Wednesday, July 27, 2022

दत्तबावनी

 *🙏संस्कारदीप स्तोत्र मालिका🙏*


🌹दत्तबावनी🌹

जय योगीश्वर दत्त दयाळ II तूच एक जगती प्रतिपाळ II
अत्रनुसये करूनि निमित्त II प्रगटसि जगतास्तव निश्चित ॥
ब्रम्हाSच्युत शंकर अवतार ॥ शरणांगतासि तू आधार ॥
अंतर्यामी ब्रम्ह स्वरूप ॥ बाह्य गुरू नररूप सुरूप ॥
काखिं अन्नपूर्णा झोळी ।। शांति कमंडलु करकमळी ॥
कुठे षड्भुजा कोठें चार ॥ अनंत बाहू तू निर्धार ॥
आलो चरणी बाळ अजाण ॥ दिगंबरा ,उठ जाई प्राण ॥
ऐकुनि अर्जुन- भक्ती- साद ॥ प्रसन्न झाला तू साक्षात ॥
दिधली ऋद्धि सिद्धी अपार ॥ अंती मोक्ष महापद सार ॥
केला का तू आज विलंब ॥ तुजविण मजला ना आलंब ॥
विष्णुशर्म द्विज तारूनिया ॥ श्राद्धिं जेविला प्रेममया ॥
जंभे देवा त्रासविले ॥ कृपामृते त्वा हांसविले ॥
पसरी माया दितिसुत मूर्त ॥ इंद्रा करवी वधिला तूर्त ॥
ऐसी लीला जी जी शर्व ॥ केली ,वर्णील कैसी सर्व ॥
घेई आयु सुतार्थी नाम ॥ केला त्याते तू निष्काम ॥
बोधियले यदु परशुराम ॥ साध्य देव प्रल्हाद अकाम ॥
ऐसी ही तव कृपा अगाध ॥ कां न ऐकशी माझी साद ? ॥
धांव अनंता पाही न अंत ॥ न करी मध्येच शिशुचा अंत ॥
पाहुनि द्विज पत्नीकृत स्नेह ॥ झाला सुत तू नि:संदेह ॥
स्मर्तृगामी कलितार कृपाळ ॥ जडमुढ रजका तारी दयाळ ॥
पोटशुळी द्विज तारियला ॥ ब्राम्हण श्रेष्ठी उद्धरिला ॥
सहाय का ना दे अजरा ? ॥ प्रसन्न नयने देख जरा ॥
वृक्ष शुष्क तू पल्लविला ॥ उदास मजविषयी झाला ॥
वंध्या स्त्रीची सुत स्वप्ने ॥ फळली झाली गृहरत्ने ॥
निरसुनी विप्रतनूचे कोड ॥ पुरवी त्याच्या मनिंचे कोड ॥
दोहविली वंध्या महिषी ॥ ब्राम्हण दारिद्र्या हरिसी ॥
घेवडा भक्षुनि प्रसन्न क्षेम ॥ दिधला सुवर्ण घट सप्रेम ॥
ब्राम्हण स्त्रीचा मृत भ्रतार ॥ केला सजीव , तू आधार ॥
पिशाच्च पिडा केली दूर ॥ विप्रपुत्र उठविला शूर ॥
अंत्यज हस्ते विप्रमदास ॥ हरूनी रक्षिले त्रिविक्रमास ॥
तंतुक भक्ता क्षणांत एक ॥ दर्शन दिधले शैली नेक ॥
एकच वेळी अष्टस्वरूप ॥ झाला अससी , पुन्हा अरूप ॥
तोषविले निज भक्त सुजात ॥ दाखवुनि प्रचिती साक्षात ॥
हरला यवन नृपाचा कोड ॥ समता ममता तुजला गोड ॥
राम-कन्हैया रूपधरा ॥ केल्या लीला दिगंबरा ॥
शिला तारिल्या , गणिका , व्याध ॥ पशुपक्षी तुज देती साद ॥
अधमा तारक तव शुभ नाम ॥ गाता किती न होती काम ॥
आधि -व्याधि -उपाधि -गर्व ॥ टळती भावे भजता सर्व ॥
मूठ मंत्र नच लागे जाण ॥ पावे नर स्मरणे निर्वाण ॥
डाकिण ,शाकिण , महिषासूर ॥ भूतें ,पिशाच्चे ,झिंद असूर ॥
पळती मुष्टी आवळुनी ॥ धून -प्रार्थना -परिसोनी ॥
करूनि धूप गाइल नेमे ॥ दत्तबावनी जो प्रेमे ॥
साधे त्याला इह परलोक ॥ मनी तयाच्या उरे न शोक ॥
राहिल सिद्धी दासीपरी ॥ दैन्य आपदा पळत दुरी ॥
नेमे बावन गुरूवारी ॥ प्रेंमे बावन पाठ करी ॥
यथावकाशे स्मरी सुधी ॥ यम न दंडे त्यास कधी ॥
अनेक रूपी हाच अभंग ॥ भजता नडे न मायारंग ॥
सहस्र नामे वेष अनेक ॥ दत्त दिगंबर अंती एक ॥
वंदन तुजला वारंवार ॥ वेद श्वास हें तव निर्धार ॥
थकला वर्णन करतां शेष ॥ कोण रंक मी बहुकृत वेष ॥
अनुभवतृप्तीचे उद्गार ॥ ऐकुनी हंसता खाइल मार ॥
तपसि तत्वमसी हा देव ॥ बोला जयजय श्री गुरूदेव ॥
।। श्री गुरूदेव दत्त ॥

 🛕🌴🌸🐚🕉🐚🌸🌴🛕


*अधिकमास [१४]*

 *मुख्य मंदिरे विष्ष्णु अवताराची*

भारतभर विष्णुरुपातली अनेक महत्तम मंदिरे आहेत ..ज्याचें दर्शनास गेल्यास वैष्णव तर होतातच बिगर वैष्णव देखिल आंनदी होतात..

*१] विठ्ठल मंदीर.पंढरपूर महाराष्ट्र*

विष्णुच्या *चोवीसाहुन आगळा*
असलेल्या रुपाचे मंदिर महाराष्ट्री परम वैभवात नांदत आहे...चंद्रभागा नदीच्या काठी..वेगवेगळ्या संत मंहतानी..प्रेमाने या दैवताचा उल्लेख केलाय साहित्यात..विठ्ठल व रुक्माई.

*विठ्ठल वारी* हे वेगळे वैशिष्ट्य इथले..

*२] बद्रिनाथ मंदिर.चमोली..उत्तराखंड*

चार धाम पैकी महत्वाचे ..अलकनंदा किनारी..केदारनाथ सोबत ब्रदिनाथ अवश्य केलेच जाते.
..विष्णुंची लक्ष्मीसह शिवआराधना केलेली तपस्थली

*३] द्वारकाधीश ..द्वारका.गुजरात*

चारधाम पैकी एक..महाभारत कालीन नगर..गोमती नदी किनारी..श्रीकृष्णाच्या पणतु वज्रनाभाने बांधले इथे पहिल्यांदा मंदिर..ही मुळ श्रीकृष्ण राजवाड्याची जागा..द्वारिका व बेटद्वारका हे दोन भाग.

विशेष म्हणजे *श्रीकृष्णाने वसवलेली ही नगरी*

*३] रंगनाथस्वामी.श्रीरंगम..तामिलनाडू*

चार धामापैकी एक..रामेश्वरम जवळचे..मोठ्या गोपुरानीं बनलेले हे सुंदर मंदिर ...श्रीरामाने इथे पुजन केल्याचे संदर्भ आहे...गौतम ऋषिनीं ब्रह्मदेवाकडुन ह्या मंदिराची प्रथम निर्मिती...

*४] पद्मनाभस्वामी..तिरुअनंतपुरम..केरळ*

शेषनागावर शयनमुद्रेत भगवंत..मुर्तीच तीन दरवाजांनी दर्शन घ्यावे लागते..प्रचंड अवाढव्य मुर्ती.

विशेष ..अंत्यत श्रीमंत मंदिर ...विभिन्न खजाने व त्याच्या कथा सर्वश्रुत.


*५ ]जगन्नाथ..पुरी..ओरिसा*
चार धामात हे ही येते..असंख्य अदभुत् कथा दतंकथाच वर्तुळ ह्या मंदिराभोवती रेखित आहे..मराठ्यांनी.रघुजी दुसरा ह्यांनी इथे कोर्णाक सुंर्यमःदिराचा अरुणस्तंभ काढुन स्थापित.[वेगळा लेख त्यावर पुढे]

विशेष इथली रथयात्रा जी आषाढ द्वितेयेस दरवर्षी निघते.

*६ ]तिरुपति..तिरुमला..आंध्रप्रदेश*

सप्तगिरी पहाडी वर बासलेला देव,.आधी इथे जाणे कष्टप्रद समजले जाई..आता मात्र वळणदार घाटररस्ते झालेले.

