Monday, December 26, 2022

मराठी भाषेचे सौंदर्य


इलेक्ट्रिकच्या दुकानवाल्याने 
फलकावर लिहिलं होतं..
"तुमच्या बुध्दीचा प्रकाश पडो ना पडो, आमच्या बल्बचा नक्की पडणार".. 🤣

इलेक्ट्रॉनिक दुकानावर लिहिलेलं 
वाचून माझं मन भरून आलं ..
"आपला कुणी फॅन नसेल तर आमच्याकडून एक घेऊन जा "..😀

चहाच्या टपरीवर असाच फलक होता..
"मी साधा माणूस आहे पण चहा मात्र खास बनवतो.."🤣

एका उपाहारगृहाच्या फलकावर 
वेगळाच मजकूर होता ..
"इथे घरच्यासारखं खाणं मिळत नाही, आपण बिनधास्त आत या.." 🤪

पाणीपुरीवाल्यानं लिहिलं होतं..
"पाणीपुरी खाण्यासाठी मन मोठं नसलं तरी तोंड मात्र मोठं हवं" ..🤣

फळं विकणाऱ्या माणसाने 
तर कमालच केली. ..
"तुम्ही फक्त पैसे देण्याचे कर्म करा, फळं आम्ही देऊ ".. 🤣

घड्याळाच्या दुकानदाराने अजब 
मजकूर लिहिला होता ..
"पळणाऱ्या वेळेला काबूत ठेवा, पाहिजे तर भिंतीवर टांगा किंवा हातात बांधा.."🤣

ज्योतिषाने फलक लावला होता 
आणि त्यावर लिहिलं होतं.....😅
"या आणि फक्त १००
 रुपयांत आपल्या आयुष्याचे पुढील एपिसोड बघा ..."🤣

*आणि, आमच्या ग्रुपवर लिहीले होते* ......

*इथे दररोज येऊन तर बघा*






*सर्व अडचणी विसरून जाल*

😃😃😃🌹😃😃😃

No comments:

Post a Comment

  १. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...