Showing posts with label पंकज कोटलवार -लेख मालिका. Show all posts
Showing posts with label पंकज कोटलवार -लेख मालिका. Show all posts

Wednesday, February 8, 2023

 


थेट पंकज कोटलवारच्या लेखणीतुन – विचार बनाये जिंदगी!

-------------------------------------------------------

त्या घटनेला आज एकतीस वर्ष झाले.

तीन दशकांपासुन बॉलीवुडमध्ये आपलं स्टारपद अढळपणे मिरवणारा आमिर खान तेव्हा आपल्या वयाच्या विशीत होता, त्याचा चुलत काका मन्सुर खान ह्यांनी त्याला हिरो म्हणुन हिंदी सिनेमामध्ये लॉन्च करायचे ठरवले होते,

फिल्मचे नाव होते, कयामत से कयामत तक, आणि ती एक लो बजेट फिल्म होती, चित्रपट पुर्ण झाला, पण सिनेमा बनवातानाच संपुर्ण बजेट संपले होते,

सिनेमाची प्रसिद्धी आणि प्रमोशन करण्यासाठी निर्माता-दिग्दर्शक ह्यांच्याकडे पुरेसे पैसेच उरले नाहीत.

त्याकाळात तर केबल नेटवर्कही नव्हते, इंटरनेटही नव्हते, त्यामुळे चित्रपटांची प्रसिद्धी मुख्यतः पोस्टरमधुनच व्हायची.

अमिर खान नवखा असला, कुमारवयीन असला, आणि पहील्याच सिनेमाचा हिरो असला तरी, लहानपणापासुन ह्या क्षेत्रात वावरल्याने त्याला सिनेमाच्या तंत्राची चांगली जाणीव होती.

कसलाही खर्च न करता, आपल्या सिनेमाचे प्रमोशन करण्यासाठी त्याने आपल्या काकाला सांगुन एक शक्कल लढवली,

आपल्या सिनेमाची छोटी छोटी पोस्टर्स घेऊन तो स्वतः आपल्या पाच सहा मित्रांना घेऊन मुंबईतल्या ऑटोस्टॅंडवर भेटी देऊ लागला.

प्रत्येक ऑटोवाल्याशी ओळख करुन घ्यायची, मी एका सिनेमाचा हीरो आहे आणि माझ्या सिनेमाचे पोस्टर तुमच्या ऑटोवर चिटकवण्याची परवानगी द्याल का? अशी नम्र विचारणी करायचा,

बहुंसंख्य ऑटोवाले त्याच्या ह्या लाघवी बोलण्याने खुश व्हायचे, आनंदाने पोस्टर लावण्याची परवानगी द्यायचे, आवर्जुन पिक्चर बघण्याचे आश्वासनही द्यायचे,

अमिरखानची व त्याच्या येणार्‍या पिक्चरची जोरदार प्रसिद्धी होवु लागली,

असंच एका सकाळी अमिर आणि त्याचे मित्र एका ऑटोस्टॅंडवर गेले आणि एकीकडे आमिर ऑटोवाल्याला नेहमीसारखं बोलु लागला, दुसरीकडे आत्मविश्वासाच्या भरात मित्रांनी ओटोमागे पोस्टर चिटकावुन ही टाकले,

मात्र त्या ऑटोवाल्याला हे आवडले नाही.

न विचारता, पोस्टर लावल्याबद्द्ल त्याने आमिरला खडसावले,

आमिरने माफी मागितली, पण ऑटोवाला खुपच रागात आला,

त्याने स्वतःच्या ऑटोवरचे पोस्टर काढले, टराटरा फाडले, त्याचे तुकडे तुकडे करुन अमीरच्या तोंडावर मारले, व म्हणाला,

“बडा आया, हिरो बनने!”

आमिरचा असा अपमान आजपर्यंत झाला नव्हता, त्याला खुप वाईट वाटले,

हा घाव त्याच्या वर्मी बसला,

तसाच खिन्न मनाने तो घरी परतला, स्वभावाने तो भावुक होता,

त्याच्या डोळ्यात आसवे जमा झाली,

त्याचे मित्र त्याला समजावु लागले, तेव्हा तर त्याने मोठमोठ्याने हुंदके देऊन रडायलाच सुरुवात केली,

पण पुढे हाच प्रसंग त्याला स्वतःमधलं बेस्ट देण्यासाठी सतत प्रेरीत करत राहीला, हे त्याने स्वतःचं मान्य केले आहे.

नियती अमिरला हरवायला आली होती, आमिर हरला नाही,

तो झुंजला, तो लढला आणि तो जिंकला.

कयामत से कयामत तक सुपर डुपर हिट झाला,

आमिरला फिल्मफेअर मिळाले, अमिर खान स्टार झाला.

आज आमिर खान स्वतःच्या कर्तूत्वावर कुठल्या कुठे जाऊन पोहचला,

आज त्याला हिणवणाऱ्या त्या ऑटोवाल्याचं काय झालं ते कोणालाच माहित नाही.

आपल्या ध्येयप्राप्तिच्या प्रवासावर आपली मानखंडना करणारे, अपमान करणारे अनेक प्रसंग कधीकधी आपल्याही आयुष्यात येतच असतील,

पण आयुष्यात मानहानीचे प्रसंग आल्यावर हातपाय गाळुन एका जागी बसुन शोकमग्न जगायचं, का प्रयत्नांचा वेग दुप्पट करुन अधिक जिद्दीने जगासमोर स्वतःच कर्तुत्व सिद्ध करायचं, हा निर्णय ज्याने त्याने घ्यायचा असतो,

असाच एक निर्णय १९८९ मध्ये पाकिस्तानच्या बॉलर्सनी फास्ट बॉलिंग करुन नाक फोडल्यावर लढण्याचा निर्णय सचिन तेंडुलकरने घेतला होता.

असाच एक निर्णय हॉटेल ताजमध्ये प्रवेश नाकारल्यानंतर डि. एस. कुलकर्णींनी घेतला होता.

असाच एक निर्णय मुंबईच्या लोकल मध्ये फुटकळ वस्तु विकणार्‍या गौतम अडाणी नावाच्या माणसाने घेतला होता.

असाच एक निर्णय पार्टनरनी विश्वासघात केल्यामुळे कफल्लक झालेल्या संदीप महेश्वरीने घेतला होता.

असाच एक निर्णय चित्रपटांमध्ये काम मिळवण्यासाठी पाच पाच वर्ष स्टुडीओचे धक्के खाणाऱ्या शाहरुख खानने घेतला होता.

आज आपली कितीही विपरीत परिस्थिती असो,

पण संकटात सापडल्यावर पुन्हा उठुन उभा राहुन लढण्याचा असाच एक निर्णय घेण्याची बुद्धी आपण विकसित केली पाहिजे!..

-----------------------------------------------------------------------------------------------------------------

तुम्ही बऱ्याच यशस्वी लोकांना, व्हिडीओमध्ये किंवा प्रत्यक्ष अनेक मोटीव्हेशनल स्पीकर्सना असं बोलताना ऐकलं असेल, पुस्तकांमध्ये वाचलं असेल की चांगले विचार चांगलं जीवन घडवतात.

तुमच्यापैकी बरेच जण लॉ ऑफ अट्रॅक्शन/ द सिक्रेट माननारे, यांच्यावर विश्वास ठेवणारे असतील.

इतरांच्या अतिरंजित कथा ऐकुन/वाचुन मीही मनापासुन तळमळीने व्हिज्वलायजेशन करतो पण मला यश का मिळत नाही, असा प्रश्णही तुम्हाला कित्येकदा पडला असेल?

असं एका जागी बसुन बसुन व्हायब्रेशन सोडुन खरचं यश मिळतं का?

हे खरं आहे की खोटं?

हे अर्धसत्य आहे.

मग सत्य काय आहे?

----------------------------------------------

“तुम्ही जसा विचार करता, तसे तुम्ही बनता!”......

----------------------------------------------

माझ्या लेखी लॉ ऑफ अट्रॅक्शनची खरी समज एवढीच आहे,

आपण ज्या गोष्टीवर संपुर्ण लक्ष केंद्रीत करतो, ती गोष्ट घडते.

एखाद्या गोष्टीबद्द्ल सतत सतत विचार केला, तीच ती गोष्ट डोक्यात घोळवली की ती प्रत्यक्षात येतेच येते.

जगातल्या प्रत्येक असामान्य माणसाने ह्या कळत नकळत, ह्या वैश्विक नियमाचा वापर केला आणि कमी कालावधीत यश मिळवले.

त्यांनी नेमकं काय केलं?

त्यांनी आपल्याला हवं तसं विश्व आपल्या कल्पनाशक्तीने तयार केलं!

एक खोटं खोटं आभासी जग!

त्या जगामध्ये त्यांनी स्वतःला हरवुन टाकलं,

वास्तव त्या स्वप्नांच्या कितीही विपरीत असलं तरी त्याला मर्यादा मानन्यास त्यांनी नकार दिला.

ते फक्त आपल्या कल्पनांमध्येच आनंदी राहीले,

आणि एके दिवशी

आणि त्याच कल्पनाशक्तीने त्या माणसांच्या आतमध्ये एक अनोखी उर्जा भरली,

कल्पनाशक्तीने तयार झालेल्या त्या अनमोल उर्जेचा प्रत्यक्ष व्यवहारात वापर करुन ह्या सामान्य लोकांनी आपली स्वप्ने पुर्ण केली. जग जिंकलं!

आता स्वतःचं निरीक्षण करा.

तुम्ही जेव्हा स्वप्नं बघता तेव्हा उर्जा तयार होते का?

आपले गोल्स लिहल्यावर, व्हिज्वलाईज केल्यावर तुम्हाला उत्साहीत आणि प्रचंड एक्सायटेड वाटतं का?

ती उर्जा जतन करा, त्या उर्जेला विखरु देऊ नका,

----------------------------------------------------------------------------------------

मोठ्या स्वप्नांचे दहा छोटे छोटे टप्पे करा.

उदा. –

ध्येय - “मला एक वर्षात पंचवीस लाख रुपये कमवायचे आहेत.”

१) एक वर्षात पंचवीस लाख कमवणे म्हणजे एका महिन्यात दोन लाख!

हे दोन लाख रुपये कुठुन येतील?

२) त्याचे काही मार्ग असे आहेत. - नौकरीच्या ठिकाणी मिळणारा पगार/ व्यवसायातुन मिळणारे उत्पन्न/ गुंतवणुकीतुन आलेला रीटर्न/ फावल्या वेळेचा सदुपयोग करुन झालेली एक्स्ट्रा कमाई!

३) मी कमीत कमी अत्यावश्यक तेवढाच खर्च करेन आणि जास्तीत जास्त उत्पन्न कसे वाढवु याविषयी जागरुक राहीन!

- हे साधण्यासाठी मी स्वतःमध्ये, स्वतःच्या कार्यपद्धतीमध्ये बदल करणार आहे.

४) मी उद्या सकाळी लवकर उठेन. शरीराला उत्साह देण्यासाठी व्यायाम करेन. मनाला प्रसन्न आणि तरतरीत ठेवण्यासाठी ध्यान करेन.

५) मी नौकरीच्या ठिकाणी मन लावुन काम करेन, माझ्या उपस्थितीने व माझ्या कार्यपद्धतीने, सर्वांची मने जिंकेन. ठरलेल्या वेळी कामाच्या ठिकाणी पोहचेन व बाहेर पडेन. कंपनीचा शक्य तितका फायदा करुन देईन.

६) व्यवसायामध्ये काही पटींनी ग्रो होण्यासाठी मी स्वतःमध्ये आवश्यक त्या सुधारणा करेन. ब्रम्हांड मला ज्या कल्पना पाठवत आहे, त्यांच्यावर तात्काळ अंमलबजावणी करेन.

७) मला गुंतवणुकीचं सामर्थ्य माहित आहे, एक एक रुपया माझ्यासाठी महत्वाचा आहे. मी वायफळ खर्च करणार नाही.

८) मला वेळेची किंमत माहीत आहे. मी व्हॉटसएप, फेसबुक, टी.व्ही यांच्यावरती माझा बहुमुल्य वेळ घालवणार नाही. फक्त सकारात्मक विचार आणि प्रोफेशनल वापरासाठी मी सोशल मिडीया वापरेन.

९) दिवसभरामध्ये कधीही माझ्या स्वप्नांपासुन आणि माझ्या विचारांपासुन मी भरकटणार नाही.

१०) स्वनियंत्रण मी सहज करु शकतो.

११) प्रत्येक दिवशी प्रत्येक बाबतीत मी अधिकाधिक चांगला होत आहे.

करुन बघा आणि लॉ ऑफ अट्रॅक्शनची जादु अनुभवा!

आपण आपल्या समोरच्या समस्यांपेक्षा कितीतरी जास्त मोठे आहोत, ही समज आपल्यामध्ये निर्माण व्हावी, या मनःपुर्वक प्रार्थनेसह,

आभार आणि शुभेच्छा!..

[10/21/2020, 7:46 AM] +91 95036 45430: स्वप्नातले घर बांधताना आकर्षणाचा नियम खरचं कामाला येतो का? इथे वाचा...

ना बादलों की छाव मे, ना चांदनी के गाव मे,

ना फुल जैसे रास्ते, बने है इसके वास्ते,

मगर ये घर अजीब है, जमीन के करीब है,

ये इट पत्थरोंका घर, हमारी हसरतों का घर,

ये तेरा घर, ये मेरा घर,

ये घर बहुत हसीन है…

------------------------------------------------------------------

थेट पंकज कोटलवारच्या लेखणीतुन - माझं घर, माझं स्वप्न!..

------------------------------------------------------------------

आपलं स्वतःच्या हक्काचं ऐसपैस, प्रशस्त, टुमदार घर असावं, अशी ह्या पृथ्वीवर जन्मलेल्या प्रत्येक व्यक्तीची इच्छा असतेच असते, ते बनवण्यासाठी बरेच लोक कर्ज काढतात, आयुष्यातील उमेदीच्या वीस वीस वर्षांची कमाई खर्च करतात, वेळप्रसंगी काटकसरीने जगतात, वर्षांनुवर्ष वाट पाहतात, त्रास सोसतात,

बॅंकवाल्यांपासुन बिल्डरांपर्यंत, इंजिनीअरपासुन मिस्त्रीपर्यंत सगळ्यांचे नखरे सहन करतात, कित्येक जणांचे उंबरठे झिजवतात, पण ह्या सगळ्यात उराशी जीवापाड जपलेलं टुमदार घराचं स्वप्न पुर्ण करतात.

अशी अत्यावश्यक आणि पावरफुल गोष्ट जिच्यासाठी माणुस कळत नकळत इतके कष्ट घेतो,

पै-पै करुन आयूष्यभर चिकाटीने साठवलेला पैसा एकरकमी सढळ हाताने खर्च करुन मोकळा होतो.

मध्यमवर्गीय माणसाच्या कमाईची बरीच मोठी रक्कम घर बांधण्यात खर्ची पडते.

आणि ज्यांचं स्वतःचं हक्काचं घर नसतं, ते आतुन स्वतःच्या घरासाठी तळमळत असतात,

दिवसेंदिवस घर बनवण्याची किंमत वाढत असताना, लॉ ऑफ अट्रॅक्शनचा वापर करुन लवकरात लवकर घर बांधण्याचं स्वप्न पुर्ण करण्यासाठी काही तंत्र आहे का?

नक्कीच आहे!

एक आर्किटेक्ट ह्या नात्याने मी घर बांधण्याच्या ह्या संपुर्ण प्रोसेसला अगदी जवळुन पाहिलयं, रोज रोज अनुभवलंय!..

मागच्या दहा वर्षात जवळपास दिडशेहुन अधिक घरे, बंगले डिझाईन केली आणि त्यांच्या बांधकामाची देखरेख करत, पुर्ण करुन दिली.

त्यातला काही जबरदस्त इच्छाशक्ती असणाऱ्या लोकांना आर्थिक आणि अनेक इतर प्रकारच्या अडचणींवर मार्ग काढत मनाजोगत्या घराचं स्वप्न पुर्ण करताना, स्वतःच्या डोळ्यांनी बघितल.

नकळत ते लॉ ऑफ अट्रॅक्शनचाच वापर करत होते.

उदा १ –

तीनचार वर्षांखालची गोष्ट आहे, एक पिग्मी एजंटचा व्यवसाय करणारा माणुस होता, परिस्थिती जेमतेम, एकाच्या ओळखीने तो माझ्याकडे आला, माहीत नाही का? पण घाबरत घाबरत बोलत होता,

मी प्लान आणि डिझाईन बनवली, आणि त्याने घराचं चित्र पाहिलं, काहीतरी घडलं, त्याच्या डोळ्यात एक वेगळीच चमक मला दिसली.

स्वतः घर असं दिसणार ह्या कल्पनेने तो भारावुन गेला, खुप आनंदी झाला,

त्याला ती डिझाईन खुप खुप आवडली, “साहेब, खर्च किती येईल?,”

मी म्हणालो, “अंदाजे, वीस लाख रुपये लागतील.”

त्याच्याकडे तेवढे पैसे नव्हतेच, पण ह्या वेळी मला त्याच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास दिसला,

“सर कितीपण कष्ट करेन आणि अगदी असंच घर बांधेन”,

त्याने खरं तर नकळत स्वतःशीच कमिटमेंट केली होती.

आहेत तेवढ्या पैशानिशी आम्ही काम सुरु केलं, मी पाहत होतो,

पुढचे कित्येक महीने त्याने आपल्या कामाचे तास वाढवले,

मला साईटवर सकाळी सातला बोलवायचा, आणि दिवसभर न थकता, बाराबारा तास तो मार्केटींगला जायचा, काय माहीत त्याने काय काय केलं, पण त्या पठ्ठ्याने वीस नाही, सव्वीस लाख रुपये खर्चुन अलिशान घर बांधलं.

वास्तुशांतीला गेलो, तेव्हा त्याचे सगळेच नातेवाईक आणि मित्र घर बघुन थक्क झाले होते, खुप कौतुक करत होते, शाबासकी देत होते.

मित्रांनो, त्याच्या स्वप्नांनी त्याला एक वेगळचं बळ दिलं होतं,

त्याचं आयुष्यच बदलुन टाकलं होतं, आळस झटकुन त्याला कामाला लावलं होतं, खरं तर, त्याच्या मागे लागुन, त्याच्या स्वप्नानं, त्याच्याकरवी, स्वतःला पुर्ण करवुन घेतलं होतं, मी त्याचा साक्षीदार होतो. जगासाठी हे एक आश्चर्य होतं, माझ्यासाठी त्याने लॉ ऑफ अट्रॅक्शन अंमलात आणला होता.

