Sunday, May 29, 2022

नकारात्मक प्रभाव

असं का होतं की ज्या गोष्टीची भीती असते, तीच गोष्ट आयुष्यात दत्त म्हणुन हजर होते.

एखाद्या विषयाची सतत भीती बाळगणारा विद्यार्थी, त्या विषयात नापासचं होतो,
पैसे नाहीत, पैसे नाहीत, अशी चिंता करणारा का दिवसेंदिवस अधिकाधिक कंगाल होतो? 
आर्थिक नुकसान होईल, अशी सतत भीती बाळगणार्‍याला कसलातरी फटका बसतोचं बसतो,
 कष्ट नकोत, कष्ट नकोत, घोकणार्‍याच्या नशिबात श्रम आणि राबणंचं असतं,
 का बरं एखादीला नको असलेलं गावच ‘सासर’ म्हणुन पदरात पडतं?
का श्रीमंत अधिकाधिक श्रीमंत होतात आणि गरीब अधिकाधिक गरीब होतायतं?

  तर ह्या सगळ्यांना एक कारण आहे,
आणि ते कारण आहे आकर्षणाचा नियम, द लॉ ऑफ अट्रॅक्शन..

    तुम्हाला माहीतीय?...जगातील फक्त एक टक्का लोकांकडे एकुण संपत्तीच्या शहाण्णव टक्के संपत्तीचा हिस्सा आहे. हा योगायोग नाही, हा आकर्षणाचा नियम आहे. काय सांगतो हा नियम? तुमच्या आयुष्यात असलेली प्रत्येक गोष्ट ही कळत नकळत तुम्हीच आकर्षित केलेली आहे, जसं की तुमचं दिसणं, तुमचे कपडे, तुमचा जोडीदार, तुमची मुलं, तुमचे मित्र, तुमचं घर, तुमचा व्यवसाय, तुमची सांपत्तीक स्थिती, तुमचं गाव, तुमच्या आवडीनिवडी, तुमचे नातेसंबंध, अगदी सगळं…सगळं…

    जसं की समजा एखाद्याला निळा रंग आवडतो, आणि त्याच्याकडे निळ्या रंगाचे खुप कपडे आहेत, तर तो बाहेर जाताना निळाच शर्ट घालुन जाईल, तसंच, आपल्या मनाच्या कपाटात ज्या रंगाचे विचार असतात, तीच परिस्थीती वास्तव बनुन समोर येते.

     उदा. माझं कर्ज कसं फिटेल याची सतत चिंता असेल तर मनाचा फोकस कर्जावर जातो तर कर्ज वाढतं.
माझं वजन वाढतयं, म्हटलं की वजन अजुन वाढतं, 
माझे केस गळतायत म्हटलं की अजुनच केस गळतात,
माझं लग्न जमत नाही म्हणलं की लग्न जमायला अजूनच उशीर होतो,
कर्ज माझा जीव घेणार म्हणलं की अजून अडचणी निर्माण होतात,
वगैरे वगैरे...

ज्या गोष्टीवर मन, लक्ष केंद्रित करतं, ती गोष्ट घडते.

  म्हणजे जर आपण आपल्याला जे हवं ते आपल्याला मिळालयं अशी कल्पना करुन, मनाला उत्तेजित अवस्थेत नेलं आणि त्यावर विश्वास ठेवला, की हवं ते आपल्याला मिळतचं मिळतं.

फक्त आपल्याला ते मिळालयं, हे मनाला पटवुन देता यायला हवं.

        मरणाच्या दारात पोहचलेली, डॉक्टरांनी आशा सोडून दिलेली पण हे रहस्य जाणणारी, अनेक माणसं फक्त ह्या शक्तीचा वापर करुन आणि सकारात्मक कल्पना करुन आणि त्यावर विश्वास ठेऊन पुन्हा ठणठणीत बरी झाली. 

विश्वातील सर्वच थोर माणसांनी हे आकर्षणाचं रहस्य जाणलं होतं आणि त्याची अंमलबजावणी केली, म्हणुन तर ते इतरांपेक्षा वेगळे ठरले.

      तुम्हालाही तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी समाधान हवं असल्यास, रोज सकाळी मस्त तयार होवुन आरशासमोर उभे राहुन, चेहर्‍यावर स्मितहास्य ठेवुन, मोठमोठ्याने अशी वाक्ये जोरजोरात म्हणा!..

1) मी हवा तेवढा पैसा आकर्षित करु शकतो, मी शक्तीशाली आहे.
2) माझ्यात जग बदलण्याची शक्ती आहे.
3) माझ्या भावना नियंत्रित करण्याचा अधिकार मलाच अहे, आणि आज मी आनंदात रहायचे ठरवले आहे.
4) माझ्या आई-वडीलांना, माझ्या परीवाराला माझ्यावर, गर्व आणि अभिमान वाटेल, असे एक काम मी आज करणार आहे. 
5) मी प्रचंड आत्मविश्वासाने भरलेला असुन, प्रचंड संपत्तीवान आहे.
6) मी एका प्रसन्न व्यक्तीमत्वाचा मालक असुन, संपर्कात आलेल्या प्रत्येकाला मी भरभरुन आनंद वाटतो. खळखळुन हसवतो.
7) परिस्थीतीला हरवण्याची माझ्यात हिंमत आहे. मी परीस्थीतीवर सहज मात करु शकतो.
8) माझ्या जिद्दीला भिऊन संकटे दुर पळुन जातात.
9) मी आयुष्याच्या प्रत्येक लढाईचा यशस्वी सामना केला आहे, आणि ती जिंकली आहे.
10) माझ्या आजुबाजूचे, अवतीभवती वावरणारे, सर्व लोक माझ्यावर खुप प्रेम करतात, आणि मी ही त्यांच्यावर खूप खूप प्रेम करतो.
11) मी आतापर्यत माझी बरीचशी स्वप्ने पुर्ण केली आहे, आणि माझी उरलेली स्वप्ने लवकरचं पुर्ण होणार आहेत.
12) मी सतत आनंदी असतो. मला रोज नवनव्या कल्पना सुचतात, आणि मी तात्काळ त्यांना अंमलात आणतो. 
13) मी निरोगी आहे, 
14) आयुष्यात प्रत्येक चांगल्या गोष्टीसाठी मी आभारी आहे.
15) मी निसर्गाची अद्वितीय कलाकृती आहे.

याला पॉझीटीव्ह अफैर्मेशन्स म्हणा, सकारात्मक स्वयंसुचना म्हणा, यामुळे दिवसभर एक आगळीवेगळी उर्जा तुमच्यामध्ये संचार करेल

तुम्ही हे जर मनापासुन, फील करुन बोललात, आणि ते तुमच्या सुप्त मनापर्यंत पोहोचलं, तर तुमच्या नकळत ते तुमच्या सार्‍या आज्ञा पाळेल आणि खर्‍या करुन दाखवेल.

आणि हीच एका दृष्टीने “लॉ ऑफ अट्रॅक्शन” ची दणदणीत सुरुवात असेल!..

ही आणि अशी प्रत्येक वाक्ये तुम्हाला अधिकाधिक शक्तीशाली आणि आनंदी बनवो, 

आरोग्यम् धनसंपदा....

सुंदर विचार

    पैशाने पुर्ण झालेली स्वप्न,

          मरेपर्यत टिकतात..
      कष्टाने पुर्ण झालेली स्वप्न,
          इतिहास घडवतात..
        
 घरातून बाहेर जाताना हुशार बनून जा कारण जग एक बाजार आहे ....
 ""परंतु घरी जाताना एक हृदय घेऊन जा कारण तिथे एक कुटुंब आहे ""....                                        

कुणाच्या नशिबाला हसू नये
               नशिब कुणी विकत घेत नाही
       
वेळेचे नेहमी भान ठेवावे..
           वाईट वेळ सांगून येत नाही.!
 
बुद्धी कितीही तल्लख असली तरी
          नशिबाशिवाय जिंकता येत नाही, 
  
 बिरबल बुद्धीवान होता तरीही तो           
             राजा होऊ शकला नाही.!

     समाधान ही अंत:करनाची सर्वात सुंदर संपत्ती आहे.
ज्याला ही संपत्ती मिळाली,तो जगात सर्वात सुखी मनुष्य आहे.

"अशा व्यक्तीवर जास्त विश्वास ठेवा जी व्यक्ती आपल्या अंतकरणातील तीन गोष्टी ओळखेल
हसण्यामगील दुःख
रागवण्या मागील प्रेम
आणि शांत रहाण्यामागील कारण."

कपडे नाही 
माणसाचे विचार
Branded पाहिजे...!

चुकीच्या बाजूला उभा राहण्यापेक्षा 
एकटं उभं रहाणं केव्हाही चांगलं.

माणूस "मागे" असण्याची २३ कारणे...

 आर्थिक सल्लागार मकरंद गाडगीळ यांच्या लेखणीतून...

♻ माणूस "मागे"
असण्याची २३ कारणे...

मराठी माणूस आज च्या स्पर्धेच्या युगात मागे का पडतो ? आर्थिकद्रुष्ट्या का कमकुवत होतोय ? मराठी माणसातचं बेकारी व गरिबी का वाढतच चालली आहे ? त्यावर केलेले 'संशोधन' व "निरीक्षणाअंती २३ कारणे दिसून आली, जी मराठी माणसांनी "स्वतःला" विचारावीत व त्यावर "स्वतःच" उपाय योजना करावी. ह्या बाबी प्रत्येक मराठी माणूस 'सकारात्मकतेने' घेईल हिच अपेक्षा...! (वाद नको.! कारण, 'नाहक वादविवाद' मराठी माणूसचं घालतो..!!)

हिच ती २३ कारणे : -

१) कमी प्रवास - प्रवास केल्याने जग कळते, कल्पना सुचतात, मार्ग सापडतात व प्रगती होते. मराठी माणूस आर्थिक स्थितीमुळे फारसा प्रवास करताना दिसत नाही, अनेक औद्योगिक प्रदर्शनात मराठी माणूस दिसत नाही.

२) अति राजकारण - सर्वतजास्त मराठी माणूस राजकारण वेडा आहे. राजकीय नेत्यांच्या सभेला आपला कामधंदा सोडून लाखोंच्या संख्येने येणारा मराठी माणूसच असतो. यात व्यापारी समाजातला एक तरी माणूस दिसतो का? मी काय करतो आहे या पेक्षा लोकांनी काय केले, काय करतात यात जास्त लक्ष.

३) दोनच हाथ कमवणारे - सर्वसाधारण मराठी कुटुंबात एकच व्यक्ती कमवते. कुटुंबातील जास्तीत जास्त लोकांनी काम केले पाहिजे. 

४) सर्वांची तोंडे वेगळ्या दिशेला - कुटुंबात एकी नसते. बाप एका दिशेला, मोठा मुलगा एका दिशेला तर लहान भाऊ तिसरीकडेच. प्रत्येक कुटूंबात एकी पाहिजे.

५) खोटं बोल पण रेटून बोल -सगळ्या थापा एकमेकांना गंडवण्याच्या गोष्टी, खरे सांगण्यासारखे नसतेच म्हणून खोट बोलावे लागते. मी हे करीन ते करीन या स्वप्नातच आयुष्य संपते, पण मी हे करतोच असा निश्चय घेत नाहीत.*

६) आहार व आरोग्याकडे दुर्लक्ष - आरोग्याकडे अत्यंत दुर्लक्ष, महागाईमुळे उपचारही परवडत नाही, थातुरमातुर उपचार केले जातात. योग्य आहार नाही, व्यसनांचे प्रमाण प्रचंड आहे. भरपूर पैसा व्यसनातच संपतो.

७) आर्थिक निरक्षरता - पैसा काय आहे ? तो कसा वापरायचा ? शेअरमार्केट, डिमॅट, फॉरेन एक्सचेंज, डॉलर, आय टी याची खूप कमी माहिती शिकलेल्या लोकांनाही नाही. ९०% महिलांचे तर साधे पॅनकार्ड सुद्धा नसते. 

८) दूरदृष्टीचा अभाव - पुढील ५, १०, २० वर्षाच्या योजना आखाव्या लागतात. त्यावर आजपासूनच काम करावे लागते. अशा दूरदृष्टीमुळे नियोजन होते व माणसे कामाला लागतात. 

९) ऐतिहासिक स्वप्नात - अजूनही मराठी माणूस ऐतिहासिक स्वप्नात जगत आहे. जास्तीजास्त वेळ फेसबुक व्हाट्सएप वर कोणी कधी काय केले ते शोधत फिरतो, आणि स्वतःचा वेळ वाया घालवतो, तेव्हा सत्य आणि सध्याच्या परिस्थितीचे भान ठेऊन उद्योग करून पैसा कमावला पाहिजे. 

१०) गृहकलह, कोर्टकचेरी - गृहकलहाचे प्रमाणही प्रचंड आहे. भावाभावातचं वाद. संपत्तीवरून भावकीत वाद , वादावादी, मारामारी, खून, कोर्टकचेऱ्या सामंजस्यपणे निपटावे व प्रगतीच्या मार्गे लागावे.

११) समाज अर्थपुरवठा पद्धत -  नवीन व्यवसाय सुरु करण्यासाठी अत्यंत कमी व्याज दरात किंवा बिनव्याजी ताबडतोब अर्थपुरवठा करण्याची व समाजातील सर्वाना वरती आणण्याची पद्धत गुजराती, मारवाडी, सिंधी, समाजात आहे. तशी मराठी समाजात आढळत नाही. आता तर सरकार ने नवीन व्यावसायिकांसाठी 5 लाखांपर्यंत कर्जयोजना सूरु केली आहे, ज्यात बिना गैरेंटी कर्ज उपलब्ध आहे, पण त्याबद्दल काहीच माहिती करून घेत नाहीत.

१२) जनरेशन गॅप - खूप मोठा जनरेशन गॅप कुटुंबात जाणवतो. एखादा हुशार तरुण उद्योग करतो म्हटले कि त्यालाच येड्यात काढले जाते. जुन्या लोकांच्या डोक्यातून नोकरी अजून जात नाही. 

१३) ज्ञानापेक्षा सर्टिफिकेट -  प्रत्यक्ष व प्रॅक्टिकल ज्ञानापेक्षा पदवीच्या सर्टिफिकेटला जास्त महत्व आहे. काहीही करून पदवी मिळवायची. त्यामुळे सिव्हिल इंजिनियर झाले बेरोजगार.... व बाहेरून आलेला प्लंबर, गवंड्यांचे काम करून महिना ५० हजार कमवतो. 

