Wednesday, February 8, 2023

*🌹सत्य आणि शांती...*☘️🌺🙏

*🌷आपले मन ज्यावेळी एखाद्या गोष्टीचा स्वीकार करत नाही, त्यावेळी ते नाकारण्याचे आपल्यात जर धाडस नसेल, तर आपले मन आपल्याला नाटक करायला भाग पाडते...*

*🌷आपल्या जीवनातील कोणतेही ढोंग आणि नाटक हे आपण स्वतःशी प्रामाणिक नसलो तरच शक्य होते... जीवनातील काही गोष्टी स्पष्टपणे बोलणे, आपल्या किंवा एखाद्याच्या तोट्याचे असेल, तर अशावेळी स्पष्ट न बोलणे शहाणपणाचे असते...!!!*

*🌷एखादी गोष्ट स्वीकारल्यानंतर आपला तोटा होत असेल किंवा ते आपल्याला आवडत नसेल, तर आपण तिला टाळणेच पसंत करतो. मग ते कोणीही असो, परंतु आपण टाळतोय हे इतरांना समजू नये असे आपल्याला वाटत असते कारण त्यामुळे आपल्या प्रतिमेला तडा जाण्याची शक्यता असते...!!!*

*🌷या भीतीपोटी आपण नाटक करायला प्रवृत्त होतो. ढोंग किंवा नाटक केल्याने आपली त्यावेळची वेळ जरी मारून नेता आली, तरी आपले नाटक फार काळ टिकत नाही कारण ते आपल्याला टिकवता येत नाही...!!!*

*🌷सत्य फार काळ लपून राहत नाही, आपले नाटक म्हणजे सत्य लपविण्याचा प्रकार असतो, त्यामुळे नाटकाचा सत्यावरील पापुद्रा कधीच दीर्घायुष्यी नसतो... का कोणास ठाऊक? पण आपल्या जीवनातील सगळी नाटके आपण दुसऱ्याचा विचार करूनच करत असतो...!!!!*

*🌷समोरच्याला काय वाटेल, हा विचार मनात आला की आपण आपल्या स्वतःचा विचार करणे सोडून देतो... आपल्या स्वतःचा विचार म्हणजे स्वार्थ नव्हे, तर आपल्या आत्म स्वरुपाचा विचार आहे...!!!*

*🌷आपण ज्यावेळी आत जसे आहोत, तसेच बाहेर असतो, त्यावेळी आपण खऱ्या अर्थाने स्थिर असतो... आपल्या आतल्या आणि बाहेरच्या रूपात व स्वरूपात फरक पडला की, आपण अस्थिर होतो... ही अस्थिरता, ●आपल्या स्वास्थ्याला अस्वस्थ करते.. ●वृत्तीला अशांत करते आणि... ●शरीराला बेचैन करते...!!!*

*🌷अशा माणसाची शांती आणि विश्रांती दोन्ही गायब होते. आपण जसे आत आहोत, तसे बाहेर असणे आणि राहणे परमार्थिक पातळीवर शक्य होते आणि, हे अध्यात्मिक पातळीवर आपल्या हिताचे असते. परंतु व्यावहारिक पातळीवर यात काही वेळा तोटा होतो, म्हणून संसारामध्ये नाटक करावे लागते...!!!*

*🌷संसारात केलेली नाटके आर्थिकदृष्ट्या आणि व्यावहारिकदृष्ट्या फायद्याची ठरत असतील, तर ती करावी लागतात आणि संसारातील हा शहाणपणा असतो म्हणून सर्वानुमते संसारातील सुख कायम रहात नाही. यात फक्त ताप आणि त्रासच आहे. अगदी संत सुद्धा याला अपवाद नाहीत...!!!*

*विश्ववंदनीय जगद्गुरू तुकोबाराय म्हणतात...!!!,*🙏

*संसार तापे तापलो मी देवा l करीता या सेवा कुटुंबाची ll*
*म्हणवोनि तुझे आठविले पाय|*
*येई वो माय पांडुरंगे ll*

