Monday, December 26, 2022

मराठी भाषेचे सौंदर्य


इलेक्ट्रिकच्या दुकानवाल्याने 
फलकावर लिहिलं होतं..
"तुमच्या बुध्दीचा प्रकाश पडो ना पडो, आमच्या बल्बचा नक्की पडणार".. 🤣

इलेक्ट्रॉनिक दुकानावर लिहिलेलं 
वाचून माझं मन भरून आलं ..
"आपला कुणी फॅन नसेल तर आमच्याकडून एक घेऊन जा "..😀

चहाच्या टपरीवर असाच फलक होता..
"मी साधा माणूस आहे पण चहा मात्र खास बनवतो.."🤣

एका उपाहारगृहाच्या फलकावर 
वेगळाच मजकूर होता ..
"इथे घरच्यासारखं खाणं मिळत नाही, आपण बिनधास्त आत या.." 🤪

पाणीपुरीवाल्यानं लिहिलं होतं..
"पाणीपुरी खाण्यासाठी मन मोठं नसलं तरी तोंड मात्र मोठं हवं" ..🤣

फळं विकणाऱ्या माणसाने 
तर कमालच केली. ..
"तुम्ही फक्त पैसे देण्याचे कर्म करा, फळं आम्ही देऊ ".. 🤣

घड्याळाच्या दुकानदाराने अजब 
मजकूर लिहिला होता ..
"पळणाऱ्या वेळेला काबूत ठेवा, पाहिजे तर भिंतीवर टांगा किंवा हातात बांधा.."🤣

ज्योतिषाने फलक लावला होता 
आणि त्यावर लिहिलं होतं.....😅
"या आणि फक्त १००
 रुपयांत आपल्या आयुष्याचे पुढील एपिसोड बघा ..."🤣

*आणि, आमच्या ग्रुपवर लिहीले होते* ......

*इथे दररोज येऊन तर बघा*






*सर्व अडचणी विसरून जाल*

😃😃😃🌹😃😃😃

 *जोपर्यंत तुम्ही एखाद्याला मदत करत आहात तोपर्यंत तुमच्या कौतुकाचा सोहळा चारचौघांत साजरा केला जातो पण एकदाका तुम्ही मदत करणं थांबवलं तुमच्या निंदेची खिरापत घरोघरी वाटली जाते कटू आहे पण सत्य आहे आयुष्य सोपं नसतं ते सोपं करायचं असतं थोडं संयम ठेऊन थोडं सहन करून आणि खूप काही दुर्लक्ष करून.मग थोडं नेहमीच्या दिनक्रमातून बाहेर डोकवायच मनाला प्रसन्न टवटवीत करणारे अनेक क्षण अनेक गोष्टी आपल्याच आजूबाजूला दिसतील बोलण्यापूर्वी शब्द आणि पेरण्यापूर्वी बी कोणतं वापरणार याचा विचार जीवनात जरूर करा नंतर विचार व करण्यात काही अर्थ नाही कारण त्याचा परतावा तोच मिळेल जो तुम्ही वापरला आहात चांगला गुरु यशाचे दरवाजे उघडून देऊ शकतो पण त्यातून यशाच्या दिशेने जाण्यासाठी स्वतःलाच चालावे लागते रानावनात एकाकी पडलेले फूल जसे कोणीही कौतुक करण्याची वाट न पाहता फुलत असते तसेच तुम्हीही कोणाच्या कौतुकाची वाट न पाहता तुमच्या प्रामाणिक प्रयत्नावर टिकून राहा कौतुक करणारेच तुम्हाला शोधत येतील आहारात सत्व वागण्यात तत्व आणि बोलण्यात ममत्व असेल तरच जीवनाला महत्त्व येते जर तुमचे विचार देवापाशी केलेली प्रार्थना आणि मनापासून केलेली इच्छा सकारात्मक असेल तर तुमचे आयुष्यही आपोआप सकारात्मक होत जाते वाईट कोणीच नसतं जीवनात अशी पण वेळ येते की माणूस कितीही खरा आणि चांगला वागला तरी तो कोणाच्या तरी मनासारखा न वागल्यामुळे वाईट ठरत असतो जिद्दीच्या प्रवासात शांतता अन संयम खुप महत्वाचा असतो शत्रू मिळवणंही वाटतं तेवढं सोपं नसतं त्यासाठी खूप चांगली कामं करावी लागतात आयुष्य सोपं नसतं ते सोपं करायचं असतं थोडं संयम ठेऊन थोडं सहन करून आणि खूप काही दुर्लक्ष करून मग थोडं नेहमीच्या दिनक्रमातून बाहेर डोकवायच मनाला प्रसन्न टवटवीत करणारे अनेक क्षण अनेक गोष्टी आपल्याच आजूबाजूला दिसतील कमाई चा अर्थ फक्त धन च मोजणे असा नाही तर अनुभव नाती मान सन्मान वागणूक संस्कार आणि आपण केलेली कामे हे सुध्दा कमाई मध्येच मोजले जाते संयम हीच जीवनातील खरी परीक्षा आहे जेवढा वेळ तुम्ही संयम ठेवून काम कराल तेवढेच तुमचे यश मोठे असेल माणसाने वेळेसोबत चालावे काळाप्रमाणे बदलावे परंतु काहीही झाले तरी आपल्या संस्कृतीला आणि संस्कारांना शेवटपर्यंत स्वतःसोबत ठेवावे यश ही तुमची सावली आहे तिला पकडायचा प्रयत्न करू नका तुमचा मार्गाने चालत राहा ती आपोआप तुमच्यामागे येईल लक्षात ठेवा सावली तुमच्या मागे येते जेव्हा तुम्ही प्रकाशाच्या दिशेने चालता चूक नसतानासुध्दा निव्वळ वाद टाळण्याकरिता मागितलेली माफी जीवनातील संयमाचं एक मोठं उदाहरण ठरतं आई वडील वयानं नव्हे तर काळजीनं म्हातारे होतात जेव्हा बाळ रडतं तेव्हा पुऱ्या बिल्डिंगला समजतं पण जेव्हा आई वडील रडतात तेव्हा शेजाऱ्यांनाही पत्ता लागत नाही ही जीवनातली सत्यता आहे कानाने ऐकलं तर फक्त शब्दांचा आवाज येतो परंतु मनाने ऐकलं तर शब्दांचा अर्थ समजतो*✍️

