Showing posts with label प्रबोधन. Show all posts
Showing posts with label प्रबोधन. Show all posts

Wednesday, February 8, 2023

 ऑक्सिजन ची किंमत आता कळतीय! रोज एक झाड मानवाला किती ऑक्सिजन पुरवते!

आणि मानव झाडं तोडून त्याच झाडावर उभाराहून स्वतः च दाखवतो मीच माझ्या मृत्यूला कारणीभूत असेल!*

*अजून ही वेळ आहे प्रत्येक झाड वाचवा आणि दरवर्षी झाडं लावत रहा!*
*आज दवाखान्यात बिना ऑक्सिजन मरत आहेत उदया भर रस्त्यावर बिना ऑक्सिजन तडफडून मराव लागेल !*

🌳🌳🌳🌳🌳🌳

 महाराष्ट्र MSEB चे लाइट बील भरण्यास सर्व ग्राहकांचा बहिष्कार

आपण कधी वीज बिल बारकाईने पाहता का ?
मग आता पहा .............
स्थिर आकार - मार्च - २०१७ मध्ये रु. - ५५.००
स्थिर आकार - एप्रिल - २०१७ मध्ये रु. - ५९.००
स्थिर आकार - मे - २०१७ मध्ये रु. - ६०.००
स्थिर आकार - एप्रिल - २०१८ मध्ये रु. - ६२.००
स्थिर आकार - मे - २०१८ मध्ये रु. - ६५.००
आणि आता ऑक्टोबर - २०१८ मध्ये १५.०० रु. ची वाढ करून ८०.०० रु. केला आहे.
प्रत्येक महिन्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या देयकाचे बारकाईने वाचन करा. सदरच्या बिलात स्थिर आकार या महिन्यापासून म्हणजे ऑक्टोबर - २०१८ पासून १५.०० रु. ची वाढ करून ८०.०० रु. केला आहे.
आणि एप्रिल २०२१ पासुन १०० रूपये ग्रामीण भागासाठी व ११० रूपये शहरी भागासाठी , 
या आधी एका नवीन आकाराची भर टाकली होती त्या नवीन आकाराचे नांव आहे. वहन आकार @1.18 Rs /U. त्या आकारामुळे मागील बीलाच्या एकूण ३५ ते ४० % नी वीजबिलात वाढ झालेली आहे. प्रत्येक महिन्यात कोणता ना कोणता आकार वाढवून वीज वितरण कंपनी अक्षरशः आपली दिशाभूल करत आहे व आपण त्याकडे दुर्लक्ष्य करत आहोत. या विरोधात कोणी आवाज उठवेल का?
वीज वितरण कंपनीच्या ग्राहकांनो ही अचानक केलेली वाढ आपणास परवडणारी आहे का? विचार करा. या विरोधात आवाज उठवला नाही तर ठराविक अंतराने नवनवीन आकारात भर पडतच राहणार आहे. 
कोरोना काळात लोकांना मदत करण्याऐवजी लूटमार ! 
        कृपया हा मेसेज पुढे पाठवा सर्वांना ही झालेली वाढ माहीत नाही. वीज बिले बारकाईने वाचणारांची संख्या खूपच कमी आहे. 
ही post कोणत्याही सरकार / राजकीय पक्षाविरोधात नसुन सत्य परिस्थिती चे आकलन आहे .

🔍 ग्राहकांनो वेळीच जागे व्हा ! 🔍🙏🙏🙏

Sunday, January 22, 2023

 *🤝 आपला लोकप्रतिनिधी निवडताना उमेदवार कसा असावा तर तो समाजाच्या अडीअडचणी सोडवण्याची तळमळ करणारा असला पाहिजे व समाजाच्या विकासाचा विचार करणारा असला पाहिजे, अश्या विचारांचे प्रतिनिधी आता नक्की निवडा...!!!*🤝🌹🌺🙏


*🤝 आपला लोकप्रतिनिधी नको त्याला कंत्राटाची अभिलाषा तर त्याला समाजसेवेची भावना असावी. त्याची निस्वार्थ पणाची भावना व पद्दत असावी...!!!*

*🤝 आपला लोकप्रतिनिधी असा असावा की त्यांनी गरीबातील गरीब व गरजू माणसांची निस्वार्थीपने कामे करावी...!!!*

*🤝 आपला लोकप्रतिनिधी असा असावा त्यांनी सर्वसामान्य माणसांची सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, पाणी इत्यादि मूलभूत गरजा पूर्ण करण्याचा ध्यास घेणारा असावा...!!!*

