Friday, August 19, 2022

 रात्र जरी लांबली काळोख माजला 

सूर्य उगवणार आहे आजही आजही
किर्र किच्च जरी घुबडे घुत्कारीती
पक्षी गातील पहाटे आजही आजही

रस्ते गर्दीचे जरी असती सामसुमले
नेती तेथेच ते आजही आजही
शहर धास्तीत जरी आहे विश्रामले
वस्ती त्याच्यात आहे आजही आजही

श्वास मुखवस्त्रात जरी आशेत गुदमरले
शुभ्र मोगरा सुगन्धतो आजही आजही
स्पर्श हवेसे जरी असती दुरावले
आम्र मधुर मोहरतो आजही आजही

चार भिंतीत जगणे जरी आहे कोंडले
मन पिसाट हिंडते आजही आजही
चाकोरीत जरी सारे नियम कोंबले
कल्पना विहारते आजही आजही

नियतीच्या पटावर सोंगटीचे सरकणे
हाती नसणार आहे आजही आजही
थिरकण्यात त्या मात्र आनंदणें
आवाक्यात आहे आजही आजही

गंभीर

🙏🏾🙏🏾🙏🏾

No comments:

Post a Comment

  १. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...