Showing posts with label दिनविशेष. Show all posts
Showing posts with label दिनविशेष. Show all posts

Wednesday, February 8, 2023

---जागतिक ई कचरा दिवस--

 *आज १४ ऑक्टोबर* 

*आज जागतिक ई कचरा दिवस.*
पर्यावरण आणि मानवी आरोग्यासाठी धोकादायक ई-कचऱ्याची निर्मिती महाराष्ट्रात सर्वाधिक होते. दर वर्षी राज्यात सुमारे ५० हजार टना हून अधिक ई-कचरा तयार होतो. अधिकृत पुनप्र्रक्रियेची क्षमता केवळ २४ हजार टन असून, अजूनही कचरा प्रक्रियेच्या बाबती राज्याचे चाचपडणेच सुरू आहे.
देशात सुमारे ५ लाख टन ई-कचरा दर वर्षी तयार होतो. महाराष्ट्राखालोखाल आंध्र प्रदेश, तामिळनाडू, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये मोठय़ा प्रमाणात ई-कचरा तयार होतो. ई-कचरा निर्मितीत सर्वाधिक वाटा असलेल्या शहरांमध्ये राज्यातील मुंबई, नागपूर आणि पुणे या तीन शहरांचा समावेश आहे. मुंबई आणि पुणे परिसरातूनच दर वर्षी सुमारे २० हजार टन ई-कचरा गोळा होतो, अशी माहिती केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या ताज्या अहवालातून देण्यात आली आहे.
आयटी कंपन्यांमधून मोठय़ा प्रमाणावर ई-कचरा तयार होतो. कॉम्प्युटर्सचे मॉनिटर, की-बोर्ड, माऊस, मोबाइलचे खराब झालेले सुटे भाग, बंद पडलेली इलेक्ट्रॉनिक उपकरणे ही ई-कचरा या प्रकारात मोडतात. टेलिव्हिजन, इलेक्ट्रॉनिक खेळणी, क्षमता संपलेले सेल, अशा अनेक वस्तू सामान्य कचऱ्यात मिसळून डम्पिंग ग्राऊंडपर्यंत पोचतात. राज्यात हजारो टन ई-कचरा पारंपरिक भंगारवालेच खरेदी करतात. अशा प्रकारचा कचरा खरेदी करण्यासाठी त्यांना परवानगी नाही आणि वैज्ञानिक पद्धतीने त्याची विल्हेवाट लावण्याची व्यवस्थाही त्यांच्याकडे नाही. ई-कचऱ्याच्या विल्हेवाटीचा प्रश्न त्यामुळे गंभीर वळणावर पोचला आहे. ई-कचऱ्यात असलेल्या पारा, शिसे, कॅडमिअम, क्रोमिअम, बेरिअम आणि ब्लॅक कार्बन अशा धोकादायक पदार्थामुळे होणाऱ्या दुष्परिणामांविषयी अजूनही जागरूकता नाही.
पर्यावरणाच्या दृष्टीने परिपूर्ण तंत्रज्ञान असलेल्या २३ उद्योगांना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने अधिकृत केले आहे. मात्र, त्यांची पूनप्र्रक्रिया करण्याची वार्षिक क्षमता २४ हजार ३२० टन आहे, अशी माहिती मंडळातील सूत्रांनी दिली. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने ई-कचऱ्याचे व्यवस्थापन करून तो नष्ट करण्यासाठी २००८ मध्ये काही नियम बनवले होते. २०१२ पासून ‘ई-वेस्ट मॅनेजमेंट अॅूण्ड हॅन्डलिंग अॅाक्ट’ लागू झाला आहे, पण या कायद्याची अंमलबजावणी प्रभावीपणे होऊ शकलेली नाही.
संयुक्त राष्ट्र पर्यावरण संरक्षण संस्थेच्या (यूएनईपीए) अहवालानुसार पुढील दशकभरात भारतासारख्या देशात मोबाइल फोन आणि कॉम्प्युटरमुळे तयार होणाऱ्या ई-कचऱ्याच्या प्रमाणात सुमारे ५०० टक्क्यांची प्रचंड वाढ होणार आहे. या कचऱ्याच्या पुनप्र्रक्रियेची किंवा तो नष्ट करण्याची व्यवस्था तोकडी असल्याने हा प्रश्न बिकट होण्याची शक्यता आहे.

