Friday, August 19, 2022

 माउली 


पंढरीच्या दारी, चालली वारी 
दगड मातीची, ती मखमली वाट
सुखाच्या रेषा, ह्या पाऊली उमटे 
ध्यास एकच, माउली भेट 

नसे वेदना, नसे ते क्लेश 
नसे काही, ते आत्म पाश 
असे मनी, ह्या एकची लक्ष 
ध्यास एकच, माउली भेट 

नसे जाणीव, पाय भेगांची 
नसे काळजी, तन मनाची 
फिकीर नसे, मनी कशाची 
ध्यास एकच, माउली भेट 

स्वप्न उराशी, एकच घेउनी 
माय पंढरी, चालत जाऊनी 
माथा चरणी, माय माउली ठेउनी 
ध्यास एकच, माउली भेट 

खंत एकच, आहे ह्या उरी 
नाही वारी, ह्याही वर्षी 
माऊलीच ती, आलीया दारी 
दर्शन देई, अनेक रुपी 
ध्यास तिज, भेटी आहे मज
ध्यास एकच, माउली भेट 

©️ उदय पोवळे

*ॲन्टीबाॅडी*

  ————


जिवाभावाच्या मित्राला
करू तर द्या खोडी
लेकरांसंगे पाण्यात 
सोडा कागदाची होडी
बघा कशा पटकन
तयार होतोत ॲन्टीबाॅडी

रूसलेल्या बायकोला
जरा लावा लाडीगोडी
फुलांचा गजरा आणा
आणा आवडीची साडी
बघा कशा पटकन
तयार होतात ॲन्टीबाॅडी

थकलेले आईबाबा
त्यांची सेवा करा थोडी
गमतीदार किस्से वाचा
सोडवून पहा शब्दकोडी
बघा कशा पटकन
तयार होतात ॲन्टीबाॅडी

लिंबू आणी कैरीच्या
चाखुन बघा आंबट फोडी
छोट्या छोट्या गोष्टीत
जेव्हा सापडते आनंदाची नाडी
बघा कशा पटकन
तयार होतात ॲन्टीबाॅडी

ध्यान,प्राणायाम योगा करा
जरा कमी करी जाडी
कुणाच्या तरी आधाराची
जेव्हा व्हाल तुम्ही काडी
बघा कशा पटकन
तयार होतात ॲन्टीबाॅडी

चूकभूल माफ करा
मनात ठेऊ नका अढी
काळजात जिव्हाळ्याची
आता ऊभारा ना गुढी
बघा कशा पटकन
तयार होतात ॲन्टीबाॅडी

घसरलेली नक्कीच
रूळावर येईल गाडी
आजाराच्या आरोग्यावर
पडणार नाहीत धाडी
बघा कशा पटकन
तयार होतात ॲन्टीबाॅडी।
===========================================

जेवणात ही कढी अशीच राहू दे
खिचडीच्या ढिगावरी निवांत ओतू दे
जेवणात ही कढी अशीच राहू दे !

पापड मी तेलावर मस्त तळले
आवडती तुज म्हणोन काही भाजले
उडदातील गोडवा जिभेस लाभू दे
जेवणात ही कढी अशीच राहू दे !

हळूच तुला गिळण्याचा छंद आगळा
भुकेचा त्याविण का अर्थ वेगळा
घोटातून आल्याचा गंध येऊ दे
जेवणात ही कढी अशीच राहू दे !

पिऊ दे असेच तुला नित्य जेवता
वाटी भर अजून एक .. काय थांबता
कढी खिचडी बेत सर्व-मान्य होऊ दे
जेवणात ही कढी अशीच राहू दे !

🌹🌷🌹
=====================================

मी ओळखून आहे सारे तुझे बहाणे एक विडंबन* 😅

भाजून सोलणे अन्
निवडून ते पहाणे
मी ओळखून आहे
कुठल्या डब्यात दाणे ॥धृ॥

जाता घरातूनी तू
घेईन एक वाटी
खाईन मस्त दाणे
येईल मौज मोठी
हे स्वप्न जीवघेणे
भरतो सुखे बकाणे ॥१॥

मी ओळखून आहे कुठल्या डब्यात दाणे...

हाती डबा जयाच्या
त्याला कसे कळावे
पोटात भूक ज्याच्या
त्यालाच दु:ख ठावे
लपवून लाख ठेवा
शोधू आम्ही दिवाणे ॥२॥

मी ओळखून आहे कुठल्या डब्यात दाणे...

