बोधकथा

      ▌☣ कर्तव्य ☣ ▌      

एक तरुण आपल्या विधवा आईला सोडून पळून आला आणि एका मठात तंत्र मंत्र साधना करू लागला, अनेक वर्षे लोटली, एकेदिवशी त्याने आपले वस्त्र सुकविण्यासाठी टाकले आणि ध्यान करू लागला, डोळे उघडल्यावर पाहतो ते काय! एक कावळा त्याचे वस्त्र ओढत असल्याचे त्याला दिसले, हे पाहून तरुणाने त्या कावळ्याकडे क्रोधाने पाहिले. त्याक्षणी तो कावळा जळून खाक झाला. 

आपल्या सिद्धीचे यश बघून तो खुश झाला आणि अहंकाराने भिक्षा मागायला गेला. त्याने एका दारावर जावून आवाज दिला. पण कोणीच बाहेर आले नाही. त्याला फार राग आला. त्याने अनेक वेळेला आवाज दिला. 

तेंव्हा एका स्त्रीने म्हटले," महाराज! थोडा वेळ थांबा! मी साधना समाप्त होताच आपल्याला भिक्षा वाढते." तरुणाने हे ऐकले आणि त्याचा पारा चढला. त्याने म्हटले,"दुष्टे! तू आम्हाला ओळखत नाहीस. आमची परीक्षा बघतेस काय? याचे किती वाईट परिणाम होतील हे माहित आहे काय?"

हे ऐकताच घरातील स्त्री म्हणाली," माहित आहे! तुम्ही शाप देताल. परंतु मी काही कावळा नाही जो आपल्या क्रोधाग्नीत भस्म होईल. मातेला एकटी सोडून मुक्ती मिळवू पाहणाऱ्या अहंकारी संन्याशा! तू माझे काही बिघडवू शकत नाही."


तरुणाने हे ऐकले आणि त्याचा सगळा गर्व चक्काचूर झाला. त्याने बाहेरूनच क्षमा मागितली. तेंव्हा गृहस्वामिनी घराबाहेर आली तेंव्हा त्याने तिला तुम्ही कोणती साधना करता ? असा प्रश्न केला. तेंव्हा ती म्हणाली,"आपली साधना तीच असते आपण जी कर्मे करतो ती कर्म सोडून मुक्तीच्या मागे धावलं तर मुक्ती मिळणे दुरापास्त होते व यातूनच अहंकार निर्माण होतो. मी गृहस्थ धर्माची उपासना करते आणि त्यात कसूर करत नाही." 


हे ऐकून तरूणाने अहंकाराचा त्याग केला व सन्यस्त जीवन सोडून मूळ कर्तव्याचे पालन करण्यासाठी आईकडे परतला. 

🔅तात्पर्य :-प्रत्येकाने...आपले विहित कर्तव्य योग्यपणे करावे.

------------------------------------------------------

           ▌☣ खरा मित्र ☣   ▌ 

आश्रमात राहणाऱ्या शिष्यांनी एके दिवशी आपल्या गुरूला एक प्रश्न विचारला,"गुरुजी ! धन, कुटुंब आणि धर्म यापैकी खरा सहकारी कोण आहे? " 


यावर गुरुजींनी एक कथा ऐकवली, एका व्यक्तीला तीन मित्र होते, तिघांपैकी पहिला त्याला प्रिय होता. तो प्रत्येक दिवशी त्याला भेटायचा. प्रत्येक कामात त्याची सोबत करायचा. दुसऱ्या मित्राबरोबर त्याची मध्यम स्वरूपाची मैत्री होती. दुसरा मित्र २-३ दिवसातून भेटायचा आणि क्वचितच त्याच्या सोबत असायचा. तिसरा मित्राला मात्र तो २ महिन्यात एकदा भेटायचा आणि कोणत्याही कामात त्याची मदत घेत नसे. 


एकदा त्या व्यक्तीकडून काहीतरी चूक झाली. त्यामुळे त्याला राजदरबारात बोलावण्यात आले. तो घाबरला. त्याने पहिल्या मित्राला सांगितले व नेहमीप्रमाणे सोबत राहण्याचा आग्रह केला. मात्र त्याने सर्व गोष्ट ऐकून सोबत राहण्यास नकार दिला. कारण तो राजाशी आपले संबंध बिघडवू इच्छित नव्हता. दुसऱ्या मित्रानेही त्याला सोबत येण्याची तयारी दर्शविली पण अचानक कामाचे कारण सांगून येण्याची टाळाटाळ केली. 


त्या व्यक्तीने तिसऱ्या मित्राला विचारताक्षणी तो त्याच्यासोबत गेला आणि राजासमोर त्या व्यक्तीची बाजू मोठ्या धीराने व खंबीरपणे मांडली. राजालापण ते कथन योग्य वाटल्याने त्याने त्या व्यक्तीला दोषमुक्त केले. 


हि कथा ऐकवून गुरुजींनी शिष्यांना समजावले, पहिला मित्र म्हणजे पैसा. ततो परमप्रिय असतो पण मृत्युनंतर काहीच कामी येत नाही. तर दुसरा मित्र म्हणजे कुटुंब. आपले आपले म्हणणारे शेवटी आपल्याला वेळेला उपयोगी पडत नाहीत. आणि तिसरा मित्र म्हणजे आपला धर्म, जो आपल्याला जिवंत असेपर्यंत साथ देतोच पण मृत्युनंतर ही तो एकमेव आपल्या सोबत असतो.


🔅तात्पर्य :-


माणसाने आपल्या वर्तनातून आपल्या मनुष्य धर्माचे पालन केले पाहिजे, जे माणुसकीच्या दृष्टीने योग्य आहे.


********

 ╔═════ ▓ ࿇ ▓ ═════╗

                      बोधकथा

      ╚═════ ▓ ࿇ ▓ ═════╝



अवंतीनगरीचे राजे बाहुबली यांना राजज्‍योतिष्‍याची गरज होती. मंत्रिपरिषदेसमोर त्‍यांनी ही इच्‍छा व्‍यक्त केली. राजज्‍योतिषाबाबत घोषणा केली जावी आणि पात्र व्‍यक्तिला निरखुन पारखून नियुक्त केले जावे अशी सर्व मंत्रिगणांनी सर्वसहमतीने ठरवले.


या पदासाठी पात्र उमेदवारांनी मुलाखती द्याव्‍यात अशी दवंडी दुस-या दिवशी राज्‍यात पिटवण्‍यात आली. सर्व उमेदवार ठरलेल्‍या वेळी दरबारात उपस्थित झाले. राजाने स्‍वत:च मुलाखती घेण्‍यास सुरुवात केली. अनेक ज्‍योतिष्‍यांनी आपल्‍या ज्ञानाचे सादरीकरण करण्‍यास सुरुवात केली परंतु राजाचे समाधान झाले नाही.


अखेरीस तीन ज्‍योतिषी उरले त्‍यातील पहिल्‍या ज्‍योतिष्‍याला राजाने विचारले,”तुम्‍ही भविष्‍य कसे सांगता” ज्‍योतिषी म्‍हणाला,”नक्षत्र पाहून” राजाने दुस-या ज्‍योतिष्‍याला हाच प्रश्‍न विचारला तेव्‍हा दुसरा ज्‍योतिषी म्‍हणाला,”हस्‍तरेषा पाहून भविष्‍य सांगतो. ” तर तिसरा ज्योतिषी उत्तरला  "फासे टाकून खात्रीलायक भविष्य वर्तवितो." परंतु राजाला कुणाचीच उत्तरे आवडली नाहीत.


अचानक राजाला तेव्‍हा आपल्‍या राज्‍यातील निर्धन ज्‍योतिषी विष्‍णुशर्माची आठवण झाली. विष्‍णुशर्माला तात्‍काळ बोलावण्‍यात आले. राजाने विष्‍णुशर्माला विचारले,” तुम्‍ही ज्‍योतिषी असूनसुद्धा या मुलाखतीसाठी का आला नाहीत. तुम्‍हाला राजज्‍योतिषी होणे आवडत नाही काय?”

विष्‍णुशर्माने सांगितले,”महाराज मी घरी बसून माझ्या स्‍वत:च्‍या पत्रिकेचा अभ्‍यास केला व माझ्या अभ्‍यासानुसार या पदावर मीच नियुक्त होणार आहे. तुम्‍ही मला निमंत्रण पाठवून मला बोलावून घ्‍याल हे मला माझ्या अभ्‍यासातून आधीच कळाले होते. त्‍यामुळे मी या पदासाठी मुलाखत देण्‍यास आलो नाही.” 


राजाला विष्‍णुशर्माची अभ्‍यासू वृत्ती व त्‍याचा आत्‍मविश्‍वास या दोन्‍हीचा अभिमान वाटून त्‍याने विष्‍णुशर्माला राजज्‍योतिषी म्‍हणून नियुक्त केले.


               🔅 तात्‍पर्य 🔅 


ज्‍यांचा स्‍वत:वर व स्‍वत:च्‍या अभ्‍यासावर प्रचंड विश्‍वास असतो तो कधीच हार नाहीत व त्‍यांच्‍याकडे संधी आपोआप चालून येते.

***************


 सत्संगाचा परिणाम


              ╰═༺༒༻═╯

एका गावात एक चोर आणि त्याचा मुलगा राहत होते. वडिलांनी खूप चो-या केल्या होत्या. त्यांचा शेवट जसा जवळ आला तसे त्यांनी मुलाला जवळ बोलावून घेतले आणि सांगितले कि, ''काय वाटेल ते होऊ दे पण कोणत्याही प्रवचन किंवा कीर्तनाच्या वाटेला चुकूनही जाऊ नकोस'' असा मुलाला उपदेश केला. त्यांनी मग प्राण सोडले.


मुलानेही हा उपदेश मनापासून पाळला पण त्यामागील कारण त्याला कळले नाही. एके दिवशी जंगलातून पळून गावाकडे येत असताना चुकून एका मंदिराच्या पाठीमागे तो आडोश्याला लपला. त्या मंदिरात एका महाराजांचे प्रवचन चालू होते. प्रवचनात त्यांनी एक कथा निवडली होती. त्यातील एकाच वाक्य ह्याचा नकळत कानावर पडले. ते म्हणजे 'देवांची सावली पडत नाही'. ह्याने ते मुद्दाम ऐकले नव्हते तरी त्याच्या डोक्यात ते चांगलेच भिनले.


नेमके त्याच वाटेवर राजाचे सैनिक त्याला आडवे आले आणि त्यांनी त्याला पकडले आणि तुरुंगात टाकले. बरेच दिवस खूप त्रास देवूनही, खुप मार खावूनही याने गुन्हा कबूल केला नाही तेंव्हा राजा चिंतीत झाला आणि त्याने सरदारांची सभा बोलावली आणि चोराबद्दल सांगितले व उपाय सुचविण्याबद्दल सांगितले. 


एका सरदाराने शेवटी एक उपाय सुचविला. तो म्हणाला हा कशाला घाबरत नाही किंवा कशाला बधत नाही तेंव्हा याला देवाची तरी भीती घालू आणि ह्याच्याकडून गुन्हा कबूल करून घेवू. मग एका सुंदर स्त्रीला खुपसे दागदागिने घालून देवीच्या रुपात सजविण्यात आले आणि ह्याच्या समोर पाठविण्यात आले. तुरुंगात सर्वत्र अंधार होता आणि फक्त थोडा उजेड या स्त्री वर पाडण्यात आला. 


चोराने पाहिले एक देवी आपल्यासमोर उभी आहे आणि ती आपल्याला गुन्हा कबूल करण्यास सांगत आहे. पण ह्याच वेळी त्याला नेमके प्रवचनातील 'देवांची सावली पडत नाही' हे वाक्य आठवले आणि त्याचा समोरील देवीची सावली पडलेली त्याला दिसली. त्याच बरोबर त्याला कळले कि... ही देवी नाही माणूस आहे. 


त्याला कळून चुकले आपण एकदा प्रवचन चुकून ऐकले तर आपल्याला इतका फायदा झाला. मग हि लुटमार कशाला...? चोरी कशाला...? त्यापेक्षा चांगला मार्ग पत्करून जीवन जगण्याचा त्याने निश्चय केला.


तात्पर्य :~ 


चांगले विचार ऐकल्याने, चांगली संगत केल्याने माणसाला चांगले वागण्याची प्रेरणा मिळते.


****


बोधकथा ☣ ▌



          ♦️ भगवंताचे अस्तिव ♦️


             

  थॉमस अल्व्हा एडिसन एकदा रेल्वेने प्रवास करीत होते, त्यांच्या समोर एक मोठे प्रोफेसर बसले होते. एडिसन बायबल वाचत होते , ते प्रोफेसर नास्तिक होते. त्यामुळे ते एडिसन यांना म्हणाले "अहो तुम्ही चांगल्या घरातील दिसता , वय पण तरूण आहे मग देव देव करण्यापेक्षा काहीतरी चांगलं कार्य करा आणि समाजात नाव कमवा , हे बायबल वाचून काय होणार ?" 


हे ऐकून एडिसननी गपचूप बायबल आपल्या पिशवीत घातले. त्या प्रोफेसरनी आपलं कार्ड एडिसनना दिले व सांगितले की काही काम हवं असेल तर मला कॉन्टॅक्ट करा. एडिसन चे स्टेशन आल्यावर ते उतरू लागले असता एडिसननी सुद्धा आपले कार्ड त्यांना दिले व ते उतरले. त्यानंतर ते प्रोफेसर सुद्धा आपल्या घरी पोहचले.

                             

आठवड्याचे कपडे धुवायला काढताना त्या प्रोफेसरना ते कार्ड सापडले , त्या दिवशी त्यांनी ते गडबडीत आपल्या खिश्यात टाकले होते , आज ते कार्ड बघून ते अचंबित झाले. आपण एका महान शास्त्रज्ञा समोर होतो आणि आपल्याला कळलंच नाही आणि आपण काय बोललो या बद्दल त्यांना अपराधी वाटू लागले. या जगविख्यात शास्त्रज्ञाने विजेच़ा बल्ब, फिल्म, फोनोग्राफ, ग्रॅहॅमचा, फोनमधील सुधारणा वगैरे अनेक शोध लावून जगावर उपकाराचे डोंगर उभारले.


त्यांनी लगेचच त्यांना भेटण्यासाठी अपॉइंटमेंट घेतली. त्यांच्या प्रयोगशाळेतच ते दोघे भेटले. ती प्रयोगशाळा पाहून प्रोफेसर थक्क झाले. ते म्हणाले "वा , काय प्रयोगशाळा आहे तुमची , खरंच तुम्ही फार मोठे आहात , किती दिवस लागले हो हे सगळं करायला ?" त्यावर एडिसन म्हणाले "छे हो, हे मी काहीच केलेलं नाही. सगळे आधीच तयार होते मी फक्त इथे येऊन प्रयोग केले."


त्यावर प्रोफेसर म्हणाले, "माझी चेष्टा करताय काय, असं आपोआप काही तयार होतं होय ?" त्यावर एडिसन हसले व म्हणाले "अहो ही एवढीशी माझी प्रयोगशाळा आपोआप आली असं म्हटलेलं तुम्हाला पटलं नाही ना , मग हे ""ब्रह्मांड"" आपोआपच निर्माण झालं हे मला कसं पटेल.


         प्रख्यात शास्त्रज्ञ एडिसन यानी एक सिद्धांत मांडला आहे , ते म्हणतात "Where there is a creation there should be a creator ,Without a creator there is no creation so god exists."


 जिथे निर्मिती असते तिच्या मागे निर्माता असतोच. निर्मात्या शिवाय निर्मिती असूच शकत नाही. म्हणजेच "देव" अस्तित्वात आहे.

******

योग्य निवड  ✨

दुर्गम भागात फिरताना तीन साधुना एक झोपडी दिसते, ते झोपडीचा दरवाजा वाजवतात. घरातील महिला त्यांच्याकडे विचारणा करते,"आपण कोण आहात? आणि आपल्याला काय हवे आहे?" ते म्हणतात,"आम्ही तिघे भुकेले आहोत, अन्नाची काही व्यवस्था करा." 

झोपडी बाहेरील झाडाखाली विश्रांती करण्याची विनंती करत महिला पुन्हा घरात गेली, काही काळानंतर बाहेर येत ती तिन्ही साधूना जेवणासाठी आमंत्रित करते. तेंव्हा साधू म्हणतात," आमच्यापैकी केवळ एकचजण फक्त तुझ्या घरात प्रवेश करू शकतो." 
महिला आश्चर्यचकित होते व विचारते," असे का? भूक तिघानाही लागली आहे. पण येणार मात्र एकचजण?"
साधू म्हणतात," हा आमच्यातील करार आहे. आमच्यातील एक "वैभव" आहे. तर दुसरा "यश" आणि तिसरा "प्रेम". आता तू ठरव कि आमच्यातील कोणाला आत बोलवायचे?"

महिला गोंधळून जाते. ती पुन्हा घरात जाते, नवऱ्याशी चर्चा करते आणि बाहेर येते व "प्रेम" नावाच्या साधूला जेवणासाठी निमंत्रण देते. प्रेम घरात येताच त्याच्या पाठोपाठ "वैभव" आणि "यश" साधू पण जेवणासाठी घरात येतात.
 महिला पुन्हा गोंधळून जाते, तेंव्हा साधू म्हणतात," मुली ! तू प्रेम मागितले, त्या पाठोपाठ यश आणि वैभव तुझ्या घरात प्रवेशकर्ते झाले, पण तू वैभव किंवा यश यांना जर पाचारण केले असते तर आमच्यातील दोघे उपाशी राहिले असते." 
महिलेने तिघांचे यथायोग्य स्वागत करून
त्यांचे आदरातिथ्य केले.

🔅तात्पर्य :~

प्रेमापाठोपाठ यश आणि वैभव
आयुष्यात व घरात येत असते.


*****


आपल्या मनासारखे वागावे का दुसऱ्याच्या मनासारखे ? हे समजवणारी सुंदर अशी बोधकथा

बायकोनं घरात मांजर पाळलेलं. तिचं ते खूप लाडकं. ती जेवायला बसली की तिलाही घेवून बसायची. एका वाटीत दूध भाकर कुस्करुन द्यायची. 

पण नवऱ्याला ते मांजर अजिबात आवडायचं नाही. उघडं दिसेल त्या भांड्यात तोंड घालायची त्याला सवय. त्याचा त्याला प्रचंड राग यायचा... 

एकदा नवरा जेवायला बसलेला, आणि नेमकं मांजराने त्याच्या ताटात तोंड घातलं. नवरा चिडला आणि रागारागाने शेजारी असलेला पाटा त्याच्या डोक्यात घातला.  

घाव वर्मी बसल्याने मांजर बराच वेळ निपचित पडून राहीलं. 'मेलं की काय' अशी शंका येत असतांनाच ते अंग झटकून उठून बसलं. 

त्याने हळूच नवऱ्याकडे हसून बघीतलं, आणि चक्क 'शॉरी यार, मी मघाशी तुझ्या ताटात तोंड घातलं. क्या करे आदत से मजबूर हूँ, पुन्हा नाही असं करणार..' असं माणसासारखं बोललं. नवरा वेडा व्हायचाच बाकी..!

त्यानंतर मांजर नम्र आणि आज्ञाधारक झालं. ताटात तोंड घालणे तर सोडाच, दारातला पेपर आणून दे, टी पॉय वरचा चष्मा आणून दे...  अशी बारीकसारीक कामं ते करू लागलं.

मग काय, नवऱ्याची आणि त्याची छान गट्टी जमली. ऑफिसमधून येताच मांजर दिसलं नाही की तो अस्वस्थ व्हायचा. 'अग मन्या दिसत नाही गं कुठं ?' बायकोला सतत विचारत राहायचा.

असेच काही दिवस गेल्यावर एकेदिवशी सोसायटीच्या गेटसमोर बेवारस कुत्री आणि मांजरं पकडून नेणारी महापालिकेची व्हॅन येऊन थांबली. 

मन्याने खिडकीतून ती व्हॅन बघितली. त्याच्या मनात काय आलं कोण जाणे, पण धावत जावून तो व्हॅन मधे बसला. 

नवऱ्याने हे बघितले.  हातातला पेपर पटकन बाजूला टाकून तो मन्यामागे धावला. मन्या व्हॅनमध्ये निवांत बसलेला.

नवरा म्हणाला, "मन्या, अरे इथं गाडीत का बसलायस? ही गाडी बेवारस मांजरासाठी आहे. तुझ्यासाठी नाही."

"मला माहितेय..! पण मला जायचंय आता." मन्या शांतपणे बोलला.

"मन्या, अरे असं काय करतोस? तू किती लाडका आहेस आम्हा दोघांचाही.  माझं तर पानही हालत नाही तुझ्याशिवाय. तू क्षणभर नजरेआड गेलास तरी मला करमत नाही. मी इतकं प्रेम करतो तुझ्यावर आणि तू खुशाल मला सोडून निघालास ? ए प्लिज, प्लिज उतर रे आता." काकुळतीला येवून नवरा बोलला.

मन्या गोड हसला, आणि बोलला, "तू माझ्यावर प्रेम करतोस? माझ्यावर?"

"म्हणजे काय शंकाय का तुला?"

"मित्रा, अरे मी जेंव्हा माझ्या मनासारखं वागत होतो, हवं तिथं हवं तेंव्हा तोंड घालत होतो, तेंव्हा मी तुझा नावडता होतो. सतत रागवायचास माझ्यावर. अगदी माझ्या जीवावर उठला होतास तू एकदा. 

पण जेंव्हा मी तुझ्या मनासारखं वागू लागलो,  तुला हवं तसं करू लागलो.... तेंव्हा तुला आवडू लागलो. तू माझ्यावर प्रेम करू लागलास, यात नवल ते काय?" 

      नॉट सो स्ट्रेंज यार...!!

वपुंची ही कथा खूप काही सांगून जाते......

जेंव्हा आपण एखाद्यावर प्रेम करतो, तेंव्हा ते खरंच त्याला बरं वाटावं म्हणून, की स्वतःला बरं वाटावं म्हणून करतो ?

      समोरचा जो पर्यंत आपल्या मनासारखं वागत असतो, तोपर्यंत त्याच्यावर आपलं प्रचंड प्रेम असतं. कारण त्याचं वागणं आपल्याला सुखावणारं असतं. 

     पण जेंव्हा तो आपलं ऐकत नाही, आपल्याला हवं तसं वागत नाही, तेंव्हा त्याचं आपल्या सोबत असणंही आता नकोसं वाटतं. त्याला टाळत राहतो.

      भेटलाच कधी तर त्याच्यावर चिडतो, रागावतो. त्यानं नाहीच ऐकलं की मग वर्मी घाव घालून नातंच संपवून टाकतो. ज्याच्यावर जीवापाड प्रेम असतं, त्याला क्षणात परकं करून टाकतो.

     आश्चर्य आहे ? का वागतो असं आपण ? त्याच्यावर खरंच आपलं प्रेम असतं की निव्वळ time pass म्हणून केलेली खोटी भावनिक गुंतवणूक?

      आपल्या मनासारखं वागणाऱ्या माणसावर कुणीही प्रेम करतं.

      अवघड असतं त्याच्यावर प्रेम करणं, त्याला समजून घेणं, जेंव्हा तो आपल्या मनासारखं वागत नसतो..!!

©️ व.पु.काळे

0000




      ╭════════════╮

            ▌ 🎨❝बोध कथा❞🎨 ▌

            ╰════════════╯



देव आणि राक्षस यांचे वडील प्रजापती, एक दिवस देव आणि राक्षस मिळून प्रजापतीकडे गेले आणि त्यांना विचारले, आमच्यात मोठे कोण ? प्रजापतीने सांगितले कि तुम्ही सारे आज माझ्याकडे जेवायला थांबा. जेवण झाले कि... तुमच्या प्रश्नाचे उत्तर देतो. 


 देव ३३ कोटी... राक्षसही कितीतरी कोटी ! त्यामुळे प्रजापतीने सुचवले कि आपण दोन पंगती करू... या राक्षसांना प्रत्येक गोष्टीची घाई... ते म्हणाले, " पहिल्या पंगतीला आम्ही येणार " प्रजापतीने सगळी तयारी केली. पाने मांडली,वाढून तयार झाली. 


राक्षस घाईघाईने आले. प्रजापती दुरून पहात होते. राक्षसांनी जेवायला येण्यापूर्वी हातपाय स्वच्छ धुतले नाहीत. सगळे राक्षस पंगतीत बसेपर्यंतही आधी आले त्यांना दम नव्हता. त्यांनी लगेच जेवायला सुरवातही केली. 


तेव्हा प्रजापतीने एक मंत्र म्हटला त्याबरोबर राक्षसांचे हात कोपरात ताठ होऊन गेले. पानातला घास तर उचलला... पण कोपरात हात वाकेना... त्यामुळे घास तोंडात जाईना. तासभर प्रयत्न केला तरी राक्षस उपाशीच राहिले. पंगत संपली.


प्रजापतीने लगोलग दुसऱ्या पंगतीची तयारी केली. देव स्वच्छ हातपाय धुवून आले. गोंधळ न करता शिस्तीत पानांवर बसले. त्यांनी सामूहिक भोजनमंत्र म्हटला. जेवायला सुरवात करणार तेवढ्यात प्रजापतीने पुन्हा त्याच मंत्राचा प्रयोग केला. देवांचेही हात कोपरात ताठ झाले... घास तोंडात घालताच येईना... देवांनी इकडे तिकडे पाहिले... सर्वांचीच तशी अडचण होती. 


तेव्हा देवांनी एक युक्ती केली. प्रत्येकाने आपल्या शेजारच्या देवाला भरवालयास सुरवात केली. स्वतःच्या तोंडात हात पोचत नव्हता तरी तो शेजारच्याच्या तोंडापर्यंत जात होता. काहीच सांडलवंड झाली नाही.सर्वांचे जेवण अगदी व्यवस्थित झाले. 


सगळे जण नंतर प्रजापतीकडे आले व म्हणाले, “आमच्यात मोठे कोण ?"

प्रजापतीने सांगितले कि, "मोठेपण हे दिसण्यावरून ठरत नाही तर कृतीरून ठरते. जेवताना जे काही घडले त्यावरून आपले आपणच सिध्द झाले आहे कि श्रेष्ठ कोण ? "


🔅तात्पर्य :~


जो फक्त स्वतःचे पोट भरण्याचा विचार करतो, तो स्वतःही उपाशीच राहतो व दुसऱ्याच्याही कामी येत नाही. हेच राक्षसांच्या बाबतीत घडले. देवांनी एकमेकांची काळजी घेतली. त्यामुळे सगळेच संतुष्ट झाले. फक्त आपल्या स्वार्थाचा विचार करणाऱ्यांपेक्षा संपूर्ण समाजाच्या हिताचा जे विचार करतात तेच श्रेष्ठ !


0000




               ▌ ❝बोध कथा❞  ▌

      

देवर्षी नारद हे भगवान विष्णूंचे परमभक्त... ते सदैव नामस्मरण करीत असत. एकदा त्यांच्या मनात आले कि मी सदैव देवाचे नामस्मरण करतो त्याअर्थी सर्वश्रेष्ठ भक्त मीच असणार... ही गोष्ट देवापासून कशी लपणार ? 


एकदा देवानेच नारदांना विचारले , "माझा सर्व श्रेष्ठ भक्त कोण ?"

नारद म्हणाले " मीच " 

देवाने सांगितले कि , " नाही, पृथ्वीवरच्या एका छोट्या गावात एक शेतकरी आहे तो तुझ्यापेक्षाही श्रेष्ठ भक्त आहे. "


नारदाला आश्चर्य वाटले. ते गुप्तरूपाने त्या गावात येऊन शेतकऱ्याच्या  साऱ्या दिनक्रमाचे निरिक्षण करू लागले. तो शेतकरी पहाटे लवकर उठे , आंघोळ करून नदीकाठच्या देवळात जाई. देवाला दोन फुले वाहून येई , मग दिवसभर तो कामात मग्न असे. पाणी भरणे, अंगण झाडून काढणे, तुळशीला पाणी घालणे, बैलांना चारा पाणी करणे, गोठ्याची स्वच्छता करणे मग बायकोने केलेली भाकरी बांधून घेऊन शेतात जाई व दिवसभर कष्ट करी... संध्याकाळी घरी आल्यावर सुध्दा त्याचे काही न काही काम चालतच असे. पण हे सगळे काम करताना तोंडाने नामस्मरण करत असे. 


ते पाहून नारद भगवान विष्णूंकडे जाऊन म्हणाले कि, " तुमचे म्हणणे काही खरे वाटत नाही. तो शेतकरी नामस्मरण करतो खरा, पण त्याचे सारे लक्ष दिवसभरातल्या घरच्या कामांतच असते."

देवाने नारदास म्हटले कि, " तुझ्या प्रश्नाचे मी नंतर उत्तर देतो. आधी एक काम कर ही तेलाने काठोकाठ भरलेली वाटी भगवान शंकराकडे नेऊन दे. पण लक्ष दे कि थेंबभर सुध्दा तेल सांडता कामा नये. "


सदरचे काम काही नारदऋषींना अवघड वाटले नाही. ते तेलाची वाटी शंकराकडे पोचवून आले. आल्याबरोबर देवाला सांगितले , कि, " एक थेंब सुध्दा सांडलेला नाही. "

देवाने विचारले, " पण जाता येता माझे नामस्मरण केले कि नाही ?"

 नारद म्हणाले, " हे कसे शक्य होते ? माझे सगळे लक्ष त्या तेलाकडे होते . थोडे जरी दुर्लक्ष्य झाले असते तर सांडले असते ना ! " 


देवाने विचारले , " मग आता तूच सांग, रात्रदिवस घरातली सगळी कामे करत राहूनही तो माझे नामस्मरण चुकत नाही... तू मात्र छोटेसे काम करताना मला विसरलास. तर श्रेष्ठ भक्त कोण ?" 


🔅तात्पर्य :~


देव कधीही कामधंदा सोडून आपली भक्ती करायला सांगत नाही, कर्म करत राहून फक्त नाम स्मरणातून परमार्थ साधता येतो.

0000


=======================

आत्मज्ञानापुढे मृत्यूला परतवून लावणा-या
सिद्धीचीही किंमत शून्य असते. 

========================

चांगदेव सिद्धींच्या बळावर १४०० वर्षे जगले होते. त्यांनी मृत्यूला ४२ वेळा परतवून लावले होते. त्यामुळे प्रतिष्ठेचाही मोह होता. त्यांनी एकदा संत ज्ञानेश्वरांची कीर्ती ऐकली. संत ज्ञानेश्वरांना सगळीकडे मान मिळत होता. 

चांगदेव ज्ञानेश्वरांचा मत्सर करू लागले. चांगदेवांना वाटले, ज्ञानेश्वरांना पत्र लिहावे; परंतु पत्राचा आरंभ कसा करावा, हे त्यांना कळेना; कारण ज्ञानेश्वरांचे वय अवघे सोळा वर्षे होते, मग पूज्य म्हणून कसे लिहिणार ? चिरंजीव लिहावे, तर ज्ञानेश्वर महात्मा होते. काय लिहावे काहीच समजेना; म्हणून त्यांनी कोरेच पत्र पाठवले.

