Showing posts with label प्रेरणादायी. Show all posts
Showing posts with label प्रेरणादायी. Show all posts

Wednesday, February 8, 2023

 आपले मन नेहमी विचारात भरकटत असते, त्याला अधूनमधून वर्तमान क्षणात आणणे आवश्यक असते. त्याक्षणी ऐकू येणाऱ्या आवाजावर किंवा शरीराला जाणवणाऱ्या स्पर्शावर ‘ध्यान’ दिले, की मन वर्तमान क्षणात येते. ज्ञानेंद्रिये नेहमी त्या क्षणात जे काही घडते आहे, त्याची माहिती देत असतात. आपले ध्यान त्यावर आणणे, हा ‘माइंडफुलनेस’चा पहिला व्यायाम असतो.


माइंडफुलनेस म्हणजे सजगता. इंग्रजीत ‘टु माइंड’ हे क्रियापद आहे. त्याचा अर्थ ‘लक्ष देणे’ असा आहे. लोकलमधून प्रवास करणारे सारेजण प्रत्येक स्थानकावर ‘माइंड दी गॅप’ ही उद्घोषणा ऐकतात; त्यामध्ये हे क्रियापद वापरलेले आहे. त्याचा उद्देश गाडीत चढताना आणि उतरताना माणसांना सजग करण्याचाच आहे.

माणूस सजग असतो, त्या वेळी त्याला परिसराचे भान असते. संमोहित अवस्थेत असे भान कमी झालेले असते. त्या दृष्टीने संमोहन आणि सजगता या जागृतीच्या ‘स्पेक्ट्रम’च्या दोन टोकांच्या अवस्था आहेत, असे म्हणता येईल. मात्र या दोन्ही अवस्था येण्यासाठी आणि अधिक काळ राहण्यासाठी मेंदूला सराव द्यावा लागतो. या सरावाला ध्यानाचा अभ्यास म्हणता येईल. एकाग्रता ध्यानाची परिणिती ‘ट्रान्स’सदृश भारित स्थितीत होते. सजगता वाढवण्यासाठी मात्र समग्रता विकसित करणारे ‘साक्षी ध्यान’ आवश्यक असते.

या साक्षी ध्यानाचा पहिला टप्पा म्हणजे लक्ष पुनपुन्हा वर्तमान क्षणात आणायचे. आपण काही काम करीत असू, तर त्यावर लक्ष आणायचे. अन्यथा परिसरावर, समोरील दृश्यावर, आवाजावर, स्पर्शावर लक्ष आणायचे. असे लक्ष आणले तरी ते फार वेळ वर्तमान क्षणात राहत नाही. मनात विचार येऊ लागतात. असे विचार येणे स्वाभाविक आहे; विचारांची निर्मिती हेच मेंदूचे एक महत्त्वाचे काम आहे. मात्र, आत्ता आपले लक्ष वर्तमान क्षणात नाही हे लक्षात येणे हेदेखील मेंदूतील ‘डोर्सोलॅटरल प्री-फ्रण्टल’ या भागाचे काम आहे. आपले लक्ष विचलित झाले आहे याचे भान येते, त्या वेळी हे केंद्र सक्रिय झालेले असते. म्हणूनच या भागाला ‘अटेन्शन सेंटर’ म्हणतात.

लक्ष वर्तमान क्षणात नाही, मन विचारात भरकटले आहे याचे भान येईल त्या वेळी ध्यान पुन्हा वर्तमान क्षणात आणायचे. असा सराव पुनपुन्हा केल्यास मेंदूतील हे केंद्र विकसित होते आणि ‘अटेन्शन’ सुधारते, असे संशोधनातून दिसत आहे.

🔅🔅🔅🔅🔅🔅🔅🔅🔅🔅


     *जीवन विकास केंद्र जळगाव*

             9850484722

वाचा आणि आत्मपरीक्षण करा

एक दिवस नेहमीप्रमाणे ऑफीसमध्ये आलेला प्रत्येक कर्मचारी समोरच्या बोर्ड वाचून आश्चर्य चकित होत होता.

" तुमची प्रगती रोखणाऱ्या व्यक्तीचा काल मृत्यु झाला आहे, त्याच्या अंतयात्रेत नक्की सामिल व्हा. "

सुरवातीला प्रत्येकाला कुठल्या न कुठल्या सहकाऱ्या बद्दल वाईट वाटल.

पण नंतर उत्सुकता वाढली, माझी प्रगती रोखणारा नक्की कोण????

यासाठी प्रत्येकजण शवपेटीच्या जवळ जाऊ लागला.
शवपेटीत डोकावून बघताच प्रत्येकाचे डोळे विस्फरले, शरीर स्तब्ध झाले, तोंडातून शब्द फुटेना.

कारण शवपेटीत एक मोठा आरसा ठेवला होता. प्रत्येकजण त्यात स्वतःला बघत होता.

शवपेटीच्या जवळच एक बोर्ड ठेवला होता,

"या जगात तुम्हाला जर कोणी प्रगती पासून रोखु शकतो तर तो फक्त अन फक्त तुम्ही स्वतः"

कंटाळा, आळस, नाकर्तेपणा, कारणे सांगणे, प्रत्येक गोष्टीमधून पळवाट काढणे हे फक्त तुम्ही फक्त स्वतःसाठी करत असता.

तुमच आयुष्य कधीही मित्र, कंपनी, जॉब, बॉस बदलल्यामुळे बदलत नाही.

ते बदलते फक्त आणि फक्त तुम्ही बदलता तेव्हाच.

आयुष्याच्या शेवटापर्यंत दुसऱ्याला कितीही दोष दिला तरी तुमची परिस्थिती बदलणाार नाही.
दुसऱ्याच्या आड़ तुमचा नाकर्तेपणा किती दिवस झाकाल?

तुम्ही तेव्हाच मोठे होवू शकता; जेव्हा तुम्ही स्वतः मोठे व्हायचं ठरवाल. अन्यथा या जन्मात तुम्हाला मोठे करणे कुणालाही शक्य नाही.
.