पोटास वेदनांचा
का सांग त्रास व्हावा ?
इतका चविष्ट खाऊ
का औषधी नसावा ?
येवो कळा कितीही
सोडू अाम्ही न खाणे ॥३॥

मी ओळखून आहे कुठल्या डब्यात दाणे...😝😅

कवी माहीत नाही.
=======================================

ही कविता म्हणजे ......* 
*एखाद्या व्यक्तीस ढेरी का सुटते ?* 
*यावर केलेले चिंतन आहे !* 🤪
 😜
*केवळ गंमत म्हणून..*
*या कवितेकडे पहावे !* 

🤪😜😝

------------

*नवऱ्याची ढेरी वाढण्यात*
*बायकोचाच असतो हात*
*तीच म्हणते थोडाच उरलाय*
*घेऊन टाका भात* 😀😜

*पिठलं उरो , पोळी उरो*
*बायकोच आग्रह करते*
*पुरणाच्या पोळीवर*
*तुपाची धार धरते* 😝

*बोन्ड वाढते , भजे वाढते*
*मस्त भाज्या करते*
*दोन्ही वेळेस यांचे पोट*
*तडसावणी भरते* 😝

*अन्न पूर्णब्रह्म म्हणून*
*तो ही खात राहतो*
*बायकोचं मन मोडत नाही*
*म्हणून जाड होतो* 😜

*ज्याची बायको सुगरण असते*
*त्यालाच ढेरी येते*
*लोकं उगीच नावं ठेवतात*
*लक्ष द्यायचे नसते ?* 😜

*साधी फोडणी दिली तरी*
*खमंग स्वयंपाक होतो*
*त्याच बाईच्या नशिबात*
*ढेरीवाला असतो*😛

*जिथं जाईल तिथं लोकं*
*आग्रह करत राहतात*
*स्वभाव , हुशारी सोडून*
*ढेरी कडेच पाहतात* 😀

*बरेचजण सल्ला देतात*
*थोडा व्यायाम करत जा*
*सकाळी उठून थोडं तरी*
*ग्राऊंडवर पळत जा* 😏😀

*योगासनं , प्राणायाम*
*का करत नाही ?*
*पहाटे उठून डोंगरावर*
*का चढत नाही ?* 😀

*ते जरी बोलले तरी*
*कशाला लक्ष द्यायचं*
*एक वाटी संपली की*
*दुसरं आईस्क्रीम घ्यायचं* 🤪

*लोकांच्या भरीस पडून*
*काहीच करायचं नाही*
*उगीचच डायटिंग करून*
*मरकुडं व्हायचं नाही* 😝

*व्यायाम करा व्यायाम करा*
*ते म्हणतच असतात*
*कोण म्हणतं जाड माणसं*
*हँडसम दिसत नसतात* 🤪😜

*माकड हाड मोडल्यावर*
*कोण मदतीस येतो?*
*म्हणून मी पळत नाही*
*घरीच लोळत असतो* 😝

*फुकटचे सल्ले द्यायला*
*लोकांचं काय जातं*
*आमची ढेरी पाहून त्यांच्या*
*पोटात दुखत राहतं* 🤪😜

*वा वा छान म्हणून*
*जो जेवत असतो*
*खरं सांगतो त्याचाच पोटाचा*
*घेर वाढत असतो* 😀

*कोण्याही ऐऱ्यागैऱ्याला*
*ढेरी सुटत नसते*
*ढेरीसाठी भगवंताची*
*कृपा लागत असते* 😜

*समाधानी माणसालाच*
*सुटत असते ढेरी*
*सुखाचे , आनंदाचे*
*प्रतीक असते ढेरी* 😀😝

*प्रा.विजय पोहनेरकर*
*औरंगाबाद , 17/7/2021.*

*फुंकर.. किती सुंदर अर्थवाही शब्द. नुसता शब्द वाचला तरी डोळ्यापुढे तरळतो तो ओठांचा चंबू, ते अर्धोन्मीलित प्रेमव्याकूळ नेत्र, ती माया, ती ममता, तो स्नेह, ती सहवेदना, ती संवेदनशीलता. आणि अस्फुट ऐकूही येतो, फू ऽऽऽ, तो अलगद सोडलेला हवेचा विसर्ग, एक लाघवी उच्छ्वास.*