*🌷रूपाची आणि स्वरूपाची एकवाक्यता, ही जीवन ही सत्याशी झालेली ओळख असते... हेच अध्यात्म आहे आणि हाच परमार्थ आहे व हेच शांतीचे मूळ आहे...!!!*
 
 *शांती परते नाही सुख l येरं अवघेचि दुःख ll*
 *म्हणवोनि शांती धरा l उतराल पैलतीरा ll*

*🌷परमसत्याचा,शांतीचा आणि सुखाचा घनिष्ठ संबंध आहे. आपण या तिघांमध्ये जेवढे अंतर ठेवू तेवढा काळ आपल्या जीवनातील अस्वस्थतेचा, अशांततेचा आणि पर्यायाने दुःखाचा असतो.. डॉ.आसबे ल.म. ,अध्यक्ष कामधेनू सेवा परिवार. मो.नं 9822292713 ...!!!*

*🌷आयुष्य खुप सुंदर आहे. तुम्हीही आनंदात जगा व दुसऱ्यालाही आनंदात जगु द्या. सर्वानी आनंदात राहा आपला समाजातील माणसांवर जिव्हाळा कायम राहो.....!!!* 

*🌷आपण प्रथम स्वतःची व आपल्या कुटुंबातील परिवाराच्या आरोग्याची काळजी घ्या, आपल्यामुळे कोणालाही कुठलाही त्रास होणार नाही याची जास्त काळजी घ्या. तसे त्याप्रमाणे वागा, एकमेकांना धीर द्या, त्यांना आधार द्या, त्यांना साथ द्या. सरकारी नियमांचे व सुचनांचे सर्वानी प्रामाणीकपणे व काटेकोर पालन करा, सरकारला सहकार्य करा. खोट्या राजकारणी अफवापासून दूर व सावध राहा, प्रत्येकाने प्रथम स्वतःचा व परिवाराचा जीव वाचवा...!!!*

*जागृत राहा, सतर्क रहा, सुरक्षित रहा*. 

🌹🙏🌹 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹
[5/12/2021, 12:29 AM] +91 94233 63843: *🌺भावंडा मधील नाते मनःपासून घट्ट असाव लागते*🌹🙏

*☘️प्रत्येक आईवडिलांना वाटायचे भावाला भाऊ पाहिजे, म्हणून अनेक घरात बरेच भावंडे असायचे. तसे लहानपणी भाऊ एकमेकांसाठी जीव टाकायचे. एकत्र खेळणे एकत्र कामे करणे विनोद करणे. शाळेत एकत्र जाणे. घरामध्येही दादा म्हणून मागे मागे फिरणे. एकमेकांची काळजी घेणे. एकाला लागले तर दुसर्‍याच्या डोळ्यात पाणी यायचे. एकमेकांचे कपडे घालणे. दादाही आपल्या लहान भावाची काळजी घ्यायचा. स्व:ताला कमी घेवून आपल्या भावाच्या गरजा पुरवायचा...!!!*

*☘️आई सांगायची काही झालं तरी एकमेकांची साथ सोडायची नाही. तेही आईला वचन द्यायचे आम्ही कधीही अंतर्गत मतभेद झाले तरी आम्ही एकमेकांची साथ कधीच सोडणार नाही, आईवडिलांनाही धन्य वाटायचे. भरून पावलो असं वाटायचे. एकमेकांसाठी त्यागाची भावना असायची. असे मजेत चालले असताना भावा भावामध्ये काय झाले...!!!*

