सुख दुःखाचे सुरेख नाते,
माझी कविता...
प्रेमाचेही वचन पाळते,
माझी कविता...
प्राजक्तसड्यापरि मला भासते
माझी कविता...
मनात माझ्या मोरापरि ती,
नाच नाचते, माझी कविता...
अडथळ्यांच्या वाटेवरही सोबत करते, माझी कविता...
कधी कधी तर आई होवून प्रेमळ
हसते, माझी कविता...
रानोमाळ धावूनही कधी न भेटे,
माझी कविता...
तर कधी हलक्या पावलांनी येवून
बिलगते, माझी कविता...
भकास होता सारे काही,
मनात माझ्या केवळ उरते,
माझी कविता...
स्नेहा राणे-बेहेरे, ठाणे/वेंगुर्ला.
जागतिक काव्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा ! 
================================
तू रंग लाव चेहऱ्याला...
आणि उभा राहा रंगमंचावर..
प्रेक्षकांच्या नजरेत स्वतःला..
बंदिस्त करून घे...
साठवून घे कानात...
टाळ्यांचा तो कडकडाट...
गर्दीत असतोस तेव्हा...
कुणीच पाहत नसतं तुला...
झेलून घे आता त्या असंख्य नजरा...
ज्या रोखल्या गेल्यात फक्त तुझ्यावर आता
तूच हसवणारा आणि तूच रडवणारा..
तुझे संवाद त्यांच्या काळजाला भिडवणारा..
प्रकाशाच्या रंगात रंगून जाणारा..
नवरसांची चव चाखणारा...
तू कोण हे विसरून...
नव्याने जन्मणारा...
क्षणाक्षणाला बदलणारे भाव..
हृदयाचा ठाव घेऊ पाहणारा...
कलाकार तू फक्त...
रंगभूमीसाठी जगणारा...





*
मराठी रंगभूमी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा *
मराठी रंगभूमी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा *
No comments:
Post a Comment