१४) धरसोड वृत्ती - हे प्रमाण प्रचंड आहे. थोडे दिवस खासजी संस्थेत नोकरी... कामाच्या अगोदरचं पगार किती देणार ? विचारायची प्रवृत्ती...हे काम केले तर लोकं काय म्हणतील??? अशा धरसोड वृत्तीमुळेच आयुष्यातील १० वर्ष निघून जातात. एकदाच ठसून एखाद्या क्षेत्रात टिकून राहिले पाहिजे.

१५) कष्टाची लाज - विशेषतः सुशिक्षित तरुणांना कष्टाची लाज वाटते. Easy Money चे खुळ डोस्क्यात थैमान घालतयं. मी एमए, बीई, बीएड, झालोय म्हणजे मला इस्त्रीचे कपडे घालून फिरण्याचा अधिकार आहे असे समजतात. स्वतःच्याच घरातही कामं करण्यास लाजं वाटते. 

१६) फालतू बाबींना महत्व - एकत्र येणे, प्रगती साधणे, उद्योग उभारणे हे मुख्य विषय राहिले बाजूला... पण मराठी माणूस अजून लग्नपत्रिकेत नाव नाही टाकले, लग्नात आहेर नाही केला, होर्डिंग ववर नाव माही टाकले, अशा फालतू बाबींमध्ये अडकला आहे. 

१७) दुसऱ्यांच्याच अपयशात आनंद - भावाचा ऊस जळाला, त्याला पाण्याची  नाही दिली, त्याची म्हैस गेली कि दुसऱ्या भावाला भलताच आनंद व उकळ्या फुटतात...मित्रांचे व्यवसायात नुकसान झाले, बरं झालं मी आधीच सांगत होतो नको करू, अगदी आपल्या सख्ख्या भावाचं चांगले झाल्यावरही बघवत नाही हे "आश्चर्य"...!!!  मराठी माणूसच मराठी माणसाचा शत्रू आहे...!!! 

१८) इंग्रजी कच्चे - मराठीचा अभिमान जरूर बाळगावा पण जगाच्या स्पर्धेत टिकण्यासाठी व पुढे जाण्यासाठी अस्सलिखित इंग्रजी बोलणे, लिहिणे, वाचणे आलेच पाहिजे. अति उत्तम इंग्रजी आलेच पाहिजे. इंग्रजी बोलता येत नाही म्हणून इंग्रजीवर राग दाखवून काही होणार नाही.

१९) संवादकौशल्याचा अभ्यास - जीवनात व उद्योगात पुढे जाण्यासाठी आपण दुसऱ्यांशी संवाद करतो ह्या कौशल्याचे खूप मोठे महत्त्व आहे. मोठे प्रोजेक्ट मिळवणे, काम मिळवणे, विविध स्थानिक अधिकारी वर्ग इतर व्यक्ती यांनाही आपण प्रत्यक्ष पत्रव्यवहार, इ-मेल द्वारे, फोनवर कसा उत्कृष्ट संवाद साधला पाहिजे हे शिकले पाहिजे.

२०) चाकोरी मोडत नाही - अजूनही जुन्याच पद्धतीने काम चालू आहे. त्यामुळे प्रगती होत नाही, मतदार संघात काहीही काम न करता कित्येक दशके तोच खासदार, आमदार, नगरसेवक, झेडपी - पंचायत - ग्रामपंचायत सदस्य निवडून देण्याचे / येण्याचे प्रकार दिसतात.

२१) जाती प्रथा - (फालतू प्रथा) 21व्या शतकात सुद्धा जाती प्रथेचा पगडा प्रचंड आहे. एकाच गावात व एकाच गल्लीत १० वेगवेगळ्या जातीचे पुढारी आहेत. संपूर्ण समाज अनेक धर्म - पंथ - जात - पोटजातीत विभागला गेला आहे, त्यामुळे समाजाची ताकद क्षीण झाली आहे. या धावपळीच्या युगात एक मराठी माणूस म्हणून कोणीच एकत्र यायला मागत नाही. आणि याचा फायदा इतरांना होतो.अमुक एका जातीत जन्म झाला यासारख्या अर्थशून्य गोष्टींचा मराठी माणसाला; स्वतःची  एक व्यक्ती म्हणून दमडीची अचीव्हमेंट नसताना; चक्क अभिमान वाटतो.

२२) वेळेची किंमत - वेळेचे महत्व समजलेले नाही. अनेक व्यक्ती आयुष्याच्या वेळेचा प्रचंड अपव्यय करताना दिसतात. बारसे, साखरपुडा, मुलगी बघणे, विवाह, यात्रा, मयत, प्रचार सभा, निवडणूक, वारी, देवदर्शन, राजकारण, या अनेक बाबींसाठी सरासरी वर्षातले १०० दिवसाहून अधिक काळ वाया घालवतात.  

२३) ग्राहकाला किंमत न देणे - ग्राहक म्हणजे राजा समजला जातो पण अपल्याकडे तसे होत नाही, ग्राहकाला समोर रुबाब दाखवणे, तसेच ऐन कामाच्या वेळेला मोबाईल बंद करून ठेवणे आणि ग्राहकाला दिलेलं वेळ न पाळणे, 10 ची वेळ सांगून 11 ला पोचणे, याने ग्राहक सुद्धा निसटतो. आणि आपला रेफरन्स पुढे कोणाला देत नाही.

हिच आहेत  माणूसं मागे असण्याची २३ कारणे...!!! 🙏🌹 *"पटलं तरं घ्या, बदल घडवा, तुमची मर्जी".! 
++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

मनव्यवस्थापन!

आहे त्याचा स्वीकार केल्यास नव्यान्नव टक्के चिंता पळुन जातात.

वेदनांना विचारांपासुन तोडलं की चिंता पळुन जाते! 

1) भुतकाळात घुटमळणे बंद करा– 

बसल्या बसल्या ना, आपल्या डोक्यात उगाच चक्र सुरु असते, 
- “दहा वर्षांपुर्वी मी चांगला अभ्यास केला असता, तर आज मी ही खुप मोठ्ठा ऑफीसर राहीलो असतो.” 
- “सात वर्षांपुर्वी मी प्लॉट घ्यायला हवा होता, तेव्हा मी सुवर्णसंधी सोडली.” 
- “त्यावेळी मी त्यांच्याशी असे वागायला नको होते! खुप वाईट आहे मी!” 
- “मी खुप कमी पगारावर काम करायला तयार झालो, मी असे नव्हते करायला पाहीजे.”
 व्हायच्या त्या घटना घडुन गेल्या, 
टाईम मशीनमध्ये जाऊन ते काही बदलता येणार नाही, तेव्हा आता त्यावर विचार करुन फक्त आणि फक्त, आपली बहुमुल्य उर्जा, फालतुमध्ये खर्च होणार, त्यापेक्षा 
*भुतकाळातल्या, ह्या सर्व चांगल्या वाईट घटना, विसरुन गेलेलं, बरं!

2)इथे प्रत्येक जण अद्वितीय आहे– 

बहुतांश दुःखांच मुळ हे तुलनेत असतं,

ह्या जगात प्रत्येक गोष्ट एकमेवअद्वितीय आहे
गुलाब दिसायला सुंदर असतो, पण म्हणुन मोगर्‍याचं महत्व कमी होत नाही, त्याचा सुगंध ही त्याची ओळख! त्या दोघात डावं-उजवं अशी तुलना करता होईल का? प्रत्येक फुल अद्वितीय आहे.
आता यात डावं उजवं करुन, कशाला दुःखी व्हायचं! प्रत्येकाचा चेहरा एक दुसर्‍यापासुन वेगळा आहे, म्हणुन ह्या जगातली प्रत्येक व्यक्ती एकमेव अद्वितीय आहे, तुम्हीपण!..

3) ‘आयुष्य कशासाठी’ याचं उत्तर शोधा–

आयुष्य निसर्गाने आपल्याला दिलेली अनमोल भेट आहे, 
आयुष्य सतत आनंदी राहण्यासाठी आहे, आयुष्य उत्साहाने भरभरुन जगण्यासाठी आहे, आयुष्य भव्यदिव्य स्वप्नं बघण्यासाठी आणि ती स्वप्ने मनमुरादपणे जगण्यासाठी आहे, 
आयुष्य आपल्या आणि इतरांच्या चेहर्‍यावर हसु फुलवण्यासाठी आहे!

जीवनाचा प्रत्येक क्षण निष्पापपणे बागडण्यासाठी आहे, मनातले सर्व अपराधी भाव, भुतकाळ-भविष्यकाळ, काल्पनिक जबाबदार्‍यांचे ओझे, सगळे सगळे फेकुन द्या, मोकळे आणि रिते व्हा, प्रत्येक क्षणाला, निरापराध वृत्तीने, निरागसपणे सामोरे जा!

माणसाला तीन गोष्टी जास्त त्रास देतात, प्रत्येक दुःखाच्या मुळाशी ह्या तीन गोष्टी सापडतील, 

 अ) अपेक्षा
 ब) अपुर्ण स्वप्ने,
 क) ध्येयप्राप्ती नंतर येणारा रिक्तपणा!

बहूदा आपण भला ऊसकी कमीज मेरे कमीजसे सफेद कैसी ! याच विचारात असतो. 
तो कसा सुखी आहे, 
ती कशी मस्त जगते, 
त्याच आयुष्य आरामशीर आहे,  माझ्याकडे हे का नाही, या अपेक्षेने, तुलनेने दु:ख्खी होत तर नाही ना !

बघा! किती गंमतीशीर आहे हे, समजा, एखाद्याचे लग्न होत नाही, तेव्हा तो किती परेशान असतो, उठता-बसताना, जेवताना, झोपताना एकच ध्यास असतो, लग्न-लग्न-लग्न! नकळत हाच विचार, चिंता बनुन, त्याच्या आत्म्याला डाचु लागतो, त्याच्या दुःखाचं कारण बनतं, मग हास्य गायब होतं, चित्त थार्‍यावर राहत नाही, चिडचिड वाढते. स्वप्नप्राप्तीकडे रोज वाटचाल करायची पण मनावर जखम न होवु देता!, ह्याला म्हणतात, सुखी जीवन!

आणि समजा, एके दिवशी लग्न झालेच, (प्रत्येकाचे होतच असते,) मग अचानक आयुष्यातले थ्रील खतम! पुन्हा सप्पक आयुष्य सुरु, जॉब लागु दे, जॉब लागु दे म्हणुन तळमळलो, आणि जॉब लागला, आता थोड्याच वर्षात त्या जॉबचा कंटाळा यायला लागतो, एक प्रकारचा रिक्तपणा येतो, 

आयुष्य कशासाठी? जीवनाचा निर्भेळ आनंद घेण्यासाठी, मनाच्या आकाशात हे उत्तर जेव्हा गवसेल, तेव्हा नैराश्य, उदासीनता जवळपास फटकणार पण नाहीत! 

4) सेवा करणार्‍याला आत्मिक समाधान मिळते-

बघा! किती मजेशीर आहे हे,

- अगरबत्ती स्वतः हवेत विरुन जाते, पण वातावरणात एक प्रसन्न सुगंध पसरवते,
- दिव्याची वात स्वतः नष्ट होते, पण तेजाने घर उजळुन टाकते.
काहीतरी बनण्यासाठी, काहीतरी प्राप्त करण्यासाठी आपण सकाळ संध्याकाळ धावत असतो, पण खरे समाधान कुठे आहे? 
आपल्यात असलेल्या गुणांचा, शक्तीचा वापर आजुबाजुच्यांना, नातेवाईकांना, मित्रांना, अगदी अनोळखी लोकांना सुखी, आनंदी बनवण्यासाठी करणार्‍यांचं जीवन खरं सार्थ झालं, असं म्हणता येईल.

ह्याच चार सुत्रांचा मिळुन बनतो लॉ ऑफ अट्रेक्शन!
मनाच्या तळाशी जाऊन सुखाचा शोध घेऊ पाहणा-या,  
सगळ्यांचे आयुष्य, सुखी, समाधानी आणि समृद्ध होवो,
 ह्या मनस्वी प्रार्थनेसह, 

धन्यवाद आणि शुभेच्छा!
आपल आयुष्य अरोग्यपुर्ण जावो

लेख आवडल्यास शेअर करून वाचनाची आवल प्रत्येकामध्ये रुजविण्याचा कामाच्या गोष्टी या उपक्रमात आपला सहभाग नोंदवावा ही विनंती.

काॅपी/ पेस्ट , सदर लेख हा कामाच्या गोष्टी पेज चा नसून मूळ लेखकाचे नाव माहीत नसल्यामुळे तसाच टाकण्यात आलेला आहे.त्यासाठी लेखकाची दिलगिरी व्यक्त करतो व हा लेख याच्या मूळ लेखकास समर्पित.आपल्याला लेखकाचे नाव माहीत असल्यास कॉमेंट मध्ये नाव आणि ओरिजनल लेखाची लिंक असेल तर पाठवावी ही विनंती.
वाचाल तर वाचाल

मन शांत, एकाग्र ठेवण्यासाठी...!

कठीण परिस्थितीमध्ये मनाला शांत ठेवणं फार कठीण काम. 

म्हणून आपलं अशांत मन एकाग्र करण्यासाठी खालील गोष्टी करून पहा, तुम्हाला नक्कीच फायदा होईल...


1) टू मिनिट रुल वापरा : कठीण प्रसंगात दोन मिनिटे शांत चित्ताने विचार करा आणि ती गोष्ट केल्याने आणि न केल्याने काय परिणाम होतील याची कल्पना करा. म्हणजे तुमच्यासमोर दोन पर्याय निर्माण होतील. आता काही सेकंद डोळे बंद करा आणि आपलं मन जे काही सांगतं आहे त्याचाच आधार घेऊन परिस्थितीशी दोन हात करण्यासाठी पुढे या.

2) नकारात्मक विचार सोडा : आपण नेहमीच नकारात्मक विचार करण्यात खूप शक्ती वाया घालवतो. आपल्याला भीती असते की त्या कठीण प्रसंगाचे वाईट परिणाम काय होतील? या विचारामुळे मनात भीती निर्माण होते आणि चित्त थाऱ्यावर राहत नाही. उलट अशा क्षणी आपण सकारात्मक विचार केला पाहिजे की या परिस्थिती समोर आपण जिंकलो तर त्याचे किती सुंदर परिणाम दिसून येतील. हा विचार तुमच्या मनात आशा निर्माण करतो आणि तुमचे मन दृढ बनवतो.

