जनरल नॉलेज

 1)पिनकोड शोधा 

2)बँक IFSC कोड शोधा 

3)आजचे दिनविशेष 

4)वयाची सोपी गणना 

5)EMI कॅलक्यूलेटर

6)उपयुक्त संगणक माहिती 

7)बोलती पुस्तके 

 













〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰





युट्युब वर जाण्यासाठी 👉 क्लिक करा  

                ==============================================

⇨ राष्ट्रीय महामार्गांना क्रमांक कसे दिले जातात? जाणून घ्या...


भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणची स्थापना १९८८ साली करण्यात आली. देशातील राष्ट्रीय महामार्गांचा विकास करणे, देखभाल करणे आणि त्यांचे संरक्षण करण्याचे काम हे प्राधिकरण करतं.

भारतात आजवर ५,४७२,१४४ किमी रस्त्यांचे बांधकाम पूर्ण झाले आहे. ज्यामध्ये ९७,९११ किमी अंतराचे राष्ट्रीय महामार्ग आहेत. भारताचे रोड नेटवर्क हे जगातील दुसरे सर्वात मोठे रोड नेटवर्क आहे.

गुगल मॅप्स वापरताना आपल्याला अनेकदा AH, NH आणि SH यांसारखी सांकेतिक चिन्हे दिसतात. त्यापैकी National Highways (NH) म्हणजे राष्ट्रीय महामार्ग होय.

State Highways (SH) म्हणजे राज्य महामार्ग होय आणि Great Asian Highways (AH) म्हणजे आशियायी आंतरराष्ट्रीय महामार्ग होय. जो आशिया मधील देशांना जोडतो.

उत्तर-दक्षिण (जम्मू-काश्मीर ते कन्याकुमारी) या मुख्य रस्त्याचे एकूण अंतर आहे ४००० किमी! पूर्व पश्चिम (पोरबंदर ते सिलचर) या मुख्य रस्त्याचे एकूण अंतर आहे ३३०० किमी!

सुवर्ण चौकौन मार्ग (The Golden Quadrilateral -GQ) जो दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि चेन्नई या भारतातील मुख्य शहरांबरोबरच पुणे, बंगलोर आणि अहमदाबाद या शहरांना देखील जोडतो. या रस्त्याचे एकूण अंतर आहे ५८४६ किमी!

राष्ट्रीय महामार्गांना क्रमांक कसे दिले जातात?

सर्व उत्तर-दक्षिण दिशेच्या महामार्गांना सम संख्या क्रमांक दिला जातो.

उदा, NH 8: दिल्ली ते मुंबई.

आणि सर्व पूर्व-पश्चिम दिशेच्या महामार्गांना विषम संख्या क्रमांक दिला जातो.

उदा: NH 13: तवांग ते आसाम

सर्व प्रमुख राष्ट्रीय महामार्गांसाठी एक अंकी किंवा दोन अंकी संख्या वापरली जाते.

जसजसे आपण पूर्वेकडून पश्चिमेकडे जातो तसतसे उत्तर-दक्षिण राष्ट्रीय महामार्गांचे क्रमांक मोठे होत जातात. म्हणजेच मध्य भारतात किंवा पश्चिम भारतात असलेल्या राष्ट्रीय महामार्गाचा क्रमांक हा पूर्व भारतातील महामार्गाच्या क्रमांकापेक्षा मोठा असेल.

म्हणजे, समजा NH 4 हा पूर्व भारतामध्ये आहे, तर NH 34 हा पश्चिम भारतामध्ये असणार आणि हे दोन्ही रस्ते सम संख्या असल्यामुळे उत्तर-दक्षिण जाणारे असणार.

त्याचप्रकारे जसजसे आपण उत्तरेकडून दक्षिणेकडे जातो तसतसे पूर्व-पश्चिम राष्ट्रीय महामार्गांचे क्रमांक मोठे होत जातात. म्हणजेच मध्य भारतात किंवा दक्षिण भारतात असलेल्या राष्ट्रीय महामार्गाचा क्रमांक हा उत्तर भारतातील महामार्गाच्या क्रमांकापेक्षा मोठा असेल.

म्हणजे – समजा NH 7 हा उत्तर भारतामध्ये आहे , तर NH 83 हा दक्षिण भारतामध्ये असणार आणि हे दोन्ही रस्ते विषम संख्या असल्यामुळे पूर्व-पश्चिम जाणारे असणार.

तीन आकडी क्रमांक असणारे महामार्ग मुख्य महामार्गाचे उपमार्ग असतात.

उदा. १४४, २४४, ३४४ हे महामार्ग NH 44 चे उपमार्ग आहेत. या उपमार्गांना देण्यात आलेल्या क्रमांकामध्ये जर पहिला क्रमांक हा विषम असेल तर समजावं की तो रस्ता पूर्व-पश्चिम दिशेला स्थित आहे. जर पहिला क्रमांक हा सम संख्या असेल तर समजावं की रस्ता उत्तर-दक्षिण दिशेला स्थित आहे.

A,B,C,D हे तीन आकडी क्रमांक असणाऱ्या उप महामार्गांच्या नावाशी जोडले जातात. ज्यावरून उपमहामार्गांच्या भागांचे संकेत मिळतात. उदा. 966-A. 

तर हे आहे राष्ट्रीय महामार्गांना दिल्या जाणाऱ्या क्रमांकांच्या मागील माहित नसलेलं पण आता माहित झालेलं गुपित!


000

•हळदीचे पेव• -  जमिनीखालचे कोठार !

हळदीच्या पेवात गोणींमध्येत भरलेली हळदीची खांडे रिते केले जातात.हळद ही कीडनाशक म्हणून ओळखली जाते, परंतु खुद्द हळदीचे पीक अत्यंत नाजूक आहे. हळकुंड उघड्यावर ठेवल्‍यास त्‍यास किडीची लागण पहिला पाऊस पडताच होण्‍याची शक्‍यता बरीच असते. हळदीला ओलसरपणा लागला तर ती आतून काळपट-लाल पडते. अशा हळदीला लोखंडी हळद असे म्‍हणतात. त्या हळदीचा दर्जा कमी असतो. त्‍यामुळे पावसाळ्यात हळद साठवण्‍यासाठी जमिनीमध्‍ये कोठार खणण्‍यात येते. त्या कोठारास ‘पेव’ असे म्‍हटले जाते. शेतकर्‍यांचा अनुभव आणि निरीक्षण यांमधून पेवांचे तंत्र शतकापूर्वी विकसित झाले. पेव ही हळकुंड स्‍वरूपातील हळद साठवण्‍याची शेतक-यांची पारंपरिक पद्धत आहे.

हळद साठवण्यासाठी पेवे खोदली जातात. सांगलीतील हरिपूर, सांगलवाडी या परिसरात १९६५ सालापर्यंत सुमारे आठशे पेवे खोदण्यात आली होती. अन्य राज्यांतून हळदीची मोठी आवक १९६५ साली झाल्याने, त्यावेळी आणखी बाराशे नवीन पेवांची निर्मिती करण्यात आली होती. त्या दोन हजार पेवांत दोन लाख पोती हळदीची साठवणूक होई. त्यानंतर पेवांची संख्या व हळद साठवणुकीची क्षमता वाढत गेली. २००४ सालापर्यंत हरिपूरात चाळीस हजार पेवे होती. त्‍यात चाळीस लाख पोती हळद मावत असे.

हळदीचे पेव हरिपूर गावची माती वैशिष्‍ट्यपूर्ण आहे. पेव खोदत असताना तेथील जमिनीत पाचेक फुटांपर्यंत काळ्या मातीचा थर लागतो. त्‍याखाली तांबड्या रंगाची माती लागते. ती माती नदीतील गाळासारखी घट्ट असते. त्‍या मातीला ‘माण माती’ असे म्‍हणतात. पेव माण मातीत खोदले जाते. माण माती केवळ हरिपूर गावात आढळते. गावापासून दीड किलोमीटर अंतरावर जाऊन खोदले तरीही ती माती आढळत नाही. पेवाची खरी सुरूवात माण मातीच्‍या स्‍तरापासून होते. तेथे पेवाचे तोंड असते. पेवासाठी जमिनीत वीस ते तीस फुटांपर्यंत खोल व चौदा फूट रुंदीचा लंबगोलाकार आकाराचा खड्डा खोदला जातो. माण मातीचा घट्टपणा एवढा असतो, की त्‍यावर पहार किंवा कुदळ यांनी घाव घातला तरी केवळ टवका उडतो. या मातीच्‍या घट्टपणामुळे पेवात पाणी व हवा यांचा शिरकाव होत नाही. पेवात हळद हवाबंद राहते.

कामगार पेवामध्ये हळद भरत असतानापेव तळाच्‍या भागात रुंद असून तोंडाकडील बाजूस निमुळते होत गेलेले असते. पेवाचे तोंड साधारणतः दीड ते तीन फूट व्‍यासाचे असते. त्याचा आकार प्रयोगशाळेतील चंबूसारखा असतो. पेवाची आतील बाजू शेणामातीने सारवून घेतली जाते. त्‍यानंतर ते उन्‍हात सुकवले जाते. पेवात हळद भरण्‍यापूर्वी आतून ऊसाचा पाला आणि गवताच्‍या पेंड्यांचे थर लावले जातात. त्याला कट्टा बोरी लावणे असे म्हणतात. तसेच तळाला शेणाच्या सुक्‍या गोवर्‍या टाकल्‍या जातात. त्यामुळे पेवाच्‍या आतील हवामान उबदार राहण्‍यास मदत होते. त्‍यानंतर पेवात सुटी हळकुंडे ओतली जातात. पेव हळदीने भरले, की त्यावर पाला व गवताच्या पेंड्या टाकून पेवाचे निमुळते तोंड मातीने लिंपून बंद केले जाते. अथवा त्‍यावर फरशी किंवा एखादे झाकण ठेवले जाते. वरील पाचेक फुटांपर्यंतच्‍या खड्ड्यात पुन्‍हा काळी माती दाबली जाते. पेवाच्‍या तोंडावरील मातीचा हा थर सच्छिद्र असतो. वरून जमिन तापत असल्‍याने पेवात असलेली हवा हळूहळू गरम होते आणि पेवातून बाहेर पडू लागते. अशाप्रकारे बंद केलेल्‍या पेवातील प्राणवायू तीन-चार दिवसांत निघून जातो आणि पेव पूर्णपणे हवाबंद होते. जमिनीखालची गरम हवा बाहेर पडते, मात्र बाहेरची हवा जमिनीखाली जाऊ शकत नाही. प्राणवायू नसल्‍याने पेवाच्‍या आत जीवजंतू तयार होऊ शकत नाहीत. त्‍यामुळे पेवात ठेवलेली हळद पाच ते दहा वर्षांपर्यंत सुरक्षित राहू शकते. इतर ठिकाणी हळद टिकवण्‍यासाठी औषधांचे फवारे मारावे लागतात. मात्र हरिपूरला पेवांच्‍या आतील भागात कडेने कडुलिंबाचा पाला घातला की काम भागते. पेवातला कोरडेपणा आणि मातीची ऊब यामुळे हळदीला रंगगंध चढतो. त्याचा फायदा व्‍यापार्‍यांस होतो.

पेवात हळद भरणारे कामगार मोठ्या आकाराच्या पेवात सव्वादोनशे ते अडीचशे पोती अर्थात दोन-अडीच हजार किलो हळद मावते. तो आकडा पेवांच्‍या आकारानुसार कमी-जास्‍त होतो. हरिपूरमधील सर्वात मोठ्या पेवाची क्षमता चारशे पोत्‍यांची आहे. पेवामध्‍ये हळदीव्‍यतिरिक्‍त गहू, मका, ज्‍वारीसारखी धान्‍येही ठेवली जातात. जमिनीखाली मोठ्या संख्‍येने पेवे असली तरी पृष्‍ठभागावरून अवजड वाहनांची दळणवळण होऊ शकेल एवढा जमिनीचा पृष्‍ठभाग मजबूत असतो. म्‍हणून पेव बंद केल्‍यानंतर त्यावरून ट्रक फिरवला तरी पेवास किंवा आतील हळदीला धोका पोचत नाही.

पेव बंद केल्‍यानंतर पृष्‍ठभागावरील जमीन सपाट दिसते. बाहेरून पाहिले असता त्‍या जमिनीखाली पेव आहे हे कळतदेखील नाही. खुणेसाठी पेवाचे तोंड बंद करताना तेथे मालकाच्‍या नावाची लोखंडी पाटी लावली जाते. पाटीवर पेवाचा क्रमांक, पेवाच्‍या मालकाचे नाव, हळदीच्‍या मालकाचे नाव, हळदीचे प्रमाण, आणि त्‍यावर कर्ज काढलले असल्‍यास बँकेचे नाव लिहिलेले असते. बँकेचे नाव अशासाठी, की हळदीचे पेव बँकेकडे तारण म्‍हणून ठेवले जाऊ शकते. त्‍यामुळे जे पेव तारण म्‍हणून ठेवले आहे, त्‍याच्‍या पाटीवर बॅंकेचे नाव आढळते. पाटीवर लिहिलेली माहिती तीन चिठ्ठ्यांवर लिहिलेली असते. एक चिठ्ठी पेवाचे तोंड बंद करण्‍यापूर्वी झाकणाच्‍या आत ठेवली जाते, दुसरी चिठ्ठी हळदीच्‍या मालकाकडे राहते तर तिसरी चिठ्ठी बॅंकेकडे. पूर्वी शेतक-यांनी पेवांसाठी शेतीच्‍या जमिनी वापरल्‍या असल्‍याचे उल्‍लेख आहेत.

पेवे भाड्यानेही दिली जातात. पेवे भाड्याने देण्‍याचे प्रमाण मोठे आहे. पेवाचे भाडे पोत्‍यामागे तीस ते पनास रूपयांच्‍या दरम्‍यान आकारले जाते. पोत्‍यांचे भाडे हळदीच्‍या त्‍या त्‍या वेळच्‍या बाजार किमतीवर आधारलेले असते. पेवाचे भाडे चैत्र पाडवा ते चैत्र पाडवा असे वर्षाचे धरले जाते.

पेवातून हळद काढताना वा भरताना प्रथम एक-दोन दिवस पेवाचे तोंड उघडून ठेवले जाते. त्यामुळे आत साठलेली हळदीची दूषित हवा निघून जाते. प्राणवायूची कमतरता असलेल्‍या तेथील हवेमुळे माणूस गुदमरून मरण पावण्‍याची शक्‍यता असते. पेवातील दूषित हवा गेली आहे की नाही हे पाहण्यासाठी पेवात कंदील सोडला जातो. कंदील पेटता राहिला तर हमाल खाली उतरतो. मग हळद ओतली जाते. चारी बाजूंनी ऊसाचा पाला लावत पेव भरले जाते. एक पेव भरण्यास दोन हमालांना पाच-सहा तास लागतात. त्या उलट पेवातून हळद काढताना चेळे (छोटे पोते) भरून वर काढले जाते. त्यामुळे पेवातून हळद काढण्यास दोन-तीन तास लागतात. पेवात पूर्णपणे अंधार असल्‍याने कंदील लावूनच पेवातील काम करावे लागते.

हरिपूरमध्‍ये मोकळे प्‍लॉट दिसतात, परंतु तेथे केवळ पेवे खोदलेली असतात. हरिपूर-सांगली भागात शेतात, अंगणात हजारो पेवे आढळून येत असत. हरिपुरात सध्‍या नवीन पेव खोदण्‍यास जागा राहिलेली नाही. एकेका व्‍यक्‍तीच्‍या मालकीची हळदीची पन्‍नास-पंच्‍याहत्तर पेवे असतात. हळदीची गरज लागल्‍यावर पेव फोडले जाते. मग त्यातून पिवळाधम्मक रंग असलेली, घमघमाट सुटणारी हळकुंडे बाहेर पडतात. त्यावरूनच मराठीत ‘पेव फुटणे’ हा वाक्प्रचार आला.

हरिपूर गावात अडीच हजारांच्या- संख्येने पेव आढळतात. छायाचित्रात थोड्या अंतरावर असलेल्या दुस-या पेवात हळद भरली जात आहे कृष्णा नदीला २००५ साली आलेल्या महापुरामध्ये सांगलीच्या हळद बाजारपेठेचे आणि विशेषतः पेवांचे अतोनात नुकसान झाले. पेवांमध्‍ये पाणी जात नाही, मात्र त्या पुरामुळे पेवांच्‍या तोंडातून पाणी आत गेले आणि पेवे आतून ढासळली. हजारो पेवे कायमची खराब झाली. त्‍या पेवांच्‍या मालकांनी ती पेवे बुजवून, जमिनी सपाट करून कसायला घेतल्‍या. २००५च्‍या पुरापूर्वी हरिपूरात असलेल्या चाळीस हजार पेवांपैकी केवळ अडीच हजार पेवे शिल्‍लक राहिली आहेत. त्‍या महापुरात तब्बल दहा कोटी रुपयांची हळद पाण्याखाली गेली. त्‍या वेळी पेवांच्‍या स्‍वरूपातील हळद साठवण्‍याची शेतकर्‍यांची पारंपरिक व्‍यवस्‍था मोडकळीस आल्‍यासारखी झाली होती, कारण पुरानंतर व्‍यापारीही धास्‍तावले. त्‍यांनी आधुनिक तंत्रांचा वापर करून हळद साठवण्‍याचा प्रयत्‍न काही काळ केला. त्‍यामुळे पुरानंतर पेवांचा वापर कमी झाला होता. मात्र हळद साठवण्‍याच्‍या नवीन तंत्राला मेण्टेनन्‍स भरावा लागतो. तसेच हळदीवर औषध फवारणीचा खर्च होतो. त्‍या मानाने पेव बरेच स्‍वस्‍त आणि सुरक्षित वाटते. त्‍यामुळे पुन्‍हा पेवांचा वापर वाढत आहे. २०११ साली हळदीचा दर एकवीस हजार रूपये क्विंटलपर्यंत गेला. त्‍यामुळे २०१२ साली हळदीची लागवड वाढल्‍याचे निदर्शनास आले. त्‍या वर्षी पेवांचे भाडे वाढल्‍याले तरीही शेतकरी पेवांना पसंती देताना दिसले. २०१२च्‍या जून महिन्‍यापर्यंत हरिपूरातील अनेक पेवे फुल्‍ल झाली होती.

व्‍यापारी हळद विकत घेतात आणि पेवांमधून साठवतात. सीझनमध्‍ये भाव चढला, की त्‍याची विक्री करतात. विक्रीसाठी सगळी हळद बाहेर काढावीच लागते असे नाही. पेवातून हळदीचे किलोभर सॅंपल काढून ते बाजारात नेले जाते. त्‍या आधारे बाजारात हळदीचा लिलाव केला जातो. व्‍यापारी बाजारात हळदीचे व्‍यवहार करतात. पैशांची देवाणघेवाण होते. इकडे पेवांवर लागलेल्‍या केवळ चिठ्ठ्या बदलत राहतात. हळद पेवातच राहते! सोलापूर जिल्‍ह्यातील दारफळ या गावी 'धान्‍याची बँक' या नावाने धान्‍याच्‍या साठवणासाठी पेवांची व्‍यवस्‍था आढळते. 

0000

विज्ञानगाथा🌼💥
📙 संदेशाची भाषा 📙
********

 माणसाला बोलता येते. त्याला भाषेचा वापर करता येतो. स्वर-व्यंजनांना निश्चित उच्चारांतून विशिष्ट अर्थ देता येतो. यातूनच दोन माणसे एकमेकांशी संपर्क साधतात. पण त्याखेरीज एकंदरीत प्राणिजगत कसे चालते ?

 मानवी भाषा, मानवाचे लिहिणे वाचणे हे अर्थातच प्रगत आहे, यात शंकाच नाही. पण याखेरीज इतर प्राण्यांचे आपापसातील व्यवहार खरोखर चकित करणारे ठरतात. अगदी मधमाशांचे उदाहरण घ्या. एकमेकींना संदेश देण्याची त्यांची पद्धत नर्तनाने वा हवेतील गोलाकार उडण्यातून आहे. पण याखेरीज मधमाशांचे गुणगुणणे हेसुद्धा एकमेकींना संदेश देत असते. एखाद्या गिरणीचा भोंगा आपल्या कानाला अगदी नकोसा करून सोडतो. पण संशोधकांना या भोंग्यापासून जेमतेम दहा फूट अंतरावरील फूटभर लांबीच्या मधमाशांच्या पोळ्यातील मधमाशांचे व्यवहार अगदी भोंगा वाजत असतानाही नेहमीचेच आढळले आहेत. मग भोंगा चालू असतांना गुणगुणणे एकमेकींना कळत ते कसे ? अशीच काहीशी गोष्ट डॉल्फिनचा चित्कार व व्हेलच्या आवाजाची आहे. कित्येक किलोमीटर अंतरावरील आपल्या जोडीदाराचा आवाज ते सहज ऐकू शकतात. सजातीय प्राण्यांना आवाजातील संदेश कळतात, ओळखू येतात, हे ओघानेच आले. पण जंगलात काय चालते ?

 जंगलचा राजा जेव्हा पाण्यावर येतो व त्याची चाहूल लागते तेव्हा प्रथम पक्षी व नंतर माकडे सर्व प्राण्यांना त्याची चाहूल लावून देतातच देतात. या वेळचा माकडांचा चित्कार समस्त प्राणीजातीला धोका दाखवून देणारा ठरतो. तो त्या त्या प्राण्याला तात्काळ समजतो. असाच दुसरा प्रकार, पण उलट्या पद्धतीत पहावयाला मिळतो. खेड्यातील झाडावर माकडांची टोळी उतरते. त्यावेळी फक्त कालवा करतात ती कुत्री व घाबरतात माणसे. या झाडाच्या आसपासच्या गाईगुरे, म्हशी, मांजरे, झाडावरचे पोपट, चिमण्या, कावळे यांच्या वागण्यात काडीचाही फरक पडलेला दिसत नाही.

अनेक प्राणीतज्ज्ञ या बाबतीत एक महत्त्वाची गोष्ट नमूद करतात. प्रत्येक प्राण्याची हालचाल व डोळे यांतून तो सतर्क झाला आहे काय, घाबरला आहे काय, उत्तेजित झाला आहे काय हे कळते किंवा आक्रमणाची त्याची इच्छा लक्षात येते. याला माणूसही अपवाद कसा असेल बरे ? साप व नाग सहज हाताळणारे, वाघ सिंह यांना सर्कशीत खेळवणारे, मधमाशांचे नक्षीचे जाळे अंगावर तयार करणारे पाहिले की या म्हणण्याची पूर्ण प्रचिती येते. सहजसंवादाची साहचर्याची भाषाही असू शकते. याची खात्री पडते.

 घरातील मांजराशी व कुत्र्याशी कधी नजरेने बोलला आहात काय ? एकही खूण न करता, एकही शब्द न उच्चारता त्याला इकडे ये, इथे बस, इथून तु चालू लाग हे सांगितलेले सहज समजू शकते. म्हणजेच नजर व चेहरा हे सुद्धा अत्यंत महत्त्वाचे संदेश देण्याचे साधन आहे.

मानवाने भाषा न वापरता पाठवलेले संदेश म्हणजे मोर्स कोड. कडकट्टची भाषा वापरून जगभर संदेश पाठवण्याची पद्धत म्हणजे एक क्रांतीच होती.

 संदेशाची पृथ्वीवरील भाषा येतच नसेल, तर संवाद साधण्यासाठी एक ताम्रपट्टिका खूप विचारांती शास्त्रज्ञांनी तयार केली. 'पायोनियर' या अवकाशयानावर ही पट्टिका लावून ते अवकाशात पाठवले गेले आहे. कधी काळी सजीव सृष्टी या यानाला भेटली, तर संवाद व्हावा ही यामागची कल्पना.

 पट्टीका काय व्यक्त करते ? अगदी मोजक्या खुणांतून साऱ्या सूर्यमालिकेची व मानवाची माहिती यात समजते. डंबेलची आकृती हायड्रोजनचे अणू दाखवते. कारण सारेच विश्व त्याने भरलेले आहे. चौदा विश्वकिरण (Cosmic rays from pulsurs) ज्या दिशांनी सूर्याकडे येतात, त्या दिशा व रेडिओ पल्सेसची फ्रिक्वेन्सीही दाखविली जाते. ही दुसरी ठळक खूण. स्त्री व पुरुष ही तिसरी खूण व त्याच्या तळाशी ग्रहमालिका व त्यामधील पृथ्वीचे स्थान आणि त्या दिशेने जाण्याचा जवळचा मार्ग असा संदेश खुणांनी या पट्टिकेत दिलेला आहे.

 संदेश तर दिला आहे. यामागची कल्पना मात्र अशी की हा संदेश समजणारा विश्वातील सजीव प्राणी निदान आपल्याएवढा हुशार नक्कीच असला पाहिजे. विश्वामध्ये सजीव सृष्टी असली, तर हुशार कोण, ते कळायला फारसा वेळ लागणार नाही, अशीही एक भीती शास्त्रज्ञांना वाटतेच आहे.

'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून

000

==================================================

🎴🎴🎴🎴🎴🎴🎴🎴🎴🎴🎴
*सीबीआय आणि सीआयडी यांच्यातील फरक काय?*

*सीबीआय म्हणजे काय?*
*सीबीआय म्हणजे केंद्रीय अन्वेषण विभाग ही राष्ट्रीय पातळीवरील सर्वात मोठी तपास यंत्रणा आहे. केंद्र सरकारच्या अखत्यारितील ही संस्था देशभरात कुठेही घडलेल्या गुन्ह्याची चौकशी करु शकते. 1941 साली स्पेशल पोलीस इस्टॅब्लिशमेंट आणि 1963 ला सीबीआय म्हणून ओळख, संपूर्ण देश हे कार्यक्षेत्र आहे.*

*लाचलुचपत विभाग, आर्थिक गुन्हे, धोरणात्मक विभाग, विशेष गुन्हे शाखा, फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी, प्रशासकीय विभाग हे कार्यक्षेत्र. देशपातळीवरील हत्या, भ्रष्टाचार यांसारख्या गंभीर गुन्ह्यांची चौकशी. गंभीर गुन्ह्यांमध्ये सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट किंवा केंद्र सरकारकडून चौकशीचा आदेश दिला जातो.*

*राज्य सरकारच्या विनंतीवर राज्यातील प्रकरणांचीही चौकशी सीबीआयकडून केली जाऊ शकते. डीएसपीई म्हणजेच दिल्ली स्पेशल पोलीस इस्टॅब्लिशमेंट अॅक्ट 1946 अंतर्गत तपासाचे अधिकार*

*सीबीआय संचालकांची नियुक्ती लोकपाल कायद्यानुसार पंतप्रधान, सरन्यायाधीश किंवा त्यांनी नियुक्त केलेले सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती आणि विरोधी पक्ष नेते यांची समिती करते.*

*सीआयडी म्हणजे काय?*

*सीआयडी म्हणजेच क्राईम इन्वेस्टिगेशन डिपार्टमेंट. राज्य सरकारच्या अखत्यारितील पोलीस विभागातील ही यंत्रणा राज्यातील गुन्ह्यांचा तपास करते. 1902 साली ब्रिटीश सरकारच्या काळात स्थापना. संपूर्ण राज्य हे कार्यक्षेत्र आहे.*

*फिंगर प्रिंट ब्युरो, गुन्हे शाखा आणि सीआयडी, अँटी नार्कोटिक्स सेल, मानव तस्करीविरोधी विभाग या विभागात चौकशीचा अधिकार. पोलीस आयोगाच्या शिफारशीनुसार राज्यातील दंगल, हत्या यांसारख्या प्रकरणांची चौकशी केली जाते. राज्य सरकार किंवा हायकोर्ट चौकशीचा आदेश देऊ शकतं.*

*सीआयडीचे प्रमुख हे अतिरिक्त संचालक पदाचे पोलीस अधिकारी असतात.*
*स्त्रोत: आंतरजाल, 

====================================================

जाणून घ्या हा पिनकोड वाचायचा कसा?

आता तुम्ही सगळ्यांनी पिन कोड तर पाह्यलाच असेल. पाह्यला असेल काय, कित्येकदा लिहिला पण असेलच की हो. पण कधी विचार केलाय, ही भानगड कशी आणि का अस्तित्वात आली याचा? किंवा याच्या मागं नक्की कुणाचं सुपीक डोकं असेल याचा? ही आयडियाची कल्पना आहे  श्रीराम वेलणकर या मराठमोळ्या माणसाची. यांनीच पूर्ण भारताला पिनकोडची देणगी दिलीय बरं...

PIN म्हणजे पोस्टल इंडेक्स नंबर्. हे घडलं १९७२मध्ये. तोपर्यंत जनरल पोस्ट ऑफिसांत पत्रांवरचे पत्ते वाचून त्यांचि विभागवार विभागणि व्हायची. पण त्यात बऱ्याच अडचणी यायच्या. म्हणजे एकसारख्या नावाची माणसं, एकसारख्या नावाचि गावं, कधी  कुणाचं अक्षर नीट वाचता येण्यासारखं नसे, आणि हे सगळं कमी की काय म्हणून आपल्या देशभरात पत्ता लिहिण्यासाठी वापरलेल्या कितीतरी भाषा!!  चुकीचे पत्ते लिहिणं हा तर काही लोकांचा जन्मसिद्ध अधिकार आहेच. हे सगळं टाळण्यासाठी विभागवार पत्रांची विभागणी करण्यासाठी ही पिनकोड पद्धत अंमलात आणण्यात आली.
पोस्ट आणि टेलीग्राफ खात्यात नोकरीत असताना श्रीराम भिकाजी वेलणकर यांनी त्यावर उपाय म्हणून १५ ऑगस्ट १९७२ रोजी पिन कोड पद्धत अंमलात आणली.  त्यामुळेच श्रीराम भिकाजी वेलणकर यांना ‘पिन कोड’ प्रणालीचे जनक म्हणतात. या पिनकोडमुळे बरीच कामं सोपी झाली हे खरं. 

पिनकोडची रचना अशी आहे.
पूर्ण देश ९ झोन मध्ये विभागला गेला आहे. यातले ८ झोन हे भौगोलिक विभाग आहेत,
 तर एक मिलिट्रीसाठी वापरला जातो.

आता पाहूयात हा पिनकोड वाचायचा कसा..

यातले पहिले दोन अंक पोस्टऑफिस दर्शवतात. म्हणजे यातही हा तक्ता वापरता येईल
११ - दिल्ली
१२ व १३ - हरयाणा
१४  ते १६ - पंजाब्
१७ - हिमाचल प्रदेश्
१८ ते १९ जम्मू आणि काश्मिर्
२० ते २८ - उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड
३० ते ३४ - राजस्थान्
३६ ते ३९ - गुजरात्
४० ते ४४ - महाराष्ट्र
४५ ते ४९ मध्य प्रदेश आणि छत्तीसगड
५० ते ५३ - आंध्र प्रदेश
५६  ते ५९ - कर्नाटक
६० ते ६४ - तामिळनाडू
६७ ते ६९ - केरळ
७० ते ७४ - पश्चिम बंगाल्
५५ ते ७७ - ओरिसा
७८ - आसाम
७९ - पूर्वांचल
८० ते ८५ बिहार आणि झारखंड
९० ते ९९ - आर्मी पोस्टल सर्व्हिस्

म्हणजे सहा आकडी पिनकोडमधला पहिला अंक दाखवतो- विभाग, दुसरा अंक- उपविभाग, तिसरा अंक - सॉर्टींग जिल्हा आणि राहिलेले शेवटचे तीन अंक हा त्या विशिष्ट पोस्ट ऑफिसचा नंबर असतो. उदाहरणार्थ ४१३००१ हा सोलापूरचा पिनकोड आहे. यात पहिला अंक दाखवतो- पश्चिम विभाग, त्यानंतर १३ हा पश्चिम विभागातल्या महाराष्ट्रातला एक उपविभाग दाखवतो, ४१३ हा अंक सॉर्टिंग जिल्हा दर्शवतो, तर शेवटचे तीन अंक - ००१ हा सोलापूर जिल्ह्यातल्या विशिष्ट पोस्ट ऑफिसचा नंबर आहे.

आता पत्रं लिहिणं दुर्मिळ होत चाललं असलं तरी पिनकोड सिस्टिम कधीच इतिहासजमा होणार नाही. ही अशी पद्धत शोधणाऱ्या श्रीराम भिकाजी वेलणकरांना मानाचा मुजरा...!

श्रीराम भिकाजी वेलणकर हे संस्कृत पंडित होते व पाली भाषेचे गाढे अभ्यासकही होते.
आज दुर्देवाने या श्रीराम भिकाजी वेलणकर यांच्या बद्दल खूप कमी माहिती उपलब्ध आहे.

000
==============================================================

  *पॅनकार्डवरील नंबरचा अर्थ काय आहे?*

*ओळखपत्र म्हणून अनेक ठिकाणी पॅनकार्डचा वापर केला जातो. पैशांची मोठ्या प्रमाणात देवाणघेवाण, तसेच करसंबंधित गोष्टींसाठी पॅनकार्डचा वापर केला जातो. बँकेतूनही मोठी रक्कम काढायची असल्यास पॅनकार्ड नंबर अनिवार्य असतो. मात्र या १० अंकी पॅननंबरचा अर्थ तुम्हाला माहीत आहे का?*

*१० अंकी पॅननंबरला पाच भागांमध्ये विभागण्यात आलेय. ज्यातील पहिले पाच आणि शेवटचा अंक अक्षरे असतात तर उरलेले अंक संख्येत लिहिलेले असतात.*

*१. समजा एखाद्याचा पॅननंबर ADEPH6548C असा आहे. यातील पहिले तीन अंक हे AAA ते ZZZ यादरम्यानची तीन अक्षरे असतात.*
*२. चौथा अंक पॅनकार्डधारकाची स्थिती दर्शवतो. हा सर्वात महत्त्वाचा अंक असतो. अनेक पॅनकार्डवर चौथा नंबर म्हणून p हे अक्षर असते. याचा अर्थ पर्सन म्हणजेच व्यक्ती. याशिवाय चौथा नंबर म्हणून C,H,F,A,T,B,L,J आणि G ही अक्षरेही असतात.*

*या अक्षरांचा अर्थ खालीलप्रमाणे.*
*C – कंपनी*
*H – संयुक्त हिन्दू कुटुंब.*
*F – फर्म*
*A – व्यक्तींचा समूह*
*T – ट्रस्ट*
*B – एका व्यक्तीची संस्था*
*L – स्थानीय प्राधिकरण*
*J – कृत्रिम विधिक व्यक्ति*
*G – सरकार*

*३. पाचवा अंक हा पॅनकार्ड धारकाचे नाव अथवा आडनावातील पहिले अक्षर असते. उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीचे नाव अमित गोएल असे असेल तर पाचवा नंबर G हा असेल.*

*४. पाच अक्षरांनंतर पुढील चार अंक संख्येत असतात. हे चार अंक 0001 ते 9999 यादरम्यानच्या अनुक्रमे संख्या असतात.*

*५. पॅननंबरमधील शेवटचा अर्थात दहावा अंक एक अक्षऱ असते जे सुरुवातीच्या नऊ अंकाचा वापर करुन एका विशिष्ट फॉर्म्युल्याअंतर्गत निर्धारित केले जाते.*

======================================================
*पक्षाघात (पॅरालिसिस) हा आजार कसा होतो ?*

*'अंगावरून वारे गेले आहे,' असा शब्दप्रयोग तुम्ही अनेकदा ऐकलेला असेल. या प्रकारचा आजार म्हणजेच पक्षाघात होय. शरीराचा काही भाग अचानक लुळा पडणे, काम करेनासा होणे, त्याची ताकद जाणे अशी लक्षणे या आजारात दिसून येतात. त्याची कारणे लुळ्या पडलेल्या भागात नसून थेट मेंदूशी संबंधित आहेत.*

*मेंदूमध्ये रक्तपुरवठा करणाऱ्या वाहिन्यांमध्ये दोन प्रकारचे बिघाड संभवतात. एक म्हणजे रक्तदाब वाढला किंवा रक्तवाहिनीचे आवरण पातळ झाले व वयोमानामुळे झीज झाली, तर अशी वाहिनी फुटून रक्तस्राव सुरू होतो. मेंदू कवटीमध्ये बंद अवस्थेत असल्याने अशा रक्तस्रावामुळे आतील दाब वाढू लागतो. ज्या वाहिनीतून रक्तपुरवठा केला जात असतो, तोही बंद होतो. या साऱ्याचा एकत्रित परिणाम मेंदूच्या कार्यावर होऊ लागतो. कवटीच्या आतील दाब प्रमाणाबाहेर वाढला, तर शरीरातील महत्त्वाची कार्ये म्हणजेच श्वसन, हृदयक्रिया यांवर परिणाम होऊ शकतो. त्याचा शेवट मृत्यूत होतो. पण दाब वाढणे व रक्तस्राव थांबणे या दोन्ही गोष्टी एकमेकींवरच अवलंबून असल्याने अनेकदा रक्तस्राव थांबतो पण त्या भागातील मेंदूच्या पेशी मृत पावतात.*

*दुसऱ्या प्रकारात एखादी रक्तातील छोटी गुठळी अतिशय महत्त्वाच्या अशा रक्तवाहिनीत अडकून रक्तपुरवठा बंद होतो. काही वेळा कोलेस्ट्रोलसारख्या पदार्थाचे आवरण साचून मानेतील कॅरॉटीड रक्तवाहिन्या आकाराने लहान होत जातात. या आवरणाचे सुटलेले छोटे तुकडेही एखाद्या रक्त वाहिनीत अडथळा निर्माण करू शकतात. असे झाल्यास तेवढ्याच भागाचा रक्तपुरवठा बंद होऊन तेथील मज्जापेशी मृत पावतात.*

*मेंदूतील रक्तस्राव झालेल्या रुग्णास वाचवणे कठीण असते, पण गुठळी होऊन झालेल्या पक्षाघातात योग्य व तातडीच्या उपचारांचा फायदा होऊ शकतो. मेंदूचा उजव्या भागात इजा झाली, तर डावा भाग लुळा पडतो वा त्याच्या उलट होते. काही वेळा पक्षाघात अगदी सौम्य असेल, तर हाताचा काही भाग, बोटे यांतीलच शक्ती जाते. पक्षाघाताची तात्कालिक जाणीव करून देणारी गंभीर लक्षणे काही रुग्णांत दिसतात. ट्रान्झियंट इस्केमिक अॅटॅक किंवा काही क्षण मेंदूच्या रक्तपुरवठ्यात तात्पुरता अडथळा असे स्वरूप असल्याने त्या काही सेकंदांपुरता रुग्ण बेशुद्ध होणे, ताकद जाणे, तोल जाणे असे परिणाम होतात. सिटी स्कॅन, एमआरआय, सेरेब्रल एन्जिओग्राफी, क्ष-किरण तपासणी यातून व मानेच्या रक्तवाहिन्या कलर डाॅपलर पद्धतीत तपासून पक्षाघाताचे निदान व पूर्वतपासणी करून प्रतिबंध शक्य असतो. मधुमेह, रक्तदाब, भावना यांवर नियंत्रण ठेवणे या तीन गोष्टी पक्षाघात टाळण्यासाठी अत्यावश्यक ठरतात.*

*पक्षघाताचा रुग्ण पूर्ववत काम करायला लागणे या दिशेने उपचारांचे स्वरूप असते. मात्र रुग्ण कधीच पूर्णतः पूर्ववत होऊ शकत नाही. फिजिओथेरपीचे व्यायाम, स्नायू आखडू न देणे, यासाठी मसाज, रुग्णाचे मनोबल वाढवणे यांवर भर द्यावा लागतो. काही रुग्णांचे मलमूत्रविसर्जन व बोलणे या दोन्हीवरचे नियंत्रण गेलेले असते. अशांची रुग्णसेवा अत्यंत कठीण भाग असतो.*

*कंबरेखाली दोन्ही पायांतील ताकद जेव्हा एकाच वेळी जाते, तेव्हा सहसा मज्जारज्जूचा आजार व त्याला इजा वा बिघाड झालेला असतो. या प्रकारात मेंदूचा संबंध येत नाही. पाठीच्या मणक्यांना झालेली दुखापत त्याला कारणीभूत असते.*
*'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*
=====================================================

*रामायण एखादी काल्पनिक घटना नाही, सत्य सिद्ध करतात हे 21 तथ्य.* 

*माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव.*

*रामायण आणि भगवान श्रीराम या दोन्ही गोष्टींशी हिंदू लोकांची श्रद्धा निगडीत आहे. परंतु अनेकवेळा हे प्रश्न विचारले जातात की, भगवान श्रीरामाचा या पृथ्वीवर जन्म झाला होता का? रावण आणि हनुमान खरंच होते का? आम्ही यांना तुमच्यासमोर आणू शकत नाहीत परंतु यांचे अस्तित्व असल्याचा पुरावा तुमच्यासमोर ठेवू शकतो. भारत आणि श्रीलंकेमध्ये काही ठिकाण असे आहेत, जे रामायणात लिहिलेली प्रत्येक गोष्ट सत्य असल्याचे सिद्ध करतात.*

*1. कोब्रा हूड गुहा, श्रीलंका.*
*असे सांगितले जाते की, रावण देवी सीतेचे हरण करून जेव्हा लंकेत पोहोचला, तेव्हा सर्वात पहिले त्याने देवी सीतेला याच ठिकाणी ठेवले होते. या गुहेवरील नक्षीकाम या गोष्टीचा पुरावा देते.*
*2. हनुमान गढी.*
*हे तेच ठिकाण आहे, जेथे हनुमानाने भगवान श्रीराम यांची वाट पाहिली होती. रामायणात यासंदर्भात लिहिण्यात आले आहे. अयोध्यामध्ये आजही या ठिकाणी एक हनुमान मंदिर आहे.*
*3. बजरंगबली हनुमानाचे पद चिन्ह.*
*जेव्हा हनुमान देवी सीतेला शोधण्यासाठी समुद्र पार करून निघाले तेव्हा त्यांनी भव्य रूप धारण केले होते. या कारणामुळे श्रीलंकेत पोहोचल्यानंतर त्यांच्या पायाचे मोठमोठे ठसे तेथे उमटले, जे आजही त्याठिकाणी आहेत.*
*4. राम सेतू.*
*रामायण आणि भागण राम असण्याचा सर्वात मोठा पुरावा म्हणजे समुद्रावर श्रीलंकेपर्यंत जाण्यासाठी तयार करण्यात आलेल्या या सेतूविषयी रामायणात लिहिण्यात आले आहे. वर्तमानात या सेतूचा शोध लावण्यात आला आहे. हा सेतू दगडांनी बांधलेला असून हे दगड पाण्यावर तरंगतात.*
*5. पुरातत्व विभागानेसुद्धा केले आहे मान्य.*
*भगवान श्रीराम पृथ्वीतलावर होते ही गोष्ट पुरातत्व विभागानेसुद्धा मान्य केली आहे. पुरातत्व विभागानुसार 1,750,000 वर्षांपूर्वी श्रीलंकेत सर्वात पहिले मनुष्य वस्ती असल्याचे सांगण्यात येते आणि रामसेतूसुद्धा याच काळातील आहे.*
*6. पाण्यावर तरंगणारे दगड.*
*रामसेतू पुलावरील दगड पाण्यावर तरंगत होते. सुनामीनंतर रामेश्वरममध्ये त्या सेतुमधून निखळलेले काही दगड जमिनीवर आले होते. वैज्ञानिकांनी ते दगड पुन्हा पाण्यात टाकल्यानंतर दगड तरंगू लागले आणि तेथील सामान्य दगड पाण्यात टाकल्यानंतर ते बुडत होते.*
*7. द्रोणागिरी पर्वत.*
*युद्धामध्ये जेव्हा लक्ष्मण मेघनाथच्या अस्त्र प्रहाराने बेशुद्ध पडले तेव्हा त्यांना शुद्धीवर आणण्यासाठी हनुमानाने द्रोणागिरी पर्वतावरून संजीवनी बुटी आणली होती. आजही हा पर्वत या घटनेचा साक्षी आहे.*
*8. श्रीलंकेत हिमालयातील औषधी वनस्पती.*
*श्रीलंकेत ज्या ठिकाणी लक्ष्मणाला संजीवनी देण्यात आली होते, त्या ठिकाणी हिमालयातील दुर्लभ औषधी वनस्पतीचे अंश आढळून आले आहेत. संपूर्ण श्रीलंकामध्ये या वनस्पती नाहीत आणि हिमालयातील या वनस्पती श्रीलंकेत आढळून येणे हा या गोष्टीचा मोठा पुरावा आहे.*
*9. अशोक वाटिका.*
*देवी सीतेचे हरण केल्यानंतर रावणाने त्यांना अशोक वाटिकेत ठेवले होते, कारण सीता देवीने रावणाच्या महालात राहण्यास विरोध केला होता. आज त्या ठिकाणाला Hakgala Botanical Garden म्हणतात आणि ज्या ठिकाणी सीतेला ठेवण्यात आले होते त्या ठिकाणाला 'सीता एल्या’ म्हटले जाते.*
*10. लेपाक्षी मंदिर.*
*देवी सीतेचे हरण केल्यानंतर रावण त्यांना आकाश मार्गाने लंकेत घेऊन जाताना तेव्हा त्याला थांबवण्यासाठी जटायू पक्षी आला होता. रावणाने जटायूचा वध केला. आकाशातून जटायू यात ठिकाणी पडले होते. सध्या येथे लेपाक्षी नावाचे एक मंदिर आहे.*
*11. टस्क हत्ती.*
*रामायणातील एक अध्याय, सुंदरकांडमध्ये श्रीलंकेचे रक्षण करण्यासाठी एक विशालकाय हत्ती होता असे वर्णन आहे. या हत्तीला हनुमानाने यमसदनी पाठवले होते असे सांगण्यात येते. पुरातत्व विभागाला श्रीलंकेत अशाच हत्तीचे अवशेष मिळाले असून यांचा आकार सामान्य हत्तीपेक्षा खूप मोठा आहे.*
*12. कोंडा कट्टू गाला.*
*हनुमानाने लंका जाळल्यानंतर रावण घाबरला आणि हनुमानाने पुन्हा हल्ला करू नये यासाठी त्याने देवी सीतेला अशोक वाटीकेतून काढून कोंडा कट्टू गाला येथे ठेवले. पुरातत्व विभागाला येथे काही गुहा आढळून आल्या, ज्या रावणाच्या महालापर्यंत जातात.*
*13. रावणाचा महाल.*
*पुरातत्व विभागाला श्रीलंकेत रावणाचा एक महाल आढळून आला आहे. जो रामायण काळातील असल्याचे सांगितले जाते. या महालातून निघालेले गुप्त मार्ग शहराच्या मुख्य ठिकाणापर्यंत पोहोचतात.*
*14. कालानिया.*
*रावणाचा मृत्यू झाल्यानंतर विभीषणला लंकेचा राजा बनवण्यात आले होते. विभीषणाने आपला महाल कालनियामध्ये बदलला होता. जे कैलास नदीच्या काढावर आहे. पुरातत्त्व विभागाला त्या नदीच्या किना-यावर महालाचे काही अवशेष मिळाले आहेत.*
*15. लंका जळाल्याचे अवशेष.*
*रामायणानुसार हनुमानाने संपुर्ण लंका जाळली होती. त्या ठिकाणावरील जमीन आजही काळी झालेली आहे. त्याच्या आजुबाजूच्या जमीनीचा रंग जसाच्या तसाच आहे.*
*16 दिवूरमपोला, श्रीलंका.*
*रावणाकडून सोडवून आणल्यानंतर रामाने सितेला पवित्रता सिध्द करण्यासाठी अग्नी परिक्षा द्यायला लावली होती. ज्या झाडाखाली सितेने अग्नी परिक्षा दिली होती ते झाड आजही उपलब्ध आहे. लोक आज तेथे महत्त्वाचे निर्णय घेतात.*
*17. रामलिंगम*
*रामाने जेव्हा रावणाला मारले होते तेव्हा त्यांना या पापातून मुक्त व्यायचे होते. कारण त्यांनी एका ब्राह्मणाला मारले होते. यासाठी त्यांनी महादेवाची आराधना केली. तेव्हा महादेवाने त्यांना चार शिवलिंग बनवण्यास सांगितले. तेव्हा सीतेने एक लिंग बनवले ते वाळूचे होते. दोन शिवलिंग हनुमानने कैलासामधून आणलेले आहेत आणि रामाने स्वतःच्या हाताने एक शवलिंग बनवले. जे आजही या मंदिरात स्थित आहे. यामुळेच या ठिकाणाला रामलिंगम असे म्हणतात.*
*18. जानकी मंदिर*
*नेपाळच्या जनकपुर शहरात जानकी मंदिर आहे. सीतेच्या वडिलांचे नाव जनक होते. त्यांच्या नावावरुनच या शहराचे नाव जनकपुर ठेवले. सितेला जानकी म्हटले जात होते. यामुळे या मंदिराचे नाव जानकी असे पडले.*
*19. पंचवटी*
*नाशिक जवळ आजही पंचवटी तपोवन आहे. येथे राम, सीता आणि लक्ष्मण यांनी वास्तव्य केले होते. लक्ष्मणाने येथे सूर्पखाचे नाक कापले होते.*
*20. कोणेश्वरम मंदिर.*
*रावण महादेवाची आराधना करत होता त्यांना महादेवाच्या मंदिराची स्थापना केली होती. महादेवापेक्षा रावणाची मोठी मुर्ती असलेले हे जगातील एकमेव मंदिर आहे. म्हटले जाते की, रावणाचे दहा डोके होते आणि प्रत्येक डोक्याच्या मुकूटावर त्यांच्या दहा ठिकाणाचे अधिपत्य दर्शवलेले होते.*
*21. गरम पाण्याच्या विहिरी.*
*रावणाने कोणेश्वरम मंदिराजवळ गरम पाण्याच्या विहिरी बनवल्या होत्या, त्या आजही आहेत.*

======================================================


*नार्को टेस्ट म्हणजे काय आणि ती कशी केली जाते ?*

*आरोपींकडून सत्य जाणून घेण्यासाठी या टेस्टचा वापर केला जातो. याकरिता फॉरेन्सिक एक्स्पर्ट, तपास अधिकारी, डॉक्टर्स आणि मनोवैज्ञानिक आदींची मदत घेतली जाते. सर्वप्रथम आरोपीला काही औषधांचा डोज दिला जातो. यामुळे तो सुस्त अवस्थेत जातो. औषधांमुळे त्या व्यक्तीची तर्कशक्ती मंदावते. काही वेळेस आरोपी बेशुद्धही होतो. अशा स्थितीत सत्य जाणून घेणे कठीण होते.*

*नार्को टेस्ट ही अशी चाचणी असते, जी आरोपींकडून सत्य जाणून घेण्यासाठी केली जाते. ही चाचणी फॉरेन्सिक तज्ञ, तपास अधिकारी, डॉक्टर आणि मानसशास्त्रज्ञ इत्यादींच्या उपस्थितीत केली जाते. या चाचणीत आरोपीस काही औषधे दिली जातात, ज्यामुळे त्याचे जागृत मन सुस्त अवस्थेत जाते. त्यामुळे आरोपीच्या कानावर पडणाऱ्या गोष्टींविषयी विचार करुन उत्तर देण्याचे त्याचे कौशल्य कमी होते. काही प्रकरणांमध्ये आरोपी बेशुद्धावस्थेत जातो, तेव्हा सत्य जाणून घेता येत नाही. परंतु नार्को टेस्टमध्ये आरोपी प्रत्येक वेळी सत्य सांगतात आणि प्रकरण सोडवले जाईल असे होत नाही. बर्‍याच वेळा आरोपी अधिक हुशार असतात आणि चाचणी करणाऱ्या तपास टीमला देखील चकमा देतात.*

