Showing posts with label संग्राह्य लेख. Show all posts
Showing posts with label संग्राह्य लेख. Show all posts

Wednesday, February 8, 2023

 संविधान असे काय कमजोर झाले आहे की ते आम्हांला वाटते बचाव करावे...?


संविधान कमजोर हे १९५१ रोजीच कमजोर झाले.

म्हणून कदाचित संविधान बचाव करणारे म्हणतं असतील जे पूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला जी घटना दिली ती लागू करा...!

कसं आहे सकारात्मक विचार केला पाहिजे.

जे म्हणतात संविधान बचाव त्यांना हेच सांगायचे असते की संविधान आत कमजोर झाले आहे.

बरं नेमकं संविधानात काय कमजोरी मागील १० वर्षात झाली हे समजून सांगेल का..?

तुम्हांला जर समजून सांगता येत नसेल तर मी तुम्हांला सांगतो भंपक लोकशाहीच्या गोष्टी करणारे १८ जून १९५१ पासून संविधान कोणी कसे कमजोर केले.

आपली दुकानं चालू ठेवण्यासाठी जनतेला मुर्ख काढणारे हजारो तयार झाले

लक्षात असू द्या जो चिकित्सक अभ्यास करतो तो विषयांचा मुळावर घाव घालतो.

मलमपट्टी पोळी भाजून घेण्यासाठी काम करत नाही.


#भारतीयसंविधानएक_मायाजाल
व्हीप जारी करून बनवलेले नेहरु लिखित संविधान
काही लोक डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान समजून डोक्यावर घेऊन नाचत आहेत. स्वतःचीच फसवणूक करून घेत आहेत.

कारण संविधान सभे अंतर्गत मसुदा समितीची स्थापना संविधान लिहिण्यासाठी झाली नव्हती.

संविधान सभेचे सल्लागार बी एन राव यांनी बनवलेल्या मसुद्याची छाननी करण्यासाठी मसुदा समितीची स्थापना करण्यात आली होती.- पुराव्यासाठी संविधान सभेचा २९ ऑगस्ट,१९४७ चा ठराव पहा:-
"to scrutinise the draft of the text of the Constitution of India prepared by the Constitutional Adviser giving effect to the decisions taken already in the Assembly and including all matters which are ancillary thereto or which have to be provided in such a Constitution, and to submit to the Assembly for consideration the text of the draft Constitution as revised by the Committee".

यावरून हे सिद्ध होते की डॉ बाबासाहेब आंबेडकरांना संविधान सभे अंतर्गत मसुदा समिती मध्ये विचार स्वातंत्र्य दिले गेले नव्हते.

या बाबतीत संविधान सभेतील काँग्रेसचे सदस्य प्रा. सिब्बन लाल सक्सेना यांनी १९ नोव्हेंबर,१९४९ रोजी आपल्या पक्षाची पोल खोल संविधान सभेतच केली आहे. ते म्हणतात
#भारतीयसंविधानसभाकेवळदिखाव्यासाठीहोती
संविधान सभेत भारतीय संविधान बनवले गेले नसून काँग्रेस पार्टीच्या बैठकीत बनवले गेले आहे. मसुदा समितीला विचार स्वातंत्र्य दिले गेले नव्हते, तिच्यावर काँग्रेस पार्टीने घेतलेले निर्णय बंधनकारक होते.दिखाव्या साठी बनवलेल्या गेलेल्या संविधान सभेत केवळ काँग्रेस पार्टीच्या बैठकात घेतले गेलेले निर्णय नोंदवले गेले.
#पुरावा:-
Under the procedure adopted, the Drafting Committee could not get the advantage of the free opinion of the whole House and decisions of the Congress Party alone became binding upon it. I personally feel that the constitution has very much suffered on this account. Out of about 10,000 amendments which appeared on the order paper from time to time during the course of the last one year, I think this House had opportunity for discussing hardly a few hundreds. The rest were all guillotined inside the Congress Party and were not moved in this House because the Party did not accept them.

●Congress Party meetings became meetings of the real Constituent Assembly, and this real Assembly became the mock Assembly where decisions arrived at the Congress Party meetings were registered.●

संविधान सभेची उप समिती असलेल्या मसुदा समितीचे एक सदस्य सईद मुहम्मद सादुल्ला
यांनी देखील २१ नोव्हेंबर,१९४९ रोजी संविधान सभेतच खुलासा करून असे सांगितले आहे की #मसुदासमितीस्वतंत्रएजन्सीनव्हती.
सुरुवातीपासूनच विविध पद्धती आणि परिस्थिती द्वारे तिला अपंग केली गेली होती.

डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी २ सप्टेंबर,१९५३ रोजी राज्यसभेत केलेल्या खुलाश्या प्रमाणे त्यांना जसे सांगण्यात आले, तसे त्यांनी त्यांच्या इच्छे विरोधात लिहिले. तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान नाकारले.

पुराव्या साठी राज्यसभेतील भाषणाचा भाग पहा:-
Dr B R Ambedkar:- Now. Sir. we have inherited a tradition. People always keep on saying to me: "Oh, you are the maker of the Constitution." My answer is I was a hack. What I was asked to do, I did much against my will.
(कॉलम:-८७४)

डॉ बाबासाहेब आंबेडकर आपल्या भाषणात पुढे असे नमूद करतात की:-
ब्रिटिशांच्या द्वेषापायी, लोकशाही बद्दल ज्या आपण प्रथा (विशिष्ट कल्पना) बनवल्या आहेत , त्या माझ्या मते कुठेही स्वीकारल्या गेलेल्या नाहीत. राज्यपालाला कोणतेच अधिकार नसले पाहिजेत. राज्यपाल हा केवळ रबर स्टॅम्प असला पाहिजे. अशी प्रथा आपण पाडली आहे. मंत्री कितीही नालायक (scoundrel) असू दे, किती ही भ्रष्टाचारी असू दे, जर त्याने राज्यपालां समोर प्रस्ताव ठेवला, तर तो राज्यपालांनी मंजूर केलाच पाहिजे.
या देशात आपण विकसित केलेल्या लोकशाही विषयीची ही संकल्पना आहे. असा धक्कादायक आणि स्पष्ट खुलासा डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी केला आहे.
DR. B. R. AMBEDKAR: But, Sir, we have
inherited, on account of our hatred of the
British, certain ideas about democracy which, it seems to me, are not universally accepted. We inherited the idea that the Governor must have no power at all, that he must only be a rubber stamp. If a Minister, however scoundrelly he may be, however corrupt he may be, if he puts up a proposal before the Governor, he has to ditto it. That is the kind of conception about democracy which we have developed in this country.
(कॉलम ८७५)

म्हणून हे सिद्ध होते की भारतीय तकलादू संविधानाचे खरे शिल्पकार पारतंत्र्यवीर नेहरू आहेत. डॉ बाबासाहेब आंबेडकर नाहीत. कारण स्वतः डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान नाकारले आहे.
पुराव्यासाठी राज्यसभेतील भाषणाचा भाग पहा:-
 Sir, my friends tell me that I have made
the Constitution. But I am quite prepared to say that I shall be the first person to burn it out. I do not want it. It does not suit anybody. But whatever that may be, if our people want to carry on, they must not forget that there are majorities and there are minorities, and they simply cannot ignore the minorities by saying, "Oh, no. To recognise you is to harm democracy." I should say that the greatest harm will come by injuring the  minorities.
(कॉलम:-८७७)

अधिक माहितीसाठी खालील संदर्भ सूची मधील सदस्यांची संविधान सभेतील भाषणे काळजी पूर्वक वाचावीत, अभ्यासावीत. अंधश्रद्धा दूर होतील.
#संदर्भ_सूची:-
संविधान सभेतील खालील सदस्यांची भाषणे
१) बिस्वनाथ दास
२)मुहम्मद सादुल्ला
३)मोहम्मद इस्माईल साहिब
४)दामोदर स्वरूप सेठ
५)मौलाना हसरत मोहानी
६)पॉकेर साहिब बहादूर
७)सरदार वल्लभभाई पटेल
८)के टी शहा
९)शिब्बान लाल सक्सेना
१०)गोपी कृष्णा विजयवर्गीय
११)सईद काझी करीमुद्दीन
१२)महोमद शेरीफ
१३)हुसेन इमाम
१४)राम नारायण सिंग
१५)मेहबूब अली बैग साहिब बहादूर
१६)के संथनाम
१७)लोकनाथ मिश्रा
१८)पंजाबराव देशमुख
१९)Rev. J J M Nichols रॉय
२०)दक्षयनी वेलयुधान
२१)Z H लारी
२२)कमलापती तिवारी
२३)लक्ष्मीनारायण साहू
२४)सरदार हुकूम सिंग
२५)एच वी कामत
२६)नंदकिशोर दास
२७)एन जी रंगा
२८)Algu Rai Shastri
२९) T J M Wilson
३०)अजित प्रसाद जैन


मयुर बाळकृष्ण बागुल

संविधान साक्षरता आंदोलन

Sunday, January 22, 2023

खर्च करताना काळजी घ्या.. पुढे मोठी मंदी.


*भारतात अघोषित आर्थिक संकट आहे. अशी संकटे हळूहळू जनतेसमोर दिसतात. मी विचार करतो की सद्यस्थिती ही केवळ संकटाची पहिलीच फेरी आहे.*

बँकांचे *एनपीए* वाढवणे म्हणजे. भांडवलाची कमतरता म्हणजे नवीन गुंतवणूक नाही. दिवाळखोरी कायद्याचे गौरव आणि कंपन्यांमध्ये सतत घोटाळे

*घरे* विकली जात नाहीत म्हणजे स्टील, सिमेंट, स्नानगृह फिटिंग्ज, बांधकाम घटणे. या बँकांसह एनपीए वाढू लागतील. हे एनपीए संकट अधिक सखोल करून वैयक्तिक पातळीवर जातात.

• *वाहन* विक्री कमी होत आहे. देशात सध्या प्रथमच दुचाकींच्या विक्रीत नकारात्मक वाढ दिसून येत आहे. मारुतीने उत्पादन 50% कमी केले आहे. बरेच वाहन विक्रेते बंद होत आहेत. याचा अर्थ स्टील, टायर आणि इतर सामानांसाठी मोठ्या प्रमाणात कपात करण्याची मागणी आहे.

वरील तीन गोष्टी म्हणजे कोट्यवधींच्या नोकरीचा शेवट आणि सरकारच्या कर महसुलात घट. अशा परिस्थितीत सरकार निराश होते आणि प्रत्येक वस्तूवर कर लावून आपले तोटा पूर्ण करू इच्छित आहे, सरकार नफा खासगी हातात देतो आणि तूट सरकारी खात्यात टाकते. अशा परिस्थितीत, सरकारी मालमत्ता त्यांच्या आवडत्या कॉर्पोरेटच्या अनेक पटींमध्ये विकल्या जातात आणि तोटा वाढतो.

*भारतातील संकट मार्च २०२० च्या सुमारास दिसून येईल* बहुतेक सरासरी भारतीयांना याबद्दल माहिती नाही. आपण साबण, शैम्पू आणि डिटर्जंट विकण्यास सक्षम नसताना काळजी घेण्याची वेळ आली आहे.

गेल्या काही वर्षांपासून, अगदी *एफएमसीजी क्षेत्र* देखील मंदीच्या चक्रात आहे. बाबा रामदेव यांच्या पतंजली कंपनीची जाहिरात तुम्ही अखेर कधी पाहिली होती ते आठवते काय? पतंजली सुमारे २ वर्षांपूर्वी टीव्हीवर सर्वाधिक सक्रिय होती. पण गेल्या एका वर्षापासून पतंजलीचीही स्थिती भारताच्या एफएमसीजी बाजारात सर्वात वेगवान वेगाने वाढली आहे. पतंजलीच्या उत्पादनांची विक्री कमी होत आहे. त्याशिवाय पतंजली आयुर्वेदात आर्थिक वर्ष २०१९ मध्ये १०% महसूल तूट दर्शविली आहे. पतंजलीच नव्हे तर हिंदुस्तान लिव्हरसारख्या कंपन्यादेखील वाढीस उतरल्या आहेत.

 ग्रामीण भागामध्ये साबण, टूथपेस्ट, हेअर ऑईल, बिस्किट इत्यादीसारख्या ग्राहकांच्या वस्तूंची विक्री जोरात कमी झाली आहे. यामुळे निरोगी ग्रामीण मागणीवर अवलंबून असलेल्या व्यवसायांची कामगिरीही कमी झाली आहे. यात एफएमसीजी, दुचाकी आणि ऑटो कंपन्या समाविष्ट आहेत जी एंट्री-लेव्हल कार बनवितात.

आता या वाहतुकीवर चला - इंडियन फाउंडेशन ऑफ ट्रान्सपोर्ट रिसर्च अँड ट्रेनिंगच्या अहवालानुसार नोव्हेंबर 2018 पासून ट्रक भाड्यात 15% घट नोंदली गेली आहे. तसेच फ्लीट यूटिलायझेशन त्यापेक्षा जास्त घसरले आहे. सर्व ट्रंक मार्ग, भाडे मोठ्या प्रमाणात खाली गेले आहेत. एप्रिल ते जून दरम्यान, फ्लीट यूटिलायझेशन मागील वर्षाच्या पहिल्या तिमाहीच्या तुलनेत 25% ते 30% कमी झाली आहे. यामुळे वाहतूकदारांचे उत्पन्नही सुमारे 30% कमी होते. पुढील तिमाहीत बरेच ऑपरेटर फ्लीटच्या ईएमआय डीफॉल्टमध्ये येऊ शकतात.

वाहतुकीच्या मागणीवर स्पष्ट परिणाम होत आहे कारण औद्योगिक उत्पादन घटले आहे. ट्रक वाहतुकीत सर्वाधिक योगदान देणार्‍या उत्पादन क्षेत्राची मागणी किमान स्तरावर आहे.