*☘️काही दिवसांनी भावांचे लग्न झालेत व तेथूनच संबंधामध्ये दुरावा सुरू झाला. जमीनीच्या वाटणी मागू लागले, एवढंच नाही एखाद्याला थोडी जास्त जमिन गेली तर हमरीतुमरी वर यायले लागले. कोर्टकचेर्‍या सूरू झाल्या. एकमेकांचे तोंड बघणे म्हणजे अपशकून असे मानू लागले. घरांच्या विभागणीवरून वाद निर्माण सूरू झालेत. आईवडिलांचा सांभाळ कुणी करायचा याबद्यल भांडणे सूरू झालेत...!!!*

*☘️आईवडिलांचा सांभाळ करण्यासाठी अधिक जमिन व पैसे याची मागणी करू लागलेत. बहिणींना दिवाळीला कोण साडी घेणार म्हणून बहिणींची वाटणी करायला लागलेत. आई एका भावाकडे व वडील दूसर्‍याकडे असे चित्र दिसू लागले. काहीवेळा मुले असूनही आईवडिल मुलीकडे दिसतात. काही वेळा सर्व असूनही आई वृद्धाश्रम मध्ये दिसते. वाटणीसाठी एकमेकांचा खून सूद्धा करतात...!!!*

*☘️आज जर नजर टाकली तर ९५% भाऊ भाऊ एकत्र फिरतांना दिसत नाही व एकमेकाशी बोलतही नाहीत. एकमेकांच्या घरी जात नाही. काहीतर एवढे कट्टर असतात एकाचा मृत्यू झाला तर अंतविधिलाही जात नाही. एकमेकांच्या लग्न कार्याला जात नाही. एखाद्या भावाला अपघात झाला किंवा आजारपणामूळे अॅडमिट व्हावे लागले तर त्याला भेटायला न जाता वरून भोगेल अजून तो अशी भाषा वापरतात...!!!*

*☘️एकाच आईच्या ऊदरात जन्म घेवून एवढी दुश्मनी कूठून घूसली कोण जाणे. आपण लहानपणी दिलेल्या आणाभाका सर्व विसरलेत. जो कुणी हा लेख वाचत असेल त्याने किंवा तिने विचार करा की आपण भावंडे खरंच बोलत नाहीत का. तसे असेल तर सारे विसरून फोन लावा व माफी मागा किंवा भेटायला जा...!!!*

*☘️काही वर्षानंतर या पृथ्वीवर दोघं नसणार. परस्परांबद्दल आदर बाळगा. एक श्रीमंत असेल व दूसरा गरीब असेल तर ती दरी येवू न देता आपण भावंड आहोत याची जाणीव ठेवून एकमेकाबद्दल संबंध चांगले ठेवा. प्रेमाने दादा म्हणून हाक मारा. एकाने जरी केले तरी हे लिहिण्याचे सार्थक झाले असे मी म्हणेन...!!!*

*☘️माणुसकी हा एकच धर्म,,,,,,,,, मेल्यावर खांदा देऊन काय उपयोग,,,,,, एकमेकांना जिवंत असताना मदतीचा हात द्या, मनापासून साथ द्या,,,!!!*

*☘️आयुष्य खुप सुंदर आहे. तुम्हीही आनंदात जगा व दुसऱ्यालाही आनंदात जगु द्या. सर्वानी आनंदात राहा आपला समाजातील माणसांवर जिव्हाळा कायम राहो.....!!!* 

*☘️आपण प्रथम स्वतःची व आपल्या कुटुंबातील परिवाराच्या आरोग्याची काळजी घ्या, आपल्यामुळे कोणालाही कुठलाही त्रास होणार नाही याची जास्त काळजी घ्या. तसे त्याप्रमाणे वागा, एकमेकांना धीर द्या, त्यांना आधार द्या, त्यांना साथ द्या. सरकारी नियमांचे व सुचनांचे सर्वानी प्रामाणीकपणे व काटेकोर पालन करा, सरकारला सहकार्य करा. खोट्या राजकारणी अफवापासून दूर व सावध राहा, प्रत्येकाने प्रथम स्वतःचा व परिवाराचा जीव वाचवा...!!!*

*जागृत राहा, सतर्क रहा, सुरक्षित रहा*. 

