कायद्याची ओळख

 1) RTE (शिक्षण हक्क ) कायद्याविषयी माहिती जाणून घ्या ...👇

   ⇒ शिक्षण अधिकार

2)माहिती अधिकार २००५ मराठी PDF-👇

क्लिक करा  

⇒ माहिती अधिकार कायदा / RTI ACT : DOWNLOAD

3)पोक्सो  कायदा :👉 DOWNLOAD

4)सायबर गुन्ह्यांविरुद्ध आत्मजागृती अभियान (Self Awareness )

5)सायबर गुन्हे

6)ऑनलाईन /सोशल मीडिया फ्रॉड 

7)Cyber Security Awareness 

8) RBI: BOOKLET ON MODUS OPERANDI OF FINAN.FRAUDS 

======================================================

तक्रार कोठे करावी 

======================================================

२४ डिसेंबर : जागतिक ग्राहक दिन माहिती 

जनसामान्याचा कायदा : दिवाळी अंक (कायदा विशेष )

महसुली दाव्यातील कार्यपद्धती 

शेत जमीन वाटणीपत्र GR 

जमीन खरेदीच्या नोंदी 

जमिनीच्या चुकीच्या नोंदी व दुरुस्ती 

जमिनीची मोजणी 

मध्यस्थांचे व्यवहार

बांधाचे वाद

वहिवाटीचे वाद 

रस्त्याचे हक्क 

पीक पाहणी

=======================================================

*कायदा लोकसेवा हक्काचा *

जात पडताळणी समिती GR 

जीवनावश्यक वस्तू अधिनियम

पोलीस स्टेशनचे कामकाज 

फौजदारी प्रक्रिया संहिता 

भारतीय राज्यघटनेतील कलमे 

भारताचा ध्वज 

=======================================================


*✍कायदा✒


 बाबासाहेब भिमराव रामजी आंबेडकराचा 


🙏 भारतीय घटनेचा🙏


कलम १- कायद्याचे नाव.

कलम २- भारतात केलेल्या अपराधास शिक्षा.

कलम ३- भारताच्या हद्दी बाहेर केलल्या अपराधाची चौकशी / शिक्षा.

कलम ४- परमुलकी अपराधास हा कायदा लागू.

कलम ५- अमुक कायद्यास हा अधिनियम लागू नाही.

कलम ६- ह्या कायद्यातील लक्षणांस अपवाद.

कलम ७- अर्थपूर्ण शब्द.

कलम ८- लिंग.

कलम ९-वचन.

कलम १०- पुरूष - स्त्री हया शब्दाचा अर्थ.

कलम ११- मनुष्य.

कलम १२- साधारण सर्व लोक.

कलम १३- हुकुमशाही / राजेशाही  रद्द .

कलम १४- शासकीय सेवक.

कलम १५/१६- रद्द.

कलम १७- सरकार.

कलम १८- भारत.

कलम १९- जज्ज.

कलम २०- न्यायाचे कोर्ट.

कलम २१- लोकसेवक.

कलम २२- जंगल मालमत्ता.

कलम २३- गैरलाभ / गैरहानी.

कलम २४- लबाडीने.

कलम २५- कपटाने.

कलम २६- समजण्यास कारण.

कलम २७- बायको.

कलम २८-नकली पदार्थ.

कलम २९- दस्तावेज.

कलम २९(अ)- विदूत नोंदी.

कलम ३०- मुल्यवान रोखा.

कलम ३१- मृत्यूलेख.

कलम ३२- कृत्याच्या करण्यास / वर्जनास लागू शब्द.

कलम ३३- कृती, अकृती.

कलम ३४- सामायिक इरादा.

कलम ३५- गुन्ह्याच्या इराद्यानं कृत्य.

कलम ३६- अंशतः समजून कृत्य.

कलम ३७- अपराधांना सामील होणे.

कलम ३८- अपराधांचा दोष येणे.

कलम ३९- आपरकशीने / इजापुर्वक.

कलम ४०- अपराध.

कलम ४१- विशेष कायदा.

कलम ४२- स्थलविशेषाचा कायदा.

कलम ४३- गैरफायदा, कायद्याने करणे पात्र.

कलम ४४- क्षती / हानी.

कलम ४५- जीव.