3) जबाबदारी घ्या : जर एखादे काम करण्यासाठी तुमची निवड केली असेल तर कठीण प्रसंगी त्याचे अपयश इतरांवर फोडू नका. एक लक्षात ठेवा की इतरांच्या चुका पुढे केल्याने ते लोक पुढल्या वेळेस तुमच्या पाठीशी उभे राहणार नाहीत. जर जबाबबदारी तुमची होती तर ती स्वीकारा म्हणजे त्या कठीण प्रसंगातून बाहेर पडण्यासाठी तुमचे सहकारी तुम्हाला मदत करतील. 

4) एकाच वेळी एकच काम करा : एकाचवेळी अनेक गोष्टी केल्याने कोणतेही काम नीट होत नाही हे लक्षात ठेवा. एक काम पूर्ण झालं की मग दुसरं काम हाती घ्या. कठीण प्रसंगी हा नियम पाळणे अतिशय महत्त्वाचे आहे. एकाचवेळी अनेक गोष्टींमध्ये मन गुंतवल्यास कोणत्याही एका कामावर तुम्ही लक्ष केंद्रित करू शकणार नाही. म्हणजे आधीच वाईट असलेली परिस्थिती अधिकच वाईट होईल.

5) केवळ ध्येय नजरेसमोर ठेवा : कठीण प्रसंगात आपण सामान्यत: आपले ध्येय विसरून जातो. आपण ही गोष्ट नेमकी का करत आहोत याबद्दल आपल्या मनात संभ्रम निर्माण होतो. एकदा का तुम्ही ध्येयापासून भटकलात की तुमचे मन एकाग्र होणार नाही. तुम्हाला निर्णय घेण्यात अडचण होईल. सर्वप्रथम मनाला विचारा की आपले ध्येय काय आहे? ते उत्तर मिळाले की त्यानुसार कठीण प्रसंगाशी कसे लढावे या संदर्भात निर्णय घ्या. 

कठीण प्रसंगात वरील गोष्टी लक्षात ठेवल्यास तुमच्या मनावरचा ताबा नक्कीच सुटणार नाही. उलट मन शांत, एकाग्र राहील.

प्रगल्भता म्हणजे काय ?

प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्ही जगाला बदलण्याचा नाद सोडून देता, आणि स्वतःच्या बदलासाठी स्वतःच्या प्रत्येक कृतीचे निरीक्षण-परीक्षण करता.

प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्हीं लोकांना, ते जसे आहेत तसे स्वीकारता.

प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्हांला समजायला लागते कि जीवनात प्रत्येकजण आप आपल्या जागी बरोबर असतो.

प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्ही घेण्या पेक्षा देण्यावर जास्त भर देता.

प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्हीं नात्या मधल्या अपेक्षा सोडून देता आणि त्यागाची भावना स्वीकारता.

प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुमचं आत्मीक सुखं नेमकं कशात आहे ते तुम्हांला समजतं.

प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्हीं किती हुशार आहात, किती मोठे आहात, हे जगाला पटऊन देण्याच्या भानगडीत पडत नाही.

प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्ही इतरांकडून स्तुती आणि शब्बास्कीची अपेक्षा न ठेवता प्रामाणिकपणे काम करता.

प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्हीं स्वतःची तुलना इतरांशी करणं सोडून देता.

प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्हीं स्वतःमध्ये देखील रममाण होता.

प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्हांला गरज आणि हव्यास यातील फरक स्पष्ठपणे जाणवतो.

प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्हीं माणसांच्या बरोबर माणुसकीने बोलता, वागता.
================

प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्हीं न सुटणारे प्रश्न सोडून देता.

प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्ही आपली प्रगती करत असताना इतरांना देखील मोठं करत असता.

प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्हीं चांगल्या गोष्टींचं निरपेक्ष भावाने,मनापासून कौतुक करता.

प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्हांला जाणीव होते कि आपल्यामुळे कोणाला त्रास होऊ नये.

आणि शेवटी अती महत्वाचे

👉प्रगल्भता म्हणजे : जेव्हा आपण अंतरीक सुखाचा संबंध भौतिक गोष्टींशी जोडणे सोडून देता.

Be Happy with Nothing, You will be Happy with Everything.

 स्वयंसुधारणे साठी इतका वेळ द्यावा की इतरांवर टीका करण्यासाठी वेळच उरणार नाही.  

-----------------------------------------------------------------

तणाव नियोजन आणि विवेकनिष्ठ विचार पद्धती

-तणाव नियोजन म्हणजे असाह्य भावनांचे साह्य भावनात रूपांतर करणे.यासाठी तुमचे विचार वास्तववादी पाहिजे.

-नियंत्रणातले घटक कोणते आणि नियंत्रणाबाहेरचे घटक कोणते हे जेव्हा माणसाला कळते त्याल विवेक असे म्हणतात.आत्मनिरीक्षण करणे गरजेचे.

-वर्तमानात जगा.तुमच्या समस्येवर कल्पक विचार करा.

-फक्त घटना घडतात म्हणून परिणाम होतात असे नाही,घटना आणि परिणाम ह्या दोहामध्ये असतो व्यक्तीचा दृष्टीकोन.

-विचार आणि भावनांना विकासाकडे न्यायचे की विकारांकडे हा निर्णय प्रत्येक व्यक्तीच्या हातामध्ये आहे.

-आग्रही आणि निर्धाराचे वागणे-बोलणे हा तणाव नियोजनाचा मूळ आधार आहे.
 
-तणाव नियोजन ही गतिशील प्रक्रिया आहे.

- व्यक्तीवर आणि परिस्थितीवर 'लेबले' लावण्यापेक्षा वर्तनाचे मूल्यमापन करावे.

-दोषारोप करण्यात व्यय होणारी मानसिक उर्जा समस्येचे समाधान करण्यासाठी वापरावी. 

- सुख आणि दुःख आपल्या विचारांवर अवलंबून असते.

-आपण जसा विचार करतो तश्या घटना आपल्या आजूबाजूला घडतात.

-आपले चांगले विचार मित्र असतात.विघातक विचार शत्रू असतात.

-भूतकाळातील घटनांचा विचार करू नका.

-घडणाऱ्या घटनेला आपण कसा प्रतिसाद देतो हे महत्वाचे.
 
-भगवान गौतम बुद्धांची एक गोष्ट.
  भगवान बुद्ध एकदा एके ठिकाणी धम्मदेसना देत असतात.एक जण येऊन बुद्धांना शिव्या देतो.बुद्ध एकदम शांत असतात कुठलीही प्रतिक्रिया देत नाहीत.
नंतर त्यांचा शिष्य त्यांना विचारतो भगवान आपण त्या व्यक्तीला कुठलीच प्रतिक्रिया का नाही दिली. बुद्ध म्हणतात मी त्या व्यक्तीच्या शिव्या कुठे घेतल्या.त्याच्या त्याला परत केल्या.

- प्रत्येक गोष्ट मनाला लावून घेऊ नका.ओझं वाढत जात.

संदर्भ- दूरदर्शन- सखी सह्याद्री कार्यक्रम.

-सकारात्मक विचार ठेवा.उद्या पासून आपण ताण कमी करण्याचे उपाय पाहू.

आपला नम्र
भूषण सुकेशनी वामनराव
मो.92849 18607

सदर लेख हा Stress Management या कोर्स मधील आहे.कोर्सच्या अधिक माहिती साठी खालील लिंकवर क्लिक करून संपर्क साधा.

 https://wa.me/919284918607

तुमचा विनर्स ऍटीट्युड तुमचं आयुष्य बदलून टाकेल.

मित्रांनो, तुमचं ऍटीट्युड कसंही असो पण आपल्या स्वतःमध्ये जाणीवपूर्वक काही बदल केले तर तुमचं ऍटीट्युड ‘विनिंग ऍटीट्युड’ मध्ये बदलणे हे फक्त तुमच्या आणि तुमच्याच हातात आहे.

ऍटीट्युड दोन प्रकारचे असतात एक ‘विनर्स ऍटीट्युड’ आणि दुसरा ‘लूजर्स ऍटीट्युड’

एकदा जमशेदजी टाटा मुंबईतलं त्या काळचं नावाजलेलं हॉटेल ‘हॉटेल वोट्सन मध्ये गेले. पण या हॉटेलच्या बाहेर लिहिलं होतं ‘कुत्रे आणि भारतीयांना प्रवेश निषिद्ध आहे’ तेव्हा या गोष्टीला आपलाच काय पूर्ण भारतीयांचा अपमान समजून जमशेदजी टाटांनी ठरवलं कि यापेक्षाही मोठ जगतविख्यात हॉटेल मी भारतात बनवेल….

हा असतो विनर्स ऍटीट्युड… विनर्स जे संधी शोधत बसत नाहीत तर संधी निर्माण करतात.

कारण यशस्वी लोकांना प्रत्येक अडचणीत संधी दिसते पण अपयशी लोकांना प्रत्येक संधीत अडचण दिसते. त्यामुळे ऍटीट्युड बदलावा लागेल आयुष्य आपोआप बदलेल.

हा ‘विनर्स ऍटीट्युड’ आपल्याला अशी नजर देतो ज्यामुळे आपण जगाकडे एका वेगळ्या दृष्टिकोनातून पाहू शकतो. जिथं दुसऱ्यांना फक्त समस्या दिसतात तिथं आपल्याला संधी दिसू शकतात.

आता हेच बघा… एक तरुण होता जो बोलण्यात नुसता अडखळायचा एक वाक्य सुद्धा त्याला न अडखळता स्पष्ट बोलता यायचं नाही. पण त्याचं स्वप्नं होतं ऍक्टर बनण्याचं. त्याच्या अडखळत बोलण्याने त्याला कुठेही काम मिळत नव्हतं. पण त्याने हार मानली नाही त्याने स्वतःचाच एक शो बनवला. होऊन होऊन काय होईल शो चालणार नाही, नाही चालला तर पुढे बघू हा त्याचा ऍटीट्युड होता. या शो मध्ये त्याने तोंडातून एकही शब्द काढला नाही. फक्त तोडवरचे हावभाव हेच त्याचं भांडवल होतं. हा शो सुपरडूपर हिट ठरला लोकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं आणि हा तरुण म्हणजे कोमिडी मास्टर ‘मिस्टर बीन’…

स्वतःमध्ये असलेल्या कमतरतेमुळे त्याने हार मानली असती तर आपल्याला आज ‘मिस्टर बीन’ जगाला माहीत असता का?

समस्या प्रत्येकाच्या आयुष्यात असतात जोपर्यंत तुम्ही जिवंत आहात, समस्या या येणारच पण या समस्यांकडे तुम्ही कसं पाहताय ते तुमचा ऍटीट्युड डीसाईड करतं. त्यामुळे परिस्थिती कितीही वाईट असो त्यामध्ये चांगल्या गोष्टी शोधण्याचा प्रयत्न करा. कारण समस्या आणि संकटं कधीच एकटी येत नाहीत तर ती आपल्यासोबत अनेक संधी घेऊन येत असतात. पण होतं असं की आपलं लक्ष हे फक्त समस्यांकडे जातं त्यातली संधी शोधायसाठी समस्येकडे थर्ड पर्सन होऊन बघायची फक्त गरज असते.

जग त्याच लोकांना लक्षात ठेवतं जे आपल्या समस्यांवर मात करून काहीतरी हटके करून दाखवतात. नाहीतर बाकीच्यांना समस्या स्वतःच गाडून टाकतात. मग सांगा तुम्हाला समस्येसमोर पाय रोऊन उभे राहायला आवडेल की समस्या, संकटं यांच्या दुष्टचक्रात स्वतःला संपवायला आवडेल.

जिथे आपण एकदा फेल झालो तरी हार मानतो तिथे या माणसाला एक नाही दोन नाही कित्येक वेळा नोकरीसाठी डावललं गेलं. आणि नोकरी काही मोठी हाय प्रोफाइल कॉर्पोरेट कम्पनिमधली नाही. साधी वेटरची नोकरी शोधत होता तो. पण त्याचा ऍटीट्युड त्याला हार मानायला देतंच नव्हता त्यानं त्याच्या अपयशाला वेगळ्या नजरेतून पाहिलं त्यातून तो शिकत गेला. हा आहे अलिबाब चा फाउंडर ‘जॅक मा’ ज्याला एका वेटरच्या नोकरीसाठी हतबुद्ध व्हायची वेळ आली होती तोच आज चायनाचा सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे. ही असते विनिंग ऍटीट्युडची ताकत.

एक गोष्ट लक्षात ठेवा चुका त्यांच्याकडूनच होतात, फेल तेच लोक होतात जे प्रयत्न करतात. आणि यांच्या चूका तेच लोक शोधतात जे स्वतः काही करत नाहीत. यासाठी तुम्ही तुमचा विचार, नजर, ऍटीट्युड इतका पॉजीटीव्ह ठेवा की आयुष्यात कितीही संकटं आली तरी तुम्ही त्यांचा सुद्धा सामना करू शकता. आणि सर्वात महत्त्वाचं अपयशाला स्वीकार करा. कारण अपयश ही यशाची पहिली पायरी असते हे मी तुम्हाला सांगायला नको😊

जे लोक आज यशाच्या शिखरावरती आहेत ते सुद्धा कधी न कधी अपयशी झालेच होते. बिल गेट्स, अब्राहम लिंकन, एलॉन मस्क अशी कित्येक उदाहरणं आहेत जे अपयशी होऊन थांबले नाहीत. त्यांनी जर हार मानली असती तर आज जगाला ही महान नावं माहीत असती का?

आता तुम्ही म्हणाल या सगळ्या खूप दूरच्या गोष्टी झाल्या असं काही कोणीही महान, फेमस लोकांच्या यादीत जाऊन बसू शकत नाही. या सगळ्या बोलायच्या गोष्टी झाल्या. काय राव नुसतं ज्ञान वाटायचं काम चालवलंय!!

तर थांबा आपल्या ‘रानु मंडल’ सांगितल्यावर तर पटेल ना… की हार न मानता आपल्यामधला एखादा गुण आपल्याला कुठच्या कुठे नेऊ शकतो.

