*जोपर्यंत तुम्ही एखाद्याला मदत करत आहात तोपर्यंत तुमच्या कौतुकाचा सोहळा चारचौघांत साजरा केला जातो पण एकदाका तुम्ही मदत करणं थांबवलं तुमच्या निंदेची खिरापत घरोघरी वाटली जाते कटू आहे पण सत्य आहे आयुष्य सोपं नसतं ते सोपं करायचं असतं थोडं संयम ठेऊन थोडं सहन करून आणि खूप काही दुर्लक्ष करून.मग थोडं नेहमीच्या दिनक्रमातून बाहेर डोकवायच मनाला प्रसन्न टवटवीत करणारे अनेक क्षण अनेक गोष्टी आपल्याच आजूबाजूला दिसतील बोलण्यापूर्वी शब्द आणि पेरण्यापूर्वी बी कोणतं वापरणार याचा विचार जीवनात जरूर करा नंतर विचार व करण्यात काही अर्थ नाही कारण त्याचा परतावा तोच मिळेल जो तुम्ही वापरला आहात चांगला गुरु यशाचे दरवाजे उघडून देऊ शकतो पण त्यातून यशाच्या दिशेने जाण्यासाठी स्वतःलाच चालावे लागते रानावनात एकाकी पडलेले फूल जसे कोणीही कौतुक करण्याची वाट न पाहता फुलत असते तसेच तुम्हीही कोणाच्या कौतुकाची वाट न पाहता तुमच्या प्रामाणिक प्रयत्नावर टिकून राहा कौतुक करणारेच तुम्हाला शोधत येतील आहारात सत्व वागण्यात तत्व आणि बोलण्यात ममत्व असेल तरच जीवनाला महत्त्व येते जर तुमचे विचार देवापाशी केलेली प्रार्थना आणि मनापासून केलेली इच्छा सकारात्मक असेल तर तुमचे आयुष्यही आपोआप सकारात्मक होत जाते वाईट कोणीच नसतं जीवनात अशी पण वेळ येते की माणूस कितीही खरा आणि चांगला वागला तरी तो कोणाच्या तरी मनासारखा न वागल्यामुळे वाईट ठरत असतो जिद्दीच्या प्रवासात शांतता अन संयम खुप महत्वाचा असतो शत्रू मिळवणंही वाटतं तेवढं सोपं नसतं त्यासाठी खूप चांगली कामं करावी लागतात आयुष्य सोपं नसतं ते सोपं करायचं असतं थोडं संयम ठेऊन थोडं सहन करून आणि खूप काही दुर्लक्ष करून मग थोडं नेहमीच्या दिनक्रमातून बाहेर डोकवायच मनाला प्रसन्न टवटवीत करणारे अनेक क्षण अनेक गोष्टी आपल्याच आजूबाजूला दिसतील कमाई चा अर्थ फक्त धन च मोजणे असा नाही तर अनुभव नाती मान सन्मान वागणूक संस्कार आणि आपण केलेली कामे हे सुध्दा कमाई मध्येच मोजले जाते संयम हीच जीवनातील खरी परीक्षा आहे जेवढा वेळ तुम्ही संयम ठेवून काम कराल तेवढेच तुमचे यश मोठे असेल माणसाने वेळेसोबत चालावे काळाप्रमाणे बदलावे परंतु काहीही झाले तरी आपल्या संस्कृतीला आणि संस्कारांना शेवटपर्यंत स्वतःसोबत ठेवावे यश ही तुमची सावली आहे तिला पकडायचा प्रयत्न करू नका तुमचा मार्गाने चालत राहा ती आपोआप तुमच्यामागे येईल लक्षात ठेवा सावली तुमच्या मागे येते जेव्हा तुम्ही प्रकाशाच्या दिशेने चालता चूक नसतानासुध्दा निव्वळ वाद टाळण्याकरिता मागितलेली माफी जीवनातील संयमाचं एक मोठं उदाहरण ठरतं आई वडील वयानं नव्हे तर काळजीनं म्हातारे होतात जेव्हा बाळ रडतं तेव्हा पुऱ्या बिल्डिंगला समजतं पण जेव्हा आई वडील रडतात तेव्हा शेजाऱ्यांनाही पत्ता लागत नाही ही जीवनातली सत्यता आहे कानाने ऐकलं तर फक्त शब्दांचा आवाज येतो परंतु मनाने ऐकलं तर शब्दांचा अर्थ समजतो*
Pages
- Home
- प्रबोधन
- आपला भारत
- महत्वाच्या लिंक / वेबसाईट
- कायद्याची ओळख
- शैक्षणिक /करिअर मार्गदर्शन
- महिला वर्ग / ज्येष्ठ नागरिक विशेष
- महापुरुषांची ओळख
- शासन निर्णय /शासकीय योजना
- विविध संस्था माहिती
- ताज्या बातम्या व घडामोडी
- सोशल मिडिया
- ई -साहित्य -अंगण : PDF पुस्तके व अन्य माहिती
- जनरल नॉलेज
- फोटो गॅलरी
- अध्यात्मिक
- आयुर्वेद / आरोग्य विशेष
- संगीत विभाग
- अनमोल सुविचार
- खाद्य भ्रमंती
- बोधकथा
- कोरोना विशेष
- प्रेरणादायी
Monday, December 26, 2022
Subscribe to:
Post Comments (Atom)
१. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...
-
प्रत्येक प्रवासाची सुरुवात आणि शेवट ठरलेला असतो, तसंच त्या प्रवासातले टप्पे किंवा थांबेही ठरलेले असतात. काही वेळा ते अगदी हक्काचे असतात, तर ...
-
*आता पर्यंत आपण धारा 370 बद्दल माहिती घेत होतो चला आता कलम 340 बद्दल माहिती जाणून घेऊ* —— कलम ३४० —— (ओ.बी.सी. च्या सत्यानाशाचे का...
-
काश्मीरच्या पूर्वेकडील हिमालयाचा भाग, आसाम, बंगाल, ब्रह्मदेश व पश्चिम हिंदुस्थान आणि सिंहलद्वीप या प्रदेशांत हें झाड दृष्टीस पडतें. याचीं फळ...
No comments:
Post a Comment