Thursday, June 30, 2022

हनुमान जयंती

 हनुमान जयंती

=============

राजा दशरथाने पुत्रप्राप्‍तीसाठी `पुत्रकामेष्टी यज्ञ' केला असता, यज्ञातून अग्नीदेव प्रकट होऊन त्याने दशरथाच्या राण्यांसाठी पायस प्रदान केले होते. दशरथाच्या राण्यांप्रमाणेच तपश्चर्या करणार्‍या अंजनीलाही पायस (खीर, यज्ञातील अवशिष्ट प्रसाद) मिळाले होते व त्यामुळेच मारुतीचा जन्म झाला होता. त्या दिवशी चैत्रपौर्णिमा होती. तो दिवस `हनुमानजयंती' म्हणून साजरा करतात. वाल्मीकि-रामायणामध्ये (किष्किंधाकांड, सर्ग ६६) पुढीलप्रमाणे हनुमानाची जन्मकथा दिली आहे : 

अंजनीच्या पोटी हनुमान जन्मला. जन्म झाल्यावर `उगवणारे सूर्यबिंब हे एखादे पक्वफळ असावे', या समजुतीने हनुमानाने आकाशात उड्डाण करून त्याकडे झेप घेतली. त्या दिवशी पर्वतिथी असल्यामुळे सूर्याला गिळण्यासाठी राहु आला होता. सूर्याकडे झेपावणारा हनुमान हा दुसरा राहुच आहे, या समजुतीने इंद्राने त्याच्यावर वज्र फेकले. ते हनुवटीला लागून ती छाटली गेली. यावरून त्याला हनुमान हे नाव पडले.
 
उत्सव साजरा करण्याची पद्धत
 या दिवशी हनुमानाच्या देवळात सूर्योदयाच्या आधीपासून कीर्तनाला सुरुवात करतात. सूर्योदयाला कीर्तन संपते व हनुमानाचा जन्म होतो. त्यानंतर हनुमानाच्या मूर्तीची पूजा करतात व सर्वांना प्रसाद म्हणून सुंठवडा देतात.
 
हनुमान जयंतीला मारुतीचा नामजप जास्तीतजास्त का करावा ?

   `हनुमान जयंती' या तिथीला मारुतीचे तत्त्व पृथ्वीवर नेहमीच्या तुलनेत १००० पटीने कार्यरत असते. या दिवशी `श्री हनुमते नम: ।' हा नामजप जास्तीतजास्त केल्याने नेहमीपेक्षा जास्त प्रमाणात कार्यरत असलेल्या मारुतित्त्वाचा आपल्याला लाभ मिळतो.

  जन्मत:च मारुतीने सूर्याला गिळण्यासाठी उड्डाण केले अशी जी कथा आहे, तीतून वायूपुत्र (वायूतत्त्वातून निर्माण झालेला) मारुति हा सूर्याला (तेजतत्त्वाला) जिंकणारा होता, हे लक्षात येते. पृथ्वी, आप, तेज, वायू व आकाश या तत्त्वांत वायूतत्त्व हे तेजतत्त्वापेक्षा जास्त सूक्ष्म, म्हणजे जास्त शक्‍तीमान आहे.
 
कठोर आराधनेमुळे अंजनाच्या पोटी शंकराचा जन्म
मुनीच्या आदेशानुसार अंजना वायुदेवाची आराधना करते. वायुदेव प्रसन्न होतात. स्वत:च तिच्या पोटी जन्म घ्यायचे आश्‍वासन देतात. काही वर्षे जातात. अंजनेला मूल होत नाही. ती तगमगते. भगवान शंकराची उपासना करते. काही वर्षे आराधना करते. शंकराची कृपा संपादन करते. शंकर स्वत:च तिचा मुलगा होण्याचे आश्‍वासन देतात. तिला मंत्र सांगतात. अंजना आसनमांडी घालून बसते. मांडीवर हाताची ओंजळ असते. शिवमंत्राचा जप करत असते. आकाशातून घार पायसपात्र घेऊन जात असते. अवचित सुसाट वादळ सुटते. झंझावाताने घार थरथरते. पंख आणि पात्र लटपटतात. पायसपात्र खाली पडते, ते नेमके अंजनेच्या ओंजळीत ! ती ध्यानस्थ असते. शंकराचा, वायूदेवाचा हा प्रसाद ती अतीव श्रद्धेने प्राशन करते. अंजनेला दिवस जातात. मुलगा होतो. चैत्र पौर्णिमा मंगळवारी सूर्योदयाला हनुमंताचा जन्म होतो.
 
ब्राह्मतेज व क्षात्रतेज यांचे प्रतीक असलेला हनुमंत !

 हनुमंताच्या गळयातील जानवे हे ब्राह्मतेजाचे प्रतीक आहे. हनुमंत हा शिवाचा अवतार असल्याने त्याच्यात लय करण्याचे सामर्थ्य आहे. रामभक्‍ती करतांना त्याच्यात विष्णुतत्त्व आले. त्यामुळे त्याच्यात स्थितीचे (तारक) सामर्थ्यही आले. हनुमंतामध्ये ब्राह्मतेज व क्षात्रतेज दोन्ही असल्याने युद्धाच्या वेळी आवश्यकतेनुसार तो त्यांचा वापर करतो. कौरव-पांडव यांच्यातील युद्धात श्रीकृष्णाने हनुमंताला अर्जुनाच्या रथावर स्थान दिले होते. तेव्हा हनुमंताने रथ व अर्जुन यांच्यावर येणारी अस्त्रे व शस्त्रे हवेतच नष्ट केली होती.
 
भूत, राक्षस यांसारख्या वाईट शक्तींपासून रक्षण
सगळया देवतांमध्ये फक्‍त मारुतीला वाईट शक्‍ती त्रास देऊ शकत नाहीत. लंकेत लाखो राक्षस होते, तरीही ते मारुतीला काही करू शकले नाहीत. म्हणूनच मारुतीला `भुतांचा स्वामी' म्हटले जाते. भुताने कोणाला पछाडले, तर त्या व्यक्‍तीला मारुतीच्या देवळात नेतात किंवा मारुतिस्तोत्रे म्हणतात. याने त्रास न गेल्यास पछाडलेल्या व्यक्‍तीवरून नारळ उतरवून तो मारुतीच्या देवळात नेऊन फोडतात. व्यक्‍तीवरून नारळ उतरविल्याने व्यक्‍तीतील वाईट शक्‍ती नारळात येते व तो नारळ मारुतीच्या देवळात फोडल्यावर त्यातून बाहेर पडणारी शक्‍ती मारुतीच्या सामर्थ्याने नष्ट होते. त्यानंतर तो नारळ विसर्जित करतात.

लग्न न होणार्‍यांपैकी जवळजवळ ३० टक्के व्यक्‍तींचे लग्न भूत, करणी इत्यादी वाईट शक्‍तींच्या त्रासामुळे होत नाही. मारुतीच्या उपासनेने ते त्रास दूर होतात व लग्न होणे शक्य होते. (१० टक्के व्यक्‍तींचे लग्न भावी वधू किंवा वर याच्या अवास्तव अपेक्षा असल्याने होत नाही. त्या संदर्भात अपेक्षा कमी केल्या की लग्न होते. ५० टक्के व्यक्‍तींचे लग्न प्रारब्धामुळे होत नाही. प्रारब्ध मंद किंवा मध्यम असल्यास कुलदेवतेच्या उपासनेने प्रारब्धामुळे असणारा अडथळा नष्ट होऊन लग्न होऊ शकते. तीव्र प्रारब्ध असल्यास केवळ संतकृपेनेच लग्न होऊ शकते. उरलेल्या १० टक्के व्यक्‍तींचे लग्न इतर आध्यात्मिक कारणांमुळे होत नाही. त्यासाठी त्या त्या कारणाप्रमाणे उपाय योजावे लागतात.

समर्थांचे अकरा मारुती

 -------------------------------

समर्थांचे अकरा मारुती
--------------------------------

समर्थ रामदास स्वामी आणि रामभक्त हनुमान यांच्यातील एकरूपतेच्या आणि दोघांमधील दैवी संबंध सिद्ध करणा-या अनेक गोष्टी समर्थचरित्रात आढळतात. 
समर्थ रामदास स्वामींनी बारा वर्षं तपश्चर्या केली. त्याचवेळी श्रीराम आणि हनुमानानं त्यांना दर्शन दिलं आणि ' कृष्णातीरी जगदुद्धार कर ' असा आदेश दिला. त्यानंतर रामदासांनी भारतभर पायी भ्रमण केलं. हिंदू जनतेची मनं रामभक्तीकडे वळवून त्यांना दूरवस्थेतून बाहेर काढण्याचं त्यांनी ठरवलं. त्याचबरोबर , रामाचा संदेश पोहोचवणारा सर्वश्रेष्ठ दास मारूतीकडच्या बलाची उपासनादेखील लोकांना शिकवावी , असंही त्यांनी ठरवलं. त्यासाठी गरज होती लोकसंग्रहाची आणि लोकजागृतीची. म्हणूनच त्यांनी गावोगावी भ्रमण केलं आणि ११ मारुतींची स्थापना केली. त्यामुळे जनतेमध्ये धैर्य , वीर्य आणि बलसंपादनाची ईर्षा निर्माण झाली. 

श्रीक्षेत्र शहापूर 

समर्थांच्या अकरा मारुतींपैकी हा मारुती कालानुक्रमे पहिला मानला जातो. शके १५६६ , सन १६४५ मध्ये त्याची स्थापना झाली. 

शहापूर हे गाव तेव्हा आदिलशाहीत होतं. तेथील बाजीपंत कुळकर्णी देवभक्त होते. कामात एकदम चोख. समर्थांचा मुक्काम त्यावेळी तिथूनच जवळ असलेल्या चंद्रगिरी डोंगरावर असायचा व ते शहापुरात माधुकरी मागायला यायचे. ते बाजीपंत कुळकर्ण्यांच्या घरासमोर येताच पंतांची पत्नी सतीबाई तणतणत बाहेर यायची , समर्थांची ' गोसावडा ' म्हणून अवहेलना करायची. परंतु एक दिवस , कुळकर्ण्यांच्या घरात काहीसं दुःखी वातावरण होतं. कारण गावकीच्या हिशोबावरून बाजीपंतांना मुसलमानांनी पकडून विजापुरास नेले होते. 

सतीबाईंची अवस्था रामदासांना पाहवेना. तेव्हा समर्थ सतीबाईंना म्हणाले , " आजपासून पाचव्या दिवशी बाजीपंत सुखरूप परत आले तर तुम्ही रामनामाचा जप कराल काय ?" सतीबाई म्हणाल्या , " तसे झाले तर एकदाच का हजारदा जप करीन. " त्यानंतर रामदास निघून गेले. 

ते कारकुनाच्या वेषात आदिलशहासमोर हजर झाले आणि बाजीपंतांच्या सास-यांनी व पत्नीनं आपल्याला हिशोब समजावून सांगायला पाठवल्याचं सांगितलं. आपलं नाव त्यांनी दासोपंत सांगितलं आणि अधिका-यांना हिशोब समजावून बाजीपंतांची सुटका केली. बाजीपंतांना काहीच कळायला मार्ग नव्हता. गावाच्या वेशीवर येताच रामदास स्वामी अदृश्य झाले. बाजीपंत घरी आले , तेव्हा दासोपंतांची कथा ऐकून सगळेच आश्चर्यचकित झाले. अचानक सतीबाईंना गोसाव्याची आठवण झाली आणि त्याचं दर्शन होईपर्यंत त्यांनी अन्नपाण्याचा त्याग केला. रामदासांना हे कळताच ते कुळकर्ण्यांच्या घरी गेले. तेव्हा सतीबाईंना त्यांच्या पायावर डोकं ठेवलं. त्यांनी समर्थांकडून अनुग्रह घेतला. 

एकदा त्या रामदासांच्या दर्शनासाठी एका डोंगरावर गेल्या. रामदास नैवेद्य दाखवत असताना त्यांना मागे वळून पाहिलं तेव्हा त्यांना प्रखर तेजस्वी हनुमानाची मूर्ती दिसली. ती पाहून सतीबाई मुर्च्छित पडल्या. त्या शुद्धीवर येताच समर्थ म्हणाले , तुमच्या थोर पूर्वपुण्याईमुळे तुम्हाला आज मारुतीरायांचे दर्शन घडले. 

त्यानंतर समर्थांनी एक चुन्याची मारूतीची मूर्ती तयार केली व सतीबाईंच्याच गावात एका योग्य ठिकाणी तिची प्रतिष्ठापना केली. तीच ही शहापूरच्या देवळातली मारुतीची मूर्ती. हा मारुतीला ' शहापूरचा चुन्याचा मारुती ' असंच म्हणतात. मूर्तीचा चेहरा उग्र वाटतो आणि त्याच्या डोक्याला एक गोंड्याची टोपी आहे. येथ चैत्र शुद्ध १५ या तिथीला हनुमानजयंतीचा उत्सव साजरा केला जातो. 

श्रीक्षेत्र मसूर 

समर्थांच्या भ्रमणामुळे , त्यांच्या रसाळ कीर्तनांमुळे आणि त्यांच्या सिद्धिसामर्थ्यांमुळे त्यांचा शिष्यसंप्रदाय वाढत चालला. आपल्या शिष्यांना व आपल्याकडे आकर्षित होणा-या लोकांना एकत्र आणून त्यांच्यात परस्परांविषयी आत्मियता निर्माण व्हावी म्हणून त्यांनी रामजन्माचे व हनुमानजयंतीचे उत्सव सुरू केले. अशा उत्सवांसाठी त्यांनी काही मोक्याच्या ठिकाणी मारुतीची स्थापना केली , त्यातलाच एक मसूरचा मारुती होय. मसूर येथील ब्रह्मपुरी भागातील कुलकर्णी घराण्याला समर्थांनी अनुग्रह दिला होता. म्हणून या ब्रह्मपुरी भागातच शके १५६७ , सन १६४६ मध्ये मारुतीची स्थापना केली. हा मारुती मसूरचा मारूती म्हणून ओळखला जातो. त्याला ' महारुद्र हनुमान ' ही म्हणतात. 

ही मूर्तीसुद्धा चुन्याची आहे. समर्थांच्या अकरा मारुतीत सर्वात देखणी ही मूर्ती आहे. तिची मुद्रा सौम्य , प्रसन्न आहे आणि डोक्यावर सुरेख मुकूट आहे. गळ्यातील माळा , हार , जानवे , कटि-मेख

ला , लंगोटाचे काठ , हाताची बोटं बारकाव्याने रंगवलेली आहेत. मूर्तीच्या डाव्या उजव्या बाजूला शिवाजी महाराज व समर्थ रामदास यांची चित्रं काढलेली आहेत. 

समर्थ रामदासांनी या मारूतीची स्थापना केल्यानंतर सतत चार वर्षे येथे रामनवमीचा उत्सव केला. तिथेच समर्थांना कल्याण या शिष्याची प्राप्ती झाली होती. 

चाफळचे मारुती 

समर्थ रामदासांच्या जीवनकार्यात चाफळचे महत्त्व फार मोठे आहे. चाफळचं प्रसिद्ध राममंदिर रामदासांनी शके १५६९ , सन १६४८ मध्ये आपले शिष्य व गावकरी यांच्या मदतीने बांधलं. प्रभू रामचंद्रांनी दिलेल्या दृष्टांताप्रमाणे चाफळपासून जवळच असलेल्या अंगापूरच्या डोहातील रामाची मूर्ती त्यांनी बाहेर काढली व तिची या देवळात प्रतिष्ठापना केली. पंचवटीचा राम कृष्णेच्या खो-यात आला आणि समर्थ संप्रदायाच्या मुख्य मठाचे स्थान चाफळ हे ठरले. 

अशी आख्यायिका आहे की , ज्यावेळी प्रभू रामचंद्रांनी समर्थांना अंगापूरच्या डोहातील मूर्तीविषयी दृष्टान्त दिला त्याच वेळी मारुतीनेही समर्थांना दर्शन देऊन सांगितले की , या रामाच्या समोर माझी मूर्ती स्थापन करून तू त्या मूर्तीत प्रवेश कर आणि माझी भीममूर्ती रामाच्या देवळाच्या मागे स्थापन कर. मारुतीच्या या आदेशाप्रमाणे समर्थांनी राममंदिराच्या पुढे हात जोडून उभा असलेला दासमारुती आणि मंदिराच्या मागे प्रतापमारुती अशा दोन मूर्तींची स्थापना शके १५७० , सन १६४९ मध्ये केली. 

दासमारुती 

हा श्रीरामाच्या समोर ' दोन्ही कर जोडोनि ' उभा आहे. श्रीरामासमोर नम्र हनुमंताची मूर्ती असली पाहिजे म्हणून समर्थांनी सुंदर दगडी मंदिर बांधून त्यात दासमारुतीची स्थापना केली. ही मूर्ती सुमारे सहा फूट उंच आहे. चेह-यावर अत्यंत विनम्र भाव , समोर असलेल्या प्रभू श्रीरामाच्या चरणांवर विसावलेले नेत्र , अशी ही मूर्ती आहे. तिचे अवयव रेखीव व प्रमाणबद्ध आहेत. या दासमारूतीसाठी समर्थांनी बांधलेले मंदिर आज सुमारे सव्वातीनशे वर्षांनंतरही उत्तम स्थितीत आहे. १९६७ सालच्या भूकंपातही या मंदिरास कोठे धक्का लागला नाही , साधा तडाही गेला नाही. राममंदिराचे मात्र या भूकंपाने मोठं नुकसान झालं. त्यामुळे त्याची पुनर्बांधणी करण्यात आली आहे. परंतु समर्थकालीन सर्व शिल्प व वास्तू कायम ठेवण्यात आली आहे.  

प्रतापमारुती 

श्रीराम मंदिराच्या मागे सुमारे तीनशे फूट अंतरावर प्रतापमारुतीचे मंदिर आहे. या मारुतीला ' भीममारुती ', ' प्रताप-मारुती ' किंवा ' वीर-मारुती ' अशी तीन नावं आहेत. प्रताप-मारुतीची उंची सुमारे सात-आठ फूट आहे. मूर्ती अत्यंत भव्य , उंच व रेखीव आहे. भीमरुपी महारुद्रा या स्तोत्रात समर्थांनी वर्णन केल्याप्रमाणे पुच्छ माथा मुरडिले आहे. मस्तकावर मुकूट , कानात कुंडले आहेत. कटिभोवती सुवर्णाची कासोटी व तिला रुणझुण करणा-या घंटा आहेत. टकाराचे ठाण मांडून बसलेली ही मूर्ती नेटकी व सडपातळ आहे. समर्थांनी आपल्या विशिष्ट शैलीत ठसकेबाज वर्णन केलेली ही मूर्ती पुण्यवान भक्तांना परितोषविणारी व दुष्टांना ' काळाग्नी व काळरुद्राग्नी ' सारखी भासते. 

चाफळ मठात वास्तव्य असलं की समर्थ या मूर्तीच्या चरणतलाशी बराच वेळ बसून समोर असलेल्या बकुलवृक्षावरील वानरांच्या लीला पाहात. चाफळ गावावर आलेले कोणतेही दैवी संकट या मूर्तीच्या पूजेने दूर होते , अशी या भागातील भाविक जनतेची श्रद्धा आहे. दरवर्षी श्रावण महिन्यात महारुद्र मूर्तीला महारुद्राभिषेक करण्यात येतो व अनुष्ठानाची सांगता वद्य ३० ला यथासंग साजरी केली जाते. 

श्रीक्षेत्र शिंगणवाडी 

चाफळच्या नैऋत्येला अर्ध्या मैलावर शिंगणवाडीची टेकडी आहे. तेथील गुहेत समर्थ रामदास जप करायला जात म्हणून त्यांनी आपलं आराध्य दैवत मारुतीची तिथे स्थापना केली. चाफळच्या दोन मारुतींपाठोपाठ , शके १५७१ , सन १६५० मध्ये या मूर्तीची स्थापना झाली असावी असे मानले जाते. चाफळ येथे मुख्य मठ स्थापन करण्यापूर्वी समर्थांचा मठ येथे होता. शिवाजी महाराज व समर्थ रामदासांची भेट या मठालगतच्या बागेतील एका शेवरीच्या झाडाखाली झाली होती. या भेटीच्या वेळी शिवाजी महाराजांकडून गुरुदक्षिणेदाखल मिळालेले होन समर्थांनी जमलेल्या लोकांवर उधळले होते , त्यातील काही नाणी अगदी परवा-परवापर्यंत  सापडत होती. 

