Wednesday, February 8, 2023

 🦠😷🗣️💉🩺💊🚑🚨🏥

       *कोरोना विषाणू आजार*
             *( कोविड 19 )*                           
       *उपचारपद्धती ,औषधे व* 
         *त्यासंबंधित चाचण्या* 
♻️ *कोविडचा* प्रसार शहरातून आता *ग्रामीण भागात* झपाट्याने होत असताना दिसत आहे. प्रत्येक व्यक्तीच्या नातेसंबंधामध्ये कोणालातरी *कोविड* झाल्याची बातमी मिळत असून काहीजणांच्या *मृत्यूची* बातमीसुद्धा दररोज ऐकण्यास मिळत आहे. आपणा सर्वांना ठाऊक आहे की *आजपर्यंत* या आजारावर *100% प्रभावी औषध किंवा लस* उपलब्ध नाही.तरीही रुग्ण बरे कसे होतात त्यासाठी या लेखामध्ये आपण *कोविडचे पॉझिटिव्ह निदान* झाल्यानंतर काय *औषधोपचार* करतात याची थोडक्यात माहिती घेऊया.
♻️ *गृहविलगिकरण ( Home Isolation)* 👉 कोविड रिपोर्ट *पॉझिटिव्ह* आल्यावर ज्यांना काहीच *लक्षणे नाहीत* किंवा अतिशय *सौम्य* लक्षणे आहेत ,ज्यांचे *वय 50 पेक्षा कमी व डायबिटीस,बी. पी.,दमा असे विकार नसतील* त्यांनी घरीच तशी सर्व व्यवस्था म्हणजे वेगळी रूम व सोबत टॉयलेट बाथरूम असल्यास सर्व नियम पाळून ,काळजी घेऊन औषधोपचार घेतले तरी ते योग्य राहील. जवळच्या सरकारी आरोग्य केंद्रातील *मेडिकल ऑफिसर* किंवा *फॅमिली डॉक्टरांकडून* प्राथमिक तपासणी म्हणजेच *BP, ब्लड शुगर,SPO2,ECG, CBC,ESR, CRP , डिजिटल X-RAY Chest* करून सर्व *नॉर्मल* असल्यास त्यांच्या *सल्ल्याने* व *सतत संपर्कात* घरी राहूनच *ट्रीटमेंट* घ्यावी... तसे होम आयसोलाशनचे *सर्टिफिकेट* *तालुका आरोग्य विभागाला* सादर करावे.. 

♻️ *कोविड सेंटर किंवा हॉस्पिटल येथे ऍडमिट होणे* 👉 कोविड टेस्ट *पॉझिटिव्ह* आल्यावर ज्यांना घरी तशी व्यवस्था नसल्याने किंवा ज्यांना अतिशय *जास्त स्वरूपाची लक्षणे* आहेत,खूप त्रास होतोय,ज्यांना *डायबिटीस ,बी.पी. व ईतर असे विविध प्रकारचे आजार आहेत,ज्यांचे वय 50 पेक्षा जास्त* आहे त्यांनी *कोविड सेंटर किंवा हॉस्पिटल* येथे दाखल होऊनच उपचार घेतलेले योग्य राहतील. तेथे Admit झाल्यावर आवश्यक तपासण्या करून डॉक्टरांच्या देखरेखीखाली ट्रीटमेंट केली जाईल. 

♻️ *जलद निदान व त्वरित उपचार* 👉 सर्वांना नम्र विनंती राहील की सध्या या काळात ज्यांना *ताप ,सर्दी,खोकला,दम लागणे, घसादुखी,डोकेदुखी,अंगदुखी,भुक न लागणे,अशक्तपणा,वास व चव जाणे* अशी काहीही लक्षणे वाटल्यास स्वतःहून किंवा आपल्या डॉक्टरांना विनंती करून प्रथम *CBC, ESR,CRP, डिजिटल X-RAY Chest* या त्वरित होणाऱ्या तपासण्या करून *प्राथमिक निदान* करून काही शक्यता वाटल्यास *त्वरित कोविडची टेस्ट* करून घ्यावी. आजकाल *रॅपिड अँटीजन* टेस्टचा रिपोर्ट अर्धा ते एक तासात प्राप्त होतो. जेवढया *लवकर निदान* लागेल तेवढ्या *जलद गतीने* उपचार घेऊन पेशंट *बरा* होऊ शकतो व *मृत्यू टाळू* शकतो. बरेच रुग्ण *कोविडची टेस्ट* सांगितल्यावर *घाबरतात ,घरीच बसतात* व नंतर त्रास वाढल्यावर मृत्यूला सुद्धा सामोरे जावे लागते.. याबद्दल *समाजात जागरूकता* निर्माण करणे खूप आवश्यक आहे. असे लक्षात आले आहे की कोविड झाला असेल तरीही *टायफॉईड किंवा डेंग्यूची टेस्ट False पॉझिटिव्ह* येते . मग काही रुग्ण कोविडची टेस्ट न करता ईतर आजारांची ट्रीटमेंट घेऊन *वेळ घालवताना* दिसत आहेत. त्याबद्दल सर्व *डॉक्टरांनी सतर्क* राहणे आवश्यक आहे. तसेच काही पेशंट कोविड टेस्ट न करता लगेच *HRCT CHEST* म्हणजे छातीचा सिटी स्कॅन करून निदान करून घेतात. पण C.T. स्कॅन मध्ये एक्स रे च्या *10 पट जास्त क्ष-किरणांच्या ( Radiation ) दुष्परिणामांना* सामोरे जावे लागते हे बऱ्याच जणांना ज्ञात नाही. *HRCT* फक्त ऍडमिट झाल्यानंतर डॉक्टरांना वाटल्यास त्यांच्या सल्ल्यानेच करावे.

