आयुष्य म्हणजे आई वडीलांनी रेखाटलेले एक स्वप्न आहे. त्यामध्ये रंग भरणे हे आपले कर्तव्य आहे. पैसा आणि प्रसिद्धी साठी नाही तर आई वडीलांच्या डोळ्यातून निघणाऱ्या आनदांश्रू साठी मोठं व्हायचंय हे स्वप्न उराशी बाळगा...*
*कसं जगायचं हे बापाने मुलाला सांगण्या पेक्षा कसं जगावं हे बापाने मुलाला जगून दाखवावं आणि मुलाने ते शिकावं. संघर्ष हा वडीलांकडून आणि संस्कार हे आईकडून शिकावेत...*
*पुर्ण दुनिया जिंकून सुद्धा आई वडीलांचे मन जिंकू शकला नाहीत तर तो दुनिया जिंकण्याचा विजय सुद्धा काही कामाचा नाही, हे लक्षात ठेवा...*
*देव आहे की नाही या प्रश्नाचे उत्तर शोधायचं असेल तर एकदा तुमच्या वडीलांकडे बघा उत्तर मिळून जाईल. आणि घरातल्या आईला खूश ठेवा मंदिरातली आई आपोआप प्रसन्न होईल...*
*शुभ रात्री...*
No comments:
Post a Comment