इथून जवळच ' रामघळ ' हे समर्थांचं चिंतनाला बसण्याचं ठिकाण आहे. तसंच शिवाजी महाराजांची तहान भागवण्यासाठी समर्थांनी आपल्या कुबडीनं दगड उलथून दगडाखाली पाण्याचा झरा दाखवला ते ' कुबडीतीर्थ ' ही जवळच आहे. 

या मारुतीला खडीचा मारुती किंवा बालमारुती असंही म्हणतात. मारुतीच्या डाव्या हातात त्रिशुळासारखी वस्तू आहे आणि दुसरा हात उगारलेला आहे. रामदासांच्या अकरा मारुतींमध्ये हे देऊळ सर्वात छोटं आहे. 

श्रीक्षेत्र उंब्रज 

समर्थ रामदासस्वामी चाफळहून रोज उब्रज येथे स्नानाला जात असत , म्हणून येथील मारुतीची स्थापना झाली असावी. मंदिराच्या जवळ कृष्णा नदीचा घाट आहे. तिथे स्नान करायचं आणि मारुतीच्या मूर्तीची पूजा करायची असा समर्थां

चा नित्यक्रम असे. या मूर्तीची स्थापना शके १५७१ , सन १६५० मध्ये झाली. या मूर्तीच्या स्थापनेनंतर समर्थांनी सतत १३ दिवस कीर्तन केलं , असा उल्लेख आहे. समर्थांना शके १५७० मध्ये उंब्रजमध्ये काही जमीन इनाम म्हणून मिळाली होती. त्यामुळे त्यांनी येथे मारुती मंदिर व त्यापाठोपाठ मठही स्थापन केला. 

समर्थांच्या अकरा मारुतींमध्ये ही मूर्ती वयानं सगळ्यात लहान वाटते. तो ' बालमारूती ' वाटतो. या मूर्तीला चांदीचे डोळे आहेत. त्याला ' उंब्रजचा मारुती ' किंवा ' मठातील मारुती ' अशी नावं आहेत. हनुमानाचं पाऊल आणि खडकावर उमटलेला श्रीराम जय राम जय जय राम हा त्रयोदशाक्षरी मंत्र या दोन्हीच्या खुणा अजून इथे आहेत. रामदास बुडत असताना मारुतीनं त्यांना वाचवलं त्यावेळी उमटलेलं ते हनुमानाचं पाऊल असल्याचं मानलं जातं. 

श्रीक्षेत्र माजगाव 

माजगावच्या शिवेवर साधारण घोड्याच्या आकाराचा एक मोठा धोंडा होता. लोक त्या धोंड्यालाच ग्रामरक्षक मारुती म्हणून पूजीत असत. एकदा समर्थ त्या गावी गेले असताना , त्यांना गावक-यांनी तो धोंडा दाखवला व ' तुमच्या पवित्र हातांनी या मारुतीची प्रतिष्ठापना व्हावी ' अशी विनंती केली. 

गावक-यांची श्रद्धा पाहून समर्थांनी त्या धोंड्यावर मारुतीची प्रतिमा कोरून घेतली व शके १५७१ , सन १६५० मध्ये त्या मारुतीची उत्सवपूर्वक स्थापना केली व तेथे देऊळही उभे केले. आजचं तिथलं देऊळ श्रीधरस्वामींनी  बांधलेले आहे. माजगावचा मारुती याच नावानं हा मारुती ओळखला जातो. 

सध्या तिथे असणारे मारुतीचे मंदिर श्रीधरस्वामींनी उभारले आहे. मूर्ती पाच फूट उंचीची आहे. मूर्तीचे तोंड पश्चिमेला म्हणजे चाफळच्या मारुतीकडे आहे. देवळाच्या पूर्वेकडील बाहेरच्या भिंतींवर आकाशोड्डाण करणा-या हनुमंताचे सुंदर चित्र रेखाटले आहे. 

श्रीक्षेत्र बहे बोरगाव 

कृष्णा नदीकाठी वाळवे तालुक्यात असलेल्या बहे-बोरगाव हे समर्थस्थापित मारुतीचे जागृत आणि रम्य स्थान आहे. येथील नदीत रामलिंग नावाचे बेट आहे. तेथे एक राममंदिर असून राममूर्तीच्या पुढ्यात शिवलिंग आहे. या मारुतीचे हात कृष्णेचा प्रवाह अडवण्याच्या स्थितीत आहेत असे वाटतात. आकाराने भव्य असलेल्या या मूर्तीची स्थापना समर्थांनी इसवीसन १६५२ मध्ये केली असे मानले जाते. 

या स्थानाबद्दल एक अख्यायिका सांगितली जाते. रावणवध करुन सीतेसह परत येत असताना रामलक्ष्मणांनी बाहे गावात मुक्काम केला. सीतामाईंना गावात ठेवले आणि ते कृष्णेत स्नानासाठी गेले. स्नानानंतर श्रीराम शिवलिंगाची पूजा करण्यात मग्न असताना नदीचा प्रवाह एकदम वाढू लागला. मारुतीरायांनी लगेचच रामाच्या मागे नदीत उभे राहून दोन्ही हातांनी कृष्णेचा प्रवाह रोखला. मारुतीने प्रवाह रोखल्यामुळे प्रवाह दोन बाजूंनी पुढे गेला आणि मध्ये बेट तयार झाले. म्हणूनच या स्थानाला बाहे असे नाव पडले. 

समर्थ तिथे आले तेव्हा त्यांना ही लोकांकडून ही हकीगत कळली. मारुती नदीत उडी मारुन बसला आहे असा गावक-यांचा समज होता. जेथे रामाने वास केला तेथे मारुती असणारच असे समर्थांनीही मानले. समर्थांनी डोहात उडी मारली. काही काळ ते डोहात होते. पण त्यावेळी गावरक-यांकडून पूजेची तयारी झाली नव्हती. त्यामुळे मारुतीराय पुन्हा डोहात लुप्त झाले. समर्थांनी ते रुप आठवून दुसरी मूर्ती तयार केली आणि तिची रामाच्या मूर्तीमागे स्थापना केली. 

अत्यंत निसर्गरम्य असणा-या या क्षेत्राचा कृष्ण महात्म्यात ' बाहुक्षेत्र ' असा उल्लेख आढळतो. 

श्रीक्षेत्र मनपाडळे 

ज्योतिबाचा डोंगर आणि पन्हाळगड येथून जवळ असलेला आणि सर्वात दक्षिणेकडचा समर्थस्थापित मारुती म्हणजे श्रीक्षेत्र मनपाडळे. पन्हाळगडाचे राजकीय महत्त्व लक्षात घेऊन समर्थांनी या मारुतीची स्थापना केली असावी. 

नदीच्या अगदी टोकावर वसलेल्या या मारुती मंदिराचा गाभारा ७ X ६ फूट असून त्याभोवती २६ X १५ फूट असा सभामंडप आहे. मंदिर कौलारू आहे आणि त्याच्याजवळून ओढा वाहतो. बलभीम मारुतीची मूर्ती उत्तराभिमुख आहे. साधारणतः साडेपाच फूटाची ही मूर्ती साधी पण सुबक आहे. 

श्रीक्षेत्र शिरोळे 

नागपंचमीच्या सणासाठी प्रसिद्ध असलेल्या शिराळे या गावात महादजी साबाजी देशपांडे हे समर्थशिष्य राहत असत. त्यांच्या आग्रहास्तव समर्थांनी इसवीसन १६५५ मध्ये येथे मारुतीची स्थापना केली. तेव्हापासून या मारुतीच्या पूजेची जबाबदारी देशपांडे कुटुंबांकडे आहे. 

हे देऊळ उत्तराभिमुख असून मूर्तीचे तोंडही उत्तरेकडे आहे. ही सात फूट उंचीची वीरमारुतीची मूर्ती असून तिच्या कंबरपट्ट्यात घंटा , कटिवस्त्र आणि गोंडा चितारलेला आहे. मूर्तीच्या मस्तकाच्या डाव्या-उजव्या बाजूला झरोके असून त्यातून मूर्तीभोवती हवा खेळती राहते. सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी या झरोक्यातून मूर्तीवर प्रकाश पडतो आणि फार सुंदर दृश्य दिसते. देवळाच्या दक्षिण दिशेलाही एक प्रवेशद्वार आहे. 

श्रीक्षेत्र पारगाव 

क-हाड कोल्हापूर रस्त्यावरील वाठार गावापासून वारणा साखर कारखान्याकडे जाणा-या रस्त्यावर नवे पारगा

व आहे. या नव्या पारगावाच्या उत्तरेस दोन मैलावर जुने पारगाव आहे. या जुन्या पारगावचा मारुती म्हणजेच समर्थांनी स्थापलेला शेवटचा मारुती.

अकरा मारुतींपैकी या मारुतीची मूर्ती सर्वात लहान मानली जाते. या मूर्तीची उंची फक्त दीड फूट आहे. एका सपाट दगडावर ही मूर्ती कोरलेली असून या मारुतीने केसाची शेंडी बांधलेली आहे. तो डावीकडून तोंड करुन धावत निघालेला आहे. समर्थाच्या इतर मूर्तीहून ही मूर्ती इतकी निराळी आहे की ही मूर्ती समर्थांची नव्हे अशी शंका यावी. 


💫 संकलित माहिती

भक्ती ☀️


     🚩 भक्ती हा संस्कृत हा शब्द मूळ धातू किंवा क्रियापद 'भज्' वरून आला आहे. 
ज्याचा अर्थ आहे, 
"विभागणे, वाटणे, सहभागी होणे, भाग घेणे, भाग असणे".
"आत्मीयता, भक्तीभाव, आवड, आदर, विश्वास किंवा प्रेम, पूजा, आध्यात्मिकतेप्रती असलेली पावित्र्याची भावना, धार्मिक मूल्ये किंवा मुक्तीचे मार्ग" असेही या शब्दाचे अर्थ होतात.

     🚩 परमेश्वराचे स्वरूप प्रेमाने समजून घेऊन, मन तद्नूरूप करणे यालाच भक्ती असे म्हणतात. पण हे अलोट प्रेम, निष्काम, निरहेतुक, आणि कायमचे असायला हवे, कारण काही तरी म्हणून भक्ती केली की, ती व्यापारी स्वरूपाची, राजस भक्ती होते आणि त्यामुळे पूर्ण चित्तशुद्धी होत नसते.

     🚩 श्वेताश्वतर उपनिषदामध्ये भक्तीची व्याख्या सहभाग, समर्पण आणि कोणत्याही प्रयत्नामध्ये असलेली आत्मीयता अशी केली गेली आहे. मोक्ष मिळविण्यासाठी सांगितल्या गेलेल्या तीन आध्यात्मिक मार्गांपैकी एक म्हणून भक्ती योगाची भगवद्गीतेमध्ये सखोल चर्चा केली गेली आहे.

     🚩 एखादी व्यक्ती भक्ती करते म्हणजे ती आपली सर्व सुखदुःखे आपल्या आराध्याला सांगते, त्याच्याशी शेअर करते, असा अर्थ करता येतो. 

     🚩 भक्ती ही भागवताप्रमाणे नऊ प्रकारची असून, नारद भक्तीसूत्रात तिचे अकरा फरक सांगितले आहेत. भक्ती कोणत्याही प्रकारची असली तरी भगवंतावर निरातिशय, निरहेतुक प्रेम करणे हा त्याचा पाया आहे.

     🚩 भक्तीचे जे महत्त्व आहे ते मुळात भजन-पूजनात नसून भक्ताच्या भावात आहे. 

     🚩 कामना मनात ठेवून भक्ती करताना मनुष्य ईश्वराचा वापर फक्त इच्छा पुरी व्हावी याकरिता करतो. म्हणजे, सकाम भक्तीमध्ये ईश्वर साध्य नसून केवळ साधन असतो. त्यामुळे, या प्रकारे ईश्वराची प्राप्ती झाली नाही तर त्यात नवल ते काय? 

     🚩 मात्र, जेव्हा मनुष्य निष्काम भक्ती करतो, त्याचे मन त्याच्या आराध्याकडे एकरूप करतो, त्यावेळी ईश्वर हे साध्य बनते. ईश्वराची प्राप्ती व्हावी हेच उद्दिष्ट निष्काम भक्तीत असते. त्यामुळे, त्याला त्याचे साध्य प्राप्त होते. यामुळेच, बहुधा विविध उपचार आणि कर्मकांड याहूनही भाव महत्त्वाचा. 

     🚩 देव फक्त भावाचा भुकेला आहे असे तुकोबा म्हणतात - 

‘देव भावाचा भुकेला
दास सेवकाचा झाला । 
पहा महिमा आवडीची
फळे खाय भिल्लिणीची ।। 
पोहे सुदामदेवाचे
फके मारी कोरडेची । 
न म्हणे उच्छिष्ट अथवा
थोडें तुका म्हणे भक्तिपुढे ।।’

     🚩 थोडक्यात सांगायचं म्हणजे...

🙏 भक्ति हा निष्ठेचाच प्रकार आहे. 

🙏 पतिनिष्ठा, राजनिष्ठा, स्वामीनिष्ठा, ही मूल्ये जाणणारेच भक्ति करू जाणतात ! 

🙏 भक्ति म्हणजे बावळटपणा नव्हे. 

🙏 जे लोक भक्ति म्हणजे भित्रेपणा म्हणतील त्यांच्या बुद्धीची कीव करावी तेवढी थोडीच ! 

🙏 ज्यांना निष्ठा माहित नाही त्यांना भक्ति ही प्रयत्नांनी आत्मसात करावी लागते. 

🙏 अभ्यासाने प्रयत्नांनी सर्व काही साधते. 

🙏 निष्ठेची धार असणाऱ्यांमध्ये भक्ति सहजच खेळते पण तेथे विवेक जागृत हवा, नित्यानित्य, शुद्धाशुध्दतेची जाण हवी. 

🙏 भक्ति हा हट्ट आहे पण तो प्रेमाचा हट्ट आहे. 

🙏 भक्ति हा लोचटपणा नक्कीच आहे पण तेथे स्वार्थ कदापीही नाही. 

🙏 भक्ति हा स्वार्थ आहेच पण अप्पलपोटेपणा म्हणता येणार नाही. 

🙏 भक्ति ही निष्ठा आहे पण दगा नाही. 

🙏 भक्ति म्हणजे अगदी निस्सीम, निःस्वार्थ परिपूर्ण प्रेम !

आपला दिवस...
आपल्या आराध्याची...
भक्ति करण्यात जाओ...!!


केदारनाथ मंदिर - एक न उलगडलेल कोडं

केदारनाथ मंदीराचे निर्माण कोणी केलं याबाबत अनेक गोष्टी सांगितल्या जातात.  अगदी पांडवांपासून ते आद्य शंकराचार्य पर्यंत. पण आपल्याला त्यात जायच नाही. 

केदारनाथ मंदिर हे साधारण ८ व्या शतकात बांधलं गेलं असावं असे आजचं विज्ञान सांगत. म्हणजे नाही म्हटलं तरी हे मंदिर कमीतकमी १२०० वर्षांपासून अस्तित्वात आहे. 


केदारनाथ जिकडे आहे तो भूभाग अत्यंत प्रतिकूल असा आज २१ व्या शतकातही आहे. एका बाजूला २२,००० 

फूट उंचीचा केदारनाथ डोंगर, दुसऱ्या बाजूला २१,६०० 

फूट उंचीचा करचकुंड तर तिसऱ्या बाजूला २२,७०० 

फुटाचा भरतकुंड. अशा तीन पर्वतातून वाहणाऱ्या ५ नद्या 

मंदाकिनी, मधुगंगा, चीरगंगा, सरस्वती आणि स्वरंदरी. 

ह्यातील काही ह्या पुराणात लिहिलेल्या आहेत. 


ह्या क्षेत्रात फक्त "मंदाकिनी नदीच" राज्य आहे. थंडीच्या 

दिवसात प्रचंड बर्फ तर पावसाळ्यात प्रचंड वेगाने 

वाहणार पाणी. अशा प्रचंड प्रतिकूल असणाऱ्या जागेत 

एक कलाकृती साकारायची म्हणजे किती खोलवर 

अभ्यास केला गेला असेल. 


"केदारनाथ मंदिर" ज्या ठिकाणी आज उभे आहे तिकडे 

आजही आपण वाहनाने जाऊ शकत नाही. अशा ठिकाणी त्याचं निर्माण कां केल गेलं असावं ? त्याशिवाय 

१००-२०० नाही तर तब्बल १००० वर्षापेक्षा जास्ती काळ 

इतक्या प्रतिकूल परिस्थितीत मंदिर कसं उभं राहील 

असेल ? हा विचार आपण प्रत्येकाने एकदा तरी करावा. 

जर पृथ्वीवर हे मंदिर साधारण १० व्या शतकात होतं तर 

पृथ्वीवरच्या एका छोट्या "Ice Age" कालखंडाला हे 

मंदिर सामोरं गेलं असेल असा अंदाज वैज्ञानिकांनी बांधला. 


साधारण १३०० ते १७०० ह्या काळात प्रचंड हिमवृष्टी 

पृथ्वीवर झाली होती व हे मंदिर ज्या ठिकाणी आहे तिकडे 

नक्कीच हे बर्फात पूर्णतः गाडलं गेलं असावं व त्याची 

शहानिशा करण्यासाठी "वाडिया इंस्टीट्युट ऑफ जीओलोजी डेहराडून" ने केदारनाथ मंदिरांच्या दगडांवर "लिग्नोम्याटीक डेटिंग" हि टेस्ट केली. लिग्नोम्याटीक डेटिंग टेस्ट हे "दगडांच आयुष्य" ओळखण्यासाठी केली जाते. ह्या टेस्टमध्ये अस स्पष्ट दिसून आलं कि साधारण १४ व्या शतकापासून ते १७ व्या शतकाच्या अर्ध्यापर्यंत हे मंदिर पूर्णतः बर्फात गाडलं गेलं होत. तरीसुद्धा कोणतीही इजा मंदिराच्या बांधकामाला झालेली नाही. 


सन २०१३ मध्ये  केदारनाथकडे ढगफुटीने आलेला प्रलय 

सगळ्यांनी बघितला असलेच. ह्या काळात इकडे "सरासरी पेक्षा ३७५% जास्त" पाऊस झाला. त्यानंतर आलेल्या प्रलयात तब्बल "५७४८ लोकांचा जीव गेला" (सरकारी आकडे). "४२०० गावाचं नुकसान" झालं.  तब्बल १ लाख १० हजार पेक्षा जास्त लोकांना भारतीय वायूसेनेने एअरलिफ्ट केलं. सगळंच्या सगळं वाहून गेलं. पण ह्या प्रचंड अशा प्रलयातसुद्धा केदारनाथ मंदिराच्या पूर्ण रचनेला जरासुद्धा धक्का लागला नाही हे विशेष.


"अर्किओलॉजिकल सोसायटी ऑफ इंडिया" यांच्या मते 

ह्या प्रलयानंतरसुद्धा मंदिराच्या पूर्ण स्ट्रक्चरच्या ऑडीट 

मध्ये १०० पेकी ९९ टक्के मंदिर पूर्णतः सुरक्षित आहे. 

"IIT मद्रास" ने मंदिरावर "NDT टेस्टिंग" करुन 

बांधकामाला २०१३ च्या प्रलयात किती नुकसान झालं 

आणि त्याची सद्यस्थिती ह्याचा अभ्यास केला. त्यांनी पण 

हे मंदिर पूर्णतः सुरक्षित आणि मजबूत असल्याचा निर्वाळा दिला आहे.  


दोन वेगळ्या संस्थांनी अतिशय "शास्त्रोक्त आणि वैज्ञानिक" पद्धतीने केलेल्या चाचण्यात मंदिर पास नाही 

तर "सर्वोत्तम" असल्याचे निर्वाळे आपल्याला काय 

सांगतात ? तब्बल १२०० वर्षानंतर जिकडे त्या भागातले सगळं वाहून जाते, एकही वास्तू उभी रहात नाही. 

