प्रबोधन

 १)झाडे लावा ..झाडे वाचवा..झाडे वाढवा... 

----------------------------------------------------------------------------------------------------


भविष्यात फुकटात (मोफत)भरपूर ऑक्सिजन व पर्यावरण सरंक्षण साठी आता ही चळवळ उभारण्याची गरज आहे.जिथे कुठे पिंपळ उगवले असतील ते जपा..  रस्याच्या दुतर्फा लावा.. तसेच निंब आणि चिंचाही..


स्कन्द पुराणात एक अद्भुत श्लोक आहे:

*अश्वत्थमेकम् पिचुमन्दमेकम्*
*न्यग्रोधमेकम्  दश चिञ्चिणीकान् ।*
*कपित्थबिल्वाऽऽमलकत्रयञ्च. पञ्चाऽऽम्रमुप्त्वा नरकन्न पश्येत्।।*


*अश्वत्थः = पिपंळ*
*पिचुमन्दः = कडूनिंब*
*न्यग्रोधः = वट वृक्ष*
*चिञ्चिणी = चिंच*
*कपित्थः = कवठ*
*बिल्वः = बेल*
*आमलकः = आवळा*
*आम्रः = आंबा*
*(उप्ति = झाडे  लावणे)*

अजूनही वेळ गेलेली नाही आता तरी चुका सुधारू.

*गुलमोहर, निलगिरी, सुबाभूळ ही झाडे आपल्या देशातील पर्यावरणाला घातक आहेत.*
तरी पाश्चात्यांचे अंधानुकरण करून अगदी पर्यावरणाच्या बाबतीत देखील ज्या चुका घडल्या त्या *वड, पिंपळ,आंबा चिंच आदी झाडे लावून पुढच्या पिढीला निरोगी आणि सुजलां सुफलां पर्यावरण देण्याचा प्रयत्न करू*     .🌱🌳🌱🌳 .🌱🌳🌱🌳.🌱🌳🌱🌳

*दुष्काळाचे खरे कारण*

*पिंपळ, वड आणि लिंब हि झाडे लावणे बंद केल्याने होत आहे हे वाचुन आपल्याला विचित्र वाटेल, परंतु हे सत्य आहे*.

*( पिंपळ कार्बन डाय ऑक्साइड १००% शोषून घेतो, तर वड  ८०% आणि नीम ७५% शोषतो आणि हि झाडे परिसराला थंड हवामान तसेच ऑक्सिजन देवुन नैसर्गिक ताजेतवाने करण्याचे काम करतात )*.

आपणच लोकांना खुश करण्यासाठी ह्या झाडांना लावणे टाळले आणि उलट यूकेलिप्टसची (नीलगिरी) झाडे लावण्यास सुरुवात केली. यूकेलिप्टस फार पटकन वाढते आणि दलदलीची जमीन कोरडी करण्यासाठी हे झाड लावले जाते. ज्यामुळे जमीन जलविहीन होते.गेल्या ४० वर्षांपासून हे वृक्ष सर्वमहामार्गांवर दुतर्फा लावले  गेले आहेत. त्यामुळे  नैसर्गिक ताजेतवाने न राहिल्याने, उष्णता वाढून वेगाने पाण्याची वाफ होत आहे.

पिंपळाला झाडांचा राजा म्हणतात.
त्याच्या स्तुती मध्ये एक श्लोक आहे -
*मूले ब्रह्मा त्वचा विष्णु शाखा शंकरमेवच!!*
*पत्रे पत्रे सर्वदेवायाम् वृक्ष राज्ञो नमोस्तुते!!*
याचा अर्थ समजला गेला पाहिजे.

येत्या काही वर्षांत प्रत्येक ५०० मीटर अंतरावर एक एक पिंपळ, वडाचे झाड लावले तर प्रदूषणमुक्त भारत होईल
या जीवन-वृक्षांची जास्त झाडे लावा आणि नीम आणि वडाची झाडे लावा. ज्यांच्याबाजूला जागा असेल तुळस लावा
या आपण सर्वांनी एकत्रितपणे *आपल्या "भारताला " नैसर्गिक आपत्तीतून वाचवू या.*

*सर्वांना विनंती आहे. कृपया जिथे शक्य होईल तिथं वृक्षारोपण करा*.

                                           🌹🙏👍🌳🌱

************************************************************

२) मतदान करा..लोकशाही बळकट करा  !! 



@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@

                 ⇨  तक्रार कोठे करावी ⇦


                --------------------------------------------------------------------------




            =============================================


मीच तो वड🌳

पिंपळ,आंबा,फणस  सर्व रागावलेत माझ्यावर
म्हणे काय जादू केली तू या महिला वर्गावर

नटून थटून सर्वजणी येतात तुझ्या पारावर
नाहीच भेटला तू तर फांदी ठेवतात पाटावर

काय सांगू त्यांना वैतागलो मी या सणाला
नमस्कार माझा त्या ऋषी मुनींना
केला सण साजरा धरून विज्ञानाला

महत्व प्राप्त करून दिले या भारत देशाला
विज्ञान समजत नाही म्हणून उभे केले सावित्रीला
वडाजवळ येऊन बसा फायदा होईल आरोग्याला

माझ्या पानांमधून द्रव निघतो पावसाच्या सुरुवातीला
स्त्रीयांचे आजार उभे राहणार नाहीत वाऱ्याला
या सर्वच गोष्टी बाजूला राहिल्या
आणि सावित्रीच्या लेकी पूजेला लागल्या

झाड लावा माझे मी चोवीस तास 
ऑक्सिजन देतो
पटत नाही लोकांना म्हणे फारच जागा घेतो
वर्षातून एकदाच लागते, कशाला हवे झाड?
नाहीच मिळाले तर कुठून फांदी तोडून आण

किंमत राहिली नाही या अक्षय वट वृक्षाची
गरज आहे आता समाजाला झाडे लावण्याची

बिघडलेल्या ह्या वसुंधरेचा तोल सावरण्याची
मीच आहे तो सत्यवान ,ज्याला  गरज आहे 
झाडे लावणाऱ्या सावित्रीच्या लेकींची.

माझ्या प्रिय
मैत्रिणी...वहिनी...बहिणी...मावशी आणि माम्यांनो...येत्या पौणिमेला वड पूजून सात जन्मी तोच वगैरे नवरा हवा असेल तर कुणाचीही हरकत असण्याचे कारण नाही.  पण एक विनंती आहे. ...वड वगैरे पूजायचाच असेल तर पायपीट करून झाडाच्या शोधात बाहेर पडा.  सध्या सगळे  instant हवं असल्याने वडाची फांदी विकत आणून तीला वड म्हणून पूजण्याचे फ्याड आले आहे...यामुळे एका दिवसाला मुंबई,ठाणे,नवी मुंबई या शहरी भागात एका दिवसाला किमान 52 लाख फांद्या कापल्या गेल्याचा धक्कादायक अहवाल आहे. ....जमलंच तर हा ट्रेन्ड़ ब्रेक करा. .....नवराही त्याची स्वत:ची काळजी घ्यायला सक्षम आहे. ..कृपया भावी पिढी आणि आपल्या पोरांची काळजी असू द्या...त्यांच्यावर अॉक्सिजन सिलेंडर पाठीवर घेऊन फिरण्याची वेळ आणु नका ...वटपौर्णिमेला एकतरी झाड लावा...  पर्यावरण राखा...नवरोबा जपा...धन्यवाद


$$$$$$$$$$$$$ $$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$

याला जबाबदार कोण ?

विधवा/विधुर- पुनर्विवाह आणि अपेक्षा...

लेखिका- प्रा. त्रिशिला साळवे.
 