 *महामानव भारतरत्न डॉ.भीमराव आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतीला  विनम्र अभिवादन* 🙏🙏


*शिका , संघटीत व्हा आणि संघर्ष करा ”*
*असे आपल्या समाज बांधवाना सांगणारे डॉ. बाबासाहेब* *आंबेडकर म्हणजे सवर्णांच्या जुलमान्विरुध उगारलेली वज्राची मुठ होय.* *आंबेडकर म्हणजे जातीभेदावर ,* *विषमतेवर , धर्ममार्तंडांच्या वर्चस्वावर , समाजातील वतनदार सत्ताधाऱ्यांवर सदैव पुकारलेले युद्धच होय.*
*डॉ. बाबासाहेब आंबेडकर अष्टपैलू व्यक्तिमत्व होते. त्यांना प्रत्येक क्षेत्राचे परिपूर्ण ज्ञान होते. सामाजिक , राजकीय ,आर्थिक, शैक्षणिक , धार्मिक , पत्रकारिता , कायदे अशा विविध क्षेत्रात आपल्या अमोघ वक्तृत्वाने व कुशल नेतृत्वाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिन-दलितांच्या , श्रमिकांच्या , विस्थापितांच्या , शोषितांच्या अंधकारमय जीवनाला प्रद्य्नेचा संदेश दिला . गलितगात्र झालेल्या मनामनातुन समाजक्रांतीचे स्फुलिंग चेतवून डॉ. आंबेडकर यांनी मुर्दाड झालेल्या समाजाला आपल्या हक्काप्रती जागृत केले . समतेवर आधारित समाजरचना घडावी असे त्यांचे ध्येय होते .*
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
[4/14/2021, 7:52 AM] +91 94233 63843: !! *पत्रकार बाबासाहेब* !!
_________________________
*तुम्ही जर सत्य मांडायला घाबरत असाल तर समजून जा की तुम्ही गुलामीच्या दिशेने वाटचाल करताय* 

*____ डॉ.बाबासाहेब आंबेडकर*
[4/14/2021, 7:52 AM] +91 94233 63843: # *डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा!*♀

   ◆ *डॉ बाबासाहेब आंबेडकर* म्हणजे :-...
★ आजन्म विदयार्थी.
★ शिक्षणाचा एक मौलिक ग्रंथ.
★ एक आदर्श विदयार्थी.
★एक आदर्श प्राध्यापक
★ एक आदर्श प्राचार्य
★ एक आदर्श शिक्षण संस्था 
     चालक.
★ ज्ञानाचे महासागर.
★ विचारांचा प्रचंड ऊर्जास्रोत.

    *जयंतीनिमित्त भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन! आणि सर्वांना हार्दिक शुभेच्छा!*👍🌹
             - भाऊराव राऊत

 सर्व कर्तृत्ववान महिलांना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

💐💐💐💐💐💐💐💐


       *“वेध स्त्री मनाचा”*
                        (..डॉ. स्वप्नील मानकर )


*वेध स्त्री मनाचा अहो घ्याल का कुणी जरा !*
*साद तिच्या दुःखांना द्य़ाल का कुणी जरा !!*

विसरून सारं काही !
करत राहते कर्तव्य !!
पाहत असते नेहमी !
घरदाराचे भवितव्य !!
*आवडे तुज काय विचाराल का कुणी जरा !*
*वेध स्त्री मनाचा अहो घ्याल का कुणी जरा !!*

मुलबाळांंमध्ये तिला !
तिचे सर्वसुख दिसते !!
त्यांना घडविण्यातच !
तिला स्वारस्य असते !!
*मुलांना कशी वागवते पहाल का कुणी जरा !*
*वेध स्त्री मनाचा अहो घ्याल का कुणी जरा !!*

