Saturday, December 24, 2022

LIC च्या खाजगीकरणाच्या बातमी संदर्भात

 📯📯📯📯📯📯📯📯📯📯

*LIC च्या खाजगीकरणाच्या बातमी संदर्भात :* ⁉

1⃣ *लोकांना पडलेला पहिला प्रश्न*❓
LIC IPO चा काल प्रस्ताव 📑 अर्थसंकल्पात मांडण्यात आला. त्यावरून LIC चे खाजगीकरण अशा भडक बातम्या 📺 झळकल्या, आणि लोकांना नेमके समजेना कि *काय झाले LIC चे..?* 🤔

*उत्तर* :
अगदी सोप्या भाषेत हि प्रक्रिया समजून घेऊया.

*IPO : Initial Public Offering* 🏷
म्हणजे *एखाद्या संस्थेचा शेअर मार्केट मध्ये लोकांसाठी उपलब्ध करून देणे* आणि त्यातून जास्तीत जास्त *भांडवल निर्मिती* 💰💰करणे..
LIC सारख्या बलाढ्य संस्थेचा शेअर लोकांसाठी उपलब्ध झाला तर...??‼
 तर *LIC देशातील स्टॉक मार्केट मधील सगळ्यात मोठी संस्था* 🏢 (रिलायन्स इंडस्ट्रीज आणि टाटा कन्सल्टन्सी पेक्षा सुद्धा मोठी) *म्हणून उदयाला येईल...* 🌅

आयुर्विम्याच्या भारतातील *एकूण व्यवसायाच्या 70- 75 % पेक्षा जास्त हिस्सा* 💪🏻असलेल्या आणि भारतातील *सगळ्यात मोठ्या लिस्टेड संस्था* 🏬 होउ शकणाऱ्या LIC चा शेअर विकत घेण्यासाठी *गुंतवणूकदारांच्या उड्या पडतील...* 🏃🏻‍♂💸
म्हणजेच LIC च्या *शेअर ची किंमत खूप वाढेल,* 📈म्हणजेच LIC चे भांडवल सुद्धा वाढेल, ज्याचा *खूप चांगला परिणाम LIC च्या फायद्यावर सुद्धा होईल..*📊

*LIC चा जेव्हडा फायदा जास्त तेव्हडा ग्राहकांना बोनस जास्त...*✅

2⃣
*दुसरा प्रश्न :* ❓
*आता LIC सरकारी राहणार कि खाजगी ?*🤔

*उत्तर* :
सध्या सरकारी संस्था असलेल्या *सर्व सरकारी बँका* 🏦( स्टेट बँक, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा, पंजाब नॅशनल बँक इ.) स्टॉक मार्केट ला लिस्टेड आहेत, त्याबरोबर *सर्व सरकारी तेल उत्पादक कंपन्या* 🏗 (इंडियन ऑइल, ONGC , भारत पेट्रोलियम, हिंदुस्थान पेट्रोलियम इ.) सुद्धा *स्टॉक मार्केट ला लिस्टेड* 📊आहेत, *म्हणून त्या बँका , कंपन्या खाजगी झाल्या का ?* ⁉नक्कीच नाही..

त्याप्रमाणे *LIC चे काही शेअर स्टॉक मार्केट मध्ये सर्वसामान्य लोकांना खरेदीसाठी उपलब्ध जरी झाले तरी LIC हि सरकारी संस्थाच राहणार आहे.* ✳ त्यामुळे LIC खाजगी होईल या विधानात तथ्य नाही . तसेच *ग्राहकांना काळजी करण्यासारखे काही नाही .* ✅

*🎉 कदाचित भांडवल वृद्धीमुळे आयुर्विम्यातील भारतातील 🇮🇳 सगळ्यात मोठी असलेली LIC जगातील सर्वात मोठी आयुर्विमा संस्था होऊ शकेल.* ⬆

*फक्त उथळ बातम्या देण्याऐवजी माध्यमांनी जर संभाव्य वृद्धीची 📈 माहिती 📃 दिली तर लोकांचा संभ्रम होणार नाही.*

* ( भारतीय आयुर्विमा महामंडळ 🇮🇳)*

No comments:

Post a Comment

  १. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...