तिकडे हे मंदिर दिमाखात उभ आहे आणि नुसतं उभं 

नाही तर अगदी मजबुत आहे.  ह्या पाठीमागे श्रद्धा 

मानली तरी ज्या पद्धतीने हे मंदिर बांधल गेलं आहे. ज्या 

जागेची निवड केली गेली आहे. ज्या पद्धतीचे दगड आणि 

संरचना हे मंदिर उभारताना वापरली गेली आहे त्यामुळेच 

हे मंदिर ह्या प्रलयात अगदी दिमाखात उभं राहू शकलं 

असं आजच विज्ञान सांगतं आहे.


हे मंदिर उभारताना "उत्तर–दक्षिण" असं बांधलं गेलं आहे. भारतातील जवळपास सगळीच मंदिर ही "पूर्व–पश्चिम" अशी असताना केदारनाथ "दक्षिणोत्तर" बांधलं गेलं आहे. याबाबत जाणकारांच्या मते जर हे मंदिर  "पूर्व-पश्चिम" असं असतं, तर ते आधीच नष्ट झालं असतं. किंवा निदान २०१३ च्या प्रलयात तर नक्कीच नष्ट झालचं असतं. 


पण ह्याच्या दिशेमुळे केदारनाथ मंदिर वाचलं आहे. 

दुसरी गोष्ट म्हणजे ह्यात जो दगड वापरला गेला आहे तो 

प्रचंड कठीण आणि टिकाऊ असा आहे. अन् विशेष 

म्हणजे जो दगड या मंदिराच्या बांधकामासाठी वापरला 

गेला आहे तो दगड तिकडे उपलब्ध होत नाही मग फक्त 

कल्पना करा की ते दगड तीथंपर्यंत वाहून नेलाच कसा 

असेल ?  एवढे मोठे दगड वाहून न्यायला (ट्रांसपोर्ट करायला) त्याकाळी एवढी साधनंसुद्धा उपलब्ध नव्हती.  या दगडाची विशेषता अशी आहे कि वातावरणातील फरक तसेच तब्बल ४०० वर्ष बर्फाखाली राहिल्यावर पण त्याच्या "प्रोपर्टीजमध्ये" फरक झालेला नाही.  

 

त्यामुळे मंदिर निसर्गाच्या अगदी टोकाच्या कालचक्रात 

आपली मजबुती टिकवून आहे. मंदिरातील हे मजबूत दगड कोणतही सिमेंट न वापरता "एशलर" पद्धतीने 

एकमेकात गोवले आहेत. त्यामुळे तपमानातील बदलांचा कोणताही परिणाम दगडाच्या जॉइंटवर न होता मंदिराची 

मजबुती अभेद्य आहे. २०१३ च्या वेळी एक मोठा दगड 

विटा घळई मधून मंदिराच्या मागच्या बाजूला अडकल्याने 

पाण्याची धार ही विभागली गेली आणि मंदिराच्या दोन्ही 

बाजूने पाण्याने सर्व काही आपल्यासोबत वाहून नेलं  

पण मंदिर आणि मंदिरात शरण आलेले लोक सुरक्षित 

राहिले. ज्यांना दुसऱ्या दिवशी भारतीय वायूदलाने 

एअरलिफ्ट केलं होतं. 


श्रद्धेवर विश्वास ठेवावा की नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण तब्बल १२०० वर्ष आपली संस्कृती, मजबुती 

टिकवून ठेवणार मंदिर उभारण्यामागे अगदी जागेची निवड करण्यापासून ते त्याची दिशा, त्याच बांधकामाचं 

मटेरियल आणि अगदी निसर्गाचा पुरेपूर विचार केला गेला ह्यात शंका नाही.  "Titanic जहाज" बुडाल्यावर 

पाश्चिमात्य देशांना "NDT टेस्टिंग" आणि "तपमान" कसं 

सगळ्यावर पाणी फिरवू शकते हे समजलं. पण आमच्याकडे तर त्याचा विचार १२०० वर्षापूर्वी केला गेला 

होता. 


केदारनाथ त्याच ज्वलंत उदाहरणं नाही का ? काही महिने पावसात, काही महिने बर्फात, तर काही वर्ष बर्फाच्या आतमध्ये राहून सुद्धा ऊन, वारा, पाऊस ह्यांना पुरुन उरत समुद्रसपाटी पासून ३९६९ फूट वर "८५ फूट उंच, १८७ फूट लांब, ८० फूट  रुंद" मंदिर उभारताना त्याला तब्बल "१२ फूटाची जाड भिंत आणि ६ फूटाच्या उंच प्लॅटफोर्मची मजबूती" देताना किती प्रचंड विज्ञान वापरलं असेल ह्याचा विचार जरी केला तरी आपण स्तिमित होतोय. 


आज सगळ्या प्रलयानंतर पुन्हा एकदा त्याच भव्यतेने "१२ ज्योतिर्लिंगापैकी सगळ्यात उंचीवरच" असा मान 

मिळवणार केदारनाथच्या वैज्ञानिकांच्या बांधणीपुढे आपण "नतमस्तक" होतो.


वैदिक हिंदू धर्म-संस्कृती किती प्रगत होती याचे हे एक 

उदाहरण आहे, त्याकाळी वास्तुशास्त्र, हवामानशास्त्र, 

अंतराळ शास्त्र, आयुर्वेद शास्त्र यात आपले ऋषी अर्थात 

शास्त्रज्ञ यांनी खुप मोठी प्रगती केली होती. म्हणूनच मला 

मी "हिंदु"असल्याचा अभिमान वाटतो.


|| ॐ नमः शिवाय ||                    || धर्म जागो जनार्दनाचा ||           

नामस्मरणाने चमत्कार

नामस्मरणाने खरोखर एवढे चमत्कार होतात??? स्पष्ट करुन सांगा

श्रीराम

निश्चित्तच चमत्कार म्हणु अशा घटना आपल्या आयुष्यात घडतात.सर्वप्रथम आपण अबोल होतो.एकांताची आवड निर्माण होते.बहुतेक संतांची चरित्रे वाचल्यावर आपल्या हेच लक्षात येईल.ते सुरुवातीला एकांतात होते.समाजापासुन अलिप्त रहात होते.साधना पुर्ण झाल्यावरच त्यांनी लोकांत मिसळायला सुरुवात केली...


श्रीराम

सुरुवातीला डोक्यामध्ये विचारांची खुप गर्दी होते.इतके दिवस षड् रिपु आपल्या मनात ठाण मांडून बसलेले असतात.त्यांच्यावर नामस्मरणाने हल्ला होतो.ते आपली जागा सोडू लागतात.मनात विचारांची गर्दी होणे,हे चांगले लक्षण आहे.काही साधकांना ही पायरी कळत नाही.ते घाबरुन नामस्मरण करणे सोडून देतात...


श्रीराम

काही दिवसांनी झोपेतही जप चालू होतो.जप वैखरीतून मध्यमा वाणीत आल्याचे ते लक्षण आहे...


श्रीराम

शांत झोप लागते.वेळेवर जागही येते...


श्रीराम

पशु पक्षीही साधकांना घाबरत नाहीत.साधना योग्य दिशेने जाते,हे समजण्याचे  एक महत्त्वाचे लक्षण आहे...


श्रीराम

स्वप्नात अतृप्त आत्मे येत नाहीत.नामस्मरणाने साधकाच्या सभोवती एक संरक्षक कवच तयार झालेले असते,त्यामुळे आत्म्यांना प्रवेश मिळत नाही...


श्रीराम

राग येत नाही.हे ही साधना व्यवस्थित चालल्याची खुण आहे.नामस्मरण करुनही तुम्हाला राग येत असेल तर तुम्ही नीतीनियम पाळण्यामध्ये कमी पडता,असाच त्याचा अर्थ होतो...


श्रीराम

क्रमाक्रमाने कुंडली शुद्ध होत जाते.त्या अनुषंगाने घटना घडत जातात.नामस्मरण हे ग्रहांवरही मात करणारे आहे...


श्रीराम

कुंडलीतल्या प्रत्येक स्थानाला नाव आहे.उदा.प्रथम स्थान हे स्वभाव स्थान,द्वीतिय स्थान हे धनस्थान,तृतीय स्थान हे पराक्रम स्थान वगैरे.

साधकाची प्रगती होत गेल्यावर कुंडलीतली स्थाने शुद्ध होत गेली की त्याप्रमाणेच अनुकूल घटना घडू लागतात...


श्रीराम

आश्चर्य म्हणजे सर्वसामान्य लोकांनी ऐहिक सुखासाठीच सुरुवातीला नामस्मरणाची कास धरलेली असते,पण जशी साधना पुढे जात रहाते,तशी त्यांची वासना कमी कमी होत जाते...


श्रीराम

नामस्मरणावर खुप काही लिहिण्यासारखं आहे.जितके सांगावे,तितके कमीच... !!!खरोखर एवढे चमत्कार होतात??? स्पष्ट करुन सांगा


श्रीराम

निश्चित्तच चमत्कार म्हणु अशा घटना आपल्या आयुष्यात घडतात.सर्वप्रथम आपण अबोल होतो.एकांताची आवड निर्माण होते.बहुतेक संतांची चरित्रे वाचल्यावर आपल्या हेच लक्षात येईल.ते सुरुवातीला एकांतात होते.समाजापासुन अलिप्त रहात होते.साधना पुर्ण झाल्यावरच त्यांनी लोकांत मिसळायला सुरुवात केली...


श्रीराम

सुरुवातीला डोक्यामध्ये विचारांची खुप गर्दी होते.इतके दिवस षड् रिपु आपल्या मनात ठाण मांडून बसलेले असतात.त्यांच्यावर नामस्मरणाने हल्ला होतो.ते आपली जागा सोडू लागतात.मनात विचारांची गर्दी होणे,हे चांगले लक्षण आहे.काही साधकांना ही पायरी कळत नाही.ते घाबरुन नामस्मरण करणे सोडून देतात...


श्रीराम

काही दिवसांनी झोपेतही जप चालू होतो.जप वैखरीतून मध्यमा वाणीत आल्याचे ते लक्षण आहे...


श्रीराम

शांत झोप लागते.वेळेवर जागही येते...


श्रीराम

पशु पक्षीही साधकांना घाबरत नाहीत.साधना योग्य दिशेने जाते,हे समजण्याचे  एक महत्त्वाचे लक्षण आहे...


श्रीराम

स्वप्नात अतृप्त आत्मे येत नाहीत.नामस्मरणाने साधकाच्या सभोवती एक संरक्षक कवच तयार झालेले असते,त्यामुळे आत्म्यांना प्रवेश मिळत नाही...


श्रीराम

राग येत नाही.हे ही साधना व्यवस्थित चालल्याची खुण आहे.नामस्मरण करुनही तुम्हाला राग येत असेल तर तुम्ही नीतीनियम पाळण्यामध्ये कमी पडता,असाच त्याचा अर्थ होतो...


श्रीराम

क्रमाक्रमाने कुंडली शुद्ध होत जाते.त्या अनुषंगाने घटना घडत जातात.नामस्मरण हे ग्रहांवरही मात करणारे आहे...


श्रीराम

कुंडलीतल्या प्रत्येक स्थानाला नाव आहे.उदा.प्रथम स्थान हे स्वभाव स्थान,द्वीतिय स्थान हे धनस्थान,तृतीय स्थान हे पराक्रम स्थान वगैरे.

साधकाची प्रगती होत गेल्यावर कुंडलीतली स्थाने शुद्ध होत गेली की त्याप्रमाणेच अनुकूल घटना घडू लागतात...


श्रीराम

आश्चर्य म्हणजे सर्वसामान्य लोकांनी ऐहिक सुखासाठीच सुरुवातीला नामस्मरणाची कास धरलेली असते,पण जशी साधना पुढे जात रहाते,तशी त्यांची वासना कमी कमी होत जाते...


श्रीराम

नामस्मरणावर खुप काही लिहिण्यासारखं आहे.जितके सांगावे,तितके कमीच... !!!

श्री गणपति अथर्वशीर्ष


श्री गणेशाय नमः ।

ॐ भद्रङ् कर्णेभिः शृणुयाम देवाः । भद्रम् पश्येमाक्षभिर्यजत्राः । स्थिरैरङ्गैस्तुष्टुवांसस्तनूभिः र्व्यशेम देवहितं यदायुः ।।


ॐ स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः । स्वस्ति नस्तार्क्ष्योऽअरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु ।। ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः ।।


ॐ नमस्ते गणपतये । त्वमेव प्रत्यक्षम् तत्त्वमसि । त्वमेव केवलम्कर्ताऽसि । त्वमेव केवलन् धर्ताऽसि । त्वमेव केवलम् हर्ताऽसि । त्वमेव सर्वङ् खल्विदम् ब्रह्मासि । त्वं साक्षादात्माऽसि नित्यम् ।। १ ।।


ऋतं वच्मि । सत्यं वच्मि ।। २ ।।


अव त्वम् माम् । अव वक्तारम् । अव श्रोतारम् । अव दातारम् ।अव धातारम् । अवानूचानमव शिष्यम् । अव पश्चात्तात् । अव पुरस्तात्  अवोत्तरात्तात् । अव दक्षिणात्तात् । अव चोर्ध्वात्तात् । अवाधरात्तात्  सर्वतो माम् पाहि पाहि समन्तात् ।। ३ ।।


त्वं वाङ्मयस्त्वं चिन्मयः । त्वम् आनन्दमयस्त्वम् ब्रह्ममयः । त्वं सच्चिदानन्दाद्वितीयोऽसि । त्वम् प्रत्यक्षम् ब्रह्मासि । त्वम् ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि ।। ४ ।।


सर्वम् जगदिदन् त्वत्तो जायते । सर्वम् जगदिदन् त्वत्तस्तिष्ठति । सर्वम् जगदिदन् त्वयि लयमेष्यति । सर्वम् जगदिदन् त्वयि प्रत्येति । त्वम् भूमिरापोऽनलोऽनिलो नभः त्वम् चत्वारि वा‍क्‌पदानि ।। ५ ।।


त्वं गुणत्रयातीतः । त्वं देहत्रयातीतः । त्वं कालत्रयातीतः । त्वं मूलाधारस्थितोऽसि नित्यम् । त्वं शक्तित्रयात्मकः । त्वां योगिनो ध्यायन्ति नित्यम् । त्वं ब्रह्मा त्वं विष्णुस्त्वम् रुद्रस्त्वम् इन्द्रस्त्वम् अग्निस्त्वं वायुस्त्वं सूर्यस्त्वं चन्द्रमास्त्वम् ब्रह्मभूर्भुवः स्वरोम् ।। ६ ।।


गणादिम् पूर्वमुच्चार्य वर्णादिन् तदनन्तरम् । अनुस्वारः परतरः । अर्धेन्दुलसितम् । तारेण ऋद्धम् । एतत्तव मनुस्वरूपम् । गकारः पूर्वरूपम् । अकारो मध्यमरूपम् । अनुस्वारश्चान्त्यरूपम् । बिन्दुरुत्तररूपम् । नादः सन्धानम् । संहिता सन्धिः । सैषा गणेशविद्या । गणक ऋषिः । निचृद्गायत्री छन्दः । गणपतिर्देवता । ॐ गँ गणपतये नमः ।। ७ ।।


ॐ एकदन्ताय विद्महे । वक्रतुण्डाय धीमहि । तन्नो दन्तिः प्रचोदयात् ।। ८ ।।


एकदन्तं चतुर्हस्तम्, पाशमङ्कुशधारिणम् । रदंच वरदम् हस्तैर्बिभ्राणम्, मूषकध्वजम् । रक्तं लम्बोदरं, शूर्पकर्णकम् रक्तवाससम् । रक्तगन्धानुलिप्ताङ्गम्, रक्तपुष्पैःसुपूजितम् । भक्तानुकम्पिनन् देवं जगत्कारणमच्युतम् । आविर्भूतंच सृष्ट्यादौ, प्रकृतेः पुरुषात्परम् । एवन् ध्यायति यो नित्यं स योगी योगिनां वरः ।। ९ ।।


नमो व्रातपतये, नमो गणपतये, नमः प्रमथपतये, नमस्ते अस्तु लम्बोदराय एकदन्ताय, विघ्ननाशिने शिवसुताय,वरदमूर्तये नमो नमः ।। १० ।।


              फलश्रुति

एतदथर्वशीर्षं योऽधीते  स ब्रह्मभूयाय कल्पते । स सर्वविघ्नैर्न बाध्यते । स सर्वतः सुखमेधते । स पंमहापापात् प्रमुच्यते । सायमधीयानो दिवसकृतम् पापम्  नाशयति । प्रातरधीयानो रात्रिकृतम् पापम् नाशयति । सायम् प्रातः प्रयुजानोऽअपापो भवति । सर्वत्राधीयानोऽपविघ्नो भवति । धर्मार्थकाममोक्षंच विन्दति । इदम् अथर्वशीर्षम् अशिष्याय न देयम् । यो यदि मोहाद्दास्यति स पापीयान् भवति । सहस्रावर्तनात् । यं यं काममधीते तंतं मनेन साधयेत् ।। ११ ।।


अनेन गणपतिमभिषिंचति । स वाग्मी भवति । चतुर्थ्यामनश्नन् जपति स विद्यावान् भवति । इत्यथर्वणवाक्यम् । ब्रह्माद्यावरणम् विद्यात् । न बिभेति कदाचनेति ।। १२ ।।


यो दूर्वाङ्कुरैर्यजति । स वैश्रवणोपमो भवति । यो लाजैर्यजति, स यशोवान् भवति । स मेधावान् भवति । यो मोदकसहस्रेण यजति । स वांछितफलमवाप्नोति । यः साज्यसमिद्भिर्यजति स सर्वं लभते, स सर्वं लभते ।। १३ ।।


अष्टौ ब्राह्मणान् सम्यग्ग्राहयित्वा, सूर्यवर्चस्वी भवति । सूर्यग्रहे महानद्याम् प्रतिमासन्निधौ वा जप्त्वा, सिद्धमन्त्रो भवति  महाविघ्नात् प्रमुच्यते । महादोषात् प्रमुच्यते । महापापात् प्रमुच्यते । स सर्वविद् भवति, स सर्वविद् भवति । य एवम् वेद ।। १४ ।।


ॐ भद्रङ् कर्णेभिः शृणुयाम देवाः । भद्रम् पश्येमाक्षभिर्यजत्राः । स्थिरैरङ्गैस्तुष्टुवांसस्तनूभिः र्व्यशेम देवहितं यदायुः ।।


ॐ स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः । स्वस्ति नस्तार्क्ष्योऽअरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु ।। ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः ।।


दैवी वृक्ष : औदुंबर


काश्मीरच्या पूर्वेकडील हिमालयाचा भाग, आसाम, बंगाल, ब्रह्मदेश व पश्चिम हिंदुस्थान आणि सिंहलद्वीप या प्रदेशांत हें झाड दृष्टीस पडतें. याचीं फळें अंजिरासारखीं असतात. तीं कच्चीं व पिकलेली, दोन्हीही खातात. दुष्काळांत तर त्यांचा फार उपयोग होतो. पानें हत्ती व गुरें यांना चारा म्हणून उपयोगी पडतात. लाकूड टिकाऊ नसतें तरी, त्याचीं दारें, गाडीचीं आडवी दांडकी वगैरे ओबडधोबड जिनसांकरितां उपयोग करतात. स्वयंपाक वगैरे करण्याच्या कामी याच्या लाकडांचा सरपणाकडे उपयोग करीत नाहींत. हा यज्ञिय वृक्ष असून याच्या समिधांचा (काटक्यांचा) श्रौत व स्मार्त कर्मांत उपयोग करतात. व लाकडाची यज्ञिय उपकरणेंही करतात.

