Wednesday, February 8, 2023

 *🙏अजुनही वेळ गेली नाही*

          *जागेवर या...*
              *अहंकार सोडा*!!
👉 कुणाची शेती..?,
👉कुणाचा बांध ..?,
👉कुणाची विहीर..?
👉कुणाची मोटर..?
👉कुणाचा रस्ता..?
👉कुणाचं घरदार,..?
👉कुणाचं दुकान..?
👉नाही जाऊ देणार ..
👉त्याला अडवणार ...
👉त्याला घरदार विकायला लावेल..
👉त्याला सोडणार नाही.
👉त्याचा काटा काढेल...?
👉त्याची जिरवतो...
👉त्याला भिकारी बनवेल..?
👉त्याचं हिसकून खाईल..?
👉मी ओळखीत नाही....
👉कुणाचा भाऊ..?
👉कुणाची बहीण...?
👉कुणाचे भाऊबंद...?
👉मी सर्वात मोठा..?
👉मी दादा ..
👉माझे सर्व ऐकतात ..!
👉मी बॉस..
👉हा नेता माझा तो तुझा..
👉आपल्याशिवाय त्याच चालत नाही..!
          आता हे सर्व विसरा. एक व्हेंटिलेटर बेड व एक रेमडेसिवीर इंजेक्शन मिळवण्यासाठी प्रयत्न करुन पहा. आपल्या ओळखी आणि आपलीं वट याचा असणारा माज व घमेंड पार उतरुन जाईल. कोरोना नेमकं हेच घेऊन आलाय. पैसे ,संपत्ती ,जमिन, बंगला, गाडी, सोनं, चांदी,याला कोरोना भीक घालत नाही. म्हणून एकमेकांना सहकार्य करा. एकाची अडचण ती सर्वांची अडचण आहे हे समजून सहकार्य करा. कोरोनात काही ठिकाणी संपत्तीलाही वारस उरले नाहीत. अहंपणा सोडावा लागेल एकमेकांच्या हातात हात घालून चला. जेंव्हा आपला सर्वांगीण विकास होईल तरच समाजाचा विकास होईल. 'दुसऱ्याचे भले त्यात आपले भले' ही आपलेपणाची भावना जोपासा. आपुलकीची भावना ठेवा आपलं गाव व आपलीं माणसं सुरक्षित रहातील याची काळजी घ्या ही विनंती.....🙏🙏
                    *आपला मित्र🙏🏻

No comments:

Post a Comment

  १. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...