अजुन एक उदाहरण सांगतो!.. –

आमचे एक जुने वयस्कर व्यावसायीक मित्र आहेत, फक्त नवरा बायको, एक मुलगा, त्यांच्या बांधकामाच्या वेळी तर प्रचंड मोठी आव्हाने होती, एका राजकारणी गुंडाला त्यांची मोक्याची जागा बळकवायची होती,

तो धनशक्तीने प्रबळ, ह्यांना कोणाचाच पाठींबा नव्हता. पण त्यांनी शेवटपर्यंत चिवटपणे झुंज दिली. त्यांना तिथुन घालवण्यासाठी खुप खालच्या स्तरावर प्रयत्न झाले, इतके ही लढाई बघणारे थक्क झाले, एकवेळ तर पॅनिक होवुन मी ही गिव्हअप करायच्या, आणि काम सोडुन द्यायच्या मुडमध्ये आलो होतो, इतका त्रास वाढला होता, वेगवेगळ्या क्लृप्त्या वापरत, चहुबाजुंनी घेरणं, धमक्या देणं, सामान चोरणं, नगरपालीकेनं काम बंद पाडणं, पोलीस स्टेशनला वरात काढणं, असे कित्येक विचित्र झाले,

ह्या नवऱ्याबायकोनं खंबीरपणे प्रत्येक लढा दिला, ते प्रत्येक लढाईला हसत-हसत सामोरे गेले, प्रचंड जिद्दीने लढले आणि विजयीही झाले, लातुरमध्ये त्यांची चार मजली बिल्डींग आज दिमाखात उभी आहे,

दोघांनाही कंबरदुखी आणि गुडघेदुखीचा त्रास होता, किरायाच्या घर पहिल्या मजल्यावर होतं,

काम चालु असताना मी त्यांच्या किरायाच्या पडक्या घरात जायचो,

दुष्काळ होता, तेव्हा कुरकुर न करता, खालच्या मजल्याहुन बादल्यांनी पाणी वर घेऊन जायचे,

कितीही वाईट सिच्युएशन असली तरी आम्ही हसायचो, जोक मारायचो, मला अजिबात तणावात येऊ द्यायचे नाहीत, प्रत्येक वेळी आम्ही एकमेकांना नवी हिंमत द्यायचो!..

आज दोन वर्षांनी आठवतयं, आम्ही लॉ ऑफ अट्रॅक्शन वापरला होता, काहीही हो दे, जीव गेला तर बेहत्तर, घर तर बांधणारचं, अशा स्पिरीटने काम केलं म्हणुन घर पुर्ण झालं.

मित्रांनो, प्रत्येक घर बांधणारा ही लढाई आयुष्यात एकदा खेळतोच, तो त्याच्या जीवनातील अविस्मरणीय अनुभव असतो. कल्पनाशक्ती वापरुन, घराचं स्वप्न जलद पुर्ण करता येतं,

घर बांधण्याची प्रक्रीया मजेशीर आणि सोपी करता येते. घर बांधताना स्पष्टता हवी, जी आकर्षणाच्या नियमाचा वापर केल्याने, अंतर्मनाकडुन सहज मिळते आणि स्वप्न आस्तित्वात येतं.

आपलं ड्रिम हाऊस बांधण्याची तुमची इच्छा आहे का?

असेल, तर आपल्या ड्रिम हाऊसचं चित्र शोधा,

त्याला सतत आपल्या समोर ठेवा,

ब्रह्मांडाकडे सकाळ संध्याकाळ स्पष्ट संदेश पाठवा, विश्वास ठेवा!..

उत्तर नक्की मिळेल,

धन्यवाद!..

[10/24/2020, 2:52 PM] +91 95036 45430: Building wealth is a marathon; Not a sprint. Discipline is the key ingredient.

---------------------------------------------------------------------

थेट पंकज कोटलवारच्या लेखणीतून – गुंतवणूकीचे महत्व!..

-------------------------------------------------------

आजकाल प्रत्येक जण एक दुसऱ्याला ओरडून ओरडुन सांगत असतो, की इन्व्हेस्टमेंट करा, इन्व्हेस्टमेंट करा,

पण इन्व्हेस्टमेंट म्हणजे नेमकं काय?

इन्व्हेस्टमेंट ज्याला आपण मराठीत गुंतवणूक म्हणतो, म्हणजे आपल्या पैशाला अशा ठिकाणी लावणे, ज्यामुळे भविष्यात आपल्याला मुळ भांडवलापेक्षा जास्त संपत्ती वापस मिळते.

गुंतवणुकीतून नफा मिळवण्याच्या चार पद्धती असतात.

१) कॅपीटल एप्रीसिएशन –

यामध्ये आपण घेतलेल्या एसेटचे भाव वाढतात.

उदा. तुम्ही दहा वर्षाखाली वीस हजार रुपये तोळा किंमतीनं सोनं घेतलं असतं, तर आज त्याची किंमत पन्नास हजार रुपये तोळा झाल्यामुळे तुम्हाला एकशे पन्नास टक्के रिटर्न मिळाले असते.

२) व्याज –

तुम्ही बॅंकेत एफ डी करता, आणि त्यावर तुम्हाला नाममात्र व्याज मिळते.

३) डिव्हिडंड –

कंपनी आपल्या शेअरधारकाला आपला नफा समान प्रमाणात वाटुन टाकते, त्याला डिव्हिडंड म्हणतात.

४) भाडे/किराया –

तुम्ही आपली मालमत्ता जसे की जागा, वास्तु, कार किंवा साहित्य गरजु माणसाला काही काळासाठी किरायाने वापरायला देता, त्यातुन तुम्हाला नियमित उत्पन्न मिळते.

मार्केटमध्ये गुंतवणुकीतुन नफा कमवण्याच्या अजुन काही पद्धती आहेत, पण त्या सगळ्यांची मुळे खोलवर कुठेतरी वरील चार प्रकारांशी जोडलेली असल्याचे तुम्हाला आढळुन येईल.

श्रीमंत आणि गरीब माणसामध्ये एक आणि एकमेव फरक असतो, की गरीब माणसं इन्व्हेस्ट करत नाहीत, म्हणुन त्यांचा आयूष्यभर भाजी भाकरीचा अविरत संघर्ष सुरुच असतो,

खाओ, पिओ, मजा करो, कल किसने देखा? ही अल्पसंतुष्टी आणि ‘चलता है’, वृत्ती त्यांना आगीतुन फुफाट्यात घेऊन जाते.

कर्ज काढून, घर घेणारे, कारमध्ये फिरणारे आणि तात्पुरती चैन करणारे लोक एखादा मोठा आर्थिक झटका बसला की चांगलेच पस्तावतात.

नेमकं याउलट श्रीमंत माणुस आपल्या संपत्ती वर्धनाच्या बाबतीत प्रचंड जागरुक असतो.

तुम्ही वीस वर्षाचे असा, तीस वर्षाचे असा, किंवा चाळीस पन्नास वर्षाचे असा, तुम्ही दर महिन्याला नुसती बचतच नाही, तर नित्यनेमानं काहीतरी गुंतवणूक करतच राहीलं पाहीजे.

कोव्हिड संकट आपल्यासोबत एक भयंकर आर्थिक आरिष्ट्य घेऊन आलं आहे, येणाऱ्या काळात महागाई अजुन वाढेल. अन्नधान्य, भाज्या, दुध, औषधं सगळं महाग होत जाईल, अशा वेळी तुमच्या बॅंकेत ठेवलेल्या एफ डीची किंमत दिवसेंदिवस घटत जाईल.

अंदाधुंद पणे अविचारीपणे खरेदी केलेले स्टॉक्स आणि ब्रोकरने स्वतःच्या कमिशनसाठी तुमच्या गळ्यात मारलेले म्युचल फंड तुम्हाला कधीच चांगले रिटर्न देणार नाहीत.

अशा वेळी आपण स्वतःची तीक्ष्ण बुद्धीमत्ता विकसित करणं आणि आर्थिक साक्षर होणं जास्तीत जास्त आवश्यक होवुन बसलं आहे.

पावर ऑफ कंपाऊंडींग म्हणजे चक्रवाढ व्याजाची शक्ती, ही जगातलं आठवं आश्चर्य आहे, असं आईनस्टाईन म्हणाला होता,

पण मग कोणती गूंतवणूक चांगले रिटर्न देते?

सोनं, रिअल इस्टेट का शेअर मार्केट?

जर तुम्ही १९८० मध्ये एक लाख रुपये सोन्यामध्ये गुंतवले असते तर २०२० मध्ये त्याची किंमत बेचाळीस लाख सत्तर हजार झाली असती.

सोन्याने मागच्या चाळीस वर्षात सरासरी वार्षिक दहा टक्के रिटर्न दिले आहेत.

जर तुम्ही १९८० मध्ये भारताच्या मोठ्या शहरामध्ये एक लाख रुपयांची एक जागा विकत घेतली असती तर आज त्याची किंमत एक कोटी दहा लाख असली असती.

रिअल इस्टेटने मागच्या चाळीस वर्षात साडेबारा टक्के वार्षिक ग्रोथ दाखवली आहे.

पण जर का तुम्ही १९८० मध्ये भारतातल्या शेअर बाजारातल्या प्रख्यात आणि लार्ज कॅप कंपन्यांमध्ये एक लाख रुपये गुंतवले असते, तर आज त्याची किंमत तीन कोटी शहात्तर लाख रुपये असली असती.

शेअर्स बाजाराने मागच्या चाळीस वर्षात सरासरी सोळा टक्क्यांचे रिटर्न दिले आहेत,

असे असतानाही सर्वसामान्य लोकांना शेअर बाजारात शॉर्ट टर्म आणि लॉन्ग टर्म दोन्ही प्रकारच्या व्यवहारांमध्ये फायदा कमी आणि लॉसच जास्त होतो, असे का?

कारण आपण एकतर वाईट कंपन्या स्वस्त दरात खरेदी करतो,

नाहीतर अतिशय महाग दरात चांगल्या कंपन्याचे भागीदार बनतो,

दोन्ही वेळा अपयशच आपल्या पदरी पडते.

आपल्याला नेमका हाच चक्रव्युह भेदायचा आहे.

त्यासाठी प्रत्येक महिन्याला हातामध्ये काही ना काही शिल्लक पैसा साठवण्याची सवय तुम्ही तुमच्या अंतर्मनामध्ये रुजवली पाहिजे.

हा खेळता पैसा नसेल तर कितीही जास्त नॉलेज असुन काहीच फायदा नाही,

साधी जीवनशैली, आवश्यक तिथेच खर्च करणे, आणि खर्चाच्या आधी बचतगुंतवणुक करणे हे सुत्र आपल्याला मनापासुन स्वीकारावे लागेल.

जसं सकाळी उठल्यावर सवयीने नित्यनेमाने ब्रश करतो, आंघोळ करतो, कामाला जातो, जेवण करतो अगदी तसंच इन्व्हेस्टमेंट सुद्धा आपल्या आयुष्याचा एक भाग झाली पाहिजे.

एकदा का तुमच्याकडे शिल्लक पैसा साठायला लागला, तर तुम्ही इतरांपासुन प्रभावित न होता, स्वतःची बुद्धी वापरुन शेअर्स निवडायला शिकलं पाहिजे.

कमी किंमतीत चांगले शेअर्स कसे निवडायचे, आपलं मुळ मुद्द्ल कसं सांभाळायचं?

उद्यापासून एक महिना चालणाऱ्या व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग व्हॉटस एप कोर्समध्ये आपण हेच तर शिकणार आहोत.

आभार आणि शुभेच्छा!...

[10/26/2020, 5:36 PM] +91 95036 45430: -------------------------------------------------------------------------------------------------------------------

थेट पंकज कोटलवारच्या लेखणीतुन – बाई; एका रंगपर्वाचा मनोहर प्रवास!

-------------------------------------------------------------------------------------------------------------------

बाई, म्हणजे विजया मेहता!

विजया मेहता हे मराठी रंगभुमीवर आदरानं घेतलं जाणारं नाव आहे, ह्याच्यापलिकडे मला त्यांच्याबद्द्ल काही माहिती नव्हती.

थोड्यांच दिवसांखाली पुलं यांच्या चरित्रावर आलेल्या व्यक्ति आणि वल्लीमध्येही ‘विजया मेहता’ ह्यांच्या भुमिकेमुळं कुतुहुल वाढलं होतं.

आणि अशातच लायब्ररीमध्ये पुस्तकं धुंडाळत असताना, अंबरीश मिश्र ह्यांनी लिहलेल्या ‘बाई’ नावाच्या पुस्तकावर नजर पडली, ते पुस्तक विजया मेहतांवर असल्याचं कळलं, आणि क्षणाचाही विलंब न करता मी त्या पुस्तकावर झडप घाली.

नाटकांवरची पुस्तकं, आपल्याला एका वेगळ्याच जगात घेऊन जातात.

एका रात्रीत एकशे एक्क्याऐंशी पानं वाचुन आज खरोखर मी तृप्त झाले आहे,

खरोखरच विजया मेहतांचे व्यक्तिमत्व जितके मोहक आहे, तितकेच उत्तुंग आहे,

विजया मेहता ह्या जगभरातल्या रंगभुमीवर भारताची ओळख बनल्या,

भारतीय नाटकांना त्यांनी आंतराष्ट्रीय पातळीवर लोकप्रिय केले,

विजयांबाईंनी केलेलं नाटक हे रंगभुमीवर शंभर टक्के यशस्वी होणार, अशी खुणगाठ निर्मात्यांनी बांधली होती.

आणि प्रत्येक नाटकाला एक जिवंत आणि नवं आव्हान म्हणुन स्वीकारणार्‍या विजयाबाईंनी आपल्या ह्या प्रतिष्ठेला कधी धक्का लागु दिला नाही.

विलक्षण प्रतिभा लाभलेल्या, पहिल्या महिला दिग्दर्शक म्हणुन त्यांचे प्रचंड कौतुक झाले.

अल्काझी आणि अदी मर्दबान अशा कसलेल्या दिग्दर्शकांपुढे त्यांनी अभिनयाचे धडे गिरवले,

‘सुंदर मी होणार!’, ह्या आपल्या नाटकात दिदीराजेंचा रोल करण्यासाठी पुलंनी त्यांना निवडले होते.

 पुढे विजय तेंडुलकर, श्रीराम लागु, अरविंद देशपांडे, भास्कर चंदवलकर आणि अनेक उत्साही नवीन मंडळींनी रंगायन नावाची संस्था काढली, विजयाबाई त्या संस्थेच्या ‘प्राण’ होत्या.

शेकडो कलावंताच्या लाडक्या त्या बाई झाल्या.

त्यांच्याकडे आईची माया आहे, आणि शाळेतल्या खडुस आणि कडक हेडमास्तरीणसारखा दरारा आहे.

आणि नेमक्या वेळी नेमकं शस्त्र चालवण्याची कलासुद्धा त्यांना अवगत आहे,

रंगायनने महाराष्ट्राल अनेक रसबहार नाटके दिली.

पुढे विजयाबाई नाट्यशास्त्राच्या अभ्यासासाठी, काही वर्षांसाठी इंग्लड-जर्मनीला गेल्या.

पीटर ब्रुक्स आणि फ्रिट्झ बेनेवित्ज ह्यांच्यासारख्या नावाजलेल्या आणि मनस्वी कलाकरांच्या सोबत काम करताना त्यांनी पाश्चात्य रंगभुमीचे अंतरंग जाणुन घेतले.

रंगायन सोडल्यावर विजयाबाई स्वतःच दिग्दर्शक - निर्मात्या झाल्या,

विक्रम गोखले सारख्या दिग्गज अभिनेत्याला, ताकतीचा रोल देऊन, पहिल्यांदा लोकांपुढे आणण्याचे श्रेय विजयाबाईंना जाते,

‘बॅरीस्टर’ नावाच्या नाटकाने विक्रम गोखले महाराष्ट्राच्या घराघरात आणि लोकांच्या मनामनात पोहोचले,

‘महासागर’ आणि पुरुष ह्यांनी ‘नाना पाटेकर’ हा अदभुत कलाकार जन्माला घातला.

नीना कुलकर्णी, रिमा लागु ह्यांनीही विजयांबाईच्या छत्रछायेखालीच व्यावसायिक रंगभुमीवर प्रदर्पण केलं.

‘ब्रेश्त’ ही एक खुमासदार भाष्य करणार्‍या नाटकाची शैली आहे, त्याचा मराठीत वापर करुन त्यांनी ‘अजब न्याय वर्तुळाचा’ हे गजब नाटक लोकांपुढे आणलं, आणि रसिकांनी त्याला डोक्यावर घेतलं.

ह्याच ब्रेश्त शैलीवर आधारित बेनेवित्झ ह्या नाटककारासाठी त्यांनी ‘चॉक सर्कल’ नावाचं नाटक तर इतक्या विलक्षण पद्धतीने बांधलं की बर्लिन महोत्सवात प्रेक्षकांनी नाटकाला उभी राहुन मानवंदना दिली.

शाकुंतल, हयवदन आणि नागमंडल ह्या आणि अशा, विजयाबाईंच्या कित्येक नाटकाच्या रोचक कहाण्या आहेत, किस्से आहेत.

आज मराठी हिंदीत अव्वल स्थानी काम करणारे अनेक कलावंत बाईंनी घडवले आहेत,

आपल्या लाव्हक्या स्वभावाने त्यांनी आपल्या ह्या गोतावळ्याला जीव लावला आहे.

बाईंचा लळा लागलेली लोक त्यांच्या सहवासासाठी आसुसलेली असतात,

संपर्कात आलेला प्रत्येक माणुस त्यांच्या रंगभुमीच्या ज्ञानाने आणि त्यांच्या मोहक स्वभावामुळे भारावला जातो,

नाना पाटेकर, विक्रम गोखले, नीना कुलकर्णी, विजय केंकरे, प्रतिमा कुलकर्णी, रीमा लागु,

महेश एलकुंचवार, सुहास जोशी, मीना नाईक आणि मंगेश कुलकर्णी,

अजित भुरे, अमृता सुभाष आणि दिलीप कोल्हटकर

अशा अनेक कलावंतानी सांगितलेल्या आठवणींचा कोलाज म्हणजे ‘बाई’ हे पुस्तक आहे.

अशा दिग्गज कलांवतानी आपल्या वाट्याला आलेलं बाईंच प्रेम शब्दात मांडण्याचा प्रयत्न केलाय, त्या पुस्तकाचं नाव आहे, बाई!

अत्यंत व्यावसायिक असलेल्या लोकांनाही नकळत हळुवारपणे भावनिक करणारा, मनाचा एक कोपरा म्हणजे बाई!

बाईंचे मिस्टर फरोख मेहता ह्यांनी लिहलेलं शेवटचं प्रकरण तर निव्वळ अफलातुन आहे,

माझी बायको कशी आहे, याचं विनोदी वर्ण्न करुन हा माणुस आपल्याला मनसोक्त हसवतो, आणि

असा काही भावुक शेवट करतो, की कधी आपले डोळे पाणावले कळतच नाही.

काही काही लोकांना खुमासेदार शैलीत विचार मांडण्याचं दैवी वरदान असतं हेच खरं!

विजयाबाईंच्या आतमध्ये अनेक जणांची आई दडलेली आहे, याचा प्रत्यय आल्यामुळे की काय? आपणही नकळत बाईंमध्ये गुंतत जातो,

आणि बाईंनी आपल्या लेकरांवर केलेली माया, त्यांच्या शब्दातुन झिरपत झिरपत आपल्यालाही चिंब भुजवुन टाकते.

आभार आणि शुभेच्छा!

[10/27/2020, 3:36 PM] +91 95036 45430: ------------------------------------------------------------------

थेट पंकज कोटलवारच्या लेखणीतुन – प्रतिसृष्टीचं निर्माण करणारे दोन देवदुत!