कलम ४६- मरण.

कलम ४७- प्राणी.

कलम ४८- नाव.

कलम ४९- वर्ष.

कलम ५०- कलम.

कलम ५१- शपथ.

कलम ५२- इनामाने / शुद्ध हेतूने.

कलम ५२(अ)- आसरा देणे / आश्रय अपवाद.

कलम ७६- कायदेशीर बांधील असलेल्या व्यक्तीने

                 तथ्य विषयक चुकभुलीमुळे केलेली कृती

                 अपवाद होत नाही.

कलम ८२- सात वर्षे वयाखालिल बालकाने केलेली

                 कृती.

कलम ८३- सात वर्षावरील व बारा वर्षा खालील.

                अपरिपक्व समजशक्ती असलेल्या

                 बालकाने केलेली कृती.

कलम ८४- वेड्या मनुष्याने केलेले कृत्य.

कलम ९०- भीतीमूळे दिलेली संमती.

कलम ९६- खासगीरीत्या बचाव करण्याचा अोघात

                 केलेली गोष्ट.

कलम ९७- शरीराचा व मालमत्तेचा खासगीरीत्या 

                 बचाव करण्याचा हक्क.

कलम १००- शरीराचा खासगीरीत्या बचाव 

                   करण्याचा हक्क हा मृत्यू घडून

                   आणण्याईतपत केव्हा व्यापक

                    असतो.

कलम १०१- असा हक्क मृत्यूहून अन्य अपाय

                   करण्याइतपत केंव्हा व्यापक

                    असतो.

कलम १०२- शरीराचा खासगीरीत्या बचाव

                   करण्याचा हक्क सुरू होणे व

                   चालू राहाणे.


साह्य करण्या विषयी. *     


कलम १०७- एखादे कृत्य करण्या विषयी साह्य.

कलम १०८- अप्रेरक.

कलम १०९- अपप्रेरकामूळे परिणामत: .

कलम ११४- अपराधाचे वेळी साह्य करणारा

                   जवळ असणे. 

कलम १४१- बेकायदेशीर जमाव.

कलम १४२- बेकायदेशीर जमावाचा घटक असणे.

कलम १४३- शिक्षा.

कलम १४४- प्राणघातक हत्त्यारासह बेकायदेशीर

                   जमावात सामील होणे.

कलम १४५- बेकायदेशीर जमावाला पांगविण्याचा

                   आदेश झाल्याने माहीत असूनही 

                    सामील होणे.                         

कलम १४६- दंगा भरणे.

कलम १४७- दंगा करण्याबद्दल शिक्षा.

कलम १४९- विधिनीयूक्त जबाबदारी.

कलम १५१- ५ किवा अधिक व्यक्तींना पांगण्याचा

                   आदेश मिळाल्यानंतर जाणीवपूर्वक

                    थांबून राहणे.

कलम १५३(अ)- धर्म, वंश,जन्म, निवास, भाषा ई.

                      कारणावरून निरनिराळ्या गटांमध्ये

                      शत्रुत्व वाढविणे.

कलम १५९- दंगल.

कलम १६०- दंगली बद्दल शिक्षा.

कलम १७०- लोकसेवकाची बतावणी करून

                   तोतयागीरी करणे.

कलम १७१- लोकसेवक वापरतो तशी गर्दी किवा

                   अोळख चिन्ह कपट करण्याच्या 

                    उद्देशाने वापरणे परिधान करणे.


*लोकसेवकांच्या कायदेशीर अधिकाराच्या

           अपमाना विषयी *

कलम १७२- समन्सची बजावणी किवा इतर

                  कारवाई टाळण्यासाठी फरारी होणे.

कलम १८१- लोकसेवक यांच्या समोर शपथेवर                  खोटे कथन करणे.

कलम १८८- लोकसेवकाने जारी केलेला आदेश न                   माणने.


* खोटा पुरावा आणि सार्वजनिक न्यायाच्या

             विरोधी अपराध *


कलम २०१- अपराध्याला वाचवण्यासाठी

                    अपराध्याचा पुरावा नाहीसा करणे

                    किवा कोटी माहिती देणे.

कलम २२३- लोकसेवकाने हयगयीने कोणास

                  कैदेतून पळून जाऊ देणे.