*🤝 लोकप्रतिनिधी फक्त ठेकेदार व नात्यागोत्यांचा विचार न करता सर्वांची जी मागणी असेल ती प्राधान्यने पूर्ण करणारा असावा...!!!*

*🤝 लोकप्रतिनिधी हा सर्व मूलभूत गरजा पूर्ण करणारा व सर्वांगी विकास करणारा असावा, त्यांनी स्वतःचेच मित्र,जवळचे नातेसंबंधित, जवळचे राजकारणी यांचीच कामे करुन त्यांच्याच विकास पहाणारा स्वार्थी नेता नसावा...!!!*

*🤝 लोकप्रतिनिधिने कामे सर्वांचीच करावी, त्याने साधन, संपत्ती, पैसा, साम, दाम, दंड़ भेद याची घमेंड करुन व तसा वापर करुन लोकांच्यावर प्रभाव टाकू नये. दलबदलू, इकडून तिकडे उड्यामारणारा, स्वार्थी व चंचल स्वभावी, लाचखोर लोकप्रतिनिधिना त्यांची जागा दाखवाच ...!!!*

*🤝 लोकप्रतिनिधिला पैशाची घमेंड अजिबात नसावी, त्याला सर्वाना एकत्र घेऊन सामोरे जाण्याची सवय असावी, त्याला लोकांचे तंटे मिटवण्याची सवय व पद्धत असावी तर त्याला लोकांचे तंटे लावण्याची सवय नसावी...!!!*

*🤝 लोकप्रतिनिधीची भाषा काट्याने काटा काढण्याची नसावी तर ती सौम्य, प्रमाणिक, प्रेमळ असावी, मनात कपट नसावे...!!!*

*🤝लोकप्रतिनिधीची मैत्री विरोधकांशिवाय असावी, त्यांच्याशी विचारांची, दिलदार पणाची लढाई व्हावी...!!!*

*🤝 लोकप्रतिनिधिने ज्येष्ठ नागरिक, विचारवंत, साहित्तिक, विद्वान, उच्चशिक्षित, निपक्ष पत्रकार यांचा आदर करुन सन्मान द्यावा...!!!*

*🤝 लोकप्रतिनिधि हा जनतेचा सेवक असतो, त्याने ज्येष्ठांची किंमत राखली पाहिजे व कनिष्ठांची मने जिंकली पाहिजेत...!!!*

*🤝 लोकप्रतिनिधिने आपल्या मार्जितील लोकानचीच फक्त कामे न करता सर्वसामान्यांची कामे देखील सहज वेळोवेळी केली पाहिजेत...!!!*

*🤝 लोकप्रतिनिधी हा दिलेला शब्द पक्का पाळनारा असावा, त्यांनी निवडणुकीच्या वेळी दिलेली आश्वासने व पक्या शब्दांची जाणीव ठेवावी...!!!*

*🤝 लोकप्रतिनिधी ज्या पक्षातून अथवा अपक्ष निवडून आल्यानंतर इकडुन तिकडे उड्या मारून लोकशाहिची व लोकांनची थट्टा करणारा अजिबात नसावा. जनतेच्या मतांची जाणीव ठेऊन प्रामाणिकता जपावी. लोकहिताची कामे करावी...!!!*

*🤝 जर लोकप्रतिनिधी प्रामाणिक व लोकांच्या मार्जितील असेल तर मग तुम्ही लोकांच्या आशिर्वादाने यशाची अणेक उंच शिखरे सहज गाठता येतील. त्यावेळी तडजोडीची वेळच येणार नाही, आणि तुम्हाला पाडण्याची कुणाचीही हिम्मतच होणार नाही...!!!*

*🤝 लोकप्रतिनिधीने कुणाचीही कुठल्याही कामात कधीही आडवणुक करू नये, आपल्या सोबत सर्व धर्म, जाती पातीचे राजकारण न करता सर्व माणसे जवळ करा...!!!*

*🤝 लोकप्रतिनिधिनी मतदार संघात विकासाची मशाल पेटवा, सर्वांशी बंधुत्वाची भावना ठेवा, मग तुमची समाजातील क्रेज बघा, छोट्या मोठ्यांशी सौजण्यानेच वागायची सवय करा...!!!*

