प्रेरणादायी

 माझे पुस्तक वाचन 

मला अनेक जण विचारतात की तु वेगवेगळ्या पुस्तकांचे वाचन कश्याप्रकारे करतो ??वाचलेलं ध्यानात कसे ठेवतो ??तुझ्या वाचनाचा वेग किती ??एका दिवसांत किती पृष्ठ वाचून समाप्त करतो ??वाचून त्याचे विश्लेषण कसे करतो ?? पुस्तक वाचताना नोट्स काढतो का ??अभ्यासातून वेळ कसा मिळतो ?? पुस्तक वाचल्यानंतर काय होते किंवा त्याचे फायदे काय ?? वगैरे इत्यादी काही प्रश्नांची उत्तरे मी या लेखात द्यायचं प्रयत्न करतो...

✍️ मी पुस्तके का व कशासाठी वाचतो ??

१)जसे गाडी पेट्रोल, मोबाईल चार्जिंग,मनुष्य अन्न/पाणी/हवे शिवाय चालत नाही त्याच प्रकारे माझा मेंदू वाचनाशिवाय चालत नाही यामुळे मेंदूला चालना देण्यासाठी मी वाचत असतो..

२)वेगवेगळ्या लेखकांचे भिन्न भिन्न विषय/मुद्द्यांवर त्यांचे अनुभव/विचार जाणून घेऊन स्वतःच एक मत बनवण्यासाठी मी वाचत असतो.

३)एका जागी बसूनच जग फिरण्यासाठी मी वाचत असतो,

४)मनातील/मेंदूतील घाण विचार बाहेर पडून चांगले विचार मेंदूत घर करून बसावे यासाठी मी वाचत असतो,

५)जगात/देशात वाढत चाललेल्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी मी वाचत असतो.

६)जगात जेवढे यशस्वी व्यक्ती आहेत ते एक चांगले वाचक आहे यामुळे मी वाचत असतो.

७)वाचनाने काहीही नुकसान होत नाही यामुळे मी वाचत असतो किंवा तणावातून मुक्त होण्यासाठी मी वाचत असतो.

८)इतरांच्या अनुभवातून/चुकांतून शिकण्यासाठी मी वाचत असतो किंवा शब्दसंग्रह भाषाकोष वाढवण्यासाठी मी वाचत असतो.

९)माझे व्यक्तिमत्त्व विकासाच्या साठी मी वाचत असतो व मनाच्या शांतीसाठी मी वाचत असतो.

१०)आयुष्य बदलण्यासाठी व घडवण्यासाठी मी वाचत असतो व यासोबत आत्मविश्वास वाढवण्यासाठी मी वाचत असतो.

११)एखाद्या विषयावर सखोल ज्ञान घेण्यासाठी व जिज्ञासापुर्ती करण्यासाठी मी वाचत असतो..

१२)स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे यासाठी व विपुल प्रमाणात चांगले लेखन करता यावे म्हणून मी वाचत असतो.

१३)भविष्यात एक चांगला अधिकारी बनण्यासाठी मी वाचत असतो व शेवटी पुस्तके हेच माझे मित्र आहेत त्यांच्याबरोबर नेहमी बोलण्यासाठी मी त्यांना वाचत असतो..

✍️मी वाचन कसे करतो ??

तुम्ही किती वेळा वाचता यापेक्षा कशाप्रकारे वाचतो हे महत्वाचे ठरते.लिहलेलं वाचून समजून घेण्यावर जास्त भर द्यायला हवा.

१)मी रोज एक पुस्तकाचे ४०-५० पृष्ठ न चुकता वाचत असतो यामुळे ३००-४०० पृष्ठांची कादंबरी सुद्धा मी ६-७ दिवसांत वाचून पूर्ण करु शकतो(काही अपवाद वगळता) एखादे पुस्तक जर खूपच मनात घर करून गेले तर त्या पुस्तकाचे रोज १५० पृष्ठ मी वाचन करतो आणि ते फक्त वाचतच नाही तर त्यावर विचार सुद्धा करत असतो व ते समजून घेण्यावर जास्त भर देतो..

२)एखादा मजकूर न समजल्यावर तो पुन्हा रिपीट वाचत असतो.

३)अवघड/कठीण शब्द/नाव अंडरलाईन करत असतो

४)वाचन मी नेहमी शांत मनाने व मनात चाललेले सारे विचार बाजूला काढून वाचत असतो.

५)समोर/टीव्ही सुरू असल्यावर अथवा गोंगाटामध्ये मी कधीही वाचत नाही मी नेहमी शांत जागेत वाचन करत असतो.

६)पुस्तकातील फक्त काहीच मजकूर मी जोरजोरात वाचत असतो व बाकी मूक वाचनालाच प्राधान्य देतो.

७)मी एकाच जागी बसून कधीही वाचन करत नसून बसून/झोपून/चालत-फिरत वाचत असतो.

८) पुस्तकातील मुख्य पात्राच्या ठिकाणी स्वतःला ठेऊन मी वाचन करत असतो (उदाहरण :-रावण कादंबरी वाचत असताना मी स्वतःला रावण समजून वाचत होतो किंवा प्रतिपश्चन्द्र कादंबरी वाचत असताना स्वतःला रवि समजून वाचत होतो)

९)पुस्तक वाचत असताना मी फक्त त्याच पुस्तकावर लक्ष्य केंद्रित करून वाचत असतो.

१०)वाचन समाप्त झाल्यावर मला त्यातून काय शिकायला मिळाले याबद्दल मी विचार करत असतो,

११)फक्त वाचायचं आहे किंवा पुस्तक वाचून संपवायचं आहे म्हणून मी कधीही वाचत नाही.

१२)पुस्तक वाचन झाल्यावर त्या विषयावर गुगल करतो व काही माहिती पुन्हा वाचतो,समीक्षण वाचतो आणि मला जे समजलं/उमजलं ते सरळ सरळ लिहून काढतो..

१३)मी वाचत असताना ओळीवर बोट ठेऊन कधीही वाचत नसतो याने वाचनाचं वेग खूप कमी होतो.

याप्रमाणे मी वाचन करत असतो आणि ते वाचलेलं माझ्या लक्षात सुद्धा राहते..

✍️ वाचनाचे फायदे काय किंवा पुस्तक वाचन केल्यानंतर...

१)प्रेम आणि वासना यामधील फरक समजतो..

२)गरीब सुद्धा श्रीमंत दिसु लागतो..

३)समाजामध्ये किती दुःख आहे हे समजते..

४)कोणत्या माणसांशी कसे वागावे हे समजू लागते..

५)प्राण्यांशी व निसर्गाशी आपुलकी निर्माण होते..

६)समाजातील भयानक रितीरिवाज,अंधश्रद्धा,रुढीपरंपरा, ढोंग समजू लागते..

७)महापुरुष नेमके कोणास म्हणावे हे समजते..

८)पैसा हाच सर्व नाही या गोष्टीवर आपला विश्वास बसतो..

९)विश्वात आपले अस्तित्व किती किरकोळ आहे हे समजते..

१०)आई वडिलांची खरी किंमत कळते..

११)कोणी आपल्याला कितीही वाईट बोलू द्या आपण त्याला नेहमी प्रेमानेच बोलावे हे समजून चुकते..

१२)आपल्या देशासाठी किती थोरांनी आपल्या प्राणाची बाजी लावली आहे हे समजते..

१३)किती इतिहासातील गोष्टी आपल्या पासून लपवल्या गेल्या आहे हे समजते..

१४)प्रत्येक महिलांची नेहमी इज्जत करावी हे समजते..

१५)आयुष्यात पास होणे फक्त हेच जीवनाचे उद्देश्य नाही.. किंवा एकाद्या परीक्षेत नापास झाल्यावर आत्महत्येचा विचार सुद्धा मनात येत नाही..

१६)आज जी व्यक्ती आपल्याला उच्च शिखरावर दिसते त्यांनी त्या शिखरावर पोहचण्यासाठी किती मेहनत केली होती हे समजते..

१७)विश्व किती अफाट आहे याची जाणीव होते..

१८)धर्म,जाती हे सर्व ढोंग असून माणुसकी हीच सर्वोपरी आहे याची समज येते..

१९)गौतम बुद्धांनी सांगितलेला "अत दीप भव" हा मार्ग समजतो..हजरत मुहम्मद पैगंबर यांचा खरा शांतीचा मार्ग देणारा इस्लाम समजतो..

२०)माणसांनी निसर्गाचा कशाप्रकारे विनाश केला आहे हे समजते..

२१)गुन्हेगारा मध्ये सुद्धा माणूस दिसू लागते व  त्याची मजबुरी समजू लागते..

२२)कोणालाही उपदेश देण्याच्या पहिले आपण काय आहोत हे समजायला लागते..

२३)शिवरायांच्या स्वप्नातला हिंदवी स्वराज्य म्हणजे नेमकं काय हे समजते..

२४)बाबासाहेबांनी सांगितलेला मूलमंत्र शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा'याचा अर्थ कळतो..

२५)डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम सरांच्या स्वप्नातील भारत म्हणजे काय हे समजते..

२६)शहीद भगत सिंह यांच्या क्रांतीचा अर्थ कळतो..

२७)मंदिर-मस्जिद या गोष्टी मानवासाठी एवढ्या उपयोगाच्या नसून हॉस्पिटल,शाळा इत्यादीच मानवाच्या मूलभूत गरजा आहे हे समजते..

२८)कोणाकडून चुकी झाली असल्यावर त्याला माफ करण्याची समज येते..

२९)देशभक्तीचा नेमका अर्थ काय हे समजतो..

३०)विश्वाला,समाजाला बघण्याची एक नवीन दृष्टी मिळते..

३१)हिंदू मुस्लिम म्हणून न जगता माणूस म्हणून कसे जगावे समजते..

३२)समाजात तेढ निर्माण करणाऱ्या नेत्यांचा असली चेहरा समजतो..

३३)शेतकऱ्यांचे ,कामगारांचे दुःख समजते

३४)बालविवाह,लहान मुलांचे लैंगिक शोषण,कुपोषण,बलात्कार,बंधुवा मजदूरी इत्यादी आपल्या समाजाला लागलेली कीड आहे हे समजते...

३५)पुस्तक वाचनाचे फायदे कळू लागतात..

३६)आत्मविश्वास निर्माण होतो.

३७)विश्वाला/समाजाला बघण्याचा दृष्टिकोन बदलतो..

  लेखक जेव्हा कोणत्याही एका विषयावर/मुद्द्यांवर/व्यक्तींवर ( उदाहरण :-ऐतिहासिक,चरित्र,भौगोलिक, राजकीय अथवा ) पुस्तक/कादंबरी लिहायला घेतो तेव्हा तो त्या विषयासंबंधीत अनेक पुस्तके/ग्रंथ/बखरी खंगाळतो त्याचा अभ्यास व संशोधन करतो,नोट्स काढतो,अनेक तज्ञांना भेटतो त्यांच्याकडून माहिती घेतो,पुरावे गोळा करतो,या विषयावर रात्रंदिवस मेहनत करतो व  एकंदरीत आपल्या आयुष्यातील काही महत्वपूर्ण वर्षे देऊन तो आपल्या स्वतःच्या अनुभवाने/पात्रतेने पुस्तक वाचकांसमोर ठेवतो...

  आता जेव्हा आपण त्याविषयावर पुस्तक वाचायला घेतो तेव्हा आपल्याला जास्त मेहनत घ्यावी लागत नाही कारण त्यावर मेहनत ही लेखकाने अगोदरच घेतलेली असते म्हणून आपल्याला फक्त हे पुस्तक वाचूनच ज्ञान/अनुभव/माहिती मिळून जाते..लेखकाने पुस्तक लिखाणासाठी केलेली मेहनत व अनेक वर्षेदेऊन अभ्यास/संशोधन करून मिळवलेली माहिती/अनुभव आपल्याला फक्त काही दिवसाच्या वाचनानेच मिळून जाते..आणि हीच पुस्तकांची खरी ताकद आहे...पुस्तक वाचनाने आपण विचार करायला शिकतो, आपली इच्छाशक्ती मजबूत होते,आत्मविश्वास येतो,पुस्तके आपल्याला कधीही एकटे पडूच देत नाही ,वाचनाने आपले विचार प्रगल्भ होतात,आपल्याला अनेक विषयांवर शिकायला मिळते,आपण इतरांच्यापेक्षा वेगळे वागतो आणि नेमकं जगायचं कसे हे आपल्याला शिकायला मिळते...✍️❤️

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

पुस्तके का वाचली पाहिजेत

पुस्तकांनी काय शिकवलं ?

तुमच्याकडे दहा रुपये असतील तर आठ रुपये स्वतःच्या खर्चासाठी ठेवा . उरलेल्या दोन रुपयांपैकी एक रुपयाचं गुलाबाचं फुल घ्या आणि एक रुपयांचं पुस्तक घ्या अशी एक म्हण आहे , का जगायचं ते गुलाबाकडे पाहून कळेल आणि कसं जगायचं ते पुस्तक शिकवेल . पुस्तके अत्यंत मोलाची आहेत . त्यात मराठी साहित्य ही तर न संपणारी दौलत आहे. जितकी जास्त लुटाल तितकी ती वाढत जाते . एक ज्ञानेश्वरी जरी पुन्हा पुन्हा वाचली तर प्रत्येक ओवीचा अर्थ नव्याने कळतो . आपण मराठी माणसे खरोखर नशीबवान , आपल्याला जसा थोर इतिहास लाभला तशी साहित्याची मोठी परंपराही लाभली.

          मी पुस्तके वाचायला सुरुवात केली तेव्हा काय वाचायचं हे ठरवलं नव्हतं . सार्वजनिक वाचनयालात जे समोर येईल ते वाचत गेलो आणि हळहळू मराठी साहित्याचा मोठा खजिना हाती गवसला . सुरुवात झाली होती पॅपिलॉन नावाच्या पुस्तकापासून . हेन्री शॅरीयर नावाच्या एका फ्रेंच गुन्हेगाराने हे पुस्तक लिहिलं ,  हेन्रीला गुन्हेगारी जगतात पॅपिलॉन नावाने ओळखत असत . तो फार मोठा गुन्हेगार नव्हता पण त्याच्यावर खुनाचा खोटा आळ आला आणि त्याला फ्रेंच गियानामधील कुप्रसिद्ध जेलमध्ये धाडण्यात आलं. तिथे त्याला कठोर कारावास भोगावा लागला ,  आपल्यावर खोटा आळ टाकणार्‍यांना धडा शिकवायचा , त्यासाठी जेलमधून पळायचं आणि पुन्हा फ्रान्सला जायचं हे त्याने ठरवलं ,  त्याचा प्रवास सोपा नव्हता , तरीही अत्यंत जिद्द , धाडसाच्या बळावर तो पळाला ,  ही सगळी कथा त्याने स्वतः लिहिली आणि रवींद्र गुर्जर ह्यांनी ती मराठीत आणली . ह्या पुस्तकाने शिकवलं की जीवनात केव्हाही अडचणी येऊ शकतात आणि त्याला तोंड द्यायला साहस , दुर्दम्य आत्मविश्वास ह्याची गरज असते . संघर्ष हा दर पावलाला येत असतो आणि त्याला तोंड देत जिद्दीने लढायचं असतं .

  साहस आणि दुर्दम्य आत्मविश्वासाचा विषय निघतो तेव्हा वीर सावरकरांचं ''माझी जन्मठेप'' पुस्तक विसरता येत नाही. सावरकरांना दोन जन्मठेपीच्या शिक्षा सुनावण्यात आल्या ,  एक जन्मठेप होती २५ वर्षांची. म्हणजे सावरकर ५० वर्षा नंतर जेलमधून बाहेर येणार होते ,  थोडक्यात जिवंत बाहेर येण्याची शक्यता नव्हती ,  तरीही शिक्षा ऐकून ते डगमगले नाहीत ,  त्यांनी ब्रिटिश सरकारला ऐकवले ,  तुम्ही फार काळ भारतात राहू शकणार नाही ,  त्यामुळे माझी शिक्षा लवकर संपेल , इतका दुर्दम्य आत्मविश्वास फक्त तेच दाखवू शकतात. अंदमानच्या सेल्युलर कारागृहात गेल्यावर त्यांची कठोर बारीशी गाठ पडली , शारीरिक - मानसिक यातनांना सुरुवात झाली ,  दिलेल्या भांड्यात संडास करावी लागे , स्वतःच्या कोठडीत लघुशंका केल्यावर त्याचा वास घुमत राही , दिवसाचे 16 तास कोलू चालवून शरीर भयंकर थकून जाई , इतकी भयंकर प्रतिकूलता असूनही ते हिंदुस्तानच्या स्वातंत्र्याचं स्वप्न पाहत होते ,  जगताना आपल्यावर संकटे येऊ शकतात आणि आपण त्यांवर मात करू शकतो हे शिकायचं असेल तर 'माझी जन्मठेप' वाचायलाच हवे. क्रांतिकारकांनी जे भोगले त्या तुलनेत आपल्या वाट्याला जर काही प्रतिकूल परिस्थिती आली तर ती काहीच नाही हे जाणवू लागते.

         जगायला शिकवणाऱ्या पुस्तकांची अनेक उदाहरणे आहेत ,  त्यातील मी वाचलेलं अजून  एक आहे डेझर्टर! गंथर बाहनमन हा जर्मन सैनिक होता ,  त्याची लिबियामध्ये नेमणूक झाली होती. हिटलरसाठी तो लढत असताना त्याच्या वडिलांना नाझी सैनिकांनी फासावर चढवले , म्हणून त्याने सैन्य सोडण्याचे ठरवले. जर्मनीला जाऊन आईला भेटायचे त्याचे स्वप्न होते पण त्याचा प्रवास सोपा नव्हता ,  सैन्यातून पळाल्यामुळे त्याला ठार केले जाऊ शकत होते , तरीही तो जर्मन आणि त्यांचे दोस्त असलेल्या इटालियन सैन्याला झुकांड्या देत पळत राहिला आणि अखेर शत्रूच्या म्हणजे ब्रिटिशांच्या तावडीत सापडला ,  ब्रिटिशांच्या कैदेत असताना तो इंग्लिश शिकला आणि त्याने हे पुस्तक लिहिले.

   विजय देवधरांनी अनेक पुस्तकांचा अनुवाद केला. त्यापैकी बरीच पुस्तके साहसावर आधारित आहेत. ही सगळी पुस्तके आपल्याला धाडस करायला उद्युक्त करतात. रवींद्र गुर्जरांनी अनुवादित केलेल्या 'सत्तर दिवस' पुस्तकाचाही आवर्जून उल्लेख करायला हवा. एक विमान दुर्गम पर्वतामध्ये कोसळले आणि त्यात जिवंत राहिलेल्या प्रवाशांनी जगण्यासाठी जी धडपड केली , ती ह्या पुस्तकात दिली आहे. ह्या प्रवाशांनी बर्फाळ प्रदेशात स्वतःला जिवंत ठेवण्यासाठी मेलेल्या सहप्रवाशांचे मांस कापून खाल्ले . अखेरीस त्यांचा शोध लागला आणि त्यांची सुटका झाली. ज्यांना जीवनात अपयश आल्यामुळे आत्महत्या करावीशी वाटते त्यांनी जगण्याचा टोकाचा प्रयत्न कसा असतो हे जाणून घेण्यासाठी हे पुस्तक जरूर वाचावे . ही सत्यकथा आपल्याला अत्यंत प्रतिकूल परिस्थितीही जगण्याची प्रेरणा देते ,  जगण्यासाठी अनेकांची कशी धडपड चालते हे जाणून घ्यायचे तर 'मला निसटले पाहिजे' हे पुस्तकही वाचावे . रशियाने काही ब्रिटिश सैनिकांना बंदी बनवले होते . ह्या सैनिकांनी पळून जाण्यासाठी जे प्रचंड धाडस केले तो ह्या पुस्तकाचा विषय आहे . कैदेतून पळाल्या वर हे सैनिक रशियापासून भारतापर्यंत चालत आले ,  इथे ब्रिटिशांची सत्ता होती . भारतात आल्यावर ब्रिटिश आपल्याला पुन्हा इंग्लंडला पाठवतील , हे ओळखून त्यांनी अत्यंत थंड प्रदेशातून उपासतापास सहन करून भारतापर्यंत चालत प्रवास केला . भारताच्या सीमेवर ते ब्रिटिश सैन्याकडे आले आणि त्यांना इंग्लंडला पाठवण्यात आले . स्वातंत्र्य मिळवण्यासाठी माणूस प्रसंगी जीवावर उदार होतो , असंख्य अडथळे पार करतो हे या पुस्तकातून शिकता येते . आपल्याला मिळालेले स्वातंत्र्य किती बहुमोल आहे ते कळते ,  तसेच एक सैनिक देशासाठी किती झटत असतो तेही कळते .

     भारता मध्येही अनेक चरित्रकथा लिहिल्या गेल्या. 'लंडनच्या आजीबाई' हे पुस्तक त्यापैकी एक आहे. इंग्रजांच्या काळात विदर्भात राहणारी राधाबाई वनारसे  ही विधवा दारिद्र्य भोगत होती . मुलींचं पोषण करणं अशक्य झालं होतं . ती दुसरा विवाह करून इंग्लंडला राहायला गेली . दुर्दैवाने दुसऱ्या पतीचेही निधन झाले. पुन्हा दारिद्र्य आले . इंग्लिश भाषा येत नव्हती . ती अशिक्षित होती . तरीही इंग्लंडमध्ये राहून तिने खानावळ चालवली आणि लंडनमध्ये चार इमारती विकत घेतल्या . पु. ल. देशपांडे , अत्रे , यशवंतराव चव्हाण लंडनला गेले की तिच्या खानावळीत जात असत . अत्रेंनी तर तिचे कौतुक करताना म्हटले की त्यांच्यामुळे लंडनही महाराष्ट्राचा भाग व्हायला पाहिजे . हे पुस्तक वाचकाला आशावादी बनवते , संघर्ष करण्याची प्रेरणा देते . कितीही संकटे आली तरी श्रम करून संकटे दूर करता येतात , यश मिळवता येते , हे या पुस्तकातून शिकता येते.

काही पुस्तके जगायला शिकवतात तर काही पुस्तके का जगायचं हे शिकवतात. जीवनातील विसंगतीकडे पाहून हसता येते हे पु. ल. देशपांडेंची पुस्तके शिकवतात आणि असे दिलखुलास हसता येते हाच जीवनातील मोठा आनंद आहे हे या पुस्तकातून कळते . "चाराणे खाल्ले तर चौकटीची टोपी घालून डिस्ट्रिक्ट जेलात घालतात आणि लाखो रुपये खाल्ले तर लोकनियुक्त प्रतिनिधी बनवतात''  हा त्यांचा विनोद अनेक वर्षे उलटली तरी अजूनही खरा ठरतो. ''असा मी असामी'' आजही सामान्य माणसाचे प्रतिबिंब आहे . आचार्य अत्र्यांची पुस्तकेही अशीच हसवतात . द. मा. मिरासदार , रमेश मंत्री यांचीही पुस्तके करमणूक करतात . शं. ना. नवरे , व. पु. काळे छोट्या कथेमधून खूप काही सांगून जातात . व्यंकटेश माडगूळकर आणि रवींद्र पिंगे ह्यांचे ललित लेख तर फार वाचनीय असतात . माडगूळकरांनी त्यांच्या गावाचे खुमासदार वर्णन केले आहे आणि पिंगेंनी स्वतः केलेल्या भटकंतीवर विपुल लेखन केले आहे . हे लेखन आपल्याला आसपास पाहायला प्रवृत्त करते . जीवन चहूबाजूने खूप काही दाखवत असते . आपण आपल्या छोट्या समस्या , रोजचे रडे बाजूला सारून हा आनंद घ्यायला हवा हे त्यांची पुस्तके शिकवतात.

       कथा, चरित्रकथा अनेक शब्दातून व्यक्त होतात पण कविता मोजक्या शब्दातून खूप मोठा अर्थ सांगून जाते. आशावाद , सकारात्मकता कशी असावी हे मंगेश पाडगावकरांच्या 'या जन्मावर , या जगण्यावर' च्या शेवटच्या कडव्यातून शिकता येते . पाडगावकरांनी लिहिले आहे ,

या ओठानी चिंबून घेईन हजारदा ही माती,

अनंत मरणे झेलून घ्यावी इथल्या जगण्यासाठी...

इथल्या पिंपळ पानावरती अवघे विश्व तरावे,

या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे...

  आपण जगताना अनंत यातना सोसतो . प्रसंगी मरणही झेलून घेतो . तरीही पाडगावकर लिहितात की ज्याप्रमाणे श्रीकृष्ण पुरामध्ये पिंपळ पानावरुन तरून गेला तसे हे विश्वही तरणार आहे. आसपास अनेक नकारात्मक प्रसंग घडताना हा आशावाद मनाला खूप उभारी देतो . आपल्या मनाला उभारी देण्यासाठी आणखी एक गोष्ट आवश्यक असते ती म्हणजे एखाद्या व्यक्तीने आपल्या पाठीशी उभं राहणं . एखाद्याने नुसता धीर दिला तरी मोठ्या संकटांवर मात करता येते. कुसुमाग्रजांची *"कणा" कविता हेच शिकवते . कुसुमाग्रजांकडे त्यांचा एक विद्यार्थी आला आहे . त्याच्या घरात पुराचे पाणी शिरल्यामुळे त्याचं घर उध्वस्त झाले आहे. तो येतो आणि म्हणतो,

*"ओळखलत का सर मला?’ - 

पावसात आला कोणी,

कपडे होते कर्दमलेले, केसांवरती पाणी.

क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून,

‘गंगामाई पाहुणी आली, गेली घरट्यात राहुन’.

त्याच्या घरात पुराचं पाणी शिरलं पण त्या पाण्याला नाव न ठेवता तो त्याला गंगामाई म्हणतो आणि पुढे सांगू लागतो , 

"माहेरवाशीण पोरीसारखी चार भिंतीत नाचली,

मोकळ्या हाती जाईल कशी , बायको मात्र वाचली ,

भिंत खचली , चूल विझली , होते नव्हते नेले ,

प्रसाद म्हणून पापण्यांवरती पाणी थोडे ठेवले.

कारभारणीला घेउन संगे सर आता लढतो आहे ,

पडकी भिंत बांधतो आहे ,

 चिखलगाळ काढतो आहे"

कुसुमाग्रजांनी त्याला मदत म्हणून काही पैसे देण्याचा विचार केला पण त्याने ते नाकारले ,  कुसुमाग्रज लिहितात,

खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला,

‘पैसे नकोत सर,

जरा एकटेपणा वाटला.

मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा,

पाठीवरती हात ठेउन, फक्त लढ म्हणा’!

पूरग्रस्त झालेला हा विद्यार्थी खूप मानी आहे ,  त्याला पैसे नकोत , फक्त सरांकडून धीर हवा आहे ,  सरांनी पाठीवर हात ठेवून फक्त लढा म्हणावे इतकीच त्याची इच्छा आहे !! कुसुमाग्रजांची ही कविता अनेकांच्या स्मरणात राहिली ती फक्त हव्या असलेल्या धीरासाठी!

          मराठी पुस्तकांची ही खासियत आहे . ही पुस्तके जगायला बळ देतात . जणू पाठीवरती हात ठेवून लढ म्हणत असतात  ,म्हणून आपल्या संग्रही पुस्तके असावीत , आपल्या पुढच्या पिढीला संपत्ती देण्यापेक्षा पुस्तके द्यावीत , कारण संपत्ती मिळालेली पिढी पंगू होते तर पुस्तके मिळालेली पिढी सक्षम बनते. 

           पुस्तकांचे महत्त्व अधोरेखित करणारी पाब्लो नेरुडाची कविता आहे,

If you do not travel,

If you do not read,

If you do not listen 

 to the sounds of life,

You start dying slowly

जर तुम्ही प्रवास करत नसाल , पुस्तक वाचत नसाल , जीवनाचे रंग अनुभवत नसाल तर तुम्ही हळूहळू मरत आहात....वाचाल तरच वाचाल , 

आणि 

दुनिया फिराल तरच जगाल !!

@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@


# जाने कहा गये वो दिन ...सरीवर सरी

 वाचन.. एक सुखद अनुभव

   वाचनाचं वेड लहानपणीच लागावं लागतं. आपल्या पिढीला हे वाचनाचं वेड लावण्याचं महत्वाचं काम काही मासिकांनी केलं होतं. त्यापैकी काही सगळ्यांनाच आठवत असतील. 

    लहानपणी आमच्या कडे चांदोबा आणि किशोर ही दोन मासिक नित्यनेमाने येत असत.  गुळगुळीत कागद असलेलं सोव्हिएट रशिया, धर्मयुग, अमृत, विचित्रविश्व, रिडर्स डायजेस्ट(मराठी) अशी मासिकं पण घरात सतत असत. जगभरातल्या रंजक बातम्या, घडामोडी त्यात असत.  वडिलांची बदलीची नोकरी होती. बदली होऊन नविन गावात गेलं की सगळी दुकानं , डॉक्टर, शाळा, ह्यांची लाईन लावावी लागे. त्यातच लायब्ररीपण असायची. पहिल्याच महिन्यात वडील लायब्ररी लावत असत. लायब्ररीतून पण काही मासिकं घरात येत. दक्षता, ललना, माहेर, स्त्री, मनोहर, किर्लोस्कर. नंतर नंतर ही तिन्ही मासिकं एकत्र करून किस्त्रीम चा अंक पण निघायला लागला. बुवा, आवाज, त्यातली खिडकी चित्रं.. 

  चांदोबा, किशोरची वार्षिक वर्गणी भरलेली असायची. त्यांचे अंक पोस्टाने येत.  अंक आला की अक्षरश: आम्हा  भावंडांमधे भांडणं,पळवाळवी होई. कधी कधी पोस्टमनच्या हातून एखाद्याच्या हाती अंक लागला की कुठेतरी लपून तो अंक आधाशासारखा पूर्ण वाचून काढायचो. चांदोबातली चित्र अगदी जिवंत.. मनाला हुरळून टाकणारी असायची. त्यातली संस्कृतप्रचूर नावं, गावं वेगळ्याच विश्वात घेऊन जात. किशोरमधे चित्र पण असायचं रंगवायला. महिन्यातून एकदा ते चित्र रंगवायला मिळायचं. त्याचा कोण आनंद असायचा. 

    बाकी मासिकांमधून लेखन करणारी दिग्गज मंडळी असायची. माहेर, ललना मधल्या शकुंतला गोगटे, शैलजा राजेंच्या कथा फार छानअसायच्या. साध्या सोप्या भाषेतल्या त्यांच्या कथा महिला वर्गात लोकप्रीय होत्या. प्रमोद नवलकरांच्या पोलीस चातूर्यकथा पण फार सुरस असायच्या..  इंद्रायणी सावकार, रमेश मंत्री, वि आ बुवा हास्याचे मळे फुलवत. वि स खांडेकर, ना सि फडकेंच्या कादंब-यांची धूम होती. गो नि दांडेकरांची 'मोगरा फुलला'.. सातवी आठवीत वाचली होती. परवा सहज हाती आली म्हणून परत वाचली. पण तेव्हासारखा मोगरा दरवळला नाही. 

तेव्हा वाचलेलं खरंच आतपर्यंत मुरायचं. आता कितीही वाचलं तरी तेव्हासारखी मजा नाही येत. 

©® ✍नीलिमा क्षत्रिय. मो.8149559091

(वरील लेखाचे हक्क लेखिकेकडे राखीव आहेत. निनावी  शेअर करू नये. )


**************************************************************


'कव्हर स्टोरी

( जागतिक पुस्तक दिना निमित्य)


आज २३ एप्रिल 'जागतिक पुस्तक दिन '. सर्व वाचनप्रेमींना शुभेच्छा 💐. 'वाचाल तर वाचाल' अशी संतवाणी होऊन गेली असली तरी याचे बाळकडू अगदी लहानपणी आपल्या पालकांकडून, "निट वाच ( अभ्यास कर) नाहीतर पुढे ढकलला "असा शेरा मिळेल बघ हं!  अशा रुपात  वेळोवेळी मिळत गेले. 

 पुस्तकांची पहिली ओळख लहानपणी आपल्याला मुख्यत्वे पाठ्यपुस्तकांच्या रुपानेच झाली.


जून महिन्यात शाळा सुरु व्हायच्या आधी नविन वर्षाची पुस्तके 'ताम्हनकर, तानवडे बुक डेपोतून आणली जायची. अगदी आपल्या पुढच्या इयत्तेत 

असणा-या आमचा चुलत भाऊ 'चेंड्या' कडून त्याच्या वह्या पुस्तकाचे गाठोडे आणून, आमचे गाठोडे आमच्या मागे असणाऱ्या दुस-या चूलत भावाकडे 'ढेंप्या' कडे पोहोचते केले असले तरी आई- बाबांच्या मागे लागून पुस्तकांचा नवीन संच या दुकानातून आणणे हे एकाही वर्षी चुकले नाही.

ही पुस्तके घेताना एक गोष्ट आवर्जून घेतली जायची ती म्हणजे तपकिरी रंगाचे कागद ज्याला आपण 'कव्हर्स ' म्हणतो.


शाळा सुरु व्हायच्या आधी या पुस्तकांना 'कव्हर्स ' घालणे हा जंगी कार्यक्रम घरोघरी व्हायचा. पुस्तक वर्षभर चांगले रहावे हा या मागचा मूळ उद्देश असला आणि तो कितीही चांगला असला तरी मुळात मला हा प्रकार फारसा आवडला नाही.शाळा सुरु होऊन १-२ महिन्यात असे माझे एकही पुस्तक नव्हते ज्याचे घातलेले कव्हर टिकले आहे.


मंडळी, पुस्तकांची खरी मजा कव्हर नसलेल्या म्हणजेच पुस्तकाचे मुखपृष्ठ दिसत असतानाच आहे हे माझे स्पष्ट मत. पुस्तक ही मस्त मोकळा श्वास घेतात, आपल्याशी मुखपृष्ठातून ती बोलतात, यात काय आहे हे सारांश रुपाने सांगतात, वाचनाची उत्सुकता वाढवतात. बहुतेक बालभारती पुस्तकाचे मुखपृष्ठ दरवर्षी सारखे असायचे पण इतर विषयांचे मुखपृष्ठ दरवर्षी वेगवेगळे असायचे(??)


हळूहळू पाठ्यपुस्तकांबरोबरच आपल्या हातात चंपक, चांदोबा, छावा, आनंद, किशोर ही बालमासिके , नंतर लोकप्रभा, चित्रलेखा, साप्ताहिक सकाळ अशी साप्ताहिके मग प्रपंच, रोहिणी, धनंजय, किर्लोस्कर अशी मासिके ते दिवाळी अंक हा हवाहवासा वाटणारा प्रवास आणि  हवेहवेसे, पहावेसे वाटणारे प्रत्येक अंकाचे मुखपृष्ठ. तारुण्यात 'आवाज' सारख्या दिवाळी अंकाच्या मल्टीपल मुखपृष्ठांची मजा न घेतलेला हास्य रसिक मिळणे अवघडच 😊


त्यानंतर वाचनात आलेली अनेक ऐतिहासिक पुस्तके, आत्मचरित्रे, कादंबरी, या सगळ्यात मुखपृष्ठ हे अगदी मुख्य भूमिका निभावते. 


( सध्या आपल्याला फारसे दिसत नाही पण सिनेमाचे गावागावातील भिंतीवर लागलेले पोस्टर हे एकप्रकारे त्या सिनेमाचे मुखपृष्ठच नाही का? )


तर अशी ही मनाला कुठलेही कव्हर न घालता लिहिलेली 'कव्हर स्टोरी', एखाद्या कसलेल्या फलंदाजाने मारलेल्या 'कव्हर ड्राईव्ह ' ची मजा नसेल ही आली पण पुस्तक दिना निमित्ताने ही पुस्तकांबद्दल व्यक्त केलेली कृतज्ञता समजा.


लेखनाचा शेवट काही ओळींनी


अजि पुस्तिकाचा दिनु

व्रत वाचनाचा जाणू


हर्ष जाहिला रे , हर्ष जाहिला रे 

कथा कादंबरी, वाचावी ज्ञानेश्वरी ||


दृढ 'विडंबन' मुळी

विराजीत वनमाळी 

हर्ष जाहिला रे , हर्ष जाहिला रे |


अजि पुस्तिकाचा दिनु

व्रत वाचनाचा जाणू 📖🙏🏻


📝२३/०४/२०२०

#पुस्तक_दिन

******************


+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++



++++++++                +++++++++++++




+++++++++++++


======================
   
+++++++++++++++




=============================================================



++++++++++++++++++



👌🏼👌🏼👌🏼

👍🏼👍🏼☘🌸🌺🌷🌹🌹

समुद्राच्या किना-यावर जेव्हा एक लाट आली तेव्हा जाताना एका लहान मुलाची एक चप्पल आपल्या सोबत घेऊन गेली... तो मुलगा वाळुवर बोटाने लिहीतो कि

"समुद्र चोर आहे".

त्याच समुद्राच्या दुस-या तटावर मासे पकडणारा खुप मासे पकडतो तो वाळुवर लिहीतो कि

"समुद्र पालनकर्ता आहे".

एक युवक समुद्रात बुडून मरतो तेव्हा त्याची आई वाळुवर लिहीते

"समुद्र खुनी आहे".

एका दूस-या किना-यावर एक गरीब वृध्द वाकड्या कंबरेने फिरत असतो त्याला एका मोठ्या सीपमध्ये एक अनमोल मोती सापडतो तर तो वाळुवर कसा लिहीतो

"समुद्र दाता है".

अचानक एक विशाल लाट येते *आणि सर्व लिहीलेले पुसले जाते

लोकं काही म्हणू द्या... परंतु अथांग, विशाल समुद्र आपल्या लाटांमध्ये मस्त राहतो... आपली भरती आणि ओहोटी तो आपल्या पध्दतीने सिध्द करीत असतो

      जर अथांग समुद्र बनायचे असेल तर कोणाच्या निर्णयावर लक्ष न देता जे करायचे ते आपल्या पद्धतीने करायचे...

भूतकाळातील विचार करत बसू नये. यश अपयश, मिळणे न मिळणे, सुख-दुख, या सगळ्यात मन विचलित होऊ देऊ नये.

जर जीवन सुख शांति ने भरलेले असते तर मनुष्य जन्माला येताना रडला नसता

*जन्माला येताना रडणे आणि मेल्यानंतर रडवणे यामधील संघर्षमय वेळेलाच कदाचित जीवन म्हणतात...

++++++++++


प्रार्थना हा शब्द प्र+अर्थ या सोपसर्ग धातूपासून बनलेला आहे.


त्याचा अर्थ ‘ प्रकर्षाने याचना करणे ’ असा होतो. प्रार्थना या शब्दाला इंग्रजीमध्ये प्रेअर असे म्हटले जाते. प्रेअर हा शब्द लॅटिन असून तो


‘ प्रेकॅरिअस ’पासून तयार झाला आहे. प्रेकॅरिअस म्हणजे ‘ मन:पूर्वक केलेल्या याचनेपासून प्राप्त केलेला ’ असा अर्थ आहे.


‘‘ माणसाने आपल्या इष्टदेवतेला किंवा अन्य एखाद्या श्रेष्ठ शक्तीला उद्देशून विनम्र भावनेने आणि धार्मिक श्रद्धेने केलेला नि:शब्द किंवा शब्दबद्ध असे स्तवन, उपकार, स्मरण, पश्चात्तापाचे निवेदन किंवा याचना म्हणजे प्रार्थना ! ’’ अशीही प्रार्थनेची व्याख्या केली जाते.


प्रार्थनेत अभिनव शक्ती आहे . प्रार्थना चिंतेच्या चितेला विझवू शकते तर दगडालाही पाझर फोडू शकते . वादळालाही थोपवू शकते आणि बुडणाऱ्या नावेला किनारा देऊ शकते. अर्थात प्रार्थनेत आर्तता हवी . प्रार्थना म्हणजे जणू काही हृदयाची हाकच होय. या मनापासून, हृदयापासून केलेल्या प्रार्थनेला स्थळ-काळाचे नियम नसतात. मात्र अशा प्रार्थने वेळी क्षणभर का होईना स्वत:चा पूर्ण विसर पडला पाहिजे.  ( संग्रहित प्रार्थना )

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

वन मिनिट प्रिंसिपल' 


दहा दिवस हा प्रयोग सगळयांनी मिळून करायचा आहे. एखादी चांगली सवय जी आपल्याला असायला हवी असं मनापासून वाटतंय पण जमतच नाही, कळतंय पण मन वळत नाही असं वाटतंय. अशी एकच एक सवय, चांगली गोष्ट निवडा. या सवयीचा अक्षरशः लहानसा भाग ठरवा. लहान किती तर अक्षरशः काहीतरीच काय, फक्त इतकंच असं वाटेल, बालिशपणा वाटेल इतका लहान भाग.

1. रोज एका पुस्तकाचं एकच पान.

2. रोज एकच सुर्यनमस्कार.

3. रोज एक योगासन.

4. रोज पाच मिनिट मेडिटेशन.

5. रोज दोन स्पेलिंग पाठ करणे.

6. रोज चांगल्या अक्षरात दोन ओळी लिहिणे.

असंच.. कितीही ... काहीही..

या अक्षरशः एका मिनिटाच्या व्रताने पुढे काय बदल होऊ शकेल हे प्रत्यक्ष अनुभवानेच समजून घ्या. रोज दिवसभरात कधीही एकदा तो एक मिनिट ते ठरवलेलं काम करायचंय.

21 दिवसात साधारण सवय लागते... त्यामुळे संकल्प 21 दिवसांचाच करा. 

काय आहे वन मिनिट प्रिसिंपल?

 Kaizen 

जपान मध्ये kaizen चा शोध लागला आणि मानवी आयुष्याला जबरदस्त कलाटणी मिळाली. Kai म्हणजे बदल आणि झेन म्हणजे शहाणपणा.

 (Change +Wisdom).

आयुष्याला आकार देणा-या या जादूच्या तंत्राचा उपयोग करून आपण आपले जगणे आणखी सोपे आणि सहज करू शकतो. वेळेच्या नियोजनात आजवर शिकलेल्या सर्व युक्त्यांपेक्षा अतिशय सोपी युक्ती म्हणजे, *‘वन मिनिट प्रिन्सिपल ’

Masaaki Imai यांनी 'वन मिनिट प्रिन्सिपल’ चा शोध लावला आणि आज जपान या तंत्राचा अवलंब करत यशाची शिखरे गाठणारा देश ठरला आहे. आपण वेळेच्या नियोजनात अपयशी ठरतो त्याचे कारण सातत्य ठेवण्यात कमी पडतो. त्यामुळे अपराधी भाव येतो तो वाढत वाढत आत्मग्लानीचं रूप घेतो, आपण काही करू शकत नाही आपल्यात जिद्द नाही, आपण एखादे काम करण्यास लायक नाही अशी नकारात्मकता आपल्याला ग्रासून टाकते. अशा वेळी एखाद्या जादूसारखी ती टेक्निक काम करते. मला एका मिनिटात वेळेचे नियोजन शिकवा म्हटले तर मी हा नियम शिकवेन. काय आहे सूत्र? तर सवयी किंवा आयुष्यातला बदल हा अचानक होत नसून तो सावकाश पण नियोजनपूर्वक शहाणपणाने करायला हवा, सातत्य आणि सराव यासाठी नियमित योजना असते. आत्मविश्वास देणारा हा नियम म्हणजे 60 सेकंद दररोज एखाद्या ध्येयासाठी वापरा. आपल्याला हसू येईल, विश्वास बसणार नाही पण दररोज एक मिनिट हा चमत्कारासारखे रिझल्ट देतो. काय आहे नियम तर...

 *Every day 

 At the same time 

 Just for a minute* 

दररोज ठराविक वेळी फक्त एक मिनिट कोणतेही ध्येयाशी संबंधित एखादे काम पूर्ण करायचे असेल तर व्रत घेतल्यासारखे ते करायचे हे यशाचे सूत्र आपण जाणतो. पण त्यासाठी एकदम दोन तास, एक तास अशा तासांच्या भाषेत हट्टीपणा करतो आणि मन बंड पुकारते कधीकधी परिस्थितीची साथ नसते. अशा वेळी एक मिनिट फक्त एक मिनिट करायचे आहे हे ठरवताच हसत हसत आपण तयार होतो. मनाची साथ मिळते आणि तेवढा वेळ सहज काढू शकू असा आत्मविश्वास तयार होतो. आता कामाला कृतीला सुरुवात करायची. एक मिनिट काम करायचे आणि अक्षरश: बाजूला ठेवून द्यायचे. दुस-या दिवशी परत तेच. गंजलेल्या चाकाला रोज एकदा फिरवायचे, बंद पडलेल्या गाडीला रोज एकदा फक्त सुरु करायची, रोज एक पान वाचायचे, रोज पाच ओळी लिहायच्या, रोज एक श्लोक वाचायचा, रोज एक काहीही छोटेसे..

जमेल? सोप्पय हो नक्कीच!

एकदा मोमेंटम गती मिळाली की ते काम झपाट्याने पूर्ण होईल. हा प्रयोग करून तर पहा, अनुभव घ्या.

===================================================


🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

माणूस किती किंमतीचे कपडे

वापरतो यावरून त्याची किंमत

होत नसते ,

🍒

परंतु , तो इतरांची किती किंमत

करतो यावरून त्याची किंमत

ठरत असते .

🍒


🐧पक्षी जेंव्हा जिवंत असतो तेंव्हा तो 🐞किड्या 🐜मुंग्याना खातो पण जेंव्हा पक्षी मरण पावतो तेंव्हा तेच कीड़े मुंग्या त्या पक्षाला खातात. 

वेळ आणि स्थिती केंव्हाही बदलू शकते.

कोणाचा 😏अपमानही करू नका आणि कोणाला 😇कमी लेखु नका. 

👉तुम्ही खुप शक्तिशाली असाल पण वेळ ही तुमच्या पेक्षाही शक्तिशाली आहे. 

🌳एका झाडापासून लाखो माचीसच्या काड्या बनवता येतात पण एक माचीसची काडी लाखो झाडे 🔥जाळून खाक करू शकते.

कोणी कितीही महान झाला असेल पण निसर्ग कोणाला कधीच महान बनन्याचा क्षण देत नाही.

🌅✨कंठ दिला कोकीळेला पण रूप काढून घेतले.

🌄✨ रूप दिले मोराला पण ईच्छा काढून घेतली.

🌇✨ ईच्छा दिली मानवाला पण संतोष काढून घेतला.

🏕✨ दिला संतोष संतांना पण संसार काढून घेतला.

👏 हे मानवा.... कधी करू नको अहंकार स्वतःवर तुझ्या माझ्या सारख्या किती जणाना मातीतून घडवल आणि मातीतच घातल.

🍀🍀🍀

लग्नाच्या वरातीत लोकं पुढे नाचत असतात, तर अंत्ययात्रेला मागुन चालत असतात.🌿

याचाच अर्थ असा की लोकं सुखात पुढेपुढे नाचत असतात आणि दुःखात मागुन चालत असतात.

लोक त्यांच्या रितीने पुढेमागे होतच असतात. त्यामुळे लोकं आपल्या पुढे असली काय किंवा मागे असली काय, आपलं जीवन आपण आपल्या हिमतीवर व निश्चयानेच जगायच असत..💐


🎄थोडस महत्वाचं__🌿


1)🌅 अन्य जाती-धर्मांवर टिका 

     करत वेळ वाया घालवू नका.

     जे चांगलं असेल त्या गोष्टी 

     आत्मसात करा.💮


2)🌅 दंगली- मारामारी करुण आपलं 

     नाव खराब करुण घेऊ नका.

     आता लढाईचा काळ 

     राहिलेला नाही.💮


3)🌄 उच्च शिक्षण तुम्हाला आणि 

    तुमच्या पुढच्या पिढीला चांगलं

    जीवन देऊ शकतं.💮


4) 💐राजकीय पक्षांचे झेंडे उचलून 

    गुलामी करू नका.


5) 💪आजचा तरुण एकमेकांना मदत

    करुण प्रगती करू शकतो.

    त्यासाठी राजकीय पक्षाची  वा 

     नेत्याची गरज नाही.💮


6)👬 मंदिरात दान करण्याऐवजी 

    गरीब आणि गरजू तरुणांना 

    मदत करा. ते तुम्हालाही कधीतरी 

    मदत करतीलच.💮


7) 🙏चार दिवस सुट्टी काढून कुटुंबा  सोबत प्रेक्षनीयस्थळी जरुर फिरा पण त्यातला कही वेळ 

    समाजाच्या प्रगतीसाठी द्या 

    समाजही तुम्हाला कधीतरी 

    मदत नक्कीच करेल.💮


8) 👆इंग्लिश बोलायला शिका.

     हा मराठीचा किंवा हिंदीचा अपमान नाही  काळाची गरज  आहे.💮


9) 💪व्यायाम, योग, मैडिटेशन करीता स्वतःसाठी दिवसातून तास भर वेळ द्या. 💮


🌅🌳🎄"जगाला काय आवडतं ते करु नका,

तुम्हाला जे वाटतं ते करा, 

कदाचित उदया, तुमच वाटणं जगाची "आवड" बनेल.                💐💐💐💐मला आवडला म्हणून पाठवला 

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++



++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++


-------

सही

---------


हस्ताक्षर यावरून मानवी मनाचा कल आणि  काही संकेत ;


जे लोक बहुतांशी नोकरी करतात किंवा नोकरीतल्या माणसाची मानसिकता जपतात त्यांच्या सह्या ह्या पसरत्या flat  असतात!


जे लोक महत्वाकांशी असतात त्यांच्या सहीला नेहमी ३०-४५ degree चा angle असतो, त्यांना स्वतःला महत्व नेहमी घ्यावेसे वाटते!


जे लोक पारंपारिक पद्धतीचा वडिलोपार्जित व्यवसाय करतात बहुतांशी त्यांची सहीला angle कमी असतो!


शिक्षकी पेशा मधील लोक सहीखाली बहुतांशी आडवी रेष न चुकता मारतात, स्वतःचे व्यक्तिमत्व दर्शविण्यासाठी!


जे लोक लांबलचक सही करतात त्यांना मुळ मुद्यावर यायला जरा वेळच लागतो!


सहीखालील वक्र रेष हि त्या व्यक्तीच्या कला रसिकतेचे प्रतिक असते !


सहीच्या खाली पण सही संपल्यावर असलेले टिंब व्यक्तीचा जनसंपर्क आणि मिश्कील वृत्ती दर्शविते !


सहीच्या खाली रेष न मारणाऱ्या व्यक्ती ना स्वतःला फारसे महत्व घेणे आवडत नाही , त्यांच्या मध्ये तुलनेने आत्मविश्वास हि कमी जाणवतो इतरांपेक्षा!


जे वडिलांच्या छत्रछायेखाली पारंपारिक व्यवसाय करतात आणि वडिलांचा मन ठेवतात , त्यांच्या सही मध्ये स्वतःचे initial हे वडिलांच्या initial मध्ये झाकले जाते!


जे लोक स्वताची सही खालील आडवी रेष ओढताना कापतात, ते स्वतः स्वतःच्या मार्गात अडचण  असतात!


थोडक्यात ज्यांची सही वाचता येते तेवढे ते ओळखायला सोपे, जेवढी कठीण तेवढे ओळखायला कठीण !

----------------------------------------------

मुळाक्षरे आणि आपला स्वभाव ;

-----------------------------------------------


१] ज्यांचे अक्षर बारीक

 त्यांच्या विचारात बारकावा,दूर दृष्टी , नियोजन कौशल्य


२] अति बारीक अक्षर

चिकित्सक वृत्ती, निर्णयास विलंब

 

३] मोठे अक्षर ;

 तडजोड वृत्ती , नजीकचा विचार अधिक ,साधेपणा 


४] वेढब अक्षर-

 समयसूचकता नसणे,सामान्य बुद्धिमत्ता 


५] गोलाई अक्षर ;

 गोडपणा ,लाघवी पणा ,मधुर वाणी 


६] अक्षरावरील रेघ;

मनावरील ताबा , पण दुसर्यावर अवलंबून राहणे


७] अक्षरावर रेषा नसणे ;

 स्वतंत्र विचारशैली 


८] खाडाखोड असलेली अक्षरे-

 मनाची अस्थिरता 


९]पुसट अक्षर;

 निराशावाद 


१०]गाठीयुक्त अक्षर;

 निर्णयात ठामपणा


११] मुळाक्षर गडद असणे ;

 जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टीकोन 

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++


एका शून्यातून तयार झालेला हिरो - # बोमन_इराणी!..

मित्रांनो,

बोमन इराणी तुम्हाला आवडतो का?

मुन्नाभाई एम बी बी एस मधला डॉ.रस्तोगी,

थ्री इडियट्स मधला इंजिनीअरींग कॉलेजचा प्रिंसिपल, विरु सहस्त्रबुद्धे उर्फ व्हायरस,

आणि अशाच अनेक विविधरंगी भुमिकांमुळे बोमन आज एक लोकप्रिय अभिनेता आहे. 

पण बोमनचा एक विनोदी अभिनेता बनण्यापर्यंतचा प्रवास सोपा होता का?

बोमनचा जन्म मुंबईतल्या एका पारशी घरात झाला, 

बोमन जन्मण्याच्या सहा महिने आधीच बोमनच्या वडीलांचे निधन झाले,

बोमनला तीन बहिणी होत्या, दोन मावश्या, आणि एक आत्या होती, 

सतत सर्व स्त्रियांच्या सहवासात राहील्यामुळे लहानग्या बोमनचाही स्वभाव काळजी करणारा आणि भित्रा झाला,

त्याला डिस्लेक्सिया नावाचा रोग होता, शाळेत, अभ्यासात बोमन अतिशय मंद होता,

बोलताना तो तोतरे बोलायचा, त्यामुळे त्याचे मित्र त्याची मस्करी उडवायचे,

न्युनगंडामुळे बोमन इराणी स्वतःला अपयशी मानु लागला होता, त्याने स्वतःसाठी कसलीही मोठी स्वप्ने पाहिली नाहीत, 

त्याचे मित्र डॉक्टर, इंजिनीअर आणि सी.ए. झाले, मात्र बोमन कधीच काही मोठे मिळवण्यासाठी स्वतःला पात्र समजायचा नाही. 

बोमनने स्वतःसाठी वेटरचा जॉब निवडला,

बोमनची आई कुटूंबाची उपजीविका चालवण्यासाठी फरसाण, फाफडा वगैरे तयार करुन पदार्थ विकायची, 

बोमनचे ग्रॅंट रोडवर फरसाण विक्री करायचे आठ बाय आठ फुटाचे एक छोटेशे टपरीवजा दुकान होते,

वयाच्या बत्तीस तेहतीस वर्षांपर्यंत बोमन इराणी त्या दुकानातुन जेमतेम उत्पन्न कमवायचा,

ग्रॅंट रोड हा मुंबईचा एक रेड लाईट एरीया आहे, सगळी रफ पब्लिक दुकानात यायची,

ह्या सगळ्या परिस्थितीची बोमनला चीड आली,

बोमनने साईड बिजनेस म्हणुन फोटोग्राफी सुरु केली,

१९९०-९२ तो काळ असेल,

बोमन क्रिकेट, फुटबॉल खेळणाऱ्या मुलांचे छान छान फोटो काढायचा,

वीस-वीस रुपयांना ते फोटो त्या मुलांच्या आईवडीलांना विकायचा,

अशा प्रकारे काही रुपये त्याने जमा केले,

लग्नानंतर सात वर्षांनी आपल्या बायको मुलांना घेऊन उटी फिरायला गेला,

जमलेली बचत फार मोठी नव्हती, म्हणुन एक बजेटमधले हॉटेल त्याने बुक केले,

पण ते हॉटेल अतिशय निकृष्ट दर्जाचे निघाले,

एखाद्या भुतबंगल्याप्रमाणे असलेल्या त्या हॉटेलात अत्यंत भीतीदायक वातावरण होते,

हॉटेलच्या खोलीत फक्त एकच झिरोचा बल्ब होता,

बोमन म्हणतो, तो झिरो लाईट पाहुन मला स्वतःचीच, माझ्या गरिबीचीच जबरद्स्त चीड आली,

“आयुष्यात पुन्हा कधी अशी ‘झिरो लाईट मोमोंट’ येऊ नये म्हणुन मी संपुर्ण जीवनभर मी झोकुन देऊन मेहनत करेन असा मी चंग बांधला,”

पुढे ह्या झिरो लाईटने बोमनचे आयुष्यच बदलावुन टाकले, 

बोमन इराणीला मुंबईत होणाऱ्या बॉक्सिंग ऑलिंपिकबद्द्ल माहिती मिळाली,

तो ऑलिंपीक च्या ऑफिसमध्ये गेला, व त्याने बॉक्सिंगचे फोटो काढण्याची परवानगी मागितली,

पण तिथल्या डायरेक्टरने ती धुडकावुन लावली,

बोमनने अनेक अर्ज विनंत्या केल्या, आर्जवे केली,

मी फ्रिमध्ये काम करीन असे सांगितले, 

तेव्हा तो खडुस डायरेक्टर थोडासा नरमला, 

आणि सध्या राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धा चालु आहेत, त्याचे फोटो काढुन आण, 

तुझ्यातली गुणवत्ता बघुन तुला काम देऊ असे सांगितले,

बोमन कंबर कसुन कामाला लागला,

पुढचे सहा महिने बोमनने प्रचंड मेहनत घेतली,

कसेही करुन त्याला हे कॉन्ट्रॅक्ट मिळवायचेच होते,

ह्या एकाच विचाराने त्याला पुर्ण झपाटले होते,

उठता-बसता, खाता पिता, त्याला फक्त आणि फक्त बॉक्सिंगचे फोटोच दिसायचे,

माझं काम आणखी उत्कृष्ट कसे होईल, हा एकच विचार त्याच्या डोक्यात असायचा,

तो कॅमेरा गळ्यात घेऊन आठ आठ - दहा दहा तास बॉक्सिंगच्या मॅचेस च्या ठिकाणी तळ ठोकुन बसायचा,

त्यादरम्यान त्याने अप्रतिम फोटोग्राफ्स शुट केले,

सगळे फोटोग्राफर फक्त व्यवसाय आणि कामाचा भाग म्हणुन फोटो काढायचे,

बोमन मात्र पॅशनेट होता, 

शेवटी जागतिक बॉक्सिंग ऑलिंपिकचा ऑफिशीयल फोटोग्राफर म्हणुन बोमनचीच निवड झाली,

अमेरीकेतल्या मॅनेजरची बोमनने अपॉईंटमेंट घेतली,

त्याने बोमनला तीन फोटो काढायची ऑर्डर दिली,

 एक अमेरीकन बॉक्सर समोरच्या मुष्ठियोद्ध्याला एक जोरदार पंच मारेल तेव्हाचा,

एक समोरचा बॉक्सर जमिनीवर पडलेला असताना, अमेरीकन बॉक्सर उन्मादाने उड्या मारतानाचा,

आणि तिसरा,

सामना जिंकल्यानंतर अमेरीकन बॉक्सरचा हात उंचवताना,

ह्या प्रत्येक फोटोबद्द्ल बोमनला तीनशे डॉलर्स मिळणार होते,

बोमन जोमाने कामाला लागला,

इथपर्यंत पोहोचण्यासाठी मागचे सहा-आठ महिने त्याने प्रचंड मेहनत केली होती,

आता यश अगदी दृष्टीपथात होते,

त्याने रिंगच्या बाजुचा एक योग्य कोपरा निवडला,

सामना सुरु झाला, पण बोमनचे नशीब त्याच्यावर जणु रुसले होते, 

बोमनचे ग्रह काही ठिक नव्हते की काय माहित पण त्या दिवशी अमेरीकन बॉक्सर सपाटुन मार खात होता,

तीनपैकी एकाही फोटोची शक्यता दिसत नव्हती,

बोमनचे स्वप्न जमिनदोस्त होण्याच्या मार्गावर होते,

त्याची मेहनत पाण्यात चाललेली त्याला दिसत होती,

हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाताना जे तीव्र दुःख होते, अगदी तसेच दुःख त्याच्या मनात साठुन आले होते,

त्याच्या डोळ्यात पाणी तरळले, उर भरुन आला,

एकेक ठोसा अमेरीकन बॉक्सर खात होता, पण त्याच्यापेक्षा कितीतरी मोठे दुःख बोमनला होत होते,

बोमनने स्वतःला समजावले,

"मी आणखी मेहनत करीन, एके दिवशी नियतीला माझी नक्की दया येईल,”

आणि त्याची आर्त प्रार्थना ब्रम्हांडापर्यंत जाऊन पोहोचली,

चमत्कार घडावा असे काही रिंगमध्ये घडले,

पंचेचाळीस मिनीटे मार खाणारा अमेरीकन बॉक्सर त्वेषाने उठला,

त्याने समोरच्या बलाढ्य मुष्टियोद्धयाला एक जोरदार तडाखेबाज पंच मारला, 

बोमनने तो क्षण अचुक टिपला, 

समोरचा बॉक्सर खाली पडला, बोमनने दुसरा क्लिक केला,

आणि अमेरीकन बॉक्सर विजेता झाला, बोमनने तिसरा क्लिक केला,

त्या बॉक्सरला झाला नसेल तितका आनंद बोमनला झाला,

त्याने तात्काळ धावत पळत स्कुटरवरुन आधी फोटो डेव्हलपिंगची लॅब गाठली, मग टेलिफोन ऑफीसला पोहोचला,

तिथुन त्याने अमेरीकेला फोटोज स्कॅन करुन पाठवले.