Saturday, December 24, 2022

स्वप्न*'Dream it, Belive it, do it'.

 *स्वप्न*

'Dream it, Belive it, do it'. या तीन शब्दांनी माझं आयुष्य बदलुन गेलयं. 'स्वप्न बघा, त्यावर विश्वास ठेवा आणि ती प्रत्यक्ष कृतीत आणा' असा त्याचा अर्थ. स्वप्नांशिवाय कुणाच्याही जीवनाला अर्थ नाही. प्रत्येकाने स्वप्न ही बघीतलीच पाहिजेत, मात्र ती जागेपणी. डोळे उघडे ठेऊन. आपण पाहिलेल्या स्वप्नावर आपली दृढ निष्ठा पाहिजे. विश्वास पाहिजे. आपलं अंत:करणापासून त्यावर प्रेम पाहीजे आणि ती प्रत्यक्ष कृतीमध्ये आणण्यासाठी, पुर्ण करण्यासाठी सतत कार्यरत झालं पाहिजे. तरच आपल्याला यश मिळतं.
       जी व्यक्ती सतत नवनवीन कल्पनांमध्ये मनापासून रमते ती व्यक्ती तिच्या मनात असलेली कल्पना एक दिवस खरी करुन दाखवतेच. जे लोक आपली स्वप्न उराशी बाळगुन ते साकार करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करतात त्यांना यश निश्चित मिळते. कोलंबस हा दुसऱ्या जगाची कल्पना उराशी कवटाळून होता. एक दिवस त्याने शोध लावलाच. बुद्धाने आत्मीक शांती आणि ताणतणाव नसलेल्या सुंदर जगाची कल्पना केली व ती प्रत्यक्ष साकार करुन दाखवली. कोपरनीकसननेही मोठ्या जगाची कल्पना प्रत्यक्षात उतरवुन दाखवली. अशी अनेक उदाहरणे शुन्यातुन विश्व निर्माण करणाऱ्याची देता येतील. त्यांनी स्वप्न कशी पाहिली आणि ती प्रत्यक्षात कशी साकार केली याचा अभ्यास केल्यास आपल्यालाही आपली स्वप्न साकार करणे कठीण जाणार नाही. आपण कुठलीही इच्छा व्यक्त करताना ती प्राप्त करण्यासाठीच करावी. मात्र ती इच्छा तत्काळ पूर्ण होईल अशी अपेक्षा ठेवणे चुकीचे आहे. धीर धरुन प्रयत्न केल्यानंतरच आपले इच्छापुर्ती होते हे लक्षात असू द्या.
        आपल्या देशाचे माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांनी युवांना संदेश देताना आपल्या भाषणामध्ये, 'छोटी स्वप्न बघणे हा गुन्हा आहे' असे सांगितले होते. ते सर्वार्थाने खरे आहे. स्वप्न पाहायची तर ती मोठी. भव्य-दिव्य आणि ती साकार करण्यासाठी प्रयत्नही करायचे ते ‌ शर्थीचे. यश नक्कीच मिळेल. मात्र स्वप्न पाहिले आणि अर्ध्यावरच प्रयत्न सोडले, तर हाती खूप मोठी निराशा येते. म्हणूनच सर्वात प्रथम स्वप्न असे पहा की कठोर परिश्रम करायला लागले तरी चालतील, पण साध्य होईल. आपली स्वप्न ही झोपल्यानंतर पडणारी वा वास्तवात न येणारी नसावीत. तर ती जागेपणी पाहिलेली असावीत. डोकं शांत ठेऊन, पूर्ण विचार करुन पाहिलेलं स्वप्न हे नेहमीच खरं ठरतं. ज्यांनी अशी स्वप्न पाहिली तेच पुढे गेले. मोठे झाले. दिवा स्वप्न पाहून काहीही उपयोग होत नसतो. असा माणूस फक्त कल्पनेत रमतो. वास्तवामध्ये मात्र त्याच्या पदरी मोठी निराशा येते.
       आपण जन्माला आल्यानंतर आपल्याला मिळालेल्या आयुष्यात आपण काही करुन दाखवलं नाही तर आपल्या जगण्याला काहीही किंमत उरत नाही. जिवंतपणी आपल्याला कुणी विचारत नाही आणि मृत्यूनंतर आपलं नावही कुणी काढत नाही. आपल्या उभ्या आयुष्यात आपल्या जगण्याचा आपल्या जन्मदात्या आई-वडीलांनाही उपयोग होत नाही की कुटूंबियांना आणि स्वतःलाही. म्हणूनच जे काही आयुष्य आपल्या हातात आहे. त्या आयुष्याचं सोनं करण्यासाठी प्रत्येकाने स्वप्न पहायला शिकलं पाहीजे. स्वप्न पाहताना आपण त्यांचं नियोजन व्यवस्थितपणे आखलं पाहिजे. डोळ्यासमोर आपल्या स्वप्नाशिवाय इतर काहीही न दिसता स्वप्नाकडेच आपली वाटचाल सुरु राहिली पाहिजे. ते पूर्ण होण्यासाठी कठोर परिश्रम करण्याची तयारी असली पाहिजे. तरच ती पूर्ण होतात. हेही लक्षात ठेवलं पाहिजे. स्वप्न सर्वच पाहतात. मात्र पुर्ण त्यांचीच होतात जे जिद्दीने पूर्ण झोकून देऊन त्यादृष्टीने वाटचाल करतात.