कलम २७९- सार्वजनिक रस्त्यावर बेकायदेशीर

                  वाहन चालविणे.

कलम २९२- अश्र्लिल पुस्तके ई. विक्री करणे.

कलम २९५- कोणत्याही वर्गाच्या धर्माचा अपमान

                   करण्याच्या


उद्देशाने उपासना स्थानांचे

                   नुकसान करणे किवा ते अपवित्र करणे.

कलम २९५(अ)- कोणत्याही वर्गाच्या धर्माचा किवा

                    धार्मिक श्रद्धांचा अपमान करून 

                    धार्मिक भावनांवर अत्याचार 

                    करण्याचा उद्देशाने कृती करणे.

कलम २९८- धार्मिक भावना दुखावण्याचा उद्देशाने

                   जाणीव पुर्वक शब्द उच्चारणे.

कलम २९९- सदोष मनुष्यवध.

कलम ३००- खून.

कलम ३०२- खुना बद्दल शिक्षा.

कलम ३०४- सदोष मनुष्यवधाबद्दल शिक्षा.

कलम ३०४(अ)- हयगयीने मृत्यूस कारण.

कलम ३०४(ब)- हुंडाबळी.

कलम ३०६- आत्महत्येला अपप्रेरणा देणे.

कलम ३०७- खुनाचा प्रयत्न करणे.

कलम ३२३- इच्छापुर्ण दुखापत पोहोचण्या बद्दल

                   शिक्षा.

कलम ३२४- घातक हत्त्याराने किवा साधनांनी 

                   इच्छापुर्वक जबर दुखापत पोहचवणे.

कलम ३२५- इच्छापुर्वक जबर दुखापत

                  पोहचवण्याबद्दल शिक्षा.

कलम ३२६- घातक हत्त्याराने किवा साधनांनी

                   इच्छापुर्वक जबर दुखापत

                   पोहचवीणे.

कलम ३२६(अ)- अॅसिड ई. वापर करून इच्छापुर्वक

                     जबर दुखापत पोहचवीणे.

कलम ३२६(ब)- इच्छापुर्वक अॅसिड फेकणे अथवा

                    फेकण्याचा प्रयत्न करणे.

कलम ३२८- अपराध करण्याच्या उद्देशाने विष ई.

                  सहाय्याने दुखापत करणे.

कलम ३३०- कबुलीजबाब जबरीने घेण्यासाठी,


            गेलेला माल परत घेण्यासाठी 

                  इच्छापुर्वक दुखापत करणे.

कलम ३३२- लोकसेवकाला धारकाने त्याच्या

                  कर्तव्यापासून परावृत्त करण्यासाठी

                  इच्छापुर्वक दुखापत करणे.

कलम ३३६- इतरांचे जीवित किवा व्यक्तिगत

                  सुरक्षितता धोक्यात आणणारी

                  कृती.

कलम ३३७- इतराचे जीवित किवा व्यक्तीगत

                   सुरक्षितता धोक्यात आणणार्या

                    कृतीने दुखापत पोहचवीणे.

कलम ३३८- इतरांचे जीवित किवा व्यक्तिगत

                   सुरक्षितता धोक्यात आणणार्या

                    कृतीने जबर दुखापत पोहचवीणे.

कलम ३३९- गैरनिरोध / अन्यायाने प्रतिबंध 

                    करणे.

कलम ३४०- अन्यायाने कैदेत ठेवणे.

कलम ३४१- गैरनिरोधाबद्दल शिक्षा.

कलम ३४२- फौजदारी पात्र बलप्रयोगाबद्दल शिक्षा.

कलम ३४९- बलप्रयोग.

कलम ३५०- फौजदारी पात्र बलप्रयोग.

कलम ३५१- हल्ला / अंगावर जाणे.

कलम ३५२- फौजदारी पात्र बलप्रयोगाबद्दल शिक्षा.

कलम ३५३- लोकसेवकाला त्याच्या कर्तव्यापासून

                  धाकाने प्रारूप्त करण्यासाठी फौजदारी

                   पात्र बलप्रयोग करणे.

कलम ३५४- स्त्रिची विनयभंगकरण्याच्या उद्देशाने

                   तिच्यावर हमला किवा फौजदारीपात्र

                   बलप्रयोग.