संतांची भाषा संतच जाणतात. मुक्ताबाईंनी पत्राला उत्तर दिले, १४०० वर्षे तुझे वय झाले; पण तू तुझ्या पत्रासारखा कोराच राहिलास ! हे वाचून चांगदेवांना वाटले की, अशा ज्ञानी पुरुषांची भेट घ्यावी. चांगदेवांना सिद्धीचा गर्व होता. ते वाघावर बसून आणि सर्पाचा लगाम घेऊन भेटायला निघाले. ज्ञानेश्वरांना समजले की, चांगदेव भेटायला येत आहेत. त्यांचे आदरातिथ्य त्यांना सामोरे जाऊन केले पाहिजे, असे त्यांना वाटले. त्या वेळी ज्ञानेश्वर ज्या भिंतीवर बसले होते, त्या भिंतीलाच त्यांनी चालण्याचा आदेश दिला. भिंत पुढे जाऊ लागली. हे चांगदेवांनी पाहिले आणि त्यांना पटले की, आपल्यापेक्षाही ज्ञानेश्वर श्रेष्ठ आहेत; कारण त्यांचा निर्जीव वस्तूंवरही अधिकार आहे. आपला केवळ प्राण्यांवरच अधिकार आहे. त्या क्षणीच चांगदेव ज्ञानेश्वरांचे शिष्य बनले.

🔅तात्पर्य :~

सिद्धींचा वापर हा आत्मज्ञान मिळवण्याच्या मार्गावरील अडथळा आहे.
00

सुख ~ दु:ख
〰️〰️〰️

एका शिष्याने एके दिवशी गुरुदेवास विचारले
" गुरुजी माझ्याच आयुष्यात पावलोपावली दुख का...?" 
त्यावेळेस गुरुजीने त्या शिष्यास एक पेला पाणी आणि दोन चमचे मीठ आणावयास सांगितले.

गुरुजींच्या आज्ञेप्रमाणे त्या शिष्याने ते संपूर्ण मीठ पेल्यामध्ये टाकून एका चमच्याने विरघळवले. त्यानंतर गुरुजींनी तो संपूर्ण पेला शिष्याला प्यायवयास लावला आणि विचारले,
"पाण्याची चव कशी वाटली ? 
तेव्हा शिष्य म्हणाला, 
"अतिशय खारट".

त्यानंतर गुरुजी त्या शिष्याला घेऊन मोठ्या तळ्याकडे गेले... सोबत आणलेले दोन चमचे मीठ त्यांनी तळ्यात टाकावयास सांगितले... आणि पुन्हा तळ्याचे पाणी प्यावयास सांगितले व नंतर विचारले पाणी कसे वाटले?

शिष्याकडून ऊत्तर आले... अतिशय मधुर.
गुरुजींनी विचारले, "मीठ तळ्यात पण टाकलेस ते खारट वाटले नाही. पण... पेल्यामध्ये मात्र खारट वाटले दुःखाचे पण तसेच आहे. मन जर पेल्यासारखे लहान असेल तर दुःखाने हुंदके येतात व माणूस त्रस्त होतो. पण.... मन विशाल तळ्यासारखे असेल तर दुःखाचा सुतराम ही परीणाम होत नाही."

🔅तात्पर्य :~

विशाल मनाने जगा... मनाची संकुचीत अवस्था टाकून द्या... जगात प्रत्येकालाच दुःख आणि यातना आहेत कुणीही सुखी नाही... पण काही पेल्यासारखे लहान मन करुन जगतात ते  सदैव दुःखीच असतात आणि काही विशाल मन असणाऱ्यावर दुःखाचा सुतराम परीणाम होत नाही... !!


त्याग, सेवा व भक्ती
➖➖➖➖➖

रावणाचा वध करून राम अयोध्येला परत आले आणि त्यांचा राज्यााभिषेक झाला तेंव्हा एक दिवस एका सभासदाने भरताला विचारले की, "आपण रामासाठी इतका मोठा त्याग केला आणि रामही आपल्याला प्राणप्रिय समजतात मग असे काय कारण आहे की... आपणाला सर्वात मागे स्थान देण्यात आले आहे ?"

तेंव्हा भरत म्हणाले, '' जे झाड कडू असेल त्याची सर्व पाने, फळे व फुले कडू असतात, माझ्या मातेने रामाला वनवासाला पाठवून पाप केले होते. तिचा पुत्र असल्यामुळे त्या पापाच्या् कडवटपणातून मी कसा अलिप्त राहू शकतो? त्या‍मुळे मला मागचे स्थान देण्यात आले आहे.'' 

जेव्हा  सभासदाने रामाला भरताचे हे विचार सांगितले तेंव्हा रामचंद्र म्हणाले, ''भरताचे हे विचार ठीक नाहीत, अयोध्येाला परतल्यावर मी भरताला म्हटले होते की, उद्यापासून तू माझे छत्र घेऊन माझ्या मागे उभा राहा. कोणीही राजा तोपर्यतच राजा राहू शकतो जोपर्यत त्याचे छत्र सुरक्षित आहे.'' 

सभासद आता विचारात पडला की कोणाचे विचार खरे मानावे? त्याने परत जाऊन भरताला रामाचे विचार ऐकवले. भरत म्हणाले, ''रामचंद्र तर आपल्या लहानातल्या लहान सेवकांचेही प्रशंसा करत असतात. खरे तेच आहे जे मी तुम्हाला सांगितले.''

सभासद गोंधळला त्याने रामाला पुन्हा् जाऊन भरताचे विचार सांगितले तेव्हा रामचंद्र म्हणाले,'' प्रेम आणि त्यागाच्या युद्धात मी भरताकडून हरलो, मी आपला पराभव स्वीेकारून त्या‍ला पाठ दाखविली, त्यामुळे तो पाठीमागे आहे. त्याचे मागे होणे हे त्याच्यातल्या महानतेचे लक्षण आहे.


🔅 तात्पर्य :~

त्याग, सेवा आणि भक्ती ही तीन सूत्रे
धरतीवर रामराज्य‍ साकार करू शकतात.

00

त्यागाचे महत्व
  ➖➖➖

फार वर्षापूर्वी एक स्‍वाभिमानी राजा होऊन गेला. त्‍याचे राज्‍य मोठे होते आणि अपार संपत्तीने खजिना भरलेला होता. त्‍याचे महाल सोन्‍यापासून बनलेले होते. नोकरचाकरांची रेलचेल होती. मात्र त्‍याचे सल्‍लागार त्‍याच्‍या अहंकाराला प्रोत्‍साहन देत होते.

एकदा त्‍याच्‍या दरबारात एक तेज:पुंज साधू आला. राजाला पाहूनच त्‍याने ओळखले की... राजाला फार गर्व चढला आहे. राजाने मोठ्या तो-यात साधूला विचारले, ''तुला काय पाहिजे?''
साधू म्‍हणाला, '' राजन, मला तुझ्याकडून काहीच नको आहे. उलट मीच तुला काहीतरी देण्‍यास आलो आहे.'' 
हे ऐकून राजाचा अहंकार दुखावला व तो मोठ्याने ओरडला, ''लहान तोंडी मोठा घास घेतोस. लाज वाटते का नाही. तुझ्याजवळ फुटकी कवडी नाही अन तू मला काय देणार?''

साधू मंद स्मित करत म्‍हणाला, ''राजन, त्‍यागाशिवाय भोगाला चव येत नाही. वैभवात जेव्‍हा त्‍याग समाविष्‍ट होते तेव्‍हा तो वंदनीय आणि प्रशंसनीय ठरतो. त्‍याग येताच अहंकार दूर होतो. आसक्ती दूर होते आणि मन परमात्‍म्‍याकडे पोहोचण्‍यासाठी तयार होते.'' 
साधूचे बोल ऐकून राजा खजील आला. त्‍याचे डोळे उघडले आणि त्‍याने गर्वाचा त्‍याग केला.


🔅 तात्‍पर्य :~

त्‍यागाने अहंकाराचा नाश होतो. अहंकार हा मनुष्‍याचे नुकसान करतो.


000

बोधकथा
〰️〰️〰️

एक कुंभार मातीची चिलीम बनवित होता. चिलीमचा आकार सुध्दा केला होता ! पण थोड्याच वेळात त्याने तो आकार बदलला. 

मातीने विचारले, "अरे कुंभार दादा, तु छान चिलीम बनविली होतीस. मग का परत बदल केला ?"

कुंभार म्हणाला, "मी चिलीम बनवत असताना माझी मती बदलली आणि घागर बनविण्याचा निर्णय घेतला !"

माती म्हणाली, "कुंभार दादा, तुमची मती बदलल्या मुळे, माझे जीवन बदलले ! मी चिलीम झाले असते तर मी ही जळाले असते आणि दुसऱ्यांना ही जाळले असते ! आता मी घागर झाल्यावर मी ही शीतल राहिल आणि इतरांना ही शीतलता देइल !"

🔅तात्पर्य :~

 जीवनात सुयोग्य निर्णय घेतल्यास, आपल्याला ही आनंद मिळतो आणि आपल्या मुळे इतरांना ही आनंद मिळतो !


***


योग्य वेळ + योग्य निर्णय = जीवन

एका कॉलेजमध्ये फिलॉसफीचे एक प्रोफेसर वेगवेगळ्या पध्दतींने विद्यार्थ्यांना आयुष्यातील लहान-लहान गोष्टी समजावून शिकवायचे. एक दिवस प्रोफेसरने आपल्या सर्व विद्यार्थ्यांना बोलावले आणि म्हणाले की, आज मी तुम्हाला एक खुप महत्त्वपुर्ण गोष्ट समजावणार आहे.

सर्व विद्यार्थी लक्षपुर्वक प्रोफेसरचे ऐकत होते. प्रोफेसरने पाण्याने भरलेले एक भांडे घेतले आणि त्यामध्ये एक बेडूक टाकला. पाण्यात जाताच बेडूक आरामात पोहू लागला. यानंतर प्रोफेसरने ते भांडे तापायला ठेवले.

भांड्यातील पाणी हळुहळू गरम होत होते. भांड्यामध्ये जो बेडूक होता तो पाण्याच्या वाढत्या तापमानानुसार स्वतःला अडजस्ट करत होता. हळुहळू पाणी जास्त गरम होत होते पण बेडकाला काहीच फरक पडत नव्हता. तो स्वतःला तापमानानुसार तयार करत होता.

काही वेळानंतर पाण्याचे तापमान वाढले आणि पाणी उकळू लागले. तेव्हा बेडकाचीही सहनशक्ती संपली. त्याला त्या भांड्यात थांबणे कठीण झाले. तेव्हा बेडकाने उडी मारुन भांड्याबाहेर येण्याचा प्रयत्न केला. पुर्ण शक्ती लावूनही त्याला त्या भांड्यातून बाहेर पडता आले नाही.

 प्रोफेसरांनी तात्काळ त्या बेडकाला बाहेर काढले आणि विद्यार्थ्यांना विचारले की, बेडूक भांड्याबाहेर उडी का मारु शकला नाही ?

सर्वांनी वेगवेगळे उत्तर दिले. तेव्हा प्रोफेसर म्हणाले - बेडूकाची इच्छा असती तर तो मी पाणी तापायला ठेवल्याबरोर बाहेर येऊ शकत होता. पण बेडूक स्वतःला वातावरणानुसार अडजस्ट करण्याचा प्रयत्न करत होता, जेवढे तो सहन करु शकत होता तेवढे त्याने केले. पण जेव्हा त्याला वाटले की, जीव वाचवण्यासाठी बाहेर पडावेच लागेल, तेव्हा तो उडी मारु शकला नाही, कारण त्याने अडजस्ट होण्याच्या प्रयत्नात त्याची सर्व एनर्जी नष्ट झाली होती. जर मी त्याला बाहेर काढले नसते, तर बेडूक मरुन गेला असता.

🔅 तात्पर्य :-

योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची कला म्हणजेच जीवन.

00

▌☣ बोधकथा ☣ ▌


          ♦️ भगवंताचे अस्तिव ♦️

             
  थॉमस अल्व्हा एडिसन एकदा रेल्वेने प्रवास करीत होते, त्यांच्या समोर एक मोठे प्रोफेसर बसले होते. एडिसन बायबल वाचत होते , ते प्रोफेसर नास्तिक होते. त्यामुळे ते एडिसन यांना म्हणाले "अहो तुम्ही चांगल्या घरातील दिसता , वय पण तरूण आहे मग देव देव करण्यापेक्षा काहीतरी चांगलं कार्य करा आणि समाजात नाव कमवा , हे बायबल वाचून काय होणार ?" 

हे ऐकून एडिसननी गपचूप बायबल आपल्या पिशवीत घातले. त्या प्रोफेसरनी आपलं कार्ड एडिसनना दिले व सांगितले की काही काम हवं असेल तर मला कॉन्टॅक्ट करा. एडिसन चे स्टेशन आल्यावर ते उतरू लागले असता एडिसननी सुद्धा आपले कार्ड त्यांना दिले व ते उतरले. त्यानंतर ते प्रोफेसर सुद्धा आपल्या घरी पोहचले.
                             
आठवड्याचे कपडे धुवायला काढताना त्या प्रोफेसरना ते कार्ड सापडले , त्या दिवशी त्यांनी ते गडबडीत आपल्या खिश्यात टाकले होते , आज ते कार्ड बघून ते अचंबित झाले. आपण एका महान शास्त्रज्ञा समोर होतो आणि आपल्याला कळलंच नाही आणि आपण काय बोललो या बद्दल त्यांना अपराधी वाटू लागले. या जगविख्यात शास्त्रज्ञाने विजेच़ा बल्ब, फिल्म, फोनोग्राफ, ग्रॅहॅमचा, फोनमधील सुधारणा वगैरे अनेक शोध लावून जगावर उपकाराचे डोंगर उभारले.

त्यांनी लगेचच त्यांना भेटण्यासाठी अपॉइंटमेंट घेतली. त्यांच्या प्रयोगशाळेतच ते दोघे भेटले. ती प्रयोगशाळा पाहून प्रोफेसर थक्क झाले. ते म्हणाले "वा , काय प्रयोगशाळा आहे तुमची , खरंच तुम्ही फार मोठे आहात , किती दिवस लागले हो हे सगळं करायला ?" त्यावर एडिसन म्हणाले "छे हो, हे मी काहीच केलेलं नाही. सगळे आधीच तयार होते मी फक्त इथे येऊन प्रयोग केले."

त्यावर प्रोफेसर म्हणाले, "माझी चेष्टा करताय काय, असं आपोआप काही तयार होतं होय ?" त्यावर एडिसन हसले व म्हणाले "अहो ही एवढीशी माझी प्रयोगशाळा आपोआप आली असं म्हटलेलं तुम्हाला पटलं नाही ना , मग हे ""ब्रह्मांड"" आपोआपच निर्माण झालं हे मला कसं पटेल.

         प्रख्यात शास्त्रज्ञ एडिसन यानी एक सिद्धांत मांडला आहे , ते म्हणतात "Where there is a creation there should be a creator ,Without a creator there is no creation so god exists."

 जिथे निर्मिती असते तिच्या मागे निर्माता असतोच. निर्मात्या शिवाय निर्मिती असूच शकत नाही. म्हणजेच "देव" अस्तित्वात आहे.
00

स्वप्न आणि सत्य ~

एकदा स्व‍प्न‍ आणि सत्य यांचे जोरदार भांडण झाले. भांडणाचा विषय होता... ’भविष्य  घडविण्याात सर्वाधिक सहभाग कोणाचा असतो’ दोघेही खूप भांडले, भरपूर वाद घातला पण निर्णय काही होईना. 

शेवटी दोघेही आपल्या पित्याकडे गेले. पित्याला वादाचा विषय सांगितला. पिता म्हणाला,’’ज्याचे कोणाचे हात आभाळाला टेकतील पण तरीही पाय जमिनीवर असतील त्याचा भविष्य घडविण्यात निर्णायक सहभाग असतो.’’ 

दोघेही परत आले. सर्वप्रथम स्वप्नाने एकाच उडीत हात आभाळाला टेकवले, मात्र पाय जमिनीपासून केव्हाच उचलले गेले होते. 
मग सत्याने प्रयत्न केला मात्र त्यााचे पाय कायम जमिनीवर टेकलेले होते पण हात आभाळाला पोहोचू शकले नाहीत.

दोघांनीही खूप प्रयत्न केले पण दोघेही अयशस्वी‍ राहिले. शेवटी थकून ते पुन्हा एकदा पित्याकडे गेले तेव्हा पिता म्हणाला,’’ भविष्य घडविण्यासाठी सत्य आणि स्वप्न या दोघांचाही समान सहभाग असतो.’’


🔅तात्पर्य ~

ख-या अर्थाने भविष्य घडवायचे असेल तर स्वप्नाला सत्याच्या खांद्यावर उभे राहायला हवे.


+++++


खरं दु:ख

एक सोनार होता. त्याच्या दुकानासमोरच एका लोहाराचे दुकान होते. सोनार जेव्हा काम करत असे तेंव्हा सोनाराच्या दुकानातून हळू आवाज होत असे. पण जेंव्हा लोहार काम करत असे तेंव्हा मात्र लोखंडाचे काम होत असल्याने मोठा आवाज होत असे. तो आवाज मोठा कर्णकर्कश असे. 

एके दिवशी सोनाराच्या दुकानातील एक सोन्याचा कण कसा कोण जाणे पण लोहाराच्या दुकानात जावून पडला. त्या सोन्याच्या कणाची भेट एका लोखंडाच्या कणाशी झाली. खूप दिवसांची ओळख असल्यासारखे ते एकमेकांशी बोलू लागले.

सोन्याच्या कणाने लोखंडाच्या कणाला म्हंटले, "दादा, आपले दुःख तर खरे एकसमान आहे. दोघानाही आगीत तापवले जाते आणि हातोड्याने ठोकले जाते. मी तर बाबा चुपचाप हे सहन करतो, पण तुझे काय?"

लोखंडाचा कण सोन्याच्या कणाकडे पाहून दुःखी स्वरात म्हणाला, "अरे ! तुझे म्हणणे अगदी बरोबर आहे. दोघानाही तापवणारी आग एकच आहे आणि ठोकणारा हातोडाहि एकाच धातूचा आहे. पण खरे दुःख याचे आहे कि तुला ठोकणारा हातोडा हा तुझा कोणीच लागत नाही पण मला ठोकणारा लोखंडाचा हातोडा हा नात्याने माझा भाऊच लागतो. दुसऱ्याने दिलेल्या दुःखापेक्षा स्वकीयांनी दिलेला त्रास हा अगदी हृदयात वार करून जातो."

🔅तात्पर्य :~

आपल्या माणसांकडून होणारा त्रास हा कायमच दुःखदायक वाटतो.


00000बोधकथा ☣ ▌


          ♦️ भगवंताचे अस्तिव ♦️

             
  थॉमस अल्व्हा एडिसन एकदा रेल्वेने प्रवास करीत होते, त्यांच्या समोर एक मोठे प्रोफेसर बसले होते. एडिसन बायबल वाचत होते , ते प्रोफेसर नास्तिक होते. त्यामुळे ते एडिसन यांना म्हणाले "अहो तुम्ही चांगल्या घरातील दिसता , वय पण तरूण आहे मग देव देव करण्यापेक्षा काहीतरी चांगलं कार्य करा आणि समाजात नाव कमवा , हे बायबल वाचून काय होणार ?" 

हे ऐकून एडिसननी गपचूप बायबल आपल्या पिशवीत घातले. त्या प्रोफेसरनी आपलं कार्ड एडिसनना दिले व सांगितले की काही काम हवं असेल तर मला कॉन्टॅक्ट करा. एडिसन चे स्टेशन आल्यावर ते उतरू लागले असता एडिसननी सुद्धा आपले कार्ड त्यांना दिले व ते उतरले. त्यानंतर ते प्रोफेसर सुद्धा आपल्या घरी पोहचले.
                             
आठवड्याचे कपडे धुवायला काढताना त्या प्रोफेसरना ते कार्ड सापडले , त्या दिवशी त्यांनी ते गडबडीत आपल्या खिश्यात टाकले होते , आज ते कार्ड बघून ते अचंबित झाले. आपण एका महान शास्त्रज्ञा समोर होतो आणि आपल्याला कळलंच नाही आणि आपण काय बोललो या बद्दल त्यांना अपराधी वाटू लागले. या जगविख्यात शास्त्रज्ञाने विजेच़ा बल्ब, फिल्म, फोनोग्राफ, ग्रॅहॅमचा, फोनमधील सुधारणा वगैरे अनेक शोध लावून जगावर उपकाराचे डोंगर उभारले.

त्यांनी लगेचच त्यांना भेटण्यासाठी अपॉइंटमेंट घेतली. त्यांच्या प्रयोगशाळेतच ते दोघे भेटले. ती प्रयोगशाळा पाहून प्रोफेसर थक्क झाले. ते म्हणाले "वा , काय प्रयोगशाळा आहे तुमची , खरंच तुम्ही फार मोठे आहात , किती दिवस लागले हो हे सगळं करायला ?" त्यावर एडिसन म्हणाले "छे हो, हे मी काहीच केलेलं नाही. सगळे आधीच तयार होते मी फक्त इथे येऊन प्रयोग केले."

त्यावर प्रोफेसर म्हणाले, "माझी चेष्टा करताय काय, असं आपोआप काही तयार होतं होय ?" त्यावर एडिसन हसले व म्हणाले "अहो ही एवढीशी माझी प्रयोगशाळा आपोआप आली असं म्हटलेलं तुम्हाला पटलं नाही ना , मग हे ""ब्रह्मांड"" आपोआपच निर्माण झालं हे मला कसं पटेल.

         प्रख्यात शास्त्रज्ञ एडिसन यानी एक सिद्धांत मांडला आहे , ते म्हणतात "Where there is a creation there should be a creator ,Without a creator there is no creation so god exists."

 जिथे निर्मिती असते तिच्या मागे निर्माता असतोच. निर्मात्या शिवाय निर्मिती असूच शकत नाही. म्हणजेच "देव" अस्तित्वात आहे.

******************

गोरा ढग आणि काळा ढग बोधकथा 

🌹बोधकथा 🌹
एकदा आभाळात दोन ढगांची भेट झाली . काळा ढग पाण्याने जड झाला होता . तो हळूहळू जमिनीकडे उतरत येत होता . गोरा ढग अगदी हलका होता . तो उंच आभाळात चढत होता . भेट झाल्यावर गोऱ्या ढगाने काळ्याला विचारले , “ कुठे चाललास ? " काळा ढग म्हणाला , " जमिनीकडे . मी तिथे जाऊन पाऊस पाडणार आहे . माझ्याजवळ जेवढे पाणी आहे ते सगळे धरणी मातेला देऊन टाकणार आहे .

 जमीन उन्हाने तापली आहे . नद्या , तलाव , विहिरी कोरड्या पडल्या आहेत . झाडेपण सुकून गेली आहेत . शेतकरी आतुरतेने माझी वाट पहात आहेत . मला जरा घाईने गेले पाहिजे . " गोरा ढग त्याला हसला . त्याला म्हणाला , " वेडाच आहेस . आपली संपत्ती कधी अशी कोणी जगावर उधळून देतो का ? तुझ्यातले पाणी संपले कि तुझे आयुष्यच संपले की ! मी चाललोय स्वर्गात . देव बाप्पाच्या घरी एक जागा रिकामी झालीय . ती मला मिळेल . " 

गोऱ्या ढगाला खूप घाई होती . तो धावतच पुढे निघाला , काळा ढग हळूहळू जमिनीपर्यंत आला . मुसळधार पाऊस झाला . काळा ढग अदृष्यच झाला . नद्या , नाले दुथडी भरून वाहू लागले तलाव विहिरी काठोकाठ भरले . सारे रान हिरवेगार झाले . शेतकरी सुखावले . 

गोरा ढग वर जाताना ते पहात होता . काळ्या ढगाच्या वेडेपणाला तो हसला . पाहता पाहता स्वर्गाचा दरवाजा आला . गोऱ्या ढगाने दार ठोठावले . एका देवदूताने ते उघडले . त्याने गोऱ्या ढगाला विचारले , " तुझे देवबाप्पाकडे काय काम आहे ? " गोरा ढग आपल्याच तोन्यात होता . तो म्हणाला , " मी इथे रहायलाच आलोय , स्वर्गात १ जागा रिकामी झालीय . ती मलाच मिळणार ! उघड दरवाजा . " दार उघडायच्या ऐवजी देवदूताने ते लावूनच घेतले . लावता लावता तो म्हणाला , " ती रिकामी जागा आता भरलीय . देवबाप्पा स्वतः विमान घेऊन गेले होते व त्या काळ्या ढगाला स्वर्गात घेऊन आले . ज्याने आपले सर्वस्व देऊन पृथ्वीवर आनंदी आनंद निर्माण केला , त्याच्यापेक्षा आणखी चांगली व्यक्ती कोण असणार ? "

मराठी बोधकथा तात्पर्य : समाजासाठी सर्वस्व समर्पण करणे हाच मोक्ष आहे . आपल्या आजूबाजूच्या सर्वांना सुखी करणे , त्यांना काही न काही मदत करणे यातूनच माणूस सुखी समाधानी होऊ शकतो.


000


सम्राट... आणि प्रजा
➖➖➖➖➖

एका सम्राटाला रात्री झोप येत नव्हती म्हणून... ते फेरफटका मारत असताना आपल्या कक्षाबाहेर आले. तर मंत्री महोदय आपल्या हिशोबाच्या वह्या काढून हिशोब तपासत आहेत असे त्यांच्या लक्षात आले. मंत्र्याच्या चेहऱ्यावर कसली तरी चिंता आहे. हे महाराजांच्या अनुभवी नजरेने हेरले. 

महाराजांनी त्यांना या चिंतेचे कारण विचारले तेंव्हा मंत्री म्हणाले, "महाराज ! मागील वर्षाच्या तुलनेत या वर्षी कर अधिक जमा झाला आहे. पण त्याचे कारण मला समजले नाही. " 
सम्राट म्हणाले,
"अहो! हिशोबात काही चूक असेल." 
मंत्री म्हणाले,"हिशोब अचूक आहे. मी स्वत: तपासला आहे."
तेव्हा सम्राट म्हणाले," रात्र जास्त झाली आहे. हि समस्या उद्या सकाळी सोडवा." 
परंतु मंत्री म्हणाले," उत्पन्न अशा प्रकारे वाढणे साम्राज्यासाठी चिंतेचे कारण आहे. कराची कमतरता सहन करणे शक्य आहे. पण अन्यायाची एक पै तिजोरीत जास्त आली तर तिच्यामुळे साम्राज्याला तळतळाट लागू शकतो. महाराज ! कुणा गरीबाचा तळतळाटाचा पैसा चुकून जरी आपल्या तिजोरीत पडला तर तुम्हाला आणि मला आपल्या दोघांना आवडणार नाही. यामुळे मी तो हिशोब तपासत आहे."

आता सम्राटही गंभीर झाले आणि मंत्राच्या समोर बसले. बराच वेळ विचार केल्यावर मंत्री म्हणाले, "महाराज! उन्हाळा जास्त झाल्याने नदीची पाणी पातळी खालावली आहे. त्यामुळे काठावरच्या जमिनीला शेतकऱ्यांनी कुंपण घातले. शेतकऱ्यांनी पिके कमी घेतली पण सरकारचा कर बुडवायचा कसा? या विचाराने त्यांनी सरकारात धन जमा केले. त्यामुळे जास्त धन गोळा झाले." 

यावर सम्राट म्हणाले,"जर दुष्काळाची परिस्थिती असेल तर त्या गरीब शेतकऱ्यांनी जमा केलेला कर आपल्या तिजोरीमध्ये ठेवून मला पापाचा धनी व्हायचे नाही. गरीब शेतकऱ्यांना शेतीसाठी मदत म्हणून तोच पैसा परत करा." 

सम्राटाच्या आज्ञेचे पालन करण्यात आले. पुढील वर्षी त्या राज्यात भरपूर पाऊस झाला. जनतेचे आशीर्वाद फळाला आले.

🔅तात्पर्य :-

सर्वांचे हित जाणणारा, प्रेम, आत्मीयता व कठीण प्रसंगात योग्य साथ देणारी व्यक्तीच योग्य प्रकारे सत्ता चालवू शकते.


000

चांगली घटना लक्षात ठेवा !!
➖➖➖➖➖➖➖

दोन भाऊ समुद्राच्या किनाऱ्यावर फिरत होते. दोघांमध्ये कोणत्या एका गोष्टीवरून वाद झाला. मोठ्या भावाने लहान भावाच्या थोबाडीत मारली. लहान भाऊ काहीच बोलला नाही. फक्त वाळूवर लिहलं 'आज माझ्या भावाने मला मारलं.'

दुसऱ्या दिवशी दोघेही पुन्हा समुद्रकिनाऱ्यावर फिरू लागले. लहान भाऊ समुद्रावर अंघोळ करू लागला. अचानक तो बुडू लागला. मोठ्या भावाने त्याला वाचवलं. तेव्हा लहान भावाने दगडावर लिहलं, 'आज माझ्या भावाने मला वाचवलं'. 

मोठया भावाने विचारलं, "जेव्हा मी तुला मारलं तेव्हा तू वाळूवर लिहिलं होतंस आणि जेव्हा तुला वाचवलं तेव्हा तू दगडावर लिहितोयसं अस का ?

लहान भावाने यावर उत्तर दिलं, "जेव्हा आपल्याला कुणी दुःख देत तर ते वाळूवर लिहावं कारण ते लवकर मिटून जावं... परंतु जेव्हा कुणी आपल्यासाठी चांगलं करतं तेव्हा आपल्याला ते दगडावर लिहायला हवं कारण ते मिटु नये !!"

🔅तात्पर्य :-

घडलेली वाईट घटना... विसरायलाच हवी आणि चांगली घटना नेहमी लक्षात ठेवायला हवी !!


000


एक दिवसाचा पांडुरंग 🎄

पंढरपूर येथील पांडूरंगाच्या मंदिरात गोकुळ नावाचा भक्त नियमितपणे झाडण्याची सेवा करत होता. एकदा त्याच्या मनात विचार आला कि, "विटेवर उभा राहून रोज हजारो लोकांना दर्शन देत असणाऱ्या पांडुरंगाचे पाय नक्कीच दुखत असतील, म्हणून एक दिवस त्याने पांडुरंगाला विचारले, '" देवा तू आमच्यासाठी सारखा उभा असतोस, तुझे पाय दुखत असतील तेव्हा तू आता विश्रांती घे, मी तुझ्या जागी उभे राहण्याची सेवा करेन" 

त्यावर पांडुरंग म्हणाला, " ठीक आहे , पण तू इथे उभा राहून कोणालाही काही सांगू नकोस, काहीही झाले तरी बोलू नकोस, फक्त हसत उभा रहा"

पांडुरंगाचे हे बोलणे गोकुळ ने मान्य केले व दुसऱ्या दिवशी सकाळी तो पांडूरंगाच्या जागी उभा राहिला.