------------------------------------------------------------------


आपल्या अवतीभवती वाटोळं झालेला निसर्ग, दुषित झालेलं पर्यावरण, प्रदुषित हवा-पाणी-जमिन ह्या सगळ्यांकडे बघुन आपण सर्वजण अस्वस्थ होतो. हळहळतो, सुस्कारे सोडतो, आणि नजर फिरवुन आपल्या कामाकडे वळतो.


एकीकडे शहरी भागात कोरडं, नीरस आणि शुष्क जीवन तर दुसरीकडे जंगल आणि वनांच्या वेगळ्याच समस्या आहेत, तुफान वेगाने होणारी भरमसाठ वृक्षतोड, कोवळ्या, निष्पाप वन्यप्राण्यांच्या हक्काच्या घरांचा नाश, हत्ती असो वा वाघ सिंह, शिकाऱ्यांनी क्रुरपणे केलेल्या प्राण्यांच्या कत्तली, कुठल्याही संवेदनशील माणसाला अवस्थ करतात.


पण ह्या जगात काहीकाही लोक खरोखर अदभुत आणि असामान्य असतात, आपल्या कर्तुत्वाने ते आपल्यासमोर का जगावं आणि कसं जगावं? ह्याचा धडा घालुन देतात. 


 जेव्हा कोट्यावधी आणि अब्जावधी जनता मी आणि माझं बघण्यात धन्यता मानते, तेव्हा काही दैवी व्यक्तीमत्व मात्र स्वार्थानं लडबडलेलं तुच्छ जीवन त्यागुन एक भव्य आणि उदात्त संकल्प घेऊन आपले अख्खे आयुष्य त्या ध्येयासाठी वाहुन घेतात, हे आजकाल तसं विरळच! 


आणि पायाशी सगळ्या सुखसुविधा लोळण घेत असताना, त्यांचा त्याग करुन एक अनिवासी भारतीय जोडपं मागच्या पंचवीस वर्षांपासुन निसर्गाच्या संरक्षणासाठी अविरत झटत असेल तर,


तर मृतप्राय झालेल्या वनाचं हिरव्यागार गर्द वनराईमध्ये रुपांतर करणाऱ्या ह्या जोडप्याला आपण आधुनिक काळातले ऋषीचं म्हण्टलं पाहिजे.


अनिल मल्होत्रा हे तसे मुळचे भारतीय, पण शिक्षण झाल्यावर ते अमेरीकेला गेले, तिथे त्यांचा बांधकामाचा आणि रेस्टॉरंटचा व्यवसाय होता, न्यु जर्सीमधल्या वास्तव्यात त्यांची पामेला नावाच्या मुलीशी भेट झाली, त्यांचं प्रेम जुळलं आणि त्यांनी लग्न केलं.


त्या दोघांनाही निसर्गाचं प्रचंड आकर्षण होतं, ते आपल्या हनिमुनला अमेरीकेतल्याच हवाई बेटांवर फिरायला गेले, आणि तिथल्या निसर्गाच्या प्रेमातच पडले, आणि शेवटी तिथेच स्थाईक झाले. 


१९८६ मध्ये अनिलच्या वडीलांच निधन झालं, जेव्हा वडीलांच्या अंत्यविधीला ते दोघे भारतात आले तेव्हा हरीद्वार आणि आसपासचा प्रदेश पाहुन त्यांना अतीव दुःख झालं, 


प्रचंड प्रमाणात होणारी वृक्षतोड, प्रदुषित नद्या, आणि संवेदना हरवलेलं समाजमन, त्यांना स्वस्थ बसु देत नव्हतं,


भारतातील निसर्गाच्या संवर्धनासाठी काहीतरी करायचं त्यांनी ठरवलं.

पण हे काहीतरी करणं म्हणजे साधं काहीतरी नव्हतं, तर ते त्यांच्या जीवनाचं सर्वस्व अर्पण केल्यासारखंच होतं,


भारतात येऊन निसर्ग संवर्धन करायचं म्हणुन चक्क त्यांनी त्यांची हवाईमधली प्रॉपर्टी विकली, 


पैसे जमवले आणि एका मित्राकरवी त्यांनी कर्नाटकातील कोडागु जिल्ह्यामध्ये, ब्रम्हगिरी भागात, पंचावन्न एकरचं एक ओसाड माळरान विकत घेतलं.


तिथं प्राणी-पक्ष्यांसाठी एक कृत्रिम अभयारण्य बनवण्याचं एक आगळंवेगळं स्वप्न त्यांनी पाहिलं,


त्या माळरानावर झाडं, वेली लावण्यात, प्राण्यांना, पक्ष्यांना हक्काचा निवारा देण्याच्या कामात त्यां दोघांनी स्वतःला दिवसरात्र झोकुन दिलं.


हे इतकं सोपं नाही, थोड्याच दिवसात त्यांच्या लक्षात आलं, आजुबाजुच्या शेतीमध्ये अजुनही घातक पेस्टीसाईड वापरले जात होते.


 त्यांनी जमेल तशी आजुबाजुची शेती विकत घेऊन तिचे गर्द वनराईत रुपांतर करायचा चंग बांधला.


असंख्य अडचणी आल्या, अनेकांनी अनेक प्रकारे त्रास दिला.


पण मल्होत्रा दांपत्य अविचलपणे, खंबीरपणे अडचणींना तोंड देत राहीले,

आज पंचवीस वर्षांच्या अथक परिश्रमाचं फळ की काय, आज त्या ओसाड माळरानाचं स्वर्गालाही हेवा वाटावा, अशा प्रतिसृष्टीचं रुपांतर झालं आहे. 


तीनशे एकरवर पसरलेल्या ह्या भारतातल्या पहिल्या कृत्रिम अभयारण्याचं नाव साई – सेव्ह एनिमल इनिशिएटीव्ह असं आहे.


आज ह्या अभयारण्यात हत्ती, बिबटे, चितळ, सांबर, हरणं मुक्त संचार करतात. रंगबेरंगी देखणे पक्षी आणि फुलांची झाडे किती आहेत ह्याची तर गणतीच नाही.


प्राण्यांची तहान भागवण्यासाठी त्यांनी ह्या अभयारण्यात एका सुंदर नदीसुद्धा बनवली आहे.


अष्ट्याहत्तर वर्षांचे अनिल आणि सदुसष्ट वर्षांच्या पामेला आजही जेव्हा आपल्या ह्या नंदनवनात फेरफटका मारतात, आणि निसर्गाच्या अदभुत आनंदात हरवुन जातात, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर एक विलक्षण, लोभसवाणा आनंद पहायचा असेल तर एकदा हा व्हिडीओ पहाच.


वृक्षवल्ली आम्हा सोयरी आणि भुतदया हीच ईश्वरसेवा असे सांगणारी संतमंडळी यांच्यापेक्षा वेगळी असतील काय?


निसर्ग जगावा, प्राणीपक्ष्यांना हक्काचं घर मिळावं, जैवविविधता वाढावी, अशा संकल्पामध्ये आपल्या आयुष्याच्या समिधा अर्पण करणाऱ्या ह्या आधुनिक ऋषींचं जीवन जगणारे जगावेगळे लोक पाहुन आपण आपोआप नतमस्तक होतो. 


निसर्गाची ही ओढ आपल्या प्रत्येकाच्या मनात निर्माण व्हावी, ह्या एकाच मनःपुर्वक प्रार्थनेसह,


आभार आणि शुभेच्छा!

[10/28/2020, 2:25 PM] +91 95036 45430: If someone doesn’t appreciate your presence, make them appreciate your absence.

------------------------------------------------------------------------------------------------------

थेट पंकज कोटलवारच्या लेखणीतुन – आदर आणि सन्मान वाढवण्यासाठी अनुपस्थितीचा वापर करा.

------------------------------------------------------------------------------------------------------

आजचा हा लेख अशा लोकांसाठी आहे, ज्यांची अशी तक्रार आहे की जग त्यांची योग्य ती दखल घेत नाही,

आजचा लेख अशा लोकांसाठी आहे, ज्यांना जगाच्या नजरेत स्वतःची किंमत वाढवायची आहे.

घर असो वा कामाच्या ठिकाणी, तुमची जवळची माणसंच, तुम्हाला गृहित धरतात का?

तुमच्या आजुबाजुचे लोक तुमच्याकडे दुर्लक्ष करतात का?

अशा परिस्थितीत, आपल्याला योग्य तो सन्मान न देणार्या लोकांमध्ये, स्वतःचं महत्वपुर्ण स्थान अबाधित कसं राखावं ह्याचं सोपं रहस्य तुम्हाला माहीत आहे का?

“The law of scarcity ह्या नियमाचा वापर केल्यास अदभुत आणि अनोखे रिझल्टस तुम्हाला भेटतील.”

तुम्हाला काही मजेशीर उदाहरणं सांगतो,

- दिवाळीची चाहुल लागली की सुकामेवा महाग होतो.

- रमजान ईद जवळ आली की खजुरांचे भाव वाढतात.

आणि त्याउलट,

- उन्हाळ्याच्या सुरुवातीला एक हजार रु डझन भावाने चढाओढीने विकला जाणारा आंबा, बाजारात मुबलक उपलब्ध झाल्यास नंतर पाचशे रुपायांनाही विकल्या जात नाही.

लॉ ऑफ स्कार्सिटी म्हणजे बाजारातुन एखादी गोष्ट दुर सारुन किंवा नाहीशी करुन ताबडतोब त्याच्यासाठीची मागणी तुम्ही वाढवु शकता.

-----------------------------------------------------------------------------------

सतराव्या शतकामध्ये हॉलंड येथे एक राजा होता, त्याला ट्युलिपचं फुल खुप, खुप, खुप आवडायचं,

ट्युलीप हे इतर फुलांसारखं साधारण फुल बनुन राहु नये, ते एक स्टेटस सिंबॉल व्हावं, अशी त्याची इच्छा होती.

म्हणुन त्याने राज्यातल्या सगळ्या ट्युलिपच्या बागा एकतर खरेदी केल्या किंवा नष्ट केल्या.

हे फुल आपोआपच दुर्मिळ किंवा नष्ट झाले.

मिळविण्यास अत्यंत दुर्मिळ, दुर्लभ झालेल्या या फुलाने लोकांना जणु ट्युलिपचे वेड लावले.

हव्याहव्याश्या या फुलाच्या कमतरतेला ‘ट्युलिपोमॅनिया’ असे नाव पडले.

प्रत्येक फुलाची किंमत आता सोन्यात तोलली जाऊ लागली.

आजही अर्थशास्त्रामध्ये जेव्हा केव्हा कृत्रिम टंचाई केल्याची शंका येते तेव्हा त्याला ‘ट्युलिपोमॅनिया’ असेच म्हणतात.

अभाव असलेल्या गोष्टीला प्रचंड मागणी असण्याच्या हा नियम तुमच्या बाबतीतही लागु होतो.

- “तुमच्याकडे असलेले कौशल्य सहजासहजी उपलब्ध होणारे आहे का ते दुर्मिळ किंवा प्राप्त करण्यास कठिण आहे??”

ह्या एका प्रश्णाच्या उत्तरावरुन जग तुमची किंमत ठरवते.

ऐकण्यास कडु असलं तरी दुर्दैवाने हेच सत्य आहे.

-----------------------------------------------------------------------------------

हा लेख लिहता लिहता मला एक संस्कृतमधला एक श्लोक आठवला.

‘‘अतिपरिचयात अवज्ञा संततगमनादनादरो भवति,

मलये भिल्लपुरंध्री चंदनतरूकाष्ठमिन्धनं कुरुते’’

म्हणजे,

मलय पर्वतावर राहणा-या भिल्ल स्त्रिया चंदनाच्या लाकडांचा उपयोग (चुलीच्या) सरपणासाठी करतात.

पिकतं तिथे विकत नाही, असं म्हणतात बघा!..

बाहेर चंदनाच्या लाकडाला खुप किंमत असते, चंदनाचं लाकुड किती मौल्यवान समजलं जातं?

पण जिथे चंदनाचच जंगल आहे, तिथे राहणा-या भिल्लिणींना त्याचं काय मोल असणार?

अतिउपलब्ध होणाऱ्या वस्तुच्या किमतीमध्ये घट होते.

अगदी हेच तत्व माणसाच्या जीवनातही लागु तंतोतंत होते.

गंमत म्हणुन सांगतो,

लग्नाआधी गर्लफ्रेंडच्या पुढेमागे गोंडा घोळणारा आशिक हक्काची बायको झाल्यावर तिला भाव देईनासा होतो,

कारण आधी भेटीचा टाईम ‘लिमीटेड’ असायचा, तेव्हा किती बोलु, किती नक्को, असे व्हायचे,

निरोप घेताना जीव खालीवर व्हायचा, तिला येताना पाहीलं की थ्रिल यायचं, धडधड वाढायची,

आता काय ती चोवीस तास आपल्या घरी, आपल्या जवळच तर असते.

म्हणुन तर एकमेकांना गृहित धरले जाते, भांडणे होतात, मान-अपमान नाट्य होतात.

रुसवाफुगवा-व्हाया-अबोला-धुसफुस असा अखंड वर्तुळाकार प्रवास चालत राहतो.

ह्या सुत्रामधुन आपण दोन धडे शिकु शकतो.

----------------------------------------------------------------------------

१. धडा पहिला - सुत्रे स्वतःच्या हातात घ्या, मोजक्या वेळीच उपलब्ध व्हा.

----------------------------------------------------------------------------

- कुठेही तुमच्या अतिहजर असण्याने तुमची किंमत कमीकमी होत जाते.

- एखादा सेलेब्रेटी किंवा राजकीय नेता, प्रमोशनल इव्हेंटमध्ये किंवा राजकीय प्रचारसभेमध्ये, स्वतः प्रत्यक्ष जनतेसमोर येण्याआधी श्रोत्यांची खुप उत्सुकता ताणुन धरताना तुम्ही पाहिले आहे का? अनुभवले आहे का?...

- आणि आकर्षक रुपात, समोर आल्यावर हे सेलेब्रिटी लोक अक्षरशः एकेक मिनीट मोजत, स्वतःला जगापुढे सादर करतात, काम झाले की एक मिनीटही थांबत नाहीत, तात्काळ अदृष्य होतात.

- म्हणुन तर सामान्य लोक त्यांची एक झलक पहायला मरमर करतात, त्यांच्याशी हस्तांदोलन करायला, त्यांच्यासोबत सेल्फी काढायला जीवाचं रान करतात.

- ते दुर्मिळ असतात, म्हणुन तर जनतेला त्यांच्याबद्द्ल कुतुहल असतं, म्हणुनच लोक त्यांच्या येण्याकडे डोळे लावुन बसतात, त्यांच्यामध्ये, त्यांच्या खाजगी जीवनामध्ये रस घेतात.

- ज्या संस्थेमध्ये, ज्या लोकांमध्ये, सार्वजनिक ठिकाणी किंवा एखाद्या विशीष्ट व्यक्तिच्या मनामध्ये तुम्हाला स्वतःची छाप उमटवायची आहे, अशा ठिकाणी, योग्य प्रसंगी, मोजक्या वेळेसाठीच उपस्थिती लावा, की तुमच्याबद्द्ल लोकांमध्ये आपोआपच उत्सुकता वाढावी.

- स्वतःला दुर्मिळ बनवा.

- करिअर ऐन भरात असताना क्रिकेटपटु सर डॉन ब्रॅडमन यांनी अचानक क्रिकेटमधुन निवृत्ती जाहीर केली, सगळे जग अवाक झाले,

- पत्रकारांनी विचारले, सर, तुम्ही रिटायर का झालात?

- त्यांनी उत्तर दिले, “तुम्ही हा प्रश्ण सन्मानाने विचारावा, म्हणुन तर मी करीअर भरात असताना रिटायर झालो. करिअरला उतरती कळा लागल्यावर तर कोणीही रिटायर होईल.”

- क्रिकेटच्या मैदानावर त्यांनी स्वतःला असे काही अनुपस्थित केले की सगळे जग हळहळले.

- आता ह्याच सुत्राची दुसरी बाजु बघुया, जी खुप मजेशीर आहे.

-----------------------------------------------------------------------------------

सुरुवातीला भितीदायक वाटणाऱ्या सर्व गोष्टी अतिपरिचयाने ओळखीच्या होतात.

-----------------------------------------------------------------------------------

तीन माणसं एका रस्त्यावरुन जात होती.

तेवढ्यात त्यांनी समोरुन एक हत्ती वेगात आपल्या दिशेने येत असताना पाहीला,

त्या तिघांपैकी दोघांची त्रेधातिरपीट उडाली, त्यांना वाटले, आता आपण मरणार! हा हत्ती आपल्याला चिरडणार!

त्या तिघांपैकी एक माणुस तर अतिशय भित्रा होता,

त्याला वाटले हा हत्ती आता मला मारणार!

तो आपला जीव वाचवण्यासाठी उलट्या दिशेने जीवाच्या आकांताने पळत सुटला, आणि दुरवर जाऊन थांबला, त्याने समाधानाचा सुस्कारा टाकला,

आणि आपला जीव वाचवल्याचा आनंद साजरा केला.

दुसरा माणुस थोडा अधिक हिंमतवान होता, तो बिचकला नाही,

प्रसंगअवधान राखुन, तो त्या हत्तीपासुन चटकन दुर जाऊन एका सुरक्षित अंतरावर उभा राहीला, मनातुन तोही खुप घाबरला होता.

तिसर्याने मात्र चक्क त्या हत्तीच्या सोंडेला हात घातला, भरभर त्याच्यावर चढला, आणि त्याच्या गंडस्थळाला असे काही थोपाटले ही सगळा राग विसरुन हत्ती एकदमच शांत झाला.

आता तो त्या माणसाशी प्रेमाने खेळु लागला.

तो माणुस एक अनुभवी आणि आपल्या कामात निष्णात असा माहुत होता,

आयुष्याची मागची कित्येक वर्ष त्याने हत्तींच्या सहवासात काढली होती,

त्याच्या मनात असलेली हत्तींबद्द्लची सारी भीती केव्हाच मरुन गेली होती.

कितीही हट्टी किंवा क्रुर हत्ती पाहिला तरी त्याला त्याचे भय नव्हते.

सगळे जग घाबरुन सैरावैरा धावत सुटले पण त्याच्यावर कसलाही परिणाम झाला नाही,

कारण तेच,

कारण ‘अतिपरिचयात अवज्ञा!’...

अतिपरिचयाने सर्वच गोष्टी मवाळ आणि ओळखीच्या बनतात.

कित्येक वर्ष हत्तीच्या सहवासात काढल्याने हत्ती त्याला साधारण वाटत होते.

------------------------------------------------------------------------------------------

आता ह्याचा लॉ ऑफ अट्रॅक्शनशी संबंध कसा आहे, ते सांगतो.

- लॉ ऑफ अट्रॅक्शन मध्ये सुरुवातीला आपण स्वतःसाठी, एखादे अशक्य कोटीतले वाटणारे, अवघड असे ध्येय ठरवतो.

- उदा. मी एका वर्षात एक करोड रुपये मिळवणार!..