*फुंकर.. एक सहजसुंदर, स्वाभाविक, हळूवार भावनाविष्कार.*

———————

*फुंकर*

धनी निघाले शेतावरती
बांधून देण्या भाजी भाकर
चुलीत सारून चार लाकडे
*निखार्‍यावर घाली फुंकर।*

माय जाणते दमले खेळून
बाळ भुकेले स्नानानंतर
बशी धरूनी दोन्ही हातानी
*दुधावरती हळूच फुंकर।*

कुसुम कोमल तान्हे बालक
चळवळ भारी करी निरंतर
ओठ मुडपुनी हसे, घालता
*चेहर्‍यावरती हळूच फुंकर।*

खेळ खेळता सहज अंगणी
डोळ्यात उडे धूळ कंकर
नाजूक हाते उघडून डोळा
*सखी घालते हळूच फुंकर।*

राधारमण मुरलीधर
धरूनी वेणु अधरावर
काढीतसे मधु मधूर सूर
*अलगुजात मारून फुंकर।*

किती दिसांचा वियोग साहे
रागेजली ती प्रिया नवथर
कशी लाजते पहा खरोखर
*तिच्या बटांवर घालून फुंकर।*

सीमेवरूनी घरधनी येता
अल्प मिळाला संग खरोखर
रात जाहली पुरेत गप्पा
*दिवा मालवा मारून फुंकर।*

संसारातील जखमा, चटके
सोसायाचे जगणे खडतर
सुसह्य होते कुणी घालता
*सहानुभूतीची हळूच फुंकर।*

अटल आहे भोग भोगणे
कुणी गेल्याचे दु:ख भयंकर
पाठीवरती हात फिरवूनi
*दु:खावरती घाला फुंकर।*

कितीक महिने गेले उलटून
मित्र भेटही नाही लवकर
मैत्रीवरची धूळ झटकुया
*पुनर्भेटीची घालून फुंकर।*

🙏🏼🙏🙏
=============================================

बाईच्या दुःखाला


 भाकरी भाजता भाजता
 धग असह्य झाल्यावर
 तिने चुलीतील लाकडे
 पुढे सरकवली
आणि मनातल्या मनात
 पुटपुटली
आयुष्याचा कोळसा
 होण्याआधी स्वप्नांचे
 निखारे असेच फुलत
 जातात....

नंतर तिने भाकर परतली
 आयुष्य परतावे
 सप्तपदींच्या दिवशी
 तेवढी सहज
पण संसाराची भाकरी
 करपली ती करपलीच....
आता पुन्हा हा जाळ
 असा आनंदाने सोसते आहे

मग तिने तवा अलगद
 खाली उतरवला
त्याच्यावर पाणी मारले
चर्रss आवाज झाला
अलिकडे जवळपासच्या
 माणसांच्या बोलण्याने
 होतो तसा

तिने विस्तवावर पाणी मारले
आणि चुलीपासून दूर झाली
आता ती स्त्रीमुक्तीच्या सभेला
निघाली आहे पदरात चार निखारे बांधून...
ती सभागृहाच्या -मागच्या रांगेत
 आणि पुरुषच बसलेले असतात पुढच्या रांगेत
 बाईच्या दुःखाला 'टाळी' द्यायला निमंत्रित म्हणून...
   
      -मधुसूदन नानिवडेकर 9404440276

 ही कविता नक्की वेळ काढुन वाचा...