कलम ३५४(अ)- लैगिक छळाबद्दल शिक्षा.

कलम ३५४(ब)- निर्वस्त्र करण्याच्या उद्देशाने

                     तिच्यावर हमला किवा फौजदारी

                     बलप्रयोग करणे.

कलम ३५४(क)- चोरून अश्लील चित्रण करणे.

कलम ३५४(ड)- चोरून पाठलाग करणे.

कलम ३४९- अपहरण / मनुष्य चोरून नेणे.

कलम ३६२- अपहरण / पळवून नेणे.

कलम ३६३- अपहरणाबद्दल शिक्षा.

कलम ३७०- व्यक्तीचा गुलाम व्यापार करणे.

कलम ३७५- बलात्कार.

कलम ३७६- बलात्काराबद्दल शिक्षा.

कलम ३७७- अनैसर्गिक संभोग शिक्षा.

कलम ३७८- चोरी.

कलम ३७९- चोरीबद्दल शिक्षा.

कलम ३८०- राहते घर वैगेरे ठिकाणी चोरी.

कलम ३८३- जुलमाने घेणे.

कलम ३८४- शिक्षा.

कलम ३९०- जबरी चोरी.

कलम ३९१- दरोडा.

कलम ३९२- जबरी चोरीबद्दल शिक्षा.

कलम ३९३- जबरी चोरी करण्याचा प्रयत्न करणे.

कलम ३९५- दरोड्याबद्दल शिक्षा.

कलम ४०५- फौजदारी विश्र्वासघात.

कलम ४०६- शिक्षा.

कलम ४०९- लोकसेवकाने, सावकार,एजेंट यांनी

                   अन्यायाने विश्र्वासघात करणे.

कलम ४१०- चोरीची मालमत्ता.

कलम ४११- अप्रामाणिकपणे चोरीची मालमत्ता

                   स्वीकारणे.

कलम ४१५- ठगवणूक.

कलम ४१७- ठगवणूक करण्याबद्दल शिक्षा.

कलम ४२०- ठगवणूक करणे आणि मालमत्ता                   देण्यास नकार देणे.

कलम ४२५- अपक्रीया.

कलम ४२६- अपक्रीया बद्दल शिक्षा.

कलम ४३५- १००रू. पर्यंतच्या किवा शेतमालाच्या                    १०रू.किमतीच्या नुकसान करण्याच्या                    उद्देशाने स्फोटक पदार्थ अथवा विस्तव                   याद्वारे आगळीक करणे.

कलम ४४१- फौजदारी पात्र अतिक्रमण किवा

                    घराविषयी आगळीक.

कलम ४४२- गृह अतिक्रमण किवा घराविषयी 

                   आगळीक.

कलम ४४३- चोरटेगृह अतिक्रमण.

कलम ४४४- रात्रीच्यावेळी चोरटेगृह अतिक्रमण                    करणे.

कलम ४४५- घरफोडी.

कलम ४४७- फौजदारी पात्र अतिक्रमणाबद्दल शिक्षा.

कलम ४४८- घर अतिक्रमणाबद्दल शिक्षा.

कलम ४५२- दुखापत, हमला,करण्याची पूर्वतयारी

                   करून नंतर गृह अतिक्रमण


करणे.

कलम ४५४- कारावासाच्या शिक्षेस पात्र असलेल्या

                   अपराध करण्यासाठी चोरटेगृह                    अतिक्रमण किवा घरफोडी करणे.

कलम ४५७- कारावासाच्या शिक्षेस पात्र असलेल्या                    अपराध करण्यासाठी रात्रीच्या वेळी                     चोरटे गृह अतिक्रमण किवा घरफोडी

                      करणे.

कलम ४६३- बनावटी लेख करणे.

कलम ४६५- बनावटी करण्याबद्दल शिक्षा.

कलम ४६८- फसवणूक करण्यासाठी बनावटी करणे. कलम ४९८(अ)- एखाद्या स्त्रीच्या पतीने किवा

                      नातेवाईकाने तिला क्रूर वागणूक देणे. कलम ५०४- शांतताभंग करण्याच्या उद्देशाने अपमान

                    करणे.

कलम ५०६- फौजदारी पात्र धाकदपटशाबद्दल शिक्षा.