विशेष..पैसे ,धन देणारा देव अशी ख्याती ..सर्वात जास्त पैसे भक्तांकडुन मिळवणारा देव

*७] बांके बिहारी..वृंदावन,उत्तर प्रदेश*

बांकेबिहारीचे मंदिर हिंदी सायडर लोकात खुप महत्वाचे.

विशेष..जन्माष्टमी स निघणारी *झुलनयात्रा..* व अक्षयतृतीयेची सजावट

*८] कनकभवन.अयोध्या.उत्तरप्रदेश*

श्रीरामजन्मभुमी..कौशल्या च्या पोटी श्रीरामाचा जन्म .गर्भगृह हे त्याच ठिकाणी बांधलेले.

विशेष ..नुक्तेच भव्य श्रीराममंदिराची *वास्तुपुजा, झालेलीय ..मुहुर्तमेढ रोवलेली*

*९] श्री नाथ..नाथद्वारा..उत्तरप्रदेश*

बालकृष्णास समर्पित,हे मंदिर..इथे दररोजच जत्रेसम गर्दी..मुर्ती भाssरी च जुनीय..प्राचीन...नाथजी ची पुजा सुशोभनीय आशी.

*१०] सिंहाचलम मंदिर.विशाखापट्टणम आध्रंप्रदेश*

नृसिंह अवताराचे जन्मस्थान म्हणुन मंदिरास मान्यता..अक्षयतृतीयेस जत्रा भरते..तशी अनेक नृसिंह मंदिरे दक्षिणेस..

*११] अंनतवासुदेवमंदिर.भुवनेश्वर .उडिसा*

शिवाचे लिंगराज मंदिर वा ह्या मंदिराचे शैव वैष्णंवास महत्व,...इथे श्रीकृष्ण सुभद्रा बलराम मुर्ती..पुरीसारखेच मंदिर 

विशेष..पुर्णाकृती मुर्तींची पुजा.

*१२] अंकोरवाट..यशोधरापुर..कंबोडिया.*

जगातले सर्वात मोठे मंदिर..सर्वात मोठ्ठ विष्णु मंदीर.हे दोन्हीही सन्मान..जे खंडहरात मिळाले..वेळोवेळी सोमनाथसम लुटल्या गेलेले.

विशेष..दुसऱ्या देशात स्थित...रामायण अंकित केलेले.शिलापट्टांवर.

*१३] विराट रामायण मंदिर.जानकीपुर.बिहार*.

अंकोरवाट मंदिरापेक्षा मोठ्ठे असे हे मंदिर आकारास येत आहे...

विशेष..ह्याच नाव देखिल .विराट अंकोरवाट मंदिर अस ठेवलेलेय..तर कंबोडियन सरकारने नावाचा अग्रहक्क राखत नाव भारत सरकारला बदलवायला लावले.

*तुच मुळ व्यंकटेश असत*
*नाना रुपात सर्वत्र वसत*

*कुठे लक्ष्मीमांसह नांदत*
*कधी एकल भक्तां दिसत*

*कधी गजबजले मंदिरात*
*कधी एकटा शांत निवांत*,

*सदा आर्शीवादवरदहस्त*
*अपत्यांस अपंरपार देत*

*दशागुंळे व्यापुनही उरत*
*तुज मधु सदैव कौतुकत*
-मधु- 

विष्णुचे दशावतार..चोवीस अवतार पैकी,.कुठे एकल कुठे पत्नीसह..कुठे नांदती तर... कुठे उध्वस्त असल्याने पुजा न होणारी..काही प्रसिद्धसे ..तर काही अप्रसिद्ध,.काही वर्दळ गर्दीची..काही विरळ जन दर्शनास येणारी..असे प्रकार 

ठळक नावे इथे घेतलेली..ह्याशिवाय देखिल देशभर विष्णु मंदिरे असंख्य विखुरलेली..

*रामेश्वरम शुद्ध स्नान*
*ब्रदिनाथ धरी ध्यान*

*पुरीमधे घेई भोजन*
*द्वारकेस करी शयन*

*विष्णुस मधुचे नमन*
*देई रे चरणधुलीकंण*
-मधु-

*अधिकमास [१४]*
*माधुरी ब्रह्मे-देशपांडे* 
*अधिक कृष्ण द्वितिया*


🛕🌴🌸🐚🕉🐚🌸🌴🛕

देशील उत्तर..

 *थेट पंकज कोटलवारच्या लेखणीतुन - देशील उत्तर..*

मी अमावस्येचा चंद्र
नेहमी कुठेतरी लपलेला
तु पौर्णिमेचं चांदणं,
लखलख प्रकाश खुललेला
तु आयुष्याचं रंगीत गाणं
अन सुरेल स्वरांची मैफिल
मी फक्त आसुसलेला श्रोता
स्तब्ध, निःशब्द अन सदा गाफील

तु गुलाब, तु रातराणी
तु फुलांची भरलेली ओंजळ
तु शांत भरलेला जलाशय अन
मी त्यात उमललेलं कमळ...

तु आठवणींचा शिडकाव,
रणरणत्या उन्हात
मी फुटलेला बांध
भावनांच्या पुरात

तु सौंदर्याला पडलेलं निरागस स्वप्न,
जागं झालं की ते विसरुन जायचं असतं,
तु पावसाची अवचित सर...
म्हणती, अरे वेड्या, असं घसरुन जायचं नसतं...
आठवतं, आपण भातुकलीचा डाव मांडला होता,
तु वाढताना माझ्यावर भात सांडला होता,
तेव्हा क्षुल्लक कारणावरुन मी खोटंखोटं घरच मोडलं होतं,
लुटीपुटीच्या खेळात आपलं खरं नातंच तोडलं होतं,
तु खोटेखोटे चित्र, अन त्यात मी माझ्या
कल्पनांचे जीवंत रंग भरलेले..
तु मृगजळ आणि भ्रम, हे माहीत असुन सुद्धा,
तुझे शिल्प मीच माझ्या मनावर कोरलेले...
तु अभिनय करतेस छान,
तुझ्या दोन भुमिका..
कोणती खरी तु?
पत्नी कि प्रेमिका?..


