ही कविता नक्की वेळ काढुन वाचा...
अप्रतिम रचना...
...
...
परवा अचानक शाळेतला,
जुना बाक भेटला..
शरीर तुटकं पाय बारीक,
थोडा म्हाताराच वाटला...
"ओळखलसं का मला?",
विचारलं त्याने हसुन...
वेळ असेल तुला तर,
बोलुया थोडं बसुन...
गाडी पाहताचं आनंदला,
हलवली तुटकी मान...
"खुप मोठा झालासं रे,
पैसा कमावलासं छानं"
"ओळखल्यास का बघ ह्या,
माझ्यावरच्या रेघा...
भांडण करुन मिळवलेली,
दोन बोट जागा...
अजुनही भेटतात का रे,
ओक्या, मन्या, बंटी...?
टाळ्या देत करत असालं,
मनमोकळ्या गोष्टी...
डबा रोज खाता का रे,
एकमेकांचा चोरुन?
निसरड्या वाटा चालता का,
हाती हात धरुन..?
टचकन् डोळ्यात पाणी आलं,
कंठ आला भरुन...
मित्र सुटले, भेटी सरल्या,
सोबत गेली सरुन...
धावता धावता सुखामागे,
वळुन जेंव्हा पाह्यलं...
एकटाचं पुढे आलो मी,
आयुष्य मागे राह्यलं...
त्राण गेलं, आवेश संपला,
करावं तरी काय..?
कोरड पडली घशाला,
थरथरले तरणे पाय...
तेव्हढ्यात आला शेजारी,
अन् घेतलं मला कुशीत...
बस म्हणाला क्षणभर जवळ,
नक्की येशील खुशीत...
"अरे वेड्या पैश्यापाठी,
फिरतोस वणवण...
कधी तरी थांबुन बघ,
फिरवं मागे मन..."
मित्र सगळे जमवं पुन्हा,
जेव्हा येईल वीट...
वंगण लागतं रे चाकांना,
मग गाडी चालते नीट...
शाळेतल्या त्या सोबत्याचा,
खुप आधार वाटला...
परवा अचानक शाळेतला,
जुना बाक भेटला...
======================================
Ek Malvani Prem Kavita
माझा तेच्यावरचा पिरेम
माका पहिलीतच उमागाला
पण हेकाच पिरेम म्हणतत
ह्या सातवीत गेल्यार समाजला
पांढरया निळ्या गणवेशात ता
लय भारी दिसायचा
लांबसडक केस सोडल्यार
"हेमामालिनी"भासायाचा
न इसारता कपाळावर ता
टिकली लावन यायचा
टिकलीसकट शाळेत ता
सगळ्यात सुंदर भासायचा
सायकल म्हणजे तेव्वा माका
BMW वाटायची
तेका बघून चालवताना
छाती भरून यायची
तेका चिंचे आवडतत असा
फक्त तेना म्हनायचा
कि मिया राना तुडवत जावन
चिंचे घेवन यायचा
चिंचे खाताना शहारलेला बघून
माका ता लय आवडायचा
चिंचेका मग बियासकट
मिया सुद्धा खायचा
खरा म्हणजे एसटी प्रवास
माझ्या जीवार यायचा
पण ता एसटीत असला कि
एसटी सकट आवडायचा
तेच्या साठी शूरपने
सीट अडवून द्यायचा
आणि आपण मात्र लोंबकळत
तेका बगत यायचा
खरा म्हणजे भजन माका
कधी नाय आवडायचा
तेच्या साठी मातुर मी
तेच्या घरात भजनाक जायचा
भजनभर सगळा सोडून तेका
शोधीत बसायचा
आणि आतल्या खोलयेत
अंधारात बसान तेना
माझ्यार हसायचा
करंजे वाटूक ताटा घेवक
पुढे पुढे जायचा
तेना सुद्धा निम्मित्त करून
ताटा देवक यायचा
हाताक हाताचो स्पर्श
हळूच करून घ्यायचा
आणि त्या स्पर्शानंतर
सगळा जग फिक्या वाटायचा
अचानक इलेलो पावस माका
देवासारखो भासायचो
तेच्यासाठी माझ्याजवळ
एक खोळ एक्स्ट्रा असायचो
पेंडका हाडूक तेच्या शेतात
मित्रान बरोबर जायाचा
तरवो लावूक मात्र ता
आमच्या मळ्यात यायचा
आवशीच्यान सांगतय मेला
स्वप्नात सुद्धा यायचा
स्वप्नात येवन ता माका
नदीवर घेवन जायचा
न्हाता न्हाता अचानक मग
खडबडून जाग्या व्हायचा
आवस तोंडार पाणी मारी होती
ह्या नंतर लक्षात यायचा
नाय तेना म्हटल्यान तरी
नाखूष नाय व्हायचा
लग्नात तेच्या पावशेर मारून
दणकावून नाचायाचा
खरच तेव्वा गावात असा प्रेम व्हायचा
No comments:
Post a Comment