 *खूप चांगले लिखाण आहे.कंटाळा न करता जरुर वाचा आणि विचार करा......................*


महाभारताचं युद्ध अठरा दिवस चालले. या युध्दामध्ये कौरवांच्या बाजूने व पांडवांच्या बाजूने जेवढी मनुष्यहानी झाली, तेवढी कधीच झाली नव्हती. युद्ध संपल्यानंतर याचा द्रौपदीला खूप त्रास झाला. शरीराने व मनाने ती खूप खंगली होती. वयस्कर दिसायला लागली होती. हस्तिनापुरात सर्वदूर विधवाच विधवा दिसत होत्या. अनाथ मुले इकडे तिकडे फिरताना दिसत होती. एखाद दुसरा फक्त पुरुष दिसत होता.
महाराणी द्रौपदी हस्तिनापुरातील 
महालात दु:खद अंत:करणात निजली होती. तेव्हां श्रीकृष्ण तिच्या कक्षात आला. त्याला पाहून तिला राहावलं नाही. धावत जाऊन तिने त्याला मिठी मारली. ती त्याला म्हणाली, "सख्या, असा तर मी कधी विचारच नव्हता केला. हे असं कसं झालं?
  कृष्ण म्हणाला, "पांचाली, नियती खूप निष्ठूर असते. ती आपल्या मनाप्रमाणे चालते. द्रौपदी, तुला कौरवांचा बदला घ्यायचा होता नां? तू यशस्वी झालीस. फक्त दुर्योधन आणि दुःशासनच नाही तर सर्वच कौरव संपले. द्रौपदी, तुला तर आनंदच व्हायला हवा होता."
  द्रौपदी म्हणाली, "कृष्णा, तू मला सावरायला आला आहेस की हिणवायला आला आहेस ?"
  योगेश्वर कृष्ण म्हणतात, ''नाही द्रौपदी, मी तुला त्यातलं वास्तव 
सांगायला आलो आहे. आपल्या कर्माची फळे आपल्याला दिसत नाहीत. पण ती फळे समोर येतात तेव्हा आपण काहीच करू शकत नाही."
  द्रौपदी विचारते, "कृष्णा, मग ह्या युध्दाला मीच पूर्णपणे जबाबदार आहे. असं तुला म्हणायचं आहे कां?"
  कृष्ण म्हणतात, "नाही द्रौपदी, तू स्वत:ला इतकं महत्त्व देऊ नकोस. तू तुझ्या कर्मात थोडा जरी दूरदर्शीपणा दाखवला असतास तर तुला एवढा त्रास झाला नसता!"
  द्रौपदी विचारते, "कृष्णा, मी काय करू शकत होते?"
  कृष्ण म्हणतो, "तुझ्या स्वयंवराच्या वेळी तू कर्णाचा अपमान करायला नको होतास. त्यानंतर कुंतीने तुला पाच पांडवांची पत्नी होण्याचा आदेश दिला त्याचा तू स्विकार केला नसतास, तर परिणाम काही वेगळे झाले असते. आणि त्यानंतर तू तुझ्या महालात दुर्योधनचा अपमान केला नसतास तर तुझं वस्रहरण झालं नसतं. कदाचित त्यावेळीही परिस्थिती वेगळी असती.
आपले शब्दच आपल कर्म बनवतात. आपण आपला प्रत्येक शब्द विचार करुन बोलायला हवा. नाहीतर त्याचे दुष्परिणाम फक्त स्वत:लाच नाही, तर आपल्या पूर्ण *परिवाराला* *भोगावे लागतात.* 
जगात फक्त मानव असा एक प्राणी आहे की त्याच्या दातात नाही तर जीभेत वीष आहे."
  (ही एक बोधकथा आहे.यातून आपण काय बोध घ्यायचा हे ज्याचे त्याने ठरवावे.)
   *म्हणून शब्द जपून* वापरा.सध्या संपूर्ण देशात कोरोनाचे युद्ध चालू आहे. आपात्कालीन व्यवस्थापन चालू आहे. लोकांचे जॉब गेले आहेत , आर्थिक परिस्थिती खूपच वाईट झालेली आहे, आपल्या लेखनीतून, वाणीतून, जीभेतून निघालेले शब्द आपल्याला संकटात टाकू शकतात. अनेक अडचणी निर्माण करू शकतात. अनेक वर्षांचे संबंध, नाते, मैत्री तोडू शकतात , कुटुंबामध्ये कलह निर्माण होऊ शकतो, त्यामुळे बोलताना विचार करा. समोरची व्यक्ती दुखावणार नाही याचाही विचार करा. दुसऱ्याला बोलताना आपण त्याच्या जागी असतो तर आपण काय केले असते याचाही विचार करा. कधी चुकून एखादा चुकीचा शब्द बाहेर पडलाच तर, तात्काळ त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करून माफी मागा. व समोरच्या व्यक्तीच्या मनातील राग, किल्मिष दूर करा तरच मैत्री, नाते संबंध टिकू शकतात.
ह्या परिस्थिती मध्ये आपलं कटुंब , आपले नातेवाईक , आपला मित्र परिवार आपल्या बरोबर नसेल तर आपण संपून जाऊ. 
आपली माणसच , आपला आधार आहेत . 
*भले भले आले नी रिकाम्या हाती गेले.राहिले ते फक्त त्यांचे कर्म*

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

वनवासाच्या काळात माता सीतेला तहान लागली, तेव्हा श्रीरामाने सर्वत्र बघितले पण पाणी कोठेच मिळेना सर्वत्र जंगलच दिसत होते.तेव्हा श्रीरामाने पृथ्वी मातेला प्रार्थना केली की जेथे कोठे पाणी असेल तेथे जाण्याचा मार्ग अाम्हाला दाखव तेव्हा एक मयुर 🦚तेथे आला व श्रीरामास म्हणाला, येथून थोड्याशा अंतरावर एक जलाशय आहे.चला मी आपणास दाखवतो.पण मार्गात मी उडत उडत जाईन आणि आपण चालत येणार त्यामुळे चुकामूक होऊ शकते. म्हणून मी मार्गात एक एक पंख टाकत जाईन. त्यामुळे आपणास मार्ग सापडेल व आपण जलाशया जवळ पोहचाल.
आपणास माहिती आहे की मयूर पंख, हॆ एका विशेष काळी व एका विशेष ऋतु मध्ये तुटून पडतात पण मोराच्या इच्छे विरूद्ध पंख निघत असतील तर त्याचा मृत्यु होतो. आणि तेच झाले. त्याचे पंख निघत होते त्यामुळे त्याचा मृत्यूचा काळ जवळ आला होता. तेव्हा मोर म्हणाला, की मी किती भाग्यशाली आहे की जो जगाची तहान भागवतो त्या प्रभुची तहान भागवण्याचे मला सौभाग्य प्राप्त झाले. माझे जीवन धन्य झाले.आता मरताना माझी काही इच्छा शेष राहीली नाही.तेव्हा मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामाने मयुरास म्हटले की, माझ्या साठी जे मयूर पंख इच्छे विरूद्ध काढून मार्गात टाकलेस त्यामुळे तुझे माझ्यावर ऋण झाले आहे व जो ऋणानुबंध झाला आहे हे ऋण मी पुढच्या अवतारात नक्की फेडिन. माझ्या कृष्ण अवतारात तुला माझ्या माथ्यावर धारण करीन. त्यानुसार पुढच्या अवतारात श्रीकृष्ण अवतारात त्यांनी आपल्या माथ्यावर मयूर पंख धारण करुन वचना नुसार मयुराचे ऋण उतरवले.
        तात्पर्य हे आहे की जर प्रत्यक्ष भगवंतास मागील जन्मातले ऋण पुढील जन्मात फेडावे लागले मग आपण तर मनुष्य आहोत न जाणो आपणास कितीतरी ऋण फेडायचे आहे.
आपण तर अनेक ऋणानुबंधनात अडकलेलो आहोत.ते ऋण फेडण्यासाठी कित्येक जन्म कमी पडतील. 
         अर्थात आपणास जे काही भले करायचे आहे ते या जन्मात करायचे आहे.कारण पुढचा जन्म कुठला असेल आपणास माहिती नाही.आणि मनुष्य जन्मातच ऋण फेडता येते.....
      एक महत्त्वाचे - पूर्वीचा ऋणानुबंध असल्याशिवाय माशी सुध्दा अंगावर बसत नाही. त्यामुळे मागच्या जन्मातील देणेकरी, वैरी, ज्यांना त्रास दिला गेला ते आपल्या या जन्मी भाऊ, बहीण, नातेवाईक, शेजारी या रुपात आपापले ऋण वसूल करतात व ज्यांना आपण मदत केली, तेही या जन्मी कोणत्या ना कोणत्या रुपात येवून परतफेड करतात
            त्यामुळे मी सरळमार्गी आहे, मी कोणालाही त्रास दिला नाही मग माझ्या बाबतीत असे का होते याची कधीच खंत करु नका - समर्थ रामदास स्वामी म्हणतात,
मना त्वाची रे पूर्वसंचित केले 
तयासारिखे भोगणे प्राप्त झाले
        देह प्रारब्धावर सोडून मन सद्गुरु चरणी व वाणी नामस्मरणात गुंतविल्यास जीवनातील गंमत व आनंद अनुभवता येतात 
*🔱🙏श्री स्वामी समर्थ🙏🔱* *जगता आलं पाहिजे...*