--------------------------------------------------------------------------------------
थेट पंकज कोटलवारच्या लेखणीतुन – हाताखालच्या माणसांना कसं हाताळु?
---------------------------------------------------------------------------------------
मी एका कंपनीमध्ये सुपरव्हायझर आहे, माझ्या हाताखाली एक माणुस आहे कामाला, वयाने आणि एक्सपिरीअन्स ने माझ्यापेक्षा मोठा आहे,
पण म्हणुन की काय, पण तो मी सांगितलेले कुठलेच काम ऐकतच नाही,
आणि तेच काम जर साहेबांनी सांगितले तर तत्परतेने करतो,
साहेबांचं आणि त्यांचं खुप जमतं,
दोघे मिळुन मला त्रास पण देतात,
मार्गदर्शन करावे,
----------------------------------------------------------------------------------------------
ऑफीस असो वा फिल्डवर्क, नौकरी असो वा व्यवसाय,
अंगमेहनतीची काम करणारे लेबर्स असो किंवा घराघरात काम करणार्‍या कामवाल्या,
हाताखालची माणसं काम ऐकत नाहीत, ही तुम्ही सांगितलेली समस्या आजकाल सगळीकडे बघायला भेटते.
आजकाल शारिरीक श्रम कोणालाच नकोच वाटतात,
अगदी आपल्यालाही एका लेव्हल नंतर कितीही महत्वाचं असलं तरी काम करायचा कंटाळा येतोच,
आणि अशा आळशीपणाला ऑफीस पॉलिटीक्सची फोडणी भेटली मग तर काय?
आधीच मर्कट त्यात मद्य प्याला,
अशी लोकं आपल्याला उपद्र्व द्यायला लागतात,
आपल्याला मदत करण्यासाठी असलेली लोकंच कशी आपल्याला सळो की पळो करुन सोडतात,
हे मी खुप जवळुन बघितलेलं आहे, अनुभवलेलं आहे आणि त्यातल्या काही लोकांना यशस्वीपणे हाताळलेलं आहे.
खरं तर उद्ध्ट, उर्मट आणि आपल्याच दयेवर जगुन आपल्यालाच न जुमानणार्‍या लोकांना आपल्यापासुन चार हात दुर ठेवलं पाहीजे,
बेभरवशाची आणि दगाबाज माणसं कितीही टॅंलंटेड असली तरी मनःशांती हिरावुन घेतात, ज्या लोकांमुळे आपण पुन्हा पुन्हा गोत्यात येतो, आणि तोंडावर आपटतो, अशा लोकांवर कधीही डिपेंड राहु नये, अशा माणसांना आपल्या आतल्या वर्तुळात कधीही प्रवेश देऊच नये,
पण तुम्ही सध्या ऑफीसमध्ये काम करत असल्यामुळे हा पर्याय तुम्हाला उपलब्ध नाही, तेव्हा तुम्हाला त्या व्यक्तीला टाळता येणे शक्य नाही, अशा वेळी इतर काय काय उपाय करता येतील, ते पाहुया!
----------------------------------------------------------------------------------------------------------------
१) मैत्री करा. –
दिवसभर सोबत राहुन एकमेकांचा द्वेष करण्यापेक्षा, आपल्या सहकार्‍यांशी हलकंफुलकं नात जोडणं हेच अधिक शहाणपणाचं लक्षण आहे.
जो जसा आहे, ज्याचा सहवास टाळता येण्यासारखा नाही, त्याला मनाने स्वीकारलं की आपोआपच मनावरचा ताण हलका होतो.
‘हा असाच वागणार’ हे आधीच गृहित धरल्यामुळे आता त्याने केलेल्या काड्यांमुळे मनःशांती भंग होत नाही.
अशा लोकांना वश करण्यासाठी अधुन मधुन त्याला थोडं चढवलं पाहिजे, थोडी त्याची तारीफ केली पाहीजे.
त्याच्या सुखादुःखात सहभागी झालं पाहीजे.
त्याला काहीतरी भेट द्या, त्याचा बर्थडे सेलिब्रेट करा, काही करुन त्याला बोलतं करा, जमल्यास त्याच्या घरी जा,
दमदाटी करुन संबंध बिघडवण्यापेक्षा प्रेम करुन जिंकणं, कधीही चांगलचं!
त्याच्याबद्द्ल आपलं जुनं मत बदलत आहे, ही जाणीव त्याला व्हायला हवी, म्हणजे आपोआपच त्याचे उपद्रव कमी होतील.
--------------------------------------------------------------------------------------------------------
२. अनप्रेडीक्टेबल बना. –
पण सर, काही काही लोकांना प्रेमाची भाषा कळतच नाही, बोट दिलं की डोक्यावर बसतात, खलबत्ता काढुन मिरे वाटतात,
अशा वेळी त्याला धक्काशास्त्राचा वापर करा.
रोज छान बोलायचं आणि एके दिवशी उगीच फटकुन वागायचं,
त्याच्या मनात आपल्याविषयी जरब बसेल अशी कोणतीही कृती करा.
त्या व्यक्तीचा संपुर्ण अभ्यास करा, त्याच्या स्ट्रेन्ग्थ, त्याच्या विकनेस ह्याविषयी संपुर्ण माहिती गोळा करा.
प्रत्येक माणसात काहीनाकाही दोष असतोच.
तो कधी चुकला की तात्काळ त्याची चुक त्याला लक्षात आणुन द्या,
त्याला सांगा, ही चुक लहान नाही, पण जाऊ दे, पुढच्या वेळी असे करु नको,
त्याला दाखवुन द्या, की तुम्ही किती मोठ्या मनाने त्याचे अपराध पोटात घालत आहात.
कोणीही माणुस आपल्याला तेव्हाच गृहित धरु लागतो, जेव्हा तो आपली सगळी पोथी ओळखुन घेतो,
‘झाकली मुठ सव्वा लाखाची’ हे तत्व कुठेही कामाला येते.
समोरचा माणुस बघुन व्यवहार ठरवा.
मतलबी आणि चलाख लोकांशी संपर्क आल्यास, तुमचं खरं रुप, तुमचे कच्चे दुवे कोणालाच कळता कामा नये. नाहीतर तुमचा खेळ खल्लास!
कधी उगीचच त्याच्याशी मैत्रीपुर्ण संवाद करा, कधी उगीचच चेहर्‍यावर कठोर भाव ठेवुन त्याला गोंधळात पाडा.
--------------------------------------------------------------------------------------------------------
३. माणसं वाचा. त्यांची दुखरी नस शोधा. –
व्यवहारात यशस्वी व्हायचं असेल तर काही क्षणात माणसं वाचता आली पाहीजेत.
नेमकं काय बोललं म्हणजे एखादा माणुस आपल्याशी मैत्रीपुर्वक आणि सौहार्दाने वागु लागेल, हे गणित ज्याला जमलं तो खरा व्यवहार कुशल!
बॉसला जिंकण्यासाठी आपल्याला नेमुन दिलेलं काम चोख पार पाडा.
एक्स्ट्रा एफर्टस घ्यावे लागले तरी चालतील पण प्रत्येक वेळी दिलेल्या जबाबदारीपेक्षा काकणभर सरस कामगिरी करा.
जेव्हा तो आपल्यावर खुश असेल, जेव्हा आपलं नौकरीतलं स्थान भक्कम असेल तेव्हा, जवळीक साधण्याचे जाणीवपुर्वक प्रयत्न करा.
बॉसच्या मागे भक्कम पणे उभे रहा, छोट्या छोट्या घटनांमध्ये त्याला तुमचा आधार वाटला पाहिजे.
त्याने न सांगताही, काही कामं करा.
स्तुती हे एक असं आयुध आहे, जे एकही रुपया खर्च न करता माणसांना आपल्या बाजुने वळवण्यात यशस्वी ठरतं.
कधी डायरेक्ट कधी इनडायरेक्ट, पण नेहमी, ज्यांना ज्यांना आपल्या बाजुने वळवायचे आहे अशा प्रत्येक व्यक्तीची तोंड भरुन प्रामाणिक स्तुती करा.
ऑफीसमध्ये किंवा ऑफीसबाहेर ज्यांचा बॉसशी मैत्रीपुर्ण व्यवहार आहे, अशा लोकांसोबत एकदम बोलुन गेल्यासारखं, अगदी सहज म्हणुन छोट्यामोठ्या कारणासाठी बॉसची तारीफ करा,
तुमची तारीफ, तुमच्या भावना बॉसपर्यंत पोहचवतील अशीच माणसं निवडा.
बॉसवर कधीही उघड टिका करु नका, मिटींगमध्ये अप्रिय विषय टाळा.
फेसबुक, आणि व्हॉटसएप स्टेटस ला आवर्जुन कौतुक करा.
बॉसचे आपण निष्ठावान आहोत, असे चित्र उभे करा.
जेव्हा केव्हा बॉससोबत चहापाणी, नाष्टा, जेवण किंवा प्रवास करण्याची संधी मिळेल, त्यातली एकही संधी सोडु नका. साखरपेरणी करत रहा.
-----------------------------------------------------------------------------
४. इर्रेप्लेसेबल बना. –
तुमच्या कंपनीतील, तुमच्या ऑफीसमधील सर्वात महत्वाची व्यक्ती बनण्याची तुमची क्षमता आहे का?
इतका गजब परफॉर्मन्स द्या, की तुमच्याशिवाय कंपनी चालणे अशक्य होवुन बसावे.
तुम्हाला हर्ट करणे, किंवा तुमचा ऑफीस सोडुन जायचा विचार कोणालाही परवडु नये, असे एक स्वतःचे एक भक्कम स्थान तयार करा.
------------------------------------------------------------------------------------------------
४. अधुन मधुन शॉक थेरपीही वापरा. -
एकदा वर भक्कम स्थान निर्माण झालं की मग हाताखालच्या माणसाची कामात हलगर्जीपणा केल्याबद्द्ल जाहीर कानउघडणी करा.
त्याच्या मनात तुमची जरब आणि दरारा असेल तरच तो तुम्हाला भाव देईल.
‘माणुस मनाने खुप चांगला आहे, फक्त शिस्तप्रिय आहे’, असे त्याने चारचौघात आपल्याबद्द्ल बोलले पाहीजे,
-----------------------------------------------------------------------------------------------------------------
आजच्या जगात काम करणार्‍यापेक्षा काम करवुन घेणारा अधिक वेगाने श्रीमंत होतो आहे,
मॅनेजमेंट स्किल्सशिवाय कोणीही प्रचंड प्रगती करु शकणार नाही, हेच सत्य आहे.
इतरांकडुन काम करवुन घेण्यासाठी कधी प्रोत्साहन कामी येतं,
कधी एवॉर्डस आणि शाबासकी द्यावी लागते,
कधी शिस्तीचा चाबुक काढावा लागतो,
आणि कधी समोरच्या व्यक्तीचं हित कशात आहे, हे त्याला पटवुन द्यावं लागतं,