तेव्हा तेथे भक्तांचे येणे सुरु झाले, 

श्रीमंत भक्त :- "देवा मी लाखो रुपायांची देणगी दिली आहे, माझ्या व्यवसायामध्ये भरभराट होऊंदे" 

( त्यावर तो श्रीमंत भक्त तेथून निघून गेला, पण चुकून तो आपले पैशांनी भरलेले पाकीट तेथेच विसरला, पण देवाने काहीच न करता फक्त उभे राहण्याचे सांगितले असल्याने गोकुळ त्याचे पाकीट त्याला परत देऊ शकला नाही, त्यामुळे तो फक्त हसत उभा राहिला .......... पुढे तेथे एका गरीब भक्ताचे येणे झाले ) 

गरीब भक्त :-  "पांडुरंगा, हा एक रुपया मी तुला अर्पण करतो, माझी हि धनाची सेवा स्वीकार कर. तसेच मला नेहमी तुझ्या चरणाशी ठेव, माझ्याकडून तुझी भरपूर सेवा करून घे... देवा माझी बायको व मुले २ दिवसांपासून उपाशी आहेत, घरात अन्नाचा कण नाही, माझा सगळा भार मी तुझ्यावर सोडला आहे, जे काही होईल ते तुझ्या इच्छे प्रमाणे होईल असा मला विश्वास आहे"

( असे म्हणून तो भक्त आपले डोळे उघडतो तेव्हा त्याला तिथे पैशांनी भरलेले पाकीट दिसते, तेव्हा देवाचे आभार माणू तो ते पाकीट घेऊन जातो व आपल्या उपाशी बायकोला, मुलांना व इतर गरीब लोकांना अन्न देतो... गोकुळ काहीच न बोलता हसत उभाच असतो )

पुढे तिथे एक नावाडी येतो, देवाला उद्देशून तो म्हणतो, " हे पांडुरंगा आज मला समुद्रातून खूप लांबचा प्रवास करायचा आहे, तेव्हा सर्व व्यवस्थित होण्यासाठी आशीर्वाद दे "

(असे म्हणून तो नावाडी तेथून जाऊ लागतो तितक्यात तो श्रीमंत भक्त पोलीसांना घेऊन तिथे येतो, तिथे पाकीट नसल्याचे बघून तो श्रीमंत भक्त पोलिसांमार्फत पाकीट चोरल्याच्या संशयावरून नावाड्याला अटक करतो... तेव्हा गोकुळला फार वाईट वाटते पण तो काहीच करू शकत नसल्याने तो फक्त उभा राहतो. ) 

तेव्हा नावाडी देवाकडे बघून म्हणतो, " पांडुरंगा हा काय खेळ मांडला आहेस, मी काहीच नाही केले तरी मला हि शिक्षा"

( हे ऐकून गोकुळचे हृदय गहिवरते, तो विचार करतो कि... स्वत:हा पांडुरंग जरी इथे असला असता तरी त्याने काहीतरी केले असते, असे म्हणून न राहवून तो पोलीसांना सांगतो कि, " पाकीट नावाड्याने चोरले नसून गरीब भक्ताने चोरले आहे" ... 

त्यावर पोलीस नावाड्याला सोडून देतात, तेव्हा नावाडी व श्रीमंत हे दोघे भक्त देवाचे आभार मानून तेथून निघून जातात.

रात्री पांडुरंग मंदिरात येतो व गोकुळाला विचारतो "कसा होता दिवस?" 

गोकुळ म्हणतो , " पांडुरंगा मला वाटले होते कि इथे उभे राहणे फार सोपे काम आहे, पण आज मला कळाले कि... हे काम किती अवघड आहे ते, ह्यावरून कळते कि तुझे दिवस हे सोपे नसतात... पण देवा मी आज एक चांगले काम पण केले, असे म्हणून तो सारी हकीकत देवाला सांगतो.

तेव्हा पांडुरंग निराश होऊन त्याला म्हणतो, " शेवटी तू माझ्या आज्ञेचा भंग केलास, तुला मी सांगितले होते कि तू कोणालाही काहीही बोलू नकोस पण तू ऐकले नाहीस, तुझा माझ्यावर (देवावर) विश्वासच नाही... तुला काय वाटते कि मी भक्तांच्या ह्रुदयातील भावना ओळखू शकत नाही. " 
गोकुळ मान खाली घालून उभा राहतो. 

पांडुरंग पुढे म्हणतो .... 

अरे त्या श्रीमंत माणसाने दिलेल्या देणगीतील पैसे हे चुकीच्या मार्गातील आणि भ्रष्टाचारातील होते, आणि त्या पैशांच्या बदल्यात त्याला व्यवसाया मध्ये माझ्याकडून भरभराट हवी होती. त्यामुळे पाकीट हरवण्याचा खेळ मला करावा लागला जेणेकरून ते पैसे चांगल्या मार्गाला वापरून त्याच्या पदरातील पापाचा साठा कमी होणार होता.

त्या गरीब भक्ताकडे फक्त शेवटचा एकच रुपया राहिला होता, तरी देखील श्रद्धेने व भक्तीने त्याने मला तो अर्पण केला. म्हणून पैशांचे पाकीट मी त्याला दिले कारण तो सर्व पैसे फक्त गरीब लोकांसाठी वापरतो आणि त्याने तसेच केले आहे.

त्या नावाड्याने काहीही चुकीचे केले नव्हते पण तो समुद्रामध्ये लांबच्या प्रवासाला जाणार होता, तेथील वातावरण आज खूप खराब आहे, मोठमोठ्या लाटा जोराने वाहात आहेत, ह्या परिस्थितीत तो आपली नाव वाचवू शकला नसता व त्याचा प्राण गेला असता, म्हणून मी त्याला अटक करण्याचा खेळ रचला जेणेकरून तो तुरुंगात बंद राहील व मोठ्या संकटापासून सुटेल. 

पण तुला वाटले कि... आपण एक दिवसाचा देव झालो म्हणजे आपण सगळे समजू लागलो. पण तू तर सर्व खेळावर पाणी सोडलेस, आणि नेहमी जे होते तेच आजपण झाले ...देव मनुष्यासाठी चांगले खेळ रचतो, पण मनुष्याच त्यावर पाणी सोडतो. 

🔅तात्पर्य :-

देव जे काही करत आहे ते फक्त आपल्या चांगल्यासाठीच करत आहे ... फक्त आपण देवावर विश्वास ठेवून धीर बाळगला पाहीजे  !!

0000


कुऱ्हाड आणि दांडा
➖➖➖➖➖

         एकदा कु-हाड आणि लाकडाचा दांडा यांच्यामध्ये वादविवाद सुरु झाला. दोघेही स्वत:ला अतिशय शक्तिशाली असल्याचे सांगत होते. लाकडाचा दांडा नंतर शांत झाला. मात्र कु-हाडीची बडबड मात्र अखंडपणे चालूच होती.

         कु-हाडीला प्रचंड अहंकार होता. ती रागाच्या भरात काय वाटेल ते बोलत सुटली होती,"अरे लाकडाच्या दांडक्या ! तू स्वत:ला काय समजतोस? तुझी शक्ती माझ्यापुढे पाणी भरते, मी ठरवले तर मोठमोठे वृक्ष मी सहज कापून काढते, तुझ्यासारख्या दांड्याने माझ्याशी वैर घेणे चांगले नाही. तू माझी बरोबरी करू नकोस." 

         लाकडाचा दांडा कु-हाडीचे अहंकारी सुरातील बोलणे मन लावून ऐकत होता. काही काळ बडबड केल्यावर कु-हाड शांत झाली मग लाकडाचा दांडा बोलू लागला,"तू जे म्हणते आहेस ते सर्व खरे आहे. तू झाडे तोडू शकतेस, तुझी शक्ती माझ्यापेक्षा जास्त आहे. हे सगळे खरे आहे पण तू एका गोष्टीकडे लक्ष दिले नाहीस ते म्हणजे तू वरीलपैकी कोणतेच काम एकट्याने करू शकत नाहीस. तुला प्रत्येक गोष्टीत माझ्या सहकार्याची गरज हि लागतेच. तू कोणतेच काम एकटीच्या जीवावर कधीच करू शकणार नाही हे तुला माहित असतानासुद्धा तू नको त्या शक्तीचा गर्व बाळगून आहेस. तेंव्हा स्वत:ला यापासून वेळीच सावर अन्यथा तुला कुणी किंमत देणार नाही." 

         कु-हाडीला तिची चूक समजली व तिने दांड्याची माफी मागितली.

🔅 तात्पर्य :-

सहकार्य भावना महत्वाची असते. अहंकारातून सहकार्य भावनेला जर तडा गेला तर काम करता येणे अशक्य आहे. परस्परसंबधी आदरभाव ठेवणे गरजेचे आहे.
0000


चांगल्‍या कामाचे फळ मिळतेच
        ━━━━━━━━━━━━━━━━

उज्‍जैनचा राजा विक्रमादित्‍य गरीब आणि गरजू लोकांना मदत करण्‍यास सदैव तयार असे. या प्रजादक्ष राजाचे सर्वत्र कौतुक केले जात असे. राजाची स्‍तुती शनि महाराजांपर्यंत जाऊन पोहोचली व त्‍यांनी राजाची परीक्षा घेण्‍याचे ठरविले.

शनि महाराज विक्रमादित्‍यास म्हणाले,'' राजा मी कोण आहे हे तुला माहिती आहे का ?'' 
राजा म्‍हणाला,'' मी तुझी ओळख ठेवून काय करणार, तुझेच काही काम असेल तर मला सांग, मी जीवाची बाजी लावण्‍यासही मागे-पुढे पाहणार नाही.'' 

शनि महाराजांना या राजाच्या बोलण्‍यातून स्‍वत:चा अपमान वाटला व त्‍यांनी त्‍याला सुनावले की, "राजा तुला तुझ्या सत्तेचा, पराक्रमाचा गर्व चढला आहे. मी जेव्‍हा तुला सळो की पळो करून सोडेन, तेव्‍हा तूच मला ओळखू लागशील.''
यानंतर शनि महाराजांचा कोप झाल्‍याने विक्रमादित्‍याने स्‍वत:चे राज्‍य गमावले, त्‍याच्‍यावर जंगलात जाऊन एकांतवासात राहण्‍याची वेळ आली.

शनिमहाराजांनी आता जंगलात जाऊन पाहिले तर त्‍यांना विक्रमादित्‍य जंगलातही मजेत राहत होता. राज्‍यकारभाराच्‍या ताणतणावातून मुक्त झाल्‍याने त्‍याला लोकांना मदत करण्‍यासाठी अजूनच जास्‍त वेळ मिळत होता. ते पाहून शनिदेवाने एका डाकूचे रूप घेतले आणि राजासमोर जाऊन युद्धाचे आव्‍हान दिले. यात राजाचा पराभव होऊन डाकूच्‍या वेशात असलेल्‍या शनिदेवांनी राजाचे हातपाय तोडले. 

अशा अपंग असलेल्‍या राजाची ही अवस्‍था पाहून एका तेल्‍याला त्‍याची दया आली व तो राजाला घरी घेऊन गेला. त्‍याची सेवा केली. राजा तेल्‍याला म्‍हणाला, ''बाबा, तुम्‍ही माझ्यासाठी इतके केले, तुमच्‍या तेलाच्‍या घाण्‍यावर जर मला बसवले तर मी बैलांवर लक्ष ठेवेन. तुमचे तेवढेच काम हलके करण्‍याचा प्रयत्‍न करेन. तेल्‍याच्‍या या कामातही राजाने आपली मदत करण्‍याची वृत्ती सोडली नाही हे पाहून शनिदेव प्रसन्‍न झाले. राजाचे सर्वस्‍व हिरावूनही तो लोकांना मदत करण्‍याचा वसा सोडत नाही हे पाहून शनिदेवाने राजाला पूर्ववत करून त्‍याचे सगळे साम्राज्‍य त्‍याला परत केले.


🔅तात्‍पर्य :-

चांगल्‍या कामाचे फळ हे लगेच जरी मिळत नसले ते निश्चित मिळते. छिन्नी - हातोड्याचे घाव सोसल्‍याशिवाय दगडालासुद्धा देवपण येत नाही. चांगले काम करताना निंदानालस्‍ती, टीका, उपहास जरी सहन करावा लागला तरी आपण सदवर्तन करत राहावे यातूनच उत्‍कर्ष होतो.

0000

आत्मविश्वास  🥀

एका जंगलात एक कावळा रहात होता. आपला दिवस आनंदाने आणि सुखाने घालवत तो आयुष्य काढत होता. आपण अत्यंत सुखी आहोत अस त्याला वाटायचं आणि त्याच आनंदात तो जगत होता. 

एक दिवस जंगलातल्या तळ्याकाठी बसला असताना त्याला त्या तळ्यात स्वच्छंदीपणे पोहोत असलेला राजहंस दिसला. तो पांढराशुभ्र आणि डौलदार पक्षी पाहून तो थोडा हिरमुसला आणि विचार करू लागला," मी असा काळा कुळकुळीत एकदम आणि हा पक्षी एकदम शुभ्र, खरच हाच जगातला सर्वात सुखी पक्षी असावा, मी उगाचंच मला सुखी समजत होतो " असा विचार करत तो त्या राजहंसाकडे गेला आणि त्याला आपल्या या भावना बोलून दाखवल्या.
तो राजहंस म्हणाला,
" खरं आहे मित्रा तुझं, मी ही समजत होतो असं, पण एके दिवशी मी एका पोपटाला पाहिलं , मला एक रंग आहे पण त्याला दोन रंग होते, खरच तो माझ्यापेक्षा सुखी असणार रे "

मग हा कावळा पोपटाच्या शोधात निघाला. एका पोपटाला गाठून त्याने सगळी कथा ऐकवली. तो पोपट हसत म्हणाला ," माझा ही समज असाच होता, मी स्वतःला खरच सुखी समजत होतो पण एके दिवशी मी एका मोराला पाहिलं आणि मला जाणवलं कि... तोच सगळ्यात सुखी पक्षी आहे पृथ्वीवर , कारण त्याच्या अंगावर अगणित रंग आहेत "

हे ऐकून कावळा अजून संभ्रमित झाला. आणि मोराच्या शोधात निघाला. एका प्राणी संग्रहालयात एका पिंजऱ्यात त्याला एक मोर दिसला. शेकडो लोकं त्याच्या भोवती गोळा होवून त्याचं गुणगान करत होते. आता कावळ्याला खात्री पटली कि हाच जगातला सर्वात सुखी पक्षी. काही वेळाने सर्व लोक निघून गेल्यावर हा त्याच्या पिंजऱ्याजवळ गेला आणि आत्तापर्यंत झालेला सगळा घटनाक्रम त्याला ऐकवला आणि म्हणाला, " मयुरराज, आपण खरच खूप सुंदर आहात, रोज हजारो लोक तुम्हाला पाहायला येतात आणि तुमची स्तुती करतात , मला मात्र कुठं गेलं कि हुसकावून लावतात, आपण सगळ्यात सुखी पक्षी आहात या भूतलावर !!

तो मोर खिन्नपणे हसत म्हणाला,
" मला ही सगळ्यात सुंदर आणि सुखी पक्षी असल्याचा अभिमान होता मित्रा... पण माझ्या या सौंदर्यामुळे मी पिंजऱ्यात अडकलोय, सगळं प्राणी संग्रहालय फिरून बघ तुला इथे सगळे पक्षी दिसतील पिंजऱ्यात... पण कावळा नाही दिसणार कुठे , आणि त्यामुळे मी असा निष्कर्ष काढतोय कि, कावळा हा सर्वात सुखी पक्षी आहे कारण तो त्याच्या मर्जीने कुठेही उडू शकतो आणि जावू शकतो ….!

🔅 तात्पर्य :- 🔅

आपण नेहमी समजत असतो कि... आपले नातेवाईक, मित्र, सहकारी, आजूबाजूचे लोक हे जास्त सुखी आहेत आपल्यापेक्षा... पण प्रत्यक्षात काही वेगळाच असतं. "भला उसकी कमीज मेरी कमीज से सफेद कैसी ?" ह्या प्रश्नाचं उत्तर शोधतच आपली जिंदगी चालली आहे. प्रत्येकाला त्याच्या त्याच्या परीने दु:खं आहे आणि सुख ही आहे. त्यांच्या नशीबावर आपलं नशीब घासत बसून उपयोग नाही, आपलं सुख कशात आहे हे शोधा आणि ते वाढवा कारण समर्थ सांगून गेलेत...

" जगी सर्व सुखी असा कोण आहे ?
विचारी मना तूच शोधोनी पाहे …!!

0000


  एक तरी ओवी अनुभवावी
        ━━━━━━━━━━━━━━━━

कौरव आणि पांडव आश्रमात राहून शिक्षण घेत होते. एकदा त्यांच्या गुरूंना काही कामानिमित्त बाहेरगावी जायचे होते. जातांना त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना ते परत येईपर्यंत काही पाठांचा अभ्यास करण्यास सांगितले. पंधरा दिवसांनी गुरु परतले आणि प्रत्येकाने काय काय अभ्यास केला, याविषयी विचारणा करू लागले. प्रत्येक जण आपण कसा जास्तीत जास्त अभ्यास केला, याविषयी सांगू लागला. 

शेवटी धर्मराजाची पाळी आली. धर्मराज म्हणाला, "गुरुजी, मी एका वाक्याचा अभ्यास केला."
धर्मराजाच्या तोंडचे उत्तर ऐकताच गुरुजींना खूप राग आला; कारण धर्मराज हा त्यांचा अत्यंत आवडता आणि हुशार विद्यार्थी होता. ते ओरडले, "काय रे, या सर्वांपेक्षा तू मोठा आहेस, बुद्धीमान आहेस आणि तरीसुद्धा तू केवळ एकाच वाक्याचा अभ्यास केला म्हणतोस ? तुला लाज वाटली पाहिजे."

धर्मराज शांतपणे म्हणाला,
"गुुरुजी, माझा नाईलाज आहे; परंतु एवढ्या कमी काळात मी खरंच एक वाक्य शिकलो.

गुरुजींचा पारा चढला. ते खवळले आणि म्हणाले, "मूर्ख लेका, तू आळशीच नाहीस, तर निर्लज्ज आहेस."
तरीही धर्मराज शांतच होता. जराही विचलित न होता तो म्हणाला, "गुरुजी, माफ करा; पण मी खरोखरच एवढंच शिकलो."

गुरुजींना राग आवरेना. त्यांनी रागाच्या भरात धर्मराजाच्या थोबाडीत मारायला सुरुवात केली, तरीही धर्मराज शांतच होता. त्याच्या तोंडावरचे भाव जरासुद्धा पालटले नव्हते. आता मात्र गुरुजी वरमले. त्यांना वाटले की, धर्मराजाच्या म्हणण्यात काहीतरी तथ्य असले पाहिजे. ते म्हणाले, "बाळ, तू कोणते वाक्य शिकलास, ते तरी सांग."

धर्मराजाने आपली वही आणून दाखवली. तिथे लिहिले होते, कोणत्याही परिस्थितीत आपल्याला राग येऊ देऊ नये. या एका वाक्यासरशी गुरुजी आणि बाकी विद्यार्थी काय समजायचे, ते समजले. विनाकारण शिक्षा केल्याविषयी गुरुजींनी धर्मराजाची क्षमा मागितली. 

🔅तात्पर्य :-

नुसत्या अफाट ज्ञानापेक्षा थोडे शिकले, तरी चालेल; परंतु जे शिकू, ते कृतीत आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. संत ज्ञानेश्‍वर महाराजांनी म्हटले आहेच, एक तरी ओवी अनुभवावी !!

+++++++++


कालिदासांना हा अहंकार  झाला होता कि ते खूप मोठे ज्ञानी झालेत एकदा प्रवासात त्यांना तहान लागली, त्यांनी पाहिलं कि जवळच एक वृद्ध स्त्री विहिरीवरच पाणी भरत आहे. कालिदास म्हणाले, माते मला पाणी देशील तर तुला खूप पुण्य मिळेल. वृद्ध स्त्री म्हणाली बाळा मी तुला ओळखलं नाही, कृपया तू तुझा परिचय दे, मग मी तुला पाणी देते. मग कालिदासाने परिचय देण्यास सुरवात केली. कालिदास म्हणाले मी प्रवासी आहे. वृद्ध स्त्री म्हणाली प्रवासी तर फक्त दोनच आहेत एक चंद्र 🌕आणि दुसरा सूर्य🌞 जे दिवस रात्र चालतच असतात. कालिदास म्हणाले मी अतिथी आहे. पाणी मिळेल ? वृद्ध स्त्री म्हणाली अरे अतिथी तर फक्त दोनच आहेत एक धन आणि दुसर तारुण्य ते निघून जातात. खरं सांग तू कोण आहेस ? कालिदास म्हणाले मी सहनशील आहे. आता तरी पाणी मिळेल ? वृद्ध स्त्री म्हणाली, 'अरे सहनशील तर तर फक्त दोनच आहेत ! एक धरती 🌍आणि दुसरं झाडं 🌵धरती जी पुण्यवान लोकांच्या बरोबर पापी लोकांचं देखील ओझं घेऊन आहे. आणि झाडं ज्यांना दगडं मारला तरी ती मधुर फळच देतात. कालिदास आता हतबल झाले, कालिदास म्हणाले मी हट्टी आहे. वृद्ध स्त्री म्हणाली नाही तू हट्टी कसा असशील, हट्टी तर फक्त दोनच आहेत एक नख💅🏻ं आणि दुसरे केस, कितीही कापले तरी परत वाढतातच. कालिदास आता काही ही बोलण्याच्या मनःस्थितीत नव्हते, ते त्या स्त्रीच्या पायावर डोकं ठेऊन पाण्यासाठी विनवणी करू लागले. वृद्ध स्त्री म्हणाली उठ बाळा, आवाज एकूण कालिदासांनी वर पाहिलं तर त्या स्त्रीच्या जागी साक्षात सरस्वती देवी उभी होती, कालिदास आता नतमस्तक सरस्वती देवी कालिदासांना म्हणाली, शिक्षणाने ज्ञान येते, अहंकार नाही.  
शिक्षणाच्या बळावर मिळालेला मान, स्नमान आणि प्रतिष्ठा यालाच तू सर्वस्व समजलास आणि त्याचा तुला अहंकार आला. तुझे डोळे उघडणे आवश्यक होते. कालिदासांना त्यांची चूक समजली, ते भरपूर पाणी पिऊन पुढील प्रवासाला निघाले.

तात्पर्य: विद्वत्तेवर कधीच गर्व करू नका. वाचनात आलेला हा एक  सुंदर लेख ! लिहिणाऱ्याचे आभार.

+++++


एका तरुणाने शिक्षण पूर्ण झाल्यावर अनेक ठिकाणी अर्ज दाखल केले. काही ठिकाणी बोलावण्यात येवून नकार मिळाला तर काही ठिकाणी नुसताच नकार!. असेच एकदा त्याला एका मोठ्या कंपनीत इंटरव्ह्युसाठी बोलावण्यात आले. नेहमीप्रमाणे हा तरुण मुलाखतीस गेला, मुलाखत घेणाऱ्याने त्याला प्रश्न विचारले याने त्या प्रश्नांची योग्य उत्तरे दिली, आता याची निवड पक्की असे वाटत असतानाच कंपनीच्या प्रमुखाने त्याला सांगितले,"तुम्हाला आमच्या कंपनीत घेण्यासाठी आम्ही इच्छुक आहोत. तुम्ही बाहेर जा आणि तुमचा इ-मेल आयडी द्या. आम्ही तुम्हाला मेल करू." तरुणाने काही सेकंद विचार केला आणि उत्तर दिले,"साहेब! मी तुम्हाला इ-मेल आयडी देवू शकत नाही कारण माझ्याकडे कॉम्प्युटर नाही त्यामुळे माझा इ-मेल आयडी पण नाही." प्रमुख म्हणाले,"अरे आजकालच्या या तंत्रज्ञानाच्या युगात तुमच्याकडे इ-मेल आयडी नाही म्हणजे तुम्ही नोकरीला लायक नाही. आमची कंपनी फक्त इ-मेल आयडी धारकांना नोकरी देते." तो तरुण तिथे काही उलटे उत्तर न देताच बाहेर पडला. त्याच्या डोक्यात विचारचक्र सुरु झाले. खिशात फक्त १० रुपये होते, पोटात भूक होती, हातात काही काम नव्हते, चल मंडईत जावू आणि काही भाजी घेवू असा विचार करून तो मंडईत गेला. तिथे त्याने १० रुपयाचे बटाटे विकत घेतले आणि त्याच्या मनात काय आले कुणास ठाऊक पण ते विकायला तो तिथेच बसला.त्याच्या अंगी विक्रीची कला होती.

             काही वेळातच त्याने बोलून १० रुपयाचे २० रुपये मिळवले. सगळे बटाटे संपविले. मग त्याच्या लक्षात आले कि अरे आपण व्यापार करू शकतो. त्याने त्या २० रुपयाचे दुसऱ्या दिवशी अजून दुप्पट केले आणि भाजी घरोघर जावून विकू लागला. असे करता करता त्याने एक दुकान, एक ट्रक खरेदी केले व खूप श्रीमंत झाला. ५ वर्षात तो त्या गावातील मोठा श्रीमंत व्यक्तींमध्ये गणला जावू लागला. त्याचे लग्न झाले, मुलेबाळे झाली. आता त्यांच्या भविष्याची चिंता त्याला सतावू लागली. त्यासाठी त्याने एका पॉलीसी एजंटला बोलावले. तो एजंटही मोठी पॉलीसी मिळणार म्हणून आनंदाने आला. फॉर्म भरताना एके ठिकाणी एजंटाने त्याला त्याचा इ-मेल आयडी विचारला आणि तो व्यापारी मोठ्याने हसू लागला.एजंटला काहीच कळेना, तो म्हणाला ,"तुमच्याजवळ इ-मेल आयडी नाही का? तुमच्यासारख्या गावातील मोठ्या माणसाकडे इ-मेल आयडी नाही हि मोठी मजेची गोष्ट आहे. तुम्ही कधी विचार केला आहे का कि इ-मेल आयडी नसतानासुद्धा तुम्ही इतके श्रीमंत आहात आणि जर का तुमच्याकडे इ-मेल आयडी असता तर?" तो व्यापारी (तरुण) उत्तरला," जर माझ्याकडे इ-मेल आयडी असता तर.................................................मी एका कंपनीचा कारकून राहिलो असतो. इतका श्रीमंत कधीच होवू शकलो नसतो."

तात्पर्य-आत्मविश्वासाने कोणतीही गोष्ट केल्यास आपले कुठल्याच गोष्टीत अडत नाही.


+++++

ध्येय गाठायचे असेल, तर कामात अडथळे निर्माण करणाऱ्याकडे लक्ष देऊ नका
   ================
            कथा
गाढव वाघाला सांगतो गवत पिवळे असते.वाघ गाढवाला सांगतो की गवत हिरवे असते. त्यांच्यात वाद होतो. ते दोघे सिंहाकडे जातात निवाडा करायला.दरबारात सर्व जमलेले असतात. गाढव शहाणपणा करत सर्वांच्या समोर सिंहाला सांगतो कि गवत पिवळे असते आणि हा वाघ बोलतो की गवत हिरवे असते...तुम्हीच आता सांगा की खर काय आणि खोट काय?सिंह स्मितहास्य करतो आणि सर्वांच्या समोर सांगतो की गाढव बरोबर सांगत आहे.गवत पिवळे असते..आणि सिंह वाघाला एक वर्षाची शिक्षा करतो.गाढव आनंदाने उड्या मारत जंगलात निघून जातो.सर्व दरबार संपल्यावर वाघ जाऊन सिंहाला विचारतो, "की तुम्हाला माहित आहे ना की गवत हिरवं असतं.तरीही मला का शिक्षा केली?? सिंह बोलला, मी शिक्षा तुला यासाठी केली की तो गाढव आहे हे सर्वांना माहीत आहे आणि गवत हिरवंच आहे ह्यात काहीच शंका नाही. पण तरीही तू एका गाढवा बरोबर वाद घालत बसून स्वतःच वेळ वाया घालवलास ..म्हणून तुला शिक्षा दिली.
..........
 Moral of the Story : 
ध्येय गाठायच असेल तर आपल्या कामात अडथळे निर्माण कारणाऱ्यांकडे लक्ष न देता ध्येयपूर्तीसाठी काम करावे.कारण शेवटी ध्येय महत्वाचं आहे..


=========

एक राक्षस होता. त्याकला आपल्याप सर्व कामासाठी एका माणसाची गरज होती. त्याकने शोधाशोध करून एका माणसाची नियुक्ती केली. तो माणूस खूप सज्जन होता. राक्षस सांगेल ते कोणतेही काम तो पूर्ण करत असे. तो अविरत काम करत असे. मात्र राक्षस आपली वाईट प्रवृत्ती दाखवून द्यायचाच. तो त्याेला सतत धमकावत असे. कामात त्यारला विलंब झालेला चालत नसे. माणसाने जरा जरी कामात विलंब केला तरी मी तुला मारून टाकीन असे धमकी वजा राक्षस बोलत असे. माणूस राक्षसाच्याअ भीतीने घाबरून आणखी वेगाने काम करत असे. माणूस विचार करायचा की आपण जर काम नीट केले नाही तर आपल्या्ला हा राक्षस मारून तर टाकायचा नाही ना. एकेदिवशी सकाळपासून संध्याहकाळपर्यंत तो सतत काम करत होता. तो इतका थकला होता की त्यांला सुस्तीह येऊ लागली. त्यािला एक पाऊलही टाकवेना. थोड्या वेळाने राक्षस आला. माणसाला बसलेला पाहून राक्षस ओरडला,’’ तुझी अशी रिकामे बसून राहण्यालची हिंमत झालीच कशी, चल उठ कामाला लाग नाही तर मी तुला खाऊन टाकीन.’’ राक्षसाच्याा धमकीने माणूस घाबरला. त्याीच्याश मनात विचार आला की तू माणूस आहे व तो राक्षस आहे. धमकाविणे हे त्या‍चे काम आहे. तू जोपर्यंत याला घाबरशील तोपर्यंत हा तुला घाबरवत राहणार. एकदा का होईना याला प्रत्युयत्तर दिलेच पाहिजे. शेवटी माणसाने मनाची तयारी केली. आता जे होईल ते होईल पण याला उत्तर हे द्यायलाच हवे हा पुरुषार्थ त्या च्याल मनात जागृत झाला व तो राक्षसाला म्हहणाला,’’ सारखे सारखे खाऊन टाकण्या ची भाषा कशाला करतोस, खायचे असेल तर मला खाऊन टाक म्हऊणजे मी पण एकदाचा सुटलो.’’ त्यााची ही हिंमत पाहून राक्षसाने आपले वागणे बदलले.


तात्पर्य :- रोजच्यात जीवनातही असे राक्षस आपल्यााला घाबरवत असतातच पण त्यांयना किती किंमत द्यायची हे आपणच ठरवायचे असते. ज्यातदिवशी आपल्याणतील भीती सोडून आपण पुढे चालू तेव्हा. ही राक्षसीप्रवृत्ती आपोआप गप्प बसते.