*नार्को टेस्ट करण्यापूर्वी घेण्यात येणारी काळजी*
*१) कोणत्याही आरोपीची नार्को टेस्ट करण्यापूर्वी त्याची शारीरिक तपासणी केली जाते. आरोपी व्यक्ती आजारी, वृद्ध किंवा शारीरक आणि मानसिकदृष्ट्या दुर्बल असल्यास ही चाचणी केली जात नाही.*
*२) नार्को टेस्टची औषधे आरोपीचे आरोग्य, वय आणि लिंगाच्या आधारे दिली जातात. बर्‍याच वेळा औषधाच्या जादा डोसमुळे ही चाचणी अपयशी ठरते, म्हणून ही चाचणीपूर्वी बरीच काळजी घ्यावी लागते.*
*३) बर्‍याच प्रकरणांमध्ये या चाचणीदरम्यान औषधाच्या जादा डोसमुळे आरोपी कोमामध्ये जाऊ शकतो किंवा त्याचा मृत्यू होऊ शकतो. त्यामुळे ही चाचणी बऱ्याच विचारपूर्वक केली जाते.*

*नार्को टेस्ट कशी केली जाते ?*

*नार्को टेस्टमध्ये आरोपीला “ट्रुथ ड्रग” नावाचे मनोवैज्ञानिक औषध किंवा “सोडियम पेंटोथल/सोडियम अमाईटल”चे इंजेक्शन दिले जाते. या औषधाचा परिणाम होताच आरोपी अशा अवस्थेत जातो, ज्यात तो पूर्णतः बेशुद्धही नसतो आणि पूर्णतः शुद्धीवरही नसतो. आरोपीची तार्किक क्षमता कमी होते. त्याची विचार करण्याची, समजून घेण्याची क्षमता कमी होते. त्यामुळे व्यक्ती जास्त किंवा गतीने बोलू शकत नाही. अशा अवस्थेत त्या आरोपीला संबंधित केसविषयी प्रश्न विचारले जातात. अशा अवस्थेत आरोपी सत्य उत्तरे देण्याची जास्त शक्यता असते.*

*सन २०१० मध्ये के. जी. बालाकृष्णन यांच्या अखत्यारीतील ३ सदस्यीय न्यायाधीशांच्या खंडपीठाने सांगितले की, नार्को टेस्ट किंवा पॉलिग्राफ टेस्ट घेताना संबंधित व्यक्तीची परवानगी असणे गरजेचे आहे. सीबीआय किंवा इतर संबंधित एजन्सीची परवानगी असल्याशिवाय नार्को टेस्ट करता येत नाही.*
===================================================

   मिले सुर मेरा तुम्हारा तो सुर बने हमारा।

*मिले सुर मेरा तुम्हारा तो सुर बने हमारा । सुर की नदियाँ हर दिशा से बहते सागर में मिलें। बादलों का रूप ले कर बरसे हल्के हल्के। मिले सुर मेरा तुम्हारा तो सुर बने हमारा।*

*(कश्मीरी)*
*चॉन्य् तरज़ तय म्यॉन्य् तरज़ इक-वट बनि यि सॉन्य् तरज़*

*(पंजाबी)*
*तेरा सुर मिले मेरे सुर दे नाल मिलके बणे एक नवा सुर ताल*

*(हिन्दी)*
*मिले सुर मेरा तुम्हारा तो सुर बने हमारा*

*(सिन्धी)*
*मुहिंजो सुर तुहिंजे साँ प्यारा मिले जडेंह गीत असाँजो मधुर तरानो बणे तडेंह*

*(उर्दू)*
*सुर का दरिया बह के सागर में मिले*

*(पंजाबी)*
*बदलाँ दा रूप लैके बरसन हौले हौले*

*(तमिल)*
*इसैन्दाल नम इरुवरिन सुरमुम नमदक्कुम तिसै वॆरु आनालुम आऴि सेर मुगिलाय मऴैयय पोऴिवदु पोल इसै नम इसै*

*(कन्नड)*
*नन्न ध्वनिगॆ निन्न ध्वनिय, सेरिदन्तॆ नम्म ध्वनिय*

*(तेलुगु)*
*ना स्वरमु नी स्वरमु संगम्ममै, मन स्वरंगा अवतरिंचे.*

*(मलयालम)*
*निंडॆ स्वरमुम् नींगळुडॆ स्वरमुम् धट्टुचॆयुम् नमुडॆय स्वरम.*

*(बांगला)*
*तोमार शुर मोदेर शुर सृष्टि करूर अइको शुर*

*(आसामी)*
*सृष्टि हो करून अइको तान.*

*(उड़िया)*
*तोमा मोरा स्वरेर मिलन सृष्टि करे चालबोचतन*

*(गुजराती)*
*मिले सुर जो थारो म्हारो बणे आपणो सुर निरालो*

*(मराठी)*
*माझ्या तुमच्या जुळता तारा मधुर सुरांच्या बरसती धारा.*

*(हिन्दी)*
*सुर की नदियाँ हर दिशा से बहते सागर में मिलें, बादलों का रूप ले कर बरसे हल्के हल्के, मिले सुर मेरा तुम्हारा तो सुर बने हमारा, मिले सुर मेरा तुम्हारा …, तो सुर बने हमारा।*

*गीतकार : पियूष पांडे.*
*संगीतकार : अशोक पत्की, डांबर बहादुर बुडाप्रिति, प्रताप के. पठाण.*
*गायक : पं. भीमसेन जोशी, लता मंगेशकर, कविता कृष्णमूर्ति, एम. बालकृष्णमूर्ति, सुचित्रा मित्रा.*
*( दूरदर्शनच्या लोकसेवा संचार परिषदेच्या वतीने १५ ऑगस्ट १९८८ रोजी देशातील १४ प्रमुख भाषेतील हे गीत राष्ट्राला अर्पण करण्यात आले. )*

***********************************************************

सीआरझेड २०११

*सीआरझेड २०११ या नव्या नियमावलीमुळे सागरी किनाऱ्याचे पर्यावरणाच्या दृष्टीने संवर्धन आणि संरक्षण होणार आहे. मुंबईतील कोळीबांधवांना या नव्या नियमावलीचा फायदा होणार असून जवळपास ३८ कोळीवाडे, ६२० मोडकळीस आलेल्या इमारती आणि १४६ झोपडपट्याचा पुनर्विकास शक्य होणार आहे. या इमारतीमध्ये राहणाऱ्या ४७००० कुटुंबांचे पुनर्वसन होईल असे म्हटले जाते. एकूण या नव्या नियमावलीत नेमके काय आहे, ते पाहू.*

*काही वर्षांपूर्वी त्सुनामीने भारतीय किनाऱ्यांना दिलेली धडक आणि त्यामुळे अंदमान, निकोबार, केरळ इ. किनाऱ्यावरील स्थानिकांची झालेली जीवितहानी आणि मालमत्तेचे नुकसान हि आपल्या सागरी किनाऱ्यांची आणि तिथे राहणाऱ्या लोकांची सुरक्षा यांचा पुनर्विचार करायला लावणारी घटना होती. आधुनिकीकरण आणि औद्यीगीकीरणाच्या रेट्यामुळे नैसर्गिक साधनसंपत्तीचा काळात कळत नकळत अमर्याद वापर झाला आहे. त्याचाच परिणाम म्हणून ठिकाणी जमिनीची तसेच सागरी किनाऱ्यांची धूप होण्याचे प्रमाण वाढले. पर्यावरणाचा होणारा, जागतिक तापमान बदल, चाक्रीवाद्लांचे वाढलेले धोके यांचा विचार करूनच २० वर्षांपूर्वी लागू आलेल्या तटवर्ती क्षेत्र नियमावलीत सुधारणा करण्यात आली.*

*किनारी क्षेत्राचा शाश्वत विकास करणे आणि सागरावरील स्थानिकांचे जीवनमान सुधारणे तसेच त्यांच्या संपत्तीची आणि जीविताची सुरक्षा हा मुळ नियमावलीच्या मागील उद्देश होता. परंतु भारताच्या भौगोलिक विविधतेचा विचार न करता भारतभरातील संपूर्ण ७५०० कि. मि. सागरी क्षेत्रासाठी प्रकारे व्यवस्थापन या नियमावलीत सुचविण्यात आले होते. यामुळे त्याची प्रत्यक्ष अंबलबजावणी करताना अनेक अडथळे आले आणि त्यावर मत करण्यासाठी गेल्या २० वर्षात या नियमावलीत २५ वेळा दुरुस्ती करण्यात आली. प्रत्येक ठिकाणच्या भौगोलिक, सामाजिक, आर्थिक परिस्थीतिचा विचार करून स्थानिकांना हितावह ठरेल अशा समवर्ती सागर तटीय नियमन क्षेत्र नियमावलीची अत्यंत आवश्यकता होती. यासाठी एम. एस. स्वामिनाथन यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली होती. या समितीच्या अहवालानुसार सागरी किनारे अति मानवी हस्तक्षेपामुळे कमालीचे असुरक्षित झाले आहेत. जागतिक हवामान बदलाच्या परिणामांमुळे या किनारयांना चक्रीवादळाचा भविष्यात सामना करावा लागेल. त्यामुळे सागरी किनारे तसेच स्थानिक रहिवाशी यांचे संवर्धन आणि संरक्षणाच्या उपाययोजना तातडीने आखणे गर्जेजे असल्याचे या अहवालात म्हटले आहे. या समितीने केलेल्या शिफारसी आणि किनाऱ्यालगत पारंपारिकपणे राहणाऱ्या लोकांचे अभिप्राय, त्यांनी केकेल्या सूचना यांचा सांगोपांग विचार करून केंद्र शासनाने ६ जानेवारी रोजी सागरतटीय व्यवस्थापन अधिसूचना, २०११ लागू केली आहे. गेले काही दिवस काही न खी कारणाने CRZ झोनचा उल्लेख वारंवार आपण ऐकला. त्यामुळे CRZ हे काहीतरी किचकट प्रकरण असले पाहिजे असा समज होण्याचीही शक्यता होती.*
 
*नव्या नियमावलीनुसार भौगोलिक परिस्थितीचा, सामाजिक आर्थिक प्रश्नांचा विचार करून उपाययोजना करण्यात आली असल्याने त्यांची अंबलबजावणी करणे अधिक सोपे आणि स्थानिकांच्या हिताचे होईल. याचा मुंबईला नेमका काय फायदा होईल असा प्रश्न अनेकांच्या मनात येतो आणि मुंबईबाबत CRZ चा उल्लेख वारंवार का केला जातो, हाही प्रश्न मनात डोकावतो याचे कारण म्हणजे मुंबईच्या एकूण ४३७ चौ. कि. मि. क्षेत्रापैकी २०२ चौ. कि. मी. चे क्षेत्र हे सागर किनाऱ्यालगतचे आहे. याचाच अर्थ असा कि एकूण क्षेत्रापैकी ४६.३ टक्के सागरतटीय क्षेत्र असल्याने मुंबईच्या दृष्टीने या नियमावलीचे विशेष महत्त्व आहे. मुंबई महानगराच्या समस्या या इतर सागरी किनाऱ्यापेक्षा वेगळ्या आहेत. इथे वर्षानुवर्ष किनाऱ्यालगत राहणाऱ्या कोळीबांधवांच्या घरांच्या समस्या, त्यांचे संरक्षण, मासेमारीसाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधांची उभारणी, त्यांचा पुनर्विकास या महत्त्वाच्या समस्या आहेत.*

*१९९१ च्या नियमावलीने किनाऱ्यालगतच्या क्षेत्रात कुठलेही बांधकाम करण्यास प्रतिबंध केला होता आणि हा नियम पारंपारिकपणे सागरी किनाऱ्यावर वस्ती असलेल्या कोळीवाड्यांसाठी जाचक ठरत होता. फक्त मुंबई पुरतेच बोलायचे तर ३८ कोळीवाडे, पडझड झालेल्या ६२० इमारती आणि १४६ झोपडपट्ट्या पुनर्विकासाकडे डोळे लावून बसल्या होत्या.*

*या इमारतीमध्ये राहणाऱ्या ४७००० कुटुंबांचे पुनर्वसन आता या नव्या नियमावलीनुसार शक्य झाले आहे. बृहन्मुंबई क्षेत्रात अनेक झोपडपट्ट्या आहेत. त्यांना पिण्याचे पाणी, वीज, सांडपाणी वहन यंत्रणा यासारख्या मुलभूत सुविधा पुरविणे गरजेचे आहे. याशिवाय वादळे, चक्रीवादळे आणि त्सुनामी सारख्या नैसर्गिक आपत्तींचा सर्वाधिक धोका किनाऱ्यालगत असणाऱ्या झोपडपट्ट्याना आहे. या झोपडपट्टीवासियांना सुरक्षित आणि चांगली निवासस्थाने पुरविण्यासाठी राज्य सरकार, म्हाडा, शिवशाही पुनर्वसन प्रकल्प, एमएमआरडीएयांच्या माध्यमातून झोपडपट्टी पुनर्विकास योजना राबवू शकते. परंतु या योजना सार्वजनिक-खाजगी भागीदारी आकृतीबंधानुसार राबवतांना राज्य सरकारची भागीदारी ५१ टक्क्यांपेक्षा कमी नसावी तसेच एफ. एस. आय देताना ज्यावेळी हे प्रकल्प मंजूर झाले तेव्हा नगर विकास खात्याने मंजूर केलेला एफ. एस. आय देण्यात यावा अशी सूचना नियमावलीत आहे. जुन्या मोस्क्लीस आलेल्या ६२० इमारतींचा पुनर्विकास अत्यंत पर्दार्शिपानेव्हावा तसेच या इमारतीतील रहिवाशांना योग्य न्याय मिळावा यादृष्टीने २०११ च्या नियमावलीत स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. या इमारतीचे मालक किंवा खाजगी विकासक पुर्विकास प्रकल्प हाती घेऊ शकतात.*

*मुंबईत ट्राफिक जॅम हे नेहमीचे चित्र झाले आहे. यावर उपाय म्हणून समुद्र किनाऱ्याभोवतीचे रस्ते, सागरी मार्ग यांची उभारणी करणे आवश्यक आहे. हे लक्षात घेऊन सिल्टवर भारतीच्या लाटांना कुठलाही अटकाव होणार नाही अशा प्रकाचे बांधकाम करण्यात मुभा देण्यात आली आहे. या नियमावलीत सागरी किनाऱ्याचा विकास करताना पर्यावरणातील प्रत्येक घटकांचा बारकाईने विचार केला आहे. किनाऱ्यांची होणारी धूप रोखण्यासाठी तिवरांचे संरक्षण माग्त्त्वाचे आहे. त्यादृष्टीने बांधकामाच्या वेळी नष्ट झालेल्या किंवा कापलेल्या तिवरांच्या दुप्पट फेर लागवड करणे बंधनकारक आहे. एवढेच नाही तर सर्व पानवनस्पतींच्या क्षेत्राची मोजणी करून हे क्षेत्र संरक्षित वन क्षेत्र म्हणून अधिसूचित केले जाईल. घनकचऱ्यावरील प्रक्रियेच्या प्रकल्पातून होणाऱ्या उत्सर्जनाचा परिणाम सागरी वनस्पती, जीव तसेच माशांवर प्रत्यक्ष- अप्रत्यक्षपणे होत असल्याने असे प्रकल्प यापुढे CRZ कक्षेत उभारता येणार नाहीत.*

*मुंबई मध्ये घरांची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे मोकळ्या जागा, क्रीडांगणे यांच्यावर आक्रमण होण्यास वेळ लागणार नाही. आताच या उंच उंच इमारतींच्या गर्दीत मुंबई चा श्वास गुदमरू लागला आहे. या शहराला मुक्त मोकळा श्वास मिळावा म्हणून खुल्या जागा, क्रीडांगणे, मोकळी मैदाने यांचा समावेश CRZ अर्थात 'ना-विकास' क्षेत्रात करण्यात येइल. या पायाभूत सुविधानाही १५ टक्के एफ.एस.आय देण्यात येईल. हे सारे मुंबई च्या बाबत झाले पण एकूणच या नियमावलीत सागरी किनाऱ्यांचे संवर्धन आणि संरक्षण करण्याच्या दृष्टीने बारीक सारीक तपशिलांचा विचार करण्यात आला आहे. किनारी नियमन क्षेत्रात नवा उद्योग उभारणे किंवा असलेल्या उद्योगांचा विस्तार करता येणार नाही, पण काही पायाभूत सुविधा आणि उद्योग समुद्र किनाऱ्यांवर उभारणे आवश्यक असते. अशा उद्योगांची आणि पायाभूत सुविधांची उभारणी करण्यास या नियमावलीत अनुमती देण्यात आली आहे. अशा प्रकारच्या सुविधांचे म्हणजे बंदरे, धक्के, गोदी यांची उभारणी, किनाऱ्यांची धूप होऊ नये यासाठी प्रतिबंधक योजना, लाटांचा जोर कमी करण्यासाठी उभारण्यात येणारे बंधारे, जलवाहिन्या, दीपगृह, जलवाहतूक सुरक्षा सुविधा, पोलिस चौकी यासाठी बांधकाम करता येईल. तसेच आण्विक उर्जा प्रकल्प, समुद्राच्या पाण्यापासून गोडे पाणी तयार करणारे प्रकल्प, नवी मुंबईच्या हरित क्षेत्र विमानतळाची उभारणी, मासे साठविणे, प्रक्रियांवर आधारित प्रकल्प उभारण्याची परवानगी या नियमावलीत देण्यात आली आहे.*

*सांडपाणी, घनकचरा किंवा दुषित पाण्याचा निचरा समुद्रात, खाडीमध्ये करता येणार नाही. सध्या अशा प्रकारचा निचरा होत असेल तर हि नियमावली लागू झाल्यापासून दोन वर्षाच्या आत थांबवावा लागेल. यासाठी राज्य सरकारने व केंद्रशासित प्रदेशांची प्रशासने कृती आराखडा तयार करतील आणि किनारी प्रदेशांचे तसेच पाण्याचे प्रदूषण रोखण्यासाठी कालबध्द कार्यक्रम तयार करून पुरेशी आर्थिक तरतूद अर्थसंकल्पात करतील. मानवी हस्तक्षेपामुळे समुद्र किनाऱ्यांची धूप होण्याचे प्रमाण वाढले आहे. या किनाऱ्यांची पाहणी पर्यावरण आणि वन मंत्रालयाची तज्ञ समिती करेल आणि त्यानंतर या किनाऱ्यांची अधिक धूप होणारे मध्यम धूप होणारे आणि स्थिर किंवा कमी धूप असणारे समुद्रकिनारे अशी वर्गवारी केली जाईल. तसेच किनारपट्टीचे हे वर्गीकरण किनारी क्षेत्र व्यवस्थापनाचा आराखडा तयार करताना लक्षात घेतले जाईल. व्यावसायिक किंवा रहिवाशी संकुल, हॉटेल, समुद्रात भराव टाकणे, करमणूक केंद्र उभारणे, वाळू उपसा यांना प्रतिबंध घालण्यात आला आहे. तसेच वाळूंच्या टेकड्या, ढिगारे किंवा नैसर्गिक रचना काही अपवाद वगळता बदलता येणारे नाहीत.*
*स्त्रोत: आंतरजाल.*

=======================================================



वेडात मराठे वीर दौडले सात

इतिहासात पावनखिंडीला जे महत्त्व आहे तेच नेसरीच्या खिंडीलाही आहे. सरसेनापती प्रतापराव गुजर आणि त्यांच्या सहा मावळ्यांच्या शौर्याने आणि बलिदानाने उजळून निघालेला तो दिवस म्हणजे २४ फेब्रुवारी १६७४.



"म्यानातूनि उसळे तरवारीची पात
वेडात मराठे वीर दौडले सात"

कवी कुसुमाग्रजांनी रचलेल्या या ओळी लता मंगेशकरांच्या आवाजात ऐकताना आपणांस स्फुरण चढल्याशिवाय राहात नाही. अंगावर शहारे आणणारा इतिहास कविवर्य कुसुमाग्रजांनी स्फूर्तीगीतातून जिकंत केला. छत्रपती शिवरायांच्या एका शब्दाखातर खरोखरच सात साहसी वीरांनी शत्रूकडे दौड घेऊन स्वराज्यासाठी बलिदान दिले. सेनापती प्रतापराव गुजर आणि सहा सरदारांनी शौर्य गाजवलेला तो दिवस होता २४ फेब्रुवारी १६७४.

भोसरे (ता. खटाव, जि. सातारा) या गावी जन्म घेतलेले स्वराज्याचे दुसरे सेनापती कुडतोजी गुजर. महाराजांच्या शब्दाखातर स्वराज्यात दाखल झाल्यानंतर राजांनी त्यांना किताब दिला प्रतापराव! राजे जेव्हा आग्र्यात अटकेत होते तेव्हा याच प्रतापराव गुजरांनी चार-पाच महिने स्वराज्याचा गाडा अतिशय व्यवस्थित चालविला. युवराज शंभूराजांना पंचहजारी मनसबदार म्हणून जेव्हा सहा महिने संभाजीनगरला राहावे लागले तेव्हा सोबत प्रतापराव होतेच. १६७० साली राजांच्या समवेत जाऊन सुरतेची बेसुरत करण्याचे कामही त्यांचेच. कोकणापासून विदर्भातील कारंज्यापर्यंत प्रतापरावांची तलवार चालली. म्हणूनच पुढे राजांनी राज्याभिषेकाची तयारी सुरू केली.

मराठी मुलुखावर आक्रमण करण्याकरिता शहाने आपला कर्नुलचा जहागिरदार बहलोलखानाची नियुक्ती केली. ३० हजारांची फौज घेऊन तो निघाला. खानाचा मुक्काम मिरजेच्या बाजूला कर्नाटक प्रांतातील उमराणी गावात पडला असता ४०८ कि.मी.चे अंतर अगदी कमी वेळात पार करत प्रतापरावांनी भल्या पहाटे तळ्याभोवती नाकेबंदी करून खानाची नाकेबंदी केली. कुठलाही प्रतिकार न करता बहलोलखान प्रतापरावाला शरण आला. आपण पुन्हा स्वराज्याच्या वाट्याला येणार नाही म्हणत अभयदान मागितले. तेव्हा प्रतापरावाच्या मनातील मराठा जागा झाला आणि त्यांनी मोठ्या मनाने बहलोलला माफ करत सोडून दिले. 

इकडे महाराज राज्याभिषेकाच्या तयारीत असताना शत्रूपासून सावध होते. मोगलांचा सुभेदार बहादुर खानाला गोडी गुलाबीची पत्रे पाठवून झुलवत ठेवले होते. अशावेळी हातात आलेला शत्रू परस्पर सोडून दिल्याने राजांची प्रतापरावांकर इतराजी झाली. खरमरीतपणे लिहिलेल्या पत्रात राजांनी लिहिले, ‘सला काय म्हणोन केला? बहलोल गर्दिस मिळवोन तोंड दाखविणे.’

पराक्रमी प्रतापरावांच्या मनावर याचा मोठा परिणाम झाला. अनंतराव मवाजीसह त्यांनी आदिलशाहीच्या प्रदेशात धुमाकूळ घालत अथनी, बाळापूर, संपगाक लुटून फस्त केले. महाराजांचा अंदाज खरा ठरला. खानाने आपला शब्द पाळला नाही. सर्जाखानासह तो पुन्हा स्वराज्याच्या दिशेने निघाला. इकडे राज्याभिषेकाचा मुहूर्त जवळ येत होता. राजे स्वतः आदिलशाही प्रांतात आक्रमण करून आदिलशहावर वचक बसवून परिस्थिती नियंत्रणात आणण्याच्या तयारीत असताना सोडून दिलेला बहलोलखान पुन्हा आडवा आल्याने राजांची नाराजी आणखी वाढली. त्यामुळे प्रतापरावांची बेचैनी आणखी वाढली. बहलोलखान स्वराज्यावर पुन्हा चालून येत असल्याचे पाहून त्यांना राग येणे स्वाभाविक होते.

बहलोल कोल्हापूरच्या बाजूने पन्हाळ्यावर आक्रमण करत स्वराज्याच्या दिशेने निघाला होता. प्रतापरावांना खानाची खबर लागली. खान या वेळी गडहिंग्लजच्या बाजूला नेसरी ऊर्फ सावंतवाडीच्या परिसरात ताकदेवाडी ते डेनेवाडी भागात सांबऱ्याच्या माळावर मुक्कामाला होता. आज लोक याला लष्करतळ म्हणून ओळखतात. जवळून घटप्रभा नदी वाहते. नेसरीच्या जवळ डोंगराची उंची २६३० फुटांपर्यंत असल्याने दऱ्याखोऱ्यामुळे हा भाग गनिमी काव्यासाठी योग्य असल्याची भावना प्रतापरावांची झाली असावी. प्रतापराव गुजरांनी बहलोलखानाच्या हालचालीची माहिती घेत गडहिंग्लजपासून जवळ ४ किलोमीटरवर भडगाव, सामानगड व हिरण्यकेशीच्या जवळ आपला मुक्काम हलविला तर खान आता चंदगड, गंधर्वगडापासून पुढे सरकत होता. प्रतापरावांचा राग अनावर झाला. राजांची इतराजी दूर करायची असेल तर खानाचा अफझल करण्याशिवाय दुसरा पर्याय दिसत नव्हता. प्रतापरावांचा हात समशेरीला गेला आणि ‘हर हर महादेव’ म्हणत त्यांनी मागचा-पुढचा विचार न करता घोड्याला टाच मारली. आपल्या सरदाराचा अवतार पाहून त्यांचे सहकारी विसाजी बल्लाळ, विठोजी शिंदे, विठ्ठल पिळदेव, दीपाजी राऊतराव, सिद्दी हिलाल, कृष्णाजी भास्कर त्यांच्यासोबत निघाले.

प्रतापराव गुजरांसह हे सहा वीर प्राण हातावर घेऊन १५००० फौजेचा मुकाबला करण्यासाठी निघाले. लढाई मोठी विषम होती. संख्येच्या बळावर दोन्ही पक्षांची बरोबरी व्हायचा प्रश्नच उरला नव्हता. नेसरीच्या सांबऱ्याच्या माळावर हर हर महादेवची गर्जना झाली. मराठ्यांचे सात वीर शत्रूवर तुटून पडले. एकच कापाकापी सुरू झाली. परिणाम काय होणार हे सांगायला ज्योतिषाची गरज नव्हती. जेधे शकाकलीनुसार माघ वद्य १४ (शिवरात्र) शके १५९५ म्हणजेच मंगळवार, दि. २४ फेब्रुवारी १६७४ रोजी प्रतापरावांसह या सातही वीरांना वीरगती प्राप्त झाली.

या सात साहसी वीरांच्या दुःखाची बातमी शिवरायांच्या कानावर पडली. राजांच्या दुःखाला पारावार राहिला नाही. प्रतापरावांनी एका शब्दाखातर एवढा आततायीपणा का केला? सर्वच इतिहासकारांनी एवढ्या कमी संख्याबळावर खानावर चालून जाण्याबाबत प्रतापरावांना जबाबदार धरले आहे.

 कुसुमाग्रजांनी प्रतापरावासह या वीरांवर कविता करताना म्हटले आहे,

दगडावर दिसतील अजुनि तेथल्या टाचा
ओढय़ात तरंगे अजुनि रंग रक्ताचा
क्षितिजावर उठतो अजुनि मेघ मातीचा
अद्याप विराणी कुणी वाऱ्यावर गात…
वेडात मराठे वीर दौडले सात।।

थोर इतिहासकार का. सी. बेंद्रेंनी मात्र याबाबत वेगळे मत मांडताना म्हटले आहे की, आततायीपणा करण्याइतपत सरनोबत प्रतापराव गुजर काही नवखे नव्हते. राजगडाच्या किल्लेदारीपासून आग्राभेट, सूरत स्वारी, साल्हेरची लढाई यामध्ये त्यांनी आपल्या गनिमी काव्याने शत्रूंना सळो की पळो करून सोडलेले होते. त्यामुळे कदाचित नेसरीच्या भौगोलिक परिस्थितीचा अंदाज असलेल्या प्रतापरावांची या वेळी काही तरी वेगळी अशी रणनीती असावी. एखाद्या आडवळी बाजूला शत्रूला गाठून त्यांना खिंडीत पकडावे, त्याच वेळी दुसऱ्या तुकडीने इतर बाजूने शत्रूवर हल्ला चढवावा असेही असू शकते. परंतु युद्धात मात्र जर आणि तरला काही किंमत नसते. इथं ‘जो जिता वही सिकंदर’ असतो. अनेकांना हे गाणे माहीत असेल मात्र त्याचा मथितार्थ कळणार नाही. प्रतापरावांशिवाय इतरांची नावेसुद्धा संशोधकांशिवाय सर्वसामान्य वाचकांना माहीत नसतात. सिद्दी हिलालसारख्या एका मुस्लिम सैनिकाने स्वराज्यासाठी आपले प्राण दिलेले आहेत. अशा सर्वसामान्य सैनिकांच्या बलिदानावरच स्वराज्याचा डोलारा उभा राहिला. सात वीरांच्या बलिदानापुढे बहलोलही नमला. त्याने आपला मार्ग बदलला. तो परत फिरल्याने जवळ येऊन ठेपलेला राज्याभिषेक पुढे निर्विघ्नपणे पार पडला. ६ जून १६७४ रोजी शिवाजीराजे छत्रपती झाले.

प्रतापराव गुजरांच्या बलिदानाने व्यथित झालेल्या शिवाजी महाराजांनी त्यांची बूज राखली. आपले धाकटे चिरंजीव युवराज राजारामाचा विवाह प्रतापरावांची कन्या जानकीबाईशी केला. पराक्रमी पित्याची ही कन्या दुसऱ्या पराक्रमी घराची सून झाली आणि ताराबाई नावाने त्यांनीही स्वराज्याची सेवा करताना मोगलांना नामोहरम केले.
 तेव्हा त्यांच्यावर रचलेली कविता तेवढीच स्फूर्तीदायक आहे.

दिल्ली झाली दीनवाणी,
दिल्लीचे गेले पाणी
ताराराणी भद्रकाली कोपली,
मोगल हो सांभाळा…

 प्रतापरावांसह सात वीरांची बूज राखत नेसरीकरांनी आपल्या गावात त्यांचे भव्य स्मारक उभे केले आहे. शेवटी इतिहासाचे वेड लागल्याशिवाय अशा वेडय़ा वीरांची कथा समजत नाही हेच खरे!


➖▪️➖▪️♦️▪️➖▪️➖



|| परिपूर्ण जलव्यवस्थापन ||
आज पासून सुमारे चारशे वर्षांच्या पूर्वीची गोष्ट आहे. मलिक अंबर नावाचा एक हबशी गुलाम होता . त्याला अहमदनगर मधील एका मुस्लीम सरदाराने आफ्रिकेतील गुलामांच्या बाजारात विकत घेतले. नंतर त्या गुलामाच्या अंगभूत गुणांच्या मुळे प्रभावित होऊन त्याने त्याची गुलामीतून मुक्तता केली आणि त्याला आपला सहकारी म्हणून वागवले. तो गुलाम सुद्धा युद्धात उत्कृष्ट कर्तबगारी दाखवत सरदार पदापरेंत चढला. पुढे त्याने औरंगझेबाच्या पदरी नोकरी पत्करली. त्यावेळी औरंगझेब मराठ्यांशी अटकोविटको च्या लढाई साठी महाराष्ट्रात उतरणार होता. त्याला इथे स्थायी स्वरुपाची राजधानी निर्माण करायची होती. त्याच्या सरदार मंडळीनी औरंगाबाद ची निवड केली. औरंगाबाद या गावाचे मूळ नाव खडकी. राजधानी वसवण्याची जबाबदारी मलिक अंबर च्या खांद्यावर येऊन पडली. त्याने ५२ पुरे आणि ५२ दरवाजे असणारे उत्कृष्ट शहर वसवले. शहर वसवताना नागरिकांना पुरेल अश्या पाण्याची सोय करणे भाग होते आणि औरंगाबादेतील खाम नदी त्या दृष्टीने त्या वेळी सुद्धा अपुरी होती.
गुलाम म्हणून आफ्रिकेतून भारतात येताना मलिक अंबर इराण मधून आला होता आणि इराण मधील क्यानोत हि जलव्यवस्थापन यंत्रणा त्याला माहित होती. त्याने त्याच पद्धतीचा येथे अवलंब करायचे ठरवले. इराण देशात सुद्धा पाण्याचे दुर्भिक्ष आहे. परंतु तरी सुद्धा तुम्हाला इराण मध्ये सर्वत्र उत्कृष्ट बागा, कारंजे यांची रेलचेल दिसेल. बऱ्यापैकी दुष्काळी आणि जवळ जवळ वाळवंट असणाऱ्या प्रदेशातील हा चमत्कार म्हणजे क्यानोत.
क्यानोत म्हणजे काय आणि ते कसे बनवले जातात ?
ज्यावेळी पावसाळ्यात पाउस पडतो त्यावेळी डोंगर रंगांच्या मध्ये एक जल साठवण विहीर तयार केली जाते. विहिरीची खोली ५०० फुट किंव्हा त्या पेक्षा अधिक सुद्धा असू शकते अर्थात जमिनीच्या प्रतीनुसार आणि पाण्याची लागणारी गरज यावर विहिरीची खोली ठरते.त्या विहिरीचे तोंड हे शंखाकृती ठेवले जाते ज्यामुळे सूर्यप्रकाश आत पोचू शकत नाही. कोणताही डोंगर अथवा पर्वतीय भागात नैसर्गिकरित्या उंचावर टेबल land तयार झालेली असते. जो डोंगर विहीर तयार करण्यासाठी निवडला जातो त्याच्या पुढे अजून उंच डोंगरांची रांग असल्याची खात्री केली जाते.. त्या डोंगर रांगेवरील पाणी चर खणून या विहिरीपरेंत पोचवले जाते. या पाण्याचे बाष्पीभवन होऊ नाही आणि पाण्यासह धूप झालेली माती विहिरीत येऊ नये म्हणून सभोवताली असणारी डोंगररांग झाडे लावून हिरवीगार केली जाते. झाडे आणि गवत जमिनीची धूप होऊ देत नाही आणि फक्त पाणीच विहिरीपरेंत वाहात येते. या पावसाच्या पाण्याने ती विहीर तुडुंब भरते. आता विहिरीचा परीघ अन खोली हि ज्या ठिकाणी पाणी पुरवठा करायचा आहे तेथील दैनंदिन गरज लक्षात घेऊन सुमारे दीड वर्ष ५०० दिवस सलग तितका पाणी पुरवठा होऊ शकेल या पद्धतीने बनवली जाते. या विहिरीत सुद्धा खाली काही भाग हा डेड स्टोक म्हणून असतो ज्यात वाहत आलेल्या पाण्यातील गाळ साठून राहतो आणि फक्त स्वच्ह पाणीच पुढे प्रवाहित होऊ शकते. आता डोंगरापासून खेद्यापरेंत एक सरळ रेषा लक्षात घेऊन प्रत्येकी २०० फुट ( ६० मीटर ) अंतरावर खोल खड्डे ( विहिरी पण कमी परिघाच्या ) तयार केले जातात. आता मुख्य विहीर आणि या छोट्या रांगेतील विहिरी एकमेकांना जोडण्यासाठी आत एक बीळ तयार केले जाते. त्या बिळाच्या वरच्या भागात आर्च म्हणजेच मातीच्या भाजून तयार केलेल्या कमानी बसवल्या जातात. या कमानी मातीचा दाब सहन करतात आणि पाण्यात माती मिसळू देत नाहीत. परंतु पृष्ठभाग मात्र मातीचाच असतो त्यामुळे या बिळातून सुद्धा जमिनीत पाणी झिरपत राहते आणि जमिनीखालील पाण्याचा स्तर सुद्धा राखला जातो. आता हि २०० फुटावर असणारी जी छोटी विहीर आहे तिच्या बरोबर खाली सुद्धा डेड स्टोक तयार करतात म्हणजे प्रत्येक ठिकाणी २०० फुट अंतरावर पाण्यातील गाळ साठला जातो आणि पुढे अधिकाधिक शुद्ध पाणी प्रवाहित होत राहते. आता हि यंत्रणा खेड्यापरेंत आली कि त्याचे मुख उघडले जाते. आता मुखाचे तोंड हे साधारण २४ तास पाणी वाहत राहील आणि एका दिवसाची गरज भागेल इतके मोठे असते त्यामुळे वर्षभर त्या खेड्याला पाणी पुरवठा होत राहतो. त्यामुळे तुम्ही खेडे वगळता इराण मध्ये फिरलं तर तुम्हाला वाळवंटच दिसणार पण खेड्यात मात्र मुबलक पाणी वापरासाठी आणि शेतीसाठी पण आणि इतकेच काय मस्त बागा आणि कारंजे सुद्धा. हि अफलातून पद्धत सुमारे ४०० -४५० वर्षापूर्वी सुरु झाली आणि त्या काळात बांधलेले क्यानोत अजून सुद्धा उत्तम काम करत आहेत. नवीन क्यानोत बनवण्याची इराण मध्ये गरज पडत नाही फक्त जे आहेत त्या क्यानोत ची देखभाल केली जाते. डोंगरातील पाणी सायफन च्या तत्वाने खेड्यात येते वर्षभर पुरते. वीज किंव्हा कशाची सुद्धा गरज नाही.

मलिक अंबर ने हेच तंत्रज्ञान वापरून औरंगाबाद जवळ असणाऱ्या जटवाडा च्या डोंगर रांगातून पाणी आणले अंतर सुमारे ३० किलोमीटर. आणि त्या पाण्याचा पहिला स्त्रोत बेगमपुरा येथे उघडला. त्या पाण्यावर चालणारी पाणचक्की हे एक पर्यटन स्थळ म्हणून औरंगाबाद ला गेलेल्या प्रत्येकाला माहित आहे. या प्रकल्पावर चीफ इंजिनियर ( त्या काळी ) थत्ते म्हणून गृहस्थ होते. त्यांनी त्यांच्या वाड्यात सुद्धा यातील एक लाईन ओढून घेतली. बेगमपुर्यात पाण्याने सतत भरला राहणारा थत्ते हौद सुद्धा तितकाच प्रसिद्ध. हि नहरे अंबरी एकेकाळी सुमारे ४० % औरंगाबाद ला पाणी पुरवत असे ( १९९० परेंत ) परंतु गेल्या काही वर्षात हिची काळजी न घेतल्याने पार वाट लागली आहे आणि मी मध्ये औरंगाबाद ला गेलो त्यावेळी थत्ते हौद कोरडा पडला होता. पाणचक्कीमध्ये तरी सध्या पाणी आहे. किती काल टिकेल माहित नाही. आपण न बांधलेल्या धरणांच्या साठी ७०००० कोटी खर्च करू शकतो पण या अभियांत्रिकी चमत्काराला जिवंत ठेवण्यासाठी आणि सतत पाणी मिळवण्यासाठी काही लाख रुपये दर वर्षी देखभाल दुरुस्तीला खर्च करू शकत नाही हे लज्जास्पद आहे. पैठण ते औरंगाबाद जलवाहिनी बनवली आहे तिच्यासाठी कोट्यावधी रुपये खर्च झाले. पाणी उपसा करून आणायला कोट्यावधी रुपयाची वीज लागते पण हे फुकट तंत्रज्ञान मात्र आपण वापरत नाहीत. ती जलवाहिनी वर्षातून कमीत कमी दोन वेळेला फुटते आणि आणि औरंगाबाद ला निर्जळी घडते क्यानोत ४०० वर्षांच्या पूर्वी बांधली आज सुद्धा फुकटात काम करते. पण अक्कल शून्य असणारा सिंचन विभाग आणि प्रेताच्या टाळूवरील लोणी चाटत जगणारे पुरातत्व खाते या अनमोल ठेव्याला नष्ट होताना पाहत बसले आहेत. दुर्दैवाने सामान्य माणूस तर निसर्गापासून कायमचा तुटला आहे त्याला या अनमोल ठेव्याची काहीच किंमत नाही.
या पद्धतीच्या यंत्रणा तुम्हाला भारतात सुद्धा इतर ठिकाणी बघायला मिळतील. तुळजापूर ला मंदिरात जाताना गोमुखातून पडणारे पाणी, राजापूर ची प्रकट होणारी आणि गायब होणारी गंगा. लोणार च्या खार्या पाण्याच्या सरोवराजवळील मंदिरातील सतत वाहणारी गोड्या पाण्याची धार. हेच तंत्रज्ञान तुम्हाला प्रत्येक लेणी मध्ये वापरलेले दिसेल. हेच तंत्रज्ञान तुम्हाला प्रत्येक किल्ल्यावर सुद्धा विहिरीच्या स्वरूपात वापरलेले दिसेल. त्याला टाके म्हणतात. वर्षभर फुकट मिळणारे पाणी. पाउस पडताना साठवून ठेवायचे. किती साधे आणि सोपे निसर्गपूरक तंत्रज्ञान.परंतु आजच्या काळात आपण प्रगत झालो आहोत. आपण डोंगर फोडतो.. जंगले उध्वस्त करतो आणि पावसाचे पाणी वाहून जाऊ देतो. नंतर आपण डोंगराळ भागाला नोवेंबर ते जून tanker ने पाणी पुरवठा करतो. पैसे खर्च झाले तरी चालतील पण ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांची करियर tanker ने पाणी पुरवठा होऊन घडणे अधिक महत्वाचे आहे. हा या लेखमालेचा पहिला लेख आहे. पुढील भागात अधिक विवेचन करेन.

क्यानोत म्हणजे काय हे समजावून सांगण्यासाठी मी या लेखासोबत काही फोटो टाकतो आहे त्यामुळे अधिक योग्य पद्धतीने लक्षात येईल. इराण मध्ये उन्हाळ्यात लोकांना बाहेर पडणे अशक्य होते. क्यानोत या यंत्रणेचा वापर करून इराण मध्ये त्यांनी खेड्यातील लोकांना दुपारी आराम करण्यासाठी नैसर्गिकरित्या थंड असणाऱ्या खोल्या सुद्धा तयार केलेल्या आहेत त्याचे फोटो सुद्धा या लेखासोबत देत आहोत. जरूर पहा.

Credits: Aurangabad News

0000


उंबरा 💠

उंबरा म्हणजे लाकडी दाराच्या चौकटीत खालच्या बाजूस बसविलेले जाड, रुंद आणि सपाट लाकूड. दाह शमन करणारा आणि दीर्घकाळ पाण्यात टिकून रहाणारा वृक्ष म्हणजे उंबराचा वृक्ष. 

म्हणूनच पूर्वीच्या काळात घराचा उंबरा हा उंबराच्या खोडापासून बनत असे. 

या वृक्षाच्या नावावरुनच दाराच्या चौकटीत बसवायच्या या लाकडाचं नाव उंबरा असे पडले असावे. 

उंबराचा वृक्ष हा कृतिका नक्षत्राचा आराध्यवृक्ष आहे आणि त्याच्या औदुंबर या नावाने त्याला शुभ असे धार्मिक अधिष्ठानही प्राप्त झालेले आहे.

घरात शिरताना शुभ वृक्षाच्या लाकडाला ओलांडून प्रवेश केल्यास घरातील उर्जा कायम सकारात्मक राहिल, या हेतूने उंबराच्या वृक्षाचा वापर होत असावा, असाही कयास करता येईल. 

काही लोक याच उंब-याला उंबरठा असेही म्हणतात. उंब-यापाशी उभं राहून आपण येणा-या व्यक्तीची वाट बघतो. उंबरा ओलांडून एखाद्या भिक्षेक-याच्या झोळीत भिक्षा टाकतो. 

नववधू घराच्या उंबरठ्यावर ठेवलेले माप लांघत घरात प्रवेशते. 

उंब-याला गृहित धरत आपण बरेचसे शुभ अशुभ संकेत मानतो. घरातल्या उंब-याच्या खूप सा-या भूमिका असल्या तरीही माझ्या मते उंबरा असते एक मर्यादा. 

उंबरा असते एक सीमारेषा. 
उंबरा म्हणजे आपल्याला भानावर आणणारी नेमकी गोष्ट. 

बाहेरुन घरात येणा-यांसाठी आपला इगो चपलांच्या सोबत बाहेर काढून ठेवायची जागा म्हणजे उंबरा. प्रवेशत असलेल्या घरातल्या चालीरीतींना मान देत आपण वागायचं आहे हे उंब-याची वेस ओलांडतानाच मनात बिंबवून यायचं असतं. आणि घरातून बाहेर पडत असताना त्या घराने आपल्यावर केलेले संस्कार बाहेर पडल्यावरही आपण विसरणार नाही, हे आपल्या लक्षात आणून देणारी जागा म्हणजे उंबरा. 

उंबरा म्हणजे आत्मभान जागृत ठेवणारं स्थान.

उंब-याबाहेर पडल्याशिवाय जग काय आहे हे कळत नाही हे म्हणतात ते अगदी खरं आहे. 

उंबरठे झिजवल्या शिवाय यश पदरात पडत नाही हे सुद्धा खरंच.

पण 

उंबरठे झिजवताना आपल्यावर आपल्या उंब-याने केलेले संस्कार लक्षात ठेवले तर निसरड्या जागांचा सामना करणं सोपं होत असतं. 

अजून एक गोष्ट इथे नमूद करायलच हवी. ती म्हणजे - उंब-याच्या बाहेर पडण्यासाठी फार मोठं धैर्य लागतं आणि बाहेरच्या जगात वावरण्यासाठी मर्यादेचं फार मोठं भान. हे भान जे कोणी जपतं त्याचं आयुष्यात नेहमीच सुंदर होत असतं.

0000


सध्या पाळीव प्राणी यामध्ये कुत्र्यांच्या विविध जातींची माहिती घेत आहोत.  चला तर मग मित्रांनो वेळ वाया न घालवता पाहुया आज कुठल्या कुठल्या कुत्र्यांच्या जातींची माहिती आहे ते.    

1.   जर्मन शेफर्ड.    जर्मन शेफर्ड कुत्र्याची एक बुद्धिमान जात आहे. त्यांना गुन्हेगारांना शोधून काढण्यासाठी आणि पकडण्यासाठी प्रशिक्षित केले जाते. जर जर्मन शेफर्ड हा कुत्रा वेळेवर थांबला नाही किंवा गुन्हेगार प्रतिकार करत राहिल्यास जर्मन शेफर्ड हा कायद्याचे उल्लंघन करून एका क्रूर मारेकऱ्याचे स्वरूप धारण करतो..      

2.    जर्मन बॉक्सर.     जर्मन बॉक्सर या जातीच्या कुत्र्यांना तुम्ही रिंग मास्टरसारखे प्रशिक्षण देऊन आपल्या पाहिजे तसे वागवू शकत नाही, कारण हा खूप शांत आणि आळसावलेल्या सारखा असतो. पण त्याचा आकार अस्वला एवढा मोठा असतो..      

3.    डॉबरमन.    डॉबरमन हा एखाद्या मित्रासारखा असतो. पण जर त्यांचा मालक संकटात असेल किंवा एखाद्या दुसऱ्या व्यक्तीने त्यांच्या मालकाला इजा पोहचवण्याचा प्रयत्न करत असेल, तर डॉबरमन आपले नैसर्गिक आक्रमण प्रदर्शित करतो..    

4.    डेलमॅटियन.    डेलमॅटियन ही अजून एक वेगळी कुत्र्याची जात आहे. डेलमॅटियनला प्रशिक्षण देणे खूप कठीण असते, कारण तो जन्मतःच बहिरा असतो.

त्यामुळे डेलमॅटियनवर नियंत्रण ठेवणे खूप कठीण असते. कधी-कधी तो आवाक्याच्या बाहेर होऊन आपल्या मालकावर देखील हल्ला चढवू शकतो..    

आपण वाचत आहात साहित्य उत्सव समूह.   यानंतर वाचूया आणखी काही कुत्र्यांच्या जातींविषयी.     

5.    सायबेरियन व्हायकी.   सायबेरियन व्हायकी हे आपल्या मालकासोबत मैत्रीपुर्वक राहतात. या जातीचे कुत्रे हे लांडग्यांसारखे दिसतात. या जातीच्या कुत्र्यांना पाहून कधी-कधी लोकांच्या मनामध्ये भीती देखील निर्माण होऊ शकते.

याच भीतीमुळे यांच्या मनामध्ये राग निर्माण होतो आणि ते हल्ला करण्याची शक्यता असते, असे बहुतेक कुत्र्यांच्या बाबतीत घडते, असे आपल्याला दिसून येते..    

6.   चाउ चाउ….    चाउ चाउ ही कुत्र्याची जात केसाळ आणि लहान आकाराची असते. त्याच्या मालकाला या कुत्र्याच्या समोर काही वाईट बोलल्यास किंवा त्याच्या मालकाच्या घरामध्ये मालकाच्या परवानगी न घेता गेल्यास हा हल्ला करण्याची शक्यता असते.

त्याच्या सुंदर आणि शांत दिसण्यावर जाऊन या भ्रमात राहू नका की, तो तुम्हाला काही करणार नाही. वेळ पडल्यास तो तुम्हाला मोठी दुखापत करू शकतो..      

7.    चीप्पिपराई.    चीप्पिपराई ही कुत्र्यांची प्रजाती तमिळ नाडू येथील मदुराईच्या चीप्पिपराई येथील या शाही घराण्यांची देण आहे. ही कुत्र्यांची प्रजाती शिकारी करिता वापरली जायची त्यानंतर त्यांना रॉयलटी आणि प्रतिष्ठेच प्रतिक मानल्या गेलं..     

8.   इंडियन परिया डॉग.    हा आपल्या देशाचा मूळ कुत्रा आहे. देशाच्या प्रत्येक भागात हा कुत्रा आढळायचा. ही कुत्र्याची प्रजाती जगातील सर्वात जुन्या प्रजातींपैकी एक आहे..     

चला मित्रांनो आज इथेच थांबू या भेटूया पुढील आठवड्यात.     दर्जेदार साहित्याचा व कलाकृतींचा आस्वाद घेण्यासाठी वाचत राहा ज्ञान आणि मनोरंजन यांचे अतूट नाते संस्कारदीप.     

धन्यवाद!

000

निदान आज तरी याला मडकं म्हणू नका


📖 (चला वाढवू वाचन संस्कृती)



📔 विशेष आभार : श्री.संतोष कोल्हे
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
   अक्षय्य तृतीयेची पूजा करायची म्हणून फडके हौदावर खरेदीला गेलो होतो. माझे साहित्यिक मित्रही खरेदीला आले होते. ते माझ्या कुंभार मित्राला म्हणाले मडकं दे. तो पटकन त्यांच्याकडे बघून म्हणाला आजच्या दिवस तरी मडकं म्हणू नका.

    खरेतर मलाही माहित नव्हतं त्याला नक्की काय म्हणतात. उत्सुकते पोटी मी त्याला विचारले मग काय म्हणतात याला. स्वर्गीय माता म्हणून लाल रंगाचे त्याला केळी व स्वर्गीय पिता म्हणून काळ्या रंगाचे त्याला करा म्हणतात. माझ्या मराठी शब्दकोषात दोन शब्द वाढले.

   मराठीत मातीच्या भांड्याला उपयुक्ततेनुसार व प्रसंगानुसार वेगवेगळ्या नांवांनी संबोधले जाते अशी माहिती झाली.

पाण्याचा... माठ
अंत्यसंस्काराला... मडकं
नवरात्रात... घट
वाजविण्यासाठी... घटम्
संक्रांतीला... सुगडं
दहिहंडीला... हंडी
दही लावायला... गाडगं
लक्ष्मीपूजनाचे... बोळकं
लग्न विधीत... अविघ्न कलश
आणि
अक्षय्य तृतीयेला... केळी व करा

खरच मराठी भाषा समृद्ध व श्रीमंत आहेच.