आवश्यक तिथे आवश्यक ते बोलायचं, आणि आवश्यक तिथे आवश्यक ते वागायचं, ह्यालाच मॅनेजमेंट म्हणतात.
आपल्या सर्वांना ही बिना एमबीए करता ह्या मॅनेजमेंट स्किल्स अवगत होवो, ह्या मनःपुर्वक प्रार्थनेसह,
आभार आणि शुभेच्छा!
[9/26/2020, 11:50 AM] +91 95036 45430: -------------------------------------------------------------------------------------------------------------
थेट पंकज कोटलवारच्या लेखणीतुन – कालजयी कुमारगंधर्व!!
------------------------------------------------------------------------------------------------------------
एप्रिल १९४७!
पंडीत कुमार गंधर्व तेव्हा फक्त तेवीस वर्षांचे होते, पण दैवी सुरांचं वरदान लाभलेला अदभुत प्रतिभाशाली गायक म्हणुन त्यांची संपुर्ण भारतात ख्याती पसरली होती.
अवघ्या अकराव्या वर्षीपासुन कुमारगंधर्वांचा झंझावात सुरु झाला होता, तो मागच्या बारा वर्षांपासुन अव्याहत सुरुच होता,
कानपुर पासुन कर्नाटकापर्यंत आणि कलकत्यापासुन मुंबईपर्यंत, संपुर्ण भारतातल्या शास्त्रीय संगीतातल्या रसिकांना कुमार गंधर्वांनी आपल्या मोहक स्वरांनी भुरळ घातली होती.
आत्ता तर त्यांनी कुमार वय सोडुन यौवनात प्रवेश केला होता, अजुन तर किती लांबचा पल्ला गाठायचा होता,
पण एक अघटित घटना घडली, कुमार गंधर्वांना श्वास घ्यायला त्रास होवु लागला.
तपासण्या झाल्या, निदान झाले, डॉक्टर म्हणाले, तुम्हाला दमा आहे.
त्याकाळात दम्यावर प्रभावी उपचार नव्हते,
दैवी सुरांचं वरदान लाभलेले गंधर्व, इतक्या लहान वयात हजारो श्रोत्यांना मंत्रमुग्ध करुन तासनतास खिळवुन ठेवणारे कुमारजी,
लोकांना आपली सगळी दुःखे, चिंता विसरायला लावुन, फक्त आपल्या सुरांच्या बळावर लोकांना एक आगळ्यावेगळ्या जगात घेऊन जाणारे कुमारजी,
देवधर गुरुजींच्या मार्गदर्शनाखाले, कित्येक वर्षांच्या अखंड परिश्रमांमुळे शास्त्रीय संगीतातली रागांचे अदभुत बारकावे शिकलेले कुमारजी,
आता दिवसेंदिवस त्यांचा आवाज क्षीण होत होता,
गाणे तर सोडाच, नुसते बोलताही यायचे नाही,
दम्याने फुप्फुसे अशी काही पोखरुन टाकली होती की स्वरयंत्रातुन आवाज येणे जवळजवळ बंद झाले होते,
पुढची पाच वर्ष पंडीतजींनी एकही गाणं गायलं नाही,
गाणं, रागदरबारी, संगीत हाच कुमार गंधर्व ह्यांचा श्वास होता, आणि अजाण वयात भरभरुन दान पदरात टाकुन क्रुर नियतीने अचानकपणे आता ते सगळंच एका झटक्यात त्यांच्यापासुन हिरावुन घेतलं होतं,
संपत्तीच्या शिखरावर पोहोचलेल्या व्यक्तीला एका फटक्यात भिकारी बनवलं गेलं तर त्याला कसं वाटेल?
आपल्या कलेवर निस्सीम प्रेम असणाऱ्या एका सच्च्या कलावंतासाठी, आपल्या कलेपासुन दुरावणे ही जीवनातली सर्वात मोठी वेदनादायी वेळ असते,
समजा, एखाद्या हाडाच्या चित्रकाराकडून त्याचा कॅनव्हास आणि कुंचलाच काढुन घेतला तर तो कसा पाण्यातुन बाहेर काढलेल्या माशासारखा तळमळत बसेल? तसंच काहीसं!...
किंवा टेनिस एल्बोमुळे सचिनला क्रिकेटपासुन काही वर्ष दुर रहावं लागलं होतं तेव्हा त्याला काय वाटलं असेल, तसं काहीसं!...
अशा विपत्तीला संवेदनशील व्यक्ती सहन करु शकत नाही, इतिहासात अनेक कलावंतांची दुःखद अखेर अशीच पहायला मिळते,
कुमार गंधर्व यांचं एक फुफ्पुस पुर्णपणे निकामी झालं, पण तरीही कुमारजी खचले नाहीत,
ते तानपुरा घेऊन रियाजाला बसायचे, आणि इतरांना आलाप घ्यायला सांगायचे,
ते मनातल्या मनात गायचे,
तासनतास गायचे,
गळ्यातुन नाही गाता आलं तर काय झालं? अगदी ह्रद्यातुन गायचे,
लोकांना ऐकता नाही आलं तर काय झालं, स्वतःसाठी गायचे,
गाता गाता त्यांची भावसमाधी लागायची, आणि डोळ्यातुन पाणी वाहु लागायचं,
त्यांची संगीतावरची, गायनावरची ही भक्ती पाहुन अखेर नियतीलाही पाझर फुटला,
१९५० च्या सुमारास दम्यावर प्रभावी अशा एका उपचारपद्धतीचा शोध लागला.
ह्या काळात कुमारजींच्या पत्नी भानुमती ह्यांनी दिवसरात्र त्यांची मनोभावे सेवासुश्रुषा केली, त्यांना आधार दिला,
आणि कुमारजींचा आवाज परत आला,
आता त्या आवाजात आधीसारखे तळपणारे तेज नव्हते, पण तो कठिण संकटातुन तावुन सुलाखुन बाहेर पडुन अजुनच आकर्षक आणि मोहक झाला होता,
फक्त एका फुफ्पुसाने श्वास घेत कुमारजी पुढची अडतीस वर्ष लाखो श्रोत्यांचे कान तृप्त करत राहीले.
परंपरेच्या चौकटीत अडकलेल्या भारतीय शास्त्रीय संगीताला कुमार गंधर्व ह्यांनी नवे वळण दिले.
अगदी तरुणपणीच मृत्युच्या दारात जाऊन आल्यामुळे की काय, त्यांच्यात एक पवित्रता, शुद्धता आली होती,
साक्षात मृत्युला भेदुन गेल्यानंतर शिल्लक असलेल्या फक्त आणि फक्त असीम आनंदाला त्यांनी अनुभवले होते का?
त्याच आनंदाला त्यांनी आपल्या गाण्यांमध्ये. सुरांमध्ये नितळपणे उतरवले होते का?
म्हणुनच प्रत्येक वेळा त्यांची गाणी आपल्याला भावसमाधीत घेऊन जातात का?
“‘सुनता है गुरु ग्यानी’, गगनमे आवाज हो रही झीनी झीनी!...”
पवित्रता फक्त त्यांच्या आवाजातच नव्हती, तर त्यांच्या आचरणात आणि विचारांमध्येही होती.
योगायोगाने कुमारजींचा पुर्नजन्म झाला, आणि त्यांनी स्वतःच्या प्रतिभेच्या बळावर एका नव्या आणि अदभुत, विस्मयकारी प्रकारच्या शास्त्रीय संगीताचे सर्जन केले.
आपल्या निर्गुणी भजनांमध्ये कधी त्यांनी कबीराचे दोहे मनमुक्तपणे गायले,
कधी माळवा-गुजरात प्रांतामध्ये प्रसिद्ध लोकगीते त्यांनी रागदरबारीमध्ये गुंफली, आणि भारतीय संगीताची अनोखी झलक जगापुढे सादर केली.
कुमार गंधर्वांनी अनेक भजने गायली, तशीच काही मराठी गाणीही गायली,
असंच एक गाणं जे कितीही वेळा ऐकलं तरी कान तृप्त होत नाहीत ते म्हणजे, “ऋणानुबंधाच्या गाठी, भेटीत तृष्टता मोठी!”
हे गाणं पंडित कुमार गंधर्व आणि वाणी जयराम ह्यांनी गायलेलं एक अप्रतिम गीत आहे.
अगदी कालपरवा पुलंच्या जीवनावर आलेल्या भाई – व्यक्ती आणि वल्ली ह्या चित्रपटमध्येही त्याची झलक आली होती,
पंडीतजींच्या आवाजांशी माझं एक नातं आहे,
आयुष्यात जेव्हा केव्हा संघर्षाचे प्रसंग आले, तेव्हा पंडीतजींच्या पवित्र सुरांमध्ये मी स्वतःला झोकुन देतो,
आणि काही क्षणांमध्ये सगळ्या चिंता, दुःखे कापरासारखी उडुन जाते,
कुमार गंधर्वांच्या शब्दात इतकी शक्ती आहे की त्यांच्या सुरावटी ऐकल्यानंतर नुसता मुड फ्रेश होत नाही,
एका दिव्य आनंदाची अनुभुती होवु लागते, आतमध्ये आनंदाचे झरे फुटु लागतात.
कुमार गंधर्व हे भारतीय शास्त्रीय संगीतसृष्टीला पडलेलं सोनेरी स्वप्नं आहे.
--------------------------------------------------------------------------------------------
संगीत हे मुड बदलवण्यासाठी एक प्रभावी साधन आहे,
आयुष्यात माझ्यावर अनेकदा हादरावुन टाकणारी संकटे आली,
जेव्हा जेव्हा मी सैरभैर झालो
पण भीमसेन जोशी, पंडीत जितेंद्र अभिषेकी, जयतीर्थ मेवुंडी, गायत्री-रागिनी, ह्या सर्वांच्या दैवी सुरांनी मला प्रत्येक वेळी निराशेतुन बाहेर काढलं,
सैरभैर झालेल्या मनाला, पुन्हा एकदा उत्साहित केलं,
आनंदी होण्याचं एकही कारण जवळ नसताना, सुर हेच माझ्यासाठी आनंद-धाम बनले,
नरकयातनांचे मोक्षामध्ये रुपांतर करण्याची शक्ति अभंगामध्ये आहे, भजनांमध्ये आहे, सुरांमध्ये आहे, हे मी कित्येकदा अनुभवले आहे.
आणि असंचं, चलबिचल झालेल्या मनाला ताळ्यावर आणण्याचा हुकुमी उपाय म्हणजे,
कुमार गंधर्वांना ऐकणे,
स्वतःला त्यांच्या स्वाधीन करणे,
काही कळो किंवा न कळो, त्यांच्या गाण्यामध्ये स्वतःला झोकुन देणे,
आपोआपच आपला प्रत्येक रोमरोम दिव्य चैतन्याने काठोकाठ भरुन जातो,
आजही जेव्हा केव्हा रात्र रात्रभर ड्रॉईंग पुर्ण करण्यासाठी मला जागावे लागते,
 तेव्हा साथीला पंडीतजीच्या दैवी सुर असले की काम करण्याचा शीण क्षणात नाहीसा होतो,
दिवसभर कितीही थकलेलो असलो तरी असामान्य उर्जा मिळते,
शब्दात सांगता येत नाही, असा आनंद मिळतो,
रात्र कधी संपली तेच कळत नाही.
आणि हीच पंडीत कुमार गंधर्व ह्यांच्या आवाजाची जादु आहे.
----------------------------------------------------------------------------------------------------------
शुभेच्छा आणि आभार!!