=======


एकदा स्व‍प्न‍ आणि सत्यभ यांचे जोरदार भांडण झाले. भांडणाचा विषय होता ’भविष्य  घडविण्याात सर्वाधिक सहभाग कोणाचा असतो’ दोघेही खूप भांडले, भरपूर वाद घातला पण निर्णय काही होईना. शेवटी दोघेही आपल्याह पित्यालकडे गेले. पित्या्ला वादाचा विषय सांगितला. पिता म्ह्णाला,’’ज्याल कोणाचे हात आभाळाला टेकतील पण तरीही पाय जमिनीवर असतील त्यापचा भविष्या घडविण्याीत निर्णायक सहभाग असतो.’’ दोघेही परत आले. सर्वप्रथम स्वाप्नाने एकाच उडीत त्यायचे हात आभाळाला टेकले, मात्र पाय जमिनीपासून केव्हा च उचलले गेले होते. मग सत्यायने प्रयत्नय केला मात्र त्यााचे पाय कायम जमिनीवर टेकलेले होते पण हात आभाळाला पोहोचू शकले नाहीत. दोघांनीही खूप प्रयत्नभ केले पण दोघेही अयशस्वी‍ राहिले. शेवटी थकून ते पुन्हाप एकदा पित्याोकडे गेले तेव्हाी पिता म्हनणाला,’’ भविष्यह घडविण्या्त सत्यि आणि स्वणप्न’ या दोघांचाही समान सहभाग असतो.’’


तात्पचर्य :- ख-या अर्थाने भविष्या घडवायचे असेल तर स्व प्नापला सत्याचच्याा खांद्यावर उभे राहायला हवे.

~ स्वप्न आणि सत्य - मराठी गोष्टी

=========

एक साधू तपश्‍चर्येस एका निर्जन स्‍थळी बसले होते. त्‍या ठिकाणी एका यक्षाचे वास्‍तव्‍य होते. या गोष्‍टीची साधूला कल्‍पना नव्‍हती. ते जेव्‍हा तेथे पोहोचले तेव्‍हा निर्जन स्‍थान पाहून त्‍यांनी तेथेच ध्‍यानधारणा सुरु केली. त्‍या वेळी यक्ष तेथे नव्‍हता. रात्री जेव्‍हा यक्ष तेथे आला तेव्‍हा आपल्‍या जागेवर दुस-यास व्‍यक्तीला पाहून त्‍याला राग आला. त्‍याने मोठ्याने आरडाओरड सुरु केली, पण समाधी अवस्‍थेत असलेल्‍या साधूवर त्‍याचा काहीच परिणाम झाला नाही. यक्षाने मग हत्तीचे रूप घेऊन त्‍यांना भीती दाखविण्‍याचा प्रयत्‍न केला. परंतु ते ध्‍यानस्‍थ असल्‍याने त्‍यांच्‍यावर याचा काहीच परिणाम झाला नाही. 

                मग यक्षाने वेगवेगळी रूपे घेऊन साधूला घाबरविण्‍याचा प्रयत्‍न केला. कधी तो वाघ, सिंह, तरस, कोल्‍हा अशा जंगली प्राण्‍यांची रूपे घेतली तरी साधूच्‍या ध्‍यानात काहीच खंड पडेना. शेवटी त्‍याने विषारी सापाचे रूप धारण करून त्‍यांना दंश केला तरीही त्‍यांच्‍यावर याचा काहीच परिणाम दिसेना. इतक्‍या प्रयत्‍नानंतरही साधूवर कोणताही परिणाम न झाल्‍याने यक्ष झालेल्‍या श्रमाने थकून सर्परूपातच विश्रांती घेऊ लागला. थोड्याच वेळात साधूंची समाधी अवस्‍था पूर्ण झाली व ते जागे झाले व त्‍यांची नजर सर्परूपी यक्षावर पडली. त्‍या नजरेत इतके प्रेमभाव भरलेले होते की त्‍या कृपादृष्‍टीने सापाच्‍या अंगातील विष अमृत बनले. यक्ष साधूंना शरण गेला व त्‍याने त्‍यांना आदरपूर्वक वंदन केले.

तात्‍पर्य – एकाग्रता, स्‍नेह आणि प्रेमभावनेने कोणावरही विजय प्राप्त करता येतो.

~ साधू आणि यक्ष - मराठी गोष्टी


=================

एक जिज्ञासूवृत्तीचा मुलगा होता. तो कोणतीही नवी गोष्‍ट शिकण्‍यास तयार होत असे. त्‍याने धनुष्‍यबाण तयार करण्‍यास ते कसे तयार करतात हे शिकून घेतले. नाव बनवणा-यांकडून नाव, घराचे बांधकाम, बासरी बनविणे इ. प्रकारात तो निपुण झाला. परंतु त्‍याच्‍यात अहंकार आला, तो आपल्‍या मित्रांना सांगत असे. या जगात माझ्याइतका प्रतिभावंत अन्‍य कोणी नसेल. एकदा या शहरात बुद्धांचे आगमन झाले. त्‍यांनी जेव्‍हा या मुलाची कला आणि अहंकाराबाबत ऐकले. तेव्‍हा त्‍यांना वाटले, या मुलाकडून आपण अशी कला शिकून घ्‍यावी जी आतापर्यंतच्‍या कलांमध्‍ये श्रेष्‍ठ असेल. ते भिक्षापात्र घेऊन त्‍याच्‍याकडे गेले. मुलाने विचारले, तुम्‍ही कोण आहात. बुद्ध म्‍हणाले,''मी शरीरावर नियंत्रण ठेवणारा माणूस आहे.'' मुलाने यावर त्‍यांना खुलासा विचारला असता बुद्ध म्‍हणाले,''जो धनुष्‍यबाण वापरतो त्‍याला त्‍याचा वापर माहित असतो, जो नाव हाकतो, जो घराचे बांधकाम करतो त्‍याला ते काम माहित असते. पण जो ज्ञानी आहे तो स्‍वत:वर नियंत्रण ठेवतो,'' मुलाने विचारले, ते कसे काय. बुद्ध म्‍हणाले, '' जर कोणी प्रशंसा केली तर अभिमानाने ताठ होत नाही तसेच निंदा केली तरी तो शांत राहतो, अशी व्‍यक्ती नेहमी आनंदी असते. मुलाला जाणीव झाली की सर्वात मोठे कौशल्‍य तर स्‍वत:ला नियंत्रणात ठेवण्‍याचे असते.

तात्‍पर्य :- ज्‍यांना स्‍वत:ला नियंत्रणात ठेवता येते त्‍याला समभाव ठेवता येतो. हाच समभाव अनुकूल आणि प्रतिकूल परि‍स्थितीत आपल्‍याला आनंदी ठेवतो.

~ आत्‍मनियंत्रणाचे महत्‍व - मराठी गोष्टी

===========

एका जातक कथेतील वर्णनानुसार वाराणसीलगत एका गावातील एक सुतार रोज जंगलात जात असे. एकदा त्‍याने खड्ड्यात पडलेल्‍या जंगली कुत्र्याच्‍या पिलाचा जीव वाचवला तेव्‍हापासून त्‍याला त्‍या पिलाचा लळा लागला. ते पिलू त्‍याला तेथे भेटत होते. ते पाहून इतरही जंगली कुत्रे त्‍याच्‍याजवळ येत असत. परंतु त्‍यांना सर्वांना एका वाघाने फार त्रस्‍त करून सोडले होते. तो रोज त्‍यांच्‍यावर हल्ले करत होता. सुताराने एक योजना बनविली. नेहमीप्रमाणे वाघ डोंगराच्‍या माथ्‍यावर आला. सर्व कुत्री वेगवेगळ्या ठिकाणी थांबून त्‍याच्‍यावर भुंकु लागली. वाघाने चवताळून एका कुत्र्यावर झेप घेतली तसा तो कुत्रा खाली बसला. वाघाची उडी थेट त्‍या कुत्र्याच्‍या मागे असणा-या एका मोठ्या खड्ड्यात पडली. सगळ्या कुत्र्यांनी त्‍याच्‍यावर धाव घेतली व त्‍याच्‍यावर हल्‍ला करून त्‍याला ठार केले.

तात्‍पर्य :- एकीचे बळ मोठे असते.

~ एकीचे बळ सर्वश्रेष्‍ठ - मराठी गोष्टी

===========

एका वेड्यांच्‍या हॉस्पिटलमध्‍ये वेड्यांना बाहेर पडेपर्यंत म्‍हणजेच पूर्ण बरा झाला आहे की नाही हे पाहण्‍यासाठी अनेक मानसशास्‍त्रीय चाचण्‍यांना तोंड द्यावे लागत असे. त्‍यातील शेवटच्‍या चाचणीमध्‍ये वेड्यासमोर एक नवे कोरे चकचकीत पाच रूपयांचे नाणे आणि एक मळकट पन्‍नास रूपयांची नोट ठेवली जाई. त्‍यातील फक्त एकच गोष्‍ट त्‍याला उचलण्‍यास सांगितली जाई. वेड्याने पन्‍नास रूपये उचचले की त्‍याला डिसचार्ज दिला जाई व तसे न केल्‍यास त्‍याला पुन्‍हा एकदा चाचण्‍या पार करायला सांगितल्‍या जात. गरज पडल्‍यास पुन्‍हा उपचारासाठीही पाठविले जाई. 

                हॉस्‍पीटलमधील एक वेडा शेवटच्‍या चाचणीपर्यंत सगळ्या चाचण्‍या पटापट पार करत असे मात्र शेवटच्‍या चाचणीला मात्र नापास होत असे. अनेकदा असे घडल्‍यावर चाचणी घेणारे डॉक्‍टर कंटाळले व त्‍यांनी एक युक्ती केली पुढच्‍या वेळेला त्‍या वेड्यासमोर एक पाच रूपयांची जुनी नोट व पन्‍नास रूपयांची कोरी करकरीत नवी नोट ठेवली तरीही त्‍या वेड्याने पाच रूपयांचीच नोट उचचली. हे पाहून डॉक्‍टर आश्‍चर्यचकित झाले व ओरडले,'' अरे मूर्खा, सगळ्या चाचण्‍या आरामात पार करतोस आणि शेवटच्‍या चाचणीत मात्र कायम चुकतोस. तुला पाच आणि पन्‍नास यातील फरक कळत नाही काय'' वेडा शांतपणे म्‍हणाला,'' ते मला चांगलं कळतं डॉक्‍टरसाहेब, पण इथून बाहेर पडलो की, मला रोजचा खर्च स्‍वत:लाच करावा लागणार आहे. त्‍यापेक्षा पाच रूपयांचे नाणे उचचले की, मला इथून बाहेर पडावे लागत नाही, पाच रूपयेही मिळतात आणि खाणेपिणेराहणे सगळे काही फुकटात होते. मग मी पन्‍नास रूपयांची नोट उचलून स्‍वत:च्‍या पायावर धोंडा पाडून का म्‍हणून घेऊ''

~ खरा वेडा कोण - मराठी गोष्टी

=============

एक राजा होता. त्‍याचे सुखी व संपन्न राज्‍य होते. दुर्दैवाने एकदा त्‍याच्‍या राज्‍यात पाऊसच पडला नाही. त्‍यामुळे दुष्‍काळाचे संकट उभे ठाकले. गरिबांचे हाल होऊ लागले. बादशहाने आपला खजिना जनतेसाठी खुला केला. एकेदिवशी तो खजिनाही संपला. आता पुढे काय हा प्रश्‍न राजासमोर उभा ठाकला. प्रजाजनांचे पोषण कसे करता येईल ही एकच चिंता राजाला सतत सतावित होती. त्‍याने त्‍याच्‍या बोटातली हि-याची अंगठी नोकरांना दिली व सांगितले,'' ही अंगठी घेऊन शेजारच्‍या देशात जा, तेथील राजाला आपली सर्व परि‍स्थिती सांगा. तो राजा आपली अवस्‍था जाणेल व हा हिरा फार दुर्मिळ आहे. या हि-याच्‍या बदल्‍यात त्‍याच्‍याकडून धान्‍य मागून आणा व जनतेत वाटप करा. '' मंत्र्यांनी राजाला विचारले,''राजन, इतका महागडा, दुर्मिळ हिरा तुम्‍ही का विकत आहात, दुसरी काहीतरी सोय करता येईल.'' राजा म्‍हणाला,''माझे राज्‍य ही माझी संपत्ती आहे. प्रजा उपाशी मरत असताना मी महागडा हिरा का सांभाळत बसू. प्रजा आहे तर मी आहे. असे हिरे पुन्‍हा प्राप्‍त करता येतील पण प्रजा एकदा जर नाराज झाली तर पुन्‍हा अशी प्रजा मला मिळणार नाही.''


तात्‍पर्य :- आपल्‍या हाती जर सत्‍ता असेल तर त्‍याचा योग्‍य विनियोग कसा करता येईल हे पहाणे इष्‍ट ठरते.

~ हि-यापेक्षा जनता महत्‍वाची - मराठी गोष्टी


000000


एक मुलगा खूपच सरळमार्गी आणि प्रामाणिक होता. त्‍याच्‍यावर त्‍याच्‍या आईवडीलांनी चांगले संस्‍कार केले होते व त्‍या संस्‍कारांना अनुसरुन तो वागत होता. एकदा काही निमित्ताने तो शेजा-याच्‍या घरी गेला. शेजारी कुठेतरी बाहेर गेला होता. शेजा-याच्‍या नोकराने मुलाला बसायला सांगितले आणि नोकर निघून गेला. मुलगा जिथे बसला होता तिथे जवळ एका टोपलीत उत्तम दर्जाची सफरचंदे ठेवली होती. त्‍या मुलालाही सफरचंद खूप आवडत असत पण त्‍याने त्‍यांना हात लावला नाही. तो शेजा-याची वाट पाहात बसला होता. ब-याच वेळाने शेजारी घरी परतला त्‍याने पाहिले की मुलगा बसला आहे व त्‍याच्‍याशेजारी सफरचंदे असूनही तो त्‍यांना हातसुद्धा लावत नाही. 

             मुलाला सफरचंद खूप आवडतात हे शेजा-याला माहित होते. शेजारी येताच मुलाने उठून नमस्‍कार केला, शेजा-याने त्‍याला जवळ घेतले व विचारले,''तुला सफरचंद तर खूप आवडतात ना, मग तरीसुद्धा एकही सफरचंद उचलून का खाल्‍ले नाहीस'' मुलगा म्‍हणाला,'' इथेच कोणीच नव्‍हते, मी दोन तीन सफरचंदे जरी उचलून घेतली असती तरी कुणालाच कळले नसते, कोणीच मला पाहात नव्‍हते पण कोणी पाहत नव्‍हते पण मी स्‍वत:ला ते पाहात होतो. परंतु मी स्‍वत:ला फसवू शकत नाही.'' शेजा-यास त्‍याच्‍या या बोलण्‍याचा आनंद वाटला. त्‍याने त्‍याला शाबासकी दिली व म्‍हणाला,'' आपण करतो ते आपला आत्‍मा पाहात असतो, आपण आपल्‍याला कधीच फसवू शकत नाही. दुस-याला लाख फसवू पण स्‍वत:शी खोटे बोलणे फार अवघड आहे. सर्वांनीच तुझ्यासारखे वर्तन केल्‍यास जग सुखी होईल.''


तात्‍पर्य :- लहानपणीच मुलांना खोटे वागणे, बोलणे यापासून दूर ठेवल्‍यास मुले भविष्‍यात योग्‍य वर्तन करतील. वाईट गुण घेण्‍यास क्षणाचाही विलंब लागत नाही पण चांगले शिकण्‍यास खूप काळ जावा लागतो. मुले वाईट वर्तनाची निघाल्‍यास त्‍याचा दोष आईवडीलांना येतो.

==============

एक माणूस कामासाठी दुस-या शहरात गेला. प्रवासात त्‍याची काही लोकांशी ओळख झाली. तेही कामानिमित्ताने त्‍याच शहरात चालले होते. त्‍यांच्‍यापैकी काहीजण पायी तर काही घोड्यावर स्‍वार होते. बोलत चालले असताना एका घोडेस्‍वाराच्‍या हातून चाबूक खाली पडला. त्‍या व्‍यक्तिने त्‍या घोडेस्‍वारास खाली उतरू न देता, चाबूक देण्‍याची तयारी दर्शविली पण त्‍या सहका-यास नम्रपणे नकार देत स्‍वत: खाली उतरून त्‍या घोडेस्‍वाराने चाबूक स्‍वत:च हातात घेतला.

             खालून मदत करणा-या व्‍यक्तिने याचे कारण घोडेस्‍वारास विचारले असता घोडेस्‍वार उत्तरला,''आपण ज्‍यावेळी घोड्यावर बसतो तेव्‍हा चाबूक आपणच सांभाळावा लागतो. आपण प्रत्‍येक गोष्‍टीत स्‍वयंपूर्ण राहिलो तरच आपल्‍याला यशाची खात्री आहे असे समजावे.''

तात्‍पर्य :- कुणावरही विसंबून न राहता स्‍वावलंबनाचा स्‍वीकार केल्‍याने यश मिळतेच.

~ स्‍वावलंबन - मराठी गोष्टी

====================

एका माणसाने त्‍याच्‍या घरी एक पोपट पाळला होता. पिंज-यात ठेवलेल्‍या पोपटाला चांगले खायलाप्‍यायला मिळत असे व पोपट बोलका असल्‍याने घरातील लोकांकडून त्‍याचे फार कौतुकही केले जाई. पण पोपटाच्‍या मनात मात्र पारतंत्र्याचे शल्‍य दाटून येई. अखेर एकेदिवशी पोपटाला संधी चालून आली. त्‍या माणसाने पोपटाला खाणे देण्‍यासाठी पिंज-याचे दार उघडले होते व त्‍याच्‍याहातून ते तसेच उघडे राहिले होते. माणसाला अचानक काही काम आल्‍याने तो ते
दार उघडे टाकून निघून गेला असता

             पोपट पिंज-याच्‍या बाहेर निघून गेला. पण लहानपणापासूनच पिंज-यात राहिला असल्‍याने त्‍याला फारसे नीट उडताच येत नव्‍हते. एका झाडावर गेला असता त्‍याला इतर पोपटांशी बोलता येईना कारण लहानपणापासूनच तो परकी भाषा शिकत असल्‍याने त्‍याला पोपटांची भाषा येत नव्‍हती म्‍हणून इतर पोपटही त्‍याला सहकारी मानत नव्‍हते. पिंज-यात आयते खायची सवय असल्‍याने त्‍याला अन्न मिळवणे अवघड जाऊ लागले व ऊन वारा पाऊस यांची कधीच सवय नसल्‍याने तो आजारी पडला व
मरून गेला.

तात्‍पर्य : - जास्‍त काळ पारतंत्र्यात(गुलामगिरीत) राहिल्‍याने तशीच गुलामगिरीची सवय अंगात मुरुन राहते. मग परक्याची भाषा, संस्‍कृतीच आपली वाटू लागते आणि मिळालेले स्‍वातंत्र्य टिकवण्‍यासाठीची जिद्द अंगी राहत नाही. परक्‍या संस्‍कृतीचे चांगले काही घेताना आपल्‍या संस्‍कृतीचे विस्‍मरण होऊ न देणे हाच खरा शहाणपणा.

~ सवय - मराठी गोष्टी

===================

सदाचारी असेल तरचं लक्ष्मी, दान यांचा वास असतो

महाभारतकालीन राजा सत्यदेव एक दिवस सकाळी उठले, तर त्यांना एक सुंदर स्त्री राजवाड्यातून बाहेर पडताना दिसली. राजाने आश्‍चर्यचकित होऊन त्या स्त्रीला हात जोडून नम्रपणे विचारले, ‘आपण कोण आहात ?’ त्यावर त्या स्त्रीने सांगितले, ‘मी लक्ष्मी आहे, आता या राजवाड्यातून मी जात आहे.’ तेव्हा राजाने तिला सांगितले, ‘तू जाऊ शकतेस.’ लक्ष्मी बाहेर पडली. नंतर लक्ष्मीच्या पाठोपाठ एका सुंदर पुरुषाला राजवाड्याबाहेर पडताना पाहून राजाने त्यालाही विचारले, ‘आपण कोण आहात ?’ त्याने उत्तर दिले, ‘माझे नाव ‘दान’ आहे. लक्ष्मी बाहेर गेल्यानंतर आपण दान करू शकणार नाही; म्हणून मीही तिच्यासह जात आहे.’ राजाने सांगितले ‘आपणसुद्धा राजवाडा सोडून जाऊ शकता.’ त्यानंतर त्याच्या पाठोपाठ तिसरा पुरुष ‘यश’ निघून गेला. त्यानंतर चौथा पुरुष प्रकट झाला अन् बाहेर पडू लागला. तेव्हा राजाने त्यालाही हात जोडून नम्रपणे त्याचे नाव विचारले. तो पुरुष म्हणाला, माझे नाव ‘सदाचार ! राजाने त्याला म्हटले, ‘मी तर तुझा कधीच त्याग केला नाही. तू मला सोडून का जात आहेस ? तुझ्यासाठीच मी लक्ष्मी, दान आदींचा त्याग केला आहे. मी तुला जाऊ देणार नाही. तू मला सोडून गेलास, तर माझे सर्वस्व जाईल !’ राजाचे हे बोल ऐकून सदाचार राजवाड्यातच थांबला. सदाचार बाहेर पडला नाही, हे पाहून बाहेर गेलेली लक्ष्मी, दान आणि यशही परत आले.

तात्पर्य :- सदाचाराने वागणे हेच आयुष्याचे सर्वस्व आहे. जीवनात सदाचार (नीतीमत्ता, धर्माचरण आदी) नसेल, तर दान, लक्ष्मी (श्रीमंती) आदींचा काहीच उपयोग नाही.

+++++

बालकथा : झाड आणी कुर्‍हाडीचा दांडा
एक लाकूडतोड्या रानातले एक मोठे झाड कुर्‍हाडीने तोडत होता. त्यामुळे त्या झाडास खूप वेदना होऊ लागल्या. तेव्हा ते झाड दुःखाने म्हणाले, 'काय ही माझी स्थिती ! हा माणूस किंवा ही कुर्‍हाड करते आहे ते काही चूक नाही. पण माझ्याच शरीरापासून बनवलेला हा कुर्‍हाडीचा दांडा मात्र मलाच मारायला मदत करतो आहे, याचं फार वाईट वाटतं.'

तात्पर्य - आपल्या जवळच्या लोकांनीच आपल्यावर संकट आणावे, यासारखी दुःखदायक गोष्ट नाही.

+++++++++

बालकथा : माकड आणि मासा
एकदा एक तारू मुंबईजवळ एका खडकावर आपटून फुटले. तेव्हा त्यावर असलेले एक माकड समुद्रात पडून बुडू लागले. तेव्हा एका माशाला वाटले तो मनुष्यच आहे. म्हणून त्याला आपल्या पाठीवर घेऊन मासा किनार्‍याकडे निघाला. वाटेत त्याने माकडाला विचारले, 'अरे माणसा, तू कोणत्या गावचा ?'

माकडाने सांगितले, 'मी मुंबईचा?'

माशाने पुन्हा विचारले, 'गिरगावाची माहिती तुला आहे' आपण मनुष्य आहोत असे त्याच्या मनावर बिंबवावे म्हणून माकडाने उत्तर दिले, 'गिरगाव हे गृहस्थ माझे नातेवाईकच आहेत; माझे वडील आणि ते सख्खे भाऊ.'

या मूर्खासारख्या बोलण्याचा माशाला इतका राग आला की, त्याने त्या माकडाला ताबडतोब पाठीवरून फेकून दिले. त्याबरोबर ते समुद्रात बुडून मरण पावले.

++++++++++

अस्वल आणि दोन मित्र

 एकदा दोन चांगले मित्र जंगलातील एकाकी आणि धोकादायक वाटेवरून चालले होते. सूर्य मावळतीला जात असताना त्यांची भीती वाढली पण दोघांनी एकमेकांना घट्ट धरून ठेवले. अचानक त्यांना वाटेत अस्वल दिसले. एकजण पट्कन जवळच्या झाडाकडे पळाला आणि क्षणार्धात झाडावर चढला. दुसऱ्या मुलाला झाडावर चढता येत नव्हते म्हणून तो जमिनीवर मेल्याचे ढोंग घेऊन पडून राहिला.अस्वल जमिनीवर पडलेल्या मुलाजवळ आले, आणि त्याने त्याला डोक्यापाशी हुंगले. मुलगा मेला आहे असा विचार करून अस्वल त्याचा वाटेने निघून गेले.झाडावरचा मुलगा खाली उतरला. त्याने मित्राला विचारले,"अस्वलाने तुझा कानात काय सांगितले?"तो उत्तरला,"ज्या मित्रांना तुमची काळजी नसते अशा मित्रांवर विश्वास ठेऊ नका."तात्पर्य: संकटकाळात जो मदत करतो तोच खरा मित्रनैतिक मूल्यांसह असलेल्या ह्या लघुकथा, आपल्या मुलांना उत्तम धडे देतील तसेच तुम्हाला त्यांच्यासोबत चांगला वेळ घालवण्यास मदत करतील. जेव्हा आपण मुलांचे मनोरंजन करू इच्छित असाल तेव्हा नैतिक मूल्यांसह कथा हा नेहमीच चांगला पर्याय ठरेल.

++++++++++

एका शेतकर्‍याने पक्षी धरण्यासाठी एक जाळे मांडून ठेवले होते. त्यात एका पारव्यामागे लागलेली एक घार सापडली. जाळ्यातून सुटून जाण्यासाठी ती पंख फडफडावून धडपड करीत आहे, तोच शेतकरी त्या ठिकाणी आला व तिला धरून ठार मारू लागला. 

तेव्हा ती त्याची विनवणी करून म्हणाली, 'दादा, मला मारू नको, मी तुझा काही अपराध केलेला नाही. मी त्या पारव्याच्या मागे लागले होते. हे ऐकून शेतकरी तिला विचारू लागला, 'अग, मग त्या पारव्याने तरी तुझा कोणता अपराध केला होता?' असे म्हणून त्याने तिला ठार मारले.

तात्पर्य - जे लोक निरपराधी लोकांना विनाकारण त्रास देतात, त्यांना त्रास देणारा त्यांच्यापेक्षा बलिष्ठ असा भेटला म्हणजे ते अगदी दीन होऊन साधूत्वाचा आव आणतात, पण त्याचा काही उपयोग न होता, त्यांच्या वाईट कर्माची फळे त्यांना भोगावीच लागतात.

++++++++++++

एक बोकड एका डोंगराच्या माथ्यावर चरत असता एकाएकी मोठे वादळ झाले. त्यापासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी तो बोकड जवळच्या दाट झाडीत जाऊन बसला. ती जागा शांत व निवार्‍याची असल्याने त्याला तेथेच झोप लागली. 

काही वेळाने वादळ शांत झाल्यावर तो जागा झाला व घरी जाण्यास निघाला, तेव्हा त्याला असे आढळून आले की, त्याच्या लोकरीत काटेरी झाडाची एक फांदी अडकली आहे. थोडा वेळ हिसकाहिसकी केल्यावर बरीचशी लोकर गेल्यावर ती फांदी बाजूला झाली व तो आपल्या घरी गेला.

तात्पर्य - काहीही अपेक्षा न ठेवता आश्रय देणारे किंवा दुसर्‍याचे रक्षण करणारे लोक थोडेच असतात.



+++++++++++++


एका रानातल्या खडकावर दोन घोरपडी उन्ह खात बसल्या असता त्यापैकी एकजण दुसरीस म्हणाली, 'आमची स्थिती मोठी शोचनीय आहे ! आम्ही फक्त जिवंत आहोत एवढंच, बाकी सगळ्या जगात आमच्याकडे कोणी ढुंकूनही बघत नाही.

आमच्या क्षुद्रतेचा धिक्कार असो ! यापेक्षा रानातल्या वार्‍यासारख्या उड्या मारणार्‍या हरणाचा जन्म मिळाला असता तर काय मजा आली असती !' हे बोलत असताच एक हरिणामागे लागलेल्या शिकारी कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज ऐकू आला व धावून थकलेल्या हरणाचा जीव कुत्र्याने घेतलेला तिने प्रत्यक्ष पाहिला.

त्यावेळी दुसरी घोरपड आपल्या स्थितीविषयी कुरकुरणार्‍या पहिल्या घोरपडीला म्हणाली, 'ज्या हरणाचं जीवन आपल्याला मिळावं अशी इच्छा तू करीत होतीस त्या हरणाची स्थिती किती भयंकर आहे, हे आता प्रत्यक्षच पाहा अन् ज्या मोठेपणाबरोबर अनेक दुःखही भोगावी लागतात तो मोठेपणा देवाने आपणास दिला नाही याबद्दल त्याचे आभार मान !'

तात्पर्य - बाह्य रूपावर जाऊन फसू नये, कारण त्याच्या अंतर्यामी दुःख असण्याचीच शक्यता असते.

************

एके दिवशी काही घुबडे, वटवाघुळे आणि इतर दिवाभीते एका दाट सावलीच्या झाडावर बसून आपल्या शेजार्‍यापाजार्‍यांस यथेच्छ शिव्या देत होते. शेवटी त्यांनी सूर्याची निंदा करण्यासही कमी केले नाही. 

ते म्हणू लागले, 'हा सूर्य फार त्रासदायक, उद्धट आणि विनाकारण लोकांच्या उठाठेवी करणारा आहे.' त्यांचे हे बोलणे ऐकून सूर्य त्यांना म्हणाला, 'बाबांनो, जो मी तुम्हा सर्वांना एका क्षणात जाळून टाकण्यास समर्थ आहे त्या माझी तुम्ही अशी निंदा करावी, याचे मला आश्चर्य वाटते. पण मी तुमच्या बडबडीकडे बिलकुल लक्ष न देता, पूर्वी सारखाच यापुढेही तापत राहणार, याबद्दल तुमची खात्री असूं द्या.'

तात्पर्य - मूर्ख व हटवादी लोकांच्या बडबडीकडे लक्ष देऊन शहाणे लोक आपले काम सोडत नाहीत.

**************

एक माणूस कामासाठी दुस-या शहरात गेला. प्रवासात त्‍याची काही लोकांशी ओळख झाली. तेही कामानिमित्ताने त्‍याच शहरात चालले होते. त्‍यांच्‍यापैकी काहीजण पायी तर काही घोड्यावर स्‍वार होते. बोलत चालले असताना एका घोडेस्‍वाराच्‍या हातून चाबूक खाली पडला. त्‍या व्‍यक्तिने त्‍या घोडेस्‍वारास खाली उतरू न देता, चाबूक देण्‍याची तयारी दर्शविली पण त्‍या सहका-यास नम्रपणे नकार देत स्‍वत: खाली उतरून त्‍या घोडेस्‍वाराने चाबूक स्‍वत:च हातात घेतला.

