Sunday, May 29, 2022

# राग...(Anger)

राग... काय म्हणावं नेमके याला...

मित्र की शत्रू...
मित्र म्हणाव तर
त्याने प्रेमाने राहायला हवं...
आणि शत्रू म्हणावं
तर त्यानं गोंधळ घालू नये...! 

राग म्हटलं की डोळ्यासमोर येतात लालबुंद झालेलं डोळे... हसू ची एक ही कळी नसलेला चेहरा...
गर्व... कपाळावर पडलेल्या आठ्या आठवतात...

आणि हो, 
आपण रागाला दोषी ठरवतो नेहमी... पण तो योग्य वेळी योग्य ठिकाणी आलाच पाहिजे तो... नाहीतर लोक तुमचा फायदा घेऊन जातील... बघा ना... समजा... तुम्हाला कुणीतरी विनाकारण शिव्या देत आहे... आणि तुमची काहीही चुकी नाहीये... तर काय कराल तुम्ही... नक्कीच तुम्ही कारण विचारणार... ठीक आहे... आणि तरीही तुम्हाला तो कारण न सांगता शिव्याच देऊ पाहतोय... तर नक्कीच तुम्ही रागवाल... आणि साहजिक रागवलंच पाहिजे...
पण नेहमी नाही... वेळ... काळ... कारणे... रागवणारी व्यक्ती... कोण आहे हे सर्व बघून रागवलं पाहिजे.. नाहीतर प्रेमाने समजावून सुद्धा प्रश्न सुटतात...

तस बघितले तर 
रागाचे भरपूर प्रकार आहेत...
जस की आधी प्रेमाने समजावणे... नाही ऐकलं तर रागावून ही सांगणे... पण त्यामागे चांगलं हेतू असावा...
आणि हो, 
जर रागावून कुणाचं चांगलं होत असेल तर राग चांगला आहे... तो आपला मित्र आहे...

राग आपला स्वाभिमान दाखवून देतो... आणि अहंकार ही... आपल्यावर असतं... आपण रागाला कस वागवयचं... कसं काबू मध्ये ठेवायचं... आणि कसे शस्त्र  म्हणून उपयोगात आणायचे...! 

राग आपला स्वभाव नाही होऊ शकत... आणि त्याला कधी आपला स्वभाव म्हणून वागवूही नका... त्याला आपली सवय ही बनवू नका... अन् आपली कमजोरी म्हणून ही दुसऱ्याला दाखवू नका... तो जितका चांगला आहे... तेवढंच वाईट ही आहे...! 

एक क्षण हवा असतो फक्त राग यायला... आणि सर्व काही मातीत मिसळावयाला... आपली प्राण - प्रतिष्ठा... इज्जत... मान - सन्मान... घालवायला... आणि कित्तेक वर्ष जातात हे सर्व कमवता - कमवता... !! 
म्हणून जेवढं होईल तेवढं आपल्या रागाला काबू मध्ये ठेवा...

राग हा फक्त काही क्षणांचा असतो.... तर तेवढा क्षण जर आपण त्याच्याकडे लक्ष दिलं नाही... अन् दुसऱ्या गोष्टीमध्ये मन गुतवले... पूर्णपणे दुर्लक्ष केलं... तेवढे क्षण आपण त्या जागेवरून किंवा त्या वक्ती समोरून बाजूला गेलो... तर नक्कीच आपण हे सर्व होण्यापासून वाचू शकतो... आणि आनंद निर्माण करू शकतो... प्रयत्न तरी करून बघा...
हे सूत्र कसं फायदेशीर ठरतं... !!

No comments:

Post a Comment

  १. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...