   मला मंगल प्रसंगी हातात धरता तो करा म्हणतात हे माहिती होते. पण हे अक्षय तृतीयेला असे म्हणतात माहिती नव्हते, तुम्हाला ?


00000


स.न.वि.वि.

सुरुवातीला स.न.वि.वि. 
असे लिहिल्यामुळे मी काही सांगतोय किंवा कशाबद्दल तरी आमंत्रण देतोय असे कदाचित वाटु शकेल.
पण अशी सुरुवात करुन लिहिण्याचा मोह आवरला गेला नाही. 

हल्ली लग्नपत्रिका, आमंत्रण पत्रिका यावरच असे लिहिलेले बघायला मिळते. एरवी असे शब्द लिहिले जात होते हे सुध्दा विसरायला झाले आहे.

उतारवयात स्मरणशक्ती कमी होते म्हणून काही गोष्टी विसरायला होतात. पण आता असे शब्द वाचण्यात आणि लिहिण्यात येत नसल्याने विसरायला झाले आहेत.

खरेच मोबाईल सारख्या सहज संभाषण करता येणाऱ्या वस्तू उपलब्ध झाल्यामुळे, नवनवीन शोधामुळे काही गोष्टी सोप्या झाल्या असल्या तरीही... पत्रलेखन मात्र जवळपास बंदच झाल्यामुळे पत्रात लिहिले जाणारे काही शब्द लुप्त झाल्यासारखे वाटतात. 

आज सहज अशा काही शब्दांची आठवण झाली.......!! 

•||• श्री •||• लिहून पत्राची सुरुवात.
श्री.रा.रा. श्रीमान राजमान्य राजश्री.
स.न.वि.वि. सप्रेम नमस्कार विनंती विशेष.
तिर्थरुप आई / बाबा.
शि.सा.न. शिर साष्टांग नमस्कार.
या सारखे शब्द वाचायलाच मिळेनासे झाले आहेत. 

कळविण्यास आनंद होतो की..... असे लिहून पत्राची सुरुवात झाली तर पुढे आनंदाची बातमी आहे म्हणून पत्र अक्षरशः अधिरतेने वाचले जायचे. (दोन वेळेस)

पत्राच्या शेवटी लिहिले जाणारे.......
कळावे, लोभ असावा.
आपला.
तुझाच.
आपला आज्ञाधारक.
मो.न.ल.अ.उ.आ‌. मोठ्यांना नमस्कार, लहानांना अनेक उत्तम आशिर्वाद छोट्यांना गोड पापा असे लिहून तान्हुल्यांची सुध्दा आवर्जून आठवण ठेवली जायची. यात गोड पापा असे वाचतांना सुध्दा खरेच लहानांचा गोडपापा घेतला जातोय असा भास व्हायचा.

हे आणि या सारखे शब्द शाईच्या पेन सारखेच झाकण (टोपण) लाऊन जवळपास कायमचे बंद झाले आहेत असे वाटते. 

त्यामुळेच असे आपलेपणा जपणारे शब्द पेन ने कागदावर उतरण्याचे थांबलेच नाहीत तर बंद झाले आहेत.

पत्र लिहून संपविताना एखादी गोष्ट आठवली तर...
ता.क. म्हणजे ताजा कलम असे लिहून उरलेल्या जागेत ती मावेल अशा अक्षरात लिहीली जायची. त्यात सुध्दा गंमत वाटायची.

कदाचित शाईमुळेच त्या शब्दात आपलेपणाचा ओलावा येत असावा. नंतर बॅाल पॅाईंट पेन मुळे तो ओलावा कमी होत गेल्याचे जाणवले. आतातर मोबाईल वरच टाईप केल्याने ओलावा सुध्दा काही वेळा कृत्रिम वाटायला लागतो.

खरेच  शाईने लिहिलेल्या अशा शब्दात एक आपलेपणाचा गोडवा होता आणि आहे.

पत्राची सुरुवात यापैकी कशानेही झाली तरीही ते सुद्धा वाचलेच जायचे. आजच्या ई मेल, व्हॅाटसअप, फेसबुक च्या जमान्यात या शब्दांची मजा हरवली आहे. 

पत्रांच्या ऐवजी आता ई-मेल येतात. यात सुध्दा, Dear, Sir/Madam, Respected Sir/Madam अशी सुरुवात आणि Regards, Yours असे लिहून शेवट होतो. यात आपलेपणा जाणवतच नाही. कार्यालयीन आणि कोरडे वाटतात हे शब्द. त्यात नात्यातला ओलावा नाहीच. Yours faithfully यापैकी फेथफुली वर तर मला फुलीच (X) माराविशी वाटते. 

यातही स.न.वि.वि. सारखेच नुसतेच GM, GN असे लिहिण्याची सवय आहे. पण सुप्रभात, शुभ रात्री, शुभ रजनी ची मजा GM (गम) GN (गन) मध्ये नाही.

आजकाल फोनवरच बोलणे (त्यातही काही वेळा व्हिडिओ कॅाल) होत असल्याने साष्टांग नमस्कार, आशिर्वाद, गोड पापा अशा शब्दांच्या ऐवजी मग काय? कसे काय ? बाकी सगळे ठिक आहेत ना ? असे बाकी (चे) विचारुनच नात्यांची शिल्लक (बाकी) विचारली जाते, किंवा पाहिली जाते.

पत्र आले की आनंद व्हायचाच पण मोठे पत्र (अंतर्देशीय) आले की ते व्यवस्थित उघडुन (खरेतर फोडून) रविवारच्या पुरवणी सारखे त्याचे वाचन व्हायचे. पण आता हे सगळे हरवले आहे असे वाटते. 

कळावे.......
🙏 आपला 🙏🏻


0000

'पुरस्काराची शान वाढवणारे पद्मश्री!'

सामान्य जनतेतील 'असामान्य' व्यक्तींना अचूक हेरुन त्यांचा यथोचित  सन्मान करण्याची परंपरा 2021 च्या पद्म पुरस्कारांनी अबाधित ठेवली आहे.  'पद्मश्री' पुरस्कारानं यावर्षी सन्मानित करण्यात आलेल्या काही 'रियल लाईफ हीरोंची' ही संक्षिप्त ओळखः 

1. पप्पाम्मलः  या आज्जींचं वय आहे फक्त 105.. कोईमतूर मधे राहतात. पन्नास वर्षांपूर्वी त्यांची आजी वारल्यावर किराणा मालाचं एक दुकान चालवायची जबाबदारी पप्पाम्मल वर आली. पण त्यांना आवड शेतीची. दुकानातील उत्पन्नातून थोडे थोडे पैसे बाजूला काढून त्यांनी दहा एकर शेती विकत घेतली व अनेक वर्षं एकटीनं राबून ती सांभाळली. निरनिराळे प्रयोग केले. कष्ट झेपत नाहीत म्हणून 80व्या वर्षी काही जमीन विकली. आज वयाच्या 105व्या वर्षी अडीच एकराचं 'अॉर्गेनिक फार्म' आज्जी चालवतात. दररोज दोनदा शेतात जातात. 

2. मेमे छोंजोरः वय 79. निवास लडाख मधल्या अंतर्गत भागात. 'कार्ग्याक' हे अतीव दुर्गम गाव 'रमझाक' या जम्मू भागातल्या गावाला जोडण्यासाठी सलग तीन वर्षं खपून या माणसानं एकट्यानं 38 किलोमीटरचा रस्ता तयार केला. तृतीय श्रेणी सरकारी नोकर म्हणून निवृत्त झालेल्या या गृहस्थानं स्वतःची सारी कमाई (57 लाख) यासाठी खर्च केली. स्वतःचं घरही विकलं. एक जेसीबी व 5 गाढवांच्या सहाय्यानं त्यानं हा चमत्कार केला. 

3. नंदा पृस्टीः वय सुमारे 90. गेली 70 वर्षे ओडिसातील 'कनित्रा' नामक खेड्यात विद्यार्थांना मोफत शिकवतात. गावातील चार पिढ्यांना त्यांनी शिकवलं आहे. आजही दररोज सकाळी 7.30 आणि दु. 4.00 वा. 'नंदा' सरांचे वर्ग चालू असतात. गावातली मुलं अन्य शाळांत शिकत असली तरी नंदा सरांच्या वर्गात आवर्जून हजेरी लावतात. 

4.नानाद्रो माराकः मेघालय.. वय 65!  यांच्या 5 हेक्टरच्या शेतात 'ब्लॕक गोल्ड'ची अर्थात 'काळ्या मिरी'ची 3400 झाडं आहेत. त्यांनी ही झाडं अशा पध्दतीनं  वाढवली आहेत की सामान्य सरासरी उत्पादनाच्या 'तिप्पट उत्पादन' ही झाडं देतात. राज्यातील शेतकऱ्यांनी यापासून प्रेरणा घेऊन आपलं  उत्पन्न वाढवावं म्हणून 'माराक' यांना पद्मश्री  पुरस्कार देण्यात आला आहे. 

5. सुजीत चटोपाध्यायः वय 77. औसग्राम (प.बंगाल)!  केवळ दोन रुपये 'वार्षिक फी' घेऊन, गेली 17 वर्षं हा माणूस 'फकीर पाठशाला' चालवत आहे. इथे, आठवी ते टी.वाय्. पर्यंतच्या  मुलांना 'समाजशास्त्राचे' विषय बंगालीतून शिकवले जातात. सध्या या खेड्यातल्या प्रशालेत 350 विद्यार्थी शिकत आहेत. 

6. राधे देवीः मणीपूर, वय 80+. 'पोटलोई' हा मणीपुरी विवाहात वधूने घालायचा पारंपरिक पोशाख! यात कमरेला नेसायचं वस्त्र 'पिंपाच्या' आकाराचं असतं. हे वस्त्र शिवणं अतिशय किचकट व कष्टाचं काम! ही लुप्त होत चाललेली कला 'राधे देवीने' गेली साठ वर्षं जतन केली आहे. आजही, या वयात केवळ पाच दिवसात ती एक 'पोटलोई' शिवते. या गोलाकार झग्याची किंमत दहा ते पंधरा हजार असते. 

7. शाम पलीवालः राजस्थान!  2006 मधे यांच्या मुलीचं दुःखद निधन झालं. तेव्हापासून गावात 'मुलीचा जन्म' झाला की 111 रोपं लावण्याचा उपक्रम या माणसानं चालू केला. गेली पंधरा वर्षं अव्याहतपणे तो चालू आहे. दरवर्षी सुमारे साठ मुली या खेड्यात जन्माला येतात. या उपक्रमामुळे गाव हिरवंगार झालं आहे. 'पालिवाल' यांनी गावात छोटी छोटी तळीही बांधली आहेत. त्यामुळे दुष्काळ नाहीसा झाला आहे. 'वॉटर टेबल' वाढलं आहे.  आता ग्रामपंचायतही नवागत मुलीच्या नावाने बँकेत फिक्स्ड डिपॉझीट ठेवत आहे.  

यंदाच्या 102 पद्मश्रींपैकी काही प्रेरणादायी व्यक्तिमत्वांची ही झलक! उर्वरित यादीत आणखीही समकक्ष व्यक्ती सापडतील. अशा उत्तुंग व्यक्तींच्या सन्मानानं 'पुरस्काराची उंची' खचितच वाढते.

(धनंजय कुरणे)

00


डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम

संस्कारदीपवर विज्ञान वार्ता...

पूर्ण नाव :  डॉ. अबुल पाकीर जैनुलाब्दीन अब्दुल कलाम (डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम)

जन्म  : १५ ऑक्टोबर १९३१

जन्म स्थान  : धनुषकोडी, रामेश्वरम, तमिळनाडु, भारत

राष्ट्रीयत्व :  भारतीय

व्यवसाय  : इंजीनियर, वैज्ञानिक, लेखक, प्रोफेसर, राजनीतिज्ञ


मृत्यू  : २७ जुलै २०१५ , शिलॉग, मेघालय, भारत

बालपण

डॉ. अबुल पाकीर जैनुलाबदिन अब्दुल कलाम तथा ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जन्म १५ ऑक्टोबर १९३१ रामेश्वर येथे झाला होता. कलाम यांनी आपले शालेय शिक्षण रामनाथपुरमला पूर्ण केले. लहान वयातच वडिलांचे छत्र गमावल्याने डॉ. कलाम गावात वर्तमानपत्रे विकून, तसेच अन्य लहान मोठी कामे करून पैसे कमवीत व घरी मदत करीत होते. त्यांचे बालपण खूप कष्टात गेले. शाळेत असताना गणिताची त्यांना विशेष आवड लागली. नंतर ते तिरुचिरापल्ली येथे सेंट जोसेफ कॉलेजमध्ये दाखल झाले. तेथे बी.एस्‌‍सी. झाल्यानंतर त्यांनी 'मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीत प्रवेश घेतला. प्रवेशासाठी लागणारे पैसेही त्यांच्याकडे नव्हते. बहिणीने स्वतःचे दागिने गहाण ठेवून त्यांना पैसे दिले. या संस्थेतून एरॉनॉटिक्सचा डिप्लोमा पूर्ण केल्यानंतर, त्यांनी अमेरिकेतील 'नासा' या प्रसिद्ध संशोधन संस्थेत चार महिने एरोस्पेस टेक्नॉलॉजीचे प्रशिक्षण घेतले.

कार्य

१९६३ मध्ये ते भारतीय अवकाश संशोधन संस्थेत (इस्रो) क्षेपणास्त्र विकासातील पिएसएलव्ही(सेटेलाइट लॉन्चिंग व्हेईकल) च्या संशोधनात भाग घेऊ लागले.इंदिरा गांधी पंतप्रधान असताना भारताने क्षेपणास्त्र विकासाचा एकात्मिक कार्यक्रम हाती घेतला त्या वेळी डॉ. कलाम पुन्हा डीआरडीओमध्ये वैयक्तिक कामापेक्षा सांघिक कामगिरीवर त्यांचा भर असे व सहकार्‍यांमधील उत्तम गुणांचा देशाच्या वैज्ञानिक प्रगतीसाठी उपयोग करून घेण्याची कला त्यांच्यामध्ये होती. क्षेपणास्त्र विकासकार्यामधील 'अग्नी' क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणीमुळे डॉ. कलाम यांचे जगभरातून कौतुक झाले. पंतप्रधानांचे वैज्ञानिक सल्लागार म्हणून काम करतांना देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने त्यांनी अनेक प्रभावी धोरणांची आखणी केली. त्यांनी संरक्षण मंत्र्यांचे वैज्ञानिक सल्लागार व डीआरडीओ चे प्रमुख म्हणून त्यांनी अर्जुन हा एम.बी.टी.(मेन बॅटल टँक) रणगाडा व लाइट काँबॅट एअरक्राफ्ट (एलसीए) यांच्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका पार पाडली.

शिक्षण

त्यांचे वडील रामेश्वरमला येणार्‍या यात्रेकरूंना होडीतून धनुष्कोडीला नेण्याआणण्याचा व्यवसाय करीत.त्यांचे वडील व लक्ष्मणशास्त्री नावाचे पुजारी घनिष्ठ मित्र होते.त्यांच्यातील अध्यात्मिक चर्चा कलाम ऐकत असत.डॉ. कलाम यांनी आपले शालेय शिक्षण रामनाथपुरम्‌ला पूर्ण केले. लहान वयातच वडिलांचे छत्र गमावल्याने डॉ. कलाम गावात वर्तमानपत्रे विकून, तसेच अन्य लहान मोठी कामे करून पैसे कमवीत व घरी मदत करीत. त्यांचे बालपण खूप कष्टात गेले. शाळेत असताना गणिताची त्यांना विशेष आवड लागली. नंतर ते तिरुचिरापल्ली येथे सेंट जोसेफ कॉलेजमध्ये दाखल झाले. तेथे बी.एस्‌‍सी. झाल्यानंतर त्यांनी 'मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीत प्रवेश घेतला. प्रवेशासाठी लागणारे पैसेही त्यांच्याकडे नव्हते. बहिणीने स्वतःचे दागिने गहाण ठेवून त्यांना पैसे दिले. या संस्थेतून एरॉनॉटिक्सचा डिप्लोमा पूर्ण केल्यानंतर, त्यांनी अमेरिकेतील 'नासा' या प्रसिद्ध संशोधन संस्थेत चार महिने एरोस्पेस टेक्नॉलॉजीचे प्रशिक्षण घेतले.

स्वभाव

विज्ञानाचा परम भोक्ता असणारे डॉ. कलाम मनाने खूप संवेदनशील व साधे होते. त्यांना रुद्रवीणा वाजण्याचा, मुलांशी गप्पा मारण्याचा छंद होता. भारत सरकारने 'पद्मभूषण', 'पद्यविभूषण' व १९९८ मध्ये 'भारतरत्‍न' हा सर्वोच्च किताब देऊन त्यांचा सन्मान केला. डॉ. कलाम हे अविवाहित व पूर्ण शाकाहारी होते. बालपण अथक परिश्रमांत व्यतीत करून विद्येची अखंड साधना करीत खडतर आयुष्य जगलेले, आणि जगातील सर्वात मोठया लोकशाही राष्ट्राच्या राष्ट्रपतिपदी निवड झालेले डॉ. कलाम, हे युवकांना सदैव प्रेरणा देणारे व्यक्तिमत्त्व होते. पुढील वीस वर्षांत होणार्‍या विकसित भारताचे स्वप्न ते सतत पाहत असत.

गौरव

अब्दुल कलाम यांचा १५ ऑक्टोबर हा जन्म दिवस जगभरात जागतिक विद्यार्थी दिवस म्हणून पाळला जातो.
भारत सरकारने 'पद्मभूषण', 'पद्मविभूषण' व १९९७ मध्ये 'भारतरत्‍न' हा सर्वोच्च किताब देऊन त्यांचा सन्मान केला.

डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलामांना मिळालेले पुरस्कार व सन्मान

१९८१ : पद्मभूषण

१९९० : पद्मविभूषण

१९९७ : भारतरत्‍न

१९९७ : इंदिरा गांधी राष्ट्रीय एकात्मता पुरस्कार

१९९८ : वीर सावरकर पुरस्कार

२००० : रामानुजन पुरस्कार

२००७ : किंग्ज चार्ल्स (दुसरा) पदक

२००७ : ब्रिटन येथील वॉल्व्हरहॅम्प्टन विद्यापीठाची डॉक्टर ऑफ सायन्स ही मानद पदवी

२००८ : सिंगापूर येथे डॉक्टर ऑफ इंजिनिअरिंग ही मानद पदवी

२००९ : अमेरिकन सोसायटी ऑफ मेकॅनिकल इंजिनिअर्सचे हूव्हर पदक

२०१० : वॉटर्लू विद्यापीठाची डॉक्ट ऑफिंजिनिअरिंग ही मानद पदवी

२०११ : न्य़ूयॉर्कच्या आयईईई या संस्थेचे सभासदत्व

२०१२ : आऊटलुक इंडियाच्या ‘द ग्रेटेस्ट इंडियन’ या आंतरराष्ट्रीय सर्वेक्षणामध्ये कलाम दुसऱ्या क्रमांकावर होते.

२०१५ सप्टेंबर : बंगालच्या उपसागरात ओरिसाच्या किनाऱ्याजवळ असलेल्या व्हीलर आयलंडचे प्रचलित नाव बदलून ते अब्दुल कलाम बेट असे करण्यात आले.

निधन
ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची प्रकृती शिलाँग येथील आय.आय.एम.च्या कार्यक्रमात व्याख्यान देताना तबेत बिघडली. शिलाँगमधीलच एका रुग्णालयात त्यांनी २७ जुलै, इ.स. २०१५ रोजी अखेरचा श्वास घेतला.कलाम यांनी केलेल्या कार्याचा उपयोग भारतासाठी विविध कार्यात झाला आहे.

0000


कीटक या विभागातील आणखी काही प्राण्यांची माहिती घेणार आहोत.   चला तर मग मित्रांनो सुरुवात करूया आजच्या विशेष सदराला.    

1.   फुलपाखरू.   
फुलपाखरू हा एक आकर्षक रंगांचे पंख असलेला एक कीटक आहे. मोनार्क जातीची फुलपाखरे लांब प्रवासासाठी प्रसिद्ध आहेत.

फुलपाखरांचे जीवनचक्र

फुलपाखरांच्या वाढीच्या अंडी, अळी, कोश व फुलपाखरू या अवस्था असतात.

अंडे/ अंडी - विशिष्ट जातींची फुलपाखरे ही काही विशिष्ट प्रकारच्या झाडांवर अंडी घालतात. प्रत्येक जातीच्या फुलपाखरांचे होस्ट प्लांट ठरलेले असते. फुलपाखराची मादी ही मिलनानंतर लगेचच तिला हवे असलेले झाड शोधते व त्यावर अंडी घालते. काही फुलपाखरे ही एका वेळी एक अंडे घालतात तर काही समुहाने अंडी घालतात. ही अंडी पानांच्या मागे किंवा पानांच्या बेचक्यात अशी घातलेली असतात. जेणेकरून ती कोणत्याही परिस्थितीत भक्ष्य होऊ नयेत. यांचा रंग पानांशी मिळताजुळता असतो. यांचा आकार खूप लहान म्हणजे अगदी मोहरीच्या दाण्याएव्हढा असतो.

अळी किंवा सुरवंट- अंडे अथवा अंडी घातल्यानंतर त्यातून एका आठवड्याच्या आसपास अळी किंवा सुरवंट त्याच अंड्याचे कवच खाऊन बाहेर पडतो. सुरवंट खूप खादाड असतो. कोवळ्या पानांचा फडशा पाडायला तो सुरुवात करतो. ही अवस्था साधारण १५ ते २० दिवस असते. सुरवंटाचा आकार मोठा होतो. या अवस्थेत तो ३ ते ४ वेळा वरचे आवरण काढून टाकतो. यांचेही रंग आसपासच्या वातावरणातील रंगांशी मिळतेजुळते असतात.

जाती

बिबळ्या कडवा

बिबळ्या कडवा या जातीच्या फुलपाखपाराची मादी रुईच्या पानांवर अंडी घालते. अंड्यामधून सहा ते आठ दिवसांनी अळी बाहेर पडते. या अळीलाच सुरवंट म्हणतात. या फुलपाखराचा सुरवंट अंड्यातून बाहेर पडतेवेळी भुकेने वखवखलेला असतो..    

2.    ढेकूण.   
या निशाचर व रक्तशोषक कीटकाचा समावेश हेमिप्टेरा गणाच्या सायमिसिडी कुलात करतात. याची सायमेक्स लेक्ट्युलॅरियस ही जाती उपोष्ण व समशीतोष्ण कटिबंधांत सर्वत्र आढळते. सा. रोटुंडेटस ही जाती द. आशियात व आफ्रिकेत विशेष आढळते. ढेकूण मानवाखेरीज उंदीर, ससे, गिनीपिग, घोडे, गुरे व कोंबड्या यांना उपद्रव देतो. प्रौढ ढेकूण तांबूस तपकिरी, लांबट वर्तुळाकार, पसरट, ४–५ मिमी. लांब व वरवर पहाता पंखहीन असून त्याच्या सर्व अंगावर आखूड व दाट केस असतात. अगदी कमी वाढ झालेली, खवल्यांसारखी पंखांची पहिली जोडी फारच अस्पष्ट आणि अकार्यक्षम असते. ढेकणाला येणारा विशिष्ट अप्रिय वास हा त्याच्या गंध ग्रंथींतून निघालेल्या स्रावामुळे येतो. अशा ग्रंथी हेमिप्टेरा गणाचे वैशिष्ट्य आहे.

नराचे उदर बरेच टोकदार असते व त्याच्या शेवटी आठव्या खंडाच्या (भागाच्या) डाव्या बाजूच्या खोल खाचेत मोठे वाकडे शिश्न असते. मादीच्या चौथ्या (किंवा पाचव्या) उदरखंडावर उजव्या बाजूला मैथुनकोष्ठ (पिशवी) असतो. याला रिबागा इंद्रिय (रिबागा या शास्त्रज्ञांच्या नावावरून) म्हणतात. याच्या पलीकडे कोशिकीय (पेशीय) ऊतकाचा (समान रचना व कार्य असलेल्या पेशींच्या समूहाचा) पुंजका असतो, त्याला बर्लेस इंद्रिय (आंतान्यो बर्लेस या इटालियन कीटकवैज्ञानिकांच्या नावावरून) म्हणतात. मैथुनाच्या वेळी नर रिबागा इंद्रियात शुक्राणू सोडतो व तेथून ते बर्लेस इंद्रियातून जाऊन जननमार्गात पोहोचतात.

अनुकूल परिस्थितीत सु. २१° से. तापमान व भरपूर अन्नपुरवठा असताना दिवसाला ३–४ या हिशोबाने मादी सरासरीने २०० किंवा त्यापेक्षा जास्त अंडी घालते. १०° से. खालच्या तापमानात मादी अंडी घालीत नाही. उपासमार झालेली मादी अंडी घालणे बंद करते. अंडी लांबट, पांढरट, डोळ्यांनी सहज दिसतील एवढी मोठी असून त्यांच्या एका टोकाला स्पष्ट टोपी असते. ती फर्निचर, भिंती इत्यादींच्या फटींत चिकटवून ठेवलेली असतात. ६–१७ दिवसांत अंडी फुटून त्यांतून पिले बाहेर पडतात. पिले प्रौढासारखी दिसतात पण फिक्या पिवळ्या रंगाची असतात. पाच वेळा कात टाकून पिलांना प्रौढावस्था प्राप्त होते. अनुकूल तापमानात पिलाला प्रौढावस्था प्राप्त होण्यास ४–६ आठवडे लागतात. एका वर्षात ढेकणाच्या तीन किंवा त्यांपेक्षा जास्त पिढ्या होतात.

दिवसा ढेकूण गाद्या, उश्या, कपाटे, फर्निचर, भिंती इत्यादींच्या फटींत लपून बसतात. ते आगगाडीचे डबे, नाट्यगृहे, चित्रपटगृहे,हॉटेले, सैन्याच्या बरॅकी इ. ठिकाणी विशेष आढळतात. रात्री तसेच दिवसाही अंधाराच्या जागी ते माणसाला उपद्रव देतात. माणसाचे रक्त शोषून घेतल्यावर ते आपल्या लपण्याच्या जागेत जाऊन बसतात व अन्नपचन करतात. अन्नपचनासाठी त्यांना बरेच दिवस लागतात. ढेकूण अन्नाशिवाय तीन महिन्यांपर्यंत जगू शकतात.

माणसाचे तापमान व त्याच्या बसण्याचा दाब या दोन संकेतांनी ढेकूण लपलेल्या फटीतून बाहेर येऊन माणसाला चावा घेतो. चावण्यापूर्वी तो लाला ग्रंथींचा स्त्राव चावण्याच्या जागेवर सोडतो व नंतर आपल्या शुंडाने (सोंडेसारख्या अवयवाने) छिद्र करतो. स्त्रावामुळे छिद्र करण्याची वेदना जाणवत नाही व रक्त शोषताना ते गोठत नाही. ढेकणाच्या चाव्याचा परिणाम लगेच दिसून येत नाही. परंतु त्याच्या विषामुळे थोडीशी खाज सुटणे, आग होणे व गांधी येणे हे परिणाम वेगवेगळ्या व्यक्तींत कमीअधिक प्रमाणात दिसून येतात. काही व्यक्तींत हे परिणाम एका आठवड्यापेक्षा जास्त काळही टिकतात. ढेकणामुळे विविध रोगांचा प्रसार होत असावा असे शास्त्रज्ञांना वाटते, परंतु अजून तसा सबळ पुरवा मिळालेला नाही.

ढेकणांच्या वसतिस्थानावर डीडीटी, क्लोरडान किंवा लिंडेन ही कीटकनाशके फवारून त्यांचा बंदोबस्त करता येतो. परंतु या कीटकनाशकांच्या फवारणीने ढेकूण मेले नाहीत; तर डायझिनॉन, मॅलॅथिऑन यांसारखी अधिक प्रभावी कीटकनाशके वापरावी लागतात [⟶ कीटकनाशके]. उकळते पाणी किंवा रॉकेल यांचा ढेकणांच्या अंड्यांवर परिणाम होत नाही..    

3.   शेण किडा.   
शेणकिडा कीटक वर्गातील एक प्राणी. कोलिऑप्टेरा गणातील स्कॅरॅबिइडी कुलात याचा समावेश होतो. भारतात याच्या तीन जाती आढळतात.

शेणकिडा काळ्या किंवा तपकिरी रंगाचा असतो. त्याच्या शरीराचे शीर्ष (डोके),वक्ष (छाती) व उदर(पोट) असे तीन प्रमुख भागपडतात. डोके रूंद व चपटे असते. शृंगिका (सांधे असलेली लांब स्पर्शेंद्रिये) आखूड, जबडे नाजूक व ओठांवर बारीक केस असतात. त्यास पायाच्या तीन जोड्या असतात. पायाच्या दुसऱ्या व तिसऱ्या जोडीमध्ये अंतर असते. उदर ९-१० खंडांचे बनलेले असते. पंखांची पहिली जोडी जाड व टणक असते; पण ती त्यांना उडण्यास उपयोगी पडत नाही. ती उदरावर पसरते व उदराचे रक्षण करते. पंखांची दुसरी जोडी पातळ व नाजूक असून तिचा उपयोग उडण्यासाठी होतो. इतर वेळी ती पहिल्या पंखांच्या जोडीच्या आत घडी घातल्यापमाणे दिसते.

रवंथ करणाऱ्या प्राण्यांच्या ताज्या शेणाच्या वासामुळे हे कीटक शेणाकडे आकर्षित होतात. त्यांच्या चपट्या डोक्याच्या साहाय्याने ते शेणाचा छोटासा भाग वेगळा करतात. त्यास जबडा व पायाच्या साहाय्याने गोल आकार देतात. हा शेणाचा गोळा ते पाठीमागच्या पायाने पुढे ढकलतात व पुढचे पाय जमिनीवर टेकवितात. कीटक उलटा पुढे पुढे सरकत जातो व अशा रीतीने शेणाचा गोळा सु. अर्धा किलोमीटर अंतरापर्यंत तो ढकलत नेऊ शकतो. कीटकाच्या आकारापेक्षा तिप्पट मोठा शेणाचा गोळा असू शकतो. नर कीटक बीळ तयार करतो. त्यावेळी मादी शेणाच्या गोळ्यांचे संरक्षण करते. बीळ तयार झाल्यावर मादी गोळा बिळाकडे ढकलते. शेणाचे गोळे बिळात साठविले जातात. मादी त्यावर अंडी घालते. अंड्यातून बाहेर पडलेल्या अळ्या साठविलेल्या शेणाच्या गोळ्याचा अन्न म्हणून उपयोग करतात. मग त्या आपल्याभोवती कोश तयार करतात. कोशावस्थेतून बाहेर पडण्यास साधारणतः वर्षाचा काळ लागतो. जमीन टणक असेल, तर ती पावसाने भिजून मऊ होईपर्यंत कीटक बाहेर पडू शकत नाहीत. 

हे कीटक काही टन शेण गोळ्यांच्या स्वरूपात बिळात साठवितात व अन्न म्हणून वापरतात. वातावरण स्वच्छ व आरोग्यदायी होण्यास त्यांची अप्रत्यक्ष मदतच होते..    

आपण वाचत आहात साहित्य उत्सव समूह.   यानंतर पाहूया आणखी काही कीटकांची माहिती.    

4.   वाळवी.   
लाकुड कोरून खाणारे हे कीटक उधई या नावानेही ओळखले जातात. या किटकांना संस्कृत भाषेत वल्म तर इंग्रजी मध्ये टर्माइट असे म्हंटले जाते. भारतात सर्वत्र वाळवी आढळते. वाळवी हा कीटक वसाहत करून लाकडा मध्ये राहतो. दमट जागा जुन्या लाकडामध्ये वाळवीचे अस्तित्व असते. वाळवी ही कीड खोडाची कोवळी साल कुरतडून खाते. फॉरमोसॅन सबटेरानियन टर्माईट' या नावाने ओळखली जाणारी आशियातील वाळवीची जात वेगाने लाकुड खाते. या उपद्रवी कीटकांमुळे दरवर्षी कोट्यवधी रुपयांचे नुकसान होते. कीटकांना पंखांच्या दोन जोड्या असतात. वाळवीचा खाद्य म्हणूनही वापर केला जातो. ही अतिशय पौष्टिक असते.

इतिहास

वराहमिहिराने बृहत संहितेत विहिर खणायची असेल तर वाळवीचं वारूळ असलेली जागा शोधून काढा असा सल्ला दिला आहे.

प्रादुर्भाव

वाळवीची वसाहत पूर्ण झाली की त्यातील राणीमाशी उडून जाते. आपले पंख काढून टाकते. नंतर ती आणखी वसाहत तयार करण्याच्या उद्देशाने प्रजननासाठी नवीन ठिकाण शोधते व तेथे कार्य सुरु करते.

उपाय

शेतातील वाळवीची वारुळे खोदून त्यातील राणी वाळवी नष्ट करावी. असे केल्याने पुढील पीढी येत नाही. तसेच वारुळात थाईल ब्रोमाईड व क्‍लोरोफॉर्म यांचे २५० मि.लि. मिश्रण प्रति वारुळात ओतावे. यामुळे वाळवी तेथे राहत नाही. निंबोळीपेड टाकल्यास वाळवीला न आवडून तेथून ती जाण्याचा प्रयत्न करते. सरडा हे प्राणी वाळवी खातात..    

5.   राणी पाकोळी.    
ब्लू मॉरमॉन (शास्त्रीय नाव: Papilio polymnestor) (मराठी उच्चार - ब्ल्यू मॉरमॉन) हे महाराष्ट्राचे 'राज्य फुलपाखरू' आहे. याच्या पंखांचा विस्तार 120-150 मिमी असतो.देशातील 'सदर्न बर्डविंग' या फुलपाखरानंतर सर्वात मोठे फुलपाखरु असण्याचा मान ब्लू मॉरमॉनला जातो. ते मखमली काळ्या रंगाचे असून पंखावर निळ्या रंगाच्या चमकदार खुणा असतात.तसेच पंखाच्या खालची बाजू काळी असून शरीराकडील एका बाजूवर काही लाल ठिपके असतात.

वितरण

हे फुलपाखरू केवळ भारत आणि श्रीलंका या देशातच आढळते. भारतात हे पश्चिम घाट, दक्षिण भारत आणि पूर्व किनाऱ्यावरच आढळते.उत्तरेला गुजरात पर्यंत हे सापडल्याच्या नोंदी आहेत. हे बऱ्याचदा अगदी बागांमध्ये किंवा मुंबई, पुणे, बेंगलोर अशा शहरात अगदी वाहतुकीच्या गर्दीत सुद्धा आढळते.

स्थिती

हे सामान्यपणे आढळणारे फुलपाखरू आहे. आणि हे धोक्यात असल्याचे मानले जात नाही. हे वर्षभर आढळते, पण विशेषत: पावसाळा आणि त्यानंतरच्या काळात जास्त आढळते.

मूळ स्थान

जास्त पाऊस असलेल्या सदाहरित जंगलासारख्या भागात हे खास करून आढळते. पानगळीच्या जंगलात सुद्धा हे आढळते.याचे वसतीस्थान लिंबूवर्गीय वनस्पती असल्यामुळे या वनस्पतींची लागवड असलेल्या शहरी भागात सुद्धा हे आढळते. हे एका दिशेने वेगात उडते आणि उडताना सतत मार्ग बदलते, वर- खाली उडत असते. त्यामुळे याचे छायाचित्र घेणे सुद्धा कठीण जाते. खनिज समृद्ध जमिनीत हे चिखलपान मड पड्लिंग करताना दिसते. सीताफळाचा कुजलेला गर पडलेला असेल तर त्याचा दर्प सुटतो. त्याकडे आकर्षित होऊन राणी पाकोळी हमखास त्यावर आल्याची निरीक्षणे आहेत. मधातून न मिळणारी आवश्यक पोषक द्रव्ये मिळवण्यासाठीच फुलपाखरे चिखल, कुजलेले पदार्थ यावर बसलेली दिसतात.

खाद्य वनस्पती

पपनस,लिंबू या वनस्पतींची पाने याचे खाद्य आहे.

सवयी

हे फुलपाखरू जंगलातील वाटा आणि झरे यावर आढळते.याच्या नराला सूर्यप्रकाश आवडतो, त्यामुळे तो सावली टाळतो.विशेषत: अशोकी, मोगरा कुलातील फुले,झिनिया या फुलांना हे फुलपाखरू सतत भेटी देत असते..    

6.   कुंभार माशी.    
ही एक प्रकारची गांधील माशी आहे. हा एक वास्प जातीचा कीटक आहे. ही माशी अंडी घालण्यासाठी चिखलाचे घरटे तयार करते. ही घरटी कठीण असतात. या माशा मधमाशीच्या पोळ्यांवर हल्ले करून त्यांना मारतात व खातात..    

000

छत्रपती .... 

शिवाजी महाराजांचे 7 घोडे -
1- मोती
2- विश्वास 
3- तुरंगी 
4- इंद्रायणी
5- गाजर 
6- रणभीर
7- कृष्णा- शेवटच्या काळातील पांढरा घोडा. महाराज राज्याभिषेकांनंतर या वर बसले.
शिवाजी महाराज घोड्याचा वापर निर्णायक प्रसंगीच करत असत.

छत्रपती शिवरायांचा आहार साधा होता. 
संपूर्ण जीवन निर्व्यसनी. मोहिमेच्यावेळी तंबूत झोपणे. दैनंदीन पोशाख साधा परंतु दरबारी पोशाख राजेशाही असे. काळी दाढी, मिशी, लांब केस, मोठे व तेजस्वी डोळे, भेदक नजर, अत्यंत सावध, बोलतांना स्मित हास्य. उंची पेक्षा हाताची लांबी नजेरेत भरणारी. 

मराठी माणसाला स्वाभीमानाने जगायला शिकविले. 

जगातील 111 देशात १९फ़ेब्रुवरिला जयंती साजरी केली जाते. 1300 पेक्षा जास्त शब्दांचा पहिला मराठी शब्दकोश शिवरायांनी तयार केला.

छत्रपती शिवाजी महाराज एक 
भूगर्भ शाश्रज्ञ-  

आज आपण शेतीत 300 फूट बोअर घेऊनही पाणी लागत नाही परंतु आज 400 वर्षांनंतरही महाराष्ट्रातील कुठल्याही किल्यावर गेलो तर 4000 फूट उंचीवर भर उन्हाळ्यात आपल्याला किल्यावरील टाक्यांमधून स्वच्छ पाणी आढळते/दिसते. तीही कुठलीही मोटार किंवा पाईपलाईन नसतांना.

छत्रपती शिवराय “स्वराज्य स्थापनेचा” विचाराशी सहमत असणाऱ्या सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र घेवून लढले. स्वराज्यावर आक्रमण करणारे, फंदफितुरी करणारे मग ते शत्रू असतील, घरातील, स्वराज्यातील, कुठल्या जातीधर्माचे आहेत याचा विचार न करता त्यांना कठोर शासन केले.  

जगाच्या इतिहासात एकमेव राजा आहे ज्याच्या दरबारी कधी स्त्री/नर्तकी नाचली नाही,  स्वतःसाठी मोठमोठे महाल बांधले नाहीत, सत्तेचा वापर स्वतःच्या किंवा कुटुंबाच्या फायद्यासाठी केला नाही. शिवाजी महाराज “रयतेच स्वराज्य” असाच शब्द वापरत.

छत्रपती शिवाजी महाराज एक इंजिनिअर –

प्रत्येक किल्ल्यावर 2 प्रकारचे हौद/टाके- ओपन आणि भूगर्भात 
किल्यावर पाण्याचे हौद/टाक बांधकामात खडक फोडण्यासाठी दारुगोळा/सुरुंग कधीच वापरले नाहीत. त्या ऐवजी नैसर्गीक साधनांचा वापर करून खडक फोडले. म्हणूनच टाक्यांचा आकार एकदम गुण्यात/आयताकृती आहे.
याच टाक्यांमधील पाणी संपूर्ण गडावर वापरले जायचे. ते पाणी स्वच ठेवण्यासाठी नैसर्गीक तंत्राचा वापर केला जायचा. 
पाण्याचे टाके खडकाच्या कपारीला ५० ते १५० फुट पर्यंत खोल कोरलेले आहेत. त्यांना आतल्या बाजूला स्टेप दिलेल्या आहेत. एक स्टेप/टप्पा साधारण 25 फुट व जास्त लांब आहे.

रायगड- 
राज्यभिषेक दिन 6 जून.
महाराज्यांच्या काळात रायगडावरील लोकसंख्या कमीतकमी 10000 असे. 
65 किल्ल्यांच्या गराड्यात रायगड किल्ला.
2000 फुटावर पहिली तटबंदी 
4000 फुटावर दुसरी तटबंदी
किल्याची वाट एकदम छोटी.
किल्यावर 300 इमारती होत्या.
10000 लोकांना वर्षभर पाणी मिळावे यासाठी 9 टाके.
रायगडाला 3 बाजूला तटबंदी नव्हती फक्त पश्चिम बाजूला तटबंदी आहे.
किल्याचे एकूण क्षेत्र 1200 एकर.
रायगडावर 42 दुकाने होती. पैकी 21 दुकाने देशी माल विक्री व 21 दुकाने परदेशी माल विक्रीसाठी.

आजच काम आजच झालं पाहिजे, उद्या नाही त्यांचं नाव शिवाजी महाराज.

मराठ्यांचे घोडे एकदा निघाल्यावर एक दमात 100/125 किमी सहज जात कारण मावळे स्वराज्यासाठी लढत होते.

मुघलांचे घोडे 30/35 किमीवर थांबत कारण मुघल सैन्य पगारसाठी काम करत होते.

महाराज्यांच्या अष्टप्रधान मंडळात 
८ मंत्री
३० विभाग (12 महाल व १८ कारखाने) 
३० विभागात ६०० कर्मचारी
महाराजांकडे येणाऱ्या केसेसचा समोरासमोर निकाल.
रायगडावर काम घेऊन आलेला प्रत्येक व्यक्ती जेवल्याशिवाय गडावरून खाली जाऊ द्यायचा नाही हा नियम.

छत्रपती शिवाजी महाराज -
महाराष्ट्राच्या किनार पट्टीवर १६७१ मध्ये त्या काळात मीठ शेती केली जायची. परंतु इंग्रच, डच, पोर्तुगीज यांनी तिथली शेती मोडीत काढण्यासाठी त्यावेळच्या गोवा प्रांतातून मीठ आणून स्वस्तात विक्री सुरु केली. महाराज्यांच्या हे लक्षात आल्यावर त्यांनी आयात मिठावर कर लावला. त्यामुळे आयात मीठ महाग झाले व आपल्या शेतकऱ्यांच्या मिठाची मागणी वाढली.
म्हणून छत्रपतींना जानता राजा म्हणतात.

वयाच्या 17 व्या शिवरायांच्या करिअरची सुरुवात आर्किटेक्ट म्हणून झाली. त्यांनी स्वतः डिजाईन करून राजगड किल्ला बांधला. एक इंग्रज लिहितो “ शिवाजी महाराज द ग्रेट गॅरिसन- इंजिनिअरचा गुरु” होते. बांधकाम खर्च 22000 कोटी. 
या गडावर महाराज 27  वर्ष राहिले. 

1982 साली पोर्तुगालची राजधानी लिसबेन येथे गडकोट/किल्ल्यांचे जागतिक प्रदर्शन भरले होते. 

त्या प्रदर्शनाच्या निवड समितीने जगातील किल्ले बघितल्यावर “राजगड” किल्यास प्रथम पारितोषिक दिले. 
महाराज्यांच्या मृत्यूनंतर 302 वर्षांनीही महाराज्यांच्या सन्मान होतो.
धन्यवाद ज्याच्या मुले आपल्या राजांची माहिती मिळाली 

 जय शिवराय.... ..
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
मा बाजीराव सदाशिव नाईक
संस्थापक/अध्यक्ष
बहुजन परिवर्तन पार्टी प्र महाराष्ट्र राज्य महिला बचाव समिती (नोंदणीकृत)
वृद्ध श्रम सेवा भावी संस्था महाराष्ट्र राज्य (रजि)
00


 पिन कोडचा शोध कोणी लावला?

एक काळ असा होता, की बँकेतून पैसे काढायचे, तर तुमची सही हीच तुमची ओळख पटवण्याची खूण असे; आणि निरक्षर असल्यास निशाणी डावा अंगठा ते काम करत असे. पण आता जागोजागी एटीम स्थापन केली गेली आहेत. त्यामुळे बैंकेपर्यंत तंगडतोड करण्याऐवजी जवळच्याच एटीम केंद्रात जाऊन काम भागतं. बाहेरगावी गेल्यावर तर ही सोय चांगलीच फायदेशीर ठरते. काही बँका तर घरबसल्या इंटरनेटचा वापर करून आपल्या खात्यावरचे व्यवहार करू देतात.

टेलिफोन, वीज, गॅस वगैरेंची बिलंही अशीच परबसल्या भरता येतात. पण या सोयीसाठी आपली सही आता कामी येत नाही. त्याऐवजी फक्त आपल्याला आणि बँकेच्या संगणकाला माहिती असलेल्या पिन कोडची, एका खास आकड्याची गरज भासते, आपली ओळख पटवणारा हा पिन कोड आता सर्वांच्याच परिचयाचा झाला आहे.

हा इतका उपयोगी पिनकोड कोणी बरं शोधून काढला असेल? पिन हा पर्सनल आयडेन्टिफिकेशन नंबर' या इंग्रजी शब्दांच्या आद्याक्षरापासून बनलेला संकुचित शब्द आहे. प्रत्येक व्यक्तीची स्वतंत्र ओळख पटवण्याचे ते एक साधन आहे.

जेव्हा खात्यातले पैसे वितरित करणार यंत्र कार्यान्वित करायची वेळ आली तेव्हा या साधनाची आवश्यकता भासली. तोपर्यंत बँकेतला कॅशियर खातेदाराच्या सहीवरून त्याची ओळख पटवून घेत असे व त्याला पैसे देत असे. त्यामुळे ज्याचं खातं आहे त्यालाच पैसे दिले पण युरोपात मनुष्यबळाची नेहमीच कमतरता जाणवत आली आहे. त्यामुळे मग अशा स्वयंचलित यंत्राची कल्पना पुढे आली.

जॉन शेपर्ड बॅरन या स्कॉटिश इसमानं ते यंत्र शोधून काढलं. बॅरनचा जन्म भारतात शिमला इथ झाला होता. नंतर वडिलांसमवेत तो स्कॉटलंडला परतला. तिथं त्यानं यत्रं बनवण्याचा कारखाना काढला. बार्कलेज बैंकेन त्याचे हे यंत्र विकत घेऊन १९६७ मध्ये प्रधम वापरात आणलं. त्यावेळी खातेदारच पैसे काढत आहे व ते त्यालाच वितरित होत आहेत, याची खातरजमा करून घेण्याची आवश्यकता भासली. सहीचा वापर आता अप्रस्तुत ठरला असता. म्हणून मग बॅरनने हा पिनचा पर्याय अवलंबला.

त्यानं प्रथम सहा आकडी क्रमांक शोधला होता. पण त्याच्या पत्नीला सहा आकडी क्रमांक लक्षात ठेवणं कठीण जाऊ लागलं, म्हणून मग तिच्या आग्रहाबरून त्यानं चार आकडी क्रमांकाचा वापर सुरू केला. आज जगभरात वीस लाख एटीएम यंत्र कार्यरत आहेत. सर्व ठिकाणी आता चार आकडी क्रमांकाचाच वापर केला जातो. बॅरनच्या या शोधाचा इतका झपाट्यानं प्रसार होईल अशी कोणालाच कल्पना नव्हती. कारण आता पिन क्रमांक केवळ एटीएमपुरताच मर्यादित राहिलेला नाही. क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्डसाठीही। प्रणाली वापरण्यात येते.

इन्कम टैंक्स कार्यालयानं प्रत्येक करपात्र नागरिकाला एक विशिष्ट क्रमांक दिला आहे. हा पॅन नंबरही पिनचाच एक वेगळा अवतार आहे. आता तर प्रत्येक नागरिकाची निर्विवाद आणि समग्र ओळख पटवणारा युनिक आयडेन्टिटी नंबर बहाल करण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. तोही पिनचाच विस्तारित प्रकार आहे. त्यामुळे बॅरनची मूलभूत संकल्पना दृढ झाली आहे.


0000


 🔸इंटरनेट.🔸

---------------------------------------------
🔸संकलन: सदानंद पाटील, रत्नागिरी.
---------------------------------------------

हे 'इंटरनेट` म्हणजे आहे तरी काय? तर संगणकाव्दारे संदेशवहन. आज संगणकाने सर्व क्षेत्रात व घराघरात प्रवेश मिळविला आहे. शब्द, चित्र वा संगीत कोणत्याही प्रकारची माहिती संगणक साठवून ठेवू शकतो. त्यावर पाहिजे ते संस्कार करू शकतो. एखाद्या ऑफिसात अनेक संगणक असल्यास ते एकमेकांना जोडून त्यांचे जाळे वा 'नेट` तयार केलेले असते. त्यामुळे हे संगणक एकमेकांत संवाद साधू शकतात. जगभरातील अशी सर्व जाळी वा नेट एकमेकांशी जोडली की होते 'इंटरनेट`

इतिहास.
१९६९ साली इंटरनेटच्या कल्पनेचा जन्म झाला. अमेरिकन लष्कराने इंटरनेटच्या पायाभूत ठरणारे आर्पानेट नांवाचे नेटवर्क वापरात आणले. अमेरिकेला अशी भीती वाटे की संदेशवहनाचे मुख्य केंद्र जर रशियाने बॉम्ब टाकून नष्ट केले तर काय होणार? या भीतीपोटी त्यांनी चार केंद्रे स्थापून ती एकमेकांना जोडली. हेतू हा की कोणतेही केंद्र नष्ट झाले तरी बाकीची तीन केंद्रे काम करू शकतील. हेच आर्पानेट. युध्द संपल्यानंतर अमेरिकेतील विद्यापीठांना अशा नेटवर्कचा उपयोग करण्याची मुभा देण्यात आली व आर्पानेटचा विस्तार झाला.

नवीन संशोधन व माहितीची देवाणघेवाण या कामासाठी वापर सुरू झाल्यानंतर सर्व क्षेत्रातील लोकांचे याकडे लक्ष वेधले गेले आणि 'इंटरनेट` चा खऱ्या अर्थाने उपयोग सुरू झाला. १९६९ मध्ये ४ केंद्रे असणारे हे नेटवर्क १९९५ मध्ये ५० लाख केंद्रे असणाऱ्या नेटवर्कमध्ये रूपांतरीत झाले. आता इंटरनेटमध्ये लक्षावधी नेटवर्क असून आता ५० टक्के नेटवर्क अमेरिकेबाहेर इतर देशात आहेत. इंटरनेटमुळे जग खऱ्या अर्थाने जवळ आले आहे.