पण रात्रीचे दोन वाजले तरी फोटो अमेरीकेला पोहोचले नाहीत, असा फोन आला,

दुसऱ्या दिवशी बोमन पुन्हां टेलीफोन ऑफीसला पोहोचला,

ती मशिन मुख्यमंत्र्याच्या कार्यक्रमासाठी पॅक करुन नेण्यात येणार आहे, असे त्याला सांगण्यात आले,

बोमन खवळला, त्याने तिथे प्रचंड आरडाओरडा केला,

सरकारी यंत्रणेच्या अशा भोंगळ कारभारामुळे भारताचे नाक कापले जाईल, असे त्याने ऑफीसरला ठासुन सांगितले,

त्याच्या ह्या हृदयापासुन केलेल्या युक्तिवादाचा परिणाम झाला,

आणि पॅक केलेली मशिन उघडण्यात आली,

फोटो अमेरीकेला पाठवले गेले,

बोमनला नऊशे डॉलर्सची रॉयल्टी मिळाली,

त्याला लगेच पुढची टुर्नामेंट कव्हर करण्यासाठी चेन्नईला पाठवण्यात आले,

बोमन स्वखुशीने गेला,

त्याने आपल्या लाघवी, विनोदी, निरागस स्वभावाने जिथे जाईल तिथे मित्र जोडले, लोकांना जिंकुन घेतले,

त्याचा फोटो स्टुडीओ मुंबईत एक टॉपचा फोटो स्टुडीओ म्हणुन ओळखला जाऊ लागला,

एके दिवशी फोटोसेशन करण्यासाठी बोमनच्या स्टुडीओत सुप्रसिद्ध कोरीओग्राफर शामक दावर आला,

शामकने बोमनला नाटकात काम करशील कां? असे विचारले,

व त्याची भेट प्रसिद्ध नाटककार अल्काझी पद्मसी यांच्यासोबत करुन दिली,

बोमन साशंक होता,

अल्काझींनी तर बोमनला पाहिल्याबरोबर नाकारले,

पण शामक दावर आपल्या मागणीवर अडुन राहीला,

अल्काझींना त्याने बोमनला घ्या, नाहीतर मी नाटक सोडुन देईन अशी धमकीच दिली,

बोमनला आपल्या पहिल्या नाटकात एका वेश्येच्या दलालाचा एक छोटासा रोल मिळाला,

बोमनने त्याचेही सोने केले,

पुढची पाच सात वर्ष बोमनने नाटकाचे मैदान गाजवले,

अनेक उत्तमोत्तम भुमिका केल्या,

एकदा त्याचे नाटक विधु विनोद चोप्राने पाहिले, आणि त्याला चित्रपटात काम करण्याविषयी विचारले,

बोमन त्यासाठी तयार नव्हता,

पण राजु हिराणी हा चोप्रांचा असिस्टंट बोमनच्या स्टुडीओत आला,

पंधरा मिनीटांसाठी ठरलेली ही भेट पुढचे आठ तास कशी चालली, हे दोघांनाही कळले नाही,

बोमनने स्वतःला राजुच्या हातात स्वाधीन केले,

आणि मुन्नाभाईमधले मामु नावाचे पात्र अवतरले,

ह्यावेळी बोमन पंचेचाळीस वर्षांचा होता,

त्यासाठी बोमनला त्यावर्षीचे बेस्ट कॉमेडी फिल्मफेअर अवॉर्ड मिळाले,

पुढे काही वर्षांनी थ्री ईडीयट्स मध्ये बोमनने तोंडातल्या तोंडात बोलणाऱ्या व्हायरस उर्फ सहस्त्रबुद्धेची भुमिका केली 

त्यासाठी त्याने आपली लहानपणीची तोतरे बोलण्याची खास लकब वापरली, 

मित्रांनो,

एक मंदबुद्धी, तोतरा बोलणारा, दहा एक वर्ष वेटरची कामे करुन, वयाच्या तेहतीसाव्या वर्षी फरसाणची टपरी चालवणारा एक माणुस वयाच्या पंचेचाळीसाव्या वर्षी चित्रपटात डेब्यु करतो काय,

आणि साठाव्या वर्षापर्यंत एंशी हुन अधिक चित्रपट काय करतो?  

सगळेच थक्क करुन टाकणारे आहे,

बोमन म्हणतो,

उटीच्या हॉटेलात आलेल्या झिरो लाईट मोमेंटमुळेच माझ्या हृदयात आग लागली, आणि त्यामुळेच मी इथवर पोहचु शकलो आहे,


मित्रांनो, 

जेव्हा केव्हा आयुष्यात , व्यवसायात, कुटुंबात  कसली संकटे येतील तेव्हा बोमन इराणीला आठवा...त्याच्या आयुष्यात आलेल्या संकटांना आठवा, त्याच्या झिरो लाईट फिलॉसॉफीला आठवा...संकटावर मात करण्याची कितीतरी पट जास्त उर्जा तुम्हाला मिळेल.....किती ही संकटे आली तरी घाबरु नका, धैर्याने तोंड द्या.......

लेखक - पंकज कोटलवार

************************************************************


दूधाला दुःख दिले की दही बनते... 

दह्याला दुखावले की ताक बनते... 

ताकाला त्रास दिला तर लोणी बनते आणि लोण्याला लोळवले तर तूप बनते....


दुधापेक्षा दही महाग...

दह्यापेक्षा ताक महाग...

ताकापेक्षा लोणी महाग...

लोण्यापेक्षा तूप महाग...


परंतु या सर्वांचा रंग एकच, शुभ्र! याचाच अर्थ पुन्हा पुन्हा संकटे आणि दुःख झेलुनही जो माणुस आपला रंग बदलत नाही, अश्या माणसाची समाजातील किंमत जास्त असते. 


दूध उपयोगी आहे पण एक दिवसात नासते...

दूधाचे विरजण दही, दोन दिवस टिकेल...

दह्याच्या घुसळलेल्या ताकाचे दिवस तीन...

ताकामधले लोणी आठवडाभर राहील...


पण लोण्याचे कढवलेले तूप मात्र कधीही खराब होत नाही. आता बघा आहे की नाही गंमत, एका दिवसातच नासण्याऱ्या दूधात कधीही न नासणारे तूप लपले आहे...! 


तसेच आपले मन अथांग आहे.  त्यात सकारात्मक विचार घालून नीट मंथन करा...! 


चिंतन करा, मनन करा आणि आपले जीवन तावुन सुलाखून त्यातुनच बाहेर पडलेले, म्हणजे कधीही न हरणारे आपले स्वत:चे एक सदाबहार व दिलखुलास व्यक्तीमत्व असू द्या.

💐💐🌹🌹🙏🌹🌹💐💐


'हार मी मानणार नाही...!'

________


          कितीही संकटं आली तरी, आयुष्यात मी हार कधी मानणार नाही. याउलट‌ या वादळरूपी संकटांचा सामना करून, ही आयुष्याची स्पर्धा जिंकेन हा आत्मविश्वास ठेवून आजच्या या 'कोरोना' नामक महारोगाशी आपण सर्वांनीच सामना करायला हवा.


         हे वादळ आहे आणि ते संपणार आहे, हा होकारार्थी विचार मनात ठेवून आपण सगळ्यांनीच कोरोनाशी दोन हात करायला हवेत. कोरोनाला हरवायचं असेल तर आपण आपल्यावर संयम राखायला हवा.असा विषाणू जो डोळ्यांना दिसतही नाही आणि आपल्यावर जीवघेणा हल्ला करू पाहत आहे. त्याचा नाकावाटे व तोंडावाटे, शिंकेतून बाहेर पडून प्रसार होत आहे. कोरोनावर यश मिळवायचं असेल तर आपल्याला आपल्या जीवनशैलीत‌ बदल करणे क्रमप्राप्त आहे. कोरोना नामक विषाणुचा फैलाव रोखण्यासाठी गर्दीत जाणं टाळणं, सरकारने घालून दिलेल्या नियम अटींचं पालन करणं, काळाची गरज आहे. 


          'मला काही होवू शकत नाही' हा अति आत्मविश्वास आपल्याला व समाजासाठी धोकादायक होवू शकतो. यासाठी अगदी अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडणे, मास्कचा वापर करणे, सामाजिक अंतर ठेवणे, हात साबणाने वा सँनेटायझर ने वारंवार धुणे हेच यावरील प्रतिबंधात्मक उपाय आहेत. सध्या लसीही यावर उपलब्ध असून सरकारच्या सूचनेनुसार त्या वेळोवेळी घेणंही तितकच गरजेच आहे. 


          सध्याची परस्थिती ही कोरोनाच्या उपद्रवामुळे फार गंभीर झाली आहे. याची लक्षणं साधी आहेत पण गंभीर आहेत. वेळेवर योग्य उपचार, वेळीवेळी डाँक्टरांच्या सुचनेनुसार टेस्ट करून घेणे गरजेचे आहे. हा आजार अंगावर न काढता आणि न घाबरता यावर त्वरित उपचार घेणे गरजेचे आहे. आपला कोरोना रिपोर्ट जरी पाँजिटीव्ह आला तरी, न घाबरता आपण यावर मात करू या विश्वासाने लढायला हवे. ही लढाई स्वत:ची स्वताशी आहे. आपल्यातल्या निर्भयतेची कसोटी आहे. आपल्यातल्या आतंरमनावर हल्ला करू पाहणा-या या कोरोनारूपी राक्षसाचा आपणच आत्मविश्वासाने संहार करायचा आहे. कोरोनाला न घाबरता, त्याविषयीची सगळे उपाय आमलात आणणे आज गरजेचे आहे. तरच या संकटावर आपण विजय मिळवू.


          कोरोना नामक महामारीत 'माणुसकी' नावाची गोष्ट जरी संपत असल्याचा भास होत असला तरी ती काही घटनांवरून जिवंत असल्याच चित्र दिसत आहे. आरोग्य कर्मचारी, सामाजिक संस्था, व्यक्ती आपल्यापरीने मदत करत आहेत, विचारपुस करत आहेत. आज माणसाला खरी गरज 'आधाराची' आहे. चार आपुलकीच्या शब्दांनी माणसात एक ऊर्जेचा संचार होतो. त्याचा विश्वास दुनावतो. आपल्याबरोबर कुणीतरी या संकटाच्यावेळी आहे ही भावना त्याला त्यांच्यावर ओढावलेल्या संकटावर मात करायला मदत करते. तेव्हा आपल्या व स्वकियांबरोबर समाजिक भावनेने दुरध्वनी ने का होईना संपर्क साधून विचारपूस नक्की करावी. 


       आजची परस्थिती जरी बिकट असली तरी आपण यावर नक्कीच संघटित होवून, ठाम निश्चयाने मात करू शकतो. या कोरोना लढ्यात कित्येक 'देवमाणसं' आज यासाठी झुंजत आहेत, स्वत: च्या प्राणाचाही विचार न करता आज कित्येक डाँक्टर्स, नर्सेस, आरोग्य कर्मचारी, पोलिसमित्र आणि अनगिनत देवमाणसं आज प्राण पणाला लावून कित्येकांची आयुष्य वाचवित आहेत. त्यांच्या या कार्याला सलाम. सलाम त्यांच्यातल्या माणुकीला ! आपणही याचा विचार करताना आज संयमाने, कर्तव्यनिष्ठपणाने वागलं पाहिजे आणि सर्व नियम अटींचे पालन केले पाहिजे. जर आपण सुरक्षित असू तर सर्व काही आहे. त्यासाठीच आपण आपल्या व इतरांच्या सुरक्षिततेबाबत निष्काळजीपणा करता कामा नये. आपली सुरक्षितता आपल्या हातात आहे तेव्हा चला एकजुटीने या कोरोनाचा नाश करूया...! कोरोनाला हारवूया, प्राण वाचवूया...!


@साहित्यिक धनंजय शंकर पाटील

ता.मंगळवेढा जि सोलापूर

मोबा. क्र. 8380916155



-----------------------------

               प्रतिसाद

-----------------------------

हॅरी नावाचा एक खुप प्रसिद्ध आणि यशस्वी गोल्फ प्लेअर होता. त्याने एक चॅम्पिअनशिप जिंकली, त्यात त्याला एक हजार डॉलर्सचे बक्षीस मिळाले.


आज विजेता झाल्यामुळे हॅरी खुशीत होता, गुणगुणत तो स्टेडिअममधुन बाहेर पडला आणि आपल्या कारच्या दिशेने चालत असताना एक महीला आपल्या चिमुकल्या बाळाला कडेवर घेऊन त्याच्या समोर येते.


तिच्या चेहर्‍यावर प्रचंड आगतिकतेचे भाव असतात, ती गरीब दिसणारी स्त्री, दिनवाणे, केविलवाणे भाव आणुन त्याला विणवते की ह्या मुलाला एक दुर्धर रोग आहे, आणि जर त्याचे उपचार झाले नाहीत, तर तो जास्त दिवस जगणार नाही, त्या मुलाच्या उपचारासाठी एक हजार डॉलर्सची आवश्यकता आहे.


हॅरीला त्या मुलाकडे पाहुन दया येते, आणि कर्तव्यभावनेने तो तिला एक हजार डॉलर्सच्या रकमेचा चेक देतो. बघता बघता ही गोष्ट सगळ्या शहरात पसरते.


हॅरीची एक महत्वाची मॅच असते आणि त्याच्या ओळखीचे लोक त्याला शुभेच्छा देण्यासाठी येतात. त्यातली त्याची एक ओळखीची व्यक्ती हॅरीला सांगते.


“हॅरी, तुला फसवलं गेलयं, मागच्या आठवड्यात, तु एका महिलेला एक हजार डॉलर्स देऊन फसला आहेस, तुला माहीतीये, मागच्या आठवड्यात शहरात कोणीही बाळ दगावलं नाही.”


हॅरीचा हसरा चेहरा अजुनच आनंदी झाला, “थेंक्स गॉड, मागच्या आठवड्यात शहरात कोणीही बाळ दगावलं नाही.” आणि हसत हसत हॅरी त्याच्या पुढच्या गोल्फ मॅचसाठी मैदानाकडे गेला.


गोष्ट संपली…….. 


मित्रांनो, तुम्ही आम्ही जर हॅरीच्या जागेवर असलो असतो तर आम्ही कसा प्रतिसाद दिला असता? मला फसवलं गेलं, ही भावना आपल्याला किती त्रास देऊन गेली असती? मला मुर्ख बनवुन, खोटं सांगुन, एक हजार डॉलर्स लुबाडले, म्हणुन आपण किती चिडलो असतो?


हॅरीने दिलेला प्रतिसाद किती वेगळा होता. “धन्यवाद देवा, मागच्या आठवड्यात, शहरात कोणतंही बाळ दगावलं नाही.”


हॅरीसारखं हसत हसत, पुढची मॅच खेळायला आपल्याला जमलं असतं का?


इथे मला असं अजिबात म्हणायचं नाही की आपण आपल्याला फसवणार्‍यांकडे दुर्लक्ष करावे, पण अचानक उद्भवलेल्या परिस्थीतीला आपण हसत हसत सामोरे जाऊ शकतो.


आयुष्यात रोज काहीनाकाही चांगल्या घटना घडत असतात, आणि वाईट ही घटना घडत असतात. आपण फोकस कशावर करतो, त्यावर आपल्या वाट्याला आनंद आणि दुःख येतं.


एक हजार डॉलर्सचा फटका बसल्याचं दुःख व्यक्त करायचं की मागच्या आठवड्यात शहरात एकही बाळ दगावलं नाही, म्हणुन आनंद व्यक्त करायचा, हे आपणचं ठरवायचं.


&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&

   🌼🌼सुखाशी मैत्री🌼🌼

चित्तवृत्तींचा निरास साधण्यासाठी अभ्यास व वैराग्याची आवश्यकता असते, हे आपण समजून घेतलं आहे. खरं सुख बाहेर नाही तर आपल्या अंतरंगातच असतं आणि तिथेच ते शोधावं लागतं, हेही आपल्याला माहिती आहे. भगवान पतंजलींनी सांगितलेल्या उपायांचा वापर करून शाश्वत सुख आणि प्रसन्नता कशी प्राप्त करून घ्यायची हे नीट समजून घेऊया. आपण जीवनाकडे कसे पाहतो, यावर आपले सुख आणि प्रसन्नता अवलंबून असते. म्हणून, सुखाकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा असावा हे समजून घ्यायला हवे. सुखाकडे मैत्रीच्या भावनेने पाहणे हा अतिशय योग्य दृष्टिकोन आहे. वरवर पाहता सुखाशी आणि सुखी माणसाशी मैत्री करणे सोपे वाटते, पण प्रत्यक्षात ते वाटते तेवढे सोपे नसते. तसेच, दुःखाशी आणि दुःखी माणसाशी मैत्री करणे कठीण वाटले तरीही प्रत्यक्षात ते तेवढे कठीण नसते. दुःखी माणसाचे दुःख पाहून त्याला मदत करताना आपला 'अहंकार थोडासा सुखावत' असल्यामुळे अशी मदत करणे सोपे असते. अपयशी माणसांचं सांत्वन करताना मनाच्या कोपऱ्यात आपल्याला मिळालेल्या यशाची 'सुखद जाणीव दडलेली असू शकते. यशस्वी माणसाचं अभिनंदन करणाऱ्या लोकांच्या चेहऱ्यावरून आनंद ओसंडून वाहताना दिसतो; पण बऱ्याच वेळा, त्यांच्या आनंदी चेहऱ्यामागे सूक्ष्म असूया आणि स्वतःच्या अपयशाचे दुःख दडलेले असते. सुखाशी आणि सुखी माणसाशी खरीखुरी मैत्री केल्यास मात्र असं होत नाही. दुसऱ्याच्या सुखाने सुखी होता आलं तर दोन्ही एकाच वेळी शक्य होते. सुखाशी मैत्री केल्याने हे साध्य होते.

⭕ डॉ. संप्रसाद विनोद⭕

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

तुमचे प्रयत्न तुम्हांला संपन्न बनवतील, तर तुमचा अनुभव तुम्हांला ज्ञानी बनवतील, आणि तुमची चिकाटी तुम्हांला यश मिळवून देईल.

लोग प्यार के लिये होते है, और चीजे इस्तेमाल के लिये । बात तो टॅब ही बिगडती है, जब चिजो को प्यार किया जाता है, और लोगों का इस्तेमाल ।


मान सन्मान हवी असणारी माणसे सलाम करणाऱ्याला जास्त पैसे देतात, आणि आशीर्वाद देणाऱ्याला चिल्लर देतात.

अपयश अनाथ असते, तर यशाला हजार नातेवाईक असतात.

अनुभवाचा वय आणि वेळेशी काहीही संबंध नसतो, संबंध असतो तो आलेल्या, ऐकलेल्या अनुभवांचा परिस्थितीनुसार सुयोग्य वापर करून सदैव प्रगती करणे.

न मिळालेल्या गोष्टींचा विचार करून दुःखी होण्यापेक्षा जे आपल्याकडे आहे, त्यात आनंदाने जगणे म्हणजे खरे जीवन जगणे होय.

किसीं इंसानके कुछ समयके बुरे व्यवहारकी वजहसे उसको हमेशा के लिये बुरा ना समझे, कभी कभी हालात बुरे होते है, इंसान नही ।

क्षेत्र कोणतेही असो, कष्टाला पर्याय नसतो, आणि कष्ट प्रामाणिक असले की यशालाही पर्याय रहात नाही.

Wisdom is not cheap, it costs ego, hatred, desire, solitude, and some really hard life lessons.

हजारों खोखले शब्दों से अच्छा वह एक शब्द है जो शांति लाये.*


***********************************************************

आस्था (Believe) आणि विश्वास (Trust)

एक छान गोष्ट वाचनात आली,खूप छान गोष्ट आहे. नक्की वाचा!!

एकदा एके ठिकाणी एका २५ मजली इमारतींच्या मध्ये एक तार बांधली होती. त्या तारेवरून एक कलाकार हातात बांबू घेऊन चालत होता. विशेष म्हणजे चालताना त्याच्या खांद्यावर एक लहान मूल होते. हजारो प्रेक्षक श्वास रोखून तो प्रकार पाहत होते. तो माणूस अगदी विश्वासाने,  घट्ट पावले रोवून, वाहत्या वाऱ्याला तोंड देत आपले व आपल्या मुलाचे आयुष्य पणाला लावत त्या माणसाने ते अंतर पार केले. 

संपूर्ण गर्दी आनंदाने नाचू लागली. टाळ्या, शिट्या आणि त्या माणसाच्या स्तुतीने आसमंत भरून गेले. सगळी गर्दी त्या कलाकाराचे फोटो काढत होती. ज्यांना संधी मिळेल ते सेल्फी काढत होते. काही लोक त्याच्याशी हात मिळवत होते. 

गर्दीतून वाट काढत तो माणूस पुढे आला. त्याने माईक हातात घेतला आणि तो गर्दीला उद्देशून म्हणाला की "तुम्हाला असे वाटते का की हे जे मी आत्ता केले ते परत करू शकेन का?" गर्दी जोरात ओरडली "हो नक्कीच तू हे परत करू शकशील" त्याने परत विचारले "तुम्हाला नक्की विश्वास आहे की मी हे करू शकेन?" परत गर्दीतून आवाज आले "हो नक्की आम्हाला तुझ्यावर विश्वास आहे तू हे कितीही वेळा करू शकशील"

कलाकाराने पुन्हा एकदा विचारले 

"मी पुन्हा एकदा विचारतो तुमचा नक्की पूर्ण विश्वास आहे ना? " गर्दी आता एकमुखाने ओरडू लागली "नक्की…नक्की…नक्की… करू शकशील"

कलाकार म्हणाला 

"ठीक आहे, कुणीतरी आपल्या मुलाला घेऊन या पुढे, मी त्या मुलाला खांद्यावर घेऊन चालणार आहे."

संपूर्ण गर्दी गप्प झाली, शांतता पसरली

कलाकार म्हणाला 

"काय झाले घाबरलात…? आत्ता तर तुम्ही ओरडत होतात की तुमचा माझ्यावर विश्वास आहे मी हे करू शकेन. खरे सांगायचे तर तुमची आस्था होती की मी हे करू शकेन पण तुमचा माझ्यावर विश्वास नव्हता. दोन्ही मध्ये खूप फरक आहे"

मित्रांनो मला हेच सांगायचे आहे देव आहे… ही आपली आस्था आहे पण आपला देवावर संपूर्ण विश्वास नाहीये

You Believe in God but you don't Trust him.

आणि जर देवावर पूर्ण विश्वास असेल तर मग चिंता, राग, द्वेष आणि तणाव का आहे…?   

################################################################

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

         🟠  मनाची अफाट शक्ती  🟠

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

लुईस या एक अमेरिकन महिला होत्या. त्यांच्या पूर्वायुष्यात वयाच्या ५-१५ वर्षांपर्यंत त्यांच्यावर भरपूर शारीरिक अत्याचार झाले. यामुळे त्यांचा जगाकडे बघण्याचा दृष्टिकोनच इतका नकारात्मक होता की, हे संपूर्ण जगच वाईट आहे. सर्व पुरुष हे घाणेरडेच असतात व मी जगायला लायक नाही. 

ख्रिश्चॅनिटीनुसार त्या ‘नन’ होतात व त्यांच्या धर्मातील आध्यात्मिक पुस्तके वाचत. पुढे वयाच्या ४० व्या वर्षी त्यांना कॅन्सर होतो. जेव्हा त्यांच्या हे लक्षात येते की, ज्यांनी हे कृत्य करायचं ते करून निघूनही गेले; त्यांच्या आयुष्यात काहीच फरक पडलेला नाही. त्रास (कॅन्सर) कोणाला झालाय तर मला. कारण इतकी वर्षं त्या सर्वांबद्दलच्या सर्व नकारात्मक भावना (राग, द्वेष, घृणा) मी धरून ठेवल्या आहेत. जर मला यातून बाहेर पडायचे असेल तर त्या सर्वांना माफ करणे खूप गरजेचे आहे. बरं ज्यांनी ते कृत्य केलं, ते माफ करण्यासारखं होतं का? तर आपल्या दृष्टीने नक्कीच नाही. पण ‘लुईस हे’ यांनी मनाची स्वच्छता केली. 

त्या सर्व व्यक्तींविषयी मनात असलेला सर्व राग बाहेर काढून त्या सर्वांना मनापासून माफ केले व कोणतेही ऑपरेशन (शस्त्रक्रिया) न करता त्या पूर्णपणे बऱ्या  झाल्या. पुढे ९० व्या वर्षापर्यंत जगभर लेक्चर देत फिरत होत्या.

त्यांनी एक सुंदर पुस्तक लिहिले आहे ‘यू कॅन हील युवर लाईफ’. त्या पुस्तकाच्या शेवटच्या काही पृष्ठांमध्ये तर त्यांनी एक तक्ता दिला आहे, ज्यामध्ये पहिल्या स्तंभामध्ये आजार, दुसऱ्या स्तंभामध्ये त्यामागील नकारात्मक भावना व तिसऱ्या स्तंभामध्ये कशाप्रकारे सकारात्मक विचार करा म्हणजे तो आजार बरा होईल असे दिले आहे. अगदी सर्दी खोकल्यापासून कॅन्सर पर्यंत सर्व आजारांच्या मागच्या नकारात्मक भावनांचा त्यामध्ये समावेश आहे. हा तक्ता आपल्या मनाची स्वच्छता करायला नक्कीच मार्गदर्शक ठरेल.

दुसरे उदाहरण ‘ब्रँडन बेज’ यांचे. त्यांना स्वत:ला फुटबॉलच्या आकाराचा ट्युमर पोटामध्ये होता.  बऱ्याच दिवसांपासून पोट सुटल्यासारखं वाटतंय म्हणून रूटिन चेकअपसाठी सोनोग्राफी केली, तेव्हा एवढा मोठा ट्युमर डॉक्टरांना दिसला. त्यांच्या गायनॅकॉलाजिस्ट (स्त्री रोग तज्ज्ञ) तर उडाल्याच. त्या म्हणाल्या, लगेच अ‍ॅडमिट होऊन उद्याच्या उद्या ऑपरेशन करून काढून टाकू. पण ब्रँडन बेज यांना मन, भावना व शरीराच्या संबंधांविषयी चांगली माहिती असल्याने त्या म्हणाल्या, "मला एक महिन्याची मुदत द्या. समजा काही उपयोग नाही झाला तर ऑपरेशन करा."

एक महिनाभर त्यांनी स्वत:च्या मनाची स्वच्छता केली व जुन्या अनावश्यक आठवणी खणून बाहेर काढल्या व टाकून दिल्या. त्याच्याशी निगडित लोकांना माफ केलं. महिनाभराने सोनोग्राफीत ट्युमरचा आकार निम्म्याने कमी झाला व पुढील तीन महिन्यांत सोनोग्राफी नॉर्मल आली. इतरांनाही याचा उपयोग व्हावा यासाठी त्यांनी 'The Journey' या नावाचे पुस्तक लिहिले आहे. तसेच ही पद्धत शिकवणारा तीन दिवसांचा कोर्सही सुरू केला आहे. त्या कोर्सचा अनेकांना खूपच उपयोग झाला.

तसेच आपल्या देशातील डॉ. दीपक चोप्रा हे एक प्रख्यात एन्डोक्रायनॉलॉजिस्ट आहेत व अमेरिकेतील एका प्रसिद्ध हॉस्पिटल मध्ये प्रमुख पदावर होते. ते म्हणायचे की, मी अगदी मनापासून कॅन्सरच्या गाठी मुळापासून कापतो, So ideally it should not recur. खरं म्हणजे ते पुन्हा होता कामा नये. पण तरीही recurrence का बरं होतो? 

जेव्हा त्यांनी याचा शोध घ्यायला सुरुवात केली तेव्हा त्यांच्या हे लक्षात आले की, जेव्हा आपल्याला एखादी जखम होते, तेव्हा मलम लावलं तर ती जखम लवकर बरी होते. पण समजा नाही लावलं तरीही ती जखम बरी होतेच. कोण बरं ही जखम बरी करतं? आपलंच शरीर.

जखमेच्या शेजारील mother cells पासून daughter cells तयार होतात व जखम भरून येते. सर्वसाधारणपणे आईचे जसे संस्कार, मानसिकता असेल तशीच मुलीची होते. आपल्या नकारात्मक भावना वेगवेगळ्या पेशींमध्ये साठवल्या जातात. त्यामुळे ट्युमर कापला तरी तिथे जी जखम होते, ती बरी करण्याचं काम तिथल्या mother cells करतात. 

पण त्यामध्ये जर नकारात्मक भावना साठवल्या असतील तर नवीन पेशी परत तशाच तयार होणार. त्यामुळे वर-वर फांद्या छाटून उपयोग नाही तर झाड मुळापासून काढायला हवं. हे जेव्हा त्यांच्या लक्षात आले तेव्हा त्यांनी medical practice बंद केली व आता ते पूर्णपणे cellular healing वर काम करतात. म्हणजेच प्रत्येक व्यक्तीला मनाची स्वच्छता करायला शिकवतात.

त्यामुळे जर आपण सर्वांनी स्वत:साठी रोजची १५ मिनिटे काढली व मनाची स्वच्छता केली तर आपण कमीत कमी आजारी पडू. बरं मनाची स्वच्छता करताना एखाद्या दिवशी खूपच छान व हलके वाटते पण दुसऱ्या दिवशी परत काहीतर घटना घडतात आणि ‘ये रे माझ्या मागल्या’ प्रमाणे मनात नकारात्मक विचार यायला लागतात. 

दारुड्या माणसाला तुम्ही कितीही समजवा की दारू पिणे वाईट आहे व त्याला ते पटते सुद्धा. पण दारूचे दुकान दिसल्यावर पाय बरोबर तिकडे वळतात. त्याचप्रमाणे आपण अगदी ठरवतो सुद्धा की, फक्त सकारात्मकच विचार करायचे. पण एक ठिणगी पुरेशी होते की, लगेच नकारात्मक विचारांची शृंखला सुरू होते. पण हे अगदी नैसर्गिक आहे. ज्याप्रमाणे घरातील धूळ रोज साफ करावी लागते, त्याचप्रमाणे मनाची स्वच्छताही रोज करणे आवश्यक आहे.

प्रयोग म्हणून करून तर पहा. मी जोपर्यंत स्वत: कोणती गोष्ट करून अनुभवून पहात नाही तोपर्यंत त्यावर विश्वास ठेवत नाही. तुम्हीही ठेवू नका. पण एकदा तुम्हाला अनुभव आला की, मला खात्री आहे की, रोज ज्याप्रमाणे आपण सकाळी उठल्यावर व रात्री झोपताना दात घासायला, अंघोळ करायला, हातपाय धुवायला विसरत नाही, त्याप्रमाणे एकदा तुम्हाला मनाची स्वच्छता करण्याची सवय लागली की, तुम्ही कधीच ही सवय सोडणार नाही.

सर्वांना निरामय आरोग्यासाठी हार्दिक शुभेच्छा!

आपण सर्व आरोग्यदायी जीवन जगत इतरांना प्रेरित कराल ही अभिलाषा !


~ ✍️ नरेंद्र धारणे ~

( मनशक्ती अभ्यासक )

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

 थोडं मनातलं  !!

आयुष्य खुप सुंदर आहे....

गरम गरम भुईमुगाच्या शेंगाची कढई समोर आणुन ठेवतो. कढईभोवती बसुन शेंगा फोडुन खायला सुरवात करतो. अशातच शेंगा फोडत असताना एखाद्या शेंगेतील शेंगदाणा हातातुन खाली पडतो आणि खालच्या टरफलांमध्ये गायब होतो.

आपण मग तो बोटाने शोधायला सुरवात करतो.अगदी अर्धा ते एक मिनिटाची ही क्रिया पण शेजारी कढईभर शेंगा असुनही त्या एका शेंगदाण्याला आपण शोधत बसतो, थोडेसे तरी वैतागतो. या नादात जवळ बसलेली व्यक्ती शेंगा जास्त संपवते. आयुष्याचे देखील असेच आहे का? पाटीभर आनंद शेजारी असुनही, आपण वाटीभर आनंदासाठी झुरतो. पाटीकडे लवकर कधी लक्ष जातच नाही आणि जेव्हा पाटीकडे वळतो तेव्हा ती रिकामी झाल्याचे दिसुन येते. 

आयुष्य खुप सुंदर आहे त्याला अनुभवत गेलेल्या क्षणासाठी झुरत बसण्यापेक्षा समोर असलेलं आयुष्य भरभरून जगा....

@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@


नातं !!

जेव्हा एखाद्या कठीण प्रसंगी "मी आहे ना" जेव्हा साद मिळते, तेव्हा ती एक अमृत संजीवनी असते... !! आपल्या आयुष्यात आलेली माणसं, ही काही उगाच जन्माला आलेली नसतात..!! प्रत्येक गोष्टीमागे काहीतर कारण असतं. 

कुणाशी तरी पूर्वाश्रमीचे काहीतरी ऋणानुबंध जुळलेले असतात..!नाहीतर  करोड लोकसंख्येच्या देशात नेमक्या याच व्यक्तींशी आपली ओळख का होते? याचे उत्तर कोणीही देऊ शकत नाही.

जी नाती तयार होतात, ती आपण जीवापाड जपावी..!! आपल्या जगण्यासाठी, ज्या प्राणवायूची गरज असते, तो प्राणवायू म्हणजे ही आपली माणसे...!

रक्ताच्या नात्यांना काही चॉईस नसतो, पण आपले पणाच्या नात्यात तसं नसतं. मनं जुळली की, आपलेपणाचे नातं आपोआपच तयार होते. आपण खूप वाईट परिस्थितीतून जात असताना, नात्यातील, मित्राचे किंवा मैत्रिणीचे "मी आहे ना..." एवढे शब्द संजीवनी सारखे काम करतात.अगदी प्रत्यक्ष नाही, पण अप्रत्यक्ष सोबत असणं, खूप सकारात्मक ऊर्जा देणारं असते !! 


          000000000000000000000000000000000000000000000

आयुष्यात... रिटेक नाही

-----------------------------------

विरहानं प्रेम वाढतं हे खरं असलं, तरी... ते प्रेम व्यक्त करायला पुन्हा भेटायची संधी जर मिळाली तरच अर्थ आहे ना ? पण विरहाचं रुपांतर वियोगातच झालं तर....???

नाती, माणसं असतात तोवर किती निष्काळजी आणि बेफिकीर असतो ना आपण! 

जेव्हा परतायच्या वाटाच बंद होतात, तेव्हा कळते त्याची किंमत. पण तोवर काळानं पान उलटलेलं असतं आणि ... आणि 

आपल्या हातात फक्त आठवणींच्या जखमांचं दान असते...

म्हणूनच, या जन्माचा प्रत्येक क्षण आसुसून जगायला हवा. पूर्णविरामाचा क्षण, कुणास ठाऊक कधी राहील उभा! 

सकाळी उठताना कंटाळा येतो तर मग करून बघा विचार, सगळ्यांच्याच नशिबात कुठे असा सूर्य कुणी बिचारा झोपेतच जगाचा निरोप घेतो ... मग बिछाना सोडून ताडकन उठावंसं वाटेल. आळसाला रामराम ठोकावासा वाटेल ... 

नोकरीवर जायचा कंटाळा आला तर जरूर आठवा ती बेरोजगारांची रांग ...

स्वयंपाकाचा कंटाळा आला तर आठवावी खपाटीला गेलेली पोटं ...

अभ्यासाचा कंटाळा आला तर डोळ्यासमोर आणावी ती अर्धनग्न कळकट मुलं, ज्यांना भीक मागण्यासाठी हात पसरावे लागतात सतत ... त्यांच्या हातात कुठून येणार पाटी? मिळत असून नाकारणारी, कंटाळणारी आपलीच कपाळकरंटी ... 

भूतकाळ माझा नाही. भविष्यावर अधिकार नाही. पण वर्तमानातला प्रत्येक क्षण फक्त माझ्यासाठीच आहे. म्हणून तर वर्तमानाला इंग्लिशमध्ये प्रेझेंट म्हणतात. हे प्रेझेंट, हे बक्षीस, आपण सर्वार्थानं उपभोगायला हवं. सजगतेनं जगायला हवं.

सुदृढ शरीराचा लाभ न घेता व्यसनाधीन होऊन छातीचं खोकं आणि किडनीची चाळणी करणारी मंडळी पाहिली की, अस्वस्थ व्हायला होतं. 

एकत्र कुटुंबाला भाऊबंदकीची किड लागते, तेव्हा वाईट वाटते. 

आपला सगळा राग मुलांवर काढणारे पालक दिसले की, विचारावंसं वाटतं, मुलं नसण्याचं दु:ख पदरी नाही, याचा आनंद मानायचा सोडून, असलेल्या सुखावर हात कसा उगारता तुम्ही ?

अरसिक नवरा किंवा बायको पाहिले की त्यांना लग्नासाठी झुरणारी मंडळी दाखवावीशी वाटतात... 

आई-वडिलांना दुखावणाऱ्यांना अनाथालयात न्यावंसं वाटतं. 

सतत रडवेला मुखडा घेऊन जगणाऱ्यांना हॉस्पिटलला व्हिजिट द्यायला पाठवावंसं वाटतं. 

जगण्याचा कंटाळा आलाय असं म्हणत, इतरांना कंटाळा आणणाऱ्यांना कॅन्सरशी झुंजणाऱ्या पेशंटना भेटवावसं वाटतं. 

श्रीमंतांच्या श्रीमंतीचा हेवा करत कुढणाऱ्यांना, इस्टेटीच्या वादावरून झालेला रक्तरंजित इतिहास वाचून दाखवावासा वाटतो. 

अपूर्ण इच्छांच्या पूर्ततेची हमी दशक्रिया विधीच्या वेळी देऊन पिंडाला कावळा शिवावा म्हणून प्रार्थना करण्यापेक्षा ती व्यक्ती जिवंत असतानाच तो आपलेपणा आणि विश्वास दिला गेला असेल तर ...?

शूटिंगमध्ये शॉट चांगला झाला नाही तर रिटेक करतात. म्हणजेच पुन्हा तोच सीन करतात. पण आयुष्यात असे रिटेक घेता येत नसतात. म्हणूनच प्रत्येक क्षणी वन टेक ओके व्हावा इतकं प्रसन्न जगलं तर ...?


खरंच आयुष्य 

किती सुंदर होईल .....!!

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

मनाचा आजार

मनुष्याला जितकी हाॅस्पिटलची गरज असते ना... तितकीच धार्मिक स्थळांची गरज असते. डाॅक्टर जसा देहाचा इलाज करू शकतो तसा मनाचा इलाज मनुष्याला स्वतःचा स्वतःला करावा लागतो. एकदा का हे तंत्र स्वतःला जमले की... मनाचे आजार लवकर बरे होतात.

काही आजार हे मनाचे असतात पण लोक त्याला 'कसेतरी वाटतंय' या सदरात नेऊन ठेवतात. कधीकधी डोकं सुन्न झालं की वाटतं डोकं दुखतंय तेव्हा महाशय दवाखान्यात जातात. डाॅक्टरला असे पेशंट खूप आवडतात. व्हिटॅमीनच्या दहा गोळ्या देतात आणि स्वतःची फी ५०० रुपये घेतात. या उलट कसेतरी होत असेल आणि ती व्यक्ती धार्मिक स्थळात जाऊन बसली तर मन शांत होऊन आराम मिळतो. 

समूहातील सहवासात मनुष्य स्वतःला सुरक्षित समजतो व तेथे त्याचे मन हलके होते. आपण आजूबाजूला पाहिलं तर असं लक्षात येईल की प्राणी स्वतःचा इलाज स्वतःच करतात. तसंच आहे धार्मिक स्थळात जाऊन मनुष्य प्रथम स्वतःला सावरून घेतो. काहीजण तणाव घालवायला मद्यालयात जातात तर ज्यांच्याकडे खूप पैसे आहेत ते लोक पर्यटनाला जातात. हवाबदल झाला तर मन स्थिर होतं. 

बीपी व हायपर टेंशन मनुष्याला इतर विकार आणण्यास मदत करतात. तुम्ही कोणत्याही डाॅक्टर कडे गेलात तर तो प्रथम तुमचे बीपी चेक करतो. बहुतांश आजारांचे मूळ कारणच मनात असलेल्या चढ उतार यावर अवलंबून आहेत. मनावर औषध असतं पण बऱ्याच वेळा पैशाचे सोंग नाही आणता येतं. आधार मिळाला तर बरेच प्राॅब्लेम परस्पर संपतात. धार्मिकता मनुष्याला वाट पहायला शिकवते. वेळ निघून गेली की सगळे जागेवर येते. 

वाईट काळ मनुष्याची परिक्षा घेतो. संयमाने परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी मन स्थिर असावे लागते. धार्मिक विधीतुन मन स्थिर करता येते. स्थिरता जमली नाही तर मन दुसरीकडे नक्कीच वळवता येते. मग धर्म कोणताही असो ....!! 

@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@


प्रतिपूर्ती

प्रतिपूर्ती  हा शब्द फारसा  परिचित नाही... पण कुठलं ही नाते टिकवायचे असेल, तर प्रतिपूर्ती किवा reciprocation आवश्यकच आहे.

'मी त्याच्या साठी  इतकं  केलं, त्याने काय केलं  माझ्यासाठी...?' ही अशी वाक्यं  आपण नेहमीच ऐकतो.... प्रतिपूर्ती किंवा reciprocation  चा अभाव हेच त्याचे खरे कारण...!

समाजात राहातांना, नाते संबंध जपतांना, एकमेकांसाठी काहीना काही, करावे लागते. त्या शिवाय नाती टिकू च शकत नाहीत... हे काहीतरी  करणे म्हणजेच प्रतिपूर्ती ... 

अर्थात  याचा अर्थ दर वेळेला कुठले  तरी काम करणे असे नसून , त्या व्यक्तीशी चांगलं वागणं, बोलणं, शब्दातून धीर देणं अश्या स्वरुपात ही असू शकतं... 

माणूस जसा जसा प्रगती करु लागला... तस तसा त्याच्यातील "मी" पणा वाढायला लागला... आपल्या माणसा चा वापर करुन घेणे सुद्धा त्याला कळले... 

समाजात धूर्त, कपटी माणसे आहेत तशीच साधी भोळी देव माणसे सुद्धा अजून आहेत.

अश्या लोकांचा मग पध्दतशीर पणे नात्यां मधे वापर होवू लागला...

गोड गोड बोलून आपली कामे साधण्या पुरता त्या व्यक्तीचा उपयोग केला जाऊ लागला.

नाती सांभाळायची, तर जाऊ द्या... विसरुंन जाऊ... ह्या शब्दांचा पद्धतशीर पणे वापर होऊ लागला. पण कुठेतरी, कधीतरी एक वेळ येतेच. त्या वेळी केलेल्या कामाच्या पोच पावतीची अपेक्षा केली जाते...

 "जाऊ दे" चा कधीतरी कंटाळा येतो... एकतर्फी नाती टिकवण्याचे अथक प्रयत्न  अखेर निष्फळच होतात, आणि एक ना एक दिवस नाती दुभंगतात. म्हणूनच नात्यांमधे प्रतिपूर्ती ला महत्व आहेच..

प्रतिपूर्ती ही प्रत्येक वेळी मोठमोठ्या gifts देऊनच होते असे नाही.

आपलेपणा, आत्मीयता या गोष्टीची किंमत करताच येत नसते. वृद्ध  सासू - सासऱ्यांची सेवा करणाऱ्या सुनेला "तू आमच्या साठी  खूप करतेस" असे म्हणणे / तिच्या सेवेची पावती देणे सुद्धा प्रतिपूर्तीच आहे...

म्हातारपणात कुठलीही शारिरिक मदत शक्य नसते. पण मुलाला आणि सुनेला, "आम्ही घरी थांबतो... तुम्ही दोघे निश्चिंत मनाने  बाहेर जा..." अशा आश्वासक शब्दाने सुद्धा प्रतिपूर्ती होत असते.

परदेशात राहणाऱ्या भावाने, भारतात रहाणार्‍या अणि वेळोवेळी आई वडीलांच्या मदतीला धाऊन जाणाऱ्या बहिणीला / भावाला ..." तू आहेस म्हणून  मला आई बाबांची काळजी नाही" हे म्हणणे म्हणजे एक प्रकारे प्रतिपूर्तीच आहे... 

सुखात आणि दुःखातही माणसाला आपल्या माणसाची गरज असतेच.

नाती टिकवणं ही जरी काळाची गरज असली, तरी, प्रतिपूर्तीचा अभाव असेल, तर नात्यां मधे तणाव निर्माण होतोच... 

एकतर्फी नाती कधीच टिकू शकत नाहीत. सहानभूती, आणि सांत्वनाचे  फक्त दोन शब्दही, दुःखाच्या काळात मनाच्या जखमेवर फुंकर घालुन जखम भरण्याचे काम करतात. 

ज्याला दुःखाच्या दिवसातील आपल्या माणसांचे महत्त्व  कळले... त्याला प्रतिपूर्ती कळली, असेच म्हणावे लागेल....!!


+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

सल..... आणि..... लस

            दोन अक्षरे, पण शब्द वेगळे. फक्त अक्षरांची जागा बदलली की हे दोन्ही शब्द तयार होतात. अक्षरे तीच पण मागेपुढे लिहिण्याने अर्थ बदलतो.

              सल म्हणजे एखादी गोष्ट मनात साठून तीची नकोशी असणारी जाणीव मनास सतत टोचत असते. ती काढून टाकायचा प्रयत्न असतो.

             आणि या उलट लस म्हणजे एखादी गोष्ट होऊनये म्हणून जाणीवपूर्वक शरीराला टोचून घेणे.

            टोचणे दोघातही असते. पण एक नकोसे असते. आणि दुसरी मात्र घेतली का? घेणार का? याची चौकशी होते.

          पहिल्याचे टोचणे मनाशी असते, तर दुसऱ्याचे शरीराशी. पहिल्याच्या आठवणीसाठी मन तयार नसते. किंवा आठवल्यावर दु:ख होते. तर दुसऱ्या टोचणीसाठी मन खंबीर झालेले असते. थोडक्यात पहिल्या टोचणीचे परिणाम मानसिकतेवर जास्त अवलंबून असतात. तर दुसऱ्या टोचणीचे परिणाम शरीरावर दिसतात.

           पहिले कोणत्याही परिस्थितीत लपवण्याचा प्रयत्न असतो. तर दुसऱ्याचे कौतुक करतो. (आजकाल तर काही वेळा त्यांचे फोटो देखील काढले जातात.)

              पहिल्याचा परिणाम मनावर आणि नंतर शरीरावर किती कालावधी पर्यंत राहिल हे सांगता येत नाही. पण तो लवकर संपावा याचा प्रयत्न असतो. बऱ्याचदा काळ हाच त्यावर उपाय असतो.

       दर दुसऱ्याचा परिणाम जास्तीत जास्त काळ टिकावा हि इच्छा असते. त्याला काळाचे बंधन नसावे असे वाटते.

            पहिल्या टोचणीचे कोणतेही निशाण दिसत नाही. पण बऱ्याचदा ते वागण्यावरून, किंवा चेहऱ्यावर जाणवते. या उलट दुसऱ्या टोचणीचे टोचून घेतल्याच्या काही खुणा जरी शरिरावर राहिल्या तरी त्यात काहीही गैर वाटत नाही.

               पहिल्या टोचणीने मनावर, शरीरावर काय? केव्हा? कसे? कुठे? परिणाम होतील यांचे भाकीत करता येत नाही. काही प्रमाणात त्या व्यक्तीला ते परिणाम अगोदर किंवा नंतर जाणवत असावेत.

              पण दुसऱ्या टोचणीचे परिणाम काय होऊ शकतात. आणि तसे झाल्यास काय करावे हे बऱ्याच प्रमाणात सांगता येऊ शकते.

         सल सगळ्यांच्या मनात असेलच असे नाही. तसेच लहान वयात ती असणे कठीणच (नसतेच, किंवा नकोच). आणि असली तरी तीची वेगवेगळी कारणे असू शकतात.

        लसीचे मात्र तसे नसते. ती एकाच हेतूने सगळ्यांना तेवढ्याच निर्वीकारपणे टोचली जाते. यावेळी वयाचे बंधन असू शकते. किंवा सगळ्यांसाठी गरजेची असते.


       पहिल्या बाबतीत हि टोचणी काही घटना घडल्यानंतर सुरू होते. दुसऱ्या बाबतीत मात्र घटना घडू नये म्हणून सावधानता बाळगण्यासाठी मिळेल त्या ठिकाणी जाऊन, प्रसंगी वाट पाहून, पैसे देऊन टोचून घेतली जाते.

              सल जी आपल्या मनात आपल्यासाठी असते. तर लस घ्यायला मात्र बऱ्याचदा जनजागृती, जाहिरात करावी लागते. सल आत्मकेंद्रित असते. तर लस देण्यासाठी बऱ्याच ठिकाणी केंद्रे उघडली जातात.


                अक्षरे दोनच. पण त्यांची जागा बदलली की शब्दाचा अर्थ बदलतो.....! 

स्वास्थ्यासाठी पहिल्या टोचणीचे जाणे, तर दुसरीचे टोचून घेणे गरजेचे असते.....!! 

*******************************************************

नाती ▪️ 

कधी तरी निवांत बसून आयुष्यात येऊन गेलेल्या आणि दुरावलेल्या नात्यांचा डोळसपणे अभ्यास केला की, लक्षात येतं... अनेकजण ज्यांनी "आपल्याला दुखावलं" म्हणून आपल्या आयुष्यातून आपण वजा केलं होत ते अनेकदा समर्थनीय नव्हतंच...

भावना दुखावल्या असं म्हणत आपण आपल्या अहंकाराला विनाकारण जोपासत बसलो आणि सोन्यासारखी माणसं आपल्या प्रतिक्षेला कंटाळून आपापल्या मार्गे निघूनही गेली. त्यांची एखादी कृती, चूक हा जणू काही जन्म-मरणाचा प्रश्न बनवून ती हकनाक आपल्या अहंकाराची बळी कधी झाली हे कळलंच नाही. नाजूक नात्यांना शेवटी अहंकार नाही, तर मायेच्या ओलाव्याचीच गरज असते.

आपण जसे जसे परिपक्व होत जातो तसं तसं लक्षात येतं की, भावना आणि अहंकार ह्यांच्यात असलेली सूक्ष्म रेषा योग्य वेळी जाणून वागायला हवं होत.... 

भावना क्षमाशील असते तर अहंकार मात्र एक घाव दोन तुकडे करून मोकळा होतो.

भावना दुखावली असं आपण म्हणतो तेव्हा खूप वेळा भावना नाही तर अहंकार दुखावलेला असतो. 

अगदी एखादी आनंदाची बातमी जरी कुणी आपल्याला नंतर दिली तरी त्याच दुःख म्हणून त्यांचं अभिनंदनही आपण केलेलं नसतं आणि हे अनेकदा घडतं....

जगणं म्हणजे फक्त श्वास घेणं नसतं तर त्या जगण्यालाही स्वतःच असं वेगळं रूप आणि अस्तित्व असतं.... 

कुणाचंच कुणावाचून काही अडत नाही, पण आयुष्यात आलेली चांगली माणसं जेव्हा गैरसमजुतींमुळे दुरावतात तेव्हा मात्र जर ती लोक आपल्या आयुष्यात राहिली असती तर जगणं अजून सुंदर आणि अर्थपूर्ण झालं असतं असं मात्र नक्कीच वाटून जातं.... 

क्षणभंगुर आयुष्याचे लाड करताना आपल्या जगण्याचा दर्जा आपण राखायला हवा आणि ह्यासाठीच ते जगणं सुसंस्कृत आणि अर्थपूर्ण बनवणाऱ्या चांगल्या माणसांची ओळख आणि जोपासना करणं आणि अहंकारामुळे त्यांना न गमावणे हे जाणीवपूर्वक आपण करावं असं मनापासून वाटतं...

बऱ्याचदा  तर समोरच्या वागण्याचा आपण आपल्या मतानुसार अर्थ काढतो, तसा विचारही समोरच्याचा नसतो, तो सहज आपलं म्हणून वागत असतो.. 

परंतु आपण चुकीचा अर्थ काढून समोरच्याला आयुष्यातून सहज काढून टाकतो.. आणि आपला अहंकार आपल्याला या गोष्टीची जाणीवही होऊ देत नाही..

म्हणून...... 

कुणाची कितीही मोठी चुक असली तरी ती आयुष्यापेक्षा व नात्यापेक्षा मोठी निश्चितच नसते !!

************************************************************


कौतुक

जगातला सर्वात चांगला गुण कौतुक हा होय, ज्या घरात एकमेकांचे कौतुक होते ते घर म्हणजे पृथ्वीवरील स्वर्गच आहे  जी नाती एकमेकांची कौतुक गातात तीच नाती सर्वोत्तम होय! 

जे मित्र आपले कौतुक करतात ते मित्र मित्र नसून निसर्गाने दिलेला परिस मित्र आहे, समाजात जेव्हा कौतुक होते तेव्हा समाज हा सुखाची बाग होऊन जाते, देश जेव्हा कौतुक करू लागते तेव्हा त्याचे जीवन अमृतमय होऊन जाते, याचे कारण त्याचे सर्वच संकल्प पूर्ण झालेले असतात पण जेव्हा जग कौतुक करते तेव्हा तो पूजनीय व वंदनीय होतो, कारण तो शाळेतील इतिहासात सहज प्रगट होतो !

सर्वात महत्वाचे सांगतो... जेव्हा संपूर्ण निसर्ग तुमचे कौतुक करीत असेल तेव्हा तो वक्ती... वक्ती राहत नसून निसर्ग पुत्र होऊन जाते. कौतुक करणे म्हणजे आपल्या अंतरंगातील भगवंताला जागृत होण्यास भाग पाडणे! 

कौतुक जेव्हा आई करते तेव्हा ती मुले आदर्श होतात, कौतुक जेव्हा शिक्षक करतात तेव्हा तो मुलगा ज्ञान हाच देव आहे अशा प्रकारे अभ्यास करतो, कौतुक जेव्हा मित्र करतात तेव्हा ते नकळत सांगत असतात हा माझा सर्वात बेस्ट मित्र आहे ,जेव्हा कवी कौतुक करतात तेव्हा समजून जायचे की आपल्यात वृक्षा सारखे गुण थोडे आहेत, पण सर्वात महत्वाचे आत्मज्ञानी गुरू जेव्हा कौतुक करतात तेव्हा समजून जायचे की या जन्माचे सार्थक होणार... आपले जीवन स्वयंप्रकाशित होणारच, जीवनात तर नित्य सुख दुःख येणारच हे कालचक्र आहे! 

पण कौतुक करा... कौतुक करा, तुम्ही नेहमीच पहा दररोज आपल्या 𝐖𝐡𝐚𝐭𝐬𝐀𝐩𝐩 वर किती सुंदर, सुंदर...मेसेज येतात तुम्ही आवडलेल्या सुंदर विचारांना दोन हात जोडलेत 𝐖𝐡𝐚𝐭𝐬𝐀𝐩𝐩 वरून याचा अर्थ असा होतो ते सुंदर विचार पटकन आपल्या हृदयात विराजमान होतात व आपले नित्य अंतरंग शुद्ध करतात! 

हीच तर ग्यानबाची मेख आहे हे गुपित सिक्रेट आहे कसे ते समजून सांगतो, जसे काही मेसेज ग्रुपवर येतात... हा मेसेज वाचून तुम्ही पुढे पाठविला नाही तर तुमचे नुकसान होईल व पाठवला तर तुम्हाला आनंदाची बातमी ऐकण्यास मिळेल हो ना ?? तुम्ही लगेच पीडा नको म्हणून लगेच मेसेज 𝐅𝐨𝐫𝐰𝐚𝐫𝐝 करता. मी माझ्या आयुष्यात कधीच असे मेसेज 𝐅𝐨𝐫𝐰𝐚𝐫𝐝 केले नाहीत व माझे कधीच नुकसान झाले नाही. कारण माझे हृदय सर्वांचे कौतुक करण्यात व्यस्त असते, तुम्ही भिंतीवर जोरात बॉल मारला तर काय होते तो बॉल तेवढ्याच वेगाने तुमच्या अंगावर धावत येतो. तसेच कौतुकाचे दोन शब्द आपल्या मित्राला आपल्या प्रेमळ माणसांना सुखद गारवा देतात. मग तेही आपले कौतुक करण्यासाठी आपली युक्ती वापरतात, सुख द्या सुख घ्या ,छोटी युक्ती आहे! 

कौतुक करणे म्हणजे बॉस ला आपलेसे करून घेणे, कौतुक दुकानदारांनी  करणे म्हणजे व्यवसाय भरभराटीस घेऊन जाणे होय, चला मग आज पासून कौतुके नाचू... गाऊ कौतुके... राहू सर्वासंगे आनंदी म्हणजे  जीवनाचे अमृत करू !! 