       परवाच माझी एक जुनी विद्यार्थिनी सहज भेटायला म्हणून घरी आली होती. वयापेक्षा ती अधिकच प्रौढ दिसू लागली होती. बराच वेळ बसली, बोलली आणि सांगू लागली, "लग्नाला वर्षही झालं नव्हतं मॅडम. अकराच महिन्यात हे ॲक्सिडेंटमधे गेले, तेव्हा मी सात महिन्यांची गरोदर होती. आता मुलगा सात वर्षांचा आहे.
       इतके दिवस तर काही वाटलं नव्हतं मला, पण आता जीवनसाथी असायला हवा असं वाटतं. 
       भावाचं लग्न झालं तेव्हापासून कटकटी सुरू झाल्या माहेरी. आता आईवडीलांनाही मी भार वाटतेय. नवरा मेला तेव्हाच सासरच्यांनी सर्व संबंध तोडले होते. अगदी नातवाचं तोंडही पाहिलं नाही त्यांनी. आईवडीलांचं घर सोडावं म्हणते, तर आर्थिकतेचा प्रश्न आ वासून आहेच.   
        पुनर्विवाहाचे प्रस्ताव आले, पण माझ्या मुलाला स्विकारायला नको म्हणतात. आई-वडील किंवा सासरचे मुलाला सांभाळायला तयार नाहीत, आणि मी सुद्धा आई आहे ना, मुलाला कसं टाकून देणार. मी तर समोरच्या व्यक्तीचा संसार, मुलं स्विकारणार आहे ना, मग त्यांना माझा मुलगा का नको...?" सत्तावीस वर्षांची एक अल्लड विधवा तिचं मन मोकळं करत होती.
        काॅलनीतच साडी विक्रीचा व्यवसाय करणारी एक महिला राहते. तीसुद्धा विधवाच आहे. खूप जास्त वय नाही आहे तिचं. असेल जेमतेम तीस एक वर्षांची. मुलबाळ नाही. 
       एकदा सहज तिला विचारलं, " ताई, तुम्ही दुसरं लग्न का करत नाही? मुलबाळ तर नाही तुम्हाला. वयही खूप जास्त नाही. शिवाय दिसायला अजूनही चांगल्या आहात, मग दुसरं लग्न करायला अडचण काय आहे..? 
        ती शांतपणे म्हणाली, "अहो ताई, तुमचं सगळंं खरं आहे, पण पुनर्विवाहात लोकं खूप अटी ठेवतात. जी स्थळं आली त्यात विधुर लोकच जास्त. वयात पंधरा-वीस वर्षांचं अंतर. 
       मी त्यांच्या घरातील सगळं करणार, पण मला मुलं होवू द्यायची नाही, ही अट कायम. मी फक्त त्यांच्या मुलांचं करायचं.
       मुलं लहान असतील तर ते शक्य होईलही, पण आधीच जी मुलं अठरा एकोणीस वर्षाची, ती माझा 'आई' म्हणुन कसा स्विकार करणार?. 
       त्यात लग्न झाल्यानंतर दोन वर्षांपर्यंत ते माझी वागणुक बघतील, आणि मग मला त्यांच्या संपत्तीचा वाटेकरी म्हणून मान्यता देतील. पण मग या दोन वर्षांत मुलांनी नाही स्विकारले, किंवा माझ्याकडुन काही चुकले, जर मला त्यांनी घटस्फोट दिला, किंवा दुर्दैवाने याही नवऱ्याला काही झाले, तर मी पुन्हा वाऱ्यावर का..."
तिचा उलट प्रश्न ऐकून मी पुन्हा शांत. 
       अगदी परवा परवाच नात्यातील एका मामीचा फोन आला. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या आणि हळूच म्हणाल्या, "अगं माझ्या माहेरमधे एक मुलगा आहे. चांगल्या नोकरीला आहे. वय जवळपास पन्नास असेल कदाचित.
      सात आठ वर्षे झाली, बायको वारली त्याची. दोन मुलं आहेत. मोठी मुलगी काॅलेजच्या तिसऱ्या वर्गात आणि लहान मुलगा बारावीत. घरात कशाचीही कमतरता नाही. सगळं चांगलं आहे. स्वतःची दोन घरं आहेत.
     तीशी पस्तीशीच्या जवळपास कुणी विधवा, घटस्फोटीता असेल तर बघ. आणि हो, तिला मुलबाळ अजिबात नको बरं का..? सुशिक्षित पाहिजे. नोकरी वगैरे असेल तर उत्तमच. आणि हो, जरा तिच्या माहेरचंही चांगलं पाहिजे. सुंदर हवी, अजून बाकी कशाचीच अपेक्षा नाही त्यांना." 
       मामीच्या माफक अपेक्षा ऐकून मी फक्त 'बरं' म्हटलं आणि फोन ठेवला, पण काही केल्या मामीचं बोलणं डोक्यातून जात नव्हतं. 
       आजही विधवा पुनर्विवाहासाठी किती अटी ठेवलेल्या आहेत समाजाने. जणुकाही वैधव्य संबंधित स्त्रीने स्वेच्छेने मागून घेतलंय. 
       आजही विधवा पुनर्विवाह हा विषय जेव्हा निघतो तेव्हा विधुर अथवा घटस्फोटीत पुरुषांची पहिली अट हीच की 'संबंधित स्त्रीला मुलबाळ नको.' तिने फक्त दुसऱ्या नवऱ्याच्या मुलांना आणि घराला सांभाळायचं. जर विधवा स्त्रीकडून अशी अपेक्षा केली जाते तर पुरुष संबंधित स्त्रिचे अपत्य का स्विकारु शकत नाही ...? हा खरोखरच आजही विचार करण्यासारखा प्रश्न आहे.
       बऱ्याच वेळा विधुर, अथवा घटस्फोटीत पुरुष हे वयाने बरेच मोठे असतात, तरीही त्यांना कमी वयाची विधवा किंवा घटस्फोटीत हवी पुनर्विवाहासाठी. अविवाहित मिळाली तरी त्यांची ना नाही. शिवाय सुसंस्कृत, सुशिक्षित, हे जरी मान्य असले तरीही 'नोकरी करणारी आणि माहेरची परिस्थिती चांगली असणारी', ही बाब मुळीच मनाला पटत नाही. कारण नोकरी करणारी जर विधवा असेल तर आर्थिक दृष्ट्या ती सबळ असल्याने पुनर्विवाहास तयार होईलच असे नाही, आणि जिच्या माहेरची आर्थिक सुबत्ता आहे तीदेखील पुनर्विवाह करण्यास उत्सुक असेल का, हा देखील एक प्रश्न आहेच.
       पुनर्विवाहाबाबत जितक्या अटी स्त्रियांसाठी ठेवल्या जातात तितक्या पुरुषांसाठी नसतात. आजही समाजात ही असमानता दिसून येते. 'विधवा, घटस्फोटीता पुनर्विवाह' ही दुर्देवाने ओढावलेल्या परिस्थितीवर मात करून जीवन जगण्याचा केवळ एक मार्ग आहे, पण 'अत्यावश्यकच' असा मार्ग नाही. कारण अर्ध्या वयातून नवीन जीवनाला सुरुवात करणं खूप कठीण असतं, म्हणून तिथे अपेक्षा कमी आणि वास्तवाचं भान असणं अधिक गरजेचं आहे. 
       पण आजही हे भयाण  वास्तव आणि अपेक्षांचं ओझं फक्त स्त्रियांसाठी आहे हेही नाकारुन चालणार नाही. याचं सर्वात मोठं कारण म्हणजे स्त्रिचं आर्थिक परावलंबित्व. 
        जर प्रत्येक घरामधून 'भविष्यात काही अघटीत घटना घडून त्याचे विपरीत परिणाम आपल्या मुलीला भोगावे लागू नये' असा विचार झाला तर नक्कीच स्त्रियांच्या आर्थिक स्वावलंबनाला अग्रक्रम येईल आणि पुनर्विवाहात स्त्रियांसाठी ज्या जाचक अटी आहेत त्या काही प्रमाणात कमी होवून पुन्हा नव्या जीवनाला यशस्वी पणे सुरुवात होईल.
लेखिका-प्रा. त्रिशिला साळवे,
पिंपळनेर
९११२८५९६६९/८०१०२८३८०३


+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
तक्रार कोठे करावी 
झाडे आणि ऑक्सिजन...

झाडे, नैसर्गिक ऑक्सीजन, मेडिकल ऑक्सीजन, यांचा परस्पर सम्बन्ध लावणे किती निरर्थक आहे, यावर भाष्य करणारा लेख ...

कोविड- १९ महासाथीच्या दुसऱ्या लाटेने भारतातील आरोग्यव्यवस्थेचे आणि प्रशासन यंत्रणेचे अक्षरश: वाभाडे काढले आहेत. पण सत्याला सामोरे जाण्यापेक्षा इतरांवर दोषारोप करण्याची वृत्तीच सर्व स्तरांमध्ये दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वी यासाठी विज्ञान आणि पर्यावरणालाही वेठीला धरले गेले.

एका रुग्णालयाने कोविडमधून बरे झालेल्या रुग्णांना घरी सोडताना ‘तुम्ही अमुक इतका ऑक्सिजन वापरला आहे, तर आता तमुक तितकी झाडे लावा..’ असा सल्ला दिल्याची बातमी विविध माध्यमांमधून बरीच गाजली. सर्वत्र याबाबत प्रशंसेचा सूर उमटला. एका डॉक्टरने कोविड रुग्णाला दिलेल्या प्रिस्क्रिप्शनवरही ‘ऑक्सिजनसाठी एक झाड लावा’ असा संदेश लिहून दिल्याचे छायाचित्र समाजमाध्यमांवर फिरले. जोडीला पिंपळ, तुळस इ. सर्वात जास्त ऑक्सिजन निर्माण करतात, असे गेली कित्येक वर्षे फिरत असलेले सर्वस्वी ‘अवैज्ञानिक’ संदेशही नव्या जोमाने समाजमाध्यमांवर फिरवले गेले.

या साऱ्याचे कौतुक नाही ; तर निषेध करण्याची गरज आहे. वडाची साल पिंपळाला लावून वैद्यकीय यंत्रणांतील नियोजनाचे अपयश झाकायचे; आणि उलट सामान्य माणसालाच कानकोंडे करायचे, असा हा प्रकार आहे. वृक्षतोडीमुळे हवेतील ऑक्सिजन कमी झाला आहे म्हणून वैद्यकीय ऑक्सिजन कमी किंवा महाग मिळतो आहे असे म्हणायचे आहे का? मी एकहाती प्रयत्न करून दुसरे अ‍ॅमेझॉन वन जरी निर्माण केले तरी माझी फुप्फुसे निकामी होऊन मी व्हेंटिलेटरवर गेल्यास लागणारा वैद्यकीय ऑक्सिजन हा कारखान्यांनी तयार केला आणि वैद्यकीय यंत्रणांनी पुरवठा केला तरच मला मिळणार आहे. महत्त्वाचे म्हणजे मुळात झाडांचा आणि हवेतील ऑक्सिजन वायूच्या उपलब्धतेचा एकमेकांशी काहीही संबंध नाही. 

वातावरणातील वायू

पृथ्वीच्या वातावरणातील ऑक्सिजनची दोन संयुगे सजीवसृष्टीच्या दृष्टीने महत्त्वाची आहेत. एक म्हणजे वातावरणाच्या वरच्या स्तरात असलेला ओझोन आणि दुसरे म्हणजे ज्याला आपण प्राणवायू म्हणतो तो ऑक्सिजन वायू. ओझोनचा थर हा आपल्याला अपायकारक असणारे सूर्याचे अवरक्त किरण पृथ्वीपर्यंत येण्यापासून थोपवतो. आज पृथ्वीच्या पृष्ठभागावर वातावरणाच्या संपर्कात वावरणारे सर्व सजीव आपले जीवनव्यवहार चालू ठेवण्यासाठी इंधन म्हणून लागणारा प्राणवायू ेश्वसनाद्वारे हवेतून मिळवतात. हवेत २१ टक्के ऑक्सिजन वायू आहे. वातावरणाचा सर्वात मोठा घटक नायट्रोजन वायू आहे. याखेरीज इतर काही वायू अत्यंत अल्प प्रमाणात वातावरणाचा भाग आहेत. त्यापैकी एक आहे कार्बन डायऑक्साइड. संपूर्ण वातावरणाचे जर एक दशलक्ष भाग केले तर आजच्या घडीला त्यात कार्बन डायऑक्साइड फक्त चारशे भाग आहे. (तुलनेसाठी- ऑक्सिजन सुमारे दोन लाख भाग आहे.) त्यातही, नैसर्गिकरीत्या असणारे कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण अडीचशे भाग इतकेच आहे. त्यापुढली १५० भागांची भर ही औद्योगिकीरणामुळे पडलेली आहे.

