⇨गोमाता : महती , माहिती व चिकित्सा
⇨मूत्रपिंड (kidney ) निगा व घरगुती उपचार
************************************************************
***********************************************************
बाजारात जांभळ आलेत हो.......शिरका करुन ठेवा.....
घरीच करा जांभुळाचा शिरका/ संपुर्ण आरोग्यदायी बरका//
(कोकणातील सौ. छायाताई भिडेंनी जांभुळ पोळी परदेशात नेली.
मधुमेहाची वाढती संख्या बघता शेतकरीवर्गाने जांभुळ शिरका व जांभुळ बी चुर्ण करुन साईडबिझनेस म्हणून बघाव .मार्केटमधे खुप मागणी आहे गरज आहे ती प्रचार व प्रसाराची.ऐकमेकांना मोठ्याखुशीत तिळगुळ देता सोबत असे आरोग्यदायी जांभुळपोळी व शिरका ऐकमेंकाना द्या म्हणजे घरोघरी आरोग्य अबाधित राहील म्हणून आजचा लेख)
मिरजला सासरवाडीत खुप जुन जांभुळ झाड आहे रसरसीत जांभळ बघुन मिही घरी ऐक मोठफळ व ऐक लहानफळ जांभुळ झाड लावल.शेणखत वर्षातुन दोन वेळा देतो.
शेजारी व आलेले पेशंट ने खाउनही भरभरुन जांभळ येतात.
आता लवकरच जांभुळ सीझन चालु होईल .जांभळाचा शिरका करुन ठेवल्यास वर्षभर खराब होत नाही शिवाय मधुमेह असला तरी व नसला तरी शिरका प्यावाच असा आग्रह करतो आहे.लहानांपासुन वृद्धापंर्यत आरोग्यदायी असा हा शिरका व्हिटामीन्स ने परिपुर्ण आहे.
थोड्या प्रमाणात ब जीवनसत्त्व असते . यामध्ये प्रथिने , खनिजे , तंतूमय व पिष्टमय पदार्थ व थोडय़ा प्रमाणात मेद असतो . त्याचबरोबर कोलीन व फोलिक आम्लही त्यामध्ये असते . जांभळाचे पान हे उत्कृष्ट स्तंभक आहे . तसेच कोवळ्या पानात ई जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात आहे . जांभळाच्या बीयांमध्ये ग्लुकोसाईड जांबोलिन ' हा ग्लुकोजचा प्रकार असल्यामुळे साखर वाढल्यावर हा घटक पिष्टमय पदार्थाचे साखरेत रूपांतर करण्यावर आळा घालतो .
म्हणूनच जांभूळ व त्याचे बी मधुमेह या आजारावर गुणकारी आहे . तसेच मधुमेह होउ न देण्याची क्षमता यात आहे.
लोहाचे प्रमानही जांभळात जास्त आहे त्यामुळे हिमोग्लोबीनची समस्या दुर होते.
जांभळाचे झाडाला लोखंडीखिळा ठोकला असता ऐका वर्षातआत खीळा विरघळतो यावरुन या झाडाची रसायन कीती प्रभावी आहेत हे समजायला सोपे जाते.
जांभुळ शिरका बाजारात मिळतांना प्रिझरवेटिव्ह टाकलेला असु शकतो.म्हणून घरी केलेला उत्तम .शिवाय शिरका ठेवायला काचेची बाॕटल वापरावी ही विनंती .
ऐका मातीच्या डेर्यात पिकलेली जांभळ स्वच्छ धुवुन त्यावर काळे मीठ कींवा सेंधेमीठ लावा व डेर्याचे तोंड कापडाने बंद करा.आठ दिवस उन्हात डेरा ठेवल्यावर त्यातील जांभळाची साल मगज व बी वेगळ्या करा बी वाळवुन त्याची पावडर करता येते.
ती मधुमेहास उत्तमच.
आता राहीलेला मगज साल चांगली कुस्करुन हातानेच पिळा व गाळुन काचेच्या बाॕटलमध्ये भरा.ही बाॕटल ऐक महीणाभर उन्हात राहु द्या.
हा शिरका प्रतिकारशक्ती युक्त लोहयुक्त ताकद चा आहे.
पाचक, तृषानाशक, मधुमेह ,अंगावर पांढरी धुपणी ,गर्भाशय आरोग्यपुर्ण ठेवते.दाहनाशक, मेदहर ,यकृतास उत्तम आहे.