@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@





+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

आत्मचिंतन

चांगुलपणा हा माणसाचा सद्गुण आहे .आपण तो जपण्याचा सातत्याने प्रयत्न केला पाहिजे. एकमेकांना सहकार्य करणे, मदत करणे, दुसऱ्यांबद्दल चांगली भावना ठेवणे हे नेहमीच आचरणात आणले तर जीवनाला एक नवीन आयाम प्राप्त होईल .

दुसऱ्यानी चांगले म्हणावे ही अपेक्षाच चुकीची आहे. स्वतःला स्वतःचे मूल्यमापन करता आले पाहीजे. आपण जे काही करतो आहे ते बरोबर आहे की चूक आहे हे आपले अंतर्मन नेहमीच सांगते. त्यामुळे त्याला फसवता येत नाही. 

प्रत्येकालाच आपण आवडतो असे कधी होत नसते त्यामुळे स्वतःशीच  प्रामाणिक असणे गरजेचे असते .चांगल्या वाईटांची व्याख्या ही व्यक्तीपरत्वे बदलत असते. ज्याला आपण फायद्याचे ठरतो तो आपणाला चांगला समजतो आणि ज्याला अडचणीचे ठरतो त्याच्यासाठी वाईट ठरतो मग त्याठिकाणी आपण बरोबर असलो तरीही ...! 

 सगळ्यालाच खुश ठेवणे शक्य नसते म्हणून आपण स्वतः प्रामाणिक भूमिका ठेवायची, मग कुणी काहीही म्हणो... आपण आपलं चांगल काम चालूच ठेवायचं…  ईतरांचं त्यांच्यापाशी…फक्त आपल्यातला “चांगुलपणा” कमी होऊ द्यायचा नाही….!

**********************************************************

------------------------------------------
 जीवनात यशस्वी व्हायचं
 असेल तर या ६ गोष्टी करा 
--------------------------------------------


 तुम्हाला जर तुमच्या जीवनात काही तरी मिळवायचं असेल आणि यशस्वी व्हायचं असेल तर तुम्हाला खाली दिलेल्या ६ गोष्टी केल्या पाहिजेत. प्रत्येक यशस्वी व्यक्तीच्या जीवनात या ६ गोष्टी दिसतात. ज्यामुळे ते आज यशस्वी झाले आहेत. 
जाणून घ्या त्या ६ गोष्टी कोणत्या आहेत.

१) रिकाम्या वेळेचा सदुपयोग

तुम्ही कामावरुन घरी गेल्यानंतर काय करता ? टीव्ही पाहता, सोशल मीडियावर मित्रांसोबत चॅट करता किंवा मग पार्टी करण्यासाठी जाता. पण तुम्हाला मिळालेल्या रिकाम्या वेळेचा वापर जर तुम्ही योग्य पद्धतीने केला तर  तुमच्या प्रोफेशनल लाईफमध्ये यशस्वी होण्यासाठी तुम्हाला कोणीच रोखू शकत नाही.  स्टीव जॉब, इमा वॉट्सन, इलॉन मस्क आणि टीम कूक यांनी रिकाम्या वेळेचा सदुपयोग करुन यश गाठलं.

२) पुरेशी झोप घ्या.

अपुरी झोप फक्त तुम्हाला अस्वस्थच करत नाही तर तुमचा दुसरा दिवस देखील खराब करते. याचा परिणाम तुमच्या कामावर नक्कीच होतो. अॅपल कंपनीचे सीईओ रोज रात्री ९.३० ला झोपायचे आणि ७ तासांची झोप घ्यायचे. फेसबूकचे सीओओ सँडबर्ग  झोप खराब होऊ नये म्हणून रात्री मोबाईल बंद करुन ठेवायचे. रोज ७ तासांची पुरशी झोप घेतलीच पाहिजे.

३) वाचन, वाचन आणि वाचन

काहीही वाचा पण वाचलं पाहिजे. वाचणामध्ये वेळ गुंतवल्याने त्याचे परिणाम देखील चांगले येतात. यामुळे तुमचं ज्ञान, कौशल्य आणि तुमचं संभाषण कौशल्य देखील चांगलं होतं. वाचणाने तुमच्या शब्द भंडारात देखील वाढ होते. इलॉन मस्क, वॉरेन बफेट, बिल गेट्स आणि इतर यशस्वी लोकांमध्ये वाचण ही कॉमन गोष्ट आहे.

४) व्यायाम करा

व्यायाम केल्याने माणूस लवकर अतिवृद्ध होऊ शकत नाही. ६८ वर्षीय व्हर्जिन ग्रुपचे संस्थापक रिचर्ड ब्रान्सन यांनी सांगितले की, व्यायामामुळे त्यांना "दुप्पट यश मिळालं. शिवाय, इतर अनेक फायदे देखील झाले. आत्मविश्वास पातळी, सर्जनशीलता, एकाग्रता पातळी, मेमरी आणि उत्साह वाढला.

५). नाही म्हणतांना घाबरु नका

नाही म्हणणं हे देखील एक कौशल्य आहे. नाही म्हणण्याची कला प्रत्येकामध्ये नसते. जेव्हा तुम्ही अनप्रोडक्टीव्ह काम, मिटींग आणि असाईमेंट्सला नाही म्हणता तेव्हाच तुम्ही खऱ्या अर्थाने प्रोडक्टीव्ह कामाला सुरुवात करता. योग्य कामाला प्रधान्य द्या. ज्यामुळे तुम्ही कामावर फोकस करु शकता आणि तुमचा परफॉर्मन्स आणखी चांगला होऊ शकतो. स्टीव्ह जॉब म्हणतात की, फोकस म्हणजे हो म्हणणं पण अशा कामांना ज्यामुळे तुमचा फोकस आणखी वाढेल.  पण याचा अर्थ असं नाही की १०० चांगल्या गोष्टींना देखील नाही म्हणायचं.

६). शिका आणि अभ्यास करा

नवीन गोष्टी शिकण्यासाठी आणि अभ्यास करण्यासाठी वयाचं बंधन नसतं. आपण स्वत: ला कसे विकसित कराल आणि कशा प्रकारे तुम्ही प्रतिस्पर्धकांच्या बरोबरीने पुढे जाल याचा विचार केला पाहिजे. यासाठी लेखन कार्यशाळा, मनोचिकित्सा किंवा नवीन विषयांचा अभ्यास करणं फायद्याचं ठरु शकतं. ईमा वॉटसनने आपल्या अभिनय करियरमधून ब्रेक घेतला आणि ब्राउन युनिव्हर्सिटीमध्ये अभ्यास करण्यासाठी प्रवेश घेतला.

माहिती संदर्भ :- आंतरजाल

@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@



#################################################

Very Important

समुद्राच्या किना-यावर जेव्हा एक लाट आली तेव्हा जाताना एका लहान मुलाची एक चप्पल आपल्या सोबत घेऊन गेली.....
 तो मुलगा वाळुवर बोटाने लिहीतो कि
"समुद्र चोर आहे".
त्याच समुद्राच्या दुस-या बाजुला मासे पकडणारा खुप मासे पकडतो तो वाळुवर लिहीतो कि
"समुद्र पालनकर्ता आहे".
एक युवक समुद्रात बुडून मरतो तेव्हा त्याची आई वाळुवर लिहीते
"समुद्र खुनी आहे".
एका दूस-या किना-यावर एक गरीब वृध्द वाकड्या कंबरेने फिरत असतो त्याला एका मोठ्या सीपमध्ये एक अनमोल मोती सापडतो तर तो वाळुवर लिहीतो
"समुद्र दाता है".
अचानक एक विशाल लाट येते आणि सर्व लिहीलेले पुसले जाते
लोकं काहीही म्हणू द्या...
 परंतु अथांग, विशाल समुद्र आपल्या लाटांमध्ये मस्त राहतो... 
आपली भरती आणि ओहोटी तो आपल्या पध्दतीने सिध्द करीत असतो
      जर अथांग समुद्र बनायचे असेल तर कोणाच्या बोलण्याकडे, टोमण्यांकडे लक्ष न देता जे करायचे ते आपल्या पद्धतीने करायचे...
भूतकाळातील विचार करत बसू नये. 
यश अपयश, मिळणे न मिळणे, सुख-दुख, या सगळ्यात मन विचलित होऊ देऊ नये.
जर जीवन सुख, शांति ने भरलेले असते तर मनुष्य जन्माला येताना रडला नसता
जन्माला येताना रडणे आणि मेल्यानंतर रडवणे यामधील संघर्षमय वेळेलाच कदाचित  "जीवन"  म्हणतात.


@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@

लिंक तुटलेली माणसे.... 
                    
आपल्या जीवनात किती तरी माणसे येतांत जातात. ती का येतात याचा विचार कधी मनात आला कां ??? माझ्या मनात अनेक दिवसांपासून हे विचांरांचे वादळ उठलंय.

ही लिंक कशी जुळते ??? अगदी आपल्या जन्मापासूनच ती सुरू होते. या तारा अनेक नाती, मैत्री यांच्याशी जोडल्या जातात.

काही दिवसांनी, काही वर्षांनी यांतील नाती संपुष्टात येतात. म्हणजे काही वयस्क काळा पलीकडे जातात. काही बदली, सेवानिवृत्ती, लग्न, शिक्षण इ. कारणांमुळे दूर जातात, व ही लिंक तुटते. माणसे दूर जातात. काही तर त्यातले पुन्हा म्हणून आयुष्यात दिसत नाहीत.

ही माणसं एका मर्यादेपर्यंतच आपल्या सोबत असतात. असं कां ??? तसंच मित्र व मैत्रीणींचं. जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर नवीन लोकं आयुष्यात येतात, व काही जीवलग बनून कायम आयुष्यात राहतात मदत करतात. काही कधीच पुन्हा म्हणून दिसत नाहीत. काही कधीतरी क्वचितच भेटून जातात व पुन्हा ही लिंक तुटते...

काहींना आपण पटत नाही, किंवा काही आपल्याला पटत नाहीत. म्हणून लिंक तुटते.

हल्ली ही लिंक फोन, फेसबुक, व्हाॅट्सअप इ. मार्गांनी साधण्याचा केविलवाणा प्रयत्न दिसतो, पण त्यात खरं सांगा प्रेम, आपूलकी जिव्हाळा दिसतो का? मला तरी नाही दिसत. लिंक असूनही लिंक तुटलेली व कृत्रिम लिंक जोडलेली माणसंच जास्त वाटतात.

हल्ली सर्वत्र मनातून लिंक तुटलेल्या कृत्रिम माणसांचाच वावर जास्त दिसतो. माणसं तुटली आहेत-तुटत चालली आहेत. काही हाताच्या बोटावर मोजण्या एवढीच लोकं आयुष्यात उरतात. त्यांची कदर करणं, त्यांना नीट ओळखणं, नीट वाचणं  गरजेचं आहे. त्यांच्याशी मनातली लिंक मजबूत ठेवून एकमेकांना धरून रहा. खोट्या जगात राहून खोटा आनंद नका मिळवू. मनातलं सांगतां येणं व मन मोकळं करता येणं, या शिवाय दुसरा आनंद नाही.नाहीतर साठून-साठून नुसते ढग साठत जातात व मग ढगफुटी होते. ज्यांनी लिंक तोडली किंवा तुटली अशा माणसांना आपल्यापासून सहजपणे दूर ठेवून जगतां आलं पाहीजे. जीवनाचा निखळ आनंद अगदी छोट्या छोट्या गोष्टीत लपलेला आहे, तो शोधता आला पाहीजे.

असं म्हणतात की, माणसं ही आपल्या कर्मानुसार आपल्या जीवनात येत-जात असतात. कर्म संपलं की नवीन लोकं नवीन कर्म. अशी ही लिंक बहुतेक अविरत शेवटच्या क्षणापर्यंत चालू असते.
  
काही प्रश्नांची उत्तर मिळतात, काहींची नाही. हे जीवन अजब न कळणारं मिश्रण आहे. पण लिंक तुटणारी माणसं मात्र येतात-जातात. हे ही तितकंच खरं. शेवटी म्हणावसं वाटत की,
ठरावीक आयुष्यमान हे प्रत्येक सजीवांचे लक्षण आहे . जन्मास येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीस मृत्यूचा आनंद घ्यावाच लागतो . व्यक्तीचे थोरपण हे त्यांच्या जन्मावरून ठरत नसून त्याच्या कर्तृत्वार अवलंबून असते . ज्याप्रमाणे माणसाने माणसाशी तीन दिवसापेक्षा जास्त दिवस अबोला (न बोलणे ) ठेवणे ते त्या विश्वनिर्माण करणाऱ्यास मंजूर नाही त्याचप्रमाणे कितीही मोठे दुःख असले तरी त्याचा दुःखवटा तीन दिवसापेक्षा जास्त दिवस पाळू नये . जन्म आणि मृत्यू याचा सर्वाधिकार त्या परमपूज्य परमेश्वराकडे अबाधित आहेत .

       ये जीवन है, इस जीवन का यही है,
                 यही है रंग रूप। 🎶
       थोड़े गम है, थोडी खुशीयाॅं, यही है 
              रंग रूप। ये जीवन है। 🎶

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++


&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&

मृत्यूचं सत्य !

झाडावरून गळून पडलेलं एक कोमेजलेलं, सुगंध मालवलेलं निस्तेज फूल हळुवार मातीवर पहुडलं. 

मातीने त्याच्या नाजूक पाकळयांना जोजवत विचारलं, "काही त्रास नाही ना झाला ?"

सुकून गेलेल्या फुलाने देठापासून देह हलवण्याचा यत्न केला आणि पाकळयांनीच नाही म्हणून खुणावलं. 

काही क्षण असेच गेले...

आपल्या कुशीत घेण्यास आतुर झालेल्या मातीने पुन्हा कातर आवाजात विचारलं, "झाडावरून गळून पडल्याचं खूप दुःख होतंय का ? फार वाईट असतं का हे सर्व ?"

म्लान पाकळ्यावर मंद स्मित झळकलं. 
फुल म्हणालं, "निमिषार्धासाठी वाईट वाटलं.. 
कारण झाडाशी, पानांशी, गुच्छातल्या सोबती फुलांशी, उमलत्या कळ्यांशी, ओबड धोबड फांद्यांशी आता ताटातूट होणार म्हणून वाईट वाटलं. 
पण पुढच्याच क्षणाला आनंदही वाटला. जितका काळ झाडावर होतो तेंव्हा वारा येऊन कानात गुंजन करायचा, पाकळयांशी झटायचा, झोंबायचा. 
कधी त्याचा राग यायचा तर कधी त्याच्यासोबत अल्लड होऊन उडत जावं असं वाटायचं. 

पण तेंव्हा मी झाडाचा एक भाग होतो त्यामुळे माझा एकट्याचा निर्णय घेण्यास मी स्वतंत्र नव्हतो... "

"तू आता स्वतंत्र झालास खरा पण आता तू क्षणा क्षणाला कोमेजत चाललायस .... आता काय करणार ?" - मातीचा प्रश्न.
 
दीर्घ उसासा टाकत फूल म्हणालं, "आता हवा जिकडे नेईल तिकडे मी जाईन... 
वाऱ्यावर स्वार होऊन जीवात जीव असे तोवर जमेल तितके जग पाहून घेईन... 
मग एकेक पाकळ्या झडतील, देठापासून तुटून पडेन. 

पण जिथं अखेरचे श्वास घेईन तिथल्या मातीशी एकरूप होईन. त्या मातीचं एक अंग होऊन जाईन आणि तिच्या कुशीत येऊन पडणाऱ्या नव्या बीजासाठी खत होऊन जाईन, त्या बीजातून अंकुरलेल्या झाडावर कोवळ्या फुलांचा एक टवटवीत गुच्छ असेल, माझं कर्म चांगलं असेल तर मीही त्या गुच्छात असेन !"

फुलाचं उत्तर ऐकून सदगदीत झालेल्या मातीने त्याच्या सुरकुतल्या पाकळयांचे हलकेच चुंबन घेतले. 

काही वेळ निशब्द शांतता राहिली आणि पुढच्याच क्षणी मंद वाऱ्याची एक झुळूक आली आणि फुलाला त्याच्या अंतिम सफरीवर घेऊन गेली... 

आपलं आयुष्यही असंच आहे.

संसार कुटुंब आप्तेष्ट मित्र ही सगळी त्या झाडाची भिन्न अंगे. आपल्या सर्व जबाबदाऱ्या पार पाडल्या की कुणी स्वखुशीने त्यातून बाहेर पडतो तर कुणा कमनशिबींना परागंदा व्हावं लागतं. 

मग सुरु होतो एका जीवाचा एकाकी सफर... जो आपल्याला आयुष्यातलं अंतिम सत्य दाखवून देतो. 

 आयुष्यातली सत्कर्माची शिदोरी मजबूत असली की हा प्रवास सुसह्य असतो, इथं आपल्याला मदत करायला कुणी येत नसतं.

नियतीच्या वाऱ्यावर आपल्याला उडावं लागतं. आपणही असेच पंचतत्वात विलीन होतो आणि प्रारब्धात असलं तर जीवनाच्या पुष्पगुच्छात पुन्हा अवतिर्ण होतो !

जीवन सुंदर तर आहेच...
पण ते अर्थपूर्णही आहे !

**************************************************************

आत्मचिंतन

चांगुलपणा हा माणसाचा सद्गुण आहे .आपण तो जपण्याचा सातत्याने प्रयत्न केला पाहिजे. एकमेकांना सहकार्य करणे, मदत करणे, दुसऱ्यांबद्दल चांगली भावना ठेवणे हे नेहमीच आचरणात आणले तर जीवनाला एक नवीन आयाम प्राप्त होईल. दुसऱ्यानी चांगले म्हणावे ही अपेक्षाच चुकीची आहे. स्वतःला स्वतःचे मूल्यमापन करता आले पाहीजे. आपण जे काही करतो आहे ते बरोबर आहे की चूक आहे हे आपले अंतर्मन नेहमीच सांगते. त्यामुळे त्याला फसवता येत नाही.
 
प्रत्येकालाच आपण आवडतो असे कधी होत नसते त्यामुळे स्वतःशीच  प्रामाणिक असणे गरजेचे असते. चांगल्या वाईटांची व्याख्या ही व्यक्तीपरत्वे बदलत असते. ज्याला आपण फायद्याचे ठरतो तो आपणाला चांगला समजतो आणि ज्याला अडचणीचे ठरतो त्याच्यासाठी वाईट ठरतो मग त्याठिकाणी आपण बरोबर असलो तरीही ...!  सगळ्यालाच खुश ठेवणे शक्य नसते म्हणून आपण स्वतः प्रामाणिक भूमिका ठेवायची, मग कुणी काहीही म्हणो... आपण आपलं चांगल काम चालूच ठेवायचं… ईतरांचं त्यांच्यापाशी… फक्त आपल्यातला “चांगुलपणा” कमी होऊ द्यायचा नाही….!

=====================================================

असणं आणि दिसणं...

एकदा खूप महिन्यांनंतर एका मित्राच्या घरी गेलो होतो. मस्त गप्पा टप्पा आणि चहाचा रतीब चालू होता. तितक्यात आतल्या खोलीतून मित्राची आज्जी बाहेर आली. खूप आस्थेने त्यांनी माझी, घरच्यांची चौकशी केली आणि मग "चालू दे तुमचं" म्हणून त्या परत आत गेल्या.

थोड्या वेळाने मी निघालो. बाहेरूनच आज्जींना हाक मारली.. "आज्जी, निघतो मी". त्या बाहेर आल्या. मी त्यांच्या पाया पडलो. प्रेमाने माझ्या डोक्यावर हात ठेऊन म्हणाल्या..."खूप दिवसांनी आलास. येत जा हो अधूनमधून. दिसंत राहावं बाबा... बरं वाटतं"

खरंच.. किती महत्त्वाचं असतं
"असणं आणि दिसत राहाणं"...

आपल्या आयुष्यात अनेकजण येऊन जातात. कमी अधिक प्रमाणात तरंग उमटवून जातात.. आपले ठसे मागे सोडून जातात.. काळाच्या ओघात काही ठसे पुसट होत जातात तर काही गहिरे रंग ठेवून जातात. या प्रवासात अनेक नाती, ऋणानुबंध जपलेले असतात. सगळ्याच नात्यांना नावं नाही देता येत. मग त्याला आपण मित्र किंवा मैत्रीण म्हणतो. त्यांचं असणं हा एक मोठा दिलासा असतो. एकाच वस्तीत राहूनही दिवस दिवस भेटू न शकणारे सुहृदयही असतातच की... पण ते आहेत.. नुसते जिवंत आहेत असं नव्हे तर आपल्या मैत्रीत आहेत ही भावनाही सुखावह असते. ते "असणं" खूप महत्वाचं पण ते "असणंपण" टिकवणं हे सर्वात महत्वाचं! 

माझा खूप जवळचा एक मित्र आम्ही शाळा कॉलेजमध्ये असताना त्याच्या घरी जेवणाचा जर काही खास बेत असेल तर माझ्या घरी बोलवायला यायचा. "अरे राज्या,आईने स्पेशल डिश केली आहे आज. दुपारी जेवायला आमच्या घरी ये". फोन नव्हते तेंव्हा घरोघरी. त्याच्याबरोबर डबा पाठवणंही शक्य असायचं. पण घरी खास बेत असताना पंक्तीला जिवाभावाचा मित्र हवा ही भावना मोठी. ते "असणंपण" टिकवणारी! 

आयुष्य पुढे जात राहातं... क्षितिजं रुंदावतात, आपापले संसार सुरू होतात... वाढतात... आणि लहानपणी जे असण्याबरोबर दिसणं असायचं ते दुरापास्तं होऊ लागतं. जगण्याच्या गर्दीत सो कॉल्ड अनुभवाची पुटं चढतात मनावर... बुध्दीवर... संवेदना निबर होऊ लागतात आणि इच्छा असो वा नसो "दिसणं" कमी होऊ लागतं. वय वाढल्यावर दिसणं तसही कमीच होऊ लागतं म्हणा.. एकच दिलासा असतो.. तो किंवा ती आहे याचा...! 

तसे मित्र पुष्कळ असतात. सध्याच्या सोशल मिडियाच्या जमान्यात तर फारच.. पण शब्दांच्या पलिकडे जाऊन ऋणानुबंध जपणारे फारच थोडे... अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच... काही प्रत्यक्षातले तर काही आठवणीतले. काही जवळ असलेले तर काही दुरावलेले. काही खांद्यावर हात ठेवून शेजारीच उभे असलेले तर काही पापण्यांच्या कडांवर ओथंबलेले..
"दिसणं" महत्वाचं आहेच...!
पण "असणं" लाख मोलाचं...!!

 सहज आलं ....
मनांतलं ओठावर
आणि ...
आपल्याला शेअर केलं 


                 0000          0000          0000          0000          0000




+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++



+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

माणसं मनातली.....

मोगऱ्याचं फूल ओंजळीत घेतलं की त्याचा गंध मनाला , शरीराला प्रसन्न करून जातो. सहवासातील माणसाचं देखील असंच असतं....

काही माणसं काही क्षणातच मनाला खूप आवडतात , आपली होऊन जातात. तर , काही कितीही सहवासात राहिली , तरी त्यांची आतून ओढ नसतेच...

चेहरा बघण्यापेक्षा नेहमीच समोरच्याच्या मनात उतरून बघावं. शोधूनही तिथं माणूसपण सापडत नसेल , तर त्याचं सुंदर दिसणंही मग किळसवाणं वाटतं....

शरीराची सुंदरता वया बरोबर संपते , तर मनाची सुंदरता शेवटपर्यंत टिकून राहाते. शरीराला वय असतं , मनाला ते कधीच नसतं....

शेवटी काय , आपण व्यक्तीच्या स्वभावाच्या प्रेमात असतो , शरीर तर निमित्त मात्र असतं. माणसाच्या स्वभावात गोडवा , शालीनता , प्रामाणिकपणा , आणि विनयशीलता असेल , तर त्याची काही क्षण जरी सोबत मिळाली तरी ती हवीहवीशी वाटते....

म्हणूनच बाहेर लक्ष दिव्याची सुंदर आरास असूनही , देवघरातील समईच्या तेजापुढं आपण नतमस्तक होतो....

आयुष्यात अशी माणसं कधी भेटली तर त्यांच्यावर जीवापाड प्रेम करावं !!

आपल्या आवडत्या माणसाचं आपल्या सोबत असणं , ही आयुष्यातील सगळ्यात मोठी कमाई....

ती प्रत्येकाच्या वाट्याला येतेच असं नाही.

आजकाल अशी माणसं भेटतात तरी कुठे ? नशिबानं कधी भेटलीच तर हळुवार जतन करून ठेवावीत....
 
कदाचित , पुन्हा भेटतील , न भेटतील ?

~~  व. पु. काळे !

&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&

सहजच....  

दुसऱ्या साठी करताना सुद्धा आपल्याला झेपेल इतकंच करावं..
अनेकदा आपण कोणताही स्वार्थ नसताना अनेकांसाठी बरंच काही करतो..झटतो. प्रत्येक वेळी आपलीच जबाबदारी म्हणून, कर्तव्य म्हणून पुढे पुढे करतो..कोणताही स्वार्थ नसतांना.. 
मतप्रवाह तर दोन्ही बाजूंनी असतात. ज्याच्यासाठी करतो त्याला वाटतं केलं आमच्यासाठी तर काय फरक पडतो..याचं कर्तव्यच आहे..

करणाऱ्याचा हेतू स्वच्छ असतो.. आपल्या प्रयत्नाने कुणाचं तरी भलं व्हावं हा निर्मळ प्रयत्न असतो..
गैरसमज हा फार मोठा शत्रू असतो. तो या निर्मळ भावनेलाच धोका निर्माण करतो...

ज्याला समजून घ्यायचंय तो समजूतदारपणे गोष्टी हाताळतो...ज्याला समजून उमजुन घायचंच नाही तो शब्दाचा किस पडतो...शब्दांनी घायाळ करतो...

नात्यांची खरी मेख तर इथेच आहे...माझं माझं करता करता आपण आपल्यांना दुखावतो..घालून पाडून बोलतो..परिणाम फक्त वाईटच होतात...संबंध दुरावले जातात..आपुलकीतला रस संपत जातो...उरते ती फक्त निराशा...

हल्ली तर नाती आर्थिकदृष्टीतच बांधलेली दिसतात..जणू पैसा म्हणजे सर्वस्व...अमक्याने अमक्या कार्यक्रमात आहेर दिला नाही म्हणून राग...रस्त्याने जाताना ओळखीचे बोलले नाही हा राग...एखाद्या प्रसंगांत मागे उभे राहिले नाही म्हणून राग...

निर्व्याज प्रेम .. जिव्हाळा.. काळजी.. कुटुंबातील प्रेम हे सगळंच विरळ होत चाललंय ...

एकमेकांना टाळ्या देत हास्याची कारंजी उडणं लुप्त होतंय...

       
खरं बघितलं तर किती दिवस आपण जगणार याची काहीच शाश्वती नाही..सोबतीला काय घेऊन जाणार हेही माहीत नाही..

जिव्हाळ्याची अगदी कमी माणसं असतात जी आपली काळजी करतात.. जीव ओतून आपल्याला घडवतात.. वेळप्रसंगी आपल्याला भल्यासाठी रागावतात पण परत माया करतात..त्यांचा विसर कधीच पडू देऊ नये..

कोणाला व्यक्त होता येतं तर कोणाला नाही.. हा समजूतदारपणा अंगी यायला हवा..

जगण्यासाठी दिवस फार कमी आहेत.. तक्रारी मात्र त्यानंतर ही सुरूच असणार..

दुसऱ्याला दुःखी करून आपण सुखी व्हावं ही भावना किती बोचरी आहे...

आयुष्य फक्त धावण्याची स्पर्धा नाही... 

मिळेल ते अनुभव ..मिळेल ती उपेक्षा ..मिळेल ते प्रेम... आदर.. मिळेल ती अनुभूती घ्यावी... 

प्रवाहात मुक्त जगावं.. जीवनात सगळेच रंग हवेत... निराशेतही आशा आहेच की... त्या ऊर्जेची वाट बघायची..

कोणा वाचून कोणाचं अडत नसतंच खरं तर..पण आनंद मात्र घेता येत नाही तो आपल्या माणसांशिवाय...

कौतुक करणारं..पाठीवर हात ठेवणारं कुणीतरी हवंच ना....

आपल्या दुःखाच्या प्रसंगी डोळ्यात अश्रू येणारी... आपलं यश डोळे भरून बघणारी माणसं ही हवीतच अवतीभवती... 

नाहीतर यश .. पैसा खूप मिळवला पण माणसंच नसतील प्रेम करणारी तर त्या सारखा दरिद्री तोच. खरं ना..?

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++



*************************************************************

ससा आणि कासवाच्या शर्यतीत ससा झोपून राहिल्याने हरला. कासव जिंकले पण सशाला शांत बसवेना .आपल्यात वेगाने पळण्याची क्षमता अधिक असूनही निव्वळ झोपल्यामुळे आपण हरलो हे त्याच्या लक्षात आले. पराभवाचा हा सल संपविण्यासाठी त्याने कासवापुढे पुन्हा शर्यतीचा प्रस्ताव ठेवला. विजयाच्या आनंदात आपण जिंकू शकतो, यावर विश्वास बसलेल्या कासवाने होकार भरला. शर्यत पुन्हा सुरू झाली. यावेळी सशाने चूक केली नाही. तो थांबला नाही. झोपला नाही. परिणामी, वेगवान ससा शर्यत जिंकला. हळू चालणारे *कासव हरले.
    पण एकदा विजयाची चव चाखलेलं कासव हार पत्करायला तयार नव्हतं. कासव पुन्हा सशाकडे गेलं. म्हणालं,'मी तुझं ऐकलं. आता तू माझे ऐक. आपण पुन्हा शर्यत लावू !'ससा हसला आणि म्हणाला, "एकदा माझ्या चुकीमुळे हरलो. पुनःपुन्हा मी ती चूक कशी करेन ? पण तुझी हरण्याचीच इच्छा असेल तर लावू पुन्हा शर्यत !' सशाचा होकार मिळाला तसं कासव म्हणालं, 'पण यावेळी शर्यतीचा मार्ग मी ठरवणार !' स्वतःच्या वेगाची आणि कासवाच्या धिम्या गतीची खात्री असलेल्या सशाने त्यालाही होकार भरला.
    शर्यतीचा मार्ग कासवाने ठरवला. शर्यत पुन्हा सुरू झाली ससा चूक करणार नव्हता. तो वेगात पळत राहिला. कासव मागे राहिलं पण पळता पळता अचानक ससा थबकला. जागेवर थांबला. पुढे आडवी नदी वाहत होती. कासवाने बरोबर मार्ग काढला होता. सशाला पोहता येत नव्हतं. ससा तिथेच थांबुन राहिला. हळूहळू येणारं कासव तिथे पोहोचलं. त्याने सशाकडे सस्मित पाहिलं आणि नदीत उडी मारून पलीकडच्या काठावर पोहत पोहोचलही.शर्यत कासवाने जिंकली. सशाच्या वेगक्षमतेवर कासवाने स्वतःच्या बुद्धिक्षमतेने मात दिली .हरलेला ससा विचार करत राहिला. आपल्याला पोहता येत नाही, म्हणून आपण हरलो, हे त्याच्या लक्षात आलं.तो विचार करून पुन्हा कासवाकडे गेला. म्हणाला,'मित्रा, आपण आजपासून शर्यत नाही लावायची.आजपासून एक करायचं. जिथे जमीन असेल तिथे मी तुला पाठीवर घेईन. जिथे नदी आडवी येईल तिथे तू मला पाठीवर घे. दोघे मिळून आपण असे पुढे जात राहिलो, तर सर्वात पुढे आपण दोघेच असू !'
    प्रत्येकात साऱ्या गोष्टी अथवा गुण कधीच नसतात. मात्र प्रत्येकात काहींना काही गुण असतोच.जे आपल्यात नाही ते इतरांकडे असू शकते. जे इतरांकडे नाही ते आपल्याकडे असू शकतं. अशा एकमेकांच्या गुणांचा वापर करीत आपल्यातला उणेपणा भरून काढता येतो.सर्वोत्तम यश गाठता येतं.
  एकमेकांना पराभूत करण्यात शक्ती खर्ची घालण्यापेक्षा एकमेकांच्या शक्तीच्या बळावर बलाढ्य काही करता येतं. वैयक्तिक मोठेपणाच्या अभिलाषेपायी निव्वळ दुसऱ्याच्या चुका काढण्यापेक्षा, त्यांच्यातील चुकांकडे दुर्लक्ष करून त्यांच्यातील उत्तम गुण हेरून त्यांचा वापर करून घेणं, ही खरी यशस्वी क्रियाशीलता !
     उपयोगी पडणारी माणसं मिळवणं आणि आपण कोणाच्या उपयोगी पडू शकतो ते पाहून त्याला मदत करणं या सहकार्यभावनेच्या जोरावरच मोठमोठी कार्य सिद्धीस नेली जातात. काही लोकांकडे कल्पनाक्षमता असते;पण कल्पना सत्यात उत्तरावणारी कृतीक्षमता नसते.काहींकडे शक्ती असते; पण योग्य नियोजनक्षमता नसते. काहींकडे संघटनक्षमताअसते; पण निर्णयक्षमता नसते. निर्णयक्षमता असते; तर नेतृत्वक्षमता नसते. अशावेळी ज्याच्याकडे जे आहे त्याचा त्याच्या गुणांचा योग्य वापर करीत सांघिकपणे पुढे जाणे म्हणजेच बिकट रणांगणही जिंकणे!
   यश मिळवायचं असेल तर असे गुण आणि गुणी माणसं वेचणं हे फार महत्त्वाचं !संकटाच्या क्षणी गोगलगायीसारखे पोटात पाय घेऊन स्वतःच्याच कोषात लपून राहणं टाळलं पाहिजे!याउलट जास्तीत जास्त माणसं जोडा. जुन्या सौहार्दाचा शोध घ्या ! नव्याने मैत्री करा. साऱ्यांच्या संपर्कात राहा. मिळूनमिसळून वागा. तुमच्यासाठी जे जे उत्तम ते ते शोषून घेण्यासाठी तत्पर असलेले टिपकागद व्हा !


=========================================================

लिंबू ~ मिरची- 

नुकतीच स्वच्छ धुवून माझी पांढरीशुभ्र​ कार धावत गावाबाहेरच्या सिग्नलला थांबली.
बाजुच्या सोबत थांबलेल्या वाहनांना आधी बांधलेले लिंबू मिरची सोडून नवं लिंबू मिरची, बांधत एक जख्खड म्हातारा त्याच्या कार जवळं येवून थांबला. वाढलेल्या पांढऱ्या दाढीच्या केसांत हडकुळी बोटं रुतवत म्हणाला "साहेब नवी दिसतेय गाडी. कोणाची नजर नको लागायला... लिंबू मिरची बांधून देतो."

मी काही म्हणायच्या आत काळा धागा गाडीला अडकवून बोटानेच पाच रुपये झाल्याची खुण केली त्यानं.

खिशातून पाच रुपयांची नोट काढून त्या वृद्धांच्या हातावर टेकवत मी म्हणालो "बाबा उद्या ह्यापेक्षा भारी लिंबू मिरची बनवून आणा. माझ्या एका अनमोल नात्याला बांधायचं. कोणाची​ नजर लागलीय​ माहीत नाहीये."

खोल गेलेल्या डोळ्यातून​ तो वृद्ध मिश्कीलपणे हसत म्हणाला "का थट्टा करताय गरीबाची? अहो नातं असं नाही सांभाळलं जात. दोघांत एखादा मिरची झालाच तर दुसर्‍यानं लिंबू बनुन त्यांचा तिखटपणा​ कमी करायचा असतो. आपलं नातं आपणचं सांभाळावं लागतं."

बोलता बोलता तो वृद्ध दुसऱ्या गाडीकडे निघून गेलाही. अवघड प्रश्न किती सोपा करून सांगितला त्या वृद्धानं मला...!! 

"नाती जपा , नाती टिकवा "


%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%

फ्यूज्ड बल्ब संकल्पना 

एक वरिष्ठ कार्यकारी सेवानिवृत्त झाले आणि ते त्याच्या महत्वाच्या अधिकृत क्वार्टरमधून हाऊसिंग सोसायटीत शिफ्ट झाले जिथे त्याचा फ्लॅट होता. ते स्वत:ला मोठा समजत असत आणि कुणाशीही कधी बोलत नसत.  दररोज संध्याकाळी सोसायटी पार्कमध्ये फिरतानाही त्यानी इतरांकडे दुर्लक्ष तर केलेच .उलट ते त्यांचेकडे तिरस्काराने पहात असत.

एके दिवशी, असे झाले की... त्याच्या शेजारी बसलेल्या एका वृद्ध व्यक्तीने त्याच्याशी संभाषण सुरू केले आणि नंतर ते एकमेकाना भेटतच राहिले.  प्रत्येक संभाषण मुख्यत: निवृत्त कार्यकारी आपल्या पाळीव प्राण्यांच्या विषयावर बोलताना एकेरी शब्द वापरत होते, तसेच सांगत असे की मी “माझ्या सेवानिवृत्तीपूर्वी कार्यरत असलेल्या मोठ्या पदाची आणि उच्च पदाची कल्पना कोणी करू शकत नाही; 
 मला सेवानिवृत्ती मुळे शासकीय निवास स्थान सोडावे लागल्यामुळे मी येथे रहाण्यास आलो आहे ”;  वगैरे वगैरे आणि तेथे येत असलेल्या इतर वयस्कर व्यक्ती त्याचे बोलणे शांतपणे ऐकत असत... 

ब-याच दिवसांनी, जेव्हा त्या सेवानिवृत्त कार्यकारी इसमाने इतरांबद्दल चौकशी केली,तेव्हा त्या वृद्ध श्रोत्याने तोंड उघडले आणि म्हणाले, “सेवानिवृत्तीनंतर आपण सर्व जण फ्युज बल्बसारखे आहोत.  बल्बचे वँटेज काय होते, किंवा ते किती प्रकाश मान होते किंवा ते किती चमकत होते हे दिवे गेल्यानंतर म्हणजे निकामी झाल्यानंतर ते  दिवेच होते.
तसेच अधिकारी किंवा कर्मचारी म्हणा , सेवानिवृत्त झाल्यानंतर किंवा सेवानिवृत्ती घेतल्यावर  ते माणुस म्हणुनच रहातात. त्यांच्याकडे पहाताना काहीच फरक दिसत नाही. ते पुढे म्हणाले की, “मी गेली  ५ वर्षे या सोसायटीत रहात आहे .
पण मी येथे येणेपूर्वी दोन वेळा संसद सदस्य होतो. हे कोणालाही सांगितले नाही. तसेच  तुमच्या उजवीकडे,  बसलेले गृहस्थ हे भारतीय रेल्वेमध्ये महाव्यवस्थापक होते .त्या पदावरुन  निवृत्त झालेले वर्माजी आहेत. तसेच पलिकडे बसलेले सिंह साहेब आहेत, जे सेवानिवृत्ती पूर्वी सैन्यात मेजर जनरल होते. तसेच निव्वळ पांढ-या  पोशाखात खंडपीठावर बसलेली ती व्यक्ती म्हणजे सेवानिवृत्तीपूर्वी इस्रोचे प्रमुख असलेले मेहराजी आहेत ,ते त्यांनी हे कोणालाही सांगितले नाही. मलासुद्धा नाही, परंतु मला ते माहित आहे. "

 “सर्व फ्यूज्ड बल्ब आता एकसारखेच आहेत - त्याचे व्होल्टेज जे काही होते - 0, 10, 40, 60, 100 वॅट्स - त्यांच्यात आता काही फरक दिसत नाही ते एकसारखे बल्ब आहेत.  एलईडी, सीएफएल, हलोजन, इनकॅन्डेसेंट, फ्लोरोसेंट किंवा सजावटीच्या वस्तू तयार होण्यापूर्वी कोणत्या प्रकारचे बल्ब होते ते महत्त्वाचे नाही ते आता एक सारखे बल्ब आहेत.  आणि तो नियम माझ्या मित्रा, तुम्हालाही लागू आहे.  ज्या दिवशी तुम्ही हे समजून घ्याल... त्या दिवशी या गृहनिर्माण संस्थेत आपल्याला शांती  मिळेल. ”

 "उगवणारा सूर्य तसेच मावळणारा सूर्य हे दोन्ही सुंदर आणि मोहक दिसतात परंतु प्रत्यक्षात, उगवत्या सूर्याला अधिक महत्त्व आणि पूजा मिळते आणि त्याची उपासनाही केली जाते, तर मावळत्या सूर्याचा तितका आदर मिळत नाही. हे चांगल लवकरात लवकर समजून घ्या ”.

आमचे सध्याचे पदनाम, शीर्षक आणि शक्ती कायम नाही.जेव्हा आपण ते शेवटच्या एका दिवसात हरतो तेव्हा या गोष्टींमुळे आपण पूर्वी काय होतो हि भावना ठेवण्या मुळे आपल्या जीवनात गुंतागुंत होते.

 लक्षात ठेवा बुध्दिबळाचा खेळ संपल्यावर राजा आणि मोहरा परत त्याच एकाच बॉक्समध्ये परत जातात .... !!

@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@२


======================================================

निर्णय घेता न येणं,
ह्यासारखा दुसरा घातक दोष नाही.
निर्णय न घेण्यापेक्षा,
चुकीचा निर्णय घेणं, अधिक बरं.
चुकीचा निर्णय घेणाऱ्या माणसांनी,
जीवनात यश मिळवलेलं आहे.
परंतु जो निर्णय घेऊ शकत नाही,
त्याचं मन नेहमी  हे करू की,
ते करू ह्या गोंधळात गुंतलेल असतं. मात्र हा मनुष्य कधीही यशस्वी झाल्याचं ऐकिवत नाही.
ज्याला निर्णय घेता येत नाही,
त्याला कृती करता येत नाही.
आणि ज्याला कृती करता येत नाही,
त्याला कोणत्याही क्षेत्रात,
यश मिळवता येत नाही...!!

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++


पोच पावती

मागे एकदा पोस्टात गेले असताना एक आजोबा स्टाफला विचारत होते
"ह्याची पोचपावती मिळेल ना हो ?"
बरेचदा मी ही शारदा ला सांगते,
"शारदा, acknowledgment म्हणून जपून ठेव ग !!!"
नेहमीप्रमाणेच तो शब्द माझ्या मनात फिरू लागला आणि बोटं टायपू लागली...
 
पोचपावती ही आपल्या व्यवहारात जितकी महत्वाची, तितकीच आयुष्यातही कां असू नये ?? 
ही पोचपावती म्हणजे प्रत्येक वेळी कौतुक असाच अर्थ नसावा.

कधीतरी एखाद्या गोष्टीची घेतलेली दखल किंवा म्हणतात ना appreciation असू शकतं. 

ह्या पोचपावतीचे
माझ्या आयुष्यातील उत्तम उदाहरण म्हणजे आमचे आई- अप्पा.
घरात कोणताही एकत्र कार्यक्रम होवो किंवा एखादा नवीन पदार्थ केला,
कोणतीही चांगली कृती केली की आम्हा 3 ही सुनांना ते तसंआवर्जून सांगतात
"छान झाला बर का आजचा कार्यक्रम" आणि मग त्यांच्या ह्या शब्दांनी कार्यक्रमामुळे झालेली दमणूक एकदम निघून जाते आणि पुन्हा पुढचा कार्यक्रम करायला अजून उत्साह येतो..!

पोचपावती तुमच्या आयुष्यात मोठी जादूची कांडी फिरवते बर का.
एखाद्याला त्याच्या छोट्या छोट्या गोष्टींच appreciation देऊन बघा अगदी मनापासून,त्याच्या चेहऱ्यावर कस हसू फुलतं.

आमच्या प्रमिलाबाईना गजरे , फुल घालून यायची फार आवड !
कधी त्या मोठा गजरा घालून आल्या कामाला की शारदाच्या तोंडून उस्फूर्तपणे येतं.. "प्रमिलाबाई काय मस्त दिसताय, 
 चला एक फोटो काढते तुमचा!"
ह्याने सुद्धा खूप खुश होतात त्या.
लहानांपासून मोठ्यां पर्यन्त
आणि अगदी लहान गोष्टींपासून मोठ्या गोष्टींसाठी ही पोचपावती खूप मोठा परिणाम करून जाते आणि छान आठवण मनात ठेवून जाते.

एखादं मोठं प्रोजेक्ट complete केल्यावर बॉसने त्याची घेतलेली दखल असो
की वर्गात "छान निबंध लिहिलास हो" अस म्हणून बाईंची मिळालेली शाबासकी असो,
खपून केलेल्या पदार्थाची घरातल्यानी केलेली स्तुती असो
की अगदी आपणच कधीतरी नवीन साडी नेसल्यावर आहोंची न बोलता मिळालेली दाद असो.

ह्या पोचपावती साठी माणूस फक्त जवळचाच हवा असं नाही हं,
कधीतरी आपल्याच दुकानदाराला ही म्हणावं "काका तांदूळ चांगले होते हं तुमच्या कडून घेतलेले"

सामान्य माणसांपासून अगदी कलाकारां पर्यन्त ह्या पोचपावतीची गरज असतेच, ही दखल घायला आणि द्यायला ही वयाच बंधन नसावं कधीच ! 

काही काही नाती ही पोचपावती पलीकडची असतात ,
पण तरीही अधूनमधून ह्याचा शिडकावा नात्यात नक्की आनंद देऊन जातो ..! 

बरेचदा सततच घेतली जाणारी दखल काही खरी वाटत नाही ... 
तसं करूही नये कारण पोचपावती जितकी उस्फुर्त, तितकीच जास्त खरी !! 
ही फक्त शब्दातूनच नाही तर डोळ्यातून,कधी कृतीतून, स्पर्शातूनही व्यक्त व्हावी.
जसं जसं ज्याच्याशी नातं तशी तशी ती पोचवावी...

कधी योग्य आदर ठेवून,
कधी गळा मिठी मारून,
अगदी कधी "च्यामारी भारीच काम केलंस तू भावड्या" अशी वेगळ्या भाषेतून ही यावी.
 
माणूस जितका दिलखुलास तितकीच ही दाद उस्फुर्त,
महत्वाचं म्हणजे ती स्वीकारणाराही तितकाच ह्या मुलांच्या भाषेत cool dude हवा. 

ह्या appreciation ने काम करायला दुप्पट ऊर्जा मिळते, उत्साह मिळतो,
नातं घट्ट व्हायला एक छोटासा धागा मिळतो... 
आणि तसं म्हणाल तर ह्यासाठी काही लागत नाही फक्त मोकळं आणि स्वच्छ मन ... !!!

तर मग होऊन जाऊ द्यात एखादी झकास,
दिलखुलास दाद !!! 

शेवटी फक्त एकच
आपण रोज घेत असलेल्या
श्वासांसाठी सुद्धा,
त्या शक्तीला पोचपावती देणं आपल्याच मनाला समाधान,
शांतता देऊन जातं!

इसापनीती तात्पर्य :
ह्या सगळ्या प्रपंचात
माणसाने स्वतःचीही तितकीच
दखल घ्यावी आणि
स्वतःवरही खूश होऊन "लगे रहो,'
म्हणून आपणच आपला आत्मविश्वास वाढवावा."


❤❤❤️❤❤❤️❤❤❤️❤❤❤️❤❤❤️❤❤❤️❤❤❤️❤❤❤️❤❤❤️❤❤❤️❤❤❤️❤❤❤️❤❤❤️




#########################################################

निघून चाललीत माणसं अगदी कुणाचाच निरोप न घेता..

कष्टाने उभं केलेलं आयुष्य,गोडीने जपलेला संसार,चिमुकल्यांचं हसणं, जोडीदाराचं रागावणं, थोरा मोठयांचे आशीर्वाद, कधी कारण होतं म्हणून तर कधी विनाकारणच घातलेला वाद....
असूया,द्वेष, तिरस्कार,पैसा,मोह..
सगळं सगळं मागे टाकून निघून चाललीत माणसं.

ऑक्सिजनची खालावत जाणारी पातळी पाहून काय वाटत असावं मनाला नेमकं.?🤔
कुठल्या गोष्टी असतील तेंव्हा प्रकर्षाने आठवणाऱ्या?🤔

नको भांडायला हवं होतं तेंव्हा, उगाच बोललोत अपशब्द, उगाच धावत गेलोत इतकं..
ती एक ठरवून रद्द केलेली भेट घ्यायला हवी होती,
आणि आईस्क्रीम खायचं होतं मनसोक्त थंडीच्या दिवसात,
कोकणात जाऊन एकदा विहरायचं होतं आकाशात निळा समुद्र पायाखाली घेऊन,

आवडतील त्या रंगाचे कपडे घालून भटकायचं होतं लोकांचा विचार न करता,
म्हणायचं होतं एकदा तिला येस...आय मिस यु टू ! 
कडकडून मिठी मारायची होती आईला,
मुलीला शिकवायची होती सायकल,
बायकोला करायची होती मदत तिच्या रोजच्या कामात आणि पाय चेपायचे होते थकलेल्या बाबांचे..
तो ऑफिस मधला कलीग वाईट वागलाय आपल्याशी पण तो आजारी होता तेंव्हा करायला हवा होता आपण एक फोन..म्हणायला हवं होतं काळजी नको करूस...
किती वर्ष झालीत बोलला नाहीए एक मित्र त्याची घ्यायला हवी होती खबर एकदा तरी.


साठवलेल्या पैशांचा बॅलन्स शीट सांभाळताना जगण्याचा बजेट कोलमडत गेला आपला.
अगदी मनमुराद ,खळखळून हसायला पण किती दिवस झालीयेत आठवत नाहीए 
आता या क्षणाला आणि मोकळं रडायलासुद्धा किती बरं दिवस झालीत! 
बीचवर नुसतंच चांदणं पीत अख्खी रात्र घालवायची होती तिच्यासोबत...


किती सोप्या होत्या  या सगळ्याच गोष्टी !
सोपं होतं जगणं....
मग का कठीण करत गेलो आपण....
का जगणं सोडून धावतच राहीलोत आपण!
का कधीच थांबून पाहिलं नाही मावळणाऱ्या सूर्याचं ..
का झेलला नाही कधीच पाऊस अंगाखांद्यावर...

का कधीच पायाला लागू दिली नाही माती!

ही ऑक्सिजनची पातळी एकदा वर आली ना की सुरुवात करायचीए जगायला...
प्रेम करायला स्वतःवर आणि जगण्यावरसुद्धा!

====================================================


तात्विक "भांडण" सर्वांशी होते, पण "शत्रुत्व" कुणाशीचं ठेवू नये... खरं तर "मतभेद" एकमेकांशी असू शकतात, जरूर असावे, पण मनात कायम "भेद" ठेवू नये.. एखाद्याशी "वाद" घालावा, पण वादावादी न करता क्षणात "सुसंवाद" साधवा.
      "अहंकार" हाच या सर्वांचं मुळ आहे, तो विनाकारण बाळगुन जगू नये..
       शेवटी "मृत्यू" हे सुंदर, शाश्वत "वास्तव" आहे, त्याचे "स्मरण" असावे "भय" नसावे.आपण जन्माला आलोय ते गेलेले दिवस मोजण्यासाठी नाही तर उरलेल्या दिवसांचा "आनंद" उपभोग घेण्यासाठी, याचे "स्मरण" ठेवू या. आपण किती आनंदात आहोत त्यापेक्षा आपल्यामुळे किती जण आनंदात आहेत याला खूप महत्व आहे."एक हृदय" घेऊन आलोय जाताना "लाखो हृदयात" जागा करुन जाता आलं पाहिजे.
       प्रेम द्या, प्रेम घ्या.
         🌹 जय मल्हार 🌹

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++


माणसा - माणसात खूप फरक असतो . कमावलेल्या विश्वासाला तडा जाऊ न देण्यासाठी काहीजण आयुष्यभर झटत असतात तर काहीजण धोका देण्यासाठी मोकाच बघत असतात .

            तोंडावर चांगले बोलणारे आणि पाठीमागे आपली निंदा ,थट्टा मस्करी करणाऱ्या लोकांपासून सुद्धा " सोशल डिस्टन्स " पाळणे आवश्यक आहे कारण अशी लोकं कोरोना पेक्षा ही घातक असतात .
जरूरी नाही नेहमी वाईट कर्मा मुळेच दुःख सहन करावे लागते . कित्येकदा वाजवीपेक्षा जास्त चांगलं वागण्याची किंमत पण मोजावी लागते . कधीकधी " जशास तसे " वागणं सुद्धा बरोबर असतं . कारण जास्त समजूतदारपणा दाखवला की माणसं डोक्यावर बसतात .

00000


चव....

बऱ्याचदा घरी एखादा खास पदार्थ खाल्ल्यावर आपण म्हणतो . . .  बनलाय चांगला पण चव मागच्या वेळेसारखी नाही बरं का ??? 
किती सहजपणे बोलून जातो आपण. बनवणाऱ्या व्यक्तीने काही दिवस आधी ठरवून आणि काही तास मन लावून बनवलेला असतो हा पदार्थ. जीव ओतून केलेल्या या पदार्थावरची आपली एक कॉमेंट तिचा हिरमोड करायला पुरेशी ठरते आणि नव्याणव टक्के हा पदार्थ बनवणारी व्यक्ती तुमची आई, पत्नी किंवा सुन असते.
कशी असेल हो चव मागच्यासारखी सेम टू सेम?

बाजारातून आणलेल्या जिन्नसांचं सोडा, पण इतरही अनेक गोष्टी कारणीभूत आहेत चवीत बदल करणाऱ्यासाठी. मला सांगा, पूजेच्या दिवशी सत्यनारायणाचा प्रसाद आणि इतर दिवशी त्याच मापाने बनवलेला शिरा वेगळा का लागतो बरं?

उन्हाळ्यात खाल्लेली आणि पावसाळ्यात खाल्लेली कांदा भजी वेगळी का लागतात? कितीही लज्जतदार जेवणाचा पहिला घास आणि शेवटचा घास सारखाच लागतो का हो ? नाही ना ? कारण चवीची अनुभूती स्थलकालऋतू परत्वेच नव्हे तर तुमच्या मनस्थिती (मूड) वर पण अवलंबून असते, तुमच्या भूकेवर अवलंबून असते, तुमच्या त्या व्यक्तीवरच्या प्रेमावर पण अवलंबून असते.

एरवी बघताक्षणीच फस्त होणारा पिठलं भात घरात घडलेल्या एखाद्या दुःखद प्रसंगानंतर खाताना कुठे चवदार लागतो सांगा बरं ! एखाद्या व्यक्तीच्या विरहात किंवा आठवणीत 'अन्न गोड लागत नाही' असे म्हणतात ते यालाच. पदार्थाची चव तीच असते, तुम्हालाच बेचव किंवा वेगळी लागते.

कधी तुमची नववी-दहावीतली मुलगी पहिल्यांदाच तिच्या आईच्या देखरेखीत एखादी साधीशी भाजी बनवते. किती धांदल असते तिची ! काहीतरी नक्कीच कमी पडलेलं असतं त्या भाजीत. पण कसले खुश असता तुम्ही. इथे कौतुकाच्या मसाल्याने त्या भाजीची चव बदललेली असते.

कधी सणकून भूक लागली असते, तेव्हा घरातली शिळी भाकरी पण गोड लागते. रोजच्या घाईत ऑफिसला निघता निघता कसाबसा प्यायलेला चहा आणि सुट्टीच्या दिवशी आरामखुर्चीत पेपर वाचत घेतलेला तोच चहा परत 'घोटभर' प्यावासा वाटतो. कधी कधी लग्न होऊन गेलेल्या बहिणीकडे जेवताना तुम्हाला प्रत्येक घासागणिक तुमच्या आईच्या हातच्या चवीची आठवण येते; टचकन डोळ्यात पाणी येतं आणि नंतरचा तो प्रत्येक घास त्या आठवणीत अधिकच चवदार होत जातो.

भुकेला धर्म नसतो, अन्नाला जात नसते, पण चवीला मात्र नातं असतं. खरंच सांगतो, चव फक्त पदार्थात नसते, चव मनात असते, चव प्रेमात असते, चव आठवणीत असते.

चवीची अनुभूती घेण्यासाठी जीभ नावाचे एक वेगळे इंद्रिय जरी देवाने दिले असले तरी त्या चवदार आठवणींचा अनमोल ठेवा जपण्यासाठी तुमच्या हृदयासारखी दुसरी जागा नाही. म्हणूनच हृदयात रुळणाऱ्या आणि जिभेवर रेंगाळणाऱ्या प्रत्येक चवीबरोबर एकातरी प्रिय व्यक्तीची आठवण नेहेमीच जपलेली असते ! 😋


000



000



♻️♻️♻️♻️♻️♻️♻️♻️♻️♻️♻️♻️♻️♻️♻️♻️♻️♻️♻️♻️♻️♻️♻️♻️♻️♻️♻️♻️♻️♻️♻️♻️♻️



====================================================


३६ आणि ६३ आकडा


छत्तीस च्या आकड्याचा विचार केला तर, तीन आणि सहा दोन्ही आकडे एकमेकांकडे पहात नाहीत. दोघेही टाईट पणाने पाठीला पाठ लावून उभी आहेत. एकमेकांचं तोंडही पहात नाहीत.

त्याप्रमाणे माणसांच असतं. छत्तीसचा आकडा हा चाळिशीच्या आतला आहे. म्हणून चाळीशीच्या आत माणूस सुद्धा अहंकाराने, ताकदीने, पैशाने, परिपक्व असल्यामुळे तो नेहमीच अहंकारी असतो. कमीपणा घेत नाही. मला गरज नाही, मी त्याचं तोंड पाहणार नाही, असे शब्द त्याच्या तोंडात असतात. सख्ये भाऊ पक्के वैरी होतात. आणि हातात हात न घेता पाठीला पाठ लावतात. 
     
आता ६३ आकडा पहा. या आकड्याने साठी ओलांडल्या मुळे आता हे दोघेही नम्र झालेत दोन्ही आकडे एकमेकांकडे पाहतात हातात हात घेतात एकमेकाला आलिंगन देतात. माणसाचं असंच असतं, एकदा साठी ओलांडली की, नम्र होतो. कारण ना ताकद, ना तारुण्य, ना पैसा, ना सत्ता, काहीच राहत नाही. 

म्हणून हा नम्र होतो. तुम्ही पहा, माणूस तरुणपणी बालपण विसरतो...,  लग्न झाल्यावर आई वडिलांना विसरतो...,  मुलं झाल्यावर भावांना विसरतो..., पैसा आला की आपले नातेवाईक विसरतो..., आणि म्हातारपणी जेवढ्यांना विसरला त्यांची आठवण काढत बसतो. 

६३ च्या आकड्या प्रमाणेच. म्हणून जो आकडा बदलतच नाही त्या  आकड्या  प्रमाणे जगा. संयम राखणे हा आयुष्यातला फार मोठा गुण आहे. कारण एक चांगला विचार अनेक वाईट विचारांना नाहीसा करतो.    

वयाने कोणी कितीही लहान मोठा असु देत. वास्तवात तोच मोठा असतो, ज्याच्या मनात सर्वासाठी प्रेम, स्नेह व आदर असतो.

