Saturday, November 12, 2022


*उगीच रुसू नका,* 
*दुसऱ्याने पाठवलेले मॅसेज* 
*खसकन पुसू नका.* 

Whats app वरचा संवाद 
करू नका बंद .
माणसाशी बोलण्याचा 
लागू द्या रे छंद. 

मान्य आहे प्रत्येकालाच 
कामाचा लोड असतो. 
तरी सुद्धा " *आपल्यांसाठी* " 
वेळ काढावा लागतो. 

संवादच खुंटला तर 
आपलेपणा राहील का ?
मोकळा वेळ असल्यावर 
तो चांगला जाईल का ?

दिवसातून कमीत कमी 
एकदा हाजरी लावत जा. 
दुसऱ्याच्या मॅसेजला 
*रिप्लाय तरी देत जा.* 

करमत नाही , करमत नाही 
असं म्हणून उपयोग नसतो. 
संपर्कात राहणं हाच 
त्यावर एक उपाय असतो. 

गुर्मी आणि अहंकाराचा 
वारा बिल्कुल लागू नये. 
" *मला कुणाचीच गरज नाही* "
असे मुळीच वागू नये. 

कोणतंही संकट येऊ द्या 
" *मी माझा समर्थ आहे.* "
एकटाच सारं निपटून घेईल 
हा माणसाचा भ्रम आहे. 

हाय-हॅलो करणारे 
शेकडो परिचित भेटतील. 
*खरं संकट आल्यावर* 
*पटकन दूर लोटतील.* 

*आपलीच माणसं* *आपल्याला* 
*येत असतात कामी* 
*म्हणून नाती धरून* *ठेवावीत* ,,,,
*तुम्ही आणि आम्ही.*

🙋🏻‍♀️🤷🏻‍♀️💕🙋🏻‍♂🙋🏻‍♂🙋🏻‍♂💕🤷🏻‍♀️🙋🏻‍♀️
 

==========================================
*येईलंच कसा कंटाळा*

काहीतरीच तुमचं
तुमचा प्रश्नच आहे वेंधळा
आपल्याच घरात आपल्याला
येईल कसा कंटाळा.

माझ्या घरातली धूळ सुध्दा
माझ्यावरती प्रेम करते
किती झटकली तरीही
पुन्हा पुन्हा येऊन बसते.

ताट वाटी भांडं
ही सारीच माझी भावंड 
जेवताना रोज असते सोबत
पिठलं असो की श्रीखंड

फ्रीज, मिक्सर, गिझर, टिव्ही
साऱ्या नव्हेत नुसत्याच वस्तू
रिमोट हातात घेतला की
लगेच म्हणतात ' तथास्तु '

कपाट नुसतं उघडलं की
उघडतात मनाचेही कप्पे
वरून खाली दिसत जातात
आयुष्याचे सर्व टप्पे

पलंगावर आडवं पडून
खोचून घेतली मच्छरदाणी
तरी लपून बसलेला एक डास
कानामध्ये गुणगुणतो गाणी

खिडकी, गँलरी, पँसेज, बाल्कनी
घर असतंच नंदनवन
कितव्याही मजल्यावर घर असो
घरातंच तयार होतं अंगण

पती, मुलं, सुना, नातू 
घरात नेहमीच असते जाग
टेबलावरची एक कुंडी
फुलवते आयुष्याची बाग

घरात नुसतं बसून रहा
वाढतं जाईल जिव्हाळा
आपल्याच घरात आपल्याला
येईलंच कसा कंटाळा.
🤓

No comments:

Post a Comment

  १. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...