Saturday, November 12, 2022

 अध्यात्म म्हणजे काय ?

अध्यात्म म्हणजे मुळात कोणतीही धार्मिक गोष्ट नाही.
अध्यात्म म्हणजे वरिष्ठांच्या प्रती आदरभाव असणे.
अध्यात्म म्हणजे कनिष्ठांच्या प्रती करुणाभाव असणे. 
अध्यात्म म्हणजे आपल्यामुळे कोणाला त्रास होऊ नये अस वागणं.
अध्यात्म म्हणजे वेदना वाचता येणे. 
अध्यात्म म्हणजे आपलं काम प्रमाणिकपणे करणं.
अध्यात्म म्हणजे आपलं कौटुंबीक आणि सामाजिक कर्तव्य पार पाडणं.
अध्यात्म म्हणजे मुक्या पशु-पक्ष्यांवर देखील प्रेम करणे
अध्यात्म म्हणजे निरपेक्ष सत्कर्म करणे .
अध्यात्म म्हणजे नि:स्वार्थी सेवाभाव ठेवणे.
अध्यात्म म्हणजे सदैव कृतार्थभाव असणे.
अध्यात्म म्हणजे विना अपेक्षा कौतुक करणे.
अध्यात्म म्हणजे आपण प्रत्येकाशी सद भावाने रहाणे.
अध्यात्म म्हणजे ग्रंथांच्या आणि संतांच्या संगतीत सदैव असणे. 
अध्यात्म म्हणजे आपण या समाजाचं काही देण लागतो, आणि ते आपण दिलेच पाहिजे अशी मानसिकता असणें.
अध्यात्म म्हणजे गरजवंतांना यथा शक्ती मदत करणे. 
अध्यात्म म्हणजे आपल्या बरोबर इतरांची देखील प्रगती होवो हा भाव असणे.
🌹राम कृष्ण हरी🌹

No comments:

Post a Comment

  १. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...