कलम ५०९- विनयभंग करण्याच्या उद्देशाने हावभाव

                   किवा शब्दचोर करणे.

कलम ५११- अाजिवन कारावासाच्या किवा अन्य

                   कारावासाच्या शिक्षेस पात्र असलेले

                    अपराध करण्याचा प्रयत्न करण्या

बद्दल शिक्षा.

                          अशी घटने मध्ये कायदयाची तरतुद केली .डॉ. भिमराव आंबेडकरानी श्रिमंतांपासून गरीबांपर्यंत, सर्वसामान्यांपर्यंत सर्वांना समान कायदा देऊन, कायद्यापुढे सर्व समानता,ह्या भारताला जगातील सर्वात मोठे, धर्मनिरपेक्ष, रडतलोकशाही राष्ट्र बनवून संविधान बहाल कले.  


🙏जय संविधान 🙏 जय भारत 🙏🏻👍


===================================================

*⚖️वडिलांच्या संपत्तीवर मुली केंव्हाही हक्क दाखवू शकतात*,
*समजून घ्या,संपूर्ण माहिती !*

*माहिती समजून घ्यावी, उगाच बहिणीला तुझा कसला अधिकार म्हणून टोचू नका,*
*कायदा बदली झालाय.!⚖️*
एखाद्या मुलीचे लहान वयातच लग्न झाले आणि लग्नानंतर तिच्या नवऱ्याने आणि तिच्या सासरकडच्या मंडळीनी तिचा छळ केला आणि त्यात ती मुलगी कोठेही कमवत नसेल तर तिचे पूर्ण आयुष्य बेकार ठरते.मग अश्यावेळी मुलीची समजूत काढून वेळ मारून नेण्यापलिकडे काही उरत नाही. तसेच त्यात आणखी भर म्हणून काही ठिकाणी त्या मुलीचे आई वडील देखील त्या मुलीस मदत करण्यास तयार नसतील आणि भाऊ पण वडिलांच्या संपत्तीचा एक तुकडादेखील द्यायचा तयार नसेल तर अशा बिकट परिस्थितीत त्या मुलीने काय करावे?
*स्वतःचा खर्च कसा भागवावा ?*

बऱ्याच वेळा लोकांच्या मनात असा प्रश्न पडतो की,लग्न झालेल्या मुलीचा तिच्या वडिलांच्या मृत्यूनंतर तिच्या नावावर असलेल्या मालमत्तेवर हक्क असतो का? 
याबद्दल थोड्याच लोकांना माहिती आहे.बऱ्याच लोकांना याबद्दलची कायदेशीर तरतूद माहित नाही. 
वडिलांच्या निधनानंतर त्यांच्या संपत्तीत विवाहित मुलीचा कायदेशीर हक्क आहे.

मुलींना पितृ संपत्तीत समान वाटा देण्यासाठी २००५ मध्ये हिंदु उत्तराधिकार कायद्यामध्ये बदल करण्यात आला होता.
 वडिलांच्या संपत्तीच्या बाबतीत आता मुलीच्या जन्माबरोबरच वाटा असतो,तर मुलीने स्वतः कमवलेली मालमत्ता तिच्या इच्छेच्या तरतुदीनुसार वाटप केली जाते. 
वडिलांच्या नंतर मोठी मुलगी म्हणून तीच घरदार सांभळते.
मागच्या भावंडांची स्वतः काळजी घेते.
वडील मरण पावले आणि त्याच्या इच्छा नसताना देखील त्यांच्या मालमत्तेवर मुलगा व मुलगी यांचा समान हक्क राहतोच.

२००५ मध्ये यासंबधिचा कायदयात बदल करण्यात आला. 
हिंदू वारसा कायदा १९५६ च्या तरतुदीनुसार मुलींना वडिलोपार्जित मालमत्तेत समान हक्क दिले गेले नव्हते.
 परंतु ही असमानता दाखवणारा कायदा ९ सप्टेंबर २००५ रोजी हिंदु उत्तराधिकार कायद्यात सुधारित करून नव्याने तयार करण्यात आला. 
ज्या अंतर्गत हिंदूंमध्ये मुलामुलींच्या मध्ये मालमत्ता समान विभागली जाऊ शकते.

