अध्यात्मिक

 

।। श्री गणेशाय नमः  ।।


1)श्री ज्ञानेश्वरी 

2)अभंग हरिपाठ 

3)गीतासार 

4)यथार्थ गीता 

5)गीताबोध 

6)संत तुकाराम महाराजांच्या अभंगांचे निरूपण 

7)मनाचे श्लोक

8)सार्थ मनाचे श्लोक 

9)आरती संग्रह


000



*********************************************************

जाणून घ्या ! कुठ मिळतील दर्शनासाठी  E-Pass - महत्वाचे अपडेट

राज्यातील मंदिर प्रवेश  दर्शनासाठी अनेक ठिकाणी  E-Pass ची सुवीधा दिली आहे, तर काही ठिकाणी ठराविक संख्येने लोकांना प्रवेश मिळणार आहे , दरम्यान काही ठिकाणच्या E-Pass च्या लिंक आपल्याकडे आल्या आहेत 

💁‍♂️   पहा कुठ करता येईल E-Pass साठी नोंदणी

●  श्री संत गजानन महाराज संस्थान शेगांव E-Pass नोंदणी  - gajananmaharaj.org:8080

●  श्री साईबाबा संस्थान शिर्डी  E-Pass नोंदणी -  online.sai.org.in/

●  श्री विठ्ठल मंदीर पंढरपूर  E-Pass नोंदणी - www.vitthalrukminimandir.org/home.html

●  श्री शनिमहाराज शनिशिंगणापूर  E-Pass नोंदणी - www.shanidev.com

●  श्री सिद्धिविनायक दर्शनासाठी ऑनलाईन बुकिंग Apps व्दारे करावं लागणार - play.google.com/store/apps/details?id=com.cynapto.ssvt

●  दर्शनासाठी आवश्यक असणाऱ्या -  E-Pass नोंदणीच्या ह्या वेबसाईट नक्कीच खूप महत्वाच्या आहेत , आपण इतरांना देखील शेअर करा 

🙂  सहकार्य करा - इतरांना पण शेअर करा

================================================

         

  ब्रह्मा, विष्णू आणि महेश्वर 

  सामोरी बसले

  मला हे दत्तगुरू दिसले


  माय उभी ही गाय हो‍उनी, 

  पुढे वासरू पाहे वळुनी

  कृतज्ञतेचे श्वान बिचारे

  पायावर झुकले


  चरण शुभंकर फिरता तुमचे, 

  मंदिर बनले उभ्या घराचे

  घुमटामधुनी हृदयपाखरू

  स्वानंदे फिरले


  तुम्हीच केली सारी किमया, 

  कृतार्थ झाली माझी काया

  तुमच्या हाती माझ्या भवती 

  औदुंबर वसले


🌹🎼🚩🔆🛕🔆🚩🎼🌹

  गीत : जगदीश खेबूडकर         ✍️

  संगीत : सुधीर फडके              🎹

  स्वर : आशा भोसले                🎤

  चित्रपट : आम्ही जातो अमुच्या गावा (१९६८)                                   