आयुष्यात तुमच्या सगळ्या अडचणी सोडवू शकेल अशी व्यक्ती शोधू नका. तर... तुम्हाला कोणत्याही अडचणीत एकटे सोडणार नाही अशी व्यक्ती शोधा...!!

************************************************************

जगातला सर्वात श्रीमंत माणुस...!!!

जगातल्या सर्वात श्रीमंत बिल् गेट्सना कोणीतरी विचारलं," ह्या जगात तुमच्यापेक्षा कोण श्रीमंत आहे का...?
बिल् गेट्स म्हणाले, " हो एक व्यक्ती माझ्यापेक्षा श्रीमंत आहे.
समोरच्या व्यक्तीनं विचारलं," कोण...!!!

बिल् गेट्स म्हणाले, 
" एकेकाळी मी प्रसिद्ध किंवा श्रीमंत नसताना, मी एकदा न्यूयॉर्क एअरपोर्टवर असताना सकाळी मला एक न्युजपेपर घ्यावासा वाटला म्हणून खिशात हात घातला तर खिशात एकही डाॅलर नसल्याचं जाणवलं सबब मी तो खरेदी करण्याचा विचार सोडुन दिला...! 
व माझ्याकडं पैसे नसल्याचं सांगितलं.
समोरच्या त्या पेपर विकणा-या  मुलानं माझ्याकडं बघुन तो न्युजपेपर फुकट देण्याचं ठरवलं...!!!

तीन महिन्यानंतर योगायोगानं मी त्याच एअरपोर्टवर उतरलो असता मला पुन्हा न्युजपेपर घेण्याचा मोह झाला परंतु त्याही वेळी माझ्याकडे पैसे नसल्याने मी मोह आवरला.
पण यावेळीही त्याच मुलानं परत मला न्युजपेपर ऑफर केला...!
पण मी नम्रपणे नकार दिला, व सांगितलं मी नाही घेऊ शकत...!!!

यावर त्या मुलानं सांगितलं की तुम्ही हा न्यूज पेपर  घ्या कारण हा मी तुम्हाला माझ्या फायद्याच्या पैश्यातुन देत आहे, त्यानंतर मी तो घेतला...!!!

१९ वर्षानंतर मी जेव्हा जगातला श्रीमंत माणुस झाल्यानंतर मला त्या पेपर विकणा-या मुलाची आठवण झाली...
मी त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली, तब्बल दीड महिन्याच्या तपासांती मला तो सापडला..!

मी त्याला विचारले," तु मला ओळखतोस का ? 
तो म्हणाला," हो तुम्ही बिल् गेट्स आहात...!
मी म्हटलं, तुला आठवतंय का कि कधीकाळी तु मला न्यूजपेपर फ्री दिले होतेस...!
तो म्हणाला, " हो...दोनदा...!"
मी म्हणालो, " मला त्याची किंमत अदा करायची आहे. तुला तुझ्या आयुष्यात जी गोष्ट हवी असेल ती मला सांग...!
मी तुला हवी ती गोष्ट देऊ शकतो...!!!

यावर तो नम्रपणे म्हणाला, " सर पण तुम्हाला असं वाटत नाही का कि तुम्ही ती किंमत देऊ शकणार नाही...!"
मी विचारले," का...???

तो मुलगा म्हणाला, " मी जेव्हा तुम्हाला मदत केली तेव्हा मी गरीब होतो आणि आणि तुम्हाला माझ्या होणा-या फायद्यातुन करत होतो तर तुम्ही मला मदत अशावेळी करत आहात जेव्हा तुम्ही जगातले सर्वात श्रीमंत व्यक्ती आहात...! म्हणुन तुम्ही तुमच्या मदतीची तुलना माझ्या मदतीबरोबर करु शकत नाही...!!!

बिल गेट्सच्या नजरेत तो मुलगा जगातला सर्वात श्रीमंत माणसाहुन श्रीमंत आहे कारण कोणाची मदत करण्यासाठी त्यानं स्वतः श्रीमंत होण्याची वाट नव्हती बघितली...!!!

श्रीमंती पैश्यांची नसते तर मनाची असते कारण कोणाची मदत करण्यासाठी श्रीमंत मन असणं देखील आवश्यक आहे...!!!


👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻





%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%

ऋणानुबंध

       सर्वांचे सर्वांशी काहीना काही ऋणानुबंध हे असतातच, ते व्यक्त होतात वेगवेगळ्या भेटीतून, संकटातून किंवा निर्माण झालेल्या अडचणीतून... बऱ्याच वेळा बऱ्याच ठिकाणी आपलं असं होतं, आपण कोणत्यातरी विचारात खूप मग्न होऊन बस स्थानकावर उभे असतो आणि कोणीतरी सांगून जातं तुम्हाला जिथे जायचे आहे तिथे जाणारी बस आली पहा... एखादी परीक्षा देण्यासाठी जात असलेल्या परीक्षार्थी विद्यार्थ्याला परीक्षा केंद्रावर पोहोचायला उशीर होऊ नये म्हणून कोणी अनोळखी व्यक्ती स्वतःचा अमूल्य वेळ देऊन आपल्या वाहनाने त्या विद्यार्थ्याला परीक्षा केंद्रापर्यंत पोहोचवते....             
        एखाद्या गंभीर आजाराशी झुंज देत रुग्णालयात पुढील उपचारासाठी पैशांची किंवा रक्ताची वाट पाहत असणाऱ्या रुग्णाला कोणी अपरिचित व्यक्ती सहकार्य करण्यास तयार होते.... असे अनेक प्रसंग जेव्हा आपल्या वाट्याला येतात तेव्हा नातं आणि ऋणानुबंध या शब्दांचे खरे महत्त्व कळते.
         ज्यांच्याशी आपलं रक्ताचं नातं असतं ते जबाबदारी म्हणून सहकार्य करतात तर ज्यांच्याशी आपलं हक्काचं नातं निर्माण झालेलं असतं ते ऋणानुबंध मानून स्वेच्छेने सहकार्य करून साथ देतात....
आपण जगातली अनेक सुंदर मंदिरे पाहतो, त्यांच्या निर्मितीचे व सजावटीचे भरभरून कौतुक करतो, इतकेच काय तर त्या त्या देवाच्या असण्या दिसण्यावरून त्याची धर्मानुसार विभागणी देखील करून ठेवतो. पण एक सुंदर मंदिर व एक देव सर्वांकडेच असतो, ज्याच्याकडे आपले सहज दुर्लक्ष होते, ते सर्वात सुंदर मंदिर म्हणजे आपले मन व तो सर्वात चांगला देव म्हणजे आपला स्वभाव.....
                या देवाला कोणत्याच प्रकारच्या विशिष्ट धर्माचा शिक्का नसतो, या मनरूपी मंदिरात कोणत्याच प्रकारच्या रूढी-परंपरा नसून माणुसकी जपणाऱ्या मौल्यवान भावना असतात. त्यांचे सौंदर्य आणि आकर्षकता आपल्या विचारांवर आणि कृतीवर अवलंबून असते, इथे खर्च किंवा कर्ज या व्यवहारीक शब्दांचा वापर केला जात नसून मूल्य आणि महत्त्व यांना महत्त्वपूर्ण स्थान दिले जाते. या मंदिराची यात्रा जेव्हा आपल्यामुळे कोणाचे चांगले होते तेव्हा भरते तर या देवाचा नवस जेव्हा आपल्या सोबत असणारे सर्वजण समाधानी आणि आनंदी आहेत हे समजते तेव्हा फिटतो.
आज आपल्या सर्वांना खूप गरज आहे, ऋणानुबंध निर्माण करण्याची... कारण की सध्या सर्वांमध्ये प्रचंड एकटेपणा आणि तणाव वाढतो आहे. कोणालाच कोणाशी बोलायला किंवा विचारपूस करायला वेळ मिळत नाही, पूर्वी आपल्या शेजारच्या घरातील सर्वांना आपण त्यांच्या नावानिशी आणि स्वभावानीशी ओळखायचो, पण आता मात्र केवळ येता जाता चेहरा पाहिला जातो म्हणून तो फक्त चेहराच परिचित असतो....
        पूर्वी आर्थिक मिळकत कमी असली तरी मानसिक भरभराट खूप असायची... हल्ली काही दिवसांपर्यंत आपण म्हणायचो, शहरातील सर्व घरांचे दरवाजे बंद असतात आणि कोणीच कोणाला विचारत नाही. पण हे प्रमाण आता गावांकडे देखील हळूहळू वाढत चालल्याचे आढळून येते आहे. सध्या इच्छा नसतानाही नाईलाजास्तव ज्या आजाराचा पाहुणचार आपल्याला करावा लागतोय त्या आजाराने दिलेली बहुमूल्य शिकवण जपत शहरातील लोक गावातील नातेसंबंध आणि ऋणानुबंध जपण्याचे अनुकरण करतायेत, तर गावाकडून मात्र शहरातील क्षणिक आनंद देणाऱ्या गुणांचे हळूहळू नकळत अनुकरण करण्यात येताना जाणवते आहे. गावाकडची शेती, कसदार माती आणि घट्ट नाती पूर्वीपासून खूप प्रचलित आणि प्रसिद्ध आहेत, पण आता मात्र शेती आणि मातीचे अस्तित्व तसेच कायम असून घट्ट नात्यांचे प्रमाण कमी होते आहे... तर असे न होता सुसंवादाने विचारांची देवाण-घेवाण आणि माहितीचे आदान-प्रदान करत सुखासमाधानाने आयुष्य व्यथित करूयात आणि निर्माण झालेले प्रत्येक ऋणानुबंध मनापासून जपूयात.

रियाज हनीफ तांबोळी 
सोलापूर.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++


====================================================

मनस्थिती

*नोकरी करणाऱ्याला वाटतं धंदा बरा,
व्यवसाय करणाऱ्याला वाटतं नोकरी बरी,
घरी राहणाऱ्याला वाटतं काही तरी करावं पण घराबाहेर पडावं,
एकत्र राहणाऱ्याला वाटतं वेगळा राहतो त्याचंच आईला कौतुक जास्त,
वेगळा राहतो त्याला वाटतं एकत्र राहतो त्याला जबाबदारी आणि खर्च नाही,
गावात राहणाऱ्याला वाटतं शहरात मजा,
शहरातला म्हणतो गावातलं आयुष्य साधं सरळ सोपं आहे,
देशात राहतात त्यांना वाटतं परदेशी जावं,
परदेशात राहणाऱ्याना वाटतं आपण इथे खूप तडजोड करतो,
केस सरळ असणारी म्हणते कुरळे किती छान
कुरळे केसवाली म्हणते किती हा गुंता
एक मूल असतं त्याला वाटतं  दोन असती तर,
दोन असणाऱ्याला वाटतं एक वाला मजेत,
मुलगी असली की वाटतं मुलगा हवा होता,
मुलगा असला की वाटतं मुलीला माया असते,
ज्याला मूल नसतं तो म्हणतो काहीही चालेल,
नावे ठेवणारे रामातही दोष बघतात
कौतुक करणारे रावणाचीही स्तुती करतात

मिळून काय?
नक्की चांगलं काय ते काही केल्या कोणाला कळत नाही.
मी बरोबर आहे पण सुखी नाही दुसरा मात्र पक्का आहे तरी मजेत आहे.
किती गोंधळ रे देवा हा?
तू बसलाय वर निवांत आम्ही मात्र खाली बसलोय धक्के खात!*

म्हणुन म्हणतो जे आहे ते स्विकार करा आणि अयुष्य आनंदात जगा...

                    00000000000000000000000000000000000000000000

मऊभात

मऊभात हे प्रकरण साधं सरळ वाटत असलं तरी सगळ्यांना तो करायला जमतोच असं नाही. तो डावाने वाढता येईल इतपत घट्ट असायला हवा पण पानात वाढल्यावर आपसूक पसरायला हवा इतका पातळ सुद्धा हवा. 

पाणी आणि भात व्यवस्थित मिळून यायला हवेत. काही जणांनी केलेला मऊभात म्हणजे एकाच घरात राहून एकमेकांचं तोंडही न बघणाऱ्या भावांसारखा पाणी एकीकडे आणि भात एकीकडे असा होतो आणि काही जणांचा अगदी गोंद असतो तसा चिकट. असा झाला की मग खाववत नाही. 

पातेल्यात मस्त रटरट आवाज करत शिजलेला असेल तर उत्तम. चुलीवर पितळीच्या पातेल्यात शिजताना बघायला सुद्धा भारी वाटतो आणि पातेल्याच्या कडांना त्याची पातळ साय धरते ती खायला भारी वाटते एकदम.

असा मस्त गरम गरम भात चुलीवरून उतरला की त्यात घरी कढवलेलं कणीदार तूप घालायचं. लोणकढं तूप असेल तर अजून मस्त. मेतकूट आणि मीठ घालायचं आणि व्यवस्थित ढवळायचं. पानात भात वाढून घ्यायचा.

या मऊभाताबरोबर तोंडी लावायला पोह्याचा पापड भाजून घ्यायचा. कुरकुरीत काहीही असलं तरी छानच लागतं. पण पोह्याचा पापड, फेण्या, कुरडया असल्या तर एकदमच झकास. 

उडदाच्या पापडाचं आणि मऊभाताचं फारसं जमत नाही. चिवडा, भडंग असलं काहीही असलं तरी मस्त लागतं. 

पापड भातावर ठेऊन मऊ झाला की अजून मस्त लागतो. डावीकडे आंब्याचं, लिंबाचं, आवळ्याचं, काकडीचं, आंबेहळदीचं, सुखांब्याचं यातलं कसलंतरी लोणचं हवं. उकडंब्याचा खार असला तर अजून मस्त. 


मउभात शिजत असताना जर त्यामध्ये 2, 4 तोंडली टाकली, तर मस्त शिजून येतात व किंचित मिठाचा दाणा टाकून अप्रतिम लागतात.

मिठाचा दाणा हा शिजलेल्या तोंडल्यात टाकायचा व ते कुस्करून मग तोंडी लावायचे.

लसणीचं तिखट असेल तर भातावर सगळीकडे पेरून घ्यायचं. आदल्या दिवशी रात्री केलेलं कुळथाचं पिठलं असेल तर सोने पे सुहागा.

या सगळ्या चविष्ट यज्ञात भर टाकायला म्हणून घरीच छान विरजलेलं घट्ट दही हवं. भांड्यातलं दही मोडताना अगदी जीवावर येत असेल तर ते दही उत्तम.

अशी ही सगळी सामुग्री जमली की मजा येते. भाताबरोबर तोंडी लावायला म्हणून बाकी सगळं घेतलेलं आहे की बाकी सगळ्यांबरोबर तोंडी लावायला म्हणून भात घेतलाय असा प्रश्न पडला पायजे. 

ही अशी न्याहरी करताना जीव अगदी तृप्त होऊन जातो.

मऊभाताची गम्मत म्हणजे खाल्ल्यावर व्यवस्थित पोट भरतंच पण दुपारी जेवणाच्या वेळी व्यवस्थित भूक सुद्धा लागते. आणि पोटाला थंड एकदम.

लहानपणापासून या अशा मस्त न्याहारीवर कित्येकांचे देह पोसले असतील...

@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@



====================================================

मन साफ तर सर्व माफ

               नेहमी भूतकाळातील गोष्टी विसरून जात चला. कारण सतत मागच्या गोष्टीचा विचार करत राहिलात तर त्याचा परिणाम वर्तमानातील जगण्यावर आणि भविष्यावर होत असतो. लोक आपल्याविषयी काय बोलतात याकडे अजिबात लक्ष देण्याची गरज नाही. कारण पाठीमागे लोक तर राजालासुद्धा शिव्या देत असतात. प्रत्येक समस्येवर उपाययोजना आहेच. काळाच्या ओघात सगळ्या गोष्टीवर उपाय सापडतो त्यासाठी काही वेळ जाऊ द्यावा लागतो.

               स्वतःच्या आयुष्याची कधीही इतरांशी तुलना करू नका आणि त्यावरून इतराविषयचे मत बनवू नका. कारण त्यांच्या आयुष्यातील वादळे आणि संकटाची तुम्हाला कल्पना नसते. अतिविचार करीत बसू नका. काही प्रश्नांची उत्तरे न मिळालेलीच बरी असतात. कदाचित तुम्ही अपेक्षा ठेवली नसतानासुद्धा ती तुमच्यापर्यंत नक्कीच पोहचतील. तुमच्या आनंदाला फक्त तुम्हीच जबाबदार आहात. आपण आनंदी रहायचे किं दु:खी हे ठरवण्याचे अधिकार कुणालाही देऊ नका.

               पोट दुःखेपर्यंत हसा. लक्षात ठेवा जगातील सगळ्या प्रश्नांचा भार कुणीही तुमच्या डोक्यावर दिलेला नाही सुंदर डोळ्यासाठी जगातील फक्त चांगल्या गोष्टीकडेच पहा! सुंदर ओठासाठी नम्र आणि मृदू भाषेचा वापर करा! कधीही आपणं एकटे नाहीं याची जाणीव ठेवा! आयुष्याच्या वाटेवर चालत राहून आनंदाने जगा !! 

               कधी कधी केराचा डबाही आपल्याला मनापेक्षा बरा वाटतो. कारण तो दिवसातून एकदा का होईना निदान रिकामा तरी होतो. आपण मात्र मनात कितीतरी दुःखद आठवणी साठवतो... काय मिळवतो यातून आपण...? आपणच स्वतःचे दुःख वाढवत राहतो. घडून गेलेल्या वाईट गोष्टी वर्षानुवर्षे मनात ठेवतो आणि चघळत बसतो. त्या ज्या गोष्टीमूळ घडल्या त्यांचा पूढे आपणच तिरस्कार करतो. आता केराच्या डब्यासारखचं दररोज आपलं मन साफ करायचं जुने दुःख विसरून सारे नवीन स्वीकारायचे नव्या सुखाना त्यात आनंदाने भरायचं सुखी जीवनाचे तंत्र आता आपण सर्वांनीच शिकायचं स्वतः नेहमीच आनंदी रहायचं आणि दुसऱ्यांनाही आनंदी ठेवायचं !

               एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा आपलं मन साफ ठेवा कुणाबद्दल राग, द्वेष, सूडबुद्धी, तिटकारा, आकस ठेवू नका. मग पहा आयुष्यात काहीच चुकीचं घडणार नाही आणि आयुष्य देखील सुंदर होईल !! 

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++


**********************************************************

 
++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

 गैरसमज

कोणतेही नाते टिकवायचे असेल किवा त्या नात्याला चिरंतन जपायचे असेल तर त्या नात्यामधे विश्वास हवा... 

पण अनेकवेळा बरेचजण आपलेच  घोडे पुढे नाचवत असल्यामुळे कधी कधी वादाचे व आत्मसन्मानाचे प्रश्न ऊभे राहतात. नातं बनवणं सोप्पं असतं पण ते टिकवने एक तपश्चर्या करण्यासारखे असते.

एखादे नाते जोडल्या नंतर त्याचे विश्वासाने संगोपण करणे ही जबाबदारीची जाणीव प्रत्येकाला असली पाहिजे.  समोरच्या व्यक्तीची जबाबदारी , त्या व्यक्तीची इतर कामे किंवा त्या व्यक्तीच्या काही  priorities असु शकतात हे समजुन घ्यायला हवे, त्या व्यक्तीलासुद्धा इतरांना वेळ देता यायला हवा असे समजुतीचे वागणे दुसऱ्याचे असायला हवे... 

असे जर प्रत्येकाने वागले तर प्रत्येकाचे नाते छान आयुष्यभर टिकवता येईल; यात प्रश्नच नाही. कुठेतरी स्वतः तडजोड करायला हवीच...  नाहीतर उठसूट समोरच्या व्यक्तीला घालुन पाडुन बोलणे.. त्या व्यक्तीची बाजु ऐकुन न घेणे . समोरच्या व्यक्तीने कितीही समजवायचा प्रयत्न केला तरी स्वतःच निष्कर्ष काढुन मोकळे होणे. एक ना दोन... 

कधीतरी कोणीतरी तात्पुरते समजुन घेणार... परत येरे माझ्या मागल्या. . . छे छे... याला नातं जपणं नाही म्हणता येणार. . . ही एकप्रकारची असुया आहे नव्हे विकृती हा शब्दसुद्धा लागु पडेल अशा संबंधाना...

अशा नात्यामधे कधी  गैर आला की... त्याचा गैरसमज व्हायला वेळ नाही लागत. म्हणूनच नात्यात असलेल्या विश्वासाला , त्यातील समजाला कधीच अविश्वास किंवा   गैरसमज होऊ न दिलेले बरे... कारण नातं हे काचेसारखं असते ... एकदा का त्याला गैरसमजाचा स्पर्श झाला की तडा जायला वेळ नाही लागत. . . लगेच तडकतं. . . आणि पुन्हा जोडु म्हटले तरी जोडता येत नाही शेवटी नाजुक अशा काचेलाच तडा गेला असतो.  म्हणुनच गैरसमजातला "गैर" काढुन टाकला तर आयुष्य हे खुप सुंदर आहे... 

पण काहींना हे जमते काहीना नाही जमत... ज्यांना जमलयं ते नक्कीच सुखात आहे. आणि ज्यांना जमले नाही ते अजूनही गैरसमजामधेच, व त्याच्या  गुंतागुंतीमधेच अडकले असतील... असो.


############################################################



=====================================================




++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++


पांघरूण  

पांघरूण ह्या शब्दातच अतिव माया नि उब दाटलेली आहे. बाहेर धो धो पाऊस पडतोय असं दिसलं, की, मस्तं पांघरूण लपेटून गुडूप व्हावं वाटतं. झोप येवो, न येवो ! पण पांघरुणाची उब हवीहवीशी वाटते.

हिवाळ्यात एक पांघरूण पुरतच नाही! पूर्वी गोधडी, दुघडी, चौघाडी अश्या अनेक पदरात दाटलेली माया उब देत असे. आता, सोलापुरी चादर, ब्लॅंकेट, दुलई, रजई ह्यासारखी पांघरायला अनेकविध साधनं उपलब्ध आहेत.

पण मला आठवतंय, लहानपणी जेंव्हा दरदरून ताप आला होता, तेंव्हा आजीच्या लुगड्याच्या चार गोधड्या अंगावर टाकल्यावर, इतकी उब आली होती, नि कसकसलेल्या अंगाला तो स्पर्श सुखद वाटत होता. थोड्याच वेळात दरदरून घाम फुटल्यावर, त्या चार गोधड्या अंगावर नकोश्या झाल्या, सहन होईनाशा झाल्या, म्हणून पायांनीच सरकवून दिल्या! 
तेंव्हा आजीं म्हणाली होती, "राजा, काम झालं म्हणून असं लाथाडू नये रे पांघरूण! त्याच्या  मुळेच तर उतरला ताप तुझा!" 

झोपतांना गरज नसली तरी पायापुरते पांघरूण घ्यावेच हा आजीचा संस्कार. "त्यात पाय कधी उघडे ठेवून झोपू नये, पायांना उब राहिली तर रक्तप्रवाह सुरळीत चालतो," हे एकही इयत्ता न शिकलेल्या माझ्या आजीचे वाक्य माझे पाय दुखू देत नाहीत.

"चारचौघात कोणी उघडं पडतंय, वाभाडे काढल्या जातायेत हे दिसलं,  की, त्यावर पांघरूण घालावं!" हे मला आजीनेच शिकवले, कारण ह्यामुळे मन मरून जातं नि मेलेलं मन घेऊन शरीर जगवण्यात काही अर्थ नसतो, हे तत्वज्ञान स्वयंपाक घरात चुलीपाशी बसलेल्या आजीच्या डोक्यात कुठून आलं असेल?

"चुका झाकायच्या नि गुण उघडे पाडायचे," हे फक्त मायेचे पांघरूण असेल तरच शक्य होते. हृदयात अतिव माया, कणव असावीच, पण ही माया पांघरून जर कोणी निष्क्रिय होत असेल, तर पांघरूण ओढून कमरेत लाथ घालून उठवण्याची हिंमत पण हवीच!
हे वरवर कठोर वाटलं तरी, आपलं माणूस कर्मप्रवृत्त व्हावं ही देखील मायाच असते.

परवाच एक जोक वाचला, अंथरूण पाहून पाय पसरावे ह्या म्हणीवर. "माझ्याकडे खूप अंथरूणं आहेत पण पाय दोनच आहेत तर मग मी अजून पाय कुठून आणू पसरायला ?" ह्याला 'ते लोक' जोक म्हणत होते म्हणून, अन्यथा, यात हसण्यासारखे नाही, तर बुद्धीची कीव करावी, असे काही आहे! जरूरीपुरते असते त्यालाच पांघरूण म्हणतात अन्यथा तो फाफट पसाराच! 

आवश्यक तेंव्हा वापरावं, इतरवेळी घडी करून जतन करावं, 
नको असेल, तर, ज्याला गरज त्याला द्यावं! 

"दुसर्‍याचं उघडं झाकावं" ही दानत असेल तरच दुसर्‍याच्या चुकांवर पांघरूण घालण्याची वृत्ती तयार होते!


           @@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@


एकदा एका माणसाला भगवान बुद्धांचा अपमान करण्याची लहर आली. म्हणून तो त्यांचा सर्वांसमोर अपमान करण्याच्या उद्देशाने त्यांच्याजवळ पोहोचला. त्यांच्या जवळ जाताच त्यांच्यावर ओरडून बोलू लागला, ‘तुम्हाला लोकांना शिकवण्याचा आणि ज्ञान देण्याचा काहीएक अधिकार नाही, तुम्ही खोटे आहात.' असं खूप काही अपमानास्पद बरळू लागला.

इतके होऊनही भगवान बुद्धांनी मुखातून एकही अक्षर काढले नाही आणि ते स्मितहास्य करत शांत मुद्रेने स्थितप्रज्ञ राहिले.
भगवान बुद्धांना शांत बसलेले पाहून तो माणूस अधिकच चिडला. आपण इतके अपशब्द बोलूनही बुद्धांना शांत पाहून त्याला कमालीचे आश्चर्य वाटले. वैतागून आणि रागानेच त्याने बुद्धांना विचारले, “मी तुमचा इतका अपमान केला, शिव्या दिल्या तरी तुम्ही माझ्यावर का चिडत नाही आहात?”

यावर भगवान बुद्धांनी सुरेख उत्तर दिले. ते म्हणाले, “हे भल्या माणसा मला एका प्रश्नाचं उत्तर दे. जर तू एखाद्या व्यक्तीसाठी काही भेटवस्तू घेतलीस आणि त्या व्यक्तीला दिलीस, पण त्या व्यक्तीने तुझी भेटवस्तू स्वीकारण्यास नकार दिला किंवा स्वीकारलीच नाही तर त्या भेटवस्तूचं तू काय करशील?”

तो माणूस भगवान बुद्धांच्या या अनपेक्षित प्रश्नाने विचारात पडला. तो म्हणाला, “ज्याअर्थी समोरच्या व्यक्तीने भेटवस्तू स्वीकारण्यास नकार दिला तर... ती भेटवस्तू माझ्याकडेच राहील.”

यावर बुद्धांनी शांतपणे उत्तर दिले, “'त्याच प्रमाणे तू माझा अपमान करण्याच्या उद्देशाने इथे आलास, तू दिलेल्या शिव्या, अपमानास्पद शब्द मी स्वीकारले नाहीत. म्हणून ते सर्व तुझ्याकडेच राहिले. खरतरं या गोष्टीचा तुला त्रास होईल, दुःख होईल हे मला माहित होते म्हणूनच मला तुझा राग आला नाही."

इतक्या सहज आणि सोप्या शब्दात मूल्यवान गोष्ट भगवान बुद्धांनी सांगितली आहे जी आपल्या रोजच्या आयुष्यात हि उपयोगी पडते. जेव्हा कोणी आपल्यावर टीका करतो, विनाकारण अपमान करतो तेव्हा त्याचा त्रास करून घेण्याऐवजी त्याचा स्वीकार न करता संयम बाळगणे हेच शहाणपणाचे ठरते. अशा व्यक्तींकडे दुर्लक्ष करणे आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवणे हे केव्हाही चांगले.


                                 00000000000000000000000000000000000000000000

एक विनंती.. सर्व पुरुषांना..... 

 नात्यातील जवळच्या माणसाने अचानक जग सोडलं अन मृत्यू किती भयानक असतो याची पुन्हा एकदा जाणीव झाली. तो आक्रोश, ते अश्रू, ते दुःखं.. सांत्वनापलीकडचं होतं. एकवेळ वृद्धापकाळाने आलेल्या मरणाला माणूस सज्ज असतो पण अकाली मरण म्हणजे कधीही न भरून काढता येणारी पोकळी. नुसत्या बातमीनेच कापरं भरलं होतं, माझीच अवस्था अशी असताना त्यांच्या बायका मुलांची काय झाली असेल याची कल्पना न केलेलीच बरी. काही गोष्टी घडून जातात पण येणाऱ्या काळासाठी काहीतरी शिकवण देऊन जातात. 

     आपल्या जवळची, आसपासची किंवा घरातलीच पुरुष मंडळी. भेसळीच्या या युगात पोटात ढकललेलं अन्न आत जाऊन काय उलथापालथ करेल, नाकावाटे घेणाऱ्या श्वासातुन कित्येक जंतू दळणवळण करत असतील अन बाहेरून सुदृढ दिसणाऱ्या शरीराच्या आत काय युद्ध चालू असेल हा डोळ्यांनाही न दिसणारा शाप असतो. तो कधी एकदा पलटवार करून घात करेल सांगता येत नाही.


      स्त्रिया जसं स्वतःकडे दुर्लक्ष करतात त्याहून अधिक ही पुरुष मंडळी स्वतःच्या दुखण्याकडे सपशेल दुर्लक्ष करत असतात. पोटात दुखत असेल, छातीत दुखत असेल, चक्कर येत असेल तरीही 'मला काय होतंय..मी बरा आहे..' असं दुखणं आतल्या आत दडपून टाकण्याचा जवळ जवळ सर्वच पुरुषांचा स्वभाव. जबाबदारी, कर्तव्य, अनाहूतपणे अंगावर ओढवून घेतलेली कामं या सर्वांना न्याय देण्याचा स्पर्धेत ही मंडळी आपणही किती महत्वाचे आहोत हेच विसरतात. कुटुंबासाठी कमावताना दिवसरात्र काम करून यांना संध्याकाळी आल्यावर मुला बाळांनाही न्याय द्यायचा असतो, बायकोची दुखणी खुपणी ऐकून घ्यायची असतात,  खुशालीही ऐकून घ्यायची असते, आई वडिलांची औषधही आणायची असतात..आणि हे सगळं करताना खिशा रिकामाही राहू द्यायचा नसतो. सतत भविष्याचा विचार..सतत कुटुंबाची काळजी..हे सगळं करताना आपणही एक शरीर आहोत, त्या शरीराचीही आपल्याला काळजी करायची आहे हे ते सपशेल विसरतात. दुसऱ्याला शांत नीज असं सांगताना आतून त्याची किती झीज होत असते याची नोंद तो ठेवतच नाही. मीच जर दुखणी पुढे करत राहिलो तर माझं कुटुंब कुणाकडे बघेल? त्यामुळे आतल्या आत अश्या दुखन्यांना दाबून टाकून पुरुष पुन्हा सज्ज होतात, आणि मग निसर्ग अचानक एखाद्या क्षणी पलटवार करतो अन जागीच सगळं संपतं. अवचित कुणी पाहुणा आला की त्याच्यासोबत उन्हातान्हात फिरणं, सरकारी कामात तासनतास ताटकळत उभं राहणं, ऑफीस/शाळा मधील संभाव्य रिस्क ओळखून अचूक काम करण्यासाठी धडपड करणं, नोकरीवर गदा येऊ नये म्हणून शहाण्यांना प्रतिउत्तर न देता येणं, एवढं करून घरात कुणी नाराज असेल तर पुन्हा त्याच्या खुशालीसाठी जीवाचं रान करणं..हे सगळं करत असताना होणारी ओढाताण किती पुरूष मंडळी बोलून दाखवतात??


      सर्व पुरुष मंडळींनी आता थोडं सजग व्हायला हवं, आपल्याला काहीही होणार नाही या भ्रमातून बाहेर यायला हवं. वेळेवर सर्व चाचण्या करून घ्यायला हव्यात. ज्यांच्यासाठी आपण धावपळ करतोय त्यांच्यासाठी आपणच सर्वस्व आहोत याची जाणीव ठेवा. आपण स्वतःसाठी महत्वाचे नसलो तरी दुसऱ्यांसाठी आपण सर्वोच्च स्थानी आहोत हे लक्षात घ्या. वय वाढतं तसे विकार वाढतात. पुरुषांसाठी जबाबदारी कधीही संपत नाही, पण हे ओझं पेलायला आपला खांदा सुरक्षित असावा नाहीतर दुसऱ्यालाच त्याचा खांदा आपल्याला द्यायची वेळ येऊ देऊ नये.

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻





%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%



       
*************************************************************

आमचं फार पटतं,
We are very close _
जवळपास ही वाक्यं बऱ्यापैकी खोटारडी आहेत!
माणसाचं दुःख कमी होण्यासाठी 
हल्लीच्या तकलादू Relations चा काहीही उपयोग नाही..
उपयोग का नाही ?
कारण मित्र किंवा नातेवाईक कितीही Close असोत,,,
हल्ली फक्त Get together करतात,
शेक हॅन्ड करतात,
आपलं यश सांगतात,
त्याचं आवर्जून प्रदर्शन करतात, पण कोणीही कुणाला आपलं दुःख सांगत नाही, त्यात मात्र कमीपणा मानतात, स्वत:चं अपयश समजतात..!
खाणे-पिणे, हसणे-खिदळणे 
किंवा एखाद्या रेकॉर्डेड गाण्यावर 
सर्वांनी मिळून डान्स करणे
हे सुख नाही, हा फक्त सुखाचा आभास निर्माण करण्याचा प्रयास आहे..
याचा अर्थ या गोष्टी करू नयेत असा नाही.
परंतु जोपर्यंत माणसं खरं दुःख एकमेकाला सांगणार नाहीत, मनमोकळं रडणार नाहीत, 
तोपर्यंत आपल्याला कधीही हलकं वाटणार नाही..!
आजूबाजूला काय दिसतंय.?
चेहरे चिंताग्रस्त आहेत 
मुखवटे मात्र हसत असतात.
म्हणून आजकाल माणसं 
खूप दुःखी दिसतात. 
मग यावर उपाय.. ?
उपाय नक्कीच आहे!
आपल्या दुःखाला कुणी हसणार नाही, माघारी टिंगल टवाळी करणार नाही हा विश्वास आपल्याला निर्माण करावा लागेल.
तरंच आपल्या भेटण्याला काही तरी अर्थ असेल !
हसणे आणि रडणे या क्रिया जोपर्यंत खळखळून होणार नाहीत तोपर्यंत आनंदी किंवा Fresh चेहरे कधीही दिसणार नाहीत!
मनातल्या मनात दुःख कोंडल्यामुळे किंवा भावभावनांचा निचरा न झाल्यामुऴेच रक्त वाहिन्या मध्ये ब्लॉकेजेस होतात,
आणि दिवसेंदिवस आपल्याशी मनापासुन गोड बोलणाऱ्यांची संख्या कमी होत चालली आहे.
एक लक्षात घ्या -
ब्युटी पार्लरमधे गेल्यामुळे चेहरे तेजस्वी होत नसतात.
मसाज केल्यामुळे वेदनाही कमी होत नसतात ..
चार फोटो काढल्याने सौंदर्य वाढत नाही...
इतरांविषयी पाठीमागे वाईट बोलण्याने आपण चारित्र्यसंपन्न असल्याचे सिध्द होत नाही, उलट आपलं खरं रुप बाहेर पडतं...
पूर्वी आपण एकाद्याकडे पाहुणे होऊन जायचो, जे देतील ते आनंदाने खायचो.. 
ओसरीवर, बैठकीत, एकत्र झोपायचो..
खळखळून हसायचो..
एकमेकाला दुःख सांगून 
गळा काढून मग मन मोकळे रडायचोही..
हुंदक्यांमागे हुंदके यायचे 
आणि Automatic कपालभाती होवून जायची..
कुणीतरी जवळ घ्यायचं,
पाठीवरून हात फिरवायचं,
रडू नको म्हणत म्हणत 
घट्ट कवटाळून धरायचं..
खूप मोठा आधार वाटायचा..
हत्तीचं बळ यायचं.
माझ्याबरोबर सगळे आहेत 
असं मनापासून वाटायचं..
काळवंडलेले चेहरे 
एकदम खुलून जायचे. 
चेहरे एकदम Fresh आनंदी 
दिसायचे..
मित्रहो 
आपल्यालाही तेच करावं लागेल 
दुसरं काहीही नाही,
नाहीतर नुसते खोटारडे सुखी चेहरे घेऊन केलेल्या दिखाऊ 
Good Morning
Good Night 
ना काहीही अर्थ नाही.!!
_व पु काळे.


**********************************************************

तीन रुम किचनचा एखादा फ्लॅट, दोन चार एकरचे फार्म हाऊस, एखादी चार चाकी गाडी आणि भौतिक वस्तूंचं प्रदर्शन मांडता आलं की आपण म्हणतो, "अमक्या- तमक्यानं शून्यातून विश्व निर्माण केलं !"
म्हणजे होतंय काय की सुख मिळेल या आशेने माणूस श्रीमंत होण्यासाठी धडपडतोय. पण सुखी काही दिसत नाही!

आपणचं म्हणतो की, आमच्या लहानपणी खूप मजा यायची. खूप करमायचं, घर भरलेलं असायचं. दिवस कधी मावळायचा ते कळायचंच नाही!

  मग आता काय झालं ?

  मजा कुठ गेली?

  एकटं एकटं का वाटतं ?

  छातीत धडधड का होते ?

  कशामुळे करमत नाही ?

 कारण...

विश्व निर्माण करण्याची व्याख्या कुठेतरी चुकली. विश्व निर्माण करणं म्हणजे… 
 नाती गोती जपणं
 छंद जोपासणं
 पाहुणे होऊन जाणं
 पाहुण्यांचे स्वागत करणं
 खूप गप्पा मारणं
 घराच्या उंबऱ्यात चपलांचा ढिग दिसणं खळखळून हसणं
 आणि
 काळजातलं दुःख सांगून मोकळेपणाने रडणं !!! 
या गोष्टी आपण प्राप्त करू शकलो तर”शून्यातून विश्व निर्माण केलं ” असं म्हणावं.

तुम्हीच सांगा आपल्या आयुष्यात या सर्व गोष्टींची वाढ झाली की घट झाली ….. *???

तुमचं खर दुःख तुम्ही मोकळेपणाने किती जणांना सांगू शकता  *????
असे किती मित्र , शेजारी , नातेवाईक आपण निर्माण करू शकलो… *???
खूप कमी , किंबहुना नाहीच...
"!!! मग आपण ” विश्व निर्माण ” केलं का  *??? 
तर नाही….

मित्र हो ,
रजिस्ट्री च्या कागदाच्या फायली म्हणजे विश्व… ????
भौतिक साधनांची रेलचेल म्हणजे विश्व … *??? 
"लॉकर मध्ये ठेवलेले हिरे मोत्यांचे दागिने म्हणजे विश्व….. *????
मुखवटा घातलेल्या चेहऱ्यांची गर्दी म्हणजे विश्व…… *???? 
नाही !!
हे समजून घ्यावं लागेल,
 
मोठं बनण्याच्या दडपणा मुळे आणि मग कामाच्या व्यापा मुळे नाती दूर जाणार
असतील.....इतरांना तुच्छ लेखण्यामुळे आणि अहंकारामुळे माणसं जवळ येणार नसतील…...
दुःख सांगायला , मन हलकं करायला जागाच उरणार नसेल...
तर….. 
आम्ही शून्यातून विश्व निर्माण केलं, की विश्वातून शून्य?

माणूसकी जपा. इतरांच्या कामी या. सोबत काहीचं येत नाही.

सुप्रभात

Stay safe. Defeat Corona.


@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@



---------------------------------------------------------------------------------------

सकारात्मक ....  


दूधाला दुःख दिले की दही बनते.
दह्याला दुखावले की ताक बनते.
ताकाला त्रास दिला तर लोणी बनते
आणि
लोण्याला लोळवले तर तूप बनते.

दुधापेक्षा दही महाग.
दह्यापेक्षा ताक महाग.
ताकापेक्षा लोणी महाग.
लोण्यापेक्षा तूप महाग.
परंतु
या सर्वांचा रंग एकच शुभ्र!

याचाच अर्थ पुन्हा पुन्हा संकटे आणि दुःख झेलुनही जो माणुस आपला रंग बदलत नाही, अश्या माणसाची समाजातील किंमत जास्त असते. दूध उपयोगी आहे पण एक दिवसात नासते. दूधाचे विरजण दही, दोन दिवस टिकेल. दह्याच्या घुसळलेल्या ताकाचे दिवस तीन. ताकामधले लोणी आठवडाभर राहील. पण लोण्याचे कढवलेले तूप मात्र कधीही खराब होत नाही.

आता बघा आहे की नाही गंमत, एका दिवसातच नासण्याऱ्या दूधात कधीही न नासणारे तूप लपले आहे...! तसेच आपले मन अथांग आहे.  त्यात सकारात्मक विचार घालून नीट मंथन करा...! चिंतन करा, मनन करा आणि आपले जीवन तावुन सुलाखून त्यातुनच बाहेर पडलेले, म्हणजे कधीही न हरणारे आपले स्वत:चे एक सदाबहार व्यक्तीमत्व होईल. 



++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
 
प्राजक्त..सुगंधी शुभेच्छा...!                                        
 माणूस कसा पाहिजे..त्याच्या आयुष्याचे झाड प्राजक्ताच्या झाडासारखे फुलले पाहिजे कारण प्राजक्ताचे झाड चोहीकडून फुललेलं असतं..एकदा ते बहरलं की पानं दृष्टीला पडत नाहीत. प्राजक्ताची फुले तोडावी लागत नाहीत..एखादी मंद वाऱ्याची झुळूक आली की टप टप सडा पडतो खाली!ओंजळीत घ्यावीत,ज्यांना वहायची आहेत त्यांना वहावीत,उरलेल्या तळहाताचा वास घ्यावा, त्याला प्राजक्ताचा वास येत असतो.ज्या मातीत ती पडली त्या मातीलाही जाता जाता तोच वास देऊन जातात.प्राजक्ताच्या फुलाला दोनच रंग निसर्गाने दिले आहेत..त्यातला एक वैराग्याचा विरक्तीचा पांढरा शुभ्र अन् शृंगाराचा रसिकतेचा लालचुटुक एखाद्या तरुणीच्या ओठा सारखा!                                                                  शृंगार आणि वैराग्य हातात हात घालून ज्या फुलामध्ये वसलयं ते प्राजक्ताच फुल!हे दोन्ही रंग एकमेकांपासून पूर्ण अलग आहेत.निसर्गाने म्हणजे परमेश्वरानं..खरतर दोन्ही वेगळे नाहीत.परमेश्वर म्हणायला ज्यांची जीभ अडते ते निसर्ग म्हणतात.परमेश्वराने या फुलाला पाकळ्या भरीव दिलेल्या आहेत अन् देठ मात्र पोकळ दिलेला आहे.बकुळीच्या फुलाला देठ नसतो.कुठल्याही फुलाचा देठ पोकळ असत नाही पण प्राजक्ताचा पोकळ असतो. त्यातून फक्त दोरा ओवायचा..बस्स्!निसर्गाने आपल्या सुखासाठी किती सुंदर सोय करुन ठेवलीय.पण आपण कधी प्राजक्त हुंगतो कां?त्या कळ्यांपासून,त्या फुलांपासून बनवलेलं अत्तर आपण स्प्रे म्हणून वापरतो..पण फुले बघून आपले डोळे टवटवीत होत नाहीत.माणसं रुक्ष व्हायला लागलीत.प्राजक्ताच्या फुलांसारखे रहा.शृंगार,रसिकता आणि वैराग्य,विरक्ती एकत्र नांदली पाहिजे.असा माणसाचा स्वभाव पाहिजे..तसं जगता आलं पाहिजे.                                          

  विना पेडणेकर किती छान सांगताहेत..                                                 
उधळून टाकावे सुखाचे क्षण दुसऱ्यावर प्राजक्त होतो त्याचा,                                 
 ठेवले जवळ स्वतःजवळ स्वतःपुरते    तर गंध सुकेल त्याचा,      
                       
दडवून ठेवावे दुःखाचे क्षण मात्र  मनाच्या शिंपल्यात,                                      
स्वतःच सोसायचा स्वतःपुरता ठेवायचा   तो निवडुंगाचा त्रास,   

काळ हाच उत्तम इलाज आहे   सार्‍या समस्यांचा,   
कुणी सांगावे मनाच्या शिंपल्यातून  मोती ही निर्मायचा 

जीवनात प्राथमिकतेचा फार महत्त्वाचा!
ज्याच्या बंधनात आपण असतो ते प्रारब्ध,
मात्र सुगंधित पणे व्यक्त करायला शिकवतो तो प्राजक्त.. 
आज शुभेच्छांसाठी व्यक्त होऊया.   उलगडूनी मनाचे पदर अशी जाहली ती व्यक्त,                                            सांडल्या आठवणी सा-या   जणू अंगणी प्राजक्त! २०२० सालच्या कटू आठवणीत जाऊन आपण घटनेचा आरंभ बदलू शकणार नाही पण जिथे आहे तिथून आपण सुरुवात केली तर शेवट मात्र जरुर बदलू शकू..नाही कां? सुयोग्य बदलासाठी व नववर्षासाठी खूप शुभेच्छा!🙏

                                     ================@@@@==============



=====================================================

नक्की वाचा, मी अनुभवतेय.... 

🌹प्रत्येकाने आयुष्यात आपला कुणाला कंटाळा येईल, इतकं जास्त जवळ जाऊच नये, त्यांच्याशी चांगुलपणाचे ओझे वाटेल इतके चांगले पन वागू नये...!!!

🌹आयुष्यात कुणाला आपली गरज वाटत नसेल तर अश्यावेळी तिथे त्यांच्यात सतत रेंगाळत बसत राहू नये, पण नशीबाने जुळलेली आपली नाती प्रामाणिकपणे जपावी, आपण स्वतःहून शक्यतो नातेसंबंध तोडू नयेत...!!!

🌹आपले गोड बोलणे, गोड वागणे, कुणास अवघड वाटत असेल, तर तेथे  तसे वागू नये,आपल्या जवळपणाचे बंधन होईल, इतके जवळचे होऊच नये...!!!

🌹आपण सहजच सारे विसरून जावे असे सल मनात जपून ठेऊच नयेत, आपण जेव्हा नकोसे होऊ  इतके आयुष्य जगूच नये...!!!

🌹आपण हवे हवेसे असतो, तेव्हाच पटकन दूर निघून जावे, आपले नाव दुसऱ्याच्या ओठी कायम आठवणीत राहील, इतकेच मात्र करून जावे...!!!

🌹कारण आयुष्यात जीवनाच्या वाटेवर जी माणसे साथ देतात, तीच माणसे मध्येच आपली साथ सोडून घात करतात, जे आपल्याला हात देतात तीच माणसे आपला हात मध्येच सोडून देत, आपल्या विरोधात जाऊन घात करत असतात, ती ही आपलीच माणसे असतात...!!! 

🌹आपण ज्यास अनेक चांगल्या संधी देतो, तीच माणसे स्वतःची त्यांची संधी साधुन घेतात आणि आपला विस्वास घात करतात, ज्यांचा आपण आदर करतो त्यांना मोठ करतो, तीच माणसे नंतर सर्व उपकार विसरून भाव खातात व आपल्याला अनेक अडचणीत आणतात, ती ही आपलीच माणसे असतात...!!!

🌹आपणास जे आपले आहेत म्हणून वेड लावतात, तीच माणसे आपल्याला वेडं म्हणून ठरवत असतात, जे आपणास सल्ले देतात आपल्या जवळ राहून खातात, तिच माणसे आपल्या तोंडातील घास हिरावुन घेत असतात, ती ही आपालीच माणसे असतात...!!!

🌹जी माणसे आपल्या सतत पाठीशी असतात, तीच  माणसे नंतर अडचणीत व कठीण प्रसंगी पाठ फिरवत असतात, जे आपल्याला वाट दाखवतात , तीच माणसे आपल्या वाटेत नेहमी आडवे होतात, तीही माणसे आपालीच असतात...!!!

🌹आपली माणसच शब्द पाळायला सांगतात, आणि  तीच माणसे दिलेला शब्द लगेच फिरवतात. कधी कधी तीच माणसे गळ्यात पडतात, आणि तीच आपला विश्वासने गळा कापतात, ती ही असतात आपालीच माणसं पण ती अशी का वागतात??? ..!!!

🌹काही माणस कारण नसताना दूर राहतात, तरी पण ती आपल्या जवळचीच आहेत अशीच वाटतात, परंतु तीच माणस जवळ राहून देखील, परक्यासारखी का वागतात???,  तिही असतात आपलीच माणसं...!!!

🌹माणस ही नाना प्रकारची अशी असतात, परंतु ती नाना प्रकारची आपली माणसं ओळखायची कशी, ही एक सध्या कठीण समश्या बनली आहे. तर आता तुम्हीच सांगा ही सर्वही सारी माणसे आपलीच असतात, त्यांच्याशी वागायचे कसे???. तिही आपलीच माणसं असतात ना...!!!


======================================================

एक इंग्रजी वाक्य वाचनात आलं होतं. 
ते असं होतं की, 
we are all a little broken. But the last time I checked, broken crayons still colour the same

म्हणजे, आपण प्रत्येकजण, कधी ना कधी मनानं तुटलेलो असतो. 
पण तुटलेले रंगीत खडू मी पाहिले, 
तर लक्षात आलं,ते तुटले असले तरीही, त्यांचा रंग तसाच राहिला आहे.

किती सुंदर वाक्य आहे नाही! 
आपण प्रत्येकजण कुठे ना कुठे तरी मनावर आघात झाल्यानं, किंवा ओरखडा उमटल्यानं,तुटलेलो असतो. पण म्हणून त्या तुटलेपणानं आपल्यात जो चांगुलपणा आहे. 
तो का नष्ट होऊ द्यायचा? 
ज्या क्षमता आहेत, त्या का लयास जाऊ द्यायच्या? 
तसेच रंगाचे खडूदेखिल कधी कधी वापरताना तुटतात, 
पण म्हणून त्यांचा रंग पालटतो का? 
नाही! 
तो खडूचा तुटका तुकडाही आपल्या मूळ स्वरूपाप्रमाणेच त्याच रंगाचा प्रत्यय देत राहतो... 
अगदी झिजून संपेपर्यंत! त्या खडूच्या तुकड्यांकडून आपण इतकं तरी शिकलंच पाहिजे!!

जिंदगी एक बार मिलती है;
बिल्कुल गलत है;...!!
सिर्फ मौत एक बार मिलती है!
जिंदगी हर रोज मिलती है;...!!
बस जीना आना चाहिए;...!!


+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++ 





@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@


       आपल्या घरात कुणीतरी पुण्यवान व्यक्ती असतो. तो पर्यंत आपल्या घरात कोणत्याही प्रकारचे नुकसान होत नाही....!!

       जो पर्यंत बिभीषण लंके मध्ये राहत होते तो पर्यंत रावणाने पाप केले पण बिभीषणच्या पुण्य कारणास्तव रावण सुखी होता....!!

       परंतु जेव्हा बिभीषणा सारख्या भगवंत वत्सल भक्ताला लाथ मारली व लंके मधून निघून जाणेस सांगितले.. तेव्हापासून रावणाची विनाश होण्यास  सुरूवात झाली आणि शेवटी  रावणाची लंका जळून दहन झाली व रावण मेल्यावर मागे रडायला कुणीही वाचले नाही....!! 

       असेच या प्रकारे हस्तिनापूर मध्ये जो पर्यंत विदूर सारखे भक्त राहत होते तो पर्यंत कौरवांना सुखच सुख मिळाले.. पण जेव्हा कौरवांनी विदूरांचा अपमान करून राजसभेतून जाण्यास सांगितले तेव्हा श्रीकृष्णाने विदुराला सांगितले की काका आपण तिर्थ यात्रेला जावे, जसे विदुरने हस्तिनापूर सोडले,कौरवांचे पतन व्हायला सुरुवात झाली व शेवटी राज्य पण गेल व कौरवांचे मागे कोणीही वारस राहिले नाही....!!

       _याप्रकारे आपल्या कूटूंबात अथवा मित्र परीवारात जो पर्यंत कोणी भक्त किंवा पुण्यवान आत्मा राहतो. तो पर्यंत  आपण व आपल्या घरात आनंदी आनंद राहतो..
विचार करा एखाद्याच्या नुसत्या सहवासाने आपल्या घरातील पीडा निघून जाते आणी आपणास चांगले दिवस येऊ लागतात, पण अशी व्यक्ति जेंव्हा मनापासून आपला त्याग करते तेंव्हा पासून आपली ओहटी सुरु होते यासाठी भगवंताच्या भक्तांचा अपमान कधीही करू नका. आणि  आपण जे कमऊन खातो ते माहित नाही कुणाच्या पुण्याईने  मिळत असते. यासाठी नेहमी आनंदी रहा व आपल्या परीवारात कोणी भक्त भक्ती करत असेल तर त्याचा अपमान करू नका तर सन्मान करा. व त्यांच्या मार्गदर्शना प्रमाणे वागण्याचा प्रयत्न करा. माहित नाही संसाराची गाडी कुणाच्या पुण्याईने चालते....!!_

       आई-वडिल, वयोवृद्ध, मित्र व अतिथींचा नेहमी सन्मान करा. व सदगुरूनी दाखवलेल्या प्रमाणे जीवन जगा. व देवाची भक्ती करत रहा....!!

       कर्मानुसार आले तर बरे झाले, गेले तर बला टळली सोबत काही घेऊन आलो नाही. जातांना या संसारातून काही घेऊन जायचे नाही. गुरूदेव म्हणतात की "कर भला तो हो भला।"


****************************************************************


अग्रेषित

कोंबडीचे अंडे आणि घराच्या बांधकामासाठी वापरण्यात
येणारी विट यांच्यात एका बाबतीत साम्य आहे ते
कोणत्या बाबतीत आहे ?
.
जरा ओळखुन दाखव!”
मित्राने माझ्यापुढे कोडे टाकले.
.
मला विचारचक्रात अडकवुन स्वतः पसार झाला.
.
मी विचार करु लागलो,
“बांधकामाची विट आणि कोंबडीचे अंडे यात काय
साम्य असणार?”
खुप विचार करुनही उत्तर न सापडल्यामुळे
शेवटी शेजारी सुरु
असलेल्या बांधकामावरुन दोन विटा आणि बाजारातुन
अर्धा डझन
अंडी घेउन घरी आलो. खूप निरीक्षण
केले पण उत्तर सापडले नाही.
.
दुसर्या दिवशी तोच मित्र पुन्हा माझ्याकडे आला,
“काय सापडले काय उत्तर?”
.
मी नकारार्थी मान हलविली आणि
“आता तुच काय ते साम्य दाखवं!”
असे म्हणुन ती अंडी आणि विटा त्याच्यापुढे
ठेवल्या .
.
मित्राने हातात अंडे घेतले.
ते उभे ठेवले आणि दाबले, पण ते फ़ुटले नाही . मग त्याने
अंड्याला आडवे केले आणि दाबले, ते चटकन फुटले.
मग त्याने दोन फ़ुटावरुन हातात उभी धरलेली विट
खाली सोडली, विटेला काहीच झाले
नाही. नंतर तेवढ्याच अंतरावरुन त्याने
आडवी धरुन विट खाली सोडली,
आता मात्र विट फुटली.
.
मित्र माझ्या खांद्यावर हात ठेवून म्हणाला “विट आणि अंडे
उभे असेपर्यंत
फ़ुटत नाही, आडवे होताच फ़ुटते. हे
त्या दोघांमधील साम्य. माणुस त्या विट
किंवा अंड्यासारखाच -
तो जोपर्यंत खंबीरपणे उभा आहे, सजग आहे, तो पर्यंत
कोणीच त्याचे भवितव्य बिघडवू शकत नाही. पण
जर का तो सुस्तावला, जरा आडवा झाला, की त्याचे
भवितव्य
फ़ुटण्याची शक्यता बळावते."
खंबिरपणे उभे राहा. जग तुमचे काही बिघडवू शकत
नाही..

#########################################################





==================================================



@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@


काल रात्री झोपताना मी स्वतःला विचारलं जीवन कसे जगावं 
मला माझ्याच खोलीतून माझ्या प्रश्नांची उत्तरे मिळाली .... 

माझ्या घराचे छत म्हनाले उच्च विचार कर 
पंखा म्हणाला डोकं शांत ठेव
घड्याळ म्हणाले वेळेची किंमत कर
कॅलेंडर म्हणाले काळासोबत चल
पाकीट म्हणाल पैशाची बचत कर 
आरसा म्हणाला स्वतःकडे बघ
भिंत म्हणाली दुसऱ्याच ओझं वाटून घे 
खिडकी म्हणाली बघण्याचा दृष्टिकोन बदल फरशी म्हणाली जमिनीशी जुळवून राहा बग तुझे जीवन किती आनंदी होईल 
All is well

====================================================



$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$


माणसं कमावण्याची जबरदस्त नशा असते वयाच्या एका टप्प्यापर्यंत.आपल्यापैकी अनेकांना ती असते. माणसं जोडणं ही छानच गोष्ट, अनेकांसाठी ती एक अभिमानाची बाब असते. जरूर असावी. चांगला स्वभाव आणि उत्तम चारित्र्य याच्या जोरावर अनेक माणसं जोडावीत, जपावीत. पण हे करताना ही जपलेली माणसं आपल्यालाही 'जपत' आहेत ना हे बघणं फार महत्त्वाचं असतं. अनेकदा आपल्याला वाटून जातं, अरे बापरे...! ही अमुक इतकी 'भारी' व्यक्ती आपल्यासोबत संपर्क ठेवून आहे. म्हणजे किती छान! त्या संपर्कामागे विशुद्ध भाव आहे ना, की पुढे जाऊन आपला 'स्टेपणी' म्हणून उपयोग केला जाणार आहे हे बघायला हवं. अशा अनेक अनुभवांतून आपण जात असतो, त्यामुळे 'हुरळून' जाणं टाळायला हवं.

      तुम्हाला माणसं जोडावीशी वाटतात हा तुमचा चांगुलपणा असतो, पण त्याला तुमचा भावनिक कमकुवत पणा समजणारे खूप लोक असतात. त्यामुळे आपल्या चांगुलपणाचं इतकंही प्रदर्शन करू नये की तो संशयास्पद वाटू लागेल. 

     अनेकदा एखादी व्यक्ती आपल्याला अत्यंत जवळची, जिवलग वाटत असते, आपली सुख दुःखं आपण तिला सांगत असतो. पण आपल्या वेदनांचा वापर पुढे ती आपलं मन:स्वास्थ्य उद्ध्वस्त करणारा दारुगोळा म्हणून देखील करू शकते. माणसांना इतकंही पोटाशी धरू नये की ते पुढे आपल्यावर लाडाने दुगाण्या झाडू लागतील. माणसं जोडताना कोणाला कोणत्या पायरीपर्यंत जवळ येऊ द्यावं हे ठरवून घ्यायला हवं. लायकी नसलेल्या एखाद्या व्यक्तीला फार जवळ केल्याचा अतोनात त्रास आयुष्यभर भोगावा लागू शकतो.