*(१) वडिलोपार्जित मालमत्ता असेल तर* :-
हिंदू कायद्यातील मालमत्ता दोन भागांमध्ये विभागली आहे– वडिलो-पार्जित आणि स्वयंरोजगारीत.
वडिलोपार्जित मालमत्तांमध्ये पूर्वजांपासून ताब्यात असलेल्या मालमत्तेचा समावेश असतो, ज्यात जन्माधीच्या ४ पिढी आधीपासून असलेली मालमत्ता यात समविष्ट असते. 
अशा मालमत्तेवर मुलांचा जन्मसिद्ध हक्क असतो,मग ते मुलगा किंवा मुलगी. 
मात्र २००५ पूर्वी,अशा मालमत्तेवर फक्त मुलाचा हक्क असायचा. 
तथापि, २००५ मध्ये हिंदू कायद्यात करण्यात आलेल्या दुरुस्तीनंतर वडील त्यांच्या मनमानी अशी मालमत्ता वाटू शकत नाहीत. 
म्हणजेच वाटणी मध्ये मुलीला सामायिक करण्यास नकार देऊ शकत नाही.
 आता कायदानुसार मुलगी जन्माला येताच तिला वडिलोपार्जित मालमत्तेचा हक्क मिळतो.

*(२) वडिलांनी स्वत: कमवलेली मालमत्ता:-*
 वडिलांच्या स्वत: च्या मालकीच्या मालमत्तेच्या बाबतीत,मुलींची बाजू कमकुवत असते कारण जर वडिलांनी जमीन विकत घेतली असेल,घर स्वतः बांधले असेल किंवा स्वत: च्या पैशाने विकत घेतले असेल तर ते ही मालमत्ता ज्याला पाहिजे त्याला देऊ शकतात.
 स्वतःच्या इच्छेनुसार कोणालाही त्यांची स्वतःची मालमत्ता देणे हा वडिलांचा कायदेशीर अधिकार आहे. म्हणजेच,जर वडिलांनी मुलीला स्वत:च्या मालमत्तेत वाटा देण्यास नकार दिला तर मुलगी काहीच करू शकत नाही.

*(३) मृत्यपत्र (वसियात) लिहायच्या आधीच वडिलांचा मृत्यू झाल्यास:*
         मृत्युपत्र लिहिण्यापूर्वी वडिलांचा मृत्यू झाल्यास,सर्व कायदेशीर वारसांना त्यांच्या मालमत्तेवर समान हक्क असतो. 
हिंदू उत्तराधिकार कायदा पुरुष वारसांना चार वर्गांमध्ये वर्गीकृत करतो आणि वडिलांच्या मालमत्तेवरचा पहिला हक्क पहिल्या वर्गाच्या वारसांचा आहे.
 यामध्ये विधवा पत्नी, मुली आणि मुले तसेच इतरांचा समावेश असतो. 
प्रत्येक वारसांना मालमत्तेवर समान हक्क असतो. 
याचा अर्थ असा की एक मुलगी म्हणून आपल्याला आपल्या वडिलांच्या मालमत्तेवर पूर्ण हक्क असतो.
प्रत्येक भाऊबहीन आपआपल्या आईवडीलांच्या समान घरी जन्म घेतो.जन्माला आलेला असतो.
म्हणून मुलीना हक्क आहे.

*(४) मुलगी विवाहित असल्यास:-*
                       २००५ च्या पूर्वी हिंदू उत्तराधिकार कायद्यात मुलींकडे हिंदू अविभाजित कुटुंबाचे सदस्य म्हणून पाहिले जात होते. 
म्हणजेच लग्नानंतर कागदोपत्री ती तिच्या माहेरच्या कुटुंबाचा भाग नाही असे मानले जायचे. 
२००५ च्या तरतुदीनंतर हा कायदा बदलण्यात आला.

*(५) जर मुलीचा जन्म २००५ पूर्वी झाला असेल आणि त्यानंतर वडिलांचा मृत्यू झाला असेल तर:-*
             ९ सप्टेंबर २००५ पासून हिंदू उत्तराधिकार कायद्यात सुधारणा लागू झाली.
 कायद्यानुसार असे म्हटले आहे की या तारखेच्या आधी किंवा नंतर मुलगी जन्माला आली असली तरी तिच्या भावाला व तिला वडिलांच्या संपत्तीत तिला समान वाटा असेल.
 दुसरीकडे, ९ सप्टेंबर २००५ रोजी वडील जिवंत असतानाच मुलगी आपल्या वडिलांच्या मालमत्तेत वाटा मिळवू शकते.

