*महामानव भारतरत्न डॉ.भीमराव आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतीला विनम्र अभिवादन* 

*शिका , संघटीत व्हा आणि संघर्ष करा ”*
*असे आपल्या समाज बांधवाना सांगणारे डॉ. बाबासाहेब* *आंबेडकर म्हणजे सवर्णांच्या जुलमान्विरुध उगारलेली वज्राची मुठ होय.* *आंबेडकर म्हणजे जातीभेदावर ,* *विषमतेवर , धर्ममार्तंडांच्या वर्चस्वावर , समाजातील वतनदार सत्ताधाऱ्यांवर सदैव पुकारलेले युद्धच होय.*
*डॉ. बाबासाहेब आंबेडकर अष्टपैलू व्यक्तिमत्व होते. त्यांना प्रत्येक क्षेत्राचे परिपूर्ण ज्ञान होते. सामाजिक , राजकीय ,आर्थिक, शैक्षणिक , धार्मिक , पत्रकारिता , कायदे अशा विविध क्षेत्रात आपल्या अमोघ वक्तृत्वाने व कुशल नेतृत्वाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिन-दलितांच्या , श्रमिकांच्या , विस्थापितांच्या , शोषितांच्या अंधकारमय जीवनाला प्रद्य्नेचा संदेश दिला . गलितगात्र झालेल्या मनामनातुन समाजक्रांतीचे स्फुलिंग चेतवून डॉ. आंबेडकर यांनी मुर्दाड झालेल्या समाजाला आपल्या हक्काप्रती जागृत केले . समतेवर आधारित समाजरचना घडावी असे त्यांचे ध्येय होते .*









[4/14/2021, 7:52 AM] +91 94233 63843: !! *पत्रकार बाबासाहेब* !!
_________________________
*तुम्ही जर सत्य मांडायला घाबरत असाल तर समजून जा की तुम्ही गुलामीच्या दिशेने वाटचाल करताय*
*____ डॉ.बाबासाहेब आंबेडकर*
[4/14/2021, 7:52 AM] +91 94233 63843: # *डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा!*

◆ *डॉ बाबासाहेब आंबेडकर* म्हणजे :-...
★ आजन्म विदयार्थी.
★ शिक्षणाचा एक मौलिक ग्रंथ.
★ एक आदर्श विदयार्थी.
★एक आदर्श प्राध्यापक
★ एक आदर्श प्राचार्य
★ एक आदर्श शिक्षण संस्था
चालक.
★ ज्ञानाचे महासागर.
★ विचारांचा प्रचंड ऊर्जास्रोत.
*जयंतीनिमित्त भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन! आणि सर्वांना हार्दिक शुभेच्छा!*



- भाऊराव राऊत
No comments:
Post a Comment