नेहमी हिरवागार राहून थंडगार छाया देणारा औदुंबर वृक्ष अनेक दैवी गुणांनी युक्त आहे. भारतात सर्वत्र हा महावृक्ष आढळतो. उंबराच्या झाडाच्या आसपास जमिनीत पाणी आढळते किंबहुना, जिथे पाणी मुबलक असते अशा जमिनीत हा वृक्ष वाढतो. या वृक्षाचे काही अदभूत उपयोग पाहूया,

१. उंबराच्या सालीचा काढा करून तो थंड करावा. त्यात खडीसाखर-वेलची टाकून गुलाबी रंगाचे सरबत करावे . कॅन्सर झाल्यावर जी केमोथेरपी देतात त्यात शरीराची भयानक आग होते. त्यात हे सरबत उत्तम आहे. दिवसातून तीनदा घ्यावे.
२. अतिसार होऊन त्यातून रक्त पडत आसेल तर सालीचा काढा द्यावा.
३. जखम झाल्यावर ती धुण्यासाठी डेटोल- सेव्लोन च्या ऐवजी सालीच्या काढ्याने धुतली तर जखम वेगाने भरून येते.
४. तोंड आले असता सालीचा काढा थोडा घट्ट करून तो तोंडाला आतून लावला तर वेगाने त्रास कमी होतो.
५. गर्भाशयाची सूज कमी करण्यासाठी, रक्तप्रदर, श्वेतप्रदर, मासिक पाळीच्या अति प्रमाणात रक्तस्त्राव होत असेल, तर सालीचा काढा पोटात घ्यायला देतात. सोबत योनिमार्गाद्वारे त्याच काढ्याचा उत्तरबस्ती दिला, तर उत्तम गुण येतो.
६. गर्भाचे पोषण व्हावे, म्हणून काढा देतात. सातत्याने गर्भपात होत असेल तर गर्भ धारणेनंतर सालीचे सरबत करून प्यावे.
७. लहान मुलांना दात येताना जुलाब होतात त्यावेळी उंबराचा चिक बत्ताशासोबत देतात.
७. भस्मक नावाची एक व्याधी आहे, ज्यात व्यक्ती सारखे काही न काही खात असते. पण त्या व्यक्तीचे पोट भरत नाही. काही वेळाने परत भूक लागते. या आजारात उंबराची साल स्त्रीच्या दुधात वाटून दिली असता, ही विचित्र लक्षणे कमी होतात.
८. उचकी थांबत नसेल तर उंबराच्या फळाचा रस प्यावा.
९.काविळीत उंबराचे पिकलेले अर्धे पान विड्यातून देतात.
१०. तापात अंगाची आग होत असेल, तर पिकलेले उंबराचे फळ खायला द्यावे.
११. सरते शेवटी एक गोष्ट सांगतो, हिरण्यकश्यपूचे पोट फाडल्यावर भगवान नरसिंहाच्या बोटांचा दाह होऊ लागला. तो कशानेच थांबेना. मग त्यांनी त्यांची बोटे उंबराच्या फळात रोवली आणि त्यांचा दाह क्षणात कमी झाला.

उंबराची साल, पानें व कच्चें फळ ह्यांच्या अंगीं स्तंभक धर्म असल्यामुळें त्यांचा आमांशादि रोगांत पोटांत देण्याच्या कामीं व बाह्योपचाराच्या कामींहि उपयोग करतात. तोंडांत अथवा जिभेस गरे पडले असतां फळें पोटांत देतात. उंबर दुधांत शिजवून दिले असतां पोटांतील इंद्रियांच्या मार्गांत कांहीं अडथळा असल्यास तो दूर होतो. उंबराच्या फळांचा मधुमेहांत चांगला उपयोग होतो. पाण्यांत फळें व पानें शिजवून त्या पाण्यानें स्नान करीत राहिल्यास महारोग दूर होतो असें म्हणतात. सालीच्या अंगीं रेतस्तंभक धर्म असून तिळाच्या तेलात तिची वस्त्रगाळ पूड मिसळून दुष्ट व्रणावर लावतात. मधुमेहांत सालीचा काढा घ्यावा. कोवळ्या पानांची पूड करून मधाच्या अनुपानांत पित्तविकारावर देतात. उंबराच्या मुळीस फांसण्या टाकून त्यांतून निघणारा पातळ पदार्थ अथवा उंबराचें पाणी पौष्टिक म्हणून पोटांत देतात.

उंबराच्या झाडाखालीं किंवा जवळच पाणी लागतें असें म्हणतात. उंबराखालीं दत्ताचें वास्तव्य असतें असा समज असल्यानें त्याची पूजा करण्यांत येते, व झाड तोडणें हेंही वाइट मानलें जातें. इतर झाडांप्रमाणें उंबराला प्रथम फूल व नंतर फळ असा प्रकार होत नसून एकदम आपणांला फळच दृष्टीस पडतें. तेव्हां सशाच्या शिंगाप्रमाणें तें अशक्य व दुर्लभ असा समज होऊन ‘उंबराचें फूल’ (दुर्मिळ वस्तु) ही म्हण पडली आहे.

भगवान दत्तगुरूंना देखील ज्याच्या शीतल छायेत साधनेचा मोह आवरला नाही, अशा उंबराची अशी ही कहाणी सफळ संपूर्ण.

वास्तुशांती

 🏵 नविन घर बांधल्यावर वास्तुशांती केल्याखेरीज त्या घरात रहावयास जाऊ नये, असे म्हणतात. यास काही पर्याय वा परिहार आहेत का ? (१)

            वास्तुशांती विषयक समाजात प्रचलित असणाऱ्या समजुती परस्पर भिन्न व टोकेरी आहेत. मोठ्या शहरातीर गाळे पध्दतीने बांधलेल्या शासकीय, निमशासकीय इमारतीमधील घरात जाताना लोक वास्तुशांतीचा क्षणभरही विचार न करता, बिनदिक्कत रहावयास जातात, हे एक टोक, तर दुसरे टोक म्हणजे स्वतः बांधलेल्या घराची वास्तुशांती होण्यापूर्वी आत सामानसुमान न नेता बाहेर गाडीमध्ये आणून ठेवतात व ग्रहप्रवेश, वास्तुशांती झाल्यावर मगच गृहसाहित्य आत नेतात. वरील दोन्ही टोकेरी मतप्रणालीच्या लोकांना वास्तुशांतीचे महत्त्व, कार्य व नेमका अभिप्राय समजलेला नसतो. त्यामुळे एक अश्रध्द व दुसरा अंधश्रध्द बनतो.

           वास्तविक वास्तुशांती मागील धर्मशास्त्रकारांची तत्त्वप्रणाली अतिशय उदात्त व उच्च पातळीवरची आहे. चराचराला व्यापून उरलेल्या त्या जगदीश्वराचे अणुरेणुतही दर्शन घडते. प्रत्येक लहान-सहान, सजीव-निर्जीव वस्तुमात्रामध्ये परमेश्वर भरून उरलेला असतो. व्याष्टिसमष्टिरूपाने त्याचा आविष्कार होत असतो. तो जाणून कसा घ्यावा, ही प्रक्रिया धर्मशास्त्रकारांनी विशद करून सांगितलेली आहे.

           माणसांमध्ये एखाद्या बालकाचा जन्म होताच त्याच्यावर विविध संस्कार करण्यात येतात. त्यात जातकर्म व नामकरण हे देखील विधी आहेत. पण जातकर्म व नामकरण होईपर्यंत ते बालक एका कोपऱ्यात उपाशी ठेवून ते संस्कार झाल्यावरच त्याला घरात घ्यावे, असा अविचार कुणी करीत नाही. काही वेळा अडघणी उद्भवल्यामुळे नामकरण संस्कार दोन-तीन महिने लांबणीवर पडतो, पण त्या कालावधीतही त्या बालकाची वाढ होत असतेच व त्याच्यावर त्याचे संबंधीत लोक अपरंपार प्रेम करतातच.

           जी स्थिती बालकाची, तीच स्थिती वास्तूची असते. ज्या दिवशी पायाभरणी होते, त्याच दिवशी वास्तुनिर्मितीलाही प्रारंभ होतो. वास्तुनिर्मिती होत असताना विविध कृमी किटक, निरुपद्रवी जंतू व प्राणी , वनस्पती, विविध वृक्ष वा रोपटी यांची अकारण हत्या घडल्यामुळे त्या स्थानावरील शांती ढळलेली असते. शिवाय वास्तुनिर्मिती करणारे कामकरी, कामगार व कारागीर लोक विविध पदार्थांचे पानभक्षण करून आलेले असतात. त्यांच्या मनात चाललेल्या विचारांचे कळत नकळत प्रक्षेपण वास्तुतील कणाकणात संक्रमीत होत असते. या सर्वामुळे त्या वास्तुस्थानातील शांती नष्ट झालेली असते. यास्तव त्या वास्तुस्थानावर शांती प्रस्थापित करावी, यासाठी वास्तुशांती करावयाची असते. (अपूर्ण)
0000



वास्तुशांती

 🏵 नविन घर बांधल्यावर वास्तुशांती केल्याखेरीज त्या घरात रहावयास जाऊ नये, असे म्हणतात. यास काही पर्याय वा परिहार आहेत का ? (२)

            वास्तुशांती म्हणजे केवळ "वास्तुपुरुषाची शांती" असा अर्थ नसून  "वास्तुस्थानावरील शांती" असाही अर्थ अभिप्रेत आहे. ही वास्तुशांती केल्याखेरीज घरात प्रवेश करू नये, असा कोणत्याही शास्त्रग्रंथात दुराग्रह नाही. वास्तुशांतीला किमान अपेक्षा म्हणजे त्या घराची दारे, खिडक्या बसविलेल्या असाव्यात. अर्धवट घराची वास्तुशांती करू नये. रंगकाम व आतील सजावट, कट्टे नंतर केले तरी चालतील. घर बांधून झाल्यावर एखाद्या शुभदिनी घराच्या मुख्य भिंतीवर कुंकवाचे पट्टे ओढून घरास आम्रपल्लवादिकांनी सजवून प्रथम पत्रावळीवर तांदुळपुंज करून त्यावर भरलेला कलश ठेवून त्यात चंदनगंध, हळदीकुंकू, फूल, उदकाडी, नीरांजन व नैवेद्य यांनी पंचोपचार पूजा करावी व नमस्कार करावा. नंतर यथावकाश घरातील साहित्य नेऊन रहावयास जावे. नंतर पंचांगातील वास्तुशांती व गृहप्रवेशाचे मुहूर्त पाहून, घरातील काही अडचणी नाहीत असे पाहून आपल्या आर्थिक परिस्थितीला झेपेल त्याप्रमाणे वास्तुशांती करावी.

           घर मोठे असल्यास वास्तुपुरुषास अधिकाधिक आहुत्या द्याव्यात. वास्तुनिक्षेप (वास्तुप्रतिमा जमिनीत ठेवणे) नेहमी आग्नेय दिशेस करावा. त्यावर केरकचरा पडू नये. नेहमी पूजेच्या वेळी वास्तुपुरुषास नमस्कार करण्याची प्रथा ठेवावी. वर्षातून जमेल तेव्हा पंचोपचार, षोडशोपचार पूजा करावी. वास्तुशांती झाल्यावर लगेच त्याच दिवशी ते घर बंद ठेवू नये. काही दिवस तेथे वावर ठेवावा. दर दहा वर्षांनी वास्तुपूजा होणे आवश्यक आहे. त्यावेळी वास्तुनिक्षेप वगळून इतर सर्व विधी करावेत. ज्याला खऱ्या अर्थाने वास्तुशांतीचे फळ व फायदे हवे असतील, त्यांनी किमान एक ग्रॅमची व जास्तीत जास्त कितीही वजनाची सोन्याची पूर्णाकृती वास्तुप्रतिमा काही दिवस अगोदर आणून तिचे किमान १२/१२ सूक्तांनी आग्युत्तारण करून प्राणप्रतिष्ठा करावी.

           दररोज पंचामृत पूजा व "वास्तोष्पते" ह्या सूक्ताचा अभिषेक करावा. जितका अभिषेक जास्त होईल, तितकी वास्तुदेवता अधिकाधिक जागृत व प्रगल्भ होऊन, त्या घरात अधिकाधिक सुखशांती, समाधान लाभते. वास्तुशांतीच्या आसपास उदकशांती करून घेणेही तितकेच आवश्यक असते. घरात सोयर, सूतक, रजस्वला यांचे विविध विटाळ झाल्यामुळे पाणी व अन्न यावर कुसंस्कार होतात. यासाठी उदकशांतीही करावी. वास्तविक वास्तुशांती जशी दहा वर्षातून एकदा तरी, तशी उदकशांतीही प्रत्येक वर्षी किमान एकदा करावी, असा शास्त्रसंकेत आहे.

           वास्तुशांतीच्या दिवशीच पाहुणचार मोठ्या प्रमाणात केल्यास यजमानाचे लक्ष पाहुण्यात व आहेरात गुंतल्यामुळे एकाग्रता भग्न पावून वास्तुशांतीचा विधी समाधानकारकरित्या होऊ शकत नाही. यासाठी आदल्या दिवशी वास्तुशांती व इच्छा असल्यास दुसऱ्या दिवशी किंवा नंतर सवडीने सत्यनारायणासारखी एखादी महापूजा आयोजित करून मोठ्याप्रमाणात भोजन समारंभ आयोजित करण्यास हरकत नाही. (पूर्ण)

संदर्भ : वेदवाणी प्रकाशन.

श्रीगणेश म्हणून सुपारीची पूजा का केली जाते?

कोणत्याही शुभकार्यात गणेशाला प्रथम पूजेचा मान आहे. गणपती म्हणून सुपारीची प्रतिष्ठापना करून त्याची पूजा केली जाते. असे करण्यामागे स्मृतिग्रंथात काही उल्लेख आढळतात.

या ग्रंथात म्हटल्याप्रमाणे सुपारी हे पूर्ण फळ आहे. कुठल्याही प्रकारची पोकळी नसलेले हे फळ आहे.

प्राचीन काळी सत्य युगात ऋषी-मुनी आपल्या साधनेने देवांचे ध्यान करून त्यांना आवाहन करत असत. त्या तपश्चर्येमुळे देव प्रकट व्हायचे. मात्र, कलियुगात हे शक्य नाही. मनुष्याला पूर्वीप्रमाणे आराधना करणे शक्य नसल्याने कुठल्याही पूर्ण फळाची प्रतिष्ठापना केल्यास त्यात देवता वास करेल, असे पुराणात सांगितले आहे. त्यामुळे तांदळाच्या राशीवर सोळा उपचाराने सुपारीचे पूजन केल्यास त्यामध्ये देवता वास करते, असा विश्वास आहे. तांदूळ हे देवाचे अन्न असल्याने ते पवित्र मानले जाते.

कुठल्याही शुभकार्याप्रसंगी, पूजेच्या वेळी तांदळाच्या राशीवर सुपारीची प्रतिष्ठापना केली जाते. त्या सुपारीला ध्यान, आवाहन, आसन अर्घ्य, पंचामृत स्नान, गंधोदक स्नान, सुमंगलस्नान, पुष्पस्नान, हिरण्यस्नान, शुद्धोदक स्नान या पद्धतीने त्या सुपारीवर उपचार करून, सुपारीची प्रतिष्ठापना केली जाते.

तसेच मंत्रोच्चाराने त्या देवतेला बोलावले जाते. त्या आराधनेच्या बळावर त्या पूजेत आपला लाडका बाप्पा सुपारीच्या रूपात तेथे हजेरी लावतो.

संकलन :- सतीश अलोणी @

🔸शंखाची उत्पत्ती

 श्री स्वामी समर्थ।।


त्वं पुरा सागरोत्पन्न: विष्णुना विधृते करे।
असत: सर्वदेवानां पांचजन्य नमोस्तुते॥ अशी प्रार्थना करून शंखास पूजेमध्ये मानाचे स्थान दिले जाते.

शंखाचे एकूण तीन भाग पडतात. (१) शंखाची पन्हळ, (२) ज्या ठिकाणाहून शंखात घातलेले पाणी पडते ते अग्र, (३) ज्यावर वलये असतात ती मागची बाजू.

ब्रह्मवैवर्त पुराणात शंखाच्या उत्पत्तीविषयी कथा आहे, शंखासुर नावाचा सागरापासून उत्पन्न झालेला आणि सदैव सागरातच वास्तव्य करणारा बलाढ्य राक्षस होता. या राक्षसाने जबरदस्तीने वेदहरण केले व तो सागराच्या तळाशी दडी मारून बसला. मग देवदेवता, ऋषीमुनींनी क्षीरसागरामध्ये योगनिद्रेत असलेल्या भगवान विष्णूंना जागृत केले आणि शंखासुरास धडा शिकवण्याकरिता सांगितले. भगवान विष्णूंनी मत्स्यरूप धारण करून शंखासुराचा ठावठिकाणा शोधून काढला व त्याचा शिरच्छेद करणार इतक्यात शंखासुर म्हणाला की, भगवान आपल्या हातून मज मरण यावे याकरिताच मी वेद पळविले. आपण माझा वध अवश्य करावा; परंतु माझी एक इच्छा अशी की माझे कलेवर तुम्ही नेहमी आपल्या डाव्या हातात धारण करावे तसेच माझ्या कलेवराच्या स्पर्शाच्या जलाने आपणांस स्नान केल्याखेरीज आपली पूजा पूर्ण होणार नाही असा मला वर द्यावा.’’

भगवान विष्णूंनी ‘तथास्तु’ म्हटले आणि शंखासुराचा वध केला. त्या दिवसापासून विष्णूने हातात शंख धारण करावयास सुरुवात केली.

देवदानवांनी केलेल्या समुद्रमंथनातून जी १४ रत्‍ने बाहेर आली त्यामध्ये एक शंख आहे.

देवपूजेमध्ये शंखपूजेचे महत्त्व अनन्यसाधारण आहेच. त्याचप्रमाणे पुरातन काळी अनेक प्रकारच्या पुण्यकर्मांच्या वेळी, विवाहप्रसंगी, युद्धाच्या वेळी शंखध्वनी खूप महत्त्वाचा मानला जातो. मंदिरामध्ये शंखध्वनीचे विशेष महत्त्व आहे. तंत्रोक्त विधीमध्ये शंखाद्वारे अभिषेकाचे अलगच महत्त्व आहे. शंखध्वनींमुळे उत्पन्न होणार्‍या कंपनांमुळे सभोवतालचे वातावरण शुद्ध व पवित्र होते. तसेच तो फुंकणार्‍या व्यक्तीची फुप्फुसाची क्षमता वाढून तेज व ओजवृद्धी होते. पुरातन काळापासून शंख हे विजयाचे, सुखसमृद्धीचे प्रतीक मानले जाते.

शंख चंद्रसूर्यासमान देवस्वरूप आहे. त्याच्या मध्यभागी वरुण, पृष्ठभागात ब्रह्मदेव आणि अग्रभागी गंगा व सरस्वतीचे वसतिस्थान आहे. त्रैलोक्यात जेवढी तीर्थे विराजमान आहेत, ती सर्व विष्णूच्या आज्ञेने शंखामध्ये निवास करतात, अशी धार्मिक कल्पना आहे. सूर्याच्या उष्णतेने ज्याप्रमाणे बर्फ वितळून जातो, त्याचप्रमाणे ‘शंखाच्या केवळ दर्शनाने पापे नष्ट होतात, तर त्याच्या स्पर्शाने काय न साध्य होईल?’ असे एक सुभाषित आहे.

बंगाली लग्नात शंख वाजवल्याशिवाय लग्नाची सुरुवात होत नाही.


।। श्री सूक्त एक विचार ।।

   देवता पंचायतनामध्ये देव्याराधनाचे सूक्त म्हणून श्रीसूक्त प्रसिद्ध आहे. ते सर्व ऐहिक कामना पूर्ती करणारे असल्यामुळे ते काम्यसूक्त म्हणून विख्यात समजले जाते. ऐहिकाची देवता, भाग्य देवता, वैभव संपत्ती. शेतीवाडी, पशुधन,धनधान्य, पुत्र पौत्र आणि सेवक परिवार अशा सर्व प्रकारची लौकिक संमृद्धी आणि तिचा उपभोग मनसोक्त घेता यावा, असे आयुआरोग्य आपल्याला लाभावे, अशी प्रार्थना या श्रीसूक्तामधे ऋषीनी केलेली आहे. 