             खालून मदत करणा-या व्‍यक्तिने याचे कारण घोडेस्‍वारास विचारले असता घोडेस्‍वार उत्तरला,''आपण ज्‍यावेळी घोड्यावर बसतो तेव्‍हा चाबूक आपणच सांभाळावा लागतो. आपण प्रत्‍येक गोष्‍टीत स्‍वयंपूर्ण राहिलो तरच आपल्‍याला यशाची खात्री आहे असे समजावे.''

तात्‍पर्य :- कुणावरही विसंबून न राहता स्‍वावलंबनाचा स्‍वीकार केल्‍याने यश मिळतेच.

~ स्‍वावलंबन - मराठी गोष्टी

************************

एका माणसाने त्‍याच्‍या घरी एक पोपट पाळला होता. पिंज-यात ठेवलेल्‍या पोपटाला चांगले खायलाप्‍यायला मिळत असे व पोपट बोलका असल्‍याने घरातील लोकांकडून त्‍याचे फार कौतुकही केले जाई. पण पोपटाच्‍या मनात मात्र पारतंत्र्याचे शल्‍य दाटून येई. अखेर एकेदिवशी पोपटाला संधी चालून आली. त्‍या माणसाने पोपटाला खाणे देण्‍यासाठी पिंज-याचे दार उघडले होते व त्‍याच्‍याहातून ते तसेच उघडे राहिले होते. माणसाला अचानक काही काम आल्‍याने तो ते
दार उघडे टाकून निघून गेला असता

             पोपट पिंज-याच्‍या बाहेर निघून गेला. पण लहानपणापासूनच पिंज-यात राहिला असल्‍याने त्‍याला फारसे नीट उडताच येत नव्‍हते. एका झाडावर गेला असता त्‍याला इतर पोपटांशी बोलता येईना कारण लहानपणापासूनच तो परकी भाषा शिकत असल्‍याने त्‍याला पोपटांची भाषा येत नव्‍हती म्‍हणून इतर पोपटही त्‍याला सहकारी मानत नव्‍हते. पिंज-यात आयते खायची सवय असल्‍याने त्‍याला अन्न मिळवणे अवघड जाऊ लागले व ऊन वारा पाऊस यांची कधीच सवय नसल्‍याने तो आजारी पडला व
मरून गेला.

तात्‍पर्य : - जास्‍त काळ पारतंत्र्यात(गुलामगिरीत) राहिल्‍याने तशीच गुलामगिरीची सवय अंगात मुरुन राहते. मग परक्याची भाषा, संस्‍कृतीच आपली वाटू लागते आणि मिळालेले स्‍वातंत्र्य टिकवण्‍यासाठीची जिद्द अंगी राहत नाही. परक्‍या संस्‍कृतीचे चांगले काही घेताना आपल्‍या संस्‍कृतीचे विस्‍मरण होऊ न देणे हाच खरा शहाणपणा.

************
एकदा एका धनगराला वाटले आपल्या मेंढ्यांना बाभळीच्या शेंगा खाऊ घालाव्यात. म्हणून तो आपले धोतर झाडाखाली ठेवून, झाडावरून शेंगा आणि पाला खाली टाकू लागला.

ते खात असताना त्यातील काही मेंढ्या त्याचे धोतरही खाऊ लागल्या. ते पाहून वरून धनगर म्हणाला, 'अरे, इतरांना तुम्ही कपड्यांसाठी तुमची लोकर देता पण मी जो तुमचा मालक त्याचं धोतर मात्र तुम्ही खाऊन टाकता ? हा किती कृतघ्नपणा !'

तात्पर्य - भुकेच्या वेळी आपण काय करतो आहोत याची शुद्ध प्राणिमात्रांना रहात नाही.

****************
एकदा एका कुत्र्याच्या मागे गावातली पाचपंचवीस कुत्री लागली. पळून पळून तो कुत्रा अगदी दमून गेला. तेव्हा त्याने विचार केला, 'आता काही आपण यांच्या तावडीतून सुटत नाही. तेव्हा काय होईल ते होईल आपणच यांच्यावर चालून जावे.'

असे म्हणून तो मागे वळला आणि मोठमोठ्याने गुरगुरत त्यांच्यावर तुटून पडला. त्याचा तो आवेश बघून त्या कुत्र्यांची गाळण उडाली. ती कुत्री भिऊन पळून गेली.

तात्पर्य - संकटाचे वेळी धीटपणाच कामी येतो

+++++++++

एका गरीब भोळ्या कोकीळाला एका घारीचे मरणप्राय भय वाटले. कारण घार तिच्या डोक्यावर ओरडत व भक्ष्यासाठी घिरट्या घालत फिरत होती. ते पाहून एक पोपट कोकीळाला म्हणाला की, 'इकडे ये, घाबरू नको, धीर धर. 

हा सर्व किलकिलाट व धडपड केवळ मूर्खपणाची आहे. शेवटी या आळशी घारीने एखादा गरीब बेडूक किंवा उंदीर पकडलेला तू पाहशील, अरे ससाणे हे खरे भयंकर पक्षी असून ते काही गडबड न करता मुकाट्याने प्राणी पकडून खातात.'

तात्पर्य - बोलेल तो करेल काय ? गर्जेल तो पडेल काय ?

++++++++++


एका मांजराने आपल्या मालकाचा आवडता पोपट मारून खाल्ला. तेव्हा मालकाने, 'ते मांजर दिसले तर मारून टाकीन' असे रागाने म्हटले. ते ऐकताच मांजर इतके घाबरले की ह्या प्रसंगातून देवाने आपल्याला वाचविले तर पुढे आपण कोणताही पक्षी कधीही मारून खाणार नाही अशी प्रतिज्ञा केली.

थोड्या वेळाने दिवाणखाण्याच्या खिडकीतून एक वटवाघूळ अचानक आत आले ते पाहून असल्या मोह उत्पन्न करणार्‍या प्रसंगी कोणत्या प्रकारचे वर्तन करावे हा प्रश्न मांजराला पडला. एकीकडे भूक व दुसरीकडे प्रतिज्ञाभंग होण्याची भिती अशा पेचात ते सापडले असता काही वेळाने आपली भूक भागविण्याची एक युक्ती त्याला आढळून आली. वटवाघूळाकडे पाहून ते आपल्याशीच म्हणाले, 'हा पक्षी आहे असं जर मानलं तर केलेल्या प्रतिज्ञेप्रमाणे याला हात लावण्याचा अधिकार मला नाही, पण याच्या तोंडाचं उंदराच्या तोंडाशी इतकं साम्य आहे की, याला मारून खाण्याचा अधिकार मला आहे.' इतके बोलून तिने त्या वटवाघूळाला खाऊन टाकले.

तात्पर्य - स्वार्थ साधण्याची वेळ आली असता लबाड लोक आपली प्रतिज्ञा युक्तीने गुंडाळून ठेवतात.
+++++++



एकदा एक गाढव पाठीवर लादलेल्या ओझ्याने खचून जाऊन एका डबक्यात पडले आणि मोठमोठ्याने ओरडू लागले.

ते ऐकून तिथेच असलेला एक बेडूक त्याला म्हणाला, 'अरे तू आत्ता थोडा वेळ या डबक्यात पडला आहेस तर इतका ओरडतोस, मग आमच्याप्रमाणे जर जन्मभर इथेच राहण्याचा प्रसंग आला तर तू काय करशील ?'

तात्पर्य - एखाद्याला जी गोष्ट सवयीमुळे साधी वाटते तीच गोष्ट दुसर्‍याला कठीण वाटते.


एका हरिणामागे काही शिकारी लागले असता ते एका द्राक्षाच्या वेलापाठीमागे लपून बसले. त्यामुळे त्या शिकार्‍यांना ते दिसेना. म्हणून ते शिकारी निराश होऊन मागे फिरले. ते पाहताच त्या हरणाने त्या वेलाची पाने खाण्यास सुरुवात केली. 

त्यामुळे तो वेल हलू लागला. वेल हालत असलेला एका शिकार्‍याने पाहिले व त्याला शंका आली की, येथे एखादे सावज असावे. म्हणून त्याने बरोबर त्याच्या अनुरोधाने आपल्या बंदुकीतील गोळी मारली व हरिण तात्काळ मरण पावले. मरतेवेळी ते आपल्याशी म्हणाले, 'माझ्या कृतघ्नपणाचं योग्य बक्षीस मला मिळालं. ज्या वेलानं संकटसमयी मला आपल्या पाठीशी घातलं त्याच्यावर मी तोंड टाकावं ही केवढी कृतघ्नता !'

तात्पर्य - उपकारकर्त्यावरच अपकार करणे ही मोठी कृतघ्नता होय.


+++++++++++++

एक गाढव रानात फिरत असता त्याला एक सिंहाचे कातडे सापडले. ते पांघरून तो रानात हिंडू लागला. त्याला पाहून हा सिंहच आहे अशा समजुतीने सगळे प्राणी भिऊन पळू लागले. 

याप्रमाणे कित्येक दिवस त्या गाढवाने मोठी अंदाधुंदी करून सगळ्या जनावरांस चकविले. पुढे एके दिवशी एक कोल्हा त्याला दिसला. तो त्याच्यावर मोठ्या आवेशाने चालून गेला आणि सिंहासारखा आवाज काढण्यासाठी मोठमोठ्याने ओरडू लागला, पण गाढवाला सिंहासारखा आवाज कसा काढता येणार ? अर्थातच त्याचा आवाज ऐकून कोल्हा त्याला म्हणाला, ' मामा, आता पुरे करा.

आपण जर क्षणभर आपली जीभ आवरली असती तर मीही आपणास सिंह समजून घाबरलो असतो, पण आपल्या ओरडण्यावरून आपण कोण आहात ते मी बरोबर ओळखलं आहे !' 

तात्पर्य - दुसर्‍याची नक्कल हुबेहूब करण्याचे काम फार कठीण आहे. नुसत्या पोशाखाच्या नकलेने काही भोळी माणसे कदाचित फसतील पण चतुर माणसे आवाजावरून व इतर हालचालीवरून माणसाचे खरे स्वरूप काय आहे, हे ओळखल्याशिवाय राहणार नाहीत.

+++++++++
एका खेडेगावातील लोकांचे चोरापासून रक्षण करण्यासाठी एक शिकारी कुत्रा होता. तो एके दिवशी आपल्या पिल्लाला घेऊन गंभीरपणे गावातून फिरत असता गावातील सगळी भिकार कुत्री त्याच्याभोवती गोळा होऊन भुंकू लागली.

आपल्या वडिलांचा ह्या फालतू कुत्र्यांनी असा अपमान केलेला पाहून त्या शिकारी कुत्र्याच्या पोराला फार राग आला. मग ते आपल्या वडीलांना म्हणाले, 'बाबा, त्या कुत्र्यांवर तुटून पडून त्यांना चांगली शिक्षा का करत नाही?' त्यावर शिकारी कुत्रा म्हणाला, 'अरे मुला, ही भिकारी कुत्री गावात आहेत म्हणूनच माझी किंमत काय आहे हे लोकांना समजते आहे.'

तात्पर्य - सर्वसामान्य लोकांनी काही कारण नसताना चालविलेल्या ओरडीकडे मोठे लोक लक्ष देत नाहीत.
=============

अमेरिका खंडात एका जातीचा पक्षी आहे तो वाटेल त्या प्राण्याच्या आवाजाची अगदी हुबेहूब नक्कल करतो. पण आपले असे काही स्वर तो त्या आवाजात मिळवू शकत नाही. एकदा हा पक्षी रानातल्या एका झाडावर बसून तेथे गात असलेल्या कोकिळेची नक्कल करून तिला वेडावू लागला.

ते पाहून कोकिळा त्याला म्हणाली, 'अरे आमच्या गाण्यात बरेच दोष असतील. ते आम्ही कबूल करतो. तेवढ्यासाठी तू आम्हाला वेडावून दाखविण्यापेक्षा आमच्या गाण्यातला दोष दाखवून त्यात सुधारणा सुचवशील तर तुला आम्ही काही मान देऊ.'

तात्पर्य - दुसर्‍यास वेडावून त्याचा उपहास करण्यात मोठेसे भूषण नाही. तर त्याच्या चुका दाखवून त्यात सुधारणा करणे हे भूषण होय.

===============


एकदा एका सापाच्या शेपटाने त्याच्या डोक्याविरुद्ध बंड उभारले. ते म्हणाले, 'कोणत्याही प्राण्याच्या एकाच शेपटानं वाटेल तिकडं जावं अन् दुसर्‍या शेपटाला त्याच्या मनाविरुद्ध आपल्या बरोबर ओढत न्यावं ही मोठ्या लाजेची व जुलुमाची गोष्ट आहे.'

हे शेपटाचे बोलणे ऐकून डोक्याने त्याची समजूत घालण्याचा खूप प्रयत्‍न केला. ते म्हणाले, 'शेपटाला डोळे नाहीत, मेंदू नाही. यामुळेच त्याला वाटेल तिकडे जाण्याचे स्वातंत्र्य नाही.' 

पण डोक्याचा हा युक्तिवाद शेपटास आवडला नाही. त्याने आपला हट्टीपणा तसाच चालू ठेवला. ते पाहून डोक्यास फार राग आला. त्याने त्यास वाटेल तिकडे जाण्याची परवानगी दिली. 

मग शेपटाने आपल्या इच्छेप्रमाणे फिरावयास सुरुवात केली. साप शेपटाकडून मागे सरपटत चालला असता एका उंच कड्यावरून खाली घसरला व त्यामुळे त्याच्या सर्व अंगाला फारच लागले. आपल्या मूर्खपणामुळे असे घडले हे पाहून शेपटास फार लाज वाटली व डोक्याशी स्पर्धा करण्याचे त्याने अजिबात सोडून दिले.

तात्पर्य - प्रत्यक्ष अनुभवाशिवाय स्वतःची किंमत व कर्तबगारी काय आहे हे मनुष्यास समजत नाही.
===================

एक सिंह फार म्हातारा झाला होता. तो अगदी मरावयास टेकला आहे असे कळताच ज्या प्राण्यांना त्याने त्रास दिला होता ते सगळे सूड घेण्यासाठी तो पडला होता तेथे आले. बैलाने आणि रेड्याने आपली शिंगे रोवून त्याला जखमी केले. कुत्र्याने त्याच्या अंगावर भुंकून त्याला चावे घेतले. 

रानडुकराने आपले सुळे त्याच्या पोटात खुपसले व शेवटी गाढव पुढे होऊन त्याने त्याच्या तोंडावर लाथा झाडल्या. त्या वेळी मरावयास टेकलेला तो सिंह म्हणाला, 'देवा रे देवा, माझी ही काय स्थिती केली आहेस ?' शूर व पराक्रमी अशा प्राण्यांनाही थरथर कापविणारा जो मी, त्याला आज नीच गाढवाच्या लाथा निमूटपणे सहन कराव्या लागत आहेत. यापेक्षा हजार मृत्यूंचे दुःख मी मोठ्या सुखाने पत्करले असते.'

तात्पर्य - आपल्या चांगल्या अवस्थेत आपण इतरांना छळतो, पण जेव्हा आपल्यावर वाईट अवस्था येते तेव्हा अत्यंत क्षुद्रही त्याचा सूड घेतल्याशिवाय राहात नाहीत.
===================
एका माणसाजवळ एक हंसी होती. ती दररोज एक सोन्याचे अंडे घालीत असे तेवढ्या अंड्यावर त्या माणसाने समाधानी असायला हवे होते परंतु तसे न होता त्याचा सोन्याचा लोभ अधिकच वाढत चालला.

एके दिवशी त्याला असे वाटले की, ज्या ठिकाणाहून अशी अंडी निघतात ते ठिकाण आपणास मिळाले तर खूप संपत्ती आपल्याला मिळेल म्हणून त्याने हंसीचे पोट चिरून पाहिले, परंतु त्यात काहीच मिळाले नाही व हंसीसुद्धा मरण पावली आणि दररोज मिळणारे एक अंडसुद्धा त्याला मिळेनासे झाले.

तात्पर्य - अतिलोभ बहुतेक वेळा नाशास कारण होतो.
=====================

एक म्हातारा आपले गाढव चारीत असतां त्याचा शत्रू त्या ठिकाणी आला. तेव्हा तो म्हातारा आपल्या गाढवाला म्हणाला, 'मित्रा, चल आपण पळून जाऊ.' त्यावर ते गाढव म्हणाले, 'अरे, तुझा तो शत्रू माझ्या पाठीवर काठी का घालत नाही?' म्हातारा म्हणाला, 'अरे, तोही तुझ्या पाठीवर काठी घालील, यात काही संशय आहे का?' गाढव म्हणाले, 'असं जर असेल तर मी इथून बिलकूल हालणार नाही. माझ्या नशीबातली काठी चुकत नसेल तर माझा मालक कोणी का असेना?'

तात्पर्य - आपल्या स्थितीत जर काही फरक पडत नसेल तर कोणाचीही चाकरी करायला हरकत नाही.
===================

एका पारध्याने शेतात पक्षी धरण्यासाठी आपले जाळे पसरून ठेवले व तो एका झाडाआड लपून जाळ्यात पक्षी कसे काय सापडतात ते पहात बसला. काही वेळाने एकामागून एक पक्षी त्या ठिकाणी येऊ लागले. ते थोडा वेळ तेथे बसत आणि उडून जात. याप्रमाणे थोडे थोडे पक्षी तेथे दिवसभर येत होते. 

पण ते अगदी थोडे असल्यामुळे त्यांना पकडावे असे त्या पारध्याला वाटले नाही. खूप पक्षी एकदम पकडावे असे त्याच्या मनात होते. शेवटी संध्याकाळ झाली व सगळे पक्षी आपापल्या घरट्यात निघून गेले. मग निराश होऊन त्या पारध्याने जाळे काढून घेतले व नशिबाला दोष देत तो घरी गेला.

तात्पर्य - कोणत्याही कामात उतावीळपणा जसा चांगला नाही त्याप्रमाणे दिरंगाईही योग्य नाही.

==================

एकदा रात्री एका बाईचे हट्टी मूल फार रडू लागले. त्याला शांत करण्यासाठी आईने फार प्रयत्‍न केले, पण ते ऐकेना. शेवटी भीती दाखवावी म्हणून ती मुलाला म्हणाली, जर तू गप्प झाला नाहीस तर तुला दारात आलेल्या लांडग्याला देऊन टाकेन.' त्याच वेळी एक लांडगा खरोखरच दाराशी आला होता.

त्याने बोलणे ऐकले व बोलल्याप्रमाणे आई मुलाला आपल्या स्वाधीन करेल अशा आशेने तो तेथेच थांबला. शेवटी मूल रडून थकले व झोपी गेले. मग त्या लांडग्याला उपाशीच रानात जावे लागले. वाटेत त्याला कोल्हा भेटला, त्याने विचारले, 'मित्रा, तू ठीक आहेस ना?' लांडगा म्हणाला, 'अरे मित्रा, ते काही विचारू नकोस. मी वेडा एका बाईचं खोटं बोलणं खरं मानून फसलो नि सगळी रात्र उपास आणि जागरण करून कंटाळून गेलो.'

तात्पर्य - एखाद्याच्या बोलण्यात सहज निघालेल्या शब्दावर विश्वास ठेवू नये, त्या शब्दांचा मागचा पुढचा संबंध काय आहे हे लक्षात न घेणे मूर्खपणाचे होय.

+++++++++++++++++

एक पारधी अरण्यात पक्षी धरण्यासाठी जाळे लावत असता जवळच झाडावर बसलेला एक पक्षी त्याला विचारू लागला, 'अरे, हे तू काय करतो आहेस?' यावर पारधी म्हणाला, 'तुमच्यासारख्या पक्ष्यांकरता हे शहर बांधतो आहे. यात जे पक्षी येऊन राहतील त्यांना कोणत्याही गोष्टीची अडचण पडणार नाही. 

चारा, पाणी चिकार असेल. राहायला तरतर्‍हेची घरं अन् झोपायला मऊ गादी असेल.' पक्षाला ते सर्व खरे वाटले व पारधी जाताच तो त्या जाळ्यात शिरला व अडकला. ते पाहून बरेच पक्षी जमा झाले तेव्हा त्या सर्वांना त्याने सावध केले. तो सांगू लागला, 'यात मी फसून सापडलो, तो पारधी गोड गोड बोलून तुम्हालाही भुलविण्याचा प्रयत्‍न करेल. त्यावर तुम्ही विश्‍वास ठेऊ नका.' हे ऐकून सगळे पक्षी निघून गेले. काही वेळाने पारधी येताच तो पक्षी त्याला म्हणाला, 'अरे लबाडा, तू मला फसवलेस, पण तुझ्या या सुंदर शहरात आता एकही पक्षी राहायला येणार नाही, याबद्दल खात्री असू दे !'

तात्पर्य - लबाड लोकांची लबाडी जोवर लक्षात येत नाही तोवर ते दुसर्‍याला फसवू शकतात पण लबाडी उघडकीला आली की लोक त्याच्या वार्‍यालाही उभे रहात नाहीत.

--------------------------------------------

एक अतिशय म्हातारा माणूस लाकडे आणण्यासाठी रानात गेला. तेथे काही लाकडे जमा करून त्याची एक मोळी बांधली व ती डोक्यावर घेऊन मोठ्या कष्टाने पावले टाकत घराकडे चालला. वाटेत डोक्यावरच्या ओझ्याने तो अगदी थकून गेला आणि ओझे खाली टाकून धापा टाकत खाली बसला. 

त्यावेळी तो मृत्युला म्हणाला, 'हे प्राणीमात्राच्या विसाव्या, तू ये आणि या दुःखातून मला सोडव.' ते ऐकताच प्रत्यक्ष मृत्यू म्हातार्‍याच्या पुढे येऊन उभा राहिला व त्याला म्हणाला, 'बाबा, तू माझी आठवण का केली होती?' मृत्यू इतका जवळ आहे हे त्या बिचार्‍या म्हातार्‍याला माहीत नव्हते.

मृत्यूची ती भितीदायक मूर्ति पाहून म्हातार्‍याची भितीने गाळण उडाली. मग थोड्या वेळाने तो थरथरत मृत्यूला म्हणाला, 'मृत्यू देवा, मी अशक्त, माझ्या डोक्यावरची मोळी अचानक खाली पडली. ती उचलून देशील म्हणून मी हाक मारली. दुसरं काही कारण नाही. खरंचच इतकं काम होतं आणि यात जर मी तुझा अपमान केला असं तुला वाटत असेल, तर मी तुझ्या पाया पडतो. मला क्षमा कर व आलास तसाच कृपा करून माघारी जा.'

तात्पर्य - मृत्यूविषयी थट्टेने बोलण्याची काही लोकांना सवय असते. थोडेसे संकट आले की मरण येईल तर बरे असे म्हणतात पण मृत्यू दूर आहे तोवरच ह्या गोष्टी.

=======================

आळशी तरुण माणूस 
 
एका आळशी तरुण माणसाला सकाळी दहा वाजेपर्यंत बिछान्यात पडून राहण्याची सवय होती. त्याला एकाने विचारले, 'अरे, तू सकाळी लवकर का उठत नाहीस?' तरुण म्हणाला, 'प्रत्येक दिवशी सकाळी मी पाहतो, तो निरोद्योगिता व उद्योगिता या नावाच्या दोन स्त्रिया माझ्या दोन बाजूला उभ्या असतात.

उद्योगिता मला म्हणते, 'उठ अन् कामाला लाग. निरोद्योगिता म्हणते, 'उठू नकोस, असाच पडून रहा.' इतकंच न सांगता त्या आपली मतं समजावून देण्यासाठी लांब लांब भाषण करतात आणि निरनिराळी कारण सांगतात. त्या दोघींची भाषण एखाद्या न्यायाधीशासारखी मी ऐकून घेतो, तोच जेवणाची वेळ होते. मग त्या वेळी मी उठतो !'

तात्पर्य - आळशी माणूस काम करायला लागू नये म्हणून वाटेल त्या सबबी सांगतो.


===========
वकील आणि सरदार 
 
एका राजाने आपला वकील दुसर्‍या राजाच्या दरबारी पाठविला. तो तेथे जाऊन पोहोचल्यावर तेथील राजाने नोकर-चाकर पाठवून वाजंत्री वाजवत मोठ्या सन्मानाने शहरात नेण्यास सुरुवाते केली. तो वकील कंजूष असल्याने वाजंत्री व मिरवणूक यात पैसा विनाकारण खर्च व्हावा हे त्याला पटले नाही.

म्हणून तो त्यांना म्हणाला, 'अरे, माझी आई वारली, तिच्या सुतकात मी असल्यामुळे हा सगळा थाटमाट तुम्ही बंद कराल तर बरं होईल.' ते ऐकताच लोकांनी आपली वाद्य बंद केली. पुढे ही हकीगत तेथील एका सरदाराला समजली. तेव्हा तो त्या वकीलाजवळ येऊन त्याला म्हणाला, 'वकीलसाहेब आपल्या आईच्या मृत्युची बातमी ऐकून मला फार वाईट वाटलं, आपली आई वारली, त्याला आज किती दिवस झाले बर ?' वकील उत्तरला, 'त्या गोष्टीला आज चांगली चाळीस वर्षे झाली असतील'

तात्पर्य - पैसा वाचविण्यासाठी कंजूष माणूस वाटेल ती सबब सांगायला कमी करत नाही.

-------------------------------------

वाकडे झाड 
 
एका अरण्यात इमारतीला उपयोगी पडणार्‍या झाडांची लागवड केली होती. ती सगळी झाडे अगदी उंच व सरळ वाढली होती. त्यातील फक्त एकच झाड वाकडे होते व ते इमारतीला उपयोगी पडणारे नव्हते. त्याच्याकडे पाहून इतर झाडे मोठ्याने हसून वेडेवाकडेपणाबद्दल त्याची चेष्टा करत.

त्या अरण्याच्या मालकाने एकदा नवीन घर बांधण्याचे ठरविले व त्यासाठी लाकडाचा उपयोग होइल अशी सगळी झाडे तोडण्याचा हुकूम नोकरांना दिला. त्याप्रमाणे नोकराने ते वाकडे झाड सोडून सगळी झाडे तोडून टाकली.

तात्पर्य - ज्या गुणामुळे नुकसान होण्याची शक्यता असते. तो गुण अंगी नसला तर त्याबद्दल वाईट वाटू नये.

=============

खरे अपयश !
एकदा एक रीपोर्टर एका मोठ्या यशस्वी उद्योजकाची मुलाखत घेत होता. त्याने विचारले, "सर, तुमच्या यशाचे रहस्य काय आहे?"

यावर तो साठीकडे झुकलेला उद्योजक बोलला, "माझ्या यशाचं रहस्य मी वेळोवेळी घेतलेल्या योग्य निर्णयांत आहे"

रीपोर्टर ने ते उत्तर लिहून घेतले आणि आणखीन एक प्रश्न विचारला, "मग मला सांगा सर, योग्य निर्णय घ्यायला तुम्ही कसे शिकलात?"

यावर एका क्षणाचाही विलंब न करता त्या व्यावसायिकाने उत्तर दिले, "अनुभव. मला आयुष्यात अनुभवाने बरंच काही शिकवलं !"

हे ही उत्तर रीपोर्टर ने लिहून घेतलं आणि लगेचच उस्फुर्तपणे पुढचा विचारला, " तुम्ही हे सर्व अनुभव कसे मिळवले ?"

यावर उद्योजक मिष्कील हसला, आणि थोडा पुढे झुकत रीपोर्टरच्या कानाजवळ जाऊन म्हणाला, "माझ्या आयुष्यात मी घेतलेल्या चुकीच्या निर्णयांमुळे !!"

तात्पर्य -

आयुष्यात काही निर्णय चुकतात, काही बरोबर ठरतात. कधी यश येतं तर कधी अपयश, पण जर अपयशातून आपण काहीच शिकलो नाही तर ते खरं अपयश असतं !


============

एके दिवशी एक कोल्हा संध्याकाळी पक्ष्यांची शिकार करीत शेतातून चालला असता, जवळच कोंबडी मारून वनभोजन करीत बसलेल्या काही मुली त्याला दिसल्या. त्यांना तो म्हणाला, 'मुलींनो ह्या कोंबड्या तुम्हीच मारून खात आहात म्हणून ठीक, नाहीतर माझ्यासारख्या एखाद्या गरीब कोल्ह्याने जर ह्या कोंबड्या अशा मारून खाल्ल्या असत्या तर तुम्ही त्याच्यामागे शिकारी कुत्रे लावून त्याला पकडून त्याचा जीव घेतला असता.' 

हे ऐकून जवळच एक म्हातारी बसली होती ती त्याला म्हणाली, 'अरे मूर्खा, आम्ही आमच्या स्वतःच्या कोंबड्या मारून खातो नि तू लोकांच्या कोंबड्या मारून खातोस, हा फरक जर तुझ्या लक्षात आला असता, तर तू हे बोलला नसतास !'

तात्पर्य - स्वतःच्या वस्तूची वाटेल तशी विल्हेवाट करण्याचा अधिकार प्रत्येकास आहे, पण दुसर्‍याची वस्तू चोरून तिची वाटेल ती व्यवस्था करण्याचा अधिकार कोणासही नाही.


+++++

एका मांजराला त्याच्या लहानपणी एक चिमणी खेळावयास दिली होती. तिची व त्याची फार मैत्री जमली. चिमणीने मांजराभोवती उड्या माराव्या व मधूनच त्याला टोचावे तर मांजराने आपल्या पंजाने तिला दूर लोटावे असा खेळ चालला होता. ती दोघेही एकमेकांवर कधी रागवत नसत. 

पुढे त्या चिमणीच्या ओळखीची दुसरी एक चिमणी होती. तिचे हिच्याशी भांडण झाले. दुसरी चिमणी सशक्त असल्याने तिने हिला टोचून टोचून फार त्रास दिला. मग ती चिमणी मांजराजवळ आली व तिने त्या चिमणीला शिक्षा करण्याविषयी विनंती केली. मांजराने लगेचच झडप घालून त्या दुसर्‍या चिमणीस पंजात पकडले व एका क्षणात खाऊन टाकले. त्या चिमणीचे मांस मांजराला फार आवडले. मग ते म्हणाले, 'चिमणीचं मांस इतके रुचकर असते हे आजपर्यंत मला ठाऊक नव्हते.' इतके बोलून त्याने आपल्या मैत्रिणीवरही झडप घातली व तिलाही खाऊन टाकले.

तात्पर्य - कोणत्याही प्राण्याच्या दुष्ट मनोवृत्ती एकदा जागृत केल्यावर त्याला आवरणे फार कठीण असते.

+++++


मधमाशीचे पोळे पाहून एका माकडास मध खाण्याची इच्छा झाली. परंतु मधमाशीच्या नांगीचे दुःख केवढे असते याचा त्याला चांगलाच अनुभव असल्याने त्या पोळयास हात लावण्याचे धैर्य त्यास होईना. तेव्हा ते विचार करीत बोलू लागले, 'ज्या मधमाशीपासून इतका गोड आणि रुचकर मध उत्पन्न होतो त्याच मधमाशीच्या नांगीत भयंकर विष भरलेले असावे, हे खरोखरच मोठे आश्चर्य आहे !' ते ऐकून एक मधमाशी त्याला म्हणाली, 'अरे, अगदी खरं बोललास. माझा मध जितका मधुर असतो, तितकाच माझ्या नांगीचा दंश भयंकर असतो.'

