*कोणत्याही संकटात न डगमगणार्या
एका कोकणी माणसाचे करोना आजारा विषयी मनोगत*
*कोरोनाक कशाक घाबारतव ?*
फाटफटीक चुल पेटता
पाणी कडकडीत होता
दात घासून गरम पाणयान खसखसावन न्हातव
*आमी कोरोनाक कशाक घाबारतव ?*
घराघरात संडास बांधलेलो आसा
पॉट साफ जरा निवांत बसा
टिश्यु पेपर नको साबणान हात स्वच्छ धुतव
*आमी कोरोनाक कशाक घाबारतव ?*
रात्रीचा शीळा पाक्या शिल्लक नसता
सकाळाक चुलीर गरम भाकरी होता
पात , आला घातलेली चाय आमी पितव
*आमी कोरोनाक कशाक घाबारतव ?*
दिवसभर आमचा काम निब्रात चलता
घामाच्या धारेत सगळा व्हावान जाता
गरम जेवान येग येगळ्या ताटात जेवतव
*आमी कोरोनाक कशाक घाबारतव ?*
ओळखीच्या माणसाक नमस्कार होता
एकमेकाची खुशाली समाजता
भरता इला तरी आमी मिठी खय मारतव ?
*आमी कोरोनाक कशाक घाबारतव ?*
परडयात भाजीपालो होता
तांदुळ गोटो वर्षभर पुरता
बॉयलर नको घरातच कोंबडी पाळतव
*आमी कोरोनाक कशाक घाबारतव ?*
आमचो देवार इश्वास आसता
जय थय आमची तो पाठराखण करता
इतका आसला तरी डोळसपणान
आमी माणूस म्हणान जगतव
*आमी कोरोनाक कशाक घाबारतव ?*





@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@
कृतज्ञ मी देवा तुझा
क्वारंटाईन होण्यासाठी
माझ्याकडे घर आहे,
दोन्ही वेळा भागवायला
अन्नही पोटभर आहे ! १
मनोरंजन खूप आहे,
टीव्ही आणि इंटरनेट,
हवं ते मिळतंय सारं,
एक फोन करता थेट ! २
दिवसभर व्हॉट्स अप चालू,
भ्रमणध्वनी हाताशी,
कपाटात पुस्तकांच्या
रचून ठेवलेल्या राशी ! ३
खूप जरी नसले तरी
पैसे आहेत खात्यामध्ये,
गळ्यात गळा नसला तरी
ओल आहे नात्यांमध्ये ! ४
वीज आहे, पाणी आहे,
तसं काहीच कमी नाही,
उगीच कशाला कण्हायचं,
कारण काढत काहीबाही ! ५
कित्येक जण असे आहेत,
ज्यांच्याकडे नाही सारं,
कसे असतील जगत ते,
एकांताचं झेलत वारं ! ६
त्यांच्याकडे नाही बरं कां
वरीलपैकी एकही गोष्ट,
शारीरिक अन् मानसिक
नशिबामध्ये केवळ कष्ट ! ७
तुलनेमध्ये त्यांच्या आपण
सुखी आहोत कितीतरी,
देवाजीची आपल्यावरती
कृपा आहे हीच खरी ! ८
कृतज्ञ मी देवा तुझा,
जे दिलंस त्याच्यासाठी,
ज्यांच्याकडे काहीच नाही
ठेव थोडं त्यांच्यासाठी ! ९



No comments:
Post a Comment