       स्वप्ने ही आपल्या जीवनाला महत्त्वाचे वळण प्राप्त करुन देतात. आपल्या इच्छा, आकांक्षा पूर्ण करण्यासाठी प्रभावी माध्यम ठरतात. चांगली स्वप्न आपलं जीवन आनंदी करण्याची प्रेरणा देतात. जीवन कसं जगावं ? हे शिकवतात. मात्र फक्त स्वप्न पाहणे आणि ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्न न करणे हे बऱ्याचवेळा हानीकारक ठरते. त्यामुळे जीवनात निराशा येते व आपण वाहत जातो. जीवनाची दिशाच बदलून जाते. म्हणूनच स्वप्न निश्चित करतानाच ते पूर्ण झाल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही, असा निश्चय केला पाहिजे. या निश्चयाच्या बळावरच आपण आपली स्वप्न पूर्ण करु शकतो. त्यासाठी कालावधी मोजला जाता कामा नये. एवढी वर्ष झाली तरी मला यश मिळत नाही ? माझे स्वप्न पूर्ण का होत नाही ? असे प्रश्न पडण्यापेक्षा माझं स्वप्न पूर्ण होण्यासाठी मी काय केलं पाहीजे ? स्वप्नपूर्तीसाठी मी कोणता योग्य मार्ग निवडायला हवा ? त्यासाठी कोणत्या चुका निस्तरायला हव्यात ? यादृष्टीने गांभीर्याने वेळोवेळी विचार केला पाहिजे. स्वप्नपूर्तीसाठी प्रत्यक्ष जगातील सर्व गोष्टी विसरुन अदृश्य जगतामध्ये, इतरांपेक्षा वेगळ्या पद्धतीने जगायला शिकलं पाहिजे. या जगण्यात खूप मोठा आनंद मिळतो. या विश्वात रमणारी व्यक्ती एक दिवस आपल्या भावविश्वातील कल्पना खऱ्या करुन दाखवते. आपली स्वप्न आपल्या उराशी कवटाळून ती साकारण्यासाठी तहानभुक विसरुन प्रयत्न करतात त्यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये स्वप्नपुर्तीचे यश मिळतेच मिळते.
     स्वप्न पाहणाऱ्यांनी धीर धरायला हवा. एका दिवसात सर्व काही मिळत नाही. कोणतीही इच्छा तात्काळ पूर्ण होत नाही. त्यासाठी काही कालावधी जावाच लागतो. वाट पहावीच लागते. स्वप्नपूर्तीच्या वाटचालीत अनेक अडथळे येतात त्यांच्यावर मात करुन खंबीरमनाने न थकता, न दमता आपण आपली वाटचाल सुरु ठेवली पाहिजे. मनामध्ये शुद्ध विचार ठेऊन अंत:करणापासून स्वप्नपूर्तीकडे वाटचाल करणारे यशस्वी होतातच. आपण आपल्या विचारांमध्ये बदल केला पाहिजे. नकारार्थी विचारांना मनामध्ये कधीही थारा देता कामा नये. जे चांगले विचार मनात उत्पन्न होतील ते साकारण्यासाठीच प्रयत्न करा. मनात आलेली सुंदर कल्पना पूर्ण करण्यासाठीच मनात आणा. कुठलीही इच्छा व्यक्त करताना ती मिळवण्याचाच प्रयत्न करा. असे वागणारेच यशस्वी झालेत. त्यांचीच स्वप्न पूर्ण झालीत. तुम्ही तुमचे विचार, कल्पना, इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करायला लागल्यानंतर आपल्या मनातील वाईट विचार आपोआप नष्ट व्हायला लागतात. तुम्ही तुमच्या स्वप्नाशी एकरुप झाल्याने इतर अनावश्यक गोष्टी करायला तुम्हाला वेळच मिळत नाही. त्यामुळे तुम्ही सहजपणे आपल्या स्वप्नांना कवेत घेता.
       स्वप्न पाहताना एक गोष्ट लक्षात ठेवा, 'सामान्य माणूस एका फळामध्ये किती बी आहे ते पाहत असतो तर स्वप्न उराशी बाळगणारा त्या फळातील एका बी मधून किती फळे निर्माण करता येतील, या दृष्टीने विचार करत असतो. कारण त्याला त्या बी मधील ताकत माहित असते. ते बी जमिनीत रुजवले, त्याला खतपाणी घातले, थोडी मेहनत घेतली तर त्याच बी चे मोठ्या वृक्षात रुपांतर होते व एका बी पासून वर्षानुवर्ष मिळणारी फळं आपल्याला मिळतात. स्वप्न पाहतानाही असाच विचार केला पाहिजे.'
       राइट बंधूंनी उडणाऱ्या पक्षास पाहून 'माणुसही उडू शकतो' असे स्वप्न पाहिले. या स्वप्नाच्या पूर्तीसाठी त्यांनी दिवस-रात्र मेहनत केली आणि विमानाचा शोध लावला. छत्रपती शिवाजी महाराजांनी लहानपणीच स्वराज्य निर्मितीचे स्वप्न पाहिले आणि जीवाची बाजी लावून ते पूर्ण केले. जागेपणी पडणारी स्वप्न ही प्रत्यक्षात उतरतातच. म्हणूनच मोठे स्वप्न पहा आणि ती साकारण्यासाठी अथक परिश्रम करा. संयम, निष्ठा आणि आत्मविश्वासाच्या बळावर साकारलेल्या स्वप्नांची फुले आपल्या जीवनामध्ये सुगंध पसरवतील, तुमचे आयुष्य सत्कारणी लावतील आणि मान-सन्मान, पद, पैसा व प्रतिष्ठाही आपोआप आपल्याकडे चालून येईल लक्षात ठेवा,