‘नैसर्गिक ऑक्सिजन’चे मूळ 

वातावरणाचा जिथे स्पर्शही होत नाही अशा जागीही काही सूक्ष्मजीव राहतात (उदा. पाण्याखाली वा प्राण्यांच्या आतडय़ांमध्ये!). त्यांना आपले जीवनव्यवहार चालवण्यासाठी हवेतून ऑक्सिजन घेण्याची गरज पडत नाही. किंबहुना, ऑक्सिजनयुक्त हवेचा संपर्कही त्यांच्यासाठी घातक ठरतो. हे पृथ्वीवरील सर्वात प्राचीन सजीव आहेत. एकेकाळी हे सूक्ष्मजीव पृथ्वीवर राज्य करत होते. त्यांना असे इथे तिथे लपून राहण्याची गरज नव्हती. कारण पृथ्वीच्या वातावरणात तेव्हा ऑक्सिजन नव्हताच. त्यावेळी पृथ्वीच्या वातावरणाचा मुख्य घटक होता- कार्बन डाय ऑक्साइड.

साधारण दोन ते अडीच अब्ज वर्षांपूर्वी एका नव्या सूक्ष्मजीवांची उत्क्रांती झाली. हे सूक्ष्मजीव हवेतील कार्बन डायऑक्साइड, जमिनीवरील पाणी व अंतराळातून येणारा सूर्यप्रकाश यांच्या साहाय्याने आपल्याला लागणारे अन्न स्वत: तयार करू लागले. या प्रक्रियेला ‘प्रकाशसंश्लेषण’ म्हणतात. आणि ऑक्सिजन वायू हा या प्रक्रियेतून उरणारा कचरा असतो. या जिवाणूंना नील-हरित जिवाणू (सायनोबॅक्टिरिया) म्हणतात. या जिवाणूंची वाढ इतक्या झपाटय़ाने झाली, की त्यांच्यामुळे हवेतील कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण नगण्य इतके कमी झाले. या जिवाणूंनी बाहेर फेकलेला काही ऑक्सिजन वातावरणाच्या अगदी वरच्या स्तरात पोहोचला आणि तिथे सातत्याने होणाऱ्या वैश्विक किरणांच्या माऱ्यामुळे रासायनिक उलथापालथी होऊन ओझोन (ऑक्सिजनचे तीन अणू एकत्र येऊन तयार होणारा रेणू) तयार झाला. बाकीचा ऑक्सिजन वायू (ऑक्सिजनचे दोन अणू एकत्र येऊन तयार होणारा रेणू) वातावरणाच्या खालच्या थरातच जमा होत गेला, आणि त्याचे प्रमाण वाढत वाढत २१ टक्क्यांपर्यंत गेले. पण यामुळे ऑक्सिजन वायू ज्यांच्यासाठी विषसमान होता अशा प्राचीन सूक्ष्मजीवांची मात्र अक्षरश: ‘दे माय धरणी ठाय’ अशी अवस्था झाली आणि त्यांना तगून राहण्यासाठी वातावरणाचा संपर्क होणार नाही अशा जागा शोधाव्या लागल्या. काही सूक्ष्मजीवांमध्ये मात्र हवेतील ऑक्सिजनचा वापर करून ऊर्जा मिळवण्याची श्वसनाची प्रक्रिया उत्क्रांत झाली.

वनस्पती आणि प्राणी पेशींची उत्क्रांती या साऱ्या घडामोडीनंतर झाली आहे. वनस्पती पेशींमध्ये प्रकाशसंश्लेषणाद्वारे अन्न तयार करताना ऑक्सिजन बाहेर टाकणारे ‘क्लोरोफिल’ आणि श्वसनाद्वारे मिळवलेला ऑक्सिजन वापरून ऊर्जानिर्मिती करणारे ‘मायटोकाँड्रिया’ असतात, तर प्राणी पेशींमध्ये फक्त ‘मायटोकाँड्रिया’ असतात. क्लोरोफिल आणि मायटोकाँड्रिया हे एकेकाळी स्वतंत्र जिवाणू होते, पण आता ते पेशींचा भाग आहेत. पेशी उत्क्रांत झाल्यानंतर बहुपेशीय सजीव उत्क्रांत होण्याचा मार्ग मोकळा झाला. आज जी वनस्पती आणि प्राणीसृष्टी पृथ्वीवर आहे, ती यातूनच उभी राहिलेली आहे.

थोडक्यात म्हणजे पृथ्वीच्या वातावरणात जो ऑक्सिजन आहे, तो झाडांनी नाही तर नील-हरित जिवाणूंनी निर्माण केलेला आहे. वनस्पती प्रकाशसंश्लेषण करतात हे खरे, पण वनस्पती श्वसनही करतात. प्रकाशसंश्लेषणासाठी प्रकाश आवश्यक आहे, त्यामुळे ते फक्त दिवसाच घडू शकते. श्वसन मात्र अहोरात्र चालू असते. जमिनीवरील वनस्पतींची उत्क्रांती होईपर्यंत हवेत कार्बन डायऑक्साइड खूपच कमी उरलेला होता. त्यामुळे झाडांच्या प्रकाशसंश्लेषणावर मुळात कच्चा माल कमी उपलब्ध असण्याची मर्यादा आहे.

हवेतील ऑक्सिजनचे प्रमाण गेली कोटय़वधी वर्षे संतुलित राहिले आहे. या काळात जमिनीवरील हिरवाईच्या क्षेत्रात सातत्याने बदल होत गेले आहेत. यातले काही नैसर्गिक आहेत, तर काही माणसांच्या जीवनव्यवहारांतील बदलांमुळे झालेले आहेत. पण या साऱ्या उलथापालथीत हवेतील ऑक्सिजनचे प्रमाण तेवढेच राहिले आहे. कार्बन डाय ऑक्साइडच्या प्रमाणात मात्र वाढ झाली आहे. आणि काही मानवनिर्मित प्रदूषक आता आपल्या वातावरणाचा भाग बनले आहेत. नैसर्गिक परिसंस्था- विशेषत: जंगले- एकटी झाडे नव्हे- वातावरणातील कार्बन डायऑक्साइडचे व प्रदूषकांचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्याचे काम करू शकतात.

सर्व वनस्पती आणि प्राणी श्वसन करत असूनही हवेतल्या ऑक्सिजनचे प्रमाण कायम राहते त्याला कारणीभूत आहे- फायटोप्लांक्टन ही महासागरांच्या पृष्ठभागावर तरंगणारी आद्य वनस्पती. वनस्पतींच्या उत्क्रांतीतील अगदी सुरुवातीच्या या वर्गात अनेक प्रजाती आहेत. नील-हरित जिवाणू हेही या वर्गाचाच एक भाग आहेत. जगातील एकूण हिरवाईचे वजन केले तर फायटोप्लांक्टन त्यात फक्त एक टक्का आहेत. पण पृथ्वीवरील एकूण प्रकाशसंश्लेषणापैकी निम्मे प्रकाशसंश्लेषण यांच्यामार्फत केले जाते. त्यामुळे हवेतल्या ऑक्सिजनची काळजी वाटत असेल तर सागरी फायटोप्लांक्टनचे संरक्षण व संवर्धन करणे हे झाडे लावण्यापेक्षा जास्त महत्त्वाचे आहे.

गोष्ट चांगलीच; पण..

याबाबतीत काही वाचकांना वाटेल की, झाडे आणि ऑक्सिजनचा संबंध नसला तरी यानिमित्ताने झाडांचे महत्त्व लोकांना पटत असेल तर चांगलेच आहे. पण चांगली गोष्टही तिच्यामागील योग्य कारणे समजून घेऊन केलेली असेल तरच टिकाऊ होते. नैसर्गिक परिसंस्था टिकवणे का महत्त्वाचे आहे हे सर्वाना समजले असते तर जागा दिसेल तिथे हाताला येतील ती रोपटी लावून वृक्षारोपण सोहळे करायचे, आणि त्याचवेळी जैवविविधता जतन करण्यासाठी आरक्षित केलेल्या जमिनींचे सर्वसंगनमताने लचके तोडायचे असे घडले नसते. झाडांचा आणि हवेतल्या ऑक्सिजनचा संबंध नाही, हे सर्वज्ञात असते तर वैद्यकीय ऑक्सिजनची कमतरता ही आमच्या नियोजनाच्या अभावामुळे नाही, तर तुम्ही तुमच्या परिसरातली झाडे तोडली म्हणून निर्माण झाली आहे असा निर्लज्ज युक्तिवादही केला गेला नसता.

-साभार, प्रियदर्शनी कर्वे, 
लेखिका पर्यावरणनिष्ठ तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात कार्यरत असून ‘समुचित एन्व्हायरो-टेक’च्या संस्थापक आहेत.

ईमेल : pkarve@samuchit.com

***********************************************************

२२ मार्च : जागतिक जल दिन 

दरवर्षी २२ मार्च हा दिवस 'जागतिक जल दिन' म्हणून साजरा केला जातो.

संयुक्त राष्ट्रसंघ म्हणजेच UNO च्या सर्वसाधारण सभेने २२ मार्च १९९३ रोजी पहिला ‘वर्ल्ड वॉटर डे’ साजरा केला. तेव्हा पासून दरवर्षी, युनोच्या जागतिक जलविकास अहवालाशी सुसंगत असलेली, वेगळी संकल्पना वापरण्याची प्रथा आहे.

पाण्याशी संबंधित प्रश्‍न नेमके कोणते ?