मरता केव्हाही येतं,
पण जगता आलं पाहिजे.
सुख उपभोगता केव्हाही येतं,
पण दुःख पचवता आलं पाहिजे.

रंग सावळा असला म्हणून काय झालं, 
कर्तृत्व उजळता आलं पाहिजे.
रंग गोरा असला म्हणून काय झालं,
मनावरील काजळी काढता आली पाहिजे.

यशानं माणूस उंच जातो
पाय जमिनीवर ठेवता आलं पाहिजे.
मिळालेल्या यशात समाधान मानून
आनंदी जीवन जगता आलं पाहिजे.

पापं काय कसही करता येतं, 
पण पुण्य करता आलं पाहिजे. 
ताठ काय कोणीही राहतं, 
पण जरा झुकून वागता आलं पाहिजे.

ठेच जीवनात लागतेच, 
सहन करता आली पाहिजे. 
मलमपट्टी करून तिला, 
पुन्हा चालता आलं पाहिजे.

शहाण्याचं सोंग घेऊन,
वेड होता आलं पाहिजे.
कशाला बळी न पडता,
आनंदी जगता आलं पाहिजे.

जगण्याच्या लढाईत उणीव कायम भासेल,
ती उणीव भरता आली पाहिजे.

हास्य आणि अश्रूंचा मिलाप करून.
फक्त समाधानी राहता आलं पाहिजे...

*आयुष्य खूप सुंदर आहे भरभरून जगता आले पाहिजे*

 *A. B. C. D तो सभी को आती होगी पर ऐसे नहीं आती होगी* 


*A-* आदर करो बड़ों का
  *B-* बुरा मत करो किसी का
    *C-* चोरी मत करो 
      *D-* देना सीखो जरूरतमंद को

*E-* एहसान करो
  *F-* फर्ज अदा करो
   *G-* गुस्सा मत कऱो 
    *H-* हजारों दुआ करो

*I-* ईमानदार बनो
 *J-* जन्नत भगवान से मांगो
   *K-* किस्मत में होगा मिलेगा
    *L-* लालच मत करो 

*M-* महनत करो
  *N-* नहीं किसी से मत कहो
    *O-* औरत का सम्मान करो
      *P-* प्रणाम करो बड़ों को

*Q-* क्यों करते हो चिंता (मस्त रहो)
  *R-* रोज सुबह उठो
   *S-* शुक्रिया अदा करो 
     *T-* टहलो रोज (मॉर्निंग वॉक)
      *U-* उम्मीद रखो
        *V-* वंदना करो
         *W-* वक्त की कदर करो 

*X-* क्षमा करना सीखो
 *Y-* यकीन भगवान पर करो
  *Z-* जरा इस मैसेज को सबको फारवरड करो

*बोधकथा*

*व्यवसायात काहीच प्रगती होत नसल्याने बॉस वैतागला होता,.* *ऑफिसमध्ये स्टाफ भरपुर होता पण काम होत नसे,.*

*एके दिवशी त्यांनी सगळ्यांना एकत्र बोलावले अन सांगितले की मी तुमच्या सोबत एक खेळ खेळणार आहे,.* *यात जो जिंकेल त्याला फॉरेन टूरला पाठविले जाईल,.* *सर्व स्टाफ खुश झाला अन खेळ काय आहे,.* *हे जाणण्यास उत्सुक झाला..!*

*बॉसने सर्वांच्या हातात एक फुगा दिला अन सांगितले की शेवटी ज्याच्या हातात फुगा असेल,. त्यालाच विजयी ठरविले जाईल आणि फॉरेन टूरला पाठविले जाईल..!*

*एवढं सांगताच एकच कल्ला झाला,.* *जो तो आपल्या शेजारच्याचा फुगा फोडू लागला,.* *काही आपला फुगा कोणी फोडू नये म्हणून,.* *वाचविण्याचा प्रयत्न करू लागली पण कोणी ना कोणी ते फोडत असत,.*
*असे करता करता सर्व फुगे फुटले कोणाच्याच हातात फुगा उरला नाही आणि कुणीच विजेता होऊ शकले नाही..!*

*सर्व शांत झाल्यावर *बॉसने सांगितले की,. शेवटी ज्याच्या हातात फुगा असेल,. तोच विजयी ठरेल, असे मी बोललो,. याचा अर्थ प्रत्येकाने दुसऱ्याचा फुगा फोडावा, असा होत नाही..!* 

*तुम्ही इतरांचा फुगा फोडला नसता तर,.* *प्रत्येकाच्या हातात आता फुगा असता आणि सर्वच विजयी ठरले असते..!*

*तात्पर्य* :- *यश मिळविण्यासाठी व जिंकण्यासाठी इतरांना हरविणे गरजेचे नाही,.* 
*इतरांना हरविण्याच्या नादात आपण सर्वच हरवून बसतो..!*

*इतरांना जिंकण्यास मदत करा, आपोआप सर्वजण जिंकू शकाल..!*

---चारित्र्य आणि व्यक्तिमत्त्व--

 डॉ.संजय ओक यांनी चारित्र्य व व्यक्तिमत्व याचे सुंदर विश्लेषण केले आहे.