यासाठी अपयशाला घाबरू नका त्यातून शिकत राहा. प्रत्येकामध्ये काहीना काही अंगभूत गुण असतो. आणि तो गुण त्याला स्वतःलाच हेरायचा असतो. तुमचा पॉजिटिव्ह विनर्स ऍटीट्युड तुम्हाला यशाकडे घेऊन जाईलच जाईल फक्त गरज आहे न थांबता ध्येयाच्या दिशेने चालत जाण्याची. ९० टक्के लोक अपयशी होण्याच्या भीतीने प्रयत्नच करत नाहीत. यासाठी अपयशाकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन आधी बदला दृष्टिकोन बदलला तर आयुष्य बदलायला वेळ लागणार नाही.

अपयशी होणं हि वाईट गोष्ट नाही. आपण आपल्या अपयशातूनच शिकत जातो. जगातला प्रत्येक जण महान, यशस्वी का होत नाही याचं कारण हेच आहे. अपयशाकडे आपण विनर्स ऍटीट्युडने बघतो की लूजर्स ऍटीट्युडने यावर आपलं आयुष्य ठरत असतं.

आता हे तुम्हाला ठरवायचं आहे की तुम्हाला प्रयत्न न करता हार मानणाऱ्या नव्वद टक्क्यांचा भाग व्हायच, की प्रयत्नांची पराकाष्ठा करून यशाला खेचून आणणाऱ्या दहा टक्के विजेत्यांच्या यादीत आपलं नाव कोरायचं.

जगाच्या भीतीने आपला निर्णय बदलायचा की आपल्या निर्णयाने जग बदलायचं हे आपण ठरवायचं…

 जगात दोन प्रकारच्या वनस्पती आहेत.


एक - आपलं फळ स्वतः हुन देणाऱ्या..

उदा.आंबा,पेरु,केळी इ.

दुसरी - आपलं फळ लपवून ठेवणाऱ्या.. 

उदा. गाजर ,मुळा,बटाटा,कांदा इ.

ज्या वनस्पती आपली फळे स्वतःहुन देतात त्यांना सर्वजन खत पाणी देऊन जीव लावतात.

अन् ज्या वनस्पती आपलं फळ लपवून ठेवतात त्यांना मुळा सहित उपटून काढलं जातं._

तसेच जो मनुष्य आपली विद्या, ज्ञान, धन, शक्ती स्वतःहुन समाजाच्या सेवेसाठी खर्च करतो.तो समाजात मान सम्मान मिळवण्यात प्राप्त ठरतो.त्याची चांगली किर्ती समाजात शिल्लक राहते.

याउलट जो मनुष्य आपली विद्या, ज्ञान, धन, शक्ती स्वार्थापोटी लपवून ठेवतो. 

दुसऱ्यांना देण्याची वृत्ती बाळगत नाही तो मुळासगट उपटला जातो.
-------------"""""""""---------

खुप चांगला संदेश आहे,.

समाजाने आता बदललेच पाहिजे*


आता जी माणसे मृत्युमुखी पडत आहेत ,त्यांचे ना पिंडदान होत आहे, ना तेरावे, ना गरूड पारायण, ना ब्राम्हणांना दान दक्षिणा, अस्थी विसर्जन करायला कोणी आळंदी, पंचगंगा, काशी, ओंकारेश्वर, पैठणला जात नाहीत, तेथे कुणाला दान देत नाहीत ,पण आत्मे बरोबर जिथे जायचे तेथे व्यवस्थित जात आहेत,* म्हणजे 
संत तुकाराम, 
संत ज्ञानेश्वर
संत तुकडोजी महाराज, 
संत गाडगेबाबा हे ज्या 
"तर्क शुद्ध" गोष्टी सांगत होते तेच तंतोतंत बरोबर आहे...*

Point to be noted

१)  पैसा मुलांच्या शिक्षणावर, कुटुंबाच्या आरोग्यावर, गुंतवणूकीवर खर्च करा.*

२) कर्मातच देव आहे यावर विश्वास ठेवा.

३) 'माणूस सोबत काहीच घेऊन जात नाही', हे सांगण्यासाठी बुवा २५-५० हजार रुपये घेतो. अशा स्वामी, महाराज, बुवाबाबा यांचा नाद सोडा.
शेती, व्यवसाय, विज्ञान, तंत्रज्ञान, आरोग्य, गुंतवणूक यांच्याशी निगडीत विचारवंतांच्या व्याख्यांनांचे आयोजन करा.

४) शेतीतील, कुटुंबातील, गावकुसातील वाद समापोचाराने मिटवा. कोर्ट, कचे-यांचा मार्ग टाळा.

५) कुटुंबातील सदस्यांवर, समविचारी मित्रांवर प्रेम करा. त्यांच्यासाठी वेळ द्या. सुख-दु:खात ते तुमची जास्त काळजी घेतील.

६) शेतीवरच अवलंबून न राहता हळूहळू उद्योग-व्यवसायाकडे वळा आणि एकमेकांना व्यवसायासाठी शक्य तेवढी मदत करा. 

७) मोडेल पण वाकणार नाही, या स्वभावात आता बदल करा. काळ खूप बदलला आहे, याचे भान असू द्या. (महापुरे झाडे जाती, तेथे लव्हाळे राहती - संत तुकाराम)

८) आपसी आणि स्वार्थी राजकारणामुळे समाजाचे खूप मोठे नुकसान झालेय. आता ही परिस्थिती बदला, चांगले सुशिक्षित समाजसेवक लोकप्रतिनिधी निवडा म्हणजे पुढच्या अनेक पिढ्यांचे कल्याण होईल.

९) कमीत कमी गावात आणि जास्त वेळ शेतात/नोकरीत/व्यवसायात राहा. किमान ८ तास काम करा... (कुठल्याही क्षेत्रात प्रगती होईलच). स्वतःला कायम कामात आणि चांगल्या विचारात गुंतवू ठेवा.

१०) पाय ओढण्याची खेकडा प्रवृत्ती सोडून समाजातील इतरांना मदत करा. (एकमेका साह्य करू).

११) नियोजन व काटकसर करून आहे त्या उत्पन्नात आनंदाने जीवन जगता आले पाहिजे. मोठेपणाच्या नादात कर्जबाजारी होऊ नका.

१२) वेळ आणि पैशाचा अपव्यय टाळा, एकमेकांच्या घरी गेल्यावर व लग्नात गेल्यावर आहेर देणे बंद करा, यात फक्त व्यापारी वर्गाचा फायदा आहे. २००-३०० रुपयाची साडी आजकाल कोणी घालत नाही, मग कशाला उगाच असा खर्च करायचा. पुजा-यांचे व्यवसाय चालविणेही बंद करा.

१३) भांडकुदळ, लबाड, पैसे बुडवणाऱ्या लोकांपासून चार हात लांब रहा आणि मदत करणा-याचे कायमच ऋणी रहा.

१४) घरातील महिलांना सन्मानाची  वागणूक द्या. मुलींना उच्चशिक्षित करा.                      
१५)  मानवी इतिहासाची, विज्ञानाची, विचारवंतांची पुस्तके द्या.

१६) निंदा  टाळा. त्यामुळे तुमचा खिसा रिकामा होतो.. तुमच्या ग्रह-नक्षत्रांची शांती ही केवळ एक फसवेगिरी आहे आणि  असल्या फसव्या षडयंत्रात अडकू नका. 

१७) घराघरात जो मूर्ख TV चा बॉक्स आहे त्याच्यापासून होईल तेवढे लांब राहा, सतत वेगवेगळ्या गोष्टीत गुंतवून ठेवण्याचं काम TV करतोय, आपली सर्व वैचारिक बुद्धीचा नायनाट केला आहे या TV ने. 
१८) आपलं आयुष्याचं आपण स्वतःच्या चांगल्या वाईट अनुभवाने योग्य आर्थिक नियोजन करून सुरळीत ठेवा, व स्वतः कष्टाने कमावलेल्या पैशात आपल्या कुटुंबाला खुश ठेवा.

१९) चांगल्या गोष्टीना चांगले म्हणा, वाईट गोष्टींचा कडाडून विरोध करा, कायम सत्याच्या पाठीशी राहा, अन्यायाविरुद्ध उभे राहा,

२०) आपल्या कौटुंबिक जबाबदारी बरोबर आपल्या समाजासाठी एक सामाजिक बांधिलकी म्हणून आपल्या आयुष्यात काहीतरी चांगले काम करून जा, 
हा संदेश आपल्या संपूर्ण समाजाच्या हिताचा आहे... तेव्हा स्वतःही स्वीकार करा आणि इतरांनाही सांगा...


वाचन करा
व्यायाम करा
अर्थ साक्षर व्हा

तुलना करू नका..

एका माणसाने एक जंगली बांबूचा कोंब आणला आणि आपल्या बागेत लावला. त्याच्या बागेत त्याने हल्लीच अनेक वेगवेगळी बियाणी लावली होती. जसे आंबा, फणस, आणि बरेच काही. तो रोज त्या बियांबरोबर या बांबूच्या कोम्बालाही पाणी घालत होता.


दिवसमागून दिवस जात होते. पण या बांबूच्या कोम्बामध्ये काही फरक दिसत नव्हता. एव्हाना इतर काही बियांची तर रोपटीही दिसू लागली होती. पण त्याने त्या सर्वांबरोबर त्या बांबूच्या कोम्बालाही पाणी घालण्याचा रतीब चालू ठेवला. इकडे आंब्या फणसाची झाडे वाढून त्यांना मोहोरही आला. त्या झाडांना आता फळे लागण्याची वेळ आली होती. पण अजूनही त्या कोंबत काही फराक दिसत नव्हता.

तो माणूस आता विचार करू लागला होता कि हा कोंब लावून त्याने काही चूक तर केली नव्हती ना? त्या ऐवजी एखादे दुसरे झाड लावले असते तर कदाचित खूप फायदा झाला असता. असे म्हणून त्या कोम्बाकडे गेला, पहातो तर काय, त्या कोंबला थोडी नवी पालवी फुटू लागलेली होती. तो माणूस आता पुन्हा त्या कोंबला पाणी घालू लागला.आणि पुढच्या काही दिवसात त्या कोंबला अनेक फुटवे फुटून तो आता विस्तारू लागला होता. पुढच्या एक वर्षात तर त्या कोंबणे अर्धी बाग व्यापून टाकली आणि सगळीकडे घनदाट बांबूचे वन दिसू लागले.

असेच असते. प्रत्येकाच्या वाढीचा आणि विस्ताराचा वेगवेगळा कालावधी असतो. जेंव्हा त्या आंब्या फणसाच्या झाडांनी आपला विस्तार वर वाढवायचा प्रयत्न जोर धरून केला तेंव्हा तो बांबूचा कोंब आपला विस्तार जमिनीच्या आत वाढवत होता. तो मिळणारे सर्व पोषक अन्न आपल्या अंतर्गत वाढीला देत होता. त्यामुळे त्याची जेंव्हा वाढ आणि विस्तारण्याची वेळ आली तेंव्हा त्याने बाकीच्या झाडांना मागे टाकले, व्यापून टाकले.

तसेच आपणही, आपली वाढ आणि विस्तार करायचा असेल तर आपली मुळे मजबूत आणि विस्तारित करावीत. काळ कितीही निघून गेला, आणि कोणीही आपल्या मागून येवून कितीही पुढे गेले तरी आपल्या क्षमतांचा विकास आपण त्या बांबूच्या कोम्बाप्रमाणे करावा. जेंव्हा आपल्या क्षमता अजमावण्याची वेळ येते तेंव्हा इतर जन कदाचित मागे पडतील पण एक परिपूर्ण व मजबूत व्यक्ती कधीच मागे पडत नाही.

इतरांशी आपली तुलना करू नका. तुमच्या क्षमता अधिक मजबूत बनवण्यावर भर द्या. कारण प्रत्येकाकडे एकमेवाद्वितीय अशा कला व किमया असतात. कदाचित तुमच्या क्षमता इतरांच्याहून वेगळ्या आहेत. त्या ओळखा, पारखा, त्यांना योग्य वेळ आणि सराव द्या. तुम्ही यशस्वी होणार यात शंकाच नाही.

 जीवनात दुःख, संकटे आणी अडचणी नसतील, तर जीवन वाळवंटा सारखे ओसाड,आणि रुक्ष होईल. उज्वल भविष्याची वाट ही काट्या कुपाट्यातूनच गेलेली असते. हे ऐतिहासिक पुराव्यांनी सिद्ध झालेले कटू वास्तव आहे. 

मोठमोठ्या महापुरुषांनी आयुष्यात तारेवरची कसरत करुनच आपले अस्तित्व टिकवून ठेवले आहे. संकटाच्या अग्नीमध्ये भाजून, निघालेला माणूस सामान्य राहत नाही. तर तो लोहपुरुष होतो. जगण्यात येणाऱ्या दुःखांचा,संकटांचा नियतीचा प्रसाद म्हणून, स्विकार केला. तर ते एक वरदान ठरते. खूप काही शिकायला मिळते. आणि त्यामधून मार्ग शोधण्याची नवी चैतन्य उर्जा प्राप्त होते. जगण्यातील खरा आनंद मिळतो. 
जेव्हा आपण एकटे असतो, तेव्हा आपण आपल्यात असतो, आणि आपण आपल्या सोबत असतो.
जेव्हा आपण इतरांसोबत असतो, तेव्हा आपण आपल्या सोबत नसतो, विचार आणी विवेकाची क्षमता हरवलेली असते.
एकटेपणा हा आपल्या अंतरंगात उतरुन, आत्मचिंतन करण्याची उत्तम संधी आहे.
इतरांनी केलेले सहकार्य, हे सापेक्ष असते. आपण आपल्याला केलेले सहकार्य, हे निरपेक्ष असते.
लोकांतात असताना, कधी एकटेपणा जाणवतो. एकांतात असताना, ईश्वर आपल्या सोबत असल्याचा सात्विक भाव असतो. यातूनच सकारात्मक उर्जा प्राप्त होते...!!

शेवटी...

मै अकेला चलता रहा; काफिले अब हट गये;
अपने मे घुलता रहा; रास्ते खुशीसे  कट गये;...!!

What is Maturity ?