स्वानुभव - जांभुळ बी चुर्ण, निमपत्र, बेलपत्र ,गुळवेळ, त्रिफळा , कारलेबी,गुडमार ,सदाबहार व ऊंबरपान हे मधुमेहास अप्रतिम चुर्ण आहे. सर्व समप्रमाणात बारीक करुन अर्धाचमचा सकाळ संध्याकाळी सेवन करावे.
सावधानता- जांभुळ खाल्यावर दुध वर्ज आहे.
-कैलास उगले.
जांभळीचे वृक्ष सर्वत्र होतात . हा वृक्ष फार उंच वाढतो . याची पानें बकुळाच्या पानासारखी असतात . जांभळीच्या झाडास वैशाख - ज्येष्ठांत फळे येतात .
या फळांचा रंग बाहेरून काळसर असून आंतून तांबुस असतो . रानांत जी झाडे होतात त्यांची फळे बारीक व आंबट लागतात . परंतु बागांत जी झाडे लावतात , त्यांची फळे मोठी असून गोड असतात . बागांत लावलेल्या जांभळीस रायजांभूळ असे म्हणतात . जांभळे कितीही खाल्ली तरी उलटी होत नाही . जांभूळ हे शरीरास हित कारक आहे . जांभळीची छाया फार थंड असून सुखदायक आहे . जांभळीचे लाकूड फार चिवट असतें तें पाण्यात कुजत नाही . हे लाकूड घरकामासही उपयोगी पडते . जांभळीच्या झाडांत पाणी स्वच्छ करण्याचा मोठा गुण आहे . ज्या तळ्यांत शेवाळ वगैरे झाले असेल त्यांत जांभळीचे ठोकळे टाकले तर सर्व शेवाळ मरून जाऊन पाणी स्वच्छ होतें .
जांभळाचा शिरका ( आंबवलेला रस ) करितात , तो पोटांतील गुल्म , उदर , अतिसार , विषूचि यावर उपयोगी पडतो .
जांभूळ- तुरट , ग्राहक , मधुर , पाचक , मलस्तंभक , रुक्ष , रुचिकर , आंबट , कंठाला हितावह ; व पित्त , दाह यांची नाशक , व कृमि , श्वास , शोष , अतिसार , कास , रक्तदोष , कफ , व्रण यांची नाशक आहे .
याचे फळ - तुरट , आंबट , मधुर , शीतल , रुच्य , रुक्ष , लेखन , कंठदूषक , मलस्तंभक , वातकारक ; व कफ , पित्त , आध्मानवायु यांचा नाश करितें .
रायजांभूळ- मधुर , उष्ण , तुरट , स्वर्य , मलस्तंभक ; व श्वास , शोष , श्रम , मुख जाड्य , अतिसार , कफ व खोकला यांचा नाश करिते .
हिचे फळ- मधुर , रुचिकर स्तंभक , गुरु , दोषनाशक व स्वादु असें आहे ; जलजंबू- तुरट , शीत , कडू , गुरु , पाककाळी मधुर , आंबट , पुष्टिकर , ग्राहक , वीर्यवृद्धिकारक , बलकर ; व श्रम , दाह , अतिसार , रक्तदोष , कफ , पित्त व व्रण यांचा नाश करिते .
भुईजांभूळ- तुरट , प्रिय , मधुर , वीर्यप्रद , ग्राहक , पुष्टिकारक ; व कफ , पित्त , हृद्रोग , कंठरोग व दाह यांचा नाश करिते . हिच्या फळाचे गुण रायजांभळीच्या फळांप्रमाणे आहेत .
( १ ) घामोळ्या येतात त्या दूर होण्यास- जांभळाच्या आंतली बी उगाळून लावावी म्हणजे घामोळ्या नाहीशा होऊन अंग स्वच्छ होतें .
( २ ) रक्तातिसारावर जांभळीची साल दुधांत वाटून मध घालून प्यावी ; अथवा जांभळीच्या पानांच्या रसांत मध , तूप व दूध मिळवून द्यावे .जांभुळफळ खाल्यावर दुध दोन तास पीउ नये.
( ३ ) विंचवाच्या दंशावर- जांभळीच्या पानांचा रस लावावा .
( ४ ) पित्तावर- जांभळीच्या पाल्याचा रस तोळा १ , व गूळ तोळा १ , ही एकत्र करून उन्हात ठेवून , निवळ येईल ती प्यावी .