सामर्थ्याची उपासना

 सामर्थ्याची उपासना 🚩


आश्विन शुद्ध प्रतिपदा अर्थात घटस्थापना! श्रीभगवतीचे शारदीय नवरात्र सुरू होत आहे. यानिमित्ताने घरोघरी नवरात्राचे घट बसतील आणि रोज सकाळ सायंकाळ भक्तिमय वातावरणात श्रीभगवती आदिशक्तीची आरती गायली जाईल. यात मुख्यत्वे सर्वांच्या घरोघरी आवर्जून गायली जाते ती नवरात्रनिवासिनीची आरती! फक्त नवरात्रातच; पण घरातील सर्वांना कंठस्थ असणारी आणि गायला, ऐकायला आवडणारी आरती म्हणजेच 'आश्विन शुद्ध पक्षी अंबा' ही  नवरात्रातील देवीची आरती. पण तुम्हाला ही आरती कोणाची रचना आहे ते माहिती आहे का? ही रचना आहे सद्गुरू श्रीसमर्थ रामदासस्वामी महाराजांची!

श्रीरामराय, श्रीमारुतीराय यांसह समर्थ देवीचेही निस्सीम उपासक होते. करवीरनिवासिनी श्रीमहालक्ष्मी मंदिरात त्यांची अनेकदा कीर्तनेही झाली आहेत. याच ठिकाणी कीर्तनाप्रसंगी श्रीसमर्थांना आपला सर्वात लाडका शिष्य पहिल्यांदा भेटला. तो शिष्य म्हणजेच अंबाजी, जो पुढे योगीराज कल्याणस्वामी या नावे प्रसिद्धी पावला. चाफळची राममूर्ती जेव्हा श्रीसमर्थांनी कृष्णेच्या अंगापूरच्या डोहातून बाहेर काढली, त्याच वेळी त्यांना श्रीमहिषासुरमर्दिनी देवीची ही मूर्ती सापडली. तिची स्थापना समर्थांनी सज्जनगडावर केली. तीच गडावरची श्रीअंगाईदेवी! त्याचसोबत समर्थांनी प्रतापगडाच्या पायथ्याशी देखील श्रीरामवरदायिनी देवीची स्थापना केली आहे.

समर्थांनी श्रीरामराय, श्री महारुद्र मारुतीराया यांवर जशा अनेक स्तवनांची, काव्यपदांची रचना केली तशीच श्रीआदिशक्ति देवीवर हि केली. तुळजापूरनिवासिनी श्रीतुळजाभवानी देवी समर्थांची कुळदेवता. मारुतीवर रचलेल्या अकरा भीमरूपी स्तोत्रांप्रमाणेच समर्थांनी तुळजाभवानी देवीचे हि अनेक स्तोत्र रचले आहेत. ती सुप्रसिद्ध आहेत. तुळजापुरात प्रत्यक्ष देवीचे दर्शन झाल्यावर त्यांनी रचलेली 'सुरवरवरदायिनी मुरहरसुखसदना' ही देवीचे वर्णन करणारी खूपच रसाळ आणि त्याच बरोबर त्यांच्या काव्यप्रतिभेने नटलेली आरती रचली. अनेक देवीभक्तांकडे व विशेषतः समर्थ सांप्रदायिकांकडे ही आरती आजही नित्य गायली जाते.



या नवरात्र उत्सवाच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा!

  श्री अंबादेवी मंदिराचा थोडक्‍यात इतिहास. अमरावती येथील अंबादेवीच्‍या मंदिराचे अस्‍तित्‍व हजार वर्षापासून असल्‍याची अधिकृत नोंद आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या राज्यभिषेकाची निमंत्रण पत्रिका अंबादेवीला पाठवल्याचे इतिहासात नमूद आहे. जुन्या वस्तीच्या परकोटाला लागून हे मंदिर आहे. अंबादेवीची मूर्ती ही पूर्वाभिमुख असून, अतिशय पुरातन आहे. रूक्‍मिणीहरणाशी या मंदिराचा संबंध जोडला जातो.


                           
1500 च्‍या कालखंडात व-हाडावर मोगलांनी कब्‍जा केला होता. तेव्‍हा अनेक नगरांची त्‍यांनी लुटालूट केली. नुकसान केली. हिंदूंची अनेक मंदिरेही त्‍यांनी उद्ध्वस्त केली. त्यामध्‍येच अमरावतीच्या अंबादेवी मंदिराचा समावेश होता. हे मंदिर उद्ध्वस्त झाले होते, मात्र, आतील गाभारा व अंबेची मूर्ती त्यातून सुखरूप राहिली, असे सांगितले जाते. त्यानंतर पुढे 1660 च्‍या सुमारास श्री जनार्दन स्वामींनी मंदिराचा जीर्णोद्धार केला. पुढे नागरिकांनी जनार्दन स्वामींच्या कार्याला हातभार लावला व मंदिराचा कायापालट होत गेला. अहिल्‍याबाई होळकर यांचेही श्री अंबादेवी मंदिराच्‍या उभारणीत मोलाचे योगदान आहे.

                         
अंबादेवीची स्वयंभू मूर्ती काळ्या रंगाच्या वाळुका पाषाणाची आहे. ही मूर्ती पूर्णाकृती, आसनस्थ आहे. मंदिराच्या बांधकामात दक्षिण शिल्पकलेचा प्रभाव आहे. मंदिराच्या उत्तर बाजूला मारुती व दुर्गादेवीचे मंदिर आहे. दर मंगळवारी अंबादेवीच्या मूर्तीवर सोन्याचे दागिने चढवले जातात. मुखवटासुद्धा सुवर्णाने मढवलेला असतो. या दागिन्यांमध्ये सोन्याची नथ, बिंदी, बाजूबंद, गळ्यातील एकदाणी, कमरपट्टा, बांगड्या असा साज चढतो.


