ब्लॉग विषयी...
सर्वांना सस्नेह नमस्कार !!
"माहितीदर्शन" नावाच्या या ब्लॉगवर आपल्या सर्वांचे मी स्वागत करतो. ब्लॉगचे नाव वाचल्यावर कदाचित हा "ब्लॉग" काढण्यामागील उद्देश तुमच्या लक्षात आला असेल. होय , समाजातील सर्वांना विविध अन वेगळ्या प्रकारची माहिती पुरविणे , ज्ञानात भर टाकणे तसेच त्यांच्यासाठी संदर्भ उपलब्ध करण्यासोबतच समाज प्रबोधन - समाज जागृती करण्याच्या हेतूने या ब्लॉग ची निर्मिती करण्यात आलेली आहे.या ठिकाणी लहान बालकापासून तरुण , प्रौढ ,स्त्री -वर्ग तसेच ज्येष्ठांना त्यांच्याशी संबंधित उपयुक्त माहिती वाचण्यासाठी -मिळवण्यासाठी हा ब्लॉग नक्कीच उपयोगी ठरेल.
शिवाय ऐतिहासिक संत, पराक्रमी राजे -महाराजे ,थोर महापुरुष, क्रांतिकारक यांची माहिती , महत्वाच्या लिंक / वेबसाईट , विविध शासकीय योजना , सोशल मीडियाचे जग ,विविध संस्था -संघटना परिचय, सुविचार , वैचारिक लेख संग्रह , दुर्मिळ छायाचित्रे याठिकाणी उपलब्ध असणार आहेत.
तेव्हा "सर्वांसाठी .. सर्वकाही" असणाऱ्या या माहितीदर्शन ब्लॉग चा आपण सर्वानी सदुपयोग करून घ्यावा आणि आपल्या प्रतिक्रिया तसेच काही नवे बदल -सूचना असल्यास कळविण्यात याव्यात. धन्यवाद
विशेष सूचना : कालानुरूप या ठिकाणी असलेल्या माहितीमध्ये बदल झालेला असू शकतो. तसेच या ब्लॉगवरील कुठल्याही माहितीचा/चित्राचा गैरवापर /दुरुपयोग केल्यास त्यासाठी या ब्लॉगचे संस्थापक /संकलक म्हणून आम्ही जबाबदार असणार नाही याची सर्वांनी नोंद घ्यावी
--पंकजकुमार ध्रुव पाटील
संस्थापक /संकलक / संग्राहक : माहिती दर्शन ब्लॉग
No comments:
Post a Comment