*भगवंताला विसरु नका*







जीवावर येणारे संकट टाकावे म्हणून देवाचे चिंतन करा
भिती, राग सोडून प्रामाणिक जीवनाचा रस्ता धरा
*हे ही दिवस जातील धोडा धीर धरा*
एकटे जरी पडले तरी
एकटे राहु नका
स्वतःवर प्रेम करायला
कधीच विसरु नका
*हे ही दिवस जातील थोडा धीर धरा*
मंदिर मस्जिद आणि चर्च
झाली जरी बंद
भाव,भक्ति आणि प्रेमात राहु आम्ही धुंद
*हे ही दिवस जातील थोडा धीर धरा*
संयमाचा बाण कधीही
तुटु देऊ नका
सोबत आहे देव
हे कधीच विसरु नका
*हे ही दिवस जातील थोडा धीर धरा*
जे झाले ते वाईटच झाले
पण स्वतःला हरवु नका
निश्चय करा पक्का
विश्वास स्वतःचा सोडू नका
*हे ही दिवस जातील थोडा धीर धरा*
भिऊ नकोस मानवा
देव आहे सोबतीला
हिम्मत धर थोडी
रंगत येईल जीवनाला
*हे ही दिवस जातील थोडा धीर धरा..*
दुःखानंतर सुखाची पहाट येईल हे मात्र शिका
जीवन आहे अनमोल
भगवंताला विसरु नका
*हे ही दिवस जातील थोडा धीर धरा..*







*कवी गोकुळ गिते*
==========================================
*मोट गेली, नाडा गेला,*
*गेला सोंदुर कणा*
*सहा बैल नांगर आता,*
*दिसेल का हो पुन्हा*
*हेल गेला, कासरा गेला,*
*गेली शर्यत बैल गाडीची.*
*मोगरी गेली, हातणी गेली,*
*गेली मळणी धान्याची.*
*वावडी गेली,उपननी गेली,*
*गेली धार धान्याची.*
*भुसारा गेला,कलवड गेला,*
*गेली इर्जिक नांगराची*
*वाडगं गेलं,खळं गेलं,*
*गेली शान झोपाट्याची.*
*सावड गेली,बलुतं गेलं,*
*गेली राखुळी गुरांची.*
*हौद गेला, सारन गेली,*
*गेली बारव जुनी*
*वढवान गेलं, रहाट गेलं*
*शेंदु कसं पाणी*
*मेड गेली, कुड गेला*
*गेला वसा आढं*
*कुळव गेला, डुब्बं गेल*
*फराड गेलं पुढं*
*खुरवत गेला, खळं गेलं*
*चंद्राचं ते तळं गेलं*
*हरनाची गाडी गेली*
*मामाची पण माडी गेली*
*हेल गेला, गंजं गेली*
*करडईचा फड गेला*
*अंगणात लावलेला भला मोठा* *वड गेला*
*बोरं गेली, जांभळं गेली*
*गेला रानमेवा*
*खंबीर होती जूनी पिढी*
*गावाकडे तेव्हा*
*आता कुठ शोधायच्या*
*गावाकडच्या वाटा*
*प्रगतीच्या नावाखाली*
*मोजू कसा तोटा*
*सांग मिञा, कधी आता*
*गावाकडे जायचं*
*ताटलीत दुध भाकर*
*चुरून मुरून खायचं*
यातले कितीतरी शब्द आपल्याला भविष्यात *आठवणार* सुद्धा नाहीत

#शेतकरी #गड्या_आपला_गावच_बरा.
कदाचित यातील कित्त्येक शब्द *पुढील पिढीला* कळणार देखील नाहीत 

पण हा *अनमोल* मराठी *शब्द ठेवा* जतन करायलाच हवा 

No comments:
Post a Comment