  श्रद्धावंताच्या सर्व इच्छा पूर्ण करणाऱ्या या श्रीदेवीचे हे सूक्त भक्तांच्या पूर्ण कसोटीला उतरलेले आहे असे पाहाण्यास मिळते.तथापि हा श्रीदेवीचा सर्व विष्कार बाह्य जीवनव्यापी ऐहिकच आहे. या श्रीलक्ष्मीचे आगमनाने बाह्य अलक्ष्मी अक्काबाई दूर होते हे खरे असले, तरी त्यामुळे स्वतःच्या मोठेपणाचा ऐश्वर्यमद अंतरात निर्माण होण्याची भीती असते. हे ही तितकेच सत्य आहे आणि त्याचा परिणाम लक्ष्मी 'अपगामिनी' होण्यांत म्हणजे वाईट मार्गानी निघून जाण्यात होतो. बाह्य जीवनात ऐश्वर्य आणि अंत:करणात सुसंस्कार असतील तरच ही लक्ष्मी 'अनपगामिनी' म्हणजे स्थीर राहणारी होते. अग्नी आपल्या विविध कार्याप्रमाणे विविध नावाने ओळखला जातो. ऋषी या जातवेद अग्नीला आपले बरोबर श्रीदेवीला लक्ष्मीला घेऊन येण्याविषयी याचसाठी प्रार्थना करतो आहे की, या श्रीलक्ष्मीच्या उपभोगाचे सम्यक्ज्ञान त्यामुळे प्राप्त होईल कारण तो अग्नी सर्वज्ञ जाणता आहे. 
'गामिनी' या शब्दातून लक्ष्मी चंचल असल्याचे सूचित केले आहेच व फक्त तिचे हे गमन अपमानि घडू नये ही इच्छाही या सूक्तात प्रामुख्याने व्यक्त केलेली आहे. म्हणून स्थीर हा शब्द प्रयोग न करतां ऋषीनी 'अनपगमिनी' हा शब्द योजलेला आहे. त्या श्रीदेवीला जर गमन करावेसे वाटले, तर तिने दान धर्मातून लोकमंगल कार्यासाठीच जावे, अशीच इच्छा त्याने व्यक्त केलेली या सूक्तातून दिसून येते. श्री लक्ष्मी 'अनपगमिनी' असावी. या ऋषीच्या इच्छेमागचे वर्मही आपण समजून घेणे आवश्यक आहे. बल आणि उन्माद हे अलक्ष्मी आक्काबाईचे दोन पुत्र आहेत, असे पुराणातून वर्णन आहे. लक्ष्मी जेव्हा केवळ उपभोगाचे साधन बनते, तेव्हा तिचे ठायी हे. पुत्र जन्म
घेतात. यासाठी सावधगिरी म्हणून सत्पात्र व्यक्तीच्या हातीच श्रीदेवी राहावी. हे सूक्तरचित्या ऋषीना सांगावयाचे आहे.

त्यासाठी त्यांनी पात्रतेची कसोटी परिश्रम कष्ट हीच ठरविली आहे. परिश्रम करणाऱ्यासच श्रीलक्ष्मीचे मोल कळते. परिश्रम आणि उपभोग यांची म्हणूनच फारकत होता कामा नये. परिश्रमातून प्राप्त झालेल्या श्रीलक्ष्मीच्या कृपेस एक विशेष स्वाद, पुष्टता आणि तुष्टता प्राप्त होते. नाहीतर परिश्रम विरहित प्राप्त झालेल्या लक्ष्मीचा भोग, रोगात रूपांतरित होत असतो.
दीपावलीत लक्ष्मीपूजन करतात. आपण सोने, चांदी आणि प्रचलित नाण्याची पूजा करीत असतो. त्यावेळी या श्रीसूक्ताचा पाठ विशेषतेने केला जातो. सूक्ताची रचना संस्कृत भाषेत असल्यामुळे बहुसंख्यांना त्याचा अर्थ कळत नाही आणि सोने, नाणे दागदागिने म्हणजेच लक्ष्मी असा अत्यंत संकुचित अर्थ आपले मनांत प्रस्थापित होतो. म्हणून मुद्दाम इथे हे श्रीदेवी लक्ष्मीचे 'श्रीसूक्त' मराठी भाषेत  देत आहोत. नित्याच्या जीवनात आणि प्रासंगिक साधनेत भक्तांना त्याचा उपयोग निश्चितच होईल. 

दररोज सायंकाळी शुचिर्भूत अवस्थेत याचे किमान १६ पाठ, ते शक्य नसल्यास शुक्रवारी किंवा पोर्णिमेला तरी करणे आवश्यक आहे.

।। भावार्थ श्रीसूक्त ।।
श्री गणेशाय नमः ।
जो सर्वज्ञ जाणता । तोच श्री लक्ष्मीचा ज्ञाता ।।
जातवेद नामे विख्याता । सर्वसाक्षी अग्निदेव ।।१।।
त्यासी करितो मी प्रार्थना। लक्ष्मीस आणी आमुचे सदना।।
शुभ मार्ग आचरणा । प्रेरणा दाती श्रीदेवी ।।२।।
जिची आहे सुवर्णकांती हरिणापरिस चैतन्य गती ।
रौप्य सुवर्ण अलंकार धर्ती। ऐसी लक्ष्मी आणी घरा ।।३।।
हे सर्वात्मका जातवेदा । जी सन्मार्ग दावी सर्वदा ।
ऐसी लक्ष्मी अढळा वरदा । तूं पाचारी मजसाठी ।।४।।
जिच्या संयोगे सुवर्ण गाई । इष्टमित्र सर्वकाही ।
अवघा परिवार सुखदायी। मज होईल प्राप्त की।।५।।
लक्ष्मी असावी अनपगामिनी । जी न देते मनमानी ।
जी विचरण करी धर्मी-दानी। लोक मंगला श्रीदेवी ।।६।।
अलक्ष्मी अक्काबाई । बल उन्मादा जन्म देई ।
तिचिया योगे सर्व काही । अंती विनाश पावते ।।७।।
ती अपगामिनी बया । अनाचारी महामाया ।
तिची न पडावी कोठे छाया। ऐसी विनवणी तव पायी।।८।।
धन धान्याचा सुवर्ण रथ। त्यावर श्रीदेवी बसली स्थित।।
घोडे पळता ध्वनि उसळत । गजचित्कारा प्रमाणे ।।९।।
ऐसी लक्ष्मी आमुचे घरी । प्रसन्न वदना ईश्वरी ।
नित्य नांदावी जन्मभरी । हीच प्रार्थना करितसे ।।१०।।
सुखरूपी सुहासस्यवदनी । हिरण्यमयी तेजस्विनी ।
तृप्तिरूपी तृप्तीदायिनी । आर्द्र हृदयी पद्मारूढा ।।११।।
ऐसी श्रीदेवी प्रेमला । यश कीर्तीदाती कमला ।
आवाहन करून तिजला। विनम्र भावे बोलावितो।।१२।।
जैशी शीतल चंद्रप्रभा । ऐसी जिच्या तनुची शोभा ।
जी संतोषवी सुखगर्भा । तेजोमय देवांच्या ।।१३।।
ऐसी उदार सुकोमल । जैसी नाजुक कमलवेल ।
तिचे चरणी शिरकमल । ठेउन शरण आलो मी ।।१४।।
माझी अवकळा हरवी । अलक्ष्मी नष्ट करावी ।
ऐसी प्रार्थना माझी बरवी । पूर्ण करावी श्रीदेवी ।।१५।।
तुझ्या तपाचे फळ प्रत्यक्ष । उत्पन्न झालासे बिल्ववृक्ष ।
वनस्पतीत श्रीवृक्ष । म्हणून प्रसिद्ध जगती या ।।१६।।
त्या श्रीवृक्षाची फळे । हरोत माया मोहाचे अडथळे ।
माझ्याही श्रमाच्या तपोबळे। जीवन व्हावे विकसीत।।१७।।
न मिळो तुझ्या कृपेचा वर । हरो दैन्य दरिद्र्य समग्र ।
आदित्यवर्णे मजवर । अंतर्बाह्य कृपा करी ।।१८।।
जन्म घेतला महान राष्ट्री। मज लाभाया धन अन् कीर्ती।।
परिश्रमशील सौजन्यमूर्ति। परिचारक मज लाभावे ।।१९।।
क्षुधा तृष्णा यानी मलिन । अभद्र अलक्ष्मी तुझी बहिण ।
तिचा नाश संपूर्ण । तुझ्या कृपेने करीन मी ।।२०।।

या मातीतिल रस-गंध । आहे बहुतच कष्ट साध्य ।
परि भूमाता ही समृद्ध । रूप तुझेची श्रीदेवी ।।२१।।
चराचराची मातोश्री । वरदायिनी श्रीदेवी ।।२२।।
तुझ्या मुळेच धनधान्या। प्रसवे भूमी नित्य नवे ।।३०।।
ही रस - गंधा धरित्री । जीवाची नित्य पुष्टिदाती ।
हिचे करिता मंथन । नानाविध देते धन ।
कष्ट तपाचे साधन । जो आचरी त्यासाठी ।। २३।।
ही गोमयाने परिपूर्ण । भरली आहे संपूर्ण ।
भूतमात्राचे चैतन्य । हिचिया हाती नियंत्रित ।। २४।।
ऐसी ही श्रीदेवी शुभदा । हरी दैन्य दुःख आपदा ।
पूजनीय सदा सर्वदा । व्यक्ती समष्टीसाठी असे ।। २५।।
घर आणि राष्ट्रोद्धार । करण्या हिचाचि आधार ।
म्हणुन विनवुन वारंवार । हिज सदनी आणीतसे ।।२६।।
तिच्या कृपेचे वरदान । रक्षी धनधान्य पशुधन ।
याची जाणीव संपूर्ण । माझे ठायी नित्य वसो ।। २७।।
माझे मनिचे संकल्प । आणि वाणी मधले सत्य ।
तिनेच रक्षावे नित्य । ऐसी प्रार्थना करीतसे ।। २८।।
भाग्य वैभव आणि यश । मजला व्हावे नित्य वश ।
ऐसी कृपेची तुझ्या आस । श्रीदेवी मी धरितसे ।। २९।।
आता भूमीतिल कर्दमा । तुजला करितो मी वंदना ।
तुझे वास्तव्य नित्य । असावे शेतीवाडीत ।
पद्मासनी होवून स्थित । श्रीदेवी मग प्रगटेल ।। ३१।।
माझे कुळी तिचा वास । नित्य नांदुदे ऐसी आस ।
तुझ्या मागतो सहाय्यास । यश कीर्ती मम तव हाती।।३२।।
या भूमीतिल जलाशय । प्रसवोत स्नेह करूणामय ।
हे कर्दमा त्यांच्यासह । तूंही वसावे नित्य इथे ।।३३।।
आणि आणावी आमुचे घरी । श्रीमहालक्ष्मी परमेश्वरी ।
कुळ उध्दारक श्री ईश्वरी । प्रार्थित तुजला चिक्लिता ।।३४।।
हे सर्वज्ञा जातवेदा । कमल पुष्पानी संमृद्धा ।
भूलक्ष्मी द्यावी वरदा। सुजलाम् सुफलाम् श्रीदेवी ।। ३५।।
पिंगटवर्णी कसदार । आल्हाददायक उर्वर ।
सुवर्णदायी जलधर । श्रीदेवीला आणावी ।।३६।।
हे सर्वज्ञा अग्नीदेवा । पीक धारिणी संमृध्दा ।
कणसे लोंब्या आणि शेंगा। रूपधारिणी स्वर्णमयी।।३७।।
ऐसी भूलक्ष्मी सुवर्णमयी । अंग अलंकार तीच स्वयी ।
आर्द्रता नांदे जिचे हृदयी । भूलक्ष्मीला मज देई ।। ३८।।
हे जातवेदा ईश्वरा । सन्मार्गेच चालवी ऐसी धरा ।
श्रीदेवीच्या देउन करा । तूंचि समृद्ध करी मज ।। ३९।।
सुवर्ण गाई दासदासी । इष्ट मित्र परिवारासी ।
सुख संमृध्दीच्या अनंत राशी। येतिल मग माझे घरी।।४०।।
जो शुध्द संयमी पवित्र । व्रतस्थ राहुन जपेल सूक्त ।
या चाळिस ओव्यांचा नित्यपाठ।जीवन करी सुखदायी ।।४१।।
त्या यश कीर्ती आणि वैभव । निश्चित देइल अग्नी देव ।
या श्रीसूक्ताचा ऐसा भाव । श्रीकृष्ण भारती निवेदिता ।।४२।।
हे हिरण्यमयी श्रीसूक्त । ऋषि आनंद कर्दम चिक्लित ।
आणि आहे इंदिरासुत । ऐसे उपासके जाणावे ।।४३।।
श्री आणि अग्नि देवता । सकलकाम पूर्ती का ।
ओवी छंदातुन यासी गाता। स्वामी श्रीकृष्ण भारती।। ४४।।
श्रीलक्ष्मी प्राप्तीसाठी । करि जो धारण आपुले कंठी
जप अभिषेक हवनासाठी। त्यास लक्ष्मी तृप्त करी।।४५।।
ऐसा जाणावा अभिप्राय । सर्व सुखाची करण्या सोय ।
श्रीसूक्त हे महाचिन्मय । श्रध्दावंता फळदायी ।।४६।।
।। इतिश्री भावार्थ श्रीसूक्त संपूर्ण ।।

@ कपिल खेडेकर @

संस्कुत मध्ये असलेल श्री सुक्त

हिरण्यवर्णां हरिणीं सुवर्णरजतस्रजाम् । 
चन्द्रां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो म आवह ॥१॥
हे अग्ने (जातवेद),सोन्यासमान वर्ण असणा-या, सर्व पातकांचे हरण करणा-या (हरिणीसमान सुंदर,चपळ असणा-या), सोन्या-चांदीच्या माळा धारण करणा-या, चंद्राप्रमाणे (शीतल) असलेल्या सुवर्णमय लक्ष्मीला माझ्यासाठी आवाहन कर.

तां म आवह जातवेदो लक्ष्मीमनपगामिनीम् । 
यस्यां हिरण्यं विन्देयं गामश्वं पुरुषानहम् ॥२॥
हे अग्ने, त्या कधीही दूर न जाणा-या (अविनाशी) लक्ष्मीला माझ्यासाठी आवाहन कर, जिच्याकडून मला धन, गाय, घोडा तसेच पुरुष (नातलग,मित्र) मिळावेत.

अश्वपूर्वां रथमध्यां हस्तिनादप्रबोधिनीम् । 
श्रियं देवीमुपह्वये श्रीर्मा देवी जुषताम् ॥३॥
जिच्या मिरवणुकीत सुरुवातीला घोडे, मध्यभागी रथ आहेत (जी रथात बसलेली आहे), जेथे हत्ती ललकारी देत आहेत, अशा लक्ष्मीला मी आमंत्रित करतो. ती देवी मजवर कृपा करो.

कांसोस्मितां हिरण्यप्राकारामार्द्रां ज्वलन्तीं तृप्तांतर्पयन्तीम् । 
पद्मे स्थितां पद्मवर्णां तामिहोपह्वये श्रियम् ॥४॥
जिचे हास्य चमकदार आहे, जी सुवर्णमखरात विराजमान आहे, जी मायाळू आहे, तेजस्वी आहे, स्वतः तृप्त असून इतरांनाही तृप्त करते, जी कमळात स्थानापन्न झाली असून तिची कांती कमळाप्रमाणे आहे, अशा लक्ष्मीला मी येथे आमंत्रित करतो. ती देवी मजवर कृपा करो.

चन्द्रां प्रभासां यशसा ज्वलन्तीं श्रियं लोके देवजुष्टामुदाराम् । तां पद्मिनीमीं शरणमहं प्रपद्येऽलक्ष्मीर्मे नश्यतां त्वां वृणे ॥५॥ 
चंद्रासमान आभा असलेली, जिचे यश देदीप्यमान आहे, तिन्ही लोकात देव जिची पूजा करतात, जी उदार आहे, अशा या `ई' नामक लक्ष्मीला मी शरण जातो. माझे दारिद्र्य नष्ट होवो अशी तुला प्रार्थना करतो.
आदित्यवर्णे तपसोऽधिजातो वनस्पतिस्तव वृक्षोऽथ बिल्वः । 
तस्य फलानि तपसा नुदन्तु मायान्तरायाश्च बाह्या अलक्ष्मीः ॥६॥
हे सूर्याप्रमाणे कांती असलेल्या देवी, तुझ्या तपश्चर्येतून निर्माण झाला बेलाचा वृक्ष. त्याची फळे तपाच्या बलाने (माझ्या) अंतरीचे अज्ञान व बाहेरचे दैन्य दूर करोत.

उपैतु मां देवसखः कीर्तिश्च मणिना सह । 
प्रादुर्भूतोऽस्मि राष्ट्रेऽस्मिन् कीर्तिमृद्धिं ददातु मे ॥७॥
 देवांचा मित्र (कुबेर) कीर्ती आणि जडजवाहिर यांचेसह मजकडे येवो. मी या देशात उत्पन्न झालो आहे. तो मला कीर्ती आणि उत्कर्ष देवो.

क्षुत्पिपासामलां ज्येष्ठामलक्ष्मीं नाशयाम्यहम् । 
अभूतिमसमृद्धिं च सर्वा न् निर्णुद मे गृहात् ॥८॥ 
भूक, तहान, अस्व्च्छता(रूपी) थोरल्या अलक्ष्मीचा मी नाश करतो. संकटे, अपयश या सर्वांना माझ्या घरातून दूर हाकलून दे.

गन्धद्वारां दुराधर्षा न् नित्यपुष्टां करीषिणीम् । 
ईश्वरीं सर्वभूतानां तामिहोपह्वये श्रियम् ॥९॥ 
जी सुवासांचे प्रवेशद्वार आहे, जिच्यावर आक्रमण दुरापास्त आहे, जेथे नित्य समृद्धी नांदते आणि जी संपन्नेतेचे अवशेष सोडते, अशा त्या सर्व प्राणिमात्रांच्या स्वामिनी लक्ष्मीला मी येथे आमंत्रित करतो.

मनसः काममाकूतिं वाचः सत्यमशीमहि । 
पशूनां रूपमन्नस्य मयि श्रीः श्रयतां यशः ॥१०॥ 
(माझ्या) मनीच्या इच्छा-आकांक्षांची पूर्ती, वाणीचा सच्चेपणा, पशू, सुंदर रूप आणि अन्न जिच्यामुळे मिळते, ती लक्ष्मी मला यश देवो.

कर्दमेन प्रजा भूता मयि सम्भव कर्दम । 
श्रियं वासय मे कुले मातरं पद्ममालिनीम् ॥११॥
जनांसाठी चिखल (कर्दम) हाच आधारभूत आहे. हे कर्दमा (इंदिरेचा पुत्र), तू मजबरोबर रहा. माता लक्ष्मीला माझ्या कुळात स्थापित कर.

आपः सृजन्तु स्निग्धानि चिक्लीत वस मे गृहे । 
नि च देवीं मातरं श्रियं वासय मे कुले ॥१२॥
जलातून ओलसर (चिक्लीत) लोभसता निर्माण होऊ दे. हे चिक्लीता माझ्या घरात निवास कर. (आणि तुझ्याबरोबर) माता लक्ष्मीलाही माझ्या कुलात स्थापन कर.

आर्द्रां पुष्करिणीं पुष्टिं पिङ्गलां पद्ममालिनीम् । 
चन्द्रां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो म आवह ॥१३॥
हे अग्ने, कमळांच्या तलावाप्रमाणे रसपूर्ण असणा-या, (जनांचे) पोषण करणा-या, सोनेरी वर्णाच्या, कमळांचा हार घातलेल्या, चंद्रासारख्या (शीतल), सुवर्णमय लक्ष्मीला तू मजसाठी आवाहन कर.

आर्द्रां यः करिणीं यष्टिं सुवर्णां हेममालिनीम् । 
सूर्यां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो म आवह ॥१४॥
हे अग्ने, जी आर्द्र (जगताच्या निर्माणाला) आधार देणारी आहे, कमळांचा हार घातलेल्या सूर्याप्रमाणे तेजस्वी आहे, अशा सुवर्णमय लक्ष्मीला तू मजसाठी आवाहन कर.

तां म आवह जातवेदो लक्ष्मीमनपगामिनीम् । 
यस्यां हिरण्यं प्रभूतं गावो दास्योऽश्वान् विन्देयं पुरुषानहम् ॥१५॥ 
हे अग्ने, दूर न जाणा-या (मजसवे कायम निवास करणा-या), जिच्यात (जिच्यामुळे) मला भरपूर धन, गाई, सेवक, घोडे मिळतील अशा लक्ष्मीला तू मजसाठी आवाहन कर.