      लोक तुम्हाला खांदा द्यायला नसतात बसलेले, अनेकदा तुम्ही रडण्यासाठी त्यांचा खांदा जवळ करता, हे त्यांना एंटरटेनिंग वाटू शकतं. दुःखावर बांधावीत अशी माणसं फार विरळा असतात. मन मोठं करून समोरच्याला मदत करणं, त्याचं चांगलं व्हावं यासाठी प्रयत्न करणारी भली माणसं जगात आहेत, नक्कीच आहेत. पण भसाभस माणसं जमवण्याच्या नादात दाण्यांपेक्षा बणग्याच जास्त गोळा होतात. त्यातली एखादी आयुष्यभर कुसळा सारखी टोचत राहते, असह्य वेदना देते.

          'भारावून जाणं' ही एक फारच भाबडी गोष्ट आहे.कोणाच्या एवढ्या तेवढ्या गोष्टीने भारावून जाणारी माणसं आपल्यात असतात. फार जवळ जाऊन बघितलं की समोरच्या माणसाचे पायही मातीचे हवेत हे लक्षात येतं आणि अतोनात निराशा वाट्याला येते. माणसांतलं चांगलं ते जरूर वेचावं, त्याचं कौतुक करावं,जमल्यास आचरणात ही आणावं.

           काही माणसं समोरून फार छान वाटतात, आदर्श वाटतात. आपण त्यांना आपलं मानत राहतो, फॉलो करत राहतो. आणि एका विवक्षित क्षणी कळतं, की काहीही घेणं देणं नसताना ही माणसं आपल्या सोबत किती खोटं, कृतक वागत होती, मागे डावपेच करत होती.मग जीव उबतो, त्या नात्याची शिसारी येऊ लागते. यावर पर्याय काय? 'माणसांच्या फार जवळ न जाणे'. लांबून जे दिसतं त्यात आनंद मानावा. माणसं आपल्या समोर जे वागतात, बोलतात ते आणि तेवढंच खरं मानून पुढे निघावं, फार खोलात जाऊन गोष्टी जाणून घेण्याचा हट्ट करू नये. अपेक्षा भंग वाट्याला येतो.

           माणसं कमावणं म्हणजे त्यांना आपल्या आयुष्यात हस्तक्षेप करण्याचे अधिकार देणं नव्हे. काही व्यक्ती आपले पणाच्या हक्काने काही गोष्टी सांगत असतात. त्या नम्रपणे ऐकून घेण्याची क्षमता ठेवावी.चार कटू गोष्टी ऐकाव्या लागल्या तरी त्यातून पुढे आपला भलंच होणार आहे हे आपण जाणून असावं. अर्थात आपलं खरोखरच भलं व्हावं म्हणून स्वतःचा वेळ देऊन आपला कान पकडणारं कोण आणि आपलं भलं पाहून पोटदुखी होणारे कोण यातला फरक आपल्याला ओळखता यायला हवा. 

    माणसं जरूर जोडावीत, जपावीत,एकमेकांच्या  भावना आपल्याला दुखावू शकेल इतके अधिकार कोणाला देऊ नयेत. जगायला माणसं लागतातच, पण 'आतल्या' वर्तुळात कोणती माणसे घ्यायची आणि 'बाहेरच्या' वर्तुळात कोणती माणसं ठेवायची याचं गणित एकदा जमायला लागलं की सोपं होतं जगणं.

+++++++++++++++++++++++++++++++++++++




@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@



आपले व्यक्तीमत्व सिध्द होण्यासाठी आपल्यावर आघात होणे गरजेचे आहे कारण आघाताविना आपली बौध्दिक आणि शारीरिक क्षमता, सय्यम, धैर्य, शौर्य सिध्द होत नाही.

👣हिरा ठेविता ऐरणी । 
     वाचे मारीता जो घणी ।।
👣तोचि मोल पावे खरा । 
     करणीचा होय चुरा ।।
💎हिरा मौल्यवान आहे आणि त्याचा मौल्यवान गुण पारखण्यासाठी त्याला ऐरणीवर ठेवून ⚙️घणाने त्याच्यावर घाव घालावा लागतो. 
💎हिरा घणात किंवा ऐरणीत घुसतो 
             पण फुटत नाही 
हीच त्याची विशेषता आहे आणि 
आघाताशिवाय ती सिध्द होत नाही.
💎भारताच्या इतिहासात शिवरायांसारखा मौल्यवान हिरा जन्माला आला . 
🦾जन्माला येताना महाराजांचा जन्म एक सरदार पुत्र म्हणून झाला, पण त्यांच्यावर आलेल्या आघाताने त्यांना असामान्यत्व प्राप्त झाले. 
🤺फत्तेखानासी पहिली लढाई, अफजलखान, सिध्दी जौहर, शाईस्तेखान, आग्र्यातिल अटक, 
    हे सर्व जीवघेणे आघात होते .
 अगदी आघात होताच जातीवंत 💎हिरा जसा आघात करणाऱ्याच्या अंगात घुसतो तसे 🤺शिवराय आघात करणाऱ्याच्या पोटात घुसून त्याला पूरून उरले.
   🗣️🎭जी माणसे🎭🗣️ 
🦂आघाताला घाबरतात , 
🦂आघाताला टाळतात किंवा 
🦂आघात चुकवितात 
       ती फक्त जगून निघतात. 
प्रबोधनकार ठाकरे त्यांच्या विषयी म्हणतात, 
  जन्माला आला हेला  ( रेडा )
 आणि कसातरी जगून मेला ! 

जीवनातील अव्हाने, संकटे आणि आघात 
         हे वीराचे अलंकार आहेत, 
  वीराला याच्याशिवाय शोभा नाही. 
या गोष्टीवरच आपले मूल्य ठरत असते, 
🙈जे या परिक्षेत भागच घेत नाहीत, त्यांची गणना फक्त  जनगणनेत केली जाते. 
🛕विश्वमाऊली ज्ञानदेव यांच्यावर ज्यावेळी सन्यास्याची मुले म्हणून पैठणला धर्मसभेने आघात केला त्याचवेळी त्यांचे असामान्यत्व सिध्द झाले.
🛕जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्यावर मंबाजी बुवांनी अनेक शारीरिक आणि मानसिक आघात केले, त्यांनाही धर्मसभेने गाथा इंद्रायणीत बुडवायला भाग पाडले, या आघातामुळे त्यांचे संतत्व सिध्द झाले.
👣तुका म्हणे तोचि संत । 
     सोसी जगाचे आघात ।।
     आपल्यावर होणारे आघात 
        याला संकट समजू नका, 
खरे तर आपले असामान्यत्व सिध्द होण्यासाठी आपल्यावर होणारी ती दैवी कृपा आहे .



###########################################################

 
++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++



+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++




+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++


वाचा माइंड फ्रेश होईल

📍कधीही शाळेत न गेलेले छत्रपति 
स्वराज निर्माण करतात
📍जातीय व्यवस्थेमुळे अपमान सहन करणारे डॉ.
बाबासाहेब आंबेडकर भारताची राज्य घटना लिहितात.
📍आईचे प्रेम आणि बापाचे छत्र नसलेला 'बराक'
नावाचा पोर अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष होतो
📍पेट्रोलपंपा वर काम करणारे 'धीरुभाई' करोड़ोंचे
साम्राज्य उभे करतात...
📍कॉलेजच्या प्रवेश फी साठी पैसे नाहीत म्हणून
बहिणीचे दागिने गहाण ठेवणारे 'अब्दुल कलाम'
राष्ट्रपती पदापर्यंत जाता
📍रोजगार हमीच्या कामावर जाणारे आर.आर.पाटील
राज्याचे गृहमंत्री व उपमुख्यमंत्री होतात.
📍सत्तावीस वर्ष तुरुंगात काढणारे 'नेल्सन मंडेला'
जगाला प्रेम शिकवतात.
📍कुठलीही शारीरिक हालचाल न करू शकणारे
'स्टीफन हॉकिंग' जग हलवणारे संशोधन करतात...
"शुन्यातून प्रवास करत माणसे प्रेरणादायी जग
निर्माण करतात..."
मग, आम्ही का नाही???"
🍒माणूस किती किंमतीचे कपडे
वापरतो यावरून त्याची किंमत
होत नसते ,परंतु , तो इतरांची किती किंमत
करतो यावरून त्याची किंमत
ठरत असते .


पक्षी जेंव्हा जिवंत असतो तेंव्हा तो किड्या मुंग्याना खातो पण जेंव्हा पक्षी मरण पावतो तेंव्हा तेच ...


+++++++++



@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@


मन देऊन वाचा आवडेल ...

पाण्याने दुधासोबत मैत्री केली आणि दुधात एकरुप झाले . 

दुधाने पाण्याची समर्पित वृत्ती पाहिली आणि म्हणाले,

'मित्रा तू स्वत्व त्यागून माझे स्वरुप धारण केलंस...

आता मीं ही बघ कशी मैत्री निभावतो ते....आता तुझे मोल हे तुझे राहिले नाही ..

आता बघ मी तुझे आणि माझे मोल समान करुन तुला माझ्या मोलाने विकतो.

आणि खरेच ते पाणी दुधात एकरुप झाल्यामुळे दुधाच्याच मोलाने विकले.

नंतर ते पाणीमिश्रीत दुध उकळण्यासाठी शेगडीवर ठेवले जाते.

तेव्हा पाणी म्हणते ,' मित्रा तू माझे मोल वाढवून मैत्री निभावलीस...आता माझी पाळी आहे...

आता मी तुझ्या अगोदर जळणार 'असे म्हणून पाणी दुधापासून अलग होऊन उडायला लागते.

आपला मित्र आपल्यापासून दुरावतोय हे लक्षात आल्यावर दुधाला उकळी येते 

आणि ते उकळते दुध पातेल्यातून खाली जाळावर पडून जाळ विझवण्याचा प्रयत्न करते.

दुध उकळू लागताच दुध तापवणारी व्यक्ती त्या दुधात थोडे पाणी शिंपडते...

...तेव्हा कुठे ते उकळते दुध शांत होते .!

नात्यांचेही असेच असते ..ते दुध आणि पाण्यासारखेच असतात. एकमेकांशिवाय जगूच शकत नाहीत .

पण दुधात लिंबाचे चार जरी थेंब टाकले तर मात्र दुध आणि पाणी एका क्षणात अलग होतात.

नात्यांचेही तसेच असते ,थोडासा जरी अविश्वास झाला तर नाती क्षणार्धात तुटून जातात.

  आपल्या डोळ्यांवर विश्वास ठेवा फक्त कानावर नाही ...कारण ,

चुकीचा माणूस नसतो परिस्थिती असते ..!!!

 तात्पर्य : 'नात्यांचा ताज़महाल ,विश्वासावर उभा असतो ।
संशयाचा छोटासा घावही त्याला ,जमीनदोस्त करुन टाकतो.....!

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++


संतती लायक असेल
तर कमवून ठेवण्याची काहीच गरज नाही, कारण ते स्वतः कमविल्या शिवाय रहाणार नाहीत.

आणि संतती नालायक असेल,
तर अजिबात कमवून ठेवण्याची गरज नाही.
कारण आपल्या समोरच त्या संपत्तीला  काडी लागल्याशिवाय रहाणार नाहीत.

 विठ्ठलपंत आणि रूक्मिणी मातेने देहांत शिक्षा घेतली, त्यावेळी निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान व मुक्ताई यांचे वय काय होते ?त्या वयात निर्माण झालेली जबाबदारी विश्वाचे कल्याण करणारी ठरली.

 छत्रपती शिवरायांच्या हातात त्यांच्या चौदाव्या वर्षी पुणे जहांगीर सोपवली गेली.शहाजी राजांनी वयाच्या पाचव्या वर्षी इंदापूर जहांगीर सांभाळली. 

जबाबदारी जेवढ्या लहान वयात अंगावर पडते, तेवढे कर्तृत्व महान होते.
म्हणून आपल्या मुलांना जबाबदारी घ्यायला शिकवा आणि त्यांना स्वतःच्या पायावर उभे करा.

संघर्ष
आजकालच्या मुलांना झाडावर चढून फळे काढता येत नाहीत, साधे घरातील माळ्यावर ठेवलेली वस्तुसुद्धा काढायला घाबरतात. उंच जागी चढतांना आईच्याकडून धीर मिळत नाही. उलट "पडशील", "घसरशील", "तुला जमणार नाही", "उतर, कुणालातरी बोलावून करूया.. असे शब्द ऐकायला मिळतात.
     या मुलांच्या आया आणि बाप, मुले मोठी झाली तरी मुलांच्या शाळेची बॅग शाळेला जाणाऱ्या रिक्षा किंवा व्हॅनमध्ये पोहोचवून देतात, हे पाहिल्यावर मुलांची किव येते.
     आज सत्तरी ओलांडलेल्या आई वडिलांनी मुलांना संघर्ष शिकवला, परंतू तीच मुले आपल्या मुलांना तसा संघर्ष का शिकवत नाहीत, याचे नवल वाटते ?
      पाश्चिमात्य देशात मुले आपली सायकल (पंक्चर इ.) स्वतः दुरूस्त करतात, त्यांच्याकडे त्याचे किट असते. यात सर्व हत्यारे असतात, ज्याचा वापर मुले अगदी सहजतेने करतात. नवीन पिढीतील मुलांना स्वावलंबी करणे हेच खरे पालकत्व आहे.त्यांना शर्टाचे किंवा ड्रेसचे बटन लावणे, इस्त्री करणे, आपापले कपडे धुणे, सकाळी उठल्यावर स्वतःची चादर घडी करून योग्य ठिकाणी ठेवणे, पुस्तकांना कव्हर लावणे, बूट पॉलिश करणे, सर्व चप्पल-बूट जोड नीट एक रेषेत ठेवणे, वेळप्रसंगी भांडी धुणे, कचरा साफ करणे हे आलेच पाहिजे.
लाड खाण्यापिण्याचे करा, कामात लाड वर्ज्य आहे.
     स्वयंपाक खोलीत त्यांना मदतीला आवर्जून बोलवा, आठवड्यातून एकदा आई वडिलांच्यासाठी चहा बनवायला सांगा.दोन कप चहासाठी किती चहा, साखर व दुध लागते याचा अंदाज स्वतः केल्याशिवाय त्यांना कधीच येणार नाही. हे करताना बऱ्याच वेळेस चटका ही लागतो, लागू दे ! ही जखम दोन दिवसांची असते,
पण आयुष्यभराची शिकवण देऊन जाते. या व अश्या कामातून मुलांना जबाबदारी घेण्याची सवय होते,
तसेच ही कामे खालच्या दर्जाची नसतात हे ही समजते.
      आजकाल एक वाक्य नेहेमी ऐकण्यात येते, "मला जे कष्ट करावे लागले, ते माझ्या मुलांना करायला लागू नयेत"...... ! विचार करावा, आपण चुकीच्या मार्गाने तर जात नाही ना?

**********************************************************


आवर्जून आणि शांत पणे वाचावी अशी पोस्ट ,व्यक्तिमत्व विकासासाठी समाजात वावरताना या गोष्टी आचरणात आणा:--

1. एखादी व्यक्ती आपला फोन उचलत नसेल तर त्या व्यक्तीला दोन वेळेच्या वरती परत परत फोन करू नका , कदाचित त्या व्यक्तीला त्यावेळेस तुमच्या फोनपेक्षा महत्त्वाचे काम असेल.

2. तुम्ही एखाद्याकडून उधार घेतलेले पैसे त्याने परत मागण्याअगोदर परत करा , तीच गोष्ट छत्री आणि पेनबाबत...

3. एखादा तुम्हाला हॉटेलमध्ये जेवायला नेतो तेव्हा मेनूतील महागडा पदार्थ ऑर्डर करू नका , शक्य असल्यास पार्टी देणाऱ्यालाच ऑर्डर करायला सांगा.

4. तुझ अजून लग्न झालं नाही ? तू अजून घर बांधलं नाहीस ? असले समोरच्याला अडचणीत टाकणारे प्रश्न विचारू नका , कारण ती तुमची अडचण नाही.

5. नेहमी आपल्यापाठुन येणाऱ्या व्यक्तीसाठी दरवाजा उघडा मग ती व्यक्ती स्त्री असो वा पुरूष, कारण कुणाला चांगली वागणूक दिल्याने तुमचा कमीपणा होत नाही.

6. तुम्ही मित्राबरोबर टॅक्सी शेअर केलीत आणि त्याचे भाडे त्याने दिले तर पुढच्या वेळेस आठवणीने तुम्ही भाडे द्या...हाच नियम पार्टीसाठीही आहे.

7. सगळ्या राजकीय मतांचा आदर करा.

8. कधीच कोणाच संभाषण मध्येच खंडीत करू नका.

9. जर तुम्ही कोणाची मस्करी करत असाल आणि त्या व्यक्तीला त्याचा त्रास होत असल्यास ती मस्करी ताबडतोब थांबवा.

10. जो मदत करतो त्याला धन्यवाद द्या.

11. एखाद्याची स्तुती सगळ्यांसमोर करा पण त्याचे दोष त्यालाच सांगा.

12. कोणाच्या वजनावर भाष्य कराण्याची काही आवश्यकता नसते. फक्त म्हणा तु छान दिसतोस किंवा दिसतेस , जर त्यांना वजन कमी करायचं असेल किंवा वाढवायचे असेल तर ते तुमच्याशी बोलतील.

13. जेव्हा एखादा त्याच्या मोबाईल मधील फोटो तुम्हाला दाखवतो तेव्हा डावीकडे किंवा उजवीकडे स्क्रोल करू नका , कारण तुम्हाला कल्पना नसते पुढे काय दिसेल.

14. जेव्हा आपला सहकारी डॉक्टरकडे जातो आहे असं म्हणाला तर,  कशासाठी? का ?असे प्रश्न विचारू नका, फक्त तु ठिक आहेस अशी आशा करतो एवढच म्हणा.त्याला सांगायचं असल्यास तो सांगेल , तुम्ही त्याला खाजगी स्वरुपाच्या आजाराबाबत विचारून खजील करू नका.

15. जेवढा मान साहेबाला द्याल तेवढाच शिपायाला पण द्या. आपल्या हाताखालच्या माणसांना तुम्ही कीतीही आदराची वागणूक देता यावर तुमच्या व्यक्तिमत्वाची उंची ठरवली जाते.

16. एखादा माणूस आपल्याशी समोरासमोर बोलत असल्यास सतत मोबाईल मध्ये लक्ष देणे ही अक्षम्य चूक ठरते.

17. जो पर्यंत सल्ला मागितला जात नाही तोपर्यंत देऊ नका.

18. जेव्हा एखाद्याशी बऱ्याच वर्षांनी भेटत असाल तेव्हा जोपर्यंत विषय निघत नाही तोपर्यंत त्याचे उत्पन्न व वय याबाबत विचारू नका.

19. जोपर्यंत एखाद्या विषयात तुम्हाला समाविष्ट केले जात नाही तोपर्यंत त्या विषयापासून लांब रहाणे योग्य.

20. रस्त्यात कोणाची भेट झाल्यास गॉगल काढून संभाषण सुरू करा , ह्यातून आदर प्रतित होतो तसेच साफ संभाषणाच्या दृष्टीने डोळ्यांचा संपर्क आवश्यक असतो.
  
 हा संदेश आपल्या व्यक्तिमत्व विकासासाठी आवश्यक आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++





@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@




+++++++++++





+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++


रंगखडूंचे तुकडे !

एक इंग्रजी वाक्य वाचनात आलं होतं. ते असं होतं की, "we are all a little broken. But the last time I checked, broken crayons still colour the same!"

म्हणजे, "आपण प्रत्येकजण कधी ना कधी मनानं तुटलो असतो. पण तुटलेले रंगीत खडू मी पाहिले, तर लक्षात आलं तुटले असले तरीही त्यांचा रंग तसाच राहिला आहे!"

किती सुंदर वाक्य आहे नाही! आपण प्रत्येकजण कुठे ना कुठे तरी मनावर आघात झाल्यानं किंवा ओरखडा उमटल्यानं तुटलो असतो. पण म्हणून त्या तुटलेपणानं आपल्यात जे चांगुलपण आहे ते का नष्ट होऊ द्यायचं? ज्या क्षमता आहेत त्या का लयास जाऊ द्यायच्या? रंगाचे खडू कधी कधी वापरताना तुटतात, पण म्हणून त्यांचा रंग पालटतो का? नाही! तो तुटका तुकडाही आपल्या मूळ स्वरूपाप्रमाणेच त्याच रंगाचा प्रत्यय देत राहतो... अगदी झिजून संपेपर्यंत! त्या खडूच्या तुकड्यांकडून आपण इतकं तरी शिकलंच पाहिजे!!

- चैतन्य प्रेम

+++++++

आपलं माणूस

भरले डोळे पुसण्यासाठी आपलं माणूस लागतं... 
आनंदाचा उत्सव करण्यासाठी आपलं माणूस लागतं... 
कौतुकाने पाठ थोपटायला आपलं माणूस लागतं... 
पाठीवर रट्टा द्यायलाही आपलं माणूसच लागतं... 

अशी आपली माणसं सहजासहजी मिळत नाही...
जमिनीची मशागत केल्याशिवाय पिवळं सोनं दिसत नाही... 
खत, पाणी मुबलक मिळालं की पीक कसं तरारून येतं.. 
काळजात प्रेम, आदर, माया असली की आपलं माणूस भेटतं...

आॅनलाईनच्या जमान्यात सगळं काही घरपोच मिळतं... 
भाजीपाला, किराणा, जेवण काही क्लिकवर घरी येतं... 
एक गोष्ट मात्र मित्रांनो कधीही ऑनलाईन  मिळत नाही... 
मन मोकळे करायला आपलं माणूस  कधी घरपोच येत नाही.. 

म्हणुनच सांगतो मित्रा पैशांबरोबर आपली माणसं पण जोडायला शिक.. 
इगो, राग नि मत्सर सोडून नात्यांचे अतूट बंध  विणायला शिक..
नातं टिकवायला कधी तरी कमीपणा हा घ्यावाच लागतो...
नात्यांच्या श्रीमंतीनेच माणूस खरा श्रीमंत होतो.. 

आपली माणसं जोडणं खरंच इतकं काही अवघड नाही..
थोडासा दुसऱ्याचा विचार केला तर नातं कधीही तुटत नाही.. 
सहजच केलेला फोन खरंच खूप आनंद देऊन जातो... 
धावती जरी भेट दिली तरी आपला माणूस सुखावतो.. 

एकटं एकटं जगण्यात खरं सांग बरं काय मजा आहे?? 
आपलं माणूस सोबत नसेल तर जीवन जगणं सजा आहे... 
आपलं माणूस सोबत असलं की नैराश्य दूर पळतं... 
आपल्या माणसांमुळेच गड्या आयुष्य सुंदर बनतं...||


00000000000000000000000000000000000000000000000000000000000000

"अश्वत्थाम्याची भळाळती जखम"

 अंतरातम्यात डोकवायला लावणारी एक प्रेरक कथा

एका "बुजुर्ग" प्रवचनकार ताईंनी त्यांच्या एका प्रवचनांत "वांग्याच्या भाजीची" एक छान गोष्ट सांगितली. त्या कोणाकडे तरी जेवायला गेल्या होत्या तेव्हा वांग्याची भाजी केली होती, ती भाजी काही "तितकीशी" जमली नव्हती. त्याला काही विशेष "चव ढव" नव्हती.. आता ती तितकीशी जमली नव्हती ,हा विषय खरं तर तिथेच सोडून द्यायला हवा होता. पण तसं झालं नाही.. काही दिवसांनी त्या आणखी कोणाकडे तरी गेल्या, त्यांनीही वांग्याची भाजीच केली होती.. त्यांची भाजी मात्र "चांगली" झाली होती, ती भाजी खातानाही पुन्हा न जमलेली "ती" भाजीच त्यांना आठवली. काही दिवसांनी मंडईत कृष्णाकाठची ताजी वांगी पाहिल्यावर पुन्हा ती "न जमलेली भाजी" त्यांना आठवली.. या प्रसंगाचा शेवट करताना त्या म्हणाल्या, ‘‘जी गोष्ट चांगली झाली नाही ती स्मरणांत राहिली. त्यापूर्वी चांगल्या चवीची वांग्याची भाजी खाल्ली नव्हती का कधी? खाल्ली होती. पण ती लक्षांत राहिली नाही.. बिघडलेली मात्र लक्षांत राहिली.. आपलं मन असंच असतं.. जे लक्षांत ठेवायला हवं ते ठेवत नाही आणि "नको" ते धरून बसतं.’’

स्वत:ला नातसून आलेली आज्जे सासूबाई, तिच्या सासूबाई तिला पुरणपोळ्या नीट "जमल्या" नाहीत म्हणून जेवताना पानावर कसं "टाकून" बोलल्या, हे आजही डोळ्याला "पदर लावून" सांगत असतात , पण याच सासूबाईंनी तिच्या बाळंतपणांत तिची "सेवा" केली हे मात्र "विस्मृतीकोशांत" गेलेलं असतं. मानवी स्वभाव.. नको ते आठवत राहतं.

आमच्या घरी रोज श्लोक पाठ करून आजोबांना म्हणून दाखवण्याची शिस्त होती. कंटाळा यायचा कधी कधी, मग मी नाही पाठ करायचे. आजोबा रागवायचे, कधी कधी "अबोला" धरायचे. मग मी एका दिवसांत आठ श्लोक पाठ करून दाखवायचे. त्याचं कौतुक असायचं, पण "त्या" दिवशी पाठ केले नाहीत,हे ते विसरायचे नाहीत. मग आई नेहमीचं तिचं ठेवणीतलं वाक्य म्हणायची, "बूंद से गई वो हौद से नही आती" तो बूंद एकदा मनातून पडला ,की तोच लक्षात राहतो. नंतर कितीही मोठा हौद बांधला तरी.. काय म्हणायचं या मानवी स्वभावाला?

पाच वर्षांपूर्वी एखादा "प्रसंग" घडलेला असतो.. त्यातल्या व्यक्तींशी आपलं बोलणं, संभाषण "बंद" झालेलं असतं. जेव्हा जेव्हा ती व्यक्ती दिसते तेव्हा तेव्हा आपल्याला "तोच" प्रसंग आठवत राहतो.. कटू आठवण, अढी "अधिकच घट्ट" होत जाते.. पाच वर्षांनीही आपण सगळे तेच आणि तसेच आहोत असं मानूनच आपण वागत असतो.. या पाच वर्षांत माणसं बदललेली असू शकतात, हा विचार करण्याएवढे "उदार" आपण नसतो. त्या व्यक्तीने पुन्हा चांगल्या हेतूने नात्याचा हात पुढे केला तरी आपण धरून ठेवलेली ती "कटू" आठवण आपल्याला प्रतिसादाचा "हात" पुढे करू देत नाही.* म्हणून कटू आठवण जिथल्या तिथे सोडून देणं हाच उत्तम उपाय. ती "कुरवाळत" ठेवू नये. आपलं सुदैव की आपण खूप जुनी, "भळभळणारी जखम" वागवत फिरणारा "अश्वत्थामा" नाही.. जखम अंगावर, मनावर ताजी ठेवण्याचं "दु:ख" काय असतं ते त्यालाच माहीत. त्याला तो शाप आहे पण ,आपल्याला तर अशी "सक्ती" नाही, मग "अश्वत्थाम्याचं दु:ख" विनाकारण मागून का घ्यायचं?

मेमरी चिपवरून भूतकाळाच्या आठवणी हळूहळू "पुसून" टाकून चिपमध्ये नव्या आठवणींना "जागा" करून द्यायला हवी.. मनाला त्रास देणाऱ्या आठवणी तर "जाणीवपूर्वक" पुसून टाकायला हव्यात. त्यातून फक्त धडा घेऊन, कोणाहीबद्दल मनांत "गाठ" न ठेवता पुढे पाऊल टाकायला हवं आणि एखाद्या वळणावर भेटली पुन्हा तीच कटू आठवण, तर ‘तुझ्या कटुत्वामध्येही गोडवाच मी शोधणार आहे..’ असं तिलाच ठणकावून सांगावं. स्मृतिकोशांत काय ठेवायचं ? हे ज्याला समजलं तो "खरा" विवेकी! भूतकाळाला वर्तमानाची जागा "अडवू" देऊ नये..

‘कुंग फू पांडा’ या चित्रपटांत मास्टर उग्वे नावाचं एक कासव आहे. ते तीनशे वर्षांचं आहे. त्याच्या तोंडी एक "सुंदर वाक्य" आहे, ‘यस्टर्डे इज हिस्टरी, टुमारो इज मिस्टरी. टूडे इज अ गिफ्ट फ्रॉम द लॉर्ड, हेन्स इट इज कॉल्ड द प्रेझेंट.’ गम्मत म्हणजे तीनशे वर्षांचं असलं तरी ते ‘आमच्या वेळेला असं होतं’ असं न म्हणता ‘वर्तमान हीच "अमूल्य भेट" आहे’ असं सांगतं. रात्री झोपताना आपण "टोचणारे" अलंकार जसे काढून ठेवतो तशाच "टोचणाऱ्या" आठवणीही मनांतून "काढून" ठेवाव्यात.. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी फक्त "अलंकार" घालावेत..  *सकाळी तन मोकळं, मन मोकळं


+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++





++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++


तीन रुम किचनचा एखादा फ्लॅट, दोन चार एकरचे फार्म हाऊस एखादी चार चाकी गाडी आणि भौतिक वस्तूंचं प्रदर्शन मांडता आलं की आपण म्हणतो, "अमक्या- तमक्यानं शून्यातून विश्व निर्माण केलं !"*
म्हणजे होतंय काय की सुख मिळेल या आशेने माणूस श्रीमंत होण्यासाठी धडपडतोय. पण सुखी काही दिसत नाही!

आपणचं म्हणतो की, आमच्या लहानपणी खूप मजा यायची. खूप करमायचं, घर भरलेलं असायचं. दिवस कधी मावळायचा ते कळायचंच नाही!

  मग आता काय झालं ?

  मजा कुठ गेली?

  एकटं एकटं का वाटतं ?

  छातीत धडधड का होते ?

  कशामुळे करमत नाही ?

 कारण...

विश्व निर्माण करण्याची व्याख्या कुठेतरी चुकली. विश्व निर्माण करणं म्हणजे… 
 नाती गोती जपणं
 छंद जोपासणं
 पाहुणे होऊन जाणं
 पाहुण्यांचे स्वागत करणं
 खूप गप्पा मारणं
 घराच्या उंबऱ्यात चपलांचा ढिग दिसणं खळखळून हसणं
 आणि
 काळजातलं दुःख सांगून मोकळेपणाने रडणं !!! 
या गोष्टी आपण प्राप्त करू शकलो तर”शून्यातून विश्व निर्माण केलं ” असं म्हणावं .

तुम्हीच सांगा आपल्या आयुष्यात या सर्व गोष्टींची वाढ झाली की घट झाली ….. ???

 तुमचं खर दुःख तुम्ही मोकळेपणाने किती जणांना सांगू शकता  ????
 असे किती मित्र , शेजारी , नातेवाईक आपण निर्माण करू शकलो… ???
 खूप कमी , किंबहुना नाहीच...
 !!! मग आपण ” विश्व निर्माण ” केलं का  ??? 
तर नाही….

मित्र हो ,
 रजिस्ट्री च्या कागदाच्या फायली म्हणजे विश्व… ????
 भौतिक साधनांची रेलचेल म्हणजे विश्व … ??? 
  लॉकर मध्ये ठेवलेले हिरे मोत्यांचे दागिने म्हणजे विश्व….. ????
  घातलेल्या चेहऱ्यांची गर्दी म्हणजे विश्व…… ???? 
  नाही !!
   हे समजून घ्यावं लागेल ….!!!
 
मोठं बनण्याच्या दडपणा मुळे आणि मग कामाच्या व्यापा मुळे नाती दूर जाणार असतील.....इतरांना तुच्छ लेखण्यामुळे आणि अहंकारामुळे माणसं जवळ येणार नसतील…...दुःख सांगायला , मन हलकं करायला जागाच उरणार नसेल...
तर….. 
 आम्ही शून्यातून विश्व निर्माण केलं, की विश्वातून शून्य?

   वाचा,विचार करा,अहंकार सोडा, माणूसकी जपा. इतरांच्या कामी या.सोबत काहीचं येत नाही.



++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++


खूपच अनुकरणीय आहे...

सर्व मानसिक रुग्ण दवाखान्यातच नसतात, तर काही आपल्या जवळपासही असतात!

एक व्यक्ती ऑटोरिक्षामध्ये बसून एका ठिकाणी चालला होता. ऑटो ड्रायव्हर आरामात ऑटो चालवत होतो. 

तेवढ्यात एक कार अचानक पार्किंगमधून निघून रोडवर आली. ऑटो ड्रायव्हरने जोराचे ब्रेक लावले आणि कार-ऑटोचा अपघात होता-होता राहिला.कारचालकाची चूक असूनही तो रागामध्ये ऑटो ड्रायव्हरला घालून-पाडून बोलू लागला. ऑटो ड्रायव्हर कारचालकावर क्रोधीत झाला नाही आणि त्यालाच सॉरी म्हणून पुढे निघून गेला. 

ऑटोमध्ये बसलेल्या व्यक्तीला कार चालकाचे वर्तन पाहून खूप  राग आला होता आणि त्याने ऑटो ड्रायव्हरला विचारले- तू त्या कार चालकाला काहीही न बोलता तसेच कसे काय जाऊ दिले? 

त्याची चूक असूनही तो तुला किती वाईट बोलून गेला.आपले नशीब चांगले म्हणून आपण वाचलो अन्यथा आता दवाखान्यात असतो.ऑटोवाला म्हणाला, साहेब अनेक लोक गार्बेज ट्रक( कचऱ्याचा ट्रक) प्रमाणे असतात.

 हे लोक खूप कचरा आपल्या डोक्यात घेऊन फिरत असतात.ज्या गोष्टींची आयुष्यात काहीच गरज नाही त्या गोष्टी मेहनत करून जोडत राहतात उदा. क्रोध, घृणा, चिंता, निराशा इ.

अशा लोकांच्या डोक्यात कचरा जास्त असतो आणि हे आपले ओझे कमी करण्यासाठी इतरांवर हा कचरा फेकण्याचा शोधात राहतात.यामुळे मी अशा लोकांपासून दूर राहतो आणि दुरूनच स्मितहास्य करून त्यांना वाटी लावतो.

  कारण अशा लोकांनी फेकलेल्या कचऱ्याचा मी स्वीकार केला तर मीसुद्धा कचऱ्याचा एक ट्रक बनेल आणि स्वतःसोबतच जवळपास असलेल्या लोकांवरही कचरा फेकत राहील.

मला असे वाटते की, आयुष्य खूप सुंदर आहे. यामुळे जे आपल्याशी चांगले वागतात त्यांना धन्यवाद म्हणा आणि जे लोक वाईट वागतात त्यांना मोठ्या मनाने माफ करा. 

आपण हे नेहमी लक्षात ठेवावे की, सर्व मानसिक रुग्ण फक्त हॉस्पिटलमध्ये नसतात तर काही आपल्या जवळपासही फिरत राहतात.

लाइफ मॅनेजमेंट
शेतामध्ये बी पेरले नाही तर निसर्ग ती जमीन गवत (घासफूस)ने भरून टाकतो. याचप्रमाणे आपण डोक्यामध्ये सकारात्मक विचार भरले नाही तर नकारात्मक विचार आपली जागा बनवतात. दुसरा नियम असा आहे की, ज्याच्याकडे जे आहे तो तेच वाटत राहतो. सुखी सुख, दुःखी दुःख, ज्ञानी ज्ञान, भ्रमित भ्रम आणि भयभीत भय वाटत राहतो....

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++



+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++



=======================================================

कुणी लिहिले आहे माहीत नाही पण खूप छान लिहिले आहे

_आयुष्य जगायच कधी

वय 20 वर्षे - आता शिक्षण चालू आहे .
25 वर्षे -- नोकरीच्या शोधात आहे.
30 वर्षे -- लग्न करायचं आहे.
35 वर्षे -- मुलं लहान आहेत
40 वर्ष -- थोडं "सेटल" होऊ द्या.
45 वर्षे -- वेळच मिळत नाही हो.
50 वर्षे -- मुलगा / मुलगी दहावीला आहे.
55 वर्ष-- प्रकृती बरी नसते. 
60 वर्षे -- मुलामुलींचे लग्न करायची.
65 वर्षे -- ईच्छा तर खूप आहे, पण गुडघ्याचा त्रास खूप वाढलाय.
70 वर्ष--  मेला.

17 दिवसाच्या आत सर्व प्रॉपर्टीवरून तुमचे नाव कमी

अरेच्चा 
जगायचं राहूनच गेले … ! 
  
 तेंव्हा 
आधी जगा ते पण माणुस होऊन आनंदाने ...

आपल्या मालकीच अस कांहीच नाही या जगात

बाकी 
सर्व 
इथेच 
राहणार 
आहे .
झाडू,
जो पर्यंत एकत्र बांधलेला असतो,तोपर्यंत तो " कचरा " साफ करतो पण तोच झाडू जेव्हा विखुरला जातो तेव्हा तो स्वतः"कचरा" होवून जातो.
त्यामुळे एकत्र रहा, एकमेकांवर प्रेम करा, एकमेकांचा आदर करा, एकमेकांना मदत करा आज मला एक नवीन शिकायला मिळाले.
मी बाजारामध्ये द्राक्ष घेण्यासाठी गेलो .
मी विचारले "काय भाव आहे ?
त्यांनी सांगितले  : "60 रूपये  किलो ."
त्याच्या बाजुला काही द्राक्ष विखरुन पडली होती.  मी विचारले: " याचा काय भाव आहे "
तो बोलला  : "20 रूपये किलो"
मी विचारले :"इतका कमी भाव .? 
तो बोलला :"साहेब ही पण चांगली द्राक्ष आहेत..!! 
पण.. ती गुच्छातुन तुटून पडलेली आहेत, ती तुटून पडलेली द्राक्ष त्या गुच्छाला धरून नाही म्हणून किंमत कमी आहे 
तेव्हा मला कळाले
जो व्यक्ती  संगठन...समाज आणि  परिवार याच्या पासुन अलग होतो त्याची किंमत ...... अर्ध्याहून कमी होते...
कृपया आपले कितीही मतभेद झाले तरी आपण परिवार, संघटन आणि मित्र यांच्याशी सतत जोडून रहा...🙏🏻🙏🏻

======================
दृष्टीकोन !!   👀


       आपण नाटक पहायला गेलो तर पुढची सीट मागतो आणि सिनेमा पहायला गेलो की मागची. तुमचं जगातलं स्थान असंच सापेक्ष असत. ते अविचल कधीच नसतं...!
        साबण बनवायला तेल हा घटक जरूरी असतोे आणि तेलाचा डाग काढायला साबणच लागतो. हा अटळ विरोधाभास आहे. 
       जगात दोनच प्रकारची माणसं आनंदात असतात. वेडीे माणसं आणि लहान मुलं ! चांगल्या कामासाठी ध्येयवेडे व्हा आणि ध्येय साध्य झाले की लहान मुलांसारखा त्याचा आनंद घ्या...!
        जगण्याचा आनंद घ्या. "जीवन खुप सुंदर आहे" फक्त तसं जगायला हवं. काचेला "पारा" लावला की, आरसा तयार होतो. पण लोकांना  "आरसा" दाखवला की, त्यांचा "पारा" चढतो. "आरसा तोच असतो" फक्त त्यात "हसत" पाहिले की, आपण "आनंदी" दिसतो, आणि "रडत" पाहिले की, आपण "दु:खी" दिसतो.
      तसेच "जीवन" ही तेच असतं, फक्त त्याच्याकडे आपला पहाण्याचा "दृष्टिकोन" त्याला "आनंदी"  किंवा  "दु:खी" बनवतो.

"म्हणून" 
"दृष्टिकोन" महत्त्वाचा आहे. दृष्टिकोन बदला, जीवन बदलेल....

=======================================


============================================

😊 बेस्ट प्रेरणादाई विचार..! 👌

ससा आणि कासवाच्या शर्यतीत ससा झोपून राहिल्याने हरला. कासव जिंकले पण सशाला शांत बसवेना . आपल्यात वेगाने पळण्याची क्षमता अधिक असूनही निव्वळ झोपल्यामुळे आपण हरलो हे त्याच्या लक्षात आले. पराभवाचा हा सल संपविण्यासाठी त्याने कासवापुढे पुन्हा शर्यतीचा प्रस्ताव ठेवला. विजयाच्या आनंदात आपण जिंकू शकतो, यावर विश्वास बसलेल्या कासवाने होकार भरला. शर्यत पुन्हा सुरू झाली. यावेळी सशाने चूक केली नाही. तो थांबला नाही. झोपला नाही. परिणामी, वेगवान ससा शर्यत जिंकला. हळू चालणारे कासव हरले.

पण एकदा विजयाची चव चाखलेलं कासव हार पत्करायला तयार नव्हतं. कासव पुन्हा सशाकडे गेलं. म्हणालं,'मी तुझं ऐकलं. आता तू माझे ऐक. आपण पुन्हा शर्यत लावू !'ससा हसला आणि म्हणाला,

 "एकदा माझ्या चुकीमुळे हरलो. पुनःपुन्हा मी ती चूक कशी करेन ? पण तुझी हरण्याचीच इच्छा असेल तर लावू पुन्हा शर्यत !' सशाचा होकार मिळाला तसं कासव म्हणालं, 'पण यावेळी शर्यतीचा मार्ग मी ठरवणार !' स्वतःच्या वेगाची आणि कासवाच्या धिम्या गतीची खात्री असलेल्या सशाने त्यालाही होकार भरला .

 शर्यतीचा मार्ग कासवाने ठरवला. शर्यत पुन्हा सुरू झाली ससा चूक करणार नव्हता. तो वेगात पळत राहिला. कासव मागे राहिलं पण पळता पळता अचानक ससा थबकला. जागेवर थांबला. पुढे आडवी नदी वाहत होती. कासवाने बरोबर मार्ग काढला होता. सशाला पोहता येत नव्हतं. ससा तिथेच थांबुन राहिला. हळूहळू येणारं कासव तिथे पोहोचलं. त्याने सशाकडे सस्मित पाहिलं आणि नदीत उडी मारून पलीकडच्या काठावर पोहत पोहोचलही.शर्यत कासवाने जिंकली. सशाच्या वेगक्षमतेवर कासवाने स्वतःच्या बुद्धिक्षमतेने मात दिली. हरलेला ससा विचार करत राहिला. आपल्याला पोहता येत नाही, म्हणून आपण हरलो, हे त्याच्या लक्षात आलं.तो विचार करून पुन्हा कासवाकडे गेला. 

म्हणाला,'

मित्रा, आपण आजपासून शर्यत नाही लावायची.आजपासून एक करायचं. जिथे जमीन असेल तिथे मी तुला पाठीवर घेईन. जिथे नदी आडवी येईल तिथे तू मला पाठीवर घे. दोघे मिळून आपण असे पुढे जात राहिलो, तर सर्वात पुढे आपण दोघेच असू !'

 प्रत्येकात साऱ्या गोष्टी अथवा गुण कधीच नसतात. मात्र प्रत्येकात काहींना काही गुण असतोच.जे आपल्यात नाही ते इतरांकडे असू शकते. जे इतरांकडे नाही ते आपल्याकडे असू शकतं. 

अशा एकमेकांच्या गुणांचा वापर करीत आपल्यातला उणेपणा भरून काढता येतो.सर्वोत्तम यश गाठता येतं.

 एकमेकांना पराभूत करण्यात शक्ती खर्ची घालण्यापेक्षा एकमेकांच्या शक्तीच्या बळावर बलाढ्य काही करता येतं. 

वैयक्तिक मोठेपणाच्या अभिलाषेपायी निव्वळ दुसऱ्याच्या चुका काढण्यापेक्षा, त्यांच्यातील चुकांकडे दुर्लक्ष करून त्यांच्यातील उत्तम गुण हेरून त्यांचा वापर करून घेणं, ही खरी यशस्वी क्रियाशीलता !

उपयोगी पडणारी माणसं मिळवणं आणि आपण कोणाच्या उपयोगी पडू शकतो ते पाहून त्याला मदत करणं या सहकार्यभावनेच्या जोरावरच मोठमोठी कार्य सिद्धीस नेली जातात.

काही लोकांकडे कल्पनाक्षमता असते;पण कल्पना सत्यात उत्तरावणारी कृतीक्षमता नसते.काहींकडे शक्ती असते; पण योग्य नियोजनक्षमता नसते. काहींकडे संघटनक्षमता असते; पण निर्णयक्षमता नसते. निर्णयक्षमता असते; तर नेतृत्वक्षमता नसते. 

अशावेळी ज्याच्याकडे जे आहे त्याचा त्याच्या गुणांचा योग्य वापर करीत सांघिकपणे पुढे जाणे म्हणजेच बिकट रणांगणही जिंकणे!
 
यश मिळवायचं असेल तर असे गुण आणि गुणी माणसं वेचणं हे फार महत्त्वाचं !

संकटाच्या क्षणी गोगलगायीसारखे पोटात पाय घेऊन स्वतःच्याच कोषात लपून राहणं टाळलं पाहिजे!

याउलट जास्तीत जास्त माणसं जोडा. 
जुन्या सौहार्दाचा शोध घ्या ! 
नव्याने मैत्री करा. 
साऱ्यांच्या संपर्कात राहा. 
मिळूनमिसळून वागा. 

तुमच्यासाठी जे जे उत्तम ते ते शोषून घेण्यासाठी तत्पर असलेले टिपकागद व्हा !


=====



===============================================

नकारात्मक विचारांना आता लावा पळवून...
जाणून घ्या  फक्त ह्या एका रहस्यमय, टीप मधून👍👍👍

नमस्कार मंडळी 🙏
कसे आहात सगळे...? 

निद्रादेवतेला तिलांजली देऊन Netflix, Amazon Prime, Hotstar, News... यांची शास्त्रशुद्ध रित्या पारायणे चालू आहेत की नाही....? काय म्हणता आता त्याचाही कंटाळा आला .....चालायचंच..... 

बरं आता विषय निघालाच आहे म्हणून विचारते की तुमच्या बाबतीत कधी असं घडलं आहे का हो की एखादे पुस्तक वाचताना किंवा एखादा व्हिडिओ बघता बघता एक विचार मनात येतो आणि मग त्या विचारां बरोबरच तुम्ही वाहवत जाता...आणि जेव्हा भानावर येता...तेव्हा कळतं की, की अरे व्हिडीओ तर संपला....मग पुन्हा सुरुवातीपासून सुरू... काहींच्या बाबतीत असं होतं की फोनवर बोलता बोलता किंवा बातम्या बघता बघता ते नाश्ता किंवा जेवण करतात आणि जर त्यांना थोड्यावेळाने विचारलं  की आज काय जेवलात ..??? त्यांच्याकडे उत्तर नसते ...गृहिणींच्या बाबतीत स्वयंपाक करताना असे काही विचारचक्र मनात चालू असतात की भानावर येताच नक्की आपण भाजीत मीठ टाकलं आहे की नाही  तेच, त्यांना आठवत नाही .....घरातल्या घरात एखाद्या खोलीतून दुसर्‍या खोलीत एखाद्या कामासाठी आपण जात असतो आणि त्या खोलीत आल्यावर आपण नक्की कशासाठी आलो होतो हे स्वतःलाच विचारतो ....ऑफिसमध्ये नेमक्या वेळेवर मागितलेली महत्त्वाची फाइल सापडत नाही ....कुठे ठेवलेली असते तेच आठवत नाही ....एखादी अतिशय महत्त्वाची कामगिरी आपल्यावर सोपवलेली असते... जिथे चुकीला माफी नसते ....आपण सुद्धा अगदी मनाशी चुकायचं नाही अशी खूणगाठ मनाशी बांधून सुसज्ज होऊन रणांगणात उतरतो आणि कुठल्यातरी बेसावध क्षणी आपल्या हातून चूक घडते आणि मग सातत्याने अशा गोष्टींची पुनरावृत्ती व्हायला लागल्यावर त्या व्यक्तींच्या माथी शिक्का बसतो

ABSENT MINDED

कसा वाटतो हा शब्द ऐकायला ...???खूप वाईट वाटते ना हा शब्द ऐकल्यावर ....चर्रर्रर्र......होतं ना काळजात हा शब्द ऐकला की... 
दैनंदिन जीवनात ह्या गोष्टी आपल्याला खूप वरवरच्या वाटतात ..कधीकधी तर  आपणच आपला धांदरटपणा इतरांना सांगतो परंतु मनात खोल कुठेतरी असतेच की हे असं का होतं आपल्या बाबतीत ...??? परंतु जेव्हा आपण या गोष्टी चारचौघात सांगतो तेव्हा कळतं की आपल्यासारखे आणखीही आहेत म्हणजे हे नॉर्मल असेल आणि पुन्हा येरे माझ्या मागल्या सुरू होतं... 

आज आता एकच करा ....हा लेख वाचताना मध्येच थोडं थांबून शांतपणे डोळे बंद करून स्वतःच्या मनाला एकदा विचारा की का होतं हे असं माझ्याबाबतीत? मला १००% खात्री आहे की तुम्हा सर्वांचं उत्तर एकच असेल ते म्हणजे 

विचार-अनियंत्रित विचार

होय मित्रांनो आपलाच आपल्या विचारांवर ताबा नसल्याने या गोष्टी नकळतपणे आपल्या हातून घडतात. आपल्या धांदरटपणावर पाठीमागून हसणारे लोक मनातल्या मनात आपल्यावर
ABSENT MINDED हा शिक्का मारणारे लोक ....अनवधानाने आपल्याच हातून सतत होणाऱ्या चुका आणि त्यातून सतत मनाला येणारी अपराधीपणाची बोचणी ...आणि या सर्वांतून निर्माण होणारा अनावश्यक नकोसा वाटणारा तणाव ....या सर्व गोष्टींना एकच कारण आहे ते म्हणजे

 नको त्या वेळी येणारे नको ते विचार.... 

विषय कुठलाही असो मित्रांनो, आपल्याला ही जी विचारांवर विचार करण्याची सवय लागली आहे ना त्या चक्रव्यूहात आपण अडकत जातो आणि इच्छा नसताना आपल्या हातून अशा चुका किंवा काही धांदरटपणा होत राहतो. 

बरं आता तुम्ही म्हणालं ते सगळं ठीक आहे हो पण आता यावर उपाय काय???
सांगते ....उपाय एकच तो म्हणजे

MINDFULNESS म्हणजेच सजगता

आता हा शब्द ऐकल्यावर तुमच्या मनात आशा पल्लवित झाल्या असतील आणि संभ्रमही निर्माण झाला असेल की काय आहे हे माइन्ड फुलनेस...? कसे करायचे..?किती वेळात आमचा हा प्रॉब्लेम सॉल्व होईल..??कित्येक जणांना तर माहीतही असेल हा शब्द कदाचित त्यांच्या मनात येईल ....हो हे तर माहिती आहे कि आम्हाला...काही नाही होतं हो याने ...
एक ना अनेक विचारांची वावटळं पुन्हा तुमच्या मनात उठली असतील परंतु प्रथम ही सर्व वावटळं थांबवा आणि पुन्हा मन एकाग्र करून वाचा... 

जर तुम्हाला आठवत नसेल तर पुन्हा एकदा आठवण करून देते मंडळी किमी मी माझ्या मागच्या लेखात सांगितले होते की 

दृष्टीचा इलाज होऊ शकतो परंतु दृष्टिकोनाचा इलाज नाही होऊ शकत

म्हणूनच सर्व प्रथम पूर्वग्रह  बाजूला सारून माईंडफुलनेस या शब्दाकडे पाहूया आणि प्रथम जाणून घेऊया की हे माईंड फुलनेस म्हणजे नेमके आहे तरी काय...???? 

माईंडफुलनेस म्हणजे सजगता म्हणजेच वर्तमानातल्या क्षणाकडे लक्ष देण्याचा सराव आणि ते सुद्धा अगदी हेतुपूर्वक आणि जजमेंटल न होता

काय असतं मंडळी आपण जेव्हा एखादे काम करत असतो तेव्हा मागे म्हटल्याप्रमाणे विचारांची चक्र आपल्या मनात हळूहळू फिरायला लागतात ..बरोबर..? 

तर या माईंड फुलनेस मध्ये आपल्याला या विचारांवर फक्त लक्ष ठेवायचे असते हो पण एक आहे बर का...अजिबात जजमेंटल न होता लक्ष ठेवायचे....म्हणजे ।नेमकं काय करायचं...????

सांगते..येणारे विचार....ते चांगले आहेत की वाईट...सकारात्मक आहेत की नकारात्मक आहेत ...याचा विचार न करता त्या विचारांवर किंवा भावनांवर लक्ष ठेवायचे... 

शास्त्रशुद्ध अभ्यासातून देखील आता हे सिद्ध झाले आहे की माईंडफुलनेस च्या मदतीने आपण आनंदी व यशस्वी जीवन जगू शकतो ... या विषयावर आधारित अनेक गैरसमज देखील आहेत ....उदाहरणार्थ माईंडफुलनेस हा एक धर्म आहे।।। परंतु खरे पाहता हा एक लोकप्रिय सराव आहे जो कितीतरी धर्मात वापरला जातो ही एक 
MENTAL TRAINING TECHNIQUE आहे 
बरेचदा असेही म्हटले जाते की आपण अगदी जमिनीवर आसनस्थ होऊनच हे केले पाहिजे परंतु हा सुद्धा एक गैरसमज आहे ...तुम्ही दिवसातून कुठल्याही वेळा आणि कितीही वेळा हे करू शकता ...फक्त तुम्ही, ज्या ठिकाणी आहात ते ठिकाण ...ती जागा तुम्हाला तुमच्या सोयीची वाटली पाहिजे ...तुम्ही याचा सराव एका मिनिटापासून ते पूर्ण दिवसापर्यंत कुठेही करू शकता 
मित्रांनो...हे पूर्णपणे तुमच्यावर अवलंबून आहे

खरंतर हे माईंड फुलनेस आपल्या भावनिकतेच्या जागृती संबंधित आहेत तुम्ही तुमच्या कल्पना ,भावना यांना अगदी तसेच बघत असता जसे की तुम्ही आकाशातल्या ढगांना बघत असता ...तुम्ही या प्रक्रियेत कुठल्याच प्रकारची निंदा किंवा स्तुती करत नाहीत आणि कुठलीही प्रतिक्रियाही देत नाहीत... 

हे सगळं मी तुम्हाला एका उदाहरणाने समजावते म्हणजे तुमच्या मनात थोडी स्पष्टता येईल... 

समजा एखाद्या दिवशी तुम्हाला तुमच्या ऑफिसमध्ये एखाद्या सहकार्याचा खूप वाईट अनुभव आला तुम्ही घरी जाताना त्याच गोष्टींचा विचार करत आहात घरी जाईपर्यंत तुम्ही तुमच्या प्रत्येक विचारांना, React झाल्यामुळे किंवा प्रतिक्रिया दिल्यामुळे आता तुमचा घरी येईपर्यंत तिळपापड झालेला असतो ...घरी आल्यानंतर वड्याचे तेल वांग्यावर तर निघतंच आणि घराचं संपूर्ण वातावरण दूषित होऊन जातं....त्यानंतर अजूनही ही तुमचे विचार शांत झालेले नसतात त्यामुळे तुमचं एक मन तुम्हाला सांगत असतं लगेच त्या, सहकाऱ्याला तुम्ही फोन करून किंवा मेसेज करून तुमच्या मनातला राग बोलून दाखवावा किंवा अपमानाचा सूड घ्यावा....

आता याच घटनेकडे आपण माईंडफुलनेस दृष्टीने पाहूया... 

जेव्हा तुम्ही ऑफिसमधून घरी येत असता तेव्हा विचार तुमच्या मनात येतच असतात परंतु तुम्ही इकडे फक्त इतकेच करता की तुम्ही त्या विचारांवर कुठलीच प्रतिक्रिया देत नाही आहात...फक्त तुम्ही तुमच्या विचारांना किंवा भावनांना एका त्रयस्थ नजरेने बघत आहात .... आता आपल्या मनात जे काही आलंय तो फक्त एक विचार आहे आणि तो जसा आला तसा तो जाणारही आहे याची खूणगाठ तुम्ही तुमच्या मनाशी बांधलेली असते. . . 
त्यामुळे तुमच्या मनाचा तोल न ढळता तुम्ही घरी येता ...घरी देखील वड्याचे तेल वांग्यावर निघत नाही ...आणि तुम्ही या संपूर्ण घटनेकडे शांतपणे पाहिल्यामुळे तुम्हाला एखादा प्रभावी तोडगाही मिळतो किंवा एखादा चांगला निर्णयही घेता येऊ शकतो...
कारण, 
मित्रांनो नेहमी लक्षात ठेवा शांत व खंबीर मनात घेतले जाणारे निर्णय हे नेहमी यशस्वी ठरतात परंतु भावनेच्या भरात घेतलेले निर्णय तुम्हाला फक्त अपयशाच्या खाईकडेच लोटतात.... 

प्रत्येक वेळेला आकाश निरभ्रच असते असे नाही ...कधीकधी काळे ढग येतात..चोहीबाजूंनी अंधारूनही येते...परंतु प्रत्येक वेळेलाच ते बरसतातच असं नाही....कधीकधी ते तसेच पुढे निघून जातात.... 
मित्रांनो ..अगदी त्याचप्रकारे माईंड फुलनेस आपल्या नकारात्मक विचारांचे साचलेले मळभ अलगदपणे दूर सारते व आपले मनःपटल पुन्हा निरभ्र करते. . .. 

एकदा शांतपणे विचार करून बघा मित्रांनो ....प्रत्येक घटनेवर किंवा नकारात्मक विचारांवर त्वरित प्रतिक्रिया देणे खरंच आवश्यक असते का. . . . ? 

माइंडफुलनेस तुम्हाला तुमच्या वर्तमानाच्या क्षणाला अनुसरून काम करण्याची प्रेरणा देते....वर्तमानाचा क्षण भरभरून आनंदाने जगायला शिकवते ...त्या क्षणात ना भविष्याची चिंता असते ना भूतकाळाच्या आठवणी असतात....असतो तो फक्त तुम्ही आणि तुमचा वर्तमानकाळ बस्स........ 

आज फक्त इतकंच करा...की हा लेख वाचून झाल्यावर फक्त पाच मिनिटांसाठी डोळे बंद करून शांत बसा आणि बघा की मनामध्ये अक्षरशः निरर्थक विचारांची ट्रॅफिक होते की नाही. . . अशा परिस्थितीत माईंड फुलनेस करणे वाटते तितकी साधी गोष्ट नाही परंतु ती अशक्यही नाही...सततच्या सरावाने हे अगदी सहज शक्य आहे 
परंतु हा विषय खूप खोल आहे त्यामुळे आपण या विषयाची अधिक माहिती टप्प्याटप्प्याने घेऊया ....उदाहरणार्थ माईंडफुलनेस मोठ्यांसाठी आणि लहानमुलांसाठी कसे फायदेशीर आहे...???? 
ते कशा प्रकारे केले जाऊ शकते ...???
तणावजन्य परिस्थितीत त्याचा कसा फायदा होऊ शकतो.... ?? 
या सर्व गोष्टी हळूहळू आपण पुढच्या लेखांमध्ये पाहूया. . .. 