चारित्र्य आणि व्यक्तिमत्त्व -डॉ.संजय ओक


माझ्या विभागात माझ्याबरोबर काम करणाऱ्या सहयोगी प्राध्यापिकेचा आठ वर्षांचा चुणचुणीत मुलगा.. काळानुरूप नव्या मॅक्डोनाल्ड आणि पिझ्झा-हट संस्कृतीचा प्रतिनिधी. ‘दिवाळीच्या सुट्टीत काय किल्ला वगैरे करणार का?’ या माझ्या बाळबोध प्रश्नाला, ‘नाही अंकल, मी पर्सनॅलिटी बिल्डिंगच्या क्रॅश कोर्सला जाणार आहे,’ असे उत्तर देता झाला आणि मला धक्काच बसला. 

आमच्या लहानपणी आम्ही विटा, गोणपाट, माती, चिखल यांनी किल्ले बांधायचो. त्यावर छानसे अळीव पेरायचो. मावळे आणि महाराजांचे पुतळे आणायचो. किल्ल्याच्या पायथ्याशी रस्ता असायचा. त्यात आमच्या इम्पाला, फोर्ड अशा जुन्या गाडय़ांची पुन: पुन्हा रंगवलेली खेळण्यातली मॉडेल्स ठेवायचो. ‘महाराजांच्या काळात इम्पाला कशी?’ असले ऐतिहासिक प्रश्न आम्हाला पडायचे नाहीत. पण किल्ला बांधणे हा दिवाळीच्या सुट्टीतला सर्वात आनंददायी कार्यक्रम होता, हे खरे! 

आता हा आठ वर्षांचा आतिश पर्सनॅलिटी बांधून काढण्याच्या कोर्सला जाऊन आपली दिवाळी सत्कारणी लावणार होता. खूप फरक जाणवला मला त्या क्षणी दोन काळांत., दोन बालपणांत. 

आमचे बालपण आमच्या हातात अदृश्य वज्रमुठी घालत होते. आता रिस्ट-बॅण्डचा जमाना होता. आमच्या आई-वडिलांना पर्सनॅलिटीत गम्य नव्हते; पण आपल्या मुलांची जडणघडण चिरेबंदी चारित्र्याची व्हावी, त्याच्या ठायी अक्षय मूल्यांची पायाभरणी व्हावी यासाठी किल्ला, चिरोटे, फराळ, धन्वंतरी- पूजन या साऱ्या गोष्टींचा आग्रह होता. या गोष्टींनी आमचे बालपण समृद्ध केले. चारित्र्य हे असे कळत-नकळत घडत गेले. पर्सनॅलिटी फार नंतर अवतरली.

"चारित्र्य" आणि "व्यक्तिमत्त्व" या नाण्याच्या दोन बाजू. छापा आणि काटा एकमेकांपासून जितके वेगळे, तितक्याच निराळ्या या बाजूही. पण नाणं पूर्ण व्हायचं असेल आणि त्याला ‘चलनी’ म्हणून व्यवहारात चालवायचे असेल तर दोन्ही आवश्यक. मग त्या दोन बाबींत नेमका फरक तो कोणता? 

चारित्र्य दिसत नाही; ते असते. व्यक्तिमत्त्व दिसते, त्याची छाप पडते. चारित्र्य हा अस्तित्वाचा गाभा असतो, तर व्यक्तिमत्त्व हा अस्तित्वाचा एक भाग असतो. चारित्र्य उजळते, व्यक्तिमत्त्व झळाळते. चारित्र्य म्हणजे माजघरात किंवा देवघरात तेवणाऱ्या नंदादीपाची ज्योत. व्यक्तिमत्त्व म्हणजे उघडझाप करणारी इलेक्ट्रिकची चायनीज माळ. चारित्र्य उघडय़ा दारातून आत येते, व्यक्तिमत्त्व खिडकीतून डोकावते. चारित्र्य टिकाऊ असते, तर व्यक्तिमत्त्व दिखाऊ असते. व्यक्तिमत्त्व म्हणजे वड, तर चारित्र्य म्हणजे चंदन. वडाच्या पारंब्यांनी जसा त्याचा संभार पसरतो, तद्वतच व्यक्तिमत्त्वाच्या प्रभावामुळे अनुयायांची मांदियाळी वाढते. चंदनाच्या अस्तित्वाची साक्ष पटविण्यासाठी त्याला पारंब्यांची गरज नाही, तर त्याचा गंधच रानोमाळी त्याची महती सांगतो. थाळीत टाकलेला भाकरीचा तुकडा तोंडाला लावण्यापूर्वी डोळ्यांतून निष्ठा, भक्ती, कृतज्ञता आणि स्नेहबंध यांची पोचपावती देणाऱ्या घरातल्या श्वानासारखे चारित्र्य हे नि:शब्द बोलते. तर मालकाला मिळो- ना मिळो; मला माझे दूध कमी पडता कामा नये; आणि पडलेच, तर ओटय़ावरच्या भांडय़ाला पंजा मारायला मागे-पुढे न पाहणाऱ्या मन्यासारखे व्यक्तिमत्त्व हे मतलबी, आत्मकेंद्रित आणि स्वत:पुरते असते. चारित्र्य घडते ते संस्कारांतून, शिकवणीतून आणि अनुकरणातून. व्यक्तिमत्त्व घडविले जाते ते आकारातून, अंधानुकरणातून आणि प्रसंगी अविचारातून.

पण मग आज व्यक्तिमत्त्वाचाच बोलबाला का? त्याच्या संपादनासाठी पदरमोड करून क्लासेस कशासाठी? उत्तर सोपे आहे. व्यक्तिमत्त्व विकले जाते. त्याची बोली लागते. चारित्र्य विकावू नसतेच मुळी. आणि त्याची किंमत जगाच्या बाजारात सहजासहजी ठरविता येत नाही. व्यक्तिमत्त्वाचा व्यवहार होतो आणि म्हणूनच आजच्या देवाणघेवाणीच्या जगात त्याची चलती आहे. त्याच्यासाठीच सारे काही.. कोणते कपडे घालायचे? कोणत्या जिममध्ये जायचे? पर्सनल ट्रेनर ठेवायचा की एरोबिक्स इन्स्ट्रक्टरला बोलवायचे? कोणते अन्नपदार्थ खायचे? काय टाळायचे म्हणजे आपले व्यक्तिमत्त्व उठून दिसेल? याचीच सर्वत्र चर्चा.