 शहरे आणि ग्रामीण भागातील ग्राहकांचा खर्च कमी झाला आहे आणि एप्रिलच्या सर्वोच्च मागणीनंतर शेतीमधील वाहतूक जवळजवळ सुस्त झाली आहे. जूनमध्ये एफएमसीजीकडून फळ आणि भाज्यांची मागणी 20% कमी झाली आहे.

फ्रेटची मागणी कमी झाल्यामुळे पहिल्या तिमाहीत ट्रकचा ताफा देशातील सर्व प्रमुख मार्गांवर 30% कमी झाला आहे.

*महत्वाचे. कृपया संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचा आणि आपली कठोर कमाई हुशारीने खर्च करा, जिथे आवश्यक आहे तिथे.*

NRC आणि CAB किंवा आता CAA मधील फरक लक्षात घ्या आणि ते का आणावे लागले ते ही समजून घ्या ... "सिटीजन अमेंडमेंट बील" हे म्हणजे मुख्यतः पाकिस्तान आणि बांग्लादेश येथील शोषित अल्पसंख्याक (हिंदू,जैन,बौद्ध,पारशी,ख्रिश्चन) ज्यातले काही ऑलरेडी भारतात आश्रीत म्हणूण आलेले आहेत त्यांना मानवता म्हणूण आत घेणे (नागरीकत्व देणे) बास.... मग आता यात इथल्या मुसलमानांना त्रास होण्याचं काही कारण आहे का ?? संबंध च काय ?? 


आता NRC कडे वळूयात ..." नैशनल रजिस्टर सिटीजन" हे बिल अजून यायचंय तर यायच्या आधीच उलट सूलट चर्चा करुन माथी भडकावून, गैरसमज पसरवून भितीचं वातावरण तयार केलं जातंय ....तर हे बिल म्हणजे जे रोहींग्यां ,बांग्लादेशी, पाकिस्तानी नागरिक घुसखोरी करुन अवैध भारतात राहतायेत त्यांना शोधून काढणे आणि त्याना परत पाठवणे (कारण त्यांना ऑलरेडी आपण त्यांचे देश दिलेले आहेत हा त्यामागचा विचार) ....आता परत यात इथले नागरिक असणारे वर्षानुवर्षे इकडे राहणारे मुसलमानांना त्रास होण्याचं काही कारण आहे का ?? इथेही काही संबंध नाही.

मग का पेटलंय इतकं सगळं ...का इतका विरोध केला जातोय, तर मित्रांनो या मागचं षडयंत्र समजून घ्या ...या देशात कायमच मुस्लिमांना एका ठराविक वर्गाची (पक्षाची) भिती दाखवून त्यांची मतं घेतली गेलीयेत ...आम्ही सत्तेत आहोत म्हणूण तुम्ही सुरक्षित आहात हीच सत्ता जर उद्या भाजपच्या हाती गेली तर तुमचं काही खरं नाही ...ते तुम्हाला या देशाबाहेर हाकलणार अशी सतत एक हैमरिंग वारंवार केली गेलीय, मानसिकता बनवली गेलीये आणि म्हणूणच आज कुठे जरा जरी खुट्ट झालं की लगेच बोंबाबोंब होते ...जे काय होतंय ते सगळं आमच्या च विरोधात चालू आहे अशी एक भावना मुस्लिम समाजाच्या मनात निर्माण होते ...

अर्थात मुस्लिम समाज ही काही इतका दुधखुळा नक्कीच नाही की कुणी घाबरवावे आणि यांनी घाबरावे ...ह्या भिती मागे त्यांची स्वतःची देखील एक मानसिकता आहे (१००% म्हणत नाही मी पण आहेत बहुतांश) त्यांनी कधी हा देश आपला मनापासून मानलाच नाही सतत पाकिस्तान चा पुळका ..मग इकडे राहुनही इथल्या मातीशी एकरुप न होता मिळून मिसळून न राहता हा 'काफिर' तो 'मुश्रीक' असं ह्यांचं वागणं ...म्हणूण मग अश्यांना भिती वाटणं ही सहाजिकच आहे.

पण मित्रांनो माझ्या सारख्या हिंदुस्थानी मुसलमानाच्या मनात किंचित ही भिती नाही ...आणि भिती असावी तरी का ?? कारण मला माहीतये माझ्यावर येणारं संकंट आधी स्वतः वर झेलणारी वेळप्रसंगी जीवाला जीव देणारी माझी मराठा, ब्राह्मण, शिख, जैन,मारवाडी, दलित मित्र माझ्या साठी उभे ठाकतील...माझ्या हक्का साठी आवाज उठवतिल ...मला उचलून कुणीही देशाबाहेर काढेल तेव्हा माझे हे मित्र गप्प बसतील का ?? कधीच नाही ...मग मी का घाबरु ?? का कुणाच्या ही सांगण्यावरुन ,भडकावण्यावरुन माझ्या च देशाच्या संसाधनांचं नुकसान करु ?? 

इतका मुर्ख मी नक्कीच नाही .... 

एक उदाहरण देतो ...शाळेत दहावी ला असतांना मी शाळेतल्या क्रिकेट संघात होतो पण काही कारणास्तव मला संघातून ऐनवेळी काढून टाकण्यात आले ...त्या घटनेवरुन माझ्या वर्गातील इतर मित्र भडकली त्यांनी एकाच दिवसात एक दुसरा संघ तयार केला मला कैप्टन बनवलं आणि घोषित केलं की आधीचा संघ आणि आता बनवलेला संघ यात एक सामना होईल आणि जो जिंकेल तो टोर्नामेंट खेळेल....सगळ्यांचीच तंतरली ऐनवेळी जर का हरलो तर अख्खा संघच बाद व्हायचा त्या पेक्षा इमरान ला च परत संघात घ्या असं ठरलं ....आता बाकीच्यांनी माझ्या साठी संघ तयार केला आणि आता मी यांना सोडून कसा जाऊ असा प्रश्न माझ्या मनात निर्माण झाला ...तेव्हा ते ओळखून माझे ते मित्र मला म्हणाले इमरान वेडा आहेस का तु फक्त तुझ्या साठी (तुझ्या वर अन्याय झाला म्हणूण) आम्ही हे सगळं केलं आम्हाला खेळायचं नव्हतंच ...तु जा आणि खेळ आम्ही आहोत तुझ्या पाठीशी ....मग काय दहा हत्तींचं बळंच जणू माझ्या अंगात आलं ...ती टोर्नामेंट तर आम्ही जिंकलोच पण फायनल मैच मधे मी "मैन ऑफ द मैच" होतो.

जे मित्र मला साध्या शाळेतल्या संघाबाहेर जाऊ देत नाहीत(कुणी मला संघातनं काढलेलं त्यांना सहन होत नाही) ते मला जर उद्या कुणी ह्या देशाबाहेर काढू पाहत असेल तर गप्प बसतिल का ??? 😊

इतका विषय साधा आहे मित्रांनो ....उगाच पराचा कावळा केला जातोय आणि तुम्ही बळी पडताय ...या मातीत डोकं टेकवता तुम्ही पाच वेळेस हीच माती डोक्याला लावा आणि निर्धास्त रहा ...कारण भित्यापोटी ब्रम्ह राक्षस असतो हे ध्यानात ठेवा ....तुमच्या याच भितीचा फायदा उचलण्यासाठी टपून बसलेत काही जणं ...जाळपोळ, तोडफोड करायला तुम्हाला पुढे करणार आणि आपण मागून तमाशा बघणार ... कारण तुमच्या टोप्या आणि तुमच्या वेषभूषेवरनं तुम्ही पटकन ओळखू येताय .... सगळा देश बघतोय तुम्ही काय करताय ते.

एकीकडे लाखोंच्या संख्येने आपल्या हक्कासाठी रस्त्यावर उतरलेला मराठा समाज बघा आणि दुसरीकडे तुम्ही करत असलेले हे भयानक चित्र बघा, काय मेसेज जातोय समाजात ??

छत्रपती शिवाजी महाराजांचे संस्कार नसांनसांत भिणलेला मराठा समाज पानाच्या देठालाही धक्का लावत नाही आणि तुम्ही बसं जाळता?? रेल्वे जाळता ??? पोलिसांवर दगडफेक करता ?? 😢😢

खुपच दुखःद आहे हे ....वेळीच सावरा, कुणाच्या हातचं खेळणं बनू नका,बाकी कुणी करो न करो तुमच्या मनातली ही अनाहुत भितीच तुमचं फार मोठं नुकसान करणार आहे भविष्यात ....म्हणूण अजून वेळ गेलेली नाही परत फिरा

आणि अभिमानाने म्हणा होय आम्ही "हिंदुस्थानी मुस्लिम आहोत" हे आमचं घर आहे आणि निर्धास्त रहा तुमच्या घरातनं तुम्हाला कोणीही काढणार नाहीये.

मी "शेख इमरान" एक हिंदुस्थानी मुस्लिम निर्धास्त, बिंधास्त माझं आयुष्य या देशात जगतोय आणि जगेन ...आणि ज्या देशात महाराष्ट्रातील एका छोट्याश्या खेड्यात माझे पणजोबा "अहमद शेख" (भाई मास्तर) आणि "नानासाहेब पाटील" यांच्या मैत्रीच्या आज ही शपथा खाल्ल्या जातात (ते जाऊन बराच काळ लोटल्यानंतर ही ) त्या देशात माझ्या व माझ्या परिवाराच्या केसालाही धक्का लागणार नाही याची मला पुर्ण खात्री आहे किंबहुना तशी तिळमात्र ही शंका माझ्या मनात नाहीये 😊👍👍

#जय_हिंद_जय_भारत 

🙏🙏🙏

-इमरान शेख

Friday, January 20, 2023

लोकमान्य टिळक आणि रायगडावरील शिवसमाधी

रायगडावरील शिवाजी महाराजांच्या समाधी स्मारक जीर्णोद्धार व मेघडंबरी निर्मितीच्या संदर्भात राज ठाकरे यांनी ‘‘लोकमान्य टिळक यांनी रायगडावरील सध्याच्या शिवस्मारकाची निर्मिती केली आहे’’ असे विधान केले. त्यावर टीका करीत असताना इंद्रजीत सावंत आणि जितेंद्र आव्हाड यांनी ‘‘लोकमान्य टिळकांचा या समाधी स्मारकाच्या निर्मितीशी काहीही संबंध नाही'' असे सांगून त्यांच्या कार्यावर अन्याय करण्याचा प्रयत्न केला आहे. त्या संदर्भात लोकमान्य टिळकांनी स्थापन केलेल्या श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाच्या वतीने खालील निवेदन आपल्या माहितीसाठी देत आहोत. कृपया त्याची नोंद घेऊन योग्य ती प्रसिद्धी द्यावी ही विनंती.

