कोरोना विशेष

#:कोरोना गीत:##


कोरोनाची फुगडी.

फू बाई फू ,फुगडी फू
कधी दमशिल मेल्या
कोरोना तू रे कोरोना तू

आज बंद, उद्या बंद
बंद ,बंद किती बंद
बाहेर फिरता,कारण नसता
ते सारे कसे मंद....
आता फुगडी फू
फू बाई फू फुगडी फू
कधी दमशिल मेल्या
कोरोना तू रे कोरोना तू.....१

ताई नाही दादा नाही
कुणीच नाही भेटत
आई नाही ,बाई नाही
नाही कुणी भेटत
लॉक डाऊन चे दिवस चालले
पुढे रेटत रेटत ..
अत्ता फुगडी फू, 
फू बाई फू फुगडी फू
कधी दमशिल मेल्या
कोरोना तू रे कोरोना तू.....  २

नको करू खेळ आता
नको घेऊ जिवा
थांबव हे सारे देवा
करते मी धावा...
आता फुगडी फू
फू बाई फू फुगडी फू
कधी दमशील मेल्या
कोरोना तू रे कोरोना तू..     ३

काम नाही,नाही धंदा
जेवण तीन तीनदा
उष्टी काढा,भांडी घासा
हाच उरलाय धंदा....
आता फुगडी फू
फू बाई फू फुगडी फू
कधी दमशिल मेल्या
कोरोना तू रे कोरोना तू......४

बंद कॉलेज, बंद क्लास
बंद केली शाळा
अजुन किती बंद करशील
लाऊन तुझा टाळा
आता फुगडी फू
फू बाई फू फुगडी फू
कधी दमशिल मेल्या
कोरोना तू रे कोरोना तू......५

धुवा हात ,धुवा पाय
रहा बाई तुम्ही स्वच्छ
मेला मुडदा कोरोना बाई
भलताच बाई नीच....
अत्ता फुगडी फू  
फू बाई फू ,फुगडी फू
कधी मरशील मेल्या
कोरोना तू रे कोरोना तू...... ६

=========================


प्रिये मी संक्रमित झालोय..


प्रिये बघ ना ,
देशाची सेवा करता करता
समाजाला शिस्त लावता लावता,
अखेर मी ही संक्रमित झालोय,

मला आणखी जगायचं होतंं
कोरोनाशी अजुन लढायचं होतं,
कायमचं त्याला हद्दपार करुन
मग घराकडंच निघायचं होतं,

पण आता जिवंतपणीच मेलोय..
कारण मी ही संक्रमित झालोय....

प्रिये,
अाता घर कायमचं सुटलं
मरणाचं अखेर नभं दाटलं,
उघड्या डोळ्यासमोरच आता
बघ माझंही सरण पेटलं,

मी आॅनड्युटी परका होऊन गेलोय
कारण मी ही संक्रमित झालोय...

 प्रिये,
तुला वेळ द्यायचं राहुन गेलं
आता होत्याचं नव्हतं झालं,
पण मी ही माणुसच आहे
देवदुत बनुन तरी कोण आलं,

आयुष्यभर नुसताच विरह पिलोय
पण आता मीच संक्रमित झालोय,...


प्रिये,
जवळ माझ्या येऊ नको
थोडं दुरुनच तुझं प्रेम दे,
उणीव माझी जाणवेल पण
आता लेकरांसाठी श्रम घे,

जवळ असुनही आता दुर गेलोय
कारण मी ही संक्रमित झालोय...

आईबाबांना काही सांगु नको
सांग त्यांना ठणठणीत आहे,
जमलं तर नक्कीच येईल घरी
कारण सगळेच आता आठवणीत  आहे,

माफ कर मी परस्परच चाललोय
कारण मी ही आता संक्रमित झालोय...


प्रिये,
घरी आलोच तर अनर्थ होईल
हा पोलीस बाप तुमचा काळ होईल,
त्यापेक्षा नकोच हा विध्वंस सखे
मी श्वास अखेरचा इकडेच घेईल,

लढता लढता मी हारुन गेलोय
कारण मी ही संक्रमित झालोय.....

मी ही आता संक्रमित झालोय...