या विचारांच्या आवर्तनात सापडलो असताना काही वर्षांपूर्वी नायर रुग्णालयात घडलेला एक प्रसंग आठवला. 

एके दिवशी डीन ऑफिसात दरवाजाखालून एक चिठ्ठी आत आली- ‘सर, द्वितीय वर्षांतला सतीश दिवसातून फक्त एकदाच जेवतो. त्याच्या घरी अडचण आहे. त्याला दुसऱ्या वेळच्या जेवणाची सोय करू शकाल का?’ शंभर मुला-मुलींमधून सतीशला शोधणे फारसे कठीण नव्हते. अपुऱ्या अन्नग्रहणाच्या खाणाखुणा अंगावर वागवीत हा काळासावळा, नम्र मुलगा मला भेटला. त्याच्या डोळ्यांत मला विनम्रता, सलज्जता, थोडीशी असहायता या साऱ्या भावभावनांचे दर्शन झाले. कँटीनवाल्याला सांगून मी त्याची रात्रीच्या थाळीची सोय केली. झाला प्रसंग मी विसरूनही गेलो.
साडेतीन महिन्यांनंतर सतीश परत कार्यालयात हजर. खाणे थोडेफार अंगी लागले होते. माझ्या कपाळावर कळत-नकळत आठी. ‘आता काय आणखी?’ असे भाव. 

सतीश नमस्कार करून बोलता झाला- ‘सर, घरचा प्रश्न थोडा मार्गी लागला. मला वडील पैसे पाठवू शकतात. आता मी माझे बिल भरेन. आपले आभार मानायला आलो आहे.’

"चारित्र्य" आणि "व्यक्तिमत्त्व" यांतला माझ्या मनातला गुंता तत्क्षणी सुटला.

Sunday, January 22, 2023

---साला अडाणी होतो मी.. तेच बर होत---

 *साला अडाणी होतो मी.. तेच बर होत...*😗


साला अडाणी होतो मी तेच बर होत...
साधा सर्दी खोकला झाला की 
आलं, तुळस काढा घ्यायचो,
पोट दुखल की ओवा चावत जायचो,
ताप आला की डोक्यावर पाण्याची पट्टी ठेवायचो,
ना टेस्ट, ना स्पेशालिस्टच झंझट,
ना हॉस्पिटल च्या एडमिशन मध्ये अडकत होतो...
निरोगी आयुष्य जगत होतो...😎
*साला अडाणी होतो मी तेच बर होत...*

राम राम ला राम राम, 
सलाम वालेकुम ला, वाले कुम अस सलाम
चे प्रेमाने उत्तर देत होतो,
ना धर्म कळत होते, 
ना जात कळत होती, 
माणूस म्हणून जगत होतो...☺️
*साला अडाणी होतो मी तेच बर होत...*

सकाळी न्याहारीला दूध भाकरी, 
दुपारी जेवणात कांदा भाकरी आणि...
रात्रीच्या जेवणाला कोरड्यास भाकरी पोटभर खात होतो, 
हेल्थी ब्रेकफास्ट चा मेनू, 
लंच चा चोचलेपणा आणि 
डिनर च्या सोफेस्टिकेटेड उपासमारी पेक्षा
दिवस भर भरपेट चरत होतो...😀
*साला अडाणी होतो मी तेच बर होत...*

शक्तिमान सोबत गिरकी घेत होतो, 
रामायणात रंगून जात होतो, 
चित्रहार सोबत आयुष्याची चित्र रंगवत होतो,
ना वेबसिरीज ची आतुरता, 
ना सासबहु चा लफडा, 
ना बातम्यांचा फालतू ताण सहन करत होतो...
खऱ्या मनोरंजनाचा आस्वाद घेत होतो...😍
*साला अडाणी होतो मी तेच बर होतो...*

सण असो की जत्रा सुट्टी मिळेल तेव्हा
वेळ मस्त कुटुंबासोबत घालवत होतो, 
चार मित्रांमध्ये मिसळत होतो, 
लोकांमधी उठत बसत होतो...
ना टार्गेट ची चिंता होती, 
ना प्रमोशमन चे टेन्शन होत,
ना पगार वाढ ची हाव होती,
तणावमुक्त जीवन जगत होतो...😉
*साला अडाणी होतो मी तेच बर होत...*

गावातले वाद गावात मिटवत होतो, 
झाली भांडण तरी रात्री मंदिरात एकत्र येत होतो, 
सकाळी पुन्हा एकत्र फिरत कामाला लागत होतो..
ना पोलीस केस ची भीती, ना मानहानी चा दावा, 
ना कोर्टाच्या चकरा मारत होतो...
खरोखर सलोखा जपत होतो... 🤓
*साला अडाणी होतो मी तेच बर होत...*

कुटुंबाला प्रेमाने पत्र लिहीत होतो, पत्राची वाट बघत होतो, 
पत्राच्या प्रत्येक ओळीत प्रेमाचा ओलावा अनुभवत होतो...
ना मोबाईलवर कोरडी बोलणी, ना फॉरवर्ड म्यासेज,
ना ऑनलाइन ची निरर्थक चॅटिंग, 
उगाच चा फक्त दिखावा करत नव्हतो ...😄
*साला अडाणी होतो मी तेच बर होत...*

मातीच्या घरात रहात होतो, 
सारवलेल्या अंगणात बागडत होतो, 
ऐसपैस अर्धा एकरभर जागेत 
सुखात सगळे नांदत होतो...
ना एक बिएचके मध्ये कोंबलो होतो, 
ना बाल्कनी साठी भांडत होतो, 
ना मास्टर बेडरूममध्ये स्वतःला कोंडून घेत होतो...
मस्त मोकळ्या हवेत, 
उगढ्या ढगाखाली मोकळा श्वास घेत होतो...🤩
*साला अडाणी होतो मी तेच बर होत...*

अडाणी असताना सुशिक्षीतात जाऊन
त्यांचे आयुष्य जगावे अशी स्वप्न पाहत होतो, 
त्या साठी मेहनत करत होतो,
आणि जेव्हा सुशिक्षित झालो, 
त्या भपकेबाजीत घुसू लागलो, 
ढोंगी ते जग बघू लागलो, 
आणि मग परत वाटू लागलं...
*साला अडाणी होतो मी तेच बर होत...*😥

--पत्र २०२० सरत्या वर्षाचे--

माझ्या प्रिय नागरिकांनो

मी २०२० वर्षे बोलतोय. काय करताय मजेत ना सगळे २०२१ चे स्वागत मला स्मरणात ठेवून करताय की असेच दरवर्षी प्रमाणे साजरे करताय.