१२७ वर्षांपूर्वी म्हणजेच १८९५ मध्ये लोकमान्य टिळक आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाची स्थापना केली. याच मंडळाच्या माध्यमातून रायगडावरील शिवसमाधीचा जीर्णोद्धार करण्यात आला. टिळकांचे या मंडळाच्या स्थापनेमागचे उद्देश रायगडावरील समाधीचा जीर्णोध्दार, शिवजन्मोत्सव, शिवपुण्यतिथी तसेच शिवचरित्राचा प्रचार, प्रसार करणे असे होते.
 सन १८१८ मध्ये ब्रिटिशांनी रायगड किल्ला जिंकल्यानंतर जाणीवपूर्वक रायगडावरच्या वास्तूंचा विध्वंस केला. तसेच सामान्य लोकांना रायगडावर जाण्यास मनाई केली. शिवतीर्थ रायगडाच्या दर्शनाने येथील जनतेमध्ये देशभक्तीची भावना निर्माण होऊ शकते व इंग्रजी राज्याविरुध्द उठाव होऊ शकतो हा धोका टाळण्यासाठीच त्यांनी असे केले होते.
     सन १८८३ साली जेम्स डग्लस नावाचा एक इतिहासप्रेमी इंग्रज शिवचरित्र वाचून जिज्ञासेपोटी गडावर गेला. शिवाजी महाराजांच्या समाधीच्या दुरावस्थेविषयी त्याने आपल्या 'बुक ऑफ बॉम्बे' या पुस्तकात ब्रिटिश सरकारवर टीका केली. डग्लसचे हे वर्णन वाचून त्यावेळच्या मराठी माणसाच्या मनात अस्वस्थता पसरली. त्याचा परिणाम म्हणून सन १८८५ साली लोकमान्य टिळक यांच्या पुढाकारातून, न्यायमूर्ती रानडे, रावबहादुर जोशी, न्यायमूर्ती तेलंग, न्यायमूर्ती कुंटे इत्यादी तत्कालीन समाजधुरिणांनी पुण्यातील हिराबागेत एका सभेचे आयोजन केले. त्यात समाधी जीर्णोध्दारासाठी एका समितीची स्थापना करण्यात आली तसेच रायगड आणि समाधीच्या दुरावस्थेविषयी ब्रिटिश सरकारकडे एक निवेदन पाठविण्यात आले. त्याचा परिणाम ब्रिटिश सरकारने सालाना फक्त ५ रुपये नेमणूक केली. पुढे ३० मे १८९५ रोजी लोकमान्य टिळकांनी पुण्याच्या हिराबागेत पुन्हा एकदा भव्य सभेचे आयोजन केले. या सभेला श्रीमंत श्रीनिवासराव पंतप्रतिनिधी, सेनापती दाभाडे, बापूसाहेब कुरूंदवाडकर, सरदार पोतनीस इ. नामवंत मंडळी उपस्थित होती. या सभेमध्ये लोकमान्य टिळकांनी शिवरायांच्या रायगडावरील समाधीच्या जीर्णोध्दाराची भावी योजना मांडून त्यासाठी निधी देण्याचे आवाहन केले. या कार्यासाठी एका मंडळाची स्थापना झाली. तेच हे 'श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ' होय. श्री. दाजी आबाजी खरे यांची मंडळाचे अध्यक्ष म्हणून व लोकमान्य टिळकांची चिटणीस म्हणून नेमणूक करण्यात आली.
 लोकमान्य टिळकांनी 'केसरी', 'मराठा'च्या माध्यमातून समाधीच्या जीर्णोद्धारासाठी देणग्यांचे आवाहन केले. या सगळ्या कार्याकडे लक्ष वेधणे व जनजागृती करण्यासाठी लोकमान्य टिळकांनी रायगडावर शिवजन्मोत्सव व पुण्यतिथी सोहळा करण्याची योजना आखली. टिळकांच्या उपस्थितीत दि. २४ व २५ एप्रिल १८९६ असे दोन दिवस रायगडावरील पहिला शिवजन्मोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा झाला.
 रायगडाचा ताबा ब्रिटिश सरकारकडे असल्याने लोकमान्य टिळकांनी मंडळाच्या वतीने शिवस्मारकाच्या जीर्णोध्दाराची परवानगी मागितली. परंतु ब्रिटिश सरकारने ती नाकारली. तेव्हा लोकमान्य टिळक आणि दाजी आबाजी खरे यांनी १९०६ साली ब्रिटिश गव्हर्नर लॉर्ड लॅमिंग्टनकडे एक निषेध पत्र पाठवून त्यात सुनावले की, ''शिवाजीराजांच्या प्रती आम्हां सर्व प्रजेला सार्थ अभिमान आहे. राजांच्या स्मारकाची दुर्दशा झाली आहे. त्या राजाला शोभेल अशी स्मारकाची जीर्णोध्दारीत समाधीची वास्तू उभी करण्याचा संकल्प मंडळाने योजला आहे याला मान्यता देणे आपणास भाग आहे.''
 लोकमान्य टिळकांच्या आवाहनातून अनेक शिवभक्तांनी उदार हस्ताने समाधी जीर्णोद्धार कार्यासाठी दिलेला निधी श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाने डेक्कन बँकेमध्ये साठविला होता. दुर्दैवाने ही डेक्कन बँक १९१३ साली बुडीत निघाली. त्याविरुद्ध टिळक आणि खरे यांनी पुणे फर्स्टक्लास कोर्टात दावा दाखल करून व्याजासह रु. ३३,९११/- किंमतीचे हुकुमनामे मिळविले. परंतु त्याची अंमलबजावणी सुरु होण्यापूर्वी बँक लिक्विडेशनमध्ये निघाली. त्यामुळे मंडळाच्या या कार्याचे फार नुकसान झाले.
 लोकमान्य टिळकांनी डगमगून न जाता पुनश्च हरी ओम म्हणत निधी जमविण्याच्या कार्याला सुरुवात केली व तब्बल बारा हजार रुपयांचा निधी जमा केला. याचबरोबर टिळक ब्रिटिश सरकारकडे समाधीच्या जीर्णोद्धाराची परवानगी मिळविण्यासाठी अथक प्रयत्न करीत होते. दरम्यान लोकमान्य टिळकांचे १९२० साली दुखद निधन झाले. टिळकांच्या पश्चात हा संघर्ष चालूच राहिला. लोकमान्यांनी सुरु केलेल्या या संघर्षाला ३० वर्षानंतर यश प्राप्त झाले. त्यावेळचे श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाचे सचिव न. चि. केळकर यांना जीर्णोद्धाराची परवानगी देणे ब्रिटीश सरकारला भाग पडले. टिळकांच्या निधनानंतर ५ वर्षांनी म्हणजेच ६ फेब्रुवारी १९२५ला ब्रिटिश सरकारने समाधीच्या जीर्णोद्धाराची परवानगी दिली.
 ब्रिटिश सरकारने श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाला समाधी जीर्णोद्धाराच्या परवानगीसाठी ६ फेब्रुवारी १९२५ रोजी Duggan E. M. (under Secretary to Government) यांच्या सहीने G. R. No. 7023 पारित केला होता. तो आपल्या संदर्भासाठी सोबत जोडत आहोत.
 श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाचे रु. १२ हजार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे रु. ५ हजार आणि पुरातत्त्व विभागाचे रु. २,०४३/- असे १९,०४३/- रुपये एकत्रित निधीतून समाधीच्या जीर्णोद्धारास सुरुवात झाली.
रत्नागिरीच्या पब्लिक वर्क्स डिपार्टमेंटच्या वतीने व रायगड मंडळाच्या देखरेखीने प्लॅन तयार करून कामाला सुरूवात झाली.
 श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाने सादर केलेल्या आराखड्याप्रमाणे मंडळाच्या देखरेखीखाली पब्लिक वर्क्स डिपार्टमेंट, रत्नागिरी विभागाच्या माध्यमातून सन १९२६ साली आज आपण पाहतो ती शिवाजी महाराजांची जीर्णोध्दारीत समाधीची वास्तू उभी राहिली. समाधीचे बांधकाम कंत्राटदार सुळे यांनी केले तर त्यावरील शिल्प प्रसिद्ध शिल्पकार विनायकराव करमरकर यांनी तयार केले. समाधीचा लोकार्पण सोहळा ३ एप्रिल १९२६ रोजी शिवपुण्यतिथी दिनी पार पडला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून नागपूरकर राजे श्रीमंत लक्ष्मणराव भोसले, मंडळाचे अध्यक्ष सीतारामपंत टिळक, चिटणीस न. चि. केळकर, डॉ. बा. शि. मुंजे इ. मान्यवर उपस्थित होते.
 समाधी निर्मितीचा अहवाल सर्व पुराव्यांनिशी महाराष्ट्र सरकारने १९७४ साली (Shivaji Memorials The British Attitude, A.D. 1885-1926) या ग्रंथात प्रसिध्द केला आहे. त्याचे संकलन तत्कालीन पुरातत्व आणि पुराभिलेखागार संचालक व्ही. जी. खोबरेकर यांनी केले आहे.
 लोकमान्य टिळकांनी स्थापन केलेल्या श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाच्या माध्यमातून गेली १२७ वर्षे रायगडावर शिवपुण्यतिथीचा सोहळा पार पडत आहे. तसेच रायगड किल्याच्या जतन आणि संवर्धनासाठी वेगवेगळ्या योजना राबविल्या जात आहेत.
 ज्या लोकमान्य टिळकांनी रायगडावरील शिवसमाधीच्या जीर्णोद्धाराचा ध्यास घेऊन आयुष्यभर कार्य केले तसेच शिवजन्मोत्सवाच्या माध्यमातून भारतीयांना स्वातंत्र्यासाठी संघर्षाची प्रेरणा दिली त्या लोकमान्यांवर जातीय द्वेषातून आरोप करून त्यांचे श्रेय नाकारणे यासारखे दुर्दैव दुसरे नाही!
संदर्भ :
१) Shivaji Memorials The British Attitude, A.D. 1885-1926, Editor : V. G. Khobrekar, Director of Archives & Archaeology published by Maharashtra State Government 1974.
२) ब्रिटिश सरकारने श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाला समाधी जीर्णोद्धाराच्या परवानगीसाठी ६ फेब्रुवारी १९२५ रोजी Duggan E. M. (under Secretary to Government) यांच्या सहीने पारित केलेला G. R. No. 7023.
सुधीर थोरात जगदीश कदम 
कार्यवाह माजी अध्यक्ष       

पांडुरंग बलकवडे रघुजीराजे आंग्रे
सरकार्यवाह अध्यक्ष
श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ

..अवध्य मी...



              🙏🌺 ||...अवध्य मी...|| 🌺🙏
        
          शिवसेनेची अज्ञानी आयात खासदार प्रियंका चतुर्वेदीने संसदेत " माफी मागायला मी सावरकर नाही.." हे वाक्य उच्चारले आणि त्या क्षणीच संसदेत.. महाराष्ट्रात.. देशात ह्या वाह्यात बाईने बाळासाहेबांच्या हिंदुत्ववादी शिवसेनेच्या पुण्याईचं जाहीर वस्त्रहरण केलं..! त्याच क्षणी शिवसेनेची आन-बान-शान शरमिंदा झाली..! निस्वार्थ, निर्भिड, निस्सीम अशा एका हिंदुहृदयसम्राटाच्या निष्कलंक चारित्र्याचा.. तेजस्वी, तडफदार अशा दुसर्‍या हिंदुहृदयसम्राटाच्या अनुयायाने निष्कारण केवळ आकसापायी अवमान केला आणि इथेच शिवसेनेची अखेरची घरघर सुरु झाली..! पूर्वी शिवसेनेचे नेते, खासदार, आमदार, नगरसेवकच नव्हे तर प्रत्येक शिवसैनिक हा "वाघ" आहे ही ओळख द्यायला लागत नव्हती..! पण दुर्दैवाने आज हे कोकलून सांगावं लागतंय..! बाळासाहेबांचा कट्टर, कडवा शिवसैनिक आज खासदार असता तर सावरकरांचा असा अवमान त्याने केलाच नसता..! आणि व्हायला पण दिला नसता..!   

          उठसूठ दुसऱ्यांवर टीका टिप्पणी करणारे शिवसेनेचे वाचाळ बोरुबहाद्दर तथा साक्षात् पक्षप्रमुखांनी या घटनेचा एका शब्दाने निषेध न केल्याने.. वा दिलगिरी व्यक्त न केल्यामुळे इथेच शिवसेनेने नैतिक अधःपतनाचा तळ गाठला..! आज बाळासाहेब हयात असते तर सर्वप्रथम पक्षप्रमुख नात्याने त्या बिनडोक महिलेची पक्षातून तात्काळ हाकालपट्टी केली असती.. चिरंजीवांची कानउघाडणी केलीच असती आणि त्याच क्षणी खरा "माफीवीर" कोण..? "नेहरु" की "सावरकर" हे दस्तावेजांसह सप्रमाण दाखवुन दिलं असतं..! एका बाजूला वाचन, अभ्यास, जाणिवा, नेणिवा, आदर्श तर दुसऱ्या बाजूला "उचलली जीभ.. लावली टाळ्याला" असा उध्दट, उथळ, उसळता प्रकार..! आणि हाच मुख्य फरक आहे "शिवसेना प्रमुख" आणि "पक्ष प्रमुख" ह्या दोघां बापलेकातला ..! एक "विभूती".. तर दुसरी "अधोगती"..! गेली दोन वर्षे त्याचीच प्रचिती महाराष्ट्राला आणि देशाला येत आहे..! मोर नाचला म्हणुन लांडोर नाचून कसं चालेल..?

          पंचेचाळीस वर्षांचे गांधी 1915 साली दक्षिण अफ्रिकेत दोन दशकांहून अधिक काळ राहुन जेंव्हा भारतात आले.. त्या आधी चार वर्षे अठ्ठावीस वर्षांचा एक क्रांतिकारी तरुण अंदमानच्या काळ कोठडीत बंद होता..! बैलाऐवजी त्याला घाण्याला जुंपुन इंग्रज त्याच्याकडून कोणाचं तेल काढुन घेत होते..! काथ्थ्या कुटून घेत होते..! झाडांच्या साली कुटून घेत होते..! स्वातंत्र्य समरयज्ञाची धगधग जिवंत ठेवण्यासाठी.. तथा त्यात इंग्रजांची आहुती देण्यासाठी सुटकेच्या संधीचा प्रयत्न करत होता..! स्वातंत्र्य यज्ञात 
सर्वस्वाची आहुती दिलेल्या त्या निरामय चैतन्याला तुम्ही संधीसाधू सौदागर "माफीवीर" ठरवता..?

          पु.ल. म्हणतात.. " विज्ञान महर्षी असल्यामुळेच खरा विज्ञाननिष्ठ मानवतावाद सांगणारा, आचरणात आणणारा.. सर्व धर्मातील अंधश्रद्धेवर टीका करणारा.. धर्मवेडे नांगी ठेवणारा हा सुधारक काँग्रेस प्रमाणेच सनातनी हिंदूंना पचवणे कठीण आहे..! "

         साहित्य संमेलनात आपल्याच माणसांनी सावरकरांचा केलेला अपमान न रुचल्याने शरद पवारांनी " स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या योगदानाबद्दल चर्चा होऊच शकत नाही..! " अशा मोजक्या शब्दांत फटकार निषेधासह तीव्र नाराजी व्यक्त केली..! हीच सडेतोड भूमिका पक्ष प्रमुखांकडुन महाराष्ट्राला, देशाला अपेक्षित होती..! शिवसेनेत आयात केलेल्या नादान नंदीबैलांना तुम्ही वाघाचं कातडं सहज पांघराल हो..! पण त्यांच्या धमन्यांतून वाहणारं पूर्वाश्रमीचं नासकं, सडकं रक्त कसं बदलणार..? बुध्दिचा गंध आणि अकलेचा अंश नसलेल्या " प्रियंका " ह्या नावातच सर्व काही आलं..! एवढं मात्र निश्चित की शिवसेनेच्या आयात केलेल्या ह्या निर्बुद्ध महिला खासदाराने आपल्या अकलेचे तारे तोडुन राहुल गांधींना "प्रियंका" नावाची आणखी एक बालिश बहिण आहे हे दाखवुन दिलंच.. आणि त्याचवेळी शिवसेनेला अनेक योजने बॅकफूटवर फेकून दिलं..! 

          जो प्रदीप्त सूर्य करोडोंच्या मनामनात तळपतोयं, तेजाळतोयं.. ज्याच्या माध्यान्हीच्या तेजस्वी तेजाची दाहक प्रखरता आणि ज्याच्या सर्वस्वाच्या समर्पणाचं अर्घ्य साऱ्या जगाने पाहिलंय.. वाचलंय.. अनुभवलंय.. मान्य केलंय त्या अवध्य तेजोनिधी सूर्यावर तुम्ही कितीदा थुंकणार..? 

          " गलतके साथ गलत करनेवाला गलत नहीं होता..!" असं भगवद् गीता म्हणते..! तेंव्हा " माफीवीर कोण..? " आणि " माथेफिरु कोण.? " याचा निवाडा सव्वाशे करोड जनतेला करायला सांगा..! आहे हिंमत..?         
                                                                                           
 - अनंत सामंत                                                    
स्तंभलेखक पत्रकार                                                                       
वसई.