तात्पर्य - देवाने एकाच ठिकाणी जसे काही गुण ठेवलेले असतात तसेच दोषही ठेवलेले असतात. हे लक्षात घेऊन त्या त्या वस्तूच्या गुणाचा उपयोग करून घ्यावा व दोष प्रकट न होतील अशी खबरदार घ्यावी हे चांगले.

**************


इसापचा मालक झांथस याला अंघोळ करायची होती म्हणून त्याने इसापला स्नानगृहात लोकांची गर्दी किती आहे हे पाहून येण्यास सांगितले. इसाप स्नानगृहाकडे निघाला असता वाटेत एक मोठा दगड पडलेला होता व येणारे जाणारे सर्वजण त्याला ठेचकाळत होते. हे तो पाहात असताना स्नानगृहाकडे जाणार्‍या एका माणसाने तो वाटेतला दगड उचलून बाजूला ठेवला आणि मग तो पुढे गेला. ते पाहून इसापने घरी जाऊन मालकास सांगितले, 'स्नानगृहात फक्त एकच माणूस आहे.'

ते ऐकून मालक स्नानगृहात गेले असता तेथे बरीच गर्दी असलेली त्यांना दिसली. म्हणून त्याने रागाने इसापला विचारले, 'अरे, इथे इतकी माणसं असून फक्त एकच माणूस आहे असं तू सांगितलंस याचा अर्थ तरी काय? त्यावर इसापने दगडाची सर्व गोष्ट मालकास सांगितली व तो म्हणाला, 'ज्या माणसानं तो वाटेतला दगड बाजूला ठेवला तो एकच माणूस या नावास प्राप्त आहे. बाकीची माणसं त्या नावास योग्य नाहीत असं मला वाटते.'

तात्पर्य - ज्या गोष्टीपासून सतत त्रास होत असता त्याला प्रतिकार न करता त्रास निमुटपणे सहन करीत राहतो त्याला माणूस म्हणण्यापेक्षा पशू म्हणणे अधिक योग्य आहे.

++++++++++++


एकदा अरण्याचा राजा सिंह याने आपल्या प्रजाजनांना दरबारात हजर राहण्याचा हुकूम सोडला. त्याप्रमाणे बहुतेक प्राणी सिंहाच्या दरबारी आले. अस्वलाला सिंहाच्या स्वयंपाक घरातून येणारा वास सहन न झाल्याने त्याने आपले नाक दाबून धरले. हा त्याचा उद्धटपणा पाहून सिंह रागावला व त्याने आपल्या पंजाच्या एका तडाख्यात अस्वलाला मारले. हा भयंकर प्रकार पाहून माकड भितीने थरथर कापू लागले.

मग काहीतरी बोलायचे म्हणून ते सिंहास म्हणाले, 'राजेसरकारांच्या स्वयंपाक घरातून येणारा सुवास निरनिराळ्या उंची मसाल्याचा आहे. तो त्या मूर्ख अस्वलाला सहन झाला नाही. हे त्याचं दुर्दैव होय. राजे सरकारांचे पंजे तर फारच सुंदर आहेत, तसे इतर कोणाचेही नसतील.' 

माकडाचे हे बोलणे ऐकून सिंहाचे समाधान तर झाले नाहीच पण तो इतका चिडला की, एका क्षणात त्याने त्या माकडाच्या चिंधड्या उडविल्या. नंतर तो कोल्ह्याकडे वळून त्याला म्हणाला, 'कसे काय कोल्हेदादा ? माझ्या स्वयंपाकघरातून येणारा वास कशाचा असावा असं तुला वाटतं ?' त्यावर तो कोल्हा धूर्तपणे म्हणाला, 'महाराजाधिराज, नुसत्या वासावरून तो वास कशाचा आहे हे सांगता येण्याइतकं माझं नाक आधीच तीक्ष्ण नाही त्यातून मला आज पडसं झालेलं असल्यामुळे आपल्या घरातून येणार्‍या वासासंबंधाने अभिप्राय देण्याचं धाडस मी करत नाही.'

तात्पर्य - प्रसंगावधान व समयसूचकता या गुणांच्या बळावर माणुस वाटेल तसल्या संकटातून मुक्त होऊ शकतो.

+++++++


उन्हाळ्याच्या दिवसात काही मुंग्या आपल्या वारुळाजवळ बसून मिळवून आणलेले दाणे उन्हात वाळवीत होत्या. इतक्यात भुकेने व्याकुळ झालेला एक टोळ त्या ठिकाणी येऊन व दीनवाणे तोंड करून त्यांना म्हणाला, 'बायांनो, यातला एखादा तरी दाणा मला देऊन जर माझा प्राण वाचवाल तर तुम्हाला मोठं पुण्य लागेल.' 

हे ऐकून त्यातल्या एका मुंगीने त्याला विचारले, 'अरे, सुगीच्या दिवसात आम्ही जसं धान्य जमवून ठेवलं, तसं तू का ठेवलं नाहीस ?' टोळ त्यावर उत्तरला, 'माझा सगळा वेळ खाण्यापिण्यात आणि मौजा मारण्यात गेला. 

पुढे आपला चरितार्थ कसा चालेल ही कल्पनाही माझ्या मनात त्यावेळी आली नाही.' हे ऐकून मुंगी म्हणते, 'अरे, अशा रीतीने मौजा मारण्यात ज्यांनी आपले दिवस घालविले, ते पुढे उपाशी मरणार हे ठरलेलं आहे. मग आता तुझ्या चरितार्थाची तजवीज आम्ही काय म्हणून करावी बरं ?' 

तात्पर्य - ज्यांनी आपले तारुण्य केवळ चैनबाजीत घालविले त्यांना बहुतेक वेळा म्हातारपणी दुःख भोगावे लागल्याशिवाय राहात नाही.


=============


एका अरण्याच्या मध्यभागी एक मोठे सागवानाचे झाड उंच आणि सरळ वाढले होते. ते नेहमी आपल्या मोठेपणाच्या गर्वाने आपल्या खाली वाढलेल्या लहान झाडांचा धिक्कार करत असे. त्या झाडांमध्ये एक काटेझाड होते. सागवानाच्या झाडाचा गर्विष्ठ स्वभाव न आवडल्याने त्याने एकदा त्याला स्पष्ट विचारले, 'बाबा रे, तू एवढा गर्व कशासाठी करतोस ?' त्यावर तो म्हणाला, 'मी सर्व झाडांमध्ये श्रेष्ठ शोभिवंत आहे. माझ्या फांद्या ढगांना भिडल्या आहेत. 

त्या सतत हिरव्या टवटवीत असतात व तुम्ही अगदीच क्षुद्र आहात, जो येईल तो तुम्हाला पायाखाली तुडवतो. माझ्या पानांवरून जे पावसाचे पाणी वाहते त्यात तुम्ही बुडून जाता.' हे ऐकून काटेझाड म्हणाले, 'ते सगळे काही असू देत, पण मी तुला एकच गोष्ट सांगतो, ती लक्षात ठेव. जेव्हा लाकूडतोड्या तुझ्या बुंध्यावर कुर्‍हाडीचा घाव घालायला येईल, त्या वेळी आमच्यातल्या अगदी हलक्या झाडांच्या स्थितीशीही तू आपल्या स्थितीची अदलाबदल करायला तयार होशील.'

तात्पर्य - मोठेपणाच्या मागे अनेक दुःखे असतात, ती लहानपणामागे नसतात, तेव्हा त्यांचा धिक्कार करू नये.


++++++++++

ग्रीसमध्ये हेलाक नावाचा एक धनवान आणि लोभी माणूस राहत होता. आपल्या दुकानावर येणार्यान प्रत्येक माणसाला ठकवणे त्याचे काम होते. त्यातून तो भरपूर धन जमा करायचा. मात्र ते धन त्याच्याकडे टिकत नसे. हे पाहून त्याची सून त्याला समजवायची की बेइमानीचे पैसे कधीच टिकत नसतात. परंतु हेलाक तिचे कधीच ऐकत नसे. एके दिवशी त्याच्या मनात विचार आला की सून जे म्हणते आहे त्याची परीक्षा घेऊन बघू. त्याने इमानदारीने धन जमा करून त्याचे एक सोन्याचे गंठण बनवले व ते एका कपडय़ात बांधले व त्यावर स्वत:चे नाव टाकून चौकात ठेवून आला. एकाने ते उचलून तळ्यात फेकून दिले. तळ्यातील एका मगरीने ते गिळले. काही दिवसांनी एका
 
               मच्छीमाराला जाळ्यात ती मगर सापडली. त्यांनी तिचे पोट फाडले तेव्हा तिच्या पोटात ते गंठण निघाले, मच्छीमारांनी हेलाकचे नाव त्यावर पाहिले व बक्षिसाच्या आशेने गंठण त्याला आणून दिले. आपले सोन्याचे गंठण मिळालेले पाहून तो खूश झाला. त्याचा सुनेच्या बोलण्यावर विश्वास बसला की इमानदारीने मिळवलेले धन कुठेच जात नाही आणि बेइमानीचा पैसा कधीच टिकत नाही. त्याने खूश होऊन त्या मच्छीमारांना बक्षीस दिले.

~ कष्टाची कमाई - मराठी गोष्टी

+++++

साधेपणा आणि मूर्खपणा 🌀

कुठंतरी वाचले होतं की वेड्यावाकड्या झाडापेक्षा सरळ असणारी झाडे लवकर तोडल्या जातात आणि असंच काही लोकं माणसाविषयी ठरवतात की जी माणसे साधीसरळ असतात त्यांना लोकं जास्त त्रास देतात. 

मात्र साधेपणा आणि मूर्खपणा यात खूप फरक आहे. 
जर तुम्ही स्वतःला साधे-सरळ म्हणत असाल आणि जर कुणीही येऊन तुम्हाला त्रास देत असेल आणि तुम्ही त्याचा कुठलाही प्रतिकार करत नसाल तर तुम्ही साधे-सरळ नाही तर मूर्ख आहात. 

जर तुम्ही मनाने चांगले आहात, इतरांना त्रास देत नाही, नेहमी आपापल्या कामात मग्न असता आणि जर कुणी तुम्हाला त्रास देत असेल, तुमच्या साधेपणाचा फायदा घेत असेल तर तुम्ही त्याला बळी न पडता त्याचा प्रतिकार करायला हवा. 

साध-सरळ असावं मात्र मूर्ख नसावं.

++++




 # वणवा विझवणारी चिमणी (कथा)

    सूर्य मावळतीला चालला होता.गीता घरातील साऱ्या बालचमूंना घेऊन गच्चीवर बसली होती.कोरोनाच्या भीतीने कोणीही बाहेर जात नव्हतं.गाणी, गोष्टी, विनोद असा रोजचा कार्यक्रम सायंकाळी गीताच्या गच्चीवर रंगत असे.शकुंतलाबाई म्हणजे अगदीच कजाग आजी!घरात सहा नातवंडं,पण कधीही त्यांच्यासोबत वेळ घालवत नसत.कधीतरी त्या मुलांसोबत खेळत बसायच्या.पण त्यांच आणि मुलांचं भांडण व्हायचं.पण तरीही मुलं आजीचा मान राखायची.तीच्या हातात सॅनिटायझर लावायची.छोटी सानिका तर न विसरता आजीचा मास्क स्वच्छ धुवून द्यायची.मुलांना ही कोरोनाची सक्तीची सुट्टी कंटाळवाणी वाटू नये म्हणून गीता रोज नवनवीन गोष्टी सांगायची.कागदी वस्तू मुलांकडून बनवून घ्यायची.विविध खेळ त्यांना खेळायला लावायची.
      आज छोट्या सानिकाला गोष्ट ऐकण्याची हुक्की आली. आई आज आम्हाला गोष्ट ऐकायची आहे.छान अशी गोष्ट सांग ना! हो का? बरं!मी आज तुम्हाला छान अशी गोष्ट सांगते.पण ही गोष्ट ऐकून तुम्ही साऱ्यांनी या लॉकडाऊनच्या काळात काहीतरी चांगलं काम करायचं.आणि मी विचारेन तेव्हा ते तुम्ही मला सांगायचं.मुलांनी होकार दिला.
  मुलांनो, गोष्ट लक्षपूर्वक ऐका हं! एकदा जंगलात वणवा पेटला होता.आगीच्या ज्वाला आकाशाला भिडल्या होत्या.सारे प्राणी,पक्षी आपला जीव मुठीत धरून सैरावैरा धावत होते.पण एक चिमणी मात्र चोचीत पाणी घेऊन त्या आगीच्या ज्वालांवर ते पाणी टाकत होती.हे पाहून बाकीचे सगळे जण तीला हसू लागले.एक कावळा तिच्या जवळ आला आणि म्हणाला,अग ए,वेडाबाई,मुर्ख आहेस का? इतकी भयानक आग तुझ्या एवढ्याशा पाण्याने विझणार आहे का? त्यावर चिमणी हसून म्हणाली, माझ्या एवढ्याशा पाण्याने आग विझणार नाही हे मलाही माहित आहे.पण भविष्यात जेव्हा याचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा माझं नांव पाहून हसणाऱ्यांमध्ये नसेल तर ते वणवा विझवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांच्या यादीत असेल.मुलांना गोष्ट फार आवडली.काकू आम्ही पण चिमणी सारखं काम करू.कोरोनाच्या काळात स्वत:ची  काळ्जी घेत माणुसकी जपू.शाब्बास साहिल!चला आता जेवायला चला.
    कालची गोष्ट सानिकाच्या मनात घर करुन राहिली.खेळता खेळता ती साहिलला म्हणाली,साहिल या कोविड 19 च्या काळात आपले डॉक्टर,नर्सेस, पोलीस,सफाई कामगार, आशाताई, अंगणवाडी सेविका सारेच कोरोनापासून सर्वांची मुक्ती व्हावी म्हणून अहोरात्र प्रयत्न करीत आहेत.हो ग सानिका! त्यांनाही कुटुंब आहे.पण ते न भीता त्यांच कर्तव्य पार पाडत आहेत.अरे साहिल, अजून एक गोष्ट तु आणि सानिका विसरत आहात. सोनू,कोणती गोष्ट ? अरे आपले शिक्षक देखील आॅनलाइन शिकवत आहेत आणि घरोघरी जाऊन कोरोना सर्वेक्षण करीत आहेत.घरोघरी जाऊन जागृती करीत आहेत.अरे हो,विसरलोच की! साहिल,सोनू मलाही वाटत की,आपणही छोटीशी मदत लोकांना करायला हवी.
इतक्यात सानिकाचे बाबा सांगत आले,पलीकडचे राजू काका पॉझिटिव्ह आलेत.त्याच्यात कोणीच जाऊ नका.पण बाबा,त्याला आता जेवण,चहा कोण देणार?त्याची मेसही बंद झाली आहे कालपासून.अग सानिका,त्याचा तो बघून घेईल.तु काका काका करत त्याच्याकडे अजिबात जायचं नाहीस.नाहीतर माझा मार खाशील.तुझी कार्टी फार आगाऊ आहे.तुच ठणकावून सांग तिला.नाहीतर डोळा चुकवून कधी पळेल याचा नेम नाही.शकुंतलाबाईनी सूर ओढला.पण बाबा,मास्क लावून, सॅनिटायझर लावून राजू काकाला मी, साहिल आणि सोनू  चहा, जेवण लांबून देऊ शकतो.अरे आम्हाला आईच्या गोष्टीतील वणवा विझवणारी चिमणी व्हायचं आहे.त्यामुळे आम्ही तिघांनी ठरवलं आहे!काय ठरवलं आहे?बाबांनी आवाज चढवला.काका, आम्ही आमची काळजी घेत,क्वारंटाईन असणाऱ्या आपल्या शेजाऱ्यांना गरजेच्या वस्तू दुकानातून आणून देणार.त्यांची लांबूनच चौकशी करून त्यांना धीर देणार.आई,आपले राजू काका आम्हाला अभ्यासात किती मदत करतात!मग अशा वेळी आम्ही त्यांना एकटं सोडणार नाही.तु रोज त्यांचा चहा आणि जेवन बनवत जा.आम्ही ते त्यांना देऊन येऊ.मुलांचा ठामपणा पाहून शकुंतलाबाई रागाने उठून गेल्या.मुलांनी उच्च विचार मांडून आपणास हरवलं या विचाराने बाबा न बोलता आत निघून गेला.पण गोष्टीचा बोध मुलांना कळला याचा आनंद मात्र गीताच्या चेहऱ्यावर चमकू लागला.
सौ.सुधा पाटील


++++++++


जादूची विहीर

एकदा राजा कृष्णदेवरायने गृहमंत्र्यानां राज्यात खूप विहीरी बनविण्याचा आदेश दिला. उन्हाळा जवळ येत होता त्यामुळे राजाची अशी इच्छा होती की विहीरी लवकरात लवकर खोदल्या जाव्यात त्यामुळे राज्यातील लोकांना उन्हाळयात आराम मिळू शकतो. 

गृहमंत्रींनी हया कामासाठी राज्याच्या तिजोरीतून खूप सारे धन घेतले, लवकरच राजाचा आदेशाप्रमाणे राज्यात विहीरी खोदल्या गेल्या. यानंतर राजाने एक दिवस राज्यात फेरफटका मारला व स्वतः काही विहीरीचे निरीक्षण केले व आपल्या आदेशाचे पालन पूर्ण झालेले बघून ते समाधानी झाले. 

उन्हाळयाच्या एक दिवशी राज्याच्या बाहेर गावातील काही लोक तेनालीरामाकडे गेले, व ते सर्व गृहमंत्र्यांविरूध्द तक्रार घेऊन आलेले होते. तेनालीरामने त्या सर्वांची तक्रार ऐकून घेतली व त्यांना न्याय मिळविण्याचा मार्ग सांगितला. 

दुसऱ्या दिवशी तेनालीराम राजाला भेटला व बोलला, ‘महाराज मला राज्यात काही चोर असल्याची माहिती मिळाली आहे, व ते आपल्या विहीरी चोरत आहेत.’ 

यावर राजा बोलला, ‘काय बोलत आहेस, तेनाली! कोणी चोर विहीर कसे काय चोरू शकतो? 

‘महाराज हि गोष्ट आश्चर्यकारक जरूर आहे पण खरी आहे त्या चोरांनी आत्तापर्यंत बऱ्याच विहीरी चोरल्या आहेत.’ तेनालीराम शात स्वरात बोलला. 

तेनालीरामचे हे बोलणे ऐकून दरबारातील सर्व उपस्थित दरबारी हसायला लागले. 

महाराज बोलले ‘तेनालीराम तुझी तब्येत तर ठीक आहे ना? तू आज असे काहीपण काय बोलत आहेस? तुझ्या बोलण्यावर कोणीच व्यक्ती विश्वास ठेवू शकणार नाही.’ 

‘महाराज मला माहिती आहे की तुम्ही माझ्या बोलण्यावर विश्वास नाही ठेवणार, त्यामुळे काही गावकऱ्यांना माझ्या सोबत घेऊन आलो आहे. ते सर्व बाहेरच उभे आहेत. जर तुमचा माझ्यावर विश्वास नसेल तर तुम्ही त्यांना दरबारात बोलवून विचारू शकता, ते तुम्हाला सर्व काही सविस्तर सांगतील.’ 

राजाने बाहेर उभ्या असलेल्या सर्व गावकऱ्यांना दरबारात बोलविले. त्यातला एक जण बोलला ‘महाराज गृहमंत्र्यांव्दारा बनविल्या गेलेल्या सर्व विहीरी गायब होत आहेत, तुम्ही प्रत्यक्ष बघु शकता.’ 

राजाने त्यांचे बोलणे ऐकले व लगेचच गृहमंत्री, तेनालीराम व काही गावकऱ्यांना बरोबर घेऊन विहीरीचे निरिक्षण करायला गेले. पूर्ण राज्याचे निरीक्षण केल्यानंतर त्याला असे जाणवले की राज्याच्या आसपास, गावातील अन्य ठिकाणी एकही विहीर नाही. राजाला हे समजल्याचे बघून गृहमंत्री घाबरला. सत्य स्थितीत त्याने फक्त काही विहीरी बनविण्याचे आदेश दिले होते व उरलेला सर्व पैसा त्याने आपल्या सुख सुविधासाठी ठेवून घेतला. 

आत्तापर्यंत राजाला तेनालीरामाच्या बोलण्याचा अर्थ समजलेला होता. ते गृहमंत्र्यांवर रागवायला लागले, तेव्हा तेनालीराम मध्येच बोलला ‘महाराज, या सर्वामध्ये याची काहीही चूक नाही. वास्तवमध्ये सर्व विहीरी या जादूच्या होत्या ज्या बनल्यानंतर काही दिवसातच गायब झाल्या.’ 

आपले बोलणे संपवल्यानंतर तेनालीरामने गृहमंत्र्यांकडे बघितले, गृहमंत्र्याला आपण केलल्या कृत्याची लाज वाटली व त्याने आपली मान शरमेने खाली घातली. 

त्यानंतर राजाने गृहमंत्र्याला फटकारले व नव्याने विहीरी बनविण्याचा आदेश दिला. हया कार्याची सर्व जबाबदारी तेनालीरामवर सोपविण्यात आली. "

=======================

कोण शहाणा, कोण मूर्ख 
 
दरबारातील मंडळींना एकदा बादशहाने विचारले, ''कोणाला शहाणा म्हणावे आणि मूर्ख कोणाला म्हणावे?'' 

यावर दरबारी मंडळी उत्तरादाखल बरेच मोठे चर्‍हाट वळू लागली असता बादशहा भडकून बिरबलाला म्हणाला, ''बिरबल, तू दे बर माझ्या प्रश्नाचे उत्तर!'' 

यावर बिरबल म्हणाला, ''महाराज, जो माणूस मनात योजलेले बेत मेहनत, चिकाटी आणि योजना करून तडीस नेतो, तो शहाणा, आणि नुसतेच मोठमोठे बेत करून जो माणूस ते विसरून जातो किंवा योजलेली कामे तडीस नेण्यासाठी त्याची सुरुवात करून ती अर्धवट अवस्थेत सोडून देतो, तो मूर्ख.'' 

बिरबलाच्या या उत्तरावर बादशहा समाधान पावला


++++++++++++++++++++++++++++++++++++++++

लाकूडतोड्या व देवदूत 
 
नदीकाठी असलेल्या एका झाडावर चढून एक लाकूडतोड्या लाकडे तोडत असतो. लाकडे तोडत असताना अचानक त्याची कुर्‍हाड नदीत पडते. नदी खोल असल्यामुळे त्याला नदीत जाऊन ती कुर्‍हाड काढता येत नव्हती. तो दुःखी होऊन रडू लागतो. 

हे पाहून नदीतून एक देवदूत येतो. तो त्याला म्हणतो की, काळजी करू नकोस. मी तुला तुझी कुर्‍हाड काढून देतो. तो देवदूत नदीत डुबकी मारतो व सोन्याची कुर्‍हाड काढतो व म्हणतो ही का तुझी कुरहाड? लाकूडतोड्या म्हणतो, नाही ही माझी कुर्‍हाड नाही.. 

देवदूत पुन्हा नदीत डुबकी मारतो व चांदीची कुर्‍हाड काढतो व म्हणतो ही का तुझी कुर्‍हाड? लाकुडतोड्या म्हणतो नाही. मग तो देवदुत लोखंडाची कुर्‍हाड काढतो. लाकू़डतोड्या आता मात्र हीच माझी कुर्‍हाड असल्याचे सांगतो. कुर्‍हाड परत मिळाल्याने आनंदी होतो. लाकूडतोड्याचा प्रामाणिकपणा पाहून देवदूत लाकूडतोड्यावर प्रसन्न होतो. त्याला सोन्याची व चांदीची अशा दोन्ही कुर्‍हाडी बक्षीस म्हणून देतो.


======================

40 दिवस 56 गोष्टी.
आजची गोष्ट :  प्यारा
घाणीच्या ढीगातून वाहणारं गटाराचं पाणी. 
या पाण्यात आडव्या-तिडव्या विटा टाकून केलेला रस्ता. 
नाक मुठीत धरुन या विटांवरून उड्या मारत त्या वस्तीत गेलो. 
सगळीकडे कचर्‍याचे डोंगर, घोंगावणार्‍या माशा आणि हवेत तरंगणारे डासांचे पुंजके. 
तिथे एका पत्र्याच्या शेडमधे शाळा चालायची. 
आठवड्यातून एक दिवस तरी मी तिथे जावे, असे ती शाळा चालवणार्‍यांनी मला सुचवले होते.

ही परिस्थिती पाहून मी तर मी हबकलोच. 
तिथली ती गलीच्छं वस्ती पाहून मी मनातल्या मनात ठरवलं की आज झालं एव्हढं बास झालं. पुन्हा इथे यायचं नाही. 
पण पहिल्याच दिवशी असा काही प्रसंग घडला की, मला माझा विचार बदलावा लागला. मी त्या वस्तीत काही दिवस नियमित जाऊ लागलो. 

मी आज तुम्हाला तीच गोष्ट सांगणार आहे.

दुपारची वेळ होती. 
वातावरणात घाणीचा दमट कुंद वास भरलेला. 
शाळेचे पत्रे तापलेले. 
वर्गात वेगवेगळ्या वयोगटाची २०/२२ मुलं दाटीवाटीने बसलेली. 
त्यांचा हिंदी,मराठी आणि मला न कळणार्‍या दोन तीन भाषात कल्ला सुरू होता. 
ज्या संस्थेतर्फे हे वर्ग चालायचे त्यांचा एक कार्यकर्ता हातात काठी घेऊन मुलांवर डाफरत होता. त्यांना गप्प बसायला सांगत होता.
वर्गाच्या दारातच वस्तीतली टाइमपास करणारी माणसं, टपोरी मुलं आणि तोंडावर पदर घेतलेल्या बायकांची गर्दी. ते सारे पान खाऊन, गुटखा खाऊन तिथेच थुकत आपापसात गप्पा मारत होते. गप्पात शिव्या ओवत होते. 
‘मुले कशी शिकतात? हे पाहण्यासाठी ही गर्दी असावी’ असा माझा भाबडा समज झाला होता. पण त्यानंतर काही क्षणातच मी भानावर आलो.
या गर्दीला बाजूला सारत त्यांची जूनी टिचर मेघना आणि मी कसेबसे आत गेलो. 
मुलांना पायानेच ढकलत, काहीवेळा लाथाडत मेघनाने माझ्यासाठी आता जायला रस्ता तयार केला. 
अत्यंत शरमेने मी तिच्या पाठोपाठ गेलो. 
मुलांकडे पाहात आपल्या खास गेंगाण्या आवाजात मेघना करवादली,“ये है नये टिचर. आज से सिकाएंगे.”

तोंडातला गुटखा थुकत एक टपोरी मुलगा माझ्याकडे वैतागून पाहात म्हणाला,“ये नया टिचर? ” मग संस्थेच्या व माझ्या नावाने शिव्यांची लाखोली वाहून, ‘नवीन टिचर’ ला पाहायला आलेली गर्दी कमी झाली.
या मुलांना गणित शिकवायचं होतं. 
ही मुले होती वयवर्ष ६ ते वयवर्ष १४. 
आता यांना काय आणि कसं शिकवायचं?
कुठून सुरुवात करायची?
मेघनाने यांना कितपर्यंत आणलं होतं? 
असे प्रश्न माझ्या मनात सुरू झाले. 
मला हलवत मेघना म्हणाली,“सर मैं चलती. अब ये सादिक तुम्हे सब समजाएगा.”
मी काही बोलायच्या आत मेघना अदृश्य झाली.

मी काहीच न बोलता गप्प उभा आहे हे पाहताच मुले आपापल्या कामाला लागली. 
शिव्या देत मारामार्‍या, ढकलाढकली, पुस्तकांची फेकाफेक, जमिनीवर लोळत लाथा मारणे, किंचाळत गाणी म्हणणे इत्यादी. 
इतक्यात हातातली काठी उगारत सादिक ओरडला,“ए आवाज बंद. ये नये टिचर है ना, सबको ऐसे पिंटेंगे ना की, सबकी हड्डि फसलि एक कर देंगे. समजे?” 
मग माझ्याकडे पाहात आवाजाला आणखी धार लावत म्हणाला,“ सर, शुरू करो.”

बटण दाबल्यासारखी सगळी मुले क्षणात गप्प झाली. 
माझ्याकडे कुतुहलाने पाहू लागली. 
‘आता मी या मुलांना कसं मारावं? पिटावं? झोडावं? याचं अनाहुत मार्गदर्शन मला दारात बसलेल्या बायका करू लागल्या.
“सिखा नही ना, तो उनकी टांग तोड देना.”
“दोन कानफटीत ठिवून द्या. बेगिन शिकल बगा.”
“स्कूल नी जाते, बस्ती मे गुमते.उनकी चरबी.. ..”
त्याचवेळी सादिकने दरवाज्याकडे पाहात काठी उगारली. 
दरवाज्यात शांतता.

मग माझ्याकडे पाहात भुवया उंचावत व काठीनेच खूण करत म्हणला,“शुरू करो सर. इधर तो ऐसा ही मचमच चालू रहेगा.”

डोक्यावर कारंजी उसळत असल्याप्रमाणे प्रत्येकाच्या डोक्यावर थुईथुईणारे डास आणि खोलीत साचलेला घट्ट कुबट वास यातून मी आता समोरच्या मुलांकडे पाहिलं. 
फाटके मळके कपडे घातलेली, आंघोळ न केलेली, अस्वच्छं मुलं. 
‘ये नया टिचर क्या करेगा?’ अशी प्रत्येक मुलाच्या डोळ्यातली उत्सुकता मात्र स्पष्ट वाचता येत होती. 
हाच तेव्हढा एक आशेचा किरण मला दिसत होता.
मी अजून त्या वातावरणात मिसळून गेलो नव्हतो. 
ती गलीच्छं वस्ती आणि ती मुलं माझी आहेत, आणि आता यांना शिकवायचं आहे, ही कल्पनाच मला भयावह वाटत होती. 
कसाबसा एक तास वेळ काढायचा आणि इथून पळून जायचं. पुन्हा इथं येणं नको आणि इथे कुणाला शिकवणं ही नको, असं मी मनोमन ठरवलं होतं.
शाळा बिनभिंतिची असल्याने पत्र्यावर, कधी काळी काळा असणारा एक फळा टांगला होता. मी हातात खडू घेऊन फळ्याकडे वळलो आणि झटकन पुन्हा मुलांकडे वळत म्हणालो, “अब जो भी मैं लिखूंगा, आप नही लिखेंगे. हम सब बातें करेंगे.. ..”

मला मधेच थांबवत सादिकने त्याच्या हातातली काठी माझ्या हातात दिली. आता वर्गातली मुले सावध झाली. 
पुढे बसलेली मुले थोडी मागे सरकली.

“पहले पिटना सबको.. तब सिखेंगे..” आता सादिकला थांबवत आणि हातातली काठी फिरवत मी म्हणालो,“बिलकूल सहि! एकेक को ऐसा मारुँगा कि उनके हात, पाँव और पंख टूटने चाहिए. चाहे उसमे से कोई मर भी गए, तो अच्छा ही है. आज तो उनके बारा बज गए समझो.”