मी तुम्हाला बरेच संकटात टाकले ना याबद्दल मी खंत व्यक्त करतो.अन् माझ्यामुळे तुम्हाला झालेल्या त्रासाबद्दल दिलगिरी व्यक्त करतो.एकच वर्षे होतो तुमच्या सोबत तुमची साथ अन् तुमच्या सोबत हे वर्षे सुखाचे घालवायचे होते पण काय कराव हे वर्षे मी घेऊन आलो ते फक्त अन् फक्त *Covid 19* कोरोना वायरस ला घेऊनच आलोय. हे वर्ष मला ही आवडले नाही तुम्हाला अडचणीत टाकायला अन् तुमची अशी वडाताड करायची नव्हती मला पण खंत व्यक्त करून क्षमा मागतो.

पण या जे बऱ्याच वर्षात शिकले नाही पण ते शिकवले मी तुम्हाला असे वाटते. तुम्ही बाहेरून आल्यावर हात पाय स्वच्छ धुत नव्हते स्वच्छता राखत नव्हते. माझ्यामुळे हे तरी शिकले असाल असे वाटते अन् २०२० या सरत्या वर्षाला निरोप म्हणजे मला निरोप देत २०२१ ला आनंदात आगमन करा आणि नव्या वर्षात आनंदी रहा व आलेल्या संकटाला धुडकावून लावून निरोगी रहा हिच सदिच्छा देतो जाता जाता 

- *मी तुमचे सरते वर्षे*

** सुंदर कोण ? **



नटणं , सजणं
दाग-दागिने घालणं
ओठ रंगवणं
छान दिसणं
मेकअप , मेकओहर करणं
म्हणजे सुंदर ...?"

नाही...नाही..
अजिबात नाही...
छान असणं 
आत्मभान , समाजभान असणं
म्हणजे सुंदर ..

मनापासून चालू होतं 
हृदयापर्यंत येऊन थांबतं...
मन , मनगट, मेंदू 
यांची ताकद
यांचं तारतम्य ...
म्हणजे सुंदर ...

आपलं जगणं 
आपल्या अंगावर घेणं 
अवती-भोवतीच्या
 माणसांना समजून घेणं
इतरांच्या भावना
 ओळखून अडचणीत
 त्यांना मदत करणं
 म्हणजे सुंदर .....

संकटांना न घाबरणं
धाडसानं प्रत्येक गोष्टीला 
सामोरं जाणं
इतरांनी कितीही नाक
 मुरडलं तरी आपण
 त्यांच्याकडे प्रेमानं
 पहाणं 
म्हणजे सुंदर ....

कुणाचीही अपेक्षा 
न करता ..
आपलं जगणं फुलवणं
समृद्ध करणं
म्हणजे सुंदर ...

आपल्याच आईची 
वेळप्रसंगी आपण
"आई "होणं
घरातला कर्ता 
"माणूस " होणं
 म्हणजे सुंदर ...

निर्भीड , धाडशी 
कष्टाळू , प्रेमळ 
सेवाभावी , कर्तव्यतत्पर
निस्वार्थी , सद् विवेकी होणं 
आणि ते जपणं
म्हणजे सुंदर...

सुंदर सहज होता
 येत नाही...
खूप कष्ट लागतात...
सुंदर होण्यासाठी 

कपडे बदलले...
जॉब बदलला 
मित्र बदलले
घर बदललं
आयुष्य बदललं
म्हणजे सुंदर झालं
असं नाही होत...

अंतर बाह्य परोपकारी
निष्कपट , निःस्वार्थी 
मृदू पण तितकंच 
कणखर 
ते नेहमी सुंदर...😊👍

सुखांचे सॅशे!


आपण किराणामालाच्या दुकानात उभे असतो, मुलानी कुठलीशी दुधात घालायची पावडर आणि बायकोनी कुठलासा लै भारीवाला शांपू आणायला सांगितलेला असतो… या दोन्हीच्या च्या रेग्युलर पॅक्स वरच्या किंमती बघून आपले डोळे पांढरे व्हायची वेळ आलेली असते… आपण ते घ्यावेत का नाही या द्विधा मनःस्थितीत असताना दुकानदार हळूच सांगतो, ‘दोन्हीचे सॅचे आहेत साहेब… try करून बघा…’ मग आपण ते ‘सॅचे’ किंवा सॅशे बघतो… अगदीच पाच-दहा रुपयांना असतात… खुष होऊन आपण दोन्हीचे दोन-चार सॅशे घेऊन टाकतो आणि ताठ मानेनं घरी परत जातो!!

'सॅशे' हे भारतीय बाजारपेठेसाठी बहुराष्ट्रीय कंपन्यांनी केलेलं सगळ्यांत मोठं इनोव्हेशन आहे! हल्ली शांपू पासून सॉसेस पर्यंत, साबणांपासून मसाल्यांपर्यंत, गोळ्या-बिस्किटांपासून ते नारळपाण्याच्या पावडरी पर्यंत कशाकशाचेही सॅशे मिळतात… गिऱ्हाईकाला एकदम एक मोठ्ठा पॅक शे-दोनशे-चारशे रुपयांना घ्यायला लावायच्या ऐवजी दोन-पाच-दहा रुपयांचे ‘छोटे पॅक्स’ देणं हे त्या गिऱ्हाईकाच्या आणि आपल्याही फायद्याचं आहे हे आजकाल सगळ्याच कंपन्या जाणतात आणि तसं वागतातही…! आपणही खूप पैसे देऊन मोठ्ठे पुडे विकत घ्यायच्या ऐवजी कमी पैसे देऊन छोटे पॅक्स आणि सॅशेज विकत घेतो…

पण किराणामालाच्या दुकानातल्या व्यवहारांत दाखवत असलेला हा समजुतदारपणा आपण आपल्या व्यक्तिगत आयुष्यात मात्र अमलात आणत नाही!!

आपण आपल्या आयुष्यात सुखांच्या मोठ्या मोठ्या पॅकेट्सच्या मागे अहोरात्र धावत असतो…. मोठ्ठं घर… मोठ्ठी गाडी… भरपूर बॅंक बॅलन्स… अफाट प्रसिद्धी… प्रचंड यश… वगैरे वगैरे वगैरे…. सुखांचे हे भले मोठ्ठे पॅक्स मिळावेत म्हणून आपण जीवापाड मेहनत करत रहातो… हे मोठे पॅक मिळाले / मिळवले तरच आनंदी होतो… नाही मिळाले तर किंवा मिळत नाहीत तोवर दु:खी रहातो…

पण सुखं ही फक्त मोठ्या पॅक्समध्ये मिळत नाहीत तर छोट्याश्या सॅशे मध्येही मिळू शकतात हे आपण लक्षातच घेत नाही!!