 💊 *कोविड आजारामध्ये दिली जाणारी विविध प्रकारची औषधे* 💉
♻️ *हायड्रोक्सिक्लोरोक्वीन ( HCQ )* 👉 आजही सर्व शासकीय कोविड सेंटर व हॉस्पिटलमध्ये दाखल झालेल्या रुग्णांना हे मेडिसिन प्रामुख्याने दिले जाते. काही संशोधनानुसार या आजारावर नक्की याचा किती प्रमाणात उपयोग होतोय याबद्दल साशंकता असली तरीही बहुतांश *शासकीय आरोग्य संस्थेतील* रुग्ण याच मेडिसिनने *पूर्णपणे कोरोनामुक्त* होताना दिसत आहेत. तरीपण ज्यांना *G6PD, डायबिटीस, BP, हृदयविकार* हे त्रास असल्यास हे मेडिसिन देणे शक्यतो टाळावे.तसेच शक्य झाल्यास हे मेडिसिन चालू करण्याअगोदर व नंतर *ECG* काढून पाहणे योग्य राहील. *15 वर्षाखालील मुले , गर्भवती व स्तनदा* मातांना हे मेडिसिन देत नाहीत.

♻️ *टॅमिफ्लू ( Oseltamivir )* 
👉 हे *अँटीव्हायरल* औषध आहे. *सौम्य* प्रमाणात लक्षणे असणाऱ्या रुग्णांना व *विशेषतः लहान मुलांमध्ये* त्वरित म्हणजे आजाराच्या सुरुवातीला हे मेडिसिन चालू केल्यास चांगला परिणाम होताना दिसत आहे.

♻️ *फॅविपिराव्हीर ( Favipiravir )* 👉 हे *नवीन अँटीव्हायरल* मेडिसिन असून *सौम्य ते मध्यम* प्रमाणात लक्षणे असणारे व *डायबिटीस, बीपी* असणाऱ्या रुग्णांना लवकरच हे मेडिसिन चालू केल्यास खुप चांगले परिणाम दिसून येत आहेत. फक्त या गोळ्यांचा डोस खुप जास्त प्रमाणात घ्यावा लागतो. या गोळ्या फक्त 18 ते 75 वयोगटातील व्यक्तींनाच देता येतात. 

♻️ *रेमडेसिव्हिर ( Remdesivir )* 👉 हे *अँटीव्हायरल इंजेक्शन* स्वरूपात उपलब्ध आहे. *ICU* मध्ये ऍडमिट असणाऱ्या कोविड रुग्णांना ज्यांच्या *एक्स रे किंवा CT स्कॅन* मध्ये *फुफ्फुसातील निमोनियाचे प्रमाण खूपच जास्त* असून शरिरातील *ऑक्सिजनचे प्रमाण 90% पेक्षा कमी* झालेल्या *गंभीर आजारी* रुग्णांना हे *इंजेक्शन* दिले जाते. त्यामुळे रुग्णांच्या प्रकृतीत *जलद* गतीने *सुधारणा* होताना दिसत आहे. या एका इंजेक्शनची किंमत साधारणपणे 4 ते 5 हजारच्या दरम्यान आहे.

♻️ *टोसिलीझुमॅब ( Tocilizumab) किंवा इटोलीझुमॅब (Itolizumab )*👉 हे Immunomodulator ड्रग आहे. याचा उपयोग ऑटोइम्युन डिसऑर्डर म्हणजे संधिवातासारख्या आजारांमध्ये केला जातो. पण जे कोविडचे रुग्ण *गंभीर अवस्थेत ICU* मध्ये दाखल आहेत व वरील Remdesivir इंजेक्शन देऊनही सुधारणा होत नसेल तर हे इंजेक्शन बऱ्याच पेशंटमध्ये *वरदान* ठरताना दिसत आहे. बहुतांश रुणांचे *प्राण* या इंजेक्शनने वाचल्याचे पहावयास मिळत आहे. रक्तातील
 *IL -6 , D-dimer व Ferritin* हे घटक वाढलेल्या पेशंटला प्रामुख्याने हे इंजेक्शन दिले जाते . कोविड या आजारामध्ये *Cytokine Storm* नावाची जी *जीवघेणी अवस्था* निर्माण होते त्यावर या इंजेक्शनमुळे चांगल्याप्रकारे *नियंत्रण* मिळविता येते फक्त हे इंजेक्शन *खुप महाग* म्हणजे 30 ते 40 हजारांपर्यंत मिळते पण तरीही ते सहजपणे सर्व रुग्णांना उपलब्ध होत नाही. हे इंजेक्शन अजूनही आपल्या भारतात बनत नसून Cipla ही कंपनी स्विझरलँड मधील Roche कंपनीकडून आयात करून उपलब्ध करत आहे. *तरी शासनाला विनंती राहील की सर्व गरजू रुग्णांना ज्यांना खरंच आवश्यकता आहे त्यांना हे सहजपणे व त्वरित उपलब्ध होईल असे नियोजन करावे.*

