Friday, August 19, 2022

 *आनंदाच्या झाडाचं गणित कृष्णानं सत्यभामेच्या अंगणात लावलेल्या प्राजक्ताच्या झाडासारखं असतं.* 


*झाड सत्यभामेच्या अंगणात आणि फुलं मात्र टपटपायची रुक्मिणीच्या अंगणात !*

*रुक्मिणीला झाडाचं मूळ काही शोधता नाही आलं पण प्राजक्ताच्या सुगंधाचा आनंद मात्र मिळाला.* 

*सत्यभामेचा चडफडाट झाला तो झालाचं कारण तिनं शोधायचा प्रयत्न करुन ते फुलांचं टपटपणं थांबवायचा प्रयत्न केला. त्यामूळं अंगणात असणाऱ्या त्या झाडाच्या सहवासाचा तिला आनंद नाही उपभोगता आला.*

*रुक्मिणीनं मात्र झाडाच्या मूळाचा शोध घेण्याचा नाद सोडला आणि अंगणात टपटपणाऱ्या फुलांचा आनंद घेत राहिली.* 

*आनंदाचं तसंच असतं. तो कुठून मिळतोय याचा शोध घेत राहिलं तर आनंद संपून जातो. उरते . . . .* 
*फक्त बेचैनी !* 

*आनंद घ्यावा आणि द्यावा...प्रत्येक क्षण महोत्सव करावा.... तो कुणामुळे, कशामुळे याचा विचार शक्य झाल्यास नंतर करावा फक्त कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी म्हणून !*

*श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ*
            🌹 *शुभ सकाळ* 🙏
===================================

 गुढीपाडवा आणि नवीन वर्षाच्या मनापासून शुभेच्छा!

रोग सुद्धा असतात असे,
कमालीचे हलकट,चावट!
शुभ वर्षारंभावरच,
अशुभाचं सावट बिवट!

आपण मनात स्वस्तिक कोरू,
आणि ओठावरती ओंकार!
आपोआपच काळजात येईल,
मारुतीचा दीर्घ हुंकार!

विचारांवर लिहू फक्त,
अधिक आणि गुणाकार!
आपोआपच पुसला जाईल,
वजा आणि भागाकार!

बारसे जेवढे रोज होतात,
होत नाहीत अंत्यविधी!
चांदण्यांच्याच रात्रीनंतर,
उगवत येतो तेजोनिधी!

कुजतं कमी रुजतं जास्त,
असंच सांगत असते माती!
भाग्यरेषांपेक्षा असतं,
आपलं नशीब आपल्याच हाती!

पाडवा म्हणून सुद्धा आपण,
उभीच करत असतो गुढी!
वरवर वेड्या असल्या तरी,
शहाण्या असतात आपल्या रुढी!

विधायकच शिकवत असतात,
आपले सगळे उत्सव,सण!
आणि सांगतात सुखी रहा,
आपले/परके सगळेजण!

प्रमोद जोशी.देवगड.9423513604

==============================================


""आम्ही ज्येष्ठ "'''
    ____________
     वयाने असू
       आम्ही ज्येष्ठ
    पण मनाने आमुचे
       तारूण्य श्रेष्ठ ||
    नाही थकवा
     आम्हा ठाऊक
   करोना संकटाने
     झालो भाऊक ||
   नाही जगणे
    आनंदाचे सोडले
  डिजिटल युगास
    आम्ही जोडले ||
  घरीच राहणे
   नाही वाटत शिक्षा
  कारण घेतलीय 
     Online
    कार्यक्रमाची दिक्षा ||
  अजूनही अन्नपूर्णा
    व्रत सांभाळतो
  कुटुंबीयांस नवनवीन
     पदार्थ खिलवतो ||
  देव भजावा नित्य
    हिच आमुची सेवा
 म्हणूनच मिळतो
   आशीर्वादाचा मेवा ||
 ध्यान,व्यायाम 
   हे तर नित्य कर्म
 जाणून घ्या हो
   आरोग्य जीवन मर्म ||
 आशावादासच जीवनी
     देतो थारा
 मग नैराश्याचा 
   वाहत नाही वारा ||
 आनंदी जगावे कसे
   सर्वासी सांगावे
 सकलासी सामावून
    आपल्यात घ्यावे ||
 लेखन,वाचन यांना
   साथीस बोलवावे
 मिडीयावरील घबराटीस
   बाजूलाच ठेवावे ||
चला दोस्तहो,
  मस्त जगूया
निराशेतही
   आशा जागवू या
नवीन पहाटेची
  वाट पाहू या
मस्त कलंदर 
 होऊन जगू या
आशा उद्याची
  पुन्हा शोधूया
मनातील तारूण्य
  नित्य जपूया
आनंदे जीवन
  व्यतीत करू या ||||

   सौ.अलका म. वठारकर
=================================================


मिठी मारलीच यमानं पण,
क्षणात आडवा आला मयूर!
अपार कौतुकाच्या क्षणी,
मनात उठलंच वेगळं काहूर!

एका निमिषार्धात सांगू,
वाटेल ते घडू शकतं!
मरणाराला वाचवल्यावर,
याचं पाऊल अडू शकतं!

रेल्वेपेक्षा मयूरच्याच,
साहसाला जास्त वेग!
आवेश असतो सगळीकडेच,
इथे फक्त होता आवेग!

आंधळीला बाळच नव्हे,
भविष्यातली दिली दृष्टी!
फसल्या यमानंही केली,
स्वर्गामधून पुष्पवृष्टी!

बक्षिस मिळाल्यावर मयूर,
अजून जास्त झाला उंच!
प्रेक्षागृहामधली पायरी,
क्षणात झाली रंगमंच!

साहस आणि औदार्याचा,
केवढा तीर्थ संगम होता!
याच्या हातामधला निधी,
मग तिच्या हाती होता!

तारुण्याचं सोनं करणं,
सांगून गेली अबोल कृती!
नोकरी आणि निष्ठा यांची,
केवढी सात्विक होती युती!

रेल्वेचाच तू गौरव झालास,
पायरी खालची असून सुद्धा!
यमच किती क्षुद्र वाटला,
वरच्या खुर्चीत बसुन सुद्धा!

प्रमोद जोशी.देवगड.9423513604

No comments:

Post a Comment

  १. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...