अप्रतिम रचना...
...
...
परवा अचानक शाळेतला,
जुना बाक भेटला..
शरीर तुटकं पाय बारीक,
थोडा म्हाताराच वाटला...
"ओळखलसं का मला?",
विचारलं त्याने हसुन...
वेळ असेल तुला तर,
बोलुया थोडं बसुन...
गाडी पाहताचं आनंदला,
हलवली तुटकी मान...
"खुप मोठा झालासं रे,
पैसा कमावलासं छानं"
"ओळखल्यास का बघ ह्या,
माझ्यावरच्या रेघा...
भांडण करुन मिळवलेली,
दोन बोट जागा...
अजुनही भेटतात का रे,
ओक्या, मन्या, बंटी...?
टाळ्या देत करत असालं,
मनमोकळ्या गोष्टी...
डबा रोज खाता का रे,
एकमेकांचा चोरुन?
निसरड्या वाटा चालता का,
हाती हात धरुन..?
टचकन् डोळ्यात पाणी आलं,
कंठ आला भरुन...
मित्र सुटले, भेटी सरल्या,
सोबत गेली सरुन...
धावता धावता सुखामागे,
वळुन जेंव्हा पाह्यलं...
एकटाचं पुढे आलो मी,
आयुष्य मागे राह्यलं...
त्राण गेलं, आवेश संपला,
करावं तरी काय..?
कोरड पडली घशाला,
थरथरले तरणे पाय...
तेव्हढ्यात आला शेजारी,
अन् घेतलं मला कुशीत...
बस म्हणाला क्षणभर जवळ,
नक्की येशील खुशीत...
"अरे वेड्या पैश्यापाठी,
फिरतोस वणवण...
कधी तरी थांबुन बघ,
फिरवं मागे मन..."
मित्र सगळे जमवं पुन्हा,
जेव्हा येईल वीट...
वंगण लागतं रे चाकांना,
मग गाडी चालते नीट...
शाळेतल्या त्या सोबत्याचा,
खुप आधार वाटला...
परवा अचानक शाळेतला,
जुना बाक भेटला...
======================================

 Ek Malvani Prem Kavita

माझा तेच्यावरचा पिरेम
माका पहिलीतच उमागाला

पण हेकाच पिरेम म्हणतत

ह्या सातवीत गेल्यार समाजला

पांढरया निळ्या गणवेशात ता

लय भारी दिसायचा

लांबसडक केस सोडल्यार

"हेमामालिनी"भासायाचा

न इसारता कपाळावर ता

टिकली लावन यायचा

टिकलीसकट शाळेत ता

सगळ्यात सुंदर भासायचा

सायकल म्हणजे तेव्वा माका

BMW वाटायची

तेका बघून चालवताना

छाती भरून यायची

तेका चिंचे आवडतत असा

फक्त तेना म्हनायचा

कि मिया राना तुडवत जावन

चिंचे घेवन यायचा

चिंचे खाताना शहारलेला बघून

माका ता लय आवडायचा

चिंचेका मग बियासकट

मिया सुद्धा खायचा

खरा म्हणजे एसटी प्रवास

माझ्या जीवार यायचा

पण ता एसटीत असला कि

एसटी सकट आवडायचा

तेच्या साठी शूरपने

सीट अडवून द्यायचा

आणि आपण मात्र लोंबकळत

तेका बगत यायचा

खरा म्हणजे भजन माका

कधी नाय आवडायचा

तेच्या साठी मातुर मी

तेच्या घरात भजनाक जायचा

भजनभर सगळा सोडून तेका

शोधीत बसायचा

आणि आतल्या खोलयेत

अंधारात बसान तेना

माझ्यार हसायचा

करंजे वाटूक ताटा घेवक

पुढे पुढे जायचा

तेना सुद्धा निम्मित्त करून

ताटा देवक यायचा

हाताक हाताचो स्पर्श

हळूच करून घ्यायचा

आणि त्या स्पर्शानंतर

सगळा जग फिक्या वाटायचा

अचानक इलेलो पावस माका

देवासारखो भासायचो

तेच्यासाठी माझ्याजवळ

एक खोळ एक्स्ट्रा असायचो

पेंडका हाडूक तेच्या शेतात

मित्रान बरोबर जायाचा

तरवो लावूक मात्र ता

आमच्या मळ्यात यायचा

आवशीच्यान सांगतय मेला

स्वप्नात सुद्धा यायचा

स्वप्नात येवन ता माका

नदीवर घेवन जायचा

न्हाता न्हाता अचानक मग

खडबडून जाग्या व्हायचा

आवस तोंडार पाणी मारी होती

ह्या नंतर लक्षात यायचा

नाय तेना म्हटल्यान तरी

नाखूष नाय व्हायचा

लग्नात तेच्या पावशेर मारून

दणकावून नाचायाचा

खरच तेव्वा गावात असा प्रेम व्हायचा

*खणखणित उत्तर, संपूर्ण वाचा..* 


डाॕ.नरेन्द्र दाभोळकरांच्या खालील कवितेला डाॕ. सचिन चिंगरे यांनी दिलेल निर्भिड उत्तर जरुर वाचा.....