0000




🎴🎴🎴🎴🎴🎴🎴🎴


श्रीगुरुदेव दत्त 🌹🚩


गुरू विण कोण मज त्राता।

तोच बंधू, सखा, पाठीराखा।।धृ।।


मी अज्ञानी , मूढ, अपूर्ण।

तू कैवल्याचा चंद्र परिपूर्ण।

देई कृपेची मज शीतलता।।१।।


तुझ्या विना मिळे कैसे ज्ञान।

तू ज्ञानसिंधू , मी रज:कण।

वाहू दे तुझी ज्ञान सरिता।।२।।


आत्मज्ञानाचा मी भुकेला।

शरण आलो तव चरणाला।

दावी उघडून विश्व पसारा।।३।।


ऐसे द्यावे सद्गुरू मज ज्ञान।

माझे, मी, हे नसावे भान।

मी चातक आर्त तृषार्ता।।४।।


काय म्या पुण्य जोडले।

मज चरण तुझे लाभले।

नको होऊ निष्टुर आता।।५।।


का मजला प्रपंची गोविले।

वासना काननी मज टाकले।

सोडव यातून, करी मुक्त आता।।६।।


वृथा जन्म हा जाऊ नये रे।

तुझी कृपा हीच तरणोपाय रे।

हा गुंता मनाचा सोडव तू आता।।७।।


गेले शैशव, यौवन, जरा पण आले।

तुझी पाऊले मी कधी ना धुंडाळले।

हो कृपावंत, घे पदरात आता।।८।।


आत्मबोधाचा तो तेज, प्रकाश।

करी नाश अज्ञानाचा क्षण एक निमिष।

आलो शरण तुज साष्टांग दंडवता।।९।।

0000

विठ्ठल 🙏🏻  
     (मूळ कविता)

पंढरपूरच्या वेशीपाशी
आहे एक छोटी शाळा;
सर्व मुले आहेत गोरी
एक मुलगा कुट्ट काळा ॥

दंगा करतो मस्ती करतो
खोड्या करण्यात आहे
अट्टल
मास्तर म्हणतात करणार काय?
न जाणो असेल विठ्ठल ॥

✍️  ©विंदा करंदीकर
================
  
      🎯 इट्टल
(नगरी बोली)

पंडरपुरच्या येसिपासी
हाये येक छुटी साळा
सर्वी पोरं हायेत गुरी
योक मुल्गा कुट्ट काळा

दंगा कर्तो मस्ती कर्तो
खोड्या कर्ण्यात बी आट्टल !
मास्तर म्हंती करनार काय ?
न जानू ह्यो आसन इट्टल !
 
🖊 काकासाहेब वाळुंजकर
      अहमदनगर
=================
    
    🎯  इट्टल
(मराठवाडी बोली)

पंडरपूरच्या येशीपशी
हाय बारकी साळा एक
सगळी पोरं हायत गोरी
कुट्ट काळं त्येच्यात एक

आगावपणा करतंय पोराटगी करतंय
आवचिंदपणाबी करण्यात हाय
आट्टल...
गुरजी मनत्यात करावं काय?
एकांद्या टायमाला आसंलबी इट्टल!

🖊 डॉ.बालाजी मदन इंगळे
         उमरगा
=================

 🎯 इठ्ठल
लेवा गणबोली
पंढरीच्या येशीपाशी
आहे एक छोटुशी शाया
_सर्वे पोऱ्हय गोरे
एक पोऱ्या कुट्ट काया

दंगा करतो मस्ती करतो
खोड्या कऱ्यात आहे अट्टल
मास्तर म्हने करे काय
न जानो अशीन इठ्ठल

🖊 प्रशांत धांडे
       - फैजपूर
=================

   🎯 ईठ्ठल 
(अहिराणी रुपांतर)

पंढरपूरना शीवजोगे
एक शे धाकली शाया;
सम दा पोरे शेतस गोरा
एक पोर्‍या किट्ट काया ||

दांगडो करस, मस्त्या करस
खोड्या कराम्हा शे अट्टल;
मास्तर म्हने काय करो ?
ना जानो हुई ईठ्ठल  ||

  ✍️ नितीन खंडाळे 
            चाळीसगाव
=================
     
🎯   इठ्ठल
 (तावडी अनुवाद)

 पंढरपूरच्या येसजोय
 आहे एक छोटी शाया
 सम्दे पोरं आहेती गोरे
  एक पो-या कुट्ट काया ll

दंगा करतो मस्ती करतो
 खोड्या क-यामधी आहे अट्टल
 मास्तर म्हनता करनार काय?
ना जानो असीन इठ्ठल  ll

 ✍️ प्रा.डॉ.प्रकाश सपकाळे
        - जळगाव
=================

     🎯 इठ्ठल
(बागलाणी अहिराणी) 

पंढरपूर नी येसपन
शे एक उलशी शाळा
सर्वा पोऱ्या गोरापान
येकच पोरगा कुट्ट काळा!