 या तारखेपूर्वी वडिलांचा मृत्यू झाला असता,मुलीला पितृत्वाच्या मालमत्तेवर कोणताही हक्क नाही आणि वडिलांनी स्वत:कमवलेली मालमत्तेची त्याच्या इच्छेनुसार विभागणी केली जाते....

*बहिण भाऊ समान कायदा* *वादविवाद,पैसा,प्रोप्रटि,*
*सध्याच्या काळात नातीगोती संपत चालली आहेत. कोणी कोणाकडे जाणे येणे सर्व बंध झाले आहेत.*
*कोर्टकचेऱ्यांच्या मागे वायफळ खर्च होताना दिसत आहे.म्हणून समजून घ्या*
*वाद टाळा संबंध जोडा.*
___________________________
⚔️⛓️🛡️⚖️🎓💼👨‍🎓📚✍️


==================================================


●बिल्डरने एक महिन्याचे भाडे जरी थकवले तरी पुनर्विकासाचा करार रद्द होऊ शकतो असा महत्वपूर्ण निकाल मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे.●

बिल्डरने भाडे थकवणे, हा एकप्रकारचा सामाजिक अन्याय आहे असे मतही न्यायालयाने नोंदविले आहे.

👉 बिल्डिंग पुनर्विकासाला जात असताना सदनिका धारकांशी गोड, गोड बोलून ईमारत खाली केली जाते, त्यानंतर ती पाडली जाते,

👉 व एक वर्षेभर भाडे दिल्यानंतर इमारतीचे कामही जागेवर थांबते व बिल्डर भाडे ही देणं बंद करतो,

👉 असे हजारो प्रकल्प आणि लाखो लोकं मुंबई, ठाणे आणि पुण्यामध्ये आहेत,
ज्यांचे घरही गेलं आहे आणि बिल्डरने भाडे ही देणं बंद केलं आहे.

👉 केवळ राजकीय वरदहस्त टक्केवारी मुळे असे प्रकल्प जाणीवपूर्वक अडकवून ठेवले जात आहेत, 

👉 आताही सरकारने बिल्डरने ऍडव्हान्स मध्ये तीन वर्षांचे भाडे द्यावे, हा जीआर रद्द करून केवळ एक वर्षाचे भाडे ऍडव्हान्स द्यावे असा नवीन जीआर लागू केला आहे.

मित्रांनो जागे व्हा, सतर्क रहा, जागरूक रहा

✅ पुनर्विकासाला जाताना बिल्डरसोबत सर्व लेखी कराराच करा, कराराची प्रत जपून ठेवा!

✅ बऱ्याचदा कमिटी सभासदांना तोंडी सांगत असते बिल्डर हे देणार आहे, बिल्डर ते देणार आहे पण त्यांच्या ह्या सगळ्या थापा ही असतात, ते सगळं करारात आहे का हे तपासा.

✅ कोणत्याही प्रकारच्या "कमिटीच्या आणि बिल्डरच्या" तोंडी आश्वासनावर विश्वास ठेवू नका, 

✅ विषय जेव्हा पैशाचा येतो तेव्हा सगळे विकले जातात! 
(पुनर्विकासाला जाताना कोणती काळजी घ्यावी यासाठी वॉल वरील आजची दुसरी पोस्ट सुद्धा वाचावी)

"राजावाडी अरुणोदय को.ऑप.हौसिंग सोसायटी" च्या बाजूने मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाची प्रत पुढील लिंकवर आहे, 

डाऊनलोड करून सेव्ह करून ठेवा.


#जागोग्राहक 
#जागोनागरिक

जागरूक होऊयात

मित्रांनो,

पोsस्ट लाईक, शेअर, कमेंट्स, कॉपी पेस्ट जरूर करा, वेगवेगळ्या वॉट्सउप ग्रुपवर जास्तीत जास्त व्हायरल करा.... संतोष तारी

No comments:

Post a Comment

  १. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...