भारतातील सर्व आय.आय.टी., संशोधन संस्था व विज्ञान संस्था या इरनेटने एकमेकांशी जोडल्या गेल्या असून हे नेटवर्क अमेरिकेतील युयुनेटला जोडण्यात आले आहे. इरनेटचा उपयोग फक्त शिक्षण व संशोधन संस्थांना करता येतो.व्ही.एस.एन.एल. (विदेश संचार निगम लि.) ने १९९४ मध्ये इंटरनेटसाठी निविदा मागविल्या. टेलिकम्युनिकेशन डिपार्टमेंटने परदेशी निविदा रोखण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांना त्यात यश आले नाही. `कॉम्प्युसर्व्ह' नावावर अमेरिकेतील एका कंपनीने इंटरनेटची सेवा देणे सुरू केले. आता भारतातील कोणालाही जागतिक इंटरनेटचा वापर करणे शक्य होऊ लागले आहे. व्ही.एस.एन.एल.ने स्वतंत्रपणे अशी सेवा (इंटरनेट अक्सेस सर्व्हीस) देणे सुरू केले. व्ही.एस.एन.एल.चे मुख्य केंद्र मुंबई असून दिल्ली, कलकत्ता, चेन्नई, बंगलोर व पुणे ही भारतातील शहरे अमेरिकेतील इंटरनेटला जोडण्यात आली आहेत. इतरही शहरे हळुहळु या नेटवर्कला जोडली जाणार आहेत.

वापर पध्दती.
इंटरनेटचा उपयोग करण्यासाठी संगणक, फोन याशिवाय त्या दोघांना जोडणारे मॉडेम नांवाचे उपकरण लागते. मॉडेमची क्षमता बॉड रेटमध्ये (बिट्स पर सेकंद) म्हणजे एका सेकंदात माहितीचे कण वहन करण्याची क्षमता यात दर्शविली जाते. जास्त बॉडचे उपकरण घेणे भविष्यातील प्रगतीच्या दृष्टीने आवश्यक आहे.

इंटरनेट वरून तुम्हाला समजा माहिती पाठवायची असेल तर जेथे ती पाठवायची त्याचा सांकेतिक क्रमांक देऊन ती पाठवावी लागते. ही माहिती जशीच्या तशी न जाता आधी त्याचे छोट्या भागांत (पॅकेज) रूपांतर केले जाते हे भाग कमी जास्त लांबीचे असू शकतात. हे भाग रूटर नावाच्या विशिष्ट संगणकाव्दारे एका नेट वरून दुसऱ्या नेटवर असे करत योग्य पत्त्यावर पाठविले जातात. (जणू काही वेगवेगळया बॅगांमधून पाठविलेले सामान) ज्या ज्या ठिकाणाहून भाग घेतले वा पाठविले जातात तेथे अनेक मार्गांनी माहितीची पाकिटे येत असतात. ज्या ठिकाणी जायचे त्यासाठी देखील अनेक मार्ग उपलब्ध असतात.

त्यामुळे कोणत्या मार्गावर रहदारी कमी आहे व वेळ कमी लागेल याचा विचार करून प्रत्येक पॅकेज पाठविले जाते. हे सर्व अतिशय वेगात चालत असल्याने वेगवेगळया मार्गाने प्रवास करूनही हे भाग अत्यल्प वेळात मुक्कामी पोचतात. त्याचवेळी इतर ठिकाणहून माहिती येत असल्यास त्याचा क्रम लावला जातो. व पोस्ट बॉक्ससारखी त्या संगणाकावर सर्व माहिती साठवून ठेवली जाते. म्हणजे रोज कामाला सुरूवात करण्यापूर्वी कोणाकोणाची पत्रे आली आहेत ते ही पोस्ट बॉक्स उघडून पाहता येते.

इंटरनेट व फॅक्स.
इंटरनेटवरील इ मेल (इलेक्ट्नॅनिक मेल) आणि फॅक्स यांची तुलना केली. फॅकस कमी वेळात नियोजित स्थळी पाठविता येतो. इ मेल नेटवर्कवरील रहदारीवर अवलंबून असल्याने त्यास वेळ लागू शकतो. मात्र फॅक्ससाठी बराच खर्च येतो. एक पान माहितीसाठी भारतातल्या ठिकाणी १० रूपये तर अमेरिकेतील ठिकाणी त्यापेक्षा कितीतरी अधिक खर्च येतो. इ मेलसाठी फक्त फोनचा खर्च येत असल्याने तो नाममात्र असतो. फॅक्स ज्याला पाठवायचा त्यालाच तो मिळाला का दुसऱ्याने घेतला व फॅक्सचे उत्तर त्याने परत फॅक्स केला तरच मिळू शकते. इ मेल मात्र योग्य त्या माणसाच्या सांकेतिक क्रमांकावर जात असल्याने त्याच्याशिवाय दुसऱ्याला मिळत नाही.

तो मिळाला की नाही ते लगेच कळू शकते व थोड्याच वेळात त्याचे उत्तरही आपल्या संगणकावर मिळू शकते. आपण फॅक्स पाठविणार पाठविणार तो बाहेरगावी गेला असेल वा प्रवासात असेल तर त्याला फॅक्स मिळू शकत नाही. इ मेलमध्ये पत्ता म्हणजे एक सांकेतिक क्रमांक असल्याने तो कोठेही असला व त्याने कोणत्याही संगणकावर काम सुरू केले की इंटरनेटव्दारा त्याचा शोध घेतला जाऊन त्याला तो निरोप पोहोचू शकतो.

इ मेल.
इंटरनेटवरून पाठविलेल्या माहितीवर गुप्तता ठेवणे कठीण असते. पुष्कळ वेळा इ मेलवरील माहितीवर नजर ठेवली जाते. अर्थात इंटरदेटवरून माहितीच्या देवाणघेवाणीचे प्रमाण एवढे प्रचंड आहे की असे लक्ष ठेवणे वा माहिती विना परवाना वापरणे या गोष्टी कठीण आहेत. तरीही खाजगी कंपन्याना इंटरनेटव्दारे आपली माहिती बाहेर फुटण्याचा धोका वाटतो. यासाठी त्यांच्याकडे संरक्षक व्यवस्था ठेवणारे प्रोग्रॅम (फायरवॉल सारखे) वापरले जातात. पुष्कळ कंपन्या सर्व माहिती विशिष्ट सांकेतिक पध्दतीने बदलून इंटरनेटवर सोडतात. ज्यांना ती सांकेतिक लिपी माहीत असेल त्यांनाच त्याची उकल होऊ शकते. संरक्षण, गुन्हा अन्वेषण, संशोधन संस्था अशाप्रकारे इंटरनेटवरून माहितीची देवाणघेवाण करतात.

इंटरनेटवरील काही माहिती प्रचार वा प्रसारासाठीच असते. बातम्या, राजकीय पक्षांचे जाहीरनामे, कंपन्यांच्या जाहिराती, वस्तूंच्या किंमती, देखभाल व दुरूस्ती, शिक्षण. ग्राहक सेवा, पर्यावरण संरक्षण इत्यादी अनेक प्रकारची माहिती कोणासही सहजपणे विनामूल्य मिळेल अशी व्यवस्था इंटरनेटवर करण्यात आलेली असल्याने शिक्षण, व्यापार, संस्कृती, राजकारण यांच्या प्रसारास 'इंटरनेट ` हे महत्वाचे साधन झाले आहे. शिवाय इंटरनेट ही कोणा एकाची मालमत्ता नाही. जो कोणी इंटरनेटशी आपला संगणक जोडेल त्याचा तो हक्कदार होतो.

इंटरनेटवर खालील सेवा पुरविल्या जातात,
इ मेल - माहितीची देवाण घेवाण- जगभरच्या मित्रांशी, सहकाऱ्यांशी वा नातेवाईकांशी आपण संपर्क ठेवू शकतो. जगातील कोणत्याही संगणकावर आपणास काम करता येते व तेथे आपले प्रोग्रॅम चालवून पहाता येतात. आपल्या संशोधन प्रबंधासाठी वा व्यापार उद्योगासाठी आपण इंटरनेटचा उपयोग करून घेऊ शकता जगातील वृत्तपत्रे, मासिके, लायब्ररीतील पुस्तके, म्युझियम, संगीत यांचा लाभ मिळू शकतो. करमणुकीसाठी नवीन साधने उपलब्ध होतात.

जगभर असणारी व विखुरलेली माहिती व बुध्दीमत्ता यांचे अतिवेगात दळणवळण झाले तर प्रगतीचा वेग कितीतरी पटीने वाढू शकेल. इंटरनेटच्या प्रसारामुळे ही शक्यता आता दृष्टीपथात आली आहे. आतापर्यंत एका देशातील बुध्दीमत्ता तेथील इतर परिस्थिती योग्य नसल्याने त्या देशास वापरता येत नव्हती. त्यामुळे बुध्दीमान लोक प्रगत राष्ट्रात जाऊन बुध्दीमत्तेच्या साठ्यास गळती लागून (ब्रेन ड्न्ेन) प्रगतशील राष्ट्रांना नव्या धोक्याला सामोरे जावे लागत होते.

इंटरनेटच्या वापरामुळे बुध्दीमान व्यक्तीना आता प्रगत राष्ट्रात न जाता तेथील प्रगतीचा उपयोग करणे शक्य झाले आहे. व्यापाराच्या दृष्टीने इंटरनेटमुळे दुहेरी परिणाम होणार आहे. जागतिक व्यापरपेठ इंटरनेटमुळे खुली झाल्याने आपला माल सर्व जगभर पाठविण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्याचवेळी स्थानिक उद्योजकांना बहुराष्ट्नीय कंपन्यांशी स्पर्धा करावी लागल्याने ते अडचणीत येऊ शकतील. पर्यावरण क्षेत्रामध्ये इंटरनेट फार उपयुक्त ठरणार आहे. नवनवी घातक द्रव्ये, त्याचा वापर, पर्यावरणाचे संरक्षणाचे उपाय याविषयी त्वरीत माहिती मिळण्याची शक्यता इंटरनेटने निर्माण केली आहे.

थोडक्यात इंटरनेट रूपाने मानवाने प्रगतीचे एक पाऊल पुढे टाकले असून ते उज्वल भविष्याकडे नेईल अशी आशा आहे. इंटरनेटचा एक दोष म्हणजे त्यात माहितीचा असणारा न पेलवणारा साठा माहितीच्या समुद्रातून आपल्याला हवी ती माहिती मिळविणे ही एक मोठी मुश्किल गोष्ट आहे. अर्थात यासाठी विविध प्रकारचे शोधक प्रोग्रॅम (ब्राऊझर) बनविण्यात आले असून त्यांच्या साहाय्याने आवश्यक त्या माहितीचा शोध घेता येऊ शकतो. टेलनेट नावाचा प्रोग्रॅम वापरून आपल्याला दुसऱ्या नेटवर्कमध्ये प्रवेश मिळविता येतो. म्हणजे टेलनेट वापरल्यावर दुसरे नेटवर्क आपल्या नेटवर्कसारखे सहजसाध्य होते. सर्वांसाठी खुली असणारी माहिती उदाहरणार्थ जाहिराती वा बातम्या दाखविण्यासाठी बुलेटीन बोर्ड वापरतात. या बुलेटीन बोर्डवरील माहिती वाचण्यासाठी युजनेट हा प्रोग्रॅम वापरतात.

बी.बी.एस्. (बुलेटीन बोर्ड सिस्टीम) कंपन्या माहिती साठवून ठेवणे व वितरीत करणे या पध्दतीने काम करतात. या ठिकाणी आपण केव्हाही माहिती पाठवूश शकतो. घेणाऱ्याचा संगणक चालू नसला तरी अशा कंपन्यांच्या सहाय्याने ही माहिती पाठविता येते.वर्ल्ड वाइड वेब (www) या सर्वांना वाचता येऊ शकेल असे पान (साईट) अनेक कारणांसाठी कंपन्या तयार करतात. त्यांना एक विशिष्ट संकेतक्रमांक मिळतो. यालाच संकेतस्थळाच्या नावाने ओळखता येते. छोट्या कंपन्या अशा पानाचा छोटा हिस्साही आरक्षित करू शकतात. या पानावर वर्णनात्मक वा चित्रमय माहिती असते. वर्णनात्मक माहितीतून आवश्यक ते शब्द पकडून वाचकास त्या शब्दाच्या अनुषंगाने अधिक माहिती मिळू शकते. अशा वर्णनाला हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज (HTML) असे म्हणतात.

गोफर या नावाच्या प्रोग्रॅम मध्ये आपल्याला विविध पर्यायातून निवड करावी लागते. (मेनू कार्ड) व अशाप्रकारे नवनवीन तक्यामधून योग्य पर्याय निवडत इच्छित स्थळी जाता येते.इंटरनेटवर वेगवेगळया प्रकारचे संगणक जोडले जाण्याची किमया व त्यात संपर्क साधण्याची शक्यता टी.सी.पी./आय.पी. (ट्नन्स्मिशन कंट्नेल प्रोटोकोल/इंटरनेट प्रोटोकोल या नियम प्रणालींचा वापर केल्याने प्रत्यक्षात आली आहे. इंटरनेटचा प्रसार होत असताना या क्षेत्रातही नवनव्या सुधारणा होत आहेत. त्यामुळे भविष्यात इंटरनेटचा प्रसार होत असताना या क्षेत्रातही नवनव्या सुधारणा होत आहेत. त्यामुळे भविष्यात इंटरनेटचा वापर अधिक सुलभ व प्रभावीपणे करता येणार आहे.

इ मेल हा इंटरनेटचा प्राथमिक उद्देश वाटला तरी प्रत्यक्षात वापर करमणुकीसाठी खेळ, चित्रपट आणि संगीत यांच्या आदान प्रदानासाठी जास्त होत आहे.इंटरनेटचा शिक्षणासाठी उपयोग हा आपल्या भारतासारख्या प्रगतशील राष्ट्रांना एक वरदान आहे असे म्हटले तर वावगे होणार नाही. विविध क्षेत्रात होणारे संशोधन येथील संशोधनाला अधिक प्रेरणा देऊ शकेल. आरोग्याच्या क्षेत्रातही इंटरनेटचा वापर भविष्यकाळात फार प्रभावीपणे होऊ शकेल.
स्त्रोत - ज्ञानदीप.


000

ज्योतिष्य शास्त्रातील विविध प्रकार
----------------------------------------
ज्योतिष शास्त्रामध्ये हस्तरेषा, अंकज्योतिष, कुंडली शास्त्र आणि नाडी ज्योतिष असे मुख्य चार प्रकार आहेत. 
फेस रिडींग, तीळ व अंगलक्षणे यावरुन पण काही जण ज्योतिष सांगतात मात्र हस्तरेषा, अंक ज्योतिष, कुंडली आणि नाडी हे चार प्रकार प्रसिध्द आहेत. पुर्वीच्या ऋषीमुनींनी संशोधन करुन ती शास्त्रे लिहुन ठेवली आहेत. ‘बुडत्याला काडीचा आधार या उक्ती प्रमाणे ज्यावेळी सगळीकडून माणूस संकटात घेरला जातो. त्यावेळी त्याने या शास्त्रांचा मार्गदर्शक म्हणून जरुर वापर करावा.

हस्तरेषा फारच उपयुक्त शास्त्र असून हातावरील रेषा आणि उंचवटे आणि लक्षणे या आधारे काहीजण अचूक भाष्य करतात

हस्तरेषा पद्धतीला सामुद्रिक पद्धतदेखील म्हणतात.

 या पद्धतीमध्ये हाताच्या पंजाची रचना, बोटांची रचना, आकार आणि पंजावर असणाऱ्या रेषांचा अभ्यास केला जातो. 

मुख्यरेषा -
 या पद्धतीमध्ये पंजावरील सगळ्याच रेषांचा काळजीपूर्वक अभ्यास केला जातो. असे असले तरी काही रेषा या मुख्यरेषा असतात. या रेषांवरून अनेक गोष्टींचा बोध होतो. या रेषा पुढिल प्रमाणे 
१)जीवनरेषा -
 हस्तरेषा पद्धतीमध्ये जीवनरेषा फार महत्त्वाची मानली जाते. कारण या रेषेवरुन आयुर्मान, जीवनातील महत्त्वाच्या घटना, पुढे मिळणाऱ्या संधी, आयुष्यामध्ये येणारी संकटे, या गोष्टी कळतात. ही रेषा अंगठा आणि तर्जनीमधून निघून मनगटापर्यंत म्हणजे मणी बंधापर्यंत येते. लांब आणि स्पष्ट दिसणारी जीवनरेषा चांगल्या आरोग्याचे, समृद्धीचे लक्षण असते. वाकडी किंवा तुटक तुटक असणारी जीवनरेषा अशुभ मानली जाते. 
२)मस्तिष्करेषा -
 मस्तिष्करेषा व्यक्तीचा स्वभाव, मानसिक स्थिती आणि छंद, विचार करण्याची पद्धत दर्शवते. ही रेषा जीवनरेषेबरेबरच सुरु होते आणि कधी जीवनरेषेबरेबरच खाली येते तर कधी वर जाते. ही रेषा जेवढी निर्दोष असते तेवढी ती व्यक्ती श्रेष्ठ असते. आखुड किंवा तुटक असणारी मस्तिष्करेषा कमकुवत मनाचे लक्षण असते.
३)ह्रदयरेषा -
 करंगळीच्या खालून ही रेषा सुरु होते आणि तर्जनीकडे जाणारी असते. ही रेषा व्यक्तीचे गुण, स्वभाव, संवेदनशीलता, अवगुण दर्शवते. ही रेषा खालच्या बाजूला झुकली असेल तर ती व्यक्ती अंतर्मुख असते. तिला साहित्य आणि संगीतामध्ये रुची असते. वरती जाणारी रेषा असेल तर त्या व्यक्तीला तांत्रिक गोष्टींमध्ये रस असतो. 
४)भाग्यरेषा -
 मनगटापासून मधल्या बोटापर्यंत जाणाऱ्या रेषेला भाग्यरेषा असे म्हणतात. ही रेषा स्पष्ट असेल तर तुमचे भाग्य चांगले असते. मनगटाच्या खालून निघणारी रेषा परिवाराच्या सहकाऱ्यामुळे भाग्योदय होइल असे सांगते. चंद्र पर्वतातून निघणारी रेषा स्वयंभू व्यक्तिमत्त्व असल्याचे दर्शवते.
माहिती संदर्भ :- आंतरजाल

-----------------------------------------------
संकलन :- सतीश अलोणी @


00000

  🔸नोबेल पारितोषिक.🔸

---------------------------------------------
🔸संकलन: सदानंद पाटील, रत्नागिरी.
---------------------------------------------

नोबेल पारितोषिक हा जगातील अत्यंत प्रतिष्ठेचा पुरस्कार आहे. रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, साहित्य, जागतिक शांतता, वैद्यकशास्त्र किंवा जीवशास्त्र आणि अर्थशास्त्र या पाच क्षेत्रांतील अतुलनीय कामगिरीसाठी किंवा संशोधनासाठी प्रतिवर्षी हा पुरस्कार दिला जातो. स्वीडिश वैज्ञानिक आल्फ्रेड बर्नार्ड नोबेलने आपल्या मृत्युपत्रात या पुरस्कारांची तरतूद केली होती. त्याच्या मृत्यूनंतर पाच वर्षांनी इ.स. १९०१ मध्ये पहिल्यांदा हे पुरस्कार देण्यात आले. ऑक्टोबर २००६ पर्यंत एकूण ७६३ व्यक्तींना एकूण ७८१ नोबेल पारितोषिके देण्यात आली आहेत.

इ.स. १९६९ पासून आल्फ्रेड नोबेल याच्या स्मरणार्थ स्वीडनच्या मध्यवर्ती बॅंकेने (रिक्स बॅंकेने) अर्थशास्त्रातील मौलिक कार्यासाठी सहावे नोबेल पारितोषिक देण्यास सुरुवात केली.

नोबेल यांच्या मृत्युपत्रातील तरतुदी.
आल्फ्रेड नोबेलच्या मृत्यूनंतर इ.स. १८९७ साली त्याचे मृत्युपत्र उघडून पाहण्यात आले व चार वर्षांनंतर ते कायदेशीर असल्याचे सिद्ध झाले. या मृत्युपत्रानुसार त्याने कमावलेल्या अमाप संपत्तीचा मोठा हिस्सा (३.१ कोटी स्वीडिश क्रोनार) नोबेल निधीसाठी ठेवलेला होता. हा निधी सुरक्षित ठेवींमध्ये गुंतवून मिळणाऱ्या उत्पन्नाच्या ६० ते ७० टक्के रकमेचे पाच सारखे भाग करून प्रत्येक क्षेत्रातील पारितोषिकासाठी देण्याचे आल्फ्रेडने आपल्या मृत्युपत्रात सुचविले होते.

या मृ्त्युपत्रामध्ये कोणकोणत्या कार्यक्षेत्रात व कोणकोणत्या निकषांवर पारखून पारितोषिके द्यावीत याचेही त्याने विवेचन करून ठेवले होते. त्यासाठी आवश्यक ते स्पष्टीकरण करणारे नियम व प्रशासकीय तपशील हे मृत्युपत्राचे विश्वस्त, पारितोषिके देणाऱ्या संस्थांचे प्रतिनिधी व नोबेल यांचे कुटुंबीय यांनी चर्चा करून तयार केले व स्वीडनच्या राजाने याला इ.स. १९०० साली मान्यता दिली.

आल्फ्रेड नोबेलच्या मृत्युपत्रान्वये,
भौतिकी, रसायनशास्त्र व अर्थशास्त्र यांतील पारितोषिके देण्याचा अधिकार द रॉयल स्वीडिश ॲकॅडमी ऑफ सायन्सेसकडे, वैद्यकशास्त्राचे पारितोषिक देण्याचा अधिकार द रॉयल कॅरोलिन मेडिको-सर्जिकल इन्स्टिट्यूटकडे, साहित्याचे पारितोषिक देण्याचा अधिकार द स्वीडिश ॲकॅडमी आणि शांततेसाठी देण्यात येणाऱ्या नॉर्वेच्या संसदेने (स्टोर्टिंग) नेमलेली द नॉर्वेजियन नोबेल कमिटी या चार संस्थांकडे ही पारितोषिके देण्याचे अधिकार आहेत.

पारितोषिकासंबंधीचा निर्णय घेण्याचे व तो जाहीर करण्याचे काम या संस्था करतात. पारितोषिके देण्याचा निर्णय घेण्यासाठी प्रत्येक संस्थेच्या मदतीसाठी तीन ते पाच सदस्यांची समिती असते. या समित्या जरूर वाटल्यास इतर तज्‍ज्ञांनाही चर्चेसाठी बोलावू शकतात. पारितोषिकासाठी सुचविण्यात आलेल्या उमेदवाराच्या कार्याचे मूल्यमापन करून या समित्या आपला निर्णय देतात, पण हा निर्णय मानणे संस्थांवर बंधनकारक नसते.

मृत्युपत्रातील तरतुदीनुसार नोबेल प्रतिष्ठान स्थापण्यात आले असून ही संस्था नोबेल निधीची कायदेशीर मालक आहे. वरील चार संस्थांच्या सहकार्याने ही संस्था सर्व प्रशासकीय कामे संयुक्तपणे पाहते. इतर सर्व नोबेल संस्था प्रतिष्ठानच्या नियंत्रणाखाली आहेत मात्र पारितोषिकांच्या निवाड्याशी आणि त्यासंबंधीच्या कार्याशी प्रतिष्ठानचा काहीही संबंध नसतो.

नामांकन.
कायदेशीरपणे नमूद केलेल्या व पारितोषिके देणाऱ्या संस्थांनी नेमून दिलेल्या व्यक्तीच पारितोषिकांसाठी उमेदवारांची नावे सुचवू शकतात. स्वतःच आपले नाव सुचविल्यास ती व्यक्ती आपोआपच पारितोषिकासाठी अपात्र ठरते.

उमेदवारांची नावे सुचविण्यासाठी पुढील व्यक्ती पात्र असतात.

आधीचे नोबेल पारितोषिक विजेते. पारितोषिके देणाऱ्या संस्थांचे सभासद. काही विशिष्ट विद्यापीठांचे आणि महाविद्यालयांचे तसेच पारितोषिके देणाऱ्या संस्थांनी खास निमंत्रित केलेले त्या त्या क्षेत्रातील प्राध्यापक. साहित्याच्या पारितोषिकासाठी लेखकांच्या काही प्रातिनिधिक संघटनांचे सभासद. द स्वीडिश अकॅडमीशी तुल्य अशा संस्थांचे सभासद. शांततेच्या पारितोषिकासाठी आंतरराष्ट्रीय स्वरूपाच्या काही संसदीय व इतर संस्थांचे सभासद उमेदवारांची शिफारस करू शकतात.

उमेदवारांच्या नावाची शिफारस केवळ व्यक्तीलाच करता येते संस्थेला नाही, मात्र अनेक पात्र व्यक्ती संयुक्तपणे शिफारस करू शकतात. पारितोषिके देणाऱ्या संस्थांकडून पात्र व्यक्तींना नावे सुचविण्याविषयी विनंतीपत्रे पाठविली जातात. त्यांनी संबंधित कागदपत्रांसह आपल्या शिफारशी १ फेब्रुवारीच्या आत पाठवायच्या असतात. १ फेब्रुवारीपासून नोबेल समित्यांचे काम सुरू होते व सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये समित्या आपल्या शिफारशी पारितोषिके देणाऱ्या संस्थांकडे पाठवितात. या संस्था १५ नोव्हेंबरपर्यंत अंतिम निर्णय जाहीर करतात. नावे सुचविली जाण्यापासून ते अंतिम निर्णयापर्यंत होणारे वादविवाद, चर्चा, मतदान इत्यादी बाबतीत गुप्तता राखली जाते. नोबेल पारितोषिकांच्या निर्णयाविरुद्ध दाद मागता येत नाही.

नामांकन आणि प्रदान प्रक्रिया.
साधारणतः ३००० लोक पुरस्कारासाठी नामांकने पाठवतात. त्यापैकी नोबेल समिती ठरावीक नामांकने निवडते.

000


सीएनजी म्हणजे काय ?

गेल्या काही वर्षांपासून आपण सीएनजीचं नाव ऐकतो आहोत. प्रथम दिल्ली, नंतर मुंबई आणि आता अहमदाबाद, पुणे यासारख्या शहरांमध्ये सर्व सार्वजनिक वाहनांसाठी सीएनजीचा वापर अनिवार्य ठरवला गेला आहे. कित्येक खासगी वाहनेही आता याच इंधनाचा वापर करत आहेत. एवढेच काय, पण मुंबई शहराच्या कित्येक भागात स्वयंपाकासाठीही हा वायू आता इंधन म्हणून पुरवला जात आहे. साहजिकच हे इंधन काय आहे आणि ते वापरल्याने नेमका कोणता फायदा होतो हे प्रश्न मनात उभे राहतात.

सीएनजी हे कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस या त्याच्या संपूर्ण नावाचे लघुरूप आहे. नावावरूनच हा वायू आहे आणि तो नैसर्गिकरित्या उपलब्ध आहे हे स्पष्ट होते. पेट्रोल किंवा डिझेल यासारखी खनिज इंधनं जशी आपल्याला जमिनीच्या खाली नैसर्गिक प्रक्रियांमधून तयार होणाऱ्या वनस्पतींच्या जिवाश्मांमधुन मधून मिळतात तसाच हा वायूही नैसर्गिक खनिजांच्या रूपातच उपलब्ध असतो. खनिजाच्या रूपात मिळणाऱ्या कच्च्या तेलावर रासायनिक शुद्धीकरणाच्या प्रक्रिया केल्याशिवाय पेट्रोल, डिझेल, केरोसीन वगैरे इंधनं मिळत नाहीत; पण नैसर्गिक वायू मात्र थेट मिळतो.

यात बहुतांशी मिथेन वायूचा समावेश असतो. तो ज्वलनशील असल्यामुळे त्याचा थेट वापर करता येतो. मात्र तो ग्राहकांच्या वापरासाठी उपलब्ध करून देण्यासाठी त्याच्यावर दाब टाकून त्याचं आकारमान कमी करावं लागतं. हवेचा सामान्य दाब असताना त्याचं जे आकारमान असतं त्याच्या केवळ एक टक्का आकारमानात त्याला बंदिस्त करण्यात येतं. त्यासाठी त्याच्यावर समुद्रसपाटीवर असणाऱ्या हवेच्या दाबाच्या दोनशे ते अडीचशे पट जास्त दाब द्यावा लागतो. त्याचं आकारमान अशा रितीने आकुंचित केलं जात असल्यानेच त्याला कॉम्प्रेस्ड गॅस असे म्हणतात.

त्याची किंमत पेट्रोलच्या तुलनेत कमी असल्याने त्याचा वापर किफायतशीर तर ठरतोच, पण त्याच्या ज्वलनापायी पेट्रोलपेक्षा ४० ते ५० टक्के कमी कार्बन वायू हवेत सोडला जात असल्याने पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीनेही तो फायदेशीर ठरतो. शिवाय पेट्रोलमध्ये असणारे शिसे किंवा सल्फर हे पदार्थही त्यात नसतात. साहजिकच त्यांच्यापायी होणारे प्रदूषणही टळते.

हवेपेक्षा तो हलका असल्यामुळे गळती झालीच तर पेट्रोलसारखा जमिनीवर किंवा पाण्यावर साचून राहत नाही. हवेत उडून जातो. शिवाय त्याचा ज्वलनबिंदूही पेट्रोलच्या तुलनेत जवळजवळ दुप्पट असल्याने तो सहजासहजी पेटही घेत नाही. त्यामुळे गळती झाल्यानंतरही जरी तो तापलेल्या नळ्यांच्या संपर्कात आला तरी त्यापासून स्फोट होण्याचा धोका संभवत नाही.

जगभर आज त्याचा वापर वाढत आहे. २००९ पर्यंत जगातली जवळजवळ सव्वा कोटी वाहने या इंधनावर चालत होती. याचा सर्वात जास्त वापर भारतीय उपखंडात होत आहे. पाकिस्तान या बाबतीत आघाडीवर आहे; पण आपल्या देशातही आता दहा लाख वाहनांसाठी याच इंधनाचा वापर होत आहे. जसजशी हा काय पुरविणारी केंद्रं वाढत जातील तसतसा त्याचा वापरही वाढत जाईल.

डॉ. बाळ फोंडके यांच्या 'काय ?' या पुस्तकातून

0000

भारतीयांना मिळाणाऱ्या रविवारच्या सुट्टी मागे मराठी माणसाचा सिंहाचा वाटा.🔸

आपल्याकडे सर्वसाधारणपणे रविवार हा सुट्टीचा दिवस मानला जातो. या दिवशी शाळा, कॉलेजेस, बॅंका, सरकारी-खाजगी कार्यालये बंद असतात. मात्र रविवारीच सुट्टी असण्यामागचे कारण तुम्हाला माहीत आहे का? रविवार हा सार्वजनिक सुट्टीचा दिवस म्हणून का घोषित करण्यात आला? भारतीयांना मिळाणाऱ्या रविवारच्या सुट्टेमागे मराठी माणसाचा सिंहाचा वाटा आहे, हे तुम्हाला माहित आहे का? या सुटीचा इतिहास काय?  याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.

इंग्रजांच्या काळात मीलमध्ये काम करणाऱ्या कामगारांना सातही दिवस काम करावे लागत असे त्यांना सुट्टी मिळत नसे. आठवड्यात हक्काची एकही सुटी मिळत नसे. त्याकाळी ब्रिटिश अधिकारी रविवारी चर्चमध्ये प्रार्थना करण्यासाठी जात असत. मात्र कामगारांसाठी अशी काही परंपरा नव्हती.

कामगारांचे नेते नारायण मेघाजी लोखंडे यांनी १८८४ मध्ये मुंबईत बॉम्बे मिल हॅण्ड्‌स असोसिएशन स्थापना केली. त्यांनी इंग्रजांसमोर साप्ताहिक सुट्टीचा प्रस्ताव ठेवला. या प्रस्तावात त्यांनी असे नमूद केले की, आम्ही स्वत:साठी आणि कुटुंबासाठी सहा दिवस काम करतो. त्यामुळे आठवड्याच्या शेवटी एक दिवस आम्हाला देशाची सेवा करण्यासाठी तसेच काही सामाजिक कामे कऱण्यासाठी मिळावा. तसेच रविवार खंडोबा या देवाचा हा वार असल्याने त्या दिवशी साप्ताहिक सुट्टी मिळावी.

नेते नारायण मेघाजी लोखंडे यांनी तब्बल सात वर्ष रविवारच्या सुट्टीसाठी लढा दिला. २४ एप्रिल १८९० रोजी लोखंडे यांच्या नेतृत्त्वाखाली हजारो मिल कामगारांनी मोर्चा काढला. लोखंडे यांनी केलेला तीव्र संघर्षाची दखल घ्यावी लागली. मिलमालकांनी बैठक घेऊन रविवारच्या सार्वजनिक सुटीची मागणी मान्य केली.

१८८४ मध्ये रविवारच्या सुट्टीसाठी सुरू झालेला संघर्ष १० जून १८९० रोजी संपला.

कोण आहेत नारायण मेघाजी लोखंडे ?
भारतीयांना हक्काची रविवारची सुट्टी मिळण्यात एका मराठी व्यक्तीचा सिंहाचा वाटा आहे. सरकारी क्षेत्राबरोबरच खाजगी क्षेत्रातही रविवारच्या सुटीचं नातं जोडलं गेलेय ते भारतातल्या कामगार चळवळीचे पहिले नेते नारायण मेघाजी लोखंडे यांच्यामुळेच. १८८४मध्ये लोखंडे यांनी कामगारासाठी लढा दिला. त्यांचा लढा तब्बल सात वर्ष चालला. यादरम्यान त्यांनी अनेक आंदोलने केली. अखेर १० जून १८९० रोजी इंग्रंज सरकारने भारतीयांना रविवारची सुट्टी जाहीर केली. इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाल्यानंतरही भारतामध्ये आजही रविवारची सुट्टी आहे.

लोखंडे यांना ट्रेड यूनियन आंदोलनाचे जनक म्हणूनही ओळखले जाते. लोखंडे महत्मा फुले यांचे जवळचे सहकारी होते. २००५ मध्ये नारायण मेघाजी लोखंडे यांच्या सन्मानार्थ भारत सरकारने पोस्टाचे तिकीट जारी केले होते.

म्हणून काही पाश्चिमात्य देशात रविवारी सुट्टी?
सर्वसाधारणपणे ज्या देशांवर ब्रिटिशांनी राज्य केले त्या देशांमध्ये रविवार हा सुटीचा दिवस असतो. याचे कारणही मजेशीर आहे. सहा दिवसात सृष्टी निर्माण केल्यावर देवाने सातव्या दिवशी विश्रांती घेतली असे बायबलमध्ये परमेश्वराने सृष्टी कशी निर्माण केली त्याचे वर्णन आहे. पाश्चिमात्यांचा आठवडा सोमवार ते शनिवार असाच असतो आणि त्यामुळे सहा दिवस काम केल्यावर ते सातव्या दिवशी सुटी घेतात. चर्चमध्ये रविवारी सकाळी सकाळी जाऊन प्रार्थना करतात.


000

पर्यावरण या विभागात विविध प्राण्यांची माहिती करून देतो.  या विभागात सध्या आपण विविध कीटकांची माहिती घेत आहोत.   आजही आम्ही आपल्यासाठी ही माहिती घेऊन आलो आहोत.   चला तर मग अधिक वेळ वाया न घालवता सुरुवात करुया आजच्या विशेष सदराला.    

1.   रात किडा.   या कीटकाचा ऑर्‌थॉप्टेरा गणातील ग्रायलिडी या कुलात समावेश होतो. या कीटकांचे नर ‘किर्र’ असा नादमय आवाज करतात. यांच्या सु. २,००० जाती आहेत. या कीटकांची लांबी ३ मिमी. ते ५० मिमी. इतकी असू शकते. यांच्या शृंगिका (सांधेयुक्त लांब स्पर्शेंद्रिये) सूक्ष्म व नाजूक असतात.मागील पाय उडी मारण्यास योग्य व यांचे गुल्फ (घोट्यासारखे भाग) तीन खंडांचे बनलेले असतात. उदरावर दोन पुच्छिका असतात. पुढचे पंख ताठर व चिवट असतात आणि नरात यावरच आवाज करण्याचे साधन असते. मागील पंख लांब व पातळ असून त्यांचा उडण्याकरिता उपयोग केला जातो.

रातकिडा

पंखांचा आवाज : (अ) उघडलेल्या स्थितीतील पंख : (१) एका पंखाच्या कडेवरील खरड यंत्रणा, (२) दुसऱ्या पंखाच्या खालील बाजूस असलेले दाते; (आ) मिटलेल्या स्थितीतील पंख.एका पुढील पंखाच्या कडेवरील खरड यंत्रणा दुसऱ्या पुढील पंखाच्या खालच्या बाजूस असलेल्या ५० ते २५० दात्यांवर घासून या कीटकांतील नर ‘किर्र’ असा आवाज काढतात. खरड यंत्रणा व दाते पंखांवर असल्याने कोणता पंख वर व कोणता खाली आहे याला महत्त्व नसते. आवाजाची प्रभावी कंप्रता(दर सेकंदाला होणारी कंपनांची संख्या) प्रत्येक सेकंदाला किती दाते घासले गेले यावर अवलंबून असते. एका सेकंदाला मोठ्या आकारमानाच्या कीटकांत १,५०० आवर्तने, तर लहान कीटकांत १०,००० आवर्तने इतका बदल असू शकतो. आवाज हा स्पंदरूपाने निर्माण होतो. हे स्पंद एका सेकंदात २५० इतके असू शकतात. पंखाच्या प्रत्येक फटकाऱ्यास एक स्पंद याप्रमाणे आवाज निर्माण होतात.स्पंदाची गती आणि आवाजाची लय यांतील फेरबदल हे कीटकाच्या स्वभाव विशेषावर अवलंबून असतात. मादीस बोलविण्याकरिता एक प्रकारचा किर्र आवाज, मादीस मीलनास उद्युक्त करण्याकरिता दुसऱ्या प्रकारचा किर्र आवाज, शत्रूला भिवविण्याकरिता तिसऱ्याच प्रकारचा किर्र आवाज काढला जातो.नरात वा मादीत पुढील पायांच्या पोकळीत कर्णेंद्रिय असतात.त्यामुळे त्यांना आवाजाची दिशा निश्चित करता ये
तापमानाचा रातकिड्यांच्या आवाजावर परिणाम होतो. उत्तर अमेरिकेतील झाडावर राहणारा रातकिडा इकँथस फुलटोनी हा थर्मामीटर क्रिकेट म्हणून ओळखळा जातो. कारण याची किरकिर ऐकून बाजूच्या तापमानाचा अंदाज करता येतो. माद्या आपल्या अंडनिक्षेपकाच्या (अंडी घालण्याकरिता वापरण्यात येणाऱ्या विशेष संरचनेच्या) साह्याने त्यांची अंडी जमिनीत किंवा वनस्पतीच्या खोडावर घालतात. यामुळे वनस्पतीच्या लहान खोडास नुकसान पोहोचते. उत्तर गोलार्धात रातकिडे साधारण हिवाळ्यापूर्वी प्रौढ होतात. हिवाळ्यानंतर वसंत ऋतूत अंड्यांतून डिंभ (भ्रूणानंतरची स्वतंत्रपणे अन्न मिळवून जगणारी व प्रौढाशी साम्य नसणारी सामान्यतः क्रियाशील पूर्व अवस्था) बाहेर येतात. डिंभ ६ ते १२ वेळा कात टाकतो. प्रौढावस्थेतील रातकिडा साधारणपणे ६ ते ८ आठवडे जगतो. रातकिडा हा सर्वभक्षक प्राणी आहे. हे किडे मानवाच्या निवासात तसेच आजूबाजूंच्या उकिरड्यावर आढळतात. काही जमिनीत राहणाऱ्या जाती झाडांच्या मुळांवर जगतात आणि त्यामुळे त्यांची संख्या फार झाल्यास पिकांना व बागांना ते धोकादायक ठरतात. मासेमारीत गळाला माशाचे भक्ष्य म्हणून लावण्याकरताही यांचा उपयोग करतात. प्रयोगशाळेतही हे कीटक पुष्कळ प्रमाणात वापरले जातात. पूर्वेकडील देशांत नर त्यांच्या आवाजाकरिता पाळले जातात. चीनमध्ये करमणुकीकरिता रातकिड्यांच्या झुंजी लावण्याची प्रथा हजार वर्षांहून अधिक काळ रूढ आहे..    

2.    गोम.    आर्थ्रोपोडा (संधिपाद प्राण्यांच्या) संघातील मिरिअ‍ॅपोडा वर्गातल्या ऑपिस्थोगोनिएटा या उपवर्गाच्या कायलोपोडा गणातील कृमीसारखा दिसणारा लांब भूचर प्राणी. जगातील सगळ्या उष्ण आणि समशीतोष्ण प्रदेशांत हा आढळतो.

बहुतेक गोमा दिवसा जमिनीच्या, दगडधोंड्यांच्या किंवा पालापाचोळ्याच्या खाली, खडकांच्या भेगांत किंवा घरांच्या काळोख असलेल्या दमट कोपऱ्यात राहतातपण रात्री भक्ष्य शोधण्याकरिता बाहेर पडतात. गोमांच्या थोड्या जाती सागरी असून त्या वेलाचिन्हांच्या (भरती व ओहोटी यांच्या खुणांच्या) मधल्या प्रदेशात समुद्रतृणे, दगड, रिकामे शंख आणि कृमींच्या मोकळ्या पडलेल्या नळ्या यांत राहतात. गोड्या पाण्यात गोमा राहत नाहीत.

गोमेची लांबी सर्वसाधारणपणे २·५ — १५ सेंमी. असते. पण एका वंशात ती ३० सेंमी.पर्यंत असल्याचे दिसून आले आहे. शरीर उत्तराधर (वरून खाली) चपटे आणि खंडयुत असते. त्याचे शीर्ष आणि धड असे दोन स्पष्ट भाग असतात. शीर्षावर संवेदी शृंगिकांची (सांधे असलेल्या लांब स्पर्शेंद्रियांची) एक जोडी, चर्वणाकरिता दंतुर (दाते असलेल्या) जंभांची (भक्ष्याचे तुकडे करण्याकरिता असणाऱ्या संरचनांची) एक जोडी आणि मुखाकडे अन्न नेण्याकरिता जंभिकांच्या (जंभांच्या मागे असणाऱ्या विविध कार्ये करणाऱ्या उपांगांच्या) दोन जोड्या असतात. डोळे सामान्यतः नसतात, पण असलेच तर ते अक्षिकांच्या (बारीक डोळ्यांच्या) लहान समूहाच्या स्वरूपाचे असतात. घरांत आढळणाऱ्या गोमांचे डोळे कीटकांच्या संयुक्त नेत्रांसारखे असतात. धडाच्या सगळ्या खंडांची वरची व खालची पृष्ठे जाड पट्टिकांनी झाकलेली असून त्या लवचिक कलांनी (पातळ पटलांनी) जोडलेल्या असतात. धडाचा पहिला आणि शेवटचे दोन खंड वगळून प्रत्येक खंडावर पायांची एक जोडी असते; त्याचप्रमाणे जवळजवळ प्रत्येक खंडावर श्वासरंध्रांची एक जोडी असते. धडाच्या पहिल्या खंडावर एक पोकळ बाकदार चिमटा वा विषारी नखरांची एक जोडी असते. पकडलेल्या भक्ष्याच्या अंगात हे तीक्ष्ण नखर खुपसून विषाच्या अंतःक्षेपणाने (शरीरात सोडण्याने) गोम त्याला मारते. लहान कीटक, कृमी, पिकळ्या इ. यांचे भक्ष्य होय. पण काही गोमा शाकाहारी असतात.

आहारनाल (अन्नमार्ग) साधा व सरळ असतो. मालपीगी नलिका (आतड्यात उघडणाऱ्या धाग्यासारख्या उत्सर्जन नलिका) दोन असून त्या आहारनालाच्या मागच्या भागात उघडतात. श्वासनाल कीटकांच्याप्रमाणेच शाखित असून श्वासरंध्रांनी बाहेर उघडतात. हृदय लांब नळीसारखे व कोष्ठित (भाग पडलेले) असते. तंत्रिका तंत्र (मज्जासंस्था) जवळजवळ ॲनेलिडांच्या तंत्रिका तंत्रासारखे असते [→ ॲनेलिडा]. अनुकंपी तंत्रिका तंत्रही (आहारनालाला जाणारा आंतरांग तंत्रिका तंत्राचा भाग) असते [→ तांत्रिका तंत्र]. लिंगे भिन्न असून जनन ग्रंथी सामान्यतः एकच असते, जननरंध्रे शेवटच्या खंडाच्या अलीकडील खंडावर उघडतात. काही गोमा मातीत अंडी घालतात पण इतर काही अंडी वाळू नयेत म्हणून अंड्यांच्या पुंजक्याभोवती आपले अंग घट्ट गुंडाळतात.

गोम सहसा माणसाला चावत नाही पण चावलीच, तर ती जागा काही वेळ अतिशय दुखते पण दुखणे लवकरच थांबते. मोठ्या गोमांच्या चावण्यामुळे चावलेल्या जागी सूज येऊन अतिशय आग होते, तापही येतो..    

आपण वाचत आहात साहित्य उत्सव समूह.   यानंतर वाचूया आणखी काही कीटकांची माहिती.    

3.    मुंगूस.   सस्तन मांसाहारी प्राण्यांच्या व्हायव्हेरिडी कुलातील हर्पेस्टिनी उपकुलात मुंगुसाचा समावेश होतो. मुंगसांच्या बऱ्याच जाती आफ्रिकेतील उष्ण कटिबंधी प्रदेशात आढळतात. यांतील हर्पेस्टिस ही प्रजाती स्पेन व दक्षिण आशियात पसरली आहे. हिच्या सहा जाती भारतात आढळतात. ह. एडवर्डसी हे सामान्य मुंगूस व ह. ऑरोपंक्टॅटस हे लहान भारतीय मुंगूस भारतात सर्वत्र आढळते. हे प्राणी आकाराने लहान असून स्वतः तयार केलेल्या बिळात राहतात. आकाराने जरी लहान असले, तरी ते आपल्यापेक्षा कितीतरी पटींनी मोठ्या असलेल्या प्राण्यांवर हल्ला करतात. हे स्वभावाने हिंस्त्र आहेत. याचे मुस्कट निमुळते, कान लहान, पाय आखूड व शेपूट लांब असते. याचे केस कबरे असून त्यांचा रंग धूसर-तपकिरी असतो. मुंगूस खवळले म्हणजे त्याचे केस उभे राहतात व या अवस्थेत ते असेल त्यापेक्षा आकाराने मोठे दिसते याचे भक्ष्य लहान सस्तन प्राणी, उंदीर, पक्षी व त्यांची अंडी, साप, विंचू, बेडूक व कीटक हे असते. कधीकधी कंदमुळे व फळे यांवरही ते आपला निर्वाह करते. ते जरी शाकाहारी अन्न घेत असले, तरी मांसाहार त्यांना जास्त प्रिय आहे. त्यांचे दात मांसाचे तुकडे करण्यास व मांस खाण्यास जास्त सोयीस्कर आहेत. मुंगूस चपळ, सावधान व धीट असा प्राणी आहे. बहुधा तो आपले भक्ष्य पाठलाग करून जमिनीवर पकडतो. भक्ष्यावर उघड उघड हल्ला करताना जर भक्ष्य बिळात जाऊन लपले, तर आपल्या तीक्ष्ण नखाने बीळ उकरून तो शोधून काढतो. यांचे कान लहान असून ते बंद करता येतात त्यामुळे माती उकरताना कानात माती किंवा इतर कचरा जात नाही. अंड्यास भोक पाडून आतील बलक तो तोंडाने शोषून घेतो. सर्प हे त्याचे आवडते भक्ष्य होय. नागासारखे भयंकर विषारी सर्पही तो अत्यंत चपळाईने पकडतो. सापाचे किंवा नागाचे डोके तोंडात धरून चटकन त्याची कवटी फोडून त्याला मारणे व असे करताना सापाचा विषारी दात आपणास लागणारा नाही याची दक्षता तो घेतो. सापाचे विष मुंगसास घातक नसते, ही समजूत निराधार आहे. सापाचे विष मुंगुसास भिनले, तर मुंगुस एका विशिष्ट प्रकारच्या (मुंगूसवेल) झाडाची मुळे खाते व यामुळे या विषाचा काही परिणाम होत नाही, अशीही एक समजूत आहे. मुंगसाच्या जिभेची पृष्ठभाग खडबडीत असतो व यात सापाच्या विषावर तोडगा असतो, अशी ब्रह्मदेशात समजूत आहे. फार तर एवढे म्हणता येईल की, काही डुकरे व मांजरे या प्राण्यांप्रमाणे मुंगूसही सर्पविषाबाबत कमी संवेदनाक्षम आहे. मुंगसाचे तोंड पहाणे शुभ असते, असाही एक समज आहे. जमेका व मार्तीनीक या प्रदेशांत व्हापर जातीच्या सापांचा नाश करण्याकरिता साप मारण्यात पटाईत असे ह. आरोपंक्टॅटस या जातीचे मुंगूस सोडले. तेथे या मुंगसाने सापाचा तर नाश केलाच; पण कोंबड्यांवरही हल्ला केला. तेव्हा त्यांची संख्या कमी करण्याचे उपाय योजावे लागले. वर निर्देश केलेल्या दोन जातींव्यतिरिक्त आणखी चार जाती भारतात आढळतात.

ह. एडवर्डसी या जातीचे मुंगुस सर्वत्र आढळते. गावाजवळील उघडी मैदाने, जंगले तसेच घराची छप्परे व आच्छादिलेली उथळ गटारे यांतही हे आढळतात. यांच्या पाठीवर एकाआड एक असे गडद व फिकट रंगाचे पट्टे असतात. ह. स्मिथी हे मुंगूस आकाराने मोठे व वर्णाने लालसर असते. ह. आरोपंक्टॅटस हे आकाराने लहान असलेले मुंगूस साप मारण्यात पटाईत आहे. हे सर्व भारत, अफगाणिस्तान, बलुचिस्तान व इराण येथे आढळते. ह. फ्युस्कस या जातीच्या मुंगसाचा रंग तपकिरी असतो. हे दक्षिण भारतातील पर्वत रांगांत ९०० ते १,८५० मी. उंचीवर आढळते. ह. व्हीटिकोलीस हे आकाराने मोठे मुंगूस आहे. याच्या गळ्याच्या बाजूस कानांपासून खाद्यांपर्यंत काळे पट्टे असतात. हे जंगलात आढळते. याच्या गुदद्वाराजवळ गंध ग्रंथी असतात. भारतात सह्याद्रीच्या रांगांत याची वस्ती आहे. ह. युर्‌व्हा हे खेकडे खाणारे मुंगुस आहे. ब्रह्मदेश, चीन, मलाया व आसाम येथे सु. १,९८० मी. उंचीपर्यंत याची वस्ती आहे. हे मुंगूस पोहू शकते.

गुदद्वाराजवळील दुर्गंध सोडणाऱ्या ग्रंथीचा उपयोग फक्त ह. व्हीटिकोलीस व ह. युर्‌व्हा या दोन जातींतील मुंगूस समूहातील इतर मुंगसांस संदेश देण्याकरिता करतात. मुंगूस बिळे करून समूहाने त्यात राहतात. मनुष्यवस्तीजवळ राहणाऱ्या दोन जातींत विणीचा असा ठराविक हंगाम नाही. मादीला प्रत्येक वेळी दोन किंवा तीन पिले होतात. जंगलात ही पिले बिळांत तर मनुष्यवस्तीत छपराच्या सांदीफटींत ठेवली जातात. पिलांचे संरक्षण मादी करते. सुमारे सात महिन्यांत त्यांची लैंगिक वाढ पूर्ण होते व ती स्वतंत्र जीवन जगू लागतात. प्राणीसंग्रहालयात ठेवलेल्या मुंगसाचे आयुष्य ७ ते १३ वर्षांपर्यंत असलेले आढळले आहे.