- आपण पहिल्यांदा जेव्हा असे ठरवतो, तेव्हा खुद्द आपल्या मनातच ध्येय पुर्ण होईल का नाही ह्याविषयी शंका असतात, भीती असते.

- मग आपण व्हिज्वलायजेशन करुन वारंवार तेच ध्येय मनामध्ये घोळवतो, आणि पुढे हळुहळु मनाला त्याची सवय होते.

- आता आपोआपच त्या ध्येयाबद्द्लची भीती गळुन पडते आणि ते ध्येय साध्य झाले असल्याचा विश्वास, खात्री आपल्या मनाला पटु लागते.

- आपल्यालाच नकळत आपण आपले शंभर टक्के देऊन त्या ध्येयासाठी जीवाचं रान करतो.

- आणि अनेकदा दिवास्वप्नात पाहिलेली ती गोष्ट शेवटी प्रत्यक्षात साकार होते.

--------------------------------------------------------------------------------------------

तुम्हाला वर सांगितलेले हे दोन्ही मुद्दे तुम्हाला पटले असतील, समजले आणि उमगले असतील,

तुम्हाला गृहित धरणाऱ्या व्यक्ती तुमच्या आजुबाजुला आहेत का?

अशा लोकांपुढे स्वतःची किंमत वाढवण्यासाठी त्यांच्यासाठी स्वतःचा सहवास दुर्मिळ करा.

आदर आणि सन्मान वाढवण्यासाठी स्वतःच्या अनुपस्थितीचा वापर करा.

आभार आणि शुभेच्छा!..

[10/30/2020, 10:15 AM] +91 95036 45430: Win through actions. Never through arguments.

दुसरे तुमच्याशी सहमत आहेत अथवा नाहीत ह्याला काहीही महत्व नाही. वादविवादात गुंतण्यापेक्षा तुमची शक्ती वाचवा आणि पुढे चला.

-------------------------------------------------------------------

थेट पंकज कोटलवारच्या लेखणीतुन – विवाद्य बडबडीपेक्षा कृतीने जिंका.

-------------------------------------------------------------------

सोळाव्या शतकाच्या उत्तरार्धात इंग्लडमध्ये युरोपमध्ये एक नव्या प्रकारची जीवनशैली आणि कला जन्माला आली.

त्या कालखंडाला रिनायसान्स उर्फ पुरुरुज्जीवनाचा काळ असेही म्हणतात.

त्या काळावर आपला अमिट ठसा उमटवणारे, एकापेक्षा एक सुबक, देखण्या इमारती बनवणारे, सर ख्रिस्तोफर रे माझे फेव्हरेट आर्किटेक्ट आहेत.

ते एक महान स्थापत्य रचनाकार होते. रेन यांनी जगाला ज्या सुरेख वास्तुंची भेट दिली, त्याच डिझाईन्सवर सुरुवातीला सामान्य कुवतीच्या लोकांकडुन शंका घेतली गेली, त्यांच्या डिझाईन्सना अप्रस्तुत, अवास्तविक म्हण्टले गेले, पण ख्रिस्तोफर रेन ह्यांनी कधीही उलटुन उत्तर दिले नाही.

१६८८ मध्ये वेस्टमिनिस्टर शहराकरीता एका भव्य टाऊन-हॉलची संकल्पना रेन यांनी कागदावर चित्रित केली. नगराचे महापौर मात्र ह्या ब्लु प्रिंटवर तितकेसे समाधानी नव्हते. उलट त्यांना चिंतामग्न होते. दुसरा मजला पुरेसा सुरक्षित नाही अशी भीती त्यांना वाटत होती.

सगळे बांधकाम कोसळुन त्यांच्या पहिल्या मजल्यावरच्या कार्यालयावर आदळेल अशी भीती त्यांनी रेनपाशी बोलुन दाखवली.

प्रस्तावित वास्तुला जादाचा टेकु देण्यासाठी दोन भक्कम दगडी खांब उभारावे, अशी त्यांनी रेनकडे मागणी केले.

रेनसारख्या सर्वोत्कृष्ट परिपुर्ण अभियंत्याला हे ठाऊक होते की या खांबांचे काहीही प्रयोजन नाही. महापौराची ही भीती अनाठायी आहे. पण त्यांनी महापौराशी कसलाही वादविवाद केला नाही.

त्यांनी चक्क त्याची सुचना मान्य केली, आणि चक्क दोन जादाचे दगडी खांब बांधुन टाकले. सांगितलेले ऐकल्याबद्द्ल महापौरांनी रेन यांचे आभार मानले. मनातली शंका दिल्याबद्द्ल, अनेक धन्यवाद दिले.

पुढे अनेक वर्षांनी उंच परातीवर काम करणार्‍या मजुरांच्या लक्षात आले की छतापर्यंत येऊन ते खांब थांबले आहेत.

म्हणजे खांब व छत एकमेकांना टेकलेले नव्हते.

ते खांब बनावट होते, नकली होते, खरा आधार देणारे नसुन फक्त शोभेचे होते.

त्यातुन दोघांनाही हवे ते मिळाले.

महापौर खांब पाहिल्याने निश्चिंत झाले, आणि रेनला खात्री होती, एके दिवशी पुढील पिढ्यांच्या ध्यानात येईल की मुळ रचनेत खांबांचे काहीही प्रयोजन नाही. म्हणजेच रेनची संकल्पना बिनचुक होती.

Win through actions. Never through arguments.

वादविवाद न घालताही कसे जिंकता येते, रेनने ह्याचे अप्रतिम उदाहरण जगापुढे ठेवले आहे.

---------------------------------------------------------------------------------------------------------

सत्तेच्या शीर्ष स्थानी असणारी किंवा शिखरावर पोहचण्याची इच्छा असणारी लोकं इतर साधारण लोकांसोबत क्षुल्लक वादविवाद घालण्यात आपला मौल्यवान वेळ वाया घालवत नाहीत.

त्यांना माहित असते की, वादविवाद करुन मिळवलेला विजय क्षणभंगुर असतो.

इतरांचे मन जिंकण्यासाठी एकही शब्द न बोलता केलेली कृती जास्त प्रभावशाली असते.

वादविवाद करण्यापेक्षा आणि आपली बाजु कशी बरोबर आहे, याचे ठासुन स्पष्टीकरण देत बसण्यापेक्षा आपली योग्यता आणि अचुकता कृतीतुन दाखवुन द्या.

सत्ता आणि शक्ती प्राप्त करण्याचे आजचे सुत्र आहे.

----------------------------------

विवाद्य बडबडीपेक्षा कृतीने जिंका.

----------------------------------

१. मौन राहुनही बदला घेता येतो.

- जवळपास वीस वर्षांपुर्वीची घटना आहे. आज फ्रॉड ठरवुन जेलमध्ये असणारे प्रख्यात बिल्डर डि. एस. कुलकर्णी ह्यांनी उत्तर मुंबईमध्ये एक अपार्टमेंट बांधण्यासाठी जमीन खरेदी केली होती. मात्र काही ना कारणामुळे भाडेकरु ना जागेवरुन बाहेर काढण्यासाठी उशीर होत होता.

- पुण्याचा एक मराठी बिल्डर मुंबईत येऊन टोलेजंग टॉवर बांधतो व आपल्याशी स्पर्धा करतो, ह्यामुळे मुंबईतले इतर बिल्डर नाखुश होते.

- ते बिल्डर डिएसके ना जाहीररित्या घाटी म्हणुन खिजवायचे.

- एका अमराठी बिल्डरने एका कार्यक्रमात त्यांना ‘मुंबई तुमची, सखुबाई आमची’ असे चिडवले.

- डिएसके च्या प्लॉटच्या बाजुला असलेल्या गोदरेज ग्रुपने त्यांना भेटायला बोलवले. त्यांना तुम्ही तोट्यात जाल अशी भीती दाखवुन सात कोटीचा प्लॉट सहा कोटींना खरेदी करण्याची तयारी दाखवली.

- डिएसके नी आपलं मनोधैर्य ढळु दिलं नाही. त्यांनी गप्प राहुन प्रत्येक अपमान गिळला. ह्या छोट्या मोठ्या हल्ल्यांनी ते अजिबात विचलित झाले नाहीत.

- त्यांनी एक उत्कृष्ट इमारत बांधण्यावरच आपलं संपुर्ण लक्ष केंद्रित केलं.

- आजही ती इमारत अंबामाता टॉवर्स नावाने लोकांचे लक्ष वेधुन घेत आहे, जिचं बुकींग पंच्याऐंशी हजार रु. स्क्वेअर फुट भावाने झाल. हा मुंबईत एक नवा विक्रम रचला गेला होता. इतकी ती इमारत सुंदर बांधली गेली होती.

------------------------------------------------------------------------

२. मनके हारे हार है, मनके जीते जीत!

- एकोणीसाव्या शतकाच्या शेवटी एका युरोपिअन हॉटेलमध्ये जमशेदजी टाटांना इंग्रजांनी फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये प्रवेश नाकारला.

- १८ डिसेंबर १९०३ मध्ये जमशेदजी रतनजी दादाभाई टाटा ह्यांनी त्या काळातले पंचवीस लाख रु खर्चुन एक अलिशान हॉटेल मुंबईत बांधले, ज्याचे नाव हॉटेल ताज!

- आता ह्या हॉटेलामध्ये पाटी लावली गेली, “Dogs and British are not allowed.”

- सचिन तेंडुलकर महान लोकांच्या श्रेणीत जाऊन बसला कारण तो प्रत्येक वेळी तो आपल्या टीकाकारांना बॅटने उत्तर द्यायचा.

-----------------------------------------------------------------------

३. कर्मयोगी होवुन टीकेवर उत्तर द्या.

- इंग्लंडमध्ये राहणार्‍या बेंजमिन डिझरेली नावाच्या माणसाला व्यवसायात अपयश आले. त्याने आपल्या पत्नीला सांगितले, “मला ह्या देशाचा पंतप्रधान बनायचे आहे.”

- पत्नी म्हणाली, “साधे काम न जाणणारा माणुस ब्रिटनचा पंतप्रधान कसा होईल, आरशात तोंड पहा.”

- त्या वेळेला ते संसदेचे साधे सदस्यही नव्हते. पत्नीच्या कुचेष्टेला त्यांनी उत्तर दिले नाही.

- प्रयत्नांची पराकाष्ठा करुन अनेक वेळा पराभुत होवुन डिझरेली संसदेचे सदस्य म्हणुन निवडुन आले.

- एकदा संसदेत एका प्रस्तावावर भाषण करताना, मुद्दा व्यवस्थित मांडता न आल्याने लोकांनी त्यांची मनसोक्त खिल्ली उडवली. लोक हसु लागले. ‘खाली बसा’, ‘खाली बसा’ असा गलका केला.

- डिझरेली निराश झाले, बसता बसता ते म्हणाले, “आजचा दिवस तुमचा आहे, उदयाचा दिवस माझा असेल.”

- प्रचंड परिश्रम करुन ते दोन वेळा ब्रिटनचे पंतप्रधान झाले. नंतर त्यांचे प्रत्येक भाषण काळजीपुर्वक ऐकले गेले.

-----------------------------------------------------------------------

४. आपले म्हणणे आकर्षकपणे मांडा. –

- ज्याला चांगले संभाषण करता येते, त्याचे समाजात नेहमी स्वागत होते.

- बोलणार्‍याची माती खपते, न बोलणार्‍याचे सोनेही विकले जात नाही.

- जो व्यक्ती आपले म्हणणे आकर्षकपणे सांगु शकतो, तो दुसर्‍याचे लक्ष चटकन वेधुन घेऊ शकतो.

- अवांतर, पाल्हाळीक, आशय नसलेले, गावगप्पा, अर्थहीन, आचरट बडबड यांचा लोकांना लवकरच कंटाळा येतो.

- संभाषणात हलकेफुलके, हास्य विनोद जरुर असावेत, पण जिव्हारी लागेल असे व्यंग, फालतु विनोद नसावेत.

----------------------------------------------------------------------

५. चांगले विचार आणि चांगले वाचन मने जिंकुन घेतात.

- आजुबाजुच्या लोकांचा, त्यांच्या मनाचा अंदाज घेत, तुमच्या पोतडीतुन वातावरणाला अनुरुप असे किस्से, कथा, घटना, प्रसंग सांगुन लोकांची मने जिंकुन घ्या.

- आवाज शक्य तितका वजनदार बनवा, आवश्यक ठिकाणी आवाजात हुकुमत उमटु द्या, आवश्यक ठिकाणी आर्जवता पाझरु द्या.

- बोलताना योग्य ठिकाणी पॉझ घेतल्याने तुमचे म्हणणे लक्षपुर्वक ऐकुन घेतले जाते.

- संभाषण जिंकुन घेण्यासाठी समोरच्याची प्रशंसा करा, खोटी स्तुती करु नका, ते लगेच लक्षात येते.

- भरपुर वाचन असेल त्याला मनोरंजक संभाषण करता येते. संगीत, कला, साहीत्य, प्रवास ह्यांच्यामुळे गप्पांना बहर येतो.

----------------------------------------------------------------------

६. समोरच्या व्यक्तीचे बोलणे तोडु नका. शब्दांचे बुडबुडे सोडु नका.

- काही माणसे इतकी उतावळी असतात, की ती दुसर्‍याला धडपणे बोलुच देत नाहीत. अशा व्यक्तींना लोक टाळायला लागतात.

- दुसर्‍याचे बोलणे लक्षपुर्वक ऐकुन घेतले पाहिजे.

- उत्तम संभाषण करणारा उत्तम श्रोताही असतो. संभाषणात अखंड बोलणे बरोबर नाही.

- अफवांमध्ये रस घेऊ नका.

- लोकांच्या भानगडी चवीने चघळु नका. तुमच्या शब्दसंग्रहातुन अपशब्द काढुन टाका.

----------------------------------------------------------------------

शेवटी इतकचं सांगेन,

- वादविवादात जिंकलात तरी तो आनंद तात्पुरता असतो, तुमच्यापासुन एक माणुस कायमचा तुटलेला असतो, शब्दांचे हत्यार चालवल्यास जखम होवुन एका मित्राचे शत्रुमध्ये झालेले रुपांतर आयुष्यभरासाठी परवडत नाही.

- कृतीतुन स्वतःचे म्हणणे सिद्ध करण्याला मात्र खुप मोठा अर्थ असुन त्याची ताकतही खुप मोठी असते, जी काही न बोलता, सगळ्या जगाला दिसते.

----------------------------------------------------------------------

या सगळ्यातून आपण काय शिकू शकतो?

१ . कितीही विपरीत परिस्थीती आली तरी आज दिवसभरात कोणाशीही वादविवाद घालण्यात वेळ वाया घालवु नका.

२. आपली बाजु कशी बरोबर आहे, हे बोलण्यातुन नाही, कृतीने सिद्ध करा.

३. तुम्ही बोललेले प्रत्येक वाक्य आनंदादायी आणि आकर्षक असेल याकडे लक्ष द्या.

४. शब्दांनी कुरापती करुन मने दुखवण्याची सवय असेल तर ती तात्काळ मोडा.

५. तुम्हाला भेटलेल्या प्रत्येक व्यक्तीची प्रामाणिक स्तुती करण्याची कारणे शोधा.

उत्कृष्ट संभाषककला शिकुन मने जिंकण्यासाठी खुप खुप शुभेच्छा!...