🌹🙏🌹 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹
[5/13/2021, 12:06 AM] +91 94233 63843: 🌻🌹🌷🌻🌹🌷🌻🌹🌷🌻🌹

*हवा सगळी कडे आहे, पण गाडीतल्या चाकाची हावा गेल्यावर आपल्याला हावा भरण्या साठी पंचरच्या दुकानात जावे लागते, तसेच देव सगळी कडे आहे, पण त्याला भेटायला देवळातच जावे लागते...!!!*
      
*स्वभावातील गोडीने आणि जिभेवरील माधुर्याने माणसे जोडली जातात. संयम आणि माफ करण्याची ताकत मनुष्यामध्ये असली की, सर्व काही साध्य होते...!!!*

*अहंकार कोणालाच चुकलेला नाही, त्याचे पण दोन चेहरे असतात. एक स्वाभिमान आणि दुसरा गर्व. अहंकाराचं रूपांतर जेव्हा स्वाभिमानात होतं, तेव्हा कर्तृत्व जन्माला येतं. आणि जेव्हा तो गर्वाचं रूप धारण करतो तेव्हा तो फक्त विनाशाला निमंत्रण देतो...!!!* 

*पाप वाईट असते यात शंकाच नाही. पण पुण्य केल्याचा गर्व, त्याहीपेक्षा वाईट असतो. जीवन जगण्याची कला, त्यांनाच माहित असते...!!!*

*जे स्वतःसोबत दुस-याच्याही, आनंदाचा विचार करतात. मन शांत ठेवायला, आणि उत्तराची प्रतिक्षा करायला शिकलात, तर बहुतेक सर्व प्रश्नांची उत्तरं, तुमचं मन तुम्हाला देतं. झेप अशी घ्यायची की, आपल्याला नावं ठेवणाऱ्यांची, झोप उडाली पाहीजे...!!!*

*रस्ता चुकणं चुकिचं नसतं, मात्र रस्ता चुकत आहे हे समजुन पण त्याच रस्त्याने चालत राहणे चुकिचं आहे. विश्वास ठेवा की, श्रम, संयम, आणि नियम कधीच धोका देत नसतात...!!!*

*वाढत्या वया पेक्षा वाढत्या अपेक्षा माणसाला जास्त थकवतात. सुख आपल्या हातात नाही पण सुखाने जगणे मात्र नक्कीच आपल्या हातात आहे...!!!*

*सुख मिळालं, तर उपभोगायचं, मिरवायचं नाही.. आणि दु:ख मिळालं, तर पचवायचं, गिरवायचं नाही...!!!*

*आयुष्य खुप सुंदर आहे. तुम्हीही आनंदात जगा व दुसऱ्यालाही आनंदात जगु द्या. सर्वानी आनंदात राहा आपला समाजातील माणसांवर जिव्हाळा कायम राहो...!!!* 

*आपण प्रथम स्वतःची व आपल्या कुटुंबातील परिवाराच्या आरोग्याची काळजी घ्या, आपल्यामुळे कोणालाही कुठलाही त्रास होणार नाही याची जास्त काळजी घ्या. तसे त्याप्रमाणे वागा, एकमेकांना धीर द्या, त्यांना आधार द्या, त्यांना साथ द्या. सरकारी नियमांचे व सुचनांचे सर्वानी प्रामाणीकपणे व काटेकोर पालन करा, सरकारला सहकार्य करा. खोट्या राजकारणी अफवापासून दूर व सावध राहा, प्रत्येकाने प्रथम स्वतःचा व परिवाराचा जीव वाचवा...!!!*

*जागृत राहा, सतर्क रहा, सुरक्षित रहा*. 