1. Maturity is--जेव्हा तुम्ही जगाला बदलवण्याचा नाद सोडून देता आणि स्वतः च्या सर्वांगीण विकासावर भर देता.
2. Maturity is--जेव्हा तुम्ही लोकांना ते जसे आहेत तसेच स्विकारता
3. Maturity is--जेव्हा तुम्हाला समजायला लागते कि जीवनात प्रत्येकजण आपापल्या जागी बरोबर असतो
4. Maturity is-- जेव्हा तुम्ही घेण्यापेक्षा देण्यावर जास्त भर देता
5. Maturity is--जेव्हा तुम्ही नात्या मधल्या अपेक्षा सोडून देता आणि त्यागाची भावना स्विकारता
6. Maturity is--जेव्हा तुमचं आत्मिक सुख नेमकं कशात आहे ते तुम्हाला समजतं.
7. Maturity is--जेव्हा तुम्ही स्वतः किती हुशार आहात हे जगाला पटवून द्यायच्या भानगडीत पडत नाहीत..
8. Maturity is--जेव्हा तुम्ही दुसऱ्याकडून स्तुती अथवा शाबासकी मिळण्याची अपेक्षा न ठेवता काम करता.
9. Maturity is---जेव्हा तुम्ही स्वतः ची तुलना दुसऱ्याशी करणे सोडून देता
10. Maturity is--जेव्हा तुम्ही स्वतः मध्ये रममाण होता..
11. Maturity is--जेव्हा तुम्हाला गरज आणि हव्यास यातील फरक स्पष्टपणे जाणवतो..
आता शेवटचे पण महत्वाचे !
12 Maturity is--जेव्हा तुम्ही आत्मिक सुखाचा सबंध भौतिक गोष्टींशी जोडणे सोडून देता.

डाॅ अब्दुल कलाम साहेबांची कविता

 त्रासाने भरलेल्या खोक्यावर मी "आनंद" असं लिहितो..आणि दुःख confuse होतं

येणाऱ्या प्रत्येक संकटाला
एक छानशी smile देतो
...आणि दुःख confuse होतं

खरं सांगायचं तर खूप वेळा
मी कोलमडून जातो
सगळं संपलं असं वाटून
अगदी गर्भगळीत होतो
कुठूनतरी देव येऊन
माझ्या हातात हात देतो
...आणि दुःख confuse होतं

संकटाच काय? ती येणारच
आल्यावर थोडं फार छळणारच
आपण स्थिर राहायचं काही काळ
संकटाचं पाणी पाणी होणारच
आलेलं संकट हसता हसता
नकळत नाहीसं होतं
...आणि दुःख confuse होतं

किती दिवसाचं हे आयुष्य
आज ना उद्या संपणारच
अमुक आहे-तमुक नाही 
आपलं चालू राहणारच
फाटक्या गोधडीत पाय आखडून
मी सुखाने झोपी जातो
...आणि दुःख confuse होतं

म्हटलं तर जीवन सुंदर 
म्हटलं तर वाईट आहे
मग त्याला सुंदर म्हणण्यात 
सांगा काय वाईट आहे? 
जीवनाकडे बघण्याचा
मी चष्मा विकत घेतो
...आणि दुःख confuse होतं.

एक आवडलेली डाॅ अब्दुल कलाम साहेबांची कविता 

Minimalism म्हणजे किमानचौकटीत राहण्याची जीवनशैली

काही दिवसांपूर्वी 'minimalist' हे पुस्तक वाचायचा योग आला. 

Joshua fields Millburn आणि Ryan Nocodemus ह्या दोघांनी लिहिलेले छान पुस्तक आहे.

Minimalist म्हणजे किमान चौकटीत राहण्याची जीवनशैली.
आजकालची तरुण पिढी ही जीवनशैली आत्मसात करताना दिसते.

आपण आयुष्यात उगीच नको त्या गोष्टी स्वतः सोबत बाळगत असतो आणि त्या गोष्टींच्या मालकी हक्कापायी आपले स्वतःचे स्वातंत्र हिरावतो.
रोजच्या जीवनात लागणाऱ्या अत्यावश्यक बाबींचा विचार करता असे लक्षात येते की काही मोजक्या गोष्टी व्यतिरिक्त आपण उगाच फाफट पसारा घेऊन जगात असतो. त्या अनावश्यक गोष्टींचे ओझे बाळगताना जगण्याचा खरा आनंदच विसरतो.

' The secret of happiness is not found in seeking more but in developing the capacity to enjoy less' - Socrates

जीवनाचा खरा आनंद जास्तीत जास्त गोष्टी जतन करण्यात नसून कमीत कमी गोष्टी बाळगून गरजा कमी करण्यातच खरा आनंद आहे.

आपण घरात किती अनावश्यक गोष्टी सांभाळत असतो. एखादी गोष्ट कधीतरी पुढे लागेल हया आशेवर तिला अनावश्यक सांभाळत असतो आणि असे करताना घरात अनावश्यक गोष्टी साठवत असतो. खरं तर, घर ही 'आनंदाने जगण्याची' जागा आहे त्याला आपण 'साठवणीची जागा ' बनवतो.
Actually home is 'living space',not a 'storing space'

किमान चौकटीची जीवनशैलीनुसार, जी वस्तू तुम्ही गेल्या सहा महिने वा वर्षभरात वापरली नसेल ती वस्तू तुमच्या दृष्टीने निरुपयोगी आहे. अशी वस्तू त्वरित कोणा योग्य माणसाला देऊन टाकावी अथवा त्याची विल्हेवाट लावावी. अन्यथा ती वस्तू अडगळ म्हणूनच राहते. तुम्हाला जीवन जगतांना जास्तीत जास्त  सुमारे 100 वस्तूंची अत्यंत गरज बाकी इतर वस्तू अनावश्यक असतात. 
They are just stuff. 

' Less stuff then more freedom'

 आपले घर 'राहते घर ' असावे का अडगळीची खोली हे सर्वस्वी आपल्या सवयीवर अवलंबून असते.
खरं तर तुमच्या गरजा कमी करून तुम्ही जास्तीत जास्त समृद्ध होत असतात. गरजा आणि वस्तूंचा संचय जितका कमी तितके त्या निर्जीव वस्तूत  असलेली गुंतवणूक कमी. त्या निर्जीव वस्तूंचा सांभाळ करताना जो वेळ आणि कष्ट तुम्ही घेतात त्यामुळे जीवनाचा खरा आनंद उपभोगु  शकत नाही.
आजकाल घरात तीन television sets असतात. एक हॉल मध्ये, एक घरातील सिनियर सिटीझनच्या खोलीत आणि एक मुलांच्या खोलीत. खरंच ह्या तीन टीव्हीची गरज आहे का? ह्यामुळे कुटुंब तीन खोल्यांमध्ये विभागले गेले आणि त्यातील संवाद संपलाय. प्रत्येक जण आपल्या आवडता कार्यक्रम पाहण्यात मश्गुल मात्र एकत्र बसून गप्पा, विचार विनिमय ह्या गोष्टींना मुकलाय. तीच गोष्ट गाडीच्या बाबत घरात माणसं तेवढ्या गाड्या असतात. मग त्या वस्तूची देखभाल आणि त्यासाठी लागणारा अनावश्यक वेळ आणि खर्च ह्याचा विचार व्हायला हवा.

खरं तर आपण जेवढया गोष्टी जमवतो तेवढा वेळ त्या गोष्टी आवरण्यासाठी देतो. घरातील पसारा आवरताना ह्या गोष्टींची प्रकर्षाने जाणीव होते.

    त्यामुळे ' Owning less is better than organising more' ही उक्ती यथार्थ वाटते.

      आता लोक फिरायला जातात तेथील नवीन जागा, निसर्ग सौंदर्य, सहलीची आठवण इ. बाबींचे मनात साठवण करण्याऐवजी तेथील विक्रीला असलेल्या वस्तू घेण्याकडे सगळ्याचा कल असतो. खरे तर त्या वस्तूंचा वापर घरी आल्यावर खचितच केला जातो मात्र त्या वस्तू विकत घेऊन घरात अडगळ मात्र वाढवतो. त्यामुळे प्रवासातील महत्वाचे तत्व म्हणजे ' Collect moments, not the things.' 
खरं तर वस्तूंचा संचय आणि त्याची साठवण ह्यापेक्षा ते श्रम आणि पैसा भटकंती वरती खर्च करावा. प्रवास आपल्याला नवनवे अनुभव देतो आणि आत्मविश्वास वाढवतो त्यामुळे प्रवासात वस्तूंची खरेदी करण्याऐवजी अनुभवांची साठवण करावी.

     आता किमान जीवन शैली अवलंबताना काय करावे, घरातील अनावश्यक वस्तू, एक तर गरजू लोकांना देऊन टाकाव्यात. कदाचित आपल्या घरातील 'अडगळ' ही दुसऱ्याच्या 'जगण्याची निकड' असू शकते. तसेच त्यामुळे दातृत्वाची सवय लागते.

आजकालच्या लग्न समारंभात अवलंबलेली चांगली पद्धत म्हणजे 'आहेराचा'  स्वीकार न करणे. पूर्वी लग्न समारंभात 'आहेर ' ह्या प्रथेपायी इतक्या अनावश्यक गोष्टींची घरात बरसात होत असे की त्याचा वर्षानुवर्षे संचय होत असे आणि मग हळूहळू त्या वस्तू पुन्हा अडगळीच्या खोलीत जात.
घरातील अडगळ ही नकारात्मक ऊर्जा उत्पन्न करते. अश्या अडगळीच्या वस्तूने घरातील आनंद, सुख जणू हिरावल्यासारखे वाटते. त्यासाठी वेळोवेळी ही अडगळ कमी करायला हवी. 
'  The more I threw away, the more I found'

' when your home is clean and uncluttered, you have no choice but to examine your inner state'

 Minimalism is asking 'why' before you ' buy.'
 
 खरंच एखादी गोष्ट विकत घेण्याआधी , ती वस्तू का घेतो आणि त्याची खरंच गरज आहे काय? ह्याचे समर्पक उत्तर मिळणे गरजेचे आहे.
 
We move closer to what we love when we walk away from what we don't love.

आइनस्टाइन ने तीन नियम सांगितले आहेत.
1. Out of clutter, find simplicity
2. From discord,find Harmony
3. In the middle of difficultly lies opportunity.

Minimalism  म्हणजेच किमान चौकटीत जगण्याची जीवन शैली अवलंबताना तुम्ही अनावश्यक वस्तूंचा त्याग करता त्यावेळी त्या वस्तू दान करण्याचे औदार्य पण दाखवता.

It is letter to donate than accumulate.

वस्तूंचा अनावश्यक संचय करण्यापेक्ष्या त्याचे सत्पात्री दान करणे गरजेचे आहे.

A home with fewer possession is more spacious, more calming and more focused on the people whom live inside it.

      आजकालच्या जगात घरातील वृद्ध माणसांशी बोलायला , त्यांच्याशी संवाद साधायचा वेळ नसतो कारण प्रत्येकजण मोबाईल,टीव्ही, इंटरनेट इ बाबींमध्ये अडकलाय आणि घरातील अनावश्यक वस्तूंमध्ये गुंतलाय. ह्या अनावश्यक वस्तूंची 'अडगळ' कमी केली तरच घरातील वृद्ध व्यक्तींशी सुसंवाद साधता येईल आणि त्या वृद्ध व्यक्तींची 'अडगळ'भासणार नाही.

Accept Minimalism as lifestyle, an art of letting go.

"Too many peoples spend money they have not earned, to buy things they don't want, just to impress people they don't like."

वरील वाक्याकडे तटस्थपणे आणि गांभीर्याने बघितले तर खरोखर आजकाल मध्यमवर्गीय समाजात एक चंगळवाद वाढत चाललाय ज्यामुळे ज्या गोष्टी घेण्याची आज ऐपत आणि गरज नाही त्या वस्तू अगदी कर्जाने विकत घेऊन लोकांमध्ये मिरवण्यासाठी वृत्ती आढळते.अगदी 'ऋण काढून सण साजरे करावे' ह्यासाठी अहमहमिका लागते. तसे बघितले तर ज्या गोष्टींची आज गरज नाही त्या गोष्टींचं मूल्य 'शून्य' असते कारण वस्तूचा वापर असेल तरच तिची उपयुक्तता.

 ह्या जीवनशैलीचे अनेक फायदे आहेत, जसे
1. घरातील अनावश्यक वस्तूंचा पसारा कमी होऊन घर सुटसुटीत आणि स्वछ राहते.
2. वस्तू सांभाळणे आणि त्याची देखभाल ह्यावर लागणाऱ्या श्रमाची आणि पैशाची बचत होते.
3. निर्जीव वस्तूपेक्षा सजीव व्यक्तींमध्ये म्हणजेच आपले आप्त लोक ह्यांच्याशी जास्तीत जास्त वेळ घालवता येतो.
4. तुमच्या आरोग्याकडे जास्त लक्ष देऊ शकतात.
5. कमी ताणतणाव आणि अतिरिक्त वेळेची उपलब्धता ज्याचा विनियोग चांगला छंद जोपासण्यासाठी करू शकता.
6. वेळेची आणि पैशाची बचत होते.
ह्या बाबींचा विचार करता mimimalistic lifestyle ही एक नवीन जीवनशैली न राहता काळाची गरज असल्याचे द्योतक आहे.
 
...
Forwarded


विश्वास नागरे पाटील यांचा सुंदर लेख

☕ माझ्या हातात चहाचा कप होता, ऊभ्यानं चहा पित होतो.

अचानक तोल गेला, कप सांभाळत पडल्यामुळे, हाताच्या कोपराला लागले. कपही फुटला. 
जर मी कप सोडला असता, तर लागले नसते.
आपल्यालाही असाच अनुभव ब-याच वेळा आला असेल.
शुल्लक गोष्टी सांभाळताना बहुमोल गोष्टी अशाच निसटुन जातात.
गरज असते फक्त शुल्लक गोष्टी सोडुन देण्याची. 

* मला विचारलच नाही;

* मला Good morning केले नाही;

* मला निमंत्रणच दिलं नाही;

* माझं नावंच घेतलं नाही;

* माझ्या शुभेच्छा स्विकारल्या नाहीत;

* माझा फोन घेतला नाहीं ;

* मला बसायला खुर्चीच दिली नाही;

* मला मानच दिला नाही.

* सोडुन द्या हो!

* सोडायला शिकलं कि मग पहा,

* निसटुन चाललेल्या नात्यांमधे पुन्हा जीवन येईल.

*  अहंकार चांगली माणसं ओळखु देत नाही.  तो सोडता आला कि झालं.
✍ तो लगेच सोडता येणार नाही.  पण कठिणही नाही.  प्रयत्न करायला काय हरकत आहे.  लक्षात ठेवा एकदा का जर नात्यात क्लिष्टता निर्माण झाली की ते कधीच जुळत नसतात आणि तुम्ही समोरच्या व्यक्तिच्या मनातून कायमचे उतरता.
?? खास सर्वांना ??