थेट पंकज कोटलवारच्या लेखणीतुन – पेराल ते उगवेल!...
-----------------------------------------------------------------
पुराणांमध्ये एक गोष्ट मजेशीर गोष्ट आहे.
एकदा डाव्या हाताने उजव्या हाताशी जोरदार आणि खडाजंगी भांडण केलं, डाव्या हाताने रागारागाने सर्वांना सवाल केला,
“कुठल्याही शुभ कार्याला उजवा हातालाच मान का? त्याच्यापुढे मला सतत गौण स्थान का?”
सगळेजण डाव्या हाताची समजुत घालत होते, पण तो मात्र प्रचंड चिडलेला होता,
त्याच्या प्रश्नाचं समाधानकारक उत्तर कोणापाशीही नव्हतं!
संतापलेला डावा हात, तणतणत आपलं गाह्राणं घेऊन देवापाशी गेला,
देवाने डाव्या हाताला हसत हसत उत्तर दिले, “तु कनिष्ठच राहीलास, कारण दान देताना तु कधीही पुढाकार घेतला नाहीस.”
मित्रांनो,
ह्या जगात दोन प्रकारचे लोक बघायला भेटतात, 'देणारे' आणि 'घेणारे'!
विंदा आपल्या कवितेत म्हणतात, तसं, देणारे देतच राहतात, त्याबदल्यात त्यांना अतुलनीय आनंद मिळतो.
कोणी जगाला प्रेम देतो, कोणी गरजुंना पैशाचं, वस्तुचं दान देतो,
कोणी तहानलेल्यासाठी पाणीपोई उघडुन तडफडणार्‍यांची तहान भागवतो, कोणी अन्नछत्र उघडुन भुकेलेल्यांचा आत्मा तृप्त करतो.
देण्यार्‍याचं उत्तम उदाहरण म्हणजे निसर्ग!
झाडाचचं उदाहरण घ्या ना,
झाडे माणसाला ऑक्सीजन देतात, झाडं वाटसरुंना सावली देतात,
भाविकांना सुगंधी फुलं देतात, भुकेलेल्यांना चवदार आणि व्हिटॅमिन असलेली फळं देतात,
ढगांना थंड हवा देऊन थांबवतात, आणि आपला मित्र पाऊस ह्याला मनसोक्त बरसवायला भाग पाडतात,
आपल्या आस्तित्वानेच धरणीमातेला तृप्त करतात.
माणसासाठी विषासमान असलेला कार्बन शोषुन हवा वातावरण शुद्ध करतात,
आपल्या मुळांनी सुपीक मातीला गच्च धरुन ठेवतात.
आणि माणसं त्याला तोडायला आली की शेवटी हसत हसत त्याला आपलं सर्वस्व असलेलं खोड, फांद्या असलेलं, लाकुडही देतात, कृतघ्नी माणसं मात्र निर्लज्जपणे स्वतःच्या स्वार्थासाठी त्यांची कत्तल करतात.
असंच एक डोळ्यात पाणी आणणारं बलिदान म्हणजे सैनिक! ते देशासाठी संपुर्ण आयुष्य देतात, स्वतःच्या इच्छा, अपेक्षा, महत्वकांक्षा, मौजमजा बाजुला ठेवतात, देशातले लोक कितीही कृतघ्न असले तरीही भारतमातेला डोळ्यासमोर ठेवुन, आपला अनमोल जीव देतात, त्यांचा परिवारही खरा बहादुर असतो, कारण ते आपला जीवाभावाचा माणुस देशावर ओवाळुन टाकतात.
संत, महापुरुष कसल्याही अपेक्षेविना जगावर प्रेमाचा वर्षाव करतात. ते ज्ञान देतात, विश्वालाच आपलं घर समजुन इतरांना आनंदी भारमुक्त बनवुन त्यांची दुःखे आणि चिंता स्वतः झेलतात.
‘देणं’ ही जगातली सर्वात सुंदर कृती!
देणारे कधीही फायद्यात राहतात. जसं की आपल्या हाताने अत्तर दुसऱ्याला लावलं, की नकळत त्याचा सुगंध दिवसभर आपल्याही हाताला दरवळतो.
देणाऱ्यांना भरभरुन मिळतंसुद्धा, छानसं स्मितहास्य दिलं की समोरुनही मनःपुर्वक स्वागत होतं,
आपलेपणाने मदतीचा हात दिला की ह्र्दयपुर्वक आभार आणि सकारात्मक स्पंदने मिळतात, आपलेपणा, जिव्हाळा आणि प्रेम दिलं की भरभरुन कित्येक पटीने हे सगळं वापस येतं,
एकदा आमच्या रोटरी क्लबने केरळ पुरग्रस्तांसाठी रस्त्यावर, मार्केटमध्ये, दुकांनामध्ये जाऊन, गल्ल्यांमध्ये फिरुन निधी जमवला,
त्यात रस्त्यावर भीक मागुन उदरनिर्वाह करणाऱ्या एका व्यक्तीने मदत डब्यात पैसे टाकले,
आणि त्यावेळी त्याच्या चेहऱ्यावर ओसंडून आनंद वाहत होता.
‘देणारे’ कॅटॅगिरी नेहमी आनंदात असते,
जवळचे, पदरचे, हक्काचे देऊनही त्यांना कसं काय आनंद मिळतो, असा प्रश्ण आपल्याला पडतो,
‘देणं’ ही कृतीचं इतकी सुंदर आहे की, दिल्याने आपोआपच आतमधुन सात्विक आनंदाचा झरा खळखळ वाहु लागतो!
याउलट एक दुसरी जमात असते, हे असतात, ‘घेणारे कॅटेगिरी’!
ह्यांचा भर घेण्यावर असतो, ह्यांना सरकारकडुन सर्व प्रकारच्या सुविधा पाहीजे असतात,
त्यासाठी आंदोलनं करण्याची ह्यांची तयारी असते.
ह्यांना स्वतःसाठी सबसिड्या पाहिजे असतात, आपल्या जातीसाठी रिझर्व्हेशन पाहिजे असते,
त्यासाठी रस्त्यावर उतरुन निरपराधांना त्रास दिला तर सरकार आपल्यासमोर झुकेल असा त्यांचा विश्वास असतो,
म्हणुन एसट्या फोडायच्या, टायर जाळायचे आणि रास्तारोको करायची यांची प्रवृत्ती असते,
कसल्याही मोफत स्कीम आल्या की रांगा लावण्यात हे सर्वात पुढे असतात.
घरामध्ये प्रॉपर्टीसाठी भावाला पाण्यात पाहतील,
समाजामध्ये आमच्या समाजावर कसा अन्याय होतोय, आणि इतर समाजांनी आमचे कसे शोषण केले आहे, याचे साग्रसंगीत वर्णन करतील,
‘घेणारे’ ह्या कॅटॅगिरीचे लोकं, हवं ते मिळवण्यासाठी कधी भांडतात, कधी दरडवतात, कधी ओरडतात, कधी चोरतात, कधी रडतात,
कित्येकदा कुटील डावही खेळतात.
हे कधी चांगले चालणारे सहकारी साखर कारखाने बंद पाडतात,
तर कधी नफ्यात चालणार्‍या सहकारी बॅंका दिवाळखोरीत काढतात.
कधी आपल्या मार्केट कमिट्यांमध्ये चलाखी करुन भाव पाडतात,
कधी लालच दाखवुन दुसऱ्यांच्या मेहनतीचा पैसा रातोरात पळवुन गायब होतात.
कोणी एटीएम फोडुन पैसे पळवतात, कोणी ऑनलाईन डल्ले मारतात,
घेणारे कधी अडवणुक करुन लाच घेतात, कधी समोरच्याच्या मजबुरीचा फायदा घेऊन कमिशन घेतात.
यांच्यामध्ये जसे दोन रुपये किलो राईस खाऊन आळशी झालेले येतात,
तसेच मेडीक्लेम आणि इन्शुरंसचे खोटे क्लेम बनवुन पैसे लाटणारे सो कॉल्ड धनाढ्यही येतात.
पण शेवटी ‘माझं ते माझं, आणि तुझंपण माझं’, ही वृत्तीच त्यांचा घात करते,
आयुष्यात कितीही मिळाले तरी काही केल्या, यांचे समाधान काही होत नाही,
कितीही ओरबाडले तरी अतृप्त राहण्याचा शाप यांना ब्रम्हांडानेच दिलेला असतो.
आयुष्यातल्या छोट्या छोट्या समस्यांमुळेही हायपर होवुन आकांडतांडव करण्याची यांची सवय यांना कधीही सुखाने जगु देत नाही,
सारखं दुसऱ्यांचं ओरबाडण्याची सवय लागल्याने, हे ऐतखाऊ आणि आळशी होतात,
कलांतराने बुद्धी आपोआपच मंद होते, दुसऱ्याकडून नेहमी काहीतरी फुकट कसं मिळवायचं ही वृत्तीच यांच्या प्रगतीच्या आड येते,
यांच्या नकळतच हे इतरांचा द्वेष करु लागतात,
इतरांबद्द्ल असलेली, ईर्ष्येची आग यांना आतमधुन पोखरते, कणाकणाने जाळुन टाकते.
आपल्या आयुष्यात आपण कोणती कॅटॅगिरी निवडुन आपलं आयुष्य जगायचं, हे ज्यानं त्यानं ठरवायचं,
दोन्ही हाताने भरभरुन देऊन, ‘देण्यामधला’ आनंद मिळवायचा,
की तोच हात पसरुन दुसऱ्याकडुन मागुन किंवा हिरावुन घ्यायचे, ही निवड आपणच करायची.
शेवटी 'पेराल तेच उगवते', हाच नियतीचा नियम आहे.
आपण सगळे 'देणारे' ह्या स्पेशल कॅटॅगिरीतले होवुन, जगण्याचा प्रत्येक क्षणी, प्रसन्न होवुन, आनंद घेऊ, अशा मनःपुर्वक प्रार्थनेसह,
आभार आणि शुभेच्छा!..
[9/23/2020, 8:04 PM] +91 95036 45430: -----------------------------------------------------------
थेट पंकज कोटलवारच्या लेखणीतुन – चाणक्य नीती!
-----------------------------------------------------------
मित्रांनो,
चाणक्य भारतातला सर्वात मोठा मुत्सद्दी मानला जातो, हातात कसलेही साधन नसताना, केवळ बुद्धीच्या बळावर त्याने त्याकाळचा सर्वात मोठा शक्तिशाली सत्ताधीश ‘धनानंद’ राजाची सत्ता उखडुन फेकली होती.
आनंदी, समाधानी आणि यशस्वी जीवन जगण्यासाठी चाणक्याने जी सुत्रे मांडली, त्याला चाणक्य नीती असे नाव दिले. त्यातली मला समजलेली आणि आवडलेली अशीच काही जीवन सुत्रे आज तुमच्या समोर मांडत आहे.
१) ज्याप्रमाणे एखादा कावळा कितीही मोठ्या इमारतीवर, मोठ्या डोंगरावर जरी जाऊन बसला, तरी तो गरुड बनत नाही, त्याचप्रमाणे, एखादा माणुस किती महान आहे, हे त्याच्या गुणांवरुन ठरते, त्याच्या पदावरुन नाही.
२) फुलाचा सुगंध फक्त वार्‍याच्या दिशेने पसरतो, पण चांगले गुण असलेल्या व्यक्तीचा सुगंध मात्र सगळ्या दिशांना पसरतो.
३) एखाद्या लोभी माणसाला पैशे देऊन जिंकता येते, अहंकारी व्यक्तीला त्याची खोटी स्तुती करुन जिंकता येते, पण एखाद्या बुद्धीमान व्यक्तीला जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त सत्यच कामाला येते.
४) ज्याप्रमाणे एखाद्या बेवड्या माणसाला चांगले वाईट यामधला फरक समजत नाही अगदी तसेच एखाद्या इच्छेने वेडापिसा झालेल्या स्वार्थी माणसालाही चांगले वाईट यातला फरक कळेणासा होतो.
५) ज्याप्रमाणे सोन्याची परीक्षा करण्यासाठी त्याला घासुन बघितलं जातं, तापवलं जातं, कापलं जातं, त्याचप्रकारे माणसाची खरी वृत्ती ही संकटसमयी लक्षात येते.
६) खराब मित्र, वाईट पत्नी आणि उद्धट विद्यार्थी हे तीन असल्यापेक्षा नसलेलेच बरे! ते तुमचं समाधान हिरावुन घेतील.
७) प्रेमभंग किंवा व्यवहारात झालेला तोटा, याची इतरांसोबत चर्चा करु नये, पारिवारीक प्रॉब्लेम्स आणि वाईट घटना, तुम्ही इतरांना सांगितल्यास, तुमचं शोषण केलं जाऊ शकतं!
८) काही शिकताना, व्यापार करताना आणि भोजन करताना माणसाने संकोच बाळगु नये.
९) बिनविषारी सापानेही, फुत्कार टाकत राहीले पाहीजे, म्हणजेच स्वतःचे प्रश्ण आणि कमकुवतपणा तुमच्याजवळच ठेवा, इतरांपुढे तुम्ही तुमची मजबुत प्रतिमा उभा करा, म्हणजे तुम्हाला सन्मानाने वागवले जाईल.
१०) माणसाने अशा ठिकाणी अजिबात वास्तव्य करु नये, जिथे कुणालाही कायद्याची भीती नाही, सर्व लोक निर्ल्लजपणे वागतात, जिथे कुणीही दान करत नाही, जिथे कलेला सन्मान दिला जात नाही.
११) एखादे काम अर्ध्यावर सोडु नका, कारण जे आपलं काम पुर्ण करतात, तेच जगण्याचा खरा आनंद घेतात.
१२) ज्याप्रमाणे माणसाने चालताना डोळे उघडं ठेवणं आवश्यक असतं, तसेच पाणी पिताना स्वच्छ पाणी आवश्यक असतं, अगदी तसंच कोणतीही कृती करण्याआधी माणसाने त्याचा विवेक आणी ज्ञान यांचा वापर करणं, आवश्यक असतं!
१३) स्वच्छ कपडे महागडे नसले तरी सुंदर दिसतात, गरम आणि ताजं अन्न साधंच असलं तरी चवदार लागतं, तसंच माणसाच्या शारिरीक सौंदर्यापेक्षा जास्त महत्व त्याच्या चरित्राला आहे.
१४) ज्याप्रमाणे भरपुर साप असलेलं घर रहायला अयोग्य असतं, अगदी तसंच व्याभिचारी पत्नी, धोका देणारा मित्र आणि उद्धट नौकर यांच्यासोबत राहणं, असुरक्षित असतं!
१५) पैसा, धनसंपत्ती माणसासाठी अतिशय महत्वाचा आहे, पैसा माणसाला सन्मान आणि ताकत देतो, भल्याबुर्‍या समयी संकटांशी लढण्यासाठी तो माणसाला बळ देतो.
१६) जो आजारपणात, संकट समयात आणि गरीबीत जो तुम्हाला मदत करतो, तोच आपला खरा मित्र!..
१७) ज्याप्रमाणे सोन्याच्या हाराच्या कोंदणात हिरा शोभुन दिसतो, अगदी तसंच उत्तम गुण आणि प्रखर बुद्धीमत्ता माणसाला सुंदरता प्रदान करते.
१८) तीन प्रकारच्या व्यक्ती बर्बाद होतात, ते जे आपल्या कमाईपेक्षा जास्त खर्च करतात, ते जे आपल्यापेक्षा जास्त शक्तिशाली लोकांचा मजाक उडवतात, आणि ते जे एकापेक्षा अधिक स्त्रियांची लालसा करतात.
१९) ज्याप्रमाणे शिकारी आपल्या सावजाला मधुर ध्वनीने आकर्षित करतो, त्याचप्रकारे आपणही इतरांशी बोलताना आपण तेच बोलावे, जे ऐकल्यानंतर त्याला आनंद होईल.
२०) माणसाने आपली पत्नी, आपलं धन आणि कमाई यांच्याबाबतीत, नेहमी संतुष्ट असावे, त्याच सोबत माणसाने आपली ज्ञानलालसा आणि दान करण्याच्या बाबतीत नेहमी अतृप्त रहावे.
आभार आणि शुभेच्छा!...

Wednesday, July 27, 2022

देशील उत्तर..

 *थेट पंकज कोटलवारच्या लेखणीतुन - देशील उत्तर..*

मी अमावस्येचा चंद्र
नेहमी कुठेतरी लपलेला
तु पौर्णिमेचं चांदणं,
लखलख प्रकाश खुललेला
तु आयुष्याचं रंगीत गाणं
अन सुरेल स्वरांची मैफिल
मी फक्त आसुसलेला श्रोता
स्तब्ध, निःशब्द अन सदा गाफील

तु गुलाब, तु रातराणी
तु फुलांची भरलेली ओंजळ
तु शांत भरलेला जलाशय अन
मी त्यात उमललेलं कमळ...

तु आठवणींचा शिडकाव,
रणरणत्या उन्हात
मी फुटलेला बांध
भावनांच्या पुरात

तु सौंदर्याला पडलेलं निरागस स्वप्न,
जागं झालं की ते विसरुन जायचं असतं,
तु पावसाची अवचित सर...
म्हणती, अरे वेड्या, असं घसरुन जायचं नसतं...
आठवतं, आपण भातुकलीचा डाव मांडला होता,
तु वाढताना माझ्यावर भात सांडला होता,
तेव्हा क्षुल्लक कारणावरुन मी खोटंखोटं घरच मोडलं होतं,
लुटीपुटीच्या खेळात आपलं खरं नातंच तोडलं होतं,
तु खोटेखोटे चित्र, अन त्यात मी माझ्या
कल्पनांचे जीवंत रंग भरलेले..
तु मृगजळ आणि भ्रम, हे माहीत असुन सुद्धा,
तुझे शिल्प मीच माझ्या मनावर कोरलेले...
तु अभिनय करतेस छान,
तुझ्या दोन भुमिका..
कोणती खरी तु?
पत्नी कि प्रेमिका?..