गाव !

 गाव काळीज आहे अन् प्रत्येकजण त्या काळजातलं गाणं ! माणूसकीच्या झऱ्याच्या ओलसर संगीतावर इथले पाखरं,झाडं,पिकं साथ देतात.इथली माती ओंजळीत भरून न्यावी दूर शहरात तरी तिथे एकटं वाटत नाही.गाव घर आहे जिथे मन कायम रेंगाळतं.लोकल गर्दीत लोंबकळत असतानाही करकटकच्या एका टोकासारखं पाय रोवून मन गावातून निघत नसेल.घर गावात असतं तसं गाव नावाचं एक घर मनात वसलेलं असतच असतं.आपली माती आपली माणसं ! कितीही दूर असली तरी याच माणसांसाठी जगायचं अन् शेवटी याच माणसात मरण्याचं स्वप्न उराशी बाळगायचं.गाव म्हणजे बालपण ,गाव म्हणजे आठवण ,गाव म्हणजेच अस्तित्वही ! प्रत्येक माणूस मनाने कुण्यातरी गावात असतोच,कुण्यातरी गावचा असतोच.गाव ही तशी आपल्या आत्म्याची ओळख,खूप खोलवर रूतून बसलेला मोरपंखी स्पर्श म्हणजे गाव ! गाव म्हणजे प्रियशी,आई आणि खरं तर सर्वस्व म्हणजे गाव ! हवीहवीशी वाटणारी अन् दररोज भरणारी यात्रा म्हणजे गाव ! कधीतरी गाव जागा बदलतं पण मन बदलत नाही.गावाला दरवाजा नाही,गाव कुणासाठी दरवाजा बंद करत नसतं.हा आईसारखं थोडसं रागावतं पण लगेच कुशीत ही घेतं.आपण गाणं आहोत,गाव नावाच्या काळजातले ! या काळजाला जपलं पाहिजे.दूर कुठेतरी टिवटिवी टिवटिव करत असलेली पाहून हल्ली त्या काळजातून कळ यायला लागली आहे.कोरोना नावाच्या वावदळाची भयाण चाहूल ! गाव थरारून गेलय.ओस पडलय.गाणं ऐकू येत नाही,संगीतही ऐकू येत नाही.दररोजची यात्रा भरत नाही.गुडूप आहे गाव ! गाव भयाण झालय भयाण! घरट्यातल्या पाखरांच्या काळजीनं कासावीस झालय .सगळी पाखरं परत आलीत का ? गाव विचारतय.सगळी पाखरं सुखरूप आहेत का ? गाव विचारतय.गाव काळजी घ्यायला सांगतय.प्रत्येक घरटं गावासाठी महत्वाचं आहे .या घरट्यांनी मिळूनच तर गाव झालय.गावच एक घरटं आहे.वावदान मोठं आहे.एकदम वेगळं आहे.दिवसही वैऱ्याचा आहे.आपण आपलं आपलं घरटं वाचवू या.आपण आपलं गाव वाचवू या !_


_*#जगदिश_पाटील*_ 
 _*#करजखेडा_उस्मानाबाद*_

Monday, January 9, 2023

 💐 *मृत्युंजय अमावस्या....!*

        *रक्तरंजित पाडवा*

अमावस्येच्या इतिहासातील चित्तथरारक, अंगावर शहारे अाणणारा, मन व्यथित करुन टाकणारा हाच तो काळा दिवस !

३२५ वर्षापूर्वी तुळापूरच्या मातीत रक्तरंजित इतिहास घडला !
११ मार्च १६८९ हाच तो दिवस होता !

मनुस्मृतीच्या कायद्याची अंमलबजावणी आज तंतोतंतच झाली होती, याच दिवशी संभाजीराजाच्या देहाचे लचके तोडले गेले ! रक्ताच्या रंगपंचमीने मनुवाद्यांनी शिमगा साजरा केला,

*इंद्रायणी-भिमातीरी मृत्युचा सोहळा:*

शंभुराजांच्या तेज:पुंज शरीरातील शूर रक्त आज इंद्रायणीत सांडलं !
ही इंद्रायणी या वीर मरणाची एकमेव साक्षीदार !

आज तीही पावन झाली होती, 
थरारली होती... कारण तिच्या काठावरच, भाल्याच्या टोकावर शंभुराजांचं मस्तक अडकवून 'गुढी' उभारली गेली होती, शरीराचा सापळा टांगून त्या भोवती कडुलिंबाची पानं बांधली होती. व इथूनच ही परंपरा आपल्या घराघरात घुसली...

............. ती कायमची !

षंढासारखी 'गुढी' आजही आम्ही उभारतो व शंभूराजाच्या बलिदानाची टिंगल करतो.

*गुढीपाडवा: समज व प्रचलित रुढींची समीक्षा:* गुढीपाडव्याच्या बाबतीत अनेक मतमतांतरे आहेत.

राम विजयी होऊन आले म्हणून गुढ्या उभारल्या,असे काहींचे म्हणणे आहे. जर या विधानात तथ्य असेल तर हा सन महाराष्ट्रापलीकडे कुणा राज्यात का साजरा होत नाही ?

दूसरे एक मत सांगितलं जातं ते असं, की-

"टाळी वाजवावी। गुढी उभारावी ।
वाट ती चालावी। पंढरीची ।। "

हा संत चोखोबा यांचा अभंग १२ व्या शतकातील, ज्यामध्ये 'गुढी' शब्द आला आहे. वारकरी धर्मामध्ये पंढरीच्या वाटेवर भगवे पताका खांद्यावर घेण्याचा चोखोबा 'गुढी' संबोधतात !
चोखोबांची गुढी ही उलटा गडवा नव्हे !

तिसरे मत- आणखी असं सांगतात, की हा सण पूर्वापार चालत आलाय. संभाजीराजांच्या बलिदानाशी याचा काही संबंध नाही. पूर्वापार चालत आलेला म्हणून ग्राह्य धरु या; पण शिवरायांच्या शहाजीराजांच्या काळात कधीही हा सण साजरा झाल्याची नोंद इतिहासात का नाही. वरील मत-मतांतराचा स्पष्ट अर्थ आहे, की मानवतेच्या मारेकर्यांनी या दिवसाला उत्तेजन देण्यासाठीच चैत्र प्रतिपदा निवडली. ४० दिवसामध्ये महाराजांना ते कधीही ठार करु शकले असते. तत्कालिन बखरकार 'भिमसेन सक्सेना', 'ईश्वरदास नागर ' यांनी शंभुराजांच्या कैदेबाबत इतिहासात तारीखवार नोंद केली आहे, त्यांच्या मते १ फेब्रुवारी १६८९ ला महाराज संगमेश्वरी कैद झाले, तिथून त्यांची राजवस्त्र, जिरेटोप काढून 'कख्ता कुलाह' म्हणजे विदूषकी कापड, लाकडी टोपी चढविली गेली. 
कवी कलषासमवेत ६ दिवस त्यांची जाहीर धिंड काढली गेली, ७ फेब्रुवारीस रक्तबंबाळ शरीर, लोखंडी साखळदंडामध्ये कैद करुन वडू व तुळापुर येथील संगमेश्वरावर औरंगजेबासमोर हजर केले गेले, इतके दिवस त्यांच्या पोटात पाण्याचा एक थेंब व अन्नाचा एकही कण नसताना निधड्या छातीने शंभुराजे औरंगजेबास भिडले त्याच्यासमोर यत्किंचितही मान न झुकवता त्याने विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी अजिबात दाद दिली नव्हती .

*त्या प्रश्नांचे स्वरुप-*

१) माझ्या फितूर झालेल्या साथीदारांची नावे ...व 
२) खजिन्याच्या किल्यांचा पत्ता सांग

मात्र वजीर आसदखानास शंभुराजांनी मोठ्या हिंमतीने झुकविले. हिंदुस्तानचा शहंशाह औरंगजेबही झुकल्याचे कलशा कवीने काव्यात रेखाटले ते असे-

" पापी रावण की सभा ।
संभु बंध्यो बजरंग ।
लहू लखन सिंदूर सम । 
खुब खेल्यो रणरंग ।।
राजन तुम होतांव खरे । 
क्या खुब लढे हो जंग ।
तव-तुप तेज निहारी के ।
तखत त्यजत अवरंग ।।"

९ फेब्रुवारीस महाराजांचे डोळे मस्तकाच्या पात्रातुन तप्त सळयांनी वेगळे अलग केले गेले,

१२ फेब्रुवारीस लोखंडी सांडशीने जीभ उखडली गेली.

१३ तारखेस कानामध्ये तापलेले शिसं ओतलं गेलं.

नंतर हातापायाची नखं काढली गेली.

अंतत: शरीर तलवारीच्या टोकाने सोललं गेलं.

त्यावर गरम मीठाचं पाणी टाकून शरीराला यातना दिल्या गेल्या व गुडघ्याच्या कटोर्या काढून त्यांचे हातपाय तोडले गेले,

अशा अवस्थेतही शंभुराजे जिवंतच होते. २० फेब्रुवारी ते ११ मार्च पर्यंन्त धर्माचे ठेकेदार का थांबून होते ? त्यांचा शिरच्छेद त्यांना २० फेब्रुवारीलाच करायला हवा होता; मात्र ते मुद्दाम थांबले ते ११ मार्चच्या अमावस्येसाठीच !
रक्ताचा पाडवा साजरा करायला.

*शंभुहत्येतील मूळ आरोपी कोण ?*

शिर्के ?...की,

रंगनाथ स्वामी ??

गणोजी शिर्केंनी शंभुराजांना पकडून दिल्याचे अनेक लेखकांचे मत आहे; शिर्क्यांच्या कन्या येसुराणीबाई साहेबांच्या हाती स्वराज्याची सुत्रे शंभुराजांनी दिलेली आहेत हा विषय इथे सध्या बाजूला ठेवू या.

प्रश्न हा येतो, की संगमेश्वराच्या कैदेप्रसंगी संभाजीराजेंसोबत पुढील निवडक सहा माणसे होती.

*त्यांची नावे -*

संगमेश्वराचे सेनापती म्हालोजी घोरपडे ,

दुसरे कवि कलश ,

खंडो बंल्हाळ,

संताजी, धनाजी व

सहावा रंगनाथ स्वामी !

मुकर्रब खान संगमेश्वरावर चाल करुन आल्याची वार्ता समजताच अत्यंत संयमाने सहाही जणांना एकत्र बोलावून महाराजांनी त्यांना युध्दास सज्ज राहून फळी फोडून आपआपली सुटका करुन पुढच्या मुक्कामाची दिशा ठरविली. ठरल्याप्रमाणे पहिल्या प्रहरी रात्रीस युध्दास सुरुवात झाली व वृध्द घोरपडे स्वराज्याच्या कामी आले .

दुसर्या फळीत संताजी-धनाजी फळी मोडून बाहेर निसटले.

तिसर्या फळीत कवी कलष

तर

दस्तूरखुद्द संभाजीराजे चौथी फळी मोडून निघाले;

पण रंगनाथस्वामी कुठेच कसा नव्हता? तो नेमका बिकट क्षणी कुठे होता ?

संभाजीराजांच्या मरणसोहळ्यात तो औरंगजेबाच्या अखत्यारीत कसा ?

कारण....

त्यानेच मुकर्रबखानास शरण येऊन , फळी फोडून निसटून गेलेले संभाजीराजे जुन्या मंदिरात लपून बसल्याची खबर दिली म्हणूनच मुकर्रबखानचा वजीर आसदखान याने त्या पडक्या मंदिरास वेेढा दिला व शंभुराजे रंगनाथाकरवी पकडले गेलेत..
पण इतिहासकारांनी गणोजी शिर्केंना खलनायक दाखवले.

*रंगनाथाचा शोध :*

रामदासस्वामीच्या शिष्यसंप्रदायातील एक प्रमुख म्हणजे रंगनाथ स्वामी,

११ मार्चच्या हत्येनंतर साधा उल्लेखही कुठेच आला नव्हता, कारण शंभुराजांच्या हत्येनंतर ६४ भटांच्या घरांची तानाजी व धनाजी यांनी तुळापूरला राखरांगोळी केल्याची नोंद ' रक्तरंजित तुळापूर ' या दुर्मिळ पुस्तकात आहे .

या घरातील एक घर मुरार जगदेवाच्या वारसाचं आणि रंगनाथ स्वामीच !

हा रंगनाथ स्वामी पुढे पळून गेला व गोंडवन राज्याच्या अखत्यारीत चंद्रपूर परिसरात आल्याची शक्यता आहे.

यवतमाळ जिल्ह्यामध्ये चंद्रपूरच्या परिसरात वणी हे तालुक्याचं ठिकान असून रंगनाथ स्वामीची समाधी याच ठिकाणी आढळते, ' वणी ' येथे रंगनाथस्वामीच मंदिर असून त्या समाधीची बांधणी ही १७ व्या शतकातील असावी.

दरवर्षी रंगनाथस्वामीची फाल्गुन शुध्द एकादशीस वणी येथे यात्रा भरते. फाल्गुन शु. एकादशीस रंगनाथ स्वामी वणीत दिसला, म्हणजे त्याच तिथीवर प्रकट दिन साजरा होतो, संभाजीराजांची हत्या फाल्गुन वद्य अमावस्येला, एकाच महिन्यात हे दोन प्रकार घडले आहेत. आता रंगनाथस्वामीचा शोध घेणे गरजेचे असून शंभुराजांच्या कैदेप्रसंगी महत्वाची भूमिका बजावणारा ....

त्याचा उत्सव जर होत असेल,
तर संभाजीराजांच्या बलिदानाशी ही सरळ बेईमानी होतेय असाच त्याचा सरळ अर्थ निघतो,

रंगनाथावर आणखी पक्के संशोधन होणे गरजेचं असून 'वणी' तील रंगनाथस्वामीशी शंभुचरीत्राचा संबंध असल्यास निश्चितच त्यावर मंथन व्हावे!