दंगा करस मस्ती करस
खोड्या काढा मा शे अट्टल
मास्तर म्हणतस करवा काय
न जाणो व्हयी इठ्ठल!

  🖊 वैभव तुपे
        - इगतपुरी
=================

🎯 इठ्ठल
(आदिवासी तडवीभिल
बोली)

पंढरपूरची शिवंजवळं
ह एक लहानी शायी
सबन पोऱ्हा हती गोऱ्या
एक पोऱ्या ह कायाकुच

गोंदय करतो मस्ती करतो
खोळ्या करवात ह अट्टल
मास्तर म्हणतंहती करशान काय ?
कोणाल माहित हुईन इठ्ठल

🖊 रमजान गुलाब तडवी
- बोरखेडा खुर्द ता. यावल
=================

  🎯  विठ्ठल
(वऱ्हाडी बोली )

पंढरपूरच्या येशीजोळ
लहानचुकली शाळा हाये;
सबन लेकरं हायेत उजय
यक पोरगं कायंशार॥

दांगळो करते, मस्त्या करते
खोळ्या कर्‍याले अट्टल.
गुर्जी म्हंतात कराव काय?
न जानो अशीन विठ्ठल ॥

✍️  अरविंद शिंगाडे
           - खामगा
================
   
 🎯  इठ्ठल
 (वऱ्हाडी अनुवाद)

पंढरपूरच्या वेसीजोळ
आहे एक लायनी शाळा
सारी पोर आहेत गोरी
एकच पोरगा डोमळा ॥

दंगा करते, दांगळो करते
खोळ्या करण्यात आहेत
पटाईत...
मास्तर म्हणते कराव काय
न जाणो अशीन इठ्ठल ।।

✍️ लोकमित्र संजय
            -नागपूर
=================
        
     🎯 इठ्ठल
      (आगरी अनुवाद)

_पंढरपूरचे येशीजरी
यक हाय बारकीशी शाला
सगली पोरा हायीत गोरी
यक पोऱ्या कुट काला।।

दंगा करतंय मस्ती करतंय
 खोऱ्या करन्यान हाय
अट्टल...
मास्तर बोलतान कराचा काय?
नायतं तो हासाचा इठ्ठल!

✍️  तुषार म्हात्रे
     पिरकोन (उरण)
=================
      
    🎯   इट्टल
(मालवणी अनुवाद)

पंडरपूराच्या येशीर 
एक शाळा आसा बारकी।
एकच पोरगो लय काळो: 
बाकीची पोरां पिटासारकी।।

दंगो करता धुमशान घालता;
खोड्ये काडण्यात लय अट्टल।
मास्तर म्हणतंत करतंलास काय?
/हयतोच निगाक शकता इट्टल।।_

✍️  मेघना जोशी
         - मालवण
=================
    
  🎯  इठ्ठल
(पारधी अनुवाद)

पंढरपूरना आगंमांग
छ येक धाकली शाया ;
आख्खा छोकरा छं गोरा
यकजच छोकरो कुट्ट कायो!!

वचक्यो छं मस्त्या करस
खोड करामं छं अट्टल 
मास्तर कवस करानू काय ? 
कतानै आवस व्हसो तेवतो
 इठ्ठल !!

✍️ प्रविण पवार 
             धुळे
=================
    
   🎯   इठ्ठल
(बंजारा अनुवाद)*

पंढरपूरेर सिमेकन,
एक हालकी शाळा छ!
सारी पोरपोऱ्या गोरे,
एक छोरा कालोभुर छ!

_दंगो करचं मस्ती करचं!
खोडी करेम छ अट्टल!!
मास्तर कचं कांयी करू?
काळोभूर न जाणो इ इठ्ठल!!