कसे पोहचाल: अमरावती हे महाराष्ट्रातील एक महत्वाचे शहर आहे,मुंबई नागपूर कोलकाता मार्गाला जोडलेले आहे,
जवळचे विमानतळ: नागपूर
जवळचे रेल्वे स्टेशन :अमरावती

Tuesday, July 26, 2022

।। मनापासून शांतपणे वाचा ।।


••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
१ )■ जिथं आपली कदर नाही, तिथं कधीही जायचं नाही. ज्यांना खर सांगितल्यावर राग येतो, त्यांची मनधरणी करत बसायचे नाही. जे नजरेतून उतरलेत त्यांचा त्रास करून घ्यायचा नाही.
___________
२ )■ आपल्या हातून एखाद्याचे काम होत असेल तर ते निःस्वार्थ बुद्धीने आणि निःसंकोचपणे करा. नेहमी दुसऱ्याला मदत करा दुसऱ्याला त्रास होईल असे कदापि वागू नका.
___________
३ )■ नेहमी स्वतःसोबत पैज लावा, जिंकलात तर आत्मविश्वास जिंकेल, आणि हारलात तर अहंकार हारेल.
___________
४ )■ पाण्याने भरलेल्या तलावात मासे किड्यांना खातात, आणि जर तोच तलाव कोरडा पडला तर किडे माश्याना खातात. संधी सगळ्यांना मिळते. फक्त आपली वेळ येण्याची वाट पाहा___!
___________
५ )■ एखाद्या व्यक्तीजवळ आपल्या अशा आठवणी ठेवून जा की नंतर त्याच्याजवळ आपला विषय जरी निघाला तर, त्याच्या ओठांवर थोडसं हसू आणि डोळ्यात थोडसं पाणी नक्कीच आलं पाहिजे__ !
___________
६ )■ तुम्ही स्वतःच्या खांद्यावर डोके टेकून रडू शकत नाही आणि स्वतःच स्वतःला आनंदाने मिठी ही मारू शकत नाही__ !
आयुष्य म्हणजे दुसऱ्यांसाठी जगायची बाब आहे___ !
___________
७ )■ जगातील सर्वात सुंदर रोपटे विश्वासाचे असते आणि ते कोठे जमिनीवर नाही तर आपल्या मनात रुजवावे लागते__ !
___________
८ )■ वादळे जेव्हा येतात तेव्हा आपण आपल्या मातीला घट्ट रुजून राहायचं असतं. ती जितक्या वेगाने येतात तितक्याच वेगाने निघूनही जातात. वादळ महत्त्वाचे नसते. प्रश्न असतो की, आपण त्यांच्याशी कशी झुंज देतो आणि त्यातून कितपत बऱ्या अवस्थेत बाहेर येतो याचा.____ !
___________
९ )■ जगातील कुठलीच गोष्ट परिपूर्ण नाही. परमेश्वराने सोन निर्माण केलं. चाफ्याची फुल सुद्धा त्यानीच निर्माण केली. मग त्याला सोन्याला चाफयाचा सुगंध  नसता का देता आला ? अपूर्णतेतही काही मजा आहेच की.___ !
___________
१०)■ दगडात मूर्ती असतेच. त्याचा फक्त नको असलेला भाग काढून टाकायचा असतो. आणि मग ह्याच भावनेने माणसाकडे पहा. माणसातही नको असलेला भाग दूर करायला शिका.____!
___________
११ )■ जेव्हा अडचणीत असाल तेव्हा प्रामाणिक रहा. जेंव्हा आर्थिक परिस्थिती चांगली असेल तेंव्हा साधे रहा. जेव्हा एखादे पद किंवा अधिकार असेल तेव्हा विनयशील रहा. जेव्हा अत्यंत रागात असाल तेव्हा शांत रहा.____ !
___________
१२ )■ आपण हरवण्यासारखं आयुष्यात जरूर घडायला हवं, कारण अशा स्थळावरून परतताना माणूस माणूस राहत नाही. परतून येत ते चैतन्य____!
___________
१३ )■ सोन्याची एक संधी साधण्यापेक्षा प्रत्येक संधीच सोन करा. समुद्र हा सर्वांसाठी सारखाच असतो. काहीजण त्यातून मोती काढतात, तर काहीजण त्यातून मासे काढतात तर काहीजण फक्त पाय ओले करतात. हे विश्व पण सर्वांसाठी सारखेच आहे. फक्त तुम्ही त्यातून काय घेता हे महत्त्वाचे आहे.___!
___________
१४ )■ तुम्ही कोणासाठी कितीही केले, तरी ते कोठेतरी कमीच पडते. कारण सत्य चप्पल घालून तयार होईपर्यत, खोट गावभर हिंडून आलेलं असत.___!
___________
१५ )■ प्रेमळ माणस तुम्हाला कधी वेदना देतीलही, पण त्यांचा उद्देश फक्त आणि फक्त तुमची काळजी घेणं हाच असतो.
___________
१६ )■ जगातील कटू सत्य हेच आहे की, नाती जपणारा नेहमी सर्वांपासून दुरावला जातो.____!
___________
१७ )■ नेहमी लक्षात ठेवा की, " आपल्याकडे असलेल्या संपत्तीचा बडेजाव करू नका. भरकटलेल्या जहाजात कितीही पैसा असला तरी पिण्याचे पाणी मिळत नाही. जमिनीशी जोडलेले राहा.____!
___________
१८ )■ पदाचा, संपत्तीचा कधीही गर्व करू नये.
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
🌸🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌸
•••••••••••••••••••••••••••••••••••••••

"भोंडल्याची १६ गाणी "

भोंडला ,भुलाई ,हादगा अशा वेगवेगळ्या नावांनी ओळखला  जाणारा नवरात्रोत्सव आणि त्यातील लोकगीते  काळाच्या ओघात लुप्त होत चालली आहेत ,घरातल्या  मोठ्या व्यक्ती ,आजी यांना ती  सारी लोकगीते अगदी तोंडपाठ होती ,परंतु त्याची  कुठेही नोंद न घेतल्याने संस्कृती ,गाणी सारे काही विरून जाते आहे .

चला तर मग अशा दुर्मिळ लोकगीतांचे संकलन आपल्याकडे असणे गरजेचे नाही का ??.......
तीच परंपरा तीच गाणी आता आपल्या स्मार्ट वहीमध्ये ...अर्थात आपल्या
स्मार्टफोन मध्ये ...
आपली मैत्रीण गावाकडची असो कि शहरातील ,सर्वानीच जपावा हा अनमोल ठेवा ...

लोकसंस्कृती आपण जपली तरच पुढच्या पिढीत त्याचे संक्रमण होऊ शकते ,त्यामुळे आपल्या आई ,बहीण ,जावा ,मैत्रिणी सगळ्यांना सुपूर्त करूयात हा "नवरात्रीचा अमूल्य ठेवा" ...

1)
ऐलमा पैलमा गणेश देवा, माझा खेळ मांडून दे, करीन तुझी सेवा
माझा खेळ मांडिला वेशीच्या दारी, पारवं घुमतय पारावरी
गोदावरी काठच्या उमाजी नायका, आमच्या गावच्या भुलोजी बायका
एविनी गा तेविनी गा
आमच्या आया तुमच्या आया, खातील काय दुधोंडे
दुधोंडयाची लागली टाळी ,आयुष्य दे रे भामाळी
माळी गेला शेता भाता, पाऊस पडला येता जाता
पड पड पावसा थेंबोथेंबी, थेंबोथेंबी आडव्या लोंबी,
आडव्या लोंबती अंगणा
अंगणा तुझी सात वर्षे, भोंडल्या तुझी सोळा वर्षे
अतुल्या मतुल्या चरणी चातुल्या,
चरणी चारचोडे, हातपाय खणखणीत गोडे
एकेक गोडा विसाविसाचा, साडया डांगर नेसायच्या
नेसा गं नेसा बाहुल्यांनो, अडीच वर्षे पावल्यांनो

*********

2)श्रीकांता कमलाकांता असं कसं झालं.
असं कसं वेडं माझ्या नशिबी आलं

वेडयाच्या बायकोने केले होते लाडू
तिकडून आला वेडा त्याने डोकावून पाहिले
चेंडू चेंडू म्हणून त्याने खेळायला घेतले
वेडयाच्या बायकोने केला होता चिवडा
तिकडून आला वेडा त्याने डोकावून पाहिले
केरकचरा म्हणून त्याने बाहेर फेकला
वेडयाच्या बायकोने केल्या होत्या करंज्या
तिकडून आला वेडा त्याने डोकावून पाहिले
होडया होडया म्हणून त्याने पाण्यात सोडल्या
वेडयाच्या बायकोने केल्या होत्या चकल्या
तिकडून आला वेडा त्याने डोकावून पाहिले
बांगडया बांगडया म्हणून त्याने हातात घातल्या
वेडयाच्या बायकोने केले होते श्रीखंड
तिकडून आला वेडा त्याने डोकावून पाहिले
क्रीम क्रीम म्हणून त्याने तोंडाला फासले
वेडयाच्या बायकोने केल्या होत्या शेवया
तिकडून आला वेडा त्याने डोकावून पाहिले
गांडूळ गांडूळ म्हणून त्याने फेकून दिल्या.
वेडयाची बायको झोपली होती
तिकडून आला वेडा त्याने डोकावून पाहिले
मेली मेली म्हणून त्याने जाळून टाकले

*********

3)
नणंदा भावजया दोघी जणी
घरात नव्हतं तिसरं कोणी
शिंक्यावरचं लोणी खाल्लं कोणी
मी नाही खाल्लं वहिनीनी खाल्लं
आता माझा दादा येईल गं
दादाच्या मांडावर बसेन गं
दादा तुझी बायको चोरटी
असेल माझी गोरटी
घे काठी घाल पाठी
घराघराची लक्ष्मी मोठी

४)

कृष्णा घालितो लोळण,  आली यशोदा  धावून || धृ ||
काय रे मागतोस बाळा तुला देते मी आणून
आई मला चंद्र दे आणून, त्याचा चेंडू दे करून
असलं रे कसलं मागणं तुझं जगाच्या वेगळं
कृष्णा घालितो लोळण,  आली यशोदा  धावून...||1||
आई मला विंचू दे आणून त्याची अंगठी दे करून
असलं रे कसलं मागणं तुझं जगाच्या वेगळं
कृष्णा घालितो लोळण,  आली यशोदा  धावून....||2||
आई मला साप दे आणून त्याचा चाबूक दे करून
असलं रे कसलं मागणं तुझं जगाच्या वेगळं
कृष्णा घालितो लोळण,  आली यशोदा  धावून...||3||