मुर्त्यांना पुजण्यापेक्षा, 
माणूसकिला पूजतो मी❗
काल्पनिक देवांना न मानता, 
फुले,शाहू,आंबेडकरांना वाचतो मी❗
छाती ठोकून सांगतोय, 
असत्य नाकारणारा नास्तिक आहे मी❗

पोथ्या,पुराणे वाचण्यापेक्षा 
शिवरायांना वाचतो मी❗
दगडासमोर त्या कशाला झुकू❓
जिजाई,सावित्री, रमाईपुढे नतमस्तक होतो मी❗
छाती ठोकून सांगतोय, 
असत्य नाकारणारा नास्तिक आहे मी❗

घामाचे पैसे दानपेटीत टाकून, 
भटांची घरे भरत नाही मी❗
तहानलेल्यांना पाणी, 
भूकेलेल्यांना अन्न देऊन, 
त्यांच्यातच देव शोधतो मी❗
छाती ठोकून सांगतोय, 
असत्य नाकारणारा नास्तिक आहे मी❗

हिंदू,मुस्लिम,सिख,ईसाई म्हणून जगण्यापेक्षा, 
माणूस म्हणून जगतो मी❗
धर्मातील पाखंडांना न जपता, 
माणूसपणालाच जपतो मी❗
छाती ठोकून सांगतोय, 
असत्य नाकारणारा नास्तिक आहे मी❗

कर्तुत्ववान माणसापेक्षा, 
दगडाला श्रेष्ठ समजत नाही मी❗
मंत्र,होमहवन,कर्मकांड यांना पायाखाली तुडवून, 
मनगटावर भरवसा ठेवतो मी❗
छाती ठोकून सांगतोय, 
असत्य नाकारणारा नास्तिक आहे मी❗

मांजर आडवी गेली म्हणून न थांबता, 
थेट माझ्या ध्येयाजवळ त्या पोहोचतो मी❗
अंधश्रद्धेला मातीत लोळवून, 
विज्ञानवाद स्विकारतो मी❗
छाती ठोकून सांगतोय, 
असत्य नाकारणारा नास्तिक आहे मी❗
👆
याला
👇
*डॉ. सचिन चिगंरे यांचे निर्भिड उत्तर* 

: दाभोळकर ही केवळ एक व्यक्ति नसून (केवळ हिन्दू) धर्म चिकित्सा करू पाहणारी, वरुन स्वतः ला नास्तिकही म्हणविणारी एक बेगडी प्रवृत्ति आहे असे मी मानतो .
दाभोळकरांच्या जादूटोणाविरोधी कार्याचा मी आदर करतो.परंतु फक्त हिन्दू धर्मपरंपरेवरील एकांगी टीकेचा निषेध करतो. माझी ऊत्स्फूर्त प्रामाणिक कविता या अप्रामाणिक ,हिंदुत्वद्वेष्टया, खोट्या धर्मनिरपेक्ष परंपरेवर परखड नर्भीड टीका करते. हे माझेही संविधानदत्त अभिव्यक्ति स्वातंत्र्य आहे.

हिंस्त्र धर्मांध कट्टरांना 
घाबरुन पळतो मी
शांत सहिष्णू हिंदूंनाच 
यथेच्छ शब्दांनी झोडतो मी
नी वर छाती ठोकून सांगतो
सत्य नाकारणारा बेगडी
सेक्युलर नास्तिक आहे मी

टीका करतो गणेशोत्सवावर 
मोहर्रम ताबूतला डरतो मी
बकरीदला मी शेळी होतो
होळीवर शूर टीका करतो मी
नी वर छाती ठोकून सांगतो
सत्य नाकारणारा बेगडी 
सेक्युलर नास्तिक आहे मी 

उपहास करतो तीर्थयात्रांचा 
हज बाबत चूप बसतो मी
आरतीने ध्वनिप्रदूषण म्हणतो
बांगेपुढे नतमस्तक होतो मी
नी वर छाती ठोकून सांगतो
सत्य नाकारणारा बेगडी
सेक्युलर नास्तिक आहे मी 

मंदिर, भट, दक्षिणा दिसते 
दर्गे ,पीर,चढावा दिसत नाही
जणू हिन्दू धर्मातच फक्त दोष
ईतरांत एकही असत नाही
नी वर छाती ठोकून सांगतो
सत्य नाकारणारा बेगडी
सेक्युलर नास्तिक आहे मी 