*🤝 लोकप्रतिनिधिनीने साधन संपत्ती प्रामाणिक व कष्टाने मिळवावी, भ्रष्टाचारी मार्गाने संपत्ती कमावण्यासाठी कधीही काही यूनिट कडून हप्ते व देणगी रुपात भ्रष्ट मार्गाने पैसे घेण्याचा प्रयत्न करू नये व त्या मार्गाने जाऊ नये. आणि कधीही भ्रष्टाचारी व्यवस्थेची साथ देऊ नये...!!!*

*🤝 लोकप्रतिनिधी हारला तरी चालेल पण निवड करताना उमेदवार माणसेही जीवाभावाची, प्रामाणिक, सच्चा निष्ठावंत उमेदवारीच असावी, म्हणून निवड करताना अशाच माणसाची निवड करा. मला वाटतं हीच खरी कसोटी आहे सुजाण, सुज्ञ नागरिकांची व सुजाण नेतृत्वाची हीच खरी कसोटी असते...!!!*

*🤝 जागृत नागरिक यांनी निवडणुकीत पैश्याची उधळण करणारे, भीती व दडपशाही, दादागिरी दाखवणारे उमेदवार नकोच हीच सुज्ञ सनदशील प्रत्येक नागरिकांचे कर्त्यव्य आहे. त्यासाठी प्रत्येक नागरिकाने मोलाची, मैत्रीची, विश्वासाची व विकासाची साथ ही दिलीच पाहिजे...!!!*

*#“हाक_तुमची_साथ_आमची"...!!!*🙏

*

Friday, January 20, 2023

मतदान स्लीप थेट आपल्या मोबाईलवर !

 जय महाराष्ट्र !


आता मिळवा आपली मतदान स्लीप थेट आपल्या मोबाईलवर !
8822288222 हा नंबर सेव्ह करून तुमचा मतदान कार्ड नंबर
( उदा. HXY363838 )
या नंबरवर व्हाॅट्स अप्प वर पाठवा व लगेच तुमची मतदान स्लीप मिळवा.

किंवा खालील लिंकवर जाऊन आपला मतदान कार्ड नंबर व्हाॅट्स अप करा व मतदान स्लीप मिळवा...


========================================

🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
" *मतदार यादीत जर आपला फोटो नसेल तर आपणांस मतदान करता येणार नाही*" 
निवडणूक आयोगाचा नवीन नियम आपला व आपल्या कुटुंबियांचा,मित्रांचा,नातेवाईक व शेजारी यांचा फोटो मतदार यादीत आहे का ते 👇🏻ह्या साईट वर पडताळून पहा.  
 *https://ceo.maharashtra.gov.in/SearchList/* ह्या वेब साईट वर टाकल्यावर आपल्याला आपला फोटो आहे की नाही ते समजते. नसेल तर *दि. 8 जुलै, 2021 च्या आत फोटो मतदार यादीत टाकून घ्या*.

*जय महाराष्ट्र 🚩

Monday, January 9, 2023

मॅडम DP छान आहे


श्वेता पेंढारकर
तो म्हणाला DP छान आहे
विसरले माझे भान आहे
म्हटलं मी ok धन्यवाद दादा
माझा पती माझी जान आहेत...

असू दे म्हटला मॅडम
मला त्याचा ही मान आहे
पण दादा नका म्हणू मला
माझ्या बहिणी माझी शान आहेत

Dp छान म्हणत म्हणत
जेवणाची विचारपूस झाली
कधी येतात जातात पती
सगळी माहिती घेऊन झाली

हळू हळू मग मुले किती
आणि राहता कुठं हो मॅडम
घरात चौकोनी कुटुंब की
सासू सासर्याचा पण असतो वावर

Dp छान वरून चर्चा पहा कुठं गेली
सावध हो ग हरिणी सावध हो हरिणी
ग्रुप मधून जर पर्सनल ला आलं कोणी
माहिती जुजबी दे थोडी वाग वरकरणी

माहिती देवाण घेवाण करताना
विसरू नकोस भान
समूहातील प्रत्येकजण
राखत नसतो माणुसकीचा मान...!!

 माजी पंतप्रधान #अटलबिहारी #वाजपेयींनी लिहिलेली ही कविता मोदी भक्तांना सादर !"