*********

5)एक लिंबू झेलू बाई दोन लिंबं झेलू
दोन लिंबं झेलू बाई तीन लिंबं झेलू
तीन लिंबं झेलू बाई चार लिंबं झेलू
चार लिंबं झेलू बाई पाच लिंबं झेलू
पाचा लिंबांचा पाणोठा
माळ घाली हनुमंताला
हनुमंताची निळी घोडी
येता जाता कमळं तोडी
कमळाच्या पाठीमागे लपली राणी
अगं अगं राणी इथे कुठे पाणी
पाणी नव्हे यमुना जमुना
यमुना जमुनाची बारिक वाळू
तेथे खेळे चिल्लारी बाळू
चिल्लारी बाळाला भूक लागली
सोन्याच्या शिंपीने दूध पाजले
पाटावरच्या गादीवर निजविले
निज रे निज रे चिल्लारी बाळा
मी तर जाते सोनार वाडा
सोनार दादा सोनार दादा
गौरीचे मोती झाले की नाही
गौरीच्या घरी तांब्याच्या चुली
भोजन घातले आवळीखाली
उष्टया पत्रावळी चिंचेखाली
पान सुपारी उद्या दुपारी

*********

6)
अक्कण माती चिक्कण माती , खळगा जो खणावा
अस्सा खळगा सुरेख बाई, जातं ते रोवावं
अस्सं जातं सुरेख बाई, रवा-पिठी काढावी
अश्शी रवा-पिठी सुरेख बाई करंज्या कराव्या
अशा करंज्या सुरेख बाई तबकी भराव्या
अस्सं तबक सुरेख बाई शेल्याने झाकावं
अस्सा शेला सुरेख बाई पालखीत ठेवावा
अशी पालखी सुरेख बाई माहेरी धाडावी
अस्सं माहेर सुरेख बाई खायला मिळतं
अस्सं सासर द्वाड बाई कोंडोनी मारीतं
अस्सं आजोळ गोड बाई, खेळायला मिळतं

*********

7)

अडकित जाऊ खिडकीत जाउ खिडकीत होता बत्ता
भुलाबाईला लेक झाला नाव ठेवा दत्ता ॥१॥

अडकित जाऊ खिडकीत जाउ खिडकीत होता वाटी
भुलोजीला लेक झाली नाव ठेवा चाटी ॥२॥

अडकित जाऊ खिडकीत जाउ खिडकीत होती भाकर
भुलाबाईला लेक झाला नाव ठेवा प्रभाकर ॥३॥

अडकित जाऊ खिडकीत जाउ खिडकीत होता चेंडू
भुलोजीला लेक झाला नाव ठेवा बंडू  ॥४॥

अडकित जाऊ खिडकीत जाउ खिडकीत होता चष्मा
भुलाबाईला लेक झाली नाव ठेवा सुषमा / रेश्मा  ॥५॥

अडकित जाऊ खिडकीत जाउ खिडकीत होता रुपया बंधा
भुलोजीला लेक झाली नाव ठेवा चंदा  ॥६॥

अडकीत जाऊ खिडकीत जाऊ खिडकीत ठेवला अडकित्ता
भुलाबाईला मुलगी झाली, नाव ठेवलं स्मिता ॥७॥

अडकित जाऊ खिडकीत जाउ खिडकीत होता पाटा
भुलोजीला लेक झाला साखर खडी वाटा,
बाणा बाई बाणा, स्वदेशी बाणा, गाणे संपले खीरापत आणा ॥५

*********
८)

कारल्याचा वेल लाव गं सुने ,लाव गं सुने
मग जा आपुल्या माहेरा माहेरा
कार्ल्याचा वेल लावला हो सासुबाई लावला हो सासुबाई
आता तरी जाऊ का माहेरा माहेरा ॥१॥

कार्ल्याचा वेल वाढू दे ग सुने वाढू दे ग सुने
मग जा तू आपुल्या माहेरा माहेरा
कार्ल्याचा वेल वाढला हो सासुबाई वाढला हो सासुबाई
आता तरी जाऊ का मी माहेरा माहेरा ॥२॥

कार्ल्याला फूल येउ दे गं सुने येउ दे गं सुने
मग जा आपुल्या माहेरा माहेरा
कार्ल्याला फूल आलं हो सासुबाई आलं हो सासुबाई
आता तरी जाऊ का माहेरा माहेरा ॥३॥

कार्ल्याला फळ येऊ दे गं सुने येउ दे गं सुने
मग जा आपुल्या माहेरा माहेरा
कार्ल्याला फळ आलं हो सासुबाई आलं हो सासुबाई
आता तरी जाऊ का माहेरा माहेरा ॥४॥

कार्ल्याची भाजी कर गं सुने कर गं सुने
मग जा आपुल्या माहेरा माहेरा
कार्ल्याची भाजी केली हो सासुबाई केली हो सासुबाई
आता तरी जाऊ का माहेरा माहेरा ॥५॥

कार्ल्याची भाजी खा गं सुने खा गं सुने
मग जा आपुल्या माहेरा माहेरा
कार्ल्याची भाजी खाल्ली हो सासुबाई खाल्ली हो सासुबाई
आता तरी जाऊ का माहेरा माहेरा ॥६॥

आपलं उष्टं काढ ग सुने काढ ग सुने
मग जा तू आपल्या माहेरा माहेरा
माझं उष्टं काढलं हो सासुबाई काढलं हो सासुबाई
आता तरी जाऊ का मी माहेरा माहेरा

आणा फणी घाला वेणी जाऊ द्या राणी माहेरा माहेरा
आणली फणी घातली वेणी गेली राणी माहेरा माहेरा ॥७॥

*********

9)
आज कोण वार बाई । आज कोण वार?
आज आहे सोमवार । शंकराला नमस्कार ।

आज कोण वार बाई । आज कोण वार?
आज आहे मंगळवार । देवीला नमस्कार ।

आज कोण वार बाई । आज कोण वार?
आज आहे बुधवार । बृहस्पतीला नमस्कार ।

आज कोण वार बाई । आज कोण वार?
आज आहे गुरुवार । दत्ताला नमस्कार।

आज कोण वार बाई । आज कोण वार?
आज आहे शुक्रवार । अंबाबाईला नमस्कार ।

आज कोण वार बाई । आज कोण वार?
आज आहे शनिवार । शनिला नमस्कार ।

आज कोण वार बाई । आज कोण वार ?
आज आहे रविवार । सुर्याला नमस्कार ।

*********

१०)

काही भागात
कारल्याचा वेल ,त्याची पाने गोल गोल
तुला न्यायाला कोण कोण आलं.
....
(अशी सुरुवात आहे )

 अरडी गं बाई परडी, परडी एवढं काय गं
परडी एवढं फूल गं, दारी मूल कोण गं?
दारी मूल सासरा
सासर्‍याने काय आणलं ग बाई ?
सासर्‍यानं आणल्या पाटल्या
पाटल्या मी घेत नाही, सांगा मी येत नाही,
चारी दरवाजे लावा ग बाई, झिप्रं कुत्र सोडा ग बाई ॥१॥

अरडी गं बाई परडी, परडी एवढं काय गं
परडी एवढं फूल गं, दारी मूल कोण गं?
दारी मूल सासू
सासूने काय आणलंय गं?
सासुने आणले गोट
गोट मी घेत नाही, सांगा मी येत नाही,
चारी दरवाजे लावा ग बाई, झिप्रं कुत्र सोडा ग बाई ॥२॥

अरडी गं बाई परडी, परडी एवढं काय गं
परडी एवढं फूल गं, दारी मूल कोण गं?
दारी मूल दीर
दीरानं काय आणलं ग बाई ?
दीरानं आणल्या बांगड्या
बांगड्या मी घेत नाही, सांगा मी येत नाही,
चारी दरवाजे लावा ग बाई, झिप्रं कुत्र सोडा ग बाई ॥३॥

अरडी गं बाई परडी, परडी एवढं काय गं
परडी एवढं फूल गं, दारी मूल कोण गं?
दारी मूल जाऊबाई
जावेनं काय आणलं ग बाई ?
जावेनं आणली नथ
नथ मी घेत नाहीं, सांगा मी येत नाही,
चारी दरवाजे लावा ग बाई, झिप्रं कुत्र सोडा ग बाई ॥४॥

अरडी गं बाई परडी, परडी एवढं काय गं
परडी एवढं फूल गं, दारी मूल कोण गं?
दारी मूल नणंद
नणदेने काय आणलंय गं?
नणदेने आणल्या तोरड्या
तोरड्या मी घेत नाही, सांगा मी येत नाही
चारी दरवाजे लावा गं बाई, झिप्रं कुत्र सोडा ग बाई ॥५॥

अरडी गं बाई परडी, परडी एवढं काय गं
परडी एवढं फूल गं, दारी मूल कोण गं?
दारी मूल नवरा
नवर्‍याने काय आणलंय गं?
नवर्‍याने आणलं मंगळसूत्र
मंगळसूत्र मी घेते, सांगा मी येते
चारी दरवाजे उघडा गं बाई, उघडा गं बाई
झिपर्‍या कुत्र्याला बांधा गं बाई, बांधा गं बाई ॥६॥

*********

११)

सासरच्या वाटे कुचूकुचू काटे
माहेरच्या वाटे नारळ फुटे
कोण कोण पाहुणा आला गं बाई
सासरा पाहुणा आला गं बाई
सासऱ्याने काय काय आणले गं बाई
सासऱ्यानी आणल्या पाटल्या गं बाई
पाटल्या मी घेत नाही
सांगा मी येत नाही
चारी दारं लावा गं बाई
झिपरं कुत्रं सोडा गं बाई
सासरच्या वाटे कुचूकुचू काटे
माहेरच्या वाटे नारळ फुटे ...
 