• *शरद यशवंत पाटील*
   *संपादक, मशाल,*
   *वाडा, जि. पालघर*
  *• WP - 8600001111*

*सोडून द्यावं*


एकदोन वेळा समजावून सांगूनही पटत नसेल,
तर समोरच्याला समजावणं सोडून द्यावं.

ऐकूनही न ऐकल्यासारखं करत असतील,
तर उगाचंच संवाद साधणं सोडून द्यावं.

मुलं मोठी झाल्यावर स्वतंत्रपणे निर्णय घेत असतील, 
तर पाठीमागे लागणं सोडून द्यावं.

एका ठराविक वयानंतर कोणी नावं ठेवली,
तर मनावर घेणं सोडून द्यावं.

आपल्या हातात काही नाही; 
हा अनुभव आल्यावर,
इतरांची वा भविष्याची चिंता करणं सोडून द्यावं.

ईच्छा आणि क्षमता यात फार अंतर पडू लागलं, 
तर स्वतःकडून अपेक्षा करणं सोडून द्यावं.

प्रत्येकाचं जीवनचित्र वेगळं, आकार, रंग सगळंच वेगळं,
म्हणूनच म्हणतो, तुलना करणं सोडून द्यावं.

आयुष्याने एवढा अनुभवाचा खजिना देऊन संपन्न केल्यानंतर,
रोज जमाखर्चाची मांडणी करणं सोडून द्यावं.