--------------------------------------------------------------------------------------
थेट पंकज कोटलवारच्या लेखणीतुन – हाताखालच्या माणसांना कसं हाताळु?
---------------------------------------------------------------------------------------
मी एका कंपनीमध्ये सुपरव्हायझर आहे, माझ्या हाताखाली एक माणुस आहे कामाला, वयाने आणि एक्सपिरीअन्स ने माझ्यापेक्षा मोठा आहे,
पण म्हणुन की काय, पण तो मी सांगितलेले कुठलेच काम ऐकतच नाही,
आणि तेच काम जर साहेबांनी सांगितले तर तत्परतेने करतो,
साहेबांचं आणि त्यांचं खुप जमतं,
दोघे मिळुन मला त्रास पण देतात,
मार्गदर्शन करावे,
----------------------------------------------------------------------------------------------
ऑफीस असो वा फिल्डवर्क, नौकरी असो वा व्यवसाय,
अंगमेहनतीची काम करणारे लेबर्स असो किंवा घराघरात काम करणार्‍या कामवाल्या,
हाताखालची माणसं काम ऐकत नाहीत, ही तुम्ही सांगितलेली समस्या आजकाल सगळीकडे बघायला भेटते.
आजकाल शारिरीक श्रम कोणालाच नकोच वाटतात,
अगदी आपल्यालाही एका लेव्हल नंतर कितीही महत्वाचं असलं तरी काम करायचा कंटाळा येतोच,
आणि अशा आळशीपणाला ऑफीस पॉलिटीक्सची फोडणी भेटली मग तर काय?
आधीच मर्कट त्यात मद्य प्याला,
अशी लोकं आपल्याला उपद्र्व द्यायला लागतात,
आपल्याला मदत करण्यासाठी असलेली लोकंच कशी आपल्याला सळो की पळो करुन सोडतात,
हे मी खुप जवळुन बघितलेलं आहे, अनुभवलेलं आहे आणि त्यातल्या काही लोकांना यशस्वीपणे हाताळलेलं आहे.
खरं तर उद्ध्ट, उर्मट आणि आपल्याच दयेवर जगुन आपल्यालाच न जुमानणार्‍या लोकांना आपल्यापासुन चार हात दुर ठेवलं पाहीजे,
बेभरवशाची आणि दगाबाज माणसं कितीही टॅंलंटेड असली तरी मनःशांती हिरावुन घेतात, ज्या लोकांमुळे आपण पुन्हा पुन्हा गोत्यात येतो, आणि तोंडावर आपटतो, अशा लोकांवर कधीही डिपेंड राहु नये, अशा माणसांना आपल्या आतल्या वर्तुळात कधीही प्रवेश देऊच नये,
पण तुम्ही सध्या ऑफीसमध्ये काम करत असल्यामुळे हा पर्याय तुम्हाला उपलब्ध नाही, तेव्हा तुम्हाला त्या व्यक्तीला टाळता येणे शक्य नाही, अशा वेळी इतर काय काय उपाय करता येतील, ते पाहुया!
----------------------------------------------------------------------------------------------------------------
१) मैत्री करा. –
दिवसभर सोबत राहुन एकमेकांचा द्वेष करण्यापेक्षा, आपल्या सहकार्‍यांशी हलकंफुलकं नात जोडणं हेच अधिक शहाणपणाचं लक्षण आहे.
जो जसा आहे, ज्याचा सहवास टाळता येण्यासारखा नाही, त्याला मनाने स्वीकारलं की आपोआपच मनावरचा ताण हलका होतो.
‘हा असाच वागणार’ हे आधीच गृहित धरल्यामुळे आता त्याने केलेल्या काड्यांमुळे मनःशांती भंग होत नाही.
अशा लोकांना वश करण्यासाठी अधुन मधुन त्याला थोडं चढवलं पाहिजे, थोडी त्याची तारीफ केली पाहीजे.
त्याच्या सुखादुःखात सहभागी झालं पाहीजे.
त्याला काहीतरी भेट द्या, त्याचा बर्थडे सेलिब्रेट करा, काही करुन त्याला बोलतं करा, जमल्यास त्याच्या घरी जा,
दमदाटी करुन संबंध बिघडवण्यापेक्षा प्रेम करुन जिंकणं, कधीही चांगलचं!
त्याच्याबद्द्ल आपलं जुनं मत बदलत आहे, ही जाणीव त्याला व्हायला हवी, म्हणजे आपोआपच त्याचे उपद्रव कमी होतील.
--------------------------------------------------------------------------------------------------------
२. अनप्रेडीक्टेबल बना. –
पण सर, काही काही लोकांना प्रेमाची भाषा कळतच नाही, बोट दिलं की डोक्यावर बसतात, खलबत्ता काढुन मिरे वाटतात,
अशा वेळी त्याला धक्काशास्त्राचा वापर करा.
रोज छान बोलायचं आणि एके दिवशी उगीच फटकुन वागायचं,
त्याच्या मनात आपल्याविषयी जरब बसेल अशी कोणतीही कृती करा.
त्या व्यक्तीचा संपुर्ण अभ्यास करा, त्याच्या स्ट्रेन्ग्थ, त्याच्या विकनेस ह्याविषयी संपुर्ण माहिती गोळा करा.
प्रत्येक माणसात काहीनाकाही दोष असतोच.
तो कधी चुकला की तात्काळ त्याची चुक त्याला लक्षात आणुन द्या,
त्याला सांगा, ही चुक लहान नाही, पण जाऊ दे, पुढच्या वेळी असे करु नको,
त्याला दाखवुन द्या, की तुम्ही किती मोठ्या मनाने त्याचे अपराध पोटात घालत आहात.
कोणीही माणुस आपल्याला तेव्हाच गृहित धरु लागतो, जेव्हा तो आपली सगळी पोथी ओळखुन घेतो,
‘झाकली मुठ सव्वा लाखाची’ हे तत्व कुठेही कामाला येते.
समोरचा माणुस बघुन व्यवहार ठरवा.
मतलबी आणि चलाख लोकांशी संपर्क आल्यास, तुमचं खरं रुप, तुमचे कच्चे दुवे कोणालाच कळता कामा नये. नाहीतर तुमचा खेळ खल्लास!
कधी उगीचच त्याच्याशी मैत्रीपुर्ण संवाद करा, कधी उगीचच चेहर्‍यावर कठोर भाव ठेवुन त्याला गोंधळात पाडा.
--------------------------------------------------------------------------------------------------------
३. माणसं वाचा. त्यांची दुखरी नस शोधा. –
व्यवहारात यशस्वी व्हायचं असेल तर काही क्षणात माणसं वाचता आली पाहीजेत.
नेमकं काय बोललं म्हणजे एखादा माणुस आपल्याशी मैत्रीपुर्वक आणि सौहार्दाने वागु लागेल, हे गणित ज्याला जमलं तो खरा व्यवहार कुशल!
बॉसला जिंकण्यासाठी आपल्याला नेमुन दिलेलं काम चोख पार पाडा.
एक्स्ट्रा एफर्टस घ्यावे लागले तरी चालतील पण प्रत्येक वेळी दिलेल्या जबाबदारीपेक्षा काकणभर सरस कामगिरी करा.
जेव्हा तो आपल्यावर खुश असेल, जेव्हा आपलं नौकरीतलं स्थान भक्कम असेल तेव्हा, जवळीक साधण्याचे जाणीवपुर्वक प्रयत्न करा.
बॉसच्या मागे भक्कम पणे उभे रहा, छोट्या छोट्या घटनांमध्ये त्याला तुमचा आधार वाटला पाहिजे.
त्याने न सांगताही, काही कामं करा.
स्तुती हे एक असं आयुध आहे, जे एकही रुपया खर्च न करता माणसांना आपल्या बाजुने वळवण्यात यशस्वी ठरतं.
कधी डायरेक्ट कधी इनडायरेक्ट, पण नेहमी, ज्यांना ज्यांना आपल्या बाजुने वळवायचे आहे अशा प्रत्येक व्यक्तीची तोंड भरुन प्रामाणिक स्तुती करा.
ऑफीसमध्ये किंवा ऑफीसबाहेर ज्यांचा बॉसशी मैत्रीपुर्ण व्यवहार आहे, अशा लोकांसोबत एकदम बोलुन गेल्यासारखं, अगदी सहज म्हणुन छोट्यामोठ्या कारणासाठी बॉसची तारीफ करा,
तुमची तारीफ, तुमच्या भावना बॉसपर्यंत पोहचवतील अशीच माणसं निवडा.
बॉसवर कधीही उघड टिका करु नका, मिटींगमध्ये अप्रिय विषय टाळा.
फेसबुक, आणि व्हॉटसएप स्टेटस ला आवर्जुन कौतुक करा.
बॉसचे आपण निष्ठावान आहोत, असे चित्र उभे करा.
जेव्हा केव्हा बॉससोबत चहापाणी, नाष्टा, जेवण किंवा प्रवास करण्याची संधी मिळेल, त्यातली एकही संधी सोडु नका. साखरपेरणी करत रहा.
-----------------------------------------------------------------------------
४. इर्रेप्लेसेबल बना. –
तुमच्या कंपनीतील, तुमच्या ऑफीसमधील सर्वात महत्वाची व्यक्ती बनण्याची तुमची क्षमता आहे का?
इतका गजब परफॉर्मन्स द्या, की तुमच्याशिवाय कंपनी चालणे अशक्य होवुन बसावे.
तुम्हाला हर्ट करणे, किंवा तुमचा ऑफीस सोडुन जायचा विचार कोणालाही परवडु नये, असे एक स्वतःचे एक भक्कम स्थान तयार करा.
------------------------------------------------------------------------------------------------
४. अधुन मधुन शॉक थेरपीही वापरा. -
एकदा वर भक्कम स्थान निर्माण झालं की मग हाताखालच्या माणसाची कामात हलगर्जीपणा केल्याबद्द्ल जाहीर कानउघडणी करा.
त्याच्या मनात तुमची जरब आणि दरारा असेल तरच तो तुम्हाला भाव देईल.
‘माणुस मनाने खुप चांगला आहे, फक्त शिस्तप्रिय आहे’, असे त्याने चारचौघात आपल्याबद्द्ल बोलले पाहीजे,
-----------------------------------------------------------------------------------------------------------------
आजच्या जगात काम करणार्‍यापेक्षा काम करवुन घेणारा अधिक वेगाने श्रीमंत होतो आहे,
मॅनेजमेंट स्किल्सशिवाय कोणीही प्रचंड प्रगती करु शकणार नाही, हेच सत्य आहे.
इतरांकडुन काम करवुन घेण्यासाठी कधी प्रोत्साहन कामी येतं,
कधी एवॉर्डस आणि शाबासकी द्यावी लागते,
कधी शिस्तीचा चाबुक काढावा लागतो,
आणि कधी समोरच्या व्यक्तीचं हित कशात आहे, हे त्याला पटवुन द्यावं लागतं,
आवश्यक तिथे आवश्यक ते बोलायचं, आणि आवश्यक तिथे आवश्यक ते वागायचं, ह्यालाच मॅनेजमेंट म्हणतात.
आपल्या सर्वांना ही बिना एमबीए करता ह्या मॅनेजमेंट स्किल्स अवगत होवो, ह्या मनःपुर्वक प्रार्थनेसह,
आभार आणि शुभेच्छा!
[9/26/2020, 11:50 AM] +91 95036 45430: -------------------------------------------------------------------------------------------------------------
थेट पंकज कोटलवारच्या लेखणीतुन – कालजयी कुमारगंधर्व!!
------------------------------------------------------------------------------------------------------------
एप्रिल १९४७!
पंडीत कुमार गंधर्व तेव्हा फक्त तेवीस वर्षांचे होते, पण दैवी सुरांचं वरदान लाभलेला अदभुत प्रतिभाशाली गायक म्हणुन त्यांची संपुर्ण भारतात ख्याती पसरली होती.
अवघ्या अकराव्या वर्षीपासुन कुमारगंधर्वांचा झंझावात सुरु झाला होता, तो मागच्या बारा वर्षांपासुन अव्याहत सुरुच होता,
कानपुर पासुन कर्नाटकापर्यंत आणि कलकत्यापासुन मुंबईपर्यंत, संपुर्ण भारतातल्या शास्त्रीय संगीतातल्या रसिकांना कुमार गंधर्वांनी आपल्या मोहक स्वरांनी भुरळ घातली होती.
आत्ता तर त्यांनी कुमार वय सोडुन यौवनात प्रवेश केला होता, अजुन तर किती लांबचा पल्ला गाठायचा होता,
पण एक अघटित घटना घडली, कुमार गंधर्वांना श्वास घ्यायला त्रास होवु लागला.
तपासण्या झाल्या, निदान झाले, डॉक्टर म्हणाले, तुम्हाला दमा आहे.
त्याकाळात दम्यावर प्रभावी उपचार नव्हते,
दैवी सुरांचं वरदान लाभलेले गंधर्व, इतक्या लहान वयात हजारो श्रोत्यांना मंत्रमुग्ध करुन तासनतास खिळवुन ठेवणारे कुमारजी,
लोकांना आपली सगळी दुःखे, चिंता विसरायला लावुन, फक्त आपल्या सुरांच्या बळावर लोकांना एक आगळ्यावेगळ्या जगात घेऊन जाणारे कुमारजी,
देवधर गुरुजींच्या मार्गदर्शनाखाले, कित्येक वर्षांच्या अखंड परिश्रमांमुळे शास्त्रीय संगीतातली रागांचे अदभुत बारकावे शिकलेले कुमारजी,
आता दिवसेंदिवस त्यांचा आवाज क्षीण होत होता,
गाणे तर सोडाच, नुसते बोलताही यायचे नाही,
दम्याने फुप्फुसे अशी काही पोखरुन टाकली होती की स्वरयंत्रातुन आवाज येणे जवळजवळ बंद झाले होते,
पुढची पाच वर्ष पंडीतजींनी एकही गाणं गायलं नाही,
गाणं, रागदरबारी, संगीत हाच कुमार गंधर्व ह्यांचा श्वास होता, आणि अजाण वयात भरभरुन दान पदरात टाकुन क्रुर नियतीने अचानकपणे आता ते सगळंच एका झटक्यात त्यांच्यापासुन हिरावुन घेतलं होतं,
संपत्तीच्या शिखरावर पोहोचलेल्या व्यक्तीला एका फटक्यात भिकारी बनवलं गेलं तर त्याला कसं वाटेल?
आपल्या कलेवर निस्सीम प्रेम असणाऱ्या एका सच्च्या कलावंतासाठी, आपल्या कलेपासुन दुरावणे ही जीवनातली सर्वात मोठी वेदनादायी वेळ असते,
समजा, एखाद्या हाडाच्या चित्रकाराकडून त्याचा कॅनव्हास आणि कुंचलाच काढुन घेतला तर तो कसा पाण्यातुन बाहेर काढलेल्या माशासारखा तळमळत बसेल? तसंच काहीसं!...
किंवा टेनिस एल्बोमुळे सचिनला क्रिकेटपासुन काही वर्ष दुर रहावं लागलं होतं तेव्हा त्याला काय वाटलं असेल, तसं काहीसं!...
अशा विपत्तीला संवेदनशील व्यक्ती सहन करु शकत नाही, इतिहासात अनेक कलावंतांची दुःखद अखेर अशीच पहायला मिळते,
कुमार गंधर्व यांचं एक फुफ्पुस पुर्णपणे निकामी झालं, पण तरीही कुमारजी खचले नाहीत,
ते तानपुरा घेऊन रियाजाला बसायचे, आणि इतरांना आलाप घ्यायला सांगायचे,
ते मनातल्या मनात गायचे,
तासनतास गायचे,
गळ्यातुन नाही गाता आलं तर काय झालं? अगदी ह्रद्यातुन गायचे,
लोकांना ऐकता नाही आलं तर काय झालं, स्वतःसाठी गायचे,
गाता गाता त्यांची भावसमाधी लागायची, आणि डोळ्यातुन पाणी वाहु लागायचं,
त्यांची संगीतावरची, गायनावरची ही भक्ती पाहुन अखेर नियतीलाही पाझर फुटला,
१९५० च्या सुमारास दम्यावर प्रभावी अशा एका उपचारपद्धतीचा शोध लागला.
ह्या काळात कुमारजींच्या पत्नी भानुमती ह्यांनी दिवसरात्र त्यांची मनोभावे सेवासुश्रुषा केली, त्यांना आधार दिला,
आणि कुमारजींचा आवाज परत आला,
आता त्या आवाजात आधीसारखे तळपणारे तेज नव्हते, पण तो कठिण संकटातुन तावुन सुलाखुन बाहेर पडुन अजुनच आकर्षक आणि मोहक झाला होता,
फक्त एका फुफ्पुसाने श्वास घेत कुमारजी पुढची अडतीस वर्ष लाखो श्रोत्यांचे कान तृप्त करत राहीले.
परंपरेच्या चौकटीत अडकलेल्या भारतीय शास्त्रीय संगीताला कुमार गंधर्व ह्यांनी नवे वळण दिले.
अगदी तरुणपणीच मृत्युच्या दारात जाऊन आल्यामुळे की काय, त्यांच्यात एक पवित्रता, शुद्धता आली होती,
साक्षात मृत्युला भेदुन गेल्यानंतर शिल्लक असलेल्या फक्त आणि फक्त असीम आनंदाला त्यांनी अनुभवले होते का?
त्याच आनंदाला त्यांनी आपल्या गाण्यांमध्ये. सुरांमध्ये नितळपणे उतरवले होते का?
म्हणुनच प्रत्येक वेळा त्यांची गाणी आपल्याला भावसमाधीत घेऊन जातात का?
“‘सुनता है गुरु ग्यानी’, गगनमे आवाज हो रही झीनी झीनी!...”
पवित्रता फक्त त्यांच्या आवाजातच नव्हती, तर त्यांच्या आचरणात आणि विचारांमध्येही होती.
योगायोगाने कुमारजींचा पुर्नजन्म झाला, आणि त्यांनी स्वतःच्या प्रतिभेच्या बळावर एका नव्या आणि अदभुत, विस्मयकारी प्रकारच्या शास्त्रीय संगीताचे सर्जन केले.
आपल्या निर्गुणी भजनांमध्ये कधी त्यांनी कबीराचे दोहे मनमुक्तपणे गायले,
कधी माळवा-गुजरात प्रांतामध्ये प्रसिद्ध लोकगीते त्यांनी रागदरबारीमध्ये गुंफली, आणि भारतीय संगीताची अनोखी झलक जगापुढे सादर केली.
कुमार गंधर्वांनी अनेक भजने गायली, तशीच काही मराठी गाणीही गायली,
असंच एक गाणं जे कितीही वेळा ऐकलं तरी कान तृप्त होत नाहीत ते म्हणजे, “ऋणानुबंधाच्या गाठी, भेटीत तृष्टता मोठी!”
हे गाणं पंडित कुमार गंधर्व आणि वाणी जयराम ह्यांनी गायलेलं एक अप्रतिम गीत आहे.
अगदी कालपरवा पुलंच्या जीवनावर आलेल्या भाई – व्यक्ती आणि वल्ली ह्या चित्रपटमध्येही त्याची झलक आली होती,
पंडीतजींच्या आवाजांशी माझं एक नातं आहे,
आयुष्यात जेव्हा केव्हा संघर्षाचे प्रसंग आले, तेव्हा पंडीतजींच्या पवित्र सुरांमध्ये मी स्वतःला झोकुन देतो,
आणि काही क्षणांमध्ये सगळ्या चिंता, दुःखे कापरासारखी उडुन जाते,
कुमार गंधर्वांच्या शब्दात इतकी शक्ती आहे की त्यांच्या सुरावटी ऐकल्यानंतर नुसता मुड फ्रेश होत नाही,
एका दिव्य आनंदाची अनुभुती होवु लागते, आतमध्ये आनंदाचे झरे फुटु लागतात.
कुमार गंधर्व हे भारतीय शास्त्रीय संगीतसृष्टीला पडलेलं सोनेरी स्वप्नं आहे.
--------------------------------------------------------------------------------------------
संगीत हे मुड बदलवण्यासाठी एक प्रभावी साधन आहे,
आयुष्यात माझ्यावर अनेकदा हादरावुन टाकणारी संकटे आली,
जेव्हा जेव्हा मी सैरभैर झालो
पण भीमसेन जोशी, पंडीत जितेंद्र अभिषेकी, जयतीर्थ मेवुंडी, गायत्री-रागिनी, ह्या सर्वांच्या दैवी सुरांनी मला प्रत्येक वेळी निराशेतुन बाहेर काढलं,
सैरभैर झालेल्या मनाला, पुन्हा एकदा उत्साहित केलं,
आनंदी होण्याचं एकही कारण जवळ नसताना, सुर हेच माझ्यासाठी आनंद-धाम बनले,
नरकयातनांचे मोक्षामध्ये रुपांतर करण्याची शक्ति अभंगामध्ये आहे, भजनांमध्ये आहे, सुरांमध्ये आहे, हे मी कित्येकदा अनुभवले आहे.
आणि असंचं, चलबिचल झालेल्या मनाला ताळ्यावर आणण्याचा हुकुमी उपाय म्हणजे,
कुमार गंधर्वांना ऐकणे,
स्वतःला त्यांच्या स्वाधीन करणे,
काही कळो किंवा न कळो, त्यांच्या गाण्यामध्ये स्वतःला झोकुन देणे,
आपोआपच आपला प्रत्येक रोमरोम दिव्य चैतन्याने काठोकाठ भरुन जातो,
आजही जेव्हा केव्हा रात्र रात्रभर ड्रॉईंग पुर्ण करण्यासाठी मला जागावे लागते,
 तेव्हा साथीला पंडीतजीच्या दैवी सुर असले की काम करण्याचा शीण क्षणात नाहीसा होतो,
दिवसभर कितीही थकलेलो असलो तरी असामान्य उर्जा मिळते,
शब्दात सांगता येत नाही, असा आनंद मिळतो,
रात्र कधी संपली तेच कळत नाही.
आणि हीच पंडीत कुमार गंधर्व ह्यांच्या आवाजाची जादु आहे.
----------------------------------------------------------------------------------------------------------
शुभेच्छा आणि आभार!!

Tuesday, July 19, 2022

अंतर्मनाची अमर्याद शक्ती!

 --------------------------------------------------------

थेट पंकज कोटलवारच्या लेखणीतुन – अंतर्मनाची अमर्याद शक्ती!
-----------------------------------------------------------------------------------------------------------------

एप्रिल २०१९ मध्ये मी लातुरमधल्या आर्किटेक्चर कॉलेजचा जॉब सोडला.

पुण्याला जायचे आहे, एम. आर्च करायचे आहे, हे डोक्यात फिट्ट बसले होते,

पण चौतीसाव्या वर्षी कॉलेजमध्ये नुसतं स्टुडंट बनुन न जाता, प्रोफेसर बनुन गेल्यासच खास मजा येईल, असे मनातुन वाटत होते.

पण शिक्षण शिकता शिकता आपल्याला कोणी प्रोफेसरचा जॉब का ऑफर करेल? अशी शंका एकसारखी सतावत होती,

पण मोठ्या निग्रहाने मी साऱ्या शंकाकुशंका झटकुन दिल्या, आणि मला चांगला जॉब मिळाल्याचे व्हिज्वलायजेशन मन लावुन दिवसरात्र सुरु केले.

२०१९ च्या मे महिन्यात, मी दोन आठवडे पुण्यामध्ये थांबलो, त्या दरम्यान मी जवळपास आठ दहा कॉलेजेस आणि नावाजलेल्या आर्किटेक्चर फर्मस ला भेटी दिल्या.

जॉब मिळण्याची कसलीही लक्षणे दिसेनात.

सगळीकडे एकामागे एक नकार-घंटा वाजु लागली!

नियमानुसार पोस्ट ग्रॅज्युएशन शिकताना मला प्रोफेसरचा जॉब मिळणार नव्हता.

मी ही जिद्द सोडली नाही,

प्रत्येक नकार मी हसत हसत पचवला,

त्या दिवसात जॉबच्या शोधात, मे महिन्याच्या तळपत्या उन्हात, मी दररोज पन्नास एक किलोमीटर बाईकवर फिरायचो.

