*ॲन्टीबाॅडी*
————
जिवाभावाच्या मित्राला
करू तर द्या खोडी
लेकरांसंगे पाण्यात
सोडा कागदाची होडी
बघा कशा पटकन
तयार होतोत ॲन्टीबाॅडी
रूसलेल्या बायकोला
जरा लावा लाडीगोडी
फुलांचा गजरा आणा
आणा आवडीची साडी
बघा कशा पटकन
तयार होतात ॲन्टीबाॅडी
थकलेले आईबाबा
त्यांची सेवा करा थोडी
गमतीदार किस्से वाचा
सोडवून पहा शब्दकोडी
बघा कशा पटकन
तयार होतात ॲन्टीबाॅडी
लिंबू आणी कैरीच्या
चाखुन बघा आंबट फोडी
छोट्या छोट्या गोष्टीत
जेव्हा सापडते आनंदाची नाडी
बघा कशा पटकन
तयार होतात ॲन्टीबाॅडी
ध्यान,प्राणायाम योगा करा
जरा कमी करी जाडी
कुणाच्या तरी आधाराची
जेव्हा व्हाल तुम्ही काडी
बघा कशा पटकन
तयार होतात ॲन्टीबाॅडी
चूकभूल माफ करा
मनात ठेऊ नका अढी
काळजात जिव्हाळ्याची
आता ऊभारा ना गुढी
बघा कशा पटकन
तयार होतात ॲन्टीबाॅडी
घसरलेली नक्कीच
रूळावर येईल गाडी
आजाराच्या आरोग्यावर
पडणार नाहीत धाडी
बघा कशा पटकन
तयार होतात ॲन्टीबाॅडी।
===========================================
जेवणात ही कढी अशीच राहू दे
खिचडीच्या ढिगावरी निवांत ओतू दे
जेवणात ही कढी अशीच राहू दे !
पापड मी तेलावर मस्त तळले
आवडती तुज म्हणोन काही भाजले
उडदातील गोडवा जिभेस लाभू दे
जेवणात ही कढी अशीच राहू दे !
हळूच तुला गिळण्याचा छंद आगळा
भुकेचा त्याविण का अर्थ वेगळा
घोटातून आल्याचा गंध येऊ दे
जेवणात ही कढी अशीच राहू दे !
पिऊ दे असेच तुला नित्य जेवता
वाटी भर अजून एक .. काय थांबता
कढी खिचडी बेत सर्व-मान्य होऊ दे
जेवणात ही कढी अशीच राहू दे !



=====================================
मी ओळखून आहे सारे तुझे बहाणे एक विडंबन* 

भाजून सोलणे अन्
निवडून ते पहाणे
मी ओळखून आहे
कुठल्या डब्यात दाणे ॥धृ॥
जाता घरातूनी तू
घेईन एक वाटी
खाईन मस्त दाणे
येईल मौज मोठी
हे स्वप्न जीवघेणे
भरतो सुखे बकाणे ॥१॥
मी ओळखून आहे कुठल्या डब्यात दाणे...
हाती डबा जयाच्या
त्याला कसे कळावे
पोटात भूक ज्याच्या
त्यालाच दु:ख ठावे
लपवून लाख ठेवा
शोधू आम्ही दिवाणे ॥२॥
मी ओळखून आहे कुठल्या डब्यात दाणे...
पोटास वेदनांचा
का सांग त्रास व्हावा ?
इतका चविष्ट खाऊ
का औषधी नसावा ?
येवो कळा कितीही
सोडू अाम्ही न खाणे ॥३॥
मी ओळखून आहे कुठल्या डब्यात दाणे...



कवी माहीत नाही.
=======================================
ही कविता म्हणजे ......*
*एखाद्या व्यक्तीस ढेरी का सुटते ?*
*यावर केलेले चिंतन आहे !* 


*केवळ गंमत म्हणून..*
*या कवितेकडे पहावे !*



------------
*नवऱ्याची ढेरी वाढण्यात*
*बायकोचाच असतो हात*
*तीच म्हणते थोडाच उरलाय*
*घेऊन टाका भात* 



*पिठलं उरो , पोळी उरो*
*बायकोच आग्रह करते*
*पुरणाच्या पोळीवर*
*तुपाची धार धरते* 

*बोन्ड वाढते , भजे वाढते*
*मस्त भाज्या करते*
*दोन्ही वेळेस यांचे पोट*
*तडसावणी भरते* 

*अन्न पूर्णब्रह्म म्हणून*
*तो ही खात राहतो*
*बायकोचं मन मोडत नाही*
*म्हणून जाड होतो* 

*ज्याची बायको सुगरण असते*
*त्यालाच ढेरी येते*
*लोकं उगीच नावं ठेवतात*
*लक्ष द्यायचे नसते ?* 

*साधी फोडणी दिली तरी*
*खमंग स्वयंपाक होतो*
*त्याच बाईच्या नशिबात*
*ढेरीवाला असतो*

*जिथं जाईल तिथं लोकं*
*आग्रह करत राहतात*
*स्वभाव , हुशारी सोडून*
*ढेरी कडेच पाहतात* 

*बरेचजण सल्ला देतात*
*थोडा व्यायाम करत जा*
*सकाळी उठून थोडं तरी*
*ग्राऊंडवर पळत जा* 



*योगासनं , प्राणायाम*
*का करत नाही ?*
*पहाटे उठून डोंगरावर*
*का चढत नाही ?* 

*ते जरी बोलले तरी*
*कशाला लक्ष द्यायचं*
*एक वाटी संपली की*
*दुसरं आईस्क्रीम घ्यायचं* 

*लोकांच्या भरीस पडून*
*काहीच करायचं नाही*
*उगीचच डायटिंग करून*
*मरकुडं व्हायचं नाही* 

*व्यायाम करा व्यायाम करा*
*ते म्हणतच असतात*
*कोण म्हणतं जाड माणसं*
*हँडसम दिसत नसतात* 



*माकड हाड मोडल्यावर*
*कोण मदतीस येतो?*
*म्हणून मी पळत नाही*
*घरीच लोळत असतो* 

*फुकटचे सल्ले द्यायला*
*लोकांचं काय जातं*
*आमची ढेरी पाहून त्यांच्या*
*पोटात दुखत राहतं* 



*वा वा छान म्हणून*
*जो जेवत असतो*
*खरं सांगतो त्याचाच पोटाचा*
*घेर वाढत असतो* 

*कोण्याही ऐऱ्यागैऱ्याला*
*ढेरी सुटत नसते*
*ढेरीसाठी भगवंताची*
*कृपा लागत असते* 

*समाधानी माणसालाच*
*सुटत असते ढेरी*
*सुखाचे , आनंदाचे*
*प्रतीक असते ढेरी* 



*प्रा.विजय पोहनेरकर*
*औरंगाबाद , 17/7/2021.*
No comments:
Post a Comment