सकारात्मक विचार आणि नकारात्मक विचार

 पॉझिटिव विचार आणि निगेटिव विचार यांचा फरक  आवर्जून वाचावे.... 

एक सुप्रसिध्द लेखक आपल्या अभ्यासिकेत निवांत बसले होते. अचानक काही आठवलं म्हणून त्यांनी एक कागद पेन घेतलं आणि लिहायला सुरुवात केली ....

     या वर्षात माझ्या शरीरातलं  पित्ताशय काढून टाकलं आणि त्या आजारपणामुळे मला बरेच दिवस अंथरुणाला खिळून रहावं लागलं .  याच वर्षात मी माझ्या आयुष्यातली 60 वर्षे पूर्ण केली  आणि मी ज्या प्रकाशन कंपनीत माझी उमेदीची 30 वर्ष नोकरी केली ती नोकरी मी सेवानिवृत्त झाल्याने बंद झाली 

    याच वर्षात माझ्या वडिलांच्या दु:खद निधनाचं  दु:ख मला पचवावं लागलं    याच वर्षात माझा लाडका मुलगा त्याच्या वैद्यकिय शिक्षणाच्या परिक्षेला मुकला.... 
        त्याच्या झालेल्या कार अपघातामुळे ! जखमी अवस्थेत त्याला हॉस्पिटल आणि घरी बरेच दिवस काढावे लागले. शिवाय गाडीचे नुकसान झाले ते अजून वेगळेच ..!

      आणि शेवटी त्यांनी  लिहिले .."खरच, किती वाईट आणि दु:खदायक ठरले हे वर्ष माझ्यासाठी !!!

    इतक्यात त्यांची पत्नी त्या ठिकाणी आली.  भरलेले डोळे आणि विचारात गढून गेलेल्या आपल्या पतिकडं पहाताच त्याना काहितरी वेगळं असल्याचा अंदाज आला.सावकाशपणे त्यांनी तो टेबलवरचा कागद वाचला
 आणि काही न बोलता त्या खोलीतून निघून गेल्या. 

      थोड्या वेळाने पुन्हा त्या खोलीत आल्या त्यावेळी त्यांच्या हातात एक दुसरा कागद होता. 
तो कागद त्यानी त्यांच्या पतिच्या कागदा शेजारी ठेवला. 
लेखक महाशयानी तो कागद उचलून वाचायला सुरुवात केली. त्यात लिहिले होते ..गेले कित्येक वर्ष ज्याचा त्रास मी माझ्या शरीरात काढला ते पित्ताशय अखेर या वर्षात काढून टाकले. 
आता मला कुठलाही त्रास नाही. मी अत्यंत सुखी झालोय यामुळे ..!

      याच वर्षात मी माझ्या आयुष्याची 60 वर्षे अगदी कुठल्याही अडथळ्याशिवाय यशस्वीरित्या पार पाडली.
 आणि एक चांगल्या नोकरीतून सन्मानाने सेवानिवृत्त झालो, आता अजुन चांगलं आणि लक्षपुर्वक लिहायला माझ्याकडे भरपुर वेळ आहे...!!

  याच वर्षात माझे तिर्थरुप वडिल वयाच्या 95 व्या वर्षी अगदी कुठलाही आजार नसताना आणि कोणावर अवलंबुन न रहाता इहलोकीची यात्रा संपवुन शांतपणे मार्गस्थ झाले..!!

      याच वर्षी माझ्या मुलाला एक नवीन आयुष्य मिळालं, जीवघेण्या कारच्या अपघातातुन जरी कार पुर्णपणे मोडित निघाली तरी तो बचावला आणि कोणत्याही अपंगत्वाशिवाय परत अभ्यासाला जोमाने लागला ....!!!

  आभारी आहे देवा ...!!किती सुंदर आणि चांगल वर्ष दिलस तू मला ..!!"

     बघा मित्रानो ... तेच प्रसंग पण पाहण्याची दृष्टी वेगळी ..!! नकारात्मक विचार बाजुला सारुन एक सकारात्मक विचार करायला भाग पाडणारी !! 

आपल्या आयुष्यातही बरे वाईट प्रसंग घडत असतात.आपण ज्या दृष्टीने त्याकडे पहातो तसा आपल्या मनावर वाईट चांगला परिणाम होतो.प्रत्येक घटनेला जसा कार्यकारण भाव आहे तसाच वेगवेगळा अर्थ आहे.
 आपण काय अर्थ घ्यायचा तो आपण ठरवायच…..!!!

     त्या घटनेची वाईट बाजू न पहाता चांगली बाजू, सकारात्मक बाजू डोळ्यासमोर ठेवायला शिका. 
जे होत ते चांगल्या साठीच हा आशावाद मनाशी बाळगून पुढील आयुष्याचा सकारात्मक आणि काळजीपुर्वक विचार करा ...!! जगणं अजून सुखकारक सुसह्य आणि मजेशीर होईल !!

   Every Dark cloud has a silver lining …!!!
 प्रत्येक काळ्या ढगाला एक रुपेरी कड असते हे ही लक्षात ठेवा ..!! 

     शेवटी चिडचिड करुन जगायच की आनंद घेत हे, आपल्या विचारांवरच ठरणार आहे.आपल्याकडे काय नाही याचा विचार करण्यापेक्षा जे आहे त्याचा योग्य तो उपभोग घेवून नसलेल्या किंवा आवश्यक गोष्टी मिळवायचा प्रयत्न करा ..!! दु:खात सुख शोधा, सुखात दु:ख नको !!

  शेवटी पाडगावकरांच्या  ओळी आठवतात….!!

पेला अर्धा सरला आहे
असं सुद्धा म्हणता येत;
पेला अर्धा भरला आहे
असं सुद्धा म्हणता येत!

सरला आहे म्हणायचं
कि भरला आहे म्हणायचं?
हे आपणच ठरवायचं असतं

सांगा कसं जगायचं?
कण्हत कण्हत 
कि गाणं म्हणत

तुम्हीच ठरवा....!!
(Forwarded)
मित्रांनो सकारात्मक व्हा ....आनंद लुटा..!!


शहाणपण

🔸 इंग्रजीमधील common sense या शब्दाला मराठीमध्ये पूरक ठरणारा शब्द म्हणजे शहाणपण. एखादी चूक झाल्यानंतर ती चूक जेव्हा  आपल्याकडून परत होत नाही तेव्हा जे काम करते ते शहाणपण.


🔸 एखाद्या गोष्टीची माहिती नसतांना ती शांततेत इतरांकडून समजून घेणे म्हणजे शहाणपण. आलेल्या संकाटाला, अडचणीला घाबरून न जाता. त्याचा स्विकार करून त्यातून मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करत राहणं म्हणजे शहाणपण. 

🔸 स्वतःला ओळखून, आपल्याला क्षमतानुसार योग्य ते कुठलंही क्षेत्र निवडून त्यामध्ये मनापासून काम करणे म्हणजे शहाणपण. उगाचच दुसरा कुणी करतोय म्हणून आपणही करावं म्हणजे मूर्खपणा होय, शहाणपण आहे.

🔸 खरं तर प्रत्येक आनंदी, यशस्वी माणसाच्या जीवनाचा पायाच हा शहाणपण असतो. ज्याच्या जवळ शहाणपण नसते तो मनुष्य नेहमी त्रस्त, दुःखी आणि उदास असतो. खात्रीशीर सांगायचं झालं तर मनुष्याच्या जीवनातील यशाचं गमक हे त्याच्या अंगी असलेलं शहाणपणच असते. आनंदी, यशस्वी व्ह्यायचे असेल तर शहाणे  व्ह्याव लागेलच.


THINK POSITIVE

मनात दररोज (24 तासांत) 60 हजार विचार येतात. यातील 60 ते 70%  विचार हे नकारात्मक असतात. 

 नकारात्मक विचारांना - सकारात्मक करणे गरजेचे असते. 

सकारात्मक विचार आपली शक्ती, आत्मविश्‍वास, मनोबल वाढवतात. 

नकारात्मक विचारांना - सकारात्मक करणे म्हणजे मनाचेच - मनाशी युध्द करणे होय. यालाच तुकाराम महाराज म्हणतात. ‘‘रात्रं दिनं आम्हां युदधाचा प्रसंग’’!

थॉमस् अल्वा एडिसनने 999 प्रयोग केले - हजाराव्या प्रयोगाच्या वेळेला विजेचा दिवा लागला. थॉमसला ज्यावेळेस पत्रकारांनी मुलाखतीत विचारलं. थॉमस 999 प्रमाणे फसले याबाबत तुला काय वाटले ? 

थॉमस म्हणाला 999 प्रयोग फसले असे म्हणू नका. 999 वेळा मी हे सिध्द केलं, या मार्गाने विजेचा दिवा लागू शकत नाही. (सकारात्मक दृष्टीकोन)

नेपोलियन समुद्र किनार्‍यावर सैन्यासमोर जहाजातून उतरताना पाय चिखलावर घसरून छातीवर आडवा पडला, 
छाती चिखलाने माखली.  
तेव्हा अंधश्रध्दाळू सैनिकांना वाटलं. 
आपला सेनापती आडवा झाला म्हणजे आज आपला पराभव होणार, 
आपली मुंडकी उडणार - सैनिक भयभत झाले. 
नेपोलियनने ही बाब हेरली. 

तो उठताना छातीत झटकत म्हणाला,  ‘मित्रांनो आजचे युध्द आपणच जिंकणार, 
जिथे जिथे आपण जाऊ तेथे - तेथे आपला विजय होणार’ कारण आल्या आल्या या भूमीने मला अलिंगन दिले आहे - मी तुझी आहे, मी तुझी आहे.... ...

मित्रांनो सैनिकांचे मनोबल वाढले व सगळीकडे मोठी विजयश्री त्यांनी खेचून आणली.  
हे घडलं सकारात्मक दृष्टीकोनामुळे. 

टेबलावर एक ग्लास पाण्याने अर्धा भरला आहे. 
जर असा विचार केला की, अर्धा भरला आहे त्यामुळे मन समाधानी होतं. 
पण तो अर्धा रिकामा आहे म्हटलं की, नैराश्य, व्याकूळता, हताशपण येतं. 

सकारात्मक दृष्टीकोन मनाला प्रसन्न करून - अतिरिक्त ऊर्जा प्रदान करतो त्यामुळे कर्माला गती प्राप्त होते आणि आत्मविश्‍वास वाढतो. 

नकारात्मक विचार मनाला व शरीराला दुर्बल करतो. 
परिणामी कर्माची गती मंदावते - चुका होतात - हानी होते व यातूनच औदासिन्य (Depression) येते.
 
गौतम बुध्दाजवळ एक शिष्य धापा टाकत आला व म्हणाला भगवान ‘‘मला गावकर्‍यांनी शिवी दिली.’’ 

बुध्द म्हणाले ‘‘बरं झालं त्यांनी तुला मारलं नाही.’’ 

तो म्हणाला ‘‘भगवान नंतर त्यांनी मला मारलं सुध्दा’’  भगवान म्हणाले ‘‘या मारामुळे तुला काही जखम झाली का ?’’, शिष्य म्हणाला ‘‘भगवान माझं डोकं फुटलं आहे.’’ गौतम बुध्द म्हणाले ‘‘बरं झालं - तुझा मृत्यू झाला नाही.’’ हे ऐकून शिष्य शांतपणे बुध्दाच्या चरणाजवळ शांत बसला, 

बुध्दांना हेच सांगायचे होते की, जी घटना घडली त्यापेक्षा वाईट घटना घडू शकली असती पण ती घडली नाही यामुळे समाधानी रहा. 

मी अस्वस्थ आहे, 
पण लोकं माझ्यापेक्षा जास्त अस्वस्थ आहेत असा विचार मनाची तात्कालीक अस्वस्थता बर्‍याच प्रमाणात नियंत्रीत करतो. 

माजी राष्ट्रपती अब्दुल कलामांना नौदलात भरती होता न आल्यामुळे पुढे ते शास्त्रज्ञ व देशाचे राष्ट्रपती झाले.

काही वेळा अपयश हे महान यशाचे पण सूचक असते. 
म्हणून सकारात्मक विचार करा व आनंदी रहा. 

कोण म्हणतं जीवनात प्रत्येक वेळी काटेरी डंखच आहेत
डोळे उघडून बघा-प्रत्येकाला उडण्यासाठी-फुलपाखरासारखे पंख आहेत ....😊 
 So Be Positive !

ह्रदयांतर

       🌱तात्वीक  भांडण सर्वांशी होते ,पण  "शत्रुत्व" कुणाशीचं   ठेवू नये...!!!


      🌱खरं तर मतभेद एकमेकांशी असू शकतात, जरूर असावे, पण मनात कायम "भेद" ठेवू नये...!!!

     🌱एखाद्याशी वाद घालावा, पण वादावादी न करता क्षणात "सुसंवाद" साधवा...!!!

     🌱"अहंकार" हाच  या सर्वाच मुळ आहे, तो विनाकारण  "बाळगुन जगू" नये...!!!

       🌱शेवटी "मृत्यू" हे "सुंदर,शाश्वत वास्तव" आहे, त्याचे "स्मरण" असावे भय नसावे...!!!

      🌱आपण जन्माला आलोय ते गेलेले दिवस मोजण्यासाठी नाही तर "उरलेल्या दिवसांचा "आनंद "  उपभोग घेण्यासाठी याचे "स्मरण" ठेवू या...!!!

       🌱आपण किती आनंदात आहोत त्यापेक्षा आपल्यामुळे किती "जण आनंदात" आहेत याला खूप महत्व आहे...!!!

    🌱"एक हृदय" घेऊन आलोय जाताना "लाखो हृदयात" जागा करुन जाता आलं पाहिजे...!!!

      🌱पाणी धावतं म्हणून त्याला मार्ग सापडतो, त्याप्रमाणे जो प्रयत्न करतो, त्याला यशाची, सुखाची, आनंदाची वाट सापडते...!!!
  
         🌱नशीबापेक्षा कर्तृत्वावर जास्त विश्वास असावा, कारण उद्या येणारी वेळ आपल्या नशीबामुळे नाही तर कर्तृत्वामुळे येते...!!!
        