●पाण्याकडे पाहण्याची मानसिकता कशी बदलता येईल?
●पावसाच्या पध्दतीत होणार्‍या बदलांची नोंद घेवून पाण्याची साठवणूक कशी करता येईल?
●भूजलाची घसरती पातळी कशी थांबविता येईल?
●नद्यांचे बारमाहीकरण कसे करता येईल?
●तलावांवरील आक्रमण थांबवून त्याचे संवर्धन कसे करता येईल?
●पाण्याचे वाढते दुर्भिक्ष लक्षात घेवून त्याचा पुनर्वापर कसा करता येईल?
●पाण्याच्या वाढत्या प्रदूषणाला आळा कसा घालता येईल?
●पाण्याचा अधिक उत्पादक पध्दतीने वापर कसा वाढविता येईल?
●पाणी वितरणाचे व्यवस्थापन कसे सुधारता येईल?
●पाण्याचे सरकारीकरण कसे थांबविता येईल?

आपली भूमिका काय ?

●स्वत: ला खरोखर किती पाण्याची गरज आहे? हे समजून घेऊन तितकेच पाणी प्रत्येकाने वापरले पाहिजे.
●पाण्याचा स्रोत प्रदूषित न करणे. कुणी करत असेल तर त्याचा प्रतिकार करणे.
     लक्षात घ्या, ‘जल है तो, जीवन है’! प्रत्येक गोष्टीसाठी पाणी हे लागतेच. पाण्याचा वापर करणे आपण थांबवू शकत नाही. पण पाण्याच्या सुयोग्य वापरामुळे आपण पाणी वाचवू शकतो ऊद्याची तहान भागवण्यासाठी.


++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

भविष्यात शेती करायची असेल तर यावर्षी शेतात प्रती एकर कमीतकमी २० झाडे लावा.अन्यथा हवामान बदलामुळे शेती बरबाद होईल...

🌳एक झाड 50 वर्षांत 35 लाख रूपये किंमतीचे वायु प्रदूषण टाळते.
🌳एक झाड 15 लाख रुपये किंमतीचे ऑक्सिजन उत्पादन करते.
🌳एक झाड 40 लाख रूपये किंमतीचे पाण्याचे रीसाइक्लिंग करते.
🌳एक झाड 1 वर्षांत 3 किलो कार्बनडाय ऑक्साईडचा नाश करते.
🌳एक परिपूर्ण झाड 1000 हजार माणसांचे जेवण शिजवण्यासाठी उपयोगी येते.
🌳एक झाड आसपासच्या परिसरातील तापमान 2*अंशाने कमी करते.
🌳एक झाड 12 विद्यार्थ्यांना वह्या व पुस्तके तयार करण्यासाठी उपयोगी पडते.
🌳एका झाडापासून कुटूंबा साठी लाकडी सामान तयार होते.
🌳एका झाडावर 100 पक्षी घरटे बांधून राहू शकतात व त्याच्यावर त्यांच्या 25 पिढ्या जन्माला येतात आणि मधमाश्यांचे पोळे झाडावर असल्यास तीच संख्या लाखावर जाते.
🌳एक झाड 18 लाख रूपये किंमतीचे जमिनीची धूप थांबवते.
🌳एक झाड माणसाला लहानपणीच्या पांगुळगाड्या पासुन ते आराम खुर्ची पर्यंत तसेच वार्धक्यातील हातातील काठी पासुन स्मशानातील लाकडा पर्यंत साथ देते.
🌳एक झाड आपल्या पालापाचोळयाची भर टाकून जमिनीची कस वाढवते.
🌳एक झाड फळ,फुल,बिया आपल्या साठी देते.
---------------------------------------------------------------
एक झाड 50 वर्षांत काय करत आणि आपण माणसं काय करतो याचा लेखाजोखा आम्ही मुद्दामच मांडत आहोत जेणे करून प्रत्येक माणुस ह्याचा विचार करेल.
🌳आता नाही तर कधीच नाही.
🌳तुमची आमची मुले पाठीला ऑक्सिजनचा सिलेंडर लाऊन फिरताना कशी दिसतील विचार करा.
🌳जगातील सर्व पैसा जरी एकत्र केला तरी आपण 6 महिने
पुरेल येवढा ऑक्सिजन आपण तयार करू शकत नाही.
🌳 मग मित्रांनो तुम्ही आम्हाला एक सांगा कि असं कुठलं स्त्रोत्र तुमच्या कडे आहे ज्या माध्यमातून आपण आपल्याला लागणारा ऑक्सिजन तयार करू शकतो.
🌳तासभर ऑक्सिजन विकत देणा-या डाँक्टरांना आपण देव मानतो पण आयुष्यभर फुकट आँक्सिजन देणाऱ्या झाडांची मात्र कत्तल करतो.
🌳म्हणून तर मित्रांनो संत परंपरा आपल्याला सांगुन गेली.
।। वृक्ष वल्ली आम्हा सोयरे वनचरे।।
🌳 " निसर्ग मित्र व्हा "

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++


     पर्यावरण रक्षणाच्या निर्धाराची
   जागतिक पर्यावरण दिन
   
  भारतीय संस्कृतीचे निसर्गाशी अतूट नाते आहे. आम्ही पर्यावरण महत्त्व जाणतो ते वेदांकालापासून.
"पत्रं पुष्पं फलं तोयं यो मे भक्त्या प्रयच्छति।
    तदहं भक्त्युपहृतमश्नामि प्रयतात्मनः"
        अर्थातच भक्ताने देवाला प्रेमाने पत्र, पुष्प, फल, जल अर्पण करावे ही आमची श्रद्धेची पूजा पद्धती.
       जलाविना जीवन अशक्यच. मग समुद्र.. नदी.. तलाव याचे पूजन करतो. हे जल तीर्थ मानतो. जगण्यासाठी अन्नद्रव्ये देणाऱ्या भूमातेची चरणधूळ कपाळावर लावतो. या मातीपासून केलेल्या देवाच्या मूर्तीचे पूजन करतो.
        आमच्या देवदेवतांना जल अर्पण करतो. तर श्रीगणेशाला दुर्वा.. जास्वंदी फुले, शंकराला बेल.. लक्ष्मीसाठी झेंडूची फुले.. कृष्णाला तुळस वाहतो. पशुपक्ष्यांचेही वेळोवेळी पूजन करतो. प्राणवायू देणारे वृक्ष दारोदारी आहेत.
        जगदगुरु संत तुकारामांचे अभंग रचले गेले ते भंडारा डोंगरावर. समर्थ रामदास स्वामींनी दासबोध लिहला तो शिवथर घळीत. माऊलींचे चैतन्य आजही आहे ते अजानवृक्षाजवळ. असे आमचे पर्यावरणाशी भावनिक नाते आहे.
        भारत सुजलाम सुफलाम राखताना पर्यावरण समतोलासाठी मृदा.. जल.. खनिज आणि उर्जा व्यवस्थापन सातत्याने करतोय. अपारंपारिक ऊर्जेचा नित्य जीवनात वापर वाढवतोय.
        जगदगुरु संत तुकाराम वृक्षवेलींना सोयरे मानतात. मानवी जीवनास संजीवक अशा वृक्षांच्या जोपासनेसाठी निसर्ग संरक्षण, संवर्धन.. संगोपनासाठी श्रद्धेचे कथाभाग जोडून हे निसर्ग पूजनाचे संस्कार रुजविले गेलेत. वृक्ष पानाला आम्ही सोने समजतो.
        मानवाच्या पहिल्या श्वासापासून जन्मभर तर पर्यावरण महत्त्व आहेच. जीवनाचा अंत झाला तरीही आम्ही पर्यावरणाचे भान राखतो. असे महत्त्व जाणणारा भारत हा एकमेव देश आहे. भारतीयांचा पर्यावरणाकडे बघण्याचा दृष्टिकोन पवित्र.. उदात्त.. निरपेक्ष आणि विशाल आहे. आमच्या सोबत जगाचे हित बघतो. 
        वृक्ष वेलींना आमच्या जगदगुरुंनी सोयरे मानलेय. हे या संस्कृतीवर संतांचे संस्कार आहेत. आमचे पर्यावरण धोरणाचे ध्येय हेच आहे की..
    सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामया,
    सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चिद् दुख भागभवेत।
        जागतिक पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा !!

🌸🦋🥀🌳🌺🌳🥀🦋🌸

  वृक्ष वल्ली आम्हां सोयरीं वनचरें ।
  पक्षी ही सुस्वरें आळविती ॥१॥

  येणें सुखें रुचे एकांताचा वास ।
  नाही गुण दोष अंगा येत ॥२॥

  आकाश मंडप पृथुवी आसन ।
  रमे तेथें मन क्रीडा करी ॥३॥

  कंथाकुमंडलु देहउपचारा ।
  जाणवितो वारा अवसरु ॥४॥

  हरिकथा भोजन परवडी विस्तार ।
  करोनि प्रकार सेवूं रुची ॥५॥

  तुका म्हणे होय मनासी संवाद ।
  आपुला चि वाद आपणांसी ॥६॥



  रचना : संत तुकाराम महाराज ✍

  संगीत : श्रीनिवास खळे          🎹

  स्वर : लता मंगेशकर              🎤

=====================================================

चिमणी 

राखा अस्तित्व तिचे अबाधित सुरक्षित छान........
आज साजरा होतोय........ जागतिक चिमणी दिन......
चिवचिवाट तिचा मंजुळ  कानी येई
वाटे जणू पैंजणांची रूनझुन कानोसा घेई.......
बाळ गोपाळांची लाडकी असे, छकुलीच्या अंगाई त दिसे
राजाराणी चिऊ-काऊच्या घासात अंगुलीत  वसे.......
कहानी च्या स्वप्न नगरीत  ती असे परी जणू
 इवलीशी तोच सुंदर , करडा राखाडी तनू.......
चिवचिवाट तिचा पहा, कुठे हरवला गडे
वृक्षराजी झाली नष्ट, सिमेंटचे जंगल पुढे.......
सिमेंटच्या या जंगलात, तिचे घरटे ते कुठले?
केलाय का कुणी विचार येथे, कुणास काय पडले ?.......
जमवून काडी, गवत, दोरा पहा घरटे किती भारी
घरट्यात   त्या निजती तिची बाळे,निर्धास्त लडिवाळी ......
चिवचिवाट करून  घरं  अंगण अपुले कर्णमधुर करी
नाही कुणाशी हितगूज, कर्म  अपुले अन् वर्म उरी........
का सांगा झाला असा निष्टुर कजाग माणूस
कुठे शोधू माझी चिमणी ताई, अन तिचा सहवास?......
झाला मानव स्वार्थी अन गरजा अनाठाई भारी
जरा करता का हो, खगांचा विचार या संसारी  ......
ती म्हणत नाही ना हो तुम्हा," घर देता का घर"
आपणच करावा विचार सुसंगत अन् जोडावे कर.......
टाहो तिच्या  मनीचा आतंक पोहोचेल का कुणा अंतरी
सृष्टीचे असे धन ते जतन करा निरंतरी......
धावपळीच्या अन् तंत्रज्ञानाच्या जगात ती बिचारी अज्ञात
कोणी देईल का तिजसाठी...... चारा पाणी अन् घरटे......
 माणुसकीच्या या जगात......