म्हणजे,
"मोठ्ठं घर” होईल तेंव्हा होईल, पण सध्याच्या छोट्या घरात निवांत जगत सुखानं शांत झोप लागू शकणं हा किती छान सुखाचा सॅशे असतो...

"मोठ्ठी गाडी” घेऊ तेंव्हा घेऊ, पण सध्याच्या छोट्या गाडीतून वाऱ्यावर स्वार होऊन गावभर बेभान भटकणं हाही एक सुखाचा सॅशे असतो…

हेच सारं प्रसिद्धी, यश वगैरे साऱ्या साऱ्या मोठ्या पॅकेजेसचं… या सगळ्या मोठय़ा पॅकेजेसचे कोणते ना कोणते छोटे सॅशे असतात… जे आपण ओळखून अनुभवले ते मोठ्या पॅक्सहून जास्त सुखाचा अनुभव आपल्याला येऊ शकतो…

रहाता रहाते गोष्ट ती "भरपूर बॅंक बॅलन्स” किंवा खिशातल्या अफाट पैशाची… पैसा हे एक असं पॅकेज आहे की ज्याच्या सॅशेमध्ये मजा नाही असं आपल्याला वाटतं… हजारच्या नोटेची किंमत शंभरच्या नोटेला नाही आणि शंभरच्या नोटेची ऊब पाच रुपयाच्या नाण्याला नाही…

हा स‌ॅशे मिळेल तुम्हाला तुमच्या मुलांबरोबर एक गेम खेळताना, तुमच्या जोडीदाराबरोबर एका लॉंग ड्राईव्ह वर जाताना, एक संध्याकाळी आई वडिलांशी गप्पा मारताना, मित्रांसोबत एक डिनर मध्ये!!! 

खरंच असं वाटतं तुम्हाला?

तर मग, धो धो पाऊस कोसळत असताना, टपरीवरचा वाफाळता चहा आणि गरम्म भजी हवी घेण्यासाठी हजारची नोट देऊन बघा किंवा लाखो रुपये बॅलन्स असलेलं तुमचं क्रेडिट कार्ड देऊन बघा…!!

नाही मिळणार ते सुख तुम्हाला हजारो लाखो रुपयांनी…

तिथे पाच रुपयांच्या कॉईन्सचे दोन-चार सॅशेच पुरेसे असतील!!

 *दर्द कागज़ पर,* 

          *मेरा बिकता रहा,*

*मैं बैचैन था,* 
          *रातभर लिखता रहा..*

*छू रहे थे सब,*
          *बुलंदियाँ आसमान की,*

*मैं सितारों के बीच,*
          *चाँद की तरह छिपता रहा..*

*अकड होती तो,* 
          *कब का टूट गया होता,*

*मैं था नाज़ुक डाली,* 
          *जो सबके आगे झुकता रहा..*

*बदले यहाँ लोगों ने,*
         *रंग अपने-अपने ढंग से,*

*रंग मेरा भी निखरा पर,*
         *मैं मेहँदी की तरह पीसता रहा..*

*जिनको जल्दी थी,*
         *वो बढ़ चले मंज़िल की ओर,*

*मैं समन्दर से राज,*
         *गहराई के सीखता रहा..!!*

*"ज़िन्दगी कभी भी ले सकती है करवट...*
*तू गुमान न कर...*

*बुलंदियाँ छू हज़ार, मगर...*
*उसके लिए कोई 'गुनाह' न कर.*

*कुछ बेतुके झगड़े*, 
*कुछ इस तरह खत्म कर दिए मैंने*

*जहाँ गलती नही भी थी मेरी*, 
*फिर भी🙏🏻🙏🏻 हाथ जोड़ दिए मैंने*...🙏🙏*शुभ रात्री*🙏🙏
   
*" स्वर्गात सर्व काही आहॆ„*
           *परंतु मृत्यू नाही,☜*
       *गीतॆमध्यॆ सर्व काही आहे„*
         *परंतु खोटं नाही,☜*
  *" जगात सर्व काही आहे„*
         *परंतु समाधान नाही„☜*
        *आणि .. ... ... ...*
         *"आज माणसांमध्ये*
             *सर्व काही आहे„*
               *परंतु धीर नाही.••☜*
    *" जीवनाच्या प्रवासात सर्व काही शिकलो„*
           *आधार कुणी नाही देत परंतु••☜*
           *धक्का द्यायला प्रत्येक जण तयार*     
                 *असतो.. . .*
             *“माझं” म्हणून नाही.••☜*
        *”आपलं” म्हणून ‘जगता’ आलं पाहिजे…*
           *‘जग’ खुप ‘चांगले’ आहे. ••☜*
 *फक्त ………”चांगले वागता” आलं पाहिजे..!!*

         *🌺🌱शुभ सकाळ 🌱*🌺


बिनधास्त जगा मित्रांनो


●एकदा का *चाळिशी* पार केली की "जास्त शिकलेला" आणि "कमी शिकलेला" दोघेही सारखेच ...
(कमी शिकलेला कदाचित जास्त पैसे कमावत असेल)

● *पन्नाशी* नंतर तर "सुंदर" आणि "कुरूप" हा भेदभावच नष्ट होतो....दोन्ही सारखेच 
(कोण कितीका सुंदर असेना या वयात सुरकुत्या, डोळ्यांभोवतालची काळी वलये लपता लपत नाही )

● *साठी* नंतर तर "मोठी पोस्ट" आणि "लहान पोस्ट" असेही काही उरत नाही....दोन्ही सारखेच
(निवृत्तीनंतर तर ऑफीसातला प्यूनदेखील साहेबाला बघायचे टाळतोच.)

● *सत्तरी* पार केल्यानंतर "मोठे घर" आणि "लहान घर" असा विचार सुद्धा मनात येत नाही....दोन्ही सारखेच
(सांधेदु:खी बळावून हालचाल करणे मुश्किल झाले कि बसण्यापूर्ती जागा असली तरी पूरे.)

● *ऐंशी* नंतर गाठीशी "भरपूर पैसा" असला काय अन् नसला काय.... दोन्ही सारखेच
(जरी पैसा खर्च करावासा वाटला तरी स्वतःसाठी कुठे अन् कसा खर्च करावा हा मोठा प्रश्न ऊरतोच )

●नशीबाने *नव्वदी* पार केली (अभिनंदन) तर "झोपणे" आणि "उठणे" यांत सुद्धा फरक राहत नाही...दोन्ही सारखेच
(कारण उठून बसल्यावर आता करायचे काय हा गहन प्रश्न उरतोच)

अजुन *शंभरी* पार करायची ईच्छा आहे का ?

*जीवन साधे-सरळ-सोपे आहे.आनंदाने जगा...!*

उगाच नेहमी कुठले तरी गहन कोडे सोडवल्याचा आइन्स्टाइनचा आव आणि भाव आणू नका.