    🌱क्षमा करा, प्रेम द्या, प्रेम घ्या...!!!

आयुष्यात सुधारणा करू शकणार्‍या या पाच सवयी

१) व्यायाम आणि ध्यान धारणा करा . तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल . 

तुमचा रागावर ताबा येईल आणि तुम्ही रिलॅक्स होता.

२) पहाटे उठल्यावर तुमचं अंथरूण आणि खोली स्वच्छ करा . 
तुम्हाला ही लहान गोष्ट केल्यावर बाकीचे काम करायला प्रेरणा मिळेल. आळस सोडा .

३) अती विचार करणे सोडा . 
दुसऱ्याला नाही , तर याचा तुम्हालाच मानसिक त्रास होईल . तुमचा कामात लक्ष लागणार नाही .

४) प्रत्येक गोष्टीला पुरेपूर वेळ मिळायला एक वेळापत्रक बनवा. 
तुमचे सर्व काम सुटसुटीत होईल आणि तुम्हाला शिस्त पाळणे उपयोगी पडेल .

५) दिवसातला किमान अर्धा तास तुमच्या आवडीचा छंद साठी द्या .

ह्या सवयी तुम्हाला नक्कीच सुधारणा करायला मदत करतील .

>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>


कुणीतरी पुढे गेला म्हणून द्वेष करत बसण्यापेक्षा, आपण मागे का राहिलो हा विचार करा आणि चालत राहा...  स्पर्धा स्वत:शी करा जगाशी नाही...
रागावू नका, आजची खरी वस्तुस्थिती पहा : घरं मोठी, पण कुटुंबं छोटी...भरपूर पदव्या, पण सामान्य ज्ञानाची बोंब... दर्जेदार औषधं, पण आरोग्य ढासळलेलं... चंद्रावर पोहोचले, पण शेजाऱ्याशी ओळख नाही... प्रचंड पैसा, पण मन:शांती नाही... उच्च बुद्ध्यांक, पण भावनांक खालावलेला... माहिती खूप, पण शहाणपण नाही... आणि सरते शेवटी माणसं भरपूर, पण माणुसकीच नाही...!!!
जेव्हा लोक तुमच्यामागे तुमची बदनामी किंवा खोटी लावालावी करतात, तेव्हा समजावे की, त्यांची उतरती कळा चालू होतेय आणि आपली उत्तुंग भरारी...?
शक्यतो आयुष्यभर साथ देणारीच माणसे जोडावी... नाहीतर ​तासभर साथ देणारी माणसं, बसमध्ये पण भेटतात.​.. कधीही आपल्या दुःखाचा आणि सुखाचा बाजार मांडू नका...कारण इथे प्रत्येक जण मतलबी झालाय...​अगरबत्ती देवासाठी हवी असते, म्हणून विकत आणतात... पण सुगंध आपल्या आवडीचा पाहतात.​नम्रतेशिवाय ज्ञान मिळत नाही... समजा मिळाले, तर ते टिकत नाही... आणि टिकले, तर ते शोभत नाही... म्हणून जीवनात योग्य ठिकाणी, योग्य व्यक्तीसमोर आणि योग्यवेळी नम्र झालेच पाहिजे...
“वाहत्या पाण्याप्रमाणे चांगले काम करीत रहाव... वाईटाचा कचरा आपोआपच किनाऱ्याला लागेल"    


JOIN & LEFT ----

Join कधी व्हायचे, left कधी व्हायचे याचे गणित जमायला पाहिजे.

 मनाची गुपितं, सुखदुःख व्यक्त करण्यास join होता आलं पाहिजे.
आपल्या मताला  आदर,किंमत,सन्मान  नसेल तर तिथून left होता आलं पाहिजे.
सज्जनांच्या संगतीत join होता आलं पाहिजे,
दुर्जनांच्या संगतीतून left होता आलं पाहिजे.
परोपकारी,समाजसेवी कार्यक्रमात join होता आलं पाहिजे.
स्वार्थी,अप्पलपोटी माणसांतून left होता आलं पाहिजे.
सहकारी, संवेदनशील,परमार्थ करणाऱ्या जगात join होता आलं पाहिजे,
अहंकारी,स्वार्थी, भावनाशून्य जगातून left होता आले पाहिजे.
मुलांच्यासाठी योग्य वयापर्यंत joinहोता आलं पाहिजे,योग्य वेळी 
त्यांच्या सासंरीक प्रपंचातून left होता आलं पाहिजे......
कारण Join ला जेवढे महत्त्व आहे तेवढेच महत्त्व Left ला आहे............

 🌷रोजचा ऊगवणारा "नवा दिवस" हा, आपल्या मनाप्रमाणे, रोजच "ऊगवेल" असे होत नाही.! मात्र नविन ऊगवणा-या प्रत्येक "नव्या दिवसात," आपल्या मनासारखं, काही ना काहीतरी निश्चितच चांगले घडणारे "ऊगवलेलं" असेल, असा सकारात्मक आशावाद मनात ठेवा व तसे राहा, हे मात्र नक्की करा...!!!


🌷एखादे वेळेस आपण स्वत: जरी आनंद निर्माण करु शकलो नाही, तरी हरकत नाही.! मात्र दुस-यांच्या आनंदात अगदी मनपासुन, हसत मुखाने सहभागी होऊन "त्यांचा" आनंद द्विगुणीत करा... तुमचा आनंद आपोआप शतपटीने निर्माण होइल...!!!

🌷खूप विचार करून एक दिवस नशिबाला विचारलं की तू सगळ्यांना एवढं दुःख का देतोस! नशिबाने हि हसून उत्तर दिलं कि मी देतांना तर सगळ्यांना सुखच देतो! पण तुम्ही सगळेच जण एकमेकाच सुख पाहून दुःख ओढवून घेता, त्यात माझा दोष काय??? ...!!!

🌷समजूतदारपणा ..‌.. ज्ञानापेक्षा खूप महत्वपूर्ण असतो..... खूप लोक आपल्याला ओळखतात ...‌‌.. पण त्यातील मोजकेच लोक आपल्याला समजून घेत असतात ....!!!

🌷कोणती तरी एक भावना प्रकर्षाने हवी. चीड संपली कि सगळच संपलं. माणूस अनुभवच नको अस म्हणतो. ज्या मनात चीड धगधगत असते, त्याच मनात प्रेम असतं. कारण काहीतरी चांगलं घडावं, ह्या सदिच्छेला तडा गेला म्हणजेच चीड निर्माण होते...!!!

🌷प्रत्येक कुलुपाला त्याची एक चावी नक्की असते. नेमकी ती हाती आल्यावर ते दार उघडत असते. जसे जीवनातल्या संकटाचेही थोडेफार असेच असते. शांतपणे विचार केल्यास प्रत्येक समश्येचे एक उत्तर असते...!!!

 🌷आयुष्यात अखंड उत्साह, सत्य शोधक नजर, उत्कृष्ठ वक्तृत्व, ध्येयवादी प्रवासाची विलक्षण हौस हे सगळे गुणविशेष या सारख्या व्हिटॅमिनच्या गोळ्या खाऊन जीवनात यश प्राप्त करून घेता येऊ शकते...!!!

🌷मोठ्या लोकांच्या शेजारी उभं राहिलं, म्हणजे मोठं होता येते कि नाही ते माहित नाही. 
पण चांगल्या विचारांच्या लोकांच्या सानिध्यात (सोबतीत) राहून नक्कीच मोठं होता येऊ शकते

🌷थकलेल्या माणसाची वाट आणि झोप न येणाऱ्या माणसाची रात कधी पण मोठीच असते

 🌷"विश्वास" हा कधीच मरत नाही, आज तुम्ही कुणाला तरी द्याल, उद्या दुसरा कोणी  तरी तुम्हाला देवून जाईल. परंतु जर तुम्ही विश्वासघात केल्यास तुमचा कुठेतरी नशिबात घात झाल्याशिवाय राहात नाही...!!!

🌷जी व्यक्ती आयुष्यभर सुखात आणि दुःखा मध्ये साथ देते ती खरी मैत्री असते, मोठमोठ्या प्रश्नांमध्ये गुंतून पडू नका कारण आयुष्य आपल्याला लहान लहान प्रश्नांनी हरवत असते...!!!

 🌷जगात सर्वात सहज आणि स्वस्त आहे "सल्ला" तो कुणालाही न विचारता खुप लोक तुम्हाला द्यायला येतील. परंतु "मदत" खुप महाग आह. तुम्ही अडचणीत असताना अनेक लोकांकडे स्वतः हात जोडून मदत मांगा, कोणीही सहज तुम्हाला मदत करण्यासाठी येणार नाही...!!!

आयुष्य सुंदर आहे. आनंदात जगा, आपला जिव्हाळा कायम राहो...!!!

आधी बोला...,मग जमलं तर गोड बोला !!

काही गोष्टी आपल्यात उपजत किंवा अनुवंशिक असतात. बोलणं हा त्यातलाच एक प्रकार.

 'आधी बोला, मग जमलं तर गोड बोला'. बोलणं संपलंय खरंतर आताशा. भरभरून बोलणारी माणसं कमी झालीत. एखाद्याबद्दल भरभरून बोललं की भाबडेपणाचा, व्यक्तिपूजेचा शिक्का हल्ली लगेच बसतो. अति बोलणं आणि भरभरून बोलणं यात फरक आहे. खोटी स्तुती, मतलबी गोड बोलणं लक्षात येतं.

गुजराथी, मारवाडी लोक मुळातच गोड बोलतात. आपण त्यांना नावं ठेवण्याशिवाय दुसरं काहीही करत नाही. पोटात शिरण्याची कला त्यांच्या डीएनएमधे आहे. धंदा भरभराटीला आणण्यासाठी ते गरजेचं असतं. ते कशी छान साखरेची सुरी करून गळा कापतात दुकानात आणि आपण माहित असूनही मान पुढे करायला वारंवार जातो. हा मानसोपचार आहे. उधारीवर घेऊन सुद्धा तो तुम्हांला 'या, शेठ' म्हणतो, मराठी दुकानात तुमच्याकडे तो कमाल तुच्छ नजरेने बघतो. महाराष्ट्रीयन बाणा या नावाखाली आपण वर्षानुवर्षे माती करत आलोय, करत राहू.   

आज म्हणजे संक्रांतीच्या दिवशी व्हाट्सअप आणि फेबूच्या भिंती औपचारिक मेसेजेसनी भरभरून वहातात. प्रत्येक सणाला आपल्याकडे वैशिष्ठ्य आहे. थंडीत उष्णता हवी म्हणून तीळ आणि गुळाच्या पोळीची योजना आहे. आपण खरंतर अर्धवट आहोत. निम्म्या माहितीवर आपण खूप बोलतो. सूर्याचं संक्रमण म्हणजे काय किती जणांना माहित असतं. वाईट झालं की एखाद्यावर संक्रांत आली म्हणतो आणि इकडे हॅप्पी संक्रांत पण म्हणतो. तिळगुळ देणं, सोनं वाटणं यात भेटीगाठी आहेत, थोरांचे आशीर्वाद घेणं आहे, जमण्याचा आनंद आहे, फिल गुड वाटण्याचं नियोजन आहे. वयोमानाने थकलेली, आजारी असलेली माणसं माणसांपासून लांब जाऊ नयेत, घरात नविन कपड्यांचा वाससुद्धा त्यांना उत्साही करतो म्हणून हे सण असतात, एकत्र येण्यासाठी. कॉटवर तासंतास, दिवसेंदिवस पायाची अढी घालून, कमरेत वाकलेली माणसं शून्यात बघत एकटी बसलेली दिसतात आणि त्यांच्या घरातली माणसं व्हाट्सअप आणि फेबूवर मेसेजेस पाठवण्यात दंग असतात. असो!

गोड बोलणं म्हणजे नेमकं काय असतं? खोटी स्तुती? मतलब निघावा म्हणून केलेलं संभाषण? गुडबुक्समधे रहाण्याचा खटाटोप? उगाच कशाला वाईटपणा यासाठी? प्रत्येकाचा अर्थ ज्याच्या त्याच्या स्वभावानुसार वेगळा येईल. कारणाने गोड बोलणं वेगळं असतं, नाईलाज म्हणून असतं ते. लहान मुलाचं बोलणं गोड असतं, कुठलाही मतलब न चिकटलेलं असतं. खाऊसाठी, कडेवर घेण्यासाठी, बाहेर चक्कर मारायला नेण्यासाठी असतंही पण ते लोभस असतं. त्यात हेतू असतो, मतलब नसतो. आपल्यालाही ते आवडतं म्हणून आपण त्याचा हेतू लगेच पूर्ण करत नाही. 

वयाप्रमाणे गोड बोलण्याचे अर्थ आणि आवाजाचा पोत बदलत जातो माणसाचा. प्रेमात पडला की किंवा पटवायच्या वेळी तो जिभेवर मधाचे स्प्रिंकलर्स लावून बोलतो. नोकरीच्या ठिकाणी पुढच्या प्रगतीसाठी कॅल्क्युलेटेड गोड बोलतो. सरकारी ऑफिसात नाईलाज म्हणून मुखवटेदार गोड बोलतो.

गोड बोलणारी म्हातारी माणसं विरळ असतात. एकतर त्यांचं बोलणं संपलेलं असतं किंवा कसल्यातरी काळीज कुरतडण्या-या काळजीने, व्याधीने त्रस्त असतात. ते पटकन आपण कुणाला दुखावणार तर नाही ना या भीतीपोटी अबोल होत जातात. किरकोळ कामासाठी कायम घाईत असलेल्या नातवंडांशी ते जे बोलतात ते गोडपेक्षा लाचारीचा पदर धरून आलेलं असतं. सुखी, तृप्त माणसाचं बोलणं जास्ती गोड असतं किंवा वाटतं कारण ते मनातून आलेलं असतं. पण हल्ली झालंय काय प्रत्येकाला स्तुती हवीये. किरकोळ टीकाही लोकांना सहन होत नाही त्यामुळे वाद नको म्हणून सोशल मिडियावर लोक एकमेकांशी केवढं तरी नाटकी गोड बोलत असतात. फटकारणारा माणूस आपला हितचिंतक असतो हा आता गैरसमज आहे. पहिल्यांदा खरं बोलणारा माणूस परखड म्हणून ओळखला जायचा. त्याच्यात थोडी वाढ झाली की तो फटकळ असतो आणि त्या स्वभावाची मस्ती आली की माणूस तोंडाळ होतो आणि आपली ती प्रतिमा पुसली जाऊ नये म्हणून सतत गरज असो नसो, वादग्रस्त बोलत रहातो.   