✍️ दिनेश राठोड
 चाळीसगाव
=================

    🎯  विठ्ठल
(वंजारी अनुवाद)

पंढरपुरना हुदफर 
हे एक बारकुली शाळ
हंदा पाेयरा हे गाेरा 
एक पाेयराे निववळ काळाे

केकाटत ,मसती करत
खाेडयाे करवामा हे अटट्ल
 मासतर केत करवानाे काय
 न जाणाे हिवानाे विठठ्ल

✍️ सायली पिंपळे
              पालघर
=================
        
  🎯   विठ्ठल
      (हिंदी अनुवाद)

पंढरपूर नगरमें द्वारसमीप
है एक अनोखी पाठशाला
सुंदर सारे विद्यार्थी वहाँ के
एक बच्चा भी हैं काला...।

उधम मचाये मस्तीमे मगन
है थोड़ा सा नटखटपन
गुरुजन कहे क्या करे जो
हो सकता हैं विट्ठल...।

✍️ सुनिल खंडेलवाल
       पिंपरी चिंचवड़, पुणे
=================
          
  🎯  विट्टल
      (कोळी अनुवाद)

पंढरपूरश्या  वेहीवर , 
एक हाय बारकी शाळा।                           
 जखली पोरा गोरी गोरी।     
त्या मनी एक हाय जाम काळा।      

दन्गो करता न मस्तीव करता        
खोडी करनार अट्टल।    
न मास्तर हानता काय करु            
न जाणो यो हयेन विट्टल।   

✍️ सुनंदा मेहेर
   माहीम कोळीवाडा मुंबई
=================
       
  🎯  इठ्ठल 
   (आगरी अनुवाद)

 पंढरपुरचे हाद्दीव
 हाय येक बारकीच शाला.
 सगली पोरा हान गोरी
 येक पोर जामुच काला.

 उन्नार मस्ती करतय जाम,
 खोऱ्या करन्यान वस्ताद हाय.
 गुरूजी सांगतान करनार काय
 नयत त आसल तो इठ्ठल.

 ✍️ निलम पाटील  बिलालपाडा,नालासोपारा
=================

     🎯 विट्टल
(झाडीबोली)

पंढरपूराच्या सीवेपासी
आहे एक नआनसी स्याळा
सर्वी पोरे आहेत भुरे
एक पोरगा भलता कारा 

दंगा करतो मस्ती करतो
गदुल्या करण्यात अव्वल
मास्तर म्हणत्ये करणार काय ?
न जानो असल विट्टल !

✍️ रणदीप बिसने
        नागपूर
=================
     
       🎯 इठ्ठल
(परदेशी बोली)

पंढरपुरका येशीपास
हय एक छोटी शाळा
सब पोर्ह्यान हय गोरा 
एक पोऱ्यो कुट्ट काळो

दंगा करं मस्ती करं
खोड्या करबामं हय अट्टल
/मास्तर कहे कई करू ?_
कोनकू मालूम व्हयंगो इठ्ठल 

🖊 विजयराज सातगावकर
         - पाचोरा
=================

🎯 विठ्ठल
(पोवारी बोली )

पंढरपूरक् सिवजवर
से एक नहानसी शाळा
सप्पाई टुरा सेती गोरा
एक टुरा से भलतो कारा

दिंगा करसे मस्ती करसे
चेंगडी करनो मा से अव्वल
मास्तर कव्हसे का आब् करू?
नही त् रहे वु विठ्ठल !!

✍️ रणदीप बिसने
      नागपूर
=================

🎯 विठ्ठल
(कोकणी सामवेदी बोली)

पंढरपूरश्या वेहीपाशी
एक बारकी शाळा हाय
आख्ये पोरे गोरेपान
पान एकूस काळोमस

खूप दंगोमस्ती करत्ये
खोडयो काडण्यात अट्टल
मास्तर हांगात्ये,
का कऱ्यासा,
कुन जाणे, ओस हायदे विठ्ठल ??

🖊 जोसेफ तुस्कानो
           वसई
=================


श्रीराम...