आकाराने सर्वांत मोठे (एकूण लांबी सु. १.५ मी.) ईजिप्शियन मुंगूस (ह. इक्न्युमॉन) हे आफ्रिका व यूरोपात आढळते, तर कमकुवत दाताचे व वाळवी खाणारे पांढऱ्या शेपटीचे मुंगूस (इक्न्युमिया अल्बीकौडा), दलदलीतील बेडकांसारख्या  प्राण्यांवर उपजीविका करणारे मार्श मुगूंस (ॲटिलॅक्स पॅलुडिनोसस) व तांबूस रंगावर काळे पट्टे असणारे मुंगूस (मुंगुस मुंगुस) ही आफ्रिकेच्या पूर्व व पश्चिम भागांत आढळतात. मीरकॅट (सरिकेटा सरिकेट्टा) हे बसक्या नाकाचे मुंगूस एकाच बिळात खारीबरोबर गुण्यागोविंदाने राहते; तसेच ते चटकन,  माणसाळतेही..    

4.    इंगळी.    (सतफल, समुद्रफळ, निवर; हिं. हिज्जल; क. केंपुकणगिन; सं. धात्रीफल, विषया; इं. स्मॉल इंडियन ओक; लॅ. बॅरिग्टोनिया ॲक्युटँग्युला, कुल-मिर्टेसी). सु.  १०–१५ मी. उंचीचा हा सदापर्णी वृक्ष भारतात सर्वत्र विशेषतः नद्या व ओढे यांच्या काठाने, पाणथळ जागी व समुद्रकिनाऱ्याजवळ आढळतो; शिवाय श्रीलंका, मलाया, ब्रह्मदेश, उ. ऑस्ट्रेलिया इ. भागांतही तो आढळतो. साल जाड, गर्द तपकिरी; पाने साधी, लहान देठाची, चिवट, दातेरी, लंबगोल पण तळाशी निमुळती, एकाआड एक, ७·५० – १३ × ५ सेंमी.; फुले लहान, लाल, सुगंधी व लोंबत्या मंजरीवर एप्रिल-मे महिन्यांत येतात. संदले व प्रदले प्रत्येकी चार, केसरदले अनेक, लांब व लाल; किंजपुट अधःस्थ [→ फूल; मिर्टेसी]. मृदुफळ २·५ - ४ × १·८ सेंमी. सूत्रल (तंतुयुक्त), जाड सालीचे, एकबीजी, चौधारी व लंबगोल. ह्या वृक्षाची जून पाने व मुळे कडू पण पौष्टिक; बीजचूर्ण कफोत्सारक व वांतिकारक असून डोकेदुखीवर तपकिरीप्रमाणे ओढतात. साल, बी व मूळ मत्स्यविष; पानांचा रस अतिसारावर देतात. साल कातडी कमावण्यास वापरतात. लाकूड मऊ पण टिकाऊ असून ते नावा, विहिरीचा कठडा, कपाटे, गाड्या, किरकोळ सजावटी सामान इत्यादींकरिता उपयोगात आहे.शोभेकरिता हा वृक्ष बागेत लावतात..    


0000

  दही कसं तयार होतं? 

कोणत्याही गृहिणीला विचारा. ती म्हणेल, 'इश्श! त्यात काय आहे? दुधात इवलंसं विरजण घाला आणि झाकून ठेवा, रात्री झोपण्यापूर्वी ठेवलंत तर सकाळी उठाल तेव्हा दही तयार झालेलं असेल. खरं आहे. पण मग दिल्लीसारख्या उत्तरेकडच्या शहरात हिवाळ्यात तसं करुनही दही का लागत नाही? आणि विरजण म्हणजे तरी काय? ते दुधात टाकल्यावर नेमकं काय काय होतं, की त्यापासून दही तयार व्हावं? हे प्रश्न तसेच लोंबकळत राहतात. त्यांची उत्तरं मिळवण्याचा प्रयत्न करायलाच हवा ना!

तर, दुधामध्ये जी लॅक्टोज साखर असते तिचं विरजणापोटी आंबून लॅक्टिक आम्लात रूपांतर होतं. या आंबवण्याच्या प्रक्रियेला वैज्ञानिक भाषेत किण्वन म्हणतात. ती विक्रिया घडून येण्यासाठी जिवाणूंची आवश्यकता असते. लॅक्टोबॅसिलस जातीचे विषाणू ही कामगिरी पार पाडतात. जेव्हा जुन्या दह्यातून विरजण घेतलं जातं तेव्हा खरं तर त्यातून या जिवाणूंचा नमुनाच उचलला जातो. जुन्या दह्यात त्याला आपल्या कामगिरीसाठी आवश्यक असलेली सामग्री मिळत नाही. कारण त्याच्याच करामतीपायी ती संपलेली असते. त्यामुळे ते जिवाणू तिथं तगून राहिलेले असले तरी त्यांची वाढ होत नाही; पण नव्या दुधात त्यांना सोडलं की तिथं त्यांना लॅक्टोज साखरेचा भरपूर साठा मिळतो आणि मग त्याच्यावर ताव मारत त्यांची वाढ होते व त्या साखरेचं लॉक्टिक आम्लात रूपांतर करण्याची कामगिरी त्यांच्याकडून सहजगत्या पार पाडली जाते.

अर्थात, त्यांची वाढ होण्यासाठी किंवा त्यांच्याकडून होणारी किण्वनाची कामगिरी पार पडण्यासाठी केवळ पोषक सामग्रीचा यथास्थित साठा असून भागत नाही. योग्य त्या तापमानाचीही आवश्यकता असते. सामान्यतः उष्ण दमट हवेत या दोन्ही विक्रिया व्यवस्थिरत पार पडतात. म्हणूनच थंडी असली की त्यांची वाढही नीट होत नाही, की किण्वनाची प्रक्रिया व्यवस्थित पार पडत नाही. साहजिकच दही नीट लागत नाही, कारण हव्या त्या प्रमाणात लॅक्टिक आम्लाची निर्मिती होत नाही. एकदा ते तयार झालं, की दुधातल्या प्रथिनांच्या गुंतागुंतीच्या साखळ्या उलगडण्याच्या कामाला लागतं. जोवर प्रथिनांच्या या साखळ्यांची मूळ रचना तशीच टिकून असते, तोवर त्या प्रथिनांचे रेणू एकमेकांपासून सुटे राहून त्या दुधात तरंगत असतात; पण त्या आम्लाच्या प्रभावापोटी त्या साखळ्या उलगडल्या गेल्या, की ते लांबलचक धागे एकमेकांमध्ये गुंतून त्यांची गुठळी व्हायला सुरुवात होते.

यालाच दही लागणं किंवा कर्ड लिंग असं म्हणतात. जेवढा या किण्वन या प्रक्रियेचा प्रभाव जास्त तेवढा दह्याचा आंबटपणाही वाढतो. म्हणूनच गोड दही लावायचं असेल तर विरजणाचं प्रमाण आणि म्हणूनच किण्वन प्रक्रिया या दोन्हींनाही नियंत्रणाखाली ठेवावं लागतं.

डाॅ. बाळ फोंडके यांच्या 'कसं ?' या पुस्तकातुन


000

    खनिज तेल कसं तयार झालं? 

साधारण तीस कोटी वर्षापूर्वीची गोष्ट. त्या कालखंडाला कार्बोनिफेरस कालखंड म्हणतात. पृथ्वीवर सर्वत्र चिखलात फोफावणाऱ्या पाणथळ वनस्पतींचं राज्य होतं. त्यातले काही वृक्ष तर प्रचंड आकाराचे होते. फर्न जातीची झाडे त्यात होती. त्यांची घनदाट जंगलं सगळीकडे पसरलेली होती. सागराच्या पृष्ठभागानंही शैवालांची चादर पांघरलेली होती. हे शैवाल म्हणजे छोट्या छोट्या हिरव्या वनस्पतीच होत्या.

काही काळ गेला आणि या वनस्पतींचं आयुष्य संपून त्या मृत होऊ लागल्या. त्यांची कलेवरं मग समुद्राच्या, खाड्यांच्या, तलावांच्या पाण्यात बुडू लागली. तळाला गेली. तिथ त्यांचा एकच लगदा तयार झाला. त्यात कुजलेल्या वनस्पती होत्या तसंच पाणी होतं. सगळा चिखल झाला होता. त्यालाच पीट म्हणतात. लापशीसारखं असणारं हे पीट तळाशी जाऊन बसलेलं होतं. त्यावर मग नद्यांमधली, सागरांमधली वाळू, रेती, माती यांचे थर चढत गेले. त्यांच्याही वर गाळ चढत गेला. गाळाच्या वरवर चढत जाणाऱ्या थरांचा दाब पडून खालचं रेती, माती, गाळ यांचं मिश्रण घट्ट होत गेलं.

त्यांचे गाळीव खडक बनले. त्यावर आणखी खडक तयार झाले. त्यांची जाडी वाढत गेली. या खडकांचा दाब त्यांच्या खालच्या पीटवर पडत गेला. आपण हातात चिखल घेऊन तो दोन हातांमध्ये दाबत गेलो तर काही वेळानंतर त्या चिखलातलं पाणी आपल्या बोटांच्या फटीतून बाहेर पडून जातं. सगळं पाणी बाहेर निघून गेलं की उरलेल्या गाळाचा झकास चेंडू तयार होतो. घट्ट, कठीण असा चेंडू. खडकांच्या थरांखाली सापडलेल्या त्या पीटचीही अशीच अवस्था झाली. खडकांच्या त्या दाबापोटी त्यातलं पाणी वेगळं होऊ लागलं. वाट मिळेल तसं दुसरीकडे जाऊ लागलं. आणखी दाब पडला, आणखी पाणी निघून गेलं. ही प्रक्रिया काही लाख वर्ष होतच राहिली. त्यातून मग उरलेल्या पीटचं खनिज इंधन मध्ये रूपांतर होत गेलं.

त्यात कोळसा होता, कच्चं पेट्रोलसारखं तेल होतं तसंच नैसर्गिक वायूही होता. काही वैज्ञानिकांच्या मते डायअँटम नावाच्या छोट्या वनस्पतींपासून तेल तयार झालं. हे डायटम सागरांच्या पृष्ठभागावर घाबरत होते. त्यांची कलेवरं सागरांच्या तळाशी गेली आणि तिथं गाळाच्या दबावाखाली त्यांचं कच्च्या तेलात रूपांतर झालं, पण पृथ्वीच्या कवचात सतत बदल होतच होते. सागराच्या तळाचीही त्यापासून सुटका झाली नव्हती. त्या तळाला घड्या पडत गेल्या तसं मग ते तेल मूळ जागेपासून निसटून, जिथं त्या घड्यांमध्ये पोकळी तयार झाली होती त्या पोकळ्यांमध्ये जाऊन विसावलं. तेच आज आपल्याला सापडलं आहे.

डाॅ. बाळ फोंडके यांच्या 'कसं ?' या पुस्तकातुन
🎴🎴🎴🎴🎴🎴🎴🎴🎴🎴🎴



      वातींचे प्रकार.

🔹१) नंदादीप वात- किंवा समई वात तेलाच्या दिव्यासाठी-  ही ५, ७, ९ पदरी असते शक्यतोवर ५ किंवा ७ पदरी असते. ही रोज पूजेच्या वेळेस लावतात.

🔹२) बेल वात- ह्या श्रावणात महिनाभर लावतात. एकाला जोडून एक अश्या ३ वाती करतात (४+४+३ पदरी) एकूण अकरा पदर. ह्या कोणी रोज महिनाभर ११ वाती लावतात कोणी फक्त सोमवारी लावतात.

🔹३) शिवरात्र वात-  महाशिवरात्रीला ११०० पदराची वात तुपात भिजवून लावतात.

🔹४) वैकुंठ वात- ३५० पदरी आपल्या हाताची वितभर( करंगळी ते अंगठा लांब करून मोजलेले अंतर) करायची ती वैकुठंचतुर्दशीला लावतात. एक पुस्तक वगैरेवर मोजून मग त्यावर गुंडाळतात.

🔹५) त्रिपूर वात- तीन पदराच्या जोडून (३६५ +३६५) जोडवाती म्हणतात त्या त्रिपुरारी पौर्णिमेला लावतात.

🔹६) अधिक महिन्याची वात- ३३ पदरी ३३ वाती, ३३ फुलवाती तुपात भिजवून लावतात. कोणी महिनाभर लावतात कोणी एकदाच लावतात.

🔹७) कार्तिकी वात- एकादशी पासून कार्तिक पौर्णिमेपर्यंत ३ पदरी १०५ वाती लावतात.. कोणी पौर्णिमेलाच १०५ वाती लावतात.

🔹८) काड वाती-  तुळशीच्या कोरड्या काडीला कापूस गुंडाळून गणपतीला, होमहवन, पुरण आरती करतात.

🔹९) श्रावण वात- रोज महिनाभर ११ पदराच्या ११ वाती लावतात.

🔹१०) फुलवाती- ह्या निरंजनात रोज लावतो आरतीच्या वेळी.

🔹११) लक्ष्मी वात- शीघ्र लक्ष्मीप्राप्तीसाठी कुंकू लावलेली लाल रंगाची फुलवात, ह्या निरंजनात लावतात आरतीच्या वेळी.

🔹१२) कुबेर लक्ष्मी वात- शीघ्र लक्ष्मी लक्ष्मीप्राप्तीसाठी कुंकू लावलेल्या लाल फुलवाती सोबत एक लवंग शुद्ध तुपासोबत चांदीच्या निरंजनीत ठेवतात.

🔹१३) अनंतवात- ह्यामधे एक वशाची एक वात, दोन वशाच्या दोन वाती, तीन वशाच्या तीन, असे १०८ वशाच्या १०८ वाती करतात व तुपात भिजवून श्रीकृष्णाला ओवाळतात.

🔹१४) देह वात- आपल्या डोक्यावर टाळुपासून ते पायाच्या अंगठ्या पर्यंतची उंची मोजून घेऊन तेवढ्या लांबीची १०८ किंवा ३६५ पदरी वात करतात व ती तेलात भिजवून ज्याच्या मापाची केलीय त्या व्यक्तीने लावायची असते.

🔹१५) ब्रम्हांड वात- आपल्या कपाळावर कुंकू लावतो त्या जागेपासून पुर्ण डोक्याला फेर घेऊन ते मोजून तेवढ्या लांबीची २५० पदरी वात बनवतात व ज्याच्या मापाची आहे त्यांचे हातून तीळ तेलात भिजवून लावतात.

🔹१६) काकडा- काळ्या कपड्याचे बारीक तुकडे करून त्याच्या वाती करून काकड आरतीला लावायच्या, दृष्ट काढणे किंवा नजर उतरणे यासाठीही या वाटेचा उपयोग केला जातो.

🔹१७) दिवटीची वात - खंडोबाच्या नवरात्रात दिवट्या बुधल्यां साठी ही वात तयार केली जाते.

🔹१८) मशाल आणि टेंभे - जागरण आणि गोंधळ, या कार्यक्रमांसाठी मशाल आणि टेंभें यांच्या वाती तयार करतात.

🔹१९) कंदील वात- दिवाळीच्या वेळेस दीपमाळ, आकाश दिवे, काचेचे कंदील, शेगडी इत्यादींसाठी सुती धाग्यांच्या वीणीच्या जाड चपट्या सुतासारख्या वाती.

🔹२०) दारुगोळा वात-  फटाके आणि तोफांच्या दारूगोळ्याच्या कामी येणारी ही वेगळ्या प्रकारची वात असते.

🔹२१) रथ सप्तमी- ला ७ पदरी.
🔹२२) कृष्णाला- ८ पदरी.
🔹२३) रामनवमीला- ९ पदरी.
🔹२४) दशावतारीवात- विष्णूला-- १० पदरी.
🔹२५) शंकराला- ११ पदरी.
🔹२६) सूर्याला- १२ पदरी.
🔹२७) वैकुंठ चतुर्दशीला-  १४ पदरी.
🔹२८) गणपतीला- २१ पदरी.

हे सगळे वर्षभर करायचे असेल, तर नेम म्हणून तर त्या त्या दिवसापासून परत त्या दिवसापर्यंत व्रत करतात करणारे, जसे रथसप्तमी ते रथसप्तमी, गोकुळष्टमी ते गोकुळाष्टमी...
 
वरील सगळ्या वाती वसा काढूनच करतात, आणि जितकी पदरी पाहिजे तितके पदर गुंडाळायचे. फक्त जोडवाती म्हणजे एकाला एक दोन वाती जोडायच्या म्हणजे एक पूर्ण झाली की न तोडता दुसरी करायची. 
३ पदरी असते ही वात... ३+३ पदर..
बेलवाती पण एकाला एक जोडून ३ वाती, ४,४,३ पदरी.


0000


   🔸फटाके  कोठे तयार होतात ?🔸

फटाके विविध रसायनांपासून तयार केले जातात. त्यामध्ये प्रामुख्याने पोटॅशियम नायट्रेट, चारकोल, सल्फर यांचा समावेश होतो. स्ट्रॉनियम संयुगाचा वापर लाल रंगाच्या प्रकाशासाठी, बेरियम संयुग हिरवा किंवा पिवळा आणि कॉपर संयुग निळ्या रंगाच्या प्रकाशासाठी वापरलं जातं.

तामिळनाडूतील शिवकाशी येथे फटाके तयार करणाऱ्या जगातील सर्वाधिक फॅक्टरी आहेत. याठिकाणी घर चालविण्यासाठी बालकामगारांनाही दिवसाला अगदी तुटपुंज्या पैशांसाठी अतिशय धोकादायक परिस्थितीत आणि घातक रसायनांच्या सानिध्यात दिवसाला १२ तास काम करावं लागतं. येथील असुरक्षित वातावरणामुळे झालेल्या अपघातांमुळे अनेक मुलांना आयुष्यभराचं अपंगत्व आलेलं आहे. त्यांचा चेहरा विद्रुप झालेला आहे.

शिवकाशी हे फटका उद्योगाचे प्रमुख केंद्र आहे. परंतु सुरवातीस हे प्रमुख केंद्र नव्हते. कलकत्ता येथील गृहस्थ दासगुप्ता हे इसवी १९०० मध्ये आगपेटीची छोटी कंपनी चालवत होते. शिवकाशी येथे दुष्काळ आणि उपासमारीमुळे दोन भाऊ शिवकाशी बाहेर नोकरीच्या शोधात बाहेर पडले. श्रीमूग नादर आणि पी अय्या नादर हे त्या दोघांचे नाव, त्यानंतर त्यांनी दासगुप्ता यांच्या कंपनीमध्ये अनेक दिवस काम करून हे काम शिकून घेतले आणि परत शिवकाशीस आले स्वतःचा धंदा सुरु करण्याकरिता. कमी पाउस आणि दुष्काळ हा त्यांच्या करिता फायद्याचा विषय राहिला कारण फटाका उद्योगास अश्याच प्रकारचे कोरडे हवामान आदर्श आहे.

शिवकाशी येथील अनेक उद्योग समूह भारतीय सैन्यास दारुगोळा पुरविण्याचे काम करतात. लष्करास लागणाऱ्या लाल ज्योत असलेल्या माचीस, धूर न होणाऱ्या माचीस, प्रशिक्षणाकरिता लागणारे बॉम्ब इत्यादी साहित्य पोहचविण्याचे काम शिवकाशी येथूनच होते.

शिवकाशीकडे स्वतःचे फटाके संशोधन आणि विकास केंद्र (एफआरडीसी) आहे. हे केंद्र संपूर्ण उद्योग गुणवत्ता आणि सुरक्षा निकष दृष्टिने सुरू करण्यात आले. ते कच्च्या मालाची चाचणी घेण्याची जबाबदारी घेतात, घातक उत्पादन प्रक्रिया आणि कर्मचा-यांच्या सुरक्षेची देखरेख करतात. फटाका उद्योग हे जोखमीच उद्योग आहे यात अनेक लोकांचे बळी गेलेले आहे. FRDC च्या स्थापनेपासून या गोष्टीत घट होत आहे.

भारत आपले फटाके निर्यात करत नाही. भारतात योग्य दळणवळण सुविधा नसल्यामुळे भारत फटाके निर्यात करत नाही. फटाका आयात करणारे देश कठोर नियामक मानक लादतात जे भारत पूर्ण करण्यास असमर्थ आहे. जगातील सर्वात मोठ्या फटाके उद्योगांपैकी एक असल्याने आपण त्या वस्तूंना परकीय महसूलात टाकण्याची एक उत्तम संधी गमावत आहो हे नक्की. येथे ९८ टक्के जुन्या पध्दतीनुसार बनवले जातात. वास्तविक, येथे फक्त चार कंपन्यांनाच फटाके बनवण्याचा परवाना देण्यात आला आहे. ज्या रसायनांवर बंदी आहे, त्यांचा पर्यावरणपूरक पर्याय पोटॅशियम पेरियोडेट ४०० पटीने महाग आहे. ज्यामुळे निर्मात्यांनी कमी पर्यावरणपूरक फटाके बनवले आहेत.


0000


मोबाईल बॅटरी जास्त वेळ चार्ज राहण्यासाठी महत्त्वाच्या टीप्स :तुम्हाला तर माहीतच आहे की, बॅटरी तीन ते चार वर्षे तरी टिकायला हवी, मात्र पाच ते सहा महिन्यांत बॅटरी कशी काय बरं खराब झाली? तर असा मी विचार करू लागले व मी इंटरनेट वरती सर्च केले आणि त्यावेळी मला जी माहिती समजली ती आपण चार्जिंग करताना कोणत्या चुका करतो, तर ही महत्त्वाची माहिती मला वाटले तुमच्या पर्यंत मी शेअर करायला हवी जेणे करून आपले हे जे नुकसान आहे ते टाळता येईल.

बऱ्याचदा आपण मोबाईल विकत तर घेतो मात्र त्यामध्ये जे मॅन्युअल असते ते वाचत नाही, या माहिती पुस्तकेत संपूर्ण माहिती दिलेली असते. मात्र आपण चार्जिंग करताना ज्या चुका करतो त्यामुळे आपली बॅटरी लवकर उतरते व कधी कधी बॅटरी फुगते देखील, तर काही जणांचा मोबाईल गरम होतो, वापर करताना किंवा चार्जिंग करताना देखील गरम होतो. तर हे सुद्धा चार्जिंग करताना जी आपण चूक करतो त्यामुळेच होते. म्हणून आज आम्ही तुम्हाला अशा पाच गोष्टी सांगणार आहोत की जर या पाच गोष्टी तुम्ही फॉलो केल्या तर तुमचा मोबाईल चांगला राहील व तुमची बॅटरी देखील दीर्घकाळ टिकेल. तर चला या विषयी अधिक माहिती जाणून घेऊ.

पहिली गोष्ट म्हणजे, ज्यावेळी तुम्ही मोबाईल चार्जिंगला लावता त्यावेळी तुमच्या मोबाईलच्या मागचे कव्हर काढून मोबाईल चार्जिंगला लावावा. तुम्हाला वाटेल असे का करायचे तर याचे कारण असे आहे की, हे जे कव्हर असते हे बॅटरीला मिळणारा हवेचा पुरवठा थांबवते, थोडक्यात बॅटरीला हवा मिळत नाही, आणि परिणामी मोबाईल गरम होऊ लागतो आणि ज्यावेळी मोबाईल गरम होतो त्यावेळी आपोआपच बॅटरीवरती त्याचा खूप निगेटिव्ह इफेक्ट् पडतो, ज्यामुळे बॅटरी लवकर खराब होते….

दुसरी गोष्ट, तुम्हाला कंपनीने जो चार्जर दिला आहे तोच चार्जर तुम्ही मोबाईल चार्ज करताना वापरा. तुम्ही जर कोणताही चार्जर वापरू लागलात, उदाहरणार्थ तुमचा जर Samsung चा मोबाईल असेल आणि त्याला चार्ज करायला Oppoचा चार्जर वापरत असाल तर त्यामुळे देखील तुमची बॅटरी लवकर खराब होते, कारण प्रत्येक कंपनीने त्यांच्या मोबाईलला त्यांच्या चार्जरचे MAH म्हणजेच किती अँपिअर करंट वापरायचा हे ठरलेले असते तर तोच चार्जर आपण वापरावा….

तिसरी गोष्ट, मोबाईलला चार्जिंग करताना मोबाईल नेहमी switch off करावा, जर तुम्हाला हे करणे शक्य नसेल तर कमीत कमी flight mode वर तरी ठेवावा. जर तुम्ही तसाच मोबाईल चार्जिंगला लावत असाल तर त्यामुळे एक बाजूला चार्जिंग चालू राहते आणि दुसऱ्या बाजूला मोबाईलचे नेटवर्क चालू राहत, म्हणजे मोबाईल कामही करतोय आणि इकडे चार्जिंग देखील चालू आहे, थोडक्यात तुम्ही जॉबवर देखील गेलाय आणि काम करता करता जेवण पण करताय… तर अशी परिस्थिती होते, त्यामुळे मोबाईल चार्जिंग होण्यास फक्त दीड ते दोन तास लागतात फक्त एवढाच वेळ तुम्ही तुमचा मोबाईल switch off करून ठेवा…

चौथी गोष्ट, आपली बॅटरी किती टक्के पर्यंत चार्ज करायची हे अनेकांना समजलेले नाही, त्यामुळे काही लोक 100 टक्के पर्यंत चार्ज करतात, आणि बरेच लोक असे आहेत की जे मोबाईल रात्रभर चार्जिंगला लावतात…. कंपनीचे मॅन्युअल असे सांगते की, बॅटरी 90% ते 95% पर्यंत चार्जिंग करा, आणि 100 पर्यंत चार्जिंग करू नका. जे लोक हा नियम पळत माहीत त्यांचे मोबाईल लवकर खराब होतात व बॅटरी देखील फुगते आणि ओव्हर हिटिंगचा प्रॉब्लेम 100 टक्के होतो…..

पाचवी गोष्ट, ज्यांच्याकडे लॅपटॉप किंवा कंप्युटर्स वगैरे आहे, ते त्याला USB केबल जोडतात आणि मग त्याला मोबाईल 24 तास मोबाईल लावून ठेवतात. तुम्हाला सांगू इच्छिते की ,त्या USB मधून तुमच्या मोबाईलची चार्जिंग तर चालू असते मात्र त्याला जो करंट मिळतो, जे MAH मिळते ते अतिशय कमी मिळते, त्यामुळे मोबाईल खूप हळू चार्ज होतो त्यामुळे देखील मोबाईल खराब होतो करण USB केबलचे काम तुमच्या मोबाईल मधील डाटा कम्प्युटर मध्ये घेणे किंवा कम्प्युटर कडून घेणे हे आहे. म्हणून तुम्ही USB ने मोबाईल चार्जिंग कधीही लावू नये..
खूप उपयुक्त माहिती पाठविली आहे जरूर वाचा व इतरांनाही पाठवा... धन्यवाद🙏.

00000000


  पल्स ऑक्सिमीटर.

होम आयसोलेशनमधील व्यक्तीला स्वत:च्या शरीरातील आॅक्सिजनची पातळी घरच्या घरी मोजण्यासाठी पल्स ऑक्सिमीटरचा उपयोग होऊ शकतो.

डॉ. अमोल अन्नदाते.

शरीरातील ऑक्सिजनची पातळी व हृदयाचे ठोके मोजण्यासाठी वापरण्यात येणारी वैद्यकीय उपकरण म्हणजे पल्स आॅक्सिमीटर. लक्षणविरहीत तसेच सौम्य व मध्यम लक्षणे असणाऱ्या होम आयसोलेशनमधील व्यक्तीला स्वत:च्या शरीरातील आॅक्सिजनची पातळी घरच्या घरी मोजण्यासाठी पल्स ऑक्सिमीटरचा उपयोग होऊ शकतो.

कोरोना रुग्णाला ऑक्सिजनची पातळी मोजणे का गरजेचे असते ? कोरोनामध्ये श्वास घेण्यास त्रास सुरु होण्या आधी कमी झालेल्या ऑक्सिजनवरून न्यूमोनिया किंवा ऑक्सिजन कमी करणाऱ्या इतर गुंतागुंतीचे निदान करता येते.

नॉर्मल ऑक्सिजनची पातळी किती असते?
सहसा ९४-१०० ही नॉर्मल ऑक्सिजनची पातळी असते. कधी ९३ पर्यंतही चालते. पण ९० च्या खाली मात्र तातडीने रुग्णालयात जायला हवे.

रीडिंग कशी बघावी ?
पल्स ऑक्सिमीटर हृदयाचे ठोके व ऑक्सिजनची पातळी अशा दोन्ही रीडिंग दाखवते. ऑक्सिजन दाखवले जाते तिथे रढड2 असे लिहिलेले असते. सहसा वर दाखवलेली रीडिंग आॅक्सिजनची असते आणि खाली दाखवलेली हृदयाच्या ठोक्याची असते. काही पल्सआॅक्समध्ये हे उलटे असू शकते व कुठली पातळी कशाची आहे हे मशिनच्या कव्हरवर लिहिलेले असते. पल्स आणल्यावर घरातील एक दोन स्वस्थ व्यक्तींना लावून बघावे. जिथे सगळ्यांची रीडिंग ९० च्या पुढे दिसते आहे ती आॅक्सिजनची पातळी दाखवणारी रीडिंग आहे हे मार्क करून घ्यावे. हे नीट समजून घेण्याचे कारण म्हणजे हृदयाचे ठोके ही आॅक्सिजनची पातळी समजून रुग्ण घाबरून जातात. रीडिंग दाखवण्यासाठी किमान ३० सेकंद लागतात. पल्स आॅक्सिमीटर लावण्याआधी बोटे तळहातावर चोळून गरम करून घ्यावे.

आॅक्सिजनची पातळी कमी दाखवत असेल तर ?
आॅक्सिजनची पातळी कमी दाखवली तरी, दर वेळी ती बरोबर असेल असे नाही. व्यक्ती नॉर्मल, स्वस्थ असताना ही पातळी कमी दाखवण्याची खालील करणे असू शकतात,
मशिन बोटाला नीट लावलेले नसेल. हाताला मेंदी / नखाला नेल पॉलिश लावलेले असेल, हात थंड असतील, शरीरात लिपिड - चरबीचे प्रमाण जास्त असणे, नख मोठे असल्याने पल्सआॅक्स बोटावर नीट न बसणे, खोलीतील जास्त प्रमाणात असलेला प्रकाश / सूर्यप्रकाश पल्सआॅक्सच्या लाईटशी ढवळाढवळ करत असणे.

म्हणून आॅक्सिजन कमी दाखवले तर लगेच घाबरून जाऊ नये व मशिन योग्यरित्या काम करते आहे का, हे तपासून पाहावे.

घरात प्रत्येकाने पल्सआॅक्स विकत घ्यावे का ?
प्रत्येकाने घरोघरी विकत घेण्याची गरज नाही, पण पूर्ण सोसायटीत सगळ्यांनी मिळून एखादे पल्सआॅक्स किंवा काही कुटुंबांच्या ग्रुपने मिळून एखादे घेण्यास हरकत नाही. कारण सगळ्यांना हे एकाच वेळी लागणार नाही.

काहीही लक्षणे नसलेल्यांना प्रतिबंध म्हणून रोज पल्सआॅक्सने आॅक्सिजनची पातळी तपासावी का ?
याची मुळीच गरज नाही आणि याचा वापर फक्त कोरोना संसर्ग झाल्यावरच करावा.

स्मार्टफोनमध्ये अ‍ॅपमध्ये आॅक्सिजनची पातळी मोजावी का ?
फोनमधील आॅक्सिजनची पातळी दाखवणारे अ‍ॅप हे सदोष आहेत व त्यामुळे चुकीची पातळी दाखवण्याचे प्रमाण आहे म्हणून शक्यतो हे अ‍ॅप वापरू नये.

एकापेक्षा जास्त जण वापरणार असेल तर पल्स आॅक्सिमीटीर सॅनिटायजरने क्लीन करून घ्यावे.

(लेखक बालरोगतज्ज्ञ असून, वैद्यकीय साक्षरतेसाठी कार्यरत आहेत.)

0000000

थर्मामीटर कसे वापरतात?
 
बऱ्याचशा आजारांमध्ये ताप येणे हे एक महत्त्वाचे लक्षण असते. ताप येण्याची अनेक कारणे आहेत. सर्दी- पडशापासून ते क्षयरोगासारख्या जुनाट रोगांपर्यंत अनेक रोगांमध्ये ताप येतो. आपल्या शरीराचे तापमा सामान्यतः ९८.७ डिग्री फॅरनहाइट किंवा ३७ डिग्री सेल्सीअस इतके असते. बाळंतरोग, सर्दी-पडसे, फ्लू, यकृतदाह, जंतूदोष, मेंदूसूज, सांधे, काळीज ताप, विषमज्वर, टॉन्सीलसूज, न्यूमोनिया, श्वासनलिका दाह, हिवताप, हत्तीरोग, क्षयरोग अशा विविध रोगांत ताप येतो. तापाच्या विशिष्ट प्रकारामुळे व सोबतच्या इतर लक्षणांमुळे रोगाचे निदान व्हायला मदत होते.

प्रत्येक घरामध्ये ताप मोजण्यासाठी थर्मामीटर किंवा तापमापक नळी असणे आवश्यक आहे. या नळीच्या एका बाजूच्या गोलसर फुग्यासारख्या भागात पारा असतो. थर्मामीटरचा हा भाग जिभेखाली, काखेत किंवा गुदाशयात एक मिनीटभर ठेवल्यास तापमानानुसार फुग्यातील पारा प्रसरण पावून काचेच्या नळीत वरवर जाऊ लागतो. या नळीवर फॅरनहाईटमध्ये आकडे लिहिलेले असतात; त्यावरून ताप किती आहे ते कळते.

थर्मामीटर तोंडात एक मिनीट ठेवले असता निरोगी व्यक्तीचे तापमान ९७ ते ९८ अंश फॅरनहाईट इतके भरते. काखेत ते यापेक्षा एक अंश कमी तर गुदाशयात धरले असता एक अंश जास्त असते.

थर्मामीटरचा वापर करण्यापूर्वी नळी झटकून पारा नळीच्या टोकाच्या फुगवट्यात नेणे आवश्यक असते. ताप पाहून झाल्यावर पुन्हा नळी झटकावी व पारा जागेवर आणावा. थर्मामीटर डेटॉलमध्ये बुडवून स्वच्छ करावा. थर्मामीटरचा वापर केल्याने आपण डॉक्टरांना तापाविषयी खूप जास्त', 'जास्त', 'कमी' असे व्यक्तीसापेक्ष बदलणारे शब्द न वापरता अमुक अंश फॅरनहाईट असे तंतोतंत तापमान सांगू शकतो व त्यामुळे डॉक्टरांना रोगनिदान करायला मदत होते.

थर्मामीटरऐवजी तापमापक पट्टीचा वापर करता येतो. ही पट्टी कपाळावर लावून १५ सेकंद ठेवली असत तिचा रंग बदलून तापमान समजते.

000


☞. P D F चा अर्थ?
उत्तर:- Portable Document Format.

☞. H T M L चा अर्थ?
उत्तर:- Hyper Text Mark up Language.

☞. N E F T चा अर्थ?
उत्तर:- National Electronic Fund Transfer.

☞. M I C R चा अर्थ?
उत्तर:- Magnetic Inc Character Recognition.

☞. I F S C चा अर्थ?
उत्तर:- Indian Financial System Code.

☞. I S P चा अर्थ?
उत्तर:- Internet Service Provider.

☞. E C S चा अर्थ?
उत्तर:- Electronic Clearing System.

☞. C S T चा अर्थ?
उत्तर:- Central Sales Tax.

☞. CRR चा अर्थ?
उत्तर:- Cash Reserve Ratio.

☞. U D P चा अर्थ?
उत्तर:- User Datagram Protocol.

☞. R T C चा अर्थ?
उत्तर:- Real Time Clock.

☞. I P चा अर्थ?
उत्तर:- Internet Protocol.

.☞. C A G चा अर्थ?
उत्तर:- Comptroller and Auditor General.

.☞. F E R A चा अर्थ?
उत्तर:- Foreign Exchange Regulation Act.

☞. I S R O चा अर्थ?
उत्तर:- International Space Research organization.

☞. I S D N  चा अर्थ?
उत्तर:- Integrated Services Digital Network.
.
☞. SAARC चा अर्थ?
उत्तर:- South Asian Association for Regional co –operation.

☞. O M R चा अर्थ?
उत्तर:- Optical Mark Recognition.

☞. A H R L चा अर्थ?
उत्तर:- Asian Human Right Commission.

☞. J P E G  चा अर्थ?
उत्तर:- Joint photo Expert Group.

☞. U. R. L. चा अर्थ?
उत्तर:- Uniform Resource Locator.

☞. I R D P चा अर्थ?
उत्तर:- Integrated Rural Development programme.

☞. A. S. L. V. चा अर्थ?
उत्तर:- Augmented satellite Launch vehicle.

☞. I. C. U. चा अर्थ?
उत्तर:- Intensive Care Unit.

☞. A. T. M. चा अर्थ?
उत्तर:- Automated Teller Machine.

☞. C. T. S. चा अर्थ?
उत्तर:- Cheque Transaction System.

☞. C. T. R चा अर्थ?
उत्तर:- Cash Transaction Receipt.

☞. N E F T चा अर्थ?
उत्तर:- National Electronic Funds Transfer.

☞. G D P चा अर्थ?
उत्तर:- Gross Domestic Product.

☞. F D I चा अर्थ?
उत्तर:- Foreign Direct Investment .

☞. E P F O चा अर्थ?
उत्तर:- Employees Provident Fund Organization.

☞. C R R चा अर्थ?
उत्तर:- Cash Reserve Ratio.

☞. CFRA चा अर्थ?
उत्तर:- Combined Finance & Revenue Accounts.

☞. GPF चा अर्थ?
उत्तर:- General Provident Fund.

☞. GMT चा अर्थ?
उत्तर:- Global Mean Time.

☞. GPS चा अर्थ?
उत्तर:- Global Positioning System.

☞. GNP चा अर्थ?
उत्तर:- Gross National Product.

☞. SEU चा अर्थ?
उत्तर:- Slightly Enriched Uranium.

☞. GST चा अर्थ?
उत्तर:- गुड्स एण्ड सर्विस टैक्स (Goods and ServiceTax).

☞. GOOGLE चा अर्थ?
उत्तर:- Global Organization Of Oriented GroupLanguage Of Earth.

☞. YAHOO चा अर्थ?
उत्तर:- Yet Another Hierarchical Officious Oracle .

☞. WINDOW चा अर्थ?
उत्तर:- Wide Interactive Network Development forOffice work Solution .

☞. COMPUTER चा अर्थ?
उत्तर:- Common Oriented Machine Particularly United and used under Technical and Educational Research.

☞. VIRUS चा अर्थ?
उत्तर:- Vital Information Resources Under Siege.

☞. UMTS चा अर्थ?
उत्तर:- Universal Mobile TelecommunicationsSystem.

☞. AMOLED चा अर्थ?
उत्तर:- Active-matrix organic light-emitting diode.

☞. OLED चा अर्थ?
उत्तर:- Organic light-emitting diode

☞. IMEI चा अर्थ?
उत्तर:- International Mobile EquipmentIdentity.

☞. ESN चा अर्थ?
उत्तर:- Electronic Serial Number.

00000


ClBIL SCORE  काय असतो

हा टॉपीक अत्यंत कामी येऊ शकतो.

सिबील स्कोर काय प्रकरण आहे ?

💸💸💸💸💸💸💸💸💸

बघा मुळात माणसांच्या दोन प्रकारच्या सवयी असतात .

1) पै पै गोळा करून ठेवतील ( Depositing Habit) 

2) दुसऱ्या कडून घेतलेली पै न पै परत करतील ( Repayment Habit) 

या दोन्ही गोष्टींचा एकमेकांशी अजिबात संबंध नाही .

पूर्वी लोक काय करायचे कि पन्नास बँकातून लोन काढायचे , एका बँकेला दुसऱ्या बँकेचा पत्ता नसायचा .

जे काही डॉक्युमेंट आवश्यक असायचे ते म्हणजे नो ड्युज सर्टीफिकेट .

आत्ता हा प्रॉब्लेम मोठा व्हायचा म्हणून 

या कंपनीची स्थापना झाली Aug 2000 मध्ये .

Credit Information Bureau Ltd.

 या कंपनीची  स्थापना झाली.

आज या कंपनीचे नाव TransUnion CIBIL Ltd असे आहे.

ही कंपनी भारतातल्या सर्वच लहान मोठ्या बँका , वित्तीय संस्थांशी जोडली गेलेली आहे.

आणि यावर RBI ची मॉनीटरींग आहे.

समजा आपण बँकेत गेलो , आणि कर्जासाठी अर्ज दिला.

तर बँक म्हणते दोन,तीन दिवसांनी या ! 

आता या दोन तीन दिवसात बँक नक्की काय करते ? 

तर सर्वात अगोदर ती त्या व्यक्तीचा CIBIL रिपोर्ट मागावते.

आणि त्याची पेमेंट हिस्टरी, तसेच त्याचा CIBIL स्कोर चेक करते ? 

जसं एखादा बाप आपली पोरगी देण्याअगोदर , नवऱ्या मुलाची सगळी हिस्टरी चेक करतो तसंच आहे हे़. 

CIBIL स्कोर हा 

300- - - -- - - ते -- -- -- --900 

मध्ये मोजला जातो.

जर आपला स्कोर 750 ते 900 दरम्यान असेल तर आपल्याला लोन लगेच मिळेल.

पण जर स्कोर 650 च्या खाली असेल तर मात्र बँक म्हणते तुमचा CIBIL स्कोर नीट करून आणा ! 

कर्ज मिळतच नाही.

म्हणजे समजलं ! 

कि बँका कर्ज  देणे का नाकारतात ? 

तर CIBIL Score नीट नसतो.

CIBIL Score कमी का होतो ?

1) कर्जाचा EMl वेळेवर न भरणे.

2) कर्जाची परतफेडच न करणे.

3) चेक बाऊन्स होणे 

4) क्रेडीट कार्डची पूर्ण लिमिट संपेपर्यंत वापरणे 

5) स्वतःवर असणारे कर्ज NPA मध्ये जाऊ देणे 

6) सतत वेगवेगळ्या बँकामधे कर्जासाठी अप्लाय करत रहाणे.

यामुळे CIBIL score वर वाईट परिणाम होतात.

बघा , मुळात बँकाचे बोर्ड बाहेरून जरी वेगवेगळे दिसत असले तरी, शेवटी आतून त्या एकच असतात, त्यामुळे त्या त्यांच्या कडील प्रत्येक ग्राहकाची माहिती स्वतः हून CIBIL ला कळवतात आणि तिथुन मग कोणतीही बँक ती माहिती चेक करू शकते.

याचा अर्थ असा कि , आजच्या या डिजिटल युगात आपण  बँकांना मूर्ख बनवू शकत नाही

बघा मुळात बँकाचा मेन व्यवसायच लोन देणे हा आहे , पण लोन अमाऊंट  योग्य रित्या परत येईल का नाही याची खात्री बँक करत असते.

तर मग कसं काय करावं कि ज्यामुळे CIBIL Score सुधारेल ?

1) EMI वेळेवर भरा , चुकवू नका किंवा उशीर करू नका.

2) कोणत्याच बँकेचे कर्ज बुडवू नका ( ही तर सगळ्यात वाईट गोष्ट ) 

3) Home Loan , vehicle Loan , Education Loan , personal Loan कसंही लोन असू दया , त्याचे हप्ते वेळेवरच गेले पाहिजेत , ही शिस्त सांभाळा.

4) एखादी information बँकेकडून चुकीची गेली , समजा आपण 14 तारखेला हप्ता भरलाय पण बँकेने 16 तारखेत जमा केला , तरी तो दुरुस्त करून घ्या.

5) उद्या जर लोनची आवश्यकता भासणार आहे , तर सगळी जुनी कर्जे फेडून टाका ! त्याच्या शिवाय पर्याय नाही.

6) क्रेडीट कार्ड ची लिमीट समजा एक लाख रुपये आहे . तर पूर्ण लिमिट संपेपर्यंत कधीच वापरू नका , असे करून आपण स्वतःला Risky कस्टमर सिद्ध करत असतो त्यामुळे 30% पर्यंतच क्रेडीट कार्ड वापरा.

CIBIL स्कोर निव्वळच कमी असणे  म्हणजे , आजपर्यंत आपण कधीही बँकींग लोन  सिस्टीमचा वापरच केला नाही असं दाखवते.


पण राजे हो , कर्ज मिळण्या पाठीमागे एवढा सगळा पसारा असतो.

इथे सबकुछ CIBIL असतं, त्याच्या  बाहेर जाऊन कोणतीही बँक कर्ज देणार नाही.

म्हणून शासकीय योजना असो किंवा महामंडळा कडून घेतलेले कर्ज बुडवू तर नकाच , परंतु वेळेत फेडा ! 
नाहीतर आपल्या वाईट काळात कोणतीही बँक सोबत उभी रहाणार नाही.



************************************************************


एक एक कर पढें कि संस्कृत किस तरह भारत की नींव है।

विभिन्न संस्थाओं के संस्कृत ध्येय वाक्य।

●भारत सरकार : सत्यमेव जयते
●लोक सभा : धर्मचक्र प्रवर्तनाय
●उच्चतम न्यायालय : यतो धर्मस्ततो जयः
●आल इंडिया रेडियो : सर्वजन हिताय सर्वजन सुखाय
‌●दूरदर्शन : सत्यं शिवं सुन्दरम्
●गोवा राज्य : सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चिद् दुःखभाग्भवेत्
●भारतीय जीवन बीमा निगम : योगक्षेमं वहाम्यहम्
●डाक तार विभाग : अहर्निशं सेवामहे
●श्रम मंत्रालय : श्रम मेव जयते
●भारतीय सांख्यिकी संस्थान : भिन्नेष्वेकस्य दर्शनम्
●थल सेना : सेवा अस्माकं धर्मः
●वायु सेना : नभःस्पृशं दीप्तम्
●जल सेना : शं नो वरुणः
●मुंबई पुलिस : सद्रक्षणाय खलनिग्रहणाय
●हिंदी अकादमी : अहं राष्ट्री संगमनी वसूनाम्
●भारतीय राष्ट्रीय विज्ञान अकादमी : हव्याभिर्भगः सवितुर्वरेण्यम्
●भारतीय प्रशासनिक सेवा अकादमी : योगः कर्मसु कौशलम्
●विश्वविद्यालय अनुदान आयोग : ज्ञान-विज्ञानं विमुक्तये
●नेशनल कौंसिल फॉर टीचर एजुकेशन : गुरुर्गुरुतमो धाम
●गुरुकुल काङ्गडी विश्वविद्यालय : ब्रह्मचर्येण तपसा देवा मृत्युमपाघ्नत
●इन्द्रप्रस्थ विश्वविद्यालय : ज्योतिर्व्रणीत तमसो विज्ञानन
●काशी हिन्दू विश्वविद्यालय : विद्ययाऽमृतमश्नुते
●आन्ध्र विश्वविद्यालय : तेजस्विनावधीतमस्तु
●बंगाल अभियांत्रिकी एवं विज्ञान विश्वविद्यालय शिवपुर : उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य वरान् निबोधत
●गुजरात राष्ट्रीय विधि विश्वविद्यालय : आनो भद्राः क्रतवो यन्तु विश्वतः
●संपूणानंद संस्कृत विश्वविद्यालय : श्रुतं मे गोपाय
●श्री वैंकटेश्वर विश्वविद्यालय : ज्ञानं सम्यग् वेक्षणम्
●कालीकट विश्वविद्यालय : निर्भय कर्मणा श्री
●दिल्ली विश्वविद्यालय : निष्ठा धृति: सत्यम्
●केरल विश्वविद्यालय : कर्मणि व्यज्यते प्रज्ञा
●राजस्थान विश्वविद्यालय : धर्मो विश्वस्य जगतः प्रतिष्ठा
●पश्चिम बंगाल राष्ट्रीय न्यायिक विज्ञान विश्वविद्यालय : युक्तिहीने विचारे तु धर्महानि: प्रजायते
●वनस्थली विद्यापीठ : सा विद्या या विमुक्तये
●राष्ट्रीय शैक्षिक अनुसंधान और प्रशिक्षण परिषद : विद्याsमृतमश्नुते
●केन्द्रीय विद्यालय : तत् त्वं पूषन् अपावृणु
●केन्द्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड : असतो मा सद्गमय
●प्रौद्योगिकी महाविद्यालय त्रिवेन्द्रम : कर्मज्यायो हि अकर्मण:
●देवी अहिल्या विश्वविद्यालय इन्दौर : धियो यो नः प्रचोदयात्
●गोविंद बल्लभ पंत अभियांत्रिकी महाविद्यालय पौड़ी : तमसो मा ज्योतिर्गमय
●मदनमोहन मालवीय अभियांत्रिकी महाविद्यालय गोरखपुर : योगः कर्मसु कौशलम्
●भारतीय प्रशासनिक कर्मचारी महाविद्यालय हैदराबाद : संगच्छध्वं संवदध्वम्
●इंडिया विश्वविद्यालय का राष्ट्रीय विधि विद्यालय : धर्मो रक्षति रक्षितः
●संत स्टीफन महाविद्यालय दिल्ली : सत्यमेव विजयते नानृतम्
●अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान : शरीरमाद्यं खलुधर्मसाधनम्
●विश्वेश्वरैया राष्ट्रीय प्रौद्योगिकी संस्थान नागपुर : योग: कर्मसु कौशलम्
●मोतीलाल नेहरू राष्ट्रीय प्रौद्योगिकी संस्थान इलाहाबाद : सिद्धिर्भवति कर्मजा
●बिरला प्रौद्योगिकी एवं विज्ञान संस्थान पिलानी : ज्ञानं परमं बलम्
●भारतीय प्रौद्योगिकी संस्थान खड़गपुर : योगः कर्मसुकौशलम्
●भारतीय प्रौद्योगिकी संस्थान मुंबई : ज्ञानं परमं ध्येयम्
●भारतीय प्रौद्योगिकी संस्थान कानपुर : तमसो मा ज्योतिर्गमय
●भारतीय प्रौद्योगिकी संस्थान चेन्नई : सिद्धिर्भवति कर्मजा
●भारतीय प्रौद्योगिकी संस्थान रुड़की : श्रमं विना नकिमपि साध्यम्
●भारतीय प्रबंधन संस्थान अहमदाबाद : विद्या विनियोगाद्विकास:
●भारतीय प्रबंधन संस्थान बंगलौर : तेजस्वि नावधीतमस्तु
●भारतीय प्रबंधन संस्थान कोझीकोड : योगः कर्मसु कौशलम्
●सेना ई एम ई कोर : कर्मह हि धर्मह
●सेना राजपूताना राजफल : वीर भोग्या वसुन्धरा
●सेना मेडिकल कोर : सर्वे संतु निरामया
●सेना शिक्षा कोर : विद्यैव बलम्
●सेना एयर डिफेन्स : आकाशेय शत्रुन् जहि
●सेना ग्रेनेडियर रेजिमेन्ट : सर्वदा शक्तिशालिम्
●सेना राजपूत बटालियन : सर्वत्र विजये
●सेना डोगरा रेजिमेन्ट : कर्तव्यम् अन्वात्मा
●सेना गढवाल रायफल : युद्धया कृत निश्चयः
●सेना कुमायू रेजिमेन्ट : पराक्रमो विजयते
●सेना महार रेजिमेन्ट : यश सिद्धि
●सेना जम्मू काश्मीर रायफल : प्रस्थ रणवीरता
●सेना कश्मीर लाइट इंफैन्ट्री : बलिदानं वीर-लक्ष्यम्
●सेना इंजीनियर रेजिमेन्ट : सर्वत्र
●भारतीय तट रक्षक : वयम् रक्षामः
●सैन्य विद्यालय : युद्धं प्रगायय
●सैन्य अनुसंधान केंद्र : बलस्य मूलं विज्ञानम्

विदेशी।
●नेपाल सरकार : जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी
●इंडोनेशिया जलसेना : जलेष्वेव जयामहे
●इंडोनेशिया : पञ्चचित
●कोलंबो विश्वविद्यालय श्रीलंका : बुद्धि: सर्वत्र भ्राजते
●मोराटुवा विश्वविद्यालय श्रीलंका : विद्यैव सर्वधनम् पेरादे पञ्चचित
●पेरादेनिया विश्वविद्यालय : सर्वस्य लोचनशास्त्रम्

मित्रों! संस्कृत और संस्कृति ही भारतीयता का मूल है ।

भारत का विकास इसी से संभव है, तो कीजिये अपने गौरव को याद और सिर उठाकर कहिये "हम भारतीय हैं और संस्कृत हमारी पहचान है", हमें अपने गौरव का अभिमान है।

भारत माता की जय.
जयतु संस्कृतम् जयतु भारतम्

000


प्रत्येक वर्षी दसऱ्या नंतर बरोबर २१ दिवसांनंतरच दिवाळी का येते ? विश्वास नसेल तर कॅलेंडर चेक करा, वाल्मिकी ऋषी सांगतात की प्रभु श्रीराम यांना व सर्व सैन्याला श्रीलंकेतून अयोध्येत पायी चालत पोहोचायला २१ ( एकवीस दिवस म्हणजे 504 तास, ) दिवस लागले !!!! म्हणजे 504 तास / भागीले 24 तास करा उत्तर येईल 21.00 म्हणजे 21 दिवस
मला ही आश्चर्य वाटले . काहीतरीच सांगत असतील म्हणून सहज कुतूहल म्हणून गुगल मॅपवर सर्च केले श्रीलंका ते अयोध्या पायी अंतर 3145 व वेळ 504 पाहून मला धक्काच बसला !!!! 
गुगल मॅप हे हल्ली आलेय  पूर्ण विश्वसनीय आहे . आपण तर दसरा व दिवाळी ही (त्रेतायुग) पूर्वापार चालत आलेल्या परंपरेनुसार साजरी करतो. त्यामागील वेळेचे तथ्य आज पटले आहे . 
तुम्हाला माझ्यावर विश्वास नसेल तर गुगल सर्च करुन पहा व इतरांना ही माहीती सांगा . आणि वाल्मिक ऋषींनी तर आधीच रामायण लिहुन ठेवले आहे तर त्यांच भविष्यात घडणारे गोष्टींचा अंदाज किती अचुक होता आपली हिंदु संस्कृती किती महान आहे. गर्व असु द्या हिंदुसंस्कृतीत जन्म झाल्याचा...!
।। जय श्रीराम ।। ।। जय श्रीराम ।।
 खूप इंटरेस्टिंग आहे ना ?