कविता कोणाची आहे माहित नाही आवडली  व माझ्या पोलीस बांधवांशी निवडीत आहे  आहे.......
माझा  सर्व  पोलिस  बांधवांना समर्पीत
========================================

आजचे एकांत दान

आता सर्वात्मके देवे । 
विनाकारण न फिरावे । 
घरीच बैसोनि द्यावे । 
एकांतदान हे ॥ 1॥

एकमेका कर न मिळवावे । 
दुरुनीच नमस्कारावे । 
अंतर सुरक्षित राखावे । 
परस्परांमाजी ॥ 2॥

सदासर्वदा हात धुवावे । 
रुमालाविणा ना शिंकावे । 
कोमट जल प्राशावे । 
थंड वर्जावे सर्वथा ॥ 3॥

घरी बसण्याचा येता कंटाळा । 
जोपासावी एखादी कला  । 
मदत करावी गृहिणीला । 
पुण्य लागे ॥ 4॥

करा स्वच्छता सदनाची । 
त्याच बरोबर तनाची । 
काढा जळमटे मनाची । 
शूचिर्भूत व्हावया ॥ 5॥

मनन आणि चिंतन । 
थोडा वेळ नामस्मरण । 
चुकविता येईल मरण । 
तुम्हासहित इतरांचे ॥ 6॥

आजपावेतो खूप पळाला । 
दे विश्रांती थोडी शरीराला । 
सादर व्हावे समयाला । 
संत वचन हे ॥ 7॥

आहे विषाणू चे संकट । 
करी मनाला बळकट । 
सकारात्मकतेचे उभारी तट । 
सभोवताली ॥ 8॥

वेळ नव्हती म्हणोन । 
केले नसेल वाचन । 
ज्ञानेश्वरी ग्रंथ पावन । 
आता तरी वाचावा ॥ 9॥

आयुष्यभर पुरेल । 
पुरोनिया उरेल । 
ग्रंथांची रेलचेल । 
संतकृपेकरोनी ॥ 10॥

आवाहन करी वारंवार । 
केंद्र व राज्य सरकार । 
धोका वाढेल फार । 
बेफिकीरिने ॥ 11॥

खाकी वर्दी आणि डॉक्टर । 
सोबत स्वच्छता कामगार । 
काळजी घेती तत्पर । 
सकल जनांची ॥ 12॥

हेही दिस जातील निघोन । 
उद्या येईल आशेचा किरण । 
तोवर संयमाचे पालन । 
कर मनुजा ॥ 13॥ 

येथ म्हणे श्री निसर्गरावो । 
कोरोना ना पसरावो । 
स्वच्छतेचे गीत गावो । 
जनकल्याणहेतू ॥ 14॥

===================================================


कधी वाटलं होतं का?
असेही दिवस येतील?
माणसं एकमेकांना भेटायला तरसतील...

कधी वाटलं होतं का?
माणसांच्या गर्दीतून
माणूसच गायब होईल?
सगळं ऐश्वर्य असूनही माणूस
एकटा होईल?

कधी वाटलं होतं का असं होईल?
एकेकाळी गर्दीने बहरलेले रस्ते असे....
अचानक सामसूम होतील?
हॉटेल मधून येणारे सुवास....
 हसणारे,खिदळनारे आवाज लुप्त होतील?

कधी वाटलं होतं का असंही होईल?
सोसायट्यांमधून एकमेकांशी 
टाळ्या देत मारलेले संवाद....
नाहीसे होतील....?
लोक एकमेकांशी लांबूनच
 राम राम ठोकून निघून जातील😊

कधी वाटलं होतं का?
अंगणात खेळणारी...
हसणारी मुलं...
दंगा करणारी मुलं....
आपापल्या घरात बंदिस्त होतील....?

कधी वाटलं होतं का?
भले विज्ञान,तंत्रज्ञान आज
 कितीही पुढे गेलं...
चंद्रावर जरी जाऊन पोचलं....
तरी एवढ्या क्षुद्र अशा...
विषाणू पुढे,निसर्गापुढे.... 
माणूस एकदिवस असा नतमतस्क होईल?
कधी वाटलं होतं का?

