Wednesday, February 8, 2023

 🌻🌺🌻🌺🌻🌺🌻🌺🌻🌺🌻


*🌹आपण उपवास हा नेहमी अन्नाचाच का करावा?, कधीकधी वाईट विचारांचाही करून पहा, कधीतरी उपवास आपल्या स्वार्थी बुद्धीचा व अहंकाराचा ही करावा, कधीतरी आपल्या 'मी' पणाचाही उपवास करून बघा, मनाला खूप शांती मिळते...!!!*

*🌹आपण कुणाच्या ह्रदयातून आपली जागा कमी करणे खूप सोपे असते, पंरतु कुणाच्या ह्रदयात आपली जागा पक्की करुन ती टिकवून ठेवणे खूप कठीण असते...!!!*

*🌹ज्या वेळी तुम्हाला बघताच समोरची व्यक्ती नम्रतेने पहाते आणि आदराने बोलते, त्यावेळी समजून घ्या की जगातील सगळ्यात मोठी श्रीमंती आपण कमावली आहे...!!!*

*🌹आपल्या आयुष्यात आलेल्या एका दु:खामुळे आपण जर हताश होऊन बसलो, तर पुढे आयुष्यात येणारी सुखे आपल्यावर रुसून निघून जातील. त्यामुळे जीवनातील प्रत्येक क्षण हा अमूल्य आहे, तो आनंदाने जगा...!!!*

*🌹आपण आदर आणि चादर ह्या गोष्टी चुकीच्या माणसाला कधीच देऊ नये, नाहीतर आपण उघडे पडतो...!!!*

*🌹आपल शरीर जितकं फिरत राहील, तेवढं स्वस्थ राहतं आणि मन जितकं स्थिर राहील, तेवढं शांत राहतं...!!!*

*🌹आपण कुणासाठीही वेळ नसेल, इतकं व्यस्त होऊ नये,आणि कुणीही गृहीत धरावं, इतकं स्वस्त पण होऊ नये...!!!*

*🌹आपणास सुखी माणसाचा सदरा विकत मिळत नाही, तो आपल्यालाच शिवावा लागतो, 'आपल्या स्वभावाच्या मापाने आणि भावनांच्या धाग्यानी...!!!'*

*🌹आयुष्य खुप सुंदर आहे. तुम्हीही आनंदात जगा व दुसऱ्यालाही आनंदात जगु द्या. सर्वानी आनंदात राहा  आपला समाजातील माणसांवर जिव्हाळा कायम राहो.....!!!* 

*🌹आपण प्रथम स्वतःची व आपल्या कुटुंबातील परिवाराच्या आरोग्याची काळजी घ्या, आपल्यामुळे कोणालाही कुठलाही त्रास होणार नाही याची जास्त काळजी घ्या. तसे त्याप्रमाणे वागा, एकमेकांना धीर द्या, त्यांना आधार द्या, त्यांना साथ द्या. सरकारी नियमांचे व सुचनांचे सर्वानी प्रामाणीकपणे व काटेकोर पालन करा, सरकारला सहकार्य करा.  खोट्या राजकारणी  अफवापासून दूर व सावध राहा, प्रत्येकाने प्रथम स्वतःचा व परिवाराचा जीव वाचवा...!!!*

*जागृत राहा, सतर्क रहा, सुरक्षित रहा*. 

🌹🙏🌹 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹

No comments:

Post a Comment

  १. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...