Friday, August 19, 2022

🦅🦇

.
*एका माणसाने खरंच वाटी भर पाणी पक्षांसाठी ठेवले आणि पुढे काय घडलं?*

त्या पक्षांमधे आणि माणसामधे काय संवाद झाला ?त्याचे वर्णन खालच्या कवितेत केलय.

(Unfortunately कवीवर्यांचे नाव कळले नाही) 

*वाटीत पाणी बघता*
*ऐटीत पक्षी आला*
*चोचीत थेंब घेता*
*मना मधे म्हणाला*

*येतो घेउनि आता*
*घरट्यातल्या पिलाला*
*सोय आजची हि झाली*
*भय उद्याचे कशाला*

*वाटीतल्या जळाची*
*चर्चा चिकार झाली*
*गावात विहगांच्या*
*सभेत नोंद झाली*

*आहे कुणीतरी या*
*गावात चांगाला बा*
*पात्रात पाणी ठेवी*
*म्हणतो आम्हास हे घ्या !*

*धामात सज्जनाच्या*
*काही पक्षीगण गेले*
*हालवित पंख छोटे*
*त्यातील एक बोले*

*पात्रात पाणी या का*
*आम्हास ठेवले तू*
*नाही मनुष्य आम्ही*
*तरी परोपकारिले तू।*

*जातीस जात भीते*
*हे दीस आजचे आले*
*माणूस माणसाशी*
*आज शत्रुसमान वागे*

*हे रोज पाहण्याची*
*सवय आम्हाला झाली*
*हे असे असता पाणी*
*कोण परांस घाली?*

*हे पहावया मनुजा*
*तुझ्या समीप आलो*
*उपकार कसा मी घेउ?*
*म्हणुन बोलता झालो*

*ऐकुन प्रश्न भोळा*
*यजमान सुन्न झाला*
 *लज्जीत वदनाने*
*पुढे बोलता झाला*

*हे दान नाही मित्रा*
*उपकार फेडतो मी*
*वाटीतल्या जलाचे*
*काज सांगतो मी*
  
*तोडले वृक्ष आंम्ही*
*निसर्ग उजाड झाला* 
*उखडून घरटी तुमची*
*विश्राम आम्ही केला*

*वनास तोडून आम्ही*
*शहरात वास केला*
*उत्तुंग इमारतीचा*
*आम्हीच माज केला*

*परंतु विश्रामधामी*
*विश्रांती ना मनाला*
*तळमळ अंतरीची*
*न सांगता ये कुणाला*

*यंत्रे शोधुनी आम्ही*
 *श्रमचोर जाहलो रे*
*लाडावुनि गात्रे*
*रोगांत ग्रासलो रे*

*आरवशी प्रभाती तू*
*नी जातो मनाचा शीण*
*गुंताडल्या मनांची*
*का सहजी सुटे रे वीण*

  *सरसावशी आकाशी*
 *मी पहातो तुझी भरारी*
 *मरगळल्या मनाला*
*येते पुन्हा उभारी*
    
 *आकाश कवेत घेता*
 *करतोस येरझारा*
 *पाहुनी कसरती त्या*
 *मी विसरतो देहभाना*
       
*पहाटे जाग येते*
*तू सुरात जेव्हा गातो*
*कोण मनुष्य प्राणी*
 *काय तुलारे देतो?*
 
*बोल कृतज्ञतेचे*
*एकुन त्या जनाचे*
*जलप्राशनामिषेने*
*सारा पक्षीवृंद नाचे*

🦅 🦇 🦋

*"पक्षीमित्र व्हा "असा संदेश देणारी सुरेख कविता.*

=========================================

घरांत अशी शिस्त होती...!!

घरी आल्यावर हातपाय 
धुतलेस कां..? चल उठ 
आधी, तशीच बसलीयेस
घाणेरडी...!! 

अगं, जेवायला बसायचं नां, 
हात धुतलेस कां स्वच्छ..? 

संध्याकाळ झाली, आधी 
तोंड धू आणि नीट केस 
विंचरून वेणी घाल...!! 

तोंड पुसायचा टॉवेल 
हात पुसायला घेऊ 
नको गं, गलिच्छ कुठली..!!  

बाथरूममधून बाहेर 
येताना पाय कोरडे कर, 
ओले पाय घेऊन फिरू 
नको घरभर...!! 

केस स्वयंपाक घरांत 
नको ग विंचरू, अन्नांत 
जातील...!!

शिळ्या भाताचा चमचा 
ताज्या भाताला वापरू 
नकोस, खराब होईल तो...

दुधाची पातेली एकदम 
वरच्या खणांत गं.... 
फ्रीजमध्ये, खालती 
नको ठेऊ...!! 

वाट्टेल त्या भांड्यात दूध 
नाही तापवायचं गं... !!

तुझ्या भांड्याने पाणी पी, 
माझं घेऊ नकोस...!!

अगं, केस पुसायच्या 
पंचाने अंग नको पुसू...!! 

बेक्कार नुसती...!!! 
खोकताना तोंडावर 
रुमाल घे, कितीवेळा 
सांगायचं (आणि तो 
रुमाल स्वतः धू...
बाकीच्या कपड्यात 
टाकू नको धुवायला...!!

दुसऱ्याशी बोलतांना 
चांगलं हातभार अंतर 
ठेवून उभी रहा, थुंकी 
उडते कधीकधी...!!

कशाला जाता येता 
मिठ्या मारायच्या 
एकमेकांना.....

घांम असतो, धूळ असते,
अंगाला ती लागेल नां..!!
कांहीतरी फ्याड एकेक, 
कांय ते प्रेम लांबून करा..!!! 

चप्पल घालून घरांत 
आलीस, तर याद राख, 
काढ आधी ती दारात...!!

खजूर खल्लास, 
बी टाकून दे लगेच, 
तशीच ठेवायची नाही,
तोंडातली आहे नां ती..? 

नीट जेव, शीत 
तळहाताला कसं 
लागतं गं तुझं...? 

कसं जेवत्येस..! 
ताट स्वच्छ कर, 
आणि पाणी घालून 
ठेव, करवडेल नाहीतर..!! 

तोंडात घांस असतांना 
बोलू नकोस, इतकं कांय 
महत्वाचं सांगायचंय..?? 

तात्पर्य कांय...? 
तुम्हाला जर असं 
वाढवलं गेलं असेल, 
तुमच्यावर जर असे 
संस्कार केले असतील, 
तर कोरोनाची अजिबात 
चिंता करू नका...

कारण आज सगळं 
मेडीकल सायन्स जे 
सांगतंय, ते आपल्या 
पितरांनी आपल्याला 
लहानपणीच शिकवलंय...

तेव्हा जाच वाटला खरा, 
पण आज ह्याच सवयी 
आपलं कोरोनापासून 
रक्षण करतील...

तेव्हा काळजी करू नका, 
जसे वागत आलायत 
तसेच वागत रहा...!!!

एक शंका, आपल्या 
पूर्वजांचे अस्वस्थ आत्मे 
तर कोरोनाच्या रूपाने 
परत आले नाहीत नां, 
जगाला स्वच्छता
शिकवायला...??? 

नाही म्हणजे, 
इंग्लंडचा राजा पण 
शेकहँड करायच्या 
ऐवजी नमस्कार 
करतोय म्हणे...
दोन्ही हात जोडून...!!!

🙏🙏

मंडळी कोरोना वाढतोय काळजी घ्या.आपल्या हलगर्जीपणाने कुटुंबाला व इतरांना संकटात टाकू नका

No comments:

Post a Comment

  १. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...