♻️ *Low Molecular Weight Heparin ( LMWH)* 👉 हे *इंजेक्शन* ज्या कोविड रुग्णांच्या रक्तातील *D-dimer व Ferritin* हा घटक वाढला आहे किंवा रक्तवाहिन्यामध्ये रक्ताच्या गुठळ्या तयार होऊ नये यासाठी *प्रतिबंधात्मक उपाययोजना* म्हणुन दिले जाते.

♻️ *स्टिरॉइड्स* व *अँटीबायोटिकस* 👉 *ICU* मध्ये ADMIT असणाऱ्या *गंभीर* रुग्णांना *ऑक्सिजन पातळी कमी* झाली असल्यास *Dexamethasone* किंवा *Methylprednisolone* हे *Steroid चे इंजेक्शन* व तसेच ईतर *जंतुसंसर्ग* टाळण्यासाठी काही *Higher Antibiotics* ची इंजेक्शने सुद्धा दयावी लागतात.

♻️ *प्लाझ्मा थेरपी* 👉 एक शेवटचा उपाय म्हणून *अतिगंभीर* रुग्णांमध्ये या पद्धतीचा अवलंब केला जातो. जे रुग्ण कोविड आजारातून पूर्णपणे बरे झाले आहेत व रक्तगट जुळत असणाऱ्या व्यक्तींच्या शरीरातील रक्त घेऊन *Plasma* हा घटक वेगळे करून गंभीर रुग्णांना दिले जाते. 

♻️ *ऑक्सिजन थेरपी* 👉 ज्या कोविड रुग्णांचे *ऑक्सिजनचे* प्रमाण *94% पेक्षा कमी* होते त्यांच्यासाठी हा सर्वात महत्त्वाचा व प्रमुख उपाय समजला जातो...जेव्हापर्यंत ऑक्सिजन न देता प्रमाण नॉर्मल म्हणजे *95% च्या वर* जात नाही तेवढे दिवस त्यांना ऑक्सिजन सतत चालूच ठेवावा लागतो. *Nasal Canula, High Flow Nasal O2, Non Rebreather Mask, Bipap मशीन* या काही ऑक्सिजन देण्याच्या पद्धती आहेत. कधी कधी याने सुद्धा शरीरातील ऑक्सिजनची पातळी नाही वाढल्यास *व्हेंटिलेटर मशीनचा* वापर करावा लागतो. 

♻️ *व्हिटॅमिन C ,D, झिंक व बी कॉम्प्लेक्स* 👉
वरील सर्व उपचारांसोबत *प्रत्येक पेशंटला* हे *सर्व व्हिटॅमिन्स* दिले जातात. *प्रतिकारशक्ती* वाढविण्यासाठी यांचा चांगला उपयोग होतो. तसेच काही रुग्ण यासोबत *आयुर्वेदिक व होमिओपॅथी* या उपचारपद्धतीचा सुध्दा अवलंब यशस्वीपणे करत आहेत.

♻️ *आईवरमेकटिन (Ivermectin) व डॉक्सिसायक्लिन. (Doxycycline )* 👉 *बांगलादेशमध्ये* ही दोन औषधे वापरून कोविड नियंत्रणात आणण्यासाठी यश मिळाले आहे असे एक संशोधन आहे. ही दोन्ही औषधे अनुक्रमे *कृमी/ जंत, खरूज* आणि *अँटीबायोटिक* म्हणून वापरली जातात. या आजारावर सुध्दा काही प्रमाणात प्रभावी ठरत असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.

👆 🙏 या लेखात उल्लेखित सर्व औषधे ही फक्त डॉक्टरांच्या सल्ल्यानेच व देखरेखीखाली घ्यावयाची आहेत याची सर्वांनी नोंद घ्यावी. फक्त सर्वसामान्य जनतेला कोविड आजराची एकूण उपचारपद्धती काय व कशी असते हे सोप्या रीतीने समजणे हाच या लेखाचा प्रमुख उद्देश आहे. 📝

.........

No comments:

Post a Comment

  १. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...