अक्षरशः घामाच्या धारा निथळायच्या, मरु दे जॉब, असेही वाटायचे, इतका थकवा यायचा,

पण सकारात्मक लेख लिहित राहण्याचा एक फायदा होतो, कितीही निगेटीव्ह परिस्थिती असली तरी मन त्या निराशेत जास्त वेळ बुडुन राहुच शकत नाही,

एके दिवशी असाच फिरत फिरत तीसपस्तीस किलोमीटर दुर असलेल्या डीवायपाटील कॉलेजला आलो,

प्रिन्सिपल मॅम ला भेटलो, त्यांना माझी अडचण सांगितली, आणि त्यांच्याकडे माझ्यासाठी व्हॅंकन्सी होती.

ब्रम्हांडाने माझ्यासाठी योजना आखुन ठेवली होती.

अविश्वसनीयरित्या फक्त पाच मिनीटात माझा प्रोफेसरचा जॉब पक्क झाला.

मी मनातल्या मनात प्रचंड खुश झालो होतो, अगदी नाचावेसे वाटत होते,

पण चेहऱ्यावरचे हावभाव न बदलु देता, मी तसाच कॉलेजबाहेर पडलो,

एके ठिकाणी रस्त्यात गाडी थांबवली, बॉटलमध्ये मिळतो तो सोडा पिऊन मी सेलेब्रेशन केलं, जल्लोष केला,

आधी आधी अशक्यप्राय वाटणारं, माझं मॅनिफेस्टेशन पुन्हा एकदा काही सेकंदात आस्तित्वात आलं होतं!
 
नेहमीप्रमाणे विचार जिंकले होते, परिस्थिती हरली होती,

--------------------------------------------------------------------------------------------------------------
तुम्हाला वाटत असेल, हा दिडशहाणा काय, नेहमीच स्वतःची पाठ थोपाटुन घेतो?

नुसते विचार करुन हवे ते साध्य करता येते, याचे पुरावे देण्यासाठी मला माझे वैयक्तिक अनुभव लिहावे लागतात,

माझ्यावर विश्वास ठेवा,

तुमच्या प्रत्येकाकडे हा अदृष्य ‘लॉ ऑफ अट्रॅक्शन’ रुपी अल्लाउद्दीनचा दिवा आहे,

तुम्ही कधी आपल्या अंतर्मनाची अमर्याद शक्ती अनुभवली आहे का?

अंतर्मनाचं अफाट सामर्थ्य वापरुन ह्या जगात चमत्कार घडवता येतात, ह्यावर तुमचा विश्वास आहे का?

आपल्या सर्वांकडे ही शक्ती आहे, तर मग प्रत्येकाला ह्या खजाना का लुटता येत नाही?

हा खजाना ज्या गुहेत द्डलेला आहे, त्या गुहेत शिरायचे कसे,

त्या गुहेची चावी कशी वापरायची?

अंतर्मनात विचार रुजवुण्यासाठी सर्वात उत्तम उपाय म्हणजे संमोहन! हिप्नोटीझम!

हिप्नोटीझम मध्ये बाह्यमनाला झोपवतात, अंतर्मनाला पुर्ण एक्टीव्ह करतात आणि कमांड देऊन हवं तसं काम त्याच्याकडुन करुन घेतात.

हिप्नॉटाईझ केलेल्या व्यक्तीला गोड आहे असं सांगुन तिखटाआग मिरच्या जरी खायला दिल्या तरी त्याला गोड लागतात, हे मी स्वतः माझ्या डोळ्यांनी बघितलेलं आहे.

अंतर्मनाच्या सुप्त पण अमर्याद शक्तीचा हा पुरावाच म्हणता येईल.
----------------------------------------------------------------------------------------------------------------
१. अंतर्मनाचं वैशिष्ट्य –

- अंतर्मनात ज्ञानाचं अमर्याद भांडार आहे, ते कधीही रितं होत नाही.

- आपण जे एकदा पाहतो, ऐकतो, वाचतो, ते ह्यात साठवलं जातं, ते कधीच पुसलं जात नाही, कधीनाकधी ते माणसाला पुन्हा कधीतरी आठवतं.

- आपल्या बहिर्मनात येणारे, सहज आपल्या कानी पडणारे विचार अंतर्मन टिपत असतं!

- मनातलं नकारात्मक विचारांच तण जर आपण प्रयत्नपुर्वक उपटुन नाही काढलं, तर आयुष्याच्या झाडाची पानगळ व्हायला अजिबात वेळ लागत नाही.

----------------------------------------------------------------------------------------------------------
३) अंतर्मनात जे पेरलं जातं तेच उगवतं!

- जे वारंवार बजावलं जातं, ते अंतर्मन स्वीकारतं!

- अंतर्मनाला विवेकबुद्धी नसते, ते फक्त आज्ञा पाळतं!

- तुम्ही स्वतःशी संवाद साधताना म्हणाल,

‘हे अवघड आहे’,
‘हे होणं शक्य नाही’
‘हे जग खुप वाईट आहे’
‘माणसं विश्वासपात्र नसतात.’
‘बापरे! आता माझं काही खरं नाही,’
‘मला हे जमणार नाही’
‘माझं नशिबचं फुटकं’
‘नेहमी माझ्या बाबतीतच असं का होतं?’

- असे वाक्य स्वतःशी पुन्हा पुन्हा बोलणं, म्हणजे अंतर्मनाला असं वागण्याची, असं घडवण्याची आज्ञा देणं!

- तुमचं अंतर्मन तुम्हाला असेच मिळतेजुळते वाईटसाईट अनुभव देणारी परिस्थिती उपलब्ध करुन देईल,

- ह्याऐवजी आपण आपली प्रोग्रामिंग काही छानशी वाक्य बोलुन केली तर!.....

अफरमेशन साठी तयार केलेलं प्रत्येक वाक्य शक्य तितक्या जास्त वेळा मनातल्या मनात न वाचता, मोठ्याने वाचा.

- ह्या स्वयंसुचना खरोखर तुमचं जीवन बदलुन टाकतील.
-----------------------------------------------------------------------------------

२. आरोग्य –

- माझं शरीर आणि माझं मन एकच आहेत.

- शरीरातल्या पेशींपेशींवर माझं नियंत्रण आहे.

- आजारातुन बरं होण्याची नैसर्गिक शक्ती माझ्या अंतर्मनात आहे, आता ती प्रकट होत आहे.

- माझं मन प्रसन्न आहे.

- माझं शरीर दिवसेंदिवस अधिकाधिक आरोग्यसंपन्न होत आहे.

- जीवनावर माझी श्रद्धा आहे.

- ह्या श्रद्धेमुळेच माझं शरीर, माझं मन नव्या चैतन्यानं भरुन जात आहे.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------
३. यश –

- आयुष्यात मला यश, आनंद, वैभव मिळवणं, हा माझा हक्क आहे.

- माझ्या क्षमतेची व पात्रतेची मला पुर्ण खात्री आहे.

- माझ्या अंतर्मनाच्या अमर्याद शक्तीचीही मला जाणीव आहे.

- त्या शक्तीवर माझा पुर्ण विश्वास आहे.

- दिवसेंदिवस माझ्या प्रयत्नांना यश लाभत आहे.

- माझं ज्ञान, माझी बुद्धी, माझी प्रतिभा मी सतत वापरत आहे व मला तिचा पुरेपुर मोबादला मिळत आहे.

---------------------------------------------------------------------------------------------------------
४. स्मरणशक्ती –

- माझी स्मरणशक्ती आता दिवसेंदिवस सुधारत आहे,

- ऐकलेलं, वाचलेलं सारं माझ्या व्यवस्थित लक्षात राहत आहे,

- हव्या त्या वेळी, हवं ते मला सहजपणे आठवतं,

- पुर्वीपेक्षा माझी स्मरणशक्ती उत्तम झाली असुन ती अधिकाधिक वाढतच जाणार आहे.

----------------------------------------------------------------------------------------------------------------
५. क्षमा –

- झालेल्या प्रकाराबद्दल मी ___ ला मनोमन क्षमा करत आहे.

- त्याच्याबद्द्ल माझ्या मनात कसलाही राग किंवा द्वेष नाही.

- त्याच्याबद्दलच्या सर्व विचारातुन मी मुक्त झालो आहे,

- माझं आयुष्य मला आनंदात जगायचं असुन आता कुणामुळेही मी दुखावला जात नाही.

-------------------------------------------------------------------------------------------------------
६. पैशाचं उद्दिष्ट्य –

- ३१ डिसेंबर २०२१  पर्यंत मी ------ लाख रुपये मिळवणार आहे.

- हे पैसे मी ___ म्हणुन देणार असलेल्या सेवेबद्द्ल मला मिळतील.

- माझ्या पुर्ण क्षमतेनुसार मी लोकांना सर्वोत्तम अशीच सेवा देणार आहे.

- माझ्या कामामुळे सर्वांनाच भरपुर लाभ होणार असल्यामुळे मला हवे तेवढे पैसे मिळणारच ह्याची मला खात्री आहे.

- मला हवा असलेला पैसा मला मनःचक्षुंपुढे स्पष्ट दिसतो आहे.

--------------------------------------------------------------------------------------------------------
७. चिंतामुक्ती –

- चिंता करुन काहीच साध्य होत नसतं, हे मी जाणतो.
- जे घडतं ते चांगल्यासाठीच घडतं, ह्यावर माझा विश्वास आहे,
- अगदी वाईटात वाईटातुनही चांगलंच काहीतरी घडतं, हे मी अनेकवेळा अनुभवलेलं आहे.
- परिस्थिती कायम बदलणारी असते, ह्याचं मला भान आहे.

- प्रत्येक प्रश्णावर काही ना काही उत्तर असतं, प्रत्येक अडचणीवर मार्ग निघतो, ह्यावर माझा ठाम विश्वास आहे.

- ज्या बाबतीत मला काही करणं शक्य आहे, अशाच गोष्टींवर मी आपलं संपुर्ण लक्ष केंद्रित करतो.

- मी माझं मन नेहमी चांगल्या, सकारात्मक, स्फुर्तीदायक विचार कल्पनांमध्ये गुंतवुन ठेवतो.

- म्हणुन नेहमीच माझे विचार मला आनंदी, उत्साही आणि निरोगीच ठेवतात,

----------------------------------------------------------------------------------------------------------------
आपल्या मोबाईलमध्ये ह्या आणि अशा अनेक स्वयंसुचनांच्या रेकॉर्डींग बनवा,
स्वतःच्या धीरगंभीर आवाजात ह्या सुचना रेकॉर्ड करा,
त्या सकाळ संध्याकाळ पुन्हा पुन्हा ऐका,
फावल्या वेळात त्या पुन्हा पुन्हा घोका, आठवा,
मनातल्या मनात उजळणी करा,
नियमित नव्वद दिवस हे कराल तर तुमच्या जीवनात होत असलेला बदल तुम्हाला निश्चितपणे जाणवु लागेल.

आभार आणि शुभेच्छा!

मनाचं कॉम्पूटर!

 Your brain works just like computer; so make sure you’re the only one programming it!..

-------------------------------------------------------------
थेट पंकज कोटलवारच्या लेखणीतुन – मनाचं कॉम्पूटर!
-------------------------------------------------------------

तुम्हाला माहितीये?

मन आणि कॉम्पूटर दोघांमध्ये खुप साम्ये आहेत. दोघेही प्रचंड शक्तिशाली आहेत, बुद्धिमान आहेत.

दोघांमध्ये अफाट स्मरणशक्ती आहे, तसेच कल्पनाशक्तीही आहे.

यांचा नीट वापर केल्यास प्रचंड सर्जनात्मक यांच्याकडुन काम करवुन घेता येते.

यांचा नीट वापर केल्यास प्रचंड संहार आणि विध्वंसही घडवुन आणला जावु शकतो.

एवढचं नाही तर दोघांची कार्यपद्धतीही एकदम सेम टु सेम आहे.

कॉम्पुटरचा एखादा प्रोग्रॅम लिहताना तो असा लिहावा लागतो.

----------------------------------------
इनपुट – प्रोसेस – आउटपुट
 ---------------------------------------

अगदी असंचं माणसाच्या मनाचंही आहे,

कॉम्पूटर यंत्र असल्यामुळे आपलं काम चोख करतो, पण फारचं थोडी माणसं आपलं डोक्यातल्या कॉम्पुटरचा नीट वापर करताना दिसतात.

आपल्या आजुबाजुला असे बरेचशे कॉम्पुटर बिघडलेले दिसतात.

गंमत म्हणुन त्यांच्यातले काही प्रकार सांगतो,

१) इनपुट वाईट, म्हणुन आउटपुट शुन्य –

हे कॉम्पुटर तुम्हाला सदानकदा टी. व्ही समोर दिसतील, वेड्यावाकड्या संदर्भहीन बातम्या, वर्षानुवर्ष तिथल्यातिथे रेंगाळणाऱ्या सिरीअली, हातात स्मार्टफोन मोबाईल असल्यास हे रात्रंदिवस, मुव्ही, गेम्स यांच्या जाळ्यात अडकुन पडलेले दिसतील.

काही कॉम्पुटर गावात राहणारे असतील तर चौकाचौकात पानपट्ट्यावर घोळका करुन एखाद्याची टर उडवताना दिसतील.

आपल्यापेक्षा पूढे गेलेल्या लोकांचा मनोमन द्वेष करताना दिसतील,

फेसबुक, सोशल मिडीयावर कट्टर कार्यकर्ते बनुन रोजरोज गरळ ओकताना दिसतील,

कधी हताश, निराश होवुन स्वतःच्या नशीबाला कोसताना दिसतील,

मुळचे हे मॉडेल तल्लख बुद्धीचे आणि प्रचंड उर्जा असलेल्या कॉन्फीगरेशन असलेले होते.

पण योग्य इनपुट न मिळाल्याने यांच्या आयूष्याचे वाटोळे होते, आणि शेवटी यांना भंगारच्या दुकानात जावे लागते.

---------------------------


२) इनपुट नाही, प्रोसेस नाही, फक्त आऊटपुट आहे,  –

- म्हणजे मला सगळे काही माहित आहे, मला सगळे कळते,

- हे कॉम्पूटर समोरच्याला नेमकं काय म्हणायचयं, हे समजुन घेण्याआधीच प्रतिक्रिया द्यायला उतावीळ असतात, इथेच त्यांचा घात होतो.

- ह्यांच्या आजुबाजुला असलेले लोक ह्यांना आणि ह्यांच्या निरर्थक बडबडीला टाळु लागतात.

- जगात चाललेल्या प्रत्येक घडामोडीवर कमेंट करण्याचा यांनी मक्ता घेतलेला असतो.

- ज्या लोकांशी आपला काहीही संबंध नाही, जे लोक आपल्याला खिजगिणतीत धरत नाहीत, अशा राजकीय नेत्यांविषयी, अभिनेत्यांच्या जीवनात यांना नको तेवढा रस असतो.

- कम्युनिकेशनची उत्कृष्ट क्षमता असणारे हे लोक, पण वर्तमानपत्रे, न्युज चॅनेल आणि फेसबुक व्हॉटसएप च्या सापळ्यात इतक्या अलगद अडकतात, की आपल्या जीवनाचं मुख्य ध्येय विसरुन नको नको त्या मुद्द्यांवर आपली पुर्ण उर्जा खर्च करतात.

- सगळ्या राजकीय पक्षांनाही आपल्या प्रचारासाठी अशाच लोकांची तर गरज असते.

- माणसानं आपल्याला कोणी मुर्ख बनवु नये, इतकं शहाणं तर असायलाच हवं!..

---------------------------

३) इनपुट आहे, पण आऊटपुट नाही, कारण प्रोसेसरच बिघडलाय. –

- हे कॉम्पूटर शांतपणे ऐकल्याचा आव आणतात, पण ऐकतात आणि सोडुन देतात!

- विचारांना आपल्या आत खोलवर कधीच रुजु देत नाहीत, चिंतन नाही, मंथन नाही.

- हे तसे निरुपद्रवी प्राणी असतात, पण म्हणुनच ते आहेत तिथल्या तिथे घुटमळत राहतात,

- यांना स्वतःचं असं ठाम मत नसतं, त्यामुळे ते कोणाला प्रभावित करु शकत नाहीत.

- कसलीही भव्य स्वप्ने नसल्यामुळे कुठल्याही कामात स्वतःला झोकुन द्यायला यांना जमत नाही.

- चौकटी मोडुन संघर्ष करण्याची यांना भीती असते.

- एखादा चांगला प्रोग्रॅम यांचं आयुष्य बदलवण्यासाठी पुरेसा असतो.

---------------------------

४) व्हायरस, बग्ज आणि लॅग्ज यांच्यामुळे स्लो झालेले कॉम्पुटर –

- हे कॉम्पुटर पुर्णपणे व्यसनांच्या आहारी गेलेले असतात.

- चहा, दारु, सिगरेट, सुपारी, अतिखाणे, अतिवासना, अतिबडबड, सोशलमिडीयाचा अतिवापर, अतिभांडण, निराशा ह्यापैकी कोणाताही एक व्हायरस, चांगल्यात चांगल्या आणि उत्तम सिस्टीमची वाट लावायला पुरेसा आणि सक्षम असतो.

- मुळचे हे तल्लख बुद्धीचे आणि क्षमतावान, उर्जावान लोक होते, पण एका सुक्ष्म व्हायरसने यांचा घात केलेला असतो.

- ह्यावर फॉर्मॅटींग हाच एकमेव आणि जालीम उपाय शिल्लक राहतो.

- ध्यान आणि अध्यात्मिकता हेच सर्वोत्कूष्ट फॉर्मॅटींग आहे.

---------------------------

५) उत्तम इनपुट, उत्तम प्रोसेस, अतिउत्तम आउटपुट –

- हे तुम्ही आणि आम्ही!

- उत्तम पुस्तके वाचतात, मनाची आणि शरीराची काळजी घेतात,

- पेरलं तेच उगवतं हा आकर्षणाचा नियम ह्यांना माहित असतो.

- नियमित प्रयत्नपुर्वक कृतीने जगाला थक्क करणाऱ्या अचिव्हमेंटस करुन दाखवतात.

- जिकडेतिकडे ह्यांचा बोलबाला असतो.

---------------------------------------------------------------------------------------

विनोदाचा भाग सोडा.

कित्येकदा आपण ही नकळत आपल्या मनावर एक प्रोग्रॅमिंग करुन घेतलेली असते.

जसं की,

“मी हा असा आहे!”

“हे मी सहज करु शकतो.”

“नाही, हे मला जमण्यासारखं नाही, हे खुप अवघड आहे.”

“ही तर माझ्यासाठी अशक्य कोटीतील गोष्ट आहे.”

“ही माझी विकनेस आहे.”

“पॉझीटीव्ह विचारांचा परिणाम माझ्यावर थोडावेळ टिकतो, पुन्हा मी मुळपदावर येतो.”

“माझं ना, असं आहे, ‘कळतयं पण वळत नाही,’”

“मी प्लानिंग मोठमोठी करतो, शेवटी तोंडावर आपटतो.”

“मी आरंभशुर आहे. सुरुवात जोरदार करतो आणि शेवटी ढेपाळतो.”

वगैरे, वगैरे!

अजुन तुम्हाला हवी ती वाक्ये एड करा.