यावं पाव्हणं यावं घ्यावा आमुचा रामराम
मुखी रामनाम आचरणी पण आहे का राम

पितृभक्त आज्ञाकारी एकवचनी सीतेचा राम
मर्यादापुरुषोत्तम मातृभक्त कौशल्येचा राम

पितृवचन राखावया सिंहासन सोडी श्रीराम
वल्कले लेवुनिया वनवासी होई राजा राम

पत्नी हट्ट पुरवण्या अग्रेसर एकपत्नीव्रती राम
वालीच्या शरसंधानाने मित्रवचनाला जागे राम

शबरीची बोरे चाखून मन राखी भक्तांचा राम
सुग्रीव बिभीषणाचा मान राखी मित्रांचा राम

प्रयत्नांती परमेश्वर दाखवी सेतू बांधून राम
विनाशापूर्वी शत्रूला सुधारण्या संधी देई राम

अन्यायाविरुद्ध उभा धैर्यशील पुरुषोत्तम राम
अमृतमय नाभीच्या दुष्टाचा नाश करे श्रीराम

मृत्युसोबतच वैर संपे लक्ष्मणाला सांगे श्रीराम
शत्रूकडूनही विनयाने ज्ञानार्जनात आहे राम

बिभीषणा देई लंका सुग्रिवा किश्किंधा देई राम
स्वार्थत्यागात पुरूषार्थ वचनपूर्तीत आहे श्रीराम

दुर्जनांच्या नाशासाठी सदैव तत्पर रामाचा बाण
सज्जनांच्या रक्षणासाठी कोदंडधारी जय श्रीराम

अही मही कलीयुगातही अधीन करू पाही श्रीराम
जागृक असती भक्तगण मनात वसे ज्यांच्या राम


✍️..... एजाज



000

संत चरित्र 🌹

संत सखू

संत सखू हे महाराष्ट्रीयांच्या भोळ्या - भाबड्या नव्हे, तर सुजाण - श्रद्धाशील मनाला पडलेले एक मधुर स्वप्नच आहे. सखू प्रत्यक्षात होऊन गेली की नाही कोणास ठावूक. पण प्रत्यक्षात होऊन गेली असती तर महाराष्टीय लोकमानस तिनं जेवढं व्यापलं असतं, त्यापेक्षा कितीतरी पटींनी हे लोकमानस ती प्रत्यक्षात होऊन गेली नसतानाही व्यापलं आहे, हे कुणीच नाकारू शकणार नाही. प्रत्यक्षापेक्षा तिचे हे अस्तित्व अधिक सत्य, अधिक व्यापक आणि अधिक सार्थ आहे, गहन गूढ आहे. ती समाजमनाची एक मानसिक प्रक्रिया आहे. त्यामागे काही पिढ्यांच्या पारमार्थिकतेचे संचित उभे आहे. त्यामुळे संत सखू हे एक काल्पनिक चित्र नाही. अखिल मराठी मानस एकवटून गेलेलं ते एक जिवंत, चिरंजीवअसं मानस व्यक्तिमत्व आहे. राधा ही अखिल भारतीय लोकमानसातील आदिम प्रतिमा बनून गेली आहे. कृष्ण ही पुरूष तत्त्वाची, तर राधी ही रात्री तत्त्वाची आदिम प्रतिमा. त्यात पुरुष - स्त्री असा भेद नाही. राधा ही भारतीय स्त्री - पुरुषांच्या मनातील आदिम प्रतिमा आहे. तसाच श्रीकृष्ण. महाराष्ट्रीयांच्या मानस संपुटात अजूनही पूजिली जाणारी सखू, तिचं चरित्र हा महाराष्ट्रीयांच्या पारमार्थक मनाचा एक मनोज्ञ आविष्कार आहे. त्या चरित्राला Super reality चं परिमाण प्राप्त झालेलं आहे.
तिच्या चैत्रकथेत सारेकाही सामावलेलं आहे. त्यात जीवनवास्तव आहे, जीवनातील सुष्ट - दुष्ट प्रवृत्तींचा संघर्ष आहे, स्वार्थ परायण मनोवृत्तींचं दर्शन आहे, सुजाण मनोवृत्तीही कार्यसर झालेल्या आहेत. टोचणार्‍या काकवृत्ती आहेत, गोंजारणारे मायाळू हात आहेत. पुरूषप्रधान संस्क्रुतीचे चटके आहेत. समजावून घेणार्‍या बाया - बापड्या आहेत. या सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे जीवनसंघर्षाचे सर्व चटके सोसून समर्पित झालेलं संज्ञाशील संतसखूचं मन या चरित्रकथेत भक्कमपणे उभं आहे. ही संतसखूची चरित्रगाथा म्हणजे महाराष्ट्रीय मनाचा एक मनोज्ञ अविष्कार आहे. किंबहुना महराष्ट्रीयांच्या पारमार्थिक मनाचा कालोवा करून उभं केलें संतसखू हे एक शिल्प आहे.
ज्या स्त्रिया भक्तिमार्गाला लागून आत्मोद्धारासाठी तळमळत राहिल्या त्या सर्वांच्या वाट्याला आप्तस्वकीयांकडून व समाजाकडून निंदा, नालस्ती व छळवाद या पलीकडे काहीच आले नाही. संतसखूला या सर्वातून जावे लागल्याचे चित्रण केले जाते. संतसखूनं मराठी माणसाची अशी काही पकड घेतली आहे की, तिच्यावरील चित्रपट असो वा नाटक असो. मराठी मन तिथं धावत जातं. कारण तिच्या रूपात त्याला आपल्यालाच पाहायला मिळतं. लोक प्रतिभेतून निर्माण झालेलं सखूचं भावचित्र लोकमानसाला लोभावणार यात नवल ते काय ? सत्त्व पाहायची व त्या सत्त्वाला उतरायची या लोक मानसाला सवयच लागलेली. शेवट हा ईशकृपेच्या वरदहस्तानं शांत, आनंदीच व्हायचा. संत सखूचं लोकमानसातील चरित्रचित्रण असंच साकारत गेलं.