आजचा हा लेख तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा कारण तुमचा प्रेमळ प्रतिसाद हीच माझी ऊर्जा... ☺
धन्यवाद🙏🏼🙏🏼🙏🏼

                                - प्राची पाटील


+++++++++++++++++++++++

पु. ल. म्हणतात - 
👌👌👌👌👌
जळायला काही नसलं की पेटलेली काडीसुध्दा आपोआप विझते.

खर्च झाल्याचं दु:ख नसतं, हिशोब लागला नाही की त्रास होतो.

प्रोब्लेम्स नसतात कोणाला? ते शेवटपर्यंत असतात. पण प्रत्येक प्रोब्लेमला उत्तर असतंच. 
ते सोडवायला कधी वेळ हवा असतो, कधी पैसा तर कधी माणसं. या तिन्ही गोष्टीपलीकडला प्रोब्लेम अस्तित्वातच नसतो.

शस्त्रक्रिया होण्यापूर्वी रोगी घाबरलेला असतो. बरा झाल्यावर शिवलेली जखम तोच कौतुकाने दाखवत सुटतो.

माणूस अपयशाला भीत नाही. अपयशाचं खापर फोडायला काहीच मिळालं नाही तर? याची त्याला भिती वाटते.

बोलायला कुणीच नसणं यापेक्षा आपण बोललेलं समोरच्यापर्यंत न पोचणं ही शोकांतिका जास्त भयाण.

खरं तर सगळे कागद सारखेच…
त्याला अहंकार चिकटला की त्याचे सर्टिफिकेट होते.

रातकिडा कर्कश ओरडतो यात वादच नाही. त्याचा त्रास होतो.
पण त्याहीपेक्षा जास्त त्रास तो कुठे बसून ओरडतो हे सापडत नाही, याचा होतो.

आपलाही कोणाला कंटाळा येऊ शकतो ही जाणीव फार भयप्रद आहे.

कोणत्याही सुखाच्या क्षणी आपण होशमध्ये असणं यातच त्या क्षणाची अपूर्वाई आहे.

रातराणीचा सुगंध पलंगावर लोळता लोळता उपभोगू शकतो. पण तुळस वृंदावनातच राहते. तिच्यापुढे आपल्यालाच उभं राहावं लागतं.

ज्यांच्या असण्याला अर्थ असतो, त्यांच्याच नसण्याची पोकळी जाणवते.

आयुष्य फार सुंदर आहे...
ते फक्त चांगल्या विचारांनी जगता आलं पाहिजे...
माणसाला माणूस जोडत गेलं पाहिजे...


******************

शुभेच्छा

एक दीप देवापाशी एक दीप तुळशीपाशी
ढीगभर शुभेच्छा WhatsApp वर , फोनवर बोलणं उपाशी

हजारावर Frnz फेसबुकवर आणि दिवस संपतो Forwards नी
कधी कळणार वेड्या तुला , स्वर्ग Backwards जात आई—बापांच्या पायाशी !

हाय सोसायटी मॅनर्समधे अर्धा लाडू उष्टावून अर्धा देता टाकून
झाडूवाला—कामगाराची कधी सय येणार , जिन्नस पोचल्यावर तळाशी ?

हातात मोबाईल हजारोंचा पण कमवायची नाहि अक्कल
अख्खा दिवस नेटवर , वाय फाय फ्री, 
बुद्धिला गंज चढवण्याची हि कंपन्यांची शक्कल !

अंथरुणातून उठणार आठला आणि आंघोळीचा नाहि पत्ता
भ्रष्टाचारावर भाषण देत म्हणे मोदीच याच्या मुळाशी !

देश आहे माझ्यासाठी सेवा सगळ्या चांगल्याच हव्यात
कचरा मात्र मी रस्त्यावरच टाकणार झाडायला रस्त्याच्या तळाशी !

दीप लावायला हवेत मनाशी , देश माझा सुंदर आहे
संवाद साधायला हवा बोलून
कट्टी घेत डिजिटल स्थळांशी !

उदय गंगाधर सप्रे म—ठाणे

++++++++++


खूप काही शिकण्यासारखे पण सध्या विस्मरण झालेले.

१. दूध तापविणे ते तूप कढवे पर्यंत आज्जी धेनु ऋण मंत्र म्हणत असे.  
धेनु (गाय) मुळे माझा संसार आरोग्यदायी आहे असे म्हणायची.

२. कितीही श्रीमंती असली तरी शक्य असेल तर घेवडा वेल लावावा सांगत असे. 
असे का ह्याचे उत्तरही तयार, 
म्हणायची, 'श्रीमंती देवापुढे कधीच नसते, दत्तगुरु जेवण्यास येतात, घरची  घेवडा  भाजी  गुरुवारी करावी. 
घेवडा कथा वाचावी, कमी असते ते वाढते.' 

३. अन्नाचे एक शीत तरी सैनिकासाठी पानात सुरवातीला बाजूला ठेवावे मग तुळशीत अर्पण करावे. 
देव त्यांना रोजचा घास पोहोचवतो, त्या लेकरांचे आयुष्य वाढते. 

४. वाळवण घालताना आज्जी सूर्यमंत्र म्हणायची, काळजी घे म्हणायची माझ्या संसाराची. 

५. रोज एकदा घरच्या झाडांना कुरवाळून यायची, 
कोरफडीचे पण लाड करायची, आम्हाला नवल वाटायचे, 
तर म्हणायची, 'स्वतः शुष्क दिसते वरून पण अंगी खूप गुण आहेत. 
एखाद्याला फक्त वरअंगी, रूपावर तपासू नये.'

६. मुंग्यांना साखर ठेवायची, 
म्हणत असे मी दिलेल्या मार्गावरूनच जा गं बायांनो, 
सुखात राहा, माझ्या लेकरांना डसू नका. 

७. तुळशीला दिवा लावायची, चिलटे, किडे नष्ट होऊन घरात येत नाहीत.
ती माझ्या घशाला अाराम देते मी  तुळशीच्या पानांना उब देते.

६. लाईट असूनही महिन्यातला एक दिवस रात्रीचे जेवण कंदील आणि चिमणी च्या उजेडात असावे आग्रह असे. 
भाकरी पण चंद्रासारखी वाटते , 
सावल्यांची भीती जाते, 
खेळ करताना मौज असते, 
अंधाराची सवय असावी, 
'भू'मातेला पण शांतता मिळते म्हणायची. 

७. दारातल्या रांगोळीने सरपटणारे प्राणी लांब राहतात. 
त्यांच्या कातडीला रांगोळी चिकटते म्हणायची. 

८. झोपताना तांब्याच्या तांब्यात पाणी भरून डोक्याशी ठेवायची, 
चांगले असतेच पण तापलेल्या 'भू' चा तप्त असा भार किंवा स्पंदने  तांबे घेते आणि आपल्याला शांती देते. 

अजब अशा गोष्टी आणि त्या मागचा अभ्यास, 
अनुभव 
आणि ज्ञान 
कधी लक्षातच घेतले नाही.

ही post कोणाची आहे माहित नाही, पण छान माहिती आहे.

•••
देता आले तर पुढच्या पिढीला देण्यासारखे,
घेता आले तर पुढच्या पिढीने घेण्यासारखे.


======================================



++++++++++++++++++++++++


प्रत्येक शब्द ‘क’ पासून सुरु करुन एवढा मोठा परिच्छेद लिहिला आहे. जगातल्या कोणत्या इतर भाषेत
अशी ताकद असेल? मराठी भाषेची ताकद खालील लेखात पहा…

केव्हातरी कोल्हापूरच्या कर्तव्यतत्पर केळकर काकांबद्दल काकांच्याच कचेरीतल्या केशवने काकूंसमोर कागाळी केली. काकू कावल्या. काकूंनी कपाटातून कात्री काढून काकांच्या कामाचे कोरे करकरीत कागद कचाकचा कापले. काकांचे कापलेले कागद केशवानेच कचऱ्यात कोंबून काकांच्याच किचनमध्ये ‘कजरारे-कजरारे’ कवितेवर कोळीनृत्य केले.

काकूंनी कागद कापल्याचे कळताच काका कळवळले. काकांनीही कमालच केली. काकांनी काकूंचे काळे कुळकुळीत केस कात्रीने कराकरा कापले. काका काय करताहेत काकूंना कळेनाच! काकूंनी कर्कश्श किंचाळून कलकलाट केला. काका काकूंची कसली काळजी करणार! काकांना कामाची काळजी. काकूंच्या कर्णकर्कश्श कोलाहलातही, केशवाने कचऱ्यात कोंबलेले कागदाचे कपटेन कपटे काढून काकांनी कचेरीकडे कूच केले. कचेरीच्या कामासाठी काकांनी कंबर कसली. कागदाच्या कापलेल्या कपट्यांचे काकांनी ‘कोलाज’ करून कामकाज कार्यान्वयित केले. केशवाचे कारनामे कळताच काकांनी काट्यानेच काटा काढला. काकांनी केशवालाच कोलाजचे काम करण्यासाठी कुथवला. कपटी केशवने काकांवरच कामचुकारपणाचा कांगावा करून कामाचा कंटाळा केला. काकांनी कठोरपणे केशवाला कामावरून काढले. कासावीस काकूंनी कालच्या कडू कारल्याची कोशिंबीर कटाप करून काकांसाठी कच्च्या कैरीचे कोय काढून कालवण केले. काकांनीही करुणेने काकूंचे कृत्रिम केस कुरवाळले. केळकरांच्या कोकणस्थ कुटुंबात कर्तव्यापुढे कर्मकांड केव्हाही कनिष्ठच. कर्तव्यदक्ष काकांच्या कार्यकाळात कचेरीने कर्मरूपी किल्ल्याचे कीर्तिशिखर काबीज केले. कामावरून काढलेल्या केशवाने कितीतरी काबाडकष्ट काढल्यावर कोल्हापूरच्या कॉम्रेड कणेकर कॉलेजने केशवाला कबड्डीचा कर्णधार केला. क्रिडापटू केशवाने कबड्डीतच करियर केले. कालच्या कागाळीखोर केशवाला काळानेच केला ‘कबड्डीतल्या किचकट कसरतींचा कर्ता’!

कथासार:

क्रियेविण करिता कथन, किंवा कोरडेची कीर्तन,
कितीक किताब कष्टाविण, काय कामाचे… !!!

==============

मनन चिंतन. 🙏🏻

👏🌿 विषय: INTUITION, अंतरज्ञान, आतला आवाज, अंतरातम्याचा आवाज, परम्यातम्याचा संदेश, श्रीमत म्हणजे काय.  🕉😇

लौकिक आई वडील आपल्या सर्व मुलांना दूर असून सुद्धा हृदयाच्या कोपऱ्यात सदैव जवळ करून आयुष्याच्या प्रत्येक पायरीवर सरंक्षण देऊ करतात.

मूल स्वभावाने कसही असो, ते सतत काळजी घेत असतात, मुलगी ऑफिसमध्ये सुखरूप पोहचली असेल का, मुलग्याने सीट बेल्ट लावला असेल का, मुलं प्रत्यक्षात जीवन जगत असली तरी आईवडील कल्पनेने सतत त्याना  रस्ता दाखवत खड्ड्यापासून सतर्क होण्यासाठी मन बुद्धीने मेसेज पाठवत असतात.

असंच परम्यातम्याचं (आत्म्याचा पिता) आहे, त्याला प्रत्येक आत्म्याचे प्रारब्ध माहीत आहे, प्रत्येक मुलांकडून श्रेष्ठ कर्म व्हावे व संकटात सतर्क राहावे म्हणून परमात्मा प्रत्येक आत्म्यास संदेश पाठवत असतो. त्यालाच आम्ही चॉईस म्हणतो. मनात कमीतकमी दोन विचार (त्यालाच आम्ही कृष्ण अर्जुन संवाद म्हणतो) नक्कीच येतात ( जुन्या सवयी व व्यसन याला अपवाद आहे).
त्यातला एक संदेश परम्यातम्याचा असतो, मग तो संदेश आम्हाला हितचिंतक, आईवडील, मित्र, शासन इ द्वारे पण दिला जातो. (माध्यम कोणीही असू शकते).

एक बोध कथा,

एकदा मोठा पाऊस झाला, महापूर आला, कलेक्टर साहेबांनी आदेश काढले की ह्या गावातील सगळ्यांना सुरक्षित ठिकाणी हलवा. प्रथम ट्रक मधून बऱ्याच जणांना हलवलं नंतर पाणी रस्त्यावर आल्यावर होडीतून जवळजवळ सगळयांना हलवण्यात आलं पण एका घरात एक भक्त रहात होते. त्यांनी जायला नकार दिला ते म्हणाले की माझा भगवंत मला आहे वाचवायला. 

पाणी वाढत गेलं ते छतावर  जाऊन बसले म्हणून कलेक्टर साहेबांनी त्याला हेलिकॉप्टर मधून रस्सी खाली सोडली पण भक्तांचा देवावर इतका विश्वास होता ते पुन्हा तेच बोलले व हेलिकॉप्टर परत गेलं. आता पाणी इतकं वाढलं की घर पण वाहून गेलं. भक्त संपले.

वर गेल्यावर त्यांनी देवाला तक्रार केली की मी इतका विश्वास ठेवला माझ्या भक्तीवर व तुझ्यावर पण तू का नाही वाचवलं मला.

देव म्हणाला, जीपमधून, होडीतून, व हेलिकॉप्टर मधून जी व्यक्ती तुझ्या विनवण्या करीत होती तो मीच होतो. तुला ओळखता आलं नाही.

असं आमच्या जीवनात सतत घडत असतं. एखाद्या सुटबुटातल्या व्यक्तीचं, (संपत्ती, सत्ता इ,) आम्ही सहज ऐकतो पण आपले खरे हितचिंतक ओळखायला आम्ही नेहमीच अपयशी ठरतो.

माणूस ज्यावेळी यथार्थ बुद्धीने प्रत्येक क्षणाला मनाला शांत ठेऊन सतर्क, सजग राहतो त्यावेळी तो स्व आत्म्याच्या जवळ पोहचतो.
व तो आत्मा स्थितीचा अनुभव करतो. पवित्र, शुद्ध आत्म्याच्या कॉन्टॅक्ट मध्ये परमात्मा सदैव असतो त्यालाच आम्ही INTUITION, अंतरज्ञान, आतला आवाज, अंतरातम्याचा आवाज, परम्यातम्याचा संदेश, श्रीमत असे म्हणतो.

त्याची एकदा सवय झाली की सूक्ष्म व अति गुप्त आवाज पण ऐकायला येऊ शकतो, इतकंच काय तर दुसऱ्याच्या मनातील आवाज पण ऐकू येतो.

उपाय एकच मनाचा फळा नेहमी व्यर्थ भूतकाळ चिंतन व विषारी भविष्यकाळ चिंता या पासून कोरा ठेवला व सकारात्मक, शुद्ध, पवित्र,आनंदी वर्तमान (प्रेझेन्ट, गिफ्ट) स्थितीत राहिलं की परम्यातम्याचा हात आपोआपच आमच्याकडून धरला जातो.

एक महत्त्वाचा मुद्दा:

माणसाच्या आयुष्याच्या प्रारब्धातील घडणारी मोठी घटना चुकण्यासाठी फार फार मोठी साधना व कर्म असेल तरच आवाज ऐकायला येईल, त्यासाठी सर्वप्रथम सर्व फिल्टर काढून टाकून लवचिक (flexible) बनायला हवं अन्यथा परिस्थिती आतली  (आपण रागात, दुःखात, भीतीत, अहंकारात, द्वेषात, तुलनेत, लोभात) किंवा बाहेरची अशी तयार होईल की आवाज ऐकू येणं मुश्किल.

उदा: अश्वत्थामा च्या मृत्यूची बातमी द्रोणाचार्य यांच्या कानावर पडली पण ते त्यावर शांत पणे विचार करून सकारात्मक अर्थ काढू शकले  नाहीत.

प्रत्येक निर्णय विवेकबुद्धीनेच घेतला जातो व या कल्याणकारी विश्वनाटकात आपला रोल यथार्थ होतो.

म्हणूनच अध्यात्मिक मार्गात एक गोष्ट पक्की करायची कि वर्तमान श्रेष्ठ कर्माने (क्रियमान कर्म) या जन्मात किती प्रारब्ध बदलेल ते माहीत नाही परंतु त्या प्रारब्धाला आनंदाने प्रतिसाद किंवा स्वीकार करून भोगायची शक्ती प्राप्त होईल तसेच पुढच्या नाही तर त्याच्या पुढच्या जन्मात माझे भाग्य गीतामय असेल.

चला आजपासून या आवाजाला ऐकायचं प्रॅक्टिस करूया.

धन्यवाद. 

🌈🦋🌟✈🙏🏻शिवाजी कणसे १७.०४.२०१९👏🌹8208870761💧☄❄❄❇✍

============


🙏🏻 " प्रारब्ध व संगत " 🙏🏻

एका भुंग्याची शेणातल्या किड्याशी गट्टी जुळली. पुढे त्यांच्यातली मैत्री खूप गाढ होत गेली. एके दिवशी किडा भुंग्याला म्हणाला, " अरे तू माझा सर्वात आवडता आणि जवळचा मित्र आहेस तर उदया तू माझ्या घरी जेवायला ये."
भुंगा दुस-या दिवशी तडक त्याच्याकडे गेला पण नंतर विचारात पडला की मला चुकीची संगत लाभली म्हणून आज शेण खायची सुद्धा वेळ आली. आता भुंग्याने किड्याला त्याच्या स्थळी येण्याचं आमंत्रण दिलं की तू उदया माझ्याकडे ये!..

दुस-याच दिवशी सकाळी किडा भुंग्याकडे गेला. भुंग्याने येताच क्षणी त्याला उचलून गुलाबाच्या फुलात बसवलं.
किड्याने परागरस चाखला.किती भाग्यवान मी!...अस म्हणून तो मित्राचे आभार मानतच होता इतक्यात शेजारच्या मंदिरातील पुजारी आला. ते गुलाब तोडलं आणि मंदिरातल्या श्रीकृष्णाच्या चरणांवर अर्पण केलं. किड्याला भगवान श्रीकृष्णाचं दर्शन झालं तो धन्य झाला कारण त्यांच्या पायाजवळ बसण्याचं सौभाग्य लाभलं. संध्याकाळी पुजा-याने सगळी फुलं एकत्र करून गंगेत विसर्जित केली. आता किडा स्वतःच्या नशीबावर हैराण होता. इतक्यात भुंगा उडत उडत किड्याजवळ आला आणि म्हणाला,
"भाऊ, काय चालू आहे मनात?.."
किडा म्हणाला, "बंधू , जन्मोजन्मीच्या पापांची मुक्ती झाली. प्रारब्धातून सुटलो एकदाचा!..हे सर्व चांगल्या संगतीचं फळ आहे.
🌹 सांगायच तात्पर्य हेच की कोणालाच जीवनाच्या कोणत्या वळणावर आपली कोणाशी गाठभेट होणार आहे याची पूर्वकल्पना नसते. प्रत्येकाशी आपलं रक्ताचं नातं असू शकत नाही म्हणून ईश्वरी कृपेने काही माणसं अद्भुतरित्या आपल्या जवळ येतात जसं की नदीच्या प्रवाहात वाहताना दोन ओंडके अचानक एकत्र येतात. सोबत कुठपर्यंत असेल ते काहीच निश्चित नाही पण काही काळ एकत्र प्रवास होऊन पुढे वेळ आल्यावर विलग होतात. अशी नाती खरंच अद्भुत असतात पण फक्त ती जपण्याची जाणीव आणि आस्था आपल्यात असायला हवी. नात्यांमध्ये आस्था असावी पण आसक्ती नाही कारण कोणीही सोबत जन्माला येत नसतं. आपण एकटेच जन्माला आलो आणि एकटेच जाणार हे कायम लक्षात असू द्यावं मग आसक्ती निर्माण होत नाही.
मूळात आपला जन्म कशासाठी झाला आहे हे गूढ उकलता आलं तर पुढचा सर्वच प्रवास सुखकर होतो आणि 'ते उकलण्याचा एकमेव मार्ग ध्यान साधना.' प्रारब्धात ठरल्याप्रमाणे कोणाकडून काही घेण असेल किंवा आपण कोणाचं देण लागत असू तर वेळ आल्यावर त्या प्रत्येक जीवाच्या भेटीच प्रयोजन  कळतं म्हणून फक्त आपण कर्म करत राहावं इतकंच!...फळ म्हणजे प्रारब्ध ते तो बघून घेतो


===============



++++++



+++++++++++

पाऊल व पाय

पाऊल व पाय दोन्ही शब्द चटकन् बघितलं तर ऐकायला व दिसायला एकच वाटतात; पण त्यांचे संदर्भ खूप वेगळे असू शकतात..

पाऊल नाजूक ..व
 मुलायम..  तर पाय भक्कम अन् मजबूत असावा लागतो..!

पाऊलखुणा उमटतात तर पायांचे ठसे ...!!

पाऊलवाटेवर कोणाची साथ मिळेलच याची खात्री नसते; पण पायवाट ही अनेकांच्या चालण्यामुळे बनते..!

पाऊल जपून टाकायचे असते; पण पाय हा रोवायचा असतो.. !!

काय कमाल आहे बघा..
नावडत्या व्यक्तीच्या घरी "कधी पाऊलसुद्धा टाकणार नाही" असे म्हणतो; पण आवडत्या माणसाच्या घरातून मात्र आपला पाय लवकर निघत नाही..!!☺

नको त्या ठिकाणी  पाऊल घसरते तर बहारदार संगीत मैफिलीत पाय रेंगाळत राहतो !

 पाऊल वाकडे पडले तर पायांचा मार्ग व दिशा चुकते !

जीवनात किंवा  व्यवसायात टाकलेले पहिले पाऊल हा एक कौतुकाचा विषय बनतो तर येणार्‍या अनुभवांमुळे आयुष्यभर कधी स्वतःसाठी वा इतरांसाठी केलेली पायपीट ही अटळ व गरजेची असते... ...!

बऱ्याचदा विरोधी अर्थाने हे दोन्ही शब्द आपण वापरत असलो तरीही........
...........

जन्माला येताना स्वतःच्या पावलांनी न येणारे आपण ,...परत जातानादेखील आपल्या पायांनी मात्र जात नाही एवढंच काय ते दोघांत साम्य आहे....!
☺ 🙏🏻


===========================

आयुष्याच पुस्तक वाचायला निराळच इंद्रिय लागतं.
सरकारने मंजुरी दिलेल्या पुस्तकापेक्षा हे पुस्तक खूपच निराळं. ह्या पुस्तकाची भाषा ही लिपी नसलेली भाषा आहे. म्हणूनच ह्या पुस्तकाच वाचन करणाऱ्या माणसाला डिग्री नाही. आयुष्याच पुस्तक वाचणारा माणूस ओळखायचा कसा? कधी? तर तो माणूस अर्थपूर्ण हसतो तेव्हा ओळखायचा. 'मी अडाणी माणूस आहे' ह्यासारख्या वाक्यातून अशा माणसाची विद्वत्ता बाहेर पडते. नम्रतेचा पोशाख घालून चातुर्य जेव्हा प्रकट व्हायला लागतं, तेव्हा ह्या माणसांची युनिव्हर्सिटी शोधायची नसते.
ही माणसंच निराळी. चार बुकं शिकलेल्या माणसांना आपली हुशारी, आपलं ज्ञान, विद्वत्ता, रूखवातासारखी कधी मांडून ठेवू असं होतं आणि ही माणसं कशी असतात? पाकिटावर स्वतःचं नाव न घालता आहेर करणाऱ्या आप्तांसारखी असतात.
✍🏻व.पु.काळे.........🌹

===========================

आयुष्य जगायचं असतं...

 © विनीत वर्तक ©

मैं ज़िंदगी का साथ निभाता चला गया
हर फ़िक्र को धुँएं में उड़ाता चला गया

हे गाणं ज्याने पडद्यावर साकारलं त्या देव आनंद ने सिमी गरेवाल च्या एका कार्यक्रमात आपल्या ८० वर्षाच्या प्रवासाबद्दल सांगताना खूप मस्त म्हंटल आहे.

'आज जरी मृत्यू समोर आला तरी त्याला मी स्वीकारेन. एक दिवस सगळ्यांना जायचं आहे. जेव्हा जायचच आहे तेव्हा घाबरायचं कशाला?. तुम्ही ३० वर्षाचे असा वा ५० वर्षाचे किंवा ८० वर्षाचे. तुम्ही समाजाला काय परत देता ह्यावर तुमची व्हॅल्यू अवलंबून आहे. तुम्ही दुःखात थांबू नका. त्याच ओझं घेऊन आयुष्य जगू नका. ती ओझी मागे ठेवा आणि आयुष्य जगा.'

जो मिल गया उसी को मुक़द्दर समझ लिया
जो खो गया मैं उसको भुलाता चला गया......

आज पूर्ण विश्व अश्या एका अस्थिरतेच्या टोकावर उभं आहे की जिकडे पुढे काय होईल? ह्या भितीने सगळ्यांना ग्रासलं आहे. आजचा दिवस गेला पण उद्या काय? ह्याच उत्तर आज कोणीच देऊ शकत नाही आहे. जगाच्या आर्थिक स्थितीचं अनुमान करणाऱ्या संस्था असो वा ग्रहांवरून भविष्य सांगणारे ज्योतिषी आज सगळेच निरुत्तर आहेत. ज्या वेगाने आपण धावत होतो त्या वेगाला आज असा काही ब्रेक लागला आहे की पुन्हा पुढचा प्रवास करू शकू का नाही ही खात्री आज कोणीच देऊ शकत नाही. पण ह्या काळातच निसर्गाने आपल्याला पुन्हा एकदा मागे वळून बघण्याची संधी दिली आहे असं म्हंटल तर चुकीचं ठरणार नाही. आज धावता धावता आपण खूप काही गोष्टी मागे ठेवून आलो आहोत. आज त्याच गोष्टी पुन्हा एकदा आठवणींच्या कप्यातून आयुष्यात आणण्याची ही संधी सगळ्यांना निसर्गाने दिली आहे. त्या संधीला आपण कसं घ्यायचं हे मात्र आपल्यापैकी प्रत्येकाने ठरवायचं आहे.

बरबादियों का सोग़ मनाना फ़िज़ूल था
बरबादियों का जश्न मनाता चला गया....

आज दोन वेळचं अन्न मिळते आहे? पण उद्या कोणी बघितला आहे. नोकरी, धंदा, व्यवसाय, शेती सगळ्यावर अनिश्चितीचं सावट आहे. पण हा प्रश्न फक्त आपल्या एकट्याचा नाही आहे? आज पूर्ण जग त्याच मार्गाने जातं आहे. ज्या मार्गावर आपला प्रवास सुरु आहे. प्रत्येकाची तिव्रता नक्कीच वेगळी असू शकेल. प्रत्येकाची अडचण नक्कीच वेगळी असू शकेल पण आज कोणीच त्यातून सावरलेलं नाही हे सत्य आहे. पण ह्या सगळ्यात एक अशी ही जमेची बाजू आहे की आपण आपल्याच माणसांना भेटलो आहोत. आज त्यांनाच कुठेतरी समजून घेतो आहोत. आज आपल्याच मुलांसोबत वेळ घालवतो आहोत. आजूबाजूला बघितलं तर अनेकांना हे पण नशिबी नाही जे दुसऱ्या शहरात, दुसऱ्या राज्यात किंवा दुसऱ्या देशात अडकलेले आहेत. घरघुती भांडण वाढली की प्रेम ह्याची बॅलन्स शीट मांडली तर प्रेमाची बाजू वरचढ आहे ह्याबद्दल दुमत नसेल.

ग़म और खुशी में फ़र्क न महसूस हो जहाँ
मैं दिल को उस मुक़ाम पे लाता चला गया.....

लॉकडाऊन कधी संपेल हे कोणालाच सांगता येणार नाही. अजूनही ह्या विषाणूला थोपवण्यासाठी औषध सापडलेलं नाही. हा विषाणू सतत आपले रंग बदलतो आहे. चीन चा कोरोना वेगळा आणि भारताचा कोरोना वेगळा अशी स्थिती आहे. त्यामुळे लॉकडाऊन हे फक्त त्याचा संक्रमण वेग कमी करण्यासाठी आहे. जोवर त्याच्यावर औषध अथवा त्याला रोखण्याची लस येतं नाही तोवर ही लढाई आपल्याला लढायची आहे. स्वतःचा त्रास, राग, किंवा चिडचिड करून जे सत्य आहे ते बदलणारं नाही. हा काळ पण आपल्या आयुष्याचा भाग आहे आणि तो जगण्याची ताकद आपल्याला आपल्यातच निर्माण करायची आहे. ती कशी? कधी? कोणत्या मार्गाने? हे ज्याचं त्याने ठरवायचं आहे. कारण थांबला तो संपला. आयुष्य थांबवायचं नाही तर जगायचं आहे. तेव्हा,

मैं ज़िंदगी का साथ निभाता चला गया
हर फ़िक्र को धुँएं में उड़ाता चला गया...

ह्यात धुँएं में  म्हणजे विडी, सिगरेट हे अभिप्रेत नाही तर आपल्या चिंता, काळजी बाजूला ठेऊन आयुष्याच्या प्रत्येक क्षणाला त्याच आनंदाने सामोर जा. ही वेळ पण जाईल. जेव्हा एक नवीन सकाळ होईल तेव्हा आपण सगळेच त्याचा आनंद घेण्यासाठी तयार असू. 
तोवर घरी रहा, सुरक्षित रहा. आपल्यासोबत आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. आयुष्य जगायला शिका..

चिअर्स.....
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
(कॉपी पेस्ट)


***************************************************************

 

=======================================================

सुखी व्हायचं आहे का ? मग...
"कर्मा रिटर्न्स" हे विसरू नका !
* धनंजय देशपांडे 
-
एका सुंदर शहरात छान बंगल्याची एक कॉलनी होती. त्या कॉलनीत एक बंगला बरेच दिवस रिकामा असतो. त्यामुळे शेजारच्या बंगल्यातील मंडळी त्यांच्या बागेतला कचरा रात्री हळूच या बंद असलेल्या बंगल्याच्या आवारात टाकून देत असत. त्यामुळे तिथं कचऱ्याचा भला मोठा ढीग साचलेला. 
अशातच एक दिवस त्या बंद बंगल्यात एक तरुण जोडपं राहायला येत. कंपाउंड दार उघडून ते आत येताच समोर हा कचऱ्याचा ढीग दिसतो. ती चिडते, वैतागते. हे असं कुणी केलं असेल यावर तडफड व्यक्त करते. तो मात्र शांत असतो. तिला "आधी आत तर जाऊया" असं हसून म्हणत तिला आत घेऊन येतो. येतानाच बाहेरून जेवून आल्याने आता हाताशी वेळ असतो. तर तो तिला म्हणतो, "गॅलरी त्यातल्या त्यात स्वच्छ दिसतेय तर तू  तिथं थोडा आराम कर" असं म्हणून तिला तिथं बसवून हा पठया हातात झाडू घेऊन आधी पूर्ण घर साफ करतो. नंतर बागेत येतो. तिथला कचऱ्याचा ढीग नीट एका कोपऱ्यात नेतो. बागकामासाठी लागणारी हत्यारे तिथेच बागेत एका छोट्या कपाटात असतात. त्यातून तो कुदळ फावडे घेऊन एक छोटा खड्डा तयार करतो. त्यात हा कचरा टाकून वरती थोडी माती व पाणी शिंपडून खड्डा बंद करतो. 
नंतर पाईप घेऊन त्याने पूर्ण बागेच्या परिसरात मस्त पाणी मारतो. मरगळलेली ती झाडे आता एकदम तरारून येतात. जमिनीवरची हिरवळ देखील जणू खुश होऊन डोलू लागते. एक प्रकारचं चैतन्य तिथं अवतरत. अन त्याच्या लक्षात येतं की बागेत मस्त आंब्याचे, चिकूचे, पेरूचे झाडे आहेत. त्या झाडाला मग तो थोडं पाणी टाकून ठेवतो. 
*
हे करता करता संध्याकाळ होते. तोही थकून गेलेला असतो. तोवर ती हि आतून बाहेर येते. म्हणते, "मी आतलं सामान बऱ्यापैकी लावलं आहे. मात्र आता किचनचा कंटाळा आलाय रे"
तो म्हणतो, "हरकत नाही, आपण बाहेर जाऊया. थोडं फिरणं पण होईल अन येताना खाऊन येऊ"
त्याप्रमाणे दोघे तयार होऊन बाहेर जातात. 
त्या दरम्यान शेजारच्या त्या बंगल्यातले लोक तोवर हे सगळं पाहत असतात. मात्र रोजच्या सवयीने रात्रीच्या अंधारात ते स्वतःचा कचरा या स्वच्छ केलेल्या बंगल्यात टाकतात. अन दार बंद करून आत बसतात. 
हे तरुण जोडपं जेव्हा फिरून खाऊन घरी येत तर दिसत की पुन्हा शेजारच्यांनी कचरा टाकला आहे. ती आता मात्र खवळते. "मी बघतेच त्यांच्याकडे" असं म्हणून ती शेजारी जायला निघणार इतक्यात तो तिला थांबवतो अन हसून म्हणतो, "तू आत जा. बाकी सोड माझ्यावर"
असं म्हणून तिला आत पाठवून तो पुन्हा खराटा घेऊन तो कचरा गोळा करून त्या दुपारी केलेल्या खड्ड्यात टाकून पाणी टाकून ठेवतो. 
*
असे रोजच होऊ लागते. शेजारचे अंधाऱ्या रात्री कचरा टाकून जात अन हा खराटा घेऊन तो खड्ड्यात टाकून ठेवत असे. हळूहळू त्या खड्ड्यातील कचऱ्याचे मस्त सेंद्रिय खत तयार होते. ते खत तो बागेतल्या फळझाडांना टाकत राहतो. त्यामुळे लवकरच त्या झाडाला मस्त फळे येतात. 
अन त्या दिवशी तो एक धमाल निर्णय घेतो. 
नेहमीप्रमाणे रात्री शेजारचे कचरा टाकून जातात. तो हा कचरा गोळा करून शोष खड्ड्यात टाकतो. अन सकाळी उठल्यावर त्या बागेतली झकास अशी तयार झालेली फळे तोडून एका टोपलीत भरून ती टोपली घेऊन शेजारच्या घरी जातो. बेल वाजवतो. आतून तिथली मंडळी पिप होलमधून पाहतात तर हा तरुण दिसतो. ते शेजारी गडबडतात की आता भांडायला आला की काय ? असं म्हणून ते भांडणाच्या तयारीत दार उघडतात तर समोर हा तरुण हसतमुखाने हातातली फळाची टोपली त्या शेजार्याला देतो. 
शेजारी चकित होतो. शेवटी ओशाळून तोच म्हणतो की, "आम्ही रोज कचरा टाकत होतो तरी तुम्ही भांडण करत नाहीत तर उलट आम्हालाच फळे द्यायला आलात. हे कसे काय?"
तर तो तरुण म्हणाला, 
ज्याच्याकडे जे असते ते तो देत असतो.
तुमच्याकडे कचरा होता तो तुम्ही दिला. माझ्याकडे फळे होती ती मी दिली, 
उलट यामध्ये पण तुमचेच आभार मानेल की तुम्ही दिलेल्या कचऱ्यामुळे माझ्या झाडाला लवकर फळे आली. थँक्स"
असं बोलून शांतपणे तो तरुण निघून येतो. 
 मित्रमैत्रिणींनो, एक नेहमी लक्षात ठेवा, तुम्हाला सुखी व्हायच असेल तर एकच गोष्ट विसरू नका. कर्मा रिटर्न्स हे तर असतंच. तुम्ही चांगले केले तर त्याचे फळ चांगले मिळणार, मात्र त्याचवेळी समोरच्याने वाईट कृत्य केले तरी त्याला माफ करून त्याच कृत्यातून पॉजिटीव्ह असे काहीतरी काय करता येईल हे पहा. (जसे त्या तरुणाने कचऱ्याचे खत केले) मग तुमच्या मनाला शांतता लाभेल. चिडचिड होणार नाही. 
"अमुकने माझ्या आयुष्याचे वाट्टोळे केले"
असं काहीजण म्हणतात. पण त्यात तथ्य नसते. कुणीच कुणाचे असे वाट्टोळे करत नसतो तर तुम्हीच काहीतरी वाईट कर्म केलेले असते तर तेच रिटर्न तुमच्याकडे आलेले असते. हे कळले तर जीवन सुखकर होईल. 
कर्म हे असे एक हॉटेल आहे,
जिथे ऑर्डर द्यावी लागत नाही.
तिथे तुम्हाला तेच मिळते
जे तुम्ही शिजवलेले असते.

कुठेतरी मस्त ऐकण्यात आलेलं ते शेवटी सांगतो अन थांबतो. 
"दाग तेरे दामन के धुले न धुले 
नेकी तेरी कही तुले न तुले 
मांग ले गलतियो कि माफी 
कभी तो खुदसे हि 
क्या पता ये आँखे 
कल खुले न खुले ! @


********************************


📚📖📚📖📚📖📚




📖 वाचन का आवश्यक आहे ? 📖

📚एखादे पुस्तक एखाद्याच्या आयुष्याला कलाटणी देऊ शकतं. एक पान एखाद्याचे आयुष्य बदलू शकतं आणि एक वाक्य एखाद्याच्या आयुष्याचं ध्येय ठरवू शकतं. एवढी ताकद वाचनात आहे. तेव्हा रोज एक तरी पान वाचत जा !
.................................
📘 श्रीमंत माणसेच वाचन करतात असे नसुन वाचन करणारेच श्रीमंत होतात जसे शरीरासाठी दिवसातून दोन वेळा जेवण आवश्‍यक असते तसे उत्तम मेंदूसाठी दररोज दोन तास वाचन करणे आवश्यक असते. दररोज वाचनामुळे माणूस भानावर येतो.
................................ 
📙 जगाचा आतापर्यंत जो विकास झाला आहे तो वाचनामुळे आणि जगाचा आता र्‍हास होणार आहे तो टी.व्ही मोबाईलमुळे.
................................. 
📒 पुस्तक वाचनारा माणूस कधीही व्यसन करत नाही आणि टी.व्ही मोबाईल हेच मुळी व्यसन आहे.
................................. 
📕 वाचनामुळे ज्ञानात भर पडते, टि.व्ही मोबाईल मुळे माणूस Adicted होतो.
................................. 
📔 टी.व्ही साठी मोबाईल साठी नेटवर्क लागते, वाचनासाठी फक्त माणूस जागेवर लागतो.
................................. 
📓 वाचन करणारी माणसं मनाने विचाराने आणि कृतीनेही श्रीमंत होतात.
................................ 
📚वाचन करणारा माणूस शांत असतो त्यामुळे त्याला रक्तदाब वाढणे, हृदय विकाराचा झटका येणे अशा गोष्टी संभवत नाहीत. या उलट जास्त टी.व्ही. मोबाईल वापरणारेच विविध रोगांना बळी पडत असल्याचे समोर येत आहे.
................................ 
📖 टी.व्ही मोबाईलमुळे मन शांतीचा भंग होतो तर वाचनामुळे भंग झालेली मनस्थिती शांत होते.
................................. 
📔
वाचन करणारा माणूस लवकर झोपतो लवकर उठतो. टी.व्ही मोबाईल चक्कर मध्ये अडकणारे उशिरा झोपतात नी उशिराच उठतात. परिणामी शरीर संपदेसह श्रीमंतीही नष्ट होते. लवकर निजे लवकर उठे त्याला आरोग्य लाभे.. अशी एक म्हण प्रचलित आहे.
................................. 
📓 वाचन करणारा पुढे उद्योजक होतो तर वाचन न करणारा नोकरीवरच थांबतो.
................................. 
📕 वाचन करणारा चार तासच काम करून करोडपती होतो तर वाचन टाळणारा बारा तास काम करून गरिबीतच मरतो.
................................. 
📘 काही महाभाग तर नोकरी लागली की, जगातील मी एकटाच सिकंदर, आता मलाच सारे काही कळते, अशा  नंदनवनात वावरून वाचनच बंद करतात.
................................. 
📕 वाचनामुळे माणूस नम्र होतो तर टी.व्ही मुळे माणूस भांडखोर नी मोबाईलमुळे आत्मकेंद्री होतो.
..............................  
📚 जे तुम्हाला विचार करायला प्रवृत्त करते तेच खरे पुस्तक आणि जे कृती करायला लावते तेच खरे वाचन.
................................ 
📒 आपल्या आयुष्यात दोन गोष्टींचा प्रभाव पडतो एक मित्र आणि एक पुस्तक, पुस्तकालाच आपला मित्र बनवा.
................................. 
📙 टी.व्ही बघणारे प्रवास करतात, तर वाचन करणारे ध्येय गाठतात. टी.व्ही मोबाईलमुळे थकवा येतो तर वाचनामुळे तरतरी.
................................. 
📚 जिथे वाचन होते तेथे विचार होतात आणि जेथे विचारांचे स्वातंत्र्य नाही तेथे गुलामी येते. वाचनामुळे ध्येय ठरवीता येते आणि गाठताही येते.
................................ 
📕 तुमच्या ध्येयावरून तुमची लायकी पारखली जाते आणि तुम्ही किती मोठे ध्येय ठरविता ते तुम्ही कोणते पुस्तक वाचता यावर अवलंबून असते.
................................. 
📓 ज्यांना आयुष्यात कोणतेही ध्येय नसतं तेच लोक पुस्तक वाचत नाहीत आणि ध्येयाविना जगणे म्हणजे बिगर पत्त्याचे पत्र पोस्टात टाकणे होय. पुस्तक चाळणे वेगळे आणि वाचनं वेगळं.
................................. 
📖 जगात जेवढे  लोक उपास मारीने मेलेत त्यापेक्षा जास्त लोक पुस्तक वाचन न झाल्यामुळे मेलेत. पुस्तकातून ज्ञान आणि ज्ञानातुन संपत्ती निर्माण होत असते.
📖📘📚📓📔📕📙


+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++



==================================



++++++++++++

मी आहे ना 
Every thing is  fine

आपल्या आयुष्यात आलेली माणसं ही काही उगाच आलेली नसतात.. प्रत्येक गोष्टीमागे काहीतरी कारण असतं.. कुणाशी तरी काहीतरी ऋणानुबंध जुळलेले असतात.. नाहीतर सव्वाशे करोड लोकसंख्येच्या देशात नेमक्या याच व्यक्तींशी आपली ओळख का होते?याचे उत्तर कोणीही देऊ शकत नाही..

 जी नाती तयार होतात ती आपण जीवापाड जपावी..  आपल्या जगण्यासाठी ज्या प्राणवायूची गरज असते तो प्राणवायू म्हणजे ही आपली माणसे....  It's mutual relation...& understanding

 मन जुळलं की आपलेपणाचे नात होते... जे बंध खूप स्ट्रॉंग असतात ते कोणाच्याही सांगण्याने किंवा विपरीत परिस्थितीत कधीच तुटत नाहीत... आपण खूप वाईट परिस्थितीतून जात असताना मित्राचे किंवा मैत्रिणीचे " मी आहे ना " एवढे शब्द संजीवनी सारखे काम करतात.. अगदी प्रत्यक्ष नाही पण अप्रत्यक्ष सोबत असणं खूप सकारात्मक ऊर्जा देणारं असतं... 
पैशांनी श्रीमंत होणं खूप सोपं आहे ...
नात्यांनी समृद्ध होणं तितकंच कठीण……
 🙏 Be in Touch 👍
========================================================

आज मी तुमच्या पुढे थोडा वेगळा विषय मांडतो . 

३६ आकडा आणि ६३ आकडा 

छत्तीस च्या आकड्याचा विचार केला तर, तीन आणि सहा दोन्ही आकडे एकमेकांकडे पहात नाहीत. दोघेही टाईट पणाने पाठीला पाठ लावून उभी आहेत. एकमेकांचं तोंडही पहात नाहीत.

त्याप्रमाणे माणसांच असतं. छत्तीसचा आकडा हा चाळिशीच्या आतला आहे. म्हणून चाळीशीच्या आत माणूस सुद्धा अहंकाराने, ताकदीने, पैशाने, परिपक्व असल्यामुळे तो नेहमीच अहंकारी असतो. कमीपणा घेत नाही. मला गरज नाही, मी त्याचं तोंड पाहणार नाही, असे शब्द त्याच्या तोंडात असतात. सख्ये भाऊ पक्के वैरी होतात. आणि हातात हात न घेता पाठीला पाठ लावतात. 
     
आता ६३ आकडा पहा.
या आकड्याने साठी ओलांडल्या मुळे आता हे दोघेही नम्र झालेत. दोन्ही आकडे एकमेकांकडे पाहतात. हातात हात घेतात. एकमेकाला आलिंगन देतात. माणसाचं असंच असतं, एकदा साठी ओलांडली की, नम्र होतो. कारण ना ताकद, ना तारुण्य, ना पैसा, ना सत्ता, काहीच राहत नाही. म्हणून हा नम्र होतो. तुम्ही पहा, माणूस तरुणपणी बालपण विसरतो, लग्न झाल्यावर आई वडिलांना विसरतो, मुलं झाल्यावर भावांना विसरतो, पैसा आला की आपले नातेवाईक विसरतो, आणि म्हातारपणी जेवढ्यांना विसरला त्यांची आठवण काढत बसतो. ६३ च्या आकड्या प्रमाणेच. म्हणून जो आकडा बदलतच नाही त्या  आकड्या  प्रमाणे जगा.
 
संयम राखणे हा 
आयुष्यातला फार मोठा गुण आहे.    
कारण एक चांगला विचार अनेक वाईट विचारांना नाहीसा करतो.    

 वयाने कोणी कितीही लहान मोठा असु देत.
वास्तवात तोच मोठा असतो,
ज्याच्या मनात सर्वासाठी प्रेम, स्नेह व आदर असतो.

आयुष्यात तुमच्या सगळ्या अडचणी
सोडवू शकेल अशी व्यक्ती शोधू नका. तर,, 
तुम्हाला कोणत्याही अडचणीत एकटे
सोडणार नाही अशी व्यक्ती शोधा...!!

                     🙏🏻
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

रोज एक मिनिटे ही एक गोष्ट करा सगळ्यांचे लाडके व्हाल, सासू आणि सुनेने तर ही गोष्ट करावीच !
एक तरुण सॉफ्टवेअर इंजिनिअर रमेश नावाचा मुलगा आपल्या आई वडिलांबरोबर राहात असतो. त्याचे मेघा नावाच्या मुलीवर प्रेम जडते. मेघा सुद्धा एक सॉफ्टवेअर इंजिनिअर असते. त्या दोघांच्या प्रेमाचे रूपांतर लग्नात होते. दोघेही जॉब करत असल्यामुळे त्यांना दिवसातले 10 ते 12 तास घराबाहेर राहावे लागे. रमेशचे वडील अजून रिटायर झाले नव्हते त्यामुळे घरातली बरीचशी कामे रमेशची आई करायची. सकाळी सगळ्यांसाठी डबा बनवणे, घरातले सगळे बाहेर गेल्यानंतर घरातली छोटी मोठी कामे करणे.
संध्याकाळी मेघा घरी आल्यानंतर घरातला स्वयंपाक करायची. पण सॉफ्टवेअर क्षेत्रात असल्यामुळे कधी कधी तिला घरी यायला खूप उशीर होत असे. तेंव्हा रमेशची आई तक्रार न करता स्वयंपाक करून ठेवायची. एक दिवस मेघाच्या कंपनीमध्ये 8 मार्च महिला दिनानिमित्त एक स्पर्धा आयोजित केली जाते. त्यामध्ये प्रत्येकाला आपल्या आयुष्यात कोणत्या स्त्रीने महत्वाचा वाटा उचलला याबद्धल लिहून द्यायचे होते. म्हणजे लेख लिहून द्यायचा असतो.
मग कंपनीतले बरेचजण आपल्या आईबद्धल लिहितात, कोण आपल्या बायकोबद्धल लिहतो, तर कोण आपल्या बहिणीबद्धल लिहते. तेंव्हा मेघा विचार करते, तिच्या आईचा तिच्या आयुष्यात मोठा वाटा आहे यात शंकाच नाही पण सध्या सगळ्यात मोठा वाटा ज्या स्त्रीने उचलला आहे तो म्हणजे तिची सासू. कारण तिच्या सासूने घरची जबाबदारी घेतली नसती तर तिला जॉब आणि घर सांभाळायला अवघड झाले असते. तेंव्हा मेघा आपल्या सासुबद्धल एक लेख लिहते.
त्या लेखाचा थोडासा भाग मी इथे लिहत आहे. मेघाने आपल्या सासूसाठी लिहलेले शब्द, आज अशाच एका स्त्रीबद्धल थोडक्यात लिहणार आहे जिने लग्नानंतर माझ्या आईची जागा भरून काढली. ती स्त्री म्हणजे माझ्या लाडक्या सासूबाई. थोडं आश्चर्य वाटलं असेल ना? पण हे सत्य आणि वास्तव आहे. जेंव्हा कंपनीचा इमेल आला की तुमच्या आयुष्यामधल्या सर्वात महत्वाच्या स्त्रीबद्धल प्रसंग सांगायचे आहेत पण त्याच्यामध्ये सासू या नावाचा उल्लेख नव्हता. म्हणजे आजही मुलींना आपल्या सासुबद्धल काय लिहावे अथवा लिहुच नये किंबहुना विचारच करू नये असे वाटत असावे.
पण माझ्या सासूबाईंबद्धल जेवढे लिहावे तेवढे कमीच आहे. मी त्यांना आई म्हणून बोलावते. कारण त्या खरंच माझ्याशी आईसारख्या वागतात. किंबहुना त्यापेक्षा जास्त काळजी घेतात. माझे लग्न झाल्यापासून ते आजपर्यंत त्या कधीही माझ्याशी भांडलेल्या नाहीत किंवा तिरस्कारने वागल्या नाहीत, किंवा त्या सासू आणि मी सून आहे या दृष्टिकोनातून कधीच त्यांनी माझ्याकडे बघितले नाहीत. स्वतःच्या मुलीपेक्षही त्या मला खूप मान देतात, प्रेम देतात.
बऱ्याचदा असे झाले आहे की जेवणात भाजीमध्ये मीठ कमी पडले किंवा भाजी तिखट झाली किंवा स्वयंपाकामध्ये काही बिघडले आणि अशावेळी जर घरामध्ये सासरे किंवा नवरा बोलला तर त्या नेहमी माझीच बाजू घेऊन बोलतात. आणि नंतर व्यवस्थित समजावून सांगतात. मी जॉब करते जवळपास 10 ते 12 तास घराबाहेर असते त्यामुळे घरात वेळ द्यायला स्वयंपाक करायला किंवा इतर घरातील कामे आवरायला मला वेळ नसतो तरीही त्या सगळी कामे रोज चीड चीड न करता आनंदाने करत असतात. माझा आणि घरातील सर्वजणांचा दुपारच्या जेवणाचा डबा त्याच बनवतात. एवढेच नव्हे तर मला कधी उशीर झाला तर डबा पिशवीमध्ये भरून ठेवतात. असे एक नाही तर अनेक दैनंदिन जीवनामध्ये अनुभव आहेत.
मित्रांनो या लेखाला पहिले पारितोषिक मिळाले. ज्यावेळेस मेघाच्या सासूला समजले की मेघाने तिच्याबद्धल लेख लिहिला आहे तेंव्हा तिच्या सासूच्या डोळ्यातून घळा घळा अश्रू येऊ लागले. आतापर्यंत तिच्या कामाची स्तुती कोणीच केली नव्हती. एवढे वर्षे कष्ट केले त्याचे चीज झाले होते. ती त्या लेखाचा प्रिंटआऊट येईल त्याला दाखवत होती. जिथे जाईल तिथे हा प्रिंटआऊट घेऊन जात होती. आपल्या नात्यातल्या प्रत्येकाला दाखवत होती. मित्रांनो कौतुकाच्या दोन शब्दांनी मेघाच्या सासूचे आणि मेघाचे आयुष्य बदलले.
आज परिस्तिथी खूप अवघड झाली आहे. कोणाची निंदा करायची असेल तर लगेच आपण तयार असतो पण कोणाचे कौतुक करायचे असेल तर आपण तिथे कमी पडतो. कंजूसपणा दाखवतो, तिथे आपला अहंकार आडवा येतो. आपली प्रतिष्ठा आडवी येते. पण मित्रांनो तुम्ही उद्यापासून फक्त एक मिनिटे अगदी मनापासून तुमच्या जवळच्या व्यक्तीची स्तुती करायला सुरुवात करा. मग तो तुमचा ड्रायव्हर असेल, तुमच्या सोसायटीचा वॉचमन असेल, तुमच्या ऑफिस मधला तुमचा सहकारी असेल. किंवा तुमच्या घरातले तुमचे वडील, तुमची बायको, तुमचा भाऊ, तुमचे नातेवाईक, तुमचा मित्र, कोणीही असेल पण तुम्ही त्याची अगदी मनापासून स्तुती करा.
व्हाट्सएपवर कोणाच्या चांगल्या मेसेजची स्तुती करा. एखाद्याच्या चांगल्या स्टेटसची स्तुती करा. फेसबूकवर एखाद्या फोटोवर मनापासून कमेंट करा. मित्रांनो स्तुती, प्रोत्साहन हे सगळ्यांना आवडते. तुम्ही ज्याची स्तुती करता, ज्याला प्रोत्साहन देता तो तुम्हाला आयुष्यभर लक्षात ठेवतो. तुम्ही हा प्रयोग करा. तुम्ही रोज असे एक मिनिट एका माणसासाठी केले तर महिन्याला 30 माणसे होतात. वर्षाला 365 माणसे होतात. विचार करा, एका वर्षात तुम्ही 365 लोकांचे आवडते व्हाल.
ही लोकं आयुष्यात तुम्हाला कधीही विसरणार नाहीत. तुम्ही कधीही या लोकांना भेटाल तर ते तुमचा आदर करतील कारण त्यांच्या मनामध्ये तुमच्यासाठी एक वेगळीच जागा असेल. या प्रयोगामुळे तुमच्या मनाला लोकांमधले चांगले गुण बघायची सवय लागेल. दोष बघायचे बंद होईल, म्हणजे फक्त दिवसातला हा एक मिनिट तुमचं आयुष्य बदलेल. प्रयोग करून पहा. मला माहिती आहे हे थोडं अवघड आहे, थोडा वेळ लागेल पण याचे फायदे तुम्हाला काही महिन्यांनी बघायला मिळतील. मित्रांनो हा लेख जास्तीत जास्त सासू सूनांपर्यंत शेअर करा. म्हणजे त्यांना एकमेकींची किंमत कळेल. आणि त्यांच्यामध्ये प्रेमाचे नाते बनायला सुरुवात होईल.

$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$

आता   मला   जमायला   लागलय  . . . .

आयुष्यातल्या प्रत्येक टप्प्यावर जे जे मला दुखवत गेले त्या त्या सगळ्यांना न दुखावता सोडून देणं आता  मला जमायला लागलयं .......

    संघर्षाच्या किंवा वादविवादाच्या क्षणी वाद " *न* "घालता तेथून दूर निघून जाण्यातंच खरी परिपक्वता असते हे ही समजायला लागलय ....

माझ्या बरोबर घडणाऱ्या अनेक वाईट गोष्टींचा उहापोह करून त्यात शक्ती खर्ची घालून आजूबाजूला जे जे उत्तम आहे त्या कडे बघण्याचा माझा दृष्टिकोनच बदलून जातोय हे ही जाणवायला लागलयं ....

   आलेल्या अनुभवांतून बाहेर पडत स्वतःला सावरून , इतरांना आनंदी करणे मला आता जमायला लागलय ....

   कोणत्याही न पटणाऱ्या  गोष्टींवर काहीही न बोलणे म्हणजे त्यांना  संमती असणे  गरजेचे नाही , 
कधी-कधी काहीही न बोलणं किंवा कोणतही प्रत्युत्तर न देणं ....
खूप काही बोलून जातं ....
आणि 
सांगूनही जातं ....
 हे ही कळायला लागलंय .....

   आपण लोकांवर किंवा त्यांच्या विचारांवर बंधन आणू शकत नाही पण आपण स्वतःच्या मनावर मात्र बांध घालू शकतो . 
आपण अशा लोकांचे वागणे किती मनावर घ्यायचे , 
त्यांना किती महत्त्व द्यायचं , त्यांनी बोललेल्या  गोष्टी किती डोक्यात साठवून ठेवायच्या आणि स्वतःचे आयुष्य खराब करून घ्यायचं का हे ठरवणं गरजेचं असतं .  
हे ही कळायला लागलंय ........  

   कधीकधी परिस्थितीला आहे तसंच सोडून देणं आणि शांत राहणं सोईचं ठरतं . 
 लोकांना कुठल्याही गोष्टींचं स्पष्टीकरण देत बसणं आणि त्यांनी तुम्हाला समजून घेण्याची अपेक्षा करणं बावळट पणाचं आहे हे कळल्यावर मी आता  मला  त्या दृष्टीनं घडवायला लागलोय .... 

   मी इतके दिवस ज्याचा प्रकर्षांने शोध घेत होतो ती मनःशांती , समाधान मला मिळालं तेंव्हा ठरवलं की मी अशा लोकांपासून लांब राहावे ,
 ज्यांच्या दृष्टीने मी चांगला नाही अन् मला स्वतःला त्यांच्या साच्यात बसवणे शक्य नाही . 
सतत वादविवाद वा भावना नसलेले संबंध मनाला त्रास देतात .  
तोंडावर गोड बोलून मागे वाईट वागणाऱ्या ,
वरवर संबंध ठेवणाऱ्या लोकांना , आता मी कटाक्षाने दूर ठेवायला हवं हे पटायला लागलंय ....

     माझ्या स्वतःच्या आनंदाचा ठेवा मला सापडलायं आणि  उशीरा  का होईना पण मी आता त्या वाटेवर समाधानानं पावलं टाकायला लागलोय .......

 अाता   मला   समजायला   लागलयं  . . . .

💐💞🌷💐💞🌷💐💞🌷

मानसशास्त्रामध्ये एक प्रसिद्ध सिद्धांत आहे, मिसिंग टाईल्स फिलॉसॉफी!

काही मानसशास्त्रज्ञांनी एकत्र येऊन एक प्रयोग केला, 

एका नव्याकोऱ्या, अलिशान, चकचकीत आणि देखण्या हॉटेलचा शुभारंभ होता,

आतुन बाहेरुन, ते हॉटेल अतिशय भव्यदिव्य आणि सुंदर होते.

त्या हॉटेलच्या डिझाईनवर, बांधकामावर, डिझाईनवर, आणि तिथल्या फर्निचरवर पाण्यासारखा पैसा ओतण्यात आला होता. 

हॉटेलच्या उदघाटनाच्या कार्यक्रमाला हजारो लोकांना आमंत्रण दिले गेले होते.