*********************************

वेळसुचक AM आणि PM चा  "मूळ " "भारत" च होता, पण आपणाला सांगितले गेले , विश्वास पटवून दिले की ह्या शब्दांचा अर्थ;

AM : एंटी मेरिडियन (ante meridian)
PM : पोस्ट मेरिडियन (post meridian)

एंटी म्हणजे आधी, पण कोणाच्या?
पोस्ट म्हणजे नंतर, पण कोणाच्या?
 हे कधीच स्पष्ट नाही केलं, कारण हे चोरलेल्या शब्दांचे लघुतम रूप होते,

आपल्या प्राचीन संस्कृत भाषेने ह्या सर्व संशयित बाबींना हवेत उडवत सर्व काही स्पष्ट आणि दृष्टिगत केलंय,

कसे ?
पहा...
AM = आरोहनम् मार्तण्डस्य Aarohanam Martandasya
PM = पतनम् मार्तण्डस्य Patanam Martandasya
----------------------------
 सूर्य, जो प्रत्येक अवकाशीय गणनेचा प्रधान आहे,त्यालाच अप्रधान केलं. इंग्रजीचे हे शब्द संस्कृत च्या त्या अर्थांना नाही दर्शवित जे खरे वास्तविक आहेत.

आरोहणम् मार्तण्डस्य Arohanam Martandasaya म्हणजे सूर्याचे आरोहण (चढ)।
पतनम् मार्तण्डस्य Patanam Martandasaya म्हणजे सूर्याचा उतार.
 दिवसाचे १२ वाजेपर्यंत सूर्याचा चढ असतो,
'आरोहनम मार्तंडस्य' (AM)
१२ वाजेनंतर सूर्याचा उतार असतो,
'पतनम मार्तंडस्य'(PM).

 पाश्चिमात्य प्रभावात आणि पाश्चिमात्य शिक्षण घेतलेल्या काही लोकांना चुकीची धारना झाली की वैज्ञानिकता पाश्चिमात्य जगाची भेट आहे.

कदाचित तुम्हाला ही बाब समजली असेल

खूप महत्त्वपूर्ण माहिती आहे ,
 नक्की share करा....

जय श्रीराम..


0000

गॅस सिलिंडरचा विमा असतो,
हे तुम्हाला माहित आहे का ?
-----------------------------------------
आपण एलपीजी गॅस
कनेक्शन खरेदी करतो,

गॅस आपल्या घरी येतो.
आपण नियमित सिलिंडर घेतो.

या सगळ्या व्यवहारात आपल्या
नावाने एक विमा निघालेला आहे,

याची आपल्याला
कल्पना तरी असते का..?

स्वयंपाकाच्या गॅसचा
आपल्या घरात अपघात,

स्फोट वगैरे झाला
तर आपण काय करतो..?

आपण उपचारांचा,
घरदुरूस्तीचा सगळा खर्च करतो.

कारण, आपला विमा आहे,
याचा आपल्याला पत्ताच नसतो...?

अपघाताच्या वेळी,
जर तो अपघात सदोष,

गॅस सिलिंडरमुळे किंवा
यंत्रणेमुळे झाला असेल,

तर विमा
कंपनीकडुन ग्राहकाला,

४० लाख रूपयां पर्यंत
 नुकसान भरपाई मिळू शकते...!!

जर नुकसान मोठ्या प्रमाणावर असेल,

तर भरपाईची रक्कम
५० लाखापर्यंतही जाऊ शकते.

📍ही माहिती ना सरकार
आपल्याला देत, ना गॅस कंपन्या.

जर चुकून कघी
असा प्रसंग ओढवलाच,

तर गॅस कंपनीकडे विमा
मागायला विसरू नका...!!!! 

ही माहिती सर्वांपर्यंत
पोहोचवा, सर्वाना कळु दे. 

या करिता
नक्की शेअर करा...

धन्यवाद....

अभिकर्ता 
भारतीय आयुर्विमा महामंडळ.
.
📍एल.पी.जी. गॅस सिलेंडरची "एक्सपायरी डेट" असते.आपण ही आजचं तपासा!
-----------------------------------------

जर आपल्या गॅस सिलेंडरची एक्सपायरी डेट संपली असेल  तर तो गॅस सिलेंडर म्हणजे आपल्या घरात जिवंत बाॅम्ब असल्या सारखे आहे. त्यामुळे खालील सुचना वाचून आपल्या गॅस वितरकाशी खात्री करा आणि सुरक्षित रहा. कारण आपलं जीवन आपल्या घरच्यांकरता मौल्यवान आहे. 

📍कसे ओळखाल आपला गॅल सिलेंडरची एक्सपायरी डेट. 

सिलेंडरच्या पकडण्यासाठी जी गोल लोखंडी रिंग असते. त्याच्या खाली तीन रंगाच्या पट्ट्या असतात. त्यातील काळ्या रंगाच्या पट्टीवर गॅस सिलेंडरची एक्सपायरी डेट असते. यावर A,B, C आणि  D अक्षर असल्याचे स्पष्ट होते. तसच या अक्षरांसोबत दोन अंक लिहिले असतात. या अक्षरांवरुन गॅस सिलेंडर ची एक्सपायरी डेट लक्षात येते.

उदाहरणार्थ : 

A - जानेवारी ते मार्च 

B - एप्रिल ते जून 

C - जुलै ते सप्टेंबर 

D - आॅक्टेबर ते डिसेंबर 

या शब्दांनंतर जे दोन अंक लिहिले आहेत त्यावरून हे लक्षात घ्यावे!!! 

समजा आपल्या गॅस सिलेंडरवर A16 लिहिले असेल तर त्या गॅस सिलेंडरची एक्सपायरी डेट अाहे मार्च 2016. म्हणजे हा गॅस सिलेंडर मार्च 2016 नंतर वापरणे गृहिणींसाठी घातक आहे. 

कृपया याबाबत आपल्या गॅस वितरकाशी संपर्क करुन माहिती घ्या !!
अधिक माहिती साठी खालील नंबरवर संपर्क करा व आपले कुटूंब सुरक्षित करा.
9764431015
7798091409
9326359583
हा sms तुमच्या जवळच्या माणसां पर्यन्त जाऊ द्यात.  
तुमच्या 1 sms  मुळे अनेक गृहिणी   सेफ राहु शकतात.


0000


  रांगोळीचा इतिहास 

रांगोळीला अल्पना असं सुद्धा म्हटलं जातं. रांगोळी म्हणजेच अल्पना चिन्ह ही अगदी मोहंजदडो आणि हडप्पा संस्कृतीच्या खुणांमध्येही आढळली आहेत. अल्पनेचा समावेश हा कामसूत्राने वर्णन केलेल्या चौसष्ठ कलांमध्येही होतो. ही एक अतिप्राचीन लोककला आहे. अल्पना या शब्दाची उत्त्पत्ती ही संस्कृत शब्दातील ओलंपेन या शब्दातून झाली. याचा अर्थ लेप करणे असा आहे.  प्राचीन काळी लोकांचा असा विश्वास होता की, कलात्मक चित्रांनी शहर आणि गावं धनधान्याने समृद्ध राहतात आणि जादुई प्रभावापासूनही सुरक्षित राहतात. याच दृष्टीकोनातून अल्पना धार्मिक आणि सामाजिक समारंभांच्या वेळी काढण्याची प्रथा सुरू झाली. रांगोळीचा उल्लेख आर्य युगातही आढळतो.

रांगोळीचा उद्देश.

रांगोळी ही नेहमीच धार्मिक आणि सांस्कृतिकतेचं प्रतीक मानली जाते. प्रत्येक आध्यात्मिक कार्याचं रांगोळी ही एक महत्त्वपूर्ण अंग आहे. म्हणूनत प्रत्येक यज्ञाच्या किंवा पूजेच्या ठिकाणी वेदीसाठी आधी रांगोळी काढली जाते. फार पूर्वीपासून खेड्यापाड्यात तुळशी वृंदावनाजवळ रांगोळी काढण्याची प्रथा आहे. आजही शहरी भागात काही ठिकाणी गृहिणी आवर्जून रांगोळी काढतात. असं म्हणतात की, रांगोळी घरात येणाऱ्या अशुभ शक्तींना घराचा उंबरठा ओलांडू देत नाही. तसंच काहीसं शुभकार्याच्या बाबतीतही आहे. पण आता रांगोळी काढण्यामागे हे एकमेव कारण राहिलं आहे, असं नाही. तर महाराष्ट्रात नववर्षाच्या सणाला म्हणजेच गुढीपाडव्याला स्वागत यात्रांमध्ये रांगोळीचे गालिचे घातले जातात. या रांगोळीचं आयुष्य अगदी काही क्षणांचं असलं तरी त्यामागील भावना महत्त्वाची मानली जाते.

विविध प्रांतातील रांगोळी.

रांगोळीचा जसा इतिहास मोठा आहे तसंच विविध प्रांतातील तिची ओळखही वेगवेगळी आहे. केरळमध्ये पुविडल, राजस्थानमध्ये मांडणा, बंगालमध्ये अल्पना, आंध्रप्रदेशमध्ये मुग्गु, तामिळनाडूमध्ये कोलम जी मुख्यतः तांदूळाने काढली जाते. मध्यप्रदेशमध्ये चौकपूरना अशी भारतातील विविध भागात रांगोळीला विविध नावांनी संबोधलं जातं. महाराष्ट्रातील काही आदिवासी जमातींमध्ये तर रांगोळी अशा पद्धतीने रेखाटली जाते की, त्याला वारली पेटींग म्हणून ओळखलं जातं. या वारली पेटींगमधील काही आकार लग्नघरात रेखाटणं हे शुभ मानलं जातं.

रांगोळीसाठी लागणारं साहित्य (Things Required For Rangoli)
पांढरी रांगोळीही मुख्यतः गारगोटीच्या दगडापासून बनवली जाते. जी रंगाला पांढरी आणि पावडरसारखी असते. पारंपारिक रांगोळ्यांमध्ये तांदूळाचा, कुंकूवाचा, हळदीचा किंवा अगदी गव्हाच्या पीठाचाही वापर करण्यात यायचा. फुलांच्या रांगोळीसाठी खास विविध फुलांच्या पाकळ्यांचा वापर केला जातो. आजकाल रांगोळीमध्ये रंग म्हणून रासायनिक रंगांचा वापर करण्यात येतो. इको फ्रेंडली रांगोळी साकारताना ती मुख्यतः तांदूळाच्या पीठाने, फुलांनी किंवा अगदी लाकडी भुस्स्याने ती साकारली जाते.

रांगोळीतील प्रमुख तत्त्व.
रांगोळीमध्ये मुख्यतः स्वस्तिक, कमळाचं फूल, लक्ष्मीची पावलं, गोपद्म यांसारख्या समृद्धी आणि मंगल चिन्हांचा समावेश असतो. ही चिन्ह म्हणजे एक प्रकारे सांकेतिक भाषा आहे, असं म्हणायला हरकत नाही. आजही अनेक घरांमध्ये देव्हाऱ्यांसमोर नित्यनेमाने रांगोळी काढली जाते. ज्यांना हाताने रांगोळी काढणं शक्य नसतं ते रांगोळीच्या छाप्यांचा वापर करतात. आनंद आणि प्रसन्नतेचं प्रतीक म्हणजे विविध रंगी रांगोळी होय.

000000


🦹‍♂️👨‍✈️🧙‍♂️👨‍🎨🕵️‍♂️👨‍🌾👨‍💻👩‍💼👩‍🎤👩‍🚒👩‍⚖️👸

जेम्स बॉण्ड  007

आज ५ आक्टोबर २०१२. एरव्ही निरुपद्रवी वाटणारी ही तारीख, पण माझ्या दृष्टीने [तसेच जगभरातील अनेक ज्ञात-अज्ञात रसिकांच्या दृष्टीनेही] या तारखेला एक आगळेवेगळे महत्व प्राप्त झाले आहे.

बरोबर ५६ वर्षापूर्वी... म्हणजेच ५ आक्टोबर १९६२ रोजी एका 'पात्रा'ने इंग्लंड आणि अमेरिकेत चंदेरी पडद्यावर जन्म घेतला आणि त्याच्या जन्मदात्यालाही कल्पना नसेल इतके प्रेम आदर आणि लोकप्रियता या पोराने केवळ आपल्या 'सज्जन' प्रतिमेवर मिळविली. एकमेव व्यक्ती असेल की जी आपल्या कामापोटी समोरच्या व्यक्तीचा थंड डोक्याने वध करूनही पाहाणार्यांणच्या मनात त्याच्याविषयी 'खूनी' असे चित्र निर्माण करीत नाही, उलटपक्षी त्या कृत्याबद्दल त्याच्या विषयी कृतज्ञताच व्यक्त करते.

जगभरातील सिनेरसिकांच्या गळ्यातील ताईत बनलेले हे पात्र म्हणजे अर्थातच "जेम्स बॉण्ड...." एमआय ६ या ब्रिटिश सिक्रेट सर्व्हिस खात्यातील सर्व अधिकार्यांीचा लाडका गुप्तहेर...कोड नंबर ००७. या नामाचे जनकत्व जाते याला पुस्तकरुपाने वाचकांसमोर आणणार्या  इअॅरन फ्लेमिंग या लेखकाकडे, जो दुसर्याय महायुद्धाच्या काळात ब्रिटिश नेव्हीचा एक ऑफिसर होता. लेखनाची आवड अर्थातच होती आणि नेव्ही संदर्भात गुप्तहेरी करण्याच्या चर्चा सुरू असायच्या त्याचवेळी फ्लेमिंगच्या मनात अशा एका नेव्हल ऑफिसरला 'जन्म' द्यावा की जो बाहेरून सरकारी सेवा करीत आहे, नेव्हीची...पण प्रत्यक्षात तो ब्रिटिश सीक्रेट सर्व्हिसचा एजन्ट आहे. नेव्हीत सिग्नल्ससाठी कोडींगचा वापर होत असल्याने फ्लेमिंगने आपल्या मानसपुत्राला ००७ हा क्रमांक दिला आणि पुत्राचे नामकरण केले 'जेम्स बॉण्ड'. हेच नाव का ठेवले ? तर फ्लेमिंगच्या आवडीनिवडीमध्ये 'पक्षी निरिक्षण' हा भाग होता. त्याने त्या संदर्भात बरीचशी भटकंतीही केली होती. पक्षी निरिक्षण या विषयावरील त्याच्या काळात खूप गाजत असलेल्या पुस्तकाचे नाव होते : Birds of West Indies.. Field Guide आणि या पुस्तकाचा अमेरिकन लेखक होता 'जेम्स बॉण्ड'. पुस्तकाच्या प्रेमात पडलेल्या फ्लेमिंगला हे Masculine नाव आपल्या तितक्याच रफटफ नायकासाठी खूप भावले होते, आणि तिथेच त्याने डॉ.नो या आपल्या पहिल्या कादंबरीसाठी नायकाचे नाव निश्चित केले 'जेम्स बॉण्ड'.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉन केनेडी यांचा हा अतिशय आवडता नायक. त्याला कारण असे की, खुद्द केनेडी युद्धकाळात PT109 या युद्धनौकेवर नाविक म्हणूनच कार्यरत होते, युद्धातही भाग घेतला होताच. पुढे राजकारणात पडल्यानंतर विरंगुळ्यासाठी त्यानी बाँड सीरिज वाचण्यासाठी घेतली आणि त्यातील नायकाचे शारीरिक वर्णन, उंची राहणीमान आणि कामे ही जवळपास केनेडी या व्यक्तिमत्वाला शोभतील अशीच, शिवाय जेम्स बाँड देखील एक नेव्हल ऑफिसर. खास केनेडी आणि कुटुंबियांसाठीही डॉ.नो आणि फ्रॉम रशिया वुईथ लव्ह चित्रपटांचे प्रीमिअर शोज् ब्रोकोली साल्ट्झमन या निर्मात्यांनी आयोजित केले होते.

जेम्स बाँड ही 'आयकॉनिक इमेज' तयार झाली ती अगदी पहिल्या चित्रपटापासून...डॉ.नो. आणि जगभरातील प्रेक्षकांनी त्याला इतके डोक्यावर उचलून धरले की साहजिकच युनायटेड आर्टिस्टच्या टीमने तात्काळ फ्लेमिंगच्या सार्याक 'बाँण्ड' कादंबर्यांाचे हक्क विकत घेतले आणि जाहीर केले की 'बाँड मालिका अक्षय राहील...". सुरुवातीला वाटले होते की फ्लेमिंगने लिहिलेल्या एकूण १२ कादंबर्यां वरील चित्रपट निघाले की ही मालिका थांबणार. पण तसे होणे शक्यच नव्हते. निर्मात्यांनी कादंबर्यांलसमवेत 'जेम्स बाँड' हे पात्राचे नावच 'कॉपीराईट' करून घेतले आणि फ्लेमिंगच्या मृत्युनंतर {१९६४ मध्ये फ्लेमिंगचे निधन झाले होते} त्याच्या वारसांना योग्य ते मानधन देऊन नव्या लेखकांच्या टीमकडून 'जेम्स बॉण्ड' हे पात्र केन्द्रस्थानी ठेवून पुढील चित्रपट तयार करण्याचे कार्य चालूच ठेवले. आजमितीला २३ बाँडपट पडद्यावर झळकले असून जगभरातील चित्रपटक्षेत्रातील हे एकमेव असे उदाहरण आहे की, या सीरीजमधील एकाची चित्रपटाने आर्थिक अपयश पाहिलेले नाही.

'हॅरी पॉटर'  सीरीजच्या मागोमाग बाँड चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर कमाईचा इतिहास रचला आहे. पॉटर सीरिज थांबली आहे, पण आमचा जेम्स बाँड पन्नाशीनंतरही थकायला तयार नाही....तो कायमस्वरुपी 'तरुण'च राहिला पाहिजे...त्याने नेहमी 'पॉश' कपडे घातले पाहिजेच, हातात 'ओमेगा' घड्याळच असले पाहिजे ['ओमेगा' ने जाहिरातासाठी जबरदस्त फी निर्मात्यांना दिली आहे], नित्यनेमाने जेम्स बाँडने क्लब्जमध्ये जाऊन तिथे उंची मद्य...विशेषतः मार्टिनीचे घुटके सुशेगातपणे घेण्याची त्याची अदा ट्रेडमार्क झाली आहे...शिवाय मदनिका त्याच्या सहवासासाठी जणू काही वाटच पाहात राहिल्या आहेत, असा 'करिश्मा' त्याच्या व्यक्तिमत्वाभोवती असलाच पाहिजे...अशी जेम्स बाँडप्रेमींची लाडकी मागणी असते...जी ती भूमिका साकारणारा प्रत्येक नायक पूर्ण करतोच.

५ आक्टोबर २०१२ या दिवशी 'जेम्स बॉण्ड' ५० वर्षाचा झाला म्हणून लंडनच्या डार्लिंग किंडर्सलय लि. {डीके नावाने प्रसिद्ध} पब्लिशर्सनी 'JAMES BOND : 50 YEARS OF MOVIE POSTERS" या शीर्षकाने अतिशय देखणे असा 'बाँड स्मृतीगंध' प्रकाशित केला असून त्याची भारतीय रुपयात किंमत २५००/- रुपये आहे...मला हे पुस्तक फ्लिपकार्टकडून २२३०/- रुपयाला मिळाले. पुस्तकातील पहिल्या पानापासून ते शेवटच्या {आगामी 'स्कायफॉल'} चित्रपटा पर्यंत 'बाँड चित्रपटांच्या पोस्टर्स'चा मन हरखून टाकणारा चित्ररुपी इतिहास देखण्या आर्टपेपरवर आणला गेला आहे. पहिल्या डॉ.नो पासून 'पोस्टर्स कसे आणि तसे का असले पाहिजेत ?" या प्रश्नावर वेळोवेळी संबंधितांमध्ये कशी चर्चा होत गेली आणि विविध देशात {भाषेच्या गरजेनुसार} त्यांच्या प्रसिद्धीची मांडणी कशी करावी लागेल ? अमुकच शब्द पोस्टर्समध्ये का आले पाहिजेत ? त्यांची रचना कशी करावी ? रंगसंगती कोणत्या तर्हेमने असली पाहिजे [लाल आणि पिवळ्या रंगाचा पोस्टर्समध्ये खूप वापर करण्या मागील भूमिका मांडणे]....'फ्रॉम रशिया वुईथ लव्ह' या नावाने भारतात तो चित्रपट प्रदर्शित होऊ शकत नसल्याने [भारताची रशियासमवेत असलेली मैत्री विचारात घेता] मग इथल्याच 'शिवकाशी प्रेस'कडून खास भारतीय मनाला रुचेल असे 'फ्रॉम ००७ वुईथ लव्ह' या नावाने नव्याने पोस्टर्स करून घेणे...बाँडच्या ललना दाखविताना विश्वभरातील सार्यात खंडांचे त्या प्रतिनिधीत्व करतात असे दाखविण्यासाठी मदनिकांची त्यानुसार कपडे आणि केशरचना, देहरचना दाखविण्याची पोस्टर्स, ब्लॅक अँण्ड व्हाईट पोस्टर्स करायची झाल्यास ती कशी असली पाहिजेत याचा उहापोह. 

[या निमित्ताने १९६२ पासून 'स्कायफॉल' पर्यंतच्या बाँडपटांची आणि ते पात्र साकार करणार्या  नायकांची नावे इथे देत आहे :

१. डॉ. नो ~ १९६२ ~ शॉन कॉनेरी
२. फ्रॉम रशिया वुईथ लव्ह ~ १९६३ ~ शॉन कॉनेरी
३. गोल्डफिंगर ~ १९६४ ~ शॉन कॉनेरी
४. थंडरबॉल ~ १९६५ ~ शॉन कॉनेरी
५. यू ओन्ली लिव्ह ट्वाईस ~ १९६७ ~ शॉन कॉनेरी
६. ऑन हर मॅजेस्टिज सीक्रेट सर्व्हिस ~ १९६९ ~ जॉर्ज लेझन्बी
७. डायमंडस आर फॉरेव्हर ~ १९७१ ~ शॉन कॉनेरी
८. लिव्ह अॅ्ण्ड लेट डाय ~ १९७३ ~ रॉजर मूर
९. द मॅन वुईथ द गोल्डन गन ~ १९७४ ~ रॉजर मूर
१०. द स्पाय व्हू लव्हड मी ~ १९७७ ~ रॉजर मूर
११. मूनरेकर ~ १९७९ ~ रॉजर मूर
१२. फॉर यूवर आईज ओन्ली ~ १९८१ ~ रॉजर मूर
१३. आक्टोपसी ~ १९८३ ~ रॉजर मूर
१४. अ व्ह्यू टु किल ~ १९८५ ~ रॉजर मूर
१५. द लिव्हिंग डेलाईट्स ~ १९८७ ~ टिमोथी डाल्टन
१६. लायसेन्स टु किल ~ १९८९ ~ टिमोथी डाल्टन
१७. गोल्डन आय ~ १९९५ ~ पीअर्स ब्रॉस्नन
[कायद्याच्या झगड्यामुळे 'बॉण्ड निर्मिती' मध्ये सहा वर्षाचा खंड पडला होता]
१८. टुमारो नेव्हर डाईज ~ १९९७ ~ पीअर्स ब्रॉस्नन
१९. द वर्ल्स इज नॉट इनफ ~ १९९९ ~ पीअर्स ब्रॉस्नन
२०. डाय अनादर डे ~ २००२ ~ पीअर्स ब्रॉस्नन
२१. कॅसिनो रॉयल ~ २००६ डॅनिअल क्रेग
२२. क्वांटम ऑफ सोलॅस ~ २००८ ~ डॅनिअल क्रेग
२३. स्कायफॉल ~ २०१२ ~ डॅनिअल क्रेग

{याशिवाय शॉन कॉनेरी अभिनित 'नेव्हर से नेव्हर अगेन' हा स्वतंत्र निर्मित एक बॉण्डपट झळकला होता....१९८३ मध्ये}

५६ वर्षाच्या या 'तरुणा'चा इतिहास सांगायला एक लेख खूप अपुरा आहे याची मला जाणीव आहे, पण जसे जेम्स बॉण्ड कायमचे 'अमर' असे पात्र झाले आहे तद्वतच त्याच्यावरील विविध रसिकांच्या लेखमालाही सातत्याने जालावर येत राहतील याची खात्री असल्याने, 'वन अॅीण्ड ओन्ली वन ००७ जेम्स बाँड' ला वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन हा लेख आटोपता घेतो.

लेखन : महेंद्र धारणे
संदर्भ :- इंटरनेट

++++++++++++++++++


जगातील विश्वास न बसणाऱ्या गोष्टी कोणत्या आहेत?

1. अंटार्टिका सोडून प्रत्येक खंडात मॅकडोनाल्ड आहे.

2.प्रत्येक पेनाच्या टोपणामध्ये असलेले छिद्र याच्यासाठी असते की जर चुकून एखाद्याने (सहसा लहान मुले काहीही दिसलं की सरळ तोंडत घालतात) गिळले आणि घश्यात अडकले तरी वैद्यकीय मदत मिळे पर्यंत श्वास घेणे चालु रहावे यासाठी ही सोय केलेली असते.


3.जपानला सध्या निन्जाची कमतरता भासत आहे. “निन्जा शो” ला मोठी मागणी आहे, परंतु ही एक संपत जाणारी परंपरा आहे आणि कंपन्यांना योग्य प्रकारे प्रशिक्षित निन्जा शोधण्यात त्रास होतो.

4.मानवी नाक 50,000 वेगवेगळ्या गंधांची आठवण ठेवते.

5.जगातील दहा मोठ्या मूर्तींपैकी आठ बुद्धांची आहेत.

6Expedia.com,hotel.com,Hotwire ,Trivago, Travelocity आणि Orbitz सर्व Expedia Inc.या एकाच कंपनीच्या मालकीच्या आहेत.

7.कोका कोला आणि कोकेन अमली (मादक)पदार्थ एकाच झाडापासून मिळतात.

8.बहुतेक सर्वच औषधिंना रंग देण्यासाठी वापरात येणारे titanium dioxide हे तीव्र कँन्सरकारक आहे.(तुमीच औषधी तपासून बघा सकाळ -संध्याकाळ किती विष घेता .)

9.तुम्हाला विश्वास होणार नाही पण बारकोड स्कॅनर काळ्या नव्हे तर पांढऱ्या पट्टया तपासतो.

10.जगात 1000 प्रकारचे केळ खाल्ली जातात,रेडिओक्टिव्हिटीटेस्टच्या अभ्यासानुसार केळी हे किरणोत्सारी(radioactive) आहेत पण तुम्हाला अपाय होण्यासाठी 10,00,000 केळी एकावेळी खावे लागतील.

11.सगळं इथंच सोडून जावं लागतं या निसर्गनियमाला जेलिफिश अपवाद आहे जिवशास्त्रीयदृष्ट्या जेलिफिश अमर आहे.

12.उंटणीच्या दुधाचे दही बनत नाही.हंमिंगबर्ड सर्वात लहान बरोबर उलट उडणारा एकमेव पक्षी आहे.समुद्री घोडे केव्हाही लिंग बदलू शकतात.

13.गंगा नदी चे पाणी पवित्र आहे कारण गंगा नदीच्या पाण्यात एक व्हायरस बैक्टीरीयोफेजेस आहेत जे पाण्याला खराब करून रोग पसरवणार्‍या बैक्टीरीयांना खाऊन नष्ट करतो.

14.जगातील सर्वात महाग पदार्थ म्हणजे प्रति-पदार्थ. (अँटी-मॅटर)1 ग्रॅम प्रति-पदार्थ विकून जगात 100 देश खरेदी केले जाऊ शकतात. 1 ग्रॅम किंमत 31 लाख 25 हजार कोटी रुपये आहे. नासाच्या मते, पृथ्वीवर प्रति-पदार्थ सर्वात महाग आहे. 1 मिलीग्राम प्रति-पदार्थ तयार करण्यासाठी 160 दशलक्ष लागतात

15.पनामा ही जगातील एकमात्र जागा आहे जिथे पॅसिफिक महासागरात सुर्योदय होतो पण अटलांटिक महासागरात सुर्यास्त होतो.
16.आपण जेव्हा बोटे कडाकडा मोडतो तेव्हा येणारा आवाज हा बोटांच्या हाडांमधील synovial fluidमध्ये असणार्‍या नायट्रोजनचा बुडबुडा फुटण्यामुळे येतो.
17. गेंड्याचे शिंग केसांचे बनलेले असते.
18.झोपेत माणसाची वास व चव घेण्याची क्षमता बंद असते. ह्याच कारणामुळे रात्री मोठया प्रमाणात सिलेंडर स्फोटाच्या घटना घडतात.

19.आपल्या शरीरात 50,000 पेशी मरण पावले आणि नवीन बदलले गेले जेव्हा तुम्ही हे वाक्य वाचत होते.
मानवी शरीरातील सर्व रक्तवाहिन्यांची एकूण लांबी पृथ्वीभोवती सुमारे अडीच वेळा फेर्‍या मारतील एवढी म्हणजे सुमारे 1,00,000 किमी आहे.

20.जगातील सर्वात मोठे धरण हे थ्री गोर्जेस डॅम आहे

या धरणात संकलित 42 अब्ज टन पाणी 175 मीटर उंचीवर भरले आहे. पाण्याच्या इतक्या मोठ्या जलाशयांमुळे पृथ्वीच्या जडत्वावर परिणाम झाला आहे. यामुळे, पृथ्वीच्या फिरण्याची गती मंदावली आहेत.

- पृथ्वीची परिवलन मंद होण्यामुळे दिवसाचा कालावधी 0.06 मायक्रोसेकंदांनी वाढला आहे, म्हणजे दिवस थोडा जास्त लांब झाला आहे. -

थ्री गॉर्जेस धरणाची निर्मिती झाल्यामुळे उत्तर व दक्षिण ध्रुवा त्यांच्या जागेपासून २-२ सेमी अंतरावर गेले आहेत. याशिवाय ध्रुवांवर पृथ्वीही थोडी सपाट झाली आहे.

++++

-------------------------------
करगोटा (करदोरा)
--------------------------------


महाराष्ट्रात कमरेला करदोरा बांधण्याची प्रथा आहे. भाऊबीजेच्या दिवशी बहीण भावाला करदोरा देते. 
करगोटा हा काळ्या किंवा लाल रंगाचा असतो. 
हा का बांधतात याचे ठोस कारण सांगता नाही येणार. पण तर्कानुसार याची २-३ करणे असू शकतात. 
पुरुष करगोटा बांधतात. 
१) शरीरावर काळ्या रंगाचे काही असेल तर त्याकडे पाहणार्यांची पहिली नजर जाते आणि नजर लागत नाहीअसा एक प्रचलित समज आहे. म्हणूनच पुरुषाला नजर लागू नये म्हणून करगोटा बांधत असतील.

२) पहिलवानाचे शरीर पिळदार आणि आकर्षक असते म्हणून नजर लागू नये म्हणून हि प्रथा पडली असावी.

३) तसेच लहान बाळ गोंडस असते म्हणून नजर लागू नये म्हणून करदोरा बांधत असतील.

४) तसेच पूर्वी राजे महाराजे कमरपट्टा दागिना वापरायचे. हे हि करदोरा वापराचे एक कारण असू शकते.

५) तसेच खेड्यात विहिरीत पोहायला शिकवताना लहान मुलाला करगोट्याला धरून पोहायला शिकवतात. 
थोडक्यात करदोरा का बांधावा हे नक्की सांगू शकत नाही पण त्याचा उपयोग अनेक प्रकारे केला जाऊ शकतो.

काही वैद्यकीय कारणं

१. पुरुषांना हर्निया होण्याचा धोका जास्त असतो. काही संशोधना नुसार असे समोर आले आहे की जे व्यक्ती कमरेला कारदोरा बांधतात त्यांच्यात हर्निया होण्याचे प्रमाण न बांधणाऱ्या व्यक्तिसापेक्ष कमी आढळून आला.

२. नवजात शिशुची वाढ फार पटकन होत असते,ज्यामुळे त्यांच्या हृदयापासून पाया पर्यंतच्या रक्त पुरावठ्यार फरक होऊ शकतो. हा धागा बांधून, रक्त परिसंचरण योग्यरित्या नियंत्रित होतो असा काही शास्त्रज्ञांचा विश्वास आहे.

दुसरी गमतीशीर बाजू म्हणजे सैल पॅन्ट असेल तर बेल्ट नसेल तर करगोट्याचा बेल्ट सारखा वापरही केला जातो ….
----------------------------------------------

भारतातील टॉप 5 सुंदर समुद्र किनारे


 Webdunia
समुद्र किनारी फिरणे, लाटा पाहात संध्याकाळी वेळ घालवणे, समुद्र किनार्‍यावरचा अनुभव हा काही वेगळाच असतो. भारतात काही खूपच सुंदर समुद्र किनारे आहेत. ज्यामधल्या 5 किनार्‍यांची माहिती तुम्हाला देत आहोत.
1. कोवालम बीच, केरळ : 
त्रिवेंद्रमपासून 16 किलोमीटरवर मलिबार किनारपट्टीला लागून कोवालम हा किनारा आहे. एक विस्मरणीय क्षण घालवण्यासाठी या समुद्राला भेट द्या. लाइट हाऊस हे या बीचचं खास आकर्षण आहे. किनार्‍यावरील नैसर्गिक दगडी सजावट आणि शांत लाटा हे या किनार्‍याची विशेषता आहे.

2. राधानगर बीच, अंदमान : 
टाईम मॅगॅझीनने आशिया खंडातील बेस्ट बीच म्हणून या बीचचा गौरव केला आहे. शुभ्र पांढरी मुलायम वाळू, तळाचा ठाव घेऊ शकणारे निळसर पाणी हे खरोखरच वेड लावणारे आहे. निसर्गाचं सौंदर्य अनुभवायला येथे जावे. स्कूबा डायव्हिंग, मासेमारी, सङ्र्खिग इत्यादीचा पुरेपूर आनंद तुम्हाला घेता येईल.



3. तारकर्ली बीच, महाराष्ट्र :
कारली नदीचा किनारा हा अरबी समुद्राच्या साथीने जगाला सुंदरतेचा संदेश देणारा आहे. महाराष्ट्रातील मालवणमधील हा एक निर्मळ आणि सुरक्षित किनारा आहे. सूर्यप्रकाशात अगदी 20 फुटापर्यंत समुद्रतळ दिसू शकतो. शांत वेळ घालवण्यासाठी येथे निश्चित भेट द्या.

4. मेरारी बीच, केरळ :
केरळमधील आलेप्पी गावाजवळील एक सुंदर किनारा. छोटे छोटे रिसॉर्ट्स, घरगुती ङ्खूड, लुसलुशीत वाळू, लाटा ही या किनार्‍याची वैशिष्टय़े आहेत.

5. बंगाराम बीच, लक्षद्वीप : 
चंदेरी वाळू, उबदार पाणी आणि नारळाची झाडे हे या किनार्‍याचं वैशिष्टय़. पावसाळ्यात हेलिकॉप्टरने बेटावर उतरण्याची सोय असलेले हे बेट जणू एक स्वर्गच. जगातील टॉप टेन किनार्‍याच्या यादीत असलेला हा छोटासा बंगाराम. स्वच्छ पाणी, रंगीबेरंगी मासे तुम्हाला वेगळाच आनंद देऊन जातो.

==================================================

*👉 फ्लॅटखरेदी करताना या गोष्टींची माहिती ठेवा -*

*१. Carpet area - (कार्पेट एरीआ - चटई क्षेत्र) -* कार्पेट एरीआ म्हणजे प्रत्यक्षात वापरात येणारी जागा. याचा अर्थ असा की फ्लॅट मधील जेवढी जागा आपण प्रत्यक्षात राहण्यासाठी वापरु शकतो ती जागा. सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे चार भिंतींमधील जागा ज्यावर तुम्ही गालिचा (Carpet) पसरवू शकता.

*२. Built up Area - ( बिल्ट अप एरीआ) -* कार्पेट एरीआ अधिक आतील व बाहेरील भिंतींची जाडी म्हणजे बिल्ट अप एरीआ. बिल्ट अप एरीआ हा साधारणपणे कार्पेट एरीआ पेक्षा १०% ते १५% जास्त असतो.

*३. Super built up / Saleable area ( SBU - सुपर बिल्ट अप एरीआ) -* बिल्ट अप एरीआ अधिक लिफ्ट, जिना यांसाठी वापरण्यात आलेली संयुक्त जागा म्हणजे सुपर बिल्ट अप (SBU). साधारणपणे Super built up area बिल्ट अप एरीआच्या २५% ते ३०% जास्त असतो. सध्याचे बिल्डर्स स्थावर मालमत्ता ४०℅ पर्यंत सुपर बिल्टअप एरीआच्या आधारे विकतात. ( मात्र प्रत्यक्षात खरेदी करारावर कार्पेट एरीआचीच नोंद असते.)समजा तुम्ही बिल्डर कडून खरेदी करणार असलेल्या फ्लॅटचा सुपर बिल्ट अप एरीआ १००० चौरस फूट इतका असेल तर प्रत्यक्षात वापरासाठी मिळणारा कार्पेट एरीआ ६५० ते ७०० चौरस फूट असेल.

*४. Approved plans -* (मान्यताप्राप्
तआराखडा)स्थावर मालमत्तेचा आराखडा हा संबंधीत महापालिकेने मंजुर केलेला असतो. यामध्ये प्रकल्पाचा आराखडाआणि प्रत्येक फ्लॅटचा आराखडा समाविष्ट असतो.हा एक महत्त्वाचा दस्तऐवज (Document) असुन बांधकाम कायदेशीर रीत्या करण्यात आले असल्याचा एक मुख्य पुरावा असतो. घर खरेदीचा निर्णय घेण्यापुर्वी मान्यताप्राप्त आराखडा अवश्य तपासून पहावा.

*५. Completion Certificate -Occupation certificate (OC)* हा एक महत्त्वाचा दाखला असतो. हा दाखला महानगरपालिकेकडून बिल्डरला देण्यात येतो. ईमारतीमध्ये पाणी विजपुरवठ्याची सोय करण्यात आलेली आहे तसेच सुरुवातीस मंजुर केल्याप्रमाणे आणि मान्यताप्राप्त आराखड्याप्रमाणे ईमारतीचे बांधकाम केले असल्याचा हा दाखला असतो. या दाखल्याद्वारे महानगरपालिकेने सदर ईमारत राहण्यायोग्य असल्याचेजाहीर केलेले असते.फ्लॅटची पुर्नविक्री करताना ह्या दाखल्याची आवश्यकता बैंकेला सर्वात जास्त असते त्याशिवाय लोन सॅक्शन होत नाही व पुढील व्यवहारात अडचणी येतात त्यामुळे हा दाखला लवकरात लवकर मिळवण्याचा प्रयत्न करावा.

*६. Mortgage (गहाणखत) -* गृहकर्ज पुरविणारी बँक आणि खरेदीदार यांमध्ये झालेल्या करारानुसार गृहकर्जाची पुर्ण परतफेड होईपर्यंत विकत घेतलेल्या घराचा ताबा बँकेकडे ठेवला जातो. या करारास गहाणखत किंवा Mortgage deed / Agreement असे म्हणतात.मालमत्तेची सर्व कागदपत्रे कर्ज फिटेपर्यंत बँकेकडेच राहतात.

*७. Possession letter - (मालकीपत्र)* - हे पत्रक बिल्डर कडून ग्राहकास देण्यात येते. यामध्ये असे लिहिलेले असते की मालमत्ता राहण्यासाठी पुर्णपणे तयार आहे आणि आता ग्राहकाकडे हस्तांतरीत करण्यात येत आहे. Possession letter (मालकीपत्र) मिळविल्याशिवाय ग्राहकास सदनिकेत राहण्यासाठी जातायेत नाही.

*८. Registration of an agreement (करार नोंदणी) -* बिल्डर आणि ग्राहकामध्ये जागेचा/घराचा जो करार झालेला असतो त्याची Indian registration Act खाली नोंदणी केली जाते. नोंदणी करण्यापुर्वी Stamp duty (मुद्रांकशुल्क) भरणे आवश्यक असते. स्थावर मालमत्ता विकत घेताना झालेला व्यवहार व करार यांची नोंदणी करणे अत्यावश्यक असते.सदर नोंदणी करण्यासाठी रजीस्ट्रेशन चार्जेस (Registration charges) द्यावे लागतात.

*९. Sales deed (खरेदीखत)* - जमिनीचा मूळ मालक/ बिल्डर यांनी ठराविक रकमेच्या मोबदल्यात मालमत्तेचा मालकी हक्क खरेदीदाराच्यानावे हस्तांतरीत करण्यासाठीचा जो करार केला जातो त्यास Sales deed असे म्हणतात. Sales deed ची नोंदणी करणे महत्त्वाचे असते.

*१०. Stamp Duty - (मुद्रांक शुल्क)* नोंदणीकृत विक्री मुल्याच्या (Transaction Value) काही टक्के रक्कम मुद्रांक शुल्काच्या स्वरुपात सरकारला द्यावे लागतात. ग्राहकाने Stamp duty भरलेली आहे आणि त्याच्या/ तिच्या नावावर मालमत्तेची नोंदणी झालेली आहे. Stamp duty विक्री मुल्याच्या ५% ते १४% पर्यंत असते. हे दर वेगवेगळ्या राज्यांसाठी वेगवेगळे असतात.


