बागेतुनी व बाजारातुनी कुठुनी तरी ‘त्याने’
गुलाबपुष्पे आणून द्यावीत ‘तिज’ला नियमाने
कशास सांगू प्रेम तयाचे तिजवरती होते?
तुम्हीच उकला बिंग यातले काय असावे ते!
गुलाब कसले प्रेम पत्रिका लाल गुलबी त्या
लाल अक्षरे जणू लिहलेल्या पाठोपाठ नुसत्या
प्रेमदेवता प्रसन्न हो! या नैवद्याने
प्रेमाचे हे मार्ग गुलबी जाणती नवतरणे
कधी न त्याचा ती अवमानी फ़ुलता नजरणा
परी न सोडला तिने आपुला कधीही मुग्धपणा
या मौनातच त्यास वाटले अर्थ असावे खोल
तोही कशाला प्रगट करी मग मनातले बोल
अखेर थकला ढळली त्याची प्रेमतपश्चर्या
रंग दिसे ना खुलावयाचा तिची शान्त चर्या
धडा मनाचा करुन शेवटी म्हणे तिला ‘देवी’
दुजी आणखी विशेषणे तो गोन्डस तिज तो लावी
“बांधीत आलो पुजा तुज मी आजवरी रोज
तरी न उमगशी अजुन कसे तू भक्ताचे काज
गेंद गुलाबी मुसमुसणारे तुला अर्पिलेले
सांग सुन्दरी फ़ुकट का सगळे गेले?”
तोच ओरडून त्यास म्हणे ती “आळ वृथा हा की
एक पाकळी ही न दवडली तुम्ही दिल्यापैकी”
हे बोलूनी त्याच पावली आत जाय रमणी
क्षणात घेउन ये बाहेरी कसलीशी बरणी
म्हणे “पहा मी यात टाकले तुमचे ते गेंद
आणि बनवला तुमच्यासाठी इतुका गुलकंद
का डोळे असे फ़िरवता का आली भोवंड
बोट यातले जरा चाखुनी गोड करा तोंड ”
क्षणैक दिसले तारांगण त्या परी शांत झाला
तसाच बरणी आणि घेवुनी खान्द्यावरी आला
“प्रेमापायी भरला” बोले “भुर्दन्ड न थोडा
प्रेमलाभ नच, गुलकंद तरी कशास हा दवडा?”
याच औषधावरी पुढे तो कसातरी जगला
‘हृदय थांबूनी कधीच ना तरी असता तो’ खपला!
तोंड आबंले असेल ज्यांचे प्रेम निराशेने
प्रेमाचा गुलकंद तयानी चाखूनी हा बघणे..
- प्र के अत्रे
==========================================
प्रल्हाद केशव अत्रे यांची 'प्रेमाचा गुलकंद' ही कविता तरूणांमध्ये प्रसिद्ध होण्यामागची कारणं काय?
शाळेत इयत्ता आठवीला संस्कृत हा विषय अभ्यासाला होता. त्या पुस्तकात वाचलेल्या एका श्लोकाचा अर्थ आठवतोय, 'काव्य शास्त्र विनोदाची आवड नसलेला माणूस म्हणजे शेपूट नसलेला प्राणीच आहे.' प्रेमाचा गुलकंद ही कविता काहीशी तशीच आहे.
एका व्यक्तीचे एका मुलीवर प्रेम जडले. त्याला हे प्रेम शब्दात व्यक्त करण्याचा काही धीर झाला नाही. पण तो तिला नित्यनियमाने रोज एक गुलाब आणून द्यायचा. हे गुलाब तिला माझ्या तिच्यावरच्या प्रेमाची ग्वाही देतील असे त्याला वाटे. ती त्याच्या हा नजराणा स्वीकारायची खरा. पण तीसुद्धा शब्दात काही व्यक्त होत नसे. त्याला वाटायचं, तिच्या मौनातच होकार आहे. असे एक नाही दोन नाही तब्बल सात महिने गेले. शेवटी मनाचा धडा करून त्याने एकदाचे तिला विचारले, "मी तुम्हाला रोज गुलाब देतोय, तुम्हाला माझ्या मनातली भावना कळली नाही का? मी तुम्हाला दिलेले सगळे गुलाब वाया गेले काय?" हे वाक्य ऐकून ती रूपवती क्षुब्ध झाली आणि म्हणाली," हा आळ मात्र मी मुळीच खपवून घेणार नाही, तुम्ही दिलेल्या गुलाबातली एक पाकळीसुद्धा मी व्यर्थ जाऊ दिली नाहीय." तरातरा ती घरात गेली आणि घरातून एक बरणी बाहेर घेऊन आली. ती म्हणाली, "तुम्ही दिलेल्या सगळ्या गुलाबांचा मी तुमच्यासाठी गुलकंद बनवलाय, असे डोळे विस्फारून काय बघताय, चक्कर आली काय तुम्हाला? घ्या, एक बोट हा गुलकंद तरी चाखून पहा." आता हे वाक्य कोणत्याही रसिक प्रेमवीरांच्या डोळ्यापुढे अंधारी आणायला पुरेसे होते. बिचाऱ्या आपल्या प्रेमवीराने विचार केला , प्रेमापायी जेवढा भुर्दंड सोसावा लागला तेवढा खूप झाला, प्रेमलाभ नाही तर नाही, गुलकंद कशाला दवडायचा, असे म्हणून ती आख्खी बाटली तो घरी घेऊन आला आणि त्याच औषधावर त्याने गुजराण केली. कवी ,ज्यांच्या नशिबात प्रेम नसेल त्यांना हा प्रेमाचा गुलकंद अर्पण करतो.
हि कविता आचार्य अत्र्यांनी लिहिली तेव्हा कविता उपमा, उत्प्रेक्षा, निसर्ग, साचेबद्ध विषय यांच्यामध्ये अडकलेली होती. अत्र्यांनी हे कुंपण मोडलं.अत्र्यांना आयुष्यात जेथे जेथे कुरूपता दिसली तेथे तेथे त्यांनी सडकून टीका केली. जेथे भव्यता दिसली तिथे भरभरून दाद दिली. त्यांच्या झेंडूची फुले या विडंबनात्मक कविता संग्रहात विनोदाचा आधार घेऊन त्यांनी जीवनातल्या विसंगतींवर मार्मिक भाष्य केले आहे. त्यामुळे या कविता प्रसिद्ध झाल्या नसत्या तरच नवल.
काव्य शास्त्र विनोदाची आवड नसलेला माणूस म्हणजे शेपूट नसलेला प्राणीच आहे.
काव्याची तर आवड नाही मात्र विनोद करायला खूप आवडते मग आम्ही कुठल्या प्राण्यात मोडतो 