============================================

*मास्तरच्या लेखणीतून एक दुःखद सत्य :😢👍*

*विद्यालयाच्या जागेपायी*
*कुणीच इथं भांडलं नाही*
*अन्..देवालयाच्या जागेसाठी*
*रक्त इथं कमी पडलं नाही..*

              *माझाच देव मोठा म्हणण्यात*
              *रक्ताच्या नद्या वाहील्या*
              *ज्ञानगंगा कोरडी पडत*
              *ओसाड शाळा झाल्या...*

*शाळा अजुनही तशीच*
*पडक्या,तुटक्या भिंतीची*
*गरीब माझ्या देशामधी*
*उभी मंदिरं सोन्याची...*

             *शाळे मधली दानपेटी*
             *भरलेली कधी पाहिली नाही*
             *अन् मंदिराची दानपेटी*
             *रिकामी कधी राहिली नाही...*

*शाळेतला पालक मेळावा*
*पालकांवाचून राहून गेला*
*देवालयात चेंगराचेंगरीत*
*माणुस मात्र तुडवून मेला...*

                 *विद्येचं ज्ञान देऊन*
                 *गुरूजी गरीबच राहीला*
                 *अन्'अंधभक्तांचं’ दान घेऊन*
                 *पुजारी धनवान झाला...*

*खरंतर धर्म नावाचं पुस्तक* 
*शाळेत कधीच उघडत नाही*
*अन् धर्माच्या नावाशिवाय*
*देशात पानही हालल नाही...*
              
                   *✍मास्तर...*

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻



: केले कुणास्तव ते किती,
हे कधी मोजू नये,
होणार त्याची विस्मृती,
त्याला तयारी पाहिजे. 

डोक्यावरी जे घेऊनी
आज येथे नाचती,
घेतील ते पायातळी;
त्याला तयारी पाहिजे. 

सत्यास साक्षी ठेवुनी
वागेल तो, बोलेल जो,
तो बोचतो मित्रांसही!
त्याला तयारी पाहिजे. 

पाण्यामध्ये पडलास ना?
पाणी कसेही ते असो-
आता टळेना पोहणे;
त्याला तयारी पाहिजे. 

सुखात सर्व सोबती
दुःखात ना कोणती
समोर जाण्या एकटा
त्याला तयारी पाहिजे

तोंडावर गोड जे बोलती
पाठीमागे निंदा करीती
तोंड देण्या निंदकास
त्याला तयारी पाहिजे

   ~विंदा करंदीकर

ही कविता पचवली की
आयुष्य जमलंच !!

===========================================

 कशाक रे झिलांनो फिरतास अशे वणवण 
स्वर्ग पण झक मारता असो आमचो मालवण ।।

चौक्या, कुंभारमाठ, तारकर्ली, कालावलची खाड़ी 

 तोंडवली, वायंगणी, आचरा पुढे भेटता हडी ।
चिंदर, त्रिंबक, पळसंब पुढे भेटता श्रावण 
स्वर्ग पण झक मारता असो आमचो मालवण ।।

बांदिवडे-कोईळ गावचो गणपती, 
तेंचो तर एक गाव एक गणपती
करवंद, तोरणा, काजीची फका
अलीकडे मुंबई आणि बाजूकच हा गोवा 
पण शेवटी तुम्ही हयच येवा ।

कूर्ल्याचा निस्त्याक आणि बांगडे सुरमईचा कालवण
स्वर्ग पण झक मारता असो आमचो मालवण ॥

रामेश्वर,रवळनाथ,भराडी आई 
गांगो, सातेरी आणि पावणाई ।
शिवछत्रपतींच्या स्पर्शान भूमी आसा पावन 
स्वर्ग पण झक मारता असो आमचो मालवण !!

देवगडचो हापूस, विरणचो बाजार, आंगणेवाडीच्या जत्रेक चाकरमानी घेता धाव,
देवबागात आसा खाडी-समुद्राचो संगम
स्वर्ग पण झक मारता असो आमचो मालवण !!
*सुंदर कविता ज्यांनी लिहीली त्यांना सलाम*

मा. मोदी बाबत आश्चर्यकारक गोष्टी!