 मकर संक्रांतीला ( एकदिवसीय ) गोड बोला सांगण्याला फारसा अर्थ नाहीये. प्रथा आहे एवढंच. करा असं सांगावं लागतंय वर्षानुवर्षे यांतच त्यातला फोलपणा आहे. जो आपण चुकत असताना निर्भीडपणे आपण चुकत आहोत असं सांगतो, धर्मराजाचा रथ जसा जमिनीवरून दोन बोटं वर चालायचा तसे आपले जमिनीवरचे पाय सुटालागल्यावर आपले डोळे उघडतो तो माणूस प्रिय असावा खरंतर. प्रत्येकाला कडू गोळी साखरेतून देता येईल असं नाही. सातवी आठवीला एक संस्कृत सुभाषित होतं, 'सत्यम ब्रूयात प्रियं ब्रूयात न ब्रूयात सत्यम अप्रियं | प्रियं च नानृतं  ब्रूयात एषधर्मः सनातनः'. त्याचा अर्थ लक्षात आहे. सत्य बोला, प्रिय वाटेल असं बोला, पण कटू वाटेल असं सत्य आणि प्रिय वाटेल असं खोटंही बोलू नका. कुणाला वाईट वाटेल असं सत्य बोलू नये ठिक आहे पण पुढे त्याचं नुकसान होणार असेल तर मात्र आत्ता वेळीच बोलावं असो!

गोड की कडू, ते राहू देत, काय आणि कुठे बोलायचं नाही हे एकदा समजलं की माणूस यशस्वी होईल एवढं खरं. 

फुंकर

चुलीतल्या धुमसत्या लाकडांवर फुंकर घातल्यास त्यातून आगीच्या ज्वाला पेटतात ज्याने अन्न शिजते.

कुणाच्या भाजलेल्या त्वचेवर अथवा जखमेवर फुंकर घातल्यास तिथला दाह कमी होतो.

शाळेत कधी डोळ्यात काही पडलच तर बाजूची मैत्रीण तिच्या चिमुकल्या हातांनी डोळा मोठा करत त्यावर फुंकर घालायची जेणेकरून डोळ्यात पडलेला कण उडून जायचा.

कुणाच्या दु:खावर मायेच्या आश्वासक शब्दांची फुंकर घातल्यास त्या व्यक्तीस दु:ख सहन करण्याची, त्यातून बाहेर पडण्याची ताकद मिळते.

नवथर तरुणीच्या अल्लड बटांवर तिच्या प्रियकराने घातलेली हलकीशी फुंकर ही तिच्या कायेत रोमांच फुलविते. 

आठवणींच्या  वहीवर फुंकर घालताच अनेक आठवणींची पानं फडफडू लागतात. आयुष्यातली एखादी जवळची व्यक्ती गेली की खाली राहिलेली व्यक्ती या आठवांच्या जीवावर तिचे उर्वरीत आयुष्य घालवते. या आठवांच्या माध्यमातून त्या व्यक्तीचा सहवास अनुभवत रहाते.

गरमगरम कॉफीचा फुंकर घालून आस्वाद घेण्याचा नाद वेगळाच. 

लहानपणी लाजाळु/लाजरीच्या पानांवर हळूवार फुंकर घालून ती मिटताना पहाणं हाही एक नादच होता.

बशीतला गरम चहा एकाकडेने आजी/आई धरते व दुसऱ्या कडेने बाळ बशीला गच्च पकडते. मग आई हळूवार फुंकर घालते चहावर जेणेकरून बाळाच्या जीभेला चटका लागू नये. ते पाहून बाळाला अजून मजा येते. बाळपण मग फुर्र फुर्र करत चहा पिऊ लागतो.

लहान बाळाच्या जावळावर फुंकर घाला. त्याचे मुलायम केस भुरुभुरु उडतात व बाळ जितका वेळ आपण फुंकर घालू तितका वेळ खुदूखुदू हसतं. ते हसणं दैवी असतं. त्याहून सुंदर आकाशातलं चांदणं देखील नसतं.

पाटी ओल्या फडक्याने स्वच्छ पुसली की ती फुंकर घालून वाळवायचो तेंव्हाचं ते गाणं चिमणी चिमणी पाणी दे कावळ्या कावळ्या वारा घाल..अजुनही बालपणात घेऊन जातं.

बासरीच्या मुखरंध्राजवळ श्रीकृष्णाची अलवार फुंकर पडू लागली की गोपिकाच काय, गाईवासरेही देहभान विसरुन डोलू लागायची.

अशी ही फुंकर..इवलीशी..तरी अगदी जवळची.

कधी कधी मैत्री वर बसलेल्या धुळीवर पण फुंकर मारून बघावी तिथलीही धुळ उडून जाईल

कधी हलकिशी फुंकर मारून तर बघा.

मस्त आयुष्य जगण्याचा फंडा

- एक मजेशीर गणित" पहा, सोडवा किंवा सोडून द्या पण आनंद जरूर घ्या.

आपण असे मानू या की....
A, B, C, D, E, F, G, H, I, J, K, L, M, N, O, P, Q, R, S, T, U, V, W, X, Y, Z = अनुक्रमे 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26.

म्हणजेच A=1, B=2, C=3 असे
मानले तर माणसाच्या कोणत्या गुणाला पूर्ण शंभर गुण मिळतात हे पाहू या....

आपण असे म्हणतो की, आयुष्यात "कठोर मेहनत/ HARDWORK" केले तरच आयुष्य यशस्वी होते.
आपण 'HARDWORK' चे गुण पाहु या. H+A+R+D+W+O+R+K =
8+1+18+4+23+15+18+11 =98% आहेत पण पूर्ण नाहीत.

दुसरा महत्त्वाचा गुण म्हणजे "ज्ञान" किंवा 'Knowledge'.
याचे मार्क्स पाहु या
K+N+O+W+L+E+D+G+E =
11+14+15+23+12+5+4+7+5=96% हे पहिल्या पेक्षा कमी.

काही लोक म्हणतात "नशिब / LUCK" हेच आवश्यक. तर लकचे गुण पाहु या.
L+U+C+K = 12+21+3+11 = 47%, "नशिब" तर एकदमच काठावर पास.

काहींना चांगले आयुष्य जगण्या साठी "पैसा / MONEY" सर्व श्रेष्ठ वाटतो. तर आता 'M+O+N+E+Y'=किती मार्क्स?
 13+15+14+5+25=72%, पैसा ही पूर्णपणे यश देत नाही.

बराच मोठा समुदाय असे मानतो की, "नेतृत्वगुण / LEADERSHIP" करणारा यशस्वी आयुष्य जगतो.  नेतृत्वाचे मार्क्स =
12+5+1+4+5+18+19+8+9+16=97%, बघा लीडर ही शंभर टक्के सुखी, समाधानी नाहीत, आनंदी तर अजिबात नाहीत.

मग आता आणखी काय गुण आहे, जो माणसाला १००% सुखी, समाधानी आणि आनंदी ठेऊ शकतो? 
काही कल्पना करू शकता?...... नाही जमत?
मित्रांनो, तो गुण आहे, आयुष्याकडे पाहण्याचा "दृष्टिकोन / ATTITUDE"
आता 'ॲटिट्यूड' चे आपल्या कोष्टका नुसार गुण तपासू... 
A+T+T+I+T+U+D+E = 1+20+20+9+20+21+4+5=100%. पहा आयुष्यातील सर्व समस्यांचे निराकरण करून सुखी, समाधानी आणि आनंदी आयुष्य जगण्याचा स्वस्त फंडा आहे, 'आपला आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन'. तो जर सकारात्मक असेल तर आयुष्य १००%यशस्वी  होईल आणि आनंदी ही होईल.

"दृष्टिकोन बदला आयुष्य बदलेल"

# राग...(Anger)

राग... काय म्हणावं नेमके याला...

मित्र की शत्रू...
मित्र म्हणाव तर
त्याने प्रेमाने राहायला हवं...
आणि शत्रू म्हणावं
तर त्यानं गोंधळ घालू नये...! 

राग म्हटलं की डोळ्यासमोर येतात लालबुंद झालेलं डोळे... हसू ची एक ही कळी नसलेला चेहरा...
गर्व... कपाळावर पडलेल्या आठ्या आठवतात...

आणि हो, 
आपण रागाला दोषी ठरवतो नेहमी... पण तो योग्य वेळी योग्य ठिकाणी आलाच पाहिजे तो... नाहीतर लोक तुमचा फायदा घेऊन जातील... बघा ना... समजा... तुम्हाला कुणीतरी विनाकारण शिव्या देत आहे... आणि तुमची काहीही चुकी नाहीये... तर काय कराल तुम्ही... नक्कीच तुम्ही कारण विचारणार... ठीक आहे... आणि तरीही तुम्हाला तो कारण न सांगता शिव्याच देऊ पाहतोय... तर नक्कीच तुम्ही रागवाल... आणि साहजिक रागवलंच पाहिजे...
पण नेहमी नाही... वेळ... काळ... कारणे... रागवणारी व्यक्ती... कोण आहे हे सर्व बघून रागवलं पाहिजे.. नाहीतर प्रेमाने समजावून सुद्धा प्रश्न सुटतात...

तस बघितले तर 
रागाचे भरपूर प्रकार आहेत...
जस की आधी प्रेमाने समजावणे... नाही ऐकलं तर रागावून ही सांगणे... पण त्यामागे चांगलं हेतू असावा...
आणि हो, 
जर रागावून कुणाचं चांगलं होत असेल तर राग चांगला आहे... तो आपला मित्र आहे...

राग आपला स्वाभिमान दाखवून देतो... आणि अहंकार ही... आपल्यावर असतं... आपण रागाला कस वागवयचं... कसं काबू मध्ये ठेवायचं... आणि कसे शस्त्र  म्हणून उपयोगात आणायचे...! 

राग आपला स्वभाव नाही होऊ शकत... आणि त्याला कधी आपला स्वभाव म्हणून वागवूही नका... त्याला आपली सवय ही बनवू नका... अन् आपली कमजोरी म्हणून ही दुसऱ्याला दाखवू नका... तो जितका चांगला आहे... तेवढंच वाईट ही आहे...! 

एक क्षण हवा असतो फक्त राग यायला... आणि सर्व काही मातीत मिसळावयाला... आपली प्राण - प्रतिष्ठा... इज्जत... मान - सन्मान... घालवायला... आणि कित्तेक वर्ष जातात हे सर्व कमवता - कमवता... !! 
म्हणून जेवढं होईल तेवढं आपल्या रागाला काबू मध्ये ठेवा...

राग हा फक्त काही क्षणांचा असतो.... तर तेवढा क्षण जर आपण त्याच्याकडे लक्ष दिलं नाही... अन् दुसऱ्या गोष्टीमध्ये मन गुतवले... पूर्णपणे दुर्लक्ष केलं... तेवढे क्षण आपण त्या जागेवरून किंवा त्या वक्ती समोरून बाजूला गेलो... तर नक्कीच आपण हे सर्व होण्यापासून वाचू शकतो... आणि आनंद निर्माण करू शकतो... प्रयत्न तरी करून बघा...
हे सूत्र कसं फायदेशीर ठरतं... !!

गंभीर बनू नका....

फार गंभीर बनून जगू नका. हे विश्व करोडों वर्षापासून आहे. कित्येक आले आणि गेले. कुणावाचून कुणाचे काही थांबत नाही. जे व्हायचे ते होत राहणार आहे. तुम्हाला विचारुन काही घडणार नाही. या जगात आपले काहीच नसते, त्यामुळे काही गमावल्याचे दुःख करु नका. मी अमूक, मी तमूक असा अंहकार बाळगू नका. सर्वांशी प्रेमाणे रहा. धर्म, जात, तत्व या गोष्टी माणसाने निर्माण केल्या. त्यामध्ये अडकून पडू नका.

स्वतःचा भरवसा नसतांना इतरांना संपवण्याची भाषा बोलू नका. इतिहासातील कुरापती काढून वर्तमान खराब करु नका. त्यांचे जीवन ते जगले तुम्ही तुमचे जीवन जगा व इतरांना जगू द्या. आता काळ बदलला आहे. आपली खरी गरज काय आहे ओळखा. उगीच फालतु गोष्टीत नाक खुपसू नका.

हजारों प्रकारचे संकट घोंघावत असतांना, क्षुल्लक गोष्टींने विचलित होऊ नका. जीवन गंमतीने जगा. जरा मोकळेपणाने हसा. इतरांनाही आनंदी करा. लक्षात ठेवा तुमच्या गंभीरपणाने कुणाचेही भले होणार नाही. साऱ्या जगाचा विचार करू नका. नसती चिंता करु नका. लहान
सहान गोष्टींचा आनंद घ्या. सतत गंभीर बनू नका. 

इतरांशी मोकळेपणाने बोला. त्यामध्ये कमीपणा मानू नका. तुम्ही स्वतःला काहीही समजले तरी निसर्गाच्या पुढे तुम्ही फक्त एक जीव आहात. कुणाचाही द्वेष करु नका. सूडबुद्धीने वागू नका. आपल्या अवतीभोवतीचे जग बघा. किती गंमत आहे चोहीकडे.

मुंग्याची रांग बघा. पाखरांचे थवे बघा. बघा कावळ्याची स्वच्छता. खळखळणारा समुद्र तुमच्या सोबतीला आहे. त्याच्या उसळणाऱ्या लाटा तुम्हाला खुणावत आहेत. जा उंच डोंगरावर... किती प्रेमाणे तो डोंगर खांद्यावर खेळवतो. विचारा त्या कोकीळेला, इतकी सुंदर कशी गातेस? विविध रंगाची फूले बघा. आयुष्यात विविध रंग भरा.

एकसारखे जीवन जगू नका. नवी ठिकाणे नवी माणसे यांच्याशी मैत्री करा. प्राण्यांशी संपर्क ठेवा, त्यांचे जगणे बघा. कटकटी कमी
करा. अधिक आनंदी जगा.
जगणं म्हणजे फक्त श्वास घेणं नसतं, तर त्या जगण्यालाही स्वतःचं असं वेगळं रूप आणि अस्तित्व असतं... !! 

आनंदाने जगण्यासाठी...
सर्वांना मनमोकळेपणाने शुभेच्छा  !!

  १. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...