I have no idea…I didn't write that line…it's an old saying…

No problem…just kidding 

आठवते ही कविता , तुमचा फक्त गुलकंदच होणार आमचे शिक्षक म्हणाले होते .




Aaplya dukkhat aamhi sahbhagi aahot.
माझा गुलकंद नाही झाला पण तुम्ही केलाय का कुणाचा 







Nahi na…evdh dedication ne roj gulab anun denara bhetalach nahi…tyamule durdaivane tashi sandhich milali nahi 

भेटला तर गुलकंद करू नका 





Thanks for the heads up 

अत्रेंनी कविता छानच लिहिले.माझ्यामते या कवितेतील ती तरीपण परवडली, निदान गुलकंद ज्याने गुलाब दिले त्यालाच परत केला..
. आणि हो, इतके गुलाब तिने सांभाळून त्यांचा अगदी योग्य उपयोग केला म्हणून तिला बुद्धिहीन तर नक्कीच म्हणता येणार नाही.मात्र आपल्या प्रेमवीराचे हे घोर अभाग्यच म्हणावे लागेल की इतक्या दीर्घ कालावधीत त्याचे प्रेम न कळण्याइतकी ती अरसिक निघाली. पण त्यालापण मानायला हवे, इतके होऊनही तो औषध म्हणून का होईना गुलकंद घेऊन आला, कबीर सिंग नाही झाला..
असो, छान उत्तर
. आणि हो, इतके गुलाब तिने सांभाळून त्यांचा अगदी योग्य उपयोग केला म्हणून तिला बुद्धिहीन तर नक्कीच म्हणता येणार नाही.मात्र आपल्या प्रेमवीराचे हे घोर अभाग्यच म्हणावे लागेल की इतक्या दीर्घ कालावधीत त्याचे प्रेम न कळण्याइतकी ती अरसिक निघाली. पण त्यालापण मानायला हवे, इतके होऊनही तो औषध म्हणून का होईना गुलकंद घेऊन आला, कबीर सिंग नाही झाला..
असो, छान उत्तर
No comments:
Post a Comment