५) गर्भिणीच्या अतिसारावर - जांभळीची व आंब्याची साल घेऊन तिचा काढा करून , त्यांत १ तोळा लाह्यांचे , व १ तोळा सातूचे पीठ घालून चाटावयास द्यावें . अथवा पिकलेली जांभळे खाण्यास द्यावी .
( ६ ) मधुमेहावर- जांभळीची साल अथवा जांभळे सुकवून बारीक पूड करून ती दररोज २ तोळेपर्यंत खावी . जांभळे ताजी मिळाली असतां १५ दिवसपर्यंत खावी .
( ७ ) मुखरोगावर- जांभूळ , बाभळ , बोर व बकुळ , यांतील कोणत्याही वृक्षाच्या अंतरसालीचे थंड पाणी काढून त्याच्या गुळण्या कराव्या ; व यांच्या काष्ठांनी नेहमी दंतधावन करावें ; म्हणजे कधीही मुखरोग होत नाही , व दांतही बळकट होतात .
( ८ ) अतिसारावर जांभळीच्या सालीचा रस द्यावा .
( ९ ) बचनागाच्या विषावर- जांभळीच्या आंतरसालीचा रस नवटांकपर्यंत काढून त्यांत तितकीच पेज घालून तो द्यावा .
( १० ) पित्तविकारावर- जांभळीच्या सालीचा रस दुधाशी मिळवून प्यावा . या योगाने वांती होऊन पित्त पडते . उतार तूपभात .
( ११ ) पोटांत केस गेल्यास अगर लोहाचा अंश गेल्यास- जांभळे खावी .
( १२ ) ओकारीवर जांभळीच्या सालीची राख मधांत द्यावी .
( १३ ) जांभळाचा शिरका - जांभळाचा रस काढून गाळून तो बाटलीत भरून ठेवावा . जसजसा तो रस आंबत जाईल , तसतसा त्यांत जास्त गुण येत जातो . हा अतिसार , मोडशी , उदर यांवर द्यावा .
[संदर्भ -वनौषधीगुणादर्श]
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
कोकणातील ताईंची यशोगाथा बघुया.
कोकणातील सौ.छायाताई सुरुवातीच्या काळात त्या स्वतःच जांभुळपोळी तयार करत होत्या. गावातील जांभळे गोळा करुन, ती स्वच्छ करुन त्याचा रस काढून ते पोळी तयार करुन सुकवेपर्यंत सर्व कामे माणसांद्वारे केली जात असत. सुरुवातीच्या काळात तर जांभळांचा रस मिक्सरवर काढण्यात येत होता, त्यामुळे या कामाला वेळ फार लागत असे. कालांतराने आम्ही एक यंत्र तयार करुन घेतले, ज्यावर जांभळांचा रस काढता येत होता आणि त्याची आम्ही पोळी तयार करू लागलो, असे त्या सांगतात. सध्या ते देवरुख गावासोबतच शेजारील गावांमधील जांभळेदेखील विकत घेतात. छाया भिडे यांच्या या व्यवसायामुळे कोकणातील या रानमेव्याला चांगला दर मिळू लागला आहे. पूर्वी अल्पदर मिळत असलेल्या जांभळांना आता भिडे कुटुंबीय २० ते २२ रुपये प्रतिकिलोने विकत घेतात. त्याशिवाय भिडे यांच्या या उद्योगामुळे गावातील अनेक लोकांना रोजगाराची संधीदेखील मिळाली आहे. हवाबंद पॅक केल्याने ही जांभूळपोळी वर्षभर टिकते, असे छाया सांगतात. भिडे यांच्या या व्यवसायात आजवर अनेक अडचणी आल्या. पूर्णतः नैसर्गिक असलेल्या या उत्पादनाला आजवर अनेक संकटांचा सामना करावा लागला आहे. प्रत्येक वर्षी नवी अडचण आमच्यासमोर येत असते. मात्र त्यावर मात करत अविरतपणे आम्ही आमचा व्यवसाय सुरू ठेवला असल्याचे त्या सांगतात. कधीकधी जांभळांचे प्रमाण कमी असते, कधी जास्त असते, तसेच ती उन्हात सुकवण्यात येत असल्याने हवामानावरदेखील अवलंबून रहावे लागते, असे त्या सांगतात. भिडे यांची ही सुमधूर जांभूळपोळी संपूर्णतः नैसर्गिक आहे. ती टिकवण्यासाठी तिच्यात कोणत्याही कृत्रिम पदार्थाचा वापर करण्यात येत नाही. तसेच जांभूळ सुकवण्यासाठीदेखील ड्रायर यंत्राचा वापर केला जात नाही. सुर्य़प्रकाशातच ती वाळवण्यात येतात. पूर्णतः नैसर्गिक असलेली ही जांभूळपोळी भारतातील अनेक राज्यात विक्रीकरिता पाठवण्यात येते शिवाय तिने ऑस्ट्रेलियाची वारीदेखील केली आहे. या जांभूळपोळीला सध्या बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात मागणी आहे.