+++++++++++++++++++++++++++

*आजचे पसायदान*
आता सर्वात्मके जीवे । 
विनाकारण न फिरावे । 
घरीच बैसोनि रहावे । 
निवांतपणे ॥ 1॥
एकमेका कर न मिळवावे । 
दुरुनीच नमस्कारावे । 
अंतर सुरक्षित राखावे । 
परस्परांमाजी ॥ 2॥

सदासर्वदा हात धुवावे । 
रुमालाविणा न शिंकावे । 
कोमट जल प्राशावे । 
थंड वर्जावे सर्वथा ॥ 3॥

घरी येता जरी कंटाळा । 
मदत करावी गृहिणीला । 
पुण्य लागे जीवाला।
पत्नीव्रताचे॥ 4॥

करा स्वच्छता सदनाची । 
त्याच बरोबर तनाची । 
काढा जळमटे मनाची । 
शुचिर्भूत व्हावया ॥ 5॥

करा मनन आणि चिंतन । 
थोडा वेळ नामस्मरण । 
चुकविता येईल मरण । 
स्वतःसहित इतरांचे ॥ 6॥

आजपावेतो खूप पळाला। 
आता विश्रांती शरीराला । 
सादर व्हावे समयाला । 
संत वचन हे असे ॥ 7॥

आहे विषाणू चे संकट । 
करा मनाला बळकट । 
ध्यानयोगाचा वज्र तट । 
 उभारावा भवताली॥ 8॥

समय नव्हता म्हणोन । 
केले नसेल वाचन । 
ज्ञानेश्वरी ग्रंथ पावन । 
आता तरी वाचावा ॥ 9॥

आयुष्याला पुरेल । 
पुरोनिया उरेल । 
ग्रंथांची ऐसी रेलचेल । 
आहे संतकृपेने ॥ 10॥

आवाहन करती वारंवार । 
दिल्ली आणि मुंबईकर । 
धोका वाढेल फार । 
बेफिकीर राहता ॥ 11॥

शासन,पोलिस,डॉक्टर । 
 स्वच्छतेचेही शूरवीर। 
सेवा देती अहोरात्र । 
स्मरण त्यांचे असावे॥ 12॥

हेही जातील दुःखदिन। 
येतील पुढे सुखाचे क्षण । 
तोवर संयमाचे पालन । 
मनापासोन करावे ॥ 13॥
 
येथ म्हणे श्री निसर्गरावो । 
कोरोना ना पसरावो । 
हाच हेतू मनी ध्यावो । 
जनकल्याणहेतूने ॥ 14॥
*2020मधील पसायदान*


------------------------------------------------------------------------------------------------------------

*मड बसलं त्या घुबडाचं*
*काय माहीत कुठून आलं* 
*कोरोनाच्या येण्यामुळं*
*माहेरी जाता नाही आलं* 😜

*लॉक डाऊन लॉक डाऊन*
*दोनचार दिस बरं वाटलं*
*जसं जसं लांबत गेलं*
*मी म्हणलं नशीब फुटलं* 😄

*भांड्यावाली धुण्यावली* 
*सगळ्याच बसल्या घरी*
*नवरा म्हणला काम केल्याने*
*तबीयत राहते बरी* 😜

*पोट्ट्यांचं समजलं पण*
*नवराही खाय खाय करू लागला* 
*माझं पहिलं जेवण व्हायच्या आत* 
*तेव दुसऱ्यांदा मागू लागला* 🤪

*मला तर वाटलं या बॉ ला* 
*नक्की भूत लागलं*
*भात आणि खिचडी वर तर*
*कधीच नाही भागलं* 😝

*रोज उंडे लाटू लाटू*
*मान पाठ एक झाली* 
*पंधरा दिवसात या बॉ ची* 
*ढेरीच वर आली* 🤪

*आलूवडे इडली सांबार*
*ऑर्डरी वर ऑर्डरी* 
*भगुनं बुडाला लागलं तरी*
*वाढ म्हणे थोडी तर्री* 😜

*कुस्करु कुस्करु*
*बेफाम जेऊ लागले*
*पडल्या पडल्या वरच्या पट्टीत*
*माणसं घोरू लागले* 😜

*एके दिवशी मॅसेज आला*
*हापूस घरी देतो*
*या माणसाने रिपलाय दिला*
*पुरी पेटीच घेतो* 🤪 

*मग तर काय सांगावं*
*पुरा ताल गेला*
*कुरडया अन पापड्याचा* 
*डबाच खाली गेला* 😜

*बाया झाल्या मरकुड्या* 
*अन माणसं झाले बंब*
*कोरोण्या मुळे नवरे*
*फुगले टंबच्या टंब*😄

*काय माहित देवा कोणतं* 
*पाप आडवं आलं* 
*कोरोनाच्या येण्यामुळं*
*माहेरी जाता नाही आलं*



=======================================

No comments:

Post a Comment

  १. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...