Monday, January 9, 2023

 मी हिंदू . मी "ईश्वरा"ला मानतो. ईश्वराची असंख्य नावांनी स्तुती, उपासना करणे, हे आम्हा हिंदूंचे एक वैशिष्ट्य.


आमच्यात अनेक देवदेवतांची सहस्त्रनामे आहेत, असतात.

जसे, विष्णू सहस्त्रनाम, शिव सहस्त्र नाम, ललिता सहस्त्र नाम, गणपती सहस्त्र नाम, इत्यादी.

विष्णू सहस्त्र नाम, माझे सद्गुरू गोंदवलेकर महाराज, यांचे आणि म्हणून, अर्थातच माझेही, खूप आवडते आहे.

हजारो वर्षांपूर्वी, गंगेच्या किनाऱ्यावर शर पंजरी पडलेल्या भीष्मांनी युधिष्ठिराला विष्णूची सहस्त्र नामे सांगितली. आद्य शंकराचार्य यांनी त्या स्तोत्रावर भाष्य लिहिले.

------------------------------------------------------

बरे, मग ? आज हे अचानक काय मधेच ?

नाही, याची आज पुन्हा आठवण होण्याचे कारण म्हणजे, ....................

ते गांधींचे "प्रसिद्ध" आवडते भजन. तेच "रघुपती राघव ............. ईश्वर अल्लाह ...." वाले.

त्याचे काय ?

सांगतो.

हा विषय निघाल्यावर मी मुद्दाम , उत्सुकतेने, जिज्ञासेने पुन्हा एकदा, काळजीपूर्वक "विश्वं विष्णू ...........पासून .................सर्वप्रहरणायुधाय ........" पर्यंत बारकाईने वाचले. चुकुनसुद्धा चूक होऊ नये, हा उद्देश.

हेतू काय ?

हाच, की त्या हजार नावात "अल्लाह" हे नाव आहे का ? ते बघणे.

हुश्श ! अगदी पक्के कन्फर्म झाले, सहस्त्र नामांत "अल्लाह" नाव नाही, नाही, नाही !!

-----------------------------------------------------------------------

तर हं, आपण कुठे होतो ? "रघुपती राघव ........" ह्या हिंदूंच्या पवित्र, पारंपारिक भजनात गांधींनी वाटेल तशी मोडतोड करून, त्यात चक्क - "ईश्वर अल्लाह तेरो नाम ......" ही ओळ घुसडली.

ते मूळ भजन, जे लक्ष्मणाचार्य यांनी रचले होते असे आहे :

" रघुपति राघव राजाराम

पतित पावन सीताराम

सुंदर विग्रह मेघश्याम

गंगा तुलसी शालिग्राम

भद्रगिरीश्वर सीताराम

भगत-जनप्रिय सीताराम

जानकीरमणा सीताराम

जयजय राघव सीताराम.... ज्यात गांधींनी बेजबाबदार, विकृत, हिंदू विरोधी

मोडतोड केली.

आता प्रश्न असा, की गांधींना असे करण्याचा अधिकार कोणी दिला ? कोणीही नाही. असा अधिकार स्वतःकडे असल्याचे मानणे, हा उन्मत्तपणा झाला. अहंमन्यता झाली.

यातला भयानक प्रकार हा आहे, की ज्या "अल्लाह" च्या नावाने, आदेशाने, हजारो हिंदू मंदिरे पाडली, लुटली गेली, लक्षावधी हिंदू देवतांच्या मूर्ती फोडल्या गेल्या, मुस्लिमांकडून रोज पायदळी तुडवल्या जाण्यासाठी मशिदीच्या पायऱ्यात चीणल्या गेल्या, त्या अल्लाह चे नाव हा मनुष्य "ईश्वरा"ला देतोय ! खुशाल, बिनदिक्कत ? !

अरेच्चा ? जर "अल्लाह" हे "ईश्वरा"चे नाव होते , तर तैमुर, बाबर, पासून औरंगझेबा पर्यंत शेकडो वर्षे जो मंदिरांचा विध्वंस, मूर्तींची तोडफोड केली गेली, ती कशासाठी ? "त्यांना" माहित नव्हते, की अल्लाह ईश्वराचेच नाव आहे ? !!

दुसरे असे, की महम्मद घोरी, गझनी, बाबर, औरंगझेब, या सर्वांनी जे केले, ते एका दृष्टीने काहीसे क्षम्य ठरते, कारण, (गांधीजींच्याच भाषेत,) ते (बिचारे) त्यांच्या धर्मानुसार वागत होते ! पण गांधी ? ते ईश्वराला "अल्लाह" म्हणताना कुठल्या धर्मानुसार वागत होते ? !! कुठल्याही नाही. ते निव्वळ स्वतःच्या अहंकाराच्या गुर्मीत वावरत होते. नसलेल्या महानतेच्या तोऱ्यात वावरत होते. हिंदूंना वेठीला धरत होते.

गांधींचे हिंदू समाजाशी असे कोणते वैर होते, की त्यांनी शेकडो वर्षांचे अत्याचार, मंदिर विध्वंस , मूर्तीभंजन विसरायला लावून, हिंदूंना , स्वतःच्या "ईश्वरा"ला "अल्लाह" म्हणायला सांगावे ?

या भजनाचे विकृतीकरण करून, गांधींनी हिंदू समाजाच्या भळभळत्या जखमांवर मीठ चोळले. गांधींनी, हिंदूंना त्यांची मंदिरे पाडणाऱ्या, मूर्ती फोडणाऱ्या मुस्लीमा समोर अपमानित करून, कमरेत वाकून, कुर्निसात करून, "ईश्वरा"ला "अल्लाह" म्हणायला लावले !

हिंदू समाजाचा असा भयंकर अवमान करण्याची दुष्ट कल्पना औरंगझेबाला सुद्धा स्वप्नातही सुचली नसती.

झाले, तेव्हढे बस झाले. आता हे बघावे लागेल, की संपूर्ण भारतात, कुठेही, कधीही, "रघुपती राघव ......." हे भजन मूळ स्वरूपातच गायले जावे. त्यात चुकुनही "ईश्वर अल्लाह तेरो नाम ......" येता कामा नये. तो हिंदू समाजाचा असहनीय अपमान आहे.

ईश्वराला मुर्तीभंजकांचा "अल्लाह" म्हणणे ही विकृती आहे. हे थांबलेच पाहिजे.

No comments:

Post a Comment

  १. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...