पाडवा तरुणांनी साजरा करावा का ?

गुढी पाडवा हा सण असू शकतो का ?

आईची साडी चोळी घरावर टांगणे मानवधर्माला धरुन आहे का ?

वढू व तुळापूरला गुढीपाडवा का साजरा होत नाही ?

शिवले- भांडारे व शिरसाट ही तुळापूरांतील बौद्ध व मातंग समाजातच आडनावे का आढळतात?

शिख समाज 'गुरु गोविंदसिंगांच्या' बलिदानातून प्रेरणा घेतो, तिथं सचखंड गुरुद्वारा उभारला जातो, तसं आपण आपल्या शंभुराजांच्या बलिदानाचं पावित्र्य जपतो का ?

बांधवांनो शंभुराजांच्या बलिदान दिनी आपण टोकाचा विरोध स्वीकारुन गुढीची अपमानी परंपरा बदलवू व सुर्योदयसमयी, येणार्या पाडव्यास, अत्यंन्त साध्या पध्दतीने , गोडधोड न खाता स्टीलच्या रॉडवर एकपाती भगवा ध्वज, कलशामध्ये रोवून प्रत्येकाच्या निदान आपल्या तरी घरावर स्वाभिमानाचा, शौर्याचा, बलिदानाच्या परंपरेला भावपूर्ण मानवंदना देऊन भगवा फडकवू या!

तुम्हाला माझ्या शंभुराजांच्या बलिदानाची शपथ !

चला स्वराज्याच्या धाकल्या , धन्याचे वीर वारस होऊ या, 
नाहीतर शंभुराजे आज म्हणतील.

'आबासाहेब ' पाहीलीत का आपली षंढ माणसं !
अहो , स्वराज्याच्या बलिदानाचंही यांनी भांडवल केलं !
यांना कुणीही सांगितलं तरी ते हेकेखोरपणे रूढीला चिटकून बसतील ! धर्माची ओळख देतील ! याच धर्मीयांनी आम्हाला "धर्मवीर" म्हणून कायमचं संपवून टाकलं ! आमचं बलिदान हे स्वराज्यासाठी झालं, म्हणूनच शेवटच्या क्षणीही, मिर्जाखान हा आमच्याशी इमान राखून राहीला !

शहजाद्या अकबराने आमचे प्राण वाचविले !

आमच्या प्रेताचे संस्कार इथल्या मांगा-महारांनी केले !!!

मात्र ज्यांनी आमचा वारसा सांगितला ते आम्हाला समजू शकले नाहीत !!

शेवटी या षंढामध्ये काही बाणेदार निपजतील आबासाहेब !!

तीच मानसं स्वराज्याची खरी वारस असतील !

*भूमिका :*

अमोल मिटकरी यांच्या संदर्भातून

*उद्धवना सोबत घेतले म्हणून पवार जातीयवादी !*

महाराष्ट्र दिनी दोन मोठ्या सभा झाल्या. एक सभा मुंबईत झाली भारतीय जनता पक्षाची. दुसरी औरंगाबादला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची. एकूण महाराष्ट्र दिन राजकीय रणधुमाळीचा ठरला. यातून एक गोष्ट स्पष्ट झाली. भाजप आणि मनसेने आपापले टार्गेट ठरवून घेतले आहे. भाजपने हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून शिवसेनेला टार्गेट करायचे. आणि मनसेने राष्ट्रवादी काँग्रेसला टार्गेट करून जातीयवादाच्या मुद्द्यावरून घेरायचे, अशी दोन्ही पक्षांची रणनीती ठरलेली दिसते. म्हणजे एका राजकीय पक्षातसुद्धा आढळणार नाही एवढा ताळमेळ आणि समन्वय दोघांच्या भूमिकांमध्ये दिसतो. साम्यस्थळ म्हणजे दोन्ही पक्षांच्या भूमिका दोन धर्मांमध्ये विद्वेष निर्माण कऱणा-या आणि विभाजनवादी आहेत. मुस्लिम समाजाला टार्गेट करून त्यांच्या मनात दुय्यमत्वाची भावना निर्माण करणा-या आहेत. त्याअर्थाने त्या सामाजिक स्वास्थ्यासाठी धोकादायक आहेत.


सत्तेसाठी कोणत्याही थराला जाण्याची भाजपची तयारी आहे आणि मनसेनेही शक्य तेवढे घसरण करून घेण्याचा निर्धार केलेला दिसतो. दोघांच्याही भूमिका गंभीर आहेत. शरद पवारांना नास्तिक म्हणणारे राज ठाकरे फार काही धार्मिक वृत्तीचे नाहीत. सध्या ते राजकारणासाठी काहीतरी नाटक करीत असले तरी ते तेवढे धर्मभोळे किंवा देवभोळे नाहीत. दुपारी अहमदनगरच्या हॉटेलमध्ये मटण खाऊन सायंकाळी पुण्यात हनुमानाची आरती करायला जातात, त्यावरून काय ते समजून घ्यावे. 
ब्रह्मवृंदांकडून मंत्रोच्चार 
करून घेणे वगैरे टीव्हीवाल्या मित्रांच्या टीआरपीसाठी. त्यात त्यांचा स्वार्थ काहीच नाही.

शरद पवार हे जातीयवादी असल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केला. अगदी अडीच वर्षांपूर्वीपर्यंत शरद पवार हे राज ठाकरे यांच्यासाठी आदर्श नेते होते. पवारांनी एका विशिष्ट राजकीय परिस्थितीत राज यांचे बोट सोडून उद्धव यांना हात दिला, हे राज यांच्या रोषामागचे कारण आहे. खरेतर राज ठाकरे यांच्यासारख्याने समजून घेण्याची आवश्यकता होती, की इथे राज की उद्धव हा पवारांपुढचा चॉईस नव्हता. भाजपला सत्तेच्या बाहेर ठेवणे हा प्राधान्यक्रम होता. त्यासाठी राज ठाकरे यांचा शून्य उपयोग होता. पण म्हणून लगेच पवार जातीयवादी कसे काय ठरतात? १९९९ पासून ते जातीयवादी असतील तर अडीच वर्षांपूर्वीपर्यंत त्यांना त्याची जाणीव नव्हती का? १९९९ पासूनच्या पवारांच्या जातीयवादाचा साक्षात्कार त्यांना एकाएकी २०२२ साली होण्याचे कारण काय? अर्थातच राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेसोबत गेली नसती तर आजही राज यांच्यासाठी पवार हे देशातील सर्वश्रेष्ठ नेते असते.

राहिला मुद्दा पवारांच्या जातीयवादाचा. जो महाराष्ट्र पवारांना ओळखतो, त्याला पवार नेमके कसे आहेत हे गुणदोषांसकट माहीत आहे. राज्याच्या कानाकोप-यातल्या छोट्यातल्या छोट्या विकासकामाची खबर ठेवणा-या आणि चांगल्या कामाच्यामागे उभे राहणा-या पवारांच्या शेकडो गोष्टी महाराष्ट्रातून ऐकायला मिळतील. गावखेड्यापासून दिल्लीच्या राजकारणापर्यंत त्यांना असलेली मान्यता सगळ्यांना ठाऊक आहे. केवळ पुरंदरे यांच्या संदर्भाने विचार करून शरद पवारांन जातीयवादी ठरवणे हास्यास्पद आहे. इथे साधी गोष्ट लक्षात घेण्याजोगी आहे. शरद पवार हे काही इतिहास संशोधक नाहीत. पुरंदरे यांनी ब्राह्मणी उदात्तीकरणाचा जो इतिहास मांडला आहे, तो खोडून काढणारे अलीकडच्या काळातले अनेक इतिहास संशोधक आहेत. त्यातल्या अनेकांचा पवारांशी दुरान्वयाने संबंध नसेल. अर्थात हा नव्याने समोर आलेला इतिहास खोडून काढण्यासाठी पुरंदरे किंवा त्यांच्या कंपूतले कुणी पुढे आले नाही. पुरंदरेंच्या लेखनातले दोष संशोधकांनी पुढे आणले आहेत, पवारांसमोरच काय कुणासमोरही हा इतिहास आल्यानंतर त्याची दखल घ्यावीच लागते. जे अद्ययावत संशोधन असते तेच इतिहासात अंतिम असते. पुरंदरेंचा खोटेपणा उघडा पडला त्यात पवारांचा काय दोष?

*रायगडावरची छत्रपतींची समाधी*

रायगडावरची शिवछत्रपतींची समाधी लोकमान्य टिळकांनी बांधली, त्यांना तुम्ही ब्राह्मण म्हणून बघणार का? लोकमान्य टिळकांनी जे पहिलं वर्तमानपत्र सुरू केलं होतं, त्याचं नाव होतं – मराठा. परंतु शरद पवार हे सांगणार नाहीत असे वक्तव्य राज यांनी केले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगडावरील समाधीची दुरवस्था लोकांसमोर आणण्याचे किंवा या समाधीचा विषय चर्चेत आणण्याचे श्रेय महात्मा जोतिराव फुले यांना जाते. टिळकांशी त्याचा संबंध नाही. जोतिराव फुले १८६८ साली रायगडावर गेले, समाधीचा शोध घेऊन त्यासंदर्भातील वस्तुस्थिती दीनबंधू वृत्तपत्रात मांडली. त्यानंतर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा लिहिला, ज्यामध्ये त्यांनी महाराजांचा कुळवाडी भूषण असा उल्लेख केला आहे. पुण्यात चाफळकर स्वामींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या शिवस्मारकासंबंधीच्या सभेला जोतिराव फुले उपस्थित असल्याचे पुरावे उपलब्ध आहेत. उपलब्ध बाबींवरून लोकमान्यांचा संदर्भ येतो, तो १८९५-९६ साली ते रायगडावर शिवजयंती उत्सवाला उपस्थित राहिल्याबद्दलचा. महात्मा फुले चरित्राचे अभ्यासक प्रा. हरी नरके यांच्या म्हणण्यानुसार १८८०साली पुण्यात आणि रायगडावर शिवजयंती उत्सवाची जोतिरावांनी सुरूवात केली. त्यांचे सहकारी कामगार नेते रावबहादूर नारायण मेघाजी लोखंडे यांनी मुंबईच्या लालबाग आणि परळ या गिरणी कामगारांच्या वस्त्यांमध्ये शिवजयंती उत्सव सुरू केला. हा उत्सव सत्यशोधक मंडळी अतिशय भव्य प्रमाणात करत असत. १८९३ साली गणेशोत्सवाला सार्वजनिक रूप देऊन टिळकांनी त्याचे चळवळीमध्ये रूपांतर केले. आपला सहभाग देऊन त्यांनी हा उत्सव आणखी मोठा केला.

*जेम्स लेनचे प्रमाणपत्र*

जेम्स लेनने आपल्या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री जिजाऊ यांच्या चारित्र्यहननाचे प्रयत्न केले. जेम्स लेनला माहिती देणा-यांमध्ये बाबासाहेब पुरंदरे आणि त्यांच्या भोवतालच्या इतिहास अभ्यासकांचा सहभाग असल्याचा संशय होता. भांडारकर संस्थेवर संभाजी ब्रिगेडने त्याच कारणाने हल्ला केला होता. राज ठाकरे यांनी अलीकडे तो विषय उपस्थित करून त्यावरून शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर जातीयवादाचा आरोप केला. पाठोपाठ इंडिया टुडेने जेम्स लेनची मुलाखत प्रसिद्ध केली. त्यात त्याने आपले पुरंदरे यांच्याशी साधे बोलणेही झाले नसल्याचे सांगितले. ज्या माणसाने छत्रपतींची आणि त्यांच्या मातोश्रींचे चारित्र्यहनन केले, त्याच माणसाकडून पुरंदरे यांच्यासाठी प्रमाणपत्र मिळवण्याचा प्रयत्न या मुलाखतीच्या माध्यमातून केला आहे. त्यावरून हे प्रमाणपत्र किती विश्वासार्ह आहे, यासंदर्भात अधिक भाष्य करण्याची आवश्यकता नाही.

पुरंदरे यांनी शिवचरित्र घराघरात पोहोचवले, असे राज ठाकरे म्हणतात, तेव्हा त्यांना सांगावेसे वाटते की, शिवचरित्र घराघरात पोहोचवण्याची सुरुवात महात्मा फुल्यांपासून झाली होती. त्यांनी १८६९ साली शिवाजीचा पोवाडा लिहून त्याची सुरुवात केली आणि त्यानंतर गावोगावी अठरा पगड जातीच्या शाहीरांनी प्रबोधकाच्या भूमिकेतून शिवचरित्र घरोघरी पोहोचवले.

*रामदासांचे उदात्तीकरण*

रामदास स्वामी हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरू नव्हते, हे उपलब्ध पुराव्यांवरून सिद्ध झाले आहे. त्यांचे व्यक्तिगत महात्म्य जे काही असेल ते त्यांच्या अनुयायांनी मानावे. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांशी त्यांचा संबंध जोडून शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न करू नये. दुर्दैवाने राज ठाकरे हे पुरंदरे, रामदासांच्या निमित्ताने ब्राह्मणी दृष्टिकोनातून मांडलेला इतिहास आपल्या अनुयायांवर थोपवण्याचा प्रयत्न करीत आहेत.

