Saturday, November 12, 2022

*सा रे ग म प ध नि सा*


🎼 🎼 🎼 🎼 🎼

न्यायमूर्ती रानडे यांनी 
एक फार सुंदर 👌🏻 
कल्पना मांडली....

ते म्हणाले, " विश्वाची निर्मिती,
उत्क्रांती करतानाही 'त्या'ला 
संगीताचा आधार घ्यावासा 
वाटला. कसं ते पहा...

प्रथम *सा* म्हणजे *सागरात* 
जीव निर्माण झाले...

नंतर *रे* म्हणजे *रेतीत* म्हणजे 
जमिनीवर जीव निर्माण झाले...

नंतर *ग* म्हणजे *गगनात* 
पक्षी निर्माण झाले...

नंतर *म* म्हणजे *मनुष्याची* 
निर्मिती झाली...

*प* म्हणजे मनुष्यात 
जो *परोपकारी* तो श्रेष्ठ...

त्यानंतर *ध* म्हणजे 
जो माणूस *धर्माने* वागतो 
तो श्रेष्ठ...

त्यानंतर *नी* म्हणजे 
जो इंद्रिय *नियमन* करतो 
तो जास्त श्रेष्ठ....

शेवटी वरचा *सा* म्हणजे 
ज्याला *'साक्षात्कार*' झाला 
तो सर्वात श्रेष्ठ मनुष्य....

*किती सुंदर कल्पना आहे* ...!!!

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

खरी काठी तूच आहेस,
म्हणत असतील एकमेका!
दोन असली काळीजं तरी,
दोघांचाही एकच ठोका!

माहीत नाही किती अंतर,
कोण थकेल,कोण चालेल?
याचं उत्तर नकाच देऊ,
आतमधे विश्वच हलेल!

खरं लग्न असंच जगतात,
बाकी सगळ होत असतं!
अशाच क्षणी फुलावरती,
आधाराला पाखरू बसतं!

मोह सोडाच कुठली ओढ,
बांधून ठेवते एवढी घट्ट?
मला तुला संभाळायचंय,
एवढाच असतो तरूण हट्ट!

तेल आलंय संपत तरी,
दुसऱ्यासाठी तेवतेय वात!
काठीपेक्षा आतला आधार,
सांगतो हातामधला हात!

सुरकुतलेल्या वयामधे,
आधार मात्र तरूण आहे!
आतल्यापेक्षा बाहेर सगळं,
विनाकारण करूण आहे!

अद्वैताचं माहीत नाही,
असंच असतं साहचर्य!
विझत चालल्या क्षितिजावर,
अजून उगवतीलाच सूर्य!

वजाबाकी शून्य यावी,
गणित शेवटी संपेल तेव्हा!
एवढंच मागणं देवापाशी,
दोघांचिही मागते जिव्हा!

प्रमोद जोशी.देवगड.9423513604

No comments:

Post a Comment

  १. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...