---------------------------------------------------------------------------------------------


|| गोव्यातील देवकीकृष्ण मंदिर ||

हे भारतातील एकमेव श्रीकृष्ण 
मंदिर आहे जेथे भगवान श्रीकृष्ण
आपल्या जन्मदाती- माता देवकी सोबत पुजला जातो. म्हणून या मंदिराला 'देवकीकृष्ण' मंदिर म्हणतात.

या मंदिराच्या गाभाऱ्यात देवकी माता आपल्या लाडक्या मुलाला म्हणजे बाळकृष्णाला डाव्या कडेवर घेऊन प्रसन्न मुद्रेने उभी आहे.

परंतु भारतात नव्हे तर संपूर्ण जगात ज्या ठिकाणी भगवान श्रीकृष्णाचे मंदिर आहेत, त्या- त्या ठिकाणी श्रीकृष्ण मंदिराच्या गाभाऱ्यात भगवान श्रीकृष्ण एकटेच उभे असल्याचे 
आपण पाहतो.

गोव्यातील या मंदिरात मात्र
श्रीकृष्णाची जन्मदाती आई देवकीला भगवान श्रीकृष्ण पेक्षाही फारच महत्त्व देण्यात आले आहे. हे क्वचितच आपल्याला इतरत्र पहावयास मिळते.

हे मंदिर सध्या माशेल या गावात असून  ते गोव्याची राजधानी पणजी पासून 21 की.मी. अंतरावर वसलेले आहे.