उठो द्रौपदी वस्त्र संम्भालो
अब गोविन्द न आयेंगे।

कब तक आस लगाओगी तुम
बिके हुए अखबारों से।

कैसी रक्षा मांग रही हो
दु:शासन दरवारों से।

स्वंय जो लज्जाहीन पड़े हैं
वे क्या लाज बचायेंगे।

उठो द्रोपदी वस्त्र संम्भालो
अब गोबिन्द न आयेंगे।

कल तक केवल अंधा राजा
अब गूंगा बहरा भी है।

होंठ सिल दिये हैं जनता के
कानों पर पहरा भी है।

तुम्ही कहो ये अश्रु तुम्हारे
किसको क्या समझायेंगे।

उठो द्रोपदी वस्त्र संम्भालो
अब गोबिन्द न आयेंगे।

छोड़ो मेंहदी भुजा संम्भालो
खुद ही अपना चीर बचा लो।

द्यूत बिठाये बैठे शकुनि
मस्तक सब बिक जायेंगे।

उठो द्रोपदी वस्त्र संम्भालो
अब गोविंद न आयेंगे।

.... अटलबिहारी वाजपेयी

बहुजन तरुणांच्या आईबापांसाठी -

 बहुजन तरुणांच्या आईबापांसाठी -


मंडल आयोग, रथयात्रा, बाबरी पतन, 92-93 च्या मुंबई दंगली, नामांतर आंदोलन या जागतिकीकरण स्वीकारायच्या आधीच्या आणि नंतरच्या एकूण 5-6 वर्षातल्या काळात घडलेल्या आंदोलनात आणि दंगलीत महाराष्ट्रातील लाखो मराठा, महार, मुसलमान, OBC तरुणांची दंगलखोर म्हणून पोलीस दफ्तरी गुन्हेगारी नोंद झाली आणि नव्याने स्वीकारलेल्या जागतिकीकरणात पटापट नोकऱ्या निर्माण होत असताना या लाखो तरुणांना हातात डिग्री असूनसुद्धा बेरोजगार राहावे लागले. 

याच काळात पुण्या-मुंबईतून कॉम्प्युटरची डिग्री सोडा, अवघे काही महिन्याचे सर्टिफिकेट कोर्स केलेले प्रामुख्याने ब्राम्हण समाजातील तरुण या सर्व कोलाहलात सहभागी न होता अमेरिकेत, युरोपात नोकऱ्या करायला अक्षरशः झुंडीने जायला लागले. पुण्यात पेठेत 10 बाय 10 च्या खोलीत राहणाऱ्या या कुटुंबांनी पुढे याच पोरांनी अमेरिकेतून कष्ट करून पाठवलेल्या पैशातून प्रभात रोड, कोथरुड, एरंडवणे भागात चांगली घरे आणि गाड्या घेतल्या. जागतिकीकरणाचा खरा फायदा या तरुणांनी करून घेतला.

आज जेव्हा अमेरिकेचे नागरिकत्व किंवा ग्रीन कार्ड घेतलेली ही 90-92 सालची तरुणाई (आजची पन्नाशी ओलांडलेली पिढी) जेव्हा भारतात सुट्टीसाठी काही दिवस येते तेव्हा त्यांना रिक्षा किंवा ओला-उबर मध्ये फिरवायला, त्यांची व्यवस्था बघायला त्यांच्याच पिढीतील दंगली-आंदोलनात वाया गेलेली बहुजनांची पिढी लाचारपणे हजर असते. आजही आपल्याकडे पानटपऱ्या चालवणारे पन्नाशीतले बहुजन लोक आशिकी, फुल और कांटे ही त्यांच्या उमेदीच्या काळातली गाणी ऐकत बसतात, त्या पोरींच्या आठवणीत ज्या ह्यांच्या बेरोजगारीमुळे दुसरीकडे लग्न करून गेल्या.

आपल्या पोराने जर आयुष्यभर रिक्षा/टॅक्सी चालवू नये, विना अनुदानित शाळेत मास्तरकी करू नये, हमाली करू नये, कर्जबाजारी होवून शेतात फास घेवू नये, उतारवयात कुणापुढे लाचारीने हात पसरू नये असे वाटत असेल ना.... तर सगळ्यात पहिल्यांदा चौकातल्या राजकीय पक्षाच्या आणि संघटनेच्या फ्लेक्सवर दिसणाऱ्या आपल्या पोराच्या एक मुस्काटात फोडा (पोलिसांनी ते करण्यापेक्षा आईबापाने करणे केव्हाही चांगले!) आणि त्याला अभ्यासाला लावा. कुठलाही मोदी, गांधी, पवार, फडणवीस, ठाकरे, भिडे, मुंडे, पाटील तुमच्या घरातील चूल रोज पेटवायला येणार नाहीये. तुमच्या पोरावर केसेस पडल्या तर कुणी जामीन करायला येणार नाहीये.