1) मोदींचा जन्म दोन वेळा झाला.
2) पदवी प्रमाण पत्रानुसार 29 ऑगस्ट 1949.
3) निवडणूक आयोगानुसार 17 सप्टेंबर 1950.
4) वडनगर रेल्वे स्टेशनला वयाच्या 6 व्या वर्षी म्हणजे 1956 ला त्यांनी चहा विकला. 
5) मजेची गोष्ट म्हणजे रेल्वे स्टेशनच 1973 ला अस्तित्वात आले. 
6) त्यांनी मास्टर डिग्री गुजरात विद्यापीठामधून 1983 ला घेतली. 
7) एंटायर पोलिटिकल सायन्स मधून डिग्री घेणारे मोदी देशातील एकमेव विद्यार्थी आहेत. 
8) त्यांनी एकट्याने तो कोर्स घेतला, एकट्याने परीक्षा दिली व एकटेच पास झाले.
9) त्या कोर्सला शिकवणारा प्राध्यापक किंवा परीक्षा घेणारा परीक्षक किंवा अशी डिग्री असणारा दुसरा कोणताही विद्यार्थी कोणी म्हणजे कोणी अजून पर्यँत कोणालाच माहीत नाही, अगदी माहिती अधिकाराला देखील.
10) खुद्द गुजरात विद्यापीठाला असा कोर्स होता हे 2014 ला जनतेला समजले. पण गुजरात विद्यापीठाला असा कोर्स होता हे अजूनही त्यांनाच माहिती नाही.
11) त्यांचे 1978 चे दिल्ली विद्यापीठाचे पदवी प्रमाणपत्र संगणकावर टाईप केलेले आहे. 
12) 1988 पर्यत दिल्ली विद्यापीठाची पदवी प्रमाणपत्र हाताने लिहीलेली असत, संगणकाचा वापर तो पर्यंत होत नव्हता.
13) मात्र 1978 सालीच मोदींना प्रमाणपत्र संगणकाच्या प्रिंटरवर प्रिंटिंग होऊन मिळाले तेही मायक्रोसॉफ्टने 1992 च्या फॉन्ट मध्ये लिहिलेले. 
14) त्यावर ची तारीख पाहिली तर प्रमाणपत्र सुद्धा रविवारी कार्यालयीन सार्वजनिक सुट्टी च्या दिवशी प्रिंट केलेले मिळाले.
*आपल्या पंतप्रधाना बद्दल जनतेला माहीती असणे गरजेचे आहे, नुसतं अंध राहून चालत नाही!*

हर घर तिरंगा ?

आमच्या मनात खोलवर तिरंगा रुजला आहे. तो स्वातंत्र्या नंतर ५५ वर्षांनी आम्ही रुजवलेला नाही. त्यामुळे तिरंगा कधी आणि कुठे फडकवायचा हे आम्हाला सांगायची गरज नाही. जी व्यक्ती जनतेच्या प्रश्नांची उत्तरं ना संसदेत देते आणि ना पत्रकार परिषदेत; अशा व्यक्तीने आम्हाल तिरंगा फडकवा हे सांगायची गरज नाही. ज्या व्यक्तीने संविधानाच्या प्रत्येक गोष्टीत चिंधड्या उडवायचा विडा उचलला आहे, अशा व्यक्तीने आम्हाला तिरंगा फडकवा हे सांगायची गरज नाही. गरिबांना हक्क म्हणून दिली जाणारी मदत रेवडी म्हणून जी व्यक्ती संबोधते आणि उद्योगपती मित्रांवर जनतेचा पैसा खैराती सारखा उधळते त्या व्यक्तीने तिरंगा फडकवा हे सांगायची गरज नाही. शेतकऱ्यांना जी व्यक्ती आंदोलनजीवी म्हणून हिणवते त्या व्यक्तीने आम्ही तिरंगा कुठे आणि कधी फडकवायचा हे सांगण्याची गरज नाही.


आज घरा घरात तिरंगा उभारण्यापेक्षा चूल पेटणे गरजेचे आहे.
आज घरा घरात तिरंगा उभारण्यापेक्षा मुलांना रोजगार मिळणं गरजेचं आहे.
आज घरा घरात तिरंगा उभारण्यापेक्षा त्या प्रत्येक घरातील व्यक्तीला उत्तम आणि माफक दरात आरोग्यसेवा मिळणं गरजेचं आहे.
आज घरा घरात तिरंगा उभारण्यापेक्षा प्रत्येक घरातील आणि सर्व जाती धर्मातील लोकांना माफक दरात शिक्षण मिळणं गरजेचं आहे.
सध्या जे काही समाजात, देशात सुरू आहे ते बघता येत्या काही वर्षांत ह्या घरांमध्ये राहणारी माणसं तरी टिकतील का हा मोठा प्रश्न आहे. 

मुळात आज घरा घरात तिरंगा उभारण्यापेक्षा ती घर टिकणे महत्वाचं आहे.

ह्या देशाचा तिरंगा हा आमच्या मनात आहे, आमच्या श्वासात आहे, आमच्या कृतीत आहे; त्याच्यावरील प्रेमाचा असा बाजार मांडायची आम्हांला गरज नाही. आणि तो कोणाच्या तरी सांगण्यावरून तर अजिबातच नाही.