मी पुरोगामी दहशतवाद 
ही श्रद्धा ती अंधश्रद्धा ठरवतो
कावळा होत हर हिन्दूसणाला हटकून अपशकून करवतो
वर छाती ठोकून सांगतो
सत्य नाकारणारा बेगडी
सेक्युलर नास्तिक आहे मी

कुर्हाडीचा दांडा गोतास काळ 
अस्सा मी द्वाड आहे
क्रूर देशद्रोही धर्मांधांपुढे 
शेपूटघालू भ्याड आहे मी
नी वर छाती ठोकून सांगतो 
सत्य नाकारणारा बेगडी 
सेक्युलर नास्तिक आहे मी दाभोळकर तेव्हा तुम्ही गप्प का?....
देवाला फूल चढ़वलं जातं
तेव्हा तुम्ही रागवता!
*मग मेणबत्ती पेटवते वेळी,*
*चौथर्‍यावर चादर चढ़वते वेळी* 
तुम्ही गप्प्प का दाभोळकर......?

माझा गणपती घरी येतो
तेव्हा तुम्ही टिका करता!
*त्यांचा शांताक्लॉज येतो त्यावेळी,*
*त्यांचा मसीहा येतो त्यावेळी*
तुम्ही गप्प का दाभोळकर...?

माझ्या मुलांच जावळ उतरवणं
तुमच्या नजरेत जुनाट चालीरीत!
*त्यांचं मुल मेरीच्या मांडीवर देते वेळी*
*त्यांची सुंता होते त्यावेळी*
तुम्ही गप्प का दाभोळकर.......?

आमचे व्रत उपवास सण
तुम्हाला नकोसे होतात!
*पण त्यांचा रोजाच्या वेळी,*
*यांचा गुडफ्रायडे वेळी*
तुम्ही गप्प का दाभोळकर.......?

माझ्या शिक्षणात धर्माला जागा नाही
*त्यांचं मात्र धर्मावर शिक्षण बंधनकारक*
*ख्रिस्ती शाळेत येशु मूर्तीरूपानं हज़र,*
त्यावेळी तुम्ही गप्प का दाभोळकर......?

स्री शिक्षणातली हिंदू सावित्री
कधी तुम्ही समजूनच घेतली नाही...
*कारण मुस्लिम बुरख्यातुन,* *व पाश्चमात्य नग्नता* 
चांगली वाटली ना.... दाभोलकर....?

आमचे एकपत्नी राम व त्यांचं
कुटुंबनियोजन तुम्ही जगासमोर मांडलंच नाही...
*कारण एकाच पुरुषाच्या ४ बायका व त्याची २० पोर,* 
*तसेच दर सिजनला बायका बदलणारे पाश्चिमात्य. तुमच्या मनाला जास्त भावले का?........*
विचार करा दाभोळकर अन मग सांगा तेव्हा तुम्ही गप्प का?......

*माझी ती अंधश्रद्धा जगासमोर मांडलीत, मग इतरांची ती काय?*
*म्हणे सत्यशोधक*
कुराणातील काहीच असत्य नाही का?
अन् बायबलमध्ये तिथेही काहीच असत्य नाही?
*की सत्य शोधण्याचा व अपप्रचार करण्याचा छंद केवळ हिंदुत्वा पुरताच मर्यादीत ठेवणे तेवढे* सोयीस्कर वाटले का तुम्हाला दाभोळकर???
*अशा पाखंडीला कड्डक उत्तर दिलेय श्रीमान सचिन चिंगरेनी : वैचारीक मतभेदाना तसेच उत्तर* * *द्यायला पाहिजे . असे झणझणीत उत्तर दिलेय* *सचिनजीनी कि विचारु नये* .
*असेच निर्भीडपणे लिहिणारे हिंदुअभिमानी जागोजागी तयार झाले पाहिजेत तरच या* *तथाकथित फेक्युलर फुर्रोगाम्याना चाप बसेल नाहीतर कोणीही अलबत्या गलबत्या उठतो अन हिंदुंवर टपली मारुन जातो . या असल्या पाखंडीचे असेच वस्त्रहरण केलेच पाहिजे* .
अप्पा पाध्ये गोळवलकर;
गोळवली;कोंकण .
८७६७०७१७०५ 
🙏🏻🙏🏻🙏🏻

  १. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...