आता वर्गात आणि दारात तणावपूर्ण शांतता निर्माण झाली. 
मुलांचे चेहरे भीतीने आक्रसले. 
मगाशी त्यांच्या डोळ्यात असणारी उत्सुकता पळाली. 
दारातल्या बायका माझ्याकडे संशयाने पाहू लागल्या. 
सादिक खूश झाला.

“समझ में आ रहा है? 
मैं मच्छरोंके बारें में बोल रहा हूँ. 
मैं सिर्फ उनको ही मारता हूँ. 
बच्चों को कभी भी नही मारता. 
नही कभी डाटता. 
तो आजसे ये काठी सिर्फ मच्छरोंके लिए.” असं म्हणत मी ती काठी कोपर्‍यात ठेवली.

माझ्या या बोलण्यावर कुणाचाच विश्वास बसला नाही. 
सगळी मुले तशीच पुतळ्यासारखी बसलेली माझ्याकडे अविश्वासाने पाहात. 
इतक्यात एक मुलगा उठला. 
वय वर्ष सात किंवा आठ. न विंचरलेले झिपरी केस, गळणारं नाक, बटणं तुटलेला शर्ट आणि गळ्यात ताईत.
माझी पँट धरत त्याने मला विचारलं,“सर, सचमूच नही मारोगे?”

त्या मुलाला एका हाताने घट्ट धरत मी जोरात ओरडलो,“मारुँगा. 
जरूर मारूंगा अगर तुम मच्छर हो तो. 
तुम तो अच्छा लडका हो.. तुम्हे कैसे मारुंगा?बिलकूल नही मारुंगा.”

दचकलेली मुलं मोकळी झाली. 
यॅपॅझॅ करत मुले आनंदाने ओरडली. 
कोपर्‍यातली काठी घ्यायला सादीक धावला. 
त्याला मधेच अडवून सांगितल,“आजसे मारना बंद. मैं हूँ.. ..” 

मुलांनी जोरदार टाळ्या वाजवल्या. 
सादिक मला आणि मुलांना खुन्नस देत वर्गातून तरातरा निघून गेला.

माझ्या जवळच्या मुलाच्या राठ केसातून हात फिरवला. त्याला थोपटलं तर तो म्हणाला, “सर, मेरा नाम महंमद है. सर सब मुजको मारते है और मुझको ही ‘मारो महंमद’ बोलते है. सर तुम अच्छे है. तुम नही मारोगे ना मुजको”
सगळी मुलं खींखीं हसायला लागली. 
मुले म्हणाली,“सर वो सबका मार खाता है.”
“वो तो सबका पोपट है.” 
“मारो सर उसको. ..”

मी त्याला घट्ट जवळ घेत म्हणालो,“आजसे हम सब उसे मारो महंमद नही ‘प्यारा महंमद’ कहेंगे. और हम जिससे प्यार करते है उससे तो मारते नही. मैं तुम सभीसे प्यार करता हुँ.. तो तुमको नही मारता. क्या”
पुन्हा एकदा मुलांच्या टाळ्या.

मग लगेच गणिताकडे न वळता आम्ही काही अक्षरांचे, शब्दांचे खेळ खेळलो. अक्षरांपासून शब्दं आणि त्या शब्दांपासून वाक्यं तयार केली. 
या वाक्यांची एक मजेशीर गोष्ट तयार झाली. 
गोष्ट तयार करताना वर्गातले आणि दारातले सगळेच मदत करत होते. 
मधेच कधीतरी सादिक वर्गात येऊन बसला. 
पण ते कुणाच्याच लक्षात आलं नाही.
एक तास कधीच संपून गेला होता. 
मला आता निघायला पाहिजे होतं.

मी निघणार तोच, महंमद माझ्या जवळ आला. 
त्याने उजव्या हातात कुठलितरी वस्तू लपवली होती.
रडवेल्या डोळ्यांनी माझ्याकडे पाहात म्हणाला,“सर ये लो. तुम बहुत अच्‍चे हो.”
त्याच्या उजव्या हातात अर्धवट सडलेलं सफरचंद होतं.
“सर लो ना. आज मैं नही खाऊँगा. ले ओ ना सर.” तो अजीजीने म्हणाला.

मला ते सफरचंद घेता ही येईना आणि त्याला नको ही म्हणता येईना. 
माझी अवस्था विचित्र झाली. 
मी दुपारी काही खात नाही, वगैरे थातुरमातुर कारण सांगून ते सफरचंद बळेबळे त्याच्या हातात कोंबलं.

माझ्या पँटला प्रेमाने हात पुसत तो म्हणाला,“सर अभी तक कोई मुझे प्यारा बोला ही नही. सब मुजको मारते है,गाली देते है. सर मैं प्यारा है ना? सर..रोज आओ ना सिकाने को.”

मला खूप भरुन आलं. 
मी नक्की येईन असं मला चटकन म्हणता येईना. 
किंबहुना मला काही बोलताच येईना. 
एखाद्यं वेलीसारखं त्याने मला वेढून टाकलं होतं. कसेबसे त्याचे हात सोडवले आणि त्याला दूर केलं. 
सादीकने त्याला नेऊन जागेवर बसवलं.

आता बाकीची मुलं कल्ला करू लागली,“सर आना..रोज आना..”
मला वस्ती बाहेर सोडण्यासाठी सादिक आला. 
जाताना माझा हात हातात घेऊन म्हणाला, “सर आजका पहला दिन है, बच्चोंने मार नही काया और महंमदने भी. 
बच्चे बहुत खूश है. 
सर रोज आना.”
यानंतर काही दिवस मी नियमित तिथे जाऊ लागलो.
तिथे जाताना मला तिकडच्या घाणीचा, कचर्‍याचा किंवा वाहत्या गटारांचा त्रास झाला नाही किंवा दमट-कुबट वासाने डोकं सुन्नं झालं नाही.
मला दिसायची मुलांची प्रेमाची भूक, शिकण्याची तळमळ.
वाट पाहात असणार्‍या आपल्या मुलांना भेटण्याची मला ओढ लागायची.

‘प्यारा’ या एका शब्दाने महंमद खूप बदलला.
जणू त्याला प्रेमाचा साक्षात्कारच झाला.
कुणी वस्तीत त्याला टपली जरी मारली तरी तो त्यांना सांगायचा,
‘मैं वो महंमद नही. मैं प्यारा महंमद हूँ. सर ने कहा है.’
मग लोकं हसून त्याला थोपटत आणि सोडून देत.
खरं सांगायचं तर ‘प्यारा’ या शब्दाने जसा महंमद बदलला 
तसा मी पण बदललोच ना?

या एका शब्दातली ही अपार शक्ती आम्ही दोघांनी वेगवेगळ्या पातळीवर अनुभवली.
‘जेव्हा मुले आपल्याला प्रेमाचे आवाहन करतात तेव्हा आपण प्रेमासोबत करुणेचा ही अनुभव घेतो’ ही चिनी म्हण सदैव लक्षात ठेवा.
:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::
� राजीव तांबे.


++++++++++++++++

मूर्ख डोमकावळा 
 
एका गरूडाने कुरणात चरत असलेल्‍या मेंढ्यांच्‍या कळपातील एका कोकरावर झडप घातली व त्‍या कोकराला पळवून नेले. त्‍याचे हे धाडस आणि सामर्थ्‍य पाहून रानातले सर्व पशुपक्षी त्‍या गरूडाकडे भीतीयुक्‍त आदराने पाहू लागले. 

'गरूडाने पळवले त्‍यापेक्षाही मोठे कोकरू जर आपण पळवले तर गरूडापेक्षाही आपला मानसन्‍मान वाढेल, त्‍याच्‍याइतकीच प्रतिष्‍ठा आपल्‍याला लाभेल असे एका डोमकावळ्याला वाटले. 

त्‍यासाठी त्‍याने नजर ठेवून एका मोठ्या थोराड अशा कोकराच्‍या पाठीवर बसून त्‍याला उचलण्‍याचा प्रयत्‍न केला पण ते कोकरू उचलले जाण्‍याऐवजी, डोमकावळ्याचेच पाय कोकराच्‍या पाठीवरील लोकरीमध्‍ये अडकले व तिथून सुटण्‍यासाठी त्‍याने पंखांची केलेली फडफड व आरडाओरड मेंढपाळाच्‍या कानी गेली. 

तो तिथे आला व त्‍याने डोमकावळ्याला सोडविले व पिंज-यात कैद केले व त्‍याला स्‍वत:च्‍या मुलांच्‍या स्‍वाधीन केले. मुलांनी मेंढपाळाला विचारले,''बाबा या पक्ष्‍याचे नाव काय हो'' यावर तो मेंढपाळ हसून म्‍हणाला,'' या मूर्ख पक्ष्‍याला जर तुम्‍ही याचे नाव विचारले तर हा स्‍वत:ला गरूडापेक्षाही श्रेष्‍ठ असा पक्षी म्‍हणून स्‍वत:ची ओळख करून देईल पण प्रत्‍यक्षात हा मोठेपणाचा आव आणणारा एक भिकार डोमकावळा आहे.'' 

तात्‍पर्य: काही काही लोकांना मोठेपणाचा आव आणण्‍याची प्रचंड सवय असते. यामध्‍ये त्‍यांनी कितीही जरी मोठेपणाचे सोंग घेतले तरी इतर सूज्ञ लोक हे त्‍यांची पात्रता जाणून असतात.


=========================

 त्यांचा त्रास तू असा चुकव
        ━━━━━━━━━━━━━━━━━━━
गुरुगृही अध्ययन करुन घरी गेलेला एक शिष्य एकदा गुरुंकडे आला व त्यांना म्हणाला, 'गुरुदेव ! मला रिकामटेकडया आप्तमित्रांचा अतिशय त्रास होतो. ते कोणत्याही कामाशिवाय वारंवार माझ्या घरी येतात; तास्नतास इकडच्या तिकडच्या निरर्थक गप्पा मारतात, आणि नुसता माझा वेळच घेतात असं नाही, तर माझ्या वाचनात व चिंतनाही व्यत्यय आणतात. त्यांचा हा त्रास मी कसा टाळू?'

गुरु म्हणाले, 'वत्सा ! तुझ्याकडे जे तुझे श्रीमंत आप्तमित्र येतील, त्यांच्याकडे तू पैसे उसने मागू लाग. असे केलेस म्हणजे तुला पैसे उसने द्यावे लागू नयेत, म्हणून ते तुझ्याकडे यायचे आपोआप बंद होतील.'

  शिष्य म्हणाला, 'गुरुदेव ! ही युक्ती मोठी नामी सांगितलीत, पण तरीही मला माझ्या गरीब आप्तमित्रांचा त्रास होतच राहील, तो कसा चुकवू ?'गुरु म्हणाले, 'त्या गरीब आप्तमित्रांनी तुझ्याकडे उसने म्हणून पैसे मागितले की तू ते बेशक देत जा. म्हणजे घेतलेले पैसे बुडविता यावेत, या हेतूनं तेही तुझ्याकडे यायचे बंद होतील.'



==================

  भीमटोला
        ━━━━━━━━━━━━━━━━━━━
एकदा धर्मराज दरबारात बसले असता, त्यांच्याकडे एक गरीब ब्राह्मण मदत मागायला आला. धर्मराज त्याला म्हणाले, तु उद्या ये, मी तुला दान देऊन संतुष्ट करीन. 'धर्मराजांचं ते अश्वासन ऎकुन तो ब्राह्मण बाहेर पडला. त्याच वेळी धर्मराजांचं ते बोलणं ऎकलेला भीमही त्या ब्राम्हणापाठोपाठ दरबारातून बाहेर गेला.

  दरबारातून बाहेर पड्ताच भिमानं त्या ब्राह्मणाला जरा एका बाजुला बसायला सांगितलं आणि स्वतः तो नगारखान्याकडे गेला.नगारखान्यात दोन प्रकारचे नगारे होते. एक नगारा कुठ्ल्याही तर्हेचं संकट आलं असता वाजवायचा होता, आणि त्याचा आवाज अंगावर काटा उभा करणारा होता. दुसरा नगारा काहीतरी आनंदाची वा आश्चर्यांची गोष्ट घडून आली असता वाजवायचा होता आणि त्याचा ध्वनी गोड होता.
नगारखान्यात जाऊन भिमानं आनंदाचा नगारा वाजवायला सूरुवात केली. तो आवाज ऎकुन ‘काय आनंददायी घडले?’ हे पहाण्यासाठी प्रत्यक्ष धर्मराज तिथे आले. स्वतः भीम तो नगारा बडवीत असल्याचं पाहुन त्यांनी विचारलं, भिमा ! असं काय आनंददायी घडलं, म्हणुन तु हा नगारा वाजवु लागलास ?' भीम म्हणाला, 'दादा, आजपर्यंत शास्त्रे व आपला अनुभव आपल्याला असं सांगत आला की, जन्माला आलेल्या कुणाही जिवाला आपल्या आयुष्याचा भरंवसा देता येत नाही. कुणाला केव्हा 'वरचं आमंत्रण ' येईल याची शाश्वती नाही. म्हणून कुठलीही आज करता येण्यासारखी चांगली गोष्ट उद्यावर ढकलु नये.

 पण नूकत्याच मदत मागायला आलेल्या ब्राह्मणाला ज्या अर्थी तुम्ही उद्या यायला सागिंतले आहे, त्या अर्थी तुम्ही व तो ब्राह्मण किती जगणार आहात, हे तुम्हाला निश्चीतपणे समजलं आहे. ही नवलाची व आनंदाची गोष्ट मला कळली, म्हणून मी हा नगारा वाजवीत आहे.'या भीमटोल्यानं धर्मराजांचे डोळे उघडले. त्यांनी तिथल्या तिथे त्या ब्राम्हणाला मदत केली आणि भीमाच्या चातुर्याची प्रसंशा केली..

===============

          📚कष्टाविना फळ नाही  📚━━━━━━━━━━━━━━━━  
💢 एका गावात एक गरीब पंडित राहत होता. सर्व काही नशिबानेच मिळते असा त्याचा समज होता. जेंव्हा त्याचा मुलगा त्याला गरीबीबद्दल विचारायचा तेंव्हा तो त्याला सांगायचा कि, "बाबारे ! हा सर्व नशिबाचा खेळ आहे." एके दिवशी हाच प्रश्न त्याच्या मुलाने गावाच्या मंदिरातील पुजाऱ्याला विचारला. पुजाऱ्याने त्याला दुसऱ्या दिवशी आपल्या वडिलांसोबत येण्यास सांगितले. जेंव्हा दोघेही पुजाऱ्याकडे गेले तेंव्हा पुजाऱ्याने मुलाच्या हातावरील रेषा पाहून म्हंटले, "पंडितजी! आपला पुत्र फारच भाग्यशाली आहे. परंतु याच्यावर एका ग्रहाचा कोप आहे. एक अनुष्ठान करण्याने तो कुप्रभाव नष्ट होईल." यावर पंडितजींनी विचारले,''आम्हाला काय करावे लागेल.?" पुजारी म्हणाला,"तुम्ही दोघांनी मिळून आश्रमाच्या अंगणात एक विहीर खोदा म्हणजे ग्रहाचा वाईट प्रभाव कमी होईल." पिता-पुत्र विहीर खोदण्याच्या कामाला लागले. अनेक दिवसांच्या परिश्रमानंतर त्यांना त्या खड्ड्यात एक घागर दिसू लागली. त्यांनी ती घागर पुजाऱ्याकडे नेली. पुजाऱ्याने घागरीवर बांधलेला कपडा काढला. तेंव्हा त्यात सोन्याच्या मुद्रा दिसू लागल्या आणि त्यात एक चिठीही दिसू लागली. ती चिट्ठी हातात घेवून त्या मुद्रा पंडितजींना देत पुजारी म्हणाला,"हे आपल्या भाग्यात नाही." हे ऐकून पुत्राने पंडितजींना विचारले,"भाग्य काय असते? हे आपण सांगितले नाही." पुजाऱ्याने ती चिट्ठी त्याला दिली, त्यात लिहिले होते,"भाग्याचेच दुसरे नाव कर्म आहे. आता पंडितजींच्या लक्षात आले कि, आपोआप काही घडत नाही तर कर्म केल्याने भाग्य साथ देते.

तात्पर्य - अकर्मण्यता दुर्भाग्याला आमंत्रण देत असते आणि कर्मातुनच भाग्य खुलते. (थोडक्यात काय कष्टाशिवाय फळ मिळत नाही हेच खरे!!)

===============================

 "ऐक बोध कथा" 🤷‍♂
💁‍♂️  "कर्म म्हणजे काय" 💁‍♀️
एक वेळेस सिध्दार्थ गौतम बुद्ध यांच्या शिष्याने बुध्दांना विचारले की गुरूजी कृपया आम्हाला कर्म म्हण तज्ञजे काय आहे ते सांगा. तेंव्हा बुध्दांनी आपल्या शिष्यांना एका गोष्टीच्या माध्यमातून कर्म म्हणजे काय ते स्पष्ट करून दिले.  ती गोष्ट खाली देत आहे. 
बुलंद नगरचा एक राजा होता. तो एके दिवशी आपल्या प्रधानासोबत घोड्यावर बसून शहरात प्रदक्षिणा घालत होता. प्रदक्षिणा घालता घालता तो एका दुकानासमोर येऊन थांबला आणि आपल्या प्रधानाला म्हणाला की "प्रधानजी असे काय झाले आहे की या दुकानदाराला देहदंड देण्याचे माझे मन करत आहे" प्रधान राजाला याचे कारण विचारण्या अगोदरच राजा पुढे निघून गेला. प्रधानाने याचे कारण शोधून काढण्यासाठी दुसर्‍या दिवशी वेश बदलून त्या दुकानात गेला. ते दुकानात चंदनाची लाकडे विक्री केली जात असत. प्रधानाने त्या दुकानदाराला विचारले की काय दुकानदार कसा चालला आहे आपला व्यवसाय. तेंव्हा तो दुकानदार म्हणाला की काय सांगू बाबा तुला, माझी अत्यंत वाईट अवस्था आहे. दुकानात गिर्‍हाईक येतात चंदनाचा सुगंध घेऊन प्रशंसा तर खूप करतात पण खरेदी कोणीच करत नाहीत. 
"मी आता एवढी एकच प्रतिक्षा करत आहे की, आपल्या नगरीचा राजा केंव्हा एकदा मरतो आणि त्यांच्या चित्तेसाठी माझ्याकडुन खूप मोठ्या प्रमाणात चंदनाची लाकडे खरेदी केली जातील. आणि तिथून पुढे माझ्या व्यवसायात मोठ्या प्रमाणात वाढ होईल". प्रधानाच्या सर्व ध्यानात आले की "हेच नकारात्मक विचार आहेत आणि राजाच्याही मनात नकारात्मक विचार निर्माण झाले". प्रधान अत्यंत हुशार होता. त्याने विचार केला की मी थोडी चंदनाची लाकडे खरेदी करतो. त्याने त्या दुकानदाराला विचारले की काय आपण मला काही चंदनाची लाकडे देऊ शकता का? त्यावर दुकानदार खूप खूष झाला. त्याला वाटले चला थोडे फार का होईना विक्री तर होईल. एवढे दिवस झाले काहीच विक्री झाली नव्हती. त्याने ती सर्व लाकडे एका सुंदर पेपर मध्ये पॅकिंग करुण ती लाकडे प्रधानाला दिली. "प्रधान दुसर्‍या दिवशी सकाळी ती सर्व लाकडे घेऊन प्रधान राजदरबारात आला आणि म्हणाला की, महाराज त्या दुकानदाराने तुमच्या साठी काही चंदनाची लाकडे भेट म्हणून पाठवली आहेत. हे ऐकून राजा खूप खूष झाला आणि मनातल्या मनात विचार करू लागला की अरे मी विनाकारण त्या दुकानदारा बद्दल वाईट विचार करत होतो". राजाने चंदनाचे एक लाकुड हातात घेऊन सुगंध घेतला. त्यातून अत्यंत सुंदर सुगंध येत होता यामुळे राजाला अत्यंत आनंद झाला आणि खूष होऊन राजाने काही सुवर्ण मुद्रा प्रधानाला देऊन सांगितले की या सुवर्ण मुद्रा त्या दुकानदाराला द्या. "दुसर्‍या दिवशी परत प्रधान वेश बदलून त्या दुकानदाराकडे गेला आणि त्या सुवर्ण मुद्रा दुकानदाराला दिल्या. दुकानदार म्हणाला अरे राजा किती दयाळू आहे. मी तर विनाकारण राजाबद्दल वाईट विचार करत होतो". 
गौतम बुद्धांनी येथेच गोष्ट थांबवली आणि आपल्या शिष्यांना विचारले की आता तुम्हीच सांगा की "कर्म म्हणजे काय". शिष्यांनी उत्तर दिले की आपले शब्दच आपले कर्म आहे. आपण जे काम करतो तेच आपले कर्म आहे. बुध्दांनी  सर्व शिष्यांचे उत्तर ऐकून सांगितले की "आपले विचारच आपले कर्म आहे". जर का आपण आपल्या विचारांवर नियंत्रण ठेवले तर आपण महान व्यक्ती होऊ शकतो. आपण चांगले विचार केले तर आपल्या सोबत चांगलेच होते. 
असे होते सिध्दार्थ गौतम बुद्ध. कोणतीही गोष्ट ते अत्यंत साध्या आणि सोप्या पद्धतीने समजून सांगत.... 
🤷‍♂ "आपण यातुन बोध घ्यावा"
🤷‍♂ "आपलं मन ताब्यात ठेवा",,,,,


========================================================


       ☆   चिमणीचा विश्वास   ☆ 
    ( स्थानबद्धतेच्या काळात उपयुक्त )


कौरव-पांडवांमध्ये होणा-या युद्धाकरता कुरुक्षेत्राची सिद्धता करण्याचे काम सुरू होते. हत्तींच्या मदतीने विशालकाय वृक्ष भुईसपाट करण्यात येत होते. मोकळी आणि सपाट अशी युद्धभूमी तयार होत होती. एका विशाल वृक्षावर एक चिमणी आपल्या चार पिल्लांसह राहात होती. तो वृक्ष जमीनदोस्त झाला आणि तिचं घरटं आणि उडताही न येणा-या इवल्या पिल्लांसह कोसळलं... पण आश्चर्यकारकरीत्या ती पिल्लं अजूनही सुखरूप होती.

घाबरलेल्या... हताश चिमणीने, तेव्हाच अर्जुनासहित तिथे आलेल्या श्रीकृष्णांना पाहिले. युद्धभूमीचे निरीक्षण करायला आणि विजयासाठी आवश्यक ती व्यूहरचना ठरविण्यासाठी ते तिथे आले होते.

दुबळ्या पंखांत, सगळी शक्ती एकवटून तिने श्रीकृष्णांच्या रथाकडे उड्डाण केले. "हे कृष्णा, माझ्या बाळांना वाचव!  या भयंकर युद्धात ती चिरडली जातील." तिनं विनवलं.

"तुझं दु:ख मला कळतंय, पण मी निसर्गनियमात ढवळाढवळ करू शकत नाही." श्रीकृष्ण म्हणाले.

"मला इतकंच माहीत आहे, की तुम्ही माझे तारणहार आहात. माझ्या बाळांचं नशीब आता तुमच्या हातात आहे. त्यांना वाचवायचं की मरू द्यायचं, हे आता तुम्हीच ठरवा."

"कालचक्र कोणताही भेदभाव न करता फिरत राहातं," श्रीकृष्ण एखाद्या सामान्य माणसासारखं बोलत होते. असं दाखवत होते की जणू त्यांच्या हातात काहीच नाही.

"हे तत्त्वज्ञान मला कळत नाही. मला फक्त इतकंच कळतं की कालचक्र तुम्हीच आहात, मी तुम्हाला शरण आले आहे." चिमणी अत्यंत आदराने आणि विश्वासपूर्वक बोलत होती.

"मग असं कर, ३ आठवडे पुरेल इतकं अन्न तुझ्या घरट्यात गोळा कर."  श्रीकृष्णांनी सांगितलं.
सुरू असलेल्या या संभाषणाबाबत अनभिज्ञ असलेला अर्जुन चिमणीला हुसकावणार, इतक्यात श्रीकृष्ण तिच्याकडे पाहून स्मितहास्य करताना त्याला दिसले. चिमणीने आदराने पंख फडफडवले आणि ती घरट्याकडे उडून गेली.

दोन दिवसांनंतर, शंखनाद करून युद्धारंभ करण्यापूर्वी श्रीकृष्णांनी अर्जुनाकडे त्याचं धनुष्य आणि बाण मागितले. या युद्धात लढण्यासाठी शस्त्र हातात न धरण्याची प्रतिज्ञा करणा-या श्रीकृष्णांची ही मागणी ऐकून अर्जुन दचकलाच; शिवाय आपण सर्वोत्कृष्ट धनुर्धारी आहोत याबद्दल त्याला विश्वास होता.
"मला आज्ञा करावी, माझ्या बाणांसाठी काहीही अभेद्य नाही."
अर्जुनाकडून शांतपणे धनुष्य स्वत:कडे घेत श्रीकृष्णांनी हत्तीवर नेम धरला.  पण बाणाने हत्तीला खाली पाडण्याऐवजी तो बाण हत्तीच्या गळ्याभोवतालच्या घंटेला लागला आणि काही ठिणग्या चमकल्या. एवढा सोपा नेम हुकलेला पाहून अर्जुन त्याचं चुकचुकणं लपवू शकला नाही.

"मी करू का?" 
अर्जुनाने आर्जव केले. 
त्याच्या त्या प्रतिक्रियेकडे दुर्लक्ष करत श्रीकृष्णांनी धनुष्यबाण त्याला परत दिले आणि आणखी काही करण्याची गरज नसल्याचं सांगितलं.

"पण तुम्ही केशव हत्तीवर वार का केलात?" अर्जुनाने विचारलं.
"कारण चिमणीचं नांदतं घरटं असणारं झाड त्याने पाडलं होतं."
"कोण कुठली चिमणी ती!" अर्जुनाला काही कळेना... "आणि एवढं होऊनही तो हत्ती सुखरूप आणि जिवंत आहे, फक्त त्याच्या गळ्यातली घंटा तेवढी उडून पडलीय."
अर्जुनाच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत, श्रीकृष्णांनी त्याला शंखनाद करण्याची सूचना दिली.

युद्ध सुरू झालं, पुढच्या अठरा दिवसांत अनेकांची आयुष्यं संपली. अखेर पांडवांचा विजय झाला. परत एकदा, त्या रक्तलांछित युद्धभूमीवरून श्रीकृष्ण अर्जुनासहित फिरू लागले. अनेक योद्ध्यांची कलेवरे अंत्यसंस्कारांची वाट पाहात अजूनही तिथेच पडलेली होती. छिन्नविच्छिन्न झालेले दोन्ही बाजूंचे सैन्य, युद्धात मारले गेलेले हत्ती, रथाला जोडलेल्या अवस्थेत मरण पावलेले घोडे यांच्या प्रेतांचा तिथे खच पडला होता.

एका विशिष्ट ठिकाणी श्रीकृष्ण थांबले आणि तिथे पडलेल्या हत्तीच्या गळ्यातल्या घंटेकडे विचारमग्न होऊन पाहात राहिले. "अर्जुना, माझ्यासाठी म्हणून तू ही घंटा उचलून बाजूला ठेवशील का?" श्रीकृष्ण म्हणाले.
या साध्याशा सूचनेने अर्जुन मात्र गोंधळात पडला.  एवढ्या विस्तीर्ण युद्धक्षेत्रावर इतक्या बहुसंख्य इतर गोष्टींचे निवारण करणे बाकी असताना, एक क्षुल्लकसा धातूचा तुकडा उचलायला श्रीकृष्ण त्याला का सांगत असावेत, हे न कळून प्रश्नार्थक नजरेने तो श्रीकृष्णांकडे पाहू लागला.
"हां...हीच ती घंटा, मी बाण मारल्यावर हत्तीच्या गळ्यातून निसटली होती." श्रीकृष्ण म्हणाले.
अर्जुन खाली वाकला आणि कुठलाही प्रश्न न विचारता, त्याने ती जडशीळ घंटा उचलली. आणि त्यानंतर, त्याने जे पाहिले त्याने त्याचे आयुष्य कायमचे बदलले. 
एक, दोन, तीन, चार आणि पाच चार छोट्या चिमण्यांपाठोपाठ एका प्रौढ चिमणीने पंख पसरून झेप घेतली. आनंदाने उडत उडत तिने श्रीकृष्णांना प्रदक्षिणा घातली. निखळलेल्या एका घंटेने एक पूर्ण कुटुंब वाचवले होते.
अर्जुन म्हणाला, "मला क्षमा करा, श्रीकृष्णा! मानवी अवतारातल्या तुला मर्त्य मानवासारखंच वागताना पाहून मी तुझं खरं स्वरूप विसरलो होतो."


=======================================

बोध कथा 🛑

एकदा एका राजाने खुश होऊन लोहाराला चंदनाची बाग भेट दिली. लोहाराला चंदनाच्या झाडांच्या किंमतीचे ज्ञान नव्हते. त्यामुळे त्याने त्या झाडांना कापून त्यांचा कोळसा करून विकला. हळूहळू संपूर्ण बाग रिकामी झाली.

एक दिवस असेच राजा त्याच्या घरा जवळून जात होता, राजाला वाटले लोहार आता खुप श्रीमंत झाला असेल. परंतु प्रत्यक्षात पाहिल्यावर लोहाराची परिस्थिती पहिल्या सारखीच आहे असे दिसले,  राजाला आश्चर्य वाटले.

सत्य समजल्यानंतर राजाने त्याला विचारले, तुझ्याकडे एखादे लाकुड़ शिल्लक आहे का.? तेव्हा लोहाराने कुऱ्हाडीचा दांडा दाखविला.

राजाने त्याला चंदनाच्या व्यापाऱ्या कडे पाठवले. तेंव्हां त्या छोटयाश्या तुकडयाचे त्याला खुप पैसे मिळाले. लोहार खुप रडू लागला, त्याने राजाला अजुन एक बाग देण्याची विनंती केली, तेंव्हा राजा म्हणाला "अशी भेट वारंवार भेटत नाही."

मित्रांनो आपले आयुष्य त्या लोहारा सारखेच आहे. मानवी जीवनाच्या मुल्यांचे महत्व, आपल्याला जीवनाचे शेवटचे श्वास चालू असताना समजते. पण... त्यावेळेस आपण म्हणतो देवा मला अजुन थोड़ा वेळ दे, परंतु त्यावेळी वेळ मिळणे अशक्य असते.

मानवी जीवन अनमोल आहे.
असे सुंदर जीवन परत मिळणार नाही.

                    🛑 बोध 🛑
     
या जगात  दुर्लभ गोष्ट कोणती असेल तर ती म्हणजे, मनुष्य देह त्या देहाचा कोळसा करायचा की, चंदन हे आपले आपण ठरवायचे.