आजच्या सभेतली मुद्दाम उल्लेख करावयाची गोष्ट म्हणजे राज ठाकरे यांनी नरहर कुरुंदकरांचा केलेला उल्लेख. पुरंदरेंच्या पलीकडे कुणीतरी शिवचरित्रासंदर्भात काही म्हणतेय हे ऐकण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला दिसतोय. त्याचप्रमाणे त्यांनी नव्या पिढीतल्या इतिहासकारांनी मांडलेल्या गोष्टी समजून घ्याव्यात. त्यांची पुरंदरे यांच्यावरील श्रद्धा ही त्यांची व्यक्तिगत बाब आहे. इतरांना त्याच्याशी देणेघेणे नाही. इतरांसाठी फक्त इतिहास आणि त्याची वस्तुनिष्ठता महत्त्वाची आहे. *पुरंदरेंच्या ललितरम्य शैलीतल्या पक्षपाती इतिहासाऐवजी वस्तुनिष्ठ इतिहास समजून घेण्याचा प्रयत्न राज ठाकरे यांनी केला, तर ते त्यांच्यासाठी उपकारक ठरेल.*

-विजय चोरमारे

 भयंकर आहे हे सगळं! कोकण ट्रीपला जाताय? सावधान, आधी नीट चौकशी करा.


*येवा कोकण आपलाच (अ)नसा*
आणि कोकण अजिबात सुरक्षित नसा
(हा गेल्या आठवड्यातील AdvDr Suchitra Ghogare-katkar यांचा अनुभव आहे, गेल्या सोमवारचा)

नजर जाईल तिथपर्यंत पाणीच पाणी, फेसाळणाऱ्या लाटा आणि लाटांची गुंज... निसर्गाचं वरदान लाभलेल्या कोकण किनारपट्टीचे पर्यटकांना खूपच आकर्षण आहे. त्यामुळे अलिकडच्या काळात बाराही महिने पर्यटक कोकणात येत असतात.‌ पर्याटकांसाठी किणारपट्टीवर अनेक नवनवीन बीच साईट्स समोर येत आहेत. बीच रिसॉर्ट्स, होम स्टे या माध्यमातून कोकणवासीयांना उत्पन्नाचे नवीन साधन मिळाले आहे. ही खूपच चांगली गोष्ट आहे. पण याची दुसरी बाजू म्हणजे कोकण पर्यटन अजिबात सुरक्षित नाही. त्यावर प्रशासन, पोलिस आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचे नियंत्रण हा संशोधनाचा विषय आहे. 
पर्याटकांसाठी सोयीसुविधांचा अभाव आहेच पण यापेक्षा अत्यंत महत्त्वाचा विषय म्हणजे पर्याटकांची सुरक्षितता होय. पण या दृष्टीने स्थानिक स्वराज्य संस्था, स्थानिक नागरिक आणि प्रशासकीय पातळीवर काहीच काम केले जात नसल्याचे वारंवार लक्षात येते. पर्यटक बुडाल्याच्या बातम्या आल्या की प्रशासन जागे होते पण यावर कोणत्याही उपाययोजना आखल्याचे, त्या अंमलात आणल्याचे वर्तमानपत्रात वाचायला मिळत नाही आणि प्रत्यक्ष गेल्यावर तर दिसतही नाही. एकूणच कोकणात येणाऱ्या पर्यटकांची सुरक्षितता वाऱ्यावर आहे हे नक्की. याचा काल आम्ही प्रत्यक्ष अनुभव घेतला.
विस्तिर्ण अशा कोकण किनारपट्टीवर छोट्या छोट्या गावालगतच्या किनाऱ्यावरील सुरक्षेसाठी उपाय योजना करणे तसे अवघडच. पण प्रसिद्ध पर्यटन स्थळे असलेल्या ठिकाणी सुरक्षिततेविषयी आनंदच दिसून येतो. 
देवबाग तारकर्ली येथे वॉटर स्पोर्टस् विकसित होऊन बरेच वर्ष झाली आहेत. त्याठिकाणी स्थानिक प्रशासन आणि पोलीस यांचे काहीच तिथे काहीच नियंत्रण नाही. भरती ओहोटी च्या वेळा आणि त्या अनुषंगाने पर्यटकांसाठी नियमावली, सुरक्षा व धोक्याच्या सुचना याच्या पाट्या कुठेच आढळल्या नाहीत. एकूणच इथे प्रशासन कुठेच दिसत नाही. दिसतो तो फक्त स्थानिक व्यवसायिकच. 
काल सकाळी त्सुनामी आयलंड पहाणे आणि तिथे वॉटर स्पोर्टस् राईड्स घेणे या उद्देशाने गेलो. बोट ठरवताना लाईफ जॅकेट्स आहेत ना असे विचारले होते तेव्हा 'हो' असे उत्तर दिले होते. मात्र बोटीत बसल्यावर तिथे लाईफ जॅकेट्स नव्हतीच. याचे कारण विचारल्यावर इथे जवळच जायचं आहे जॅकेट्स ची गरज नाही असे उत्तर मिळाले. समोरच त्सुनामी आयलंड दिसत होते त्यामुळे इट्स ओके म्हणत तो विषय सोडून दिला. 
त्सुनामी आयलंड, पुढे खाडी व समुद्र संगम आणि क्रोकोडाईल बीच अशी राईड आम्ही घेतली होती. त्याप्रमाणे
त्सुनामी आयलंड वर बोटीतील इतर पर्यटक उतरले. आम्ही दोन मिनिटे पुढे गेलो तिथेच बोट थांबवून त्या मुलाने पाण्याच्या रंगातील फरक दाखवला व परत लगेच फिरला. आम्ही म्हटलं हे ठिकाण आपण खूप लांबून दाखवताय पैसे मात्र भरपूर घेतलेत. तर त्याने कांगावा केला. शुध्द फसवणूक आहे हे कळत असूनही हा विषय सोडून दिला. 
परत येऊन स्कूटर राईड बनाना राईड घेत होतो तेव्हढ्यात पॅरासेलिंग बुक झाल्याने बोट न्यायला आली. त्यातून थोडे पुढे गेलो व परत त्यातून पॅरासेलिंग च्या बोट मध्ये बसलो. तिथेच फक्त लाईफ जॅकेट्स होती व तो बोटमन वारंवार सुरक्षिततेच्या सुचना देत होता. एवढीच एक सकारात्मक बाजू तीन दिवसांच्या कोकण प्रवासातील. 
पॅरा सेलिंग करुन परत आलो व त्सुनामी बेटावर जायला दुसऱ्या बोटीत बसलो. बेटाजवळ आलो तर सर्व बेट पाण्याखाली गेले होते. लाटांचा जोर वाढला होता. एकूण परिस्थिती पाहून आम्ही तिथे न जाण्याचा निर्णय घेतला व आम्ही यातून उतरणार नाही असे सांगितले. तसेच आम्ही पैसे देतो पण आम्हाला इथे न सोडता पुढे जाऊन धक्क्यावर सोडा अशी विनंती केली. पण तुम्हाला ज्याने सोडलंय तोच घेऊन जाईल तुम्ही बोटीतून उतरा असे सांगून त्याने आम्हाला अक्षरशः बोटीतून बाहेर पडायला भाग पाडले. 
बोटीतून उतरणे भयंकर होते. एकतर खांद्यापर्यंत पाणी होते. लाटांचा जोर वाढला होता. बोट पूर्ण एका बाजूला कलत होती. यात छोट्या अमोघच्या डोळ्याखाली बोटीचा जोरदार मार लागला तर त्याच्या डॅडीच्या म्हणजे मेहूण्यांना पायाला मार लागला. बहिण आणि तिचा छोटा मुलगा उतरत असताना जोराची लाट आली आणि बोट नेमकी त्याच बाजूला पूर्णतः झुकली आणि ती दोघीही बोटीच्या खाली अडकता अडकता वाचली.‌ बोटीतून उतरल्यावर पुढे सुरू झाली तो जीवघेणा थरार.
(त्याविषयी लिहायचं म्हटलं तरी अंगावर शहारे येतात मन अस्वस्थ बनतं आणि म्हणूनच ही पोस्ट लिहायची अर्धवट सोडून दिली होती. 
पण आजची दुर्घटना वाचली आणि पुन्हा यावर लिहिण्याची गरज लक्षात आली.) 
अंगावर येणारी प्रत्येक लाट काळजाचा ठोका चुकवत होती. आमच्या खंद्या एवढी पाण्याची पातळी वाढली होती आणि त्यात लाटांवर लाटा येत होत्या. साडेसात वर्षांच्या अरुष दाक्षिणी दोघांना तिथल्या एका छोट्या माचणावर बसवले होते. मोबाईल पैसे पर्स वगैरे महत्वाचे साहित्य बरोबर नेहलेल्या मोठ्या वॉटरप्रुफ बॅग मध्ये ठेवले होते. आणि माचणाचे एक एक खांब पकडून आम्ही लाटांना सामोरे जात होतो. लाटेच्या तडाख्यात माझा चष्मा वाहून गेला. अनेकांचे साहित्य वाहून जात होते. लहान मुलांसाठी भयंकर स्थिती होती. पण स्थानिकांना या परिस्थितीशी काहीही देणंघेणं नव्हते. ते निर्ढावलेपणाने या परिस्थितीकडे बघत होते. एका माचणावर बसलेल्या स्थानिक लोकांना मदतीसाठी विनंती करत होतो. आमच्या बोटीच्या माणसाला फोन लावा म्हणून ओरडुन सांगत होतो. पण ते अक्षरशः दुर्लक्ष करत होते. 
त्सुनामी बेटावर माचणे तयार करुन त्यावर खाद्यपदार्थ वेगवेगळ्या वस्तूंची दुकानदारी लावलेले स्थानिक लोक तिथले त्यांची दुकाने गुंडाळून गायब झाली होती. 
बेटावर पर्यटकांशिवाय कोणीही नव्हते आणि प्रत्येकजण लाटांचा सामना करत मदतीसाठी ओरडत होते. एक बोट आली पण तो आम्हाला घेऊन जायला नकार देत होता. कारण तेच... तुम्ही ज्या बोटीतून आलात त्याच बोटीतून परत जा असे सांगितले जात होते. पण यावेळी आम्ही त्याचे ऐकले नाही व एकमेकांना हात देत त्या बोटीपर्यंत पोहचलो आणि बोटीत बसलो. आम्ही त्याला वेगळे पैसे देण्याची तयारी दाखवूनही तो आम्हाला घेऊन जायला नकार देत होता. 
आम्ही आठजण बोटीत चढलो. पर्यटकांची दुसरा ग्रुप चढला. त्यांची तर अत्यंत वाईट अवस्था होती. मोबाईल पैसे साहित्य भिजले होते पण याहीपेक्षा सहा महिने ते चार पाच वर्षे वयोगटातील त्यांची मुले होती. एक मूल तर अक्षरशः लाटेवर हातातून निसटून गेलेले दोन गटांगळ्या खाऊन परत पकडले होते. बहुतेक डॉक्टरांचा तो ग्रुप असावा कारण डॉक्टर नावाने ते एकमेकांना संबोधित होते. मुलांची सुरक्षितता धोक्यात आल्यामुळे त्यातील आया घाबरल्या होत्या आणि चिडलेल्या होत्या. 
आम्ही धक्क्यावर परत आलो व पार्किंग कडे जायला निघालो तर समोर आम्हाला बोट ठरवून दिलेला व्यक्ती भेटला. त्याला घडलेला प्रकार सांगितला तर तो हसत हसत म्हणाला "तुमचा फक्त चष्माच गेला लोकांचे फोन, पाकीटे अजून काय काय नेहमीच जात असतं." 
त्याचं हे वाक्य ऐकून एक महत्वाची बाब लक्षात आली ती म्हणजे अशा घटना त्यांच्यासाठी नेहमीच्याच आहेत. 
हा सर्व प्रकार अनुभवल्यानंतर काही महत्वाचे प्रश्न मनात उपस्थित झाले आहेत. ते म्हणजे...
१. तीन दिवसांच्या अख्या पर्यटनामध्ये मालवण परिसरात एकही पोलिस आम्हाला दिसला नाही. 
२. देवबाग जवळच्या धक्क्यावर कुठेही सूचना फलक नव्हते. सुरक्षितता उपाययोजना याविषयी माहिती फलक नव्हते.
३. बोटींमध्ये सुरक्षितता जॅकेट्स नव्हतीच. इतरही सुरक्षित बाबी नव्हत्या. 
४. बहुतांश बोटी जुन्या आढळल्या. 
५. बोटींचे कसलेचं नियोजन नव्हते. 
६. स्थानिक प्रशासन पोलिस कोस्टल गार्ड यापैकी कोणीही तिथे उपस्थित नव्हते की यावर प्रशासनाचे नियंत्रण आहे असे कुठेच दिसून आले नाही. 
७. जाताना आवर्जून आधार कार्ड घेऊन गेलो होतो. MTDC मान्यताप्राप्त होम स्टे ला थांबलो होतो पण त्याने फक्त नाव विचारले. तिथे कोणतेही रजिस्टर नव्हते. ओळखपत्र मागणे ही दूरची गोष्ट.
सर्व अनागोंदी कारभार. फक्त आणि फक्त व्यवसायिक लोकांचं साम्राज्य. 
एकूणच स्थानिक प्रशासन, पोलिस, जिल्हा प्रशासन, पर्यटन विभाग, कोस्टल गार्ड इ. कोणीच तिथे दिसून आले नाही.
एकूणच सगळा व्यवसायिकांचा बाजार. पर्यटकांची सुरक्षितता हा महत्त्वाचा मुद्दा आहे. याचबरोबर पर्यटकांची आर्थिक लूट हाही वेगळा विषय आहे.
हे सगळं अनुभवल्यावर मनात विचार येतो 'यावा कोकण आपलाच असा' नव्हे तर "यावा कोकण आपलाच नसा" आणि "कोकण अजिबात सुरक्षित नसा" हे खरं आहे.
यावर शासनाच्या सर्व संबंधित विभागाने त्वरित दखल घेणे अत्यंत गरजेचे आहे. आज घडलेली दुर्घटनेतून शासनाला जाग येईल ही अपेक्षा.
- अॅड. डॉ. सुचित्रा घोगरे-काटकर सातारा
कोकणातून परत आल्यावर या घटनेविषयी लिहून वॉट्सऍपवर पोस्ट केले होते. ते तेव्हाच फेसबुक वर पोस्ट करायला हवे होते. कदाचित प्रशासनाने दखल घेतली असती असे वाटतंय.
#Namrata Desai