यः शुचिः प्रयतो भूत्वा जुहुयादाज्यमन्वहम् । 
सूक्तं पञ्चदशर्चं च श्रीकामः सततं जपेत् ॥१६॥
जो (शरीराने) पवित्र व भक्तीने परिपूर्ण असलेला (साधक) दररोज तुपाने हवन करील, (त्याचे मनोरथ पूर्ण होतील). लक्ष्मीची आकांक्षा असणा-याने या सूक्ताची पंधरा कडवी नित्य पठन करावीत.

@ कपिल खेडेकर @

सोरठी सोमनाथ


सोरठी सोमनाथ हे बारा ज्योतिर्लिंग मंदिरांपैकी एक मंदिर आहे.

सोमनाथ‬ (सोमनाथ मंदिर, प्रभास पतन, गुजरात) ‪सोमनाथ ज्योतिर्लिंग‬ भगवान महादेव यांच्याकडून स्थापित केलेला सर्वात पाहीले ज्योतिर्लिंग आहे.

भगवान ब्रम्हाचा मुलगा प्रजापति ‪दक्ष‬ यांची २७ मुलींचा (२७ नक्षत्र) विवाह ‪चंद्रदेव‬ (चंद्रग्रह) बरोबर करण्यात आला. पण एका अटीनुसार, चंद्रदेव आपल्या सर्व पत्नींना कोणताही फरक न करता एकसारखे प्रेम करेल. परंतु असे करायला चंद्रदेव असफल राहिले, ज्या कारण प्रजापति दक्ष यांनीं त्यांना श्राप दिला की, "हळू हळू त्याची चमक कमी होऊन, तो एक मृत ग्रह बनून त्याचा अंत होणार." परंतु दक्षाने आपल्या मुलींचे पती आणि त्यांचे भविष्य च्या विषयी काहीच विचार नाही केला. यासाठी दक्ष ची मुलगी म्हणून जन्माला आलेली, भगवान शंकर ची पत्नि ‪सती‬ (पार्वती) ने भगवान शंकराला चंद्रदेवाचे प्राण वाचवायला सांगितले.

भगवान शंकरराने सतीला आपले यथारुप ‪शिवलिंग‬ देऊन समुद्राच्या किनारी मृतावस्थेत पडलेले चंद्रदेव च्या जवळ स्थापित करायला सांगितले, आणि चंद्रदेवाच्या संपुर्ण परिवार आणि सप्तर्षी यांच्या सोबत ‪महामृत्युंजय मंत्राचा जप करायला सांगितले.

त्यानंतर चंद्रदेव मृत अवस्थेमधून बाहेर आले, आणि त्यांची चमक पण परत आली. शंकराने चंद्रदेवाला मृत्युपासून वाचण्यासाठी आपल्या डोक्यावर स्थापित होण्यास सांगितले की, "चंद्रदेव, माझ्या मस्तकावर स्थापित झाल्या कारणाने तुझा अनंत काळापर्यंत अंत होणार नाही, परंतु दक्षाच्या श्रापाचा प्रभाव आपल्यावर सदैव राहील. ज्या कारण तुम्ही आपली चमक प्रत्येक १५ दिवस कमी होईल आणि त्या नंतर वाढेल आणि त्या दशाचा परिणाम समुद्रदेवतेवर होणार आणि प्रत्येक १५ दिवस समुद्र मध्ये भरती-ओहोटी (waxing and waning) होणार."

यामुळे भगवान शंकर ‪सोम‬ (चंद्र) चे ‪नाथ‬ (स्वामी) बनले आणि सोमनाथ ज्योतिर्लिंगाची स्थापना झाली.

शिवलिंगाला हळद का वाहत नाहीत


पूजा करण्‍यासाठी हिंदू धर्मांमध्‍ये अनेक नियम सांगण्‍यात आले आहेत. प्रत्‍येक देवाची पूजा करण्‍याची आणि प्रार्थना करण्‍याची पद्धत वेगवेगळी पहायला मिळते. विविध सामग्रीच्‍या सहाय्याने केलेली पूजा लाभदायक ठरते. या सामग्रीमध्‍ये हळदीला विशेष महत्त्व आहे. काही पूजेच्‍या विधी अशा आहेत, त्‍या विधीसाठी हळद वापरली नाही तर पूजा सफल होत नाही. याशिवाय आहारामध्‍ये हळद महत्त्वाची भुमीका पार पाडते. हळदीमध्‍ये विविध लाभदायक गुण असल्‍यामुळे हळद आजारावर रामबाण उपाय म्‍हणून वापरतात. हळदीचा वापर सौंदर्य प्रसाधनामध्‍ये मोठ्या प्रमाणात केला जातो.
 
मात्र ही गुणकारी हळद शिवलिंगावर वाहिली जात नाही. आज आम्‍ही आपल्‍याला सांगणार आहोत हळद का शिवलिंगावर वाहिली जात नाही.
 
शिवलिंगाची पूजा केल्‍यानंतर सर्व इच्‍छा, मनोकामणा पूर्ण होतात. शास्‍त्रामध्‍ये सांगितलेल्‍या विधिनुसार जर शिवलींगाची पूजा केली तर, शिवशंकर लवकर प्रसन्न होतात. शिवपूजेचे अनेक नियम सांगण्‍यात आले आहेत. त्‍यामध्‍ये विविध प्रकारच्‍या वस्‍तु शिवपूजेसाठी वापरल्‍या जातात. हळद मात्र वापरली जात नाही.
 
का वाहिली जात नाहीत हळद-
 
पूजेमध्‍ये गंध आणि औषधी म्‍हणून हळदीचा वापर केला जातो. शिवशकंर सोडले तर सर्व देवाला हळद- कुंकु वाहिले जाते. शिवलिंग पुरूष तत्वाचे प्रतिक असल्‍यामुळे व हळद ही स्‍त्री तत्वाचे प्रतिक असल्‍यामुळे हळद शिवलिंगावर वाहिली जात नाही.
 
जलधारासाठी (पार्वती) हळद वाहिली जाते-
 
शिवलिंगावर हळद वाहिली जात नसली तरी जलाधारीची पूजा करताना हळद वापरता येते. शास्‍त्रानुसार शिवलिंग दोन भागापासून तयार झाले आहे. शिवलिंगाचा अर्धा भाग हा शिवशंकराचे प्रतिक म्‍हणून ओळखला जातो, तर अर्धा भाग जलाधारी पार्वती मातेचे प्रतिक आहे. शिवलिंग पुरूष तत्‍वाचे प्रतिक असल्‍यामुळे हळद वाहिली जात नाही.

0000



000

व्रतांचे प्रकार

 व्रतांचे प्रकार कोणते आहेत ? त्यातील किती व्रते अत्यावश्यक आहेत व किती ऐच्छिक आहेत ?

           हिंदू धर्माचा गाभा हाच मुळी व्रतवैकल्यात्मक आहे. वर्षाचे बाराही महिने व त्यातीर ऐंशी प्रतिशत तीथ्या व्रतांशी निगडित आहेत. या व्रतवैकल्यामागे धर्यशास्त्रकारांचा प्रधान हेतू म्हणजे व्रत आचरण करणाऱ्या व्यक्तीचे, म्हणजे व्रतीचे निसर्गाशी येनकेनप्रकारेण नाते जोडले जावे. निसर्गाप्रमाणेच समाज, कुटुंब आणि ईश्वर या घटकांशीही जवळीक साधून संसारकर्तव्य करता करताच आत्मोध्दार साधता यावा, यासाठी वर्षातील सर्व व्रतवैकल्ये एका विशिष्ट पध्दतीने बसविलेली आहेत.

           व्रतांचे ढोबळ मानाने नित्य, नैमित्तिक व काम्य असे तीन प्रकार पडतात. नित्य व्रतांना पर्याय नसतो. गृहस्थाश्रमास शुध्दपक्षातील एकादशी हे नित्य व्रत आहे. संकष्टचतुर्दशी प्रदोष इत्यादी नैसर्गिक व्रते होत. अनंत, रामनाम, ऋषिपंचमी इत्यादी काम्य व्रते होत.

           काम्यव्रतांमध्येही धर्म, अर्थ, काम, मोक्ष या चतुर्विध पुरुषार्थावर आधारित चार प्रकार पडतात. केवळ पुण्यसंपादन करून चित्तशुध्दीसाठी केलेली व्रते धर्मसंपादन करून देतात.

           रामनाम व्रत ग्रहण हे असेच धर्मपुरुषार्थ प्राप्त करून देणारे नैसर्गिक व्रत आहे. याखेरीज भागवत सप्ताह, चातुर्मासातील अन्य काही व्रते काम्य व्रतात मोडतात. अनंत, कोजागरी, वरदलक्ष्मी इत्यादी व्रते अर्थपुरुषार्थ प्राप्त करून देणारी नैसर्गिक व्रते होत. शनिप्रदोषासारखी व्रते कामपुरुषार्थ प्राप्त करून देणारी नैसर्गिक व्रते होत व हरिवंशश्रवण, गुरुचरित्रवाचन इत्यादी कामपुरुषार्थप्रापक काम्य व्रते होत. नैसर्गिक व्रते वर्षातील ठराविक तिथीलाच आचरण करता येतात, पण काम्य व्रतांसाठी योग्य मुहूर्त व दिनशुध्दी पहावी लागते. सोळा सोमवारव्रत अशाघ व्रतांपैकी आहे. ते मोक्षपुरुषार्थ प्राप्त करून देणारे काम्य व्रत आहे. तसेच पुत्रप्राप्ती करून देणारेही काम्य व्रत आहे. तेव्हा पहिल्यांदा आपल्या मनात उद्भवलेला संकल्प नेमका कोणत्या पुरुषार्थाशी निगडीत आहे, हे पाहून मगच व्रताचा प्रकार व ग्राह्यता ठरवावी. पुरुषार्थाशी संबंध पाहिल्यावर ते वर्षातून पुन्हापुन्हा येणारे आहे, की केव्हातरी येणारे आहे, यावर हे नित्य आहे किंवा नैसर्गिक आहे हे ठरते.

           पंचांगात नोंद नाही, पण चांगल्या दिवशी सुरुवात करता येणारी व्रते काम्य या सदरात मोडतात. वास्तविक व्रतांची रचना करताना धर्मशास्त्रकारांनी इतका काटेकोरपणा दाखविला आहे की, व्रताचरण करणाऱ्या व्यक्तीला मोक्षमार्गप्रापक एक सद्गुरु व आपल्या इष्ट-आराध्य दैवत यांच्या भक्तीखेरीज अन्य कोणताही मार्ग अवलंबविण्याची गरज नाही. कोणतेही संकट वा महासंकट आणि कोणतीही कामना वा महाकामना परिपूर्ण करण्यास आपल्या सद्गुरूने सांगितलेल्या व्रताचरणासारखा अन्य मार्ग नाही. म्हणूनच गुरुचरित्र ग्रंथात सद्गुरूंच्या मुखातून आलेली म्हणजेच सद्गुरुने निरोपिलेली व्रते करून त्यांच्या भक्तांना इहपर कल्याण प्राप्त झालेले दिसून येते.

            समाजात तथाकथित मार्गदर्शन करणारे म्हणजे चुकीचा मार्ग दाखवून दिशाभूल करणारे महंत, बुवा इत्यादी लोक व्रताचरणाचा उपदेश वा सल्ला न देता केवळ पुड्या, अंगारे, इत्यादी देऊन समाजाला चुकीचा मार्ग दाखवतात. त्यामुळे संचित, प्रारब्ध, क्रियमाण या कशाचाही निरास न होता तात्पुरती बधिरता येऊन माणूस आनंदी होतो, पण नंतर त्याच्या लक्षात येते की, आपले संकटही दूर झालेले नाही, व मनोकामनाही पूर्ण झालेली

 नाही.

कालाअष्टमी



प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातल्या अष्टमी म्हणजे कालाष्टमी, जी आठव्या दिवशी येते. या दिवशी भगवान भैरव यांची पूजा करतात. आणि दिवसभर उपास करतात. मार्गशीष महिन्यात येणाऱ्या कालाष्ट्मिला खूप महत्त्व आहे. कारण या दिवशी भगवान शिव भैरव रुपात प्रकटले होते. म्हणून कालाष्टमिला पूजा केल्यास हवे असलेल फळ मिळते असे मानले जाते. त्यात मार्गशीष महिन्यातली कालाष्टमी फार महत्वाची आहे.

कालाष्टमी व्रत.
एकदा श्रीहरी विष्णू आणि ब्रम्हा यामध्ये विवाद झाला कि त्यांच्या मध्ये सर्वात श्रेष्ठ किं आहे. ते त्यांच समाधान करायला भगवान शंकराकडे गेले. त्यांनी एक सभा आयोजित केली. तेथे सगळे ज्ञानी, ऋषी -मुनी संत उपस्थित होते. भगवान शिव ने श्री विष्णूला आणि ब्राम्हंजीना समजवले. श्रीहरी विष्णूना भगवान शिवजिंने सांगितलं ते पटल. परंतु ब्रम्हाजी संतुष्ट झाले नाही. ते भगवान शंकरांचा अपमान करू लागले. त्यामुळे भगवान शंकर क्रोधीत झाले आणि त्यांनी रौद्र रूप धारण केलं.

भगवान शंकरांचे रौद्र रूप बगून सगळे भयभीत झाले. त्यांनाच भगवान भैरव म्हंटले आहे. ते कुत्र्यावर बसले होते. त्यांच्या हातामध्ये एक दांडू होता. भगवान भैरवाचं रूप भयंकर होत. त्यांनी ब्राम्हंजीच्या पाच पैकी एक डोक कापलं. तेव्हा पासून ब्रम्हाजीनां चार डोक आहेत. त्याचं रूप बघून भगवान ब्रम्हाजीनां त्यांची चूक लक्षात आली व त्यांनी त्यांना माफी मागितली. तसेच सगळ्या देवी देवतांनी आणि साधू संतानी वंदना केल्यानंतर भगवान भैरव शांत झाले.

या दिवशी दिवसभर उपवास व रात्री चंद्रोदय झाल्यावर भिंतीवर शेंदुराने शिव आणि चंद्र काढून त्यांची पूजा करतात. या पूजेत आठ दिवे लावतात. आठ पात्रांत वडे, पुर्‍या पायस इ. खाद्य वस्तू ठेवून त्यांचा नैवेद्य दाखवितात. ही पूजा कालभैरवा (शिवा) ची असते.

पूजेचा ध्यानमंत्र,
अष्टकालं महाकालं भैरवाष्टगणान्वितम् । चंद्रमासहितं शुक्‍ल मृत्युंजय नमोऽस्तु ते ॥

श्री कालभैरव

 एकदा स्वर्गलोकांत ब्रह्मदेव आणि विष्णू या दोघांचे आपापसात श्रेष्ठ कोण यावरून कडाक्याचे भांडण जुंपले.

 तत्पूर्वी ब्रह्मदेवाला पाच शिरे होती. या दोघांच्या वादावर शंकरांनी तोडगा काढावा आणि निर्णय घ्यावा, तसेच दोन्ही देवांत ब्रह्मरूप कोणाचे हाही वाद उद्भवला. 
तेव्हा देवऋषी नारदांनी दोन्ही देवांना बदरीकाश्रमांत जाऊन तेथील महामुनींची भेट घेऊन या शंकेचे निरसन व्हावे यासाठी पाठविले, परंतु शिव हेच ब्रह्मस्वरूप आहेत, असे महामुनींनी सांगितलेले दोन्ही देवांना पटले नाही, मग पुन्हा ते ‘चार वेद’ यांच्याकडे गेले, तेथेही अशाच उत्तराने समाधान झाले नाही. म्हणून ओमकार स्वरूपिणी त्रिपदागायत्रीकडे गेले. 
या त्रिपदा गायत्रीने हेच उत्तर दिले. त्यानंतर श्री शंकरांनी त्यांचे स्वर्गात असलेले शिर आणि पाताळात असलेले पाय अनुक्रमे ब्रह्मदेव आणि विष्णू यांना शोधण्यास पाठविले यासाठी दोन्ही देवतांनी अथक प्रयत्न केला. 
पाताळात पाय शोधीत असता श्रीविष्णूंना गणपती दिसले. पण ते ध्यानस्त बसले होते. त्यांना श्रीविष्णूंनी पायाबाबत विचारले असता गणपती म्हणाले,
 ‘आपण एवढी भ्रमंती केल्यावर तुम्हाला कुठे ब्रह्मांड दिसले; तरी अशी अनंत कोटी ब्रह्मांडे श्री शंकराचे चरणी असल्याने त्यांचे असे वेगळे अस्तित्व दिसणार नाही.’
 असे सांगितले ते विष्णूंना पटले व मान्यही झाले. मात्र स्वर्गात ब्रह्मदेव शिर शोधण्यासाठी अथक प्रयत्न करताना सतत गुणगुणत होते मीच ब्रह्म आहे व मीच श्रेष्ठ आहे. 
दरम्यान, ब्रह्मदेवांना तिथे गाय आणि केतकी (केवडय़ाचे झाड) भेटले. त्यांना ब्रह्मदेवांनी आपल्याकडे वळवून शंकराचे शिर दिसले असे खोटे सांगण्यास प्रवृत्त केले. यानंतर मग स्वर्गात विष्णू, ब्रह्मदेव, गाय व केतकीसह आले.
 त्यानंतर विष्णूंनी सांगितले की, ‘मला पाताळात पाय दिसले नाहीत. मात्र ब्रह्मदेवांनी धारिष्टय़ दाखवून खोटेपणाने मला स्वर्गात शिर दिसले आणि यासाठी साक्षीदार म्हणून गाय आणि केतकी यांना आणल्याचे सांगितले.’
यानंतर शंकरांच्या साक्षी तपासणीत गाय व केतकी यांच्या साक्षी खोट्या ठरल्या, मग शंकर क्रोधायमान झाले त्यांनी खोट्या  साक्षीबद्दल गायीला शाप दिला की,
 ‘तुझे मुख नेहमीच अशुद्ध आणि अपवित्र राहील, मात्र तुझे दर्शन पाठीमागून घेतील. 
तसेच केतकीला सुद्धा शाप दिला तुझ्या अंगावर पानोपानी काटे असतील तुझ्या केवडय़ाच्या कळीच्या पानांनी माझी पूजा केली जाणार नाही.
 तू मला म्हणजे शंकर, महादेव व भैरवनाथ यांना नेहमीच निषिद्ध राहशील.’ 
याप्रमाणे आजही गायीचे दर्शन मागून घेतात व केवडय़ाच्या कळीचे पान शंकरादी देवांना वाहिले जात नाही. 
यानंतर शंकराचे लक्ष्य ब्रह्मदेवाकडे गेल्यावर ते पुन्हा अतिक्रोधायमान झाले. त्यांनी रागाच्या भरात त्यांच्या जटेमधून एक केस उपटला आणि सिद्ध भैरवनाथ प्रकट झाले.
 याच दरम्यान ब्रह्मदेवाच्या पाचव्या मुखातून शंकराची निंदानालस्ती सुरूच होती. याबद्दल ब्रह्मदेवाला शासन व्हावे म्हणून सिद्ध भैरवानी त्वरित तलवार उपसून ब्रह्मदेवाचे पाचवे शिर धडावेगळे केले. 
तेव्हापासून ब्रह्मदेवाला चार शिरे राहिली. ब्रह्महत्येचे कालभैरवाकडून पातक घडल्याने ते पापशासन व्हावे म्हणून तो काशीला निघाला. 
पाताळात मर्त्यलोकांत- वैकुंठ लोकांत तीर्थयात्रा करून सुद्धा पापक्षालन झाले नाही; 
परंतु ब्रह्मदेवाचे तुटलेले शिर कालभैरवाच्या हाताला चिकटलेले होते. मात्र पवित्र काशी गंगेत स्नान केल्यावर ते शिर खाली पडले आणि कालभैरवाची ब्रह्म हत्येच्या पातकामधून मुक्तता झाली आणि मग शंकरांनी त्यांना चौसष्ट गणांचा अधिपती आणि काशीचा रक्षक (कोतवाल) नेमले.
शिवाच्या तेजापासून निघालेली शक्ती ही योगेश्वरी (जोगेश्वरी) ही कालभैरवाची पत्नी मानली जाते. 
कुलदैवत, उपास्य दैवत, ग्रामदैवत असे तीन प्रकार कालभैरवाचे असून त्या त्या घराण्यात भैरी भवानी (भैरवनाथ, भवानीमाता) अशी असून त्यांची नित्यनेमाने पूजा-अर्चा होत असते. कालभैरव भूतपिशाच्च करणी इ.पासून तात्काळ मुक्ती देतो. कालभैरवाचे प्रथमदर्शनी विक्राळ रूप पाहिले असता भीतीदायक, भयावह, उग्र, क्रोधदायक वाटते. पण हेच कालभैरव लवकर प्रसन्न पण होतात !