परंतु इ.स. 1530 पर्यंत म्हणजे गोवा प्रांतावर पोर्तुगीजांचे आक्रमण होण्यापूर्वी हे मंदिर माशेल पासून जवळ आलेल्या चोडन या बेटावर होते. जेव्हा बेटावरील जेष्ठ नागरीकांना सुगावा लागला की पोर्तुगीज या बेटावरील देवालय उध्वस्त करून त्याजागी चर्च बांधणार आहेत आणि हिंदू धर्मियांचे 
ख्रिस्तीकरण करणार आहेत. त्यावेळी त्यांनी तेथील सगळ्या देवालयातील मुर्तींसह बेटातून पलायन केले आणि
फोंडा तालुक्यातील माशेल येथील एका वाड्यावर आले. त्यावेळी माशेल हा गाव विजापूर आदिलशाहीच्या ताब्यात होते. माशेल हे गाव मुसलमान राजाच्या 
ताब्यात असले तरी माशेलचा प्रत्यक्ष कारभार सरदेसाई नावाचा स्थानिक अधिकारी पाहत होता. त्यांनी सर्व मुर्ती आपल्या बंगल्यावर लपवून सुरक्षित ठेवल्या.

श्री देवकीकृष्णाचे सध्याचे भव्य दिव्य आकर्षक मंदिर इ.स.1832  साली बांधून श्री देवकीकृष्णाची प्रतिष्ठापना केली असे मंदिरात असलेल्या शिलालेखावरून स्पष्ठ होते. सध्या माता देवकीची मुर्ती हिरे, सोने चांदीच्या दागिन्याने मढविलेली आहे. तिचे दर्शन घेतल्यास मन प्रसन्न वाटते.

👉 गोव्यातील प्रसिद्ध इतिहासकार अनंत धुमे म्हणतात की पोर्तुगीजांनी गोवा प्रांतावर सत्ता प्रस्थापित केल्यानंतर  वास्को-द- गामा यांची व्हाईसरॉय म्हणून नेमणूक झाली. एकदा त्यांनी आपल्या अधिकाऱ्यांसोबत चोडन बेटाला भेट दिली. भेटीच्या दरम्यान फेरफटका मारताना त्यांना श्री देवकी कृष्णाचे मंदिर दिसले आणि त्यांना मुख्य प्रवेशद्वारातून गाभाऱ्यातील देवकी कृष्णची मुर्ती त्यांना  हुबेहूब मदर मेरी आपल्या डाव्या कडेवर इंफॅन्ट (बाळ) येशू ख्रिस्त ला घेऊन उभी आहे. त्यांनी मागचा पुढचा विचार न करता त्वरीत देवीला सॅल्यूट केला आणि  नंतर दोन्हीं गुडघे टेकून देवीला नमस्कार केला. हा प्रकार पाहून चकित झालेले पोर्तुगीज अधिकाऱ्यांनी नंतर वास्को- द- गामा यांना सांगितले की देवळातील ती मूर्ती 'मदर मेरी'ची नसून ती  श्री देवकीकृष्णाची मूर्ती आहे. त्यावेळी वास्को-द-गामा यांना आपण हिंदू दैवते समोर नतमस्तक झालो याचा राग आला.

👉महाभारतात उल्लेख केल्या प्रमाणे माता देवकीचा आठवा पुत्र मथुरेचा राजा कंस चा वध करेल. या भविष्य वाणीने भयभीत झालेल्या कंसाने आपली बहीण देवकी आणि तिचे पती वासुदेव यांना आपल्या नजर कैदेत ठेवले होते. जेव्हा देवकीला आठवा पुत्र जन्मला आला तेव्हा तिने आपला पुत्र श्रीकृष्ण गोकुळातील माता यशोदाच्या स्वाधीन केले आणि त्याचवेळी माता यशोदाच्या पोटी जन्माला आलेली कन्या देवकीने आपल्या ताब्यात घेतली. येथे गोकुळात माता यशोदाने श्रीकृष्णाला आपल्या पोटच्या मुलाप्रमाणे वाढविले.

👉या घटनेला खूप वर्ष झाली. गोमाचाल पर्वतावर झालेल्या एका युद्धा नंतर जेव्हा श्रीकृष्णला आपली जन्मदाती माता देवकी हिची भेट झाली, तेव्हा तिने आपल्या पुत्राला ओळखलच नाही. 