तीच जिजाऊ सावित्री !
ती असे दुर्गा सरस्वती !!
अनिष्टांना संपविण्या !
घेई वेगवेगळे रूप ती !!
*फेड त्या उपकारांची कराल का कुणी जरा !*
*वेध स्त्री मनाचा अहो घ्याल का कुणी जरा !!*

मनातल्या भावनांना !
ती व्यक्त कधी करते !!
सासरी असताना ती !
तर प्रेमाकरिता झुरते !!
*घास आईच्या मायेने भरवाल का कुणी जरा !*
*वेध स्त्री मनाचा अहो घ्याल का कुणी जरा !!*

एवढं करून ही स्त्री !
गर्भात मारली जाते !!
शिक्षण तर रहिलं दूर !
ओझे समजली जाते !!
*दोष कसा तिचा यात सांगाल का कुणी जरा !*
*वेध स्त्री मनाचा अहो घ्याल का कुणी जरा !!*


                                  .....शीघ्रकवी स्वप्‍नील
                                         ०८/०३/२०१७

डॉ. स्वप्‍नील मानकर
मानकर बाल रुग्णालय
शिंदें प्लॉट्स, यवतमाळ
9850330301

©© आवडल्यास कृपया नावासाहित फॉरवर्ड करा
धन्यवाद
🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽

 सुप्रभात 


दिनविशेष .... जागतिक महिला दिन 

कल्पवृक्ष अशा आजीला 
सुगरण अशा आईला 
अन्नपूर्णा अशा अहो आईंना 
समाधानी अशा काकूंना
मनकवड्या अशा मामींना
प्रेरक अशा मावशींना
शिस्त अशा आत्यांना
समंजस अशा नंदांना
मायाळू अशा जावांना
नम्र अशा वहिनींना  
कर्तृत्ववान अशा बहिणींना
कुशल अशा सुनांना 
धाडसी अशा पुतणींना
बोलक्या अशा भाच्यांना
अष्टपैलू अशा लेकींना
आनंदी अशा नातींना 
अंतर्यामी अशा मैत्रिणींना 
वक्तशीर अशा नोकरदार महिलांना 
कार्यक्षम अशा उद्योजिकांना 
कर्तबगार अशा विविध क्षेत्रातील कार्य करणाऱ्या महिलांना 
कलावंत अशा कलाकारांना
अष्टावधानी अशा समस्त गृहिणींना ....

*जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा*

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

 🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

    श्रद्धासुमनं 
       राष्ट्रसंत तुकडोजी महाराज
             यांची आज जयंती 
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

सर्व सामान्य लोकांच्या मनावर शिक्षणाचे महत्त्व बिंबवणारा , अस्पृश्यता गाडून टाका असे सांगणारा , स्वच्छतेचे महत्त्व अधोरेखित करणारा , सर्व धर्मांकडं सारख्याच नजरेनं पहा असे सांगणारा, राष्ट्रसंत म्हणजेच संत तुकडोजी महाराज. यांना त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन आणि सर्वांना शुभेच्छा !
➖
*नांदोत सुखे गरीब-अमीर एक मतांनी!*
*मग हिंदू असो ख्रिश्चन वा हो इस्लामी!*
*स्वातंत्र्य-सुखा या सकलांमाजि वसू दे!*
*दे वरचि असा दे!!*

*सकळांस कळो मानवता, राष्ट्रभावना!*
*हो सर्व स्थळी मिळुनी समुदाय प्रार्थना!*
*उद्योगी तरुण शीलवान येथ असू दे!*
*दे वरचि असा दे!!*

*जातिभाव विसरूनिया एक हो आम्ही!*
*अस्पृश्यता समूळ नष्ट हो जगातुनी!*
*खलनिंदका मनीही सत्य न्याय वसू दे!*
*दे वरचि असा दे!!*

*सौंदर्य रमो घराघरात स्वर्गीयापरीही!*
 *नष्ट हो‍उ देविपत्ती भीती बावरी!*
*तुकड्यास सदा या सेवेमाजी वसू दे!*
*दे वरचि असा दे!!*

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
     🍁🍁 *रामकृष्णहरी* 🍁🍁
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

  १. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...