कालभैरव


श्री काळभैरव हे अकरा भैरवांचे अधिपती. श्री काळभैरवाच्या अधीन काळ आणि वेळ आहे . काळवेळेच्या अधीन नियती आहे. ही सर्व सदगुरुंच्या अधीन आहेत. आणि श्री काळभैरव सदगुरुंचा दास आहे.  जगन्नियंत्या भगवान शिवाची ती प्रलयंकारी उजवी बाजु. त्यांचे महात्म्य धर्ममार्तंडानी लपवून ठेवलय. हा देव ज्याची वज्रदाढ दंत नीलवर्णीय आहे. ज्याची काया सर्वात मोठी आहे. जो प्रत्येक युगाचा अंत करणारा आहे. असा हा शामवर्ण भैरव ज्यास प्रत्येक कार्यात स्मरण करुन कार्यारंभ करतात.

काळभैरव साधनेमुळे प्रकृतीगर्भात मानवाला ग्रासणारे पितृदोष. नजरदोष, ग्रहबाधा, शत्रूबाधा, भुत प्रेत पिशाच्चबाधा, करणी, भानामती, तसेच ईंद्र, कलि, माया निर्मित संकट मालिकांपासुन मुक्तता मिळते. मायेची तोड फक्त श्री काळभैरवच आहेत. तो रुद्रच असल्याने आदिपुरूष म्हणता येईल. त्याची कठोर साधना साधकाला सर्व दैत्य, पिशाच्च शक्तींवर एक हुकुमी सत्ता मिळवुन देते. पण दासाचीही पात्रता तशीच असावी लागते. हे दैवत विधिलिखितही अडवतं. श्री काळभैरव शैतानी शक्तीना नाचविणारे एकमेव ज्वलंत दैवत आहे.  हे विवेकशील सय्यमी आणि पारदर्शी चारित्र्य ही प्राथमिक पात्रता. तिथे व्याभीचार लबाडी आणि खोटेपणास थारा नाही. अशा लोकांसाठी श्री काळभैरव उग्र दैवत आहे. मृत्युपेक्षाही भयानक आहेत. उलट सदगुरुदासांसाठी ते प्रेमळ आणि भक्तवत्सल आहेत. ते घरातील वास्तुपुरुषापासुन ते कुलदेवतेच्या दैत्यमुखापर्यंत कोणालाही कुठेही आणि कसेही क्षणात संपवु शकतात . गोस्वामी तुलसीदास यानी देखील भैरवयातना भोगल्या आहेत.  त्यांच्या निर्व्याज साधनेने गमावलेला आत्मविश्वास पुन्हा प्राप्त होतो. मनात भय रहात नाही. आंतरिक विचारात बळ येते. जीवनाचा दृष्टीकोण विशाल होतो. शैतानी शक्तीपासुन आत्मरक्षा होते. अंतर्बाह्य शत्रूच्या पकडीतुन मनुष्य दुर जातो .आध्यात्मिक जीवनात रुची निर्माण होते. कठिण कार्य सहज पूर्ण होतात. आपल्या जीवनावर आपले वर्चस्व निर्माण होते . काली मातेची साधना योग साध्य होतो. सदगुरु हे कामधेनु आहेत. श्री काळभैरव तत्व सदगुरु अधीन असल्याने सदगुरु प्रणित सूक्ष्म हस्तपादुका माळेने दश भैरवांची जप साधना केल्यास सर्व लक्ष्मींची प्राप्ती होते. पण श्री काळभैरवांच्या लेखी चुकीला माफी नाही.

श्री काळभैरव यांनी  मृत्यु , देवराज ईंद्र, ब्रम्हदेव, नृसिंहदेव आणि भगवान विष्णु यांचा गर्वहरण केले होते. लोकानाच काय तर साधु योगिजनाना देखील त्यांचा अभ्यास होवु शकला नाही. श्री काळभैरव हे मोक्षप्राप्तीसाठीचे श्री दत्त अधिष्ठान हृदयात तयार करतात. श्री काळभैरव स्वाधिष्ठानाला वळसा घालुन सदगुरुंकडे आणि त्यायोगे दत्त महाराजांकडे जाण्याचा मार्ग नाही. हा मार्ग अत्यंत कठीण . जिगर असेल तरच मार्गक्रमण शक्य आहे. शनी हा काळभैरव देवांचा सर्वात मोठा भक्त आहे. श्री काळभैरव देवांची रामदास स्वामी यानी आरती लिहिलेली आहे . पण आता ती शोधुनही सापडत नाही.
 
श्री काळभैरव जितका सिद्ध योग्यांचा तितकाच महाचांडाळांचाही आहे. म्हणुनच प्रामाणिक आणि पारदर्शी रहावे. श्री काळभैरव दैवत सुक्षम देहातील वासनेची कर्म नष्ट करतात . काळभैरवाना क्षेत्रपाल असेही म्हणतात. क्षेत्र म्हणजे शरीर. पाल म्हणजे पालन करणारा. तो कर्म आणि अकर्माच्या गोंधळातुनही सोडवितो . ॐ काळभैरवाय नम; हा देवाचा जपमंत्र आहे. जपासाठी रुद्राक्षमाळा वापरतात. स्फटिक माळही चालते . महिला देखील हा जप करु शकतात. प्रामाणिक असल्यावर देवापुढे स्त्री पुरुष हा भेद रहात नाही. भैरवप्रहर हा रात्री १२ ते पहाटे ३ असा आहे.  ह्या प्रहरात भैरवसाधना केल्यास अधिक प्रभावी आणि परिणामकारक ठरते.  तप, जप आणि ध्यान मार्गात अग्रेसर होत असताना प्रथमदर्शनी बाह्य आवरणात्मक शुद्र शक्ती विविध रुपं आणि स्वरुपाद्वारे साधकाला भटकाव उत्पन्न करतात. हे अतिशय भयानक मायाजाळ आहे. त्यातुन सहज योग्य मार्ग तदृप शक्ती कधीही सापडु देत नाही. याला आंतरिक चकवा असे म्हणतात. ह्या चकव्यापासुन साधकाला काळभैरव दुर ठेवतात. काळभैरवाची सेवा केल्यास मृत्युनंतर पिशाच्च योनी कशी मिळेल? त्यांची सेवा हा मृत्युवर विजयप्राप्तीची सुवर्णसंधी आहे.

पंचमहाभुतांपलिकडे शिवतत्व आहे. साधकाला श्री काळभैरवनाथ श्री दत्तकृपेने तिथे घेउन जातात. श्री काळभैरवाची सेवा केल्यास शिवाची साधना आवश्यकता नाही. ती आपोआप साध्य होते. श्री काळभैरव यांचे प्राचीन मंदीरात गेल्यावर देवाच्या मुर्तीकडे एकटक पहावे. सात्विकता डोळ्यात भरुन येईल. भैरवोत्थान केवळ पद्मासनातच साध्य होते. मोरगाव येथील गणेश मंदीराच्या अकरा पाय- या अकरा भैरवाच्या प्रतीक आहेत.

१ प्रमुख - श्री काळभैरव.
२ उपप्रमुख - बटुकभैरव.
३ समायोजक - स्वर्णाकर्षण भैरव.
४ अष्टभैरव - स्मशानभैरव.
५ नग्नभैरव.
६ मार्तण्डभैरव.
७ कपालभैरव.
८ चंडभैरव.
९ सन्हारभैरव.
१० क्रोधभैरव.
११ रुरुभैरव.

श्री काळभैरव पाताळवासी आहेत. त्याना दक्षिणेश्वर असेही म्हणतात. नक्षत्रे त्यांच्या आज्ञेची प्रकर्षाने वाट पहातात. त्याना प्रसन्न केल्यास नक्षत्रांचे फळ तुमच्या खिशात. श्री काळभैरवाच्या आज्ञेशिवाय कोणत्याही सूक्ष्मक्षेत्रात प्रवेश नाही. नकारात्मक उर्जा डोक्यात आणि शरीरास जाणवत असेल तर सलग सहा महिने श्री काळभैरव साधना करावी. त्याची साधना निर्गुणात सरस बनविते. आध्यात्मिक प्रगतीसाठी सगुणातुन निर्गुणात अनासक्तीने पदार्पण आवश्यक आहे. श्री काळभैरवांचा विनाअट ध्यास घेता आला पाहिजे. त्यांचा ध्यास लावाल तर कर्तव्यनिष्ठा देखील ठेवावी लागेल. धरसोडवृत्ती ठेवल्यास ते भाव देणार नाहीत . त्यावर जावुन जबरदस्ती विनवणी कराल तर उरली सुरली सुखशांती गमावुन बसाल. ईथे कधीही मानस स्तरीय मजामस्ती आणि ईतर अवहेलना करु नये. नेहमी जमेल तितके दत्तसाच्यात बसण्याचा प्रयत्न करावा. श्री काळभैरवांची अनुभूती येणे ही आत्ममार्ग निर्धोक सुरु असल्याची पुष्टी करते. श्री काळभैरवाच्या कक्षेत आल्याशिवाय नशिबाचे चक्र फिरत नाही. ईतर देव देवी बघ्याची भुमिका घेतात. पण भैरवनाथ प्रामाणिक आणि तळमळीला धावुन येतात. मन हृदय आणि नियती स्वच्छ हवी. सदगुरुभक्ती सुख दु:खाच्या पलीकडे गेल्यास दैव सदभक्ताला जीवनाच्या आपदास्थितीत पाठीशी घालतं . आध्यात्मिक जीवनात घोर साधना सात्विक वैराग्यपुर्ण व सदगुरु अधिष्ठानयुक्त असतात. ह्या साधना सहज समाधी ह्या अंतिम ध्येय  योगापर्यंत घेवुन जातात.

0000000

स्वामींच्या वास्तव्याने परमपावन झालेली अक्कलकोटातील महत्वाची स्थळे...

! श्री स्वामी समर्थ !!

१. वटवृक्ष संस्थान : येथे स्वामी समर्थ महाराजांनी देह सोडताना सगळ्यांना उपदेश केला की 'वडाच्या पारंबीला धरून रहा.'🚩

२. समाधी मठ : महाराजांची समाधी.🚩

३. महाराजांच्या चर्मपादुका  : समाधी मठच्या शेजारीच शिष्य चोळप्पा यांच्या घरात आजही महाराजांच्या चर्मपादुका आहेत.सुमारे १ फुट लांबीचे पाउल आहे.🚩

४. गुरुमंदिर : श्री बाळप्पा महाराजांची समाधी. व्यवस्थापकांना सविस्तर माहिती विचारावी.🚩

५. हाक्याचा मारुती : स्वामींनी सत् शिष्य बाळाप्पा यांना नामजप करण्यास सांगितले ते हे मंदिर.तळघरत आजही जाता येते.🚩

६. जंगमांचे शिव मंदिर : स्वामींनी शिवलींगावर शेणी रचून अग्नी पेटविला. जंगम चिडले व स्वामींना मारण्यास आले. ३ दिवस अग्नी पेटत होता. ३ दिवसा नंतर शिवलींगाला काहीही हानी न होता , ते अधिच तेजस्वी झाले.🚩

७. जोशी मठ : 'स्वामी दर्शनाशिवाय भोजन करणार नाही' हा नियम तुटू नये म्हणून आजारी भक्ताला लाकडी पाटावर स्वामींनी स्वत:ची पदचिन्हे उमटवून दिली. तो पाट आजही आहे.🚩

८. मुरलीधर मंदिर : मुंबईहून स्वामी दर्शनास आलेले 'स्वामीसुत' ह्या मंदिरात स्वामींची वाट पहात बसले होते. स्वामींच्या दर्शनास गओलेल्या एका श्रीमंत भक्तास स्वामी म्हणाले ''माझ्या समोर दिवे पेटवण्याऐवजी माझा सुत काळोखात बसला आहे तेथे रोषणई कर.'' गिरगावातील कांदेवाडी येथील मठ स्थापन करणारे तेच हे स्वामीसुत !🚩

९. शेखनूर दर्गा : स्वामी कित्येकदा ह्या दर्ग्यावर येत. मन्नत मागण्याकरता आलेल्या कित्येकंना स्वामी सांगत की दर्ग्यावर चदर चढवा. तिथल्या फकीरंना भोजन द्या.🚩

१०. मालोजीराजांचा किला : महादरवाजावर असलेल्या गणपतीच्या मुर्तीस सहज हात लाऊन स्वामी जात असत्. आपला हात उडी मारुन देखील पोचत नाही. येथे एक लहानसे संग्रहालयही आहे.🚩

११. शिवपुरी : सुर्योदय आणि सुर्यास्त ह्या वेळी अग्निहोत्र कसे करावे? अग्निहोत्र म्हणहजे काय ? इ. महत्वाची माहिती यएथे सांगतात. सविस्तर माहिती आणि अग्निहोत्रात सहभाग घेण्याकरता शिवपुरी येथे सुर्यास्ताच्या साधारण १ तास आधी पोचावे. 🚩

🙏🏻 श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ 🙏🏻


नऊ नारायण अर्थात नवनाथ


कलियुगाचा नुकताच प्रारंभ झाला. त्यावेळी विष्णूने नवनारायनांना बोलाविले. आपल्याला सर्वांना पृथ्वीवर अवतार घ्यायचा आहे. त्यामुळे धर्माचा उदय होईल. लोक सत्याने व न्यायाने वागतील व सुखाने राहतील. इतर देवही अवतार घेणार आहेत, असे विष्णूने सांगितले. त्याप्रमाणे नवनारायणांनी पृथ्वीवर अवतार घेतले. तेच पुढे नवनाथ म्हणून नावारुपाला आले.

मत्स्येंद्रनाथ.
अरे हा कविनारायण । च्छोदरी पावला जनन।।
तरी मच्चेंद्र ऐसे याते नाम । जगामाजी मिरवी की ।।३३।। (नवनाथ ग्रंथ अध्याय १, ओवी ३३ वी)

एकदा शंकर व पार्वती कैलास पर्वतावर गप्पा मारत बसले होते. मला अनुग्रह द्यावा, अशी विनंती पार्वतीने शंकराला केली. जागा शांत हवी, म्हणून यमुनातिरी शंकराने अनुग्रह दिला. यमुनेच्या पाण्यात कविनारायण एका मासळीच्या पोटात बसले होते. त्यांनी शंकराचा हा सर्व उपदेश ऐकला. शंकराने पार्वतीला या उपदेशाचे सार काय? असा प्रश्‍न केला, तेव्हा कविनारायण मध्येच उत्तरला सगळं काही ब्रह्मस्वरुप आहे. शंकराने उत्तर ऐकले व समजून चुकले की कविनारायण मासळीच्या पोटात आहेत.

शंकर म्हणाले, की तू अवतार घेतल्यावर बद्रीकाश्रमास ये. तेथे मी तुला दर्शन देईल. पुढे मासळीने अंडे घातले. ते अंडे उबगले. त्यातून सुंदर मुलगा बाहेर आला. कामिक नावाचा कोळी तेथे आला. त्याला मूलबाळ नव्हते. मुलगा पाहून त्याला आनंद झाला. मुलाला त्याने घरी नेले. कामिकाची पत्नी सारद्वता हिलाही आनंद झाला. तिने बाळाला छातीशी धरले, तर तिला लगेच पान्हा फुटला. माशाच्या पोटी जन्माला म्हणून त्याचे नाव मत्स्येंद्रनाथ ठेवले. मत्स्येंद्रनाथ स्त्री राज्यात आले. तेथे मैनाकिनीशी त्यांचा विवाह झाला. त्यांना मुलगा झाला. त्याचे नाव मिनीनाथ ठेवले. मच्छिंद्रनाथांचे जन्मस्थान यमुनातिरी आहे. त्यांची संजीवन समाधी सावरगाव (ता. पाटोदा, जि. बीड) येथे आहे. मायंबा म्हणूनही हे देवस्थान प्रसिद्ध आहे. येथे जाण्यासाठी नगर जिल्ह्यातील नगर-पाथर्डी रोडवरून देवराई फाट्यावरून वृद्धेश्‍वर, तेथून सावरगावला जाता येथे. मढीवरूनही वृद्धेश्‍वरला व पुढे मच्छिंद्रनाथ गडावर जाता येते.

गोरक्षनाथ.
तरी आता न लावी उशिर । हे गोरक्षनाथ निघे बाहेर ।।
ऐंसे वदता नाथ मच्छिंद्र । बाळ शब्द उदेला ।।७५।। (अध्या ९ वा, ओवी ७५)

मत्स्येंद्रनाथ तीर्थाटन करीत चंद्रगिरी गावी आले. एका बाईला (सरस्वती) त्यांनी पूर्वी पूत्रप्राप्तीसाठी भस्म दिले होते. तिच्या घरी येऊन अलख असे म्हणाले. सरस्वतीबाई दाराशी आल्या, तर बाई तुझा मुलगा कुठे आहे, असे मत्स्येंद्रनाथांनी विचारले. कुठला मुलगा बाबा, असं त्या बाई म्हणाल्या, मी भस्म दिले होते. ते वाया जाणार नाही, असे नाथ म्हणाले. बाईने ते भस्म उकिरड्यात टाकले होते. तेथे मस्त्येंद्रनाथ गेले. "अलख निरंजन, हरि नारायणा बाहेर ये', असे म्हणताच उकिरड्यातून बारा वर्षांचा मुलगा बाहेर आला. तू गोवरात (उकिरड्यात) जन्मलास म्हणून तुझे नाव गोरक्षनाथ आहे, असे म्हणून मत्स्येंद्रनाथांनी गोरक्षनाथांना तीर्थटनासाठी बरोबर नेले. गोरक्षनाथांचे जन्मस्थान चंद्रगिरी (बंगाल) येथे आहे, तर संजीवन समाधी गिरनार पर्वत (सौराष्ट्र) येथे आहे. सौराष्ट्र काठेवाड प्रांतात जुनागड जिल्ह्यात गिरणार पर्वत आहे. राजटोकाहून जुनागड सुमारे १०० कि.मी. अंतरावर आहे. गिरणारहून द्वारकाधाम, सोरटी सोमनाथाला जाता येते. गिरणारच्या टोकावर गोरक्षनाथांचे लहान मंदिर आहे. तेथे काळ्या पाशानाची मूर्ती आहे. हा नेपाळ प्रांत आहे. तेथील हे देवस्थान अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. त्यामुळेच तेथील लोकांना गुरखा किंवा गोरखा म्हणत असावे.

नगर जिल्ह्यातील डोंगरगण (ता. नगर) जवळ गोरक्षनाथांनी तपश्‍चर्या केली. येथे जाण्यासाठी नगर-औरंगाबाद रोडवरून शेंडी गावाच्या पुढे गेल्यावर डोंगरगणला जाता येते. तेथून ३ किलोमीटर अंतरावर हा गोरक्षनाथ गड आहे.