=====================================================

  ⇨ घरातील पाली घालवण्यासाठी उपाय :

*सहसा उन्हाळ्याचा हंगाम सुरू झाला की, पाल घरातही सर्वत्र येऊ लागतात. होय, हिवाळ्याच्या वेळी कमी पाल घरात दिसत असल्या तरी उन्हाळा त्यांचा आवडता हंगाम असतो. बहुधा उन्हाळ्याच्या हंगामात पाली बाहेर येण्याचं बहुदा हेच कारण आहे. अशा परिस्थितीत आपण त्या पालींना घराच्या बाहेर काढण्यासाठी बरेच प्रयत्न करतो.*

*अशा प्रकारे पालीनपासून मिळवा सुटका.*

*आता हे स्पष्ट झाले आहे की, जेथे लहान मुले आहेत त्या घरापासून या पालींना दूर ठेवणे फार आवश्यक आहे. याशिवाय, पालींना सुद्धा मुली आणि स्त्रिया खूपच घाबरतात आणि जर पाली त्यांच्या आजूबाजूला असेल तर ते इतर कशाकडेही लक्ष देण्यास असमर्थ असतात. अशा परिस्थितीत आम्ही तुम्हाला काही सोप्या मार्गांबद्दल सांगत आहोत, जे प्रयत्न करून तुमच्या घरातून पालीपासून सुरक्षित राहील.*

*पालींपासून सुटका मिळवण्यासाठी करा हे सोपे उपाय.*

*मिरपूड(काली मिर्च) स्प्रे: हे स्प्रे बनविणे खूप सोपे आहे हे समजून घ्या. होय, हे स्प्रे तयार करण्यासाठी आपल्याला फक्त मिरपूड पाण्यात मिसळावे लागेल. त्यानंतरच हे मिश्रण एका फवारणीच्या बाटलीमध्ये टाका आणि ज्या घरात पाल दिसते त्या घराच्या कोपऱ्यात शिंपडा. तथापि, ते वापरण्यापूर्वी ते चांगले हलवा आणि नंतर घराच्या वेगवेगळ्या ठिकाणी शिंपडा. याच्या गंधामुळे पाली स्वत: घरापासून पळून जातील.*

*लसूण आणि कांदा: आता या दोन्ही गोष्टींचा उपयोग जेवणात चवदार बनवण्यासाठी केला जातो, परंतु यामुळे आपण पाली ना पळवण्यासाठी देखील उपयोग करू शकता. या पद्धतीनुसार कांद्याचा रस आणि पाणी एका स्प्रे बाटलीमध्ये मिसळा. नंतर लसणाचा रस सुद्धा काही थेंब घाला आणि नीट ढवळून घ्यावे आणि मिक्स करावे. आता त्या घराच्या कोपऱ्यात शिंपडा जेथे पाली सर्वात जास्त दिसतात. आपण इच्छित असल्यास आपण लसूण कळी देखील ठेवू शकता. वास्तविक, कांदा आणि लसूण या दोहोंचा वास खूप तीव्र आहे आणि त्याच्या गंधपासून पाली पळतात.*

*थंड पाणी आणि फिनाईल गोळ्या ची बघा कमाल.*

*बर्फाचे थंड पाणी : आपण उन्हाळ्याच्या काळात दररोज बर्फाचे किंवा थंड पाणी वापरत असाल, परंतु आपणास ठाऊक आहे की थंडगार बर्फाचे पाणी पालींना थंड होण्यास खूप उपयुक्त आहे. खरं तर थंड हवामान हे पाली राहण्यास अनुकूल नसते आणि म्हणूनच ते हिवाळ्याच्या मोसमात बाहेर पडत नाहीत. म्हणून जर त्यांच्यावर थंड बर्फाचे पाणी शिंपडले गेले तर ते त्वरित त्या ठिकाणाहून पळून जातात. म्हणजेच जिथे आपण पाल पहाल तिथे बर्फ थंड पाण्याचे फवारणी करावी आणि बरेच दिवस सतत असेच करावे.*

*फिनाईल च्या गोळ्या :- आपण कपड्यांना कीटकांपासून वाचवण्यासाठी ज्या प्रकारे फिनाइल टॅब्लेट वापरता. जिथे तुम्हाला पाल दिसते तेथे फिनाईलच्या दोन गोळ्या तिथे ठेवा. महत्त्वाचे म्हणजे, पाली त्याच्या वासामुळे घरापासून दूर जाईल.*

==================================================================

*विजेच्या लोळापासून विमानाचा बचाव कसा करतात?* 

*दरवर्षी पावसाळ्यात आपण, कुठंतरी वीज कोसळून झाड जळून गेल्याच्या किंवा टेलिफोनचे खांब उन्मळून पडल्याच्या बातम्या वाचत असतो. काही वर्षांपूर्वी तर मुंबईतल्या चौपाटीवर पावसाची मजा लुटायला गेलेल्या एका मुलीच्या कानाला लावलेल्या मोबाईलवर वीज कोसळली आणि त्यात त्या मुलीचा अंत्ही झाला.*

*आकाशातल्या ढगांवर आरूढ झालेल्या त्या विजेपासून काही किलोमीटर अंतरावरच्या जमिनीवरच्या वस्तूंची ही अवस्था, तर मग त्या ढगांमधूनच वाटचाल करणाऱ्या विमानांना त्या विजेपासून किती धोका असेल? असा प्रश्न आपल्याला पडला नाही तरच नवल. पण तसं काही होताना दिसत नाही.*

*आजवर १९६७ साली एका विमानाच्या इंधनाच्या टाकीवरच वीज कोसळल्यानं त्या टाकीचा स्फोट झाला आणि अर्थातच ते विमानही कोसळतं; पण आजमितीला कोणत्याही क्षणी हजारो विमानं जगभर आकाशात उडत असताना अशी दुर्घटना परत झालेली नाही. याचं कारण, विजेच्या लोळापासून बचाव करण्याची व्यवस्था विमानांमध्ये केलेली असते.*

*या व्यवस्थेचे अनेक पैलू आहेत. पहिली म्हणजे, विमानाच्या पायलटला सतत हवामानासंबंधीची माहिती पुरवली जात असते. त्यामुळे जिथल्या ढगांवर मोठ्या प्रमाणात विद्युत्भार साचलेला आहे आणि त्याचा निचरा करण्यासाठी तिथं वीज कोसळण्याची शक्यता आहे, अशा भागातून जाताना त्या विद्युत्भारांच्या कचाट्यात आपण सापडणार नाही याची काळजी पायलट घेतच असतो.*

*त्याव्यतिरिक्त आपल्या शरीरावरच्या कातडीसारखं विमानाचं सर्वात बाहेरचं आवरण अॅल्युमिनियमचं बनलेलं असतं. हा धातू विद्युत्वाहक आहे. त्यामुळे जर त्याच्याशी विजेचा संपर्क आला तर ती वीज त्या कातडीतच फिरून बाहेर निघून जाण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे तिची संक्रांत आतल्या दिशेनं म्हणजेच आतल्या प्रवाशांच्या दिशेनं वळत नाही. सहसा विजेचा लोळ येतो, तो विमानाच्या नाकाकडे किंवा पंखांच्या टोकाकडे. तिथून मग तो विमानाच्या कातडीतून विहरत विहरत शेपटातून बाहेर निघून जातो, त्यामुळे विमानाला धक्का पोहोचत नाही.*

*आधुनिक विमानांवर तर स्टॅटिक विक नावाची एक धातूची वाचत बसलेली असते. ही विद्युत यंत्रणेद्वारे विमानाच्या कातडीला जोडलेली असते. या वातीवर काही धातूचेच काटे असतात. ते विजेच्या लोकांना आपल्याकडे आकर्षित करण्याचे काम करतात. तिथं तसा पोहोचलेला लोळ त्या काट्यांमध्ये वातीत आणि वाटीमध्ये विमानाच्या कातडीत शिरून बाहेर निघून जातो. शिवाय आतल्या सगळ्या इलेक्ट्रॉनिक यंत्रणेवर त्या विजेपासून बचाव करणारं कवच असल्यामुळे त्यातही काही बिघाड होत नाही. विमान सुरळीत पुढे-पुढे जात राहतं.*

*डाॅ. बाळ फोंडके यांच्या 'कसं ?' या पुस्तकातुन*

@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@

*❇️हजार’चा संक्षिप्त उल्लेख ‘K’ हे अक्षर का वापरून करतात ?*

*आपण मराठी मध्ये १००० ला एक हजारच म्हणतो, पण इंग्रजीमध्ये मात्र हजारचा उच्चार जास्तकरून 1k असा केला जातो. आपण मराठी माणस देखील बऱ्याच वेळा बोलण्याच्या किंवा लिहिण्याच्या ओघात 2k, 5k, 10k असा उल्लेख करतो. तर तुमच्याही मनात कधीना कधी हा प्रश्न आला असेलच की इंग्रजी मध्ये हजार म्हणजे Thousand म्हणजे ‘T’ हे अक्षर वापरायला हवे…मग ‘K’ हे अक्षर वापरण्याचे कारण ते काय?*

*खरतरं K हे अक्षर आठ अक्षरी Thousand या शब्दाच्या बदल्यात वापरात आले. तुमचा विश्वास बसणार नाही, पण हे खरं आहे की, हा बदल ग्रीक काळामध्ये घडला, म्हणजे अतिशय जुन्या काळात! ग्रीकांच्या राज्यात हजाराला Thousand न म्हणता ‘chilioi’ म्हटले जायचे. Chilioi चा खरा अर्थ आहे- अनंत काळ, म्हणजेच पाहायला गेलं तर Chilioi चा शब्दश अर्थ ‘हजार’ असा होत नाही, पण त्या काळी ग्रीक हजार ही संख्या सर्वोच्च मानीत असतं, त्यामुळे त्यांनी अनंत काळा प्रमाणे अनंत संख्या या अनुषंगाने Chilioi हा शब्द Thousand साठी वापरण्यास सुरुवात केली.*

*कालांतराने हा Chilioi शब्द फ्रेंचांनी घेतला आणि त्याचे संक्षिप्त रूप ‘Kilo’ असे केले. फ्रेंचांनी पुढे मेट्रिक सिस्टम सुरु केल्यावर त्यांनी kilo (किलो) म्हणजे १००० अशी नवीन संकल्पना अमलात आणली. या Kilo चा फ्रेंच्यांच्या दृष्टीने अर्थ होता हजारामधील वाढ! उदा. 10k म्हणजे – 10*1000 = 10,000. व्यापाराच्या निमित्ताने जगभर पसरलेल्या फ्रेंच व्यापाऱ्यांमुळे ही संकल्पना हळूहळू सगळीकडे पसरत गेली.*

*त्यानंतर किलोलीटर, किलोग्राम आणि किलोटन सारख्या संज्ञा अस्तित्वात आल्या. याच कारणामुळे हजारसाठी संक्षिप्त शब्द म्हणून Kilo मधील K हा शब्द वापरण्याची प्रथा सुरु झाली. आधुनिक युगाच्या अर्थशास्त्रामध्ये देखील K चा वापर असाच सुरु ठेवण्यात आला.*

===============================================================

*आधार नंबर माहीत झाल्यास बँक अकाउंट हॅक होऊ शकतं का?*

*आधार कार्डचा डेटा लीक होण्याच्या अनेक बातम्या यापूर्वी येऊन गेल्या आहेत. त्यामुळे अनेकांना धडकी भरली होती. एखाद्याच्या हाती आधारचा नंबर लागला तर बँक अकाउंट हॅक होईल का, अशी अनेकांना आजही भीती असते. पण यावर आता युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडियाने पुन्हा एकदा स्पष्टीकरण दिले आहे.*

*आधार नंबर इतरांना माहीत झाल्यास आर्थिक नुकसान होऊ शकते का?*
*नाही, असे होत नाही. जसे केवळ तुमच्या एटीएम कार्डचा नंबर माहीत असेल तर कोणालाही एटीएममधून पैसे काढता येत नाहीत, तसेच केवळ आधार नंबर माहीत असल्यानंतर कोणालाही तुमचे बँक अकाउंट हॅक करता येत नाही. जोवर तुम्ही पीन/ओटीपी एखाद्या व्यक्तीला/हॅकरला शेअर करत नाहीत, तोवर तुमचे बँक अकाउंट हॅक होऊ शकत नाही.*

*इतर व्यवहारांनाही आधार लिंक असेल तर?*
*इतर कोणत्याही आर्थिक व्यवहारांसाठी, जसे की म्युच्युअल फंड, शेअरसाठीचे डिमॅट अकाउंट किंवा मोबाइल कनेक्शनसाठी आधारचा नंबर दिलेला असतो. पण, त्यामुळे त्याचा कोणत्याही बँक अकाउंटवर परिणाम होत नाही.*

*तुमच्या आधार कार्डचा नंबर जर एखाद्या व्यक्तीला माहीत झाला किंवा आधीच माहीत असेल तर तुमच्या बँक अकाउंटला धक्काही लागणार नाही, असा दावा युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडियाने केला आहे. आतापर्यंत असे कोणतेही प्रकरण समोर आलेले नाही.*

*आधार कार्डचा नंबर इतर कोणालाही माहीत असेल, तर त्याचे आर्थिक नुकसान झाल्याचे कोणतीही घटना अद्याप घडलेली नसल्याचे यूआयडीएआयने म्हटले आहे.*
===========================================

⇨  NEFT आणि RTGS मधला नेमका फरक ओळखलात तर नेट बॅंकिंग करताना होणारा गोंधळ नक्की टळेल

*ऑनलाईन पैसे ट्रान्सफर करताना तुम्ही नेहमी पाहत असाल की आपल्याला NEFT आणि RTGS हा पर्याय दाखवतो. पण कधी तुम्ही विचार केलाय का, काय आहे हे NEFT आणि RTGS?*

*भारतात पैसे पाठवणे प्रक्रिया रिजर्व बँक ऑफ इंडियाच्या देखरेखी खाली चालते. सध्या भारतात विविध प्रकारच्या पैसे पाठवणे प्रक्रिया अस्तित्वात आहेत, ज्यातील प्रमुख प्रक्रिया आहेत,*

*१. National Electronic Fund Transfer – NEFT*
*२. तात्काळ पैसे पाठवणे (Real Time Gross Settlement – RTGS*
*३. Immediate Payment Service – IMPS*

*आपण आता या तिन्ही प्रक्रियांविषयी स्वतंत्रपणे जाणून घेऊया,*

*१. नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर (NEFT)*
*ही भारतातील सर्वात प्रमुख पैसे हस्तांतरण प्रणालीपैकी एक आहे. ही प्रणाली नोव्हेंबर २००५ मध्ये सुरु करण्यात आली. या पद्धतीने पैसे लगेच ट्रान्सफर होत नाहीत, या प्रणालीमध्ये प्रत्येक तासाचा टाइम स्लॉट बनवलेला असतो आणि त्यानुसार पैसे दुसऱ्याला पाठवले जातात. हे इलेक्ट्रॉनिक संदेशाच्या माध्यमाने वापरले जाते. ही सुविधा देशाच्या ३०००० बँकांमध्ये उपलब्ध आहे.*

*२. रीअल टाइम ग्रॉस सेटलमेंट (RTGS)*
*भारतीय RTGS प्रणाली महिन्याच्या केवळ १६ दिवसात देशाच्या जीडीपी एवढी देवाण – घेवाण करते. RTGS च्या माध्यमातून मोठमोठी देवाणघेवाण केली जाते. देशातील ९५% देवाणघेवाण याच प्रणाली मधून होते. ही प्रक्रिया जगात सर्वात जास्त वापरली जाणारी प्रक्रिया आहे १९८५ पर्यंत केवळ ३ देश ही पद्धत वापरत असतं, पण आज जगातील १०० पेक्षा जास्त देश या प्रणालीचा वापर करतात.*

*RTGS प्रणालीच्या माध्यमातून पैसे लगेच हस्तांतरीत करता येतात. या पद्धतीमध्ये OK बटण दाबल्यावर लगेच पैसे समोरच्याच्या खात्यामध्ये जमा होतात.*

*३. इमीडेट पेमेंट सर्विस (IMPS)*
*ही सेवा भारतामध्ये २२ नोव्हेंबर २०१० रोजी सार्वजनिकरीत्या सुरु करण्यात आली होती. या सेवेमार्फत एका बँक खात्यामधून दुसऱ्या बँक खात्यामध्ये पैसे कधीही पाठवता येऊ शकतात. मोबाईलच्या माध्यमातून देखील या सेवेचा वापर करता येतो. एकीकडे NEFT आणि RTGS च्या वापरावर मर्यादा आहे, तर दुसरीकडे IMPS चा वापर मात्र दिवसाच्या २४ तासांत कधीही आणि सुट्टीच्या दिवशीही करता येतो.*

*ह्या सेवेचे व्यवस्थापन NationalPayment Corporation Of India (NPCI) द्वारे केले जाते.*

*NEFT आणि RTGS मध्ये काय फरक आहे?*

*१. NEFT च्या माध्यमाने छोटे बचत खाते धारक पैसे हस्तांतरीत करतात. तर RTGS चा उपयोग मोठमोठ्या उद्योगसंस्था आणि कंपन्या करतात.*
*२. NEFT मधून किमान पैसे पाठवण्याची मुभा असते, परंतु RTGS मधून कमीत कमी २ लाख रुपये हस्तांतरीत करणे अनिवार्य असते.*
*३. NEFT मधून पैसे हस्तांतरीत होण्यासाठी वेळ लागतो, पण RTGS मधून पैसे लगेच हस्तांतरीत होतात.*
*४. NEFT च्या माध्यमातून बँकेच्या कार्यालयीन वेळातच पैसे ट्रान्सफर करता येतात. RTGS मध्ये लगेचच पैसे ट्रान्सफर होतात पण त्यादिवशी बँक चालू असणे गरजेचे असते.*

*५. ट्रान्सफरसाठी आकारण्यात येणारे शुल्क :*

*NEFT मध्ये आकारण्यात येणारे शुल्क.*
*१ लाखांपर्यंत आकारण्यात येणारे शुल्क:- ५ रुपये + सेवा कर १ लाखापेक्षा जास्त आणि २ लाखांपेक्षा कमीसाठी आकारण्यात येणारे शुल्क :- १५ रुपयापेक्षा जास्त नाही + सेवा कर २ लाखापेक्षा जास्त पैसे पाठवण्यासाठी आकारण्यात येणारे शुल्क :- २५ रुपयापेक्षा जास्त नाही+सेवा कर.*

*६. RTGS मध्ये लागणारे शुल्क :*
*२ लाख रुपये ते ५ लाखांपर्यंत देवाणघेवाण करण्यासाठी आकारण्यात येणारे शुल्क :- प्रत्येक ट्रान्सफरला कमाल ३० रुपये ५ लाख रुपयांपेक्षा जास्तची देवाणघेवाण करण्यासाठी आकारण्यात येणारे शुल्क :- प्रत्येक ट्रान्सफरला कमाल ५५ रुपये.*
===============================================================

*जिभेखाली कोणते औषध ठेवायला देतात?* 

*काही वृद्ध व्यक्तींना जिभेखाली औषधाची गोळी ठेवताना तुम्ही पाहिले असेल. गोळी सामान्यत: गिळतात, इंजेक्शनही देतात ; हे आपण बघितले असेल. त्यामुळे जिभेखाली गोळी का ठेवतात, हे तुमच्या लक्षात आले नसेल.*

*पोटातून गोळी घेतल्यानंतर जठरात, लहान आतड्यात त्यातील औषधी पदार्थ रक्तात शोषला जातो. हे औषधी द्रव्य नंतर रक्तातून यकृतात जाते व नंतर पूर्ण शरीरात रक्तावाटे पसरले जाते. यकृतात बऱ्याचशा औषधी द्रव्यांवर चयापचयात्मक प्रक्रिया केल्या जातात. साहजिकच रक्तातील औषधी द्रव्याचे प्रमाण कमी होते. तसेच औषधाचा परिणामही अर्धा ते एक तासाने दिसून येतो.*

*याउलट जिभेखाली औषधी द्रव्य ठेवल्यास ते सरळ रक्तात मिसळले जाते. यकृतात ते जात नसल्याने त्यावर चयापचयाची क्रिया रक्तात येण्यापूर्वी होत नाही. यकृतात नष्ट न झाल्याने रक्तातील औषधी द्रव्याचे प्रमाणही तुलनेने जास्त असते. तसेच औषधाचा परिणाम काही मिनिटांत दिसून येतो. जाठररसामुळे व पचनाच्या क्रियेत नष्ट होणारी औषधी द्रव्ये जिभेखालून वा इंजेक्शनद्वारे द्यावी लागतात.*

*हृदयविकाराचा त्रास सुरू झालेल्या व्यक्तींमध्ये, म्हणजे ज्यांना थोड्या श्रमानंतर छातीत दुखायला लागते त्यांच्यासाठी जिभेखाली ठेवायच्या गोळ्या देतात. या गोळ्यांतील औषधी द्रव्यामुळे हृदयाचा रक्तपुरवठा वाढतो व त्यामुळे छातीत दुखायचे थांबते. खूप कडू औषध जिभेखाली ठेवणे शक्य होणार नाही व मोठ्या प्रमाणात औषधे द्यायचे असेल तरीही हा मार्ग वापरता येणार नाही. रुग्ण सहकार्य करत नसेल वा बेशुद्ध असेल तरीही जिभेखाली औषध ठेवण्याचा मार्ग वापरता येत नाही.*

************************************************************************************************

*मुंबईत जलवाहतुकीसाठी 'भाऊचा धक्का' बांधणारा भाऊ कोण? ते टोपण नाव आहे की नावाचा झालेला अपभ्रंश?*

*एकेकाळी कोकणी आणि गोंयकार प्रवाशांनी गजबजणाऱ्या मुंबईतील भाऊच्या धक्क्य़ाला यंदा 158 वर्षे पूर्ण झाली, त्यानिमित्ताने भाऊच्या धक्क्य़ाच्या इतिहासाची ही सफर.*

*गेल्या दीड शतकाहूनही अधिक काळ या धक्क्य़ावर गरीब कोकणवासी मुंबईत मिसळून जाण्यासाठी उतरत असतात. पण यातील बऱ्याच लोकांना हे माहीत नसते की, या धक्क्याला भाऊचा धक्का का म्हणतात? कोण हे भाऊ?*

*‘भाऊ’ हे घरगुती बिरुद जलवाहतुकीच्या टर्मिनसला दिले आहे आणि ते अनेक बेस्ट बसेसवर मराठीत झळकत आहे! कारण याचा जन्मदाता भाऊ अजिंक्य हा पक्का मुंबईकर! पाठारे प्रभू, या मुंबईच्या आद्य रहिवाशांपैकी एक बांधकाम कंत्राटदार….*

*स्वधन मुंबईच्या हितासाठी खर्चिणारा.. ब्रिटिश राजवटीत कुलाब्याच्या गन फॅक्टरीत हा भाऊ कारकून होता. कॅप्टन रसेल हा तोफखाना विभागातील नामांकित अधिकारी. त्याच्या विभागात एकदा एका मराठी माणसाने चोरी केली. त्याला लष्करी शिस्तीनुसार फटक्यांची शिक्षा सुनावण्यात आली. एका गरीब मराठी तरुणाला सर्वासमक्ष फटके मिळून त्याची बदनामी होणार, त्यामुळे लक्ष्मण अजिंक्य अस्वस्थ झाला. त्याने रसेलसाहेबाकडे कामगाराच्या वतीने क्षमायाचना केली.*

*स्वत: देशाभिमानी असलेल्या कॅ. रसेलला, स्वदेशाचा विचार करून एका कामगाराचे फटके वाचविणाऱ्या हेडक्लार्क अजिंक्य या क्षुल्लक कामगाराविषयी आदर निर्माण झाला. कॅप्टन रसेलने लक्ष्मणला मिठी मारून ‘यू आर माय ब्रदर!’ असे उद्गार काढून त्याची पाठ थोपटली.*

*या उद्गारांमुळे लक्ष्मण अजिंक्यला भाऊ हे नाव पडले ते कायमचे! कॅ. रसेलने या भाऊला व्यापारीक्षेत्रात शिरण्यास उद्युक्त केले. मुंबईत असलेली डबकी आणि सांडपाणी तलाव, मुंबईच्याच कचऱ्याने बुजविण्याचे काम त्या काळी सुरू झालेहोते. भाऊला हे कंत्राट मिळाले. कॅ. रसेलसंबंधी कृतज्ञता म्हणून त्याने आपल्या कंपनीचे नाव ‘भाऊ रसेल आणि कंपनी’ असे दिले.*

*मुंबईच्या पूर्वकिनाऱ्यावर भरणी घालून करनॅक बंदर आणि क्लेअर बंदर उभारणीचे कामहीही कंपनी करीत होती. तेव्हा आपल्या मराठी माणसांचा जलप्रवास सुखकर व्हावा, यासाठी एक धक्का असावा, असा विचार भाऊ अजिंक्यच्या मनात बळावला. ईस्ट इंडिया कंपनी आणि पोर्ट ट्रस्ट यांची अनुमती मिळवून त्याने तो स्वखर्चाने अमलात आणला.*

*कोकणच्या जलवाहतुकीसाठी आजतागायत वापरात असलेला ‘भाऊचा धक्का!’ भाऊ रसेल म्हणजेच लक्ष्मण अजिंक्यचे जिवंत स्मारक. रस्ता वाहतुकीसाठी एसटीचा जन्म झाला नव्हता, त्या काळी अर्ध्या अधिक मुंबईकरांचे मूळ कोकणात होते. बेशिस्तीच्या खासगी बस वाहतुकीपेक्षाही त्या काळी कोकणातून मुंबईकडे प्रवास जलमार्गानेच व्हायचा. 1862 साली भाऊ रसेलने हा धक्का बांधण्यापूर्वी उतारूंचे बोटीतून जमिनीवर पाय टेकेपर्यंत खूप हाल व्हायचे. रात्रभर प्रवास करून आलेली बोट समुद्रात लांब कोठे तरी नांगर टाकायची.*

*मग मोठय़ा हिंदकळणाऱ्या होडय़ांमधून प्रवासी खच्चून भरून, चिखलाने भरलेल्या मुंबईच्या पूर्व किनाऱ्यावर पाऊल ठेवायचे. गोदीत कंत्राटदारी करणारा भाऊ हे दृश्य पाहून रोज हळहळत असे. ब्रिटिश सरकार हे हाल निवारण्यासाठी काही करणार नाही, हे लक्षात आल्यानंतर त्यांच्याच पैशावर गडगंज झालेल्या कंत्राटदार भाऊ अजिंक्यने धक्का स्वत:च उभारण्याचे ठरवले, आणि अल्पावधीतच कोकणी माणसांच्या हक्काचा धक्का तयार झाला. कालांतराने कोकण आणि गोव्याकडे जाणारी जलवाहतूक बंद पडली तरी १९७० पर्यंत भाऊचा धक्का दिवसभर प्रवाशांनी गजबजलेला असे.*

*सकाळी साडेसहा वाजता रेवस-धरमतरकडे जाणारी छोटी बोट सुटली की, आठ वाजता दाभोळ बंदरापर्यंतची मोठी बोट सुटत असे. लागोपाठ रत्नागिरी, विजयदुर्ग, गोवा या लाइनीवरील अगडबंब बोट सुटत असे. याबोटी निघून गेल्या तरी आदल्या दिवशी कोकण-गोव्याकडे गेलेल्या बोटी परतण्याची वेळ झाल्यामुळे दुपापर्यंत भाऊच्या धक्क्य़ाला उसंत नसेच. या काळात भाऊच्या धक्क्य़ाचा अवतार. रेल्वेच्या कुठल्याही टर्मिनसवर दिसणारा असा, बोट धक्क्य़ाला टेकण्याच्या सुमारास, लाल डगलेवाल्या हमालांचा जथ्था..*

*एक गलेलठ्ठ जाडीचा दोरखंड घेऊन तो डेकवर फेकण्यासाठी सज्ज दिसे. मुख्य डेकवर तोंडात चिरूट धरलेला शुभ्र वस्त्रातील गोवेकर कॅप्टन ‘..आऽऽरी माऽऽर, आऽरीऽमाऽऽर’ अशी अनाकलनीय ऑर्डर देऊन बोट धक्क्य़ाला समांतर आणीत असे.*

*बोटीवरून खेचून घेतलेला जाड दोरखंड धक्क्य़ावरील दगडी मनोऱ्याला (कॅपस्टन) बांधला की, हमालांचा जथ्था बोट खेचून धक्क्य़ाला अंगलट करीत असत. सशक्त, चपळ हमाल बोट आणि धक्का यांना जोडणारा सेतू लागण्याच्या अगोदरच कठडय़ावरून हनुमानउडी मारून आत घुसून प्रवाशांचा कब्जा घेऊ पाहत.*

*कोकणी प्रवासी वैतागलेल्या गबाळ्या अवतारात, लाल मातीने रापलेल्या कपडय़ात, केव्हा एकदा जमिनीवर पाऊल ठेवतो, यासाठी आतुर असे. उलट्या करून थकलेले चेहरे, ढीगभर वळकट्या आणि आंबा-फणसाची पोती उचलण्याची करामत करताना तो केविलवाणा होई. तरीही आपल्या गावच्या मातीची ऊब घेतलेला कोकणी माणूस नव्या उत्साहाने गजबजलेल्या मुंबईत धनार्जनासाठी मिसळून जात असे.*

*एके काळी दिवसभर गजबजलेला भाऊचा धक्का आता वयस्कर माणसासारखा सुस्त झाला आहे. आधुनिक कोकण रेल्वे त्याला वाकुल्या दाखवीत असली, तरी स्थितप्रज्ञ ज्येष्ठाच्या नात्याने तो निनादत असतो.....*
*'मीच खरा कोकणी माणसाचा जिवाचा सखा!’*

===========================================
     *अन्न का नासते ?* 

*या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळवून दिलं, फ्रेंच वैज्ञानिक लुई पाश्चरनं. फ्रान्समधल्या मद्यउत्पादकांना एका अडचणीला तोंड द्यावं लागत होतं. त्यांनी तयार करून साठवलेलं मद्य खराब होत होतं. त्याचं कारण त्यांना समजत नव्हतं. आपल्या मद्याला कोणत्या तरी रोगानं ग्रासलंय, अशी त्यांची समजूत होती; आणि त्यावर तोडगा काढण्यासाठी त्यांनी पाश्चरला साकडं घातलं होतं. त्यानं नंतर अनेक प्रयोग केले आणि दाखवून दिलं, की हवेत नेहमीच संधिसाधू जीवाणू वावरत असतात. त्यांचा हमला त्या मद्यावर झाला, की होणाऱ्या जैवरासायनिक प्रक्रियांची परिणती त्या मद्याच्या घटकांमध्ये रासायनिक बदल घडून येण्यात होते. त्यापोटी मग मद्याची मूळची चव आणि त्याचे इतर गुणधर्मही बदलून जातात.*

*जर ते मद्य व्यवस्थित हवाबंद केलं, तर मग त्या मद्याला कसलीही लागण होत नाही आणि ते दीर्घकाळ टिकून राहतं. या प्रयोगांमध्ये पाश्चरनं असाच हवाबंद केलेला एक चंबू अजूनही दोन-अडीच शतकांनंतरही निर्जंतुक राहिला आहे. पॅरिसमधल्या एका संग्रहालयात तो बघायला मिळतो.*

*आपल्या शिजवलेल्या अन्नाची परिस्थितीही वेगळी नसते. शिजवलेल्या ताज्या अन्नामध्ये प्रथिनं, कर्बोदकं, काही चरबी आणि जीवनसत्त्वं असतात. त्यात पाणीही असतं. काहींमध्ये या पाण्याचं प्रमाण जास्त असतं; पण कोरड्या असणाऱ्या भाकरी किंवा पावासारख्या पदार्थांमध्येही काही पाणी असतंच. असं अन्न जर जास्त वेळ उघड्यावर ठेवलं तर ते हवेतल्या संधिसाधू जीवाणूंच्या संपर्कात येतं. ते त्यातल्या रासायनिक घटकांवर तुटून पडतात. त्यांचं विघटन करून आपली गुजराण ते करायला लागतात. आपली प्रजावळ वाढवायला लागतात. अन्नातल्या पाण्याची त्यांना या कामात मदत होते. त्यांच्या करणीमुळं मग त्या प्रथिनांचं किंवा कर्बोदकांचं रूपांतर आम्ल किंवा अल्कोहोल म्हणजेच मद्यार्क यांसारख्या रसायनांमध्ये होतं.*

*त्यांची दुर्गंधी आणि स्वाद यापोटी मग त्या अन्नाची चवच बिघडून जाते. शिवाय त्यात आता त्या जीवाणूंची प्रजा वाढलेली असल्यामुळे ते आरोग्याला बाधकही होतं. या जीवाणूंच्या वाढीसाठी आणि त्यांच्या करणीसाठी विशिष्ट तापमान आणि वाढीव आर्द्रता यांची मदतच होते. त्यामुळेच उबदार आणि ओलावा असलेल्या जागी अन्न लवकर नासतं. उन्हाळ्यात ते लवकर नासतं, तर हिवाळ्यात अधिक काळ टिकतं.*

*अन्न नासूनये यासाठी मग जीवाणूंचा त्याच्याशी संपर्क येणार नाही किंवा त्यांची वाढ होणार नाही, अशी परिस्थिती निर्माण करण्याची आवश्यकता असते. हवाबंद डब्यात ते ठेवणं, रेफ्रिजरेटरमध्ये कमी तापमानात ते साठवणं यांसारख्या उपायांची अन्न टिकवण्यासाठी मदत होते. तसंच त्यातलं पाणी काढून टाकून ते सुकवल्यानंही त्याचा टिकाऊपणा वाढतो.*

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

*ताप जिभेखाली तापमापक ठेवून का मोजतात?*

*ताप मोजण्यासाठी सहसा पाऱ्याचा तापमापक वापरला जातो. त्या मापकाच्या एका टोकाशी असलेल्या फुगीर गोळ्यामध्ये पारा साठवलेला असतो. त्याला उष्णता मिळाली, की तो पारा प्रसरण पावतो व त्या गोळ्याला जोडलेल्या बारीक नळीमधून वर वर सरकू लागतो. त्याच्या प्रसरणाचं मोजमाप करून शरीराचं तापमान मोजलं जातं. पारंपरिक तापमापकांमधल्या त्या नलिकेच्या बाहेरच्या पृष्ठभागावर तापाचे आकडे दाखवलेले असतात.*

*अलीकडे काही डिजिटल तापमापक आले आहेत. त्यांच्यामध्ये नलिकेवरचा आलेख नसतो, तर घड्याळातल्या तबकडीप्रमाणे असलेल्या पडद्यावर ताप दाखवणारे आकडे उमटतात. पाऱ्याच्या ऐवजी इलेक्ट्रॉनिक संवेदकाद्वारे ताप मोजणारे मापकही आता तयार झाले आहेत. तरीही बहुतांश तापमापक पाऱ्याच्या प्रसरणाच्या गुणधर्माचाच उपयोग करून घेतात. त्यानं आपलं काम अचूक बजावावं असं वाटत असेल तर मग तो पाऱ्याचा गोळा, ज्याचं तापमान मोजायचं त्या पदार्थानं संपूर्णपणे वेढला जाण्याची आवश्यकता असते. तसं करायचं तर मग शरीराचा उघडा असलेला भाग त्याच्या संपर्कात येऊन चालणार नाही. कारण अशा भागाचं तापमान हवेच्या तापमानामुळं प्रभावित झालं असण्याची शक्यता असते. तेव्हा उघड्यावर असलेला भाग टाळून त्या गोळ्याला सगळीकडून कवटाळेल, असा शरीराचा भाग निवडायचा तर तीन पर्याय सुचतात.*

*पहिला आपली काख. तो भाग उघडा नसतो. काखेत तापमापकाच्या गोळ्याला वेढून टाकतानाच त्याचाही बाहेरच्या वातावरणाशी संपर्क येणार नाही, याची व्यवस्थाही आपोआप होते. शिवाय तिथं अनावश्यक जोर पडून काचेचा तापमापक फुटण्याची शक्यता फारशी नसते. त्यामुळे खास करून मुलांचं तापमान मोजताना याच भागाचा वापर केला जातो.*

*जिभेच्या खालचा पृष्ठभाग अतिशय नाजूक असतो. त्यामुळे उष्णतेचं वहन तिथून सहजगत्या होतं. साहजिकच तापमानाच्या अचूक मोजमापाला तो भाग जास्त सोईस्कर आहे. प्रौढ व्यक्तींच्या बाबतीत ते तापमापक चावून त्याची मोडतोड करण्याची शक्यता नसते. त्यामुळे त्यांचं तापमान मोजण्यासाठी त्या भागाचा वापर डॉक्टर करतात. शिवाय तसं करताना शरीर उघडं करावं लागत नाही.*

*तिसरा पर्याय इस्पितळांमध्ये बऱ्याच वेळा केला जातो. तो गुदद्वाराचा. तिथं तापमापक ठेवल्यानं अचूक मोजमापासाठी लागणाऱ्या सर्व शर्ती पूर्ण होतात. अर्थात, लाजेकाजेस्तव त्याचा वापर करणं सहसा टाळलं जातं. तेव्हा अचूक मोजमाप आणि सामाजिक सभ्यता या दोन्हींचा विचार करता जिभेखालची त्वचा हा पर्याय सर्वात योग्य वाटतो.*

*डाॅ. बाळ फोंडके यांच्या 'का ?' या पुस्तकातुन*
++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

*अंत्ययात्रेत ‘राम नाम सत्य है’ का म्हणतात?*

*जगातील प्रत्येक जीवाला कधी ना कधी मृत्यूचा सामना करावा लागतो. आजवर कोणीही यापासून वाचवले गेले नाही, किंवा पुढेही जाणार नाही. आयुष्यभरासाठी, पैशाची, गर्विष्ठतेची आणि फसवणूकीच्या बाबतीत, माणूस इकडे तिकडे पळत राहतो, फसवणूकीचा सहारा घेतो, पण मृत्यूनंतर त्याला जगातील सर्व काही सोडावे लागेल आणि वर जावे लागेल. त्याबरोबरच चांगली कामे केली जातात, ज्याच्या आधारे त्याला नवीन जन्म मिळतो.*

*या मार्गावर मानवाला आणखी एक गोष्ट मदत करते, आणि ती म्हणजे ‘राम नाम’. तुम्ही सर्वांनी पाहिलेच असेल की, जेव्हा हिंदूंमध्ये मृतदेह नेला जातो, तेव्हा लोक राम नामाचा उच्चार करत अंत यात्रा नेली जाते.*

*हे का केले जाते, हे आपल्याला माहिती आहे का? यामागील कारण काय आहे?*

*सर्वप्रथम, पांडवांचे थोरले बंधू धर्मराजा युधिष्ठिर यांनी एका श्लोकाद्वारे महाभारत काळात या गोष्टीचा उल्लेख केला आहे. ‘अहन्यहनि भूतानि गच्छंति यमममन्दिरम्। शेषा विभूतिमिच्छंति किमाश्चर्य मत: परम्।।’ म्हणजेच मृतांना स्मशानभूमीत नेत असताना, सर्व लोक ‘राम नाम सत्य है’ म्हणत असतात पण अंत्यसंस्कारानंतर घरी परत आल्यावर ते हा राम नाम विसरतात आणि पुन्हा मायाच्या मोहात पडतात.*

*लोक मृताचे पैसे, घर इत्यादी वाटण्याच्या काळजीत असतात. या मालमत्तेबद्दल ते एकमेकांशी भांडणे सुरू करतात. धर्मराजा युधिष्ठिर पुढे असे म्हणतात की “मनुष्य मरतो, पण शेवटी कुटुंबाला मालमत्ता हवी असते त्यापेक्षा आश्चर्यकारक गोष्ट काय आहे?”*

*एक दिवस इथे सर्व काही सोडले पाहिजे. फक्त आपले कर्म एकत्र असतात. केवळ आणि फक्त राम नावाने आत्म्यास वेग मिळेल. आणि मनुष्य दूसरा जन्म घेईल.*
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

*भारतातील कोणते रेल्वे स्टेशन आहे जेथे एकाच बाकावर बसलेले लोक दोन वेगवेगळ्या राज्यात आहेत?*

*देशातील सर्वात अद्वितीय रेल्वे स्टेशन, एकच बेंच दोन राज्यात विभागले गेले आहे ही कहाणी आहे एका अश्या रेल्वे स्टेशनची, जिचा एक भाग महाराष्ट्रात आहे व दुसरा गुजरात मध्ये. दोन राज्यांच्या वेगवेगळ्या हद्दीत वसलेल्या या स्टेशनमध्ये काय विशेष असेल याची आपण कल्पनाही करू शकत नाही.*

*वास्तविक, हे एकमेव रेल्वे स्टेशन आहे जे गुजरात-महाराष्ट्र सीमेला स्पर्श करते. स्टेशनवर एक बेंच देखील आहे, ज्याचा अर्धा भाग महाराष्ट्रात आणि अर्धा गुजरातमध्ये आहेत. या खंडपीठावर बसलेल्यांनी आपण कोणत्या राज्यात बसलो आहोत हे लक्षात ठेवले पाहिजे. येथे तिकीट खिडकी महाराष्ट्रात तर गुजरातमध्ये स्टेशन मास्टर बसत असत. एवढेच नाही तर रेल्वे घोषणा चार वेगवेगळ्या भाषांमध्ये होते. या स्टेशनचे नाव आहे ‘नवापूर’.*

*नवापूर रेल्वे पोलिस स्टेशन, कॅन्टिंग, तिकिट विंडो, महाराष्ट्र राज्यातील नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर मध्ये येते आणि स्टेशन मास्टर, वेटिंग रूम, पाण्याची टाकी आणि शौचालय हे गुजरात राज्य तापी जिल्ह्यातील उच्छल मध्ये येते. या स्थानकात येणाऱ्या गाड्यांचा एक भाग महाराष्ट्रात आणि दुसरा भाग गुजरातमध्ये या रेल्वे स्थानकाची सर्वात विचित्र गोष्ट म्हणजे दोन्हीच्या हद्दीत लागू असलेले भिन्न कायदे.*

*होय, गुजरातमध्ये दारू विक्रीवर बंदी आहे, त्यानंतर महाराष्ट्रात पान मसाला आणि गुटखा. स्टेशनच्या गुजरात भागामध्ये गुटख्याची विक्री करणे हा गुन्हा नाही, परंतु कोणी चुकून ते महाराष्ट्रातील सीमेवर विकून गेले तर ते गुन्हेगार ठरते. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातही दारू आणि बिअरची विक्री होऊ शकते, परंतु गुजरातमध्ये यावर बंदी आहे. गुजरातमधील कोणी असे करताना आढळल्यास तो गुन्हेगार ठरतो.*

*बऱ्याच वेळा असे घडते की, एका राज्याच्या सीमेवर गुन्हा केल्यावर गुन्हेगार दुसऱ्याराज्यात प्रवेश करतो. अशा परिस्थितीत पोलिस आणि गुन्हेगार यांच्यात डोळेझाक होताना दिसते.*

*नवापूर रेल्वे स्टेशन पश्चिम विभागाच्या सूरत-भुसावळ रेल्वे मार्गावर आहे. सुरत-भुसावळ हा दुहेरी इलेक्ट्रिक रेल्वे मार्ग आहे. याचा सर्वाधिक फायदा महाराष्ट्र व गुजरातमधील व्यापारी घेतात. सुरतमध्ये कापड, हिरा उद्योग आहे, टेक्स्टाईल मिल आहेत. हे स्टेशन कापड व्यापार्यांसाठी खास आहे. त्याशिवाय तेथून जाणा रेल्वे गाड्यांमध्ये बोगी भरल्यानंतर उकाई मासे पश्चिम बंगालला जातात. नवापूर रेल्वे स्थानकात 24 तासांत एकूण 200 गाड्या जातात. स्वच्छतेचसाठी या रेल्वे स्थानकास अनेक वेळा बक्षीस देण्यात आले आहे.*

=============================================================

*मेणबत्त्यांचा धूरही आरोग्यासाठी हानिकारक.*

*मेणबत्त्यांचा मिणमिणता प्रकाश अनेकांना आकर्षित करीत असतो. दिवे गेले की अनेक लोक मेणबत्त्यांचाच आधार घेत असतात. काही ठिकाणी खास कँडल लाईट डिनर, किंवा मेणबत्तीच्या सजवटीचं हॉटेल असतं. हे सारे तुम्हाला रोमँटिक वाटत असले तरीही मेणबत्तीमुळे तुम्हाला काही त्रासदेखील होऊ शकतो.*

*मेणबत्ती जाळल्यानंतर त्यामधून बाहेर पडणारे घटक आरोग्याला त्रासदायक ठरू शकतात, असे तज्ज्ञांनी म्हटले आहे. प्रामुख्याने सुगंधित मेणबत्त्या जाळणे धोकादायक आहे. सिगारेटच्या तुलनेत मेणबत्त्यांचा धूर आरोग्यालाअधिक त्रासदायक ठरतो.*            

*मेणबत्त्यांमधील पॅराफिन वॅक्समध्ये सुमारे 20 विषारी घटक असतात. यामध्ये एसीटोन, फिनोल, जाइलिन, क्रेसोल आणि ब्लोरोबेंजीन हे विषारी घटक अधिक असतात. यामुळे कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराचा धोका बळावतो. यामुळे फुफ्फूसांचे तसेच मेंदूचे आरोग्य बिघडू शकते. सुगंधित मेणबत्त्यांमध्ये काही खास परफ्यूम मिसळली जातात.*

*मेणबत्त्यांमधील पॅराफिन वॅक्स अस्थमाच्या रुग्णांना त्रासदायक ठरू शकतात. मेणबत्ती जाळल्यानंतर त्यामधून एक विचित्र वास बाहेर पडतो. हा गंध फुफ्फूसांमध्ये दाह, जळजळ वाढवतो.*

============================================================

*हे आहेत दहा भारतीयांचे शोध; पण परदेशी म्हणुन खपवले जातात.*

*भारताच्या प्राचीनत्वतेचे जेवढेदाखले द्यावेत तेवढे कमीच आहेत. आपल्या देशाला हजारो वर्षांचा इतिहास आहे ही गोष्ट कोणीही नाकारू शकत नाही, कारण तसे पुरावे देखील उपलब्ध झालेले आहेत. या प्राचीन भारताने जगाला अनेक गोष्टी दिल्या हे देखील तितकेच खरे. तेव्हाची संस्कृती ही त्या काळाच्या मानाने अधिक प्रगत आणि ज्ञानी होती आणि त्यांनी लावलेले काही शोध आपण आजही वापरतो यावरूनचत्यांच्या श्रेष्ठतेची कल्पना करता येते. शुन्य, संस्कृत, साप-शिडीचा खेळ, रेडिओ आणि वायरलेस संचार सेवा, फ्लश टॉयलेट, गणिताची पट्टी आदी शोध प्राचिन भारतात लावण्यात आले होते. परंतु, पण दुर्दैवाने काळाच्या ओघात ते हरवून गेले आणि आज तेच शोध जणू पाश्चिमात्यांनी लावले आहेत असा एक गोड गैरसमज आपल्या तरुण पिढीच्या मनात आहे.*               

*१):नैसर्गिक रेशम.*
*लोकर, खादी याप्रमाणेच नैसर्गिक रेशम सर्वात आधी भारतात शोधण्यात आले. सिंधू नदीच्या खोऱ्यात राहत असलेले लोक खादीचा वापर करीत असत. त्यांच्याजवळ नैसर्गिक पद्धतीनेरेशम मिळवण्याचे तंत्रज्ञान होते. प्राचीन भारतात याचा वापर करण्यात येत होता. तसेच निर्यातहीकेली जात असे. याप्रमाणेच चांगली लोकर प्रथम जम्मू-काश्मीरमध्ये बनविण्यात आली होती.*

*२): क्रूसिबल स्टील.*
*उच्च गुणवत्ता असलेले स्टील प्राचीन भारतातील दक्षिणेकडील भागांत तयार केले जात असे. ज्या पद्धतीने हे स्टील तयार केले जात होते त्याच पद्धतीने क्रूसिबल तंत्रज्ञानाचा वापर करून स्टील घडविण्यात येते. याअंतर्गत शुद्ध लोखंड वितळवून एका कंटेनरमध्ये काच आणि लाकडांसोबत ठेवले जाई. त्यानंतर शुद्ध स्टील बनत असे.*

*३): बंदर.*
*भारत पहिला असा देश आहे, जेथे इसवीसन पूर्व २००४ मध्ये समुद्र किनाऱ्यांवर बंदर होते. हडप्पा संस्कृतीच्या लोकांनी लोथलमध्येपहिले बंदर उभारले होते. त्यासाठीत्या काळातील अत्याधुनिक समुद्र विज्ञान आणि इंजिनिअरिंगचा वापर करण्यात आला होता. समुद्राच्या लाटा आणि हायड्रोग्राफीचे ज्ञान वापरून हे बंदर बांधण्यात आले होते.*

*४): कापूस कातणारा चरखा.*
*कापूस कातण्याचा चरखा, ज्याला कापूस जिन म्हटले जाते, यात कापसाच्या बोंडातून बिज काढले जाते. अजिंठा आणि वेरूळ येथील गुफांमध्ये मिळालेल्या पुराव्यांवरून इसवीसन पूर्व ५०० मध्ये हाताने चालविण्यात येणाऱ्या या मशिनला तेव्हाही चरखाच म्हटले जात असे. कालानुरूप या मशिनमध्ये अनेक बदल झाले. त्यामुळे चांगल्या खादीचे विदेशात निर्यात केले जात असे.*

*५): शाम्पू.*
*शाम्पूचा शोध भारतात पहिल्यांदा लावण्यात आला होता. त्याला आधी चांपो म्हटले जायचे. १७६२ च्या जवळपास मुघलकालीन शासनकालामध्येबंगालच्या नवाबांनी याचा उपयोग केला होता. तेव्हा डोक्याची मालिशकरण्यासाठी याचा तेलाच्या रुपात उपयोग केला जायचा. त्याचेही काही प्रकार होते.*

*६): हिरा.*
*दागिन्यांमध्ये वापरला जाणार हिरा पहिल्यांदा भारतीय खाणींमध्ये सापडला होता. मध्य भारतात हिऱ्यांचे मोठे भंडार सापडले आहे. १८ व्या शतकात भारत एकमेव देश होता जेथे हिरा सापडला होता. त्यानंतर भारताने हिऱ्याची निर्यातही सुरू केली होती. यासोबतच प्राचीन भारतीयांना हिऱ्याची उपयोगीता, हिरा कापण्याची क्षमता आणि चमक टिकवून ठेवण्याचे तंत्रज्ञान अवगत होते.*

*७): बुध्दिबळ.*
*चतुरंगा नंतर बुद्धिबळाचा शोध लावण्यात आला होता. गुप्त वंशकाळात ६ व्या शतकाच्या जवळपास भारतात याचा शोध लावण्यात आला. प्राचिन काळापासून हा खेळ खेळला जात होता.*

*८): शाई.*
*शाई ही लिखाणासाठी अतिशय महत्त्वाची वस्तू आहे. याचा शोध भारतात लावण्यात आला होता. प्राचीन भारतातील पांडुलिपिमध्ये काळ्या रंगाची शाई वापरली जात असे. जळालेली राळ, चारकोल, हाडे आणि कार्बन यांच्या मिश्रणातून शाईची निर्मिती होत असे.*

*९): सर्जरी.*
*मोतीबिंदूची शस्त्रक्रिया आणि प्लास्टिक सर्जरी प्रथम भारतात करण्यात आली, याचे पुरावे मिळाले आहेत. प्राचीन चिकित्सक सुश्रुत यांनी पहिल्यांदा अशी सर्जरी केली होती. त्यांनी वापरलेल्या पद्धतीचे अरेबिक भाषेत भाषांतर करण्यात आले. त्यानंतर ती युरोपमध्ये गेली. त्यांनी एका गोलसुईचा वापर करीत मोतिबिंदू काढला होता.*

*१०): बटण.*
*शर्ट-पॅण्ट आणि इतरही कपड्यांमध्ये बटणा लावल्या असतात, आता तर त्याला एक फॅशन एक्सेसरी म्हणून देखील वापरल्या जाते. तुम्हाला विश्वास बसणार नाही पण ही गोष्ट खरी आहे की बटणचाशोध प्रथम भारतात लावण्यात आला. याचे अनेक ऐतिहासिक पुरावे उपलब्ध आहेत. सिंधू नदीच्या खोऱ्यात बटण वापरत असलेले लोक राहत होते. शिंपल्यांना वेगवेगळे आकार देऊन त्यात छिद्र करण्यात येत होते. लवकरच त्यात बदल झाला. त्याच्या डिझाईनमध्ये सुधारणाहीकरण्यात आल्या होत्या. झाला ना आता गैरसमज दूर? हे पाश्चिमात्यांचे नाहीत, तर आपल्या पूर्वजांचे शोध आहेत.*

+++++++++++++++++++++++++++++

शिवकालीन वजने(मापे)-
 * अठवे- शेराचा 1/8
 * अडशेरि- अडीच शेर
 * अदपाव- अर्धा पावशेर
 * अदमण- अर्धा मण
 * अदशेर- अर्धा शेर
 * अधोली- अर्धी पायली
 * अंजली- ओजळभर पानी
 * आटके- अर्धा शेर
 * आढक- चार शेर, पायली
 * कर्ष- सोळा माषांचे एक परीमाण
 * कार्त- पाव रत्तल
 * किळवे- अर्धा छटाक, अर्धे निवळे
 * कुडव- आठ शेर
 * कुंभ- वीस खंडी
 * कोथळी- मुंबईत 6 मणांची गोनी
 * कोड- खंडी, वीस मण
 * कोळवे- शेराचा अष्ठमांश
 * खारी- 16 द्रोण, एक खंडी
 * गरांव- अर्ध गूंज माप
 * गिधवे- धान्य मोजन्याचे एक माप
 * गुंज-  एक वजन परिमाण
 * चंपा- दोन शेर धान्याचे माप 
 * चवाटके- छटाक
 * चवाळामण- एक प्रकारचा मण
 * चाटंक- पांच तोळे वजनाचे परिमाण
 * चाळीसा- चाळीस शेरांचे माप
 * चिटके- अर्ध्या कोळव्याचे माप
 * चिपटे- पावशेराचे माप
 * चिमटी- हाताचा अंगठा व तर्जनी याच्या पकडित मावनारा पदार्थ
 * चिळवे- कोळव्याचा निम्मा भाग
 * चोथवा- एक पायली
 * चौटके- चार टाकांचे माप,छाटाक, चवटके
 * चौशेरी- चार शेरांचे माप
 * छटाकी- छटाक
 * छतिसी- छत्तीस परिमानाचे वजन
 * टवणा- पांच शेरांचे माप
 * टांक- एक तोळा
 * टिपरी- मापी पावशेर
 * टोमणे- पांच शेरांचे तेल मोजन्याचे माप
 * टवका- दोन्ही हातात मावेल एवढे परिमाण, कवटा
 * डवक- वस्तुवर पाचही बोटे पसरुन मारून घेतलेले परिमाण
 * डोळा- 16 शेरांचे माप
 * धडा- दहा शेरी वजन केलेल्या मापाचे परिमाण
 * धरण- सुमारे 24 गूंजाइतके वजन
 * नकटे- अर्ध्या पावशेराचे माप,निपटे,नवटाक,10 तोळ्यांचे वजन
 * नग- कापसाचे वजन करण्याचे एक परिमाण
 * नाकटी- दीड पावशेराचे माप
 * नाळके- एक माप
 * निउटके- शेराचा बत्तीसावा हिस्सा
 * तोळा- 96 भार गुंजांचा तोळा
 * पक्का शेर- 80 तोळ्यांचा शेर
 * पड- मापी 2 शेर, पाउन शेर
 * पल- 40 मासे वजन, 380 गुंजांचे वजन
 * पल्ला- 30 पायली किंवा 120 शेर, 120 शेरांचे अडीच मणाचे पक्के वजन
 * पान- पावशेर
 * पाभ- एक प्रकारचे माप
 * पायली- चार शेरांचे माप
 * पायली- 48 शेरांची खानदेशि एक पायली
 * पिक्कल- 5320 सुरती रूपये भार वजन
 * पिटके- अदपाव
 * फरा/फरी- धान्य मोजन्याचे साधन
 * बेताळामण- 1568 सुरती रुपयांचे एक माप
 * भरा- धान्याचे एक माप
 * भरो- चार खंडीचे कुडाळ प्रांतातिल एक माप
 * भार- आठ हजार तोळे वजन
 * मणखाण- सुमारे एक मण
 * मणका- एक मणाचे माप
 * मापटे- अर्धा शेर
 * मापारी- धान्य ई. मोजन्याचे फरां नावाचे एक माप
 * माष- पांच, आठ किंवा दहा रत्तीच वजन
* मासा- आठ गुंजांचे वजन
 * मुटला- सहा शेराची गुळाची ठेप
 * मूठ- मुठभर धान्य
 * रत्तल/रतल- सुमारे 15 औसांचे म्हणजे 36 सुरती रूपयांइतके वजन
 * रोवळा- एक माप
 * लिक्षा- मोहरीच्या दाण्याच्या एक षोडशांश वजनाइतके परिमाण
 * वाल- तिन गूंजाभर वजन
 * वैताद- एक तृतयांश तोळा 
 * शणपो- भात मोजन्याची मोठी ओंजळ 
 * शिरिद- पावशेर
 * शीग- धान्याचे माप भरले असता मापाच्या वर येणारी निमुळती रास
 * शिगवर- अगदी शीग लोटून सपाट केलेले माप
 * शेर- पदार्थ तोलावयाचे किंवा मापावयाचे एक प्रमाण
 * साक- एक हाताची ओंजळ
 * सामाशी- सहा मासे वजनाचे
 * सोट- सुमारे 20 पायली धान्य भरून तोंड शिवलेले पोते.
सौजन्य - देव पाटील

दिलीप कदम यांच्या भिंतीवरुन साभार

++++++++++++++


भारतात आहेत अशी १० जगावेगळी गावं ! कारणं तर जाणून घ्या !!

मित्रांनो,भारतातल्या ६ लाख ५० हजार गावांपैकी १० गावे अशी आहेत जी आज जगात त्यांच्या वेगळेपणाबद्दल ओळखली जातात. या गावांमध्ये काही खास गोष्टी आहेत ज्यामुळे त्यांची वेगळी ओळख निर्माण झाली आहे. आता उदाहरणच द्यायचं झालं तर आपल्या महाराष्ट्रातील शनिशिंगणापूरचं घ्या राव. या गावात घरांना दारवाजे नाहीत. घरातील महत्वाच्या गोष्टी चोरीला जाणार नाहीत हा विश्वास जगात आणखी कुठे पाहायला मिळेल ?

राव हे झालं एक उदाहरण चला अशी आणखी उदाहरणे...


१. शेटफळ, महाराष्ट्र

साप आणि माणूस एका घरात राहू शकत नाही. कारण साप चावल्याने माणूस देवा घरी जातो. पण हे आपल्यासाठी राव, सोलापुरातील मोहोळ तालुक्यात असलेलं शेतपळ गाव याला अपवाद आहे. या गावात साप हे जणू घरातीलच एक सदस्य मानले जातात. या गावात तुम्ही सापांना सहजपणे वावरताना पाहू शकता. काही वर्षांपूर्वी  या गावातील एक फोटो व्हायरल झाला होता ज्यात लहान मुले ‘किंग कोब्रा’ सोबत खेळत आहेत. आश्चर्य म्हणजे या गावातील एकालाही साप चावल्याचं आजवर दिसून आलेलं नाही. आहे की नाही अजब ?



