Friday, August 19, 2022

 फ्लॅट आले घरे गेली

नाती मात्र फाटत गेली,
प्रेम, जिव्हाळा,माया, ममता
सारी सारी लुप्त झाली.

चार-चार बेडरूम्सची घरे झाली!
पण वडिल, आई वृद्धाश्रमी गेली..
आई-वडिलांचे कष्टं.. ऋणं..
मुले सारी विसरून गेली.

आजीआजोबांची नातवंडं
पाळणाघरातली children झाली
सोडायला बाई, आणायला बाई
घरच्या मायेला पारखी झाली..

प्रत्येकाची वेगळी खोली !
प्रत्येकाला 'space' झाली !
सारी 'extremely busy' झाली
रक्ताचीही नाती आता
WhatsApp मध्ये बंद झाली..!

घरातल्याच माणसांमधल्या
संवादांची होळी झाली..
हॉटेलिंगची फॅशन आली 
घरची जेवणे बंद झाली..

Modular च्या kitchen मध्ये
मुरंबा,लोणची बंद झाली

खोल्यांची संख्या वाढत गेली
माणसे मात्र कुढत गेली..
चिमुकल्यांची मनेच तुटली..

पैशामुळे नीती गेली..
नीतीमुळे मती गेली..
अहो पैशासाठी माणसाने
माणुसकीही सोडून दिली

फेसबुक, गुगल, सगळे असून
डिप्रेशन ची पाळी आली
प्रत्येकाला शुगर, बीपी .. 
हार्ट चीही गोळी आली ! 

इंटरनेट ने क्रांती केली ! 
मोबाईल ने जादू केली ! 
स्वत:च्याच कोषामध्ये
माणसं आता मग्न झाली.. 

माणसं जाऊन यंत्रे आली !
यंत्रांची मग तंत्रे आली ! 
यंत्रे-तंत्रे सांभाळताना
माणुसकीची फरफट झाली..

सुखं सांगायला जवळच कोणी नाही..
दु:ख ऐकायला आपलं कोणी नाही..
'Sharing' च्या या जमान्यात
माणुसकी मात्र उरलीच नाही.

एकमेकांकडे जात जा
विचारपूस करत रहा
कसला मान आणि अपमान
नाती आपली जपत जा. 

🙏🌹🙏🌹🙏🌹🙏

*********************************************

 *सारकाही स्वतःसाठी*

देवधर्म पूजाअर्चा
सार स्वतःसाठी
देवाला यातल काही
नको असत स्वतःसाठी

फूल अर्पण करतो
ती त्याच्याकडे नाहीत म्हणून
सारी पृथ्वीच ज्याचा बगिचा
त्याला काय करायचय फुल घेऊन

नैवेद्य आपण दाखवतो
तो काय देव खातो
तो तर स्वतः प्राणीमात्रांच
भरणपोषण करत असतो

निरांजनाच्या इवल्या ज्योतीने
ओवाळतो आपण प्रभूला
चंद्रसूर्य जातीने
हजर त्याला दिमतीला

स्तोत्र त्याची गातो ती काय
हपापलाय म्हणून स्तूतीला
निर्गुण निराकार जो
त्याला अवडंबर कशाला

सार काही करायच
ते स्वतःसाठीच असत करायचं
प्रार्थनेन देव बदलत नसतो
स्वतःच स्वतःला असत सुधारायच

आवडलेल्या आमटीचा
आवाज करत मारता भुरका
विश्वास ठेवा हे पाप नाही
आनंदाने जगायच नाकरण
यासम दुसरा शाप नाही

जबरदस्त डुलकी येते
धर्मग्रंथ वाचता वाचता
लहान बाळासारखे तुम्ही
खुर्चीतच पेंगू लागता
विश्वास ठेवा हे पाप नाही

देवळापुढील रांग टाळून
तुम्ही वेगळी वाट धरता
गरम कांदाभजी खाऊन
पोटाची पूजा करता
विश्वास ठेवा हे पाप नाही

प्रेमाची हाक येते
तुम्ही धुंद साद देता
कवितेच्या ओळी ऐकून
मनापासून दाद देता
विश्वास ठेवा हे पाप नाही
आनंदाने जगायच नाकरण
यासम दुसरा शाप नाही
*मंगेश पाडगावकर*

📖 ✍️ 📕

No comments:

Post a Comment

  १. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...