प्रत्येक वर्गशिक्षिकांनी आपल्या वर्गाच्या ग्रुपवर हा मॅसेज पाठविणे. आणि पालकांना सुद्धा विनंती करणे की त्यांनी आपल्या माहितीच्या सगळ्या मित्रपरिवाराला हा मॅसेज पाठविणे.
*कोणच्याही बाबतीत हे घडू शकते*
*मोबाईल* *हा एक शाप*
एकुलता एक मुलगा. लग्नानंतर पाच वर्षांनी झाला. घरामध्ये त्याचे सगळेजण खूप लाड करतात. काही दिवसांपासून त्याचा स्वभाव खूप चिडचिडा झाला होता. त्याला पाहिजे ती वस्तू आम्ही लगेच उपलब्ध करून द्यायचो. मोबाईलवर गेम खेळणे, YOU TUBE वर व्हिडीओ क्लिप बघणे हा त्याचा आवडता छंद. मोबाईल हातात दिल्याशिवाय तो जेवतच नाही. काल संध्याकाळी तो शाळेतून आला तेव्हा त्याला खूप मोठी उलटी झाली आणि नंतर त्याला चक्कर आली. आम्ही लगेच त्याला जवळच्या डॉक्टरकडे नेलं. परंतु तो शुद्धीवर येत नसल्याने त्याला आम्हाला इकडे (हॉस्पिटलच नाव मी इथे लिहीत नाही) आणायला सांगितले. कालपासून ह्याच्यावर उपचार चालू केले आहेत. अजून शुद्धीवर आला नाही. मेंदूचा MRI केल्यावर आजाराच्या अजून जवळ जाता येईल म्हणून आम्ही डॉक्टरांसोबत इथे आलो आहोत. डॉक्टर आपल्या स्वतःच्या मुलाप्रमाणे त्याची काळजी घेत आहेत. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे *"मोबाईलच्या अतिरिक्त वापरामुळे मेंदूवर परिणाम होऊन तो कोमात गेला आहे."* हे सगळं ऐकून मला माझ्या डोळ्यासमोर मोबाईलवर खेळणाऱ्या अनेक मुलांचे चेहरे डोळ्यासमोर आले.
तिकडून बाहेर पडल्यावर ही सगळी घटना मी माझ्या पत्नीला फोनवर सांगितली आणि आपल्या मुलाबद्दल कशी काळजी घ्यावी हे ठरलं. तीनेसुद्धा आमच्या मुलाला त्या दिवसात अजिबात मोबाईल दिला नाही. हे सगळं बघून शेवटी रात्री माझा मुलगा म्हणाला की, "जर तू मला मोबाईल देत नसशील तर तू माझ्यासोबत खेळ." हे वाक्य साधं आहे पण आईवडिलांना खूप काही शिकवण्यासारखं आहे. आपण आपल्या मुलांना योग्य तो वेळ देत नसल्याने ती मुलं दुसरा आसरा शोधतात आणि तो म्हणजे एकमेव मोबाईल. हे असं का होतं ह्याच उत्तर मला त्याच रात्री माझ्या 3 वर्षाच्या मुलाकडून मिळालं.
ह्या अश्या जीवघेण्या आजारातून आपल्या मुलांना कसं वाचवायचं हे आता सर्व पालकांच्या हातात आहे, कारण तुम्ही मोबाईल वापरणारे सुज्ञ पालक आहात.
१. आपल्या मुलांना वेळ द्या, त्यांच्या सोबत खेळा.
२. मुलांसमोर पालकांनी मोबाईल जास्त वापरू नये.
३. मुलं जेवत नाहीत म्हणून त्यांच्या हातात मोबाईल देणे हे काटेकोरपणे टाळावे.
४. आपल्या लहानपणीचे खेळ त्यांच्यासोबत खेळावे. आपलासुद्धा विरंगुळा होतो. मुलांचा वेळ सत्कारणी लागतो आणि जुने खेळ जतन करता येतात.
५. मुलांना कधीतरी मातीत, उन्हात खेळुद्या. पावसात भिजू द्या. आपण सुद्धा मातीत खेळुन, पावसात भिजूनच मोठे झालोय हे कधी विसरू नये.
६. त्यांना मातीचे किल्ले बनवायला शिकवा.
७. त्यांना पोहायला शिकवा. कॅरम, बुद्दीबळ, सापशिडी, ल्युडो ह्यासारखे खेळ खेळा.
८. आजूबाजूच्या ४-५ मुलांना एकत्र करून आपल्या काळातले जुने खेळ शिकवावे. त्यांना सुदधा आवड निर्माण होते. आपण पण हेच करत करत मोठे झालो हे कधी विसरू नये.
कदाचित हे सर्व करताना आपल्याला कंटाळा येईल पण आपल्या मुलाला कोमात जाण्यापासून वाचवायचे असेल आणि हसतमुख कुटुंब बघायचं असेल तर हे करायलाच पाहिजे. ह्यामधून पालक आणि मुलं ह्यांच नातं अजून घट्ट होते.
शेवटी कमावलेला पैसा तसाच राहतो, आणि आपल्या मुलांना योग्य संस्कार करण्यात आपण कमी पडलो, त्यांना वेळ दिला नाही ह्याचंच आयुष्यभर दुःख मनात घेऊन जगावं लागत...
No comments:
Post a Comment