जास्त ताणू नका , लाईटली घ्या

 *जास्त ताणू नका , लाईटली घ्या*

🤝😄🤝😄🤝😄🤝😄

*प्रत्येकांनी एकमेकाला*
*थोडं समजून घ्या* 
*खूप जास्त ताणू नका*
*सगळेच लाईटली घ्या ll*

*थोडं फार मागे पुढे*
*होतच असतं*
*शंभर टक्के perfect* 
*कुणीच नसतं ll*

*माणुसकीही सर्वांकडे* 
*असलीच पाहिजे*
*वागण्यातून नम्रता*
*दिसलीच पाहिजे ll* 

*छोट्या छोट्या गोष्टी वरून*
*कशाला करायचं बंड*
*आपण गोड बोललंकी* 
*समोरचा होतो थंड ll*

*कधी कधी सारा विषय* 
*फारच क्षुल्लक असतो* 
*माणूस मात्र विनाकारण* 
*टेंन्शन मध्ये बसतो ll*
 
*कसाही प्रसंग असला तरी*
*राहिलं पाहिजे शांत*
*आपल्या सहनशीलतेचा*
*होऊ देऊने अंत ll*

*घर असो , ऑफिस असो*
*वा असो Whats app*
*भेटून घ्या , बोलून घ्या* 
*पडू देऊ नका gap ll*

*भाषा असली स्वीट*
*की सगळं होतं नीट*
*कुणाचाच कुणाला* 
*येत नाही वीट ll*

*झालं गेलं विसरून जा*
*घ्या हातात हात*
*निमित्ताने भेटलो आपण*
*द्या हासून साथ ll*
        🤝😄🤝😄🤝


मुंबई महाप्रलय दिन

 ********************************

*🌧️ २६ जुलै 🌧️*
*मुंबई महाप्रलय दिन*
********************************

इतिहासातला सर्वात धोकादायक पाऊस मुंबईने २६ जुलै २००५ रोजी अनुभवला. त्यावेळी २४ तासात तब्बल ९४४ मिली पाऊस झाला होता. जो गेल्या १०० वर्षातला सर्वाधिक पाऊस होता.

या पावसामुळे एक हजारपेक्षा जास्त लोकांचा जीव गेला होता, तर १४ हजार घरं उद्ध्वस्त झाली होती. ३७ हजार रिक्षा, ४००० टॅक्सी आणि ९०० बेस्ट बसेसचं नुकसान झालं होतं, तर हजारो मोठी वाहनं पाण्यात अडकली होती. ज्यामुळे ५.५ बिलियनचं नुकसान झालं होतं.

कुर्ला, धारावी या परिसरात अक्षरशः हाहाःकार माजला होता. लोकल रेल्वे ठप्प झाली होती, तसेच अनेक ट्रेनचं नुकसान झालं होतं. शेकडो लोकांचा मदती अभावी जीव गेला होता. पाण्यात अडकलेल्या लोकांना २४ तासांपेक्षा जास्त काळ घरी जाता आलं नव्हतं.

मुंबईकरांचं स्पीरिट नेहमीच पाहिलं जातं. मुंबईकरांनी एकमेकांना मदत करत माणुसकीचं तेव्हा खरं दर्शन घडवलं होतं.

*संकलन : मिलिंद पंडित, कल्याण*

*संदर्भ : इंटरनेट*

********************************

*निरनिराळ्या लोकांनी सांगितलेल्या खोट्या गोष्टी*

१) जिवलग मित्राने सांगितलेली खोटी गोष्ट 
  ती तुझ्याकडेच बघतेय*

२) बस कंडक्टर ने सांगितलेली खोटी गोष्ट
*मागची गाडी रिकामी आहे, त्यात बसा*

३) आईबाबांनी सांगितलेली खोटी गोष्ट
*फक्त दहावीपर्यंत अभ्यास कर, नंतर मज्जाच मज्जा*

४) सर्वांनीच सांगितलेली खोटी गोष्ट
*घर, गाडी आपण एकदाच घेतो, त्यामुळे पैशाचा विचार करू नको*

५) राजकारण्यांनी सांगितलेली खोटी गोष्ट
*केंद्रात आणि राज्यात एकच सरकार असलं की विकास होतो*

६) नव्याने नोकरीला लागलेल्या मित्राने सांगितलेली खोटी गोष्ट
*पगार कमी आहे, पण शिकायला खूप मिळतं*

७) बॉसने प्रमोशन नाकारताना सांगितलेली खोटी गोष्ट
*मी तुझ्यासाठी खूप भांडलो, पण काही उपयोग झाला नाही*

८) मुलगी बघायला गेल्यावर सासरच्यांनी सांगितलेली खोटी गोष्ट
*पोहे मुलीनेच बनवलेत*

९) मुलाने लग्नाआधी मुलीला सांगितलेली खोटी गोष्ट
*मी Occasionally ड्रिंक्स घेतो*

१०) पारितोषिक वितरणाच्या वेळी परीक्षकांनी सांगितलेली खोटी गोष्ट
*माझ्यासाठी सर्वच जण विजेते आहेत*