गहिनीनाथ.
तेंगे करूनी पंचभूत। दृश्‍यत्त्व पावले संजीवनी अर्थ।।
करभंजन ते संधीत । प्रेरक झाला जीवित्त्वा ।।६१।। (अध्याय १०, ओवी ६१)

कनकगिरी गावात मस्त्येंद्रनाथाने गोरक्षनाथाला गुरुमंत्र दिला. तेथेच गोरक्षनाथ एकदा मंत्रांचा जप करीत बसले. गावातील काही मुले चिखलाचा गोळा घेऊन आले व बाबा आम्हाला गाडी करून द्या, असे म्हणू लागले; परंतु बाबाने गाडी नाही करता येणार, असे सांगितल्यावर मुलांनीच गाडी तयार केली. आता त्याला गाडीवान हवा म्हणून गोरक्षनाथांनी गाडीवान तयार करून दिला. गाडीवानाचा मातीचा पुतळा तयार करताना तोंडातून मंत्राचा जप चालूच होता. पुतळा तयार होताच करभंजन नारायनाने त्यात प्रवेश केला. चिखलाचा पुतळा जिवंत झाला. मुले घाबरली. गोरक्षनाथही गडबडले. इतक्‍यात मत्स्येंद्रनाथ तेथे आले. त्यांना हा प्रकार काय झाला, ते समजले. दोघांनी त्या मुलाला उचलले व एका ब्राम्हणाकडे दिले. ब्राह्मणाचे नाव मधुनाथा होते. त्याच्या बायकोचे नाव गंगा होते. दोघांनी ते बाळ घेतले. मत्स्येंद्रनाथांच्या सांगण्यावरून त्याचे नाव गहिनीनाथ ठेवले. गहिनीनाथांचे जन्मस्थान कनकगिरी (जगन्नाथपुरी) येथे आहे. संजीवन समाधी चिंचोली (जि. बीड) येथे गहिनीनाथ गडाजवळ आहे. येथे जाण्यासाठी बीडहून आल्यास येवलवाडी (ता. पाटोदा) येथील जालिंदरनाथांचे दर्शन घेऊन डोंगरकिन्ही येथे जाऊन हातोला फाट्यामार्गे कुसळंब व तेथून चिंचोलीला जाता येते. नगरहून निघाल्यास नगर बीड रस्त्यावरून (अडबंगनाथ गड मार्गे) जाता येते.

जालिंदरनाथ.
विप्रो हाते सलील बाळ ते जातें। रक्षता स्पर्शता लागे हाते।।
दृष्टी पाहता बाळाने । जुळवत रुदन करी ।।११२।। (अध्याय ११ ओवी ११२)

पांडवकुळात हस्तिनापूर ब्रहद्रवा नावाचा राजा होता. त्याने सोमयज्ञ केला. यज्ञातील विभूती घेण्यासाठी राजाने यज्ञकुंडात हात घातला. त्याच्या हाताला मूल लागले. अत्यंत सुंदर व गोंडस दिसणारे हे मुल रडू लागले. राजाने त्याला कुंडाबाहेर काढले व आनंदाने राणीकडे घेऊन गेले. अग्नीने दिलेल्या या मुलाचे नाव "जालंदरनाथ' असे ठेवले. जालंदर नाथ या नावाचा अपभ्रंष होऊन पुढे जालिंदरनाथ हे नाव प्रसिद्ध झाले. त्यांनी पुढे नाथ संप्रदायाची दीक्षा घेतली. जालिंदरनाथांचे जन्मस्थान हस्तीनापूरमध्ये आहे. तर संजीवन समाधी येवलवाडी (ता. पाटोदा, जि. बिड) येथे आहे. येथे जाण्यासाठी पाथर्डी-बीड रस्त्यावरून रायमोहा गावापासून येवलवाडी व पुढे जालिंदरनाथांच्या समाधीस्थळी जाता येते.

कानिफनाथ.
त्वरे येऊन कर्णदृसी। दृष्टी पाहे ब्रह्मचारी ।
सहज करुनी उभयकरी । नमस्कारी प्रेमाणे ।।११५।। (अध्यय १२ वा, ओवी ११५)

बद्रीकाश्रमात शंकर, अग्निदेव व जालिंदरनाथ गप्पा मारत होते. शंकर म्हणाले हे पहा जालंदर, हिमालयात एक मोठा हत्ती आहे. त्याच्या कानात प्रब्रुद्धनारायणाने जन्म घेतला आहे. आपण तेथे जाऊ, तिघेही हिमालयात गेले. हत्ती पर्वतावर होता. जालिंदरनाथांनी मोठ्याने हाक दिली, हे प्रब्रुद्धनारायणा. तेव्हा एक सोळा वर्षाचा मुलगा हत्तीच्या कानातून बाहेर आला. त्यामुळे त्याचे नाव कानिफनाथ असे ठेवले. कानिफनाथांनी खाली उतरून सर्वांना नमस्कार केला. कानिफनाथांचे जन्मस्थान गिरीटंक (हिमालय) पर्वतावर आहे. संजीवन समाधी मढी (ता. पाथर्डी, जि. नगर) येथे आहे. येथे जाण्यासाठी नगर-पाथर्डी रस्त्यावरून तिसगावपासून मढीला जाता येते.

भर्तरीनाथ.
भर्तरी भंगताचि बाळ त्यांत । तेजस्वी मिरविले शकलांत ।।
क्षिकेचे मोहळ व्यक्त । तेही एकांग जाहले ।।२७।। (अध्याय २४, ओवी २७)

भर्तरीनाथांच्या जन्माचे गुढ उकलले नाही. मात्र ग्रंथाल उल्लेखील्याप्रमाणे एकदा उर्वशीचे अनुपम सौंदर्य पाहून सूर्याचा वीर्यपात झाला. त्या वीर्याचा एक भाग कौलिक ऋषीच्या भिक्षापात्रात पडला. त्यातून ३१०३ वर्षांनी भगवान अवतार घेतील, हे ऋषींनी ओळखले. त्यांनी हे पात्र जपून ठेवले. ठरल्या वेळी द्रमीलनारायणाने त्यात प्रवेश करून प्रकट झाले. बालकाचा जन्म झाला. ते म्हणजे भर्तरीनाथ. त्याला एका हरिणीने आपल्या पिलांसोबत मोठे केले. हरणांच्या संगतीत झाडांचा पाला खाऊन तो मोठा झाला. एकदा जंगलातून जयसिंग व रेणुका हे ब्राह्मण दाम्पत्य जात होते. त्यांनी मुलाला जवळ केले. त्याला माणसांची भाषा शिकविली. पुढे गोरक्षनाथांनी त्याला नाथपंताची दीक्षा दिली. भर्तरीनाथांचे जन्मस्थान नैमिष्यारण्य आहे. तर संजीवन समाधी हरंगुल (ता. गंगाखेड, जि. परभणी) येथे आहे. येथे जाण्यासाठी गंगाखेड तालुक्‍यातून वडगाव फाट्यावर उतरून हरंगुलला जाता येते. बीड जिल्ह्यातील बारा ज्योतिर्लिंगपैकी परळी वैजनाथ- गंगाखेड रोडवरून वडगावफाट्यावरून जाता येते.

रेवणनाथ.
पातला परी अकस्मात । येता झाला बाळ जेय ।।
सहज चाली पुढे चालत । बाळ दृष्टी देखिले ।।२१।। (अध्याय ३४, ओवी १२१)

ब्रह्मदेवाचे वीर्य रेवा नदीच्या तीरावर पडले. त्याचाच पूर्व संकेतानुसार चमसनारायणांनी प्रवेश केला. एक मुलगा जन्मास आला. सहजसरुख नावाच्या कुणब्याने त्याला पाहिले. त्याने व त्याच्या पत्नीने या बाळाला सांभाळले. रेवा नदीकाठी सापडला म्हणून त्याचे नाव रेवणनाथ ठेवले. दत्तात्रयांनी त्याला महिमासिद्धी दिली. रेवणनाथांचे जन्मस्थान रेवानदी, तर संजीवन समाधी रेणावी (वीटा, ता. खानापूर, जि. सांगली) येथे आहे. येथे जाण्यासाठी विटे गावातून १० कि. मी. अंतरावर रेणावी हे गाव आहे. तेथेच हे देवस्थान आहे.

रेवण नाथ व दत्तगुरु.

"दत्त प्रभू मजवर कृपा करा व मला सनाथ करा" या विनंतीवरुन दत्तगुरुंनी रेवणांस सिध्दी आशिर्वाद रुपाने दिली. दत्ताने दिलेल्या सिध्दीला आवाहन करुन रेवणने धान्यांच्या राशींचे सोन्यात रुपांतर करुन सिध्दीची प्रचिती घेतली.या सिध्दीच्या जोरावर गावांतील लोकांना रेवणने तृप्त व मालामाल करुन देऊन आपला भविष्यातील जनकल्याणाचा मार्गाची निवड केली.

"ब्रह्मदेव सृष्टीचा रचनाकर्ता आपल्या पौरुष्याच्या अंशापासून हजारो ऋषी तयार झाले. त्यावेळी त्याचे तेज थोडेसे रेवा नदीच्या काठी पडले होते. पूर्व ईश्वरी संकेताप्रमाणे नवनारायणांपैकी चमस नारायणानी तेथे प्रवेश केला व एका बालकाचे रूप धारण केले. जल प्रवाहाबरोबर रेवा नदीतून वाहत वाहत आलेले हे बालक किनाऱ्यावर लागले अन् ते मोठ्या मोठ्याने रडू लागले. त्यावेळी सहनसारूक नावाचा एक कुणबी तिथं पाणी आणण्यासाठी आला असता त्याने ते सुंदर बालक पहिले. बाळ रडत होते. सहनसारुकचे मन कळवळले. त्याने त्या निराधार अजाण बालकाला उचलून आपल्या घरी आणले व पत्नीकडे दिले. तिने ते बाळ छातीस लावले व नंतर आपल्या मुलाशेजारीच तिने त्याला पाळण्यात झोपविले. एवढे सुंदर बालक ते ही रेवातीरी सापडले म्हणून त्यांनी त्या बालकाचे नाव रेवण असे ठेवले.

रेवण खरच आज्ञा धारक मुलगा होता. तो आपल्या वडिलांना शेतीच्या कामात मदत करे. एक दिवस पहाटे रेवण बैलांना घेऊन शेतात जात असताना श्री दत्तात्रय महारांजांची व त्याची भेट झाली. त्यावेळी दत्त महाराजांनी एक नजरेत हा बालक म्हणजे पूर्वीचा चमस नारायण आहे हे ओळखले. त्या छोट्या स्पर्शानेही बाळ रेवणास ज्ञानप्राप्ती झाली. त्याने हे "दत्त प्रभू मजवर कृपा करा. मला सनाथ करा" अशी प्रार्थना केली. प्रसन्न झालेल्या दत्त प्रभूंनी रेवण बाळास एक सिद्धी भेट दिली. ही सिद्धी रृतुझ्या इच्छा पूर्ण करील असा आशीर्वाद ही दिला. आपल्यास प्राप्त झालेली सिद्धी खरच काय करू शकते हे पडताळून पाहण्यासाठी रेवण त्या महिमा सिद्धीला आवाहन करून म्हणाला, “ही शेतातील धान्याची रस सोन्याची करून दाखव.” त्याबरोबर सिद्धीने आपली कृपा नजर फिरवताच धान्याची रास सोन्याची झाली. मग काय ! या सिद्धीच्या बळावर रेवण गावातल्या गोर-गरिबांना यथेच्च इच्छा भोजन देऊ लागला. त्यामुळे अवघ्या पंचक्रोशीत हा बालक सिद्ध पुरुष या विशेषणाने ओळखला जावू लागला.

एक दिवस मच्छिंद्रनाथ हे त्या गावात आले. तेव्हा त्यांना या सिद्ध पुरुषाची माहिती कळली. तसेच मच्छिंन्द्रनाथांच्या हे पण लक्षात आले की हा रेवण बाळ म्हणजेच चमस नारायण आहेत. तेव्हा मच्छिन्द्रनाथांनी एक गम्मत केली. त्यांना आपल्या योग सामर्थ्याने वाघ-सिंह यासारखे पशु यांना आपला मुळचा हिंस्र स्वभाव विसरून मवाळ प्राण्यांप्रमाणे जवळपास खेळवू लागले. तर पक्षी त्यांच्या अंग-खांद्यावर खेळू लागले. हे पाहून लोक मोठे चकित झाले. त्यांनी मछिंन्द्रनाथांचा प्रताप रेवणास सांगितला. रेवण बाळाने स्वत: तेथे जावून प्रत्यक्ष ते दृश्य पाहून खाती करून घेतली. घरी येऊन त्याने सिद्धी आवाहन केले. "मला अशी सिद्धी प्राप्त करून दे" अशी मागणी केली. तेव्हा तेथे प्रकट झालेल्या सिद्धीने सांगितले की ही गोष्ट केवळ एक ब्रह्मयोगीच करू शकतो. तुला ते ब्रह्मज्ञान केवळ दत्त प्रभूंच्या कृपेनेच प्राप्त होईल. हे कळताच रेवण तयार झाला. त्याने त्याजागी पहिली दत्तभेट झाली. त्या स्थानावर दृढ निश्चयाने बैठक मारून ध्यान, तपसाधना चालू केली.

मच्छिंद्रनाथ समवेत दत्त प्रभूंनी रेवण बाळाला मंत्रोपदेश दिला. त्याला नाथ पंथाची दिक्षा दिली. सर्व विद्या शक्ती यात निपुण करून त्यास ब्रह्मज्ञानी बनविले. चमस नारायणाचा प्रथम रेवण आणि नंतर दत्त-मच्छिंद्रनाथ कृपेने रेवणनाथ झाले. भक्ति प्रचाराच्या नाथपंथ कार्यात त्यांचाही सहभाग होऊ लागला.

नाथपंथीय योगींची ज्ञान, भक्ति व श्रद्धा ही लोकमानसात वाढवत नवनाथांची लोकोद्धाराचे कार्य चालू केलेले होतेच. आणि एक दिवस गावोगाव भ्रमंती अन भिक्षाटन करत रेवणनाथ हे माणदेशातील विटे ग्रामात आले. त्या गावामध्ये सरस्वती नावाचा एक ब्राह्मण अन त्याची पत्नी जान्हवी ही दंपती राहत होती. त्यांना संताने झाली पण ती टिकली नाही. जान्हवीला सहा पुत्र झाले पण ते दहा दिवसापेक्षा जास्त दिवस टिकले नाहीत. देवाची कृपा म्हणून की काय सातवा पुत्र मात्र जवळ जवळ दहा वर्षाचा होईपर्यंत वाढला. त्या आनंद प्रीतर्थ्य सरस्वती ब्राह्मण आनंदाने ब्राह्मण भोजन देत होता. नेमके त्याचवेळी रेवणनाथ हे त्यांचे घरी आले. सरस्वती ब्राह्मणाने त्यांचे उचित आदरातिथ्य केले. भोजन दिले. इतकेच नव्हे तर नाथजी जेव्हा जाऊ लागले तेव्हा त्या दम्पतीने त्यांना त्या रात्री आपल्या घरी मुक्काम करण्याची विनंती केली. रात्री ब्राह्मण रात्री त्याचे पाय दाबून देत बसला. पत्नी मुलासह आत झोपली. पण नेमके मध्यरात्री दैवाने डाव साधला. बाळ मरण पावला. तिला हे कळताच माय बिचारी स्फुंदू स्फुंदून रडू लागली. नाथांची झोपमोड होऊ नये म्हणून सरस्वती ब्राह्मण जगाचा हलला नाही. का ती ब्राह्मणी पण आपल्या मनाच्या दु:खाला मोकळी वाट करून देऊ शकला नाही.

सकाळी नाथांना जाग आली ब्राह्मण पत्नीचे रडणे ऐकूनच. नाथांनी झाल्या प्रकारची नीट चौकशी केली आणि आपण या घरांत असताना इथे यमदूत आलेच कसे? त्यांनी बालकाचे प्राण कसे काय हरण केले? याचे रेवणनाथांना मोठे आश्चर्य वाटले आणि त्यांना रागही आला. रेवणनाथांनी त्या दंपतीला बाळाचे कलेवर सांभाळण्यास सांगून बालकाचे प्राण परत आनायालाते यमलोकी गेले. यमाने नाथांना सांगितले, की हे काम माझे नाही ही शिव आज्ञा आहे. तुम्ही कैलासावर जा व शिवाकडून बाळाचे प्राण आणा! यमलोकीहून रेवणनाथ कैलास पर्वतावर गेले. तेथे ही शिव गणांनी त्यांना अडवले. नाथांनी त्यांच्याशी युद्ध करून त्यांची दयनीय अवस्था केली. वार्ता मिळताच स्वत; शंकर युद्धाला आले. रेवणनाथांनी वाताकर्षण मंत्र म्हणून वायुरोधन केले त्यामुळे शिव-अष्ट भैरव, शिवगण या साऱ्यांचेच प्राण कंठाशी आले. मग वैकुंठाहून भगवान विष्णू धावत आले. त्यांनी रेवण नाथास आवरले व आपल्याकडील सरस्वती ब्राह्मणांचे सातही बालकांचे प्राण परत देण्याची तयारी दाखवली. त्यामुळे रेवणनाथ शांत झाले. त्यांनी शिवांसह सर्वांचे प्राण वाचवले. भगवान विष्णूंनी आदिनाथांशी भेट घडवली. त्यांना आशीर्वाद देवविले. रेवण नाथांना घेवून विष्णू वैकुंठी गेले. त्यांनी सातही बालकांचे प्राण परत आणले.

वटसिद्ध नागनाथ.
असो वटवृक्ष पोखरांत । अंड राहिले दिवस बहूत ।।
अवि होत्र नारायण त्यांत । ईश्‍वर सत्ते संचारला ।।९२।।
दिवसेंदिवस अंडात। वाडी लागले जीववंत ।।
देह होता सामर्थ्यवंत । भगन लागे अंड ते ।।९३।।
त्यांत तलवर पोखरांत । बाळ रुदन करी अत्यंत ।।
निढळवाणी कोण त्यांते । रक्षणाते नसेची ।।९४।। (अध्याय ३६, ओवी ९२, ९३, ९४)

ब्रह्मदेवाचे वीर्य एका सर्पिणीने भक्ष केले. तीच्या पोटी अग्निहोत्र नारायणाने प्रवेश केला. अस्तिक ऋषिंच्या सांगण्यावरून सर्पिण झाडाच्या ढोलीत बसून राहिली. सर्पिणीने एक अंडे घातले. ते फुटून मूल बाहेर आले. ते रडू लागले. याच वेळी कोश धर्मा नावाचा ब्राह्मण तेथून जात होता. त्याने ते बाळ घेतले. पत्नी सुरादेवीला दाखविले. त्यांनी त्याचा सांभाळ केला. वडाच्या ढोलीत जन्मला म्हणून त्याचे नाव वटसिद्ध नागनाथ असे ठेवले. दत्तात्रयांनी त्याला नाथपंथाची दीक्षा दिली. नागनाथांचे जन्मस्थान नैमिष्यारण्य येथे आहे. तर संजीवन समाधी वडवळ (ता. चाकूर, जि. लातूर) येथे आहे. येथे जाण्यासाठी लातूरवरून २५ कि. मी. अंतरावर चाकूर तालुक्‍यात वडवळ हे गाव आहे. हैद्राबाद - परळी रेल्वे मार्गावर हे तीर्थस्थान आहे.

चरपटीनाथ.

या परी बहुता दिवशी । ईश्‍वर आता अवतार ।।
विप्पलायन त्या रेतासी । नारायण संचारला ।।२१।। (अध्याय ३८, ओवी २१)

एकदा पार्वतीच्या विवाहप्रसंगी सर्व देव जमले होते. पार्वतीच्या सौंदर्याला पाहून ब्रह्मदेवाचे वीर्यपतन झाले. ते ब्रह्मदेवाने टाचेने रगडले. त्यामुळे त्याचे दोन भाग झाले. एका भागाचे योगे साठ हजार वालखित्य ऋषी उत्पन्न झाले. दुसरा भाग मात्र नदीत वाहत जाऊन एका कुशास अडकला. त्यात पिप्पलायण यांनी प्रवेश केला. त्याच वेळी बालकाचा जन्म झाला. सत्यश्रवा नावाचा ब्राह्मण पुनीत गावात राहता होता. एक दिवस भागीरथीच्या किनाऱ्यावर त्याला मुलगा दिसला. ब्राह्मणाने ते मूल उचलून सत्यश्रवाकडे दिले व सांभाळण्यास सांगितले. त्याचे नावही "चरपटीनाथ' असे ठेवण्यास सांगितले. सत्यश्रवा व त्याची पत्नी चंद्रा यांनी त्याचा सांभाळ केला. पुढे दत्तात्रयांनी त्याला अनुग्रह दिला. चर्पटीनाथांचे जन्मस्थान रेवानदी, तर संजीवन समाधी मात्र नाही. कारण ते गुप्त रूपाने अद्यापही भ्रमण करीत आहेत, असा उल्लेख ग्रंथांत आढळतो.

या नवनाथांबरोबरच मत्स्येंद्रनाथांचे चौरंगीनाथ, मीननाथ हे शिष्य आहेत. प्रत्येक नाथांचे शिष्य सिद्ध आहेत. त्यांची संख्या ८४ आहे. या शिष्यांनाच ८४ सिद्ध असे म्हणतात

  १. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...