 - श्रीम. संगिता रघुनाथ वाडेकर
   दौंड, जिल्हा- पुणे
===================================================


  II जागतिक चिमणी दिन II

                  'चिऊताई चिऊताई दार उघड!’ सारख्या बडबडगीतांमध्ये, लोककथामध्ये सर्वत्र आढळणारी चिवचिव चिमणी गेली कुठे? असा प्रश्न जगभरातील पर्यावरणप्रेमींना पडू लागला. कारखान्यातल्या चिमणीचे भकभक धूर ओकणे प्रमाणाबाहेर वाढले आणि अंगणातली चिमणी दिशेनाशी होऊ लागली. पुढच्या पिढीला चिमणी फक्त चित्रांमध्येच दिसणार की काय अशी परिस्थिती निर्माण झाली. परिणामी, २०१० सालापासून २० मार्च हा ‘वर्ल्ड स्पॅरो डे’ "जागतिक चिमणी दिन" म्हणून साजरा केला जाऊ लागला आहे.
                  चिमण्यांच्या चिवचिवाटाने सुरू होणारा दिवस शहरातच काय पण ग्रामीण भागात देखील अलीकडे फारसा अनुभवता येत नाही. चिमण्याच्या आवाजाने पूर्ण परिसर हसून उठत असतो. चिमण्याच्या चिव-चिवाटामुळे आपल्याला एक अल्हादायक वातावरणाचा अनुभव येत असतो. परंतु आज त्या चिमण्या या जगातूनच गायब होण्याच्या मार्गावर आहेत. आपण लहानपणी चिमण्याची गोष्ट ऐकली असेलच. गोष्टीतल्या चिऊ ताऊविषयी आपुलकी आणि प्रेम वाटू लागते. साधारण १४ ते १६ सेंटिमीटर असलेली नाजुकशी चिमणी आपल्याला नक्कीच आकर्षित करत असते. चिमणी आपल्या सगळ्यांच्या परिचयाची. कदाचित अतिपरिचयाची. आज चिमण्यांची संख्या कमी झालेली दिसते. खरं म्हणजे भारतात सगळीकडे सर्वात जास्त संख्येने सापडणारा पक्षी म्हणजे चिमणी. विणीचा हंगाम वर्षभर असू शकणारा, माणसाच्या जवळपास राहणारा आणि त्यामुळे नेहमी दिसणारा पक्षी अशी चिमणीची ओळख आहे. परंतु आता तिच्यासाठी अंगण नाही, झाडं नाहीत, वळचणी नाहीत आणि आपल्या घरांमध्ये तिच्या घरटय़ासाठी छोटीशी जागाही नाही. चीनमध्ये सांस्कृतिक क्रांतीच्या काळात चिमण्या मारण्याचे अभियान सुरू झाले होते, परंतु त्यामुळे पर्यावरणापुढे उभे राहणारे धोके लक्षात आले. चिमण्यांची घटती संख्या मानवासाठी अधिक धोकादायक आहे. गेल्या पाच वर्षात पक्ष्यांच्या संख्येत तब्बल ७९ टक्के घट झाल्याचे तज्ञांनी अहवालात म्हटले आहे. त्यातही कीटकभक्ष्यी असलेल्या चिमणीसारख्या पक्षांची संख्या कमी होणे, हे मानवासाठी धोकादायक असल्याचे अभ्यासकांचे मत व्यक्त केले आहे. त्यानंतर जगभरातील तज्ज्ञांच्या अभ्यासाअंती ‘चिमणी जगायला हवी’ याची जाणीव होऊन २०१० पासून २० मार्च हा दिवस ‘जागतिक चिमणी दिवस’ म्हणून  साजरा केला जातो.
                 भारतात नाशिक येथील ‘नेचर फॉरएव्हर सोसायटी’चे संस्थापक आणि निसर्गरक्षक मोहम्मद दिलावर आणि फ्रान्समधील ‘इकोसिस अ‍ॅक्शन फाऊंडेशन’ या संस्थांनी, इतर स्वयंसेवी संस्थांसह चिमण्या कमी होण्याची कारणे शोधण्यासाठी अभ्यास केला. चिमण्यांना मदत करण्यास सुरुवात केली आणि चिमण्यांची कमी होणारी संख्या हा वातावरणातील वाढत्या प्रदूषणाचा परिणाम आहे काय? हे तपासून पाहण्यासाठी जगभर चळवळ उभारली. २०१५ सालाच्या दिवसाची मुख्य संकल्पना होती ‘आय लव्ह स्पॅरो’ दिल्ली महापालिकेने चिमणी हा तेथील राज्य पक्षी जाहीर केला आहे.
           ‘या चिमण्यांनो परत फिरा रे, घराकडे आपुल्या जाहल्या तिन्हीसांजा’ हे ग. दि. माडगूळकरांचे गाणे आजच्या दिवसाला पूर्णपणे लागू होते. असे म्हटले तर चुकीचे ठरता कामा नये, एक घास चिऊताईचा असे म्हणून आई आपल्या बाळाला एक -एक घास मायेने भरवते. चिमणी काळाच्या ओघात दिसेनाशी झाली. कुठेतरी प्रत्येकाच्या बालपणाच्या आठवणींशी चिऊताई जोडली गेलेली आहे. सध्यातरी चिमणी काळाच्या ओघात दिसेनाशी झाली. आताच्या पिढीला चिमण्यांचा चिवचिवाट कानी पडणे दुर्मिळ झाले आहे. कविता, बडबडगीते यांतच चिमणी शिल्लक राहते की काय, अशी भीती निर्माण झाली आहे. शहरात मातीची भिंत किंवा कौलारू घरे पाहावयास मिळत नाहीत. अंगणात धान्य निवडणारी महिला दिसत नाही. अंगणात उड्या मारत धान्य टिपणारी बागडणारी चिमणी कुठे दिसणार? सिमेंटच्या जंगलात झाडे मोठ्या प्रमाणात तोडण्यात आल्याने अपवादात्मक झाडे आपल्या नजरेस पडतात. कधी काळी चिमण्यांच्या चिवचिवाटामुळे होणारी सकाळ आता केवळ आठवणींची स्थिती झाली आहे. 
★ जनजागृती आवश्यक - ‘जागतिक चिमणी दिन’ या दिवशी लोकांमध्ये चिमणी वाचविण्यासाठीची जागृती करणे, तिचे अन्नसाखळीतील- पर्यायाने पर्यावरणातील महत्त्व समजावणे, चिमणीला जगण्यासाठी योग्य अशी परिस्थिती निर्माण करणे अशा प्रकारचे कार्यक्रम वैयक्तिक अगर संस्था पातळीवर आयोजित केले जातात, परंतु चिमणीसाठीच्या जनजागृतीची गरज कायमस्वरूपी आहे. कमी होणारी झाडे, माणसाच्या बदललेल्या खाण्याच्या सवयी, वाढते आधुनिकीकरण, गगनचुंबी इमारतींत होणारी वाढ, मोबाइल फोन टॉवर्स या सर्व गोष्टींमुळे चिमणी अडचणीत आली आहे. चिमणीला बाभळीसारख्या नैसर्गिक अधिवासाबरोबरच घरटे बांधण्यास अनुकूल गोष्टी उपलब्ध करून देणे, घराभोवती शक्य असल्यास छोटी झाडेझुडुपे लावणे, आपल्या घराजवळ, बाहेर चिऊताईसाठी दाणा-पाणी ठेवणे अशा गोष्टी प्रत्येक जण करू शकतो.
★संकल्प करु या.... 
आजच्या जागतिक चिमणी दिनाच्या निमित्ताने संकल्प करु या, प्रत्येकाने आपल्या बागेत परिसरात जर खाद्यपदार्थाची सोय केली, तर पुन्हा एकदा आपल्याला चिमण्या मोठ्या संख्येने दिसू शकतील. याचा अर्थ असा नाही की, आज आपण चिमण्यांना खाद्यपदार्थ ठेवले आणि उद्या ८-१० चिमण्या दिसतील. चिमण्यांना याची सवय होण्यासाठी थोडा वेळ द्यावा लागतो.
"आठवूनी चिऊ काऊचा घास, घेऊ चिमणी संवर्धनाचा ध्यास!"


+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++


विज्ञानविश्‍व : मायक्रोप्लॅस्टिक आपल्या पोटात जातंय

मेघश्री दळवी.

आपण वापरून टाकून दिलेलं प्लॅस्टिक वेगवेगळ्या मार्गांनी नदी, तलाव किंवा थेट समुद्रात जातं. तिथे त्याचे लहान तुकडे होतात. वारा, पाऊस, सूर्यप्रकाश, पाण्यातले प्रवाह आणि त्यातली रसायनं यांच्या परिणामामुळे या प्लॅस्टिकचे आणखी लहान-लहान कण होत जातात. साधारणपणे मायक्रोमीटर ते मिलीमीटर आकाराचे प्लॅस्टिकचे कण म्हणजे मायक्रोप्लॅस्टिक.

