Showing posts with label सण-संस्कृती व परंपरा. Show all posts
Showing posts with label सण-संस्कृती व परंपरा. Show all posts

Monday, January 9, 2023

शिगमोत्सव

 कोकणातील सिंधुदुर्ग पासून गोव्यापर्यंत,कालच्या होळीनंतर आजपासून सुरू झालेला *" शिगमोत्सव*" म्हणजे, एका महत्वाच्या,अविभाज्य,सांस्कृतिक परंपरेतील एक प्रकार म्हणजे आपल्या पुराणातील,मिथकातीलच विविध वेशभुषा साकारणे ज्याला, "सोंगं" आणणे, असे म्हणतात.गावात प्रत्येकाच्या घरोघरी फिरून ही कला साकारण्याच्या ह्या एकूणच प्रकाराला " *रोंबाट* " असे म्हणण्याची प्रथा आहे.

       आज काळ खूप बदललाय,पुढे सरकलाय पण जुन्या काळी सर्वसाधारण आर्थिक परिस्थिती बेतास बात,ओढाताणीची होती,मनोरंजनाची कोणतीही साधने उपलब्ध नसताना,मनाच्या काही काळ विरंगुळ्यासाठी,कष्टकऱ्यांच्या  शिथिलतेसाठी हे अत्यावश्यकच होते त्यामुळे सहजी हाताशी लागणारे साहित्य वापरून ही कला सादर केली जायची आणि त्यातून घरोघरी फिरताना लोकही आपापल्या परीने हाताशी असलेले काही पैसे स्वरूपात सादर करणाऱ्यांना दिले जाते ज्याला " *" शबय* " असे रूढार्थाने म्हटले जाते,तेव्हढेच कलेला प्रतिसाद म्हणून दिल्याघेतल्याचे समाधान,जे खूप मोठे होते,ज्याचे मोल पैशात होणार नव्हते.
       सिंधुदुर्ग आणि संबंध गोवा प्रांताची जडणघडण,संस्कृती,खाद्यपदार्थ, भाषेतील साधर्म्य,पोशाख इत्यादी अनेक बाबतीत बरेचसे सारखेपणा असल्याने ही प्रथा तेथेच आढळते,आजही जपली जाते.त्यामुळेच इतर ठिकाणी होळी-शिमगा असे उच्चारताना केवळ याच प्रांतात तो उच्चार " *शिगमा* " असा केला जातो. ह्यात नवीन पिढीतील शिकले सवरलेले, आंग्लाळलेले,उच्चविद्या विभूषित अभिमानाने स्वभुमीची,इथल्या तांबड्या मातीची  परंपरा सांभाळताना दिसतात तेव्हा ती पुढे वाटचाल करत असताना, याची डोळा पाहणे,यापेक्षा अधिक समाधान ते काय असणार आहे.
*शिगम्याच्या शुभेच्छा,शबय,शबय_*
                            🙏🌈 प्रदीप धुरी

Thursday, December 22, 2022

मी नेता नाही हो खोटे बोल पण रेटून बोल...

*संस्कृती म्हणजे काय?*

माझ्या समाज बांधवानो आणि मराठी मित्रांनो,आमच्या आईवडीलांनी जशी आमची पिढी घडवली तशी पिढी घडवायला वेळ लागणार नाही,पण काय होते आताची पिढी आपल्या वडीलांना *काय रे बाबा* *काय रे आजोबा* *काय रे मामा* बोलण्याची सवय लहानपणा पासून लागली जाते तीथेच संस्कृती १००% टक्के बिघडते,
*बाळकडू कमी होतोय म्हणून हे परीणाम,*
घरातल्यांना आरे तुरे आणि *शेजाऱ्यांना आहो जावो,हेच ऐकून दुख होते.*

*🪴संस्कार केले संस्कृती टिकेल..* 
*🪴संस्कृती टिकली तर धर्म टिकेल..*
*🪴धर्म टिकला तर राष्ट्र टिकेल.*
*🪴जात धर्म टिकला तर भाषेवर प्रभुत्व टिकेल.*
चार लोकात आपली मुल *कायरे बाबा* म्हणतात ना तेव्हा शरमेनी 
ताट चालणाऱ्या सन्मानाच्या वडिलांना समाजात मान खाली घालावी लागते,
*पाया भरणी मजबूत नसल्याने संस्कृतीत बिघाड.*
काय तर आताची जनरेशन
अशीच आहे.
*ज्या क्षेत्रात आपण शिकतो,मग तो क्षेत्र कोणताही असो,
पण जनरल नाँलैज 0...काही विचारले तर अनुउत्तरीत...*