🌹🙏🌹 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹
[5/16/2021, 12:05 AM] +91 94233 63843: *🌴संसारी जीवनात व्यवहारिक अडचण अटळ असते...!!!* 🌴🙏

*☘️ माणूस कितीही सधन असला तरी तो अडचणीत येणारच नाही असे होत नाही.करोडपती असलेले बांधकाम व्यवसायीक, उद्योगपती रस्त्यावर आलेली उदाहरणे आहेत. लोकांचे आणि बँकांचे पैसे बुडविले म्हणून काही परदेशात पळून गेले तर काही तुरूंगात आहेत...!!!*

*☘️ राव असला तरी आणि रंक असला तरी पैशाच्या चणचणीचा अनुभव संसारात घ्यावाच लागतो, अशा चणचणीचा पहिला आघात हा स्वाभिमानावरच होत असतो...!!!*

*☘️ आज पैशासाठी स्वाभिमान विकाणारी, स्वाभिमान गहाण ठेवणारी अनेक माणसे आपल्याला भेटत असतात स्वाभिमान लंगडा झाला की लाचारी जीवनात प्रवेश करते आणि एकदा लाचारी जीवनात आली की ते आपले मानसिक मरण असते...!!!*

*☘️ अशी मनाने मेलेली माणसे कितीही कोटीच्या गाडीत फिरली तरी त्यांच्या चेहऱ्यावरची सुतकी कळा झाकत नाही, ही चालती बोलती फक्त प्रेते असतात. अशी प्रेतरूप माणसे कोणाचीही सेवा करू शकत नाहीत आणि यांचे कोणावरही प्रेम नसते...!!!*

*☘️ अहंकारी माणसांचा देव म्हणजे पैसा असतो आणि भक्ती म्हणजे लाचारी असते...!!!*
  
*☘️पराक्रमी आणि वीर पुरूष एकवेळ मरण पत्करेल पण आपल्या स्वाभिमानासी तडजोड करत नाही...!!!*

*☘️ अशी माणसे आपल्या कष्टाच्या जोरावर आपल्या जीवनातील आर्थिक चणचणीवर मात करतात आणि अगदीच अशक्य असेल तर आपल्या गरजा कमी करतात...!!!*

*☘️ राहणीमानात बदल करतात , जमेल तेवढी काटकसर करतात , एकवेळ उपाशी रहायची वेळ आली तरी तेही करतात, पण आपला स्वाभिमान सोडत नाहीत...!!!* 

*☘️ अशी माणसे फाटक्या कपड्यात असूद्यात, पण त्यांच्या चेहऱ्यावरचे स्वाभिमानाचे तेज अजिंक्य वीराचे असते आणि हे तेज विकत घेता येत नाही आणि कोणत्याही मेकअपने निर्माण करता येत नाही...!!!*

*☘️ही जातीवंत योद्ध्याच्या रक्ताची ओळख आहे आणि हेच आपल्या काया वाचा मने जिवंत असल्याचे लक्षण आहे_ ....!!!*

*☘️ अशी माणसे जीवनातील कोणत्याही अडचणीला आव्हान समजतात आणि लढण्यासाठी यांचे बाहू कायम फुरफूरत असतात...!!!*
 
*☘️ आयुष्य थोडे असले तरी चालेल पण स्वाभिमानी वीराचे असावे, कारण लढणाऱ्याचा इतिहास घडत असतो आणि लाचाऱ्यांचा फक्त वापर होत असतो...!!!*

*आयुष्य सुंदर आहे. आनंदात जगा, आपला जिव्हाळा कायम राहो...!!!✌*

   *❣स्वत: ची व आपल्या कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घ्या. आपल्यामुळे कुणालाही कुठलाही त्रास होणार नाही याची जास्त काळजी घ्या व तसे वागा, एकमेकांना धीर द्या, त्यांना आधार द्या, त्यांना साथ द्या...!!!❣*

|| *जागृत रहा,सतर्क रहा, सुरक्षित रहा*||
     
🌺🌲🙏🌺🌲🙏🌺🌲🙏🌺🌲

No comments:

Post a Comment

  १. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...