आज जगात सुमारे तीन लाख टन वजनाचे मायक्रोप्लॅस्टिक कण पाण्यातून पसरत आहेत. त्यांच्यामुळे जलचरांना आणि पर्यायाने माणसांनाही मोठा धोका आहे. द ग्रेट पॅसिफिक गार्बेज पॅच म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एक कोटी चौरस किलोमीटर आकाराच्या कचऱ्याच्या बेटातील सुमारे तीस टक्‍के घटक मायक्रोप्लॅस्टिक रूपात आहेत. ते आज पाण्यावर तरंगत असले, तरी उद्या ते खोलवर जाऊन आपल्या वापरातल्या पाण्यात सहज पोहोचू शकतात. समुद्रातील सर्वाधिक खोल दरी मरिआना ट्रेंच आणि अंटार्क्‍टिका खंडासारखे दूरवरचे प्रदेश इथेही मायक्रोप्लॅस्टिक आढळलेलं आहे. तेव्हा समुद्रातल्या प्रवाहांमुळे ते जगभर पसरले आहेत यात शंकाच नाही.

ब्रिटनमधील नॅशनल ओशनोग्राफी सेंटरमधल्या अभ्यासानुसार अगदी थोडा काळ जरी असे कण पोटात गेले तरी जलचरांचा अकाली मृत्यू होऊन त्यांची संख्या रोडावते. नेदरलॅंड्‌समधील वागिनी विद्यापीठामधील संशोधनानुसार पाण्यातील सूक्ष्म जीव सतत मायक्रोप्लॅस्टिक खात राहिले किंवा मायक्रोप्लॅस्टिकमधील घातक रसायनांच्या संपर्कात येत राहिले तर त्यांच्यावर दीर्घकालीन परिणाम होतात. अशा सूक्ष्म जीवांची संख्या घटली तर संपूर्ण अन्नसाखळीवर परिणाम होतो. त्यातून त्यांच्या जैविक घटकांवर परिणाम झाला तर तो पुढील पिढ्यांमध्ये संक्रमित होत जातो आणि ही साखळी कुठवर जाईल हे आज सांगणं कठीण आहे.

या घडीला मायक्रोप्लॅस्टिक इतके सगळीकडे पसरले आहेत, की एक लिटर पाण्यात एक हजारहून अधिक मायक्रोप्लॅस्टिक कण असू शकतात. सूक्ष्मजीव या कणांना चिकटून आपल्या पोटात जातात. त्यातून डायरियासारखे आजार उद्‌भवू शकतात. अनेक प्रकारचे संसर्गजन्य रोग या कणांमधून पसरू शकतात. हे कण आपल्या शरीरात शिरून श्‍वसनाचे, आतड्याचे आजार निर्माण करू शकतात. वर्ल्डवाइड फंड फॉर नेचर या संस्थेच्या एका अभ्यासानुसार दर दिवशी एक छोटा चमचा इतकं प्लॅस्टिक आपल्या पोटात जातं आहे आणि त्यातला मोठा भाग मायक्रोप्लॅस्टिकचा आहे.

अतिसूक्ष्म असल्याने नेहमीचे वॉटर फिल्टर्स मायक्रोप्लॅस्टिकला रोखू शकत नाहीत. त्यासाठी वेगळ्या प्रकारचे फिल्टर्स तयार करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पण ते पूर्ण होऊन आपल्यापर्यंत कधी पोहोचतील हे सांगता येत नाही. त्यातूनही आणखी लहान नॅनो आकाराचे कण हे नवे फिल्टर्स अडवू शकतील का, हा प्रश्‍न उरतोच. मायक्रोप्लॅस्टिक आपल्या पोटात जाण्यापासून रोखायचं असेल, तर आपण एकूणच पातळ प्लॅस्टिकचा वापर कमी करू शकतो आणि वापर केलाच तर ते प्लॅस्टिक फेकून न देता शक्‍य तेव्हा पुनर्वापर करणे किंवा पुनर्प्रक्रियेसाठी देणे या मार्गांचा अवलंब करू शकतो..    


@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@

 वाचूया गोविंद अर्थात डिंक याचे फायदे...    

##गोंद....##डिंक...
...
.. डिंक हा पदार्थ सर्वांच्या परिचयाचा आहे. संस्क्रुतमध्ये 
 . ,, क्षीरिव्रुक्ष,, म्हणून म्हटलेलि झाडे आहेत त्यांचा आतिल चिक बाहेर पडतो व वाळुन झाडाला चिपकून राहतो. तो म्हणजे डिंक होय.. बाभुळ, वड, पिंपळ, खैर, आंबा,  या झाडातून चिक येतो.. डिंकाचे औषधि फायदे भरपूर आहेत...
..          ##वायुचासुका ##खोकला.. सारखे खोकलून घसा सुकतो अश्या वेळि डिंकाचे छोटे छोटे खडे तोंडात धरावे. त्याने वायुचा खोकला लवकर थांबतो.. व कफहि सुटतो.. 
##युरीनचि ##जळजळ... बरेच वेळा युरिन होतांना आग होते, किंवा गुदद्वारापाशि पण जळजळ होते
.. अश्या वेळि डिंक खूपच फायदा देतो. दर वेळेस
... अंदाजे  २० ग्रँम डिंकाचे पाणी व तितकेच दूध  व
    खडिसाखर घालून घेतले असता, गळ्याचि, युरिनच्या जागेचि, गुदद्वाराचि जळजळ लगेच थांबते..

... पोटात आग होउन वारंवार जुलाब होत असेल तर याचे पाणि घेतल्यास थांबतात.
##प्रमेह... इंग्रजित याला  गनोरिया म्हणतात हा डिंकाच्या बस्तिने ताबडतोब थांबतो.. डिंकाचे पाणि तयार करून याचि पिचकारि त्या भागात घ्यावि 
.... इंद्रियातील व्रण बरे होतात.. पू. येणे थांबते
...##तोंडयेणे... तोंडात व्रण, छाले आले असतिल तर डिंकाचे पाणि बनवून याने गुळण्या कराव्यात.
... लगेज

बरे होतात. किंवा दूधात डिंक उगाळून लावावा..

..... शक्तिसाठि.. * डींक* अम्रुत आहे. शरिरातला कोणताहि भाग ढिला झाला असेल तर डिंक पोटातून द्यावा.. डिंकाचि बारिक पूड करून ति दूधातून २-३ ग्रँम घ्यावि.. शरिर निर्बल होउन पायात जोर नसेल,  कंबरेत जोर नसून बसवत नसेल तर डिंक खाल्याने ताकद लगेच येते.. डिंकात एक न विरघळणारि जात आहे त्याला
.. ##कथल्या ##गोंद.. म्हणतात.. हा रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा. सकाळि फूगतो छान. मग त्यात दूध व साखर घालून अशक्त व्यक्तिने प्यावे. शक्ति येते 
... क्षयाचे रूग्णांना याचा खूपच फायदा होतो..
..
    शरिरातले कँल्शिअम कमि झाले कि, हाडे ठिसूळ होतात, सांधेदुखी चालू होते.  संधिवात होतो. अश्या वेळेस पोटातून डिंक द्यावा. आणि  भिजलेला डिंक
.. निखळलेल्या सांध्यांना लावून  वर कापूस बसवायचा
... सूज ओसरते व वेदना बर्या होतात..
          शरिरात कुठेहि भाजले असेल तर अंड्याचा बलक व डिंक ओला करून तिथे लावल्यास  . फफोला येत नाही. व जखम लगेच बरि होते.
         डोळे आले असतिल, डोळ्याचि आग होत असेल तर, पाणि येत असेल तर,  डिंक व खडिसाखर उगाळून लावावि तिथे. लगेच आराम पडतो.. लालि उतरते.
.... डिंकाचा मुख्य उपयोग शरिरावरिल डाग काढुन टाकण्यासाठि आहे. शरिरावर कोणत्याहि कारणाने
    डाग पडले असतिल तर डिंक पाण्यात उगाळून वरचेवर लावित गेल्यास डाग निघून जातात.
.... तेव्हा हा सर्वगुण संपन्न .. * डिंक*  निदान हिवाळ्यात , याचे लाडू, बर्फि, किंवा खिरा पत. करून खावे. आणि वर्षभराचि आरोग्याचि बेगमि करून ठेवावि..


+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

जगणं शिकवणारी पाखरांची दुनिया.

