🌷रोजचा ऊगवणारा "नवा दिवस" हा, आपल्या मनाप्रमाणे, रोजच "ऊगवेल" असे होत नाही.! मात्र नविन ऊगवणा-या प्रत्येक "नव्या दिवसात," आपल्या मनासारखं, काही ना काहीतरी निश्चितच चांगले घडणारे "ऊगवलेलं" असेल, असा सकारात्मक आशावाद मनात ठेवा व तसे राहा, हे मात्र नक्की करा...!!!
🌷एखादे वेळेस आपण स्वत: जरी आनंद निर्माण करु शकलो नाही, तरी हरकत नाही.! मात्र दुस-यांच्या आनंदात अगदी मनपासुन, हसत मुखाने सहभागी होऊन "त्यांचा" आनंद द्विगुणीत करा... तुमचा आनंद आपोआप शतपटीने निर्माण होइल...!!!
🌷खूप विचार करून एक दिवस नशिबाला विचारलं की तू सगळ्यांना एवढं दुःख का देतोस! नशिबाने हि हसून उत्तर दिलं कि मी देतांना तर सगळ्यांना सुखच देतो! पण तुम्ही सगळेच जण एकमेकाच सुख पाहून दुःख ओढवून घेता, त्यात माझा दोष काय??? ...!!!
🌷समजूतदारपणा .... ज्ञानापेक्षा खूप महत्वपूर्ण असतो..... खूप लोक आपल्याला ओळखतात ..... पण त्यातील मोजकेच लोक आपल्याला समजून घेत असतात ....!!!
🌷कोणती तरी एक भावना प्रकर्षाने हवी. चीड संपली कि सगळच संपलं. माणूस अनुभवच नको अस म्हणतो. ज्या मनात चीड धगधगत असते, त्याच मनात प्रेम असतं. कारण काहीतरी चांगलं घडावं, ह्या सदिच्छेला तडा गेला म्हणजेच चीड निर्माण होते...!!!
🌷प्रत्येक कुलुपाला त्याची एक चावी नक्की असते. नेमकी ती हाती आल्यावर ते दार उघडत असते. जसे जीवनातल्या संकटाचेही थोडेफार असेच असते. शांतपणे विचार केल्यास प्रत्येक समश्येचे एक उत्तर असते...!!!
🌷आयुष्यात अखंड उत्साह, सत्य शोधक नजर, उत्कृष्ठ वक्तृत्व, ध्येयवादी प्रवासाची विलक्षण हौस हे सगळे गुणविशेष या सारख्या व्हिटॅमिनच्या गोळ्या खाऊन जीवनात यश प्राप्त करून घेता येऊ शकते...!!!
🌷मोठ्या लोकांच्या शेजारी उभं राहिलं, म्हणजे मोठं होता येते कि नाही ते माहित नाही.
पण चांगल्या विचारांच्या लोकांच्या सानिध्यात (सोबतीत) राहून नक्कीच मोठं होता येऊ शकते
🌷थकलेल्या माणसाची वाट आणि झोप न येणाऱ्या माणसाची रात कधी पण मोठीच असते
🌷"विश्वास" हा कधीच मरत नाही, आज तुम्ही कुणाला तरी द्याल, उद्या दुसरा कोणी तरी तुम्हाला देवून जाईल. परंतु जर तुम्ही विश्वासघात केल्यास तुमचा कुठेतरी नशिबात घात झाल्याशिवाय राहात नाही...!!!
🌷जी व्यक्ती आयुष्यभर सुखात आणि दुःखा मध्ये साथ देते ती खरी मैत्री असते, मोठमोठ्या प्रश्नांमध्ये गुंतून पडू नका कारण आयुष्य आपल्याला लहान लहान प्रश्नांनी हरवत असते...!!!
🌷जगात सर्वात सहज आणि स्वस्त आहे "सल्ला" तो कुणालाही न विचारता खुप लोक तुम्हाला द्यायला येतील. परंतु "मदत" खुप महाग आह. तुम्ही अडचणीत असताना अनेक लोकांकडे स्वतः हात जोडून मदत मांगा, कोणीही सहज तुम्हाला मदत करण्यासाठी येणार नाही...!!!
आयुष्य सुंदर आहे. आनंदात जगा, आपला जिव्हाळा कायम राहो...!!!
No comments:
Post a Comment