११) कपड्याच्या दुकानातील सेल्समनने सांगितलेली खोटी गोष्ट
*हा रंग तुमच्यावर उठून दिसतो*

१२) "टेबल पार्टनर" ने सांगितलेली खोटी गोष्ट
*बिअर म्हणजे दारू नव्हे*

आणि सर्वात कळस म्हणजे
१३) नवर्‍याने बायकोला सांगितलेली खोटी गोष्ट 
*तू माहेरी गेलीस की मला मुळीच चैन पडत नाही.*

हसलात ना ...! 😃

LIC च्या खाजगीकरणाच्या बातमी संदर्भात

 📯📯📯📯📯📯📯📯📯📯

*LIC च्या खाजगीकरणाच्या बातमी संदर्भात :* ⁉

1⃣ *लोकांना पडलेला पहिला प्रश्न*❓
LIC IPO चा काल प्रस्ताव 📑 अर्थसंकल्पात मांडण्यात आला. त्यावरून LIC चे खाजगीकरण अशा भडक बातम्या 📺 झळकल्या, आणि लोकांना नेमके समजेना कि *काय झाले LIC चे..?* 🤔

*उत्तर* :
अगदी सोप्या भाषेत हि प्रक्रिया समजून घेऊया.

*IPO : Initial Public Offering* 🏷
म्हणजे *एखाद्या संस्थेचा शेअर मार्केट मध्ये लोकांसाठी उपलब्ध करून देणे* आणि त्यातून जास्तीत जास्त *भांडवल निर्मिती* 💰💰करणे..
LIC सारख्या बलाढ्य संस्थेचा शेअर लोकांसाठी उपलब्ध झाला तर...??‼
 तर *LIC देशातील स्टॉक मार्केट मधील सगळ्यात मोठी संस्था* 🏢 (रिलायन्स इंडस्ट्रीज आणि टाटा कन्सल्टन्सी पेक्षा सुद्धा मोठी) *म्हणून उदयाला येईल...* 🌅

आयुर्विम्याच्या भारतातील *एकूण व्यवसायाच्या 70- 75 % पेक्षा जास्त हिस्सा* 💪🏻असलेल्या आणि भारतातील *सगळ्यात मोठ्या लिस्टेड संस्था* 🏬 होउ शकणाऱ्या LIC चा शेअर विकत घेण्यासाठी *गुंतवणूकदारांच्या उड्या पडतील...* 🏃🏻‍♂💸
म्हणजेच LIC च्या *शेअर ची किंमत खूप वाढेल,* 📈म्हणजेच LIC चे भांडवल सुद्धा वाढेल, ज्याचा *खूप चांगला परिणाम LIC च्या फायद्यावर सुद्धा होईल..*📊

*LIC चा जेव्हडा फायदा जास्त तेव्हडा ग्राहकांना बोनस जास्त...*✅

2⃣
*दुसरा प्रश्न :* ❓
*आता LIC सरकारी राहणार कि खाजगी ?*🤔

*उत्तर* :
सध्या सरकारी संस्था असलेल्या *सर्व सरकारी बँका* 🏦( स्टेट बँक, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा, पंजाब नॅशनल बँक इ.) स्टॉक मार्केट ला लिस्टेड आहेत, त्याबरोबर *सर्व सरकारी तेल उत्पादक कंपन्या* 🏗 (इंडियन ऑइल, ONGC , भारत पेट्रोलियम, हिंदुस्थान पेट्रोलियम इ.) सुद्धा *स्टॉक मार्केट ला लिस्टेड* 📊आहेत, *म्हणून त्या बँका , कंपन्या खाजगी झाल्या का ?* ⁉नक्कीच नाही..

त्याप्रमाणे *LIC चे काही शेअर स्टॉक मार्केट मध्ये सर्वसामान्य लोकांना खरेदीसाठी उपलब्ध जरी झाले तरी LIC हि सरकारी संस्थाच राहणार आहे.* ✳ त्यामुळे LIC खाजगी होईल या विधानात तथ्य नाही . तसेच *ग्राहकांना काळजी करण्यासारखे काही नाही .* ✅

*🎉 कदाचित भांडवल वृद्धीमुळे आयुर्विम्यातील भारतातील 🇮🇳 सगळ्यात मोठी असलेली LIC जगातील सर्वात मोठी आयुर्विमा संस्था होऊ शकेल.* ⬆

*फक्त उथळ बातम्या देण्याऐवजी माध्यमांनी जर संभाव्य वृद्धीची 📈 माहिती 📃 दिली तर लोकांचा संभ्रम होणार नाही.*

* ( भारतीय आयुर्विमा महामंडळ 🇮🇳)*

  १. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...