Thursday, June 30, 2022

दैवी वृक्ष : औदुंबर


काश्मीरच्या पूर्वेकडील हिमालयाचा भाग, आसाम, बंगाल, ब्रह्मदेश व पश्चिम हिंदुस्थान आणि सिंहलद्वीप या प्रदेशांत हें झाड दृष्टीस पडतें. याचीं फळें अंजिरासारखीं असतात. तीं कच्चीं व पिकलेली, दोन्हीही खातात. दुष्काळांत तर त्यांचा फार उपयोग होतो. पानें हत्ती व गुरें यांना चारा म्हणून उपयोगी पडतात. लाकूड टिकाऊ नसतें तरी, त्याचीं दारें, गाडीचीं आडवी दांडकी वगैरे ओबडधोबड जिनसांकरितां उपयोग करतात. स्वयंपाक वगैरे करण्याच्या कामी याच्या लाकडांचा सरपणाकडे उपयोग करीत नाहींत. हा यज्ञिय वृक्ष असून याच्या समिधांचा (काटक्यांचा) श्रौत व स्मार्त कर्मांत उपयोग करतात. व लाकडाची यज्ञिय उपकरणेंही करतात.

नेहमी हिरवागार राहून थंडगार छाया देणारा औदुंबर वृक्ष अनेक दैवी गुणांनी युक्त आहे. भारतात सर्वत्र हा महावृक्ष आढळतो. उंबराच्या झाडाच्या आसपास जमिनीत पाणी आढळते किंबहुना, जिथे पाणी मुबलक असते अशा जमिनीत हा वृक्ष वाढतो. या वृक्षाचे काही अदभूत उपयोग पाहूया,

१. उंबराच्या सालीचा काढा करून तो थंड करावा. त्यात खडीसाखर-वेलची टाकून गुलाबी रंगाचे सरबत करावे . कॅन्सर झाल्यावर जी केमोथेरपी देतात त्यात शरीराची भयानक आग होते. त्यात हे सरबत उत्तम आहे. दिवसातून तीनदा घ्यावे.
२. अतिसार होऊन त्यातून रक्त पडत आसेल तर सालीचा काढा द्यावा.
३. जखम झाल्यावर ती धुण्यासाठी डेटोल- सेव्लोन च्या ऐवजी सालीच्या काढ्याने धुतली तर जखम वेगाने भरून येते.
४. तोंड आले असता सालीचा काढा थोडा घट्ट करून तो तोंडाला आतून लावला तर वेगाने त्रास कमी होतो.
५. गर्भाशयाची सूज कमी करण्यासाठी, रक्तप्रदर, श्वेतप्रदर, मासिक पाळीच्या अति प्रमाणात रक्तस्त्राव होत असेल, तर सालीचा काढा पोटात घ्यायला देतात. सोबत योनिमार्गाद्वारे त्याच काढ्याचा उत्तरबस्ती दिला, तर उत्तम गुण येतो.
६. गर्भाचे पोषण व्हावे, म्हणून काढा देतात. सातत्याने गर्भपात होत असेल तर गर्भ धारणेनंतर सालीचे सरबत करून प्यावे.
७. लहान मुलांना दात येताना जुलाब होतात त्यावेळी उंबराचा चिक बत्ताशासोबत देतात.
७. भस्मक नावाची एक व्याधी आहे, ज्यात व्यक्ती सारखे काही न काही खात असते. पण त्या व्यक्तीचे पोट भरत नाही. काही वेळाने परत भूक लागते. या आजारात उंबराची साल स्त्रीच्या दुधात वाटून दिली असता, ही विचित्र लक्षणे कमी होतात.
८. उचकी थांबत नसेल तर उंबराच्या फळाचा रस प्यावा.
९.काविळीत उंबराचे पिकलेले अर्धे पान विड्यातून देतात.
१०. तापात अंगाची आग होत असेल, तर पिकलेले उंबराचे फळ खायला द्यावे.
११. सरते शेवटी एक गोष्ट सांगतो, हिरण्यकश्यपूचे पोट फाडल्यावर भगवान नरसिंहाच्या बोटांचा दाह होऊ लागला. तो कशानेच थांबेना. मग त्यांनी त्यांची बोटे उंबराच्या फळात रोवली आणि त्यांचा दाह क्षणात कमी झाला.

उंबराची साल, पानें व कच्चें फळ ह्यांच्या अंगीं स्तंभक धर्म असल्यामुळें त्यांचा आमांशादि रोगांत पोटांत देण्याच्या कामीं व बाह्योपचाराच्या कामींहि उपयोग करतात. तोंडांत अथवा जिभेस गरे पडले असतां फळें पोटांत देतात. उंबर दुधांत शिजवून दिले असतां पोटांतील इंद्रियांच्या मार्गांत कांहीं अडथळा असल्यास तो दूर होतो. उंबराच्या फळांचा मधुमेहांत चांगला उपयोग होतो. पाण्यांत फळें व पानें शिजवून त्या पाण्यानें स्नान करीत राहिल्यास महारोग दूर होतो असें म्हणतात. सालीच्या अंगीं रेतस्तंभक धर्म असून तिळाच्या तेलात तिची वस्त्रगाळ पूड मिसळून दुष्ट व्रणावर लावतात. मधुमेहांत सालीचा काढा घ्यावा. कोवळ्या पानांची पूड करून मधाच्या अनुपानांत पित्तविकारावर देतात. उंबराच्या मुळीस फांसण्या टाकून त्यांतून निघणारा पातळ पदार्थ अथवा उंबराचें पाणी पौष्टिक म्हणून पोटांत देतात.

उंबराच्या झाडाखालीं किंवा जवळच पाणी लागतें असें म्हणतात. उंबराखालीं दत्ताचें वास्तव्य असतें असा समज असल्यानें त्याची पूजा करण्यांत येते, व झाड तोडणें हेंही वाइट मानलें जातें. इतर झाडांप्रमाणें उंबराला प्रथम फूल व नंतर फळ असा प्रकार होत नसून एकदम आपणांला फळच दृष्टीस पडतें. तेव्हां सशाच्या शिंगाप्रमाणें तें अशक्य व दुर्लभ असा समज होऊन ‘उंबराचें फूल’ (दुर्मिळ वस्तु) ही म्हण पडली आहे.

भगवान दत्तगुरूंना देखील ज्याच्या शीतल छायेत साधनेचा मोह आवरला नाही, अशा उंबराची अशी ही कहाणी सफळ संपूर्ण.

No comments:

Post a Comment

  १. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...