========================================


           🦚  बासरी ... !!  🦚

बासरी तयार करण्यासाठी लागणारा बांबू हा तिथी पाहून तोडतात.

पंचमी, सप्तमी, अष्टमी, नवमी, दशमी या तिथींना बांबू तोडला तर त्याला हमखास कीड लागते, असं बासरी तयार करणारे सांगतात.

त्याचं कारण म्हणजे या तिथींमध्ये शेवटी ' मी ' येतो. याच ' मीपणाच्या ' अहंकारातून कार्यनाश होतो आणि बासरी टिकत नाही, असा समज आहे.

कृष्णाचं आवडतं वाद्य बासरी. एकदा कृष्णाच्या सगळ्या सख्या, म्हणजे समस्त गोपी बासरीवर चिडल्या आणि म्हणाल्या, "आम्ही त्या कृष्णाची एवढी स्तुती करतो, त्याच्या आजूबाजूला वावरतो, पण तो आम्हाला साधा भावही देत नाही. तू तर एवढी साधी; ना रूप ना काही. पण तो तुला सतत ओठांशी धरून असतो. तू अशी काय जादू केली आहेस त्याच्यावर ?"

बासरी हसली आणि म्हणाली, 'तुम्ही माझ्यासारख्या व्हा, मग कृष्ण तुम्हालाही जवळ घेईल.'
अर्थ न कळून गोपींनी बासरीकडे पाहिलं... बासरी पुढे म्हणाली, 'मी अगदी सरळ आहे;  ना एखादी गाठ...ना एखादं वळण... मी पोकळ आहे. त्या पोकळीतूनच माझ्यातला अहंकार गळून पडलाय.'

माझ्या अंगावरच्या सहा छिंद्रातून काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे रिपू मी काढून टाकले आहेत.

मला स्वत:चा आवाजही नाही. माझ्या सख्यानं फुंकर मारली तरच मी बोलते.

तो जशी फुंकर मारतो तशी मी बोलते. यावर गोपी निरुत्तर झाल्या.


अहंकार रहित शरीर...
हीच श्रीहरीची बासरी होय !!


       🌼  !! जय श्रीकृष्ण !!  🌼


=========================================================

"ससा आणि कासव यांची वेगळी कथा"
---------------------------------------
एकमेका साहाय्य करू अवघे धरू सुपंथ
----------------------------------------------

ससा आणि कासवाच्या शर्यतीत ससा झोपून राहिल्याने हरला. कासव जिंकले पण सशाला शांत बसवेना .आपल्यात वेगाने पळण्याची क्षमता अधिक असूनही निव्वळ झोपल्यामुळे आपण हरलो हे त्याच्या लक्षात आले. पराभवाचा हा सल संपविण्यासाठी त्याने कासवापुढे पुन्हा शर्यतीचा प्रस्ताव ठेवला. विजयाच्या आनंदात आपण जिंकू शकतो, यावर विश्वास बसलेल्या कासवाने होकार भरला. शर्यत पुन्हा सुरू झाली. यावेळी सशाने चूक केली नाही. तो थांबला नाही. झोपला नाही. परिणामी, वेगवान ससा शर्यत जिंकला. हळू चालणारे कासव हरले.
    पण एकदा विजयाची चव चाखलेलं कासव हार पत्करायला तयार नव्हतं. कासव पुन्हा सशाकडे गेलं. म्हणालं,'मी तुझं ऐकलं. आता तू माझे ऐक. आपण पुन्हा शर्यत लावू !'ससा हसला आणि म्हणाला, "एकदा माझ्या चुकीमुळे हरलो. पुनःपुन्हा मी ती चूक कशी करेन ? पण तुझी हरण्याचीच इच्छा असेल तर लावू पुन्हा शर्यत !' सशाचा होकार मिळाला तसं कासव म्हणालं, 'पण यावेळी शर्यतीचा मार्ग मी ठरवणार !' स्वतःच्या वेगाची आणि कासवाच्या धिम्या गतीची खात्री असलेल्या सशाने त्यालाही होकार भरला .
    शर्यतीचा मार्ग कासवाने ठरवला. शर्यत पुन्हा सुरू झाली ससा चूक करणार नव्हता. तो वेगात पळत राहिला. कासव मागे राहिलं पण पळता पळता अचानक ससा थबकला. जागेवर थांबला. पुढे आडवी नदी वाहत होती. कासवाने बरोबर मार्ग काढला होता. सशाला पोहता येत नव्हतं. ससा तिथेच थांबुन राहिला. हळूहळू येणारं कासव तिथे पोहोचलं. त्याने सशाकडे सस्मित पाहिलं आणि नदीत उडी मारून पलीकडच्या काठावर पोहत पोहोचलही.शर्यत कासवाने जिंकली. सशाच्या वेगक्षमतेवर कासवाने स्वतःच्या बुद्धिक्षमतेने मात दिली .हरलेला ससा विचार करत राहिला. आपल्याला पोहता येत नाही, म्हणून आपण हरलो, हे त्याच्या लक्षात आलं.तो विचार करून पुन्हा कासवाकडे गेला. म्हणाला,'मित्रा, आपण आजपासून शर्यत नाही लावायची.आजपासून एक करायचं. जिथे जमीन असेल तिथे मी तुला पाठीवर घेईन. जिथे नदी आडवी येईल तिथे तू मला पाठीवर घे. दोघे मिळून आपण असे पुढे जात राहिलो, तर सर्वात पुढे आपण दोघेच असू !'
    प्रत्येकात साऱ्या गोष्टी अथवा गुण कधीच नसतात. मात्र प्रत्येकात काहींना काही गुण असतोच.जे आपल्यात नाही ते इतरांकडे असू शकते. जे इतरांकडे नाही ते आपल्याकडे असू शकतं. अशा एकमेकांच्या गुणांचा वापर करीत आपल्यातला उणेपणा भरून काढता येतो.सर्वोत्तम यश गाठता येतं.
  एकमेकांना पराभूत करण्यात शक्ती खर्ची घालण्यापेक्षा एकमेकांच्या शक्तीच्या बळावर बलाढ्य काही करता येतं. वैयक्तिक मोठेपणाच्या अभिलाषेपायी निव्वळ दुसऱ्याच्या चुका काढण्यापेक्षा, त्यांच्यातील चुकांकडे दुर्लक्ष करून त्यांच्यातील उत्तम गुण हेरून त्यांचा वापर करून घेणं, ही खरी यशस्वी क्रियाशीलता !
     उपयोगी पडणारी माणसं मिळवणं आणि आपण कोणाच्या उपयोगी पडू शकतो ते पाहून त्याला मदत करणं या सहकार्यभावनेच्या जोरावरच मोठमोठी कार्य सिद्धीस नेली जातात. काही लोकांकडे कल्पनाक्षमता असते;पण कल्पना सत्यात उत्तरावणारी कृतीक्षमता नसते.काहींकडे शक्ती असते; पण योग्य नियोजनक्षमता नसते. काहींकडे संघटनक्षमताअसते; पण निर्णयक्षमता नसते. निर्णयक्षमता असते; तर नेतृत्वक्षमता नसते. अशावेळी ज्याच्याकडे जे आहे त्याचा त्याच्या गुणांचा योग्य वापर करीत सांघिकपणे पुढे जाणे म्हणजेच बिकट रणांगणही जिंकणे!
   यश मिळवायचं असेल तर असे गुण आणि गुणी माणसं वेचणं हे फार महत्त्वाचं !संकटाच्या क्षणी गोगलगायीसारखे पोटात पाय घेऊन स्वतःच्याच कोषात लपून राहणं टाळलं पाहिजे!याउलट जास्तीत जास्त माणसं जोडा. जुन्या सौहार्दाचा शोध घ्या ! नव्याने मैत्री करा. साऱ्यांच्या संपर्कात राहा. मिळूनमिसळून वागा. तुमच्यासाठी जे जे उत्तम ते ते शोषून घेण्यासाठी तत्पर असलेले टिपकागद व्हा !


===============================================

अनेक वर्षापूर्वीची गोष्ट आहे. एका गावात खूप उंदीर झाले होते. घरात, शेतात, दुकानात सगळीकडे नुसते उंदीरच उंदीर होते. त्यामुळे अन्न - धान्याचे नुकसान होत होते. कोणत्याही परिस्थितीत उंदरांचा नाश करायचा असे गावकरी ठरवतात. पण, अनेक उपाय करूनही उंदरांचा नाश होत नाही. त्यामुळे गावकरी खूप त्रस्त होतात.
ही गोष्ट शेजारी राहणाऱ्या गावातील एका बासरीवाल्या मुलाला कळते. मग तो गावात येतो व गावकऱ्यांना सांगतो की, ‘मी या उंदरांचा बंदोबस्त करू शकतो पण त्या बदल्यात तुम्ही मला शंभर सुवर्णमुद्रा दयाव्यात.’ गावकरी तयार होतात. 
मग, तो बासरीवाला बासरी वाजवत गावात फिरू लागतो. त्याच्या बासरीच्या आवाजामुळे गावातील सर्व उंदीर त्याच्याकडे आकर्षित होतात व त्याच्यामागे धावू लागतात. तो मुलगा गावाबाहेरील नदीत जातो त्याच्याबरोबर उंदीरही पाण्यात जातात आणि पाण्यात बुडून मरतात. बासरीवाला मुलगा गावकऱ्यांकडे आपल्या कामाचा मोबदला मागतो परंतु गावकरी ठरल्याप्रमाणे त्याला शंभर सुवर्णमुद्रा दयायला नकार देतात. बासरीवाल्याला कळते की गावकरी लबाड आहेत. तो म्हणतो की, ‘आता मी तुम्हाला कशी अद्दल घडवतो ते बघा.’ तो पुन्हा गावात बासरी वाजवत फिरू लागतो. पण यावेळी बासरीच्या आवाजाने गावातील लहान मुले त्याच्याकडे आकर्षित होतात व तेही त्याच्यामागे धावू लागतात.
गावकऱ्यांना भीती वाटू लागते की, बासरीवाला उंदराप्रमाणे आपल्या मुलांनाही नदीत घेऊन जाईल. त्यामुळे गावकरी त्याला थांबवतात व ठरल्याप्रमाणे शंभर सुवर्णमुद्रा देतात.
तात्पर्य - जो आपल्यावर उपकार करतो त्याला कधीही विसरू नये.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

एके दिवशी अचानक बादशहाने दरबाऱ्यांना तीन प्रश्न विचारले - ‘कोणाचा मुलगा सर्वोत्तम आहे? कोणाचे दात सर्वोत्तम आहे? कोणाची गुणवत्ता सर्वोत्तम आहे’?

सर्व दरबारी आपापसात विचारल्या गेलेल्या प्रश्नांवर चर्चा करायला लागले. त्यांच्यातील एक मोठा दरबारी बोलला ‘महाराज! राजाचा मुलगा सर्वोत्तम आहे. हत्तीचे दात सर्वोत्तम आहे. व ज्ञान ही सर्वोत्तम गुणवत्ता आहे.’

अकबरने सर्व उत्तरे ऐकली व विचार करू लागला, जर बिरबल येथे उपस्थित असता तर त्याने मला अधिक योग्य उत्तरे दिली असती.

त्याने तात्काळ बिरबलला बोलविणे पाठविले. बिरबल जेव्हा दरबारात आला तेव्हा अकबरने त्याला त्या तीन प्रश्नांची उत्तरे विचारली.

बिरबल उत्तरला, ‘महाराज गाईचा मुलगा हा सर्वोत्तम आहे. कारण तो आहे की जो जमीन नांगरतो. अगदी त्याचे शेण सुध्दा खत म्हणून उपयोगी पडते. पीक त्याच्यामुळेच उगवते आणि सर्वांसाठी अन्न तयार होते.’

‘दुसरे उत्तर आहे की नांगराचे दात हे सर्वोत्तम आहे. तो जमीन नांगरतो व सुपीक बनवतो. तो आपल्याला पीक वाढविण्यासाठी सक्षम करतो.’

तिसऱ्या प्रश्नाचे उत्तर देताना बिरबल बोलला ‘महाराज मी सांगू इच्छीतो की धैर्य सर्वोत्तम गुणवत्ता आहे. बुध्दिमान व्यक्ती पण धैर्याशिवाय काही करू शकत नाही. जरी ज्ञान ही उत्तम संपत्ती आहे , तरी धैर्य हे महत्वाचे आहे.’

अकबर व सर्व दरबारी बिरबने दिलेल्या प्रश्नांची उत्तरे ऐकून खूप आनंदी झाले.

++++++++++++++++++++++++++++++++++


एका गावात एक भिकारी रहात होता. तो रोज भीक मागून त्याचा उदरनिर्वाह करत असे.त्याला जे मिळेल तो ते खायचा काही मिळाले नाही तर पाणी पिऊन जगायचा. भीक मागण्याबरोबरच तो दिवसभर देवाचे नामस्मरण करायचा असा त्याचा नित्यक्रम होता.
देवाला त्याची दया आली व एक दिवस देव त्यावर प्रसन्न झाला व म्हणाला ‘ तुला काय हवे ते माग’ भिकाऱ्याने सोन्याच्या मोहरा मागितल्या. देव म्हणाला ‘मोहरा कशात घेणार?’ भिकाऱ्याने झोळी पुढे केली. मोहरा झोळीत टाकण्यापूर्वी देव म्हणाला ‘मी तुझ्या झोळीत मोहरा टाकत जाईल जेव्हा तू थांब म्हणशील तेव्हाच मी थांबेल.पण हे लक्षात ठेव जर तुझ्या झोळीतून एक जरी मोहर खाली जमीनीवर पडली तर त्याची माती होईल.’ भिकाऱ्याने जेव्हा अट मान्य केली. देव भिकाऱ्याच्या झोळीत मोहरा ओतू लागला हळूहळू झोळी भरत आली पण भिकाऱ्याला सोन्याचा मोह आवरेना. मोहरांच्या वजनाने झोळी फाटू शकते हे त्याच्या लक्षात येऊनही तो थांब म्हणत नव्हता. 
शेवटी जे व्हायचे तेच झाले. त्याची झोळी फाटली व त्यातील सर्व सोन्याच्या मोहरा खाली पडतात व त्याची माती होते. त्याचबरोबर देवही नाहीसा होतो व त्याच्याजवळ रडण्याशिवाय काहीच उरत नाही.
आणि शेवटी समाधानी वृत्ती नसल्यामुळे तो भिकारी पुन्हा गरीब व भिकारीच रहातो.
तात्पर्य - कोणत्याही गोष्टीचा अति लोभ करू नये.


++++++++

उंदीर, कोंबडा आणि मांजर 
 
एक उंदराचे पिटुकले पिल्लु पाहिल्यांदा आपल्या बिळातून बाहेर पडले होते, ते थोडा वेळ इकडेतिकडे फिरून पुनः बिळात गेल्यावर आपल्या आईस म्हणते, ‘आई, ज्या या लहानशा जागेत तू मला लहानाचे मोठे केलेस, ती जागा सोडून आज मी अंमळ बाहेर जाऊन आले; तेथे मी जी मौज पाहिली, ती काही विलक्षणच. 

रस्त्याच्या बाजूने फिरत असता, मी दोन प्राणी पाहिले; त्यापैकी एक प्राणी फार गडबडया स्वरूपाचा असून त्याच्या डोक्यावर तांबडया रंगाचा तुरा होता. 

तो प्राणी जेव्हा जेव्हा आपली मान हलवी, तेव्हा तेव्हा तो तुराही हालत असे. मी त्याची ही मौज पहात होतो, इतक्यात त्याने आपले दोन्ही हात हलविले आणि असा काही कर्कश शब्द केला की, त्याने माझ्या कानठळ्याच बसून गेल्या.

आता दुसर्‍या प्राण्याची गोष्ट ऐक. तो प्राणी फार सभ्य आणि शांत असून, त्याच्या अंगावर रेशमासारखी मऊ लोकर होती. तो चांगला देखणा असून, त्याचे एकंदर वर्तन असे होते की त्याच्याशी आपली मैत्री व्हावी असे मला वाटल्याशिवाय राहिले नाही. 

’ हे भाषण ऐकून उंदरी त्यास म्हणाली, ‘वेडया पोरा ! तुला काडीचीही अक्कल नाही. नुसत्या दिखाऊपणावर जाशील तर फसशील, हे लक्षात ठेव. तू जो प्राणी पाहिल्याने पाहिलास व ज्याचा शब्द ऐकून तुला इतके भय वाटले, तो विचारा कोंबडा अगदी निरुद्रची असून, एखादे वेळी त्याच्या मांसाचा थोड तरी भाग आपणास मिळण्याचा संभव आहे; पण रेशमासारख्या मऊ अंगाचा जो दुसरा प्राणी तू पाहिलास ते दुष्ट लबाड आणि क्रूर मांजर असून, उंदराच्या मांसाशिवाय दुसरा कोणताही पदार्थ त्याला फारसा आवडत नाही, हे लक्षात ठेव.’

तात्पर्य: बाह्य देखावा आणि सौंदर्य यांवरून माणसाच्या अंतरंगाची परीक्षा होणे शक्य नाही.

==========================================

      📚 संकल्प 📚━━━━━━━━━━━━━━━━  
💢 एक ऋषी ब-याच काळा पासून यज्ञ करायचा प्रयत्न होते परंतु त्यांच्या यज्ञाला काही यश येत नव्हते. त्यांच्या आश्रमा पासून तेंव्हा राजा विक्रमादित्य चालले होते. त्यांनी त्या ऋषींची हि उदासी पाहिली आणि म्हणाले," ऋषिवर! तुम्ही असे उदास का? माझ्या राज्यात तुम्हाला काही त्रास होतो आहे का? माझ्या राज्यातील कोणी उदास, निराश राहिलेले मला योग्य वाटत नाही."

त्यावर ऋषी म्हणाले," महाराज! मी ब-याच काळापासून यज्ञाचा प्रयत्न करतो आहे पण जसा अग्नी मला अपेक्षित आहे तसा तो माझ्या यज्ञातून प्रकट होत नाही." त्यावर राजे विक्रमादित्य म्यानातील तलवार काढून म्हणाले," एवढीच गोष्ट आहे ना! मी आता या क्षणी संकल्प करतो कि, जर आज संध्याकाळपर्यंत या यज्ञात अग्निदेव प्रकट झाले नाहीत तर मी माझे शीर या तलवारीने कापून या यज्ञात आहुती देईन." यानंतर राजाने काही आहुत्या दिल्या व काही वेळातच त्या यज्ञात अग्निदेव प्रकट झाले. अग्निदेव राजांना म्हणाले," मी तुझ्या वर प्रसन्न आहे! वर माग! " त्यावर राजा म्हणाले " या ऋषींची इच्छा पूर्ण करा ! त्यांचा यज्ञ संपूर्ण करा! त्यांच्या यज्ञाचे त्यांना मनोवांच्छित फळ त्यांना मिळू दे!" यावर ऋषी म्हणाले " राजा ! तुम्ही एकतर अग्नीस प्रसन्न करून घेतले. पण मी हि खूप प्रयत्न केले होते कि! पण आपण काही आहुत्या दिल्या आणि अग्नीस प्रकट कसे काय केले? " यावर राजा काही बोलण्या आधीच अग्निदेव उत्तरले," ऋषिवर! राजाने जे काही केले त्यात त्यांचा स्वत:चा काहीच हेतू नव्हता आणि त्यांचे कार्य हे दृढ निश्चयाने आणि ध्यासपुर्वक केले होते. त्यामुळे ते कार्य सफल झाले. म्हणून मी त्वरित प्रकट झालो."

तात्पर्य-संकल्पपूर्वक केले जाणारे कोणतेही काम अपेक्षित उद्दिष्ट साध्य करते.
                  
   ━━━━Ⓜ💲🅿━━━━
  सचिन रमेशराव वावरकर अमरावती
       महाराष्ट्र शिक्षक पँनल
     📞 7743912801 📞

+++++++++++++++++++++++++++++++

पती पत्नी आणि त्यांचा मुलगा        ━━━━━━━━━━━━━━━━━━━
एक भक्त कुटुंब होतं. त्यात पती-पत्नीव्यतीरिक्त त्यांचा मुलगाही होता. तिघेही ईश्वरावर विश्वास ठेवत नसत. एकदा त्यांचा मुलगा आजारी पडला. त्यांनी खूप उपचार केले. पण तो ठीक झाला नाही. त्याचवेळी पतीला एका कामासाठी दुसऱ्या शहरात कामासाठी जावे लागले, त्याने पत्नीकडे चिंता व्यक्त केली. मात्र पत्नीने त्याला आश्वासन दिले कि ती मुलाची यथायोग्य काळजी घेईल. पती गावाला निघून गेला. दुर्दैवाने तो जाताच मुलगा मरण पावला. पत्नीने मोठ्या धैर्याने मुलाचे प्रेत झाकून ठेवले आणि संध्याकाळी पती येण्याच्या वेळेत स्वयंपाक करू लागली, पतीने येताच विचारले, मुलाची तब्येत कशी आहे? पत्नी म्हणाली, आज तो विश्रांती घेत आहे. तुम्ही आधी जेवण करून घ्या.

   त्यानंतर त्याच्याकडे जा. पती जेवण करू लागला. तेव्हा पत्नी म्हणाली, "शेजारणीने माझ्याकडे भांड्यात पाणी मागितले होते, मी तिला दिले, आता जेंव्हा मी माझे भांडे मागत आहे, तेंव्हा ती माझ्यावरच चिडत आहे. भांडत आहे व भांडे माझेच म्हणून हट्ट धरून रडत बसली आहे." पती म्हणाला,"मूर्ख बाई आहे ती ! दुसऱ्याची वस्तू परत करण्यासाठी कुठे रडत बसायचे असते का?" तोपर्यंत पतीचे भोजन झाले होते. तेंव्हा पत्नी म्हणाली, "आपला मुलगा हे पण ईश्वराचे देणे होते, ती वस्तू आज ईश्वराने परत मागून घेतली आहे. मग आपणही शेजारणी सारखे रडत बसायचे का?" पतीने पत्नीच्या तोंडाकडे पाहिले आणि त्याला सगळा मामला समजून आला, तो म्हणाला,तू ठीक म्हणतेस. मग त्या दोघांनी मिळून आपल्या मुलाचे पुढील अंतिम संस्कार मोठ्या धैर्याने पूर्ण केले.


तात्पर्य- मानवी जीवन परमेश्वराची देणगी आहे. ते संपल्यावर आपले काहीच चालत नाही.

=========================================

           📚 कवी 📚━━━━━━━━━━━━━━━━  
💢 उज्जैन येथे एकदा खूप पाउस पडत होता. सारे शहर झोपले होते. मात्र राजवाड्याचा द्वारपाल मातृगुप्त जागाच होता. तो पहारा देत आपल्या दुर्भाग्याचा विचार करत होता. कारण तो एक असाधारण काव्यप्रतीभेचा धनी होता. राजा विक्रमादित्य गुणीजनांचा सन्मान करतो हे ऐकून तो येथे आला होता. परंतु राजाची त्याची भेट झाली नसल्याने त्याला द्वारपालाचे काम करावे लागत होते. त्याच रात्री भर पावसात राजा विक्रमादित्य गुप्त वेशात राज्यात पाहणी करावयास निघाले होते. द्वारावर येताच त्यांच्या कानी कुणीतरी काहीतरी गुणगुणल्यासारखे वाटले म्हणून त्यांनी थांबून ऐकले तर मातृगुप्त एक कविता म्हणत होता. त्यांनी त्याला विचारले अरे तू आता पहाऱ्यावर आहे ना? मग हि कविता कोणाची म्हणतोस? त्याने उत्तर दिले, हि कविता माझी आहे आणि या कवितेत मी राज्याची परिस्थिती वर्णन केली आहे. राजे तिथून काहीच न बोलता निघून गेले. दुसऱ्या दिवशी त्यांनी मातृगुप्ताला दरबारात बोलावले व त्याच्या हाती एक पत्र देत त्याला काश्मीरला जायला सांगितले. मातृगुप्ताने फारशी चौकशी न करता ते पत्र घेवून काश्मीरला प्रयाण केले. काश्मीरला पोहोचताच तेथील पंतप्रधानांनी ते पत्र वाचून पाहिले व मातृगुप्ताला काश्मीरचा राजा म्हणून घोषित केले. या गोष्टीचे त्याला खूप आश्चर्य वाटले. त्यावर पंतप्रधान म्हणाले, राजांनी तुझ्या कर्तव्य बुद्धी बरोबरच तुझी राष्ट्रनिष्ठा व काव्यप्रतिभा पाहिली म्हणून त्यांनी तुला येथील राजा केले आहे.

तात्पर्य- प्रतिभा आणि योग्य वेळ, योग्य माणूस यांचा संगम झाला तर प्रतिभेचे चीज होण्यास वेळ लागत नाही.


*****************

       खरे ऐश्वर्य
        ━━━━━━━━━━━━━━━━━━━
आध्यात्मिक साधनेत रममाण असणारी एक महिला डोंगराळ प्रदेशातून प्रवास करत होती.चालता चालता ती एका ओढ्याकाठी पोहोचली, उन्हात चालून ती दमली होती, तिला तहानही लागली होती, ती ओढ्यापाशी थांबली, गार पाण्याने तोंड धुतले, पाणी प्यायली, आपल्या पिशवीतून खाण्याचे पदार्थ काढले आणि झाल्यावर पुढे निघाली. तेवढ्यात तिला पाण्यात काही मौल्यवान रत्ने दिसली, तिने ती रत्ने उचलून आपल्या पिशवीत ठेवली.

   दुसऱ्या दिवशी तिला एक प्रवासी भेटला, त्याला भूक लागली होती, तिने आपली पिशवी उघडून त्याला खायला दिले. उघड्या पिशवीत ठेवलेले रत्न प्रवाशाला दिसले त्याने त्या महिलेला मागितले, तिने क्षणाचा विचार ना करता आणि कुठलेही विचार मनात न आणता ते रत्न त्या प्रवाशाला देवून टाकले. प्रवासी आनंदून निघून गेला. त्याला माहित होते कि ते रत्न विकून त्याला इतका पैसा मिळेल कि त्यात त्याचे आयुष्य सुखात तो सुखात जगू शकेल. पण काही दिवसानंतर तो त्या महिलेला परत भेटला आणि तो तिला शोधात आला होता. त्याने त्या महिलेला ते रत्न परत केले आणि म्हणाला," तुमच्याकडून रत्न घेतल्यावर अगदी नि:स्पृहपणे ते रत्न देतानाचा तुमचा चेहरा माझ्या डोळ्यासमोर सारखा दिसत होता. इतक्या सहजपणे तुम्ही ते मौल्यवान रत्न मला दिले आणि ते मी घेतले पण त्याने मला शांती दिली नाही. पैसा मी हि करू शकलो असतो त्या रत्नाचा पण तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर रत्न देताना जी शांती ठेवली होती ती मला गप्प बसू देत नव्हती. कृपा करून मला या रत्नापासून सुटका द्या आणि तुमच्या अध्यात्मिक अनुभूतीमधून मला शांती मिळवून द्या"

तात्पर्य-मनशांती मिळवण्यासाठी पैसा उपयोगी पडत नाही, त्यासाठी मन मोठे, उदार असावे लागते तेंव्हाच मनशांती मिळते.
                  ++++++++++++++++++++++++++++++++++++

   स्वतःची किंमत

 एका नातवाने आपल्या आजोबांना प्रश्न विचारला " आयुष्याची खरी  किंमत काय असते हो? "

आजोबांनी त्याला एक दगड दिला आणि म्हणाले " ह्या अगोदर तू ह्या दगडाची
खरी किंमत कळावी अशी माझी इच्छा आहे. दगडाची फक्त किंमत काढून ये , विकू
नकोस . " सर्वप्रथम नातवाने एका फळवाल्याला त्या दगडाची किंमत विचारली .
तो त्या चकाकणाऱ्या दगडाला बघून  म्हणाला - ".या दगडाचा मोबदला म्हणून मी
तुला एक डझन सफरचंदे देऊ शकतो." नातवाने  आजोबांच्या आज्ञेमुळे दगड विकू
शकत नसल्याबद्दल  त्याची माफी मागितली व निघाला . वाटेत त्याला एक
भाजीवाला दिसला आणि त्याने त्याला त्या चकाकणाऱ्या दगडाची किंमत विचारली
- " मी तुम्हाला याच्या बदल्यात एक पूर्ण पोते भरून बटाटे देऊ शकतो. "
पुन्हा एकदा नातवाने आजोबांच्या आज्ञेमुळे दगड विकू शकत नसल्याबद्दल
त्याची माफी मागितली व निघाला. आता त्याला एका सराफाचे दुकान लागले. आत
जाऊन त्याने तो चमकणारा दगड सराफाला दाखवून त्याची किंमत विचारली. आपल्या
भिंगातून त्या खड्याचे निरीक्षण करताच तो सराफ उत्तरला - " या खड्यासाठी
मी तुम्हाला  दश लक्ष रुपये देऊ शकतो." नातवंडाला फार आश्चर्य वाटले पण
नातवाने  आजोबांच्या आज्ञेमुळे दगड विकू शकत नसल्याबद्दल  त्याची माफी
मागितली व निघाला. थोडे पुढे आल्यावर त्याला अतिशय दुर्मिळ रत्न आणि मणी
विकणारे दुकान दिसले. त्याने तो दगड तिथल्या रत्नपारख्यास दाखवला. तो
रत्नपारखी ह्या विषयात अतिशय निष्णात होता.त्याने अलगद तो दगड एका मखमली
कापडावर ठेवला. त्या दगडाच्या अवती भोवती प्रदक्षिणा घालत तो म्हणाला - "
अहो, एवढा अमूल्य दुर्मिळ  अनघड हिरा तुम्ही कुठून बरे आणला? मी माझे
अख्खे दुकान जरी विकले तरी सुध्दा ह्या हिऱ्याची किंमत तुम्हाला देऊ नाही
शकणार ."

आता मात्र नातू अतिशय चकित झाला आणि गोंधळलेल्या मनःस्तिथीत  तो
आजोबांकडे परतला . 
त्याचे सर्व अनुभव ऐकून आजोबा म्हणाले - "  मला वाटते
फळवाला, भाजीवाला, सराफ आणि रत्नपारखी ह्यांच्या उत्तरावरून तुला
आयुष्याच्या मोलाविषयी कळले असेल. तुम्ही जरी अतिशय दुर्मिळ अमूल्य हिरा
असलात तरी सुध्दा लोक तुमची किंमत त्यांच्या सीमित समजुती, आकलनशक्ती, हेतू आणि कुवतीनुसारच करणार."
 त्यामुळे आयुष्यात स्वतःची किंमत जाणून घेणे सर्वात महत्वाचे असते.
स्वतःचा आदर करा. इतरांबरोबर कोण्यात्याही निरर्थक तुलने मध्ये गुंतू
नका.  

तात्पर्य  :- मनुष्य या विश्वातील एक अभिनव आणि अद्वितीय निर्मिती आहेत.
तुमच्या सारखे फक्त तुम्हीच आहात. हीच तुमच्या आयुष्याची खरी किंमत आहे.
       

                  


No comments:

Post a Comment

  १. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...