Read more at: https://yourstory.com/marathi/c2838be9a5-jambhulapolila-paradesavari-bhide-made-a-shadow-in-konkan
" हिंदुस्थानात प्राचीन काळी प्रत्येक विषयावर ग्रंथ लिहिले गेले आहेत . आज त्या ग्रंथांचा अंशही आपणास पाहावयास मिळत नाही . इंग्रजांचे राज्य असल्यामुळे व त्यांची विद्या राजमान्यता मिळाल्यामुळे विकास पावत आहे . आणि त्यामुळे आमच्या पूर्वजांचे कित्येक ग्रंथ त्याचप्रमाणे नाना तर्हेची विद्या नष्ट होत आहे .
कष्टं शिष्टक्षतिकृति कलौ कार्यमृच्छन्ति विद्या । ” असे उद्वेगजनक वाक्य कित्येक लोकांच्या मुखांतून बाहेर पडत आहे याचे कारण हेच आहे . याकरिता आमच्या सुशिक्षित वर्गाने , ज्यांची बुद्धी विशाल आहे , ज्यांना ईश्वराने अनुकूलता दिली आहे , अशा सद्गृहस्थांनी या उद्वेगजनक गोष्टीचा नाश होण्यासाठी प्रयत्न करण्याची फार आवश्यकता आहे .
" -शंकर दाजीशास्त्री पदे [ इ . स . १८ ९ ३ साली लिहिलेल्या पहिल्या आवृत्तीच्या प्रस्तावनेतून ]
टिप-
माहीती व ज्ञानलेखन संदर्भासहीत नमुद केले आहेत.
आपल्या स्वास्थ्य संवर्धन आणि व्याधी नाशनार्थ मार्गदर्शनपर प्रारंभिक शास्त्रोक्त माहिती देण्याचा हा प्रयत्न असून , औषधांचा वनस्पतीचा प्रत्यक्ष वापर तज्ञांच्या सल्ल्यानेच करावा.
सामान्य आजारावर आयुर्वेदीय व अॕक्युपंक्चर पाॕईंट माहीती 9822236969 या व्हाॕट्सअॕप वर देण्यात येईल .मात्र असाध्य व कष्टसाध्य आजारावर नाडी व प्रकृती बघुनच उपाययोजना करावी लागत असल्याने मेसेजने माहीती व औषधी योजना मीळनार नाही.याची नोंद घ्यावी.अश्यावेळी आपल्या जवळच्या वैद्दांकडुन उपचार घ्यावेत ही वीनंती.
डाॕ.कैलास उगले पंढरपूर
संचालक श्री हरिविठ्ठल हर्बल्स
गुरुदेव नगर सांगोला रोड पंढरपूर
आयुर्वेद व अॕक्युपंक्चर तज्ञ.
25 वर्षे अविरत वनस्पती संशोधनात्मक उपयोग अनुभव.
सर्व प्रकारचे शास्त्रशुद्ध पदध्तीने तयार केलेले आयुर्वेदिय वेदनाहारी तेल , केशवर्धक तेल,धन्वंतरी हर्बल चहा ,दंन्तमजंन ,विषाणूरोधक तेलाची उदबत्त्ती ,ह्रदयासाठी काढे,सुवर्णयुक्त अमृतप्राश ,च्यवनप्राश व सर्व प्रकारच्या गोळ्या योग्य दरात तयार करुन मीळतील. 9850033102,9922885008
#डॉकैलासउगलेश्री हरीविठ्ठलहर्बल्सपंढरपूर


*आपल्याला पित्त होणे ही एक कॉमन समस्या माहीतच असेल यावर आपण मेडिकल मधून गोळ्या आणून खातो परंतु या गोळ्यांचे अनेक side effect होत असतात* 



*परंतु वारंवार होणारे पित्त आपण घरच्या घरी कायमचे करू शकतो हा उपाय पाहण्यासाठी पित्त का होते हे जाणून घेण्यासाठी खालील लिंक ला टच करा* 





No comments:
Post a Comment