*एक लक्षात ठेवा...!*

*लांब पल्ल्याच्या शर्यतीत आपण सगळे समानच आहोत तेव्हा निर्भेळ आनंद लुटा, 

*स्वतःसाठी काही वेळ तरी जगायला शिका, कारण...... जिंदगी ना मिलेगी दोबारा.!*
                          
🙏🙏🙏🙏🙏

Monday, January 9, 2023

*_जीवनातील सर्वात मोठे_* *ना ट क आणि ढों ग*

आपण नैसर्गिकरित्या जसे आहोत तसे राहिलो, तर त्याच्या इतके जीवनात सुख आणि समाधान दुसरे कोणते नसते.

🎭आपण जसे आहोत त्याच्यापेक्षा वेगळे काहीतरी आहोत, हे दाखवण्याचा प्रयत्न ज्यावेळेस सुरू होतो, त्यावेळी आपल्या जीवनात ताण तणाव निर्माण होतात.
        _नैसर्गिक असणारी गोष्ट, ताणली तरी त्रास होतो आणि दाबली तरी त्रास होतो._
    ⁉️ *आपण कसे आहोत ?* 
    हे फक्त आपल्यालाच माहीत असते. त्यामुळे 
_आपण जसे आहोत तसे न राहणे, हा खरेतर आपल्या स्वतःवरचाच अन्याय असतो आणि याचा आपल्यालाच त्रास होतो._
💬आपण काहीतरी वेगळे आहोत, हे दाखविण्याचा केलेला प्रयत्न, हे ढोंग किंवा नाटकच असते. कितीही प्रयत्न केला, तरी ते उघड पडल्याशिवाय राहात नाही. 
💬कोणतेही नाटक फार काळ टिकवता येत नाही कारण त्याच्यासाठी केलेला मेकअप नैसर्गिक नसतो आणि जे नैसर्गिक नाही, ते टिकवण्याची धडपड म्हणजेच जीवनातील ताण तणाव असतो.
⛓️⛓️⛓️⛓️⛓️⛓️⛓️⛓️⛓️⛓️⛓️        
आज माणसे दारिद्र्याने फार दुःखी नाहीत, परंतु ताण-तणावाने खूप दुःखी, अशांत आणि असमाधानी आहेत.
      *आपण दररोज स्वतःला एक प्रश्न विचारला पाहिजे की _माझ्या जीवनात मी कोणते नाटक किंवा ढोंग करतो आहे_ ?*
       याचा शोध ज्या ज्या ठिकाणी लागेल, त्या त्या ठिकाणी हे नाटक आपण स्वतः संपविले पाहिजे. 
_समाजाने त्याच्यावर टिंगल करण्यापूर्वी आपल्याला आपले ढोंग संपविता आले पाहिजे._
              प्रयोग करून पहा,
 ज्या ठिकाणी आपण ढोंग टाकून देतो आणि मुळ नैसर्गिक अवस्थेत येतो त्या ठिकाणी आपण शांत आणि समाधानी असतो.
       *शांती आणि समाधान या विकत घेण्याच्या गोष्टी नाहीत, तर त्या आपल्या आत्मिक अवस्था आहेत.* 
        वरचे नाटकी आणि ढोंगी टरफल काढल्याशिवाय त्या प्रगट होत नाहीत. दुर्दैवाने आपल्याला या टरफलासहीत शांती आणि समाधान हवे असते.
         _जे आपल्या स्वतःत आहे, ते सोडून आपण त्याला बाहेर शोधत असतो, म्हणून ते आपल्याला कधीच सापडत नाही._ 
आपले मूळ स्वरूप म्हणजेच नैसर्गिक स्वरूप, हे सत्चिदानंद आहे, त्यावर देहाचे टरफल आहे.
        *खरेतर _देह म्हणजेच मी ! 🤔असे समजणे,_ हेच जीवनातील सर्वात मोठे नाटक आणि ढोंग आहे.*
🎭हे नाटक वटविण्यासाठी, त्याच्या सर्व संबंधित सुख दुःखांचा आपल्या शांती आणि समाधानावर परिणाम होतो.
♦️सुंदर नसताना 
सुंदर दिसण्याचा प्रयत्न करणे,
♦️ ज्ञानी नसताना 
ज्ञानी असल्याचा आव आणणे,
♦️ स्वार्थी असताना 
निःस्वार्थी असल्याचा अविर्भाव प्रगट करणे, 
♦️आपण आतून वासनेने बरबटलेले असूनही पवित्र असल्याचा आणि तसे दाखविण्याचा प्रयत्न करणे,
🤔 थोडक्यात काय तर 
♦️आपण चांगले नसून, 
चांगले असल्याचा आव आणणे,
        ही वरवरची नाटके आहेत.
 ही सर्वांना समजतात परंतु या नाटकी भूमिकेतून बाहेर येण्याचा प्रयत्न आपला कधीच प्रामाणिक नसतो, त्यामुळे यात आपल्याला म्हणावे तसे यश प्राप्त होत नाही. ही नाटके फार किरकोळ आहेत परंतु 
_मी देह आहे, हे आपल्या जीवनातील सर्वात मोठे असलेले नाटक आणि ढोंग आपल्याला मरेपर्यंत संपविता येत नाही._
       जोपर्यंत आपले मूळ नैसर्गिक स्वरूप, म्हणजेच *सत्चिदानंद अवस्था* आपल्याला प्राप्त होत नाही, तोपर्यंत जीवनातील हे नाटक संपत नाही आणि _हे नाटक जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत जीवनामध्ये शाश्वत शांती, सुख, समाधान आणि आनंद यांची प्राप्ती होत नाही_. ही अवस्था
 साधने शिवाय प्राप्त होत नाही,
 साधना गुरुकृपेने मिळते आणि
 गुरुकृपा आपल्या जिज्ञासूवृत्ती मुळे आणि पूर्व पुण्याईने प्राप्त होत असते. 
       जो अंतर्मुख होतो त्याला
           ही साखळी समजते,
          बहिर्मुख व्यक्तीला याचा
       थांगपत्ताही लागणे शक्य नाही.
        *मी माझे ही आठवण विसरले जयाचे अंतःकरण l पार्था तो संन्यासी जाण निरंतर ll*
         या जगात संन्याशाइतका सुखी, समाधानी, तृप्त आणि आनंदी दुसरा कोणीच नाही, म्हणूनच सर्व जग संन्याशाच्या पाया पडते. 
         *असा संन्यासी होण्यासाठी घर सोडावे लागत नाही, तर _मी व माझे अर्थात देह म्हणजे मी_, हे नाटक आणि ढोंग सोडावे लागते.*
               🕎🕎🕎🕎🕎🕎

  १. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...