Saturday, December 24, 2022

*निरनिराळ्या लोकांनी सांगितलेल्या खोट्या गोष्टी*

१) जिवलग मित्राने सांगितलेली खोटी गोष्ट 
  ती तुझ्याकडेच बघतेय*

२) बस कंडक्टर ने सांगितलेली खोटी गोष्ट
*मागची गाडी रिकामी आहे, त्यात बसा*

३) आईबाबांनी सांगितलेली खोटी गोष्ट
*फक्त दहावीपर्यंत अभ्यास कर, नंतर मज्जाच मज्जा*

४) सर्वांनीच सांगितलेली खोटी गोष्ट
*घर, गाडी आपण एकदाच घेतो, त्यामुळे पैशाचा विचार करू नको*

५) राजकारण्यांनी सांगितलेली खोटी गोष्ट
*केंद्रात आणि राज्यात एकच सरकार असलं की विकास होतो*

६) नव्याने नोकरीला लागलेल्या मित्राने सांगितलेली खोटी गोष्ट
*पगार कमी आहे, पण शिकायला खूप मिळतं*

७) बॉसने प्रमोशन नाकारताना सांगितलेली खोटी गोष्ट
*मी तुझ्यासाठी खूप भांडलो, पण काही उपयोग झाला नाही*

८) मुलगी बघायला गेल्यावर सासरच्यांनी सांगितलेली खोटी गोष्ट
*पोहे मुलीनेच बनवलेत*

९) मुलाने लग्नाआधी मुलीला सांगितलेली खोटी गोष्ट
*मी Occasionally ड्रिंक्स घेतो*

१०) पारितोषिक वितरणाच्या वेळी परीक्षकांनी सांगितलेली खोटी गोष्ट
*माझ्यासाठी सर्वच जण विजेते आहेत*

११) कपड्याच्या दुकानातील सेल्समनने सांगितलेली खोटी गोष्ट
*हा रंग तुमच्यावर उठून दिसतो*

१२) "टेबल पार्टनर" ने सांगितलेली खोटी गोष्ट
*बिअर म्हणजे दारू नव्हे*

आणि सर्वात कळस म्हणजे
१३) नवर्‍याने बायकोला सांगितलेली खोटी गोष्ट 
*तू माहेरी गेलीस की मला मुळीच चैन पडत नाही.*

हसलात ना ...! 😃

No comments:

Post a Comment

  १. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...