      पक्षी जगताचे कुतुहल मला कधी गप्प बसू देत नाही.नाना तह्रेची,नाना रंगाची ही पाखरं निसर्गाचे समृध्द धन आहे. इवलीशी नाजुकशी पण बडबडी, सतत जंगल हालवून टाकतात, डोक्यावर घेतात.तसे जंगल हे त्यांचे माहेरघर.तीथे कोणाला कशासाठी भ्यायचे? ही सारी पाखरं म्हणजे मनाचं राजं. दिवसभर हुंद हुंद हुंदडायचं, झाडाझुडपाच्या अंगाखांद्यावरनं मनोसोक्त खेळायचे. सवंगड्या सोबत दंगा मस्ती करायची. आपल्या आवडत्या जोडीदाराबरोबर दिवस दिवस काढायचे.सारे जगणेच कसे आनंदात, सुखासमाधानात.आहे का इतके सुख माणसाला? माणूस तर नुसता खोऱ्यानं पैसा ओढायच्या नादाला लागलाय. पैशापासरी झालेल्या माणसाला या जगातले नैसर्गिक सौंदर्य कसे बरे दिसेल? पाखरांची ही दुनिया जगणं शिकवून जाते.
      पाखरांच्याकडून खूप शिकण्यासारखे आहे.त्यांची निष्ठा,जोडीदाराबरोबरची श्रध्दा.ती एकमेकांवर जिवापाड करत असलेले प्रेम हे काही थोडे थोडके आहे का? जंगलाच्या पायवाटेने जाताना शेजारच्या जाळीतून अगदी पायातूनच ल्हाव्या भुर्रर्रकन उडतात.छातीत क्षणभर धस्स होते.काही कळायच्या आतच या पाखरांच्या कशपाने शंभर मिटरचे अंतर पार केलेले असते.सातभाई तर एखाद्या झाडावर खालवर करत ओरडून ते झाड हालवून सोडतात कधी कधी. पाखरांच्या संगती़चा हा प्रवास माझा खूप मोठा वेडसर आहे.काळा असूनही  डोंगरी बुलबूल चे तेज मोठे लौकीकाचे असते.हुदहुद्याचे ते एकट़्यानेच तुरूतुरू चलनं, लगबगीने जनिनीवर चोचा मारताना पाहाणं मोठे मनोरंजक असते. त्याचा तो मनमोहक तुरा राजाच्या मुकुटासारखा भासतो.मुळात कोणताही पक्षी पाहाणं इतके आनंददायी असते की  सारे विसरा़ला होते. पक्षी निरिक्षणाची ही सर कशाला येणार नाही.शेता शिवारातून जाताना, जंगल झाडी तुडवताना पहिलं लक्ष या पाखराकडे जाते.मग तो कितीही बारिक अथवा मोठा असेना का?
      मोबाईल च्या टॉवर ने गायब झालेल्या चिमण्या पाखरांनी आता परिस्थीतीशी जुळवून घेतलेय.पण मध्यंतरीच्या आठ दहा वर्षात चिमण्या सहसा नजरेस पडायच्या नाहीत त्यामूळे मी कित्येक वर्षे अस्वस्थ होतो. गेल्या काही महिण्याच्या एका सकाळी त्या एकाच ठिकाणी आमच्या शेजारच्या गल्लीतल्या  भाताच्या राईस मिलच्या जवळच्या विद्युत तारावर शेकड्याने दिसल्या नी जीव भांड्यात पडला आणि वाटलं आता खऱ्या अर्थाने पाखरांचे राज्य सुरु झाले.सुगरणीच्या घरट्याची विन पाहाताना मी कित्येकवेळा मोबाईलने शुटिंग केलेय.अशी कारागिरी करणारा हा पक्षी हा या विश्वातील अद्भुत चमत्कारी वाटला.राखी धनेश, साखुंळ्या, कवडे, हारोळी,चातक, हरियाल, सुतारपक्षी, खंड्या, भारद्वाज, नाचरा,बुलबूल, अशा असंख्य पाखरांची कित्येक नावे घ्यावी तेवढी थोडी आहेत. बगळ्यांचे कळप शेतात पाण्याच्या मागावर येतात. औताच्या मागे थांबून किडे मुंग्या खातात.वाटतं तो घरचाच प्रतिनिधी आहे.किती आपलेपणाने ते वावरतात म्हणून सांगू? इतके आपलेपण माणसात असते तर मानव्याचे राज्य कधीच उभारले असते.
   पाखरांचे संवाद कौशल्य अजब आहे.ते एकदा संकेत द्यायला लागले की जंगल डोक्यावर घेतात.नर मादीला बोलावण्यासाठी तर मादी नराला आकर्षित करण्यासाठी चे त़्यांचे ते संकेतार्थ बोलणे कधीकधी गमतीशीर असते.चिमणीएवढा तांबट पक्षी जंगल डोक़्यावर घ्यायला लागला की वाटतं कोणत्या विधात्याने ही शक्ती याला प्रदान केली असावी? पाखरांचे सारे आवाज मनाची शांती समाधान करून देणारे, अंतरात लांब कोठेतरी घेवून जाणारे, हे आवाज ऐकता ऐकता कधी मन पाखरासारखे क्षितीजापलिकडे गेले ते कळत नाही.कानभरून आवाज ऐकायला भाग्य लागतं.ती मंत्रमुग्धता जगाच्या कोणत्या साधनाने शक्य होत नाही.त्याला जंगलात जावून आपणही पाखरू व्हावे लागते.मी सतत पाखरू होतो.त्याच्याशी गप्पा गोष्टी करत राहातो.त्यांचे ते लोभसवाणे दिसणे, भर्रकन उडणे,झाडावर एके ठिकाणी तासनतास शांत बसणे तर कधी फुलातील मध चाखण्यासाठी लगबग करणे हे पाहाणे मोठे अविस्मरणीय असते. पाखरांच्या अशा या विशाल दुनियेत जाताना खूप मोठा आनंद असतो.त्या आनंदाची सर कशाला येत नाही.मोठ्या गरूड पक्षाने जवळून मारलेली छलांग मोठी शक्तीशाली असते.असे गरुड पक्षांचे अनेक प्रकार हे सारे अलौकिक आहे.
   पक्षांचे अधिवास असतात. ठराविक ठिकाणचे पक्षी ठराविक ठिकाणीच पाहायला मिळतात. कालानुरुप, स्थळानुरुप हे सारे पाहाणे मोठे मवोरंजक असते.पाखरांच्या या विशाल दुनियेने मला मोठे केले.माझ्या मनाच्या कक्षा वाढवल्या.जगणे शिकवले.त्यांच्या त्या इवल्याश्या पंखात सारे जग सर करायची ताकद असते.एकेकदा ते जोडीजोडीने, कळपाकळपाने आकाशात विहार करायला लागले की माझ्या स्वप्नांची दुनिया जागी होते.डोळ्याच्या त्या बाहूल्या त्या पाखरांच्या विहारात डोळे घालून बसतात आणि साऱ्या जगाचा विसर पडून जातो.

   -पत्रकार सुभाष माने

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

मानव आणि निसर्ग ... 

      संपूर्ण मानव जातीलाच आपल्या आचार-विचारांमध्ये लक्षणीय बदल करण्याची आवश्यकता आहे. मानव की निसर्ग या वादाला अर्थ नाही. भविष्यामध्ये दोघेही राहतील अथवा कोणीही नाही, ही वस्तुस्थिती आहे.  


    करोना साथरोगाच्या गंभीर संकटामुळे सन २०२० हे वर्ष भीती आणि काळजी यांच्या गडद छायेखाली गेले. शंभर वर्षांपूर्वी उद‌्भवलेल्या स्पॅनिश फ्लूच्या जागतिक संकटानंतर निसर्गाने मानवाला पुन्हा एकदा धोक्याचा कंदील दाखवला आहे. विविध क्षेत्रांमध्ये विज्ञान व तंत्रज्ञानाची नेत्रदीपक प्रगती होत असताना निसर्गचक्रात ढवळाढवळ करण्याचे प्रमाण धोकादायक वळणावर आले आहे. या काळामध्ये मानवाचा विकास करण्याचा प्रयत्नांमध्ये निसर्गाचा मोठ्या प्रमाणावर ऱ्हास झाला. या पार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्रांचा मानवी विकास अहवाल २०२० खूप महत्त्वाचा आणि विचारप्रवर्तक आहे.

      मानवकेंद्रीत विकासामुळे आपण जगाला धोकादायक वळणावर आणले आहे. 'नेचर' या संशोधन नियतकालिकाच्या ९ डिसेंबरच्या अंकामध्ये एमिली इल्हाकाम आणि सहकारी शास्त्रज्ञांनी प्रसिद्ध केलेल्या शोधनिबंधात या संबंधात महत्त्वाचे निष्कर्ष नोंदवले आहेत. त्यांच्या मते, या दशकामध्ये मानवनिर्मित वस्तूंचे पृथ्वीवरील वस्तुमान १.१ टेरा टन (एक टेरा टन म्हणजे एक लाख कोटी टन, १०० अब्ज टन) इतके प्रचंड वाढले असून, ते जैवभाराच्या एकूण वस्तुमानापेक्षाही अधिक झाले आहे. जगामधील सजीव प्राण्यांचे सध्याचे वस्तुमान सुमारे चार गिगाटन (एक गिगाटन म्हणजे एक अब्ज टन) आहे, तर मानवनिर्मित प्लास्टिकचे प्रमाण ८ गिगाटन एवढे प्रचंड झाले आहे. नवजात बालकांच्या नाळेमध्येही प्लास्टिकचे अंश सापडल्याचे निरीक्षण नुकतेच इटालियन संशोधकांनी नोंदविले आहेत. पृथ्वीवरील वनस्पतिजन्य पदार्थांचे वस्तुमान ९०० गिगाटन आहे, तर मानव निर्मित काँक्रीटच्या जंगलांचे वस्तुमान ११०० गिगाटन इतके प्रचंड झाले आहे. मानवकेंद्रित कृत्रिम वस्तुमानाचा भार या वसुंधरेला आता पेलवेनासा झाला आहे. शास्त्रज्ञांच्या मते आपण आत मानवकेंद्रीत युगात अस्वीकृत रीतीने प्रवेश केलेला आहे.

        भूगर्भशास्त्रज्ञांच्या आंतरराष्ट्रीय संघटनेनुसार, सध्या आपण 'होलोसीन' युगामध्ये आहोत. मागील हिमयुगाच्या नंतर सुमारे अकरा हजार सातशे वर्षांपूर्वी 'होलोसीन'ची सुरुवात झाली. सध्याच्या परिस्थितीत मानवाने निसर्गावर केलेल्या अतिरेकी आक्रमणामुळे अनेक प्राणी व वनस्पतींच्या प्रजाती नष्ट झाल्या आहेत. नद्या नाले, सागर प्रदूषित झाले आहेत. ओझोनचा थर पातळ होत आहे. जागतिक तापमान वाढीचा वेग वाढतो आहे व असे अनेक दूरगामी दुष्परिणाम दिसून येत आहेत. मानव निर्मित घडामोडींमुळे वसुंधरेच्या पर्यावरणावर होणारे नुकसान सहज भरता येणारे नाही. या बदलांचा वेग व स्तर एवढा प्रचंड आहे की भूर्गभशास्त्रीय एका युगाची अखेर होवून मानवकेंद्रित नवयुगाची सुरुवात झाली असून, यामध्ये मानवाने स्वत:च्या विकासासाठी संपूर्ण पृथ्वीलाच वेठीला धरले आहे.
       संयुक्त राष्ट्रांच्या मानव विकास अहवालाची तिसावी आवृत्ती या मानवकेंद्रित परिसीमेवर नेमके बोट ठेवतो आहे. या मानवकेंद्रित युगामध्ये जगण्यासाठी आणि टिकून राहण्यासाठी आपल्याला विकासाचा नवा अर्थ शोधणे क्रमप्राप्त आहे. आवश्यकता आणि हव्यास, लोभ, भोग व लालसा यांच्यात फरक करणे गरजेचे आहे. तथाकथित विकास, सुबत्ता व संपतीचा अतिरेक करीत असताना आपण कोट्यवधी जनतेला दारिद्र्यामध्ये ढकलत आहोत व पर्यावरणाचे न भरून येणारे नुकसान करीत आहोत याचे भान चंगळवादी समुदाय व महासत्तांनी ठेवणे आवश्यक आहे. औद्योगिक क्रांतीनंतर पर्यावरणाची झालेली हानी भरून काढायला पुढील चार हजार पिढ्या जाव्या लागतील हे माहीत असूनही कार्बनीय ऊर्जास्रोतांचा वापर मर्यादित ठेवण्याचे गंभीर प्रयत्न आजही होत नाहीत, हे चिंताजनक आहे.
       मानव विकास अहवालामध्ये मानवकेंद्रित परिसीमेच्या नवीन युगावर गंभीर चिंता व्यक्त केली आहे, ती योग्यच आहे. आपल्या विकासाच्या संकल्पना बदलण्याची गरज आहे. फक्त आर्थिक प्रगती म्हणजे विकास नाही. कोणत्याही देशातील एकूण अंतर्गत उत्पादन (जीडीपी) हा प्रगतीचा निर्देशांक मानता येणार नाही. नागरिकांना मिळणारे स्वातंत्र्य आणि वैयक्तिक प्रगतीच्या संधींची उपलब्धता; तसेच उत्तम शांत आणि अर्थपूर्ण आयुष्याची मार्गक्रमण करण्याची क्षमता यांच्या निर्देशकांला अधिक महत्त्व आहे.