पण एक प्रयोग म्हणुन ह्या उदघाटनाच्या कार्यक्रमाचा वापर करण्याचे मानसशात्रज्ञांनी ठरवले.

त्यांच्या सांगण्यावरुन हॉटेलच्या रिसेप्शन मध्ये पोहोचल्याबरोबर दिसणारी,

अगदी समोरच्या भिंतीवर लावलेल्या सुंदर टाईल्सच्या डिझाईनमधली एक टाईल, मुद्दामहुन बाजुला काढुन ठेवण्यात आली.  

आता एक वेगळीच गंमत सुरु झाली,

हॉटेलमध्ये येणारा प्रत्येक पाहुणा त्या हॉटेलचे सौंदर्य पाहुन हरखुन गेला खरा,

पण आल्याबरोबर काही क्षणात त्याचे लक्ष मिसिंग टाईलकडेच वारंवार जाऊ लागले.

शेकडो लोकांनी एकमेकांना ती मिसिंग टाईल दाखवली, त्याच्यावर चर्चा केली,

ही टाईल बसवायची राहीली का?

का ती बाजुला गळुन पडली? ह्यावर तावातावाने वादविवाद झडु लागले.

हॉटेल मालकाच्या ह्या एका निष्काळजीपणा मुळे हॉटेलच्या सौंदर्याला गालबोट लागले आहे, असेही शेकडो जणांनी बोलुन दाखवले.

एवढेच नाही, त्या हॉटेलमध्ये आल्यावर पाहुण्यांना कसे वाटले, ह्याविषयी पाहुण्यांना फिडबॅक भरुन द्यायचा होता, 

त्यामध्ये बहुतांश जणांनी अगदी थोडक्यात हॉटेलची डिझाईन, तिथले इंटेरीअर, तिथले लॅंडस्केपींग आणि तिथल्या महागड्या कलाकुसरीच्या वस्तु ह्याविषयी अगदी थोडक्यात लिहले,

आणि मिसिंग टाईल बद्द्ल अगदी भरभरुन लिहले. 
त्या हॉटेलमध्ये जागोजागी, एकाहुन एक देखणी, आकर्षक शिल्प ठेवण्यात आली होती, 

पाहतच राहाव्यात अशा सुंदर सुंदर पेंटींग्ज होत्या,

आकर्षक रंगसंगती असलेल्या अनेक भिंती होत्या,

मानसशास्त्रज्ञांच्या सांगण्यावरुन एका मोठ्या पांढऱ्याशुभ्र भिंतीवर मात्र दोन काळे डाग जाणुनबुजुन ठेवण्यात आले होते.

खरेतर ते डाग इतके छोटे होते की एकुण भिंतीच्या दहा टक्के सुद्धा त्यांचा आकार नव्हता,

पण मिसींग टाईल प्रमाणे ह्या डागांकडेही लोकांचे चटकन लक्ष जाऊ लागले. 

लोक एकमेकांना उत्साहाने ते डाग दाखवु लागले, 

सगळे काही इतके छान बनवले, पण हे दोन डाग मात्र तसेच राहीले ह्याबद्द्ल आश्चर्य व्यक्त करु लागले. 

काही काही अतिउत्साही लोक तर फक्त बांधकामातल्या फक्त चुकाच शोधु लागले,
 
एकमेकांना टाळ्या देऊन हॉटेलमधल्या उणीवा सेलेब्रेट करु लागले.

शेवटी हॉटेलच्या उदघटनाच्या कार्यक्रमात मानसशास्त्रज्ञांनी आपल्या प्रयोगाविषयी खुलासा केला,   

“आल्याबरोबर लॉबीमध्ये दिसणारी मिसींग टाईल जाणुन बुजुन काढुन ठेवण्यात आली होती”,
“मोठ्या पांढऱ्याशुभ्र पडद्यावर दोन डाग मुद्दाम उमटवण्यात आले होते”,

आणि माणसांचे ह्या दोन्ही गोष्टींवरचे प्रतिसाद जाणुन घ्यायचे होते,

आणि रिझल्ट धक्कादायक म्हणावा असाच होता,

हॉटेलमध्ये स्तुती कराव्यात अशा शेकडो, हजारो गोष्टी मांडुन ठेवण्यात आलेल्या असतानाही, बहुतांश लोकांनी फिडबॅक फॉर्ममध्ये मिसींग टाईल आणि डागांचाच उल्लेख केला होता,

मित्रांनो,
कमतरता शोधणं, पाहताक्षणी चुका काढणं,  दोष काढुन नावं ठेवणं, ही माणसाची वृत्ती जन्मतः असते का?
नाही,
पण जसजसे आपण मोठे होतो, आपल्याला कमतरता आणि उणीवा शोधण्याची सवय लागते,

मग कधी आपण दुसऱ्यांच्या आयुष्यात असलेल्या वाईट गोष्टींकडे बोट दाखवतो, त्यावर चर्चा करतो,

तर कधी आपण स्वतःच्या आयुष्यात असलेले प्रॉब्लेम्स मोजत बसण्यात आपली बहुमुल्य उर्जा आणि बहुमुल्य वेळ खर्च करतो. 

-------------------------------------------

“मला योग्य ते शिक्षणच मिळाले नाही.”

“माझा जन्म गरीब घरात झाला.”

“माझा जन्म अशा जातीत झाला, जिथे मला संधीच उपलब्ध नाही.”

“माझे आई वडील शिकलेले नव्हते.”

“माझ्याजवळ खानदानी संपत्ती नाही, जमीन नाही.”

“माझ्या वडीलांनी माझ्यासाठी कसलेच बॅकअप तयार केले नाही, मला भांडवल दिले नाही.”

“माझ्याजवळ बुद्धी नाही.”

“माझ्याजवळ डिग्री नाही.”

“घरच्या परिस्थितीमुळे मी मनासारखे शिक्षण घेऊ शकलो नाही.” 

“मी दिसायला तितकी सुंदर नाही.”

“माझा जोडीदार मला हवा तसा मिळाला नाही, म्हणुन माझी प्रगती शक्य नाही.”

ह्या आणि अशा कित्येक मिसिंग टाईल्स शोधणं, आणि त्यावर चर्चा करणं, हा मुर्खपणा आहे, असं तुम्हाला वाटत नाही का?

-------------------------------------------------
    
ज्याला आयुष्यात काही मिळवायचे आहे तो आजुबाजुला लपलेल्या संधीकडे पाहणे शोधतो.

ज्याला आयुष्यात काही करायचेच नाही, तो मात्र फक्त मिसींग टाईल शोधतो.

+++++++++++++++++++++++++++++++


गैरसमज हे असे निर्माण होतात

 गैरसमज... 

भगवान बुद्धांनी गैरसमज कसा निर्माण होतो हे एका कथेतून स्पष्ट केले आहे...

एका जंगलात एक जोडपं राहत असत, हा जंगलात जाऊन लाकूडे तोडायचा आणि ती जवळच्या शहरात जाऊन विकायचा...
काही दिवसांनी त्यांच्या घरात एक सुंदर बाळ जन्माला येत.
एक दिवस त्याला जंगलात एक निरागस आणि घाबरले मुंगूसाच पिल्लू दिसत जवळच कोणत्यातरी जंगली श्वापदाच्या हल्ल्यात त्याची आई मरून पडली होती.
तो त्या पिल्लाला घरी आणतो.
थोड्या दिवसांतच ते पिल्लू त्या घरात एखाद्या सदस्यां प्रमाणे रूळते...
एक दिवस नेहमीप्रमाणे जंगलात आपल्या कामासाठी न्याहारी करतो आणि  निघून जातो...
नंतर थोड्या वेळाने आपल्या बाळाला झोपवून ती पाणी आणण्यासाठी निघून जाते.
घरात फक्त बाळ आणि ते माणसाळलेल मुंगूस...
काही वेळातच त्या घरात एक भला मोठा साप शिरला आणि तो त्या बाळाकडे चाल करू लागला...
मुंगूसाने चपळाईने सापावर झडप मारली आणि सुरु झाली लढाई...
साप पण बलाढ्य होता पण मुंगूसाने त्याच्यावर मात केली मुंगूसाचे तोंड आणि पूर्ण शरीर सापाच्या रक्ताने माखले होते...

आता मुंगूस दारात उभे राहून बाळाच्या आईची वाट बघत होते...

तेवढ्यात बाळाची आई  डोक्यावर हंडा घेऊन आली आणि बघते तर काय...???

मुंगूसाचे तोंड आणि पूर्ण शरीर रक्ताने माखले होते

तिच्या डोक्यात एकच विचारांच वादळ ऊटल की तीच्या बाळाचे लचके त्या मुंगूसाने तोडले आणि त्याला मारुन टाकले...

पण मुंगूस मात्र तिच्याकडे खूप निरागसपणे बघत होते

मात्र त्याचवेळी तिने बाळाच्या नावाने एकच टाहो फोडला...
आणि

क्षणार्धात डोक्यावरील हांडा तिने त्या मुंगूसाच्या अंगावर फेकला

आणि....
घरात पळत सुटली पण घरात जाताच तीला चित्र वेगळंच दिसलं तीच बाळ अजूनही झोपलच होत. 
आणि

शेजारीच तो भयानक साप रक्ताच्या थारोळ्यात मरून पडलेला...

ती भानावर आली आणि सर्व प्रकार तिच्या लक्षात आला तशी ती चपळाईने उठली आणि बाहेर आली पण मुंगूस बिचारे जागेवर  ठार झाले होते..

तिने पुन्हा एकदा टाहो फोडला पण यावेळी तीचे दोन्ही हात जोडलेले होते......

भगवान बुद्ध सांगतात जे दिसतय ते बघा...
पण त्याआधी जे दिसत नाही ते शोधायचा प्रयत्न करा,कारण प्रश्न जीवलग माणूस गमवण्याचा आहे...
कारण...
गैरसमज हे जवळच्या माणसाबद्दल होतो, आणि...तो गैरसमज वेळ निघून गेल्यावरच दुर हाेताे...!! स्वतःच्या डोळ्यांनी पाहील्याशिवाय व कानाने ऐकल्याशिवाय विश्वास ठेऊ नका. 

🎭 जबाबदारीची जाणीव असणारा कधीच हात वर करू शकत नाही!
आणि हात वर करणारा कधीच जबाबदारी सांभाळू शकत नाही....!
💐 💐
"तुझं माझं करता करता एक दिवस जायचं आहे,,
जे कमावलं ते इथेच ठेवून जायचं आहे,,
करा तुम्ही चांगले कर्म  
सोबत तुमच्या तेच तर जाणार आहे,,
रडल्याने तर अश्रूसुध्दा परके होतात,,
हसल्याने परके सुध्दा आपले होतात,,
मला ती नाती आवडतात ज्यात 
मी नाही तर आपण असतो.

===================================================

एकदा काही लोकांचा समूह चालत चालत
पर्यटनाला निघाला.

वाटेत त्यांना एक
अंधारी बोगदा लागला.🚇

त्यांना त्या बोगद्यात
काहीच दिसत
नव्हते.😎

त्या लोकांच्या पायाला काही खडे टोचू
लागले.😱😰

काही लोकांनी ते खडे आपल्यानंतर येणा-
या इतरांना टोचू नये,ईजा होवू नये म्हणून ते खडे उचलुन
खिशात ठेवायला सुरु केले.😇

काहींनी जास्त खडे उचलले
तर
काहींनी कमी उचलले.😇

काही लोकांनी असा विचार
केला की आपण कशाला फुकट उचलायचे.?👿

आपल्याला त्रास झालाच ना मग
तसा इतरांनाही होइल.😈

त्यामुळे त्यातील
काहींनी तर खडे उचललेच नाहीत.👹

जेव्हा ते सर्वजण त्या बोगद्याच्या बाहेर आले

व खिशातून काढुन टाकण्यासाठी खडे बाहेर काढले तर
ते खडे नव्हते तर अस्सल हीरे💎 होते.

त्यावेळी कमी खडे उचललेले लोक आपापसात हळुहळु  बोलू  लागले की जास्त
खडे उचलले असते तर आपल्याला हीरे💎 जास्त मिळाले
असते.

न उचललेले लोक पश्चाताप करू लागले.😰

आपले जीवनही या अंधा-या बोगद्यासारखेच असते व
खड़े म्हणजे चांगुलपणा किंवा सत्कर्म आहे.🙏🏻

सत्कर्म हिऱ्यासारखे💎 बहुमोल व किंमती आहे....

म्हणुन मिञांनो कायमच सत्कर्म करीत
राहा...😇

आपोपापच फळ मिळेल...🍎!!

(हे माझे लिखाणकाम✍🏻 नाही,परंतु छान आहे👌🏻.ज्याने
कोणी लिहीले त्या व्यक्तीचे आभार🙏🏻 )

***************************************************************

भगवंताचं ATM... 

परवा एक ५-६ वर्षाचा छोटा मित्र माझ्याजवळ आला आणि मला म्हणाला... 
"काका, तुम्हाला एक कोडं घालू का?"_

मी हो म्हटल्यावर त्यानी विचारलं,  "काका ATM चा फुलफॉर्म सांगा."

मी म्हटलं, "अगदीच सोपं आहे..._ 
(A) ऑल 
(T)  टाइम
(M)  मनी"

माझं उत्तर त्याच्या अपेक्षेप्रमाणे चुकल्याचा आनंद त्याच्या चेहेऱ्यावर झळकला आणि तो म्हणाला, 
 "नाहीच मुळी! खरं उत्तर आहे..._ 
(A)  असेल 
(T)  तरच 
(M) मिळेल"

मी पण त्याला अपेक्षित असलेला बावळट भाव चेहेऱ्यावर आणला आणि हसलो आणि तोही,  एखादा गड जिंकल्याच्या अविर्भावात, चेहऱ्यावर विजयी मुद्रा घेऊन दुसऱ्या काकाला "मामा" बनवायला निघून गेला. 

या निरागस प्रश्नोत्तरामुळे मी मात्र खरंच विचारात पडलो.  
त्यानी सांगितलेलं उत्तर किती खरं आहे आणि ते केवळ बँक आणि पैशाच्या बाबतीतच लागू आहे असं नाही, तर माणसांच्या बाबतीतही ते किती यथायोग्य आहे हे लक्षात यायला लागलं. 

बँकेच्या बाबतीत, पैसे सतत डिपॉझिट करून जितके पैसे डिपॉझिट करू तितकेच पैसे काढता येतात.....

पण माणसांच्या बाबतीत मात्र याही पुढे जाऊन एका अद्भुत निसर्गनियमाप्रमाणे एका गोष्टीचं डिपॉझिट करून दुसरी अधिक मौल्यवान आणि कितीतरी अधिक प्रमाणात गोष्ट मिळते.....

बघा हं.....

व्यायाम डिपॉझिट केला तर आरोग्य परत मिळतं......

विश्वास डिपॉझिट केला तर निष्ठा परत मिळते.....॰

प्रेम डिपॉझिट केलं तर समर्पण परत मिळतं.....

कर्म डिपॉझिट केलं तर साफल्य परत मिळतं.....

तेव्हा माणसाने स्वतःच्या किंवा इतर माणसांच्या बाबतीत केलेली जी डिपॉझिट्स असतील त्याप्रमाणे त्याला अद्भुत निसर्गनियमानुसार कितीतरी अधिक प्रमाणात...

(A) अपेक्षित 

(T) ते  

(M) मिळेल. 

अर्थात, माणसांच्या बँकेतही आपली डिपॉझिट्स मात्र सतत करावी लागतात. 

ही स्थिती माणसांची तर भगवंताच्या बाबतीत?

तो तर चिन्मय जगद्नियंता.
 त्याला काय कमी आहे!  मग त्याच्या बँकेचे नियम काय असतील?

ते समजण्याची कुवत माझ्यात नाही. संतच ते सांगू जाणे. पण संतांच्या शिकवणुकीमधून एक गोष्ट मात्र लक्षात आली आहे. भंगवंताच्या बँकेत आपण अगदी थोडी थोडी भक्ती समर्पण भावाने डिपॉझिट करत राहिलो तर, आपण न मागताही, भगवंताकडून...
(A) आवश्यक 
(T) ते
(M) मिळेलच 

पण भगवंताच्या बँकेची बम्पर ऑफर काय आहे माहित्ये? 

'आपला अहं...!' 

तोही आयुष्यात फक्त एकदाच आणि कायमचा डिपॉझिट केला नं की त्या दयासागर ईश्वराकडून आपल्याला ध्यानी मनी नसताना एका सुवर्णक्षणी... 

(A) अलौकिक

(T) तेही

(M) मिळेल...!!!


*****************************************************

एक मानसशास्त्रीय सत्य

"खुप गोड बोलणारी,अति नम्रतादाखवणारी,पाया पडणारी,अति स्तुती करणारी,अतिआदर सत्कार करणारी,माणसं अत्यंत धोकादायक, दांभिक,आतल्या गाठीची, लबाड,बेरकी,संधीसाधू व विश्वासघातकी असतात.

तुमच्याच खांद्यावर हात ठेवून तुम्हालाच खांदा देण्याचे षडयंत्र ती रचत असतात.
याउलट,

जी माणसं तोंडावर ,रागाने,कडवट,टिकात्मक,जहरी,फटकळ पण स्पष्ट बोलतात त्यांच अंतर्मन "वरच्या" प्रवृत्तींपेक्षा नक्कीच चांगल असतंं,
विश्वासघात करणं,फसवणं त्यांच्या रक्तातच नसतं.ती खरच मनमोकळी व विश्वासु असतात..!

म्हणून,जीवनांत आपण बाकी काही शिको अथवा ना शिको,पण "माणसं" वाचायला नक्की शिकलंच पाहिजे.....!!!

@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@

🐜मुंगी तांदळाचा दाणा घेऊन आनंदाने निघाली. पण तितक्यात वाटेत तिला डाळीचाही दाणा दिसला. मुंगी मनात म्हणाली, "क्या बात है देवा! तू भाताची सोय केलीच होती, आता वरणाचीही सोय झाली." पण एकावेळी दोन्ही दाणे उचलणे मु़ंगीला शक्य नसल्यामुळे ती खिन्न झाली.
तेव्हा कबीर म्हणाले, "वेडाबाई! तुला दोन्ही गोष्टी नाही मिळणार. तुला भात हवा असेल, तर वरणाचा त्याग करावा लागणार आणि वरण हवे असेल, तर भाताचा त्याग करावा लागणार."
तांदळाचा दाणा गवसल्यावर अतिशय आनंदाने, समाधानाने व लगबगीने आपल्या वारुळाच्या दिशेने निघालेल्या मुंगीचा आनंद व समाधान, डाळीने हिरावून घेतला.
माणसाचंही तसंच आहे. जोवर समोर विकल्प उपलब्ध नसतो, तोवर माणूस आहे त्या गोष्टीत समाधानी असतो. पण विकल्प निर्माण झाले, की ते त्याचा आनंद आणि समाधान क्षणात हिरावून घेतात...🙏🏻!!

                II मन शांती II


+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++


आनंदी व्हायचंय ? ...    तर
उंटाची दोरी सोडा ....


एक व्यापारी आपल्या दोन उंटावर माल लादून गावागावातून तो विकत असे. अशाच एका गावात त्याने दिवसभर विक्री केली. रात्र झाल्याने तिथेच एका मंदिराच्या आवारात मुक्काम करण्याचे त्याने ठरवले.  मैदानातील झाडाला उंट बांधून स्वतः मंदिराच्या ओसरीत झोपायचं असा विचार तो करतो. दोन्ही उंटांना झाडाजवळ नेतो. एका उंटाला दोरीने बांधतो. मात्र दुसऱ्या उंटाला बांधायला जातो तर दोरी कमी पडते. आता काय करावे ? पंचाईत झाली. उंट तसाच मोकळा ठेवणे शक्य नव्हते. व्यापारी परेशान झाला. इकडे तिकडे एखादी दोरी सापडतीय का ते पाहून लागला. ती काही दिसेना. त्याची परेशानी पाहून मंदिराचा पुजारी त्याच्या जवळ येऊन म्हणाला ..., 

"अरे. पहिल्या उंटाला बांधले तसेच दुसऱ्याला बांध."
"महाराज, पण दोरी नाहीये न"
पुजारी म्हणाला, "तू नुसतं दोरी बांधल्याचा नाटक कर"

त्याप्रमाणे व्यापाऱ्याने खोटे खोटेच उंटाला दोरी बांधली. आश्चर्य म्हणजे त्यानंतर तो दुसरा उंटही निवांत खाली बसला. 

**
सकाळी व्यापारी उठून, सगळे आवरून दुसऱ्या गावी जायला निघाला. झाडाजवळ येऊन पहिल्या उंटाची दोरी सोडली. तो उंट उभा राहिला. दुसऱ्या उंटाला काही दोरी बांधलेली नव्हतीच म्हणून व्यापाऱ्याने त्या दुसऱ्याला फक्त "झ्याक झ्याक" असा आवाज देऊन उठवले. पण तो दुसरा उंट काही उठेना. व्यापारी पुन्हा परेशान. तिथेच उभा असलेला पुजारी हसू लागला. 
तो म्हणाला ..., 

"अरे, तो उठणार नाही. कारण तू त्याची दोरी कुठे काढलीस ?"
"पण महाराज, मी दोरी बांधलीच कुठे होती ? नुसते नाटक केले होते न "
पुजारी म्हणाला,  "नाटक तुझ्यासाठी होते. पण त्याला तर ते खरेच वाटले होते न. म्हणून आता ती काल्पनिक दोरी सोडव. मग पहा".

त्याप्रमाणे व्यापाऱ्याने दोरी काढल्याचे नाटक केले. आणि काय आश्चर्य ? तो दुसरा उंट तटकन उठला की !! व्यापारी चकित झाला !!

***

पुजारी म्हणाला   _ "जसा हा उंट अदृष्य दोरीने बांधला गेला तसेच आपणही जुन्या, कालबाह्य रूढीमध्ये अडकलॊ आहोत.‌_  
"ती"  अदृश्य दोरी काढून टाकण्याची इच्छाच नाही तर आपण पुढच्या (आनंदाच्या ) गावी जाणार कसे ???

**

तात्पर्य __

तुमच्या आनंदाच्या वाटेत तुमच्या शिवाय दुसरा कोणीही अडथळा आणू शकत नाही. निष्कारण स्वतःच स्वतःला बांधून घेतलेल्या अनेक "दोऱ्या" सोडवून पहा. नक्की आनंदी व्हाल .... !!!


 सकारात्मक विचार करा व आनंदी रहा.

🙏 Happy Thoughts 🙏

===========================================================

लाॅ आॅफ अॅट्रॅक्शन

हि जर पाच सुत्रे जर पाळली, तर आयुष्यातील सर्व दुःखे, सर्व समस्या, सर्व प्रॉब्लेम्स, चुटकीसरशी ‘छुमंतर’ म्हटल्याबरोबर पळुन जातील! 

१) कितीही गंभीर समस्या असो, त्याकडे आश्चर्याने बघा – 

- आज दुकानात नोकर नाही आला, “अरे वा!, बघु आज, काय काय अडतयं त्याच्यावाचुन!”, 

- आज घरी कामवाली नाही आली, “असं का? मज्जा आहे मग आज!”

- पंचवीस तारीख आहे, पैसे संपत आलेत, “छान, मस्त काटकसर करु आता पाचसहा दिवस!”

- तो माझ्यावर निष्कारण चिडला, “अरे, तो असंपणं करतो का? असु दे! असु दे!” 

- तिने माझ्याशी उगीचचं भांडण केले, “हो का? किती मज्जा, आता रुसवा काढायची संधी मिळणार!” 

बघा, कसलीही, कितीही भयानक समस्या आणा, ह्या फॉर्मॅटमध्ये ठेवुन बघा, आश्चर्य व्यक्त केल्यास, समस्येची तीव्रता अचानक नाहीशी होते, 
“ओह! हे असं आहे का?, 
अरे! हे असं पण असतं का? 
ओके!” आहे त्याचा स्विकार केल्यास नव्याणव टक्के चिंता पळुन जातात. 

समजा, एखादा दात तीव्रपणे ठणकतोय, आता इथे कसा काय मार्ग काढणार? एक उपाय आहे. डोळे बंद करुन, त्या दुखणार्‍या दाताकडे संपुर्ण लक्ष द्या, त्या त्रासदायक संवेदना अनुभवा, त्या ठिकाणी शंभर टक्के मन एकाग्र करा. बघा वेदनांची तीव्रता कमी होईल, 

गंमत अशी आहे, की प्रत्यक्ष वेदना तितकं दुःख देत नाहीत, जितकं वेदनांमुळे मनात येणारे विचार त्रास देतात, वेदनांना विचारांपासून तोडलं की चिंता पळुन जाते! 

२) भुतकाळात घुटमळणे बंद करा – 
बसल्या बसल्या ना, आपल्या डोक्यात उगाच चक्र सुरु असते, 

- “दहा वर्षांपुर्वी मी चांगला अभ्यास केला असता, तर आज मीही खुप मोठ्ठा ऑफीसर राहीलो असतो.” 

- “सात वर्षांपुर्वी मी प्लॉट घ्यायला हवा होता, तेव्हा मी सुवर्णसंधी सोडली.” 

- “त्यावेळी मी त्यांच्याशी असे वागायला नको होते! खुप वाईट आहे मी!” 

- “मी खुप कमी पगारावर काम करायला तयार झालो, मी असे नव्हते करायला पाहीजे.”

- “त्या कार्यक्रमाच्या दिवशी, ती मला अशी म्हणाली!”

अरे! व्हायच्या त्या घटना घडुन गेल्या, टाईममशीनमध्ये जाऊन ते काही बदलता येणार नाही, तेव्हा आता त्यावर विचार करुन फक्त आणि फक्त, आपली बहुमुल्य उर्जा फालतुमध्ये खर्च होणार, त्यापेक्षा भुतकाळातल्या, ह्या सर्व चांगल्या वाईट घटना विसरुन गेलेलं बरं!

३) इथे प्रत्येक जण अद्वितीय आहे! – 

बहुतांश दुःखांच मुळ हे तुलनेत असतं,

- त्यांचं पॅकेज बारा लाखाचं आहे, मी कधी पोहचणार त्या ठिकाणी?

- त्यांच्याकडे इनोव्हा आहे, आपल्याकडे खटारा गाडी!

- ते मेट्रो सिटीत राहतात, किती ऐश करतात, नाहीतर आपण?

- ती किती सुंदर दिसते. स्लीमट्रीम! माझं वजन थोडं जास्तच आहे.

- हिला सासुचा ‘जाच’ नाही, किती ‘सुखी’ आहे ही!

- तीचा नवरा तिचा प्रत्येक शब्द झेलतो, माहीतेय!
इत्यादी इत्यादी..

ह्या जगात प्रत्येक गोष्ट एकमेवाद्वितीय आहे, 
गुलाब दिसायला सुंदर असतो, पण म्हणुन मोगर्‍याचं महत्व कमी होत नाही, त्याचा सुगंध ही त्याची ओळख! 
त्या दोघात डावं-उजवं अशी तुलना करता होईल का?
प्रत्येक फुल अद्वितीय आहे.

त्याचप्रमाणे प्रत्येक फळाचा स्वतःचा एक गोडवा आहे, एक चव आहे, 

आंबा रसाळ, चवदार म्हणून चिक्कु, अननस खराब म्हणावेत का? 

संत्रा-मोसंबीने ईर्ष्या करावी का? 

केळीने माझे नशीबच फुटकं म्हणुन रडत बसावे का? 

सफरचंद-डाळींबाने आत्महत्या कराव्यात का?

कोणतं फळ चवदार आहे, 
कुणात औषधी गुणधर्म आहेत, 
कोणी पाणीदार आहेत, 
कोणी कोरडी. 
ज्याचं त्याचं एक वैशिष्ट्य आहे, जसं फळांचं, तसंच, माणसांचं!,

कोणी शार्प बिजनेसमन आहे, 
कोणी प्रचंड मेहनती आहे,
कोणी कलाकार आहे, 
कोणी बोलुन मनं जिंकण्यात तरबेज, कोणी प्रेमळ आहे, 
कोणी शिस्तप्रिय,
कोणी यशासाठी भुकेला आहे,
कोणी प्रेमासाठी आतुर!

आता यात डावं उजवं करुन, कशाला दुःखी व्हायचं!

तुम्हाला माहीतेय, ह्या जगात साडेसहा अब्ज लोक राहतात, आणि प्रत्येकाच्या हाताचे ठसे वेगवेगळे आहेत, प्रत्येकाचा चेहरा एक दुसर्‍यापासून वेगळा आहे,

म्हणुन ह्या जगातली प्रत्येक व्यक्ती एकमेव अद्वितीय आहे, तुम्हीपण!..

४) ‘आयुष्य कशासाठी’ याचं उत्तर शोधा. – 

- आयुष्य भगवंताने आपल्याला दिलेली अनमोल भेट आहे, 
- आयुष्य सतत आनंदी राहण्यासाठी आहे,
- आयुष्य उत्साहाने भरभरुन जगण्यासाठी आहे, 
- आयुष्य भव्यदिव्य स्वप्नं बघण्यासाठी आणि ती स्वप्ने मनमुरादपणे जगण्यासाठी आहे, 
- आयुष्य आपल्या आणि इतरांच्या चेहर्‍यावर हसु फुलवण्यासाठी आहे!

जीवनाचा प्रत्येक क्षण निष्पापपणे बागडण्यासाठी आहे, मनातले सर्व अपराधी भाव, भुतकाळ-भविष्यकाळ, काल्पनिक जबाबदार्‍यांचे ओझे, सगळे सगळे फेकुन द्या. मोकळे आणि रिते व्हा. प्रत्येक क्षणाला, निरापराध वृत्तीने, निरागसपणे सामोरे जा!

माणसाला तीन गोष्टी जास्त त्रास देतात, प्रत्येक दुःखाच्या मुळाशी ह्या तीन गोष्टी सापडतील, 

अ) अपेक्षा
ब) अपुर्ण स्वप्ने,
क) ध्येयप्राप्ती नंतर येणारा रिक्तपणा!

बहूदा आपण 'भला ऊसकी कमीज मेरे कमीजसे सफेद कैसी?' या विचारात असतो. तो कसा सुखी आहे, ती कशी मस्त जगते, त्याच आयुष्य आरामशीर आहे, माझ्याकडे हे का नाही, या अपेक्षेने, तुलनेने दुःखी होत तर नाही ना? 

बघा! किती गंमतीशीर आहे हे, समजा, एखाद्याचे लग्न होत नाही, तेव्हा तो किती परेशान असतो, उठता-बसताना, जेवताना, झोपताना एकच ध्यास असतो, लग्न-लग्न-लग्न! नकळत हाच विचार, चिंता बनुन, त्याच्या आत्म्याला डाचु लागतो, त्याच्या दुःखाचं कारण बनतं, मग हास्य गायब होतं, चित्त थार्‍यावर राहत नाही, चिडचिड वाढते. 

स्वप्नप्राप्तीकडे रोज वाटचाल करायची पण मनावर जखम न होवु देता!, ह्याला म्हणतात, सुखी जीवन!

आणि समजा, एके दिवशी लग्न झालेच, (प्रत्येकाचे होतच असते) मग अचानक आयुष्यातले थ्रील खतम! पुन्हा सप्पक आयुष्य सुरु.
जॉब लागु दे, जॉब लागु दे म्हणुन तळमळलो, आणि जॉब लागला, आता थोड्याच वर्षात त्या जॉबचा कंटाळा यायला लागतो, एक प्रकारचा रिक्तपणा येतो, 

आयुष्य कशासाठी? 

जीवनाचा निर्भेळ आनंद घेण्यासाठी, मनाच्या आकाशात हे उत्तर जेव्हा गवसेल, तेव्हा नैराश्य, उदासीनता जवळपास फटकणार पण नाहीत! 

५) सेवा करण्यार्‍याला आत्मिक समाधान मिळते. - 

बघा! किती मजेशीर आहे हे,

- अगरबत्ती स्वतः हवेत विरुन जाते, पण वातावरणात एक प्रसन्न सुगंध पसरवते,

- दिव्याची वात स्वतः नष्ट होते, पण तेजाने घर उजळुन टाकते.

- झाड तप्त सुर्याच्या उन्हाचा मारा सहन करतो, आणि वाटसरुला सावली देतो,

- ज्यात कसलंही पौष्टीक तत्व नाही असे गवत, गाय खाते, आणि सकस, चविष्ट दुध देते.

- सुर्य जिथं भरपुर पाणी आहे, त्याची वाफ करतो, ढग बनवुन, जिथं पुरेसं पाणी नाही, अशा दुष्काळी प्रदेशात पाऊस पाडतो.

आणि म्हणुनच की काय, ह्या सर्वांना आपल्या संस्कृत्तीत पुजनीय मानलं गेलयं. 

काहीतरी बनण्यासाठी, काहीतरी प्राप्त करण्यासाठी आपण सकाळ संध्याकाळ धावत असतो, पण खरे समाधान कुठे आहे?

इतरांसाठी निस्वार्थपणे काहीतरी करण्यामध्ये एक वेगळे समाधान आहे, आपल्यात असलेल्या गुणांचा, शक्तीचा वापर आजुबाजुच्यांना, नातेवाईकांना, मित्रांना, अगदी अनोळखी लोकांना सुखी, आनंदी बनवण्यासाठी करणार्‍यांचं जीवन खरं सार्थ झालं, असं म्हणता येईल.

याच पाच सुत्रांचा मिळुन बनतो, लॉ ऑफ अॅट्रॅक्शन! 

मनाच्या तळाशी जाऊन सुखाचा शोध घेऊ पाहणाऱ्या, सगळ्यांचे आयुष्य, सुखी, समाधानी आणि समृद्ध होवो, या प्रार्थनेसह शुभेच्छा आणि धन्यवाद!

काॅपी/ पेस्ट , सदर लेख हा कामाच्या गोष्टी पेज चा नसून मूळ लेखकाचे नाव माहीत नसल्यामुळे तसाच टाकण्यात आलेला आहे.त्यासाठी लेखकाची दिलगिरी व्यक्त करतो व हा लेख याच्या मूळ लेखकास समर्पित.आपल्याला लेखकाचे नाव माहीत असल्यास कॉमेंट मध्ये नाव आणि ओरिजनल लेखाची लिंक असेल तर पाठवावी ही विनंती.
वाचाल तर वाचाल
📚📖📚📖📚📖📚

'सुख पाहता जवापाडे दुःख पर्वताएवढे'

संत तुकारामांनी म्हटंल्याप्रमाणे  माणसाच्या जीवनात चढउतार होत असतो. आपण सुखाच्या जगात नेहमीच बागडत असतो. मात्र दुःखाचे संकट ओढावताच आपले चेहरा पडतो, मनाचे खच्चीकरण करून आपण निराशेच्या जाळ्यात ओढले जातो. 
पण अशा गोष्टी वर मात करण्यासाठी काही टिप्स.... 
-------------------------------------------------
आनंदी राहण्यासाठी 'हे' उपाय करून बघा
-----------------------------------------------

१)मनातील गोष्ट कागदावर उतरवा..

आपण नेहमीच मनातल्या गोष्टी व्यक्त करत नसतो. काहींचा सभाव बोलका असुनही प्रत्येक वेळेस सगळ्याच गोष्टी सोबतीला सांगणे योग्य नसते,  याच कारणास्तव आपण अनेक गोष्टी आपल्या मनात साचवुन ठेवत असतो. तर काहींचा स्वभाव हा अबोल असतो. पण आपल्या या अशा सवयींचा परिणाम आपल्या मनस्थितीवर होत असतो. त्यामुळे ज्या गोष्टींचा आपल्याला त्रास होतो किंवा ज्या गोष्टीमुळे आपल्यात नकारत्मकतेची भावना होत असते अशा गोष्टी कागदावर उतरावा.  मनाला होणारा सगळा त्रास आणि ताण क्षणात दुर होईल. कागदावर लिहून काढल्यास सकरात्मकतेची भावना निर्माण होण्यास मदत होते. तसेच प्रत्येक संकटाला सामना करण्याचा आत्मविश्वासदेखील निर्माण होत असतो. 

२) काम करत राहा...

जेव्हा तुम्ही दुःखी आणि तुमचे मन निराश होते, त्यावेळेस तुमचे आवडीच काम करा. आवडीचे काम केल्याने दुःख किंवा निराशाची भावना दुर होण्यास मदत होते. आपल्या आवडीच्या कामात गुंतल्याने मनातील त्रासाचा विसर पडतो. त्यामुळे आपले मन उत्साही बनण्यास मदत होते. आवडाने काम केल्याने  हाती घेतलेले कामदेखील चांगले होते. यासाठी कामात रहा आणि दुखापासू लांब रहा.

३) गुंतुन राहा..

मूड खराब झाल्यास त्यावरील सर्वात चांगला उपाय म्हणजे साफसफाई करणे होय. साफ सफाईच्या कामात गुरफटल्याने आपल्याला वाईट गोष्टींचा विसर पडतो.  तसेच आवडीचे गाणी लावा. कारण आपल्या आवडीच्या गाण्यात आपणही गुतंतो आणि गाण्यांच्या उच्चारासोबत आपले मनही बागडत असते. 

४) योगा करा..

मन हे सतत कुठल्या ना कुठल्या क्रियेत गुंतलेले असते. ते सतत भूतकाळ आणि भविष्यकाळ यात झोके घेत असते पण वर्तमान काळात मात्र ते कधीच राहत नाही. आपल्यातली सजगता वाढल्याने मनाचे हे लक्षण आपल्या सहज लक्षात येते आणि त्यावर वेळीच उपाय योजून आपण ताण तणावातून मुक्त होऊ शकतो आणि मनाला शांत करू शकतो. योग आणि प्राणायामांच्या मदतीने आपल्यातली सजगता वाढते. सजगता वाढल्याने इकडे तिकडे धावणाऱ्या मनाला आपण सतत वर्तमान क्षणात आणू शकतो. तसे केल्याने ते आनंदी आणि एकाग्र बनते. 

५) ​​​​​​​​​​​​​​इतरांना मदत करा..

आपल्याला खरा आनंद कधी होतो तर एखाद्या व्यक्तीला मदत केल्याने. ज्या व्यक्तीला आपण मदत करतो त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरील भाव पाहून खरा आनंद होत असतो. कारण मदत केल्याने आपल्या मनाला शांती आणि समाधान मिळत असते.
 त्यावेळे आपण दुःखाची पाठ कधी सोडतो हेच समजत नाही. 

६) नेहमी पॉझिटिव्ह विचार करा

तुम्ही फार टेन्शनमध्ये असाल तर तुम्ही स्वतःशीच गप्पा मारू शकता. आनंदी राहण्यासाठी बऱ्याचदा स्वतःशी गप्पा मारू शकता. त्यामुळे तुमच्या मनातील नकारात्मक विचार नाहीसे होतात.

७) डार्क चॉकलेट

डार्क चॉकलेट खाल्याने मूड फार फ्रेश होतो आणि मन आनंदी राहण्यासाठी मदत होते. डार्क चॉकलेट्समध्ये असलेले केमिकल्स शरीरातील आनंदी राहण्यासाठी आवश्यक ते घटक असतात. जर तुम्हाला आनंदी राहायचं असेल तर डार्क चॉकलेट्सचं सेवन करा.

८) आपल्या आवडत्या व्यक्तींचा विचार करा

आपल्या मित्रमंडळी आणि नातेवाईकांबाबत विचार करा आणि आपल्या चेहऱ्यावर आनंद आणण्यासाठी त्या लोकांबाबत विचार करा ज्यांचं तुमच्या आयु्ष्यात फार महत्त्व आहे. त्यामुळे तुमचा मूड चांगला होण्यास मदत होईल.

९) तणावापासून दूर रहा

जेव्हा तुम्ही फार दुःखी असता त्यावेळी त्यातून बाहेर येण्यासाठी प्रयत्न करा. नकारात्मक विचारांना आपल्या डोक्यातून काढून टाका आणि थोडासा सकारात्मक गोष्टींचा विचार करा.

वरील गोष्‍टी आपणास दु:खातून बाहेर काढण्‍यास मदत करतील.
आजच्‍या धावपळीच्‍या जगात आपण आपला आनंद विसरत चाललो आहे. 
निरोगी राहण्‍यासाठी  आनंदी राहण्‍याची गरज आहे. आनंदी रहा, आनंदी जीवन जगा.

==============================

प्रोफेसरने भांड्यात पाणी टाकून त्यामध्ये बेडूक टाकला, यानंतर ते भांडे तापायला ठेवले, पाणी गरम झाल्यानंतर बेडकाचे काय झाले, प्रोफेसरने असे का केले ?
    😊😊😊😊😊😊
                 👇
एका कॉलेजमध्ये "फिलॉसफीचे" एक प्रोफेसर शिकवायचे...ते वेगवेगळ्या पध्दतींनी विद्यार्थ्यांना आयुष्यातील लहान-लहान गोष्टी समजावण्याचा प्रयत्न करायचे...

एक दिवस प्रोफेसरने आपल्या सर्व विद्यार्थ्यांना बोलावले आणि म्हणाले की, आज मी तुम्हाला एक खूप महत्त्वपूर्ण गोष्ट समजावणार आहे.

- सर्व विद्यार्थी लक्षपूर्वक ऐकत व बघत होते.

प्रोफेसरने पाण्याने भरलेले एक भांडे घेतले आणि त्यामध्ये बेडूक टाकला. पाण्यात जाताच बेडूक आरामात पोहू लागला. यानंतर प्रोफेसरने ते भांडे तापायला ठेवले.

- भांड्यातील पाणी हळुहळू गरम होत होते. भांड्यामध्ये जो बेडूक होता तो पाण्याच्या वाढत्या तापमानानुसार स्वतःला अॅडजस्ट करत होता. हळुहळू पाणी जास्त गरम होत होतं, पण बेडकाला काहीच फरक पडत नव्हता. तो स्वतःला तापमानानुसार तयार करत होता.

- काही वेळानंतर पाण्याचे तापमान खूप वाढले आणि पाणी उकळू लागले. तेव्हा बेडकाचीहि सहनशक्ती संपली. त्याला त्या भांड्यात थांबणे कठीण झाले. तेव्हा बेडकाने उडी मारुन भांड्याबाहेर येण्याचा प्रयत्न केला.

- बेडकाने पूर्ण शक्ती लावूनहि त्याला त्या भांड्यातून बाहेर पडता आले नाही. प्रोफेसरने तात्काळ त्या बेडकाला बाहेर काढले. 
 प्रोफेसरने विद्यार्थ्यांना विचारले की, बेडूक भांड्याबाहेर उडी का मारु शकला नाही ?

- सर्वांनी वेगवेगळी उत्तरे दिली.

तेव्हा प्रोफेसर म्हणाले - बेडूकाची इच्छा असती तर तो पाणी तापायला ठेवल्याबरोर बाहेर येऊ शकत होता. पण बेडूक स्वतःला वातावरणानुसार अॅडजस्ट करण्याचा प्रयत्न करत होता. जेवढे तो सहन करु शकत होता, तेवढे त्याने केले.

- पण जेव्हा त्याला वाटले की, जीव वाचवण्यासाठी बाहेर पडावेच लागेल, तेव्हा तो उडी मारु शकला नाही, कारण अॅडजस्ट होण्याच्या प्रयत्नात त्याची सर्व एनर्जी नष्ट झाली होती. जर मी त्याला बाहेर काढले नसते, तर बेडूक मरुन गेला असता.

लाइफ मॅनेजमेंट

प्रोफेसरने आपल्या विद्यार्थ्यांना ऐकवले - 

सर्व लोकांसोबत असेच होते. आपण नेहमी आपल्या परिस्थितीशी जुळवून घेतो. पण त्यामधून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत नाही. पण जेव्हा आपण पूर्णपणे परिस्थितींमध्ये अडकतो तेव्हा आपल्याला वाटते की, मी योग्य वेळी बाहेर पडायला पाहिजे होते. पण तोपर्यंत वेळ गेलेली असते.

 बोध.... 

योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची कला म्हणजेच जीवन जगण्याची कला होय.

***************************

अकोल्याच्या ९० वर्षांवरील डाॅ नानासाहेब चौधरी यांच्या WhatsApp ग्रूपवरून फाॅरवर्ड केलेला हा संदेश आहे.

त्यांनी काय म्हटले आहे त्यातील १०% जरी मला जमले तरी मी आनंदाने उड्या मारायला लागेन:

—————————————-

●  आयुष्य 
मर्यादित आहे
आणि जीवनाचा
जेंव्हा 
शेवट होईल 
तेंव्हा 
इथली कोणतीच
गोष्ट आपल्या
सोबत 
नेता येणार नाही .! 

● मग जीवनात 
खुप काटकसर
कशासाठी
करायची ?
आवश्यक आहे 
तो खर्च केलाच
पाहिजे ज्या
गोष्टींतुन आपणास
आनंद मिळतो 
त्या गोष्टी 
केल्याच पाहिजेत .

●  आपण गेल्यानंतर
पुढे काय होणार
याची मुळीच 
चिंता करु नका .
कारण आपला 
देह जेंव्हा 
मातीत मिसळून
जाईल तेंव्हा 
कुणी आपले 
कौतुक केले काय
किंवा टीका 
केली काय ?    
     
●  जीवनाचा आणि
स्वकष्टाने मिळवलेल्या 
पैशांचा आनंद
घेण्याची वेळ 
निघून गेलेली
असेल ...! 

●  तुमच्या मुलांची
खुप काळजी 
करु नका . त्यांना
स्वत:चा मार्ग 
निवडू द्या . 
स्वतःचे भविष्य
घडवू द्या . 
त्यांच्या ईच्छा
आकांक्षाचे 
आणि स्वप्नांचे 
तुम्ही गुलाम 
होऊ नका . 

 ●  मुलांवर प्रेम करा
त्यांची काळजी
घ्या, त्यांना
भेटवस्तुही द्या. 
मात्र काही खर्च
स्वतःवर 
स्वतःच्या 
आवडी 
निवडीवर करा .

●  जन्मापासून
मृत्युपर्यंत
नुसते राबराब 
राबणे म्हणजे
आयुष्य नाही
हे देखील 
लक्षात ठेवा .

 ●  तुम्ही 
पन्नांशीत आहात
आरोग्याची 
हेळसांड करुन 
पैसे कमवण्याचे
दिवस आता 
संपले आहेत .
पुढील काळात 
पैसे मोजून सुद्धा
चांगले आरोग्य
मिळणार नाही . 

●  या वयात
प्रत्येकापुढे 
दोन महत्त्वाचे
प्रश्न असतात . 
पैसा कमवणे 
कधी थांबवायचे
आणि किती पैसा
आपल्याला पुरेल!

 ●  तुमच्याकडे 
शेकडो हजारो 
एकर सुपीक
शेतजमीन असली
तरी तुम्हाला 
दररोज किती
अन्नधान्य लागते ?
तुमच्याकडे 
अनेक घरे असली
तरी रात्री
झोपण्यासाठी 
एक खोली 
पुरेशी असते !

●  एक दिवस
आनंदा शिवाय 
गेला तर
आयुष्यातला 
एक दिवस तुम्ही
गमावला आहात 
एक दिवस 
आनंदात गेला तर
आयुष्यातला 
एक दिवस तुम्ही
कमावला आहात
हे लक्षात असू द्या. 

●   आणखी एक 
गोष्ट तुमचा 
स्वभाव खेळकर
उमदा असेल 
तर तुम्ही 
आजारातून 
बरे व्हाल आणि
तुम्ही कायम
प्रफुल्लीत असाल
तर तुम्ही आजारी
पडणारच नाहीत .
 
●   सगळ्यात 
महत्वाचे
म्हणजे 
आजूबाजूला 
जे जे उत्तम आहे
उदात्त आहे 
त्याकडे पहा . 
त्याची 
जपणूक करा 

●  आणि हो, तुमच्या
मित्रांना/मैत्रीणींना
कधीही 
विसरु नका 
त्यांना जपा . 
हे जर तुम्हाला 
जमले तर तुम्ही
मनाने कायम 
तरुण रहाल 
आणि इतरांनाही
हवेहवेसे वाटाल.

●  मित्र-मैत्रीण 
नसतील तर
तुम्ही नक्कीच 
एकटे आणि 
एकाकी पडाल.

●   त्यासाठी रोज
व्हाट्सएपच्या
माध्यमातून
संपर्कात रहा 
हसा, हसवत रहा
मुक्त दाद द्या
म्हणूनच म्हणतो 
आयुष्य खुप 
कमी आहे ते
आनंदाने जगा ...

●  प्रेम 
मधुर आहे
त्याची 
चव चाखा..!

●  क्रोध 
घातक आहे
त्याला 
गाडुन टाका..!


● संकटे ही 
क्षणभंगुर 
आहेत
त्यांचा 
सामना करा..!

●  डोंगरा आड 
गेलेला सूर्य 
परत दिसू शकतो
पण ....

●  माथ्या आड 
गेलेले "जिवलग"
परत कधीच 
दिसत नाहीत .... 

!! नाती जपा 
एकमेकांना आदर प्रेम द्या..!!

नाहीतर आयुष्य हे 
क्षणभंगुर आहे.. कधी संपेल कळणारही नाही.. म्हणून नेहमी आनंदी रहा आणि आनंद द्या..!!

!! मित्र मैत्रिणींना जपा 
मैत्री जपा!!

जमेल तसं जमतील तेव्हढे मात्र गेट टूगेदर करीत रहा!

🙏
===========================================
लहानपणी भावंडामध्ये असलेले प्रेम
   शेवटपर्यंत टिकवता आले तर_
   ते जीवन किती आनंदमय असेल
याची कल्पना जरी केली तरी आतुन 
आनंद आणि समाधान उसळी मारते , 
ज्यांना हे प्रत्येक्षात उतरवता आले ती  भावंडे आणि त्यांना जन्म देणारे  आईवडील खरोखरच भाग्यवान आहेत. 

पोटचे आले की_
  पाठच्याचा विसर पडतो आणि 
ज्यांच्या पोटी जन्म घेतला 
     त्यांची परवड सुरू होते . 
असे चित्र सर्रास पहायला मिळत आहे, याचे कारण 
 आपली कुटुंब व्यवस्था
     पूर्ण कोलमडून गेली आहे, 
संवाद संपला आहे, 
आपले दुःख व्यक्त करायला जवळचे कोणीच नाही, असा भाव तयार होऊ लागला आहे. 
यामुळे माणूस एकलकोंडा होऊन 
     मनोरूग्ण बनू लागला आहे , 
याचा शेवट आनंद हरवून 
     फक्त नैराश्य उरले आहे. आणि 
मी काय मिळविले? याचे उत्तर शून्य आहे. हे शून्य मोठे असले काय आणि छोटे असले काय त्याचे मुल्य समान आहे . 
आपण जसा कुटुंबाला वेळ दिला पाहिजे , तसा भावंडांनाही वेळ दिला पाहिजे_,
स्वतःला प्रश्न विचारून पहा 
☑कोणतेही काम नसताना आपण आपल्या बहिणीकडे किंवा भावाकडे सहज भेटायला किती वर्षे गेलो नाही 
मन सुन्न झाल्याशिवाय राहणार नाही
खाऊच्या एका घासासाठी पाठीत धपाटा मारणारी मोठी बहीण 
चिमटा काढून पळून जाणारी धाकटी बहीण 
आपण बाहेरून आलो तर काहीतरी आणले असेल म्हणून खिशाकडे, हाताकडे पाहणारा धाकटा भाऊ 
आजही तसेच आहेत
 फक्त आपला 
भाव आणि स्वभाव बदलला
वय कितीही होऊ द्यात
☑थोरल्याने अधिकार गाजवलाच पाहिजे 
☑आणि धाकट्याने हट्ट केलाच पाहिजे . 
☑आपण जेथे असू तेथे आपली भूमिका आपल्याला पार पाडता आली पाहिजे . हे शक्य आहे त्यासाठी
वर्षातून किमान एकवेळ पूर्ण एक दिवस सर्व भावंडांनी एकमेकासाठी द्या . 
त्यादिवसी आपले आईवडील आणि आपली भावंडे मिळून एक दिवस एकत्र येऊन , एक दिवसाची सहल आयोजित करा , 
कुवत असेल त्याने सर्व खर्च करा , 
कुवत नसेल तर तो एक दिवस सुट्टी घेऊन फक्त सर्व भावंडे आईवडीलांसोबत रहा आणि अनुभव घेऊन पहा .
हा अनुभव आणि आईवडील व भावंडांच्या चेहऱ्यावरील समाधान शब्दात वर्णन करता येणार नाही_. 
 मी स्वतः हा प्रयोग नुकताच करून पाहिला आम्हा सर्वांना आपले आयुष्य वाढल्याचा भास झाला. 
आई गेल्यानंतर कितीतरी दिवसांनी वडीलांना एवढे खुष आणि समाधानी होताना पाहिले , 
कितीतरी दिवसांनी सर्वांनी मनमुराद आनंद लुटला . 
 सर्व बाजूने काट्यासारखे टोचणारे जीवन , त्यावर त्या एका दिवसाने अलगद फुलांचा अल्हाददायक वर्षाव केला. 
कुटुंब व्यवस्थेची किंमत कळाली आणि 
रक्ताच्या नात्याची गाठ नव्याने उमगली 
माझे कोणीतरी आहे 
     याची जाणीव झाली आणि 
वडीलांना काय पाहिजे  
    हे त्यांनी व्यक्त न करता समजले . 
या गोष्टी पैसे देऊन हिस्सा घेऊन  वाटणी करून कोणालाही मिळविता येणार नाहीत . 
शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही वेगळे राहाणार नाही ही प्रतिज्ञा भावांनी केली आणि प्रत्येक्षात अमलात आणली तर त्यांना जन्म देणाऱ्या आईवडीलांइतके भाग्यवान जगात कोणीही नाही_. 
हे अवघड आहे , पण
       अशक्य मात्र निश्चित नाही , 
हेच रामराज्य आहे आणि
       असे घर आजही अयोध्या आहे.  

+++++++++++++++++++++++++++

     आयुष्यभराची प्रतिष्ठा💫⭐✨
 
महाभारतातील युध्द संपवून कृष्ण घरी
परतल्यावर पत्नी रुक्मिणीने त्याच्याशी 
वाद घालण्यास सुरुवात केली.

गुरु द्रोणाचार्य आणि पितामह भीष्म 
यांना ठार मारणाऱ्याच्या बाजुने 
तुम्ही कसे काय उभे राहिलात.?
कृष्णाने उत्तर दिले.

ते आयुष्यभर सत्याच्या मार्गावर चालत होते यात कुठलीच शंका नाही पण त्या दोघांकडून आयुष्यात एक पाप घडले. आणि त्यामुळे त्याच्या जीवनभराच्या सत्यमार्गावर पाणी फिरले.
रुक्मिणीने विचारले..
कोणते पाप.?
कृष्ण म्हणाला.
जेव्हा भर दरबारात द्रौपदीचे वस्त्रहरण होत होते तेव्हा ते दोघेही दरबारात उपस्थित होते. दरबारातील जेष्ठ व्यक्ति म्हणून ते हा प्रकार रोखू शकत होते. पण त्यांनी तसे केले नाही.
त्यांचा हा एकच गुन्हा त्यांच्या सगळ्या सत्यमार्ग जगणे अर्थहीन करण्यास पुरेसा आहे.

रुक्मिणीने विचारले.
मग कर्णाचे काय.?
कृष्ण म्हणाला, कर्ण दानशूर होता, यात
कुठलीच शंका नाही. त्याच्याकडे कुणी काही मागितले तर त्याच्या तोंडून कधीही 'नाही' असा शब्द बाहेर पडला नाही.

पण बलाढ्य सैन्यासमोर यशस्वीपणे लढताना अभिमन्यू जेव्हा जखमी झाला 
व रणांगणावर मृत्युची वाट पाहत पडला होता, तेव्हा त्याने शेजारी उभ्या असलेल्या कर्णाकडे पाणी मागितले.
तिथेच स्वच्छ पाण्याचे डबके होते.पण
अभिमन्युला पाणी देऊन आपल्या मित्राला म्हणजेच दुर्योधनाला दुखवायचे नाही, म्हणून कर्णाने मरण पंथाला लागलेल्या वीराला पाणी दिले नाही.नंतर
त्याच डबक्यात कर्णाच्या रथाचे चाक अडकून पडले आणि त्याचा शेवट झाला.

तात्पर्य :-
तुमच्या एका अन्यायकारक कृत्याने तुमच्या आयुष्यभराच्या प्रामाणिकपणाची किंमत एका क्षणात शून्य होवून जाते.!!

चांगले कर्म, निस्वार्थी सेवा, स्वच्छ प्रतिमा आणि प्रामाणिकपणाच शेवटपर्यंत माणसाला अमर ठेवते यात तिळमात्र शंका नाही.😇
++++++++++++++++++++++

नक्की वाचा:-

               -- इथे संपली माणुसकी --

         एकदा एक माणूस जंगलात शिकारीला गेला होता. 

           पण वाट पाहुनही त्या दिवशी सावज  काही मिळाले नाही. 

       शेवटी तहान लागली म्हणून पाणी पिण्यासाठी तो जंगलातल्या तळ्याजवळ  थांबला. 

       हातातला तीर कामठा खाली ठेवून तो पाणी प्यायला लागला, एवढयात समोरून वाघ येताना त्याला दिसला.

         तो भीतीने पळायला लागला. वाघ पाठीमागे येतोय, हे बघून त्यांने  जवळच्या झाडावर चढायला सुरुवात केली.

       पण झाडावर आधीच चढून बसलेलं अस्वल बघून त्याची भीतीने गाळण उडाली. 

            वर अस्वल, खाली वाघ! आता काय करायचं ?

        तेवढयात अस्वल त्याला म्हणाला, "घाबरु नको. वर ये. मी तुला काही करणार नाही. मी वाघापासून जीव वाचविण्यासाठीच इथे आलोय."

           माणूस मग वर गेला. वाघ मात्र झाडाखालीच बसून हे दोघे कधी खाली येतील यांची वाट पाहत होता.

        रात्र झाली तशी माणसाला झोप लागली. 

           हे बघून वाघ अस्वलाला म्हणाला, "हा परका माणूस. त्याला खाली ढकलून दे. माझी भूक भागली की मी तुला काही करणार नाही."

          वाघाने खूप खूप पटवून देण्याचा प्रयत्न केला. पण विश्वासू व ईमानदार अस्वलानं तसं केलं नाही.

         थोड्या वेळानं माणसाला जाग आली. 

 ठरल्याप्रमाणेच आता माणूस जागरण करू लागला व अस्वलानं जरा डोळे मिटले. वाघानं हीच  संधी साधली.

             तो माणसाला म्हणाला, "अस्वलाला खाली ढकल. माझी भूक भागेल आणि तुझा जीव वाचेल."

           माणसानं क्षणाचाही मागचा पुढचा विचार न करता अस्वलाला धक्का दिला. 

          सुदैवाने माणसाचा स्पर्श होताच अस्वलाला जाग आली होती व चतुराईने अस्वलानं पंजानं फांदीला घट्ट पकडले. त्यामुळे ते पडलं नाही.

           पण त्याला माणसाचा विश्वासघातकी स्वभाव कळला.

          ते म्हणालं, "मी तुझ्याशी दगा केला नाही. परंतु तू मात्र मला फसवलंस.

            "पशूंवर" विश्वास ठेवता येतो, "माणसांवर" नाही, हे मला आज समजलं."

