ज्यांना मुली आहेत त्यांनी ही कविता नक्कीच वाचावी, आणि मुलींनी पण वाचावी.
.
My Sweet 
My Sweet 
My Heart 
*पुरुषांनाही रडण्यासारखी एक कविता*
|| *लेक माझी* || 
.............................. ...................
अशी कशी लेक, देवा,माझ्या पोटी येते
नाव सुद्धा माझं ती
इथेच ठेऊन जाते।।

.
पहिला घास, देवा, तीमाझ्या कडून खाते
माझाच हात धरुन ती
पहिलं पाऊल टाकते।। 

.
माझ्याकडूनच तीपहिलं अक्षर शिकते
तिच्यासाठी सुद्धा मी
रात्र रात्र जागतो।।

.
कुशीत माझ्या झोपण्यासाठीती गाल फुगवुन बसते
मी आणलेला फ्रॉक घालून
घर भर नाचते।।

.
अशी कशी लेक, देवा,माझ्या पोटी येते
असे कसे वेगळे हे
तिचे माझे नाते।। 

.
एक दिवस अचानक, ती,मोठी होऊन जाते
बाबा , तूम्ही दमला का, ?
हळूच मला विचारते॥ 

.
माझ्या साठी कपडे, चप्पल,खाऊ घेऊन येते
नव्या जगातील नविन गोष्टी
मलाच ती शिकवते।। 

.
तिच्या दूर जाण्यानेकातर मी होतो
हळूच हसून मला ती
कुशीत घेऊन बसते।।

.
कळत नाही मला, देवा,असे कसे होते
कधी जागा बदलून ती
माझीच आई होते।।

.
देव म्हणाला, ऐक, पोरीतुझे, तिचे नाते विश्वाच्या ह्या साखळीची
एक कडी असते।। 

.

तुझ्या दारी फुलण्यासाठीहे रोप दिले असते
सावली आणि सुगंधाशी तर
तुझेच नाते असते।।



.

वाहत्या प्रवाहाला, कोणी,मुठीत कधी, का, धरते ?
मार्ग आहे ज्याचा, त्याचा
पुढेच असते जायचे।।

.
तुझ्या अंगणातली धारा ही"जीवनदात्री" होते
आणि वाहती राहण्यासाठीच
"गंगा" ''सागराला" मिळते।
एक तरी मुलगी असावी
उमलताना बघावी
नाजूक नखरे करताना
न्याहाळायला मिळावी 



.
एक तरी मुलगी असावीसाजिरी गोजिरी दिसावी
नाना मागण्या पुरवताना
तारांबळ माझी उडावी 



.
एक तरी मुलगी असावीमैचींग करताना बघावी
नटता नटता आईला तिने
नात्यातली गंमत शिकवावी 



.

एक तरी मुलगी असावीजवळ येऊन बसावी
मनातली गुपितं तिने
हळूच कानात सांगावी 



.

एक तरी मुलगी असावीगालातल्या गालात हसावी
कधीतरी भावनेच्या भरात गळ्यात मिठी मारावी......!
*एक तरी मुलगी असावी* 
dedicated to all beautiful daughters 










No comments:
Post a Comment