२. बरवान काला, बिहार

हे आहे सिंगल लोकांच गाव. सध्या लग्नाचा मौसम सुरु आहे. गावागावात नवीन जोडपी तयार होत आहेत. पण या गावात गेल्या ५० वर्षांमध्ये एकही लग्न झालेलं नाही. या गावात पोहोचण्यासाठी दळणवळणाची सोय नसल्याने या गावात कोणीही आपली मुलगी देत नाही. या गावात १६ ते ८० वर्षांपर्यंतचे ‘सिंगल’ लोक राहतात.

या गावात राहू शकेल असा तुमची कोणता मित्र आहे का ?
 
३. मट्टूर, कर्नाटक

हे आहे संस्कृत बोलणारं गाव. संस्कृत ही भारतातील प्राचीन भाषा, पण काळाच्या ओघात या भाषेने इतर अनेक भाषांना जन्म दिला आणि स्वतः मात्र लोप पावली. आज भारतात मट्टूर हे एकमेव गाव आहे जिथे ९० टक्के लोक संस्कृत भाषेत बोलतात. या गावाने संस्कृतला आजही मुख्य भाषा म्हणून जपून ठेवलं आहे.

४. मावल्यान्नॉंग, मेघालय
मेघालय मधल्या मावल्यान्नॉंग गाव हे आशियातील सर्वात स्वच्छ गाव म्हणून ओळखलं जातं. स्वच्छ भारत अभियान सुरु होण्याआधीच हे गाव स्वच्छतेच्या दिशेने अग्रेसर झाले होते. स्वच्छतेबरोबर या गावात साक्षरतेचं प्रमाण १००% आहे.

५. पुन्सारी, गुजरात

भारतातील सर्वात हायटेक गाव म्हणजे पुन्सारी. या गावात १० वर्षांपूर्वी पर्यंत मुलभूत सोई नव्हत्या पण आज या गावात वायफाय, सीसीटीव्ही, उत्तम दळणवळण, सौरउर्जेवर चालणारी साधने इत्यादी आधुनिक गोष्टी पाहायला मिळतात.

६. हिवरे बाजार, महाराष्ट्र
या गावाला श्रीमंतांचं गाव म्हणतात. ‘हिवरे बाजार’ हे भारतातील सर्व गावांसाठी एक आदर्श आहे. १९७२ च्या दुष्काळानंतर हे गाव चोरीमारी, दरोडे, स्थलांतर, मारामाऱ्या अशा समस्यांनी ग्रासले होते. गावाची सुधारणा १९८९ सालापासून सरपंच पोपटराव पवार यांच्या प्रयत्नांमुळे होऊ लागली. आणि आज या गावातील एकही शेतकरी गरीब नाही. गावातील २३५ कुटुंबांपैकी ६० कुटुंब कोठ्याधीश आहेत.

७. कोदिन्ही, केरला

या गावाला म्हणतात ‘शेम-टू-शेम’ लोकांचं गाव. या गावातील २५०० लोकांपैकी तब्बल ४१४ लोक जुळे आहेत. या अजब प्रकाराने तर जगभरातल्या शास्त्रज्ञांना सुद्धा बुचकळ्यात पाडलंय राव. जुळे जन्माला येणे म्हणजे आपल्यासाठी अगदी दुर्मिळ गोष्ट म्हणता येईल. पण या गावात जुळे जन्माला येण्याचा दर हा इतर गावांपेक्षा सर्वात जास्त आहे.

८. जम्बुर, गुजरात
मंडळी, या गावात राहणारे लोक हे आफ्रिकेतील सिद्दी जमातीचे आहेत. हे लोक गुजरात कर्नाटक भागात स्थाईक झाले होते. गुजरात मधील जम्बुर गाव संपूर्णपणे सिद्दी जमातीचं म्हणून ओळखलं जातं. मूळ आफ्रिकेतील असले तरी या गावातील लोक अस्खलित गुजराती बोलतात. याच सिद्दी जमातीतील एक म्हणजे महाराष्ट्राच्या इतिहासातील ‘सिद्दी जौहर’ होय.

९. मायोंग, आसाम
या गावाची ओळख ‘जादूटोणा करणाऱ्यांचं गाव’ अशी आहे. आजच्या आधुनिक जगात जादूटोणा मानला जात नसला तरी या गावातील लोक जादूटोणा आणि तंत्रविद्येवर भालेतच विश्वास ठेवून आहेत. गावकऱ्यांना वाटतं की तंत्रमंत्राने कोणतीही इच्छा पूर्ण करता येते. या गावात काळ्या जादूचे प्रयोग केले जातात. भारतातील हे एक सर्वात मोठं जादूटोणा करणाऱ्यांचं व शिकणाऱ्यांचं गाव आहे.

१०. शनिशिंगणापूर, महाराष्ट्र

बाहेर जाताना आपण दार नीट लावलंय की नाही हे तपासतो पण शनिशिंगणापूर मध्ये घरांना दारचं नाहीत राव. शनिशिंगणापूर मध्ये लोक आपल्या मौल्यवान गोष्टी घरात किंवा घराबाहेर ठेवून बिंदास्त राहतात. याशिवाय या गावात देशातील पहिली अशी बँक तयार झाली जिथे चक्क कुलूप नाही. या गावात कधी चोरी होत नाही अशी समजूत आहे.

मित्रांनो, या १० गावांनी सिद्ध केलंय आपला देश जगात वेगळा का आहे ते !!

++++++++++

चौदा वर्षांच्या वनवासात श्रीरामांनी कुठे कुठे वास्तव्य केले.?

रामायण व महाभारत हे समस्त हिंदूंसाठी पवित्र धर्मग्रंथ आहेत. काही लोक म्हणतात की ह्या फक्त कथा आहेत आणि हे काल्पनिक कथेवर आधारित ग्रंथ आहेत. पण बहुसंख्य लोकांची ही श्रद्धास्थाने आहेत. आणि आपल्यापैकी जवळजवळ सगळेच ह्यावर मनापासून विश्वास ठेवतो.
काही लोक तर ह्याचे पुरावे शोधून नास्तिकांचे मत बदलण्यासाठी आयुष्यभर प्रयत्न करतात. प्रसिद्ध इतिहासकार आणि पुरातत्वशास्त्रज्ञ अनुसंधानकर्ता डॉक्टर राम अवतार ह्यांनी रामायणावर व श्रीराम आणि सीतेच्या आयुष्यातील घटनांचा अभ्यास करून त्या निगडित २०० पेक्षा जास्त जागा शोधून काढल्या आहेत.
श्रीराम व सीता ह्यांना चौदा वर्षांच्या वनवासाला जावे लागले आणि त्यांच्याबरोबर लक्ष्मण सुद्धा वनवासाला गेले हे तर सर्वांनाच माहिती आहे. ह्या वनवासादरम्यान ह्या तिघांनी कुठल्या ठिकाणी वास्तव्य केले हे आपण आज जाणून घेऊया.

१ शृंगवेरपूर
श्रीरामांना जेव्हा वनवासाची आज्ञा मिळाली तेव्हा संशोधक व वाल्मिकी रामायणानुसार ते सर्वात आधी अयोध्येहून २० किमी लांब असलेल्या तमसा नदीच्या किनारी गेले. त्यानंतर त्यांनी गोमती नदी पार केली आणि प्रयागराज (अलाहाबाद ) पासून २०-२२ किमी असलेल्या शृंगवेरपूरला गेले.
ह्या ठिकाणी निषादराज गुहाचे राज्य होते. ह्याच ठिकाणी श्रीराम गंगानदीच्या किनारी गेले आणि तेथे त्यांनी नाविकाला गंगा नदी पार करून देण्यास सांगितले.

२. सिंगरौर
प्रयागराजपासून उत्तर -पश्चिमेच्या दिशेने ३५-३६ किमी लांब सिंगरौर नावाचे गाव होते. कदाचित हेच गाव श्रुंगवेरपूर असू शकते. रामायणात ह्या गावाचा उल्लेख आला आहे. हे गाव गंगानदीच्या किनाऱ्यावर वसलेले होते. महाभारतात ह्या स्थानाचा उल्लेख “तीर्थस्थळ” ह्या नावाने झाला आहे.

३. कुरई
प्रयागराज जिल्ह्यातच कुरई नावाचे गाव आहे. हे गाव गंगा नदीच्या किनारी सिंगरौर गावाच्या जवळच आहे. गंगा नदीच्या ह्या तटावर कुरई तर पलीकडच्या तटावर सिंगरौर आहे. सिंगरौर गावातून नदी पार केल्यानंतर श्रीराम. सीता व लक्ष्मण ह्याच गावात उतरले होते.
ह्या गावात एक लहानसे देऊळ आहे. असे म्हणतात की गंगा नदी पार केल्यानंतर श्रीराम, सीता व लक्ष्मण थोड्या वेळासाठी आराम करण्यास थांबले होते. त्याच ठिकाणी आज हे देऊळ बांधलेले आहे.

४.चित्रकूटचा घाट
कुरई गावातून पुढे श्रीराम प्रयागला म्हणजे अलाहाबादला गेले. ह्या ठिकाणी गंगा व यमुना ह्या दोन नद्यांचा संगम आहे. हे ठिकाण सर्व हिंदूंसाठी अत्यन्त पवित्र तीर्थक्षेत्र आहे. ह्याठिकाणी आल्यानंतर श्रीरामांनी यमुना नदी पार केली आणि ते चित्रकुटला पोहोचले.
ह्याच ठिकाणी भरताने श्रीरामांच्या पादुका घेतल्या व राजा दशरथाच्या पश्चात त्या पादुका सिंहासनावर ठेवून श्रीरामाच्या वतीने राज्यकारभार सांभाळला.

५अत्री ऋषींचा आश्रम
चित्रकूटच्या  जवळच मध्यप्रदेशातील सतना ह्या ठिकाणी अत्रि ऋषींचा आश्रम होता. अत्रि ऋषी चित्रकूटच्या तपोवनात राहत होते.
ह्याठिकाणी श्रीरामांनी काही काळ सीता व लक्ष्मण ह्यांच्यासह वास्तव्य केले. अत्रि ऋषींच्या आश्रमाच्या जवळच राक्षसांचा एक समूह राहत होता. हे राक्षस आश्रमातील लोकांना त्रास देत असत. यज्ञयागात उपद्रव करत असत. श्रीरामांनी ह्या राक्षसांचा वध केला. ह्याचे संपूर्ण वर्णन वाल्मिकी रामायणाच्या अयोध्याकांडात केले आहे.
‘पहाटेच्या वेळी जेव्हा श्रीराम आश्रमातून जाण्यास निघाले तेव्हा अत्रि ऋषी त्यांना निरोप देताना म्हणाले की,
” हे राघव! ह्या वनांत भयंकर राक्षस आणि सर्प निवास करतात. ते येथील माणसांना अनेक प्रकारे त्रास देतात. ह्याच कारणाने अनेक तपस्वी लोक अकाली मृत्यू पावतात. माझी अशी इच्छा आहे की तुम्ही त्यांचा विनाश करून ह्या सर्व तपस्व्यांचे रक्षण करावे.”
श्रीरामांनी महर्षींची आज्ञा शिरोधार्थ मानून त्यांना त्या उपद्रवी राक्षस तसेच माणसांचे प्राण घेणाऱ्या सर्पांना नष्ट करण्याचे वचन दिले व त्यांनी आपल्या पत्नी व प्रिय धाकट्या बंधूंसह पुढे प्रस्थान केले.’

६. दंडकारण्य
अत्रि ऋषींच्या आश्रमात काही काळ वास्तव्य केल्यानंतर श्रीरामांनी मध्यप्रदेश व छत्तीसगढ येथील घनदाट जंगलांत काही काळ आश्रय घेतला. हे वन म्हणजेच दंडकारण्य होय.
ह्याच ठिकाणी श्रीरामांनी वनवासातील बराच काळ व्यतीत केला. चौदा वर्षांपैकी १० वर्षे ते ह्या ठिकाणी वास्तव्यास होते.
अत्री आश्रमातून ते मध्यप्रदेशातील “रामवन ” येथे गेले. हे सतना ह्या ठिकाणी आहे. मध्यप्रदेश व छत्तीसगढमधील नर्मदा व महानदी ह्या नद्यांच्या किनारी असलेल्या ऋषींच्या अनेक आश्रमांत श्रीरामांनी भ्रमण केले. ह्या प्रदेशात ते जवळजवळ दहा वर्षे राहिले.
दंडकारण्य क्षेत्र आणि सतनाच्या पुढे असलेल्या सुतीक्ष्ण मुनी व सरभंग मुनींच्या आश्रमात ते गेले. आणि नंतर सतीक्ष्ण आश्रमात ते परत आले. ह्याचे पुरावे देणारी शृंगी आश्रम, राम-लक्ष्मण मंदिर, मांडव्य आश्रम ही व अशी अनेक स्मारके पन्ना, रायपूर, बस्तर आणि जगदलपूर ह्याठिकाणी आजही आहेत.

७. शहडोल (अमरकंटक)
दंडकारण्यातून श्रीराम आधुनिक काळातील जबलपूर किंवा अमरकंटक (शहडोल ) येथे गेले असावेत असा संशोधकांचा कयास आहे.
शहडोलच्या पूर्वेला सरगुजा नावाचा प्रदेश आहे. येथील एका पर्वताचे नाव “रामगढ” असे आहे. ह्याच ठिकाणी ३० फूट उंचावरून एक धबधबा ज्या कुंडात पडतो त्या कुंडाला “सीता कुंड” असे नाव दिले आहे. ह्याच ठिकाणी “वशिष्ठ गुहा” सुद्धा आहे.
हे शहर गोदावरी नदीच्या किनारी वसलेले आहे व येथे सीता व श्रीरामांचे देऊळ आहे जे अत्यंत प्रसिद्ध आहे. हे देऊळ भद्रगिरी पर्वतावर आहे. असे म्हणतात की वनवासादरम्यान काही काळ भद्रगिरी पर्वतावर व्यतीत केला. स्थानिक मान्यतेनुसार दंडकारण्याच्या आकाशातच रावण व जटायूचे युद्ध झाले होते आणि जटायूचे काही अवयव दंडकारण्यात पडले होते.
असे म्हणतात की जगात जटायूचे एकमेव मंदिर ह्याच ठिकाणी आहे. दंडकारण्याचा उल्लेख पुराणांत सुद्धा अनेक ठिकाणी आला आहे. ह्या क्षेत्राच्या उत्पत्तीची कथा अगस्त्य मुनींशी निगडित आहे. अगस्त्य मुनींचा नाशिक मध्ये एक आश्रम होता तसेच दंडकारण्यात सुद्धा एक आश्रम होता.

७. पंचवटी ,नाशिक
दंडकारण्यामध्ये अनेक मुनींच्या आश्रमात वास्तव्य केल्यानंतर श्रीराम अनेक नद्या, सरोवरे, पर्वत, आणि वने पार करून नाशिकात अगस्त्य ऋषींच्या आश्रमात गेले. अगस्त्य ऋषींचा आश्रम नाशिकमधील पंचवटी येथे होता.
श्रीरामांनी लक्ष्मण व सीतेसह ह्या आश्रमात काही काळ व्यतीत केला. अगस्त्य मुनींनी श्रीरामांना त्यांच्या अग्निशाळेत तयार केलेली शस्त्रे भेट दिली. श्रीराम पंचवटीत राहिले आणि त्यांनी गोदावरीच्या तटावर स्नान आणि ध्यान केले . नाशिकात गोदावरीच्या तटावर पाच वृक्षांचे स्थान हे पंचवटी म्हणून ओळखले जाते.
वड, पिंपळ, आवळा, बेल आणि अशोक हे ते पाच वृक्ष आहेत. ह्याच ठिकाणी सीता मातेच्या गुहेजवळ पाच प्राचीन वृक्ष आहेत. ह्या वृक्षांना पंचवट म्हटले जाते. असे म्हणतात ही झाडे श्रीराम-सीता व लक्ष्मण ह्यांनी स्वत: येथे लावली. ह्याच ठिकाणी लक्ष्मणाने शूर्पणखेचे नाक कापले होते व श्रीराम-लक्ष्मणाने खर व दूषण ह्या राक्षसांशी युद्ध देखील केले होते.
मारिच राक्षसाचा वध पंचवटीच्या जवळच मृगव्याधेश्वर येथे झाला होता. ह्याच ठिकाणी जटायू व श्रीरामांची मैत्री देखील झाली होती. वाल्मिकी रामायणात अरण्यकांडात पंचवटीचे अत्यंत सुंदर वर्णन केलेलं आहे.

८. सीताहरण झाले ते स्थान (सर्वतीर्थ)
नाशिकमध्ये मारीच, खर व दूषण ह्यांच्या वधानंतर रावणाने सीतेचे हरण केले आणि रावणाला विरोध करताना जटायूचाही मृत्यू झाला.
ह्या घटनेचे स्मारक नाशिकपासून ५६ किमी लांब असलेल्या ताकेड गावात “सर्वतीर्थ” नावाच्या ठिकाणी आहे. जटायूचा मृत्यू ह्याच ठिकाणी झाला. हे ठिकाण इगतपुरीमध्ये आहे. ह्या ठिकाणाला “सर्वतीर्थ” असे म्हणतात कारण ह्याच ठिकाणी मरणासन्न अवस्थेत जटायूने सीता मातेविषयी श्रीरामांना सांगितले.
इथेच जटायूच्या मृत्यूनंतर श्रीरामांनी त्याचे अंत्यसंस्कार केले व आपल्या पित्याचे व जटायूचे श्राद्ध -तर्पण केले. ह्याच ठिकाणी लक्ष्मणाने सीतेच्या रक्षणासाठी लक्ष्मणरेषा आखली होती असे म्हणतात.

९. पर्णशाला, भद्राचलम
पर्णशाला हे ठिकाण आंध्रप्रदेशातील खम्माम जिल्ह्यातील भद्राचलम येथे स्थित आहे. हे ठिकाण रामालयहून १ तासाच्या अंतरावर आहे. ह्या ठिकाणाला पनसाला किंवा पनशाला असेही म्हणतात.
ह्याच ठिकाणी रावणाने सीतामातेला पुष्पक विमानात बसवले होते म्हणूनच ह्या ठिकाणाला सीतामातेचे हरण स्थळ मानतात. ह्याच प्रदेशात राम सीतेचे प्राचीन देऊळ आहे

१ ०. सीतेचा शोध (तुंगभद्रा व कावेरी नदीचे क्षेत्र)
सीतेच्या शोधाचे प्रथम स्थान म्हणजे जेथे जटायूचा मृत्यू झाला (सर्वतीर्थ) ते होय. त्यानंतर श्रीराम व लक्ष्मणाने तुंगभद्रा व कावेरी नदीच्या क्षेत्रात अनेक ठिकाणी सीतेचा शोध घेतला.

११. शबरीचा आश्रम (पम्पा सरोवर)
तुंगभद्रा व कावेरी नदी पार केल्यानंतर श्रीराम व लक्ष्मण सीतेच्या शोधार्थ विविध ठिकाणी गेले. जटायू व कबंधची भेट झाल्यानंतर ते दोघे ऋष्यमूक पर्वतावर गेले. त्या ठिकाणी जाताना ते पम्पा नदीच्याजवळ असलेल्या शबरी ह्या रामभक्त स्त्रीच्या आश्रमात गेले.
हा प्रदेश आज केरळ राज्यात आहे. पम्पा नदी ही केरळ राज्यातील तिसरी मोठी नदी आहे. ह्या नदीला पम्बा असेही दुसरे नाव आहे. पूर्वी तुंगभद्रा नदीलाच पम्पा म्हणत असत. ह्याच नदीवर हंपी हे शहर वसलेले आहे. ह्या ठिकाणी बोरांची अनेक झाडे आहेत.
रामायणात हंपीचा उल्लेख वानरांचे राज्य किष्किंधा राज्याची राजधानी म्हणून आला आहे.

१२. हनुमान भेट –
मलय पर्वत अन चंदनाची वने पार करत श्रीराम व लक्ष्मण ऋष्यमुक पर्वताकडे गेले. ह्या ठिकाणी त्यांची हनुमान व सुग्रीवाशी भेट झाली.
ह्या नदीला पुराणात चक्रतीर्थ मानले आहे. ह्याच पर्वताच्या पायथ्याशी श्रीरामाचे मंदिर आहे. ह्याच्या जवळच्या पर्वताला “मतंग पर्वत” म्हणतात. ह्याच पर्वतावर मतंग ऋषींचा आश्रम होता.
रामायणातील अशी काही सत्यं जी दाखवतात रावणा सारखा ‘ज्ञानी’ पुरुष सापडणे कठीण!
रामायणावर विश्वास नसणाऱ्यांनो…जा श्रीलंकेत…!

१३. कोडीकरई
हनुमान आणि सुग्रीवला भेटल्यानंतर श्रीरामांनी सेना जमवली आणि त्यांनी लंकेकडे प्रस्थान केले. मलय पर्वत, चंदन वन, अनेक नद्या , धबधबे आणि वने पार केल्यानंतर श्रीराम व त्यांच्या सेनेने समुद्राकडे प्रस्थान केले.
श्रीरामांनी त्यांच्या सेनेला कोडीकरई येथे एकत्रित केले. तामिळनाडू राज्याला मोठा समुद्रकिनारा लाभला आहे. कोडीकरई हे ठिकाण वेलंकनीच्या दक्षिणेला आहे. ह्या गावाच्या पूर्वेला बंगालचा उपसागर आणि दक्षिणेला पाल्क स्ट्रीट आहे.
ह्या ठिकाणी आल्यानंतर श्रीराम व त्यांच्या सेनेच्या असे लक्षात आले की ह्या ठिकाणहून समुद्र ओलांडून जाणे शक्य नाही आणि येथे पूल सुद्धा बांधला जाऊ शकत नाही म्हणूनच श्रीराम त्यांच्या सेनेसह रामेश्वरमला गेले.

१४. रामेश्वरम
रामेश्वरमला समुद्र शांत आहे. म्हणूनच येथे पूल बांधणे किंवा इथून समुद्र ओलांडणे सोपे होते.

१५. धनुषकोडी
वाल्मिकी रामायणानुसार श्रीरामांनी तीन दिवस शोध घेतल्यानंतर त्यांना रामेश्वरमच्या पुढे समुद्रात असे स्थान सापडले जिथून लंकेला जाणे सोपे होते. त्यांनी नल व नीलच्या मदतीने लंकेपर्यंत पूल बांधला.
छेदुकराई तसेच रामेश्वरांच्या आजूबाजूला ह्या घटनेच्या संदर्भातील अनेक स्मृतिचिन्हे आजही आहेत. येथील नाविक धनुषकोडीहुन लोकांना रामसेतूचे अवशेष आजही दाखवयाला नेतात.
ह्या ठिकाणी समुद्राची खोली नदीइतकीच आहे आणि काही काही ठिकाणी तळ दिसतो.
खरे तर येथे एक पूल बुडाला आहे. १८६० मध्ये हा पूल स्पष्ट दिसला आणि तो हटवण्यासाटी अनेक प्रयत्न केले गेले. इंग्रज लोक ह्या पुलाला ऍडम ब्रिज म्हणत असत म्हणून ह्या ठिकाणी हेच नाव प्रचलित झाले. इंग्रजांनी हा पूल पाडला नाही परंतु भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर येथे रेल्वेचा ट्रॅक तयार करण्यासाठी हा पूल पाडण्यात आला.
३० मैल लांब आणि सव्वा मैल रुंद असा हा रामसेतू ५ ते ३० फूट पाण्यात बुडाला आहे. श्रीलंका सरकारला ह्या बुडालेल्या पुलावर भू मार्ग तयार करण्याची इच्छा आहे तर भारत सरकारला नौवहनासाठी सेतुसमुद्रम हा प्रोजेक्ट तयार करायचा आहे.

१६. नुवारा-एलीया पर्वतरांगा
वाल्मिकी रामायणानुसार श्रीलंकेच्या मध्यावर रावणाचा महाल होता. श्रीलंकेतील “नुवारा एलीया” पर्वतापासून ९० किमी लांब बांद्रवेलाजवळ मध्य लंकेतील उंच पर्वतांमध्ये भुयारे तसेच अनेक गुहा आहेत. ह्या ठिकाणी अनेक पुरातात्विक अवशेष सापडतात.
ह्यांचे कार्बन डेटिंगच्या माध्यमातून वय काढलेले आहे. श्रीलंकेच्या नुवारा एलीया पर्वताच्या आजूबाजूला रावण फॉल, रावण गुहा, अशोक वाटिका, बिभीषणाच्या महालाचे अवशेष ह्यांचे संशोधन केल्यास ह्या गोष्टी रामायण काळातल्या असल्याचे सिद्ध झाले आहे. रामायणात ह्या गोष्टींचे जसे वर्णन केले आहे, ही ठिकाणे आजही तशीच असल्याचे दिसून येते.
तसेच रावणाने ज्या ठिकाणी सीतेला कैद करून ठेवले होते ती जागा आज कोब्रा हूड केव्ह म्हणून ओळखली जाते.

तसेच रावणाच्या मृत्यूनंतर बिभीषणाचा केलानिया येथे राज्याभिषेक करण्यात आला. ह्या प्रदेशात बुद्धिस्ट मठांच्या बाहेर बिभीषणाच्या राज्याभिषेकाची भित्तिचित्रे बघायला मिळतात. वाल्मिकी रामायणात केलनी नदीचा उल्लेख येतो आणि बिभीषणाचा महाल ह्याच केलनी नदीच्या तटावर असल्याचे सांगितले जाते.
तसेच दिवूरुंपौला ह्या ठिकाणी सीतेने अग्निपरीक्षा दिली ती जागा आजही श्रीलंकेत अस्तित्वात आहे.
ह्या सगळ्यावरून असेच सिद्ध होते की रामायण ही एक काल्पनिक कथा नसून हे सगळे खरे खुरे घडून गेले आहे. हिंदू लोकांची श्रद्धास्थाने काल्पनिक नसून ह्या धर्माला एक सुवर्ण इतिहास आहे आणि हे सिद्ध करणारे पुरावे आजही ठिकठिकाणी अस्तित्वात आहेत......

लेखक कळल्यास नांव लिहता येईल.
CP.po...
=====================================================

टोल नाक्यावर आपल्याला मिळालेल्या पावतींचे आपण काय करता..?

 आपल्याला काय आवश्यक आहे ते येथे आहे.

 राष्ट्रीय महामार्ग रस्त्यावर आपल्या प्रवासादरम्यान आपल्याला मिळालेल्या पावत्या केवळ टोल गेट ओलांडण्यासाठी नसतात.

  मग हे कशासाठी आहे..?
                   👇🏻
 1. वैद्यकीय आपत्कालीन वेळी आपण पावतीच्या दुसर्‍या बाजूला दिलेल्या फोन नंबरवर कॉल करू शकता..!
आपल्या कॉलच्या 10 मिनिटांतच रुग्णवाहिका येईल..!

 २. जर तुमच्या वाहनाला काही अडचण आली असेल की तुमचे चाक पंचर झाले असेल तर तुम्ही तिथे नमूद केलेल्या दुसर्‍या क्रमांकावर कॉल करू शकता आणि तुम्हाला १० मिनिटांत मदत मिळेल..!

 3. जर आपले इंधन संपले असेल तर लवकरच आपल्याला 5 किंवा 10 लिटर पेट्रोल किंवा डिझेल पुरविला जाईल.
पुरवलेल्या इंधनासाठी आपण त्यांना पैसे देऊन ते मिळवू शकता..!

 या सर्व सेवांमध्ये आपण टोल गेटवर पैसे देता त्या पैशाचा समावेश होतो.

 बर्‍याचजणांकडे ही माहिती नसते आणि अशा परिस्थितीत आपल्याला खुप त्रास होतो. 

🙏🏻कृपया हा संदेश आपल्या सर्व मित्रांसह सर्वांना पाठवा..!!!🙏🏻

++++++++

अंतर सांगणारे मैलाचे दगड वेगवेगळ्या रंगांनी का रंगवलेले असतात ?

मंडळी प्रवासात तुम्हाला रस्त्याच्या कडेला उभे असणारे मैलाचे दगड नेहमीच दिसत असतील. मार्गावरचं गाव, शहरे आणि ठिकाणांचं अचूक अंतर सांगणारे हे दगड आपल्याला फारच मदतगार ठरतात. 

आता आपण अंतरं किलोमीटरमध्ये मोजत असलो तरी या दगडांना मैलाचे दगडच म्हटलं जातं. रस्ता जसा बदलेल तसे हे दगडही वेगवेगळ्या रंगाचे दिसायला लागतात. एखाद्या रस्त्यावर ते काळ्या रंगाचे असतील, तर एखाद्या रस्त्यावर काळ्या किंवा पिवळ्या रंगाचेही दिसतील. या दगडांच्या वेगवेगळ्या रंगांमागेही वेगळा अर्थ दडलेला असतो मंडळी. या आपण जाणून घेऊया...

पिवळा रंग

जर तुम्हाला रस्त्याच्या कडेला पिवळ्या रंगाचे मैलाचे दगड दिसत असतील तर तुम्ही राष्ट्रीय महामार्गवरून प्रवास करताय असं समजा. हे रस्ते एका प्रदेशाला दूसऱ्या प्रदेशाशी जोडतात.  आणि या महामार्गांची निर्मीती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून केली जाते.

हिरवा रंग

रस्त्याच्या कडेला जर हिरव्या रंगाने रंगवलेले मैलाचे दगड असतील तर तो रस्ता राज्य महामार्ग आहे असं समजा. हे महामार्ग दोन मोठ्या शहरांना जोडण्याचे काम करतात. आणि या स्टेट हायवेची निर्मिती राज्य सरकारच्या PWD म्हणजेच पब्लिक वर्क डिपार्टमेंटकडून केली जाते.

नारंगी रंग

ज्या रस्त्यांच्या कडेला नारंगी रंगाने रंगवलेले मैलाचे दगड असतील ते रस्ते नॅशनल किंवा स्टेट हायवेला गावांशी जोडण्याचे काम करतात. आणि या रस्त्यांना प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेमार्फत बनवलं जातं.

काळा किंवा निळा रंग

काळ्या किंवा निळ्या रंगाने रंगवलेले मैलाचे दगड हे शहर किंवा गावाच्या सीमेजवळ असतात. रस्त्यावरील या दगडांना पाहून तुम्ही समजू शकता की एखादं शहर जवळ येत आहे. यांची निर्मिती त्या स्थानिक PWD  विभाकडून केलेली असते. समजलं ना? आता पुढच्या वेळी प्रवास करताना गोंधळात पडू नका.

+++++++++++++

*मराठी बाणा*💪

नाव भले ही *"लालबाग - परळ - काळाचौकी"* असो,
पण अमेरिकेपेक्षाही मोठी ओळख आहे.
.
.
*शिरोडकर शाळा, नरेपार्क शाळा, अभ्युदय एज्युकेशन शाळा, अहिल्या शाळा, आर. एम. भट शाळा, एम.डी.महाविद्यालय* यांची ओळख निराळीच आहे.
.
.हाजी कासम, तेजुकाय मेन्शन , मेघवाडी, गरम खाडी, गणेश गल्ली , खटाव, पानवाला , रंगारी बदक , आहेत हे राजवाडे 
जवळच्याच गल्ली मध्ये वसलेले आहे राजकमल चे 
कडे जिथे निर्माण होतात , नाही , चालत आहेत रंगकर्मी चे धडे, 
.
येथील *गौरीशंकर मिठाईवाला, वीर महाल, अमर महाल, जयहिन्द, भारतमाता, हिन्दमाता* गणेश, जयहिंद तर अख्या दुनियाभर प्रसिध्द आहेत.
.
.
Macdonals पेक्षाही येथे *"आदिती होटेल"* ची *व्हेज कोल्हापुरी* लय भारी आहे.लाडु सम्राट चा वडा, मिसळ, आणि ........
.
.
*"दत्त बोर्डींग",* मधला मटण रस्सा, *"क्षिरसागर"* मधील रुचकर जेवण कोंबडी वडे व ताज पेक्षा ही लाजवाब आहे.
.
.
वानखडे पेक्षा *"नरेपार्क मैदान, लाल मैदान, अभ्युदय नगर मैदान आणि गणेश गल्ली मैदान"* चागंले आहेत
.
.
मॉलमध्ये जी मजा नाही, ती मजा आमच्या *"लालबाग" च्या मार्केटमध्ये* आणि *सोमवारच्या परळच्या बाजारात* आहे. 
“ जय जय राम कृष्ण हरी “ व “ पतंगे बंधूं” मधील नऊवारी साडी आणि सफेद शर्ट व खाकी पॅंट,
“पैको “आहे प्रसिद्ध स्लिपर चप्पल ते लग्नाचे बुट मिळणयाचे ठिकाण, 
“बाटा” पेक्षा आदर आहे त्याचा 
सर्व सिझनची चप्पल मिळतात छान,

जगा मध्ये जातो “ मसाला “ इथून ज्यांचे नाव आहे लालबाग 
दरवळतो सुवास व खाताना आठवण होते त्याचे नाव काढावे, नाही तिथे कसलीच बाग, 
पण नाव आहे त्याचे “ लालबाग”

जगात नाही कोठे शोधून सापडणार “ चिवडा” , फरसान बनवणयाचे अनेक प्रकार 

इथे मिळणार तुम्हाला सदैव .......मायेचा ओलावा
म्हणुन पुन्हा पुन्हा आठवण येते 

हेच आहे माझे , तुमचं माहेर घर नाही कसला इथे विकार.


रांगोळीचे रंग मिळणयाचे एकमेव ठिकाण आहे ,
जिथुन अनेक रांगोळी सम्राट , संगीतकार , गायक , गणेश मुर्ती कार तयार झाले , 
तिथेच देशाचे राजकीय नेतृत्व करणारे , कार्य सम्राट जन्माला आले, 

.
दुनियाभरची रुग्णालये परळ मध्येच आहेत.

.
*"हिंदु धर्म"* आमचं दैवत, म्हणुन तर *"लालबाग-परळ"* चा आम्हाला अभिमान आहे.
.”मराठी बाणा “ काय असतं ते जगायला व पहायला आवडेल इथे 
म्हणून तर वर्षाचे १२ ही महिने *सण* होतात साजरे मनमुराद पणे तिथे
.
.
.
आमचा जन्म येथे झाला म्हणुन आमचा *लालबाग-परळ-काळाचौकी* आमच्यासाठी खास आहे.
आमचा रुबाब लय भारी, 
आमची दोस्ती भारी..
म्हणुन सांगतो आम्हाला 
शिकवु नका दुनियादारी...
आमचा *लालबाग-परळ-काळाचौकीच* लय भारी...!!

....... एक रंगकारी ( ०२/१०/२०२० )

🤔☺😊🤔😌☺😊

काही 100-200 वर्षे जुनी आठवण - 

*माझी लाडकी मुंबई*

*भायखळा :* ही जागा म्हणजे धान्याचे खळे होते - त्याच्या मालकाचे नाव होते भाया *भायाचे खळे ते भायखळे*
आणि त्याचा झाला *भायखळा*

*परळ :* या ठिकाणी पुष्कळ परळीची झाडे होती म्हणून या गावाला *परळ* नाव पडले.

*दादर :* मुंबई बेटाच्या उत्तरेला वसलेले गाव.
ओलांडल्यानंतर थोडा चढ चढून मुंबईत येता येत असे, म्हणून चढाच्या या भागाला नाव पडले *दादर.*
वरचा मजला गाठण्याचा जिना म्हणजे दादऱ.

*माटुंगा :* मातंग स्थान म्हणजे हत्ती ठेवण्याचे ठिकाण! यावरून माटुंगा हे नाव आले.
असं म्हणतात की, या ठिकाणी भीमदेव राजाचे हत्ती ठेवले जात असत.

*नायगाव :* हा भाग ‘न्याय-ग्राम’ या शब्दावरून आलेला आहे या ठिकाणी राजा भीमदेवाचे न्यायालय आणि राजवाडा होता न्याय मिळण्याचे ठिकाण ते न्याय - न्याय आणि ग्रामचा अपभ्रंश नायगाव.

*बोरीबंदर :* हे नाव १८५२ साली तेथपर्यंत असलेले समुद्रावरील बंदर आणि त्याच्या आजूबाजूला असलेली बोरींची झाडे यावरून पडले.

*ग्रँट रोड, रे रोड* मुंबईतल्या सुमारे पंधरा रस्त्यांना मुंबईच्या ब्रिटिश गव्हर्नरांची नावे दिलेली आहेत उदा 
*लॅमिंग्टन रोड, आर्थर रोड, नेपियनसी रोड, सँडहर्स्ट रोड, ग्रँट रोड,हॉर्नबी रोड, रे रोड, कुलाब्याचा वुडहाऊस रोड*
वगैरे.

*चर्नी रोड :* या भागात पुष्कळ गवत होते आणि गाई-म्हशी इथे चरत असत त्यांची चरणी ती चर्नी !

*नळबाजार :* शहरातील सांडपाण्याचे मुख्य गटार जिथून वाहत जाऊन वरळीच्या समुद्राला मिळत होते
तो भाग नळबाजार म्हटला जाऊ लागला . आता नळबाजार कुठे आणि वरळी कुठे? पण
त्या काळात हे दोन्ही भाग या गटाराच्या नळाने एकमेकांना जोडलेले होते.

*अँटॉप हिल :* अँटॉपही जागा *अंतोबा नावाच्या कोळ्याची* होती यावर कुणाचा विश्वास बसेल काय? सायबाने
अंतोबाचा अँटॉप केला आणि त्यावरून अँटॉप हिल नाव रूढ झाले.

*डोंगरी :* हे नाव सरळसरळ डोंगरावरून आले आहे हा भाग तेव्हा संपूर्ण डोंगराळ होता.

*कांदेवाडी :* गिरगावातील कांदेवाडी हे नाव तेथल्या कांद्याच्या गोदामांनी आणले.

*लोहार चाळ :* हे नाव तेथे असणार्‍या लोखंडी सामानाच्या केवळ एका दुकानावरून पडले.

प्रत्येक मुंबईकराने शेयर केलच पाहिजे !!

*॥ जरा हटके जरा बचके ये है मुंबई मेरी जान ॥*

....आणि आम्ही मुम्बईकर !!

+++++++++++++++++++++++++

*👉 फ्लॅटखरेदी करताना या गोष्टींची माहिती ठेवा -*

*१. Carpet area - (कार्पेट एरीआ - चटई क्षेत्र) -* कार्पेट एरीआ म्हणजे प्रत्यक्षात वापरात येणारी जागा. याचा अर्थ असा की फ्लॅट मधील जेवढी जागा आपण प्रत्यक्षात राहण्यासाठी वापरु शकतो ती जागा. सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे चार भिंतींमधील जागा ज्यावर तुम्ही गालिचा (Carpet) पसरवू शकता.

*२. Built up Area - ( बिल्ट अप एरीआ) -* कार्पेट एरीआ अधिक आतील व बाहेरील भिंतींची जाडी म्हणजे बिल्ट अप एरीआ. बिल्ट अप एरीआ हा साधारणपणे कार्पेट एरीआ पेक्षा १०% ते १५% जास्त असतो.

*३. Super built up / Saleable area ( SBU - सुपर बिल्ट अप एरीआ) -* बिल्ट अप एरीआ अधिक लिफ्ट, जिना यांसाठी वापरण्यात आलेली संयुक्त जागा म्हणजे सुपर बिल्ट अप (SBU). साधारणपणे Super built up area बिल्ट अप एरीआच्या २५% ते ३०% जास्त असतो. सध्याचे बिल्डर्स स्थावर मालमत्ता ४०℅ पर्यंत सुपर बिल्टअप एरीआच्या आधारे विकतात. ( मात्र प्रत्यक्षात खरेदी करारावर कार्पेट एरीआचीच नोंद असते.)समजा तुम्ही बिल्डर कडून खरेदी करणार असलेल्या फ्लॅटचा सुपर बिल्ट अप एरीआ १००० चौरस फूट इतका असेल तर प्रत्यक्षात वापरासाठी मिळणारा कार्पेट एरीआ ६५० ते ७०० चौरस फूट असेल.

*४. Approved plans -* (मान्यताप्राप्
तआराखडा)स्थावर मालमत्तेचा आराखडा हा संबंधीत महापालिकेने मंजुर केलेला असतो. यामध्ये प्रकल्पाचा आराखडाआणि प्रत्येक फ्लॅटचा आराखडा समाविष्ट असतो.हा एक महत्त्वाचा दस्तऐवज (Document) असुन बांधकाम कायदेशीर रीत्या करण्यात आले असल्याचा एक मुख्य पुरावा असतो. घर खरेदीचा निर्णय घेण्यापुर्वी मान्यताप्राप्त आराखडा अवश्य तपासून पहावा.

*५. Completion Certificate -Occupation certificate (OC)* हा एक महत्त्वाचा दाखला असतो. हा दाखला महानगरपालिकेकडून बिल्डरला देण्यात येतो. ईमारतीमध्ये पाणी विजपुरवठ्याची सोय करण्यात आलेली आहे तसेच सुरुवातीस मंजुर केल्याप्रमाणे आणि मान्यताप्राप्त आराखड्याप्रमाणे ईमारतीचे बांधकाम केले असल्याचा हा दाखला असतो. या दाखल्याद्वारे महानगरपालिकेने सदर ईमारत राहण्यायोग्य असल्याचेजाहीर केलेले असते.फ्लॅटची पुर्नविक्री करताना ह्या दाखल्याची आवश्यकता बैंकेला सर्वात जास्त असते त्याशिवाय लोन सॅक्शन होत नाही व पुढील व्यवहारात अडचणी येतात त्यामुळे हा दाखला लवकरात लवकर मिळवण्याचा प्रयत्न करावा.

*६. Mortgage (गहाणखत) -* गृहकर्ज पुरविणारी बँक आणि खरेदीदार यांमध्ये झालेल्या करारानुसार गृहकर्जाची पुर्ण परतफेड होईपर्यंत विकत घेतलेल्या घराचा ताबा बँकेकडे ठेवला जातो. या करारास गहाणखत किंवा Mortgage deed / Agreement असे म्हणतात.मालमत्तेची सर्व कागदपत्रे कर्ज फिटेपर्यंत बँकेकडेच राहतात.

*७. Possession letter - (मालकीपत्र)* - हे पत्रक बिल्डर कडून ग्राहकास देण्यात येते. यामध्ये असे लिहिलेले असते की मालमत्ता राहण्यासाठी पुर्णपणे तयार आहे आणि आता ग्राहकाकडे हस्तांतरीत करण्यात येत आहे. Possession letter (मालकीपत्र) मिळविल्याशिवाय ग्राहकास सदनिकेत राहण्यासाठी जातायेत नाही.

*८. Registration of an agreement (करार नोंदणी) -* बिल्डर आणि ग्राहकामध्ये जागेचा/घराचा जो करार झालेला असतो त्याची Indian registration Act खाली नोंदणी केली जाते. नोंदणी करण्यापुर्वी Stamp duty (मुद्रांकशुल्क) भरणे आवश्यक असते. स्थावर मालमत्ता विकत घेताना झालेला व्यवहार व करार यांची नोंदणी करणे अत्यावश्यक असते.सदर नोंदणी करण्यासाठी रजीस्ट्रेशन चार्जेस (Registration charges) द्यावे लागतात.

*९. Sales deed (खरेदीखत)* - जमिनीचा मूळ मालक/ बिल्डर यांनी ठराविक रकमेच्या मोबदल्यात मालमत्तेचा मालकी हक्क खरेदीदाराच्यानावे हस्तांतरीत करण्यासाठीचा जो करार केला जातो त्यास Sales deed असे म्हणतात. Sales deed ची नोंदणी करणे महत्त्वाचे असते.

*१०. Stamp Duty - (मुद्रांक शुल्क)* नोंदणीकृत विक्री मुल्याच्या (Transaction Value) काही टक्के रक्कम मुद्रांक शुल्काच्या स्वरुपात सरकारला द्यावे लागतात. ग्राहकाने Stamp duty भरलेली आहे आणि त्याच्या/ तिच्या नावावर मालमत्तेची नोंदणी झालेली आहे. Stamp duty विक्री मुल्याच्या ५% ते १४% पर्यंत असते. हे दर वेगवेगळ्या राज्यांसाठी वेगवेगळे असतात.

===================================================

लस घेतल्यानंतर  ताप का येतोय?🩺

         लस घेतल्यानंतर  ताप का येतोय? हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात घर करून बसलाय, मग काही लोकांना तो येतोय काहींना येत नाही नाही, काहींना पहिला डोज घेतल्यावर येतोय तर काहींना दुसरा डोज घेतल्यावर येतोय. काहींना दोन्ही डोज घेतल्यावर सुद्धा येत नाही, काहींना अंगदुखी पण होतेय, का होतेय असे? नक्की लस शरीरामध्ये गेल्यावर कोणती क्रिया होतेय. ताप किंवा अंगदुखी हि लसीमुळे होतेय कि अजून दुसरे काही कारण असतेय?
            या प्रश्नाच्या उत्तरसाठी आधी आपण आपल्या शरीरातील काही क्रियांची थोडक्यात माहिती घेऊ. आपल्या शरीरच्या रोजच्या काही क्रिया निश्चित असतात, जसे कि आपण जेवण करतो, त्याचे पचन होते. आपण जे जेवण घेतो ते सगळे पदार्थ शरीरच्या बाहेरचे असतात पण ते शरीराला माहित असतात तसेच त्यातील जे गरजेचे आहे (प्रोटिन्स, व्हिटॅमिन्स) तेच आपल्या रक्तात घेतले जातात आणि नको असलेले बाहेर टाकले जातात. याउलट आपल्या शरीरात तोंडावाटे किंवा नाकावाटे धूळ गेली तर त्याविरुद्ध शरीराची लगेच प्रतिक्रिया येते जसे कि शींका येणे किंवा सर्दी होणे. याचे कारण म्हणजे धूळ हि शरीराला गरजेची नाही. तसेच काही आपल्या शरीरात व्हायरस किंवा बॅक्टरीया गेल्यानंतर होते. आपली प्रतिकारशक्तीच्या काही पेशी त्याना लगेच ओळखतात आणि त्यांची माहिती प्रतिकारशक्तीच्या इतर पेशींना देईल जाते जेणेकरून नको असलेले व्हायरस किंवा बॅक्टरीया शरीराबाहेर काढले जातील, हे काम प्रतिकारशक्तीच्या काही पेशी अँटीबॉडीज तयार करून करतात. त्याचबरोबर या शरीराबाहेरील शत्रूंचा हल्ला झाला आहे याची माहिती मेंदूला पण दिली जाते, मेंदूतील एक भाग प्रतिकारशक्तीला    याच्याविरुद्धची तयार करण्याचे काम करतो. हि सर्व क्रिया वेगाने पार पडत असते. या सर्व क्रियांची माहिती रक्तावाटे शरीरातील सर्व भागांना दिली जाते, तसेच अतिशय वेगाने याची तयारी करता यावी म्हणून आपली रक्तपुरवठा करणारी यंत्रणा रक्ताचा पुरवठा वेगाने करते त्यामुळे काही वेळांसाठी आपला रक्तदाब सुद्धा वाढतो.   अचानक अशा प्रकारची परिस्थिती उध्दभवल्यामुळे प्रतिकारशक्ती आणि मेंदू एकत्रितपणे काम करून शरीराचे तापमान वाढवतात जेणेकरून बाहेरून आलेला शत्रू यामुळे विचलित होऊन तो निघून किंवा त्याचे शरीरातच विघटन होईल. याला प्रतिकारशक्तीची पहिली प्रतिक्रिया असेही म्हणता येईल. 
             आता लस दिल्यानंतर काय होते पाहूया. लस म्हणजे लुळे पांगळे झालेले व्हायरस-बॅक्टरीया किंवा त्यांचा एक छोटासा भाग असतो. लस टोचल्यानंतर काही क्षणातच ती रक्तात गेली कि तिथे असणाऱ्या रोगप्रतिकारक शक्तीच्या पेशींना त्याची माहिती मिळते. लगेचच वर सांगितल्याप्रमाणे क्रिया होण्यास सुरवात होते, कारण रोगप्रतिकारक शक्ती लसीमधील व्हायरस किंवा बॅक्टरीयाच्या घटकांना बाहेरूनच आलेले शत्रू म्हणून ग्राह्य धरते. 
लसीमध्ये असलेले घटक जसे जसे रक्तात मिसळत किंवा शरीभर पसरले कि शरीराची म्हणजेच रोगप्रतिकारकशक्ती आणि मेंदूची प्रतिक्रिया म्हणजेच ताप यायला सुरवात होते, काही वेळांसाठी मग रक्त वेगाने शरीरात फिरू लागते आणि रक्तदाब वाढतो त्यामुळे अंगदुखीला सुरवात होते. या सर्व क्रिया प्रतिक्रिया काही तासांपासून ते दोन-तीन दिवस चालू राहतात आणि एखादा का लसीतील घटकांची प्रतिकारक शक्तीला ओळख झाली आणि अँटीबॉडीज तयार व्हायला सुरवात झाली कि ताप अंगदुखी कमी व्हायला सुरवात होते. साधारणपणे सर्वच प्रकारच्या लसींना यायचं प्रकारची प्रतिक्रिया शरीराकडून मिळते. काही लोकांना तीव्र प्रतिक्रिया मिळते तर काहींना सौम्य मिळते. लहान मुलांना सुद्धा सर्व प्रकारच्या लसी दिल्यानंतर हा त्रास होतो. पण एकच लस अनेकवेळा दिली तर प्रत्येकवेळी हा त्रास होत नाही कारण आपल्या प्रतिकारकशक्तीकडे याची मेमरी तयार झालेली असते आणि शरीर लगेच ओळखतेकि हि पूर्वीचीच लस किंवा व्हायरस-बॅक्टरीया आहे. जसे कि पोलिओची लस वर्षातून दोन वेळा दिली तरी मुलांना कोणताही त्रास होत नाही. कारण त्या लसीची मेमरी पहिल्याच डोसनंतर मुलांच्या प्रतिकारशक्तीकडे तयार झालेली असते. 
         एप्रिल महिन्याच्या सुरवातीला आलेल्या रिपोर्टनुसार  जगामध्ये जवळपास ३५% लोकांना लस घेतल्यानंतर ताप आलेला आहे तर ८५% लोकांना लस घेतलेल्या ठिकाणी एकदोन दिवस दुखले आहे तर १५% लोकांना संपूर्ण अंगदुखी झालेली आहे. १०% लोकांना सर्दी आणि पोटात सुद्धा दुखले आहे. तर ज्या लोंकाना काही ऍलर्जी आहे त्याना लगेच चक्कर येणे आणि अंगाला घाम येणे असे प्रकार घडले आहेत पण ते तुरळक आहेत. 
   या सगळ्यांचा अर्थ एकच होतो तो म्हणजे लस घेतल्यानंतर ताप-अंगदुखी म्हणजे तुमच्या शरीराने लसीचे स्वागत करून तिच्याविरुद्ध प्रतिक्रिया देऊन भविष्यात येणाऱ्या खऱ्या व्हायरस विरुद्ध लढण्यासाठी यंत्रणा तयार करण्याचे काम सुरु केले आहे.

🖊 नानासाहेब थोरात
        वरीष्ठ संशोधक,
ऑक्सफर्ड विद्यापीठ, लंडन

No comments:

Post a Comment

  १. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...