कोण कोण पाहुणा आला गं बाई
नणंद पाहुणी आला गं बाई
नणंदेने काय काय आणले गं बाई
नणंदेने आणला पोहेहार गं बाई
पोहेहार मी घेत नाही
सांगा मी येत नाही
चारी दारं लावा गं बाई
झिपरं कुत्रं सोडा गं बाई
सासरच्या वाटे कुचूकुचू काटे
माहेरच्या वाटे नारळ फुटे ...

कोण कोण पाहुणा आला गं बाई
दीर पाहुणा आला गं बाई
दिराने काय काय आणले गं बाई  
दिराने आणले गोठ गं बाई
गोठ मी घेत नाही
सांगा मी येत नाही
चारी दारं लावा गं बाई
झिपरं कुत्रं सोडा गं बाई
सासरच्या वाटे कुचूकुचू काटे
माहेरच्या वाटे नारळ फुटे

कोण कोण पाहुणा आला गं बाई
सासू पाहुणी आला गं बाई
सासूने काय काय आणले गं बाई
सासूने आणला राणीहार गं बाई
राणीहार मी घेत नाही
सांगा मी येत नाही
चारी दारं लावा गं बाई
झिपरं कुत्रं सोडा गं बाई
सासरच्या वाटे कुचूकुचू काटे
माहेरच्या वाटे नारळ फुटे ...
 
कोण कोण पाहुणा आला गं बाई
नवरा पाहुणा आला गं बाई
नवऱ्याने काय काय आणले गं बाई
नवऱ्याने  मंगळसूत्र आणले गं बाई
मंगळसूत्र मी घेते  
सांगा मी येते
चारी दारं उघडा गं बाई
झिपरं कुत्रं आवरा गं बाई

*********

12)
हस्त हा जीवनाचा राजा
पावतो जनांचिया काजा
तयासी नमस्कार माझा ।।

दहा मधले आठ गेले
हस्ताची ही पाळी आली
म्हणोनी त्याने गंमत केली ।।

ज्याच्या योगे झाला चिखल
त्याही चिखलात लावल्या केळी ।।

एकेक केळ मोठालं
भोंडल्या देवा वाहिलं

*********
१३)

माझ्या सुंद्रीचं लगीन
वराडी कोण कोण येणार, माझ्या सुंद्रीचं लगीन

भाऊ म्हणे मी भाऊ, आणीन नवरा पाहून
माझ्या सुंद्रीचं लगीन

बहिण म्हणे मी बहीण, करवली मी होईन
माझ्या सुंद्रीचं लगीन

बाप म्हणे मी बाप, खर्चीन हुंडा लाख
माझ्या सुंद्रीचं लगीन

आई म्हणे मी आई, करीन लग्नात घाई
माझ्या सुंद्रीचं लगीन

चुलता म्हणे मी चुलता, येईन जेवणापुरता
माझ्या सुंद्रीचं लगीन

चुलती म्हणे मी चुलती, येईन वरातीपुरती
माझ्या सुंद्रीचं लगीन

मावसा म्हणे मी मावसा, बसेन दागिन्यासरसा
माझ्या सुंद्रीचं लगीन

मावशी म्हणे मी मावशी, फराळाचे माझ्यापाशी
माझ्या सुंद्रीचं लगीन

मामा म्हणे मी मामा, येईन सर्व कामा
माझ्या सुंद्रीचं लगीन

भट म्हणे मी भट, धरीन अंतरपाट
माझ्या सुंद्रीचं लगीन

भटीण म्हणे मी भटीण, सगळ्याच पोळ्या लाटीन
माझ्या सुंद्रीचं लगीन

*********
१४)
सासरच्या जाच सांगणाऱ्या ह्या मुली सासरची बढाई सुद्धा तेवढीच रंगवून सांगायच्या.

भुलाबाई भुलाबाई सासरे कसे गं सासरे कसे?
कचेरीत बसले हे वकील जसे गं वकील जसे ॥१॥

भुलाबाई भुलाबाई सासू कशा गं सासू कशा?
कपाळभर कुंकू पाटलीन जशा गं पाटलीन जशा ॥२॥

भुलाबाई भुलाबाई पुतणे कसे गं पुतणे कसे?
हातामध्ये घडी मास्तर जसे गं मास्तर जसे ॥३॥

भुलाबाई भुलाबाई जाऊ कशी गं जाऊ कशी?
हातामध्ये लाटणं स्वयंपाकीण जशी गं स्वयंपाकीण जशी ॥४॥

भुलाबाई भुलाबाई दीर कसे गं दीर कसे?
डोळ्यावर गॉगल डॉक्टर जसे गं डॉक्टर जसे ॥५॥

भुलाबाई भुलाबाई नणंद कशी गं नणंद कशी?
हातामध्ये घडी मास्तरीन जशी गं मास्तरीन जशी ॥६॥

भुलाबाई भुलाबाई पती कसे गं पती कसे?
जटातून गंगा वाहे शंकरजी जसे गं शंकरजी जसे ॥७॥

भुलाबाई भुलाबाई आपण कशा गं आपण कशा?
शंकराच्या मांडीवर पार्वती जशा गं पार्वती जशा ॥८॥

भुलाबाई भुलाबाई मुल कसे गं मुल कसे?
वाकड्या सोंडाचे गणपती जसे गं गणपती जसे ॥९॥

*********
१५)

माहेरचा बडेजाव सांगणाऱ्या स्त्रीला मुद्दाम हिणवणारे हे गाणे :-

'तुझ्या ग माहेरच्यांनी काय काय दिलं ?'

'माझ्या ग माहेरच्यांनी दिल्या मला साखळ्या ।'

'असल्या कसल्या साखळ्या बाई फुलाच्या पाकळ्या ॥'

'तुझ्या ग माहेरच्यांनी काय काय दिलं ?'

'माझ्या ग माहेरच्यांनी दिल्या मला पाटल्या ।'

'असल्या कसल्या पाटल्या बाई हाताल्या दाटल्या ॥'

'तुझ्या ग माहेरच्यांनी काय काय दिलं ?'

'माझ्या ग माहेरच्यांनी दिले मला गोट ।'

'असले कसले गोट बाई हत्तीचे रोट॥'

'तुझ्या ग माहेरच्यांनी काय काय दिलं ?'

'माझ्या ग माहेरच्यांनी दिली मला बिंदी ।'

'असली कसली बिंदी बाई कपाळाला चिंधी ॥'

'तुझ्या ग माहेरच्यांनी काय काय दिलं ?'

'माझा ग माहेरच्यांनी दिला मला हत्ती ।'

'असला कसला हत्ती बाई उधळतो माती ॥'

'तुझ्या ग माहेरच्यांनी काय काय दिलं ?

'माझ्या ग माहेरच्यांनी दिला मला गडी ।'

'असला कसला गडी बाई, मिजास बडी ॥'

'तुझ्या ग माहेरच्यांनी काय काय दिलं ?'

'माझ्या ग माहेरच्यांनी दिली मला बाई ।'

असली कसली बाई तिला रीतच न्हाई

*********
16)
आड बाई आडोणी,
आडाचं पाणी काढोणी।
आडात पडली सुपारी,
आमचा भोंडला दुपारी ।।

आड बाई आडोणी
आडाचं पाणी काढोणी।
आडात पडली मासोळी
आमचा भोंडला संध्याकाळी ।।

आड बाई आडोणी
आडाचं पाणी काढोणी।
आडात पडली कात्री
आमचा भोंडला रात्री ।।

आड बाई आडोणी
आडाचं पाणी काढोणी।
आडात पडला शिंपला
आमचा भोंडला संपला

******************
*डॉ. विकास निकम
जीवन विकास केंद्र जळगाव
9850484722

  १. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...