संपूर्ण मानव जातीलाच आपल्या आचार-विचारांमध्ये लक्षणीय बदल करण्यीच आवश्यकता आहे. मानव की निसर्ग या वादाला अर्थ नाही. भविष्यामध्ये दोघेही राहतील अथवा कोणीही नाही, ही वस्तुस्थिती आहे.

-डॉ. भूषण पटवर्धन 

लेखक विद्यापीठ अनुदान आयोगाचे उपाध्यक्ष आहेत

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

 जागतिक वसुंधरा दिन: 

तब्बल ४५० अब्ज वर्षांपूर्वी निर्माण झालेली आपली पृथ्वी अर्थात वसुंधरा हीच मूळ परमेश्वर आहे. हीच आपली जननी आहे.  कारण मानवाची निर्माती पृथ्वीच असल्याने विविध धर्म, परमेश्वर सुद्धा नंतर अस्तित्वात आले आहेत हे नाकारता येत नाही  🌍🌍

आपल्याला अन्न,वस्त्र निवारा देणारी पृथ्वीचे संतुलन कायम रहावे आणि तिच्यावरील जीवसृष्टी जिवंत रहावी या साठी  पृथ्वीचे उपकार मानावे म्हणून २२ एप्रिल हा जागतिक वसुंधरा दिन साजरा केला जातो. 

आपली ही वसुंधरा सुमारे ४५० अब्ज वर्षांपूर्वी तयार झाली. पृथ्वीचे वयोमान मोजण्याची वैज्ञानिक पद्धती युरेनियम डेटींग ही आहे. युरेनियम २३८ या किरणोत्सारी मुलद्रव्याच्या अर्ध्या आयुष्याच्या काळावरून पृथ्वीचे वय काढण्यात आले आहे. या पृथ्वीचे वैशिष्ट्य म्हणजे केवळ यावरच जीवसृष्टी तिचा मूळ आधार पाणी आहे. 

१९७० मध्ये सर्वप्रथम सॅनफ्रान्सिस्को (अमेरिका) येथे अर्थ डे साजरा करण्याचे ठरले. तेव्हापासून २२ एप्रिल हा दिवस जागतिक वसुंधरा दिन म्हणून साजरा केला जातो. अमेरिकेचे गेलाॅर्ड नेल्सन हे वसुंधरा दिनाचे जनक आहेत. 

अनंत काळापूर्वी भ्रमणादरम्यान ग्रहमालेतील एक ग्रह सूर्यावर आदळून त्यापासून मोठा तप्त गोळा वेगळा झाला. कालांतराने थंड होऊन त्यावर जीवसृष्टी निर्माण झाली, असे वैज्ञानिकांचे मत आहे. दर वर्षाला पृथ्वीला सुमारे १० लक्ष भुकंपाचे धक्के बसतात. त्यातील काही सुक्ष्म असतात. २००४ मध्ये दक्षिण भारतात आलेल्या त्सुनामीमुळे पृथ्वीच्या फिरण्याचा वेग तीन मायक्रो सेकंद कमी झाला. पृथ्वीच्या फिरण्याचा वेग हा कमी होत चालला आहे. 

दर एक लाख वर्षांनी पृथ्वी सूर्याकडे एक सेंटीमीटर ओढली जात आहे. दरवर्षाला चंद्र देखील पृथ्वीपासून ३.८ से.मी. लांब जात आहे. त्यामुळे १०० वर्षांनी दिवस हा मिलीसेकंदाने मोठा होईल. त्याचप्रमाणे पृथ्वीवरील पाच खंडही हळूहळू सरकत आहेत. न्यूयाॅर्क शहर दर वर्षाला लंडनपासून २.५ सें.मी.ने दूर जात आहे.

जंगल - पर्यावरणाचा अतोनात नाश, वाढते सिमेंट काँक्रीट ची जंगले, वारेमाप वीज व आगीचा वापर, वाहन प्रदूषण आदी कारणांमुळे  पृथ्वीचे तापमान वाढत चालले असून समतोल ढासळत आहे. पृथ्वीचे वाळवंट होत चालले आहे.  पृथ्वीचे तापमान असेच वाढत राहिले तर भविष्यात मनुष्य इतर जीवसृष्टी नष्ट होईल, त्यामुळे आपले पर्यावरण वाचवण्याची आज गरज निर्माण झाली आहे. 

डोंगर, नदी, तलाव, खाडी, समुद्र, ओढे, जंगल, झाडे, पर्यावरण संरक्षण आता आपल्या प्राणा प्रमाणेच अतिशय  महत्त्वाचे आहे.
 
निसर्गाला नष्ट करण्याचे परिणाम हे समुद्राची वाढती पातळी, दुष्काळ, पूर, त्सुनामी, वाढते आजार आदी स्पष्ट दिसत असूनही मनुष्य सुधरण्यास तयार नाही. अजूनही आपण सुधरलो नाही तर परम परमेश्वर  वसुंधरा आपल्याला कधीही क्षमा करणार नाही. 

या वसुंधरा दिनानिमित्त सर्वांनी जात धर्मभेद विसरून निसर्ग, पर्यावरण चे संरक्षण, संवर्धन करण्यासाठी वचनबद्ध होऊया.   

निसर्गात दडलेल्या कोरोना सारख्या न दिसणाऱ्या एका विषाणू ने आज स्वतःला हुशार, शक्तिशाली समजणाऱ्या मनुष्य जातीची धूळधाण उडवली आहे.  असे असंख्य विषाणू या पृथ्वीवर आहेत. 

त्यामुळे निसर्ग, पर्यावरण हीच आपली मानवजातीची कवचकुंडले आहेत याचे भान राखया. परम परमेश्वर पृथ्वी चा आदर सन्मान करूया. 

सर्वांना जागतिक वसुंधरा (पृथ्वी) दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ... 
रोजच वसुंधरा दिवस साजरा करून आपली पृथ्वी वाचवूया ! 
=====================================================

ग्रहणाविषयीच्या अंधश्रद्धा:

❌१) ग्रहण काळात कुठले ही नवीन कार्य करणे वर्जित आहे. (कुठलेही कार्य करायला ग्रहणामुळे अडचण येत नाही)

❌२) ग्रहणा दरम्यान भोजन तयार करणे आणि जेवण करणे देखील वर्जित असते. (जेवण तयार करून खाऊ शकतो)

❌३) मल-मूत्र आणि शौच करू नये. (केल्यास कोणताही अपाय होत नाही)

❌४) देवी देवतांची मूर्ती आणि तुळशीला स्पर्श करू नये. (स्पर्श केल्यास काहीही वाईट घडत नाही)

❌५) दातांची स्वच्छता, केसांमध्ये कंगवा फिरवू नये. (केल्यास कोणताही अपाय होत नाही)

❌६) गर्भवती स्त्रीने ग्रहण पाहू नये, गर्भाला इजा होवू शकते. (धादांत खोटे,गर्भाला काहीही होत नाही)

❌७) ग्रहण काळातील ग्रहणामुळे दुषित झालेले उघडे अन्न, पाणी फेकून द्यावे. ( ग्रहण काळात पाणी दूषित होत असेल तर नदी, तलावाचे पाणी सुध्दा दूषित ? होणार मग ते पाणी कुठे फेकायचं ??? ग्रहणामुळे अन्न, पाणी दूषित होत नाही.)

❌८) ग्रहण समाप्तीनंतर घराच्या शुद्धीकरणासाठी गंगाजल जरूर शिंपडावे. (गरज नाही)

वरील सर्व गोष्टी थोतांड आहेत, त्यांना कुठलाही शास्त्रीय आधार नाही.

चला चुकीची कर्मकांडे बाजूला सारूया, आणि नयनरम्य सुर्यरग्रहणाचा आनंद घेवूया.

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती

===================================================
1. व्हाट्स वर आलेली Fake लिंक ओळखण्यासाठी ती लिंक कॉपी करून कोणत्याही browser मध्ये scamadviser.com ही website ओपन करावी.
2. ह्या web च्या search बार वर लिंक paste करून चेक करावे.

त्या लिंक च पूर्ण biodata प्राप्त होतो.
ज्यामध्ये लिंक तयार कणाऱ्याची माहिती मिळते
◆ लिंक/ वेब किती % safe आहे ते
◆ लिंक कालावधी, 
◆ अड्रेस
◆ नाव
◆ मेल
◆ फोन नंबर

Fake website चे प्रकार
1. Money steling website -
ज्यामध्ये हॅकर पर्सनल info चोरी करतो.
2. Malware pushing website
ज्यामध्ये आपल्या device माहिती इतरत्र शिफ्ट केली जाते. व आपल्या system मध्ये malware file draft केली जाते.

✒️

No comments:

Post a Comment

  १. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...