तात्पर्य ध्यानात ठेवा:-

          पाठीत खंजर खुपसुन कोणाचेही भले झाले नाही म्हणून अस्वलाचे हे शब्द खरे ठरवायचे की खोटे, हे आपल्या हातात आहे.

ज्याचे कर्म चांगले आहे तो कधी संपत नसतो.
         मानसातली माणुसकी एवढी खाली का आली ??   एवढा खालच्या पातळीवर तो का आला???  पशु पेक्षाही खालच्या थराला का गेला ?? याचे आत्मचिंतन होण्याची गरज आहे.  
        अस्वलाने दिलेला शाप म्हणूनच की काय आज माणस चोरी करायला लागले अन्  कुत्री त्याला शोधू लागली.
        लक्षात घ्या की सत्कर्मी माणसाला जीवनात अडचणी येतात पण त्या सुटणाऱ्या  असतात, याउलट जो दुसऱ्याला अडचणीत आणतो त्याची अडचण आयुष्यभर संपत नाही...
++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
कथा : जर एखादा आपली निंदा करत असेल तर काळजी न करता, आपण आपले काम…

एका लोककथेच्या अनुसार जुन्या काळात एक प्रसिद्ध गुरु होते. ज्यांचा एक शिष्य होता. गुरु शिष्य एका गावातून दुसऱ्या गावात भ्रमण करत असत. गुरु गावातील लोकांना प्रवचन देत आणि त्यांची समस्या दूर करण्यासाठी उपाय सांगत होते. त्यामुळे ते जेथेही जात होते तेथे त्यांना खूप मान-सन्मान मिळत होता.

एकदा ते आपल्या शिष्याच्या सोबत एक अश्या गावात पोहचले, जेथे ते पहिले कधीही गेले नव्हते. गुरु आणि शिष्य यांनी गावात आश्रम बनवला. काही दिवसात गुरु त्या परिसरात देखील प्रसिद्ध झाले. त्यांच्या प्रवचनास ऐकण्यासाठी आणि दर्शनासाठी दूरदूरचे लोक येऊ लागले.

गुरूच्या भक्तांच्या संख्येत सतत वाढ होत होती, हे पाहून त्याच गावातील एक स्थानिक संत चिंतीत झाला. त्याला वाटायला लागले कि या गुरु मुळे माझे भक्त कमी होतील. माझे जीवन कसे चालेल? संत गुरु बद्दल वाईट गोष्टी पसरवू लागला. तो लोकांच्या समोर गुरुची निंदा करू लागला. एक दिवस गुरूच्या शिष्याला याबद्दल समजलं तेव्हा त्याला भरपूर क्रोध आला.
 
क्रोधीत शिष्य लगेच आपल्या गुरु जवळ गेला आणि त्याने सगळं आपल्या गुरूला सांगितलं. गुरु ने शिष्याचे सगळं म्हणणं ऐकलं आणि म्हणाले त्याच्याकडे दुर्लक्ष कर. जर आपण देखील त्याच्या सोबत वादविवाद करण्यास सुरुवात केली तर यामुळे या सगळ्या गोष्टी पसरणे बंद होणार नाहीत. त्यामुळे त्याच्या गोष्टींकडे लक्ष नाही दिले पाहिजे.

गुरु ने पाहिलं कि एवढं समजावल्या नंतर देखील शिष्याचा क्रोध शांत नाही झाला आहे. तेव्हा गुरु म्हणाले जेव्हा जंगलातील हत्ती एखाद्या गावात येतो तेव्हा त्यास पासून सगळे कुत्रे भुंकतात, पण हत्तीवर याचा कोणताही परिणाम होत नाही. हत्ती आपल्या मस्तीत पुढे जात राहतो. कुत्रे भुंकून थकतात आणि पुन्हा आपल्या हद्दीत जातात. आपल्याला देखील आपली निंदा करणाऱ्या लोकांसोबत असंच वागले पाहिजे. आपण फक्त आपले काम इमानदारी ने केले पाहिजे आणि सत्याच्या मार्गावर पुढे गेलं पाहिजे. चांगली काम दुसऱ्याचे तोंड बंद करू शकतात.
++++++++++++++++++++++++

आज मी माझी सरलेली वर्ष मोजली 
आणि अचानक लक्षात आलं ..
अरेच्चा! जेवढं जगून झालंय 
त्यापेक्षा कमीच उरलंय की जगायचं..

खूप आवडीचा खाऊ खाताना..
एखाद्या लहान मुलाचं कसं होतं ना
तसं झालं काहीसं...

सुरवातीला तो आवडीने खाऊ खातोच 
पण जेंव्हा त्याच्या लक्षात येतं, की 
आता थोडासाच खाऊ उरलाय, तेंव्हा मात्र 
ते मूल खाऊ अधिकच चवीचवीने 
आणि अगदी मन लावून खायला लागतं.

कुठल्याच संकेताचं, नियमाचं आणि कायदयांचं पालन होणार नाहीय हे पुरेपूर ठाऊक असताना केवळ त्यांचीच चर्चा करणाऱ्या प्रदीर्घ बैठकांसाठी आता माझ्याकडे वेळ नाही. 

ज्यांची केवळ वयच वाढलीत, बुद्धी नाही.. 
अशा मूर्ख लोकांना सहन करण्याचा संयम आता माझ्यात अजिबात उरलेला नाही.

फार कमी वेळ उरलाय माझ्याकडे..
आता मला फक्त अर्क हवा आहे..
आत्मा घाईत आहे माझा...
फार थोडा खाऊ शिल्लक आहे माझ्याजवळ आता.

मला माणसांच्या जवळ जगायचंय आता..
खऱ्याखुऱ्या माणसांच्या ... 
ज्यांना माहीत आहे, आपल्या स्वतःच्या चुकांवर कसं हसायचं ती माणसं, 
जी विजयाच्या गर्वाने फुगलेली नाहीत ती माणसं... 
जी त्यांनी केलेल्या कर्माची संपूर्ण जबाबदारी घेतात ती माणसं…

खरंतर अशा प्रकारेच माणसांची प्रतिष्ठा अबाधित राहते.

आपलं आयुष्य कामी येणं.. 
उपयुक्त होणं हे अत्यंत महत्त्वाच.

मला अशी माणसं माझ्या अवतीभवती हवी आहेत, की ज्यांना दुसऱ्यांच्या हृदयाला स्पर्श कसा करायचा हे चांगलंच ठाऊक आहे.. .
ज्यांनी आयुष्याचे सणसणीत फटकारे झेललेत…
आत्म्याच्या पवित्र, मधुर स्पर्शाने 
ज्यांना मोठं केलंय.

हो आहे मी घाईत..
मी आयुष्याला उत्कटतेने जगण्याच्या घाईत आहे..
ती उत्कटता... 
जी केवळ प्रगल्भतेतून येते. 
आता माझ्याकडे उरलेली जराशीही मिठाई फुकट घालवायची माझी इच्छा नाही.

मला नक्की माहीत आहे की ही मिठाई अतिशय उत्तम आहे. मी आत्तापर्यंत खाल्लेल्या खाऊपेक्षाही खूप सुग्रास. 

माझं आता एकच ध्येय आहे...
माझ्या प्रेमीजनांसोबत आणि सद्सद्विवेकबुद्धीसोबत समाधानात आणि शांततेत अखेरचा क्षण गाठणं..
बस.…
 
आपल्याकडे बरं का दोस्तांनो ...
दोन आयुष्य असतात..
आणि दुसरं आयुष्य सुरू होतं तेंव्हा लक्षात येतं, 
की आपल्याकडे जगायला आता फक्त एकच आयुष्य शिल्लक आहे..

+++++++++++++++++++++++

पुर्वी मोबाईल तर अस्तित्वात नव्हतेच पण साधे फोनही सर्वांकडे नव्हते.
जानेवारी सुरु झाला कि रस्त्यावर कुठेतरी तुरळक दुकांन दिसायची न स्टेशनरीच्या दुकानात कार्ड यायची.
मग छोट्या प्लास्टिक पिशव्यात तिळगुळ भरून मेणबत्तीने चिटकवून कार्डला स्टेपल करून पाकीट तयार करून पोस्टाने पाठवून द्यायची.

काही नुसती पाकीट यायची त्यात तिळगुळ आणि पत्र.
हाताने लिहिलेल्या शब्दांना स्पर्श असतो आणि सुगंध असतो, नुसता शाईचा नाहीतर लिहिणाऱ्या माणसांच्या भावनांचा.

पाकिटातून आलेले चारदोन दाणे जेव्हा हातावर पडायचे तेव्हा एखाद्या नव्याने लग्न करून सासरी नांदणाऱ्या मुलीचा भाऊ नाहीतर वडील पत्रात शेवटी "काळजी घे" म्हणायचे तेव्हा तिच्या नकळत हुंदका यायचा, डोळ्यांत आठवणी दाटून पाणी तरळून जायचं.

त्या पत्रातल्या अक्षरांवरून हात फिरवला तरी मायेच्या माणसांच्या हाताचा स्पर्श जाणवत असायचा.

कितीही चांगले टाईप वापरून , रंग ,फोटोशॉप वापरून तयार केलेले मेसेज ढिगानं येताहेत सोशल मिडीयांवर पण त्या थरथरत्या हातानी लिहिलेल्या "काळजी घ्या" ची सर कशाला नाही.

 फोटो आणी शुभेच्छा मेसेजचे पूर कितीही आले तरी काहीसे कोरडे वाटतातच. 
बदल होत राहतात , बदल होण एवढंच फक्त चिरंतन आहे हेही कबूल पण असे दिवस काहीतरी जुन्या आठवणी चाळवून जातात आणी मनातून सगळं ढवळून जातात.

तिळगुळ घ्या गोड बोला 
संवाद असू द्या स्नेह असू द्या !!

==========

रोज एक बातमी ऐकायला येतेय.. 
आज याच हार्ट अटॅक ने दुःखद निधन, त्याचा अपघात आणि त्यांची वयं काय तर कोण 25 कोण 30 तर कोणाच नुकतच लग्न झालेल !!
      हे काय वय आहे का जगाला निरोप द्यायच .??
    आणि या सगळ्याला कारणीभूत आहे आजची जीवनशैली !!
      किती तो स्ट्रेस !
चढाओढ ,सतत जिंकायची स्पर्धा !
     आपण नक्की कोणासाठी जगतोय ?
  स्वतःसाठी ? कि पैशासाठी ?? 
  जीवन क्षणभंगुर झालय !!
तर ते आतातरी खरच जगायची वेळ आलीय, आपल्या आयुष्यावर प्रेम करायची वेळ आलीय. हो चला काही सकारात्मक बदल करूया आयुष्यात
.

१. सतत चिडचिड, त्रागा करून कोणाच भलं झालय? ना आपल  ना समोरच्याच..
       तर चिडचिडला ठोका रामराम आणि कितीही म्हणजे कितीही स्ट्रेस असला तरी स्वतःला समजवा
"सगळ होणार, मी आहे ना " मग सगळ होणार...!
शांत व्हा, मस्त मोठा श्वास घ्या आणि हसत कामाला सुरुवात करा !!

२.दुसऱ्या बरोबरची तुलना कमी करा ...
     ती कशी दिसते बघ, तो किती उंच आहे ,
     माझ्याच बाबतीत अस का ??
    अशा तक्रारी करणं,बंद करा !!! बंद म्हणजे बंद !!
    तुम्ही स्वतः युनिक आहात, तुमचं नाक छोट असेलही पण श्वास तर लांब नाक असलेल्या व्यक्ती सारखाच घेताय ना ? तो गोरा मी सावळा !!
तर मला सांगा आपला ' *कृष्णमुरारी पण सावळा होताच कि, तरीही तो महान आहे ना, रंग रूपावरून खचुन जाऊ नका !
       तुम्ही असाल छोटे पण मनाने तर मोठे आहात ना !
        हो आज पासून कोणाकडेही बघून जेलस व्हायच नाही, तुम्ही स्वतः एक भाग्यवान व्यक्ती आहात जे या सुंदर जगाचा भाग आहात...!!

३.टेन्शन लेने का नही आणि ....
    त्यापेक्षा देनेका तो बिलकुल नही..
      काळजी करून प्रश्न सुटत नाहीत हे त्रिकाल सत्य आहे, उगाचच कस होईल, काय करू अस म्हणत स्वतःची नखं खाणं कमी करा ..!
           जिथे संकट असतात तिथे उपायही असतोच फक्त आपल्या चिंतेने तो अजूनच धुसर होत जातो...!!
             त्यापेक्षा तुम्ही स्वतःला आणि समोरच्याला धीर द्या, सगळ नीट होईल,आणि तुमच्या हातात नसेल काही तर जिथे सगळ त्याच्या हातात आहे तर थोडी फार *श्रद्धा त्याच्यावर हि ठेवा... पण श्रद्धाच ठेवा, अंधश्रद्धा नको कारण मंदिराच्या दानपेटीत शंभर रुपये टाकण्यापेक्षा मंदिराबाहेरच्या भुकेल्या जीवांना दिलेला दहा रुपयाचा बिस्कीट पुडा हि तुम्हाला मानसिक शांतता देवू शकतो...!!
आता काय ते तुम्ही तुमचं ठरवा...!!😊

४. बरेच जण तक्रार करतात, ते बंद करा....!
    तक्रार करून कशाला स्वतः चा अन दुसऱ्याचा देखील दिवस खराब करायचा !!
      शेजारी बघा हे घेतल, तिने ते केल....!!
   अस म्हणून तुम्ही तुमच्या जवळच्या व्यक्तीला खचवू नका ...
     पैसा सगळे कमावतात,अगदी कंपनी चा *एमडी आणि मंदिराबाहेरील भिकारी हि !!!
         पण त्यापेक्षा तुम्ही नात कमवा,प्रेम कमवा कारण त्याची गरज जास्त आहे सध्या ...
        पैशाने तुम्ही नसाल श्रीमंत पण समाधानी नक्की बना, बघा किती छान वाटतय...!!
     आपण आपल्या घरासाठी ढाल म्हणून उभ राहील पाहिजे..
        घरात रंगीबेरंगी पडदे नसले तरी चालतील पण आपुलकी जिव्हाळ्याने  ते घर भरलेलं असाव !!

५. कोणाबद्दल मनात राग असेल ना तर तो तसाच खदखदत ठेवू नका !!
       त्याने तुम्ही  स्वतःला वीक बनवू नका तर सरळ जा त्या व्यक्ती समोर आणि एकदाच सगळा राग, त्रास बोलून टाका. त्याने तुमच्या मनाचा भार कमी होईल आणि समोरच्या व्यक्तीलाही समजेल नक्की काय चाललय तुमच्या मनात , पण शक्यतो बोलून प्रश्न सोडवावेत ! "काय" ...!!
       आणि समजा अस करणं नाही शक्य तुम्हाला, तर सरळ मोठा पेपर घ्या त्या व्यक्तीच नाव मधोमध लिहा आणि जी काही धगधग आहे ती काढा उतरवून...!!
    आणि नंतर सरळ पेपर फाडून टाका...!!
     आणि नव्याने सुरुवात करा...!!
        आणि त्या व्यक्तीकडे आता नव्याने पाहायला सुरुवात करा !
       बघा तुम्हालाच बरं वाटेल !!
      आणि कोणी आवडत असेल तरीही एक तर हिम्मत करून भावना बोलून दाखवा जे होईल ते होईल एक तर हो नाहीतर नाही. तुम्ही टेन्शन घ्यायच नाही. नाही बोललीच समोरची व्यक्ती तर वाईट वाटून घ्यायच नाही, रडायच तर मुळीच नाही फक्त एवढाच विचार करायचा "जाऊ दे तिच/त्याच नशीब खराब कि त्यांनी तुमच्या सारख्या व्यक्तीला नाकारलं....!!!
      आणि अस होत नसेल तर त्या व्यक्तीला सरळ विसरून जा उगाच मनाच्या कोपऱ्यात वगैरे ठेवून तिला गंजून देण्यापेक्षा नव्या आशा पल्लवित करा...!!
    जरा नजर फिरवा नक्की कोण ना कोण *भाग्यवान तुमच्या साठी वाट पाहत असेल....!!!
  बघा नक्की !!
••

६. समोरच्याच म्हणण ऐकून घ्या, उगीच छोट्या छोट्या गोष्टींसाठी गैरसमज टाळा, उलट छोट्या छोट्या गोष्टी एन्जॉय करायला शिका !!
     कोणी आपल्या बद्दल वाईट बोलतय ना,तर बोलू दे ! उगीच आकांडतांडव करून त्या व्यक्तीशी भांडू नका ! एक तर ती व्यक्ती तुमच्या सारखं बनू शकत नाही म्हणून तस बोलते किंवा तुमची प्रगती होतेय अन ती जेलस होतेय म्हणून ती मनाच समाधान होण्यासाठी वाईट बोलतेय !!
तुम्ही रिअॅक्ट झाला तर त्या व्यक्तीचा विजय आहे, म्हणून तसं नका वागू, तुम्ही तुमच काम करत राहा !!
        तुमचा ईग्नोरन्स त्या व्यक्तीच बोलण हळू हळू नक्की कमी करेल...!
      फक्त तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका !!
••••••••••

७. आयुष्य खूप छोट होत चाललय उगाचच आपल्या इगो,टेन्शन,स्पर्धा यामध्ये गुंतू नका !!
             जिथे उद्याचा भरवसा नाही तिथे तुमच्या आयुष्यभराचा पैसा, प्रतिष्ठा काय कामाला येणार....???
       तर सगळ सोडा अन हसत जगा !!😃
       काम करायचच आहे पण स्पर्धा सोडा...!!!😊
               जे आहे त्यात समाधानी राहायला  शिका...!!😊
           छोटसं आयुष्य आपल, प्रत्येक दिवस आनंदी बनवा.!👍                 इतरांच अनुकरण सोडा आणि युनिक बना...!
तुमच आयुष्य तुम्हीच खुलवायचयं...!
       तर उठा आणि हसत हसत जगा...!
         जे आहे ते छानच आहे आणि तुम्हीच ते अजून सुंदर बनवणार आहात !!
           बघा पटलं तर घ्या काही नाहीतर द्या सोडून...!
          निर्णय तुमच्यावर सोडलाय रोज एका नव्या उमेदीने उठा,मी ज्या काल चुका केला त्या आज नाही करायच्या, आजचा दिवस माझा !!
        अशा आशेने दिवसाची सुरुवात करा.काल झाल ते झालं, नवा दिवस, नवी उमेद !!रोज मस्त गाणी गा, मस्त गुण गुणा !!
      तुम्हाला आवडेल अस वागा, इतर लोक काय म्हणतात त्यापेक्षा तुम्हाला काय वाटतय ते करा, लोक काय म्हणतील ते त्यांना म्हणू द्या कारण त्यांच कामच ते आहे आणि ते त्यांना प्रामाणिकपणे करू द्या !! सो हॅपी गो लकी बना !!
तुमच्या आयुष्याचा आलेख तुम्हीच बनवा !!
जीवन सुंदर आहे त्याला अजुन खुलवा !!
        *आयुष्य तुमच, अन निर्णय हि तुमचा!!

++++++++++++++

जगात दोन प्रकारच्या वनस्पती आहेत.

एक - आपलं फळ स्वतः हुन देणाऱ्या..

उदा.आंबा,पेरु,केळी इ.

दुसरी - आपलं फळ लपवून ठेवणाऱ्या.. 

उदा. गाजर ,मुळा,बटाटा,कांदा इ.

ज्या वनस्पती आपली फळे स्वतःहुन देतात त्यांना सर्वजन खत पाणी देऊन जीव लावतात.

अन् ज्या वनस्पती आपलं फळ लपवून ठेवतात त्यांना मुळा सहित उपटून काढलं जातं._

तसेच जो मनुष्य आपली विद्या, ज्ञान, धन, शक्ती स्वतःहुन समाजाच्या सेवेसाठी खर्च करतो.तो समाजात मान सम्मान मिळवण्यात प्राप्त ठरतो.त्याची चांगली किर्ती समाजात शिल्लक राहते.

याउलट जो मनुष्य आपली विद्या, ज्ञान, धन, शक्ती स्वार्थापोटी लपवून ठेवतो. 

दुसऱ्यांना देण्याची वृत्ती बाळगत नाही तो मुळासगट उपटला जातो.
-------------"""""""""---------

खुप चांगला संदेश आहे,

+++++++

#प्रवास खूप छोटा आहे..

एक तरुण महिला एका बसमध्ये बसली होती. 
पुढच्याच स्टॉपमध्ये एक जाड आणि थोराड वयस्क बाई आल्या आणि तिच्याजवळ बसल्या. जास्तित जास्त आसन तिने व्यापले आणि तिच्या सोबत तिने मोठाल्या पिशव्या पण आणल्या होत्या. त्यांनी पण खूप जागा व्यापली. 

त्या तरुणीच्या दुसऱ्या बाजूस बसलेला तरुण अस्वस्थ झाला. तो  तिला म्हणाला की "तू काहीच का बोलत नाहीस?"
तरुणीने स्मित करून प्रतिसाद दिला
"अनावश्यक किंवा बाष्फळ काहीतरी बोलण्यात काहीच अर्थ नाही.  आपला एकत्र प्रवास खूपच छोटा आहे. मी पुढच्याच स्टॉपवर उतरणार आहे."

ही प्रतिक्रिया सुवर्ण अक्षरांमध्ये लिहिली जाण्यासाठी पात्र आहे.
"इतक्या नगण्य गोष्टींवर भांडण करणे आवश्यक नाही, आपला प्रवास खूपच छोटा आहे" 
आपल्यापैकी प्रत्येकाने हे जाणले पाहिजे की, आपल्याला इथे वेळ  इतका कमी आहे; की त्या वेळात भांडणे, निरर्थक वादविवाद करणे, इतरांना क्षमा न करणे, असमाधानीपणा आणि दोष शोधण्याची वृत्ती म्हणजे वेळ आणि उर्जेचा अपव्यय आहे.
कोणी आपले मन दुखावलंय का? 
*
शांत रहा, प्रवास खूप छोटा आहे. 
*
कुणी तुमचा विश्वास घात केला आहे का? तुम्हाला फसवलय का?
सोडून द्या, शांत रहा, कारण 
*
प्रवास खूप छोटा आहे.
*
कुणीही तुम्हाला त्रास दिला असल्यास, लक्षात ठेवा की, हा प्रवास किती मोठा किंवा छोटा आहे हे कुणालाच माहीत नाही. त्यांचा प्रवास कधी संपणार आहे ते कुणालाही माहीत नाही.
*
आपला प्रवास खूप छोटा आहे.
*
आपण मित्रमंडळी आणि नातेवाईक यांची कदर करूया. आपण एकमेकांचा आदर करू, एकमेकांशी प्रेमाने आणि आदराने वागूया. 
जर मी तुम्हाला अनावधानाने कधी दुखावले असेल तर मला माफ करा. जर तुम्ही मला कधी दुखावले असेल तर मी ते कधीच सोडून दिले आहे. 
कारण एकच की,

आपला प्रवास खूप छोटा आहे!.. 🙏💐

======================
कर्ण कृष्णाला विचारतो - "माझा जन्म झाल्याबरोबर माझ्या आईने मला सोडून दिले, कारण मी अनौरस संतती होतो. यात माझी काय चूक होती?

मला द्रोणाचार्यांनी शिक्षण नाकारलं, कारण मी क्षत्रिय नाही मानला जात होतो.

परशुरामांनी मला विद्या दिली, पण मला शाप दिला की ती विद्या मी विसरून जाईल. कारण मी क्षत्रिय नव्हतो!

एक गाय चुकून माझ्या बाणांनी मारली गेली, आणि गायवाल्यानी माझी चूक नसताना मला शाप दिला.

द्रौपदीच्या स्वयंवरात मला अपमान सहन करावा लागला.

कुंतीने शेवटी माझे सत्य तिच्या मुलांना वाचवण्यासाठीच सांगितले.

मला जे काही मिळाले ते दुर्योधनाचे उपकार म्हणून मिळाले.
तर मगं मी त्याची बाजू घेतली यात माझे काय चुकले?"

🌷कृष्णाने उत्तर दिले🌷:

"कर्णा, माझा जन्म कारागृहात झाला.

जन्माच्या अगोदरपासूनच मृत्यू माझी प्रतीक्षा करीत होती.

रात्री जन्म झाल्याबरोबर लगेच मला माझ्या आईवडिलांपासून वेगळे करावे लागले.

तुम्ही तलवारी, रथघोडे, धनुष्यबाणांच्या आवाजात लहानाचे मोठे झालात.

मला गौशाला, शेणमाती मिळाली आणि मी चालायला पण लागलो नव्हतो तेव्हापासून माझा जीव घेण्याचे अनेक प्रयत्न केले गेले.

ना कोणती सेना, ना शिक्षण.

मीच त्यांच्या वाईटाचा कारण आहे, असे लोकांकडून मला ऐकायला मिळायचे.

तुमचे गुरु तुमच्या पराक्रमाचे कौतुक करायचे, तेव्हा मला साधे शिक्षण पण मिळाले नाही.

संदीपनी मुनींच्या गुरुकुलात प्रवेश झाला तेव्हा मी 16 वर्षाचा होतो.

तुम्ही तुमच्या पसंतीच्या मुलीशी लग्न केले.

माझं जिच्यावर प्रेम होते ती मला मिळाली नाही, तर ज्यांची मी राक्षसांच्या तावडीतून सुटका केली त्या माझ्या पदरी पडल्या.

मला माझ्या सर्व समाजबांधवांना जरासंधाच्या अत्याचारापासून वाचवण्यासाठी यमुना काठापासून नेऊन समुद्राच्या काठी (द्वारका) वसवावे लागले.
मला पळपुटा (रणछोडदास) म्हणतात.

जर दुर्योधन जिंकला तर तुला भरपूर श्रेय मिळेल. धर्मराज जिंकला तर मला काय मिळेल... फक्त युद्ध आणि नुकसानीचा दोष.

एक गोष्ट लक्षात घे कर्णा...
प्रत्येकाला आयुष्यात कष्ट आहेत

आयुष्य कोणासाठीही कधीही सोपे नाही

दुर्योधनाच्या आयुष्यात बऱ्याचशा अप्रिय घटना घडल्या आहेत आणि तसेच युधिष्ठिराच्या पण.

परंतु काय योग्य (धर्म) आहे हे तुझ्या अंतरात्माला पण कळते...

कितीही वेळा आपल्या बरोबर अयोग्य गोष्टी झाल्या,
कितीही वेळा आपल्याला अपमान सहन करावा लागला, 
कितीही वेळा आपल्याला आपल्या वाटेचे नाकारले गेले,

तरीही

त्यावेळी आपण त्याला कसा प्रतिसाद देतो याला महत्व आहे.

तक्रारी थांबव कर्णा!

आयुष्यात घडलेल्या अप्रिय घटनांमुळे तुला अधर्म करण्याचा अधिकार मिळत नाही.

म्हणून , तुमच्या आयुष्यात आलेल्या कठीण व अतिवाईट प्रसंगी देखिल तुम्ही चांगलाच विचार करा, स्वाध्यायी व्हा, भगवतांचे नामस्मरण करा, कृतज्ञता व्यक्त करा, चांगलंच वागा आणि प्रत्येक माणसाला आणि प्राण्याला सहकार्य करा. स्वच्छंदी व्हा आणि हे विसरून जा कुणी तुम्हाला वेदना दिली की आनंद...!

    🙏 जय श्रीकृष्ण 🙏  
🍃🌹🍃🌹🍃🌹🍃

पायातून काटा निघाला की चालायला मजा येते, तसा मनातून अहंकार निघून गेला की आयुष्य जगायला मजा येते..

========================================
★ *नकारात्मक प्रभाव* ★

असं का होतं की ज्या गोष्टीची भीती असते, तीच गोष्ट आयुष्यात दत्त म्हणुन हजर होते.
एखाद्या विषयाची सतत भीती बाळगणारा विद्यार्थी, त्या विषयात नापासचं होतो,
पैसे नाहीत, पैसे नाहीत, अशी चिंता करणारा का दिवसेंदिवस अधिकाधिक कंगाल होतो? 
आर्थिक नुकसान होईल, अशी सतत भीती बाळगणार्‍याला कसलातरी फटका बसतोचं बसतो,
 कष्ट नकोत, कष्ट नकोत, घोकणार्‍याच्या नशिबात श्रम आणि राबणंचं असतं,
 का बरं एखादीला नको असलेलं गावच ‘सासर’ म्हणुन पदरात पडतं?
आणि एखादीला मनातुन मुलगी नको, मुलगी नको असा सतत धावा करुनही मुलगीच होते? 
का श्रीमंत अधिकाधिक श्रीमंत होतात आणि गरीब अधिकाधिक गरीब होतायतं?

  तर ह्या सगळ्यांना एक कारण आहे,
आणि ते कारण आहे आकर्षणाचा नियम, *द लॉ ऑफ अट्रॅक्शन....*

    तुम्हाला माहीतीय?...जगातील फक्त एक टक्का लोकांकडे एकुण संपत्तीच्या शहाण्णव टक्के संपत्तीचा हिस्सा आहे. हा योगायोग नाही, हा आकर्षणाचा नियम आहे. काय सांगतो हा नियम? तुमच्या आयुष्यात असलेली प्रत्येक गोष्ट ही कळत नकळत तुम्हीच आकर्षित केलेली आहे, जसं की तुमचं दिसणं, तुमचे कपडे, तुमचा जोडीदार, तुमची मुलं, तुमचे मित्र, तुमचं घर, तुमचा व्यवसाय, तुमची सांपत्तीक स्थिती, तुमचं गाव, तुमच्या आवडीनिवडी, तुमचे नातेसंबंध, अगदी सगळं…सगळं…

    जसं की समजा एखाद्याला निळा रंग आवडतो, आणि त्याच्याकडे निळ्या रंगाचे खुप कपडे आहेत, तर तो बाहेर जाताना निळाच शर्ट घालुन जाईल, तसंच, आपल्या मनाच्या कपाटात ज्या रंगाचे विचार असतात, तीच परिस्थीती वास्तव बनुन समोर येते.

     उदा. माझं कर्ज कसं फिटेल याची सतत चिंता असेल तर मनाचा फोकस कर्जावर जातो तर कर्ज वाढतं.
माझं वजन वाढतयं, म्हण्टलं की वजन अजुन वाढतं, 
माझे केस गळतायत म्हण्टलं की अजुनच केस गळतात,
माझं लग्न जमत नाही म्हणलं की लग्न जमायला अजुनच उशीर होतो,
कर्ज माझा जीव घेणार म्हणलं की अजुन अडचणी निर्माण होतात,
वगैरे वगैरे...

ज्या गोष्टीवर मन, लक्ष केंद्रित करतं, ती गोष्ट घडते.

  म्हणजे जर आपण आपल्याला जे हवं ते आपल्याला मिळालयं अशी कल्पना करुन, मनाला उत्तेजित अवस्थेत नेलं आणि त्यावर विश्वास ठेवला, की हवं ते आपल्याला मिळतचं मिळतं.

फक्त आपल्याला ते मिळालयं, हे मनाला पटवुन देता यायला हवं.

        मरणाच्या दारात पोहचलेली, डॉक्टरांनी आशा सोडुन दिलेली पण हे रहस्य जाणणारी, अनेक माणसं फक्त ह्या शक्तीचा वापर करुन आणि सकारात्मक कल्पना करुन आणि त्यावर विश्वास ठेऊन पुन्हा ठणठणीत बरी झाली. 

विश्वातील सर्वच थोर माणसांनी हे आकर्षणाचं रहस्य जाणलं होतं आणि त्याची अंमलबजावणी केली, म्हणुन तर ते इतरांपेक्षा वेगळे ठरले.

      *तुम्हालाही तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी समाधान हवं असल्यास, रोज सकाळी मस्त तयार होवुन आरशासमोर उभे राहुन, चेहर्‍यावर स्मितहास्ये ठेवुन, मोठमोठ्याने अशी वाक्ये जोरजोरात म्हणा!..*

1) मी हवा तेवढा पैसा आकर्षित करु शकतो, मी शक्तीशाली आहे.
2) माझ्यात जग बदलण्याची शक्ती आहे.
3) माझ्या भावना नियंत्रित करण्याचा अधिकार मलाच अहे, आणि आज मी आनंदात रहायचे ठरवले आहे.
4) माझ्या आई-वडीलांना, माझ्या परीवाराला माझ्यावर, गर्व आणि अभिमान वाटेल, असे एक काम मी आज करणार आहे. 
5) मी प्रचंड आत्मविश्वासाने भरलेला असुन, प्रचंड संपत्तीवान आहे.
6) मी एका प्रसन्न व्यक्तीमत्वाचा मालक असुन, संपर्कात आलेल्या प्रत्येकाला मी भरभरुन आनंद वाटतो. खळखळुन हसवतो.
7) परिस्थीतीला हरवण्याची माझ्यात हिंमत आहे. मी परीस्थीतीवर सहज मात करु शकतो.
8) माझ्या जिद्दीला भिऊन संकटे दुर पळुन जातात.
9) मी आयुष्याच्या प्रत्येक लढाईचा यशस्वी सामना केला आहे, आणि ती जिंकली आहे.
10) माझ्या आजुबाजुचे, अवतीभवती वावरणारे, सर्व लोक माझ्यावर खुप प्रेम करतात, आणि मी ही खुप खुप त्यांच्यावर प्रेम करतो.
11) मी आतापर्यत माझी बरीचशी स्वप्ने पुर्ण केली आहे, आणि माझी उरलेली स्वप्ने लवकरचं पुर्ण होणार आहेत.
12) मी सतत आनंदी असतो. मला रोज नवनव्या कल्पना सुचतात, आणि मी तात्काळ त्यांना अंमलात आणतो. 
13) मी निरोगी आहे, 
14) आयुष्यात प्रत्येक चांगल्या गोष्टीसाठी मी आभारी आहे.
15) मी निसर्गाची अद्वितीय कलाकृती आहे.

याला पॉझीटीव्ह अफैर्मेशन्स म्हणा, सकारात्मक स्वयंसुचना म्हणा, यामुळे दिवसभर एक आगळीवेगळी उर्जा तुमच्यामध्ये संचार करेल

तुम्ही हे जर मनापासुन, फील करुन बोललात, आणि ते तुमच्या सुप्त मेंदुपर्यंत पोहोचलं, तर तुमच्या नकळत तो तुमच्या सार्‍या आज्ञा पाळेल आणि खर्‍या करुन दाखवेल.

आणि हीच एका दृष्टीने *“लॉ ऑफ अट्रॅक्शन”* ची दणदणीत सुरुवात असेल!..

ही आणि अशी प्रत्येक वाक्ये तुम्हाला अधिकाधिक *शक्तीशाली आणि आनंदी बनवो, अशा शुभेच्छांसह,*

  *धन्यवाद....!!!* 🙏🏻🙏🏻

===============================================================================================================================
मनाचे व्यवस्थापन!

विचारमंथन!!

कोणत्याही क्षेत्रात कार्यरत असताना जसजशी प्रगती सुरु होते...
 तसतसा छुपा विरोध हा वाढू लागतोच; सुंदर वेलीच्या खोडावर बांडगुळ वाढावा तसा..
 हा निसर्गाचाच नियम आहे.  
 पण आपल्याला त्याची पुसटशीही कल्पना नसते. 
मग तुमची प्रगती डोळ्यात सलते आणि डोक्यात भनाणु लागते तेव्हा कारस्थानांच्या बिया पेरल्या जातात. 
खुरटय़ा विचारांचे कावळे एकत्र जमू लागतात आणि व्रणार्त शिशूच्या पंखावर चोच मारण्याची संधी शोधू लागतात.
अनेकदा तुम्हाला टाळलं जातं , बिघडवलं जातं...

  मग तुमच्यावर आरोप होतात- गैर-वागण्याचे,                                   गैर कारभाराचे, भ्रष्टाचाराचे !                         तुम्ही भांबावता, हडबडून जाता.                      कारण हा हल्ला तुम्हाला अपेक्षित नसतो. आणि मग तुम्ही प्रत्युत्तराची तयारी करू लागता. शब्दाला शब्द वाढतात....                  त्याची धार हळूहळू तिखट होत जाते.. 
विरोधकांना मग आयतेच खाद्य मिळते. 
आणि नेमक्या याच क्षणी तुमच्या हातून आजवर न झालेली गफलत होऊ शकते.

   सत्यनिष्ठ, प्रामाणिक लोक कामाच्या ओझ्याने दबून जात नाही ; 
पण अनेकदा केलेल्या आरोपांच्या हल्ल्यामुळे मनातून खचून जातात. 

त्यांच्या आत्मविश्वासाला तडा जातो आणि मग प्रत्युत्तरे देण्याच्या घाईगर्दीत तो आजवर सांभाळलेले संतुलन गमावून बसतो... 

खरे नुकसान तर हे या क्षणाला होते...
 
 त्यामुळे जेव्हा तुम्ही अर्थशून्य नौटंकीला सामोरे जाल, 
विषारी टीकेचे फूत्कार ऐकावे लागतील,.. तुमच्याबद्दलची व्यक्त होणारी मते चुकीच्या मार्गावर दाखविलेल्या दिशांचे प्रतिबिंब ठरू लागतील, 

तेव्हा ताठ मानेने उभे राहायचे आणि एकही शब्द न बोलता तेथून निघून जायचे, यातच खरे शहाणपण आहे. हा पळपुटेपणा नाही. ही पाठ दाखविण्याची प्रवृत्तीही नाही.तर ही शहाणपणाची, समंजस पणाची, सन्मानाची भूमिका आहे.
 प्रत्युत्तर देणे, 
आवाज चढवणे! 
म्हणजे एका अर्थी होणाऱ्या आरोपांना स्वीकृती देण्यासारखेच ठरते. 
प्रत्येक प्रत्युत्तराची एक वेळ असते. 
अपमान विसरायचे नसतात, 
तर ते मनाच्या हळव्या कोपऱ्यात जपायचे असतात. 
त्यांची बोच रोज लागता कामा नये ; 
पण त्यांचा सल मात्र खोलवर दडलेलाच बरा. 
कारण तो आपल्या पुढच्या वाटचालीला मार्गदर्शक ठरतो.
   यश पचविणे एक वेळ सोपे; 
पण आरोप रिचवणे खूपच कठीण!
 
' हेचि फल काय मम तपाला'? 
याचा वारंवार मनाच्या खिडकीत येणारा प्रत्यय सहन करणे सोपे नाही...

   कोणत्याही मॅनेजमेन्ट स्कूलमध्ये हे असे जगणे वागणे शिकविले जात नाही. 
मग हे शिकायचे कसे?
 वेळ आणि अनुभव यापेक्षा मोठे गुरू नाहीत. 

आरडा ओरड करायला शक्ती लागत नाही,
 ती शांत राहायला अन सहन करायलाच लागते. 
अशावेळी बाळगलेले मौन हे तुमच्या दुर्बलतेची निशाणी नसून तुमच्या आत्मिक शक्तीचा तो साक्षात्कार आहे. 
आणि ही शक्ती एका दिवसात येत नाही. 
तिचा 'थेंबे, थेंबे' संचयच आपल्या जीवनात करावा लागतो.
 तुमच्या निघून जाण्यात तुमचा पराभव नसतो, तर ती तुमची प्रगल्भता असते.                                               आरोप करणाऱ्यांचे पितळ  उघडे पडतेच की, आणि कालांतराने इतरांनाही सत्य समजते. तोपर्यंत काळ पुढे गेलेला असतो...
तुम्हीही बरीच प्रगती केलेली असते. आपली दिशाही बदललेली असते...

जेथे मनाला समाधान मिळत नाही तेथे काम न केलेलेंचं बरं!
अतीव दु:ख झाले तरी ते सहन करून, जीवनाला चिकटून राहणे हा मानवाचाच नव्हे तर सबंध जीवसृष्टीचा निसर्गधर्मच आहे!

          शेवटी काय तर ''आपण प्रत्येकाच्याच दृष्टीने चांगले असू  शकत नाही,

 ''पण आपण त्यांच्यासाठी उत्कृष्ट आहोत जे आपल्याला समजतात,,
 ''माणसाने स्वत:च्या नजरेत चांगलं असलं पाहीजे,, 
समाजाच्या अशा भयंकर विषवल्लीस आपल्या जीवनात डोकावू न देता, आयुष्यातील हिरवळ जपून ठेवावी लागते..!!

''लोक तर देवाला पण नाव ठेवतात."

समाेर टीव्हीवर आवडती सिरियल सुरू आहे. पण, मनात वेगळाच गाेंधळ असताे. कारण ताे बाह्यक्रिया जरूर करताे,
 पण मनाने पूर्ण व्याकुळ बनलेला असताे. कारण मनात शांती नाही ती उत्पन्न करावी लागतेय. कारण नेहमी समाधानी राहणे हेच खरे ईश्वराचे दर्शन आहे.
 ‘हेचि देवाचे दर्शन सदा राहे समाधान!’ 
असे तुकाेबांनी म्हटले आहे.
आपण जेथे शांती नाही. तेथे शांती शाेधत असताे.
 शांती शाेधल्याने मिळत नाही.  शांती आपल्या स्वच्छ कर्मात असते. 
कर्म स्वच्छ झाले की, विचार स्वच्छ हाेतात. विचार स्वच्छ झाले की, मनात शांती नांदते.
शांतीचा अनुभव स्वत:ला नक्कीच येताे. 

‘शांतिचेनि मंत्रा, मंत्रुनी विभुती,
 लाविली देहाप्रती सर्व अंगा’ असेही संत एकनाथांनी म्हटले आहे.

आजकाल याेग, ध्यान, प्राणायाम याचा उपयाेग शांतीसाठी केला जाताे.. 
शांती मिळविण्यासाठी मनाला स्थिर करावे. मनात आेमकाराचा जप करावा. 
ते हाेत नसेल तर सूर्याेदयापूर्वी सकाळी पहाटे उठून प्रसन्न वातावरणात काही वेळ तरी शांत बसावे. डाेळे मिटवावे. 
सूर्यनमस्कार करावेत...
 सर्व विचार थांबवावेत. 

जाेपर्यंत मनाला शांती मिळत नाही. ताेपर्यंत शरीराला  आराम  नाही, हेच सत्य आहे! 

=============================================
कसंतरीच्या थकव्याचं ओझं 😀🌻🙏

आनंदी रहाण्याची जादू मला सापडली आहे, आणि आनंदाने हरखूनच सगळ्यांना ते सांगत सुटावं तसं माझं झालंय ! जरा सूक्ष्म निरिक्षण केलं तर कळेल की एक आनंदाचा, सुखाचा, समाधानाचा अनुभव असतो, जो आपण नेहमी अनुभवतो, पण लक्षच नसल्याने तो कळत नाही.

हा एक प्रयोग समजा. कोणतंही एक लहानसं काम घ्या, अगदी पोस्ट वाचताना थांबून ते काम केलं तरी चालेल.

उदा. एका शर्टाला इस्त्री करणे, कपाटात पुस्तकं नीट लावणे, टिव्ही स्वच्छ पुसणे, सुरेख कांदा चिरणे... अट एकच ते काम तुम्ही मन लावून आपल्याला जितकं चांगलं येतं तितकं चांगल करायचं आहे. बिनचूक ... दिसायला सुंदर...!

आता ते काम झाल्यावर आतून जे वाटतं ते अनुभवा, तो असतो आनंद. कधीकधी पहा आपण स्वतःशीच हसतो सुद्धा. आपण थोडं मागे जातो, कामाकडे पहातो आणि आपण खूश होतो. घर आवरल्यावर स्त्रिया घरभर नजर फिरवून तृप्त होतात किंवा आपली कार धुऊन चकचकीत झाल्यावर पुरुष पहात बसतात..! लहान मुलं तर काही तयार केल्यावर नाचतातच ...!

हे काय आहे ? हा आनंद आतून येणारा ...आतल्या चैतन्याला काम आवडल्याचा...!

हा आनंद बेस्ट मोटिवेशन आहे. बाहेर काही शोधायची गरज नाही. मला हा सापडलाय. सुरुवातीला हा आनंद खूप सुक्ष्म असतो; पकडावा लागतो. एकदा दिसू लागला की वाढत जातो आणि आपण अक्षरशः त्यात  भिजून जातो. करायचं काय ? तर वरील पध्दतीने काम केल्यावर क्षणभर थांबायचं आणि आत कसं वाटतंय ते पहायचं, अनुभवायचं; मग दुस-या कामाकडे जायचं.

सकाळी उठल्या उठल्या आपण जे पांघरुण घेतलं होतं त्याची सुंदर सुबक घडी करा, आणि शेवटी त्यावर हात फिरवताना काय वाटतं ते पहा. पहिली कमाई झाली, आता दुसरं काम ..  तिथल्या तिथे मोबदला तिथल्या तिथे बक्षिस ... अशी ही अद्भुत यंत्रणा काम करताना पाहून थक्क व्हायला होईल.

मग हेच सुरु ठेवायचं दिवसभर ... थकवा गायब... नैराश्य गायब... उदासिनता, मरगळ पळून जाईल...!

आपण काय करतो, कसंतरी करतो. मग आतून काम कसंतरी झालंय, असा फीडबॅक येतो, त्याने आपण दुःखी होतो. आता पुढचं काम करायला ऊर्जा कमी होते. दिवसभर हे कर्ज  वाढत जातं.

उदा. सकाळी चादरीची घडी कशीतरी करुन फेकली तर आपल्याला दंड थोडीच भरावा लागणार आहे ? पण आतमधे कोणीतरी असतं ज्याला हे माहीत आहे की चादरीची घडी कशी करतात; तो नापास करतो. असे आपण स्वतःला नापास करत रहातो. मग माझ्यात आत्मविश्वास नाही, मला नैराश्य आहे... ई. ई. तक्रारी आपण करतो.

यापुढे 'कसंतरी काम करतोय, त्यामुळे आतलं कर्ज वाढतंय' हे लक्षात येईल. थोडा वेळ दिला तरी चालेल, पण चांगलं काम करायची सवय लावली तर वेळ वाचेल आणि आनंद मिळेल.

'भरभर कर... काय खेळत बसलाय... चेंगटपणा नको'  असं आपण ऐकतो. गती वाढवणं म्हणजे काम कसंतरी करणं नाही. काम झाल्यावर मस्त वाटलं पाहीजे. कोणी टाळ्या वाजवणारं नसलं तरी आतून त्या आपल्याला  ऐकू आल्या पाहीजेत.

काम उत्कृष्ट करुन ह्या आनंदाचं सायन्स अनुभवून आपण दिवसभर उत्साही राहू शकतो. थकवा निराशा टाळू शकतो. आजच्या काळाचे मनोशारिरीक आजार दूर करु शकतो. थकवा आणि आजार म्हणजे हे साठलेलं कर्ज आहे. आनंदच संपलाय करण्यातला !

हवंय एक लहानसं काम पुर्ण...संपुर्ण...आणि सुंदर ... आतला आनंद बाहेर आला पाहिजे...!!!

👌👍. It's from a very brilliant guy Mr. Pradeep Bimalkhedkar. Great an article.. Only thing, it's in Marathi.  Use Google translate and you would find it far more worthy... 😇


+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

सत्य हे एक अशी शस्रक्रिया आहे,
की,ज्याने सुरुवातीला तर वेदना होतात.
पण...
दुखण्यापासून कायमची मुक्ती मिळते.
पण असत्य हे असे वेदनाशामक,
(पेनकिलर) असते की,
ज्याने तात्पुरते बरे वाटले तरीही,
असंख्य साईड इफेक्टचा सामना करावा लागतो.
अट्टहासाने जोपासलेला राग,
दुसऱ्याने भरलेले कान,
आणि वैर भावनाच,
माणसाला अनेकदा हरवते.
हे ज्यांना समजत नाही,
त्यांना आपण कशाने हरलो,
हे आयुष्यभर उमगत नाही.
ज्याला दुःखाची जाणीव असते,
त्याला सुखाची किंमतही असते,
म्हणून जे दिवस आपण काढले आहेत,
त्याची नेहमी जाणीव ठेवा.
सुंदर चेहरा म्हातारा होतो,
बलाढ्य शरीरसुद्धा एक दिवस गळून पडतं,
पद सुद्धा एक दिवस निघून जातं.
परंतु एक चांगला माणूस,
नेहमी चांगलाच राहतो...!! 

++++++++++++++++++++++

कसंतरीच्या थकव्याचं ओझं

आनंदी रहाण्याची जादू मला सापडली आहे आणि आनंदाने हरखूनच सगळ्यांना ते सांगत सुटावं तसं माझं झालंय !
जरा सूक्ष्म निरिक्षण केलं तर कळेल की एक आनंदाचा, सुखाचा,समाधानाचा अनुभव असतो जो आपण नेहमी अनुभवतो पण लक्षच नसल्याने तो कळत नाही.
हा एक प्रयोग समजा. कोणतंही एक लहानसं काम घ्या, अगदी पोस्ट वाचताना थांबून ते काम केलं तरी चालेल.

उदा. एका शर्टाला इस्त्री करणे, कपाटात पुस्तकं नीट लावणे, टिव्ही स्वच्छ पुसणे, सुरेख कांदा चिरणे...
अट एकच ते काम तुम्ही मन लावून आपल्याला जितकं चांगलं येतं तितकं चांगल करायचं आहे. बिनचूक ... दिसायला सुंदर...

आता ते काम झाल्यावर आतून जे वाटतं ते अनुभवा.. तो असतो आनंद ...कधीकधी पहा आपण स्वतःशीच हसतो सुद्धा...आपण थोडं मागे जातो ... कामाकडे पहातो आणि आपण खूश होतो.
घर आवरल्यावर स्त्रिया घरभर नजर फिरवून तृप्त होतात किंवा आपली कार धुऊन चकचकीत झाल्यावर पुरुष पहात बसतात...लहान मुलं तर काही तयार केल्यावर नाचतातच ...!

हे काय आहे ? हा आनंद आतून येणारा ...आतल्या चैतन्याला काम आवडल्याचा...

हा आनंद बेस्ट मोटिवेशन आहे. बाहेर काही शोधायची गरज नाही. मला हा सापडलाय. सुरुवातीला हा आनंद खूप सुक्ष्म असतो; पकडावा लागतो. एकदा दिसू लागला की वाढत जातो आणि आपण अक्षरशः त्यात  भिजून जातो.
करायचं काय ? तर वरील पध्दतीने काम केल्यावर क्षणभर थांबायचं आणि आत कसं वाटतंय ते पहायचं, अनुभवायचं; मग दुस-या कामाकडे जायचं.

सकाळी उठल्या उठल्या आपण जे पांघरुण घेतलं होतं त्याची सुंदर सुबक घडी करा आणि शेवटी त्यावर हात फिरवताना काय वाटतं ते पहा. पहिली कमाई झाली, आता दुसरं काम ...तिथल्या तिथे मोबदला तिथल्या तिथे बक्षिस ...अशी ही अद्भुत यंत्रणा काम करताना पाहून थक्क व्हायला होईल.
मग हेच सुरु ठेवायचं दिवसभर ...थकवा गायब...नैराश्य गायब...उदासिनता, मरगळ पळून जाईल...
आपण काय करतो ... कसंतरी करतो...मग आतून काम कसंतरी झालंय असा फीडबॅक येतो, त्याने आपण दुःखी होतो. आता पुढचं काम करायला ऊर्जा कमी होते. दिवसभर हे कर्ज  वाढत जातं. 

उदा. सकाळी चादरीची घडी कशीतरी करुन फेकली तर आपल्याला दंड थोडीच भरावा लागणार आहे ? पण आतमधे कोणीतरी असतं ज्याला हे माहीत आहे की चादरीची घडी कशी करतात; तो नापास करतो. असे आपण स्वतःला नापास करत रहातो ...मग माझ्यात आत्मविश्वास नाही, मला नैराश्य आहे... ई. ई. तक्रारी आपण करतो.

यापुढे 'कसंतरी काम करतोय, त्यामुळे आतलं कर्ज वाढतंय' हे लक्षात येईल.थोडा वेळ दिला तरी चालेल, पण चांगलं काम करायची सवय लावली तर वेळ वाचेल आणि आनंद मिळेल.

'भरभर कर...काय खेळत बसलाय...चेंगटपणा नको'  असं आपण ऐकतो. गती वाढवणं म्हणजे काम कसंतरी करणं नाही. काम झाल्यावर मस्त वाटलं पाहीजे. कोणी टाळ्या वाजवणारं नसलं तरी आतून त्या आपल्याला  ऐकू आल्या पाहीजेत.

काम उत्कृष्ट करुन ह्या आनंदाचं सायन्स अनुभवून आपण दिवसभर उत्साही राहू शकतो. थकवा निराशा टाळू शकतो. आजच्या काळाचे मनोशारिरीक आजार दूर करु शकतो. थकवा आणि आजार म्हणजे हे साठलेलं कर्ज आहे. आनंदच संपलाय करण्यातला !

हवंय एक लहानसं काम पुर्ण...संपुर्ण...आणि सुंदर ... आतला आनंद बाहेर आला पाहिजे असं !

++++++++++++++++++++
नुकतंच नवीन आर्थिक वर्ष सुरु झाले .   मार्च एंडिंगची धावपळ ब-यापैकी संपली. जवळपास सगळे हिशेब पूर्ण केले.   अनेक खाती बंद केली, काही सुरु केली , काही पूर्ववत केली .    सगळी धावपळ   संपली .*
        मग उशिरा अगदी शांतपणे बसून आणखी एक बॅलन्स शीट तयार करायची इच्छा झाली . हे बॅलन्स शीट होते आयुष्याचे. 
बराच वेळ हिशेब लावण्याचा प्रयत्न केला तेव्हा  लक्षात आलं की, प्रेम, स्नेह, माया, आत्मीयता, जिव्हाळा, कर्तव्य निष्ठा, बंधुभाव ही सगळी खातीच चक्क गायब झाल्यासारखी दिसतातयत.  शिवाय जी काही मोजकी शिल्लक दिसतायतं. त्या खात्यांवर तर ब-याच दिवसांत काही व्यवहारच झालेला नाही . 
           स्वतःलाच विचारून पाहिलं, 'इतक्या वर्षात या खात्यांकडे का बरं दुर्लक्ष झालं असेल ? कुठला भ्रम होता, कसला अहंकार होता ? आयुष्य धावपळीचं झालंय हे खरंच. पण निदान ही खाती सुरु ठेवण्या इतका तरी मी वेळ काढायला हवाच होता ना. बँकेत जसं एखादया अकाउंटवर काहीच व्यवहार झाले नाहीत, तर बंद करतात, तसं तर आपल्या आयुष्यात होणार नाही ना.....!
      मग मात्र मनाला समजावले की वेळ अजूनही गेलेली नाही. विसरून गेलेली , व्यवहार न झालेली ही प्रेमाची खाती पुन्हा सुरु करुन तर पाहूयात.
        मनात कुठंतरी विश्वास वाटतोय की यावर्षी लंगडं वाटणारे माझं बँलन्सशीट( तुलनपत्र)पुढच्या वर्षापर्यत देवदयेमुळे तसेच तुमच्या मायेमुळे चांगलंचं तगडं झाले असेल  !*

             💐शुभ   सकाळ.  💐

***************************************



दुसऱ्याचा विचार-👨‍👩‍👧‍👦

लेखिका-कांचन दीक्षित.

♻️♻️♻️♻️♻️♻️♻️♻️♻️♻️♻️

        सुई दोरा वापरण्याचा एक नियम पुर्वी पाळला जायचा, अजूनही अनेक घरात असेल. नियम असा असतो की समजा एखाद्याने दोऱ्याने काही शिवलं, आणि ओवलेला दोरा संपला, तर त्याने परत सुईत दोरा ओवून गाठ मारुन तो नीट रिळाला गुंडाळून ठेवायचा, दुसऱ्याला सुईला दोरा लावलेला मिळतो, त्याचं काम झालं की त्यानं परत तेच करायचं.

        पुर्वीच्या काळी पाण्याचे बंब असायचे. एकत्र कुटुंब असायचं. गरम पाण्याच्या बाबतीतही हा नियम असायचा की जो बंबातून पाणी घेईल त्यानं अंघोळीला जाण्यापुर्वी दुसऱ्यासाठी बंबात पाणी भरायचं, दुसऱ्यानं तिसऱ्या साठी, जेणेकरुन वेळ आणि इंधनबचत व्हायचीच, पण गैरसोयही टाळता यायची.
       सुबत्ता वाढत गेली तसतशी एकमेकांवर अवलंबून जगण्याची जीवनशैलीही बदलत गेली. आता दुसऱ्याचा विचार करण्याची वेळ वारंवार येत नाही, पण याचा अर्थ तो करायचाच नाही असं मात्र नाही.
        आपला पेपर वाचून झाला की त्याच क्रमानं (नीट पुरवणी आत ठेऊन) निश्चित जागी ठेवला तर दुसऱ्याला ताजा पेपर वाचल्याचा फील येतो, शोधाशोध करावी लागत नाही.
       पाण्याची बाटली आपण रिकामी केली व लगेच भरुन फ्रीजमधे ठेवली तर ही साखळी चालू राहून एकालाच हे काम करावं लागत नाही.
        बेसिनपाशी हँडवाॅश संपत असतं, ज्याला कळेल त्यानं रिफिल करायचं हा नियम केला तर कोणालाही त्रास होणार नाही.
       पाण्याचा ग्लास, चहाचे कप आपापले धुवून/घासून ठेवायचे, हा नियम घरात पाळला तर भांडी कमी साठतील.
       खाऊ, फळं, नियमित खाल्ले जाणारे पदार्थ किंवा  कात्री, स्टेपलर, सेलोटेप सारख्या वस्तू एकाच जागी ठेवणे, आपली टर्न आल्यावर संपल्या/बिघडल्या तर आठवणीने आणणे, ही काळजी घेणे.
      घर सगळयांचं असतं, 'सगळी जवाबदारी गृहिणीची' असं म्हणून जवाबदारी झटकून न टाकता एकत्र रहाण्याचे मॅनर्स सगळयांनीच शिकायची गरज आहे.
       प्रेमात आणि नात्यात एकमेकांसाठी कामं केली जातात पण त्यामुळेच एकत्र जगण्याच्या शिस्तीला तडा जातो, चुकीच्या सवयी लागतात.
       घर ही एक संस्था समजून घराची एक शैली, एक नियमावली जरुर तयार करा. हे एक लहानसं युनिट समजा. देशात अराजकता माजू नये म्हणून कायदे असतात, तसे घरातही काही नियम असले पाहिजेत, तरच त्याचं हाॅटेल होणार नाही. (खरंतर हाॅटेलचेसुध्दा नियम असतातच!)
      लाॅकडाऊनचा काळ ही एक संधी आहे घराला घरपण देण्याची. सगळे घरात आहेत. काही एकत्र सवयी लावून घेतल्या तर भविष्यात फायदा होईलच आणि नातीसुध्दा चांगली होतील. लहान मुलांना हे शिकवता येईल. 



      थोडं थांबून आपल्या नंतर येणाऱ्याचा विचार केला तर ही मदतीची साखळी सुरु राहील. मुख्य म्हणजे आपली वेळ येईल तेव्हा आपल्यालाही फायदे मिळतील.

©कांचन दीक्षित.
00000

----0


No comments:

Post a Comment

  १. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...