- *भावनांची गडबड* -


माझ्या ओळखीतले एक नवरा बायको सध्या कोविड पॉझिटिव्ह आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांच्या बिल्डिंग मध्येच दोन-तीन फॅमिलीने एकत्र जमून गेट-टुगेदर केलं आणि नेमकं त्या पार्टीतले काहीजण पॉझिटिव्ह आले. त्यातच हे दोघे सुद्धा होते. सुदैवानी मुलगा मोठा आहे, तो निगेटिव्ह आहे. तसंच दोघांनाही काही त्रास नव्हता. पंधरा दिवस दोघं घरातच क्वारनटाईन झाले. 
यात त्यांची प्रचंड भांडणं झाली. 'त्या पार्टीला यायचा तू मला आग्रहच का केला? 'असं म्हणून बायको नवऱ्यावर चिडत राहिली. ' आपण कुठून त्या पार्टीला गेलो? ' असे विचार सतत त्या नवऱ्याच्या मनात येत होते आणि त्याला प्रचंड नैराश्य आलं.
त्यांच्याशी वेगवेगळं आणि एकत्रितपणे फोनवर बोलताना माझ्या लक्षात आलं राग, अपराधीपणा, नैराश्य, एकटेपणा अशा अनेक नकारात्मक भावनांचा त्यांना त्रास होत होता. दोघं सतत नकारात्मक विचार करत होते. हे स्वाभाविकच आहे. कारण आपल्यावर कुठलंही संकट येतं, समस्या येतात तेव्हा नकारात्मक विचार सुरु होतात. ते बरेचदा प्रश्नार्थक असतात.
माझ्याच बाबतीत का?
माझं नशीब असं कसं?
तू का मला तिकडे नेलंस?
मी त्याचं का ऐकलं?
मी का त्यावेळी तिकडे गेले?
काही अडले होते का तिकडे जायचं? 
असे प्रश्न सुरू होतात.
'हे आपल्याच बाबतीत का घडलं?' या प्रश्नाचे उत्तर आपल्याला कोणीही देऊ शकणार नाही. मग याचं सोपं उत्तर शोधलं जातं. ते म्हणजे कोणाला तरी दोष देणे.
त्यामुळे आपण नशिबाला,स्वतःला किंवा इतरांना दोष देत बसतो आणि मग जर-तरच्या भोवऱ्यात अडकतो.

जर त्यांनी आम्हाला तिथे बोलावलंच नसतं तर....
जर आम्ही तिकडे गेलोच नसतो तर....
जर तू माझं ऐकलं असतं तर.....
आणि त्याच्यातून होते नकारात्मक भावनांची गडबड...

या गडबडचं स्पेलिंग केलं तर त्यातून आपल्याला सगळ्या नकारात्मक भावना मिळतील.
                GADBAD
G- Guilt - अपराधीपणा
A- Anger- राग
D- Depression- निराशा
B- Blaming- दोष देणे
A- Anxiety- चिंता
D- Disgust - तिरस्कार
आणि या गडबडीची तीव्रता वाढली तर नातेसंबंध बिघडणे, प्रतिकारशक्ती कमी होणे, रक्तदाब, ब्लड शुगर वाढणे असे शारीरिक परिणाम ,मानसिक त्रास,मानसिक आजार असे कितीतरी दुष्परिणाम होऊ शकतात. आणि आपल्यावर जी समस्या आलेली आहे ती तर सुटत नाहीच.
मग यावर उपाय काय?
तर ज्या प्रश्नाला उत्तर नाही असा प्रश्न स्वतःला सतत विचारत राहायचं नाही.
असे प्रश्न विचारून परिस्थितीत काहीही बदल होत नाही.
 ते प्रश्न जोपर्यंत आपण स्वतःला विचारत राहू तोपर्यंत आपण मार्ग काढण्याचा कुठलाही प्रयत्न करू शकत नाही.
वर उल्लेख केलेल्या नवरा-बायकोच्या जेव्हा हे लक्षात आलं तेव्हा त्यांनी हे प्रश्न विचारणं बंद केलं. जर-तरच्या भोवऱ्यातून ते बाहेर पडले. भावनांची गडबड कमी झाली. आता पंधरा दिवस तर घरात बसायचं आहे हे त्यांनी मान्य केलं आणि मग आता क्वारंटाईन मधले दिवस कसे आनंदात घालवता येतील याचा ते विचार करायला लागले.
 चांगली पुस्तकं वाचली, वेब सिरीज बघितल्या, आवडते पदार्थ मागवले, जवळच्या मित्र-मैत्रिणींना फोन करून गप्पा मारल्या. एकमेकांशी तर भरपूर गप्पा मारल्या. जेव्हा त्यांनी नकारात्मक विचारांचे प्रश्न थांबवले, परिस्थितीचा स्वीकार केला तेव्हाच त्यांना हे करता आलं.
माझी आई डॉ अनिता अवचट हिला जेव्हा कॅन्सर झाला तेव्हा ,' हे असं कसं झालं? तुझ्यावरच कशी ही वेळ आली?' असं म्हणणाऱ्या जवळच्या लोकांना तिने समजावून सांगितलं की असे प्रश्न विचारण्यापेक्षा आपण मला हा आजार झाला आहे याचा स्वीकार करू आणि प्रश्नच विचारायचे असतील तर' यावर चांगले उपचार कुठले घेता येतील ? कुठल्या डॉक्टरचा सल्ला घेता येईल? असे प्रश्न विचारू. कारण हे विधायक प्रश्न आहेत. त्यातून आपल्याला काही तरी मदत होईल.
 'ज्या प्रश्नाला उत्तर नाही तो प्रश्न कधीच स्वतःला परत परत विचारायचा नाही'ही तिची शिकवण आम्ही मुक्तांगण मध्ये येणाऱ्या रुग्णमित्रांपर्यंत पोचवायचा आमच्या परीने प्रयत्न करत असतो.
- मुक्ता पुणतांबेकर
 संचालक,
 मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र, पुणे.

वडखळ... एक हरवलेला थांबा!!


प्रत्येक प्रवासाची सुरुवात आणि शेवट ठरलेला असतो, तसंच त्या प्रवासातले टप्पे किंवा थांबेही ठरलेले असतात. काही वेळा ते अगदी हक्काचे असतात, तर काही अनिवार्य! अनेकदा एक वाक्य आपण नेहमी ऐकतो. ते म्हणजे, 'प्रवासाची मजा मुक्कामावर पोहोचण्यात नाहीच, ती आहे प्रवासातच'. हा प्रवास मजेशीर करतात ते हे असले थांबे. नाही नाही, यातून कोणताही तत्त्वज्ञानविषयक अर्थ काढू नका. मी अगदी रस्त्यावरच्या प्रवासाचीच गोष्ट करतोय. ट्रेनमधल्या म्हणालात, तरी चालेल!

असाच एक थांबा म्हणजे वडखळचा थांबा! व-ड-ख-ळ कोणताही आकार, उकार किंवा ईकार नसलेलं हे चा र अक्षरी गाव! ज्यांनी म्हणून मुंबईतून कोकणात किंवा अलिबागला प्रवास केला आहे, त्यांचा या गावाशी नक्की परिचय असेल.
पेण या महत्त्वाच्या एसटी स्टँडपासून अगदी सात-आठ किलोमीटरवर असलेलं हे गाव एरवी दुर्लक्षित राहिलं असतं. पण जुन्या मुंबई-गोवा महामार्गाने ज्या गावांना काहीएक ओळख दिली, त्यातलं महत्त्वाचं गाव म्हणजे वडखळ!

'गाडी हुंबयसून निघाली आनि थेट मानगावला पोचलो,' तळकोकणात जाणार्‍या कोणत्याही चाकरमान्याकडून हे वाक्य याच्या आधी तुम्ही ऐकलं असणं शक्यच नाही. कोकणात जाणारी गाडी मुंबईतली वाहतूक कोंडी फोडून पनवेल ओलांडते. पळस्प्याला लागते आणि मग जरा एका लयीत येते. वाहतूक कोंडीत गचके खाणारे प्रवासीसुद्धा जरा गार हवा आल्याने सुस्तावतात ते अगदी पेणचा स्टँड येईपर्यंत. आता पेणचा एसटी स्टँड हादेखील एक स्वतंत्र लेखाचा विषय होऊ शकेल. पण तिथे मंडळी जरा फ्रेश वगैरे झाली की, गाडी पुन्हा थोडी लयीत येते आणि अचानक समोर वाहनांचा भलामोठा गोतावळा दिसतो. 'च्यायला, या वडखळला ट्रॅफिक आहे वाटतं,' बसमधला एखाद कोणीतरी बोलतो. पहिल्यांदा प्रवास करत असाल, तर वडखळचा परिचय होतो, तो असा!

वडखळला स्वत:चं असं एक व्यक्तिमत्त्व आहे. आता या परिसरात आजूबाजूला जिंदाल स्टील वर्क्स या कंपनीचे शेकडो मजूर वावरताना दिसतात. त्यांच्या चेहर्‍यावर धुळीचा राप असतो, नजर खोल गेलली असते. हाती येतील ते कपडे घालून धुळीने भरलेलं हेल्मेट आणि तसेच गमबूट घालून ते मुकाट्याने खाली मान घालून कामाच्या ठिकाणी जात असतात. वडखळ हे त्या मजुरांसारखंच आहे. फार तर डोक्यावर मळलेली गांधी टोपी, गुडघ्यापर्यंत वर आलेलं धोतर किंवा पंचा, मळलेला धुळकट सदरा, दाढीचे खुंट आलेला माणूस. वडखळवर मनुष्यत्त्वाचा आरोप करायचा, तर ते असं दिसेल.

पण इतर वेळी धूळ, तेल आणि पावसाळ्याच्या दिवसांमध्ये चिखल ही एवढीच काही वडखळची ओळख नाही. अलिबाग किंवा कोकणात जाणारी एसटी पूर्वी वडखळच्या त्या छोटाखानी एसटी थांब्याच्या आत शिरायची. जेमतेम दोन मिनिटं थांबायची आणि मग पुढे मार्गस्थ व्हायची. पण त्या दोन मिनिटांमध्येही उसाचा रस, आलेपाकाच्या वड्या, गरमागरम वडे, चहा, वेफर्सची पाकिटं वगैरे विकणार्‍यांची झुंबड उडायची. वडखळचा विलोभस चेहरा तेव्हा दिसायचा. स्वत:ची गाडी असणारे लोक पेण वगैरे भानगडीत न पडता वडखळला हमखास थांबा घ्यायचे. मुंबईच्या कचाट्यातून सुटून पुढे 30-40 किलोमीटर आलं की, मुख्य कोकण रस्त्याला लागण्याआधीचा हा थांबा!

वडखळच्या त्या छोटेखानी स्टँडसमोर एक पेट्रोल पंप आहे. बाजूला आमंत्रण नावाचं अत्यंत रूचकर पदार्थ खाऊ घालणारं हॉटेल आहे. स्टँडच्या एका बाजूला मुंबईच्या दिशेने बाजार लागतो. अलिबाग पट्ट्यातल्या सुप्रसिद्ध पांढर्‍या कांद्यांच्या माळा, चिक्की, पेणचे पापड, सुकट मासळी असे पदार्थ तिथे हमखास विकायला ठेवलेले असतात. आता, असायचे, असं म्हणावं लागेल. स्टँडच्या दुसर्‍या बाजूला दोन-तीन बर्‍यापैकी हॉटेलं होती. तिथल्या एका हॉटेलमध्ये खाल्लेल्या वड्याची चव अजूनही जिभेवर आहे. वडा, भजी, चहा आणि मिसळ या चतु:सूत्रीवर या हॉटेलांनी वडखळच्या व्यक्तिमत्त्वात रंग भरले होते.

इथे चहा प्यायला की, कोकणच्या पुढल्या प्रवासाला मंडळी सज्ज होत. तीच गत कोकणातून मुंबईकडे परतणार्‍यांची! मुंबईच्या गर्दीत हरवून जाण्याआधी गावच्या वातावरणाच्या काही शेवटच्या आठवणींमध्ये रेंगाळण्याचं ठिकाण म्हणजे वडखळ! चहाच्या प्रत्येक घुटक्यासोबत त्या आठवणींचा निचरा केला की, मग मन आणि शरीर ताजंतवानं होऊन मुंबईच्या वाटेला लागतं.

वडखळ नाक्यावरचा रस्ता माझ्या आठवणीत तरी कधीच चकाचक किंवा विनाखड्डे दिसलेला नाही. आयुष्यभर काबाडकष्ट करणार्‍या माणसाच्या हाताला जसे घट्टे असतात, तसेच खड्डे या वडखळ नाक्यावरच्या रस्त्याच्या भाळी कोरलेले आहेत. त्यामुळे कोकणात जाताना किंवा येताना वडखळ नाका सतत, 'हळू चालवा, रे बाबांनो', असं सांगतोय, असंच वाटतं.

आता मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचं काम बहुतांश झालं आहे. ते सुरू होणार होतं, तेव्हा वडखळला कसा काय चौपदरी रस्ता करणार, असा एक प्रश्न डोक्यात आला होता. पण काही दिवसांपूर्वी या मार्गावरून गेलो. कर्नाळा वगैरे कधी गेलं, तेदेखील कळलं नाही. आता वडखळला चहा घ्यायला थांबू, असा होरा होता. पण कसंच काय! वडखळ आलं कधी आणि गेलं कधी, काहीच पत्ता लागला नाही. कारण वडखळ रस्त्यात लागलंच नाही. जुन्या प्रियकराला चुकवण्यासाठी त्याच्या गल्लीऐवजी लांबचा वळसा घालून गेल्यासारखी गाडी वडखळच्या बरीच लांबून गेली आणि एकदम चुकचुकल्यासारखं झालं.