म्हणतात ना 
"भगवान तेरी लीला अपरमपार" - या प्रमाणे श्रीकृष्णाने माता देवकीच्या पोटी नुकतेच जन्माला आलेल्या बाळाचे रूप धारण केले. देवकीने त्वरित आपल्या बाळाला 
ओळखले आणि पाणावलेल्या डोळ्याने अत्यंत आनंदित होऊन धावत जाऊन आपल्या बाळाला कडेवर घेतले. तीच ही मूर्ती माशेल येथील देवळात आहे.

🙏 जय श्रीकृष्ण 🙏🏽

----------------------------------------------

पुणे विद्यापीठातील हे वैदिक घड्याळ -

◆ 1:00 वाजण्याच्या स्थानावर ब्रह्म लिहिलेले आहे, ज्याचा अर्थ हा आहे की ब्रह्म एकच आहे.
एको ब्रह्म द्वितीयो नास्ति
◆ 2:00 वाजण्याच्या स्थानावर अश्विनौ लिहिलेले आहे, ज्याचे तात्पर्य हे आहे की
 अश्विनी कुमार दोन आहेत.
◆ 3:00 वाजण्याच्या स्थानावर त्रिगुणा: लिहिलेले आहे,ज्याचे तात्पर्य हे आहे की गुण तीन प्रकारचे आहेत.
सत्वगूण, रजोगूण आणि तमोगूण.
◆ 4:00 वाजण्याच्या स्थानावर चतुर्वेदा: लिहिलेले आहे, तात्पर्य हे की वेद चार  आहेत.
ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद।
◆ 5:00 वाजण्याच्या स्थानावर पंचप्राणा: लिहिलेले आहे,ज्याचे तात्पर्य हे की प्राण पांच प्रकारचे आहेत.
अपान, समान, प्राण, उदान आणि व्यान.
◆ 6:00 वाजण्याच्या स्थानावर षड्र्सा: लिहिलेले आहे,याचा अर्थ असा की रस 6 प्रकारचे आहेत.
मधुर, अमल, लवण, कटु, तिक्त आणि कसाय.
◆ 7:00 वाजण्याच्या स्थानावर सप्तर्षय: लिहिलेले आहे,याचे तात्पर्य हे की सप्त ऋषि  आहेत.
कश्यप, अत्रि, भारद्वाज, विश्वामित्र, गौतम, जमदग्नि आणि वशिष्ठ.
◆ 8:00 वाजण्याच्या स्थानावर अष्टसिद्धिय: लिहिलेले आहे, याचे तात्पर्य हे की सिद्धि आठ प्रकारच्या आहेत.
अणिमा, महिमा, लघिमा, गरिमा, प्राप्ति, प्राकाम्य, इशित्व आणि वशित्व.
◆ 9:00 वाजण्याच्या स्थानावर नवद्रव्याणि अभियान लिहिले आहे याचे तात्पर्य हे की 9 प्रकारच्या निधी आहेत.
पद्म, महापद्म, नील, शंख, मुकुंद, नंद, मकर, कच्छप, आणि खर्व.
◆ 10:00 वाजण्याच्या स्थानावर दशदिशः लिहिले आहे, याचे तात्पर्य हे की दिशा 10 आहेत.
पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण, ईशान, नैऋत्य, वायव्य, आग्नेय, आकाश, आणि पाताळ.
◆ 11:00 वाजण्याच्या स्थानावर रुद्रा:लिहिले आहे,  तात्पर्य हे की रुद्र 11  आहेत.
कपाली, पिंगल, भीम, विरुपाक्ष, विलोहित, शास्ता, अजपाद, अहिर्बुध्न्य, शम्भु, चण्ड आणि भव.
◆ 12:00 वाजण्याच्या स्थानावर आदित्या: लिहिलेले आहे, ज्याचा अर्थ हा आहे की सूर्य 12 आहेत.
अंशुमान, आर्यमन, इंद्र, त्वष्टा, धातु, पर्जन्य, पूषा, भग, मित्र, वरुण, विवस्वान आणि विष्णु.





No comments:

Post a Comment

  १. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...