प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातल्या अष्टमी म्हणजे कालाष्टमी, जी आठव्या दिवशी येते. या दिवशी भगवान भैरव यांची पूजा करतात. आणि दिवसभर उपास करतात. मार्गशीष महिन्यात येणाऱ्या कालाष्ट्मिला खूप महत्त्व आहे. कारण या दिवशी भगवान शिव भैरव रुपात प्रकटले होते. म्हणून कालाष्टमिला पूजा केल्यास हवे असलेल फळ मिळते असे मानले जाते. त्यात मार्गशीष महिन्यातली कालाष्टमी फार महत्वाची आहे.
कालाष्टमी व्रत.
एकदा श्रीहरी विष्णू आणि ब्रम्हा यामध्ये विवाद झाला कि त्यांच्या मध्ये सर्वात श्रेष्ठ किं आहे. ते त्यांच समाधान करायला भगवान शंकराकडे गेले. त्यांनी एक सभा आयोजित केली. तेथे सगळे ज्ञानी, ऋषी -मुनी संत उपस्थित होते. भगवान शिव ने श्री विष्णूला आणि ब्राम्हंजीना समजवले. श्रीहरी विष्णूना भगवान शिवजिंने सांगितलं ते पटल. परंतु ब्रम्हाजी संतुष्ट झाले नाही. ते भगवान शंकरांचा अपमान करू लागले. त्यामुळे भगवान शंकर क्रोधीत झाले आणि त्यांनी रौद्र रूप धारण केलं.
भगवान शंकरांचे रौद्र रूप बगून सगळे भयभीत झाले. त्यांनाच भगवान भैरव म्हंटले आहे. ते कुत्र्यावर बसले होते. त्यांच्या हातामध्ये एक दांडू होता. भगवान भैरवाचं रूप भयंकर होत. त्यांनी ब्राम्हंजीच्या पाच पैकी एक डोक कापलं. तेव्हा पासून ब्रम्हाजीनां चार डोक आहेत. त्याचं रूप बघून भगवान ब्रम्हाजीनां त्यांची चूक लक्षात आली व त्यांनी त्यांना माफी मागितली. तसेच सगळ्या देवी देवतांनी आणि साधू संतानी वंदना केल्यानंतर भगवान भैरव शांत झाले.
या दिवशी दिवसभर उपवास व रात्री चंद्रोदय झाल्यावर भिंतीवर शेंदुराने शिव आणि चंद्र काढून त्यांची पूजा करतात. या पूजेत आठ दिवे लावतात. आठ पात्रांत वडे, पुर्या पायस इ. खाद्य वस्तू ठेवून त्यांचा नैवेद्य दाखवितात. ही पूजा कालभैरवा (शिवा) ची असते.
पूजेचा ध्यानमंत्र,
अष्टकालं महाकालं भैरवाष्टगणान्वितम् । चंद्रमासहितं शुक्ल मृत्युंजय नमोऽस्तु ते ॥
No comments:
Post a Comment