*मी मराठी माझी मुंबई पण टक्केवारी बोलीभाषेत 0...*

 *ईतिहास,भूगोल,नागरीक शास्त्र 0...*
*मोबाईल टक्केवारीत १००%👌...मस्त....*
बंधूनो,आणि माझ्या माता भगिनींनो आपल्या कमाईतुन 
मुलांचे भरपूर लाड नक्की करा ! तुमचा खर्च अमाप पैसा तो तुमचा प्रश्न आहे...?
*पण संस्कृती जपा...*
*तिला पायदळी तुडवू नका...*
*👏कृपया माझा राग नक्कीच येईल.*
*पण मला तुम्ही थोडे समजून घ्या.*
*आपण देखील दिवसरात्र मोबाईल हातात घेऊन फिरत असता पण 
असले चार बोध लिहून लोकापर्यंत पाठवत चला,*
*काहीशी लोक चुका दाखवण्यात माहीर असतात.*
*पण कधी चांगल्या कमेंट देणार नाही...*

🪴🍒🪴🍒🪴🍒🪴🍒🪴🍒

Saturday, November 12, 2022

दीप अमावस्या


*!! 🪔दीप अमावस्या🪔.....दिनांक २८ जुलै गुरुवार !!*
💥💥💥💥💥
🔅हा हा म्हणता श्रावण जवळ येवुन ठेपला पण. दि. २८ तारखेला गताहारी अमावास्या आहे. याला ' दिप अमावास्या' पण म्हणतात. या दिवशी *आपल्याला दिप पुजन करायचे आहे. दिवसभरात कधीही दिपपुजन करा,पण शुचिर्भुत होवुन!*

🪔देव्हा-याच्या बाजुला जागा पुसुन एक स्वच्छ पाट ठेवा. पाटाभोवती छानशी सुबक रांगोळी काढा. घरात असतील,नसतील तेवढे दिवे घासुन,पुसुन लख्ख करुन या पाटावर ठेवा     
  घरातील दिव्यांना दुध पाण्याने धुउन स्वच्छ करावेत. पाटावर वस्त्र घालून ठेवावेत त्यांची पूजा करावी. आज पासूनच पत्रीचे महत्त्व सुरु होते. आघाडा, दुर्वा, पिवळी फुले यांनी दिव्यांची पुजा करावी. गोडाचा नेवैद्य अर्पण करावा. आपल्या घरातील छोटा / छोटीला औक्षण करावे. वंशाचा दिवा असतो न म्हणून आता मुलगा मुलगी हा भेद करत नाही त्यामुळे आपल्या दिव्याचे किंवा पणतीचे नक्की औक्षण करावे.
दुर्वा ही वंश वृद्धीचे प्रतिक आहे, त्यामुळे ते ही अर्पण करून प्रार्थना करावी. सर्व दिव्यांच्या सर्व ज्योती उजळुन निघाल्या पाहिजेत. एखाद,दुसरी वात पेटवु नका. या दिव्यांची छान पुजा करा. त्यांना चंदन लावा,हळद,कुंकू लावा. छानशी सुवासिक फुले अर्पण करा. मनोभावे संकल्प करा आणि पुढील मंत्र सलग १२ वेळा म्हणा. दिव्यांसमोर नैवेद्य जरुर ठेवा. अगदीच काही जमलं नाही तर दुधसाखर किंवा एखादे फळ तरी ठेवा. मंत्र असा आहे.

दीप सूर्याग्निरुपस्त्वं तेजसा तेज उत्तमम्।*

*गृहाणं मत्कृतां पूजां सर्वकामप्रदो भव।।*

हा श्लोक भक्तिकोशातला आहे.
🪔या दिवशी दीपपुजनाला महत्त्व आहे. वर्षभर आपण देवासमोर दिवा लावत असतो. देव आपल्याला दिव्याच्या ज्योतीतुनच पहात असतो. देवांची मिती वेगळी,आपली मिती वेगळी आहे. आपण इहलोकातले प्राणी आहोत. आपल्याला पहायचे म्हणजे दिव्याची ज्योत हवीच. दिवा लावल्याशिवाय कोणतीही पुजा वा साधना पुर्ण होत नाही. ह्या दिव्याप्रती कृतज्ञता व्यक्त व्हावी,म्हणुन दिपपुजनासाठी एक दिवस ठेवला आहे.
💐*आषाढ अमावस्या म्हणजेच "दिव्यांची अमावस्या".या दिवशी काय करावे....?*🪔 घरातील दिव्यांना दूध पाण्याने धुऊन स्वच्छ करावेत.*

*🪔 पाटावर वस्त्र घालून त्यावर दिवे ठेवावेत. त्यांची पूजा करावी.*

*🪔 आज पासूनच पत्रीचे महत्त्व सुरू होते.*

*🪔 आघाडा, दूर्वा, पिवळी फुले यांनी दिव्यांची पुजा करावी.*

*🪔 गोडाचा नैवेद्य अर्पण करावा.*

*🪔 आपल्या घरातील लहान मुलाचे औक्षण करावे.*

*🪔 दूर्वा ही वंश वृद्धीचे प्रतीक आहे, त्यामुळे ते ही अर्पण करून प्रार्थना करावी.*