आजच्या काळात आयुष्यात पुढे जायचे असेल तर तुमच्या पोरा-पोरींचे आदर्श गांधी, आंबेडकर, नेहरू यांसारखे विद्वान आणि विधायक मार्गाने सामाजिक बदल घडवून आणणारे नेते पाहिजेत. तिघेही आधी बॅरिस्टर होते आणि नंतर समाजाला शहाणपण शिकवायला गेले होते. राजकीय पक्ष, सामाजिक संघटना वगैरे दलिंदर गोष्टीत, मोर्चात, बैठकीत, मोहिमेत आणि दंगलीत जर तुमचे अर्धशिक्षित कुलदीपक जात असतील आणि तुम्ही त्यांना थांबवत नसाल तर आईबाप म्हणून तुम्ही नालायक आहात आणि तुमच्या पोरांचे सगळ्यात मोठे वैरी आहात! थोडी अक्कल येवू द्या!!!

- डॉ. विनय काटे


*एका माणसाने खरंच वाटी भर पाणी पक्षांसाठी ठेवले आणि पुढे काय घडलं?*

त्या पक्षांमधे आणि माणसामधे काय संवाद झाला ?त्याचे वर्णन खालच्या कवितेत केलय.

(Unfortunately कवीवर्यांचे नाव कळले नाही) 

*वाटीत पाणी बघता*
*ऐटीत पक्षी आला*
*चोचीत थेंब घेता*
*मना मधे म्हणाला*

*येतो घेउनि आता*
*घरट्यातल्या पिलाला*
*सोय आजची हि झाली*
*भय उद्याचे कशाला*

*वाटीतल्या जळाची*
*चर्चा चिकार झाली*
*गावात विहगांच्या*
*सभेत नोंद झाली*

*आहे कुणीतरी या*
*गावात चांगाला बा*
*पात्रात पाणी ठेवी*
*म्हणतो आम्हास हे घ्या !*

*धामात सज्जनाच्या*
*काही पक्षीगण गेले*
*हालवित पंख छोटे*
*त्यातील एक बोले*

*पात्रात पाणी या का*
*आम्हास ठेवले तू*
*नाही मनुष्य आम्ही*
*तरी परोपकारिले तू।*

*जातीस जात भीते*
*हे दीस आजचे आले*
*माणूस माणसाशी*
*आज शत्रुसमान वागे*

*हे रोज पाहण्याची*
*सवय आम्हाला झाली*
*हे असे असता पाणी*
*कोण परांस घाली?*

*हे पहावया मनुजा*
*तुझ्या समीप आलो*
*उपकार कसा मी घेउ?*
*म्हणुन बोलता झालो*

*ऐकुन प्रश्न भोळा*
*यजमान सुन्न झाला*
 *लज्जीत वदनाने*
*पुढे बोलता झाला*

*हे दान नाही मित्रा*
*उपकार फेडतो मी*
*वाटीतल्या जलाचे*
*काज सांगतो मी*
  
*तोडले वृक्ष आंम्ही*
*निसर्ग उजाड झाला* 
*उखडून घरटी तुमची*
*विश्राम आम्ही केला*

*वनास तोडून आम्ही*
*शहरात वास केला*
*उत्तुंग इमारतीचा*
*आम्हीच माज केला*

*परंतु विश्रामधामी*
*विश्रांती ना मनाला*
*तळमळ अंतरीची*
*न सांगता ये कुणाला*

*यंत्रे शोधुनी आम्ही*
 *श्रमचोर जाहलो रे*
*लाडावुनि गात्रे*
*रोगांत ग्रासलो रे*

*आरवशी प्रभाती तू*
*नी जातो मनाचा शीण*
*गुंताडल्या मनांची*
*का सहजी सुटे रे वीण*

  *सरसावशी आकाशी*
 *मी पहातो तुझी भरारी*
 *मरगळल्या मनाला*
*येते पुन्हा उभारी*
    
 *आकाश कवेत घेता*
 *करतोस येरझारा*
 *पाहुनी कसरती त्या*
 *मी विसरतो देहभाना*
       
*पहाटे जाग येते*
*तू सुरात जेव्हा गातो*
*कोण मनुष्य प्राणी*
 *काय तुलारे देतो?*
 
*बोल कृतज्ञतेचे*
*ऐकून त्या जनाचे*
*जलप्राशनामिषेने*
*सारा पक्षीवृंद नाचे*

🦜🦚पक्षीमित्र व्हा 🦚🦜

  १. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...