पण आनंदाची गोष्ट ही आहे की, हे म्हणणारे, स्वतःशी ठरवणारे खरे तुम्ही असे नाहीत.

त्या हत्तीच्या पायात बांधलेल्या साखळीसारख्या ह्या फक्त समजुती आहेत,

खरे तुम्ही तर वेगळेच आहात.

तुम्ही अनंत, अमर्याद आणि महाप्रचंड शक्तीचा स्त्रोत सोबत घेऊन जन्माला आला आहात.

त्या शक्तीला जागृत करा,

त्या शक्तीला अनुभवा,

शक्तीशाली असल्याचं नाटक करा,

आणि जग तुमच्यापुढे झुकत आहे, याचा तुम्हाला प्रत्यय येईल.

----------------------------------------------------------------------

एकाने मला प्रश्ण विचारला, सर, भरघोस कमाई वाढवण्यासाठी नेमकं काय प्रोग्रॅमिंग करावं लागेल?

१. वाहन बदला. –

- समजा, तुम्ही एका बसमध्ये बसला आहात,

- तुम्हाला अमेरीकेला जायची इ्च्छा आहे, तर काय करावं लागेल?

- आधी त्या बसमधुन खाली उतरावं लागेल,

- मग विमानतळ गाठावा लागेल,

- मग अमेरीकेला जाणार्‍या विमानात बसावं लागेल,  

- आता नव्यान्नव टक्के चान्स आहे, अमेरीकेचा, एक टक्का अपघाताचा!

लॉ ऑफ अट्रॅक्शन अजुन वेगळं काय असतं?

सर, माझी महीना सत्तावीस हजार रुपयांची नौकरी आहे, मला पाच कोटी रुपये मिळवायचे आहेत, कसे मिळतील?

सत्तावीस हजार रुपयांचा नौकरीची बस तुला पाच कोटीच्या देशात घेऊन नाही जाणार दादा!

तुला त्यासाठी व्यवसायाच्या विमानात बसुन उड्डाणच करावं लागेल ना!

“मग सर, नौकरी सोडली तर घरच्या जबाबदाऱ्यांचं काय करु?”
“नौकरी करता करता मी बिजनेस करु शकत नाही.”
“माझी स्वप्न पुर्ण होत नाहीत, मग अस्वस्थता येते,”

म्हणजे तुम्हाला बसमधुन न उतरता अमेरीकेत पोहचायचं आहे, इथंच तर आपल्या सगळ्यांचं घोडं पेंड खातं!
ही पॉझीटीव्ह थिकींग नाही, विशफुल थिंकींग आहे!
आधी थोडे पैसे जमवुन त्या बसमधुन बाहेर पड, पुण्या-मुंबईला ये,
मग काही वर्ष इथे जिद्दीने परीश्रम कर,
पैसे कमव, पैसे जमव,
एके दिवशी इंटरनॅशनल एअरपोर्ट पकडुन हव्या, त्या देशात मनसोक्त उड्डाण कर,

यासाठी काही महिने लागतील, किंवा काही वर्ष लागतील,

पण दिवसरात्र मनात घोळवलंस तर अमेरीकावारीचं स्वप्नं एक ना एक दिवशी पुर्ण जरुर होईल.

मनात मोठ्या स्वप्नांचं बीज पेरणं,

त्याला नियमित चांगल्या विचारांचं खतपाणी देणं,

आणि पैसे कमवण्यासाठी जीव तोडून मेहनत करणं,

हाच माझावाला ‘लॉ ऑफ अट्रॅक्शन’ आहे,

काही कृती न करता धो धो पैसे मिळवुन देणारा उपाय मला तरी अजुन सापडलेला नाही,

----------------------------------------------------------------------------------------------------------------
२. माणुस पैसा कमवत नसतो, सिस्टीम पैसा कमवुन देते. –

रोज तुम्ही नऊ ते सहा कामावर जाता,

किंवा व्यवसायात दहा ते दहा दुकानाचं शटर उघडुन लोकांना सर्व्हिस देता,

ह्याने तुमच्या मुलभुत गरजा पुर्ण होतील,

पण तुम्हाला गर्भश्रीमंत होवुन आयुष्याच्या प्रत्येक प्रांताची मनापासुन मजा लुटायची असेल, आणि ह्या जगात आगळं वेगळं व्यक्तिमत्व बनुन जगायचं असेल तर,

पैसे कमवण्यावर लक्ष देण्याऐवजी पैसे कमवुन देणार्‍या सिस्टीम उभा करण्यावर लक्ष द्या.

तुम्ही प्रत्यक्ष तिथे हजर नसलात तरी तुमच्याकडे पैशाचा ओघ सुरु असलाच पाहीजे,

त्यासाठी स्वतःला नियमित बचतीची सवय लावा,

पैशे पुरत नाहीत, खुप खर्च आहेत, असं काही सांगु नका,

संतुलित जीवनशैली ठेवा, अत्यावश्यक असेल, तिथंच खर्च करावा,

वायफळ एक रुपयासुद्धा नष्ट होवु देऊ नये,

माझं उत्पन्न महीना पाच हजार होतं, दहा हजार होतं, तेव्हाही मी नियमित बचत करायचो,

उलट तेव्हा तर बचतीची जास्त आवश्यकता असते,

ह्या बचतीच्या पैशांनी आर्थिक दृष्ट्या स्वतंत्र व्हा,

आणि कमीत कमी गुंतवणुकीतुन जास्तीत जास्त रेगुलर रिटर्न देणारी एक सिस्टीम उभी करा.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------
३. टारगेट ठरवा. –

- पुढच्या एका वर्षात तुम्हाला किती रुपये हवे आहेत?

- एक रक्कम लिहा. मनातल्या मनात एक आकडा फिक्स करा.

- आता दररोज न चुकता व्यायाम, ध्यान आणि पैसे मिळाल्याचे व्हिज्वलायजेशन करा.

- लगेच एक कोटी रुपये प्रत्यक्ष मिळणार नाहीत,

- पण अनेक दिवसांच्या सातत्यानंतर एक कोटी रुपये मिळवण्यासाठी काय करावं लागेल, ह्याच्या नवनवीन आयडीया आपोआप रोजच सुचु लागतील.

- मनात आलेल्या कल्पना तात्काळ कागदावर उतरवा,

- आराखडा बनवा.

- अधुनमधुन आळशीपणा होईल, मन चंचल असते, त्याचे एवढे मनावर घेऊ नका.

- पुन्हा पुन्हा मनाचा व्हॅक्युम स्वप्नांनी भारुन टाका.

- सकाळ संध्याकाळ स्वप्नं मनात घोळवा.

- तुमच्या प्रार्थनेत जर तीव्रता, आर्तता आणि प्रामाणिकपणा असेल,

- तुम्ही ज्यांना भेटता किंवा भेटलाही नाहीत अशा सर्व लोकांबद्द्ल तुमच्या मनात जर काठोकाठ ओथंबुन भरलेले प्रेम असेल, तर ब्रम्हांडाला तुमच्या साऱ्या मागण्या पुर्ण कराव्याच लागतील.

शुद्ध विचार आणि नियोजनबद्ध, शिस्तबद्ध जीवनशैली ह्यांच्या जोरावर पुर्ण होणार नाही,
इतकी ‘मोठी’ औकात तर कुठल्याही स्वप्नाची नाही.

आभार आणि शुभेच्छा!...

पेरावे ते उगवते.

 Be the reasons for someone smile today.

------------------------------------------
थेट पंकज कोटलवारच्या लेखणीतुन – पेरावे ते उगवते.”
------------------------------------------
“सर, या प्रेमाचा गैरफायदा घेतला जाईल असे मला वाटते, कारण चांगुलपणाला मुर्खता समजणारे खुप जण आपल्या आजुबाजुला असतात,”

“त्यांच्याशी कसे वागावे?”

काल मी ‘प्रेम करा’ अशा आशयाचा लेख पाठवला होता, तो लेख वाचुन आपल्या ग्रुपमधील एक सदस्य सहज आपल्या मनातील एक भाबडी शंका विचारुन गेला,

आणि जाता जाता मला आजच्या लेखासाठी एक विषय देऊन गेला.

“आपण चांगले वागुनही लोक आपल्यासोबत वाईट वागतात, मग मी त्याच्यासोबत चांगलं वागल्याचा फायदाच काय?” ह्या प्रश्णानं आपल्या सर्वांनाच कधीनाकधी सतावलं असेल, छळलं असेल.

“जे लोक कपटी असतात, दुष्ट आणि दुर्जन असतात, जे निरापराधांना त्रास देतात, ते भराभर प्रगती करतात, आणि जे वर्षानुवर्ष, इमानेइतबारे, प्रामाणिकपणे वागतात त्यांचं मात्र शोषण होतं,”

असं तुम्हालाही वाटतं का?

ह्या जगाला नियंत्रित करणारी एक अदभुत शक्ती आहे, प्रत्येकाला आपापल्या कर्मांचा हिशोब इथेच फेडावा लागतो, ह्या सत्याची प्रचिती तुम्ही सर्वांनी कधीनाकधी घेतलीच असेल,

‘पेरावं तेच उगवतं’ हा अनुभव देणारी एखादी घटना नक्की पाहिली असेल, अनुभवली असेल.
----------------------------------------------------------------------------------------------------
आज मी तुम्हाला अमेरीकेमध्ये १८९३ साली घडलेली एक सत्य घटना सांगतो.

‘बिलीव्ह इट ऑर नॉट’ ह्या अमेरीकन सिरीअल मध्ये ह्याच्यावर एक डॉक्युमेंट्री बनवण्यात आली आहे.

हेन्री नावाच्या एक तरुणाचे ज्युली नावाच्या एका मुलीसोबत प्रेमप्रकरण होते,
हेन्रीने ज्युलीला लग्नाचे वचन दिले होते, ज्युली हेन्रीवर जीवापाड प्रेम करत होती,
ज्युली प्रेग्नंट झाली, तेव्हा तिने हेन्रीला लग्न करण्यासाठी तगादा लावला, मात्र हेन्रीने तिला धोका दिला.
 एकदा ज्युली हेन्रीला भेटायला गेली, हेन्रीने तिला मारहाण केली आणि ‘तुझं तोंड मला दाखवु नकोस’ असा अपमान करुन तिला घराबाहेर काढले.
रडत रडत ज्युली आपल्या भावाकडे जाते, त्याला आपली कर्मकहाणी सांगते,
ज्युलीच्या भावाला आपल्या बहिणीचा अपमान जिव्हारी लागतो, सहन होत नाही,
ज्युलीचा भाऊ संतापतो,
रिव्हॉल्व्हर घेऊन तो हेन्रीला मारण्यासाठी निघतो, हेन्रीच्या घरी जाऊन तो हेन्रीला शोधत शोधत त्याच्या बागेत जातो,
हेन्री दिसताच रागाच्या भरात त्याच्यावर एक गोळी झाडतो.
गोळी हेन्रीला चाटुन जाते, हेन्रीच्या मागे असलेल्या झाडाच्या बुंध्यामध्ये ती बंदुकीची गोळी अडकुन बसते.
घाबरलेला हेन्री खाली पाडुन मेल्याचे नाटक करतो.
आपण हेन्रीला मारले, असा समज होवुन, आता ज्युलीच्या भावाला प्रचंड अपराधी वाटायला लागते.
आपण आपल्या बहिणीच्या प्रियकराला मारले, ही डाचणी आपल्या मनाला त्रास देत राहील, आयुष्यभर ही घटना आपल्याला छळत राहील, असे त्याला वाटते,
आपण केलेल्या हत्येचे प्रायश्चित म्हणुन ताबडतोब बंदुकीतील दुसरी गोळी ज्युलीचा भाऊ स्वतःवर झाडुन घेतो.
आपला भाऊ आणि प्रियकर दोघेही मेले, हे पाहुन तिथे पोहोचलेली ज्युलीही आत्महत्या करते,
पण कुटील हेन्री मेलेलाच नसतो, तो मेल्याचे नाटक करत पडलेला असतो.
आता मला कोण काय करणार अशा अविर्भावात तो जगायला लागतो.
पुढे काही दिवसांनी तो घराचे बांधकाम करण्यासाठी बागेतले ते मोठे झाड काढुन टाकायचे ठरवतो,
त्या झाडाला डायनामाईट असलेला बॉम्ब लावुन हेन्री सावधपणे, दुर सुरक्षित अंतरावर उभा राहतो,
पण नियती आपला न्याय पुर्ण करते,
शक्तीशाली बॉम्बचा स्फोट होताच, त्या झाडामध्ये रुतुन बसलेली गोळी पुन्हा एकदा हेन्रीच्या दिशेने जाते.
त्याच्या कपाळाच्या मधोमध जाऊन त्याला लागते,
हेन्रीला आपल्या पापाची शिक्षा मिळते.
‘पेरलं ते उगवतं’ हा कर्माचा सिद्धांत पुन्हा एकदा जगापुढे स्पष्टपणे अधोरेखित होतो, दृढ होतो.
----------------------------------------------------------------------------------------------------
१. जे द्याल तेच मिळेल. –

- असं समजा, हे ब्रम्हांड एका बॅंकेसारखंच काम करत आहे,
- बॅंकेत सहा टक्के व्याजानं पैसे वाढवुन मिळतात, पण केव्हा? आधी त्यासाठी आपलं मुद्द्ल बॅंकेला द्यावं लागतं तेव्हाच!
- बॅंकेत पैसे गुंतवताना आपण निःशंक असतो, की बॅंक माझे पैसे आणि ठरलेले व्याज देईल, मग कर्माच्या बॅंकेत चांगली कर्म जमा करताना आपण एवढे संशयी का बनतो?  
- जे आपण दुसर्‍याला देऊ, तेच शंभरपटीने आपल्याला मिळेल, हेच ह्या विश्वाचं उघड गुपित आहे.
- प्रेम ‘देणं’, सेवा करणं  ही जगातली सर्वात सुंदर कृती आहे!
- देणारे कधीही फायद्यात राहतात. जसं की आपल्या हाताने अत्तर दुसर्‍याला लावलं की नकळत त्याचा सुगंध दिवसभर आपल्याही हाताला दरवळतो.
- शुद्ध, पवित्र, निर्मळ मनानं ‘देणार्‍यांना’ भरभरुन मिळतंही,
- छानसं स्मितहास्य दिलं की समोरुनही मनःपुर्वक स्वागत होतं,
- आपलेपणाने मदतीचा हात दिला की आपोआप त्याबदल्यात ह्र्दयपुर्वक आभार आणि सकारात्मक स्पंदनेही मिळतात,
- आपलेपणा, जिव्हाळा आणि प्रेम दिलं की आपण दिलेलं सारंकाही कित्येक पटीने आपल्याकडेच वापस येतं,
- आकर्षणाच्या सिद्धांताचा हा सर्वात महत्वाचा भाग आहे,
- ज्या ज्या लोकांना हे जमलं, त्यांना लॉ ऑफ अट्रॅक्शन तात्काळ फळं देऊ लागतो.
- सतत एखाद्याचा द्वेष करुन, एखाद्याला पाण्यात बघुन, दिवसरात्र एखाद्याविषयी वाईट विचार करुन तुम्ही कधीही यशस्वी होवु शकत नाही.
- स्वतःच्या मनःशांतीकरीता तरी तुम्हाला आपल्या शत्रुंना माफ करावेच लागेल.

- त्यांच्याविषयीची कटुता दुर सारल्याशिवाय मनात गोडवा निर्माण कसा होईल?
- “सगळे माझेचं आहेत, मी सर्वांचा आहे.” हा भाव मनी बाळगणार्‍यांच्या प्रार्थना निसर्ग लवकरात लवकर पुर्ण करतं.
- संकुचित आणि कोत्या मनोवृत्तीच्या लोकांना कुठल्याही कामात यश मिळत नाही, हे तुम्हीही पाहतच असाल.


२. यशस्वी होण्यासाठीही प्रेम आणि सेवा आवश्यक आहे. –

- नौकरी करत असाल तर आपल्या संस्थेवर मनातुन प्रेम करा.
- शंभर टक्के समर्पण भाव देऊन सेवा करा.
- व्यापार, व्यवसाय करत असाल तुमच्या कस्टमरवर मनातुन प्रेम करा.
- स्वतःच्या नफ्याला धोक्यात न आणता त्याचा जास्तीत जास्त फायदा कसा होईल, ते बघा.
- आपोआपच तुमचंही आर्थिक उत्पन्न भरघोस पटींनी वाढायलाच पाहिजे.
- व्यवहार द्क्ष अवश्य रहा, कोणी आपला गैरफायदा घेईल, आपल्याला लुबाडेल इतके भोळे नक्कीच राहु नका.
- पण त्यासोबतच मनातल्या मनात का होईना, आपल्या ग्राहकाला, आपल्या अन्नदात्याला, देव मानुन, त्याला मनोभावे, योग्य ती सेवाही द्या.
- कोणत्याही संत, किंवा महापुरुषांचा जीवनाचा, त्यांच्या विचारांचा अभ्यास केला तर तुम्हाला त्यात एक साम्य दिसुन येईल. त्या सर्वांनी आपल्याला हा एकच संदेश दिलेला आहे, असे तुम्हाला दिसुन येईल.
- प्रेम देण्यामध्ये, आणि सेवा करण्यामध्येच जीवनाचं सार्थक आहे, त्यातच जीवनाचा खरा आनंद लपलेला आहे.
-----------------------------------------------------------------------------------------

३. देणाऱ्यालाच पुन्हा मिळतं. –

- एका गुरुंनी आपल्या आश्रमातल्या सर्व शिष्यांना त्यांचे शिक्षण पुर्ण झाले म्हणुन घरी जाताना प्रत्येकाला एकेक गाय आशिर्वाद म्हणुन दिली,

- सर्वजण गायी घेऊन निघुन गेले. एक शिष्य मात्र गाय घेऊन गेला नाही.

- तो म्हणाला, “गुरुजी, आपण इतके मौल्यवान शिक्षण दिलेत की मी तुमच्याकडुन अजुन काही घेऊ शकत नाही, गुरुदक्षिणा म्हणुन मलाच तुम्हाला काहीतरी द्यायला पाहीजे, तेव्हा मला दिलेली ही गाय तुम्ही आश्रमासाठीच राहु द्या.”

- त्याचे हे औदार्य पाहुन गुरुजी प्रसन्न झाले, म्हणाले, “आश्रमातल्या सार्‍या गायी मी तुला आशिर्वाद रुपाने देत आहे, आता तुला ह्या सांभाळाव्याच लागतील. हा माझा आदेश समज.”

- मग शिष्य म्हणाला, आपला असाच आदेश असेल तर मी आजीवन आश्रमातच राहुन ह्या सर्व गायी सांभाळीन.

- शिष्याचे ते शब्द ऐकुन गुरुच्या डोळ्यात पाणी आले आणि आश्रमाला नवा उत्तराधिकारी मिळाला.

आपल्या सर्वांचे हात ‘घेणारे’ नाही तर ‘देणारे’ बनो, ह्या एका सदभावनेसह,
आभार आणि मनःपुर्वक शुभेच्छा!
 
(जुलै २०१९ मध्ये झालेल्या व्हॉटसएप कोर्समधील एक लेख)

  १. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...