*🪔 या दिवशी सुवासिनी स्त्रिया घरातले दिवे घासून-पुसून एकत्र मांडतात.*

*🪔 त्याच्या भोवती रांगोळ्या घालतात व ते दिवे प्रज्वलित करून त्याची पूजा केली जाते.*

*🪔 पूजेमध्ये पक्वान्नांचा महानैवैद्य दाखविला जातो. त्यावेळी पुढील मंत्राने दिव्याची प्रार्थना करतात.*

*🪔 ती प्रार्थना अशी 🪔*
⛳⛳⛳⛳⛳
*‘‘दीप सूर्याग्निरुपस्त्वं तेजसां तेज उत्तमम्‌| गृहाण मत्कृतां पूजां सर्वकामप्रदो भव॥*

*अर्थ:*

*_‘‘हे दीपा, तू सूर्यरूप व अग्निरूप आहेस. तेजा मध्ये तू उत्तम तेज आहेस.*

*माझ्या पूजेचा तू स्वीकार कर आणि माझ्या सर्व इच्छा पूर्ण कर.’’.*

*🪔 त्यानंतर दिव्यांची कहाणी ऐकली जाते आयुरारोग्य व लक्ष्मी यांची फलप्राप्ती यामुळे होते, असं धार्मिक ग्रंथात सांगितले आहे.*

 
*या पूजाव्रताची कथा खालीलप्रमाणे सांगितली आहे.*

_तमिळ देशाच्या पशुपती शेट्टी नावाच्या श्रेष्ठीला विनीत व गौरी अशी दोन मुले होती. लहानपणीच दोघांनी असं ठरविले की गौरीला ज्या मुली होतील त्या तिने विनीतच्या मुलांना द्याव्या. पुढे गौरीला तीन मुली व विनीताला तीन मुले झाली. गौरीच्या धाकट्या मुलीचे नाव सगुणा होते. गौरीच्या घरात लक्ष्मी नांदत होती. परंतु विनीताचे दैव फिरल्याने तो दरिद्री झाला. भाऊ गरीब झालेला पाहून तीवचन विसरली व पहिल्या दोन मुलींची लग्न श्रीमंतांच्या घरात केली. नंतर सगुणेचा विचार करू लागली. गौरीने (आईने) भावाला दिलेले वचन मोडले ही गोष्ट ऐकून सगुणेला वाईट वाटले. तिने विनीतच्या धाकट्या मुलाशी लग्न करायचे ठरविले. गौरी तिच्यावर संतापली. परंतु तिने हेका सोडला नाही. लग्न होऊन ती विनीतच्या घरी आली. गरिबीतच संसार सांभाळू लागली. एके दिवशी त्या नगराचा राजा स्नानासाठी गेला असता त्यांची रत्नजडीत अंगठी जी कट्ट्यावर ठेवली होती ती एका घारीने उचलून नेली. अंगठी घेऊन घार सगुणेच्या घराच्या छपरावर येऊन बसली. ती खाद्यवस्तू नाही असे समजून तिथेच टाकून उडून गेली. नंतर ती सगुणेला मिळाली. ती राजाची आहे हे समजताच तिने ती राजाला नेऊन दिली. राजाने प्रसन्न होऊन तिला बक्षीस दिले व अजून काही हवे तर माग, असे सांगितले. सगुणेने मागितले की, ‘फक्त येत्या शुक्रवारी राज्यात फक्त माझ्याच घरी दिवे असावे व दुसर्‍या कोणाच्याच घरात ते दिवे लावू नयेत असा हुकूम काढा.’’ राजाने तसे केले._

_मग शुक्रवारी सगुणेने सर्व घरभर दिवे लावले. तिने उपवास केला. राज्यात कोणाच्याच घरात दिवे नव्हते. आपल्या दोन्ही दिरांना पुढच्या व मागच्या बाजूला उभे केले व येणार्‍या सवाष्ण बाईकडून परत जाणार नाही अशी शपथ घाल व घरातून मागच्या बाजूने जाणार्‍या बाईकडून परत येणार नाही, अशी शपथ घाल. त्याप्रमाणे त्यांनी केले. अशारितीने फक्त लक्ष्मी तिच्या घरात राहिली व अवदसा घरातून निघून गेली. या घटनेमुळे सगुणेच्या घरात लक्ष्मी कायमची राहिली व घरात धनधान्य खूप झाले. राज्यातले लोक सगुणेला लक्ष्मीचा अवतार मानू लागले. अशी ही कथा *दीप अमावास्येसाठी* सांगितली आहे._
*दिपपुजनासाठी नियमही आहेत.*

*🔹पाळीचे ५ दिवस,सोयर,सुतक या दिवसांत पुजन करु नये.*

*🔹मद्यपान,धुम्रपान,मांसाहार करु नये.*

*🔹तुम्हाला वेळच नसेल तर घरातल्या कोणाकडुन तरी ही दिपपूजा करुन घ्या.*

*दिपपूजा ही घरीच करायची आहे,हे तुम्हाला कळलंच असेल.*
🕉️🚩🕉️🚩🕉️

  १. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...