एक मन म्हणत होतं की, बरं झालं. वडखळच्या वाहतूक कोंडीतून सुटका झाली. पण दुसर्‍या मनाला तिथल्या त्या गरमागरम वड्याचा गंध खुणावत होता, पांढर्‍या कांद्यांच्या माळांचा थंडावा सुखावत होता. परत येताना मुद्दामहून वडखळ लागेल, अशा हिशोबाने आलो. वडखळची रयाच गेल्यासारखी झाली. एकेकाळच्या दिमाखदार हवेलीच्या भिंतीचे पोपडे उडावेत आणि तुळयांना वाळवी लागून ती हवेली उद्ध्वस्त व्हावी, असं काहीसं वडखळचं झालं होतं. चहावाल्याने आपला ठेला गुंडाळला होता. गरमागरम वडे देणारं ते हॉटेल बंद झालं होतं. कांद्यांच्या माळा दीनवाण्या होऊन नुसत्याच लटकत होत्या.

नव्या महामार्गावरून प्रवास वेगवान झाला, यात काही वादच नाही. पण एक जुना थांबा कायमचा हरवला, याची चुटपूट लागून राहिली. त्या दिवशी रस्त्यात वडखळ लागलंच नव्हतं. आता मी माझ्या हरवलेल्या वडखळचा पत्ता शोधतोच आहे.

संग्रहित post - लेखक अनामिक

 अर्थसंकल्प...

1)LIC चे खाजगीकरण करून सरकारने "जिंदगी के साथ भी" बाद अस मिरवणारया कंपनीला रितसर अश्व लावलाय,तसेच एजंट आता सरकारी कंपनी आहे असं सांगुन बोर करणार नाहीत.तसेच ही कंपनी एखाद्या खाजगी देशभक्त अंबाणी याच्या हाती जाऊन हे पुन्हा नव्याने भारतीयांची सेवा करतील यात शंका घेण्याचे कारण नाही.
2) पेट्रोल,डिझेल,गॅस दरवाढ यामुळे एकतर राऊंडफिगर शंभर रूपये देता येणार पंपावर चिल्लरचा वांदे होणार नाहीत पंपावर वेळ वाचेल तसेच महाग झाल्याने आतंकवादी नक्षलवादी पेट्रोल डिझेल विकत घेणार नाहीत तसेच लोक अंगावर ओतुन जाळुन घेण्याचं प्रमाण कमी होईल.तसेच गॅस महाग झाल्याने गृहीणी गॅस चालु ठेऊन सिरीयल पाहणार नाहीत हा मुख्य हेतू शासनाचा आहे. 
3) जेट एअरवेज विक्री:पेट्रोल आणि डिझेल एवढं महाग झाल्यावर कमी ऐवरेजचे विमान ठेवुन काय उपयोग यामुळे विमानतळ विक्रीचा निर्णय घेतला.
4)बांबुच्या वस्तूवर विशेष सुट हा अतिशय महत्वाचा निर्णय शासनाने घेतलाय.यामुळे तिरडीचा खर्च सर्वसामान्यांच्या बजेटमधे बसणार आहे जगणं जरी महाग वाटत असेल तर मरण शासनाने स्वस्त केलंय आता लोक हव तेव्हा मरू शकतात.
5) 15 वर्षे जुनी कार आता थेट भंगारात जाणार आपल्याला दर पंधरा वर्षाला नविन माॅडेल दारात येणार तेही पाच वर्षाच्या इंन्शुरन्ससह.
6)आय.डी.बीआय,पवनहंस,आरपीसीएल या जुनाट कंपन्या विकुन खाजगी देशभक्तांना सेवेची संधी मिळणार.
7)या अर्थसंकल्पाने आपण महासत्तेकडे जाणार आहोत नोटबंदी,जी.एस.टी.या अर्थक्रांती मुळे आज आपण शंभराचे पेट्रोल,डिझेल,तसेच विमानाने फिरू शकत आहोत चारशेचा गॅस आपण आज आठशेला अगदी सहजतेने घेत आहोत हे शक्य झालं शेठमुळ तसेच आपली कार हावसाने भंगारात घालुन त्यावर नवीन कार विकत आणणार एवढ अर्थसंपन्न आपण आज झालो आहोत.पुर्वी आपण लाईटबील भरत नव्हतो आता आपण तीन महिन्याला GST भरत आहोत.150₹डीश टि.व्ही आपण आज तेवढेच चॅनल तीनशेत मजेत पाहत आहोत.मोबाईल लाईफटाईम होत ते सरकारने बंद करून 28 दिवसांच्या महीन्यासह प्रतीमहीना पाचशे वर बजेट नेण्याचं काम केल आहे.हे सगळं एकटे मोदी करणं शक्य नाही यामागे अनिल बोकील सारखे अर्थतज्ज्ञ, एम ए पास उर्जित पटेल सारखे गव्हर्नन्स व लोणच्याच्या भरणी सह प्रसिद्ध झालेल्या सितारामण सारख्या अर्थमंत्री आहेत.ही विद्वान मंडळीने भारताचे एवढे कल्याण केले आहे की कोरोना काळात वीस लाख कोटीचे पॅकेज जाहीर केल घराघरात पंधरा लाख आधीचे आणी या वीस लाख कोटींचे हिस्सा आला यामुळे आता पेट्रोल डिझेल राऊंडफिगर शंभर करावे तसेच गॅस एक हजार रूपये राऊंडफिगर करावा.तसेच उरल्या सुरल्या सरकारी कंपन्या विकुन अंबाणी कुटुंबाला सेवेची संधी द्यावी. तसेच देशद्रोही शेतकरयाच्या अन्नावर बहिष्कार घालुन पतंजलीच्या गौरया खायला द्याव्यात.या अर्थसंकल्पावर सर्व सामान्य लोक आनंदाने स्वागत करत आहेत.पेट्रोल डिझेल चे काही होईल पण बांबु स्वस्त झालेत याचा आनंद खुप मोठा आहे.
 😜 😄

रणजित डिसले गुरूजींना अनावृत्त पत्र....

काय गुरुजी हे वागणं बरं नव्हं! तुमचे शिक्षक बंधू त्यांना आतापर्यंत कायमच मुलांना शिकवायला किती अडचणी आहेत, अशैक्षणिक कामे, खिचडी शिजवणे, निवडणुकांचे कामे, निरनिराळे सर्व्हे याच अवडंबर करून सहानुभूती मिळवीत होते. सरकार कोणाचेही येवो त्यावर टीका करून आगपाखड करण्यात धन्यता मानत होते.

वेळेवर पगार होत नाही, शासन कायम निरनिराळ्या कामाला जुंपून, मानगुटीवर बसून किती काम करून घेते याची हातभर यादी आणि रडगाणं शाळेतल्या पोरांचा पुढे त्यांच्या आईबापापुढे समाजापुढे करीत होते.
सगळं कसं छान चाललं होतं.

आम्हाला वाटलं तुम्ही पण त्यांच्यातलेच पण तुम्ही कोणत्या जन्माचा दावा साधला हो, त्यांना समाजापुढे पार नंग उघड करून ठेवलत की तुम्ही, कुठे फेडाल हे पाप? त्यांनी आत्तापर्यंत शासनाविरुद्ध आवाज उठव, आंदोलन कर हे करीत आले. आतापर्यंत पगार कसा कमी आहे, पाचव्या, सहाव्या, सातव्या वेतन आयोगात आमच्यावर कसा आर्थिक अन्याय झालाय याची तांत्रिक आणि तर्कशुद्ध मांडणी, युक्तिवाद करीत होते. आणि या साऱ्याचा आमच्या शिकवण्यावर कसा विपरीत परिणाम होतो, विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या गुणवत्ता घसरणीला ही सर्व कारणे कशी कारणीभूत आहेत हे ते पटवून देत होते. पण तुम्ही सगळ्यावर पाणी फिरवलं.

पण तुम्ही भलतच काही केलं. इतरांसारख्याच सगळ्या अडचणी असतानाही तुम्ही केवळ तालुक्यात,जिल्ह्यात, राज्यात, देशात नाही तर संपूर्ण जगात शिकवावं कसं हे दाखवून दिलं आणि त्यांची गोची करून टाकली. लोकं आता येड्यावानी शाळा कॉलेजात प्रत्येक शिक्षकात रणजित डिसले पाहतील.

आजवर गावंगन्ना पुढाऱ्याला हाताशी धरून लय तर लई राज्य पुरस्कार, मोठाच वशिला लावून राष्ट्रीय पुरस्कार मिळवायचं माहिती होतं, पण तुम्ही हा जागतिक पुरस्कार मिळवून पार गोची केलीत हो. 

काहींनी कर्तृत्वाने जिल्हा परिषद शाळांची वाट लावली त्यामुळे आपोआपच पुढाऱ्यांना गावोगावी इंग्रजी शाळा काढून शिक्षणाचा धंदा उभा करता आला. शिक्षण सम्राट होता आलं. आज त्या इंग्रजी शाळांनाही तुम्ही चव्हाट्यावर आणले त्यांचेही बिंग फोडलं आणि जिल्हा परिषद मराठी शाळा ही जागतिक दर्जाची असू शकते हे सिद्ध केल, हे महापाप तुम्ही कुठे फेडणार? तुमच्या ह्या असल्या वागण्यामुळे सगळ्यांना आता काम करावे लागतील. कर्तबगारी दाखवावी लागेल. 

वर्गातली/शाळेतली/कॉलेजातली पोरं आणि त्यांचे आईबाप आज पर्यंत शिक्षकांच्या नजरेला नजर भिडवत नव्हती. आता त्यांच्या नजरेतून ते प्रश्न विचारतील याचे उत्तर आता त्यांनी कशी द्यायची? एकदा नोकरीला चिकटलं की रिटायर होईपर्यंत कायम रडगाणं गात दिवस ढकलायचे एवढंच अनेकांना माहीत होत.

तुम्हाला अशैक्षणिक कामे, खिचडी शिजवणे प्रशिक्षणे ही सर्व कामे करावी लागत नव्हती का ? या कामातुन सुटका होती का ? जर तुम्हीही ही सारी कामे करत होता तर मग ही कामे इतरांची लंगडी सबब ठरते आहे का ? हायस्कुल व कॉलेज ला तर ही कामे ही नाहीत मग हे सारे कशाच्या मागे लपत आहेत?
तुम्ही रडले नाही, भेकले नाही, कोणाला दूषणे दिली नाहीत, कोणत्याही कामाचं अवडंबर केलं नाही. ही अंत:प्रेरणा, स्फूर्ती तुम्हाला कोठून आणि कशी मिळाली? निव्वळ पाट्या टाकण्या व्यतिरिक्त एवढं जागतिक दर्जाचे अवाढव्य काम करायला तुम्हाला वेळ कसा मिळाला? शिक्षक संघटना, शिक्षकांच्या पतसंस्था, बँका आणि त्यातील राजकारण यापासून तुम्ही अलिप्त कसे राहिलात?

तेव्हा इतरांना रणजित डिसले हे जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक आहेत याचा अभिमान वाटत असेल तर त्यांनी निरनिराळ्या अडथळ्यांवर, संकटांवर त्याचा बागूलबुवा न करता कशी मात केली, कोणतीही सबब सांगितली नाही याचा आदर्श घ्यावा लागेल. मराठी माध्यमाच्या शाळा केवळ टिकवणे एवढेच नाही तर त्या अधिक सक्षम कराव्या लागतील. हे सगळ्यांच्या लक्षात आले, समजले, पटले पाहिजे. 
आणि त्याच बरोबर केवळ डी.एड., बी.एड. केलं म्हणून मी बुद्धीने/डोक्याने शिक्षक आहे या पेक्षा मी हृदयातून, अंतकरणापासून शिक्षक आहे, शिकवण हे सर्वस्व आहे हे आतून आलं पाहिजे.
डिसले गुरुजी तुम्ही केवळ तुमच्या शिक्षक बंधूंना मार्ग दाखवण्यासाठी केवळ दिवा नाही तर करोडो वॉटचा सुर्यासारखा प्रखर उजेड दाखवला आहे. 

आज अनेक शिक्षक तुमच्याप्रमाणेच खूप मन लावुन, तन-मन-धन अर्पून शिकवतात, चाकोरीच्या बाहेर जाऊन निरनिराळे प्रयोगही करतात, पण त्यांची संख्या एकूण शिक्षकांच्या मानाने खूपच कमी आहे. त्यांना तुमच्या या यशामुळे अधिक चांगले काम करायला स्फूर्ती मिळणार आहे, तर अनेक ज्यांची पाटी कोरी आहे, नवीन आहेत त्यांना तुमच्या निमित्ताने प्रेरणा व मार्ग मिळाला आहे. 

तुमच्या भेटीचा योग कधी आला नाही, पण या क्षेत्रात काम करीत असल्याने तुमच्या कार्याची माहिती नेहमी कानावर पडत होती, मिळत होती.
खूप कमी वयात तुम्हाला हे उत्तुंग यश मिळालं आहे, मिळालेल्या पारितोषिकाची रक्कमही तुम्ही जागेवरच योग्य ठिकाणी वाटायला सुरवात केली आहे, त्यामुळे तुमच्या या व अशा कृती पाहिल्यानंतर तुम्ही अतिशय विचारपूर्वक व शांतपणे पुढे जात आहात त्यामुळे तुमच्या डोक्यात या यशाची हवा जाणार नाही याची खात्री आहे.

सत्कार समारंभ, पारितोषिके, मोटिव्हेशनल भाषणे यात आता तुम्हाला अडकवण्याचा प्रयत्न होईल, पण त्यात तुम्ही फार अडकू नका, हे खरं तर तुमच्या आगामी कामातील, कार्यातील अडथळे ठरू शकतात, मूळ कामापासून तुम्हाला भटकवू शकतात.

आम्हा भारतीयांना खूप मोठ्या कालावधी नंतर असा शिक्षक तुमच्या रूपाने मिळाला आहे, तुमचे हे शिक्षकपण कायम अबाधित राहावे ही प्रार्थना! तुमच्या उत्तुंग यशासाठी हार्दिक अभिनंदन!